Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मंगळसूत्र चोर अवतरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिन्याभरानंतर शहरात पुन्हा मंगळसूत्र चोरट्यांनी सलामी दिली आहे. शुक्रवारी सकाळी एन-५ भागातून तर गुरुवारी साडेआठ वाजता सिंधी कॉलनी भागातून दुचाकीस्वार चोरट्यांनी मंगळसूत्र पळविले. या प्रकरणी जवाहरनगर व सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिणी रमेश पोंडगुले (वय ६५, रा. सह्याद्रीनगर, एन-५, सिडको) ही महिला शुक्रवारी सकाळी सात वाजता दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. दूध घेऊन घरी परतत असताना एका परिचयाच्या महिलेसोबत थांबून त्या बोलत होत्या. ही संधी साधून समोरून आलेल्या दुचाकीवरील दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. पोंडगुले आरडाओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले होते. दरम्यान, या चोरट्यांना जवळच असलेल्या एका मंदिराच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ह‌ी कॅमेऱ्याने टिपले. या दोघांची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. हा प्रकार कळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधी कॉलनीतही मारला ह‌ात

मंगळसूत्र चोरट्यांनी गुरूवारी रात्री सिंधी कॉलनीत देखील मंगळसूत्र लंपास केले. शोभा आहुजा (वय ५१) ही महिला रात्री साडेआठ वाजता गुरूद्वारा येथे दर्शन करून घरी जात होती. यावेळी अंधारात आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक महिना विश्रांती

मंगळसूत्र चोरट्यांनी २५ जून रोजी ज्योतीनगर भागातून मंगलबाई देशमुख यांचे मंगळसूत्र पळविले होते. याप्रकरणी मंगळसूत्र चोरांच्या टोळीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर महिनाभर मंगळसूत्र चोरीचे प्रकार घडले नाहीत. आता त्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फार्म हाउस फॉर्मात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य, निरामय शांतता, वाहतूक कोंडीपासून दूर ठिकाणी आपले फार्म हाउस बांधण्याचा कल शहरवासीयांत वाढतो आहे. क्रेडाईने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात फार्म हाउस प्लॉटिंगच्या ४५० साइट आहेत.

शहरपरिसराच्या तीस किलोमीटरच्या अंतरात कोट्यवधींची गुंतवणूक या घरांमध्ये केली जात आहे. सिंदोन-भिंदोन, आडगाव बुद्रुक, झाल्टा, पैठण रोड, नक्षत्रवाडीच्या पुढे, वाळूज‌, वाल्मी लिंक रोडचा परिसर, नगर-मुंबई हायवे, नाशिक रोड, माळीवाडा, लासूर स्टेशन, जळगाव रोड, सावंगीच्या पुढील भाग, पिसादेवीच्या पुढील भाग आणि कुंभेफळ परिसरात फार्म हाउस उपलब्ध आहेत. सुमारे ४ हजार स्क्वेअर फूट प्लॉटपासून ते अगदी ८ हजार ते १० हजार स्क्वेअर फुटांपर्यंतच्या प्लॉटवर अगदी एैसपैस फार्म हाउस बांधण्यावर भर देण्यात येत आहे.फार्म हाउसवर ग्रीन बिल्डिंगची संकल्पना राबवण्यात येत आहे. गारवा देणारे छत बांधण्यासाठी पॅनल्स उपयोग, छतावर भाजीपाला लागवड, रिफ्लेक्टिव्ह मटेरिअल्सचा वापर, जलफेरभरण, बायोगॅस व सौर ऊर्जा यंत्रणा बसवणे आदींसह विविध ट्रेंडी किचनद्वारे फार्म हाऊस परिपूर्ण केले जात आहे. सुमारे ६० लाखांपासून ते १ कोटीपर्यंतची गुंतवणूक फार्म हाउसमध्ये केली जाते. दोन ते पाच टक्के लोक फार्म हाउसमध्ये गुंतवणूक करत आहेत.

सुमारे दहा वर्षांपूर्वी फक्त अतिश्रीमंत व्यक्ती फार्म हाउसमध्ये गुंतवणूक करत. आता उच्च मध्यमवर्गीय नागरिकही याकडे वळू लागले आहेत. यामुळे सेकंड होम संकल्पना वाढत चालल्या आहेत.

- विकास चौधरी, सचिव, क्रेडाई

सेकंड होम, फार्म हाउस सध्या जागा आहे म्हणून उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी शहराबाहेर सुमारे २० ते ३० किलोमीटर जावे लागते. फार्म हाउसमध्ये गुंतवणूक करण्याची टक्केवारी फार नाही, पण ठराविक वर्गातील गुंतवणूक वाढते आहे.- देवानंद कोटगिरे,

संचालक, दिशा कन्स्ट्रक्शन

मी स‌िंदोन-निंदोन भागात एका बिल्डरकडून सुमारे १५ लाखांहून अधिकची गुंतवणूक करून सेकंड होमच्या दृष्टीने घर बांधण्याची तयारी केली आहे. ही गुंतवणूक पहिल्यांदाच करत आहे.

- सुभाष पाटील, गुंतवणूकदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमानला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन पाच व सहा सप्टेंबर दरम्यान अंदमान येथे होणार आहे. महाराष्ट्र मंडळ, पोर्टब्लेअर संमेलनाचे निमंत्रक आहेत. औरंगाबादेत रसिकांना संमेलनासाठी नोंदणी करण्याची व्यवस्था आहे, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. शहरात शुक्रवारी (२४ जुलै) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय मराठवाड्यात असताना २००७ मध्ये विश्व साहित्य संमेलन सुरू झाले. सध्या महामंडळाचे कार्यालय पुण्यात असून, अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला समर्पित करण्यासाठी अंदमान येथे संमेलन आहे, असे वैद्य यांनी जाहीर केले. दरम्यान, औरंगाबाद शहरातील साहित्यिक व रसिकांना विश्व साहित्य संमेलनाचे नोंदणी शुल्क भरण्याची व्यवस्था ‌केली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यालय, अभिश्री ट्रॅव्हल्स आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ यांच्याकडे नोंदणी करावी लागणार आहे. पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे भाऊ सुरडकर, सारंग टाकळकर, सुभाष कुमावत, किरण सराफ, विजय जहागिरदार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पसार आरोपींच्या मुसक्याही आवळल्या

$
0
0

औरंगाबाद : पैशांचा पाऊस पडतो, अशी थाप मारणाऱ्या घटनेतील फरार दोन आरोपींनाही शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली. तर दोन मांत्रिकांसह अटकेत असलेल्या सातही संशयित आरोपींना कोर्टाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

देवळाई शिवारात काही मांत्रिक, भक्तांसमोर पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पूजा करत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी रात्री मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी देवळाई चौक ते शिवगडतांडा रस्त्यालगत असलेल्या डोंगराळ झाडीत छापा मारून सात जणांना अटक केली होती. मात्र, दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. उस्मान शहा (वय ३९) व हकीम पठाण ( वय ३७, दोघे रा. देवळाई) देवळाई शिवारात दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून या दोघांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आल्याची माहिती चिकलठाणा पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात यांनी दिली. दरम्यान, याआधी अटक केलेल्या सातही जणांना कोर्टाने २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदनवन कॉलनीत भरदिवसा घरफोडी

$
0
0

औरंगाबाद : नंदनवन कॉलनीत प्राध्यापकाचे घर फोडून एका लाख बारा हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. शुक्रवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत बावसकर (रा. नंदनवन कॉलनी) व त्यांची पत्नी दोघे प्राध्यापक आहेत. शुक्रवारी बावसकर कुटुंब नोकरीसाठी गेले होते. तर त्यांची मुलगी कॉलेजला गेली होती. दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या व रोख दोन हजार रूपये असा ऐवज चोरट्याने लांबवला. चोरटा घराबाहेर पडत असताना नेमकी मोलकरीण तिथे आली. तिने चोरट्याला हटकले असता 'मॅडमकडे आलो होतो', असे सांगत चोरटा पसार झाला. आतमध्ये गेल्यानंतर मोलकरणीच्या हा प्रकार लक्षात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचे वेळापत्रक कोलमडणार

$
0
0

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलीटी कंपनीच्या वतीने मंगळवारी (२८ जुलै) नऊ तासांचे शटडाउन घेणार आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे. एका दिवसांने पाणीपुरवठ्याचे नियोजन पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. विद्युतयंत्रणे वरील देखभालीची; तसेच १,४०० मिमी आणि ७०० मिमी जोड वाहिनीवर रेल्वे फाटकाजवळ, उड्डाण पुलाखाली ५०० मिमी व्हाॅल्व्ह बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या काळात शहरात इतर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, ज्यात प्रामुख्याने एन - पाच जलकुंभ येथे ४०० मिमी आणि मरीमाता जलकुंभ येथे ५०० मिमी व्हॅाल्व्हची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या खंडण काळामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपन्या बंद करण्याच्या आदेशाला स्थगिती

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अट्रा फार्मा व व्हेरॉक या कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. व्ही. के. जाधव यांनी शुक्रवारी स्थगिती दिली. एन्डूरन्स व हॉस्पिरा या कंपन्यांना लवादाने स्थगिती दिली.

कारखान्याचे प्रदूषित पाणी कुठलीही प्रक्रिया न करता बाहेर सोडल्याप्रकरणी या कंपन्यांना ३२ कोटी भरण्याचे आदेश १५ जुलै रोजी दिले. या आदेशानुसार प्रदूषण मंडळाने व्हेरॉक व अट्रा फार्मा यांना उत्पादन बंद करून अनुक्रमे २ व १० कोटी भरण्याची नोटीस २२ जुलै रोजी बजावली. हा आदेश रद्दबातल करण्याची विनंती करण्यात आली आहे. वाळूज वसाहतीतील प्रदूषित पाण्यासंदर्भात हरित लवादाकडे याचिका केली होती. लवादाने या कंपन्याकडून ३२ कोटी रुपयांचा दंड औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे ४ आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला या कंपन्यांनी खंडपीठ व लवादाकडे आव्हान दिले होते. व्हेरॉक व अट्रा फार्मा या कंपनीत मंडळाने पाहणी केली नाही. गेल्या १० वर्षांपासून या कंपन्या मंडळाच्याच परवानगीने सुरू आहेत. कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता मंडळाने उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले.

मंडळाने नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग केला आहे. त्यामुळे २२ जुलैच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती याचिकाकर्त्याचे जेष्ठ वकील प्रवीण शहा व रामेश्वर तोतला यांनी कोर्टाला केली. मंडळाने कंपनीची बाजू न घेता ही कारवाई बेकायदेशीरपणे केल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांने नोंदविला आहे. मंडळाने कोर्टाने ही विनंती मान्य करून प्रतिवादी प्रदूषण मंडळ व राज्य शासन यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. राज्य शासनातर्फे शिरीष सांगळे यांनी नोटीस स्वीकारली. प्रदूषण मंडळाला ही सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते, पण त्यांचा वकील कोर्टात उपस्थित राहिला नाही. एन्डूरन्स व हॉस्पिरा या कंपन्यांनाही लवादाने स्थगिती दिली आहे. हॉस्पिरा या कंपनीला लवादाने १० कोटी भरण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम ५ कोटीने कमी करून मंडळाच्या आदेशाला स्थगिती दिली. प्रदूषण मंडळाने एन्डूरन्सला १० कोटी भरण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास लवादाने मनाई केली आहे. आय.पी.सी.ए. व श्रेया लाइफ या कंपन्यांना मंडळाने नोटीस दिली आहे, पण त्यांनी कोर्टाकडे धाव घेतली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार सुप्रिया सुळे आज शहरात

$
0
0

औरंगाबादः यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र औरंगाबादतर्फे आयोजित केलेल्या तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानास शनिवारी (२५ जुलै) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. 'सामाजिक न्याय' या विषयावरील चर्चासत्रास त्यांची उपस्थिती राहील.

तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानानिमित्त टी.व्ही. सेंटर येथून सकाळी नऊ वाजता पदयात्रा निघेल. या पदयात्रेत खासदार सुळे सहभागी होतील. तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता त्या शासकीय कर्करोग रुग्णालयास भेट देणार आहेत. नगरसेविका अंकिता विधाते यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या हस्ते होईल. यावेळी विविध पक्षांतील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. एमजीएममधील आईन्स्टाइन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 'सामाजिक न्याय' या विषयावीर चर्चासत्रास दुपारी १२.१५ वाजता सुळे या उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदारांच्या शाळेने आकडा काढला, वीजबिल भरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खासदार, जिल्हा विद्युतीकरण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खैरे यांच्या दादोजी कोंडदेव विद्यालयाने अखेर थकलेले ८५ हजारांचे वीज बिल शुक्रवारी महावितरणकडे भरले. 'मटा'मध्ये वृत्त छापून येताच शाळेवरील आकडा गायब झाला. वीज जोडणीची कार्यवाही महावितरणने सुरू केली.

मयूर पार्क येथे असलेल्या दादोजी कोंडदेव विद्यालयाचे जून महिन्याचे वीज बिल थकले होते. जवळपास एक लाख रुपयांचा भरणा करण्यात आला नव्हता. त्यामुळे महावितरणने शाळेचे वीज कनेक्शन तोडले. मात्र, संस्थेने आकडा टाकून शाळेतील वीज वापर सुरू केला. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने शुक्रवारच्या (२४ जुलै) अंकात छायाचित्रासह प्रसिद्ध केली. हे वृत्त प्रकाशित होताच महावितरण कार्यालय खडबडून जागे झाले. सहायक अभियंता एन. एम. ठाकूर आणि वीज कर्मचाऱ्यांनी दादोजी कोंडदेव विद्यालयाची पाहणी केली. या पाहणीत कोणताही आकडा सापडला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संबंधित संस्थेने वीज बिलापोटी महावितरणाकडे ८५ हजार रुपयांचा भरणा केला. आगामी काळात राहिलेले पैसे भरण्याची तयारी दर्शविल्याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

संबंधित विदयालयात आकडा टाकल्याची मा‌हिती मिळाल्यानंतर आम्ही लाइनमन पाठवून चौकशी केली. शुक्रवारी सकाळी विद्यालयाला भेट देत पाहणी केली. या पाहणीत आकडे टाकल्याची माहिती समोर आली नाही. मात्र, वीज चोरी प्रकरणांची गय केली जाणार नाही.

- एन. एम. ठाकूर, सहायक अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल ले-आउट प्रकरणी चौकशी समिती नियुक्त

$
0
0

औरंगाबाद : हर्सूलच्या गट क्रमांक २०१ मधील ले आउट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय महापौर त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत घेतला. आठ दिवसांत चौकशी अहवाल सादर करा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

गट क्रमांक २०१ या जागेवर महापालिकेने ले आउट पाडण्यास आणि संबंधित प्लॉटधारकांना घरे बांधण्यासाठी परवानगी दिली. मात्र, जेल प्रशासनाने आक्षेप घेतल्यामुळे बांधकाम परवानग्या रद्द करून घरे पाडण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली. या कारवाईला नगरसेवक रुपचंद वाघमारे, विजय औताडे, अफसर खान यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. हे प्रकरण पुन्हा या नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत उपस्थित केले. ले आउट मंजूर करून बांधकाम परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करा, ज्यांची बांधकामे पाडण्यात आली त्यांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी त्यांनी केली. नंदकुमार घोडेले यांनी या चर्चेत भाग घेतला. शेवटी महापौरांनी या प्रकरणात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली. आठ दिवसांत अहवाल द्या, असे आदेश त्यांनी दिले. आयुक्त प्रकाश महाजन यांनीही दोषींवर कडक कारवाई करू असे आश्वासन दिले.

साफसफाईसाठी विशेष सभा

नारेगावचे नगरसेवक गोकुळसिंह मलके यांनी साफसफाईचा आणि कचराडेपोचा मुद्दा मांडला. कचरा डेपोवर उद्यापासून गाड्या येऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. माझ्यावर कोणतीही कारवाई करा, पण मी कचऱ्याच्या गाड्या येऊ देणार नाही असे त्यांनी ठणकावले. त्यानंतर महापौरांनी साफसफाईसंदर्भात येत्या तीन - चार दिवसांत विशेष सभा घेऊ असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आपण मनावर घेतले तर स्मार्टसिटी यशस्वी’

$
0
0

औरंगाबाद : स्मार्टसिटी प्रकल्पासाठीचे निकष कठीण वाटतात. मात्र, आपण मनावर घेतल्यास हा प्रकल्प यशस्वी होईल, असा विश्वास आयुक्त प्रकाश महाजन यांनी नगरसेवकांसमोर व्यक्त केला.
स्मार्टसिटी प्रकल्पासाठी प्रकल्प सल्लागार समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव २० जुलैच्या सर्वसाधारण सभेत चर्चा न करता मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रकल्प नेमका काय आहे, त्याचे निकष कोणते आहेत यावर आज सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, प्रमोद राठोड, गंगाधर ढगे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी या मुद्यांच्या आधारे खुलासा केला. त्यानंतर आयुक्त प्रकाश महाजन यांनी सविस्तर खुलासा केला. स्मार्टसिटी प्रकल्पात शहराचा समावेश व्हावा म्हणून शासनाकडे पंधरा मुद्यांचा एक अर्ज भरून पाठवला आहे. शंभर गुणांचा हा अर्ज आहे. ज्या शहराला जास्त गुण मिळतील त्या शहराचा समावेश पहिल्या दहा स्मार्टसिटीत केला जाणार आहे. अर्जात उल्लेख असलेल्या मुद्यांची माहितीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैलासनगर रस्त्यासाठी खुली जागा वापरण्यास आक्षेप

$
0
0

औरंगाबाद : कैलासनगर ते एमजीएम या रस्त्याचे काम करण्यासाठी महापालिकेची खुली जागा वापरण्यास सर्वसाधारण सभेने शुक्रवारी आक्षेप घेतला. खुल्या जागेच्या वापराचे प्रयोजन बदलायचे असेल तर त्यासाठी कोर्टाची परवानगी आणा आणि सर्वसाधारण सभेत पुन्हा प्रस्ताव ठेवा, असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

लक्ष्मणचावडी ते कैलासनगर स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे काम महापालिकेने केले आहे, पण स्मशानभूमी ते एमजीएम रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यात बारा मालमत्ता बाधित होतात. ज्या लोकांच्या या मालमत्ता आहेत ते लोक मालमत्ता ताब्यात देण्यास तयार नाहीत व मोबदला घेण्यासही तयार नाहीत. त्यामुळे याच भागात महापालिकेची खुली जागा आहे. त्या जागेतून रस्त्याचे काम केल्यास घरे पडणार नाहीत व रस्ताही होईल, असा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत ठेवला होता. रस्त्याच ज्या बारा मालमत्ता बाधीत होणार आहेत, त्यात एका माजी महापौर व माजी आमदाराचीही मालमत्ता असल्याची चर्चा पालिकेत होती. खुल्या जागेतून रस्ता करण्यास राजू वैद्य यांनी आक्षेप घेतला. याबाबत कोर्टाचे काय निर्देश आहेत, असे त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले. खासगी मालमत्ता वाचवण्यासाठी खुल्या जागांचा वापर करण्याची प्रथा आपल्याला पाडायची आहे का, असा सवाल त्यांनी केला. मालमत्तांचे संपादन करण्यास कोर्टाने स्थगिती दिली नसताना असा प्रस्ताव कशासाठी आणला, असे गजानन बारवाल म्हणाले. नंदकुमार घोडेले म्हणाले, प्रस्तावाच्या सोबत नकाशा दिला असता तर अधिक चर्चा करता आली असती. विधीसल्लागार ओ. सी. शिरसाट यांनी या प्रकरणात खुलासा केला. ते म्हणाले, सर्वसाधारण सभेने प्रस्ताव मंजूर केला तरी कोर्टाची मंजुरी घेऊनच कारवाई करावी लागेल. सभागृहनेते राजेंद्र जंजाळ म्हणाले, सक्तीने भूसंपादन करून रस्त्याचे काम करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून अतिक्रमण हटाव

$
0
0

औरंगाबाद : सर्वाधिक रहदारीच्या जालना रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सोमवारी महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमवेत शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख शिवाजी झनझन, जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती शर्मा, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता के. टी. वाघ यांची बैठकीस उपस्थिती होती. जालना रोड व जळगाव रोडवरील अतिक्रमणांचा विषय नेहमीच डोकेदुखीचा ठरला आहे. पालिकेने अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा दिल्या, पण अपेक्षित कारवाई झाली नाही अशी बाजू बैठकीत झनझन यांनी मांडली. मात्र, अतिक्रमण असल्यानंतर त्याला नोटिसची गरज नाही. थेट कारवाई करा, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकांनी आयुक्तांना घेरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राकाज'चा करार रद्द करण्यात टाळाटाळ करणाऱ्या आयुक्तांना शुक्रवारी (२४ जुलै) संतप्त नगरसेविकांनी घेरले. प्रकाश महाजन व्यासपीठावरून खाली उतरताना नगरसेविकांनी त्यांचा रस्ता रोखत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सर्वसाधारण सभेतील वातावरण तापले.

सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. तेव्हा राज वानखेडे यांनी 'राकाज्'वर कारवाई झालीच पाहिजे, ही कारवाई झाली नाही तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे स्पष्ट केले. याप्रकरणी प्रशासनाने काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याची मागणी भगवान घडमोडे यांनी केली. 'राकाज'चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती आयुक्तांनी नियुक्त केली होती. या समितीचा अहवाल मांडा, असे आदेश महापौरांनी दिले. चौकशी समितीचे अध्यक्ष मुख्य लेखापरीक्षक एम. आर. थत्ते यांनी अहवाल वाचून दाखवला. 'राकाज्'प्रकरणी कराराचा भंग झाला आहे, त्यामुळे करारातील कलम ७.१९ नुसार नोटीस न देता करार रद्द करता येतो, असे थत्ते यांनी स्पष्ट केले. यानंतर नंदकुमार घोडेले म्हणाले, चौकशी समितीने अहवाल आयुक्तांना दिला आहे. अहवालातील तपशीलानुसार करार रद्द होऊ शकतो, त्यामुळे आयुक्तांना कारवाई करण्यास सांगा, अशी मागणी महापौरांकडे केली. राजू वैद्य म्हणाले, चौकशी अहवाल अभिनंदनास पात्र आहे. या अहवालाच्या नंतर आयुक्तांची भूमिका काय आहे, कारवाई करण्यासाठी ते मुहूर्त पाहात आहेत का, या बद्दलचा खुलासा व्हावा. नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, माधुरी अदवंत, अफसर खान यांनीही 'राकाज्'चा करार रद्द झालाच पाहिजे अशी मागणी केली. करार रद्द करताना पालिकेच्या प्रशासनाने कॅव्हेट दाखल करावे, अशी सूचना राजू वैद्य यांनी केली. आपली भूमिका मांडताना आयुक्त प्रकाश महाजन म्हणाले, कराराचा भंग झाला आहे. त्यामुळे करार रद्द करण्यास काहीच हरकत नाही. करार रद्द करा अशी शिफारस मी सर्वसाधारण सभेला करतो. या प्रकरणातील अधिकाऱ्यावरही लगेचच कारवाई केली जाईल. प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी करार रद्द करण्याचा निर्णय जाहीर करावा, आयुक्त आपली जबाबदारी दुसऱ्यांवर टाकत आहेत असा आरोप नगरसेवकांनी केला. तेव्हा शिफारस नको निर्णय घ्या, असे महापौरांनी आयुक्तांना सांगितले. यानंतरही आयुक्त निर्णय घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे सर्वच नगरसेविका व्यासपीठासमोर जमल्या. करार रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापौरांनी सर्वसाधारण सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली. सभा तहकूब झाल्यावर आयुक्त व्यासपीठाच्या खाली उतरत असताना नगरसेविकांनी त्यांचा रस्ता रोखला. यावेळी घोषणाबाजी केली.

गायब हार्डडिस्कसाठी पोलिसांची मदत

'राकाज्' क्लबमधून जप्त केलेल्या डीव्हीआरमधील हार्डडिस्क गायब झाली, हा मुद्दा उपमहापौर प्रमोद राठोड यांनी उपस्थित केला. हार्डडिस्कचे काय झाले, त्याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली. त्यावर महापौरांनी हार्डडिस्क प्रकरणात पोलिसांच्या मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूरजवळील अपघातात ११ ठार

$
0
0

लातूरः नांदेड-लातूर राज्यमार्गावर चाकूरजवळ अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात अलगरवाडी गावाजवळ शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता घडला. जखमींवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त जीप नांदेडकडून प्रवासी घेत लातूरकडे येत होती. या जीपची पहाटे अलगरवाडी जवळील वळणावर लातूरहून नांदेडकडे जाणारा ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात १० जण जागीच ठार झाले, तर एका प्रवाशाचा उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना मृत्यू झाला. ट्रक हा मध्यप्रदेशातील असून चालक पसार झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता, की जीपच्या समोर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि ट्रकच्या खालून मृतदेह काढावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजकीय कुरघोडीत उड्डाणपूल अडकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दोन वर्षांपासून जालना रोड अडवून बसलेल्या मोंढा नका उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले असले तरी मंत्री महोदयांना वेळ नसल्यामुळे पूल आणखी आठवडाभर खुला होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महिनाभरापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या या पुलावरून राजकीय कुरघोडी सुरू झाल्यामुळे शनिवारी ठरलेला कार्यक्रम आणखी आठ दिवस लांबविण्यात आला आहे. त्यामुळे नागर‌िकांना आणखी आठ दिवस हाल सहन करावे लागणार आहेत.

जालना रस्त्यावरील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या माध्यमातून मोंढा नाका चौकात उड्डाणपूल उभारण्यात आला. ३५ कोटी खर्चून उभारलेल्या पुलाचे बांधकाम ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण ते जवळपास दोन महिने लांबले. दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे. या काळात सर्वाधिक रहदारीच्या जालना रस्त्यावरून जाताना औरंगाबादकरांचे मात्र पुरते हाल झाले. आकाशवाणी चौकापासून अमरप्रीत चौकापर्यंत या काळात दररोज वाहतूक कोंडी होत होती. मोंढा उड्डाणपुलाच्या कामाला सुरवातीपासून अडथळे आले होते. कसेबसे काम पूर्ण झाले. २८ जून रोजी दक्षिणेकडच्या रस्त्याची चाचणीही घेण्यात आली. त्यावेळी जुलै दुसऱ्या आठवड्यात पूल खुला करण्यात येईल असे 'एमएसआरडीसी'तर्फे सांगण्यात आले होते. काम पूर्ण झाले असतानाही केवळ उद्घाटनाच्या तारखेपर्यंत डागडुजी सुरू होती. गेल्या आठवड्यात २५ जुलै ही उद्घाटनाची तारीख निश्चित झाली. पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होते. शुक्रवारी मात्र मुंबईहून उद्घाटनाबद्दल अनिश्चितता असल्याचे कळविण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्धामुळे शनिवारचे उद्घाटन लांबले आहे. पुढची तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. पण तोपर्यंत औरंगाबादकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावाच लागणार आहे. सेव्हन हिल्स उड्डाणपुलाचे कुठलेही रितसर उद्घाटन न होता २००३मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला होता, हे विशेष.

काही अपरिहार्य कारणास्तव उड्डाणपुलाचे शनिवारचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. एक ऑगस्ट रोजी उद्घाटन होईल. तोवर नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

- उदय भरडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् बालके स्वगृही परतली

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चार वर्षांची दोन बालके खेळता खेळता घरापासून थेट दोन किलोमीटर लांब गेली. हर्सूल पोलिस चौकीसमोर ही बालके पोलिसांच्या नजरेस पडली. त्यांना पूर्ण पत्ताही सांगता येत नव्हता. शेवटी लाउडस्पीकरवरून घोषणा केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना माहिती कळाली व ती बालके स्वगृही गेली. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. हर्सूल पोलिसांनी या बालकांना पालकांच्या हवाली केले आहे.

इस्माईल (वय ४) या बालकाचे घर जहांगीर कॉलनीमध्ये आहे. शुक्रवारी त्याचा मामेभाऊ नुमान (वय ४) हा आजोबांसोबत टाउन हॉलवरून जहांगीर कॉलनीत आला होता. या दोघांची लगेचच चांगलीच गट्टी जमली. खेळता खेळता ते दोघेही तब्बल दोन‌ किलोमीटर लांब गेले. मात्र, एवढ्या लांब गेल्यावर ते दोघेही घाबरून गेले.

हर्सूल पोलिस चौकीसमोरच ही भेदरलेली बालके पोलिसांच्या नजरेस पडली. या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रेमाने पोलिस चौकीत नेले. पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी व इतर कर्मचाऱ्यांनी प्रेमळपणे या दोघांची विचारपूस केली. मात्र, त्यांना पूर्ण नाव किंवा पत्ता सांगता येत नव्हता. जहांगीर कॉलनी एवढेच ते दोघेही सांगत होते. त्या माहितीच्या आधारे एका धार्मिक स्थळाच्या लाउड स्पीकरवरून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, ही बालके हरवल्यामुळे त्यांचे पालकही त्यांचा शोध घेत होते. स्पीकरवरून झालेली घोषणा एका रिक्षाचालकाने ऐकली. त्याचवेळी या मुलांचा काकासुद्धा हर्सूल पोलिस चौकीजवळ बालकांचा शोध घेत होता. रिक्षाचालकाने हा प्रकार त्यांना सांगितला. हर्सूल पोलिस ठाणे गाठून त्यांनी बालकांची ओळख पटविली. त्यानंतर या बालकांना पालकांच्या हवाली करण्यात आले.

पोलिसमामाने केले लाड

या दोन बालकांना पोलिस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. सुरुवातीला भेदरलेली ही बालके नंतर पोलिसासोबत रमली. पोलिसांनीच त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली. पोलिस निरीक्षकाच्या खुर्चीवर बसण्याचा आनंदही या बालकांना मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फवारणी यंत्र भेट देत निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद


शहरातील न होणाऱ्या साफसफाईबद्दल आयुक्तांना फवारणी यंत्र भेट देत शिवसेनेचे नगरसेवक मनोज गांगवे यांनी निषेध व्यक्त केला. आयुक्तांनी ही भेट स्वीकारली नाही. सुरक्षारक्षकांनी यंत्र जप्त केले.
गांगवे म्हणाले, औषधींची फवारणी योग्य प्रकारे होत नाही. वारंवार लक्षात आणून दिल्यावरही वॉर्ड अधिकारी काहीच कारवाई करीत नाहीत. ड्रेनेज नाल्यामध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वॉर्डात चार ते पाच हजार नागरिक आजारी आहेत. महापालिकेचे फवारणी यंत्र नादुरुस्त आहेत. कर्मचारी अपुरे आहेत. महापालिकेचे फवारणी यंत्र नादुरुस्त असल्यामुळे आयुक्तांना भेट देण्यासाठी नवीन फवारणी यंत्र मी आणले आहे, असे म्हणत गांगवे यंत्र घेऊन आयुक्तांच्या दिशेने गेले. आयुक्तांनी ते यंत्र न स्वीकारता सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून जप्त केले. फवारणी संदर्भात राजू वैद्य, भगवान घडमोडे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

क्रांतिचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याबद्दल नगरसेवक गजानन बारवाल यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. खासगी व सरकारी मालमत्तांचे भूसंपादन न झाल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. वीजेच्या खांबांचा मोठा अडसर या रस्त्यावर आहे. व्हिट्स् हॉटेलच्या चौकात रस्ता फारच धोकादायक बनला आहे असे विविध मुद्दे त्यांनी मांडले. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी रस्त्याच्या कामाबद्दल खुलासा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज् लाइफ’चा करार रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्योतीनगरातील राकाज् लाइफ स्टाइल क्लबचा करार रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. आयुक्त प्रकाश महाजन यांनी याबाबत घोषणा केली. पोहण्याच्या तलावासह क्लबचा परिसर मालमत्ता विभागाने ताब्यात घ्यावा. विधी विभागाने कोर्टात कॅव्हेट दाखल करावे, असे आदेशही आयुक्तांनी दिले.

राकाज् लाइफ स्टाइल क्बल एक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला होता. महापालिकेने पोहण्याचा तलाव व त्याच्याशी संबंधित उपक्रमांसाठी शलाका इंजिनीअर्सबरोबर करार केला होता, पण क्लबच्या परिसरात महापालिकेची परवानगी न घेता अनेक उपक्रम सुरू असल्याचे महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केलेल्या पाहणीत उघड झाले होते. २० जुलै रोजी सर्वसाधारण सभेत नगरसेविकांनी पालिकेचे बीओटी प्रमुख सिकंदर अली यांना बांगड्यांचा आहेर दिला होता. करार रद्द करण्याबद्दल आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली, पण त्यांनी काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे महापौरांनी सभा तहकूब केली होती.

ही सभा आज सकाळी झाली. सुरुवातीलाच नगरसेवक राज वानखेडे यांनी 'राकाज्'चा विषय उपस्थित केला. भगवान घडमोडे, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, शिल्पाराणी वाडकर, माधुरी अदवंत यांनी करार रद्द करण्याची मागणी केली. नगरसेविकांनी आयुक्तांना 'घेराओ' घालून, 'करार रद्द झाल्याच पाहिजे,' अशा घोषणा दिल्या. शेवटी महापौरांशी चर्चा करून आयुक्त प्रकाश महाजन यांनी, 'सभागृहाच्या आदेशानुसार 'राकाज्'चा करार रद्द करण्यात येत आहे,' अशी घोषणा केली.

राकाज् क्लबमध्ये अनेक उपक्रम कराराव्यतिरिक्त सुरू होते. त्यामुळे करारातील कलम ७.१९नुसार कोणतीही नोटीस न बजाविता करार रद्द करता येऊ शकतो, असा सुस्पष्ट अभिप्राय 'राकाज्'संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने नोंदविला व क्लबवर ठपका ठेवला. चौकशी समितीचे अध्यक्ष मुख्य लेखापरीक्षक एम. आर. थत्ते यांनी अहवाल सभागृहात वाचून दाखवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘IVF’चा प्रवास ‘डिझायनर बेबी’पर्यंत

$
0
0

निखिल निरखी, औरंगाबाद

आयव्हीएफ तंत्रामुळे १९७८मध्ये जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्मली. त्याच्या २० वर्षांनंतर, म्हणजे १९९८ मध्ये औरंगाबादेत पहिला टेस्ट ट्यूब बेबी बॉय जन्माला आला. तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळेच 'आयव्हीएफ'चा सक्सेट रेट ७ ते १० टक्क्यांवरून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, लवकरच विस्तारित पीजीडी तंत्रज्ञानामुळे पाहिजे त्या रंगरूप-उंची-आकार आणि अनुवंशिक गंभीर-दुर्धर आजार-विकार टाळून खात्रीशीर सुदृढ मूल जन्माला घालणे शक्य होणार आहे. पाश्चात्य देशांत हे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भारतामध्येही अशा प्रकारची 'डिझानर बेबी' नजिकच्या भविष्यात कधीही जन्मू शकते, अशी परिस्थिती आहे. डॉ. रॉबर्ट एडवर्ड व डॉ. पॅट्रिक स्पेप्टो यांच्या अथक परिश्रमातून आणि शंभरपेक्षा जास्त प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर १९७७मध्ये 'इन व्हिट्रो फर्टिलायझेशन' (आयव्हीएफ) तंत्र यशस्वी झाले आणि १९७८मध्ये लुईस ब्राऊन ही पहिली टेस्ट ट्यूब बेबी लंडनमध्ये जन्मली. १९९८ मध्ये आैरंगाबादेतील पहिली टेस्ट ट्युब बेेबी बॉय जिल्ला हॉस्पिटलमध्ये जन्मला. यासंदर्भात जिल्ला हॉस्पिटलच्या ज्येष्ठ स्त्रीरोग-वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. मंजू जिल्ला 'मटा'ला म्हणाल्या, 'लुईस ब्राऊनला झालेली दोन्ही मुले ही नैसर्गिक प्रसुतीद्वारे झाली आहेत आणि अशी अनेक उदाहरणे आहे. त्यामुळे आयव्हीएफ तंत्राचा कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले. पाश्चात्य महिलांमधील 'फॅलोपियन ट्यूब'च्या मोठ्या समस्येमुळे या तंत्राला प्रचंड मागणी होती व तंत्रज्ञान झपाट्याने विकसित गेले. स्त्री बिजकोषामध्ये थेट शुक्राणू सोडण्याच्या 'इक्सी' तंत्राने सक्सेस रेट वाढला. 'पीजीडी' तंत्रज्ञानाने शंभर टक्के निर्दोष गुणसूत्रांची निवड करणे शक्य झाले असून, त्यामुळे सक्सेस रेट ६० ते ७० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. अर्थात, लॅबमधील अत्युच्च तंत्रज्ञान, तज्ज्ञांवर सक्सेस रेट अवलंबून असून, सर्वसाधारणपणे भारतात ५० टक्क्यांपर्यंत हा रेट आहे. आता तर जन्माला येणाऱ्या मुला-मुलीचा अपेक्षित रंग-केशरचना-उंची व इतर शरीररचनाही तीन प्रकारच्या पीजीडी तंत्रामुळे शक्य झाले आहे.'

इक्सी, लेझर अॅसिस्टेड तंत्र, लॅबमधील क्लास १०० तंत्र, औषधी-इंजेक्शनमुळे सक्सेस रेट ५० टक्क्यांपर्यंत आणणे शक्य झाले आहे. अर्थात, अजूनही तंत्रज्ञान विकसित होण्यास मोठा वाव आहे. वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असताना हे तंत्रज्ञान मानवासाठी कल्याणकारी ठरत आहे.

- डॉ. राजेंद्र बोलधने, वंध्यत्वतज्ज्ञ, एमजीएम नेक्स्ट जनरेशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images