Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लातुरात काँग्रेसचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या २५ खासदारांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी लातुरातील गांधी चौकात काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाकडे लोकप्रतिनिधींनी मात्र, पाठ फिरवली होती.

साडे दहा वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात झाली होती. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील तीन आमदार उपस्थित नव्हते. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापती यावेळी उपस्थित नव्हते. महापौर अख्तर शेख, सभागृह नेते नरेंद्र अग्रवाल या दोन पदाधिकाऱ्यांशिवाय एकही नगरसेवक धरणे आंदोलनाकडे फिरकला नाही.

यावेळी माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मोटार मालक संघाचे अध्यक्ष ताजोद्दीन बाबा यांची भाषणे झाली. यावेळी वैजनाथ शिंदे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, तालुका अध्यक्ष दगडू पडीले, व्यकंटेश पुरी उपस्थित होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे म्हणाले, 'मोदी सरकारने हुकमशाही सुरू केली आहे. खासदारांचे निलंबन हा हुकुमशाहीचा एक नमुना आहे.'

स्मार्ट सिटीबाबत दुजाभाव

धरणे आंदोलनाच्या समाप्तीनंतर एका शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात निलंबीत खासदाराच्या मुद्यासह केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये मराठवाडा विभागावर अन्याय झाला आहे. या योजनेसाठी ज्या शहराची निवड करताना सरकराने संबंधीत शहरात काँग्रेसची सत्ता आहे की भाजपची या निकषावर निर्णय घेतला असून लोकशाहीत अशा प्रकारचा दुजाभाव स्वीकारहार्य असू शकत नाही या निर्णयाचाही निषेध करण्यात आल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जालन्यात पिकांना जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी २०.१४ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी दिवसभर आकाश ढगांच्या दाटीने गच्च भरुन गेले होते. त्यातच अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या.

जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक पाऊस मेहरबान झाला आहे. तर त्या उलट घनसावंगी आणि अंबड तालुक्यात तुरळक पावसाने हजेरी लावली आ‌‌हे. गुरुवारी दिवसभर आकाश ढगांच्या दाटीने गच्च भरुन होते. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. या पावसाने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. येत्या काळात या प्रमाणात पाऊस कोसळत राहिल्यास भूगर्भातील पाणीसाठयात वाढ होण्यास मदत मिळणार आहे.

पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये)

तालुका गुरुवारचा आतापर्यंतचा टक्केवारी

जालना २० २१२ ५७

बदनापूर ९ १८४ ४६

भोकरदन ३६ २९० ७८

जाफराबाद ३५ २२० ६५

परतूर १४ २१५ ६०

मंठा १३ २३४ ६७

अंबड १५ १६४ ५३

घनसावंगी १६ १४१ ४५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरवर पाणीसंकट

$
0
0

पाण्याचा वापर कमी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, लातूर

केज तालुक्यातील धनेगावच्या मांजरा धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत आहे. या धरणावर तीन जिल्ह्यातील महत्त्वाची शहरे अवलंबून आहेत. त्यांनी समान पाणी वापरावे आणि पर्यायी पाणी साठे शोधून मांजरा धरणाचा कमीत कमी वापर करण्याच्या सूचना लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी तीन नगर पालिकेच्या प्रशासनाला दिल्या आहेत.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आहे. त्या पाण्याचा काटकसरीने नियोजनपूर्वक वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी लातूर महापालिकेचे आयुक्त, बीड आणि उस्मानाबाद नगर परिषदाच्या मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक लातूराला बोलावली होती.

या बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी पोले म्हणाले, 'मांजरा धरणातील अंबाजोगाईसाठी राखीव असलेले पाणी दोन दिवसात संपणार आहे. त्यानंतर लातूर शहर, एमआयडीसी, कळंब, शिराढोण यांनी वितरीत करण्यातात येणाऱ्या पाळीचे अंतर वाढवावे. त्यासोबतच येत्या काळात जवळपासचे पाण्याचे स्त्रोत शोधून काढून त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यामुळे टँकर भरणे आणि वितरीत करण्यात वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. धनेगावच्या मांजरा धरणाचा कमीत कमी वापर करण्याच्या सक्त सूचना दिल्या.' अंबाजोगाईसारख्या शहरा जवळील एखाद्या तलावातील पाण्याचा वापर करता येईल का? शिराढोण, कळंब या गावासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळच्या तलावातून पाणी घेता येईल का? मुरुड गावाला रायगव्हाण प्रकल्पाचा कितपत उपयोग होतो. याचा अभ्यास करून मांजरा धरणाचे पर्यायी उपाय करण्याची सूचना करण्यात आली. लातूर महापालिकेने शहरात जे खासगी बोअर आहेत. जे पाण्याची विक्री करतात असे बोअर ताब्यात घेऊन त्याचा वापर टँकरसाठी केला पाहिजे. बेकायदेशीर नळाचे कनेक्शन शोधून ते कायदेशीर करणे किंवा बंद करण्याची कारवाई करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची सरशी; भाजपची पिछाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालूक्यातील ४० ग्रामपंचायतींपैकी अर्ध्या ग्रामपंचायतींवर काँग्रेस समर्थकांनी ताबा मिळवला आहे. शिवसेना व भाजपला प्रत्येकी चार, राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांनी दोन ग्रामपंचायतील सत्ता मिळवली. बाजार समिती सभापती संदीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्या इंदुताई वाघ, भाजपचे विकास कुलकर्णी या दिग्गजांना हादरा बसला आहे.

फुलंब्री तालुक्यातील ४४ पैकी चार ग्रामपंचायतींची निवड बिनविरोध झाल्याने ४० ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. बाबरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र जैस्वाल यांच्या गटाने १३ पैकी आठ जागांवर विजय मिळवला. येथेही भाजप, काँग्रेस एकत्र लढले होते. त्यांच्या पदरी अपयश आले. वारेगांव येथे बाजार समिती सभापती संदिप बोरसे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. या ग्रामपंचायतीच्या नऊ पैकी केवळ दोन जागा बोरसे गटाला मिळाल्या. सात जागांवर भाजप गटाने विजय मिळवला. बोरसे यांच्या दोन भावजयांचा दारूण पराभव झाला. ही ग्रामपंचायत गेल्या वीस वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात होती. वडोद बाजार येथे भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या इंदुबाई वाघ व त्यांचे चिरंजीव विद्यमान सरपंच गोविंद वाघ यांना १५ पैकी फक्त सहा जागा मिळाल्या. येथे काँग्रेस पुरस्कृत पॅनलला नऊ जागा मिळाल्या. या गावातील पराभव भाजपला धक्कादायक आह.

कायम काँग्रेसच्या ताब्यात असलेली गणोरी ग्रामपंचायत भाजपने ताब्यात घेतली आहे. या ग्रामपंचायतीतील १५ पैकी दहा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक व अपक्षांना दोन जागा मिळाल्या. वानेगांव येथील निवडणुकीत भाजपमध्ये फूट पडली होती. त्यामुळे भाजपला अकरापैकी केवळ तीन मिळवता आल्या. काँग्रेसने सहा जागा मिळवल्या, तर दोन अपक्ष निवडून आले. भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विकास कुलकर्णी यांनाही पराभव पत्कारावा लागला. कान्होरी ग्रामपंचायतीवरील वीस वर्षांपासूनची पकड कायम ठेवण्यात काँग्रेसचे प्रभाकर सोटम यांना यश मिळाले. त्यांच्या गटाने नऊपैकी आठ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत.

शिवसेनेचे राजेंद्र काळे यांच्या ताब्यात पंधरा वर्षांपासून असलेली पाल येथील सत्ता काँग्रेसने हिसकावून घेतली. राजेंद्र काळे यांच्या चिरंजीवांचाही पराभव झाला. राजेंद्र काळे व त्यांच्या पत्नी सरोजा काळे हे दोघेही पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत. या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना तालुक्यात मोठा हादरा बसला आहे.

चव्हाणांची सरशी

किनगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण यांच्या पॅनल विरोधात सर्व पक्ष व गट एकत्र आले होते. परंतु, चव्हाण यांच्या पॅनलने अकरा पैकी नऊ जागांवर विजय मिळवला. भाजप, शिवसेना, काँग्रेस समर्थकांच्या पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालुक्यावर वर्चस्वाचे दिग्गजांचे दावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामपंचायत निवडणुकीत औरंगाबाद तालुक्यावर आमचेच वर्चस्व प्रस्थापित झाले आहे, असा दावा दिग्गजांनी केला आहे. दरम्यान, औरंगाबाद तालुक्यातील ७२ सार्वत्रिक व दोन पोटनिवडणुकीचा निकाल दीड वाजता प्राप्त झाला.

औरंगाबाद तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, असा दावा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केला. फुलंब्री तालुक्यातही ४४ पैकी २६ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फकडल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आमचा प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार निवडून आला असल्याचे सांगत सिल्लोड तसेच औरंगाबादच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ७ ग्रामपंचायती ताब्यात घेऊन चांगले यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद तालुक्यातील ७२ ग्रामपंचातींसाठीच्या निकालासाठी किलेअर्क येथील शासकीय कला महाविद्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी लावण्यात आलेल्या १५ टेबलावर मतमोजणीच्या १७ फेऱ्या झाल्या. एका फेरीत सरासरी ५ ग्रामपंचायतींची मोजणी झाली. तालुक्यातील ७६ पैकी ४ ग्रामपंचायतीचे सदस्य बिनविरोध निवडून आले. तर ७२ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान घेण्यात आले. चार ग्रामपंचायतीमधील पाच जागांसाठी दहा सदस्यांना मते मिळाल्याने विजयी उमेदवार निवडण्यासाठी लकी ड्रॉचा आधार घेण्यात आला. निवडणुकीसाठी तहसीलदार रमेश मुंडलोड, नायब तहसीलदार डी. एम. देशपांडे, शिवानंद बिडवे, आनंद बोबडे, दत्ता निलावाड, सारिका कदम यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार गटास पिशोरमध्ये अपयश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील मोठी गावे देवगाव रंगारी, करंजखेडा व नागद या तीन गावांत कोणत्याच पॅनलला बहुमत मिळाले नाही. पिशोरमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गटाला फक्त चार जागा मिळाल्या. चापानेरमध्ये चुरशीच्या लढतीत किशोर पवार यांच्या गटाची सरशी झाली.

तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी शिवाजी महाविद्यालयात मतमोजणी करण्यात आली. तालुक्यातील मोजक्याच नेत्यांना गड ताब्यात ठेवण्यात यश मिळाले. अनेक गावांमध्ये सत्ताधाऱ्यांना नाकारून मतदारांनी नव्यांना संधी दिली. लक्षवेधी लढती असलेल्या करंजखेडा, देवगाव रंगारी, नागद या प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. देवगाव मध्ये राजकुमार गंगवाल गटाला ८, अनिल पाटील सोनवणे गटाला ५ व शिवसेनेला ४ जागा मिळाल्या. पिशोर मध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांना मानणाऱ्या शिवशाही पॅनलला सत्ता स्थापन करता आली नाही, या गटाला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. येथे माजी सभापती नारायण मोकासे यांच्या पॅनलला बहुमत मिळाले. हतनूर, चिकलठाण व औराळा येथे मतदारांनी विद्यमान पॅनलला नाकारले. हतनूर ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी आमदार हर्षवर्धन जाधव गटाला कल दिला. या गटाचे १३ पैकी १० उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. परंतु, मतमोजणी केंद्रावर महिलांची उपस्थिती पाच टक्केही नव्हती. त्यांच्या जागेवर फक्त नावाची चिठ्ठी दिसत होती.

मंत्र्यांची कन्या विजयी

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची कन्या मीनाक्षी किशोर पवार चापानेर विजयी झाल्या. हतनूरचे माजी सरपंच लक्ष्मण केरे यांचा दोन व भिलदरी येथील कमल चव्हाण या एका मताने पराभूत झाल्या. औराळा येथील मीना मिसाळ व विमल वाघ यांना समान मते पडली. त्यामुळे तहसीलदार महेश सुधळकर यांनी चिठठी टाकण्याचा निर्णय घेतला. त्यात मिसाळ यांना नशिबाने साथ दिली.


मान्यवरांना धक्का

पिशोरमध्ये सरपंच पुंडलिक डहाके यांच्या जनशक्ती पॅनलचा पराभव झाला. त्यांना दोन जागा मिळाल्या. चापानेरमध्ये युवासेनेचे तालुकाध्यक्ष धीरज पवार व विजय मालोदे यांच्या पॅनलचा पराभव झाला. हतनूर येथे विद्यामान सत्ताधारी साहेबराव अकोलकर, दत्तात्रय चव्हाण यांच्या गटाचा पराभव झाला. अंतापूरमध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तु बोडखे यांच्या ताब्यातून सत्ता गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजन, बनकर, माजी आमदारांनी राखली सत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, काँग्रेस नेते प्रभाकर पालोदकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, पंचायत समिती सभापती लताबाई वानखेडे या दिग्गजांनी आपापल्या गावची सत्ता राखली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश दौड यांच्या पॅनलचा पराभव झाला.

येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये गुरुवारी (६ ऑगस्ट) तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. शिवना, घाटनांद्रा, अंभई या ग्रामपंचायतीवर भाजपने, तर आमठाणा, भराडी, डोंगरगाव, उंडणगाव आदी ग्रामपंचायतीवर काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. भराडीत जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या पॅनलने बाजार समिती संचालक काकासाहेब राकडे यांच्या पॅनलचा पराभव केला. अंधारी येथे पंचायत समितीच्या सभापती लताबाई वानखेडे व विभागीय मजूर संघाचे अध्यक्ष दादाराव वानखेडे यांच्या पॅनलने बाजी मारली. पालोदमध्ये ज्येष्ठ नेते प्रभाकर पालोदकर व जिल्हा परिषद सदस्य रामदास पालोदकर यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. मांडणा येथे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी गाव ताब्यात ठेवले. गोळेगावमध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, वांगी (बुद्रुक) येथे भाजप नेते श्रीरंग पाटील, शिवना येथे भाजपचे बाजार समिती माजी उपसभापती अरूण काळे, घाटनांद्रा येथे भाजप नेते पुंडलिक मोरे, सिसारखेडा येथे शिवसेना गटनेते सुनील मिरकर, लिहाखेडी येथे शिवसेनेचे संजय कळात्रे, वडोदचाथा येथे शिवसनेचे विष्णू जांभूळकर यांचे पॅनल विजयी झाले आहे.

आमठाणा येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर यांच्या पॅनलचा पराभव झाला. पानवडोद (बुद्रुक) येथे काँग्रसेचे तालुकाध्यक्ष गणेश दौड व पंचायत समिती सदस्य विक्रांत दौड यांच्या पॅनलचा पराभव झाला. घाटनांद्रा येथे जिल्हा परिषद सदस्य कौतिक मोरे यांच्या पॅनलचा पराभव झाला. रहिमाबाद येथे निवडणुकीत भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजय डमाळे यांचा पराभव झाला. लिहाखेडीत पंचायत समितीच्या सदस्या माधवी कळात्रेंचे पॅनल पराभूत झाले. गेवराई शेमीमध्ये महिला भाजपच्या तालुकाध्यक्षा गंगाबाई ताठे निवडून आल्या आहेत. पंरतु, त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. वांगी येथे खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे यांच्या पॅनलचा पराभव झाला. या पॅनलचे उमेदवार बाजार समितीचे संचालक सुनील काकडे यांचा पराभव झाला आहे. अजिंठा येथील निवडणुकीत माजी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान सरपंच सय्यद नासेर हुसेन यांचा पराभव झाला.

काँग्रेस, भाजपचा दावा

दरम्यान, ६७ ग्रामपंचातीपैकी ३७ ग्रामपंचायतीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळल्याचा दावा आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर यांनी दोन बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीसह ३५ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे.


दोन ठिकाणी समान मते

दहिगाव येथील प्रभाग २ मधील उमेदवार चंद्रकलाबाई भास्कर येणेकर व विद्या पांडव यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. त्यात विद्या पांडव यांना घोषित करण्यात आले. तलवाडा येथील प्रभाग १ मधील उमेदवार गंगाबाई मधुकर वाडेकर व तुळसाबाई साबळे यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून वाडेकर यांना विजयी घोषित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातब्बरांच्या पॅनलला पराभवाचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण तालुक्यातील ७८ ग्रामपंयाचतींमध्ये बहुतांश ग्रामपंचायतील अपेक्षित निकाल लागले आहेत. मोजक्या ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. काही मातब्बर पुढाऱ्यांच्या पॅनलला मतदारांनी घरी बसवले आहे.

तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीपैकी पाचोड, चितेगाव, विहामांडवा, नवगाव, बालानगर, पिंपळवाडी, आपेगाव, चांगतपुरी, हिरडपुरी व ढाकेफळ या मोठ्या ग्रामपंचायतीकडे जनतेचे लक्ष होते. पाचोड ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित सात ग्रामपंचायतीबद्दल कुतुहल होते.

चितेगाव येथे विद्यमान पंचायत समिती उपसभापती कृष्णा गिधाने यांच्या सह चार पॅनल मैदानात होते. येथे एकाही पॅनलला बहुमत मिळाले नाही. हिरडपुरी, ढाकेफळ, चांगतपुरी, विहामांडवा, आपेगाव या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुक्रमे जिल्हा परिषद शिक्षण सभापती विनोद तांबे, बाजार समिती सभापती रवींद्र शिसोदे, माजी जिल्हा परिषद सभापती रामनाथ चोरमले, पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुलकर्णी व प्रल्हाद औटे यांचे पॅनल पराभूत झाले. बालानगर मध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिला. नवगावची ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत अटीतटीची राहिली.

तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्याने ८२ पैकी ७८ ग्रामपंचायतीच्या ६९४ जागांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. शहरातील संतपीठ येथे गुरुवारी (६ ऑगस्ट) मतमोजणी करण्यात आली. या ७८ ग्रामपंचायतीच्या एकूण ६९४ जागांसाठी १७८२ उमेदवार रिंगणात होते. १०० सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. मतमोजणी शांततेत झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी दिली.

एकहाती सत्ता

मनसेचे माजी जिल्हा परिषद सभापती डॉ. सुनील शिंदे यांनी रहाटगाव, सचिन घायाळ यांनी हर्षी बुद्रुक व राजू भांड यांनी वडजी ग्रामपंचायतीमध्ये एक हाती विजय मिळवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित दिग्गजांना पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शोभा खोसरे यांनी गल्ले बोरगावमध्ये विजय मिळवित सरपंचपदावरील दावा पक्का केला.

तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी येथील भद्रा मारुती भक्त निवासमध्ये गुरुवारी मतमोजणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते. मतदारांनी नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळूनही शोभा खोसरे यांचा विधानसभा निवडणुकीत परभव झाला होता. त्यांनी गल्ले बोरगावात ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब आजमावले व विजयी झाल्या. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे यांनी गल्ले बोरगाव, संतोष जोशी यांनी गोळेगाव, कृष्णा चव्हाण यांनी खिर्डी, कारभारी नागे यांनी सराई ग्रामपंचायतीत सत्ता राखली आहे.

सांसद आदर्श ग्राम योजनेमुळे वलय प्राप्त झालेल्या तालुक्यातील वेरूळ ग्रामपंचायतीमध्ये १५ जागांवर ५० उमेदवारांनी लढत दिली. पण कोणत्याही पॅनलला बहुमत मिळवता आले नाही. येथे सरपंचपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळेल.

बाजारसावंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच भीमराव नलावडे यांच्या पॅनलचा पराभव करून माजी उपसरपंच किशोर नलावडे यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी पी. के. नलावडे बाजारसावंगी ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाले आहेत. सोबती विरोधात गेलेले असतांना गोळेगावात संतोष जोशी यांनी आपली राजकीय पकड कायम ठेवली. मावसाळा ग्रामपंचायतीमध्ये सात पैकी सहा जिंकून सत्ता हस्तगत करून सरपंचपदासाठी इच्छुक असलेले पॅनलप्रमुख ज्ञानेश्वर वरकड स्वतः पराभूत झाले.


कृषी उत्पन्न बाजारसमिती माजी उपसभापती प्रकाश पाटील मिसाळ (वेरूळ), माजी उपसभापती संतोष राजपूत, विद्यमान उपसभापती नानासाहेब चंद्रटिके (गल्ले बोरगाव), विद्यमान सरपंच भीमराव नलावडे, माजी सभापती आशा नलावडे (बाजारसावंगी ) या दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास चव्हाण यांचा मुलगा शेखर वडोद ग्रामपंचायतीत विजयी झाले आहेत. ते एमबीएचे विद्यार्थी आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेना, राष्ट्रवादीचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींपैकी निम्म्या म्हणजे ४८ ग्रामपंचायती जिंकल्याचा शिवसेनेने, तर ७० टक्के ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनकर बापू पवार, पंचायत समिती सभापती द्वारका पवार व इतर दिग्गजांनी आपल्या गावातील सत्ता ताब्यात ठेवली आहे.

तालुक्यातील शिऊर, खंडाळा, बोरसर, नगिनापिंपळगाव, लासूरगाव आदी ग्रामपंचायतींची निवडणूक प्रतिष्ठेची होती. या गावातील निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. शिऊरमध्ये भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल पैठणपगारे व माजी सरपंच चंद्रशेखर खांडगौरे यांच्या पॅनलने सतरापैकी तेरा जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. पंचायत समितीचे उपसभापती सुभाष बापू जाधव यांच्या मुलासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले. खंडाळा ग्रामपंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. नगिनापिंपळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलने नऊपैकी पाच जागा जिंकून शिवसेना-भाजपाला शह दिला. या ग्रामपंचायतीत शिवसेना व भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिनकर बापू पवार यांच्या परिवर्तन पॅनलने बोरसरमध्ये तेरापैकी आठ जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पंचायत समिती सभापती द्वारका पवार यांच्या टाकळीसागज ग्रामपंचायतीत सातपैकी पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेसने, तर प्रत्येकी एक जागा शिवसेना व काँग्रेसने जिंकली. दरम्यान तालुक्यातील ९६ पैकी बाजाठाण, कापूसवाडगाव, पिंपळगाव खंडाळा, आघूर, सवंदगाव, लोणी, डवाळा, भगूर, माळीसागज, भटाणा वीरगाव, पालखेड यासह ४८ ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्याचा दावा तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, बाजार समितीचे सभापती अॅड. आसाराम रोठे व संजय पाटील निकम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. निकालाची पूर्ण माहिती घेत आहोत, पण ९६ पैकी ७० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्याचा दावा आमदार भाऊसाहेब पाटील निकम यांनी केला आहे. निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजमध्ये नव्या दमाचे कारभारी

$
0
0

रांजणगाव शेणपुंजीच्या विद्यमान सरपंचांचा विजय; वळदगावात पाटील गटाला सहा जागा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र उत्साहात विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. वाळूज ग्रामपंचायतीत दोन सदस्य वगळता मतदारांनी सर्व नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मोजक्याच ग्रामपंचायतींमध्ये जुन्या कारभाऱ्यांना पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.

वाळूज महानगर परिसरातील २१ ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी (४ ऑगस्ट) मतदान घेण्यात आले. त्यानंतर गुरुवारी (६ ऑगस्ट) मतमोजणी झाली. परिसरातील २१ ग्रामपंचायतींपैकी वाळूज, पंढरपूर, रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, वळदगाव, लांझी, नारायणपूर, पाटोदा या महत्त्वाच्या ग्रामपंचायत निवडणुकीवर लक्ष होते.

वाळूज ग्रामपंचायतीत सुभाष तुपे, कविता सोनवणे, संगीता पाठे, सायराबी पटेल, मीना सोनवणे, पपीन माने, नंदकुमार राऊत, सोनाली रवी मनगटे, सचिन काकडे, फैयाज कुरेशी, आशा संजय शिंदे, विजया बनकर, अमिनाबी पठाण, अनिल साळवे हे सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत. पूर्वीच्या ग्रामपंचायतीमधील खालेद पठाण व सईदाबी पठाण यांना आपली जागा राखता आली.

रांजणगाव शेणपुंजीच्या विद्यमान सरपंच कांताबाई जाधव यांनी यावेळी पुन्हा विजय मिळवला. त्यांचे पती अशोक जाधव यांनीही ग्रामपंचायतीत प्रवेश केला. जाधव यांच्या पॅनलला पाच जागा मिळवता आल्या. अशोक शेजूळ, भीमराव कीर्तीकर, कांचन कावरखे, दीपक बडे, सुभाष सोनवणे, दीपक सदावर्ते, नंदा बडे, मोहिनीराज धनवटे, ज्ञानेश्वर वाघमारे, मंगलाबाई लोहकरे व दत्तु हिवाळे विजयी झाले.

पंढरपूर ग्रामपंचायतीत अख्तर शेख, महेबूब चौधरी, आप्पासाहेब साळे पाटील, शमिनाबी चौधरी, गौतम चोपडा, संगीता खोतकर, गुलाब पटेल, पूजा राजू उबाळे, मीरा गिऱ्हे, महेंद्र खोतकर, बाळू राऊत, नुरजहाँ मस्तान शहा, तस्लिमा शेख, अंजिराबी शेख, लता कानडे, अनिल खोतकर हे विजयी झाले आहेत.

पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत कुसुम मातकर, चंदन राजपूत, किशोर पेरे, विष्णू राऊत, उज्वला जमधडे, पुष्पाबाई पेरे, चंद्रकांत पेरे हे निवडून आले. मीरा पवार, सुनीता पेरे, भाग्यवंत यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.

जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंयातीमध्ये विद्यमान सरपंच योगेश दळवी यांनी यापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला आहे. विद्यमान सदस्यांपैकी नजीरखाँ पठाण, सूर्यभान काजळे, मंगलाबाई ज्ञानेश्वर नीळ, राजेंद्र सरोवर यांनी विजय मिळवून पुन्हा ग्रामपंचायतीत प्रवेश केला. विलास नरवडे, मीना पऱ्हाड, प्रवीण दुबिले, हरिदास चव्हाण, कल्याण साबळे, ज्ञानेश्वर कर्डिले, रमेश सोनकांबळे, सोमनाथ वाघमारे, लोहकरे, बोंबले या नवीन चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिली.

वळदगाव ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समिती सदस्य गणेश पाटील यांच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या. या ग्रामपंचायतीत नुरजहाँ शेख, गयाबाई राऊत, सुभद्राबा साबळे, उत्तम खोतकर, विष्णू झळके, कांताराव नवले, गुंफाबाई खोतकर, संगिता खोतकर, राजू घोडके, सीमा पहाडिया, नारायणसिंग डांगर हे विजयी झाले. नारायणपूरमधून माजी सरपंच नासेर पटेल यांच्या पॅनलने बाजी मारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार निलंबनाविरोधात निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेतील पंचवीस खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस समितीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकशाही, संवैधानिक संस्था व इतर महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये हुकुमशाही कारभार सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतही मराठवाडा विभागावर अन्याय झाला आहे. या योजनेकरिता शहरांची निवड करताना सरकारने संबंधित शहरात काँग्रेसची सत्ता आहे की भाजपची या निकषावर निर्णय घेतला आहे. लोकशाहीत अशा प्रकारचा राजकीय दुजाभाव स्वीकारार्ह असू शकत नाही. या निर्णयाचाही आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला. याबाबत त्यांनी एक लेखी निवेदनही सादर केले. यावर जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम,

जिल्हा निरीक्षक बाळासाहेब देशमुख, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, माजी आमादर एम. एम. शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरपर्यंत कार्गो हब सुरू

$
0
0

शेतमाल, औषधीसह इतर उत्पादनाला आंतरराष्ट्रीय मार्केट

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया राबवून कार्गो हब सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती विमानतळ व्यवस्थापक अलोक वैष्णव यांनी 'मटा'शी बोलताना दिली. औरंगाबादमधील जुन्या विमानतळावर कार्गो हब होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतमाल, औषधी आणि इतर उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची दरवाजे उघडतील.

शहरातील उद्योजक आणि विभातील शेतकऱ्यांना त्यांचा माल परदेशी पाठविण्यासाठी मुंबई, हैदराबाद गाठावे लागते. या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी यासाठी कार्गो हब सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी कस्टम विभागाने मान्यता दिली. यानंतर कृषी विभाग आणि विमानतळ प्राधिकरणाने कार्गो हब सुरू करण्याबाबत हलचाली सुरू केल्या आहेत.

विमानतळ प्राधिकरणाच्या कार्गो विभागाचे संचालक मेहरोत्रा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत निर्यातदारांची ६ मे रोजी बैठक झाली होती. यात कार्गो हब मधील सुविधा आणि पुढील प्रक्रियांबाबत चर्चा झाली. मात्र, निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने ही प्रक्रिया थंडावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमिष दाखवून गंडा, सावधगिरी महत्वाची

$
0
0

रवींद्र टाकसाळ

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सदैव सतर्क राहावे लागते. चोरी, दरोडा, मारामारी, अत्याचारांसह दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि संबंधित आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांना कौशल्यपूर्ण तपास करावा लागतो. त्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या प्रकारातही वाढ होऊ लागली आहे. यात प्रामुख्याने आमिष दाखवून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अशा घटनांमध्ये बहुतांश वेळा तक्रारदार आमिषापायी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत असल्याचे दिसून येते.

तीन लाख रुपयांच्या कर्जाचे आमिष दाखवत दोन भामट्यांनी मुकुंदवाडी भागातील एका किराणा दुकानदाराला १५ हजार रुपयांना गंडविल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. याच भामट्यांनी बीडबायपासवरील एका सिमेंट विक्रेत्यास अशाच प्रकारे चुना लावला आणि लाखो रुपये लंपास केले होते. कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध, अशी जाहीरातबाजी आरोपींनी केली होती. बँकापेक्षा कमी दरात कर्ज मिळते, म्हणून कोणत्याही प्रकाराची शहानिशा न करता नागरिकांनी व्यवहार केला आणि त्यातूनच त्यांची फसगत झाली. आमिष दाखवून गंडा घातल्याचे हे केवळ एक प्रकरण नाही.

पैशांचा पाऊस पडतो, अशी थाप मारणाऱ्यांवर लोक विश्वास ठेवतात, हे विशेष. एमआयडीसी सिडको भागात अशाच पद्धतीने भोंदूगिरी करणाऱ्या एक आरोपी व त्यांच्या सहकाऱ्यास पोलिसांनी पकडले होते. प्रकरण चांगले गाजलेही, परंतु त्यानंतरही असे प्रकार बंद झाले नाहीत. देवळाई शिवारात असाच एक प्रकार नुकताच समोर आला.

ग्रामीण पोलिसांनी वेळीच कारवाई करत पैशांचा पाऊस पडतो, अशी थाप मारणाऱ्या मांत्रिकासह त्यांच्या साथीदारांना जेरबंद केले.

स्वस्त सोने विकणाऱ्या टोळीचे प्रतापही अधूनमधून समोर येतात. अशाच एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे व पथकाने पकडले. मुघल काळातील सोने उत्खननात सापडले, अशी बतावणी करत आरोपींनी एका शेतकऱ्यांला स्वस्तात सोने (बनावट सोने) विकले. आमिषाला बळी पडलेल्या तो शेतकरी नंतर सावध झाला आणि एवढ्या कमी पैशात अर्धा किलो सोने कसे, असा प्रश्न त्याला पडला आणि त्यानंतर ही टोळी पोलिसांनी पकडली.

या प्रकाराबरोबरच लॉटरी लागली, असे सांगत फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज कोणाच्या ना कोणाच्या मोबाइलवर असा संदेश येतोच. आपण भाग्यवंत आहात, आपल्याला २५ लाखांची लॉटरी लागली' अशी थाप मारून नंदनवन कॉलनी परिसरातील एका महिलेला दहा हजार रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आले.

आमिष दाखविले, लालूच दाखविली की लोक सहजरित्या जाळ्यात अडकतात, हेच या प्रकरणावरुन समोर आले आहे. कमी गुंतवणुकीत जास्त मोबादला कसा मिळू शकेल? प्रलचित व्याज दरापेक्षा कमी दराने कर्ज कसे मिळेल, लॉटरी तिकीट घेतलेच नाही तर लॉटरी लागेल कशी? शासकीय नोकरी मागील दाराने कशी मिळू शकेल? याचा साधा विचारही न करता केलेल्या व्यवहारामुळेच लोकांची फसगत होते आणि नंतर अन्याय झाला, अशी ओरड करत पोलिसांकडे धाव घेतली जाते. खंर तर फसवणूक झालेल्या बातम्या, घटनांची माहिती माध्यमातून वारंवार समोर येतात. साधव राहा, आमिषाला बळी पडू नका, असे आवाहनही पोलिसांतर्फे नेहमीच करण्यात येत असते. मात्र, असे असतानाही त्यातून धडा का घेतला जात नाही? असा सवाल गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनामुळे पुढे आला आहे. त्यामुळे नंतर रडत बसण्यापेक्षा आधीच सावध राहून आमिष बळी न पडणे केव्हाही हिताचेच ठरेल. परिणामी, कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यास अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांनाही मोठी मदत मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यसंस्कृतीचे किंग

$
0
0

मकरंद कुलकर्णी

फार्मसीत डिप्लोमानंतर स्वतःचे मेडिकल दुकान सुरू केल्यानंतर आरामशीर नोकरी करणे शक्य होते. जरा हटके व्यवसाय करण्याची इर्षा त्यांना माहूरहून औरंगाबादला घेऊन आली. तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन येताना कुंथलगिरीचा खवा खाल्ला आणि व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. आज या व्यवसायाचा वटवृक्ष झाला असून, भारतात नव्हे तर साता समुद्रापार खाद्यसंस्कृतीचे किंग म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. गोपी मलाईमुळे ओळखल्या जाणाऱ्या अतुल बनगीनवार यांचा प्रवास तरूण पिढीसाठी आदर्श आहे.

वडसा हे नांदेड जिल्ह्यातील माहूरजवळील गाव. अतुल बनगीनवार यांचे प्राथमिक शिक्षण याच गावात झाले. दहावी यवतमाळमधील विवेकानंद विद्यालयात झाले. १९७२चा तो काळ होता. सगळे शिक्षक आणीबाणीत सहभागी झाले होते. एकाच शिक्षकाने दहावीचे सगळे विषय शिकवले होते. बारावी सायन्सनंतर यवतमाळमध्येच फार्मसीत डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर बीएस्ससी केले. वडील दत्तात्रय बनगीनवार यांचे किराणा दुकान होते. अतुल यांनी माहूरमध्ये मेडिकलचे दुकान सुरू केले. ते तीन वर्षे चालविले, पण मन रमत नव्हते. १९९०-९१मध्ये तिरुपती बालाजीच्या दर्शनाहून ते सोलापूरमार्गे परतत होते. बस कुंथलगिरी फाट्यावर थांबली. तेथील पेढा आणि खवा प्रसिद्ध आहे. खवा खरेदी करत त्यांनी थोडी माहिती घेतली. दररोज खवा मागवला तर भाव काय असेल? अशी चौकशी करून ते परतले. कुंथलगिरीच्या खव्यापासून 'जरा हटके' प्रोडक्ट बनविण्याचे बीज पेरले गेले. मग त्यांनी मेडिकल बंद करून औरंगाबादला येण्याचा निर्णय घेतला. २५ हजार रुपये भांडवल म्हणून आणले होते. एका आजारी उद्योगात भागीदार म्हणून ते सहभागी झाले. तीन-साडेतीन वर्षे प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. अखेरीस हा उद्योग बंद केला. रेल्वे स्टेशन एमआयडीसीत एखादे गाळे विकत घेऊन स्वतंत्र व्यवसाय स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती, पण भांडवल नव्हते. त्यांना भाडेतत्वावर जागा मिळाली. १९९५मध्ये त्यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला. कुंथलगिरीचा खवा आणि आजारी उद्योगातील सेटअप याचा संगम जुळून गोपी मलाईचा जन्म झाला. गोपी मलाई म्हणजे दुधापासून तयार केलेले चॉकलेट. कुठलाही उद्योग, व्यवसाय करण्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. मार्केटची गरज आपण घेत असलेला निर्णय याची सांगड जमली नाही तर भट्टी जमण्याऐवजी प्रकल्प फेल होण्याची भीती असते. पहिल्या दिवशी त्यांनी सहा किलो खव्यापासून चॉकलेट बनविले आज हा व्याप चक्क एक टन खव्यापर्यंत पोचला. एक टन खव्यापासून दररोज चॉकलेट बनविले जातात. सुरवातीला हे प्रोडक्ट औरंगाबादमध्ये आवडले की नाही, अशी परिस्थिती होती. बनगीनवार यांनी दुचाकीवर फिरून चॉकलेटचे मार्केटिंग केले. परिस्थिती कठीण होती, पण कॅटेगिरी ओपनर प्रोडक्ट असल्याने क्लिक झाले आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रात मागणी वाढली. एवढ्यावर त्यांना थांबायचे नव्हते. याच क्षेत्रात दुसरे काही तरी करावे यासाठी हालचाली सुरू झाल्या. फळांपासून मिठाई तयार करण्यावर एकमत झाले. आंबा पोळी बनविली. बनगीनवार यांच्या त्रिमूर्ती फूड कंपनीतून मँगो बार बनविणे सुरू झाले. पाहता पाहता याची ख्याती दिल्लीपर्यंत पोचली. तेथील व्यावसायिकांनी हे पॅकेट मोठ्या संख्येने खरेदी सुरू केली. वैष्णवीदेवी मंदिरात प्रसाद म्हणून दिली जाणारा आंबापोळीचा प्रसाद औरंगाबादच्या बनगीनवार यांच्या कंपनीतून पाठविला जातो.

१९९८मध्ये त्यांचे निलिमा यांच्यासोबत लग्न झाले. त्यानंतरचा व्यावसायिक प्रवास पत्नी, आई लक्ष्मीबाई, वडील दत्तात्रय, मुली श्रृती, श्रेया, श्रीणिका यांच्या पाठिंब्यामुळे अधिक सोपा झाल्याचे बनगीनगावर सांगतात. दोन प्रोडक्टच्या यशानंतर त्यांचे खट्टीमिठी इमली हे प्रॉडक्ट देशाक प्रसिद्ध झाले. दुबई, आफ्रिकन देशातही इमलीला मागणी आहे. निर्यात सुरू झाल्यामुळे कारभार वाढला. नगर येथील दमानिया अॅग्रिटेक हॅचरिज बंद पडली होती. त्या जागेचा लिलाव करण्यात आला. तेथील प्रक्रिया प्रकल्प (प्रोसेसिंग युनिट) बनगीनवार यांनी विकत घेतला. या प्लँटमधून १०० टक्के उत्पादन निर्यात करणे सुरू झाले. २००८मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. भारतात गोठवलेल्या अन्नपदार्थांविषयी (फ्रोजन फूड) फारशी जागरुकता नव्हती. बनगीनवार यांनी काळाची पावले ओळखून वटाणा, स्वीट कॉर्न, मिक्स व्हेज, मँगो पल्प, पेरू पल्प, बेबी कॉर्न आदी उत्पादने परदेशात निर्यात करणे सुरू केले. आखाती देशांत मोठी मागणी आहे. जपानमध्ये हा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले. पहिल्या कंटेनरच्या डिलिव्हरीत पॅकेजिंगमध्ये त्रुटी आढळल्या. बनगीनवार यांनी हा माल परत मागविला. त्यात मोठे नुकसान झाले, पण आपण खोटी कामे करायची नाही, हे त्यांचे सुरवातीपासूनचे धोरण होते. उत्पादन परत मागविल्यानंत जपानी मंडळींचा विश्वास अधिक दृढ झाला. तेव्हापासून जपानमध्ये त्रिमूर्ती फूड टेकचे फ्रोजन फूड मागविले जाते. भारतातून फ्रोजन फूड निर्यात करणारा अतुल बनगीनवार यांचा पहिलाच अन्नप्रक्रिया उद्योग आहे.

दर्जात्मक उत्पादन करताना विश्वासाला तडा जाऊ नये, याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सहाय्याने त्यांचे फ्रू नावाचे नवीन उत्पादन लवकरच बाजारपेठेत येणार आहे. या यशस्वी प्रवासात बनगीनवार यांनी कुठेही तडजोड केली नाही. यशाचा हा आलेख यापुढेही असाच वाढत जाईल यात शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्मार्ट सिटी’तील सुविधांसाठी ‘आयसीटी’

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) माध्यमातून शेंद्रा-बिडकीन परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कारभाराचे नियंत्रण करण्यासाठी 'आयसीटी'चा (इन्फोर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून परिसरातील सर्व सुविधा अॅटोमेटेड करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीवरही तुलनेत कमी खर्च करावा लागेल.

चालू आर्थिक वर्षांत डीएमआयसीमध्ये सहा महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी १५३३ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून, पुढच्या टप्प्यात प्रशासकीय इमारत, सौंदर्यबेट आणि आयसीटी सुविधांच्या निविदा काढण्यात येतील. यापैकी आयसीटीची सुविधा भारतात पहिल्यांदाच औरंगाबादेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधांसाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.





'आयटीसी'मुळे देखभाल दुरुस्ती खर्चात बचत

स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त असलेले 'आयसीटी टूल' राबविण्यासाठी एमआयडीसीने परदेशात जाऊन या तंत्राच्या वापर अभ्यास केला आहे. दक्षिण भारतातील काही स्मार्ट सिटींना भेट देऊन तेथील पद्धतींची पाहणी करण्यात आली. तेथे कोठेही भूमिगत केबलिंगचे काम झालेले नाही. या तंत्राचा वापर केल्यास भविष्यातील देखभाल दुरुस्तीचा खर्चातही मोठी बचत होणार आहे. आयसीटीची निविदा शेवटच्या टप्प्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कारण पहिल्या पाच टप्प्यातील निविदातून पायाभूत सुविधांच्या उभारणीनंतर 'आयसीटी'चा वापर सुरू होणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.





'आयसीटी'मधील सुविधा

थायलंड येथील अमाटा नॅशनल पार्कमध्ये उद्योगांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डीएमआयसीच्या माध्यमातून शेंद्रा बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कमध्ये स्मार्ट सिटी उभारली जाणार आहे.

या भागातील औद्योगिक, निवासी; तसेच पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या वसाहतींसाठी १०० टक्के भूमिगत केबलिंग करण्यात येईल. वीज, टेलिफोन वा अन्य सुविधांची कुठलिही वायर जमिनीच्या वरून नसेल. उद्योगांना 'प्लन इन की' प्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

या परिसरातील स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल. या भागाचा वापर करणाऱ्यांना सर्व प्रकारची देयके अदा करण्यासाठी एक 'गेट वे' उपलब्ध करून दिला जाईल. सगळी देयके ऑनलाइन भरण्याची सुविधा करून दिली जाईल. वीज, पाणी, टेलिफोन; तसेच अन्य सुविधांवर 'स्काडा' प्रणालीद्वारे नजर ठेवली जाईल. बिले भरण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे.

ट्रॅफिक सिग्नलिंग, सर्व्हिलन्ससाठी आवश्यक तेथे अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांवर व्याजाचा बोजा वाढला

$
0
0

मालमत्ता कर थकविल्यास २४ टक्के व्याज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर थकल्यास औरंगाबादकरांना आता दरसाल २४ टक्के व्याज भरावे लागेल. त्याचबरोबर पाणीपट्टी थकविणाऱ्यांकडून १८ टक्के व्याजाने विलंबशुल्काची वसुली करण्यात येणार आहे.

महापालिकेने मालमत्ता कराच्या नोटीस बजाविल्यानंतर नियमित कर न भरणाऱ्यांकडून आता विलंबशुल्कापोटी २४ टक्के व्याज आकारले जाणार आहे. यावर्षीपासून हे व्याज आकारण्याची कारवाई सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता नागरिकांना मालमत्ता कराच्या नोटीस बजावणे सुरू करण्यात आले आहे.

मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भात शासनाने नियमांत सुधारणा केल्या आहेत. गेल्यावर्षीपर्यंत मालमत्ता कराच्या थकबाकीवर १० टक्के व्याज आकारले जात होते. त्यात शासनाने त्यात सुधारणा केल्यामुळे यावर्षीपासून २४ टक्के व्याज आकारणी केली जाणार असल्याचे करमूल्य निर्धारक व संकलक शिवाजी झनझन यांनी सांगितले. मालमत्ता कराची नोटीस आर्थिक वर्ष सुरू होताच दिली जाणार आहे. पहिल्या तीन महिन्यांत म्हणजे जून अखेरपर्यंत कर भरल्यास व्याज आकारले जाणार नाही. त्यानंतर मात्र दर महिन्याला दोन टक्के याप्रमाणे मार्च अखेरपर्यंत २४ टक्के व्यास आकारले जाणार आहे. मालमत्ता कराच्या नोटीसवर त्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याचे झनझन म्हणाले. दरम्यान, समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने ग्राहकांना द्वैमासिक बिल देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी हे बिल वेळेत भरले नाही तर दरसाल १८ टक्के दराने विलंब शुल्क आकारले जाईल, असा इशारा या पत्रकाद्वारे दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाविरुद्ध लढणाऱ्या आईला मिळाला न्याय

$
0
0

घराचा ताबा आईला देण्याचे हायकोर्टाचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलाकडून होणाऱ्या छळामुळे त्रासलेल्या आईने घराच्या ताब्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. तब्बल ४ वर्षे कोर्टात लढा दिला. मुलाने दोन दिवसांच्या आत घराचा ताबा देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. एम. देशपांडे यांनी दिले आहेत. त्या मातेस घराचा ताबा दिल्याचा अहवाल तहसीलदार असलेल्या संरक्षक अधिकाऱ्याने कोर्टात सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टाचे दोन आदेश असूनही आईला ताबा देण्यास मुलाने साफ नकार दिला होता. या आदेशाला आई बबिता विनोद अग्रवाल यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. मुलगा सागर यास प्रतिवादी करण्यात आले होते. २९ सप्टेंबर २०१३ रोजी फौजदारी अर्जावर प्रतिवादी सागर याने आईला घराचा ताबा देतांना अडथळा किंवा हस्तक्षेप करू नये, असे निर्देश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दिले होते, मात्र भरपाई व वैद्यकीय भत्ता देण्यास नकार दिला. या आदेशाच्या विरोधात सागरने फौजदारी अपील केले. ते प्रलंबित असल्याचे सागरचे वकील आर. पी. मोटे यांनी कोर्टाला सांगितले, पण या अर्जावर स्थगिती देण्यात आली नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. हे आदेश असूनही मुलाने ३ खोल्या असलेल्या घराचा ताबा आईला दिला नाही. त्यामुळे आईने पुन्हा कोर्ट गाठले. संरक्षक अधिकाऱ्याने घराचा ताबा मिळवून द्यावा, असे आदेश १६ एप्रिल २०१५ रोजी दिले, पण या आदेशाला पुन्हा मुलाने आव्हान दिले. कोर्टाने नोटीस बजावून 'जैसे थे'चा आदेश दिला.

या आदेशात स्थगिती दिली नव्हती. १६ एप्रिलच्या आदेशाला अंतरिम स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे तो आदेश आजही लागू आहेत, असे मत कोर्टाने व्यक्त केले. कोर्टात सुनावणी सुरू असताना मुलगा सागर कोर्टात उपस्थित होता. मुलाने आईला १ खोली देण्याची तयारी दाखवली.

आई घराचा ताबा घेण्यास पात्र आहे. त्या त्या कोर्टाने तसे आदेश दिले आहेत. दोन्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन झाले पाहिजे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् भाविकांच्या डोळ्यात अश्रू तरळले !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या मूर्तीला मूळ स्वरूप देणे आव्हानात्मक होते. रासायनिक प्रक्रियेनंतर मूर्तीचे तेज आणखी झळाळले. ही सगुण मूर्ती पाहताना भाविकांसह आमच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले', असे केंद्रीय पुरातत्व विभागाचे (औरंगाबाद) अधीक्षक डॉ. एम. आर. सिंह यांनी सांगितले. या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी गुरुवारी सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्राचीन शक्तीपीठ असलेल्या अंबाबाईच्या (कोल्हापूर) झिजलेल्या मूर्ती संवर्धनाची गरज होती. ही जबाबदारी डॉ. एम. आर. सिंह यांना देण्यात आली. दहा दिवसात प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेचा तपशील सांगताना सिंह भावूक झाले. 'अंबाबाईचे मूळ स्वरूप शोधण्यासाठी मूर्तीची दोन हजार छायाचित्रे काढली. पुराणातील वर्णन, जुनी छायाचित्रे आणि स्थानिक मूर्तीकारांशी चर्चा करून रासायनिक प्रक्रिया सुरू केली. मूर्तीचा डावा हात, पायाची बोटे व चेहऱ्याचे नुकसान झाले होते. जीर्ण भाग पाहून कामाची दिशा ठरवली. यापूर्वी १९०२ व १९५५ मध्ये संवर्धन झाले होते. मात्र, या कामाची नोंद नाही. धार्मिक रितीरिवाज पाळून व सोवळ्यात संवर्धनाचे काम केले', असे डॉ. सिंह यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात मूर्तीवरून तीन किलो 'एमसील' व सातशे ग्रॅम अनावश्यक धातू काढले. या अतिरिक्त वजनामुळे मूर्तीची झीज झाली होती. हळूहळू मूर्तीचे मूळ स्वरूप दिसले. अगदी देवी बसलेल्या वाघाची खरी प्रतिमा दिसली. गाभाऱ्यात फुले, प्रसाद, मिठाई, नारळ व पूजा साहित्य असल्यामुळे वाढलेली आर्द्रता मूर्तीची झीज करते. त्यामुळे लाकडी मंडप काढून आर्द्रता कमी ठेवण्याच्या सूचना डॉ. सिंह यांनी मंदिर समितीला केल्या.

मूर्ती संवर्धन प्रक्रियेत डॉ. सिंह यांच्यासह सहायक रसायन तज्ज्ञ डॉ. विनोद कुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे, छायाचित्रकार नीलेश महाजन, दीपक गुप्ता, सुजाता तांदूळकर, अनुपमा महाजन, गणेश कुलकर्णी व गुलाब सलामपुरे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर व मूर्तीचे संवर्धन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी व मंदिर समितीत अंतिम चर्चा झाल्यानंतर या कामाला सुरुवात होईल अशी माहिती सिंह यांनी दिली.

बेसॉल्ट मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी सेंद्रिय साहित्य वापरले. चंदन पावडर, दुर्वा रस, बेहडा, बिबा, काजळचा (गायीच्या तुपाचे) वापर झाला. प्रक्रियेनंतर मूर्तीचे मूळ तेज दिसत आहे. कोल्हापूरच्या भाविकांनी साहित्य उपलब्ध केले.

देवीच्या डोक्यावरील नागमुद्रा घडवण्याचा तज्ज्ञांना विसर पडल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सिंह यांनी हा आरोप फेटाळला. प्रथमदर्शनी नागमुद्रा दिसत नाही. आम्ही केवळ मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गेलो. नवीन मूर्ती घडवण्यासाठी नाही. तसेच नागमुद्रा होती की नाही याबाबत ठोस माहिती मिळाली नाही, असे सिंह म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसैनिकांची पालिकेत घोषणाबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर शहरातील पाणीटंचाईच्या विषयासाठी तीन दिवसांपूर्वी बोलाविलेल्या महापालिकेच्या विशेष बैठकीत शिवसेना नगरसेविका सुनीता चाळक यांनी संतापाने महापौराच्या दिशेने भिरकावलेल्या बाटलीच्या प्रकाराला आता वेगळाच रंग देण्यात येऊ लागला आहे. सभागृहात झालेल्या कामकाजाला जातीयवादाचा रंग देऊन शहराची शांतता बिघडू न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालिकेसमोर शिवसेनेच्यावतीने घोषणाबाजी करण्यात आली.

महापालिकेतील त्या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी काही संघटनानी शिवसेनेच्या सुनीता चाळक यांनी महापौर अल्पसंख्याक असल्यामुळेच बाटली फेकण्याचे कृत्य केले. त्यासोबतच मागील एका घटनेत आरपीआयचे चंद्रकांत चिकटे यांनी चप्पल दाखविण्याच्या प्रकार केल्याबद्दल या दोघांवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र आयुक्त सुधाकर तेलंग यांना दिले असल्याची बातमी सोशल मिडियावर येताच शिवसैनिक खवळले.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख बालाजी भोसले, संतोष सोमवंशी, माजी जिल्हाप्रमुख पप्पु कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाण्याचा प्रश्नावर महापौर गंभीर नाहीत. त्याबद्दल आता महपौरांनीच माफी मागावी असे निवेदन सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images