Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कृत्रिम पावसासाठी तारीख पे तारीख !

0
0

औरंगाबाद : कृत्रिम पाऊस आणि डॉप्लर रडारच्या इन्स्टॉलेशनसाठी प्रशासनाकडून तारीख पे तारीख देण्यात येत आहे. प्रवासात असलेले रडार औरंगाबादला मंगळवारी, तर विमान रविवारपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली.

ढगांची स्थिती, आकार वाऱ्याच्या वेगाची अचूक माहिती देणारे सी-डॉप्लर रडार सोमवारी मुंबईत पोहचणार आहे. फ्लेअर व विमान रविवारी किंवा सोमवारपर्यंत औरंगाबादला पोहचेल. ३१ जुलैपर्यंत विमान औरंगाबादला येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले होते. मात्र, हा मुहूर्त हुकल्यामुळे घोषणेनंतर गेल्या आठवड्याभरात कृ‌त्रिम पाऊस पाडण्याचे केंद्र असलेल्या औरंगाबादमध्ये कोणतीही हालचाल झाली नाही. प्रशासनाने दिलेल्या नवीन तारखेनुसार डॉप्लर रडारची यंत्रणा मंगळवारपासून कार्यान्वित होईल. त्यानंतर ढगांच्या स्थितीचा अभ्यास करून कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन आहे.

कृत्रिम पावसासाठी उपयुक्त ढगांची स्थिती महत्त्वाची ठरणार असल्यामुळे ढग निघून गेल्यास प्रयोगाला विलंब होणार हे निश्चित झाले आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस मोठ्या पावसाची वाट पहावी लागणार आहे.

मंत्र्यांचे वादे

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला उशीर झाला असतानाच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विविध व्यासपीठांवरून दोन दिवसांत मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल, कृत्रिम पाऊस पाडणारे विमान औरंगाबादच्या विमानतळावर उभे असल्याचे विधान केले होते. मात्र, सध्या विमान बंगळूरला तर रडार अद्यापही अमेरिकेतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हज यात्रेकरूंचे विमान २ सप्टेंबरला जेद्दाकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अखेर सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत यंदाही हज यात्रेकरूंचे विमान औरंगाबाहूनच सौदी अरेबियातील जेद्दाला रवाना होईल. पहिल्या विमानाने २ सप्टेंबर रोजी २४७ यात्रेकरून जातील. दरवर्षी हज यात्रेसाठी औरंगाबाद विमानतळावरून विशेष विमानाची सोय केली जाते. त्यासाठी औरंगाबादसह अहमदनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणीहून अनेक यात्रेकरू हजला जातात. या हाजींना मुंबईहून विमान सेवा देण्यात आली, तर औरंगाबाद ते मुंबई असा नाहक प्रवास करावा लागणार होता. त्यामुळे औरंगाबाद विमानतळावरून विमानसेवा कायम ठेवावी, असा आग्रह महाराष्ट्र हज कमिटीने केला. तो मान्यही करण्यात आला.

फ्लायनास एअरवेजच्या विमानाने २४७ हाजी हज यात्रेला निघणार आहे. २ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर पर्यंत औरंगाबाद ते जेद्दासाठी विमानाचे उड्डाण होईल. या विमानातून २४०० च्या वर प्रवासी हज यात्रेला जातील. परतीचा प्रवास १३ ऑक्टोबरपासून सुरू होईल. शेवटचे मीना ते औरंगाबाद हे विमान २२ ऑक्टोबरला येईल.

- अब्दुल करीम पटेल, हुज्जाज कमिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस कारमुळे खळबळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेव्हन हिल्स परिसरात एक कार बेवारस स्थितीत उभी असल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार समोर आला. सजग नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक नाशक तसेच श्वान पथकाने कारची तपासणी केल्यानंतर ही कार सिडको पोलिसांनी जप्त केली. कारमालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या कारमध्ये आक्षेपार्ह काहीही आढळले नाही.

मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवसापासून सतर्कता म्हणून सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. असे असतानाच सेव्हन हिल्स भागातील राज हाईटस् इमारतीसमोर एक कार शुक्रवारी बेवारस स्थितीत सापडली. काही तासांपासून उभी असलेली ही कार (एम.एच. २० ए.जी ९६३) नेण्यासाठी कोणीच न आल्याने तेथील नागरिकांना संशय आला. त्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारची तपासणी करून ती ताब्यात घेतली. याप्रकरणी अधिक तपास सिडको पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

याकूबच्या भावाला हवी १५ दिवस पॅरोल रजा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी फासावर लटकविलेल्या याकूब मेमनचे इसा व युसूफ हे भाऊ २०११ पासून हर्सूल कारागृहात आहेत. यापैकी इसा मेमनने पॅरोलसाठी (अभिवचन रजा) कारागृह प्रशासनाकडे अर्ज केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

याकूबला फाशी दिल्याचे समजातच इसा व युसूफ चांगलेच धास्तावलेत. इसाने कुटुंबियांच्या भेटीसाठी कारागृह प्रशासनाकडे पॅरोल मंजूर करण्याचा लकडा लावला आहे. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता पहिला अर्ज देत मुंबई येथील कुर्ला येथे जाणार असे नमूद केले. त्यानंतर त्याने पुन्हा दुसरा अर्ज करत माहीम येथील घरी जाणार असे सांगितले. या अर्जाबाबत कारागृह प्रशासनाने मुंबई येथील माहीम पोलिसांना माहिती दिली. त्यांचा अहवाल आल्यानंतरच पॅरोलवर पाठविण्यात येईल, असे कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे. इसाने पॅरोलसाठी अर्ज केल्याचे समजताच शहर पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून माहिती घेतली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी याप्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीबीझेड, एलएमएसने चुकवला ५ कोटींचा कर

0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

प्राप्तिकर विभागाने मंगळवारी ( २८ जुलै) आणि बुधवारी (२९) रोजी शहरातील श्रीनिकेतन कॉलनीजवळच्या लालचंद मंगलदास सोनी आणि सूतगिरणी चौकातील बी.बी. झवेरी या दोन बड्या सराफांच्या शहरातील दोन्ही आस्थापनांची तपासणी केली. त्यांनी ५ कोटींपेक्षा जास्त करचुकवेगिरी केल्याचे तपासणीत आढळून आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन्ही दुकानांतील कागदपत्रे व स्टॉकची दोन दिवस कसून तपासणी करण्यात आली. त्यात बी.बी.झवेरीकडून ३ कोटी ५० लाखांची, तर लालचंद मंगलदास सोनी (एलएमएस) कडून सुमारे १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक करचुकवेगिरी झाल्याचे आढळून आले. दोन्ही आस्थापनांच्या मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ही करचुकवेगिरी सुमारे ५ कोटींपेक्षा अधिक असल्याने सराफा व्यावसायिक आणि प्राप्तिकर विभागाच्या भुवया उंचावल्या आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत प्राप्तिकराच्या सुमारे आठ आस्थापनांवर धाडी पडल्या होत्या. चार महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा प्राप्तिकर विभागाने शहरातील बड्या व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित करीत कारवाई सुरू केली आहे. यामुळे करचुकव्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी २८ रोजी दुपारी २ वाजता अचानक सराफा व कासारी बाजार येथील दोन बड्या ज्वेलर्सच्या दुकानात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली. सुमारे ४० अधिकारी तपासणी करीत होते. यात शोरूममधील स्टॉकची मोजणी, खतावण्या, बिले, मालाचे आवक-जावक रजिस्टर, विक्री रजिस्टर, प्राप्तिकराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दुपारी सुरू झालेली तपासणी रात्रभर सुरू होती. या कारवाईसंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. एकीकडे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये आयकरची तपासणी चालू होती. त्याच्या बाजूचे ज्वेलर्सचे दुकान नेहमीप्रमाणे सुरू होते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर एका ज्वेलर्सने आपले शोरूम पुन्हा सुरू केले.

जुलैतच कारवाई सुरू

प्राप्तिकर विभाग नेहमी नोव्हेंबर ते मार्चदरम्यान प्राप्तिकर बुडविणाऱ्यांवर कारवाई करीत असतो; पण यंदा जुलै महिन्यातच व्यावसायिकांची तपासणी सुरू केल्याने सर्व व्यावसायिक खडबडून जागे झाले आहेत.

हो. आमच्या दोन्ही आस्थापनांकडून सुमारे दीड कोटींचा कर बुडवल्याचे निष्पन्न होत आहे, पण प्राप्तिकर विभागाने दिलेल्या नोटीसला उत्तर देऊ व आम्ही या प्रकरणातून मुक्त होऊ.

- दिनेश सोनी, संचालक लालचंद मंगलदास सोनी ज्वेलर्स

प्राप्तिकर विभागाने रूटीन सर्व्हे केला आहे. त्यांनी बजावलेल्या नोटीसला उत्तर देत आहोत, पण या धाडी होत्या असे म्हणता येत नाही. सरकारी काम आहे. ते आयकर विभागवाले पूर्ण करत होते. त्यांनी आमच्या दुकानाचा सर्वे केला आहे.

- बलराम झवेरी, संचालक बी.बी. झवेरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जायकवाडी’त पाच टक्के साठा

0
0

पैठण : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक कमी झाली असून शुक्रवारी सकाळी (३१ जुलै) २३ हजार क्युसेस प्रतितास याप्रमाणे पाणी येत होते. ही आवक सायंकाळी तीन हजार क्युसेस प्रतितासावर आली आहे. धरणाचा पाणीसाठा पाच टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात जायकवाडीच्या ऊर्ध्व भागात चांगला पडल्याने बुधवारपासून पाण्याची आवक सुरू झाली होती. धरणात सुरूवातीला १० हजार क्युसेस प्रतितास या प्रमाणे आवक सुरू होती. त्यात गुरुवारी वाढ होऊन आवक २५ हजार क्युसेस प्रतितास झाली. नगर, नाशिक व जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पावस कमी झाल्याने येणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. दरम्यान, बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात धरणात ५६.२९५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच जवळपास दोन टीएमसी पाणीसाठा झाला. जायकवडी धरणात ८३०.७३५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा असून यापैकी ९२.६२९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा (पाच टक्के) असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासी डॉक्टरला घाटीत मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीली निवासी डॉक्टरला दोन अज्ञात तरुणांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गुरुवारी रात्री एका निवासी डॉक्टर घाटीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असताना ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी डॉक्टरला काठीने मारहाण केली आणि ते पळून गेले. याप्रकरणी घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर निवासी डॉक्टरांसह बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी गेले. संबंधित डॉक्टरला एकाने काही दिवासांपूर्वी धमकी दिली होती. त्यांनीच मारहाण केली असावी, अशा संशय डॉ. जेवळीकर यांनी व्यक्त केला. संबंधित निवासी डॉक्टरचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्फ्रास्ट्रक्चरची ७५० कोटींची कामे

0
0

म. टा. विशेष प्रतिनधी, औरंगाबाद

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) कामाने तब्बल दोन वर्षांनंतर वेग घेण्यास सुरवात केली आहे. कॉरिडॉरमध्ये पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी पुढील आठवड्यात तब्बल ७५० कोटींच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्यात वीजवितरण, अंतर्गत रस्ते आणि जलनिसारणाच्या कामांचा समावेश असणार आहे.

डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा बिडकीन मेगा इंडस्ट्रिअल पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात करमाडसह बिडकीन, नांदरगाव, निलजगाव, बंगला तांडा व बन्नी तांडा येथील ८४६ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी ४००० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार (मास्टर प्लॅन) करण्यासाठी डीएमआयसी महामंडळाने निविदा मागविल्या होत्या. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे आठ चौरस किलोमीटर परिसर विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी १५३३ कोटी रुपये केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केले होते. त्यानुसार पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांना सुरवात झाली आहे.

या प्रकल्पासाठी राज्य सरकारने औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिप लिमिटेड (एआयटीएल) कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीत राज्य सरकारचा वाटा ५१ टक्के असणार आहे. डीएमआयसीच्या मास्टर प्लॅनला नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल रूलनुसार मान्यता मिळाली असून केंद्रीय पर्यावरण खात्याकडूनही प्रकल्पाच्या उभारणीस हिरवा कंदिल दर्शविण्यात आला. कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केलेली जागा कंपनीकडे हस्तांतरित केली आहे.

पुढच्या तीन वर्षांत सध्या संपादित केलेल्या जमिनीवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्राने दिलेल्या बजेटनंतर कामे वेगाने सुरू झाली आहेत. शुक्रवारी या भागातील करमाड आणि लाडगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारणीसाठी ७७ कोटींच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.

संपादित जागेवर नवीन उद्योग उभारणीसाठी पाणी, रस्ते, वीज असणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान पायाभूत सुविधा पुरविल्या जातील. वर्षभरापूर्वी जायकवाडी ते डीएमआयसी अशी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यासाठीची निविदा मंजूर करण्यात आली होती. त्याचा पुढचा टप्पा हा अंतर्गत सुविधांचा असणार आहे. त्यात रस्ते, जलनिसारण वाहिन्या तसेच वीजवितरण सुविधांचा समावेश आहे. या कामासाठी अंदाजे ७५० कोटी रुपये लागणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यापासून राबविण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

दीड वर्षात उद्योग

डीएमआयसीमध्ये पुढील दीड वर्षांत पहिला उद्योग उभारण्याच्या दृष्टिने कंपनीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. ३० वर्षांत या भागाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. त्याचा पहिला टप्पा दहा वर्षांचा असून, पहिल्या चार वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग डीएमआयसीमध्ये सुरू झाला तर, औरंगाबादमधील गुंतवणूक वाढण्यास सुरवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोजगार हमी योजनेत दोन कोटींचा गैरव्यवहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

टाकळी राजेराय येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत सुमारे दोन ते सव्वादोन कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात सरपंच, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद मनोज कुचे यांनी दिली आहे.

२०१० ते २०१३ या काळात टाकळी राजेराय परिसरात अब्दुलपूर तांडा, जमालवाडी शिवारात केलेल्या कामांचे बनावट रेकॉर्ड तयार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणांनी बनावट मजूर दाखविले. शाळकरी विद्यार्थ्यांच्या नावे मजुरीची रक्कम उचलल्याचा संशय आहे. 'सव्वादोन ते दोन कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला,' अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी दिली.

सरपंच तिलकचंद मेठी, ग्रामसेवक बी. बी. गव्हाणे, ग्रामरोजगार सेवक शेख मिनाज शेख हनीफ, राजू राठोड, पोस्टमास्तर बापू ठेंगडे, पोस्टमन शेख मुनीर शेख अब्बास, जिल्हा परिषद सिंचन शाखा अभियंता राजेंद्र अमृतकर, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता मंजूर अहेमद, कृषी सहाय्यक जाधव व वनरक्षक श्रीमती जे. आर. तरटे आणि तहसील कार्यालयातील मग्रारोहयो विभागातील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दळणवळण द्रुतगती महामार्गाने औरंगाबाद-मुंबई चार तासांत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई व नागपूर यांना जोडणारा ८०० किलोमीटर लांबीचा नागपूर - अमरावती - औरंगाबाद - घोटी - मुंबई हा दळणवळण द्रुतगती महामार्ग (कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस वे ) २०१९पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधीमंडळात केली. त्यामुळे औरंगाबाद ते मुंबई हे अंतर केवळ चार तासांत कापणे शक्य होणार आहे.

३० हजार कोटींची गुंतवणूक करून राज्यातील विकासाचा अनुशेष असलेल्या सर्व विभागातून जाणाऱ्या या महामार्गाची घोषणा सरकारने केली. मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातील शहरांना हा मार्ग जोडेल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हाय-वेप्रमाणे कंट्रोल्ड अॅक्सेस, ऑप्टिक फायबर नेटवर्क, सीसीटीव्ही, वाय-फाय; तसेच शक्य असेल तेथे आयटी पार्क, स्मार्ट सिटी, शैक्षणिक संकुले उभारण्याचाही सरकारचा मनोदय आहे. या महामार्गामुळे औरंगाबाद-मुंबई हे ३६० किलोमीटरचे अंतर चार तासांत कापणे शक्य होईल. पहिल्या टप्प्यात भूसंपादन व चार पदरी रस्ता बांधण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात सहा पदरी काँक्रिट रस्ता करण्यात येईल. सप्टेंबर २०१९पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे काम केंद्र सरकारबरोबर संयुक्त भागीदारी तत्वावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. नागपूर - मुंबई द्रुतगती मार्ग पूर्वीच जाहीर झाला होता. औरंगाबाद ते शिर्डीपर्यंतचा रस्ताही तयार झाला आहे, पण दहेगाव बंगला (ता. वैजापूर) येथे १२ किलोमीटरचे भूसंपादन रखडले आहे. पुढे घोटी येथेही एक टप्पा संपादित करता आलेला नाही. औरंगाबाद-जालना हे काम जागतिक बँक प्रकल्पातून पूर्ण झाल आहे. आता नवीन घोषणेनुसार चार पदरी रस्त्यासाठी जमीन संपादित करावी लागणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. त्याच्या अंमलबजावणीसाठी मंगळवारी मुंबईत सार्वजिनक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही बोलाविण्यात आली आहे.

सोलापूर - धुळे रस्त्याला ग्रहण

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ तयार करण्यात येत आहे. येडशी ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते धुळे अशा दोन टप्प्यांत हे काम होणार आहे. येडशी - औरंगाबाद मार्गावरील भूसंपादन मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र औरंगाबाद - धुळे रस्ता भूसंपादनाच्या अडचणीत अडकला आहे. त्यामुळे या रस्त्याला तूर्तास तरी ग्रहण लागले आहे. ८० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात भीखमांगो आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांच्या पैशांवर संशोधनाच्या नावाखाली युरोपला जाणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचा निषेध म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शुक्रवारी (३१ जुलै) सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी भीखमांगो आंदोलन करण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य कँटिनपासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली यानंतर ग्रंथालय, मुख्य इमारत परिसर, पब्लिकेशन विभाग; तसेच विद्यापीठातील रस्त्यांवर विद्यार्थ्यांनी भीक मागून ३४७ रुपये जमा केले. हे पैसे विद्यापीठ प्रशासनाने घेण्यास नाकारले म्हणून डिमांड ड्राफ्ट तयार करून विद्यापीठ फंडात जमा करण्यात येणार आहे. आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल तायडे, अमोल दांडगे, सारंग बोबडे, मनविसेचे वैभव मिटकर, राजू जावळे, संकेत शेरे, एसएफआय सुनील राठोड, प्रसाद जोशी, नितीन वाहुळे, रिपब्लिकन सेनेचे कुणाल खरात, सचिन बोर्डे, एनएसयूआयचे राहुल पाटील व इतर पदाधिकऱ्यांनी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला तंगीचे डोहाळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रशासनाने मुदतीपूर्वी (३१ जुलै) स्थायी आणि सर्वसाधारण सभेसमोर बजेट सादर न केल्यामुळे महापालिका तिजोरीत खडखडाट झाला आहे. उद्यापासूनचा खर्च भागवायचा कसा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगारपाणी, अत्यावश्यक सोयीसुविधांसाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न आहे.

निवडणुकीमुळे यंदा पालिका प्रशासनाला नियमित बजेट सादर करता आले नाही. त्यामुळे १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांचे १६३ कोटी रुपयांचे लेखानुदान अत्यावश्यक खर्च आणि पगारासाठी मंजूर केले. त्याची मुदत शुक्रवारी संपली. मुदत संपण्यापूर्वी प्रशासनाने उर्वरित आठ महिन्यांचे बजेट तयार करून ते स्थायी समितीसमोर, मुबंई प्रांतिक महापालिका कायद्याच्या ९५,९६ आणि ९९ नुसार ३१ जुलै पूर्वी सादर करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने बजेटच सादर केले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बजेट तयार करून प्रशासनाने ते स्थायी समितीला सादर केले असते तरी १ ऑगस्ट पासून खर्चाचा विषय संपला असता. कायद्यातील कलम १०१ नुसार स्थायी समितीला बजेट सादर केले असेल व स्थायी समितीने ते मंजूर केलेले नसेल तरी बजेट मंजुरीच्या आधीन राहून प्रशासनाला खर्च करण्याचे अधिकार मिळू शकतात. प्रशासनाने बजेटच तयार न केल्यामुळे ते स्थायी समितीच्या समोर आलेच नाही. त्यामुळे उद्या शनिवारपासून खर्चाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

पालिकेचा दर महिन्याचा खर्च

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार १२.५० कोटी.

समांतरचा हप्ता ५.७५ कोटी

कर्जाचे हप्ते ३.५० कोटी

वीज बिल २.०० कोटी

सर्वसाधारण खर्च २.०० कोटी

किरकोळ खर्च २.०० कोटी

घनकचरा व्यवस्थापन १.२५ कोटी

इंधन, देखभाल दुरुस्ती १.०० कोटी

स्थानिक संस्थाकर शासनाने संपुष्टात आणल्यामुळे शासन पालिकेला किती पैसे देणार हे निश्चित नाही. त्यामुळे बजेटच्या संदर्भात काय व कसा निर्णय घ्यावा, असा प्रश्न प्रशासनाच्या समोर होता. याच संदर्भात उद्या शनिवारी सकाळी अकरा वाजता सर्व विभागप्रमुख, पदाधिकारी आणि आयुक्त यांची बैठक महापौर दालनात आयोजित केली आहे. त्यात बजेटबद्दल निर्णय घेतला जाईल.

- त्र्यंबक तुपे, महापौर

प्रशासनाने वेळेत बजेट सादर करायला हवे होते. त्यासाठी मी पाठपुरावा करत होतो. आता तांत्रिक पेच निर्माण झाला आहे, त्याची माहिती घेतो. अत्यावश्यक खर्चाला स्थायी समितीची कार्योत्तर मान्यता देता येते, असे असले तरी येत्या आठवड्यात बजेट सादर केले जाईल.

- दिलीप थोरात, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद ‘टॉप टेन’मध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्य सरकारने औरंगाबादसह १० शहराची निवड केली आहे. त्याची घोषणा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली. आता राज्य सरकार या शहराची शिफारस केंद्र सरकारकडे करणार आहे. केंद्र सरकारच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास या योजनेसाठी पहिल्या वर्षी निवडण्यात येणाऱ्या शहरांत औरंगाबादचा समावेश होईल.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत देशातील १०० शहरांचा समावेश केला जाणार आहे. राज्यस्तरावर शहरांची परीक्षा घेण्यात आली. त्यातील पहिल्या १० शहरांची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येणार आहे. औरंगाबादसह राज्यातील ४४ शहरांनी राज्य सरकारकडे एंट्री दिली होती. त्यापैकी शासनाने २० शहरांना सादरीकरणासाठी मुंबईला बोलविले होतो. मुख्यसचिवांसमोर सादरीकरण झाल्यावर गुणवत्तेनुसार २०पैकी १० शहरांची निवड करण्यात आली. त्यात औरंगाबादचा समावेश आहे. महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन व शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी मुख्यसचिवांच्या समोर सादरीकरण केले होते.

या योजनेत निवडलेल्या १० शहरांची शिफासर पुढील आठवड्यात केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या समोर महापालिकेला पुन्हा एकदा सादरीकरण करावे लागणार आहे. या समितीच्या निर्णयानंतर औरंगाबादचा पहिल्या शंभर शहरात समावेश होऊ शकतो.

राज्य सरकारने निवडलेली शहरे

नवी मुंबई, पुणे - पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण - डोंबिवली, औरंगाबाद.

सादरीकरणातील मुद्दे

२०११च्या लोकसंख्येनुसार वैयक्तिक स्वच्छतागृहे किती

महापालिकेची तक्रार निवारणाची पद्धत काय आहे

महापालिकेने ई-न्यूज लेटर प्रसिद्ध होते का

गेल्या दोन वर्षांचे बजेट वेबसाइटवर आहे का

शासनाने मंजूर केलेल्या सेवा कायद्याची अंमलबजावणी होते का

महसुली उत्पन्न किती आहे, स्वतःच्या क्षमतेवर किती उत्पन्न जमा केले जाते

पगार वेळेवर होतात का

लेखापरीक्षण दरवर्षी होते का, कर वसुलीचे प्रमाण काय

पाणीपुरवठा योजनेची स्थिती काय आहे, पाणीपट्टी वसुली व मीटर पद्धत काय

समांतर जलवाहिनी व भूमिगत गटार प्रकल्पांची स्थिती काय आहे.



दरवर्षी शंभर कोटी

स्मार्ट सिटी अभियान देशातील शंभर शहरांमध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबविले जाणार आहे. त्यासाठी ४८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे प्रमाण दरवर्षी सरासरी शंभर कोटी असेल. केंद्र सरकारएवढाच निधी राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांना एकत्रितपणे उभा करावा लागणार आहे.

टॉप ट्वेंटीचे आव्हान

स्मार्ट सिटी अभियानातील सहभागासाठी केंद्र सरकारच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन देशस्तरावरील पहिल्या २० शहरांमध्ये येण्याचे आव्हान पालिकेच्या समोर आहे. कारण देशस्तरावर निवडण्यात येणाऱ्या शंभर शहरांपैकी पहिल्या वर्षी २० शहरांची निवड केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन ठिकाणी जलवाहिनी फुटली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळात शुक्रवारी दिवसभर तीन ठिकाणी जलवाहिनी फुटली. त्यामुळे क्रांतिचौक, महावीर चौक आणि सिद्धार्थ उद्यानासमोर पाण्याचे लोट वाहिले. रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना वाहन चालविताना कसरत करावी लागली. दिवसभर लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

सकाळी क्रांतिचौकात जलवाहिनी फुटल्याची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेळीच कळाली नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. शेवटी व्हॉल्व्ह बंद करून वाया जाणारे पाणी थांबवण्यात आले. जलवाहिनी फुटण्याची दुसरी घटना महावीर चौकात घडली. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे आणि जलवाहिनी फुटल्यामुळे येथे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. कंपनीने मात्र या ठिकाणी व्हॉल्व्ह निखळल्याने पाणी वाया गेल्याचे कळविले.

दुपारी तीनच्या सुमारास सिध्दार्थ उद्यानासमोर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या ठिकाणीही व्हॉल्व्ह खराब झाल्याचा दावा कंपनीने केला. या घटनांमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांदूर मधमेश्वर’मधून आज पाणी सोडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कालव्यातून रविवारी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या आदेशानंतर वैजापूर येथील कालवा विभागाने शनिवारी ७०० क्युसेकने ४० दिवस कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करणारा बिनतारी संदेश नाशिक पाटबंधारे विभागाला पाठविला आहे.

सद्यस्थितीत नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा धरणातून २५ हजार क्युसेक विसर्गाने गोदावरी नदीत ओव्हरफ्लोचे पाणी सोडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांची पाण्याचा प्रश्न सुटला आहे, परंतु जलदगती कालव्यात पाणी सोडल्यास वैजापूरसह गंगापूर तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, जनावरांनाही पाणी मिळणार आहे; तसेच लाडगाव येथे २० ऑगस्टपासून गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह असल्याने तेथे पाण्याची गरज असल्याने कालव्यात पाणी सोडण्याची मागणी वैजापूरचे माजी आमदार आर. एम वाणी यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश बोरनारे व पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप यांनी शुक्रवारी मुंबई येथे जाऊन मंत्री शिवतारे यांची भेट घेतली. होती. मंत्र्यांनी दारणा धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी नांदुरमधमेश्वर जलदगती कालव्यात सोडण्याचे आदेश नाशिक पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डान्स चालकाला चोरीप्रकरणी अटक

0
0

औरंगाबाद : डान्स आणि कराटे क्लासेस घेणारा घरफोडी करणारा निघाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याने गारखेडा परिसरातील घर फोडत तीन लॅपटॉप, संगणकाची हार्ड डिस्क, सहा हजार पाचशे रुपये आणि एक स्कुटी चोरल्याचे समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रज्वल उर्फ आदित्य गणेश वानखेडे (वय १९, रा. एन-९, श्रीकृष्णनगर, सिडको) असे त्याचे नाव आहे. पालकापासून विभक्त राहत असलेला प्रज्वल वानखेडे याने मुलांना डान्स आणि कराटे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्याला क्लासेसच्या माध्यमातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडल्याचे समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेताना दोन जणांना अटक

0
0

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपीकासह एका सेवानिवृत्त लिपीकास पाच हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी अॅन्टी करप्शन ब्युरोने पकडले. रमेश कोंडु तायडे ( वय ५६, वरिष्ठ लिपीक, तांत्रिक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग) आणि सेवा निवृत्त लिपीक अविनाश यशवंत भिसे ( वय ५९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार हे ही सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले आहे. बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना बारा वर्षानंतर कालबद्ध पदोन्नती मिळावी म्हणून मॅटमध्ये याचिका दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमध्ये दलित वस्तीवर हल्ला

0
0

उस्मानाबादः अनसुर्डा (ता. उस्मानाबाद) येथील दलित वस्तीवर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काही अज्ञात मंडळीनी हल्ला चढवित मारहाण केली. या संतापजनक घटनेत १२ जण जखमी झाले. यामध्ये वृद्धासहित महिलांचा समावेश आहे. जखमीवर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपाचर सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अनसुर्डा येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. यापूर्वी एप्रिल २०१५ मध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्तावरून अनसुर्डा येथे दलित-सुवर्ण असा वाद झाला होता. परंतु, त्यावेळी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करुन हा वाद संपुष्टात आणला होता. अनसुर्डा येथील दलित वस्तीवर १६ कुटूंब राहतात. नुकताच झालला हा वाद ग्रामपंचायत निवडणुकीच्या मुद्दयावरुन झाल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन चोरी करणारी टोळी गजाआड

0
0

औरंगाबाद : सिल्लोडमधील वाहनचोरी करणारी टोळी औरंगाबाद ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. सिल्लोड तालुक्यातील तांडाबाजार येथील इकबालखाँ अहेमदखाँ मुलतानी यांनी आपल्या मालकीची ट्रक हारवल्याची तक्रार दिली होती. फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग भारती हे तपास करत असताना त्यांना सिल्लोड येथून चोरी गेलेला ट्रक जळगाव येथे उभा असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. यावरून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटा प्रकरणी आणखी तिघांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट नोटा प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आणखीन तीन आरोपीच्या जालना जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत. प्रकाश अंकुश बोरुडे (वय २०, रा. पिरसावंगी, बदनापूर), गोविंद निवृत्ती भालेराव (वय १९) आणि गौतम वसंत मगरे (वय २०, दोघेही रा. रोहिलागड, ता. अंबड) अशी या तिघांची नावे आहेत. प्रशांत हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. तो जालना येथील एका महाविद्यालयात तो शिक्षण घेतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शंभराच्या तीनच नोटांचे तंतोतंत झेरॉक्स काढत त्या व्यवस्थितपणे कापून बनावट नोटा चलनात आणणाऱ्या अंबडमधील अल्पवयीन बालकासह शेख आमेर याला मुकुंदवाडी पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडून साडे चार हजाराच्या शंभर रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान, या बनावट नोटा चलनात आणणारे प्रकाश बोरुडे यांच्यासह भालेराव, मगरे यांना शुक्रवारी रात्री पकडण्यात आले.

गेल्या वर्षभरापासून जालना आणि औरंगाबादच्या बाजारपेठेत हे तिघेही बनावट नोटा चलनात आणत होते, अशी माहिती समोर येत आहे. या तिघांना अल्पवयीन बालक आणि आमेर पाच हजार रुपयांच्या बनावट नोटा देत होते. त्या बदल्यात हे दोघे अडीच हजार घ्यायचे. या टोळीने अशाप्रकारे सुमारे अडीच लाख रुपये बाजारात चलनात आणले असावेत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. तीनच नोटांचे ते वारंवार झेरॉक्स काढून ती चलनात आणत अशी कबुलीही त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images