Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हिताच्या निर्णयांना आयुक्तांचा हरताळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पदभार स्वीकारल्यावर महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच बैठकीत नागरिकांच्या हिताचे काही निर्णय घेतले. मात्र, प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी त्यात लक्ष दिले नाही, कार्यवाही देखील केली नाही. हे खेदजनक आहे, असा आरोप उपमहापौर प्रमोद राठोड यांनी बुधवारी आयुक्तांच्या नावे पत्र देऊन केला.

आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रात प्रमोद राठोड यांनी म्हटले आहे की, 'महापालिकेचा एक स्वतंत्र फोन क्रमांक असावा. ज्या क्रमांकावर नागरिक वेगवेगळ्या तक्रारी करू शकतील असे ठरवण्यात आले होते. त्याच प्रमाणे इंटर अॅक्टिव्ह व्हाइस रिसपॉन्स सिस्टीम सुरू करण्याचे देखील ठरवण्यात आले होते, पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. महापालिकेच्या मुख्य इमारतीत वायफाय सिस्टीम सुरू करण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यावरही प्रशासनातर्फे 'चर्चा' असा अभिप्राय देण्यात आला. महापालिकेने अॅन्डॉइड अॅप्लिकेशन बनवण्याची चर्चा देखील झाली होती, पण या प्रकरणाचीही अद्याप दखल घेण्यात आली नाही. शहरातील चौक आणि स्मशानभूमी विकासासाठी उद्योजक, संस्थांना दत्तक देण्याचा निर्णय झाला.

त्यानुसार काही जणांनी दत्तक घेण्याबाबत महापालिकेकडे पत्र व्यवहार केला, पण प्रशासनाने त्यालाही प्रतिसाद दिला नाही. समांतर जलवाहिनीच्या ऐनवेळच्या विषयावर तसेच वॉटर युटिलिटी कंपनीचे देयक अदा करण्यासाठी तत्परता दाखवत प्रशासन कारवाई करते. त्याच प्रकारे नागरिकांच्या हितासाठी व उपयोगासाठी प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असताना प्रशासन मात्र निष्काळजीपणा दाखवत आहे. याचा खेद वाटतो', असे राठोड यांनी नमूद केले आहे.

'राकाज'वर कारवाई करा

'राकाज् लाइफस्टाइल क्बलच्या संदर्भात 'मटा' शी बोलताना प्रमोद राठोड म्हणाले, 'खासदार चंद्रकांत खैरे युतीचे नेते आहेत. राकाज् प्रकरणाची त्यांनी संपूर्ण माहिती घ्यायला हवी होती. 'राकाज'वर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली पाहिजे. विजया रहाटकर यांनी नागरिकांच्या सुविधेसाठी राकाज् सुरू करण्यास मान्यता दिली, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाचे वर्तन केले. तेथे सुविधा आहेत की असुविधा आहेत याची त्यांनी वारंवार पाहणी करायला हवी होती. अधिकाऱ्यांनी ते केले नाही. खैरे यांनी अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करून, त्यासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे', असे राठोड म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगररचना अधिकाऱ्यांचा घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूलच्या गट क्रमांक २०१ च्या ले-आऊट आणि बांधकाम परवानगी प्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागातील तीन अधिकारी रडारवर येण्याची शक्यता आहे. या जमिनीला एन.ए. प्रमाणपत्र देणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडेही संशयाची सुई वळते आहे.

महापालिकेत गेल्या दोन दिवसांपासून हर्सूलच्या गट क्रमांक २०१ बद्दल चर्चा सुरू झाली. या गट क्रमांकावर घरे बांधण्यासाठी महापालिकेने नागरिकांना परवानगी दिली, पण त्यानंतर जेल प्रशासनाने आक्षेप घेतला. त्यामुळे बांधकाम परवानग्या रद्द करून घरे पाडण्याचे काम महापालिकेने सुरू केले. 'त्या' ले-आऊट संदर्भात अधिक माहिती घेतली असता महापालिकेने २०११ मध्ये या ले-आऊटला मंजुरी दिल्याचे समजले. सुमारे आठ एकरातील या प्रकल्पाला मंजुरीबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातून एन.ए. (नॉन अॅग्रिकल्चर) प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विविध आकाराचे प्लॉट जमीन मालकाने विकले.

त्या काळात पाचशे ते हजार रुपये प्रति चौरस फूट दराने प्लॉटस् ची विक्री केली. या संपूर्ण ले-आऊटमध्ये १७० ते १८७ प्लॉटस् पाडले. नंतर पालिकेने २०१४-१५ मध्ये संबंधितांना त्या प्लॉटवर घरे बांधण्यासाठी बांधकाम परवानगी दिली. ले-आऊट मंजूर करताना आणि जमिनीचे एन.ए. करताना विविध सहा कार्यालयांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. या प्रकरणात हे ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते का, यापैकी कोणी प्रत्यक्ष जागेची नियमानुसार पाहणी केली होती, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे.

अनुत्तरित प्रश्न

ले-आऊटला मंजुरी देताना २०११मध्ये महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक कोण होते ?

महापालिकेच्या नगररचना विभागातील त्यावेळचे शाखा अभियंता व उपअभियंता कोण होते ?

सहायक संचालकांच्या स्वाक्षरीनंतर त्या ले-आऊटच्या फाइलवर स्वाक्षरी करणारे आयुक्त कोण होते ?

त्या जमिनीचा अकृषक परवाना जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणत्या अधिकाऱ्याने दिला ?

२०१४-१५ यावर्षी संबंधितांना ज्या बांधकाम परवानग्या देण्यात आल्या, त्यावर कोणाची स्वाक्षरी आहे ?

चुकीच्या पध्दतीने मंजूर केलेले ले-आऊट व दिलेल्या बांधकाम परवानग्यांबद्दल महापालिकेचे आयुक्त कुणाला जबाबदार धरणार?

हर्सूलच्या गट क्रमांक २०१ चा ले-आऊट कोणत्या आधारे मंजूर केला, त्याला अकृषक परवाना कुणी दिला, याची सखोल चौकशी व्हावी. दिलेल्या बांधकाम परवानग्या रद्द करणे हा देखील गंभीर प्रकार आहे. त्याचीही चौकशी करावी.

- विजय औताडे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्ड’चा काथ्याकुट; अखेर संप मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह यांच्यासह घाटी प्रशासनाच्या आश्वासनानंतर, तसेच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्यानंतर आणि निवासी डॉक्टरला मारहाण करणारे हेच आरोपी असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही 'मार्ड'चा काथ्याकुट व बैठकांचे गुऱ्हाळ बुधवारी (२२ जुलै) रात्री उशिरापर्यंत सुरुच होते. संप मागे घेणार किंवा नाही, या विषयी कमालीची संभ्रमावस्था होती व माध्यमांनी संघटनेला संपर्क साधूनही माहिती न दिल्याने गोंधळ वाढतच गेला. अखेर संप मागे घेण्यात आला आणि रात्री नऊ वाजता निवासी कामावर पतरणार असल्याचे 'मार्ड'चे शहर उपाध्यक्ष डॉ. डॉ. अक्षय काशीद यांनी 'मटा'ला रात्री साडेआठच्या सुमारास सांगितले.

दरम्यान, बुधवारी संपाचा फटका स्पष्टपणे दिसून आला आणि रुग्णालयातील शस्त्रक्रिया निम्म्यापेक्षा कमी झाल्या. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील नोंदीनुसार, बुधवारी केवळ ११ शस्त्रक्रियांची नोंद झाली, ज्या एरवी किमान ५० ते ६० शस्त्रक्रिया होतात. परिणामी, संपामुळे रुग्णांना वेठीला धरण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

घाटीच्या अपघात विभागामध्ये रविवारी (१९ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास रुग्णाच्या मृत्यूनंतर तीन नातेवाईक-परिचितांनी मेडिसिन विभागाच्या एका निवासी डॉक्टरला मारहाण व धक्काबुक्की केली. त्यामुळे मंगळवारी सकाळी आठपर्यंत तिघांना अटक न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला होता व त्यांना अटक न झाल्याने संघटनेने संपाला सुरुवात केली. दरम्यान, संपाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. त्याच संध्याकाळी दोन आरोपींना पकडण्यात आले. मात्र त्यांची ओळख पटली नसल्याचे कारण देत सोमवारी संप सुरुच ठेवण्यात आला.

निवासींशी दिवसभर चर्चा

या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये निवासी डॉक्टरांना आश्वासन दिले. ज्याप्रमाणे रुग्ण डॉक्टरांवर विश्वास ठेवतात, त्याचप्रमाणे निवासी डॉक्टरांनीही प्रशासनावर व पोलिसांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. तसेच घाटी प्रशासनानेही निवासी डॉक्टरांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली व त्यांनीच मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संप मागे घेणार असल्याचे आश्वासन संघटनेने प्रशासनाला दिले होते. मात्र प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत बैठकांचे गुऱ्हाळ सुरुच होते. 'मटा'ने संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास राठोड यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने उपाध्यक्ष डॉ. अक्षय काशिद यांच्याशी संपर्क साधल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेलिफिशिंग अॅटॅकरचा २१ हजाराचा गंडा

$
0
0

औरंगाबाद : टेलिफीशिंग अॅटॅकरने तरुणाला २१ हजाराला गंडा घातल्याचा प्रकार २४ जून रोजी देवळाई भागात घडला आहे. एटीएम कार्ड बंद पडल्याची थाप मारून सांकेतिक क्रमांक मिळवून हा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताजअली सैजारअली (वय ३२ रा. सरदार रेसीडेंसी, देवळाई) यांच्याकडे बँक ऑफ बडोदाचे अेटीएम कार्ड आहे. २४ जून रोजी ताजअलीच्या मोबाइलवर एका अनोळखी मोबाइलधारकाने फोन केला. तुमचे एटीएम कार्ड बंद पडले असून ते चालू करावयाचे असल्यास बारा अंकी पिन क्रमांक देण्याची मागणी केली. ही थाप खरी मानून ताजअलीने समोरील भामट्याला पिन क्रमांक सांगितला. यानंतर काही वेळातच त्यांच्या बँकेच्या शाखेतून ऑनलाइन २० हजार ९१९ रूपये काढून घेण्यात आले. काही दिवसानंतर हा प्रकार ताजअलीच्या निदर्शनास आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी, डॉक्टरची आत्महत्या

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सातारा परिसर आणि मध्यवती बसस्थानक परिसरात या घटना घडल्या. यामध्ये निवृत्त नायब तहसीलदारासहित जालना येथील होमीयोपॅथिक डॉक्टराचा समावेश आहे. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निवृत्त नायब तहसीलदार भानुदास लक्ष्मण गोरे (वय ६८, रा. ज्योती प्राईड, सातारा) मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. फिरण्यासाठी घराबाहेर पडताना गेटची एक चावी गोरे स्वतःजवळ ठेवत असत. मंगळवारी रात्री ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सकाळी शोध घेतला. यावेळी कॉलनी बाहेरील एका खोलीमध्ये ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांच्याजवळ एक मद्याची तसेच विषारी औषधाची बाटली पडलेली होती. त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डॉक्टराची आत्महत्या

जालना येथील होमीयोपॅथिक डॉक्टर नितीन शरद अग्रवाल (वय ४१, रा. जहांगीरनगर, राजूर रोड) यांनी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील बापूज लॉजमध्ये आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. अग्रवाल नेहमी कामानिमित्त शहरात येत होते. झोपेच्या गोळ्या घेत त्यांनी आत्महत्या केली. लॉजच्या कर्मचाऱ्याच्या हा लक्षात प्रकार आल्यानंतर त्यांनी क्रांतिचौक पोलिसांना ही माहिती दिली. अग्रवाल यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अग्रवाल हे आईसोबत राहत असून दहा वर्षापूर्वी त्यांनी नेव्ही मधील नोकरी सोडली होती. सध्या ते बेरोजगार होते.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

नायब तहसीलदार भानुदास गोरे तसेच डॉक्टर नितीन अग्रवाल यांच्या आत्महत्येच्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. मृत्यूपूर्वी कोणतीही सुसाईड नोट या दोघांजवळ आढळून आलेली नाही. घरगुती कारणावरून आत्महत्या करण्यात आल्या का अन्य काही कारण आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका प्रशासनाला कर्मचाऱ्यांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या हातावर तुरी दिल्यात. ४०० पेक्षा जास्त निवासस्थानांमधून कर्मचारी राहतात, पण केवळ १५५ कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरभाडे कपात होत असल्याची धक्कादायक माहिती, लेखा विभागातून हाती आली.

महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी जकात नाका, मित्रनगर, दिल्ली गेट, किलेअर्क, उस्मानपुरा, भडकलगेट अशा विविध ठिकाणी निवासस्थाने बांधली. या निवासस्थानांची संख्या ४०० पेक्षा जास्त आहे. कर्मचाऱ्यांच्या वर्गवारी नुसार निवासस्थानांची रचना करण्यात आली असून, त्यांचे भाडे निश्चित केले आहे. ज्या कर्मचाऱ्याला निवासस्थान राहण्यासाठी दिले आहे, त्या निवासस्थानाचे भाडे त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला कपात होणे अपेक्षित आहे. मात्र, लेखा विभागातून मिळालेल्या माहितीनुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरभाडे कपात केले जात नाही. फक्त १५५ कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच घरभाड्याची रक्कम दर महिन्याला कपात केली जाते. या रकमेपोटी महापालिकेला दर महिन्याला दोन लाख २२३ रुपये मिळतात. उर्वरित निवास्थानांचे भाडे का कपात केले जात नाही, याचे उत्तर मात्र लेखाविभाग किंवा मालमत्ता विभागाकडे नाही.

अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नावावर निवासस्थाने महापालिकेकडून घेतली आहेत आणि त्या निवासस्थानामध्ये पोटभाडेकरून ठेवले आहेत. याची माहितीही पालिकेच्या दप्तरी नाही. कोणते कर्मचारी स्वतः त्या निवासस्थानामध्ये राहतात व कोणते कर्मचारी रहात नाहीत, कोणत्या कर्मचाऱ्यांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत याची माहिती देखील या विभागांकडे नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज्’च्या चौकशी समितीने तपशील मागवला

$
0
0

औरंगाबाद : राकाज् लाइफस्टाइल क्बलच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने नगररचना विभागाकडून अतिरिक्त आणि अनधिकृत बांधकामाचा तपशील मागवला आहे. हा तपशील मिळाल्यावर चौकशीची पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राकाज् लाइफस्टाइल क्लब प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य लेखापरिक्षक एम.आर. थत्ते यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त प्रकाश महाजन यांनी समिती नेमली आहे.

या समितीने काल मंगळवारी 'राकाज्'ची पाहणी केली. त्या ठिकाणी कोणते बांधकाम अनधिकृत आहे, पार्किंगच्या किंवा मोकळ्या जागा कोणत्या आहेत या बद्दलचा तपशील आज या समितीने नगररचना विभागाकडून मागवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला स्वस्त; कोथिंबीर, मेथी पाच रुपये जुडी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशकातून वाढलेल्या आवकमुळे भाजीपाल्याचे दर निम्म्यावर आले आहेत. कोथिंबीर, मेथी, पालकची जुडी पाच रुपयांना मिळत आहे. मंगळवारी शहरात व जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हे दर स्थिर आणि आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. फळभाज्यांचे दर सुमारे २० ते २५ रुपयांनी घसरले आहेत. गेल्या दोन आठवडयापेक्षा दर एकदम कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. शेपूची जुडी पाच ते दहा रुपये, कांदापात पाच ते दहा रुपयांना मिळत आहे. 'गेल्या आठवड्यापेक्षा भाजीपाला स्वस्त झाला आहे. नाशिकचा बहुतांश माल मुंबई, नवी मुंबईत न जाता औरंगाबाद यावलकडे वळला आहे. यामुळे कृषी उत्पन्न बजार समिती व शहरातील विविध मंड्ईत भाजीपाला आवक वाढली आहे', अशी माहिती औरंगपुऱ्यातील भाजीपाला विक्रेत्या शशिकला खोबरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला सक्षमीकरणासाठी सायकल फेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिला सक्षमीकरणासाठी आता पोलिस विभागाने पुढाकार घेतला आहे. समाजातला हा निम्मा टक्का सशक्त व्हावा, याच्या जनजागरणासाठी २६ जुलै रोजी पोलिस आयुक्तालयातर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

'सायकल फॉर अ कॉज वुमेन सेफ्टी' या घोषवाक्याअंतर्गत होणारी ही फेरी, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची संकल्पना आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सकाळी पावणे सात वाजता या सायकल फेरीचे उदघाटन होणार आहे. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड आदींची उपस्थिती राहणार आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ बक्षीसे व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. सध्या फेरीत सहभागी होण्याकरिता गुन्हे शाखा येथे नोंदणी सुरू आहे. जास्तीत जास्त महिला संघटना, बचत गट, शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांनी या फेरीत सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

सायकल फेरीचा मार्ग

पोलिस आयुक्तालय ते मिल कॉर्नर, बाबा पेट्रोलपंप, क्रांतिचौक, सेव्हन हिल, सिडको बस स्टॅँड, एपीआय कॉर्नर, प्रोझोन मॉल मार्गे आंबेडकर चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण टी.व्ही.सेंटर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, आमखास मैदान, भडकलगेट मार्गे पुन्हा पोलिस आयुक्तालयात समारोप.

महिला सुरक्षा व सशक्तीकरण हा संदेश सामान्यांपर्यंत पोहचणे अत्यंत आवश्यक आहे. शहरातली प्रत्येक महिला सुरक्षित असावी, त्या अनुषंगाने वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. सामान्यांना या उपक्रमात सहभागी करण्याकरिता आम्ही सायकल फेरीचे आयोजन केले आहे. नागरिकांनी कुटुंबियांसह या उपक्रमात सहभागी व्हावे.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलसचिवांच्या लेखी परीक्षेत प्राध्यापकांची दांडी गुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांची लेखी, तोंडी परीक्षा घेऊन मूल्यांकन करणारे प्राध्यापक आणि शिक्षकांचे मूल्यांकन करणारे प्राचार्य, अधिकारी यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कुलसचिव पदासाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत दांडी उडाली.

उपस्थितांपैकी एकही उमेदवार योग्य नसल्याने कुलसचिवांच्या निवडीसाठी नव्याने प्रक्रिया केली जाणार असल्याचे कळते. परीक्षा देणाऱ्या एकाही उमेदवाराला ३० गुणांचा आकडा पार करता आला नाही. प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता वर्षभर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव मिळणे अशक्य आहे.

विद्यापीठाची कुलसचिव पदासाठी बुधवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. पात्र २१ उमेदवारांपैकी प्रत्यक्ष परीक्षेला १० उमेदवाराच हजर राहिले. यातूनही ९ उमेदवारच पूर्ण प्रक्रियेला सामोरे गेले. प्रारंभी ६० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २० गुण पीपीटी व २० गुण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी होते. तिन्ही प्रक्रियेतून एकही पात्र उमेदवार न मिळाल्याने कुलसचिव पदभरतीची प्रक्रिया नव्याने घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लेखी परीक्षेतील प्रश्नांमुळे धांदल उडाल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तर प्रवेशाचे विद्यापीठात तांगडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन व विद्यापीठ पदव्युत्तर विभागप्रमुख यांच्यात समन्वय नसल्याने प्रवेशाची तारीख मुदत संपली की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. १५ जुलै रोजी स्पॉट अॅडमिशन झाल्यानंतर रिक्त जागा भरायच्या की नाही, याबाबत बीसीयूडीच्या पत्रात स्पष्ट आदेश नाहीत. विभागांना दुसरे आदेश कशाला हवेत, असा सवाल बीसीयूडी कार्यालयाकडून केला जात आहे. समन्वायाच्या अभावामुळे अनेक विभागात जागा रिक्त असतानाही विद्यार्थ्यांना प्रवेशाविना परत जावे लागते आहे.

विद्यापीठातील विभागांमधील प्रवेशाची प्रकिया २० जूनपासून सुरू आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली. अनेक विभागांनी ११ जुलैपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया केली व स्पॉट अॅडमिशनची फेरी १५ जुलै रोजी घेण्यात आली. यानंतरही अनेक विभागांमध्ये रिक्त जागा आहेत. असे असले तरी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाविना परत जावे लागत आहे. बीसीयूडीचे स्पष्ट आदेश नसल्याने प्रवेश देता येत नसल्याचे विद्यार्थ्यांना विभागप्रमुख सांगत आहेत. त्यातच यंदा पदवी परीक्षांचे निकाल लांबले.

सायन्स शाखेच्या काही विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीत त्रुटी असल्याचे समोर आले. या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यात आली. यामुळे हे विद्यार्थी प्रवेशासाठी विद्यापीठात चकरा मारत आहेत. प्रशासन आणि विभागप्रमुखांमध्ये समन्वय नसल्याने विभागांमध्ये रिक्त जागा किती याची आकडेवारीही प्रशासनाकडे बुधवारपर्यंत उपलब्ध नव्हती.

आदेश हवेत कशाला

ज्या विभागात रिक्त जागा आहेत, त्यांनी प्रवेश द्यायला हवेत. त्यासाठी बीसीयूडी विभागाने नव्याने आदेश देण्याची गरज नाही, असे बीसीयूडी डॉ. के. व्ही. काळे यांनी स्पष्ट केले आहे. यासह विभागांमधील रिक्त जागांची आकडेवारी घेण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल, असे 'मटा'शी बोलताना त्यांनी सांगितले.

विभागांमध्ये रिक्त जागा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायन्समध्ये अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स, बायोकेमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, पर्यावरणशास्त्र, प्राणीशास्त्र अशा विषयांच्या जागा रिक्त आहेत. यासह भाषा विषयांमध्ये वगळता मराठी, हिंदी, उर्दू, पाली अशा विषयांमध्ये जागा रिक्त आहेत. सर्व विभागांमध्ये मिळून सुमारे ६०० जागा रिक्त आहेत.

विभागांमधील रिक्त जागांचा आढावा आम्ही घेत आहोत. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. ज्या विभागांमध्ये रिक्त जागा आहेत, त्यांनी प्रवेश द्यायला हवेत. त्यांना परत त्यासाठी सूचना काढण्याचे कारण नाही.- डॉ. के. व्ही. काळे, बीसीयूडी,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरवासीयांना रो-हाउसची ‘हौस!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरवासीय सध्या बंगलो आणि रो-हाउसच्या प्रेमात पडलेत. गेल्या दोन वर्षांत सुमारे ४२५ रो-हाउस आणि ८० स्वतंत्र बंगले बांधले. यातले फक्त ६० रो-हाउस आणि बंगले शिल्लक असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातून देण्यात आली.

दोन वर्षांत औरंगाबादमध्ये सुमारे १ हजार ८०० प्लॅट बांधले गेले. त्यातील ३०० फ्लॅट शिल्लक आहेत. क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या सदस्य असलेल्या १७० हून अधिक व्यावसायिकांकडे सध्या रो-हाउस शिल्लकच नाहीत. अनेक वर्षांमध्ये फ्लॅट, रो-हाउस बांधून पडून राहिल्याची कधीच स्थिती नव्हती व ती कायम आहे. मुळात १०० फ्लॅट बांधताना टाऊनशिपमध्ये १० ते १२ रो हाउस असतात. बंगले साधारण १ कोटी ते २ कोटींच्या घरात असून त्यालाही शहराबाहेरच प्राधान्य दिले जात आहे.

इथे मिळेल रो-हाउस

पडेगाव, वाळूज, नाशिकरोड, माळीवाडा, वाळुज-पैठणरोड लिंक रोड, पैठण रोड, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, देवळाई, बीड बायपास, झाल्टा, शेंद्रा, कुंभफेळ, सावंगी, हर्सूल, जटवाडा भागांत रो-हाउस व बंगल्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही अपेक्षा पूर्ण होणार नाही, असे बिल्डर्सनी आवर्जून सांगितले.

दोन वर्षांत सुमारे ४५० ते ५०० रो हाऊसेस बांधले गेले. पैकी बहुतांश बिल्डर्सचे रो-हाउस विकले आहेत. आता बंगल्यांकडे कल वाढला आहे, पण त्याची संख्या फार विरळ आहे.

- विकास चौधरी, क्रेडाई सचिव

रो-हाउस शिल्लकच राहत नाही. जो-तो आपल्या आर्थिक मर्यादा ओळखून रो-हाउस खरेदी करतो. काही जण बंगल्यांनाही प्राधान्य देत आहेत.

- विजय शक्करवार, संचालक, अमृत डेव्हलपर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रग्ज, नशेखोर वर्दीच्या रडारवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'युवकांत ड्रग्ज, गांज्या नशापाणीचे प्रमाण वाढले आहे. या बाबत पोलिस आगामी काळात कठोर पावले उचलतील. बिल्डर लॉबीकडून ग्राहकांची होणारी पिळवणूक, महिला अत्याचार हे आपल्या अजेंड्यावरचे विषय आहेत', अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी 'मटा'शी बोलताना दिली.

अमितेशकुमार म्हणाले, 'हर्सूल परिसरातील जहांगीर कॉलनी येथे दोन गटात हाणामाऱ्या झाल्या होत्या. गांजाच्या नशेमध्ये हे कृत्य केल्याचे आढळले. या पार्श्वभूमीवर शहरातील गांजा विक्रेते, मेडिकल औषधी, गोळ्या किंवा अन्य प्रकारे नशा करणाऱ्या नशेखोरांविरूद्ध, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विरुद्ध क‌डक कारवाइचा बडगा उगारण्यात येईल', असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

'शहरात सर्वसामान्याने बिल्डरकडून घर खरेदी केल्यानंतर देखील त्याला अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. बिल्डरकडून दाखविण्यात आलेल्या सुविधापैकी अनेक सुविधा पुरवत नाही. थातूरमातूर कारणे काढून ग्राहकाला टोलावतो. महापालिका, जिल्हा प्रशासन किंवा पोलिस प्रशासन सिव्हिल मॅटर म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, पोलिस या प्रकरणांत लक्ष घालतील. त्याबाबत पोलिस आयुक्तालयात शहरातील बिल्डरची बैठक बोलावून त्यांना तशी कल्पना देण्यात आली आहे. बिल्डरनी नियमानुसार, कराराप्रमाणे खरेदीदाराला सर्व सुविधा पुरवाव्यात. अन्यथा गाठ पोलिसांशी पडले', अशा शब्दांत अमितेशकुमार यांनी ठणकावले.

काळ्या काचा निशाण्यावर

शहरात महिला अत्याचारामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाचे प्रमाण जास्त आहे. महिलांची सुरक्षितता हा मुद्दा आता पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हाती घेतला आहे. या अनुषंगाने कौटुंबिक हिंसाचार कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील वाहतूक समस्यामध्ये जास्त करून ट्रिपल सिट, काळ्या काचा तसेच फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करण्यांची संख्या लक्षणीय आहे. या वाहतूक समस्यांबाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मध्यमवर्गीय नागरिक कसाबसा घराचे स्वप्न पूर्ण करतो. मात्र, त्याला बिल्डरकडून सर्व सुविधा मिळतील याची शाश्वती नसते. कोणाकडे जावे हा प्रश्न त्याला पडतो. बिल्डर व सबंधित ग्राहकांनी त्यांचे आपसातील वाद मिटवून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. करारानुसार सुविधा न पुरवणाऱ्या बिल्डरांविरुद्ध पोलिसांकडून पावले उचलण्यात येणार आहे.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ दिवसांत ८ हजार तरुणांची परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैन्य दलातील भरतीच्या कुंभमेळ्याच्या दुसरा दिवस अधिक चर्चेचा ठरला. संकुलात वाद, पो‌लिस बंदोबस्त वाढलेला दिसला. दोन दिवसांत सुमारे आठ हजार बेरोजगार तरुणांनी परीक्षा दिली असून, सहा ऑगस्टपर्यंत ५० हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील, असा अंदाज कर्नल समीर चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

भरतीच्या दोन दिवसांत आठ हजार जणांनी परीक्षा व फिजिकल टेस्ट दिली आहे. ६ ऑगस्टपर्यंतच्या या भरतीसाठी यासाठी हजारो बेरोजगारांचे लोंढे येत आहेत. पहिल्या दिवशी हिंगोली आणि नंदुरबार जिल्ह्यांतील सुमारे साडेचार हजार तरुणांनी उपस्थिती लावली. दुसऱ्या दिवशी, बुधवारी (२२ जुलै) जळगाव जिल्ह्यातील मुलांसाठी भरती होती. त्यासाठी सुमारे तीन हजार ८०० विद्यार्थी आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विभागीय क्रीडा संकुल येथे ६ ऑगस्टपर्यंत सैन्य दलातील पदांसाठी होत असलेली ही भरती प्रक्रिया चालणार आहे. परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ पहाटे ३ ते ६ अाहे. त्यामुळे विभागीय क्रीडा संकुल परिसरात सोमवारी रात्रीपासूनच तरूण येण्यास सुरुवात झाली. परिसरात मिळेल त्या जागेत या तरुणांनी आश्रय घेतला होता. पहाटे भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. तरुणांना गटानुसार विविध चाचण्यांसाठी पाठविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने धावणे, लांब उडीसह विविध पात्रता चाचण्या होऊन उंची, वजन, छाती याचे मोजमाप घेण्यात येत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वेळापत्रकानुसार संबंधित जिल्ह्यातील मुलेही एक दिवस आधीच दाखल होत आहे.

रिक्षाचालकांकडून अडवणूक

भरतीसाठी विविध गावांमधून गटागटाने खाजगी वाहन, एसटी, रेल्वेने तरुणांनी औरंगाबाद गाठले होते. शहरात आल्यानंतर विभागीय क्रीडा संकुल येथे येण्यासाठी अनेक रिक्षाचालकांनी अधिक पैशांची मागणी केल्याचे काही तरुणांनी सांगितले. दुपारी पावसामुळे तरुणांची धावपळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पाऊस ऑगस्टमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसामुळे मराठवाड्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर सी बँड डॉप्लर रडार यंत्रणा बसविण्यात येणार असल्याने कृत्रिम पावसासाठी राज्याचे केंद्र औरंगाबाद हेच राहणार आहे. या प्रयोगासाठी २७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांच्यासह शासनाच्या इतर अधिकाऱ्यांनी बुधवारी (२२ जुलै) औरंगाबाद शहराला भेट देऊन ढगांची माहिती देणारे सी बँड डॉप्लर रडार बसवण्याबाबत चाचपणी केली व आयुक्त कार्यालयावर हे रडार बसवण्याचे निश्चित केले. यासंदर्भात दिवसे म्हणाले की, येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये रडार बसविण्यात येणार आहे. ४०० किलोमीटरपर्यंतची माहिती या रडारच्या माध्यमातून उपलब्ध होते. २५० ते २७५ किलोमीटर परीघातील माहिती अधिक अचूक असते.

आयुक्त कार्यालयामध्येच एक कंट्रोल रूम स्थापन करण्यात येणार अाहे. तेथे भारतीय हवामानशास्त्र विभाग, आपत्ती व्यवस्थापन व इतर विभागातील ५ अधिकारी; तसेच रडार स्पेशलिस्ट पथक असेल. तीन महिन्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या प्रयोगाचा संपूर्ण मराठवाड्याला लाभ होणार आहे. कृत्रिम पावसाच्या या प्रयोगात मदत व पुनर्वसन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, कृषी विभाग, केंद्र शासनाचे भारतीय हवामानशास्त्र विभाग; तसेच रिमोट सेन्सिंग विभाग सहभागी होणार आहे.

पावसासाठी २०० तासांचे उड्डाण

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अमेरिकी बनावटीच्या असलेल्या 'वेदर मॉडिफिकेशन लिमिटेड'च्या या खास विमानाच्या पंखांवर २४ ब्लोअरच्या माध्यमातून ढगांवर फवारणी करण्यात येणार आहे. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये हे विमान २०० तास उड्डाण करणार आहे. ढगांवरून उडणाऱ्या या विमानामध्येही स्वतंत्र रडार यंत्रणा उपलब्ध आहे. औरंगाबाद हे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खान्देशच्या मध्यभागी असल्यामुळे औरंगाबाद विमानतळावरून उड्डाण करण्यात येईल. पाऊस पाडणाऱ्या ढगांचा अचूक अंदाज मिळाल्यानंतर विमान लातूर, नांदेड आदी विमानतळाचाही वापर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा पाडणार पाऊस

मराठवाड्यासह परिसरातील विभागात पडणाऱ्या पावसाचा १७ वर्षांचा डेटा संकलित केला असून, त्याचे विश्लेषण केले जात आहे. सी बँड डॉप्लर रडारच्या माध्यमातून ढगांची अचूक स्थिती, आकार, वाऱ्याचा वेग, पाऊस पाडण्याची क्षमता यांची अचूक छायाचित्रे व अंदाज शास्त्रोक्त पद्धतीने मांडण्यात येईल. तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या अभ्यासाअंती पाऊस देण्यायोग्य असलेल्या ढगांवर विमानाच्या माध्यमातून सोडियम आयोडाइड व सिल्व्हर आयोडाइड फवारण्यात येईल.

तंत्रज्ञानाचा वापर करून पाऊस पाडण्यात येणार आहे. यामुळे पिके वाचवता येतील. पिकांना गरज असेल त्यावेळीच पाऊस पाडण्यात येईल. या संरक्षित सिंचनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कृत्रिम पावसासाठी औरंगाबाद हे सेंटर राहणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीमध्ये सी बँड डॉप्लर रडार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यातील ढगांची माहिती देणाची क्षमता या रडारमध्ये राहणार आहे.

- डॉ. उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी बँकेचा तगादा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

पावसाअभावी यंदाही दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांकडील कर्ज वसुलीस स्थगिती दिली आहे. त्याचा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. तरी देखील उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संचालक मंडळांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे.

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचा कारभार शासन आदेश किंवा नाबार्ड यांच्या मार्गदर्शनानुसार नव्हे तर संचालक मंडळाच्या धोरणानुसार चालतो, असे स्पष्टीकरण उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक अमर कदम यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग ‌तांबे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसंदर्भात बोलताना दिले. जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे हेही यावेळी उपस्थित होते. कार्यकारी संचालकाच्या या स्पष्टीकरणामुळे जिल्हा प्रशासनातील हे अधिकारी तर चक्रावूनच गेले आहेत.

कर्जवसुलीसाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना बँकेतील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर या कामी सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची तंबी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या पीक विम्याच्या रक्कमेतून कर्जवसुलीचा सपाटा या बँकेने लावला असल्याच्या शेतकऱ्यांच्या शिवाय विविध राजकीय पक्षाच्या तक्रारी असून, या विरोधात आंदोलनाचा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.

शासनाने कर्जवसुलीस स्थगिती दिलेल्या आदेशाचे पत्र या बँकेला प्राप्त झाले आहे. मात्र, शासन आदेशानुसार धोरण राबवायचे नाही हा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालक मंडळाचा होरा आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या धोरणानुसार येथील अधिकाऱ्यांना वागणे क्रमप्राप्त ठरते. या उपरोक्त आम्ही नाबार्डच्या आदेशवजा पत्राचा आधार घेत कर्जवसुली करीत आहोत, असे स्पष्टीकरण कार्यकारी संचालकांनी जिल्हा प्रशासनास दिल्यानंतर प्रशासकीय अधिकारी तर अवाकच झाले.

नाबार्डचे पत्र २०१३ मधील असून, त्याचा संदर्भ सांगली बँकेपुरता मर्यादित असल्याची बाब श्रीरंग तांबे यांनी कार्यकारी संचालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अमर कदम यांचा पारा पुरताच उतरला. तातडीने या सर्व बाबी संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून देऊन कर्जवसुली थांबविण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, कर्जवसुली स्थगितीबाबत आम्ही नाबार्डकडून स्पष्टीकरण मागवत शासन निर्णयाची अवहेलना करण्याचा ठेका मात्र,त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. सध्या जिल्हा बँक पीक विमा कर्जातून शेतकऱ्यांच्या थकबाकीची वसुली करीत आहेत ही बाब एमडींनी मान्य केली.

पीक विमा नुकसानीचे सुमारे १५७ कोटी रुपये आलेले आहेत. यापैकी १५५ कोटींची रक्कमही जिल्हा सहकारी बँकेला प्राप्त झाली आहे. ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वि‌तरित करून त्यांना दुष्काळी स्थितीत मदतीचा हात देण्याऐवजी वेळ काढूपणाचे धोरण अवलंबित ही रक्कम त्यांनी मुदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मुदत ठेवीत ठेवून त्यावरील व्याजाचा लाभ उचलण्याचा घृणास्पद प्रयत्न चालविला आहे. या संदर्भाने ओरड सुरू होताच यातील काही निधी लोकप्रतिनिधी व संचालक यांच्या हस्ते वितरित करण्याचे फोटोसेशन करून आम्हीच शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहोत, असे भासविण्याचा प्रकार या बँकेने केला आहे.

मी नवखा आहे. एमडीची जबाबदारी स्वीकारून महिनाच होत आहे. आगामी काळात शासन निर्णयाची अंमलबजावणी बँकेने करावी. बँकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे काम संचालक मंडळाचे आहे. मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास बसल्यास त्याची सर्व जबाबदारी संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांची राहील. - श्रीरंग तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद

शासनाच्या ‌विविध योजनेतून शासकीय अधिकाऱ्यांचा लाभ होतो. परंतु, शेतकऱ्यांच्या पीककर्ज प्रकरणात या अधिकाऱ्यांच्या हाती भोपळाच असतो त्यामुळे केवळ बैठकाचे व तंबी देण्याचे नाटक केले जाते. - दिनेश देशमुख, शेतकरी (सांगवी), ता. उस्मानाबाद

शासन निर्णय तसेच सहकारी विभागाचे धोरण याची माहिती वेळोवेळी जिल्हा बँकेला देऊन त्यानुसार कारभार चालविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर कारवाई अटळ आहे. - एस. पी. बडे, जिल्हा उपनिबंधक, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात सरासरीच्या निम्मा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

गेल्या दोन दिवसांपूवी झालेल्या पावसामुळे जालना जिल्ह्याच्या सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीचया ५१ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाच्या दुप्पट पाऊस अपेक्षित आहे. या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतातील उगवलेला कापूस, सोयाबीन, मका आणि उडीद व मुग यांना नक्कीच जीवदान मिळाले आहे. बुधवारी मात्र, पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. दिवसभर आकाशात ढग जमा झाले होते. जिल्ह्यात कुठेही सूर्यदर्शन झाले नाही तर पाऊसही पडला नाही.

दुसऱ्या दिवशी मंगळवारी जाफराबाद आणि परतूर तालुका वगळता इतर सर्व ठिकाणी सरासरी ४.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ातील सर्वात तीव्रतेच्या दुष्काळात सातत्याने गेली चार वर्ष होरपळून निघालेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षी मृग नक्षत्रात पहिल्यांदा समाधानकारक पाऊस झाला. साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर अत्यंत लगबगीने शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. जून महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत वातावरण एकदम चांगले होते. मात्र, त्यानंतर पावसाने जोरदार दडी मारली होती. त्यामुळेच खरीप हंगाम पुन्हा एकदा यंदा धोक्यात येईल, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. ते मोठ्या प्रमाणात टळेल असे आजचे चित्र आहे. मान्सूनच्या पावसाची जिल्ह्यात ३१.५८ टक्केच नोंद झाली आहे, आजपर्यंत पडलेल्या पावसाच्या पेक्षा दुप्पट पाऊस अपेक्षित आहे. पण शेतातील उगवलेल्या कापूस, सोयाबीन, मका आणि उडीद व मुग यांना नक्कीच जिवदान मिळाले आहे. जिल्ह्यातील जाफराबाद आणि परतूर तालुक्यात मंगळवारचा पाऊस झाला नाही. बुधवारी दिवसभर आकाश ढगांच्या दाटीने गच्च भरुन होते पण सायंकाळपर्यंत पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागातील खरीपातील पेरण्या संकटातून बाहेर पडलेल्या नाहीत. मात्र, जिल्ह्यात उर्वरित तालुक्यातील पिकांना अंशत जिवदान मिळेल असे चित्र दिसत आहे. बुधवारी (२२ जुलै) जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. तर जायकवाडीच्या धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणजे शहराला आता साधारण आठ दिवस आड पाणी पुरवठा होईल असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रशासनाची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी भरारी पथके नेमली असून, ही पथके प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे स्कॅनिंग करणार आहेत. बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात पगार केले जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतील तर त्यांचा पगारही कापला जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या बाबत ओरड सुरू होती. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर राहत नाहीत, याची शहानिशा खुद्द सीइओ डॉ. अभिजित चौधरी यांनी केली होती. आजवर त्यांनी १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवायाही केल्या, पण त्यानंतरही फरक पडला नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी यातून मार्ग काढण्यासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक निर्माण केले आहे. हे पथक एक जुलैपासून कार्यरत झाले आहे. पथकाकडून जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी दिल्या जातील. त्यावेळी दोन्ही वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असणे बंधनकारक केले आहे. पथकाच्या भेटीत जर वैद्यकीय अधिकारी हजर नसतील तर त्यांचा संपूर्ण दिवसाचा पगार कापण्यात येईल. रेकॉर्ड तपासताना 'पीएचसी' दररोज किती रुग्ण येतात, याचे प्रमाण पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पगार दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यास मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

पथकाच्या दौऱ्यादरम्यान वैद्यकीय अधिकारी जर उपकेंद्र किंवा अंगणवाड्यांमध्ये तपासणीसाठी गेल्याचे कारण दिलेले असेल तर संबंधित ठिकाणचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात येणार आहे. थोडक्यात प्रशासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पूर्णपणे वॉच ठेवण्यात येणार आहे. एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गलथानपणा आढळून आला तर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

'टीएचओ'ही अडकले

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील यंत्र सुरू नसेल तर गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन टीएचओंना हजेरी नोंदवावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना सौर कृषीपंप

$
0
0

पहिल्या टप्प्यात साडेसात हजार पंप उपलब्ध होणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारनियमन पाहता राज्यातील शेतकऱ्यांना पाच लाख सौर कृषीपंप देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ही योजना आता दृष्टीपथात असून केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे सौरपंप उपलब्ध करणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सात हजार ५४० पंप दिले जाणार आहेत.

राज्याचे अवघे १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. सध्या वाढत्या भारनियमनामुळे ऊस व फळबागा संकटात आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातही सिंचन अनुशेष आहे. तसेच अर्ज केल्यानंतरही कृषीपंप वीज जोडणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यानंतर राज्य सरकार टीकेचे धनी ठरले आहे. त्यामुळे शेतीची उत्पादता वाढवण्यासाठी सौरपंप देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात शेतकऱ्यांना पाच लाख सौरऊर्जा पंप मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. विहिरीवर एक पंप बसवण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च येतो. हा खर्च गरीब शेतकऱ्यांना झेपत नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सौरपंप पूरक ठरणार आहे. केंद्र सरकारने नुकतेच अपारंपरिक ऊर्जेसाठी राज्याला ९६१ कोटी रुपये दिले आहेत. याअंतर्गत कृषीपंपांसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद आहे. गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात सौर ऊर्जापंप देण्यासाठी 'सन एडीसन' या अमेरिकेच्या कंपनीशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली आहे. त्यामुळे ही कंपनी पंप पुरवण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात किमान ३०० दिवस लख्ख ऊन असते. सौरउर्जेसाठी पुरेसे ऊन असल्यामुळे सौरउर्जा निर्मिती सहजशक्य आहे. भारनियमनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी हा प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे; मात्र, महागड्या सौरपंपाची दुरुस्ती व देखभाल सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे प्रयोगाबाबत काही शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना फायदा

शेतकऱ्यांना सौरपंप देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून पहिल्या टप्प्यात केंद्र सरकार ७ हजार ५४० पंप देणार आहेत. तसेच सौरपंपासाठी केंद्र सरकार ३० टक्के अनुदान, राज्य सरकार ५ टक्के, शेतकऱ्याचा हिस्सा ५ टक्के आणि उरलेली ६० टक्के रक्कम वित्तीय संस्था किंवा बँकाकडून कर्जाच्या स्वरूपात घेतली जाणार आहे. याबाबत नुकताच अध्यादेश प्रसिद्ध झाला आहे.

सौरऊर्जा कृषीपंप योजनेची अंमलबजावणी ऊर्जा विभाग करणार आहे. कृषी क्षेत्राशी निगडीत योजना असली तरी सर्व विभागातील सदस्यांची समिती कार्यरत आहे. याबाबत लवकरच काम सुरू होईल. - विकास देशमुख, कृषी आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0

नवीन २४ सीसीटीव्ही कॅमेरे कनेक्शनविना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू भेट देणार असल्याने एक महिन्यापूर्वी रेल्वे स्टेशनमध्ये बसविण्यात आलेले २४ सीसीटीव्ही कॅमेरे शोभेचे ठरले आहेत. एक महिन्यानंतरही हे कॅमेरे सुरू करण्यात आलेले नाहीत. यावरून औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल रेल्वे विभाग गंभीर नसल्याचे लक्षात येते.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. रेल्वे स्टेशनवर एका अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या गैरप्रकार, सातत्याने होणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची चोरी यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचे लक्षात येते. याशिवाय औरंगाबाद शहर ऐतिहासिक असल्याने रेल्वे स्टेशनवर घातापाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्र्यांच्या आगमनापूर्वी रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीत २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. नवीन रेल्वे स्थानकाच्या इमारतीत फलाट, बुकिंग काऊंटर, वेटिंग रूम, नवीन रेल्वे स्टेशनच्या एन्ट्री पॉइंटवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या आगमनापूर्वी बसविण्यात आलेले कॅमेरे अद्यापही सुरू झालेले नाहीत.

रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काम जुन्या रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरच अवलंबून आहे. जुन्या इमारतीमधील आठ कॅमेऱ्यांपैकी तीन सीसिटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

आरक्षण कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद

आरक्षण कार्यालयातून दलाल तिकिटाचा काळाबाजार करत असतात. वारंवार येणाऱ्या दलालाच्या प्रतिनिधींची ओळख पटावी, आरक्षण काउंटरवरून कोणाला तिकिटांची विक्री होऊ नये. यासाठी सहा कॅमेरे काउंटरवर लावण्यात आले होते. त्यापैकी प्रवाशांकडे दिशेने लावण्यात आलेला कॅमेरा बंद आहे.

स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची कारवाई सुरू आहे. हे कॅमेरे अद्याप सुरू करण्यात आले नसल्याची बाब गंभीर आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेबदद्ल कोणतीही तड‌जोड केली जाणार नाही. कॅमेरे लवकरच सुरू करू. - पी. सी. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images