Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाड्यातील शेतकरी कृत्रिम पावसाच्या प्रतीक्षेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर सुमारे २७ कोटी रूपये खर्चकरून कृत्रीम पावासासाठी उभी करण्यात येणारी यंत्रणा अद्याप कार्यान्वित न झाल्यामुळे आणखी काही दिवस तरी शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा १ ऑगस्टचा मुहूर्त टळला आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाडा तसेच सोलापूर जिल्ह्यातील बळीराजा आभाळाकडे टक लावून बसला आहे. पिण्याच्या पाण्यासह चारयाच्या टंचाईमुळे घरा-घरातील लेकरा-बाळांवर भटकंतीची वेळ आली आहे. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर कृत्रिम पावसासाठीची यंत्रणा सज्ज असून एक ऑगस्ट रोजीचा कृत्रिम पावसाचा मुहूर्त असल्याचे शाळेत राज्याचे महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी आषाढी एकादशीला तुळजापूर येथे केले होते. मात्र, त्यांनी केलेले हे भाकित अपुऱ्या माहितीच्या आधारे होते हे यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आणखीन किमान पंधरा दिवस कृत्रिम पावसाची वाट पाहावी लागणार, असे शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी खासगी सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात कृत्रिम पाऊस झाला तरी त्याचा लाभ खरीप पिकासाठी होण्याची शक्यताही आता दूरावत चालली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बळीराजासह जनतेला कृत्रिम पावसासाठी आणखीन प्रतीक्षाच करावी लागणार आहे. ढगाची स्थिती, आकार, वार्याच्या वेगाची अचूक माहीती देणारे सी डॉप्लर रडार औरंगाबादला पोहोचल्यानंतर ही यंत्रणा कार्यान्वित होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खरीप हंगामावर दुष्काळी ढग

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यावर गेल्या काही दिवसांपासून वरुणराजा अद्यापही रुसलेलाच आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यावर अद्यापही पावसाची कृपा झालेली नाही. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अद्यापही कायम असून बळीराजा चिंतेत आहे. पावसाअभावी शेतीवर अनिष्ठ परिणाम झाले असून, यंदाचा खरिप हंगाम वाया गेल्यातच जमा आहे. जिल्ह्यातील बहुतांश पाणी प्रकल्प तळ गाठला असून केवळ दोन टक्के पाणी साठा शिल्लक आहे. सध्या भर पावसाळ्यात १४९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याकडे यंदाही पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पीक, पाणी व जनावराच्या चाऱ्याची स्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश पाणी प्रकल्प तळाला गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकटात भर पडत चालली आहे. पावसाळ्यातच १४९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ही टंचाई परिस्थिती पुढच्या काही दिवसात गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसाअभावी वाया गेल्यातच जमा असल्याने, शासनाने आता या जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

खरीप हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी रोहिणी, मृग, आदी, पुनर्वसू, पुष्य ही नक्षत्रे कोरडी गेल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. पावसाच्या आशेवर पेरणी केलेली पिके करपून गेली. पाण्याअभावी उसाची वाढही खुटली आहे. ३ ऑगस्टपासून आश्लेषा नक्षत्राची सुरुवात होत असून, या नक्षत्रात तरी मोठा पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांकडून बाळगली जात आहे.

जिल्ह्यात तीन मोठे, १७ मध्यम व १९३ लघु प्रकल्प आहेत. सद्य स्थितीत या प्रकल्पांमध्ये २ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून समजल्या जाणाऱ्या परंडा तालुक्यातील सोना-कोळेगाव प्रकल्प सध्या कोरडा आहे. उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तेरणा, रूर्हभर प्रकल्पातील जलसाठा संपुष्टात आला असून, सध्या शहरालगत असलेल्या शेकापूर (वाडगा) प्रकल्पातून शहरातल्या काही भागाची तहान भागविली जात आहे.

सध्या उजनी धरणातून उस्मानाबादसाठी चार एम एलडी पाणी पुरचठा करावा लागणार असून, यासाठीचा खर्च उस्मानाबाद नगरपालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे यासाठी पुन्हा शासन निधीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. जिल्ह्यातील काही गावांना सध्या १४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पावसाअभावी खरीप पीके वाया गेली. त्यामुळे जनावरांसाठी हिरवा तर दूरच वाळलेला चाराही मिळेनासा झाला आहे. एरवी १० ते १२ रूपये पेंढी या दरात मिळणाऱ्या कडब्याच्या पेंढीने २५ रूपये प्रति पेंढी ऊसावर ओलांडला आहे. गावात व परिसरात फिरूनही चारा मिळत नसल्यामुळे पशुधन जगवावे कसे असा प्रश्न बळीराजा बरोबरच पशुपालकांना निर्माण झाला आहे.

चारा छावण्या सुरू करण्याची गरज

पाण्याअभावी उसाची वाढ खुंटल्यामुळे उसाचा वाडा देखील पशुधनाला चारा म्हणून मिळेनासे झाले आहे. अशातच गोवंश हत्या बंदी केल्यामुळे जनावरे सांभाळण्याचा मोठा प्रश्न पशुपालकापुढे निर्माण झाला आहे. शासन मात्र अद्यापही चारा छावणी उघडून पशुपालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरभाडे भत्ता बंद करण्याचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

मुख्यालयी न राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जमादार यांनी दिली. आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी येथील पंचायत समिती सभागृहात शनिवारी (१ ऑगस्ट) आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जमादार यांनी आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. तालुक्यातील मनूर, गाढेपिंपळगाव, बोरसर व शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात थुंकी, लघवी, व रक्ततपासणी सुविधा अद्यावत करण्यात येतील, तसेच गाढेपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बाजारच्या दिवशी रविवारी उघडण्यात, येईल असे जमादार यांनी सांगितले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मनसुख झांबड, तालुका देखरेख समितीचे सदस्य धोंडिरामसिंह राजपूत, नानासाहेब शिंदे, आप्पासाहेब उगले, अर्जून जगताप यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा हॉस्पिटलमधील गैरसोयीबद्दल तक्रारी मांडल्या. उपजिल्हा हॉस्पिटलमधील कमतरता दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले. या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. हरबडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांच्या पायाला भिंगरी; गाठीभेटी सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात शिगेला पोहचला आहे. मतदानाला दोनच दिवस बाकी असल्याने उमेदवार व समर्थक पायाला भिंगरी लावून मतदाराच्या भेटी घेऊन मताचा जोगवा मागत आहेत. तालुक्यातील बड्या पुढाऱ्यांच्या गावात निवडणूक होत असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.

तालुक्याचे राजकारण ताब्यात राहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे यावेळी विधानसभा, लोकसभा निवडणुकीप्रमाणे उमेदवारंनी प्रत्येक वार्डात प्रचार कार्यालय थाटले आहे. डिजिटल फलक, बॅनर, जाहिरातींचा मारा करण्यात आला आहे. शहरी निवडणुकाला लाजवेल, असा प्रचार सुरू असून सोशल मीडियामार्फत मतदारांपर्यंत संदेश पोहचवला जात आहे. प्रत्येक गावात, कार्नर बैठका, छोटेखानी प्रचार सभांनी वातावरण तापले आहे. शेत शिवारात, वस्ती तांड्यावर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवार जिवाचे रान करीत आहेत. गेल्या वेळी झालेल्या चुका पदरात घ्या, यावेळी निवडून द्या, अशी आर्जवे केली जात आहेत. सध्या पाऊस मतदारांची भेट गावतच होत आहे. प्रत्येक गावात दुरंगी सामने असून काही ठिकाणी तरुणांनी प्रस्थापितांना कडवे आव्हान दिले आहे.

पुढाऱ्यांची गावे

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन-भराडी, माजी आमदार सांडु पाटील लोखंडे- मांडणा, भाजप नेते श्रीरंग साळवे- वांगी, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर- आमठा, भाजप माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर- गोळेगाव, काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश दौड-पानवडोद, काँग्रेस नेते प्रभाकर पालोदकर-पालोद, पंचायत समिती सभापती लताबाई वानखेडे-अंधारी. या नेत्यांना आपपल्या गावातील सत्ता ताब्यात ठेवावी लागणार आहे. नेत्यांच्या गावातील निवडणूक उत्कंठावर्धक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबार पेरणीही आता अशक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने खरीप हंगाम मोडीत काढला आहे. पाणी नसल्याने पिके जळाली असून भारी जमिनीतील पिके जेमतेम तग धरून उभी आहेत. या आठवड्यात नैसर्गिक किंवा कृत्रिम पाऊस पडला तरी, केवळ बाजरी व मका या दोन पिकांचीच दुबार पेरणी शक्य आहे. या नैसर्गिक संकटामुळे पीक विमा भरण्याची मुदत सात ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सध्या संपूर्ण मराठवाड्यात खरीप पिके शेवटची घटका मोजत आहेत. तब्बल ५० दिवसांपासून पावसाची दडी कायम असल्याने पिकांना जगवणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर विक्रमी पेरणी झाली. कापूस या नगदी पिकासह सोयाबीन, तूर, मूग, बाजरी व मका या प्रमुख खरीप पिकांचे लक्षणीय क्षेत्र आहे. औरंगाबाद (९९.३२), जालना (९७.८) आणि बीड (९०.२७) या तीन जिल्ह्यात समाधानकारक पेरणी झाली. पण, पाऊस नसल्याने जवळपास पाच लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. पाऊस पडल्यानंतरही पिके जगण्याची शक्यता नाही. दुबार पेरणीचा कालावधीही संपल्याने शेतकरी संकटात आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यास बाजरी व मका या दोन पिकांचीच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी दिले आहे. काही तालुक्यात ठिबक व तुषार सिंचनावर पिके जगवली आहेत. शेततळी, विहिरी व कूपनलिका यांची पाणी पातळी खालावल्याने पुढील काळात पिकांना पाणी देणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भारी जमिनीत ओल असल्याने पिके उभी आहेत. हलक्या जमिनीतील पिके जळाली आहेत. मागील तीन वर्षांच्या तुलनेत दुष्काळाची तीव्रता अधिक असून खरीप हंगाम पूर्णपणे मोडीत निघाला आहे. मोजक्याच तालुक्यांची स्थिती समाधानकारक असली तरी बहुतांश तालुक्यात भयावह स्थिती आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, गेवराई, वडवणी, शिरूर कासार या तालुक्यात सर्वाधिक तीव्रता आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, सोयगाव, गंगापूर व वैजापूर तालुक्यात पावसाची गरज आहे. जालना जिल्ह्यातही मंठा, परतूर, घनसावंगी, बदनापूर व जाफ्राबाद तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी केली आहे; मात्र, पीक वाढण्याच्या अवस्थेत पाऊस पडला नसल्याने उत्पादनाची सरासरी घटण्याची शक्यता आहे.

विम्यासाठी मुदतवाढ

राष्ट्रीय कृषी विमा योजनेची मुदत शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन सात ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. एक ते सात ऑगस्ट दरम्यान पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळवण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे यांनी केले. याबाबत विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांना संपर्क साधता येणार आहे. पीक विमा काढण्यासाठी बँकांसमोर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.

सध्या विभागात पिकांची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. खरीप हंगामाचे भवितव्य केवळ पावसावर अवलंबून आहे. दुबार पेरणीतही जेमतेम दोन पिकांची लागवड शक्य होणार आहे. हा सर्वाधिक कठीण काळ आहे.

- पी. डी. लोणारे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दी व्यवस्थापनाबद्दल प्रशासनाची अनास्था

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला सुरूवात झाली असून लवकरच पहिल्या शाहीस्नानाचा मुहूर्त आहे. या दिवशी जिल्ह्यातील पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यात गोदास्नान केले जाते. परंतु, तेथे होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून केलेल्या तयारीची माहिती अद्याप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झालेली नाही.

नाशिक येथे सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा पर्वामध्ये देशविदेशातून लाखो भाविक येतात. या गर्दीचा परिणाम शेजारी तालुक्यांनाही होतो. ज्या भाविकांना नाशिकमध्ये शाहीस्नान करता येत नाही ते भाविक अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील गोदाकाठच्या घाटांवर स्नान करतात. प्रामुख्याने पैठण आणि कायगाव टोक, वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या हेमाडपंती मंदिरामध्ये शाही स्नानासाठी गर्दी होते. एकाच दिवशी होत असलेल्या या गर्दीचे नियंत्रण व आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे मागविण्यात आली होती. या संदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांनी ६ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद, अहमदनगर, धुळे आदी जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्ह‌िडिओ कॉन्फरन्स घेऊन नाशिक जिल्ह्याशेजारील जिल्ह्यांना सुरक्षा तसेच गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र संभाव्य गर्दी, घाटांची संख्या, मंदिरांची माहिती, उपाययोजना याबाबत पैठण, गंगापूर आणि वैजापूर तहसील कार्यालयाकडून कोणतीही माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाठवण्यात आली नाही. पैठण तहसील कार्यालयात त्याबद्दल कामे सुरू आहेत; मात्र त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेली नाही.

नियोजन आवश्यक

नाशिक येथे येणारे भाविक परिसरातील शिर्डी, शनी शिंगणापूर, घृष्णेश्वर, वेरूळ व अजिंठा लेणी आदी पर्यटनाच्या ठिकाणी भेटी देण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीवरील हेमाडपंती पुरातन मंदिरात पर्यटकांची गर्दी राहणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे.

ही माहिती मागवली

जल मार्गातील गावे, घाट सुविधा असलेली गावे, पुरातन मंदिरे, स्नान स्थानाची क्षमता, संगम स्थळांपासून मुख्य रस्त्याचे अंतर, वाहनतळ क्षमता, शोध व बचाव पथक, गावातील आपत्ती व्यवस्थापन समिती आदी माहिती मागवण्यात आली होती. सुविधांसाठी होणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक मागविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनोविकृती’साठी ‘आयपीडी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात किंवा जिल्ह्यात शासकीय मनोरुग्णालय नाही आणि घाटीमध्ये मागच्या दीड वर्षापासून मनोरुग्णांना दाखल केले जात नसल्याने गोरगरीब मनोरुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. मात्र, लवकरच विभागाचा आंतररुग्ण विभाग (आयपीडी) पुन्हा एकदा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून, मनोविकृतीचे उपचार पूर्ण क्षमतेने मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात किंवा विभागीय पातळीवर शासकीय मनोरुग्णालय नाही. त्यामुळे गोरगरीब मनोरुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) मनोविकृती विभाग हा एकमेव आसरा आहे. मागच्या सुमारे दीड वर्षापासून या विभागाचा आंतररुग्ण विभाग बंद आहे. केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना दाखल करुन विविध उपचार करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांना उपचार मिळेनासे झाले. परिणामी, एकतर नाशिकच्या येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणे किंवा खासगी

मनोरुग्णालयात आवाक्याबाहेरचे उपचार घेण्याशिवाय गोरगरीब मनोरुग्णांना पर्याय नसल्याची स्थिती आहे. त्यातच बहुतेकांना नाशिकला जाऊन उपचार घेणेही कठीण असल्यामुळे मनोरुग्णांची फरफट होत आहे. या पार्श्वभूमीवर घाटीमध्ये 'आयपीडी' सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली होत आहेत. लवकरच वॉर्ड सुरू होईल, अशी आशा प्रशासनाच्या वतीने व्यक्त होत आहे.

मनोविकृती विभागाचा वॉर्ड सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच काही तरी मार्ग सापडेल, अशी आशा आहे.

- डॉ. कानन येळीकर, प्रभारी अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव कारच्या धडकेत पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नॅनो कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात मयूरपार्क येथील बडगुजर क्लासेससमोर रविवारी सकाळी आठच्या सुमारास झाला. कालिंदा नवनाथ जगदाळे (३८, रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, मयूर पार्क) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नॅनो कारचालक सुभाष बाबुराव देशपांडे (५५, रा. मयूरपार्क) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी नवनाथ जगदाळे हे सकाळी पत्नी कालिंदा यांच्यासह दुचाकीवरून (एमएच २० -एसी-४८७२) खरेदीसाठी जात होते. तेव्हा पाठीमागून आलेल्या नॅनो कारने (एमएच- २० -बीएन-५४३०) यांनी दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील जगदाळे दांपत्य खाली पडले. अपघातात नवनाथ यांना किरकोळ मार लागला, पण कार कालिंदा यांच्या अंगावरून गेली. कालिंदा यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कालिंदा यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्तनपानामुळे १३ टक्के बालमृत्यू रोखणे शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतातील सुमारे ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांना अपेक्षेप्रमाणे सहा महिन्यापर्यंत केवळ (एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफिडिंग) मातेचे दूध मिळत नाही, तर अर्ध्या तासात स्तनपान सुरू करणे गरजेचे असताना तब्बल ७५ टक्के बालकांना उशिरा स्तनपान मिळते. 'एनएफएचएस-३'नुसार ७६ टक्के मृत्यू हे जन्मल्यापासून पहिल्या वर्षभरात होतात आणि सर्वांधिक बालमृत्यूला अतिसार व न्युमोनिया हेच आजार कमी स्तनपानामुळे कारणीभूत ठरतात. मात्र योग्य स्तनपानामुळे यातील १३ टक्के बालमृत्यू रोखता येऊ शकतात, असे 'लॅन्सेट'ने म्हटले आहे.

जागतिक स्तनपान सप्ताह हा एक ते सात ऑगस्टदरम्यान साजरा केला जातो. यानिमित्त 'मटा'ने वैद्यकतज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे म्हणाले, पुरातन काळापासून भारतामध्ये आईच्या दूधाचे महत्व सर्वश्रुत आहे. आज विज्ञानाच्या सहाय्याने दुधाचे पृथ्थकरण करून त्यातील निरनिराळ्या घटकांचे प्रमाण व त्यांचे कार्य यांची शास्त्रशुद्ध माहिती विषद केली आहे. भारतासारख्या देशात जेथे आयुर्वेदाचा उगम झाला, त्या आयुर्वेदामध्येही 'पियुष' म्हणून स्तनपानाला अमृतासमान म्हटले आहे. मात्र गैरसमजुतींमुळे स्तनपान कमी व उशिरा होते. अलीकडेच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-३ (एनएफएचएस) नुसार, भारतामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांना सहा महिन्यांपर्यंत केवळ मातेचे दूध मिळत नाही. तसेच बाळ जन्मल्यानंतर अर्धा तासांत स्तनपान सुरू करणे गरजेचे असताना, ७५ टक्के बालकांना उशिरा स्तनपान सुरू होते. तसेच देशातील ७६ टक्के बालमृत्यू हे पहिल्या वर्षभरात होतात. त्यासाठी अतिसार व न्युमोनिया हे आजार सर्वाधिक बालमृत्यूला कारणीभूत ठरतात आणि उशिरा व कमी प्रमाणात होणारे स्तनपान हे या आजारांमागील महत्वाचे कारण आहे. 'दि लॅन्सेट सिरीज ऑन मॅटर्नल अँड चाईल्ड न्युट्रिशन-२००८'नुसार पहिल्या वर्षातील १३ टक्के बालमृत्यू योग्य स्तनपानामुळे रोखता येऊ शकतात. त्यामुळे जन्मल्यानंतर अर्ध्या तासात स्तनपान सुरू करणे, पहिली सहा महिने फक्त स्तनपान करणे व दोन वर्षापर्यंत इतर पोषक आहाराबरोबर स्तनपान सुरू ठेवणे महत्वाचे आहे, असेही डॉ. देशपांडे यांनी 'मटा'ला सांगितले.

बाळाच्या शरीराचे तापमान नियमन

उत्कृष्ठ पोषक व संपूर्ण आहार

स्तनपान पचनास हलके

प्रतिकारशक्तीसह योग्य वाढ

मेंदू व दृष्टीची योग्य वाढ

आई-बाळात भावनिक ऋणानुबंध

एकूणच स्तनपान व पहिल्या काही दिवसांतील चिख दूध हे आयुष्यभरासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करणारे असते. बालकांमध्ये ९० टक्के आजार हे पाण्यातून होतात. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करावे. त्यातूनच माता-बालकाचे आयुष्यभराचे बाँडिंग होते.

- डॉ. राजेंद्रसिंग परदेशी, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाखंड वीज देण्यास महावितरण अनुकूल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादेतील उद्योजकांना आठवड्याचे सातही दिवस विनाखंड वीज देण्यासंदर्भात महावितरण अनुकूल आहे. तांत्रिक अडचणी दूर करून पूर्तता करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महावितरणचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी शनिवारी उद्योकांना दिले.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) आणि मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चव्हाण यांच्यासमवेत बैठक झाली. उद्योगांच्या वीजेसंदर्भातील समस्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. उद्योजकांनी मुख्यतः चोवीस तास वीज, इलेक्ट्रिसिटीच्या अद्ययावत सुविधा, दर्जात्मक वीजपुरवठा आणि ग्राहकाभिमुख सेवा या चार मुद्यांवर जोर दिला. औद्योगिक वसाहतीमध्ये वीजेचा दाब कायम कमी जास्त होतो. ज्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे उद्योजकांनी मुख्य अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले. वीजवितरणासंदर्भातील त्रुटी लवकरात लवकर दूर केल्या जातील, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. सीएमआयए अध्यक्ष आशिष गर्दे, सचिव प्रसाद कोकिळ, सुरेश तोडकर, हेमंत कपाडिया, मासिआचे अध्यक्ष बालाजी शिंदे, सचिव विजय लेकुरवाळे आदींसह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. पूर्वी वीजमंडळ असताना ग्राहकांना अनेक अडचणी येत होत्या. पण कंपनी झाल्यापासून त्यात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. भविष्यात कंपनीकडून उद्योजकांना आणखी चांगल्या पद्धतीने सेवा पुरविली जाईल, असे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

प्रत्येक दोन महिन्याला बैठक

उद्योगांच्या वीजप्रश्नांसंदर्भात यापुढे दर दोन महिन्यांनी बैठक घेण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय झाला. आढावा बैठकांचे नियोजन झाल्याने उद्योजकांचे वीजप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवे मारण्याची धमकी दिल्याने तांबे यांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या वादातून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी संजय तांबे यांना शनिवारी अटक केली. स्मिता महादेव लेंडवे पाटील यांनी एक ऑगस्ट रोजी पोलिस निरीक्षकांना याबाबत तक्रार दिली आहे. त्या रात्री नऊ वाजता अभ्यासिकेतून पायी घरी निघाल्या होत्या. त्यावेळी संजय तांबे यांची गाडी (एम. एच. २०, ९००१) पाठलाग करीत आली. रस्त्यावरील झेरॉक्स सेंटरसमोरून रस्ता ओलांडताना तांबे यांनी स्मिता पाटील यांच्याजवळ येऊन गाडी आडवी लावली. 'तू माझ्याविरुद्ध केस केली आहेस त्यात मी अटकपूर्व जामीन मिळविला आहे, आता जर कोर्टात माझ्याविरुद्ध साक्ष दिली, तर तुला औरंगाबादला राहू देणार नाही. जीवे मारून टाकीन,' अशी धमकी दिली. त्यानंतर पाटील यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फोन करून याची माहिती दिली. तांबे अॅड. घाणेकरांशी संबंधित असल्याने जिवितास धोका असल्याची तक्रार त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी रात्री तांबे यांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखांच्या मालासह टेंपो चोरी

0
0

औरंगाबाद : दीड लाख रुपयांचा माल भरून रस्त्यावर उभा केलेला टेंपो पळविण्याची घटना २५ जुलै रोजी घडली. यासंदर्भात जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. खलील खान (रा. बायजीपुरा) यांच्या टेंपो (क्रमांक एम एच ४० ५२७०) मध्ये वाळूज औद्योगिक वसाहतीतील कोका कोला कंपनीतून त्यांचा मुलगा मुलगा अखिल याने दीड लाखांचा माल २४ जुलै रोजी भरला. रात्री एक वाजता अखिलने हा टेंपो बायजीपुरा, मोतीवाला नगर परिसरातील मोकळ्या जागेमध्ये उभा केला. त्यांचा मुलगा रुग्णालयात असल्याने अखिल तिकडे गेले. जाताना त्यांनी वडिलांना माल असलेला टेंपो उभा केल्याची कल्पना दिली होती. सकाळी सहा वाजता त्यांचा ड्रायव्हर गाडी जालन्याला नेण्यासाठी आला असता जागेवर टेंपो नसल्याचे आढळले. दोन तास गाडीचा शोध घेतला पण काहीच सुगावा न लागल्याने त्यांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. सुरवातीला वाळूज एमआयडीसीमध्ये गुन्हा नोंदवावा, असे पोलिसांनी सूचविल्याचे तक्रारकर्त्यांनी सांगितले. दरम्यान, खलील खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला असून मुख्य हवालदार व्ही. सी. काकडे पुढील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनवरील तिसरा डोळा सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे अखेर संगणकाशी जोडण्यात आले आहेत. शिवाय जुन्या इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची कारवाई केली जात आहे.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या दौऱ्यापूर्वी स्टेशनच्या नवीन इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पण संगणकांशी न जोडल्याने कॅमेरे बंदच होते. परिणामी स्टेशनवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत ही मागणी सातत्याने होत होती. अखेर दीड वर्षानंतर प्रशासनाने दखल घेऊन २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. हे कॅमेरे संगणकाशी न जोडल्याने निरुपयोगी ठरल्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सच्या २४ जुलैच्या अंकात लक्ष वेधण्यात आले होते.

रेल्वेच्या टेलिकम्युनिकेशन विभागाला स्टेशनवरील कॅमेरे सुरू करण्याबद्दल आदेश देण्यात आले. त्यानंतर चार दिवसांपासून सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन बॉक्स बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. नवीन रेल्वे स्टेशनच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. जुन्या इमारतीमधी कॅमेरेही नवीन संगणक प्रणालीला जोडण्याचे काम सुरू आहे.

आणखी दोन कॅमेरे

नवीन इमारतीत २२ कॅमेरे बसविण्यात आले असून जुन्या इमारतीच्या आठ कॅमेरे आहेत. याशिवाय आणखी दोन कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार शाळांवर गुन्हा दाखल करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाची मान्यता मिळालेली नसताना 'सीबीएससी पॅटर्न', 'सीबीएससी सिलॅबस' अशी जाहिरात करीत विद्यार्थी-पालकांना प्रवेश घेण्यास प्रोत्साहित करणाऱ्या आणि विद्यार्थी, पालक व शासनाची फसवणूक करणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूल (माळीवाडा), ग्लोबल डिस्कवरी स्कूल (दौलताबाद), आर. जे. इंटरनॅशनल (बीड बायपास), युनिव्हर्सल स्कूल (चिकलठाणा) यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. हिंगणे यांनी नुकतेच दिले आहेत.

नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव मंगलअप्पा मिटकर (आदर्श कॉलनी, गारखेडा) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. फिर्यादीत म्हटल्यानुसार, शाळा स्थापन करण्यासाठी शाळा मान्यतेचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेले नसताना संस्थाचालक हे मागच्या दोन-तीन वर्षांपासून विविध माध्यमांमध्ये जाहिराती देऊन या शाळा चालविल्या जात होत्या. त्यासाठी सीबीएससी पॅटर्न-सिलॅबस अशी चुकीची जाहिरात केली जात होती आणि भरमसाठ फी आकारून पालकांना प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयातून माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार चारही शाळा मान्यतेशिवाय चालविल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे कोर्टात धाव घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या प्रकरणी शाळांच्या संस्थाचालकांविरुद्ध कलम ४१८, ४२० भादंवि व कलम १८ (५) नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्याची विनंती करण्यात आली. या प्रकरणी सुनावणीवेळी, १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करून चौकशी करावी व एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हिंगणे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्याला दिले आहेत.

या शाळांची होणार चौकशी

दिल्ली पब्लिक स्कूल (माळीवाडा), ग्लोबल डिस्कवरी स्कूल (दौलताबाद), आर. जे. इंटरनॅशनल (बीड बायपास), युनिव्हर्सल स्कूल (चिकलठाणा) यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तंत्रशिक्षण’च्या एक लाख जागा रिक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंत्रशिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. यंदा तंत्रशिक्षणच्या अभ्यासक्रमांचे तंत्र पुरते बिघडल्याची स्थिती आहे. इंजिनीअरिंग, बी.फार्म, आर्किटेक्चर, एमबीए अशा पदवी, पदव्युत्त अभ्यासक्रमांच्या लाख भर जागा रिक्त आहेत. सर्वाधिक ८४,५७९ जागांवर प्रवेश झालेले नाहीत, तर एमबीएचा रिक्त जागांचा आकडा पंधरा हजार आहे.

दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. तंत्रशिक्षणच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया जूनमध्ये सुरू झाली. ती जवळपास पूर्ण झाली. मागील वर्षी पेक्षा यंदा तंत्रशिक्षणच्या अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. सर्वाधिक आघाडीवर असलेल्या इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए अभ्यासक्रम डीटीएडच्या रांगेत आले आहेत. इंजिनीअरिंगच्या जागा यंदा सर्वाधिक रिक्त असल्याचे शनिवारच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अभियांत्रिकीच्या १,५३,६२७ प्रवेशांपैकी केवळ ६९,०४८ जागांवर प्रवेश झालेले आहे. यंदा १ लाख ७ हजार विद्यार्थी इच्छुक होते, यातूनही केवळ ६,९०४८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. यापाठोपाठ एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमाचा क्रमांक लागला आहे. या रिक्त राहिलेल्या जागांमुळे संस्थाचालकांचे धाबे दणालले आहे.

अनेक कॉलेज बंद पडण्याची शक्यता

रिक्त जागांची संख्या मोठी असल्याने अनेक कॉलेज किंवा संबंधित तुकड्या बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए अभ्यासक्रमांचा यात समावेश असेल. ग्रामीण भागासह शहरीभागातील अनेक कॉलेजांमध्ये प्रथम वर्षाचे बोटावर मोजण्याएवढे प्रवेश झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नोकरीचे प्रमाण घटले

इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल अतिशय कमी झाला आहे. याची विविध कारणे सांगितली जात आहेत. यात मुख्यत्वे नोकरीची कमी झालेली हमी, विद्यापीठांच्या निकालांना होणारा विलंब, परीक्षा पद्धत यासह शिक्षणातील घसरता दर्जा यामुळे रिक्त जागांचा आकडा वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जागा रिक्त राहण्यामागे अनेक कारणे आहेत. यात ठराविक कॉलेजांमध्ये वाढलेली इंटेक, परीक्षा पद्धती, अवास्तव वाढणारे शुल्क अशा कारणांचा समावेश आहे. यासह यादव समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालावर अंमलबजावणीबाबत कोणती पावले उचलली नाहीत. याचाही फटका बसलेला दिसतो.

- डॉ. उल्हास शिऊरकर, संचालक, देवगिरी इंजिनीअरिंग

अभियांत्रिकीत करिअर घडेल याबाबत विद्यार्थ्यांमधील आश्वासकता कमी झालेली आहे. यंदा तर काही शाखांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या जागा प्रचंड रिक्त आहेत. यासह बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातुलनेत नोकरीचे प्रमाण कमी आहे. याचाही फटका बसतो आहे. यावर उपाय म्हणजे तंत्रशिक्षण विद्यापीठाला बळ मिळणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. संतोष भोसले, प्राचार्य, एमआयटी

रिक्त राहिलेल्या जागांचा विचार केला, तर यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. यात रोजगारक्षमतेचा, परीक्षा पद्धतीचा विचारही होणे आवश्यक वाटते. दुष्काळी परिस्थितीचाही फटका प्रवेशावर झाल्याचे दिसते.

- डॉ. सुधीर देशमुख, जेएनईसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रा. तिवारींचा ‘हिंदीरत्न’ने गौरव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांचा पुरूषोत्तमदास टंडन स्मृती 'हिंदीरत्न' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. नवी दिल्ली येथील हिंदी भवनात शनिवारी (१ ऑगस्ट) एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा झाला. महाराष्ट्रात तिवारी यांनी हिंदी-मराठी सेतूबंध निर्माण केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

बिगर हिंदी प्रदेशात राहून हिंदी भाषेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकाचा दरवर्षी 'हिंदीरत्न' पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी (अंबेजोगाई) यांना 'हिंदीरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाला हिंदी भवनचे अध्यक्ष त्रिलोकीनाथ चतुर्वेदी, साहित्यिक डॉ. विश्वनाथ त्रिपाठी, नाटककार नरेंद्र मोहन व कवयित्री अलका सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डॉ. नरेंद्र मोहन म्हणाले, 'तिवारी यांनी मराठी आणि हिंदी भाषेत सेतूबंध निर्माण केला. विनम्र स्वभावाच्या तिवारींनी स्वाभिमानाशी कधीच तडजोड केली नाही. हा गुण अत्यंत दुर्मीळ असून साहित्य क्षेत्रातील सेवेसाठी त्यांचा सत्कार अतिशय अभिमानास्पद बाब आहे'. तर विश्वनाथ त्रिपाठी यांनी तिवारी यांच्या साहित्याचा आढावा घेतला. 'तिवारी हे साहित्यातील बहुभाषिक उदाहरण आहे. लेखनाला साधनेच्या स्तरावर जोपासले आणि उत्कृष्ट रचनांनी त्यांनी निर्मिती केली' असे त्रिपाठी म्हणाले. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कृतज्ञ भाषण

'हिंदीरत्न' हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना प्रा. तिवारी यांनी मराठीचे स्मरण केले. मराठी व हिंदी कादंबऱ्यांच्या माध्यमातून वाचकप्रिय ठरलेले प्रा. तिवारी दोन्ही भाषेत लिखाण करतात. 'हा पुरस्कार केवळ स्वतःसाठी नाही, तर महाराष्ट्र आणि मराठीच्या वतीनेही स्वीकारत असल्याचे त्यांनी भाषणात विनम्रपणे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टॉप टेन’ नेमबाजांत तेजस्विनीची निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्राझील येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी कोटा मिळवण्याकरिता भारतीय नेमबाजी महासंघाने देशातील आघाडीच्या नऊ नेमबाजांची निवड केली. त्यात औरंगाबादच्या व्हेरॉक उद्योग समूहाच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळेचा समावेश आहे.

रिओ द जनेरियो (ब्राझील) येथे २०१६मध्ये ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. ऑलिंपिकसाठी कोटा मिळवण्याकरिता खेळल्या जाणाऱ्या जागतिक वर्ल्डकप व वर्ल्ड चॅम्पियनशीप नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशातंर्गंत एकूण सहा निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यात नऊ आघाडीच्या नेमबाजांचा सहभाग असेल. एकूण १० नेमबाजी प्रकारात प्रत्येकी नऊ नेमबाजांची निवड करण्यात आली आहे. त्यात तेजस्विनी मनोज मुळेसह महाराष्ट्रातील सुमा शिरुर, राही सरनौबत, श्रेया गावंडे, अयोनिका पॉल, पूजा घाटकर, स्वप्नील कुसाळे, जितेंद्र विभुते या सात नेमबाजांची निवड झाली आहे.

राष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या निवड समितीने ठरविलेल्या पद्धतीप्रमाणे सर्व नेमबाजांनी आत्तापर्यंत मिळविलेल्या गुणांकणांच्या सरासरीनुसार नऊ नेमबाज निवडले आहेत. पुढील वर्षभरात या खेळाडूंमध्ये सहा निवड चाचण्या होतील. त्यांच्यातून सरासरीनुसार जे सरस ठरतील ते विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन ऑलिंपिक कोटा मिळवतील. स्पोर्ट रायफल थ्री पोझीशन या नेमबाजी प्रकारात तेजस्विनी मुळेने आपले स्थान राखले असून याच प्रकारात अंजली भागवत व तेजस्विनी सावंत या वरिष्ठ नेमबाज देखील आहेत. तेजस्विनीचा साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू आहे. या निवडीबद्दल व्हेरॉक उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन, उपाध्यक्ष एम. पी. शर्मा, जिल्हा रायफल संघटनेचे अध्यक्ष व पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अभिनंदन केले आहे.

सहा चाचण्यातून नऊ आघाडीच्या नेमबाजांची निवड करण्यात आली. त्यामुळे या निवडीचे खूप महत्त्व आहे. थ्री पोझिशन प्रकारात आत्तापर्यंत ऑलिंपिक कोटा मिळालेला नाही. त्यामुळे हा कोटा मिळवण्याचे आव्हान नक्कीच आहे. कठोर सराव करीत आहे. यश नक्की मिळेल.

- तेजस्विनी मुळे, आंतरराष्ट्रीय नेमबाज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानाचे उड्डाण अनिश्चित

0
0

औरंगाबादः कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचे विमान औरंगाबादमध्ये आले. मात्र, याचे उड्डाण कधी होणार, हे सांगणे अवघड आहे. सुरुवातीला ढग कुठे आहेत, ते किती वेळ थांबतील आणि विमान तिथे पोहचण्यासाठी किती वेळ लागेल हे रडार अचूक सांगेल. त्यानंतरच विमानाचे उड्डाण होईल. त्यामुळे तूर्तास विमान उड्डाण अनिश्चित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारी मदार कृत्रिम पावसावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पिकांनी टाकलेल्या माना, सोसाट्याचा वारा, हुलकावणी देणारे ढग आणि वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या. दुष्काळाचे हे चक्र भेदण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर रडार टॉवर बसण्याचे काम सुरू आहे. उद्या (सोमवार) सायंकाळपर्यंत अमेरिकेहून मुंबईला रवाना झालेले सी-बॅण्ड-डॉप्लर रडार औरंगाबादला पोहचेल. त्यानंतर तोंडचे पाणी पळालेल्या मराठवाड्याची सारी भिस्त कृत्रिम पावसावर असेल.

वाळूज परिसरात रडार ठेवण्यासाठी आवश्यक असलेले टॉवर तयार करण्यात आले असून, रविवारी सकाळी ते विभागीय आयुक्त कार्यालयात आणण्यात आले. यानंतर क्रेनच्या सहाय्याने टॉवर बसवण्याचे काम सुरू केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील कंट्रोल रूमचेही काम सुरू असून, येथे भारतीय हवामानशास्त्र विभाग, आपत्ती व्यवस्थापन व इतर विभागातील ५ अधिकारी, रडार स्पेशलिस्ट पथक राहणार आहे.

खान्देश, उत्तर महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या औरंगाबाद येथे रडार बसवल्यामुळे आसपासच्या स्थितीचा अंदाज घेणे सोपे ठरेल. तसेच कृ‌त्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमान उड्डाणासाठी औरंगाबादसह विभागातील इतर विमानतळांचाही उपयोग होईल. हे विमान २०० तास उड्डाण करणार असून ढगांवरून उडणाऱ्या या विमानामध्येही स्वतंत्र रडार यंत्रणा उपलब्ध आहे.

रडारच्या माध्यमातून ढगांची अचूक स्थिती, आकार, वाऱ्याचा वेग, पाऊस पाडण्याची क्षमता, ढगांची छायाचित्रे व अंदाज शास्त्रोक्त पद्धतीने मांडण्यात येईल. पाऊस पाडणाऱ्या ढगांची स्थिती लक्षात आल्यानंतर औरंगाबादेत आणलेल्या अमेरिकन बनावटीच्या असलेल्या खास विमानाच्या पंखावर २४ फ्लेअरच्या माध्यमातून ढगांवर सोडियम आयोडाइड व सिल्व्हर आयोडाइड फवारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निशाणी डावा अंगठा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतील कामचुकार आणि नाठाळ कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी, स्मार्ट सिटीच्या दृष्टीने वाटचाल करण्यात कर्मचाऱ्यांना स्मार्ट करण्यासाठी महापौर व आयुक्तांनी कंबर कसली आहे. मंगळवारपासून कर्मचाऱ्यांच्या हजेरीचे मस्टर हद्दपार करण्यात येणार असून, थम्ब इम्प्रेशनची सक्ती केली जाणार आहे. दरम्यान सोमवारी महापौर व आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अचानक पाहणी केली, यावेळी पालिकेचे मुख्य गेट बंद करण्यात आले होते.

पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल गेल्या दोन महिन्यांपासून महापौर त्र्यंबक तुपे गांभीर्याने काम करत आहेत. त्यांनी तीन वेळा विविध विभागांना अचानक भेटी देऊन गैरहजर कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यानंतर शनिवारी आयुक्तांनी व्हरंड्यात खुर्ची टाकून बसत उश‌िरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारला. आज (सोमवारी) सकाळी दहा वाजताच महापौर त्र्यंबक तुपे आणि आयुक्त प्रकाश महाजन कार्यालयात आले आणि त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची संयुक्त पाहणी करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार ३०० पेक्षा जास्त कर्मचारी निर्धारित वेळेपेक्षा उशीरा आल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या प्रत्येक इमारतीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आली आहे. त्यावर थम्ब इंप्रेशन देऊन उपस्थिती नोंदवावी लागते. मात्र, याचा उपयोग केला जात नसल्याचे या पाहणीत उघड झाले. प्रत्येक विभागात उपस्थिती नोंदवण्यासाठी मस्टर ठेवण्यात आले होते. आयुक्तांनी मस्टरबद्दल आक्षेप घेतला व उद्यापासून (मंगळवार) सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांना थम्ब इंप्रेशन सक्तीचे केले.

सकाळी दहापर्यंत सर्वांनी कार्यालयात येणे आवश्यक आहे. त्यात दहा मिनिट उशीर झाला तर चालू शकतो. मात्र, दहा वाजून दहा मिनिटानंतर येणाऱ्यांची हजेरी लेट मार्क म्हणून नोंदविली जाईल. तीन लेट मार्क झाल्यावर एक दिवसाचा पगार कपात केला जाणार आहे.

....तर पगार बंद

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थम्ब इम्प्रेशनव्दारे उपस्थिती नोंदवली नाही, तर त्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार केला जाणार नाही. तसे आदेश सोमवारी आयुक्त प्रकाश महाजन यांनी काढले आणि सर्व विभागप्रमुखांना ते वितरित केले. त्यामुळे आता बायोमेट्रिक पध्दतीच्या वापर प्रभावीपणे होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images