Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पीकविम्यासाठी आंदोलन करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेने त्यांच्याकडे विमा कंपनीद्वारे प्राप्त झालेली १५५ कोटी १३ लाखांची रक्कम विना विलंब तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. ही रक्कम शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने रोख स्वरुपात द्यावी. अन्यथा या संदर्भात आंदोलनाचा पवित्रा घेत विधानसभेसमोर अधिवेशनावेळी उपोषण करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी 'मटा'शी बोलताना दिला. याबाबतची कल्पना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२०१४-१५मध्ये दुष्काळी स्थितीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील पिकांची मोठी हानी झाली. यावेळी पीकसंरक्षित केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने नुकसानभरपाई म्हणून १५७ कोटी ५ लाख ३४ हजार मंजूर केले. यापैकी १५५ कोटी १३ लाख रुपये उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेत जमा झाले.

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेने ही रक्कम जिल्ह्यातील पीक सं‌रक्षित केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीने दिलेल्या यादीनुसार जमा करणे अपेक्षित होते. मात्र, बँकेसंदर्भातील सीआरआरचा नियम दर्शवित बँकेने १५५ कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उस्मानाबाद येथील मुख्य शाखेत अल्प मुदतीसाठी ठेवून त्याच्यावर करोडो रुपये व्याज कमविण्याचा उद्योग आरंभिला आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या आर्थिक लाभांपासून वंचित राहू लागले. शिवाय त्यांना गरजेच्या वेळी ही रक्कम मिळणे दुरापास्त झाले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे आलेले हे १५५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जापोटी जमा करण्याचा या बँकेच्या संचालक मंडळाचा डाव होता. परंतु, काँग्रेस नेते मधुकर चव्हाण तसेच शेतकरी मंडळी यांच्या तसेच भारतीय जनता पक्षाचे अँड मिलिंद पाटील, संजय निंबाळकर, संजय पाटील दुधगावकर यांच्या प्रयत्नामुळे उस्मानाबाद जिल्हा बँकेचा हा डाव उघडकीस आला.

कारवाईची तंबी

जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक अरुण कदम यांना याप्रकरणी सर्तकता बाळगत शेतकऱ्यांच्या हक्काचे पीकविम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर विनाविलंब जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्याथा बँकेच्या संबधित पदाधिकारी व व अधिकारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तंबी आमदार चव्हाण यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकांविरुद्ध गुन्हे नोंदवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

पीक कर्जवाटप प्रकरणात शासन आदेशाची अवहेलना करीत टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीयीकृत, प्रादेशिक व खासगी बँका विरोधात कठोर कारवाईची भूमिका घेत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.

दरम्यान, शासनास सहकार्य न करणाऱ्या बँकांतील शासकीय ठेवी काढून घेण्याची तंबीही जिल्हाधिकारी यांनी या बँकांना दिली. एवढेच नव्हेतर स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या उस्मानाबाद शाखेतील ४०० कोटी रुपयांच्या शासकीय ठेवी व पंजाब नॅशनल बँकेतील शासकीय ठेवी या बँकांतून काढण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांना आदेशित केले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ७१२ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील विविध बँकांना देण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यातील सहकारी बँग वगळता अन्य सर्व बँकांनी या कामी असहकाराची भूमिका घेत अवघे २६१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या ३६ टक्के ही रक्कम आहे. पीक कर्ज वाटप बाबतच्या राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी नाउमेद होऊन आत्महत्येस प्रवृत्त होऊ लागला आहे.

यापूर्वीही राष्ट्रीयीकृत व खासगी बँका पीक कर्ज वाटप प्रकरणात मनमानी करून शिवाय इन्सपेक्शन चार्जेस म्हणून ५०० रुपये प्रत्येक खातेधारकास आकारत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. चौकशी अंती बँकाकडून लुटण्यात आलेली ही रक्कम ३ कोटी ५६ लाख रुपये असल्याचे उघडकीस आले. मात्र, या संदर्भात या बँकांविरोधात कारवाई करण्यास प्रशासनाने डोळेझाक केली. केवळ तंबी देऊन व बँकांच्या वरिष्ट अधिकाऱ्यांना याबबात समज देऊन हे प्रकरण नजरे आड करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ बोलल्या आणि अडकल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड तालुक्यातील वडोदचाथा येथील एका महिलेचे २१ जून रोजी कासोद शिवारातील विहिरीत प्रेत सापडले होते. हा खून असल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. कटात सहभागी असलेल्या महिला मृत महिलेच्या चुलतीजवळ 'आमच्याकडून चूक झाली,' असे सहज बोलून गेल्या. त्यावरून हा खून उघडकीस आला.

मृत अनुसया जनार्दन बिचारे (वय १९) या महिलेचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पण नवरा मुकबधिर असल्याचे लग्नानंतर समजल्याने ती माहेरी परत आली होती. तिचे आई-वडील भोळसर आहेत. तिच्या या असहाय्य परिस्थितीचा फायदा चारनेर येथील भगवान रामदास झोंड (वय २१) याने उठवला. ऊसतोड मुकादम रकीब पटेल (वय ३०, रा. चारनेर) याने भगवानची अनुसयासोबत ओळख करून दिली. त्यातून दोघांचे संबंध जुळले, अशी माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी दिली.

ऊसतोड मुकादम असल्याने पटेल याचे वडोदचाथा येथील शोभाबाई ज्ञानेश्वर साळवे (वय २८) व राधाबाई मनोहर गायकवाड (वय २७, रा. दोघी वडोदचाथा) यांच्याशी संपर्क होता. मृत अनुसयाने काही दिवसांपासून भगवानकडे लग्नाची मागणी केली होती. त्यामुळे यातून तो सुटका करून घेण्याच वाट पाहत होता. दरम्यान शोभाबाईलाही तिच्या पतीचे अनुसयासोबत संबंध असल्याचा संशय होता, असे पोलिसांनी सांगितले.

शोभाबाई व राधाबाई यांनी अनुसयाला मजुरीला जायचे आहे, असे सांगून २१ जून रोजी कासोद शिवारात नेले. तेथे भगवान, रकीब व शालिक साहेबराव भोटकर (वय २८ रा.सासुरवाडा) यांना बोलावून घेतले. सायंकाळी विहिरीवर अनुसयाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विहिरीत फेकून देण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर २३ जून रोजी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी संशयावरून पाच जणांना अटक केली असून त्यांना कोर्टासमोर उभे करण्यात आले, कोर्टाने पाचही जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

चुलतीने दिली माहिती

दरम्यान, मृत महिलेची चुलती निर्मला सोनाजी बेचारे यांच्याकडे संशयित महिला आरोपी ७ जुलै रोजी 'आमच्याकडून चूक झाली,' असे बोलून गेल्या. त्यावरून संशय बळावल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना ९ जुलै रोजी दिली. त्यावरून पोलिसांनी खूनाची उकल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक खोपडे यांनी तीन पथके पाठवून चार तासात पाच जणांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोडमध्ये रोगट कुत्र्यांचा सुळसुळाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड शहरात केस गळालेल्या व खरूज झालेल्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ही कुत्रे अंग खाजवत सैरावैरा धावत असल्याने पाळीव प्राणी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. सिल्लोड शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून ते गल्लीबोळातून दारोदार भटकत आहेत. विशेषतः केस गळालले, खरूज झाल्याने खाजवून, अंग घासून जखमा झालेल्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या अंगाची लाहीलाही होत असल्याने ते प्रसंगी सैरावैरा धावत सुटतात. पाळीव जनावरे व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या रोगट कुत्र्यांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. पालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. या संदर्भात पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी रत्नाकर पेडगावकर यांना विचारले असता, पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी रोगाचा इलाज करावा, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संत एकनाथ’च्या कामगारांचा संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

दोन महिन्यांपासून पगार थकल्याने संत एकनाथ साखर कारखान्याचे कामगार तीन दिवसांपासून संपावर गेले आहेत. दरम्यान, कारखाना चालविणाऱ्या खासगी कंपनीचे संचालक सचिन घायाळ यांनी कामगारांच्या आडमुठेपणामुळे कारखाना व कंपनी यांच्यातील करार लांबत असल्याचे म्हटले आहे. या परिस्थितीत कारखान्याच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.

सचिन घायाळ शुगर प्रा. लि. ने संत एकनाथ सहकारी साखर कारखाना १८ वर्षांसाठी भागीदारी तत्वावर चालविण्यासाठी घेतला आहे. भागीदारी तत्वावर घेण्याच्या सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहे. कारखान्याचे संचालक मंडळ, कामगार व खासगी कंपनी यांच्यातील अंतर्गत करार अद्याप झालेला नाही. गेल्यावर्षी कराराची प्रक्रिया पूर्ण न करता सचिन घायाळ कंपनीने कारखान्याचे गाळप पूर्ण केले, उसाचे पेमेंट दिले आहे.

कारखान्याच्या कामगारांनी दोन महिन्याचा पगार मिळावा, यासाठी तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनीने सुरुवातीला नियमित पगार दिला. पण गेल्या दोन महिन्यांचा पगार थकला आहे. पगार मिळेपर्यंत काम बंद ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पगार दिला जात नाही तोपर्यंत आम्ही संप सुरु ठेवणार असल्याचे कामगार संघटनेचे नेते सुभाष आढाव यांनी स्पष्ट केले.

कंपनीप्रमुख सचिन घायाळ यांनी या संपाचा व अंतर्गत कराराचा संबंध जोडला आहे. कारखाना, कंपनी व कामगारांमध्ये अंतर्गत करार न झाल्याने काही अडचणी येत आहेत. त्यामुळे एक महिन्याचा पगार थकला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चालवला, शेतकऱ्यांचे पेमेंट केले, कामगारांचे पगार नियमितपणे केले, असा दावा त्यांनी केला. कारखान्याचे संचालक, कंपनी अंतर्गत करार करण्यास उत्सुक आहेत. केवळ कामगारांच्या आडमुठेपणामुळे कराराची प्रक्रिया लांबत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तर कारखाना बंद

कामगारांनी आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवल्यास आम्हाला पुढच्या वर्षी कारखाना बंद ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. यावर्षी तालुक्यात सहा लाख टन उस उभा आहे. कारखाना बंद राहिल्यास या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असे सचिन घायाळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टोन क्रशर, खदानींचे गौडबंगाल कायम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या पंधरा दिवसांपासून औरंगाबाद तालुक्यामध्ये वाळू, मुरूम, दगड खाणींवर कारवाई सुरू आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतरही गौणखनिजच्या या मोहिमेला इतर तालुक्यांनी 'खो' दिला आहे. दरम्यान, खवड्या डोंगर कापल्याबद्दलचे वृत्त 'मटा'ने प्रकाशित करताच जिल्हा प्रशासनाने तातडीने या कारवाईचा अहवाल मागवला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण १४८ स्टोन क्रशर व ११४ दगडखाणी असल्याची नोंद गौणखनिज विभागात आहे. यातील सरकारी व खाजगी खदानींच्या आकड्यांबाबत मात्र संभ्रम आहे. सरकारी नोंदीनुसार औरंगाबाद तालुक्यात ६८, फुलंब्री २, पैठण ३२, सिल्लोड १६, कन्नड १२, गंगापूर २१ खदानींमधून रॉयल्टीनुसार उपसा करण्यात येतो. यातील बहुतांश खदानींवर स्टोन क्रशरही आहेत. जिल्ह्यात नोंद असलेल्या खदानींच्या या आकड्यांमध्ये काही खदानी कागदोपत्री बंद आहेत, पण ही माहिती प्रशासनाकडे नाही. कागदोपत्री बंद खदानीतून दगड, मुरुमाचा उपसा होत आहे. त्याबद्दल जिल्हा प्रशासनाकडे तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.

परवान्याची मुदत संपली

जिल्ह्यात पाच वर्षांच्या लीजवर देण्यात आलेल्या बहुतांश दगड खदानींची रॉयल्टी २०११-१२ मध्येच संपली आहे. यातील काही खदानचालकांनी गौणखनिज विभागाकडे रितसर परवाना देण्याची मागणी केली आहे. मात्र आता खदानचालकांना परवानगीसाठी खाणकाम आराखडा व पर्यावरण विभागाची मंजूरी आवश्यक आहे. यानुसार जिल्ह्यातून ७० आराखडे गौणखनिज विभागाला मिळाले आहेत.

अधिकाऱ्यांना बोलावले

जिल्ह्यात बेकायदा खदानींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी व आतापर्यंत खदानींवर काय कारवाई केली याचा अहवाल एका दिवसात सादर करण्याचे पत्र अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवले आहे. त्यांना शनिवारी (११ जुलै) अहवाल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांजणगावात रोखला पोलिसांनी बालविवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

रांजणगाव शेणपुंजी येथे बालविवाह एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी (१० जुलै) रोखला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला आई-वडिल नसल्याने नातेवाईक त्याचे लग्न लावून देत होते, अशी माहिती समोर आली आहे.

रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर गल्ली क्रमांक ४ मध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुला-मुलीचा कुटुंबांच्या संमतीने विवाह होत असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने पोलिस ठाण्यात फोन करून दिली. त्यानंतर पोलिसाचे पथकाने पोहोचले तेव्हा विवाहाची तयारी सुरू होती. येथे १५ वर्षाची मुलगी व १९ वर्षाच्या मुलाचा विवाह लावण्यात येणार होता. त्यावरून पोलिसांनी विवाह थांबवला व मुलीचे आई-वडील, मामा, मावस मामा, मुलाचे दोन मेहुणे या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. मुलाचा जन्म हा २१ ऑगस्ट १९९५ व मुलीचा जन्म १८ डिसेंबर २००० चा आहे. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम सन २००६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यावरून आजपासून कारवाई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यावसायिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा नाही केल्यास, दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. शनिवारपासून (११ जुलै) याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महापालिकेच्या कचरा संकलकांकडे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून द्यावा असे पालिकेतर्फे शहरातील बहुतेक व्यावसायिकांना कळविण्यात आले आहे. मात्र, त्याला व्यावसायिकांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालकिने कडक धोरण अवलंबिण्याचे ठरवले आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख उपायुक्त रवींद्र निकम यांनी दिली. या संदर्भात सर्व वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांची शुक्रवारी बैठक झाली. शहरातील सर्व हॉटेल, दुकानदार, छोटे-मोठे व्यावसायिक यांना उद्यापासून ओला-सुका कचरा वेगवेगळा करून तो कचरा संकलकांकडे जमा करण्याचे बंधन घालण्यात आले. जे व्यावसायिक हे बंधन पाळणार नाहीत, त्यांच्यावर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान कचरा डेपोच्या जागेसाठी तिसगाव शिवारातील जागा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे, अशी माहिती आयुक्त प्रकाश महाजन यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी जागा ताब्यात दिल्यावर, तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू केला जाईल, त्यामुळे त्या भागातील नागरिकांना कचऱ्याचा त्रास होणार नाही, असे महाजन म्हणाले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शासनाकडून निधी मिळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम देखील सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

रस्ता झाडणारे ७५ लाखांचे मशीन

महापालिका वाहनांच्या ताफ्यात शुक्रवारी रस्ता झाडणारी मशीन जमा झाली. टीपीआर कंपनीची ही मशीन ७५ लाख रुपये खर्च करून पालिकेने खरेदी केली आहे. रस्ता झाडत ही मशीन पुढेपुढे जाते. या मशीनच्या मागच्या बाजूस तीन टन कचरा मावेल इतक्या आकाराची ट्रॉली देण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरून ही मशीन फिरवण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाचीचे अपहरण; जमादार निलंबित

$
0
0

औरंगाबाद : लग्नासाठी भाचीचे अपहरण करणारा सिटीचौक पोलिस ठाण्यातील जमादार प्रताप इरप्पा सोनवणे याला शुक्रवारी निलंबित करण्यात आले. त्याच्याविरूद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सोनवणे याने सोमवारी त्याच्या भाचीचे लग्नाची मागणी घालत अपहरण केले होते. प्रकृती खराब झाल्याने तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. छावणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तिची सुटका करण्यात आली होती. दरम्यान, जमादार सोनवणे याने आपण आत्महत्या करण्यासाठी जात आहोत अशी चिठ्ठी पत्नीजवळ देत पलायन केले होते. मात्र, गुरूवारी पोलिसांनी त्याचा शोध घेत अटक केली. कोर्टाने सोनवणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. शुक्रवारी जमादार सोनवणेला निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

संशयित आरोपी गजाआड

सिडको पोलिस ठाण्याचे पथक बुधवारी पहाटे सिडको एन-६ भागात गस्त घालीत होते. यावेळी त्यांना अंधारात लपण्याचा प्रयत्न करीत असलेला संशयित आरोपी राजू छगन सोळुंके (वय ३० रा. कोलते पिंपळगाव, ता. भोकरदन) हा आढळला. पोलिसांनी राजूला अटक केली असून त्याच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता मायलेकीचा शोध

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी परिसरातील महिला नवऱ्याच्या भांडखोर स्वभावाला कंटाळून सज्ञान मुलीसह दोन वर्षापूर्वी घर सोडून गेली होती. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत या दोघींचा शोध घेण्यात आला. मात्र, दुर्दैवाने आपल्या पत्नी व मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पतीचा गेल्या वर्षीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

छावणी परिसरातील माया (वय २२ नाव बदललेले आहे) ही तिच्या आईसोबत ३ जून २०१३ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती. पती-पत्नीचा सतत वाद होत असल्यामुळे या दोघींनी घर सोडले होते. १ जुलैपासून हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी 'ऑपरेशन मुस्कान' मोहीम राबविण्यात येत आहे. या दोघी मायलेकी बेगमपुरा परिसरात असल्याची माहिती खबऱ्याने छावणी पोलिसांना दिली होती. या माहितीवरून पोलिसांनी या दोघींचा शोध घेतला. पत्नी व मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्या पतीचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे २ जुलै २०१४ रोजीच निधन झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, या मायलेकींनी बेगमपुरा परिसरात राहण्यास पसंती दिली असून पोलिसांनी त्यांच्या पत्त्याची नोंद घेतली आहे.

वडिलांच्या मृत्यूची मुलीला होती माहिती

आपल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती त्यांच्या मुलीला होती. ही तरुणी त्यांच्या अंत्ययात्रेत देखील सहभागी झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीम आर्यन्स’कडून रेसिंग कार निर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोसायटी ऑफ अॅटोमोटिव्ह इंजिनिअर्सतर्फे होणाऱ्या एसएई-सुप्रा या फॉर्म्युला कार रेसिंग स्पर्धेसाठी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम आर्यनने 'रेसिंग कार'ची निर्मिती केली आहे. चेन्नईत १५ ते १९ जुलै दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत ही कार सहभागी होईल.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा यासाठी एसएई - इंडिया तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी देशातील १२० संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कारची क्षमता ३९० सीसी आहे. या कारचा ताशी वेग १२० किलोमीटर असून, ही कार अवघ्या १२ सेकंदात १०० किलोमीटरचा वेग गाठते. सोनाली बेलापूरकर ही टीमची कॅप्टन असून गणेश कासले व निखिल बडवे हे चालक असणार आहेत. तसेच वैभव कांबळे, स्वामी शुभम, योगेश घोडके, पूजा जगदाळे आदींचा टीममध्ये समावेश आहे.

कार बनवण्यासाठी प्रा. आंबेकर, डॉ. चिकलठाणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे प्राचार्य डॉ. मरनाळ, विभागप्रमुख डॉ. श्रीवास्तव, डॉ. कहाळेकर, डॉ. पाटील व सर्व प्राध्यापक वृंद तसेच सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या कारसाठी बजाज ऑटो, संजीव ऑटो, व्हेरॉक, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स, इंड्यूरन्स, रूचा इंजिनीअरिंग, जयश्री इंडस्ट्रीज आदींचे प्रायोजकत्व लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्तार अधिवेशनानंतरचः दानवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. अन्य मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असेही त्यांनी सूचित केले. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना शासन मदत करण्यात येईल, असे सांगून, 'विरोधकांच्या भ्रष्टाचाराती प्रकरणे बाहेर काढणार,' असा इशाराही त्यांनी दिला.

सिपेटच्या वसतिगृहाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे शुक्रवारी शहरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी होईल, अशी अपेक्षा होती, परंतु काही राजकीय घडामोडीमुळे विस्तार तूर्तास न करता तो अधिवेशनानंतरच होईल. शिवसेना भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. युती म्हणून राज्यात चांगल्या पद्धतीने कारभार पाहात असून, मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेसह मित्रपक्षांचा समावेश असेल, असे दानवे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसने सुरू केलेल्या आंदोलनाविषयी बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत गंभीर असल्याचे सांगितले. काँग्रेस आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत ८ हजार कोटी रुपयांची मदत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केली तर, महायुती सरकारने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना एकाच वर्षांत सुमारे ७ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. दुबार पेरणीची वेळ आल्यास शासन पुन्हा मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यानिमित्ताने का होईना काँग्रेसला आंदोलन कसे करावे लागते, हे समजले असा, टोलाही त्यांनी मारला.

मध्यावधी निवडणुकांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेल्या विधानबाबत विचारले असता दानवे यांनी, पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु ते जे म्हणतात, ते नेहमीच खंर होत असे नाही. राज्यातील व केंद्रातील सरकार संपूर्ण कालावधी पूर्ण करणार, असे सांगितले.

विरोधकांच्या मागे आता ससेमिरा

महिला व बालविकास विभागाकडील निधी मार्चनंतर परत गेला असता त्यामुळेच जुन्या दरकरारानुसार चिक्कीसह विविध वस्तूंची करण्यात आली, असा दावा प्रदेशाध्यक्षांनी केला. यात गैरप्रकार असेल तर आधीच्या सरकारने केलेल्या चिक्की खरेदीची चौकशी करावीच लागले. विरोधकांचे भ्रष्टाचाराचे प्रकरणेही बाहेर काढू, असा इशाहारी त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीसाठी सभागृह बंद पाडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने त्यात भर पडली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी देईपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही. सरकारविरुद्ध काँग्रेसने एल्गार पुकारला आहे, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी औरंगाबादेत दिला.

अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काँग्रेसने औरंगाबादेत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातून काँग्रेसचे पुढारी, नेते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहागंज येथील गांधी भवनातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व चव्हाणांनी केले. प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, महिला आघाडीच्या शोभा खोसरे, प्रभाकर मुठ्ठे, झेडपी अध्यक्ष श्रीराम महाजन, सभापती विनोद तांबे यांच्यासह पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले. चव्हाण म्हणाले,'शेतकरी हित पाहत काँग्रेसने नऊ व दहा जुलै रोजी राज्यभर मोर्चे काढले. मागील चार महिन्यांत विदर्भ व मराठवाड्यातून १२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाऊस नसल्याने शेतकरी आज अडचणीत आला आहे. वर्षभरात पाऊस नाही, पीक नाही, जे थोडेफार आले होते. ते गारपीट व अवकाळी पावसाने धुवून नेले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. दुर्देवाने सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सरकार परदेश दौरे करत आहे पण त्यांना गावात येता येत नाही. शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला उठवण्याचे काम काँग्रेस करणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत सभागृह चालू देणार नाही. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणे अवघड झाले आहे. आपल्याकडे १५ टक्के बियाणे बोगस आहेत. पाण्याच्या बाबतीत मराठवाड्यात कायम अन्याय झालेला आहे. यापुढे हे सहन केले जाणार नाही.' धनगर, मुस्लिम, लिंगायत, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. मराठवाड्यातील संस्था विदर्भात पळवून नेल्या जात आहे. मराठवाडा आता पोरका नाही. मी मराठवाड्याची उपेक्षा सहन करणार नाही, अशा इशारा चव्हाण यांनी दिला.

आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड, एम. एम. शेख यांचीही यावेळी भाषणे झाली. भाषणानंतर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांना सादर केले.

औताडेंच्या कानपिचक्या

जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी अशोक चव्हाणांसमोर भाषण करताना स्थानिक नेत्यांना कानपिचक्या दिल्या. भाषण करणे सोपे असते, पण अशा कार्यक्रमांसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित होते. नेत्यामागे पाठबळ दिले पाहिजे. आमदार सत्तार यांचे याठिकाणी विशेष धन्यवाद असे म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्षांना योग्य तो संदेश दिला. राजकारण करू नये, प्रत्येकाने आपण पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहोत, याची जाणीव ठेवावी, असा सल्ला औताडेंनी जिल्ह्यातील बड्या नेत्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयावरून तिघांचा नांदेडमध्ये खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

संशयावरुन कुटुंबप्रमुखाने पत्नी, मुलगा आणि भावाचा कुऱ्हाडीने घाव करून खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास अंतरगाव शिवारात घडली. या प्रकारानंतर आरोपीने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गऊबाई प्रल्हाद तोडे (वय ४०), हनमंत प्रल्हाद तोडे (वय ११) अशोक तोडे (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. कुंटूरपासून १८ किलो मीटर अंतरावरील अंतरगाव येथे प्रल्हाद तोडे हे त्याची पत्नी, मुलगा व भावसोबत राहत होते. तिघेजण झोपलेले असताना प्रल्हादने कुऱ्हाडीने घाव घालून करून खून केला. याप्रकरणी नारायण तोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ वर्षांत मुलींच्या जन्मदरात १० टक्क्यांपर्यंत वाढ

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

'बेटी बचाव, बेटी पढाव' उपक्रम देशभर राबवून मुलींचा जन्मदर आणि शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश येत आहे. औरंगाबाद शहरात गेल्या पाच वर्षांत मुलींच्या जन्मदरात सहा ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. महापालिकेने सोनोग्राफी केंद्रांवर केलेली प्रभावी कारवाई आणि हाती घेतलेले जनजागृती अभियान यांना जन्मदर वाढीचे श्रेय द्यावे लागेल.

मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर फारच कमी आहे, अशी चर्चा पाच-सात वर्षांपूर्वी होत होती. शंभर मुलांमागे ७० ते ८० मुली असे प्रमाण असल्याची आकडेवारी सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आली. मुलींच्या जन्मदराचे प्रमाण एवढे कमी असल्याची शासकीय पातळीवर चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सोनोग्राफी सेंटरवर कारवाई, डॉक्टरांप्रमाणेच नागरिकांमध्येही करण्यात आलेली जनजागृती यांना सुरुवात करण्यात आली. शासनाने २००२मध्ये पीसीपीएनडीटी कायदा (प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा) लागू केला, पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नव्हती. गेल्या पाच वर्षांत या कायद्याच्या अंमलबजावणीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष लक्ष दिले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०११मध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण सरासरी ८४.४० टक्के होते. त्याच वर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण ८० ते ८८ टक्के होते. त्यात पुढच्या पाच वर्षांत टप्प्या टप्प्याने वाढ होत गेली. २०१४मध्ये मुलींच्या जन्मदराचे प्रमाण ९१ टक्क्यांवर गेल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. २०१५च्या जानेवारी, ते मार्च या तीन महिन्यांतील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण ९०.८९ टक्के आहे.

पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि सोनोग्राफी केंद्रांवर करण्यात आलेली कारवाई यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाली. जनजागृतीचाही यात मोठा वाटा आहे.

- डॉ. संध्या टाकळीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुबईसाठी हवाहवाई!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून आता थेट काही तासांत दुबई गाठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच एअर इंडियाच्या माध्यमातून अशी विमानसेवा सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती एअर इंडियाच्या कार्गो मॅनेजर मानसी थत्ते यांनी शुक्रवारी दिली.

एअर इंडिया इंटरनॅशनल कार्गो सर्व्हिस बाबत माहिती देण्यासाठी रामा हॉटेल येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत खासदार चंद्रकांत खैरे, सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे यांच्यासह कॉस्मो कंपनीचे आनंद जैस्वाल, अतुल बोंगीरवार, प्रभारी विमानतळ संचालक यु. जी. येवले यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. खैरे यांनी एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची सूचना केली.

या सूचनेबाबत बोलताना थत्ते म्हणाल्या, 'एअर इंडिया औरंगाबाद विमानतळावरून औरंगाबाद दुबई अशी विमानसेवा आठवडयातून एकदा सुरू करण्याच्या विचारात आहे. याबाबत नागरी उड्डयन मंत्रालयाकडून प्रस्ताव मिळाल्यास आम्ही दुबईसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहोत.'

एअर इंडियाची ना-हरकत आवश्यक

देशात कोणत्याही मार्गावर खासगी विमान कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठविला जातो. या मार्गावर खासगी विमान कंपनीची सेवा सुरू करण्यापूर्वी एअर इंडियाकडून संबंधित मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा विचाराबाबत विचारणा केली जाते. एअर इंडिया ही कंपनी शासकीय अधिपत्याखाली असल्यामुळे पहिला मान एअर इंडियाला दिला जातो. औरंगाबाद विमानतळावरून औरंगाबाद दुबई विमानसेवा एअर इंडियाने सुरू करण्याची तयारी दर्शविल्याने आगामी काळात औरंगाबाद दुबई विमानसेवा सुरू होण्यास हरकत नाही.

औरंगाबाद दुबई विमान सेवा सुरू करण्यासाठी एअर इंडिया तयार असल्यामुळे आता प्रस्ताव मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी आहे. यासाठी निश्चित पाठपुरावा करून आठवडयात एकदा तरी औरंगाबाद दुबई विमानसेवा सुरू करण्याचा माझा प्रयत्न राहील.

- चंद्रकांत खैरे, खासदार

औरंगाबाद-दुबई विमानसेवा पर्यटक आणि व्यवसायिकांसाठी आवश्यक आहे. शिवाय अन्य देशांमध्ये जाण्यासाठी दुबई कनेक्शन आवश्यक राहणार आहे. यासाठी आमचाही प्रयत्न राहणार आहे.

- आशिष गर्दे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य‌िकांचा वाद पोलिसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत जाणिवपूर्वक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करीत 'परिवर्तनवादी आघाडी'चे उमेदवार आणि समर्थकांनी शुक्रवारी गोंधळ घातला. निवडणूक अधिकारी चंद्रदेव कवडे यांना अरेरावी करीत समर्थकांनी मतदारयादी भिरकावली. तोडगा निघत नसल्यामुळे हा वाद अखेर क्रांतिचौक ठाण्यात पोहचला. यावेळी 'परिवर्तनवादी'च्या उमेदवारांनी पोलिसांना तक्रार अर्ज दिला.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली असतानाच शुक्रवारी (१० जुलै) दुपारी 'मसाप' निवडणूक कार्यालयात साहित्यिकांचे 'महाभारत' घडले. या निवडणुकीत 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हस्तक्षेप करीत असून, विरोधी मतदारांची नावे परस्पर वगळत असल्याचा आक्षेप 'परिवर्तनवादी आघाडी'चे उमेदवार व समर्थकांनी घेतला. काही मतदारांचे पत्ते बदलण्यात आले असून, मतपत्रिका ठाले-पाटील यांच्या घरी पोहचत आहेत; तसेच प्रकाशित मतदारयादीत फेरबदल करून निवडणूक अधिकारी कवडे यांनी मतदारयादी बदलली, असा आरोप करण्यात आला. यावेळी 'परिवर्तनवादी'चे उमेदवार डॉ. सतीश खुल्लोडकर, राजीव जहागिरदार, डॉ. पुंडलिक कोलते, डॉ. ललित अधाने व ईश्वर काळे आक्रमक झाले होते. पॅनलचे समर्थक गजानन सानप आणि भारत खैरनार यांनी, 'मतदारयादी बदलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला,' असा सवाल करीत कवडे यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला.

या गोंधळात कवडे यांना खुलासा करण्याची संधी दिली नसल्याने आणखी पेच वाढला. त्यातच सानप यांनी कवडे यांच्या टेबलावरील मतदारयादी व कागदपत्रे फेकली. ही निवडणूक प्रकिया रद्द करून कवडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी सानप यांनी केली. वाद चिघळत असल्यामुळे अखेर क्रांतिचौक पोलिसांनी मध्यस्थी करत कवडे व 'परिवर्तनवादी'च्या उमेदवारांना ठाण्यात आणले. हा वाद विकोपाला गेल्यामुळे पोलिस ठाण्यातही साहित्यिकांचे शाब्दिक युद्ध रंगले. दरम्यान, 'परिवर्तनवादी'च्या उमेदवारांनी पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांना तक्रार अर्ज दिला आहे.

आक्षेपाची पद्धत चुकली

मतदाराचा पत्ता बदलला, नाव वगळले किंवा कुणी मृत झाल्यास या दुरुस्तीबाबत आक्षेप मागवण्यात आले होते; मात्र कायदेशीर मार्ग सोडून गोंधळ घालणे अनुचित प्रकार आहे, असे डॉ. चंद्रदेव कवडे यांनी 'मटा'ला सांगितले. घरपोच मतपत्रिका मिळाली नसल्यास अर्ज दिल्यानंतर मतपत्रिका तात्काळ देता येते, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर हॉस्पिटलला संजीवनी

$
0
0

निखिल निरखी, औरंगाबाद

शहरातील शासकीय कॅन्सर हॉस्पिटल अर्थात शासकीय विभागीय कर्करुग्णालयातील गोरगरीब व सर्वसामान्य कर्करुग्णांच्या मदतीसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल धावून आले अाहे. 'टाटा हॉस्पिटल'च्या आधाराने कॅन्सर हॉस्पिटलला संजिवनी मिळणार आहे. 'टाटा'च्या माध्यमातून म्हणजेच केंद्र सरकारकडून कॅन्सर हॉस्पिटलसाठी तब्बल चार कोटींचे विशेष उपकरण मिळणार आहे; तसेच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसलेले सर्व उपचार, शस्त्रक्रिया करण्यासाठी 'टाटा'चे अतिविशेष तज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये नियमितपणे येणार आहेत व रुग्णांच्या गरजेनुसार तज्ज्ञांची संख्या वाढवली जाणार आहे. त्याशिवाय हॉस्पिटलसाठी 'टाटा'चे संपूर्ण मार्गदर्शन व सक्रिय सहभाग असणार असून, लवकरच ही विस्तारित अत्युच्च सेवा मिळणार आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, 'टाटा'चे संचालक (अॅकेडेमिक्स) डॉ. कैलास शर्मा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमइआर) संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आदींच्या उपस्थितीत तीन जुलै रोजी मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती डॉ. शिनगारे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिली. 'टाटा'च्या विशेष योजनेअंतर्गत या प्रकारची अत्युच्च वैद्यकीय सेवा राजस्थान, तमिळनाडूनंतर महाराष्ट्रामध्ये औरंगाबादेतील कॅन्सर हॉस्पिटल येथे एकमेव ठिकाणी मिळणार आहे, हे विशेष.

या विस्तारित सेवेत टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून व केंद्र सरकारकडून कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तीन ते चार कोटींचे 'भाभा ट्रोन' हे शरीराच्या बाहेरून रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त भारतीय बनावटीचे उपकरण येणार आहे. हॉस्पिटलमध्ये या प्रकारचे 'लिनिअर अॅक्सेलेटर' हे १६ कोटींचे विदेशी उपकरण असले तरी, रेडिएशनच्या उपचारासाठी सध्या हॉस्पिटलमध्ये तब्बल तीन ते चार महिन्यांचे वेटिंग आहे. त्यामुळेच रेडिएशनचे रुग्ण विभागले जावेत व वेटिंग अगदी एक ते दोन दिवसांवर यावे, या उद्देशाने नवीन उपकरण हॉस्पिटलमध्ये बसविले जाणार आहे. परिणामी, संपूर्ण मराठवाडा, खान्देश, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातून व काही प्रमाणात दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या कर्करुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार आहेत; तसेच मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी कित्येक दिवस फुटपाथवर काढणाऱ्या मराठवाडा-विदर्भातील गोरगरीब कर्करुग्णांना या विस्तारित सेवेमुळे दिलासा मिळणार आहे.

कन्सल्टंट येणार आठवड्याला

कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारचे उपचार किंवा शस्त्रक्रिया होत नाहीत, असे उपचार-शस्त्रक्रिया करण्यासाठी 'टाटा'चे अतिविशेष तज्ज्ञ दर आठवड्यातून काही दिवस येणार आहे. प्रारंभी असे दोन तज्ज्ञ येणार असून, रुग्णांच्या गरजेनुसार त्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

'टाटा'कडून उच्च शिक्षण-प्रशिक्षण

'टाटा'कडून तज्ज्ञांची सेवा मिळणार आहेच; शिवाय औरंगाबादसह मराठवाड्यातील पात्र डॉक्टरांचा दहा वर्षांचा बाँड करून कॅन्सरविषयीचे अत्युच्च शिक्षण-प्रशिक्षणही 'टाटा'कडून दिले जाणार आहे. अशा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विशेष वेतन देण्यात येणार असून, शिक्षण-प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहेत. विशेष तज्ज्ञांमुळे या विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू होणार आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा पुढाकार आहे; तसेच मूळ लातूर येथील असलेले 'टाटा'चे संचालक डॉ. शर्मा यांना मराठवाड्यातील कर्करुग्णांविषयी आस्था अाहे. त्यामुळेच हा निर्णय होऊ शकला. लवकरच ही विस्तारित सेवा सुरू होईल.

- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, डीएमईआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'राकाज्'चा आज नव्याने पंचनामा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शलाका इंजिनीअरच्या राकाज् लाइफ स्टाइल क्लबला सील लावताना औरंगाबाद महापालिकेने कायद्याचा अवलंब केला नाही हे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात स्पष्ट झाले. आता ज्योतीनगरातील 'राकाज्'चा पालिका नव्याने पंचनामा करणार आहे. या पंचनाम्यानंतर पालिका कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार आहे. अटीचे भंग केल्याने महापालिका प्रशासनाने शलाका इंजिनीअरच्या राकाज् लाइफ स्टाइल क्लबला सील केले होते. या कृतीला 'शलाका'ने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. स्पोर्टस् क्लबचे आरक्षण असताना बेकायदा हुक्का पार्लर, पूल टेबल, रेस्टॉरन्ट आदीही चालविले जात होते.

या याचिकेवर शुक्रवारी न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांच्यासमोर सुनावणी झाली. कायद्यात व नियमात तरतूद नसताना पालिकेने सील का लावले, अशी विचारणा कोर्टाने पालिकेचे वकील अतुल कराड यांना केला. कराड यांनी पालिकेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण कोर्टाचे समाधान झाले नाही. कायद्यानुसार व करारनाम्यातील अटीनुसार आयुक्तांना करार रद्द करण्याचा अधिकार आहे, पण सील करण्याचा अधिकार नाही. तरीही पालिकेने सील ठोकण्याची कारवाई केली होती. आयुक्तांशी चर्चा करून नव्याने पंचनामा करून सील उघडण्यात येईल, असे कराड यांनी सांगितले. कोर्टाने कराड यांनी केलेल्या निवेदनावर याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्याची बाजू अनिल बजाज व आदित्य संचेती यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कारच्या धडकेत दोघे गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

साजापूरहून भांगसीमाता गडाकडे देवदर्शनासाठी जाणाऱ्या तवेरा गाडीसमुंबईकडून येणाऱ्या झायालो कारने धडक दिली. त्यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना नागपूर-मुंबई महामार्गावरील साजापूर करोडी फाटा येथे दुपारी तीनच्या सुमारास घडली.

सिडको वाळूज महानगरमध्ये राहणारे भगवान पाटील हे गुडईअर कंपनीत काम करतात. अधिक मास महिना असल्याने भगवान पाटील त्यांची पत्नी व दोन मुले मिळून त्यांच्या मालकीच्या तवेरामधून (क्रमांक- एमएच २० सीएच ६१८५) भांगसीमाता गडावर देवदर्शनासाठी जात होते. यावेळी शेजारी राहणाऱ्या रेखा कोर व त्यांची मुलगी, संदीप पाटील व त्यांचे पत्नी व मुले तसेच भगवान पाटील यांचे सासरे प्रताप पाटील व सासू ( दोघेही रा. जयभवानी चौक बजाजनगर) मिळून जात होते.

साजापूरहून भांगसीकडे जाण्यासाठी मुंबई-नागपूर हायवे ओलंडत असतांना मुंबईकडून येणाऱ्या झायालो गाडी (क्र. एमएच ०५ बीएम ०९९०) या गाडीने जोरदार धडक दिली. त्यामुळे तवेरा गाडी पलटी होऊन त्यातील प्रवाशी रेखा कोर, चालक भगवान पाटील गंभीर जखमी झाले. इतर काहीजण किरकोळ जखमी झाले. अपघात होताच नागरीकांनी तात्काळ मदत करून पलटी झालेली तवेरा उभी करून जखमींना खासगी वाहनातून घाटी रुग्णालयात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images