Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विरुंगुळ्याचे सेकंड होम !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपले असे एक घर असावे जिथे फक्त विरुंगळा, निसर्गाचे सान्निध्य आणि निवांतपणा असावा. अशा सेकंड होमकडे आता शहरवासीय वेगाने वळला आहे. अनेक जण नोकरी, शिक्षणासाठी औरंगाबादला घर घेणे पसंद करताहेत. या सेकंड होममधील गुंतवणुकीचे प्रमाण २५ टक्क्यांवर गेले आहे.

गेल्या पाच वर्षांत मराठवाड्यातून औरंगाबादला मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. सोळा इंजिनीअरिंग कॉलेज आणि चार मेडिकल कॉलेज असल्यामुळे अनेकांनी शिक्षणासाठी, तर काहींनी नोकरीसाठी औरंगाबाद जवळ केले. जवळपास अडीच हजार घरे, या स्थलांतरित कुटुंबाने व्यापली. औरंगाबादमधील नागरिकांनी मात्र, सेकंड होम घेण्यास पुणे जवळ केले. ही गुंतवणूक २५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. औरंगाबादमधील ज्या बिल्डर्सचे पुण्यात गृहप्रकल्प आहेत, त्याच प्रकल्पात गुंतवणुकीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. शहर परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांना अनेकांनी सेकंड होम केले आहे. ही टक्केवारी २ ते ३ टक्केच आहे.

टू-बीएचके आणि स्वतंत्र बंगले यांना प्राधान्य देत गुंतवणूक वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत २०० हून अधिक रो हाऊस आणि ३०० हून अधिक फ्लॅट फक्त स्थलांतरित नागरिकांनी घेतले. फ्लॅट व बंगले यांची रेंजी १५ लाख ते ४० लाखांपर्यंत आहे. - देवानंद कोट‌‌गिरे, दिशा कन्स्ट्रक्शन

औरंगाबादेत मराठवाडा, खान्देश मधील रहिवाशांनी गुंतवणूक करणे सुरू केले आहे. ही गुंतवणूक सुमारे २०ते ३० टक्क्यांपर्यंत आहे. शिक्षणासाठी अनेक जण औरंगाबाद जवळ करत आहेत. - प्रमोद खैरनार, क्रेडाई उपाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क’मध्ये वृक्षतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कच्या (एसटीपी) इमारतीत असलेली अशोकाची ३५ ते ४० झाडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दोन दिवसांत तोडली. ही झाडे तोडली नसून त्याचे 'ट्रिमिंग' केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे, मात्र ५० फूट उंचीची झाडे तोडून तिथे केवळ पाच फुटांचे खोड ठेवण्यात आले आहे. या प्रकाराने उद्योजक मात्र नाराज झाले आहेत.

आयटी उद्योगांना एकाच छताखाली जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एमआयडीसीने चिकलठाणा एमआयडीसीत एका इमारतीत सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क सुरू केले. आजमितीला याठिकाणी छोटे-मोठे ३५ उद्योग सुरू आहेत. इमारतीला सौंदर्यीकरण; तसेच पर्यावरण पूरक पावले उचलत त्यावेळी वृक्षलागवड करण्यात आली होती. इमारतीच्या चहुबाजुंनी अशोकाची झाडे लावली होती. या झाडांनी ५० फुटांची उंची गाठली. काही महिन्यांपूर्वी इमारतीची डागडुजी केली आहे, मात्र या झाडांमुळे इमारत व्यवस्थित दिसत नव्हती.

हे कारण सांगून मंगळवारी आणि बुधवारी अशोकाच्या झाडांची कत्तल करण्यात आली. छाटणीच्या नावाखाली अगदी पाच फुटांपर्यंतच झाडे ठेवण्यात आली. उद्योजकांना बुधवारी हा प्रकार लक्षात आला. झाडांची छाटणी करावी पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात करून इमारतीचे सौंदर्यच नष्ट केले गेल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली.

झाडे तोडली की छाटणी केली याची माहिती इंजिनीअरिंग विभागाकडून घेतली जाईल. परवानगीशिवाय जर वृक्षतोड झाली असेल चौकशी करून दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. - शुभम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

अशोकाच्या झाडामुळे इमारतीच्या काचा आणि पार्किंगमधील गाड्यांना धोका होता. झाडे तोडली नाहीत त्याची छाटणी केली आहे. ही झाडे पुन्हा काही दिवसांत पूर्ववत उंच होतात. सेफ्टीच्या दृष्टीने पावले उचलली. - आर. एस. गावडे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझेल रिक्षा स्क्रॅपमध्ये जाणार कशा?

$
0
0

रिक्षाचालकांचा अत्यल्प प्रतिसाद

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन आसनी क्षमतेपेक्षा मोठ्या असलेल्या डिजेल रिक्षांना हद्दपार करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दिले आहेत. मात्र, या आदेशानंतर महिन्याभरात केवळ ४५ डिजेल रिक्षा चालकांनी स्वतःहून आपल्या रिक्षा स्क्रॅपसाठी आणल्या आहेत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत शहरातील संपूर्ण दोन हजार डिझेल रिक्षा हद्दपार होतील का? असा प्रश्न प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाच पडला आहे.

शहरातील जालना रोड, जळगाव रोड आणि इतर मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिजेल रिक्षांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. डिजेल रिक्षांचा आकार तीन आसनी रिक्षांपेक्षा मोठा असल्याने या रिक्षातून जादा प्रवासी नेले जातात. शिवाय या रिक्षांमुळे प्रदूषणातही मोठी वाढ होत असल्याच्या कारणामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या रिक्षा हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी या रिक्षाचालकांना १५ जुलैची डेडलाईन दिली होती. मात्र, त्याला तीव्र आक्षेप घेतला गेल्याने ही मुदत वाढवून १५ ऑगस्ट करण्यात आली. डिजेल रिक्षा भंगारात काढून त्यावरील रिक्षा परवाना एलपीजी किंवा पेट्रोल रिक्षांचा करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. मात्र, या मुदतवाढीनंतरही या रिक्षा काढून टाकण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. केवळ ४५ रिक्षाचालकांनी रिक्षा स्क्रॅपसाठी आणल्या. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत शहरातील दोन हजार रिक्षा स्क्रॅपमध्ये कशा निघतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डिजेल रिक्षांबाबत आरटीए कमीटीने निर्णय घेतला आहे. रिक्षा चालकांना मुदतवाढही देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत डिजेल रिक्षा स्क्रॅप करून त्याचे परवाने पेट्रोल किंवा गॅस रिक्षांवर करण्यात आले नाही. तर त्यानंतर विशेष मोहीम सुरू करून डिजेल रिक्षांवर कारवाई त्या जप्त केल्या जातील. - गोविंद सैदांणे, प्रादेशिक, परिवहन अधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेताना चार जण चतुर्भुज

$
0
0

तहसील कार्यालयात लिपिक, दलाल जाळ्यात

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला व त्याच्या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी दुपारी तहसील कार्यालयात अटक केली. जातीच्या प्रमाणपत्राची नक्कल देण्यासाठी दीड हजाराची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

सुखदेव सपकाळ ही व्यक्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार आहे. सपकाळ यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार व विरोधी पक्षातले उमेदवार यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची नक्कल मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. अभिलेख कक्षातील लिपिक गंगाधर दादाराव गायकवाड (रा. म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटलजवळ) यांच्याकडे हा अर्ज होता. सपकाळ यांना तह‌सील कार्यालयातील दलाल राजेंद्र हरीभाऊ बागुल (वय ४५ रा. कैलासनगर) याने संपर्क साधला. गायकवाड यांच्याकडून प्रमाणपत्राची नक्कल मिळवण्यासाठी तीन हजार रूपयाच्या लाचेची मागणी त्याने केली. तडजोडीअंती दीड हजार एवढी रक्कम ठरवण्यात आली. गुरूवारी दीड हजार रूपये घेऊन गायकवाड यांच्या कक्षात सपकाळ यांना बोलावण्यात आले होते. याप्रकरणी सपकाळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला. लाचेची रक्कम घेताना गायकवाड व बागुल दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याविरूद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, निरीक्षक एस. एस. शेगोकार यांनी कैलास कामठे, गणेश पंडूरे अश्वलिंग होनराव, अजय आवले व संदीप चिंचोले यांच्या मदतीने यशस्वी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला हवालदार, होमगार्डला बेड्या

$
0
0

औरंगाबाद : पतीपत्नीच्या वादातला गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड हजाराची लाच घेणाऱ्या महिला हवालदार तसेच होमगार्डला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. जिन्सी पोलिस ठाण्यात गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

अजिज नावाच्या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्याविरूद्ध महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये तक्रार दाखल केली होती. जिन्सी पोलिस ठाण्यातील महिला हवालदार ममता रामसिंग घुसिंगे (वय ४२ रा. पोलिस कॉलनी, एन १०) यांच्याकडे हा तपास होता. घुसिंगे यांनी पतीपत्नीला बोलावून घेतले होते. यावेळी दोघांनी आमचा आपसात समझोता झाला असून तसा लेखी जबाब देखील दिला होता. मात्र, घुसिंगे व होमगार्ड मुकरमखान गफ्फारखान (वय ५० रा. कटकटगेट) यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दीड हजार रुपयांवर ही रक्कम ठरली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने अजिज यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गुरूवारी दीड हजार रूपये घेऊन अजिज यांना जिन्सी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी सापळा रचलेल्या पोलिसांनी लाच घेताना दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिता वराडे, वैशाली पवार, हरीभाऊ कुऱ्‌हे, सुनील फेपाळे, बाळासाहेब महाजन व सचिन शिंदे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाचे प्रशासनाला वेध

$
0
0

औरंगाबादमधील छावणी परिसरात गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावली.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृत्रिम पावसाचे शेतकऱ्यांसोबतच प्रशासनालाही वेध लागलेत. त्यासाठी तत्काळ हलचाली सुरू करण्यात आल्या आहेत. प्रयोगासाठी जिल्ह्यातील खरीप पिकांची माहिती घेणे सुरू आहे, अशी माहिती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या कंट्रोल रूम तसेच सी बँड डॉप्लर रडार यंत्रणा बसवण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. विमानाद्वारे हायगा्रेस्कोपिक आणि ग्लासिओजेनिक प्लेअर्सचा वापर करण्यात येणार आहे. हे प्रतिबंधित पदार्थ अमेरिकेहून आणण्यात येणार असून, ते पोलिस बंदोबस्तात करमाड येथील गोडाऊनमध्ये ठेवण्यात येईल. त्यासाठी विस्फोटक साठवणूक परवाना आवश्यक आहे. हा परवाना घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. हा परवाना मिळवण्यासाठी तसेच सर्व बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी नायब तहसीलदार बी. डी. म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातवाने गळफास घेतला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लाडक्या नातवाला छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून ७६ वर्षांच्या ‌आजोबांना जागीच हृद्यविकाराचा झटका आला. अवघ्या अर्धा तासात त्यांचीही प्राणज्योत घाटी हॉस्पिटलमध्ये मालवली. भावसिंगपुरा परिसरात गुरुवारी सकाळी ह्रद्यद्रावक घटना घडली.

सागर अजय अहिरे (वय १९) हा तरुण भावसिंगपुऱ्यातल्या कानिफनाथ कॉलनीत आजी-आजोबा व वडिलांसोबत रहात होता. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, गेल्या काही दिवसांपासून मित्रासोबत तो ‌बांधकाम साहित्य विक्रीच्या व्यवसायात उतरला होता. गुरुवारी सकाळी सात वाजता सागरचे आजोबा आनंद अहिरे (वय ७६) व त्याची आजी फिरण्यासाठी घराबाहेर पडले. साडेसातच्या सुमारास आनंद अहिरे घरी परतले. यावेळी त्यांना घरातील छताला त्यांचा नातू सागर याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. हा प्रकार पाहताच आनंद अहिरे याना धक्का बसला. हार्टअॅटॅक आल्याने ते खाली कोसळले. सागरच्या आजीने हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरड केली. यावेळी परिसरातील नागरिक व नातेवाईक जमा झाले. सागरचा मृतदेह तसेच बेशुध्द आनंद अहिरे यांना तत्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अर्ध्या तासाने आनंद अहिरे यांची प्राणज्योत मालवली. या घटनेबाबत छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात सागरने आत्महत्या का केली, याचा तपास पोलिस करत आहेत. सागरला व्यायामाची आवड होती. तो घरी देखील लाडका होता. सागरच्या आईचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेच्या कामाला ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात सोलापूर-औरंगाबाद-धुळे महामार्गासाठी आजवर एक इंचही भूसंपादन झाले नाही. महिन्याभरात ही प्रक्रिया सुरू झाली नाही, तर पुन्हा अधिसूचना काढावी लागेल. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

सोलापूर ते धुळे या ४५३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचा हा प्रकल्प असून येडशी ते औरंगाबाद या पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाची कामे जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, औरंगाबाद ते धुळे या टप्प्यात ८५.८ किलोमीटरच्या रस्त्यासाठी भूसंपादनाचा संथ कारभार सुरू आहे. जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून सुरू असलेला वाल्मीचा तिढा पूर्णपणे सुटला. औरंगाबाद ते धुळे या मार्गासाठी जिल्ह्यातील ४४ गावांमधील भूसंपादन होणे आवश्यक होते. मात्र, प्रशासन मोजणीमध्येच गुरफटले आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी ८० टक्के भूसंपादनाचा अहवाल येईपर्यंत टेंडर काढता येत नाही. त्यामुळे पूर्ण प्रक्रियेवरच परिणाम होत आहे. महामार्गाच्या येडशी ते औरंगाबाद या पहिल्या टप्प्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात २९.१६, बीड ३८.५५, जालना ९१.५० तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ८४.४५ टक्के भूसंपादन झाले आहे.

लवाद लवांदेकडे : मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात अपिल चालवण्यासाठी लवाद म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाने अपर आयुक्त किसनराव लवांदे यांची नियुक्ती केली आहे. विभागात सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ (सोलापूर ते संगारेड्डी), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ (येडशी - औरंगाबाद - धुळे) तसेच राष्टीय महामार्ग क्रमांक ३६१ (तुळजापूर - औसा - लातूर - चाकूर - अहमदपूर - नांदेड - वारंगा) या महामार्गांकरिता भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या निवाड्याविरुद्ध संबंधित व्यक्ती लवादाकडे अपिल करू शकतात.

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातल्या औरंगाबाद ते धुळे मार्गासाठी २०११ पासून राज्य शासनातर्फे भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आतापर्यंत प्राधिकरणाला जमिनीचा ताबा मिळाला नाही. कायद्यामध्ये जलद व अनिवार्य भूसंपादनासाठी तरतूद आहे, पण भूसंपादन व निवड्यांच्या कामांना होणाऱ्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे.

औरंगाबाद-धुळे मार्गासाठी जिल्ह्यात २०११ पासून राज्य शासनातर्फे भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र, आजपर्यंत प्राधिकरणाला जमिनीचा ताबा मिळाला नाही. महामार्गासाठी वाल्मी संस्थेचा तिढा सुरू होता, त्याच वेळेत जिल्ह्यातील इतर गावांमध्ये प्रशासाने भूसंपादनाला गती देण्याची गरज होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईबीसी मर्यादा अडीच लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईबीसी सवलतीची उत्पन्न मर्यादा एक लाखावरून अडीच लाख रुपये करणार असल्याची महत्त्वाची घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत गुरुवारी केली.

कृषी महाविद्यालयाच्या ईबीसीधारक विद्यार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी व या विद्यार्थ्यांना आर्थिक मागासवर्गीयाचे प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे यासाठी आमदार सतीश चव्हाण हे शासनाकडे पाठपुरावा करीत होते. या प्रश्नासंदर्भात चव्हाण यांनी विधान परिषदेत ९३ अन्वये सूचना उपस्थित केली होती. महसूल अधिकारी प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. २०११ ते २०१५पर्यंतच्या शैक्षणिक शुल्काची पन्नास टक्के रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमागे तगादा लावला आहे. मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलतीची उत्पन्न मर्यादा एक लाखावरून पाच लाख करावी, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली.

आमदार चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री खडसे यांनी, तहसीलदारांना त्वरित प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबत निर्देश दिले जातील व जे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ, दिरंगाई करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे सांगितले; ईबीसी सवलतीची उत्पन्न मर्यादा एक लाखावरून अडीच लाख करण्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशाच्या पावसाची आज होती चाचणी

$
0
0

देवळाई शिवारात मांडली होती पूजा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भोंदू महाराज भीम गिरे व त्याचा साथीदार पोपट मुदगल हे बुधवारी रात्री पैशाच्या पावसाची चाचणी दाखविणार होते. चाचणी यशस्वी झाल्यानंतर सात जणांकडून प्रत्येकी एक लाख रुपये घेऊन सात कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यात येणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, भोंदू महाराज गिरे, त्याचे साथीदार मुगदल यांनी व्यावसायिक असलेल्या अन्य आरोपींकडून पैशांच्या पावसाची ट्रायल दाखविण्यासाठी दहा हजार रुपये घेतले होते. त्यात यश आल्यानंतर प्रत्येकी एक लाख रुपयांच्या मोबादल्यात सात कोटी रुपयांच्या नोटाचा पाऊस पाडण्याचे आमिष त्यांनी दाखविले होते, परंतु त्यांचा हा खेळ सुरू होण्याआधीच पोलिसांनी कारवाई करत जादुटोणा विरोधी कायद्याचा उल्लघंन करणाऱ्या भोंदू महाराज व त्यांच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या.

ओढ्याच्या काठी जमिनीवर पांढऱ्या दोऱ्याचे रिंगण करून त्यात लाल रंगाचे फडके टाकले होते. त्यावर तांदळाचे चौकोन करण्यात आले होते. स्वस्तिक काढून मांत्रिकाने मधोमध दिवा ठेवला होता. आजुबाजुस लिंबू आणि अगरबत्ती लावून मंत्रोच्चार सुरू होता. झेंडूची दोन किलो फुले, गारगोटी दगड, खोबऱ्याची वाटी, हळद-कुंकू आदी साहित्यही घटनास्थळी सापडले. पूजेच्या या साहित्यासह एक तलवार, रोख रक्कम २५९० रुपये, बोलेरा जीप (क्रमांक एम.एच. २० बी.सी ७६६७), मारुती ८०० (क्रमांक एम.एच. २९ सी ३४३), तीन दुचाकी असा ४ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांच्या शाळेत आकड्यातून वीज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांनी आकडे टाकून कृषिपंपांसाठी वीज घेतल्यानंतर तत्परतेने कारवाईचा बडगा उचलणाऱ्या महावितरणने मात्र जिल्हा विद्युतीकरण समितीचे अध्यक्ष, खासदार चंद्रकांत खैरे अध्यक्ष असलेल्या शाळेवर मेहेरनजर केली आहे. खासदार खैरे दादोजी कोंडदेव विद्यालयाचे अध्यक्ष आहेत. या विद्यालयाला आकडे टाकून वीज पुरवठा केला जात असल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. आता या शाळेवर महावितरण कंपनीसह शासकीय यंत्रणा काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे.

सिडकोलगत मयूरपार्क भागात दादोजी कोंडदेव विद्यालय आहे. शाळेकडे एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याने जून महिन्यात वीज पुरवठा खंडित केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज बंद झाल्याने शाळेने चक्क तारेवर आकडे टाकून वीजपुरवठा घेतला. शाळा आकडे टाकून वीज घेत असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत वीज प्रश्नांचा लेखाजोखा ठेवणाऱ्या खासदारांच्या शाळेमध्येच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही शाळा काही महिन्यांपूर्वीच मयूरपार्कात स्थलांतरित करण्यात आली. पहिली ते दहावीपर्यंत असलेल्या शाळेत तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. आकडे टाकून शाळेत वीज घेतली जात असल्याचा इंकार खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला, तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.

आमच्या संस्थेत असे प्रकार घडत नाहीत. शाळेच्या कारभारात मी फारसे लक्षही देत नाही. वीज थकबाकी असेल तर भरली जाईल, पण याची म‌ाहिती नाही. माहिती घेऊन सांगतो. - चंद्रकांत खैरे, संस्था अध्यक्ष

संबंधित संस्थेकडे एक लाखापेक्षा जास्त वीज बील थकले आहे. बिल न भरल्यामुळे जून महिन्यात या संस्थेचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. - एन. एम. ठाकूर, सहायक अभियंता, महावितरण.

शाळेला लावण्यात आलेले वीज बिल जास्तीचे आहे. याबाबत आम्ही महावितरणाकडे पाठपुरावा करतो आहोत. सध्या वीज पुरवठा नाही. आकडा टाकून वीज घेण्याचा प्रकार माझ्या निदर्शनास आलेला नाही. असा प्रकार होणे शक्य नाही. - शिवाजी चव्हाण, मुख्याध्यापक, दादोजी कोंडदेव विद्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसापच्या आखाड्यात ‘साहेबां’ची एंट्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत साहित्यिकांचे राजकीय डावपेच रंगलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील आखाड्यात उतरले आहेत. शहरातील एका नामवंत साहित्यिकाने पत्राद्वारे माहिती देताच पवार यांनी आमदाराला समज दिल्याची चर्चा रंगली. त्यानंतर परिवर्तनवादी आघाडी आणि आमदार सतीश चव्हाण यांचा संबंध नसल्याचे जाहीर करण्यात आले.

कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान कार्यकारिणीला आव्हान देत परिवर्तनवादी आघाडीने षड्डू ठोकले आहेत. त्यामुळे विद्यमान आघाडी अस्वस्थ झाली आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा आमदार चव्हाण यांनी परिवर्तनवादी आघाडीला पाठबळ दिले आहे. अडीच हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची यंत्रणा गतीशील झाली आहे. त्यामुळे ठाले आघाडी व परिवर्तनवादी आघाडीत चुरस वाढली, मात्र गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन चव्हाण आणि परिवर्तनवादीचा संबंध नाही, असे डॉ. वासुदेव मुलाटे यांनी जाहीर केले. या घडामोडीमागील नाट्य एका साहित्यिकाच्या पत्राने घडविले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना 'या' साहित्यिकाने सविस्तर पत्र लिहिताच 'परिवर्तनवादी' दोन पाउले मागे आले. 'आपले आदरणीय आमदार शिक्षणसंस्थेचा वापर करून मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत हस्तक्षेप करीत आहेत. मतदारांवर दबाव टाकणे व आमिषे दाखवून लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करणे खेदजनक आहे. कला, साहित्य व संस्कृतीची आपल्याला उत्तम जाण आहे. त्यामुळे तुम्ही पत्राची दखल घ्याल अशी अपेक्षा आहे,' असा या पत्राचा आशय आहे. या पत्रानंतर पवार यांनी आमदार चव्हाण यांना योग्य समज दिल्याचे समजते. पत्राची प्रत फॅक्सद्वारे औरंगाबादला पाठवण्यात आली. या राजकीय नाट्यानंतर दुसऱ्या दिवशी (१६ जुलै) चव्हाण आणि परिवर्तनवादी आघाडीचा संबंध नसल्याचे जाहीर करण्यात आले.

पत्रलेखक साहित्यिक कोण?

पत्र लिह‌िणारे संबंधित साहित्यिक व पवार यांचा जुना परिचय आहे. या पत्राबाबत आमदार चव्हाण व संबंधित लेखकात बोलणे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघांत वाद झाला नसला तरी चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली, मात्र साहित्यिक कोण याची माहिती समजू शकली नाही.

'मशिप्र'चे चार उमेदवार परिवर्तनवादी आघाडीत असले तरी साहित्याशी माझा संबंध नाही. या निवडणुकीत मी कुणाला पाठिंबा दिला नाही की मतदानासाठी फोन केला नाही. पक्षाने समज दिल्याची माहिती निखालस खोटी आहे. - सतीश चव्हाण, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ची चौकशी

$
0
0

मुख्यमंत्र्याची विधान परिषदेत घोषणा; अहवालानंतर कारवाईचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरात सुरू असलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. चौकशी अहवाल आल्यावर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समांतर पाणीपुरवठा योजना आणि नळ कनेक्शनला लावण्यात येणारे मीटर यासंदर्भात आमदार सुभाष झांबड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरापूर्वी सुभाष झांबड यांनी समांतर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, 'या योजनेचा करार झाला तेव्हा डीआय पाइप वापरण्याचा उल्लेख करारात करण्यात आला, पण त्यानंतर डीआयऐवजी एचडीपीआय पाइप वापरण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत गुप्त पद्धतीने मांडण्यात आला व तो मंजूरही करण्यात आला. त्यामुळे १५३ कोटी रुपयांचा फायदा होईल, असे सांगण्यात आले. हा सर्व प्रकार संशयास्पद वाटतो. समांतर पाणीपुरवठा योजना मुळात ३५६ कोटी रुपयांची होती, पण आता ही योजना १०१८ कोटी रुपयांवर पोचली आहे. महापालिकेने वर्कऑर्डर दिल्यापासून कंपनीने काहीच काम केलेले नाही. उलट महापालिकाच या कंपनीला दर महिन्याला पाच कोटी रुपये देत आहे. नळ कनेक्शनला बसवायचे मीटर बाजारात ८०० रुपयांना येते, पण कंपनी याच मीटरसाठी ३५०० रुपये आकारत आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या सर्व प्रकारामुळे शासनाने समांतर पाणीपुरवठा योजनेची चौकशी केली पाहिजे.'

आमदार सतीश चव्हाण यांनीही चर्चेत भाग घेतला. ते म्हणाले, समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीला १५३ कोटी रुपयांचा फायदा करून देण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीला जास्तीतजास्त फायदा कसा होईल या दृष्टीने महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. कंपनीला डीआयऐवजी स्वस्त दरातील निकृष्ट एचडीपीआय पाइप वापरण्याची मुभा देण्याचा ठराव छुप्या पद्धतीने मंजूर करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्यात या योजनेबाबत असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल केले पाहिजेत.

या लक्षवेधीला सुरुवातीला राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी उत्तर दिले, पण त्यांने आमदारांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, 'समांतर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात अनेक तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. यासंदर्भात राज्यमंत्र्यांकडेही दोन-तीन वेळा बैठका झाल्या. नगरसेवक बापू घडमोडे यांनीही तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या समांतर पाणीपुरवठा योजनेची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.'

आता आर्थिक मदत नाही

समांतर जलवाहिनीचा केंद्र सरकारच्या जुन्या योजनेत समावेश आहे. त्यामुळे या योजनेचे निकष कायम राहतील, पण शासन यापुढे 'समांतर'ला आर्थिक मदत करणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर-नांदेड रस्त्यावर अपघात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । चाकूर

लातूर-नांदेड रस्त्यावर चाकूरजवळ ब्रम्हवाडी पाटी येथे ट्रक आणि क्रूझर गाडीची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात ११ जण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मृतांमध्ये आठ पुरुष, दोन महिला आणि एक बालक यांचा समावेश आहे. अपघातात क्रूझर गाडीचा चुराडा झाला. क्रूझरमधील प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताची पोलिस चौकशी सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रशासनाची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी भरारी पथके नेमली असून, ही पथके प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे स्कॅनिंग करणार आहेत. बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात पगार केले जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतील तर त्यांचा पगारही कापला जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या बाबत ओरड सुरू होती. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर राहत नाहीत, याची शहानिशा खुद्द सीइओ डॉ. अभिजित चौधरी यांनी केली होती. आजवर त्यांनी १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवायाही केल्या, पण त्यानंतरही फरक पडला नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी यातून मार्ग काढण्यासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक निर्माण केले आहे. हे पथक एक जुलैपासून कार्यरत झाले आहे. पथकाकडून जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी दिल्या जातील. त्यावेळी दोन्ही वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असणे बंधनकारक केले आहे. पथकाच्या भेटीत जर वैद्यकीय अधिकारी हजर नसतील तर त्यांचा संपूर्ण दिवसाचा पगार कापण्यात येईल. रेकॉर्ड तपासताना 'पीएचसी' दररोज किती रुग्ण येतात, याचे प्रमाण पाहून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पगार दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यास मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

पथकाच्या दौऱ्यादरम्यान वैद्यकीय अधिकारी जर उपकेंद्र किंवा अंगणवाड्यांमध्ये तपासणीसाठी गेल्याचे कारण दिलेले असेल तर संबंधित ठिकाणचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात येणार आहे. थोडक्यात प्रशासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पूर्णपणे वॉच ठेवण्यात येणार आहे. एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गलथानपणा आढळून आला तर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

'टीएचओ'ही अडकले

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील यंत्र सुरू नसेल तर गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन टीएचओंना हजेरी नोंदवावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुप्रीम कोर्टाचे विभागवार खंडपीठ स्थापन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नैसर्गिक न्याय मिळविण्यासाठी सामान्य नागरिकांना दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे विभागवार खंडपीठ स्थापन करावे, अशी एकमुखी मागणी ठरावाद्वारे 'ऑल इंडिया लॉयर्स युनियन'च्या (आयलू) कार्यशाळेत करण्यात आली. या ठरावाची प्रत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली आहे.

गोव्यातील पणजी येथे नुकतीच संघटनेची दोन दिवसीय कार्यशाळा झाली. 'आयलू'चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बिकास रंजन यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद‍्घाटन झाले. यात विविध सत्रातील चर्चासत्रांमध्ये न्यायालयीन कामकाजाच्या पारदर्शकतेसाठी स्वतंत्र आयोग हवा व स्वतंत्र न्याय प्रशासन असावे, न्यायाधीशांची नियुक्ती पारदर्शक असावी, सुप्रीम कोर्टाचे विकेंद्रीकरण व्हावे व न्यायालय जनतेच्या दारापर्यंत गेले पाहिजे, यासह कामगार व औद्योगिक कायद्यातील दुरुस्त्यांसंदर्भात चर्चा घडून आली. गोवा, गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये आर्थिकदृष्ट्या प्रगतीशील राज्ये असूनही सामान्यांना न्याय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो, अशी खंतही व्यक्त झाली. न्यायालयीन पातळीवर पारदर्शकता आणण्यासाठी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या नेमणुकांसाठी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करावा, न्यायमूर्तींची नेमणूक, बदली वा त्यांच्या दूरवर्तन, बेकायदा कृत्य, गैरवर्तन, गैरव्यवहारांबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व अधिकार आयोगाला असावेत, नॅशनल ज्युडिशियल अपॉईंटमेंट कमिशन अॅक्टमध्ये दुरुस्ती करावी व आयोगाला स्वायत्तता द्यावी, त्यासाठी नेमणूक प्रक्रियेत वकिलांचे आणि महिला व मागासवर्गाचे प्रतिनिधित्व असावे, अशाही मागण्या करण्यात आल्या.

स्वार्थी हेतूने कायद्यात बदल

सहा कामगार कायद्यात दुरुस्तीसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न होत आहेत. कामगार कायद्यात बदल करण्यासाठी काही विधेयके २०१४मध्ये लोकसभेत सादर करण्यात आली आहेत. हा बदल कामगारांना मारक ठरू शकतो, बेरोजगारांच्या संख्येतही वाढ होऊ शकते. केंद्र सरकार मोठ्या उद्योजकांच्या हितार्थ कार्यरत झाल्याचे चित्र आहे. कामगारांकडून १४ तास काम करून घेण्याची कुप्रथा सुरू झाली आहे. केंद्राकडून कामगार कायद्यात स्वार्थी हेतूने बदल केले जात असल्याने त्यावर आवर घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला; तसेच भूसंपादन कायद्यातील बदल हे जनतेच्या भल्यासाठी नसून मोजक्याच लोकांच्या फायद्यासाठी सरकारतर्फे दुरुस्ती करण्यात आली. या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये, अशीही मागणी पुढे आली. या प्रसंगी अॅड. जी. तमकी राज (तमीळनाडू), अॅड. पी. व्ही. सुरेंद्रनाथ, अॅड. के. इलँगो, अॅढ. इ. के. नारायणन (केरळ), सोमदत्त शर्मा यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत संघटनेचे राज्य अध्यक्ष अॅड. आदिनाश तिवारी, सचिव अॅड. चंद्रकांत भोजगर, राज्य कमिटी सदस्य अॅड. जयंत बालगुडे, औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष अॅड. रामनाथ चोभे, सचिव अॅड. बी. एम. वावळकर, सदस्य अॅड. सचिन गंडले, अॅड. सुरेश वाघचौरे, अॅड. जी. एस. गाडीवान, अॅड. पल्लवी बरडे आदी सहभागी झाले होते.

रिक्त जागा भरा

सुप्रीम कोर्टात रिक्त झालेल्या १४ टक्के जागा व हायकोर्टात रिक्त झालेल्या २५ टक्के जागा तातडीने भरण्यात याव्यात. सरकार सध्या १०० रुपयांपैकी केवळ १४ पैसे न्यायालयीन साधन सुविधांवर खर्च करीत आहेत. न्यायालयीन क्षेत्रातील साधन सुविधा योग्य प्रमाणात वाढविण्यासाठी वाढीव निधीची तरतूद करावी, ज्यामुळे न्यायदानाला गती मिळेल, असे मत कार्यशाळेत व्यक्त झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ नव्या दुचाकींची बजाज कंपनीतून चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज ऑटो कंपनीतून नवीन सात पल्सर व एक डिस्कव्हर दुचाकी लंपास करण्यात आली आहे. याबद्दल अज्ञात चोराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज येथील बजाज ऑटो कंपनीत दुचाकींचे उत्पादन केले जाते. नवीन वाहने डिस्पॅच विभागात ठेवली जातात. या विभागात दुचाकी उभी करण्याची क्षमता आठ हजार आहे. येथे ठेवलेल्या दुचाकींची १ एप्रिल रोजी मोजणी करण्यात आली. त्यानंतर १३ जुलै रोजी पुन्हा मोजणी करण्यात आली. या मोजणीत सात पल्सर व एक डिस्कव्हर, अशा आठ दुचाकी कमी असल्याचे समोर आले. बजाज कंपनीच्या प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनातर्फे सुरक्षारक्षक अमित सुरेश गंभीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय बहीरव करीत आहेत.

मुल सापडले

साजपूर येथील धरम काटा परिसरात शुक्रवारी (२४ जुलै) दुपारी तीन वाजता एक वर्षाचे मुल फिरताना सापडले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. एम. साठे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. या मुलास कोणी ओळखत नसल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करून त्यास समाजकल्याण समितीकडे सोपविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहकर्जाचे २२ लाख वळल्याबद्दल गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

गृहकर्जासाठी मंजूर करण्यात आलेल्या रक्कमेतील तब्बल २२ लाख रुपये खात्यावरून परस्पर काढून घेतल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बिल्डर बी. एन. पाटील (सूरज इस्टेट डेव्हलपर्स) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव जनार्दन कासार (रा. जिल्हा परिषद क्वॉर्टर्स, पानचक्की, औरंगाबाद) यांनी घर बांधण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र एमआयडीसी वाळूज येथील शाखेत अर्ज केला होता. यावेळी बी. एन. पाटील यांनी बँकेचे चीफ मॅनेजर के. एम. राव माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे तुमचे गृह कर्जाचे काम लवकर करून देतो, असे सांगितले होते. गृहकर्जासाठी ४० लाख रुपयांचे कोटेशन तयार करण्यात आले; बँकेने ३० लाख रुपये कर्ज मंजूर केले. गृहकर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेकडून बोलविण्यात आले त्यावेळेस बी. एन. पाटील सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अॅग्रीमेंटची प्रत ठेवून त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. त्यानंतर कासार यांना पैशाची गरज भासल्यानंतर बँकेत गेले असता त्यांना बँके मॅनेजरने केवळ आठ लाख रुपयांच्या स्लीपवर सही करण्यास सांगितले. त्याबद्दल कासार यांनी विचारपूस केली असता त्यांच्या खात्यातून १२ मार्च २०१४ रोजी १५ लाख व २२ मार्च २०१४ रोजी ७ लाख रुपये बी. एन. पाटील यांचे सूरज इस्टेट डेव्हलपर्सच्या नावावर वळती करण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी बँक मॅनेजर के. एम. राव व बी. एन. पाटील यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहकर्जाचे २२ लाख वळल्याबद्दल गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

गृहकर्जासाठी मंजूर करण्यात आलेल्या रक्कमेतील तब्बल २२ लाख रुपये खात्यावरून परस्पर काढून घेतल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बिल्डर बी. एन. पाटील (सूरज इस्टेट डेव्हलपर्स) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव जनार्दन कासार (रा. जिल्हा परिषद क्वॉर्टर्स, पानचक्की, औरंगाबाद) यांनी घर बांधण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र एमआयडीसी वाळूज येथील शाखेत अर्ज केला होता. यावेळी बी. एन. पाटील यांनी बँकेचे चीफ मॅनेजर के. एम. राव माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे तुमचे गृह कर्जाचे काम लवकर करून देतो, असे सांगितले होते. गृहकर्जासाठी ४० लाख रुपयांचे कोटेशन तयार करण्यात आले; बँकेने ३० लाख रुपये कर्ज मंजूर केले. गृहकर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेकडून बोलविण्यात आले त्यावेळेस बी. एन. पाटील सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अॅग्रीमेंटची प्रत ठेवून त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. त्यानंतर कासार यांना पैशाची गरज भासल्यानंतर बँकेत गेले असता त्यांना बँके मॅनेजरने केवळ आठ लाख रुपयांच्या स्लीपवर सही करण्यास सांगितले. त्याबद्दल कासार यांनी विचारपूस केली असता त्यांच्या खात्यातून १२ मार्च २०१४ रोजी १५ लाख व २२ मार्च २०१४ रोजी ७ लाख रुपये बी. एन. पाटील यांचे सूरज इस्टेट डेव्हलपर्सच्या नावावर वळती करण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी बँक मॅनेजर के. एम. राव व बी. एन. पाटील यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष मोहिमेत फक्त दोघांवर वीज चोरीचे गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील वीज चोरांना पकडण्यासाठी विशेष पथकाने दोन महिन्यात ७४० वीज कनेक्शनची तपासणी केली. मात्र फक्त दोघांवरच वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जालना सर्कलमध्ये दोन महिन्यात ९३४ वीज कनेक्शनची तपासणी करून ८१ वीज ग्राहकांवर चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

आकडे टाकून वीज चोरी करणे, विना परवानगी वीज कनेक्शन घेणे याची तपासणी करण्यात येत आहे. वसंत भुवन फिडर आणि नारेगाव फिडर येथे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. जून आणि जुलैमध्ये घरगुती ५५५, वाणिज्यिक १९३, औद्योगिक २६ कनेक्शनची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ६७ जणांवर वीज चोरीच्या कलमातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही ग्राहकांनी महावितरणकडे दंडासह शुल्क भरले आहे. पुढील काळात ही तपासणी अधिक तीव्र करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, वसुलीसाठी पुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित ग्राहक महिनाभर बिल भरत नाही. त्यानंतर संबंधित वीज ग्राहकांची तपासणी केली जात नाही. या कार्यप्रणालीमुळे दादोजी कोंडदेव विद्यालयासारेखे आकडा टाकून वीज घेण्याचे प्रकार होत आहेत.

कोर्टात २३० खटले

औरंगाबाद विभागातील २३० प्रकरणे जिल्हा कोर्टात सुरू आहेत. १५२ प्रकरणात तडजोडीचा अधिकार वापरून संबंधित ग्राहकांनी दंडासह शुल्क भरले, अशी माहिती महावितरणच्या विधी विभागातून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images