Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रधान सचिव, कृषी संचालकांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मृदा व जलसंधारणाच्या कामांसाठी ई निविदेची गरज नसल्याचे पत्र काढल्याप्रकरणी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांसह कृषी संचालक, जिल्हाधिकारी, लातूर कृषी अधीक्षक, सहाय्यक विभागीय कृषी अधिकारी या प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले.

राज्य शासनाने शेतीमध्ये बांध तयार करणे व अन्य कृषीविषयक कामे वाटप करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब केला आहे. असे असतानाही कृषी विभागामार्फत अधिकारी जवळच्या लोकांनाच कामाचे वाटप करून गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी लातूर डिस्ट्रीक्ट अर्थ मुव्हर्स ऑर्गनायझेशनचे सदस्य विठ्ठल अण्णाराव हजगुडे, विश्वजीत भारती, के. व्ही. ताकोडे, सय्यद नसरुल्ला अमिनसा यांनी केल्या होत्या. कृषी संचालक व अन्य कुठल्याही अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत शासनाच्या परिपत्रकानुसार तीन लाख रुपयांच्या पुढील कामे वाटप करताना ई-निविदा प्रक्र‌ियेचे काटेकारपणे पालन करण्याचे आदेश देऊन खंडपीठाने याचिका निकाली काढली. खंडपीठाच्या आदेशानंतरही ३१ मार्च २०१५ रोजी कृषी सहसंचालकांनी विभागीय कृषी सहसंचालकांना पत्र पाठविले. हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याच्या सूचना दिल्या. कृषी विभागामार्फत घेण्यात येणारी मृद व जलसंधारणाची कामे खात्यामार्फत करण्यात येतात. केवळ साखळी सिमेंट कॉंक्रिट नाला बांधाची कामे ई-निविदा पद्धतीने करण्यात येतात. त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे मृद व जलसंधारणाची कामे ई-निविदा पद्धतीने करण्याची आवश्यकता नसावी, असे मत व्यक्त केले. त्यामुळे या पत्राचा आधार घेऊन याचिकाकर्त्यांनी अवमान याचिका सादर केली. खंडपीठाचे स्पष्ट आदेश असतानाही कृषी संचालकांनी ३१ मार्च रोजी काढलेले पत्र हे कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारास प्रोत्साहन देणारे आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील रामराव बिरादार यांनी केला. या याचिकेची पुढील सुनावणी चार आठवड्याने होईल. शासनातर्फे सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी काम पाहिले.

९ कोटींचा गैरव्यवहार?

एकट्या लातूर जिल्ह्यात तीन लाखांपुढील १२४ कामे जवळच्या लोकांना वाटप करून ९ कोटी ५५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. एकाच कामासाठी एकाच व्यक्तीला खंडपीठाच्या आदेशाचे पालन केले हे दाखवण्यासाठी एकाच कामाचे चार- पाच तुकडे करून १५० कामे ई-निविदा प्रक्रीयेचा अवलंब न करता वाटप केले. लातूर जिल्ह्यात तेरा कोटी रुपयांच्या निविदा विना ई-टेंडरींग केल्याचा दावा याचिकेत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिमुकल्या बाळाला सोडून महिलेचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मला जरा सामान आणायचं आहे. तुम्ही बाळाला सभांळता का ?', अशी विनंती करून गेलेली महिला परत आलीच नाही. जालना येथे महिलेने तीन महिन्याच्या चिमुकल्याला प्रवाशांकडे दिले. जालना ते औरंगाबादपर्यंत चिमुकल्याचे पालक आले नाहीत. यामुळे अखेर प्रवाशांनी तीन महिन्यांच्या चिमुकल्याला औरंगाबाद रेल्वेस्टेशन लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.

जालना रेल्वे स्टेशनवर निझामाबाद-पुणे पॅसेंजर ही रेल्वे सकाळी ७.१५ वाजता थांबली. या रेल्वेत महिलांसाठी असलेल्या विशेष डब्यात बसलेल्या, जालना-औरंगाबाद अपडाऊन करणाऱ्या स्वाती देशमुख यांच्याजवळ एक महिला बसली. तिने तोंडावर कापड बांधलेले होते. काही वेळानंतर त्या अनोळखी महिलेने 'मला सामान आणायचं आहे. तुम्ही जरा बाळाला संभाळता का,' असं स्वाती देशमुख यांना विचारलं. त्यांनी मदत म्हणून ‌तीन महिन्याच्या चिमुकल्याला आपल्याकडे घेतलं. काही वेळेनंतर रेल्वे निघाली तरीही चिमुकल्याची आई आली नाही. रेल्वे औरंगाबादला सकाळी सव्वा आठ वाजता पोहोचल्यानंतरही त्या चिमुकल्याच्या आईचा पत्ता लागला नाही.

अखेर स्वाती देशमुख यांनी लोहमार्ग पोलिस कार्यालय गाठलं. पोलिसांच्या ताब्यात चिमुकल्याला (मुलगा) सोपविले. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी स्वाती देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेल्या प्रवाशांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. पीएसआय सोनवणे अधिक तपास करीत आहेत. बाळाला केले घाटीत दाखल लोहमार्ग पोलिस ठाण्याचे दिगंबर गडलिंगे आणि पोलिस निरीक्षक प्रकाश धारिया यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तीन महिन्याच्या बालकाला घाटीत रवाना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांविरुद्ध गोवंश हत्याबंदीचा गुन्हा

$
0
0

औरंगाबाद : हर्सूल परिसरात जनावरे कत्तलीसाठी नेण्याऱ्या तिघांना मंगळवारी अटक करण्यात आली. यावेळी पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन नेण्याचा प्रयत्न चालकाने केला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गोवंश हत्या बंदी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्सूल गावातून काहीजण टेंपोमध्ये जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती हर्सूल पोलिसांना नागरिकांनी कळवली होती. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक व जनावरे नेणाऱ्या संशयित आरोपींमध्ये यावेळी वाद सुरू होता. पोलिसांनी फौजफाटा मागवून वातावरणातील तणाव शांत केला. दरम्यान, पोलिसांनी जनावरे नेणारे अनिस सिकंदर पटेल, रतन पटेल (रा. हर्सूल) व टेंपोचालक फय्याज जिल्हानी खान (रा. हर्षनगर) यांना अटक केली. यावेळी टेंपो अडविणाऱ्या जमादार शिंदेंच्या अंगावर टेंपोचालकाने वाहन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे बाजूला सरकल्याने थोडक्यात बचावले. संशयित आरोपी पटेल याच्या गोठ्यातून आठ बैल जप्त करण्यात आले. हवालदार शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरूद्ध गोवंश हत्या बंदी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या फॅन्सी नंबरप्लेटच्या दुचाकींवरही संक्रांत

$
0
0

औरंगाबाद : पोलिसांनी फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकीवर कारवाईची वेगाने मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी रस्त्यावरच धावणाऱ्या नव्हे तर विविध पार्किंग जागेत उभ्या असलेल्या दुचाकी उचलून त्यावर कारवाई करण्यात आली. चारशे दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेत ही कारवाई केली.

शहर पोलिस व वाहतूक शाखेच्या वतीने चित्रविचित्र नंबर प्लेट असलेल्या दुचाकींवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोमवारपासून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी रस्त्यावरून धावणाऱ्या ९३५ दुचाकींवर कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यावरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींवर लक्ष्य केले. औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेट भागातील अशा दुचाकी थेट उचलण्यात आल्या. पोलिस आयुक्तालयात नेऊन या दुचाकीच्या फॅन्सी नंबरप्लेट काढण्यात आल्या. तसेच दंडात्मक कारवाई या वाहनधारकांवर करण्यात आली. ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली.

वाहनाची नंबरप्लेट नियमानुसार ठेवणे गरजेचे आहे. फॅन्सी नंबरप्लेट वापरत असलेल्या वाहनधारकांनी अशा नंबर प्लेटस काढणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.

- खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिफेन्स क्लस्टरला सरकारचा ग्रीन सिग्नल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण खात्याने त्यांना लागणाऱ्या वस्तू भारतातून घेण्याचे धोरण ठरविले आहे. त्या अनुषंगाने अॅटोमोबाइल क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेल्या औरंगाबादेत डिफेन्स क्लस्टर उभारावे, अशी मागणी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) ने केली. त्यास राज्य सरकारने अनुकुलता दर्शविली असून केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

सीएमआयएचे १२ सदस्यीय शिष्टमंडळ मंगळवारी मुंबई दौऱ्यावर होते. आमदार अतुल सावे, ज्येष्ठ सदस्य राम भोगले, उमेश दाशरथी, मुकुंद भोगले, कमांडर अनिल सावे, सीएमआयए अध्यक्ष आशिष गर्दे, सचिव प्रसाद कोकिळ, मुकुंद बडवे, विनोद नांदापूरकर, लक्ष्मीकांत मणियार आदींचा यात समावेश होता. शिष्टमंडळाने पालकमंत्री रामदास कदम यांच्यासमवेत बैठक झाली. राष्ट्रीय हरित प्राधिकरण, सीइटीपी प्रकल्प तसेच अन्य औद्योगिक अडचणींवर चर्चा झाली. सविस्तर चर्चेसाठी पालकमंत्र्यांची १५ ऑगस्ट रोजी औरंगाबादेत विशेष बैठक आयोजित करण्याचे ठरले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेतही विविध विषयांवर चर्चा झाली. एमआयडीसी, विस्तार, दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) च्या आगामी विस्तारावर देसाई यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या पर्यावरणविषयक धोरण आणि उद्योगांमधील संभ्रम यासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबईत सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्याचे देसाई यांनी जाहीर केले.

त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. औरंगाबादेत डीएमआयसीच्या माध्यमातून ४,००० हेक्टर जागा संपादित केली आहे. पायाभूत सुविधांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. आता मोठ्या उद्योगांसाठी सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. स्टरलाइट, ह्यूंदाई, फॉक्सकॉन सारख्या कंपन्या भारतात गुंतवणूक करणार आहेत. या कंपन्यांना औरंगाबादकडे आकर्षित करावे, अशी मागणी सीएमआयएने मुख्यमंत्र्यांकडे केली.

संरक्षण खात्याकडून आवश्यक ती यंत्रसामग्री, शस्त्रनिर्मितीसाठी कच्चा माल निर्यात केला जातो. पण मेक इन इंडियांतर्गत याची खरेदी भारतातून केली जाईल. त्या दृष्टीने औरंगाबादेत जर डिफेन्स क्लस्टर उभारले तर एल अँड टी, टाटा, रिलायन्स, भारत फोर्ज सारख्या कंपन्या औरंगाबादेत येऊ शकतील. ७५० हेक्टर जागेवर क्लस्टर उभारले तर स्थानिक उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील, रोजगार निर्मिती होईल, आदी मुद्दे मांडले. सीएमआयएने राज्य सरकारकडे क्लस्टरची लेखी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्राकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

दिल्लीत जोरदार लॉबिंग

उद्योजक राम भोगले यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमवेत सोमवारी दिल्लीत डिफेन्स क्लस्टरसाठी जोरदार लॉबिंग केले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अर्थ मंत्रालयात लेखी निवेदने देऊन डिफेन्स क्लस्टरसाठी औरंगाबादचा पहिला क्लेम नोंदविला.

डीएमआयसीमध्ये मोठे उद्योग यावेत, जेणेकरून स्थानिकांना अधिकाधिक फायदा होईल, या उद्देशाने आम्ही डिफेन्स क्लस्टरचा प्रस्ताव सरकारसमोर सादर केला आहे. जागेची उपलब्धतता असल्याने आपल्या प्रस्तावाचा नक्कीच विचार होईल आणि आपली अधिक औद्योगिक प्रगती होईल, यात शंका नाही.

- राम भोगले, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातामुळे सचखंड पाच तास उशिरा

$
0
0

औरंगाबादः खंडवा-इटारसी दरम्यान झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ०९.३० वाजता नांदेड येथून सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस (क्रमांक १२७१५) ५ तास उशिरा म्हणजे दुपारी २.३० वाजता सुटेल. अमृतसर येथून सुटलेली अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस (क्रमांक १२७१६) ११ ऑगस्ट रोजी तिच्या बदलेल्या मार्गाने म्हणजे इटारसी, नागपूर, अकोला, पूर्णा अशी धावेल. नांदेड व अमृतसर येथून सुटणाऱ्या नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस (गाडी संख्या १२७१५ / १२७१६) गाड्या १२ व १३ ऑगस्ट रोजी बदलेल्या मार्गाने म्हणजे पूर्णा, अकोला, नागपूर, इटारसी अशा धावतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतानगरमध्ये गॅस्ट्रो, डायरियाचे ४५० रुग्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल भागातील एकतानगरमध्ये साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. डायरिया, गॅस्ट्रो, सर्दी-खोकल्याच्या ४५० रुग्णांची मंगळारी तपासणी झाली. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महापौर त्र्यंबक तुपे, नगरसेविका ज्योती अभंग, गौतम खरात, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. शिबीरासाठी पलिकेच्या सिडको एन ८ येथील रुग्णालय आणि एमआयटी हॉस्पिटलची मदत घेण्यात आली. शिबिरात गॅस्ट्रोचे २४, डायरियाचे २५०, तापाचे १६ सर्दी - खोकल्याचे पन्नास तर इतर आजाराचे शंभर रुग्ण सापडले. त्यांच्यावर लगेचच उपचार करण्यात आले. दत्तनगर, हर्सूल तलाव परिसर, सईदा कॉलनी, बशीरनगर येथील नागरिक देखील शिबिरासाठी आले होते. या भागात नळाचे पाणी नाही. टँकरचे पाणी पिल्यामुळे नागरिक विहिरीचे दूषित पाणी पितात, अशी समस्या गौतम खरात यांनी मांडली. विहिरीचे पाणी पिऊ नये, या भागात एकच्या ऐवजी दोन टँकरने रोज पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन यावेळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोलण्यात गुंतवले अन् पावणेतीन लाख पळवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

'राधा अपार्टमेट कहां है, यहा वकील कहां रहते है', असे बोलण्यात गुंतवून व्यापाऱ्याची पावणे तीन लाख रुपयांची बॅग चोरट्याने पळवली. चित्रपटात शोभले अशी ही घटना सोमवारी रात्री ८.४० वाजता साताऱ्यातील 'अथर्व रॉयल' अपार्टमेंट परिसरात घडली.

इंदर लालचंद पगारिया (रा. अथर्व रॉयल्स सोसायटी, विशाल पार्कच्या हॉटेलच्या मागे, सातारा परिसर) यांचे मोंढयात भुसार मालाचे होलसेल दुकान आहे. सोमवारी दिवसभर व्यवसाय करून त्यांनी एक हजाराच्या १३०, पाचशेच्या १५० व शंभरच्या १०० व पन्नासच्या १६० नोटा असे २ लाख ८८ हजार रुपये जुन्या काळ्या रंगाच्या हॅण्डबॅगमध्ये ठेवले. ती हॅण्डबॅग मोटारसायकल (एमएच २० बीडी २६८) च्या डिक्कीत ठेवली. रात्री ८.१५ च्या सुमारास ते अमरप्रीत हॉटेल समोरून काल्डा कॉर्नर, शहानूरमियाँ उड्डाणपुलाच्याखालच्या बाजूने घरी आले. या दरम्यान दोघांनी त्यांचा मोटारसायकलवर पाठलाग सुरू केला. त्यातील एकाने हेल्मेट, तर दुसर्याने टोपी घातली होती. इंदर पगारिया हे घराजवळ येताच पाठलाग करणार्या दोघांपैकी एकाने 'राधा अपार्टमेट कहां है, यहा वकील कहाँ रहते है', असे बोलण्यात गुंतवले. तोपर्यंत दुसऱ्याने स्क्रू ड्रायव्हरने डिक्की उघडून त्यातील २ लाख ८८ हजार रुपयांची बॅग चोरली. पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सातार्यात पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती यांनी भेट दिली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सहा. फौजदार सखाराम सानप करत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरे, वॉचमन असूनही...

पगारिया ज्या सोसायटीमध्ये राहतात, त्या ठिकाणी पार्किंगची जागा मोठी आहे. तसेच त्या ठिकाणी सीसी‌टीव्ही कॅमेरे व वॉचमनची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेचे चित्रिकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. एका चोरट्याचा चेहरा तसेच विना क्रमांकाची दुचाकी यात दिसत आहे. मात्र, घटना घडल्याची वॉचमनला काही माहिती नसल्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यानी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार दिवसांनी अॅपे हद्दपार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून अॅपे रिक्षा हद्दपार होण्याची घटिका समिप आली आहे. १५ ऑगस्टपासून हा आदेश लागू होईल. तरीही अॅपे रिक्षा शहरात धावले, तर चालकांवर गुन्हे दाखल करू असा कडक पवित्रा परिवहन विभागाने घेतला आहे. अॅपे रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा तक्रारी आहेत. जालना रोड, बीड बायपाससह अन्य महत्त्वाच्या मार्गावर अॅपेतून मोठया प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते.

आकाराने मोठ्या असलेल्या या रिक्षांचा मोठा अडथळा सिंग्नलवर होतो. प्रवासी घेण्यासाठी, सोडण्यासाठी या रिक्षा कुठेही थांबविल्या जातात. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. या पूर्वी प्रवासी घेण्याच्या नादात एक अल्पवयीन मुलाचा मुत्यू झाला होता. या सर्व घटना पाहता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत अॅपे रिक्षांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी या रिक्षाचालकांना १५ जुलैची डेडलाइन देण्यात आली. मात्र, तीव्र आक्षेपानंतर ही मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे या महिन्यात अॅपे रिक्षा प्रवास शहरात थांबेल, अशी शक्यता आहे.

६५ अॅपे भंगारात

आरटीए समितीने अॅपे रिक्षा भंगारात काढून, तो परवाना एलपीजी किंवा पेट्रोल रिक्षांत बदला असे आदेश दिलेत. मात्र, १५ जुलैपूर्वी खूप कमी रिक्षा चालकांनी या निर्णयाला प्रतिसाद दिला. मुदत वाढवल्यानंतरही आतापर्यंत फक्त ६५ रिक्षाचालकांनी अॅपे रिक्षा भंगारात काढले. त्यामुळे ही डेडालाइन पाळली जाणार का, असा प्रश्न निर्माण होतोय.

परिवहन मंत्री, परिवहन विभागाचे अप्पर आयुक्त, अप्पर मुख्य आयुक्त यांना आरटीए समितीच्या निर्णयाची माहिती दिली आहे. आमच्या गाडीला १६ वर्षांची परवानगी ‌देण्यात आली आहे. अनेक गाड्यांना दहा ते बारा वर्ष झालेत. त्यामुळे आरटीए समितीचा निर्णय लागू होऊ शकत नाही. आम्हाला योग्य न्याय मिळेल.

निसार अहेमद, अध्यक्ष, रिक्षा चालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ

आरटीए समितीने डिझेल रिक्षांबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. ज्या रिक्षा चालकांनी याला प्रतिसाद दिला, त्यांचे परवाने बदलून देण्यात आले. १५ ऑगस्टच्या मुदतीनंतरही हे रिक्षा शहरात धावत असतील, तर अशा रिक्षा जप्त करून संबंधित चालकांविरोधात गुन्हे दाखल करू.

- गोविंद सैदांणे, प्रा‌देशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोषणांनी विद्यापीठ दणाणले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठातील एक हजार क्षमतेचे वसतिगृह बांधावे, वसतिगृहांचे संपूर्ण शुल्क माफ करावे, कमवा व शिका योजनेचे मानधन वाढवावे आदी मागण्यांसाठी विद्यार्थी मंगळवारी रस्यावर उतरले. 'एसएफआय'च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी घोषणांनी विद्यापीठ दणाणले.

मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट अाहे. त्यामुळे अनेकांना शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर वसतिगृहाचे संपूर्ण शुल्क माफ करावे, सेंट्रल मेस तात्काळ सुरू करावी, कमव व शिका योजनेचे मानधन वाढावे आदी मागण्यांसाठी विद्यार्थी मंगळवारी विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. स्टुड्ंस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे हा मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीवर धडकला. विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेत घोषणा दिल्या. त्यामुळे विद्यापीठ परिसर दणाणून गेला. प्रशासनातर्फे कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी एसएफआयचे राज्य सहसचिव सुनील राठोड, जिल्हाध्यक्ष कुंडलिक खेत्री, जिल्हा सचिव रमेश जोशी, नितीन व्हावळे, स्टॅलिन आडे, सत्यजित मस्के, गणेश चव्हाण यांची उपस्थिती होती.

मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ पडतो आहे. अशावेळी विद्यापिठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. कमवा व शिका योजनेत सर्वांचा समावेश व्हावा, सेंट्रल मेस सुरू व्हावी आदी मागण्या प्रशासनाने लक्षात घ्यायला हव्यात.

- सुनील राठोड, सहसचिव, एसएफआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमवा-शिका योजनेला गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 'कमवा -शिका' योजनेत अर्धवेळ काम मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. योजनेच्या ४५० जागांसाठी तब्बल ८०० विद्यार्थ्यांनी अर्ज केला अाहे. दुष्काळामुळे पालकांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या योजनेत काम करण्यासाठी गर्दी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत सांगितले आहे.

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. अर्धवेळ काम करून शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी असंख्य विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत. शहरात नवीन असल्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना अर्धवेळ नोकरी शोधण्यासाठी पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे विद्यापीठातील 'कमवा -शिका' योजनेकडे त्यांचा कल वाढला आहे. विद्यापीठात केवळ ४०० ते ४५० विद्यार्थ्यांना या योजनेत सामावून घेतले जाते. या योजनेत विद्यार्थ्यांना २ तास काम देण्यात येते. त्यांना दरमहा १ हजार १०० रुपये मोबदला दिला जातो. एम.फिल. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना १ हजार ३०० रुपये मोबदला दिला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. मराठवाड्यात तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. विद्यापीठात पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. दुष्काळामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशावेळी योजनेत काम मिळाविण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

प्रत्येक विभागातून दहा टक्के

विद्यापीठातील विविध विभागांमधिल विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. विद्यापीठात ४२ शैक्षणिक विभाग आहेत. विभागाच्या प्रवेश क्षमतेच्या दहा टक्केच विभागाला कोटा असतो. प्रारंभी विभागांमध्ये मुलाखती होतात. त्यानंतर विद्यार्थी कल्याण विभाग अंतिम मुलाखती घेऊन निवडयादी प्रसिद्ध करण्यात येते. मंगळवारी (११ ऑगस्ट) रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात गुणांसह, विद्यार्थ्याची गरज, घरची परिस्थिती, कौशल्य, आवड आदी माहिती जाणून घेतली जाते.

मागेल त्याला काम द्या

योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी मोठी आहे. त्यामुळे मागेल त्याला काम द्या, असा प्रस्ताव विद्यार्थी कल्याण विभागाने प्रशासनाला प्रस्ताव सादर केला आहे. युरोप दौरा, दालनांचे सुशोभिकरण यावर लाखो रुपयांचा खर्च करणारे प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.

यावर्षी विद्यार्थ्यांचे अर्ज जास्त आहेत. योजनेत समावून घ्यावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी असते. हा दुष्काळी परिस्थितीचाही परिणाम आहे. अनेक गरजू विद्यार्थी आहेत. या योजनेमुळे त्यांच्या खर्चात हातभार लागतो.

- डॉ. सुहास मोराळे,

संचालक,विद्यार्थी कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना महामार्गाचा श्वास मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद - जालना महामार्गालगत वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेत मंगळवारपासून विशेष मोहिम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी २५ अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे जालना महामार्गाचा श्वास मोकळा झाला आहे.

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत, त्यात येऊ घातलेल्या डीएमआयसीमुळे शेंद्रा, करमाड परिसराचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे या भागातून जाणारा औरंगाबाद जालना महामार्ग वर्दळीचा रस्ता झालेला आहे. विदर्भासह व मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना जोडण्याचे काम हा महामार्ग करतो. वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे रस्त्यावरील हे अतिक्रमण, दुकाने, पानटपऱ्या आदींना हटविण्याची मोहीम ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी हाती घेतली आहे. बिडकीन पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील रस्त्यालगत अतिक्रमणे नुकतीच काढली तर मंगळवारपासून करमाड पोलिसांनी जालना रोडवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.

सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांनी सकाळी दहा वाजेपासून लाडगाव येथून या कामाला सुरुवात केली. सायंकाळपर्यंत सुमारे २५ ते ३० अतिक्रमणे, यात प्रामुख्याने पत्र्यांचे शेड, पानटपरी, हॉटेलचालकांनी उभारलेले कच्चे बांधकाम आदी हटविण्यात आले.

कारवाईपूर्वी संबंधित व्यावसायिकांना नोटीसही देण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई सुरू करताच बहुतांश व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. पहिल्या दिवशी लाडगाव ते कुंभेफळ या दरम्यानची अतिक्रमणे हटविण्यात आली असून ग्रामीण पोलिसांचे कार्यक्षेत्र असलेल्या शेकटा रस्त्यापर्यंतची अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने काढली जाणार आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे या रस्त्याचा श्वास मोकळा होण्यास मदत झाली.

औंरगाबाद - जालना हा अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे. अनेक व्यावसायिकांनी ठिकठिकाणी अतिक्रमणे केली, काही ठिकाणी दुभाजक तोडण्यात आलेले आहे. या प्रकारामुळे वाहतुकीला अडथळा होत होता, अपघात होत होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात येत आहे. बिडकीन, पाचोड, वेरुळ, आडूळ आदी ठिकाणी आज मोहीम राबविण्यात आली.

- नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक (ग्रामीण)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मिनिटांची दुष्काळ पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने एका शेतात दोन ते तीन मिनिटे घालवून शेतकऱ्यांची निराशा केली. यामुळे मदतीची आस लागलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

औरंगाबाद येथून सकाळी साडेआठ वाजता निघालेले पथक पैठण तालुक्यातील ढोरकीन गावात धडकले. रस्त्यालगतच्या एका शेतामध्ये उतरून अधिकाऱ्यांनी अवघ्या तीन मिनिटांत पिकाचा आढावा घेतला व शेतकऱ्यांशी संवाद साधला. लगेचच पथक दुसऱ्या शेताकडे वळाले. तेथे इतर पथकातील अधिकाऱ्यांनी गाडीतूनच पिकाची पाहणी केली. ताफ्यातील अन्य गाड्या थांबून अन्य अधिकारी खाली उतरेपर्यंत पथक गाडीत बसले आणि ताफा ७४ जळगावकडे निघाला. तेथे शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते. पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यानंतर पुढे कारकीन भागालाही पथकाने धावती भेट देत जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी केली. पुढे हे पथक रहाटगाव व पाचोडकडे रवाना झाले.

उभ्या शेतात शिरल्या गाड्या

कारकीन भागामध्ये शेख शफी यांच्या शेताची व 'जलयुक्त शिवार'च्या कामाची पाहणी करून पथकाला रहाटगाव गाठायचे होते, मात्र अरुंद रस्त्यामुळे वाहनांचा ताफा वळविण्यासाठी जागाच नव्हती. गाड्यांच्या गर्दीमुळे रस्ता ब्लॉक झाला होता. त्यामुळे लाल दिव्याच्या गाड्या चक्क उभ्या पिकात घालून वळविण्यात आल्या. शेतकरी हताश होऊन या नासाडीकडे पाहत राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फॉक्सकॉन’साठी मुख्यमंत्री अनुकूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फॉक्सकॉन कंपनीने औरंगाबादेत गुंतवणूक करावी, यासाठी राज्य सरकारकडून पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळास मंगळवारी दिले.

सीएमआयए शिष्टमंडळाने औरंगाबादेतील औद्योगिक विस्तार; तसेच सद्यस्थितीत असलेल्या उद्योगांच्या अडचणी, नवीन संधी याविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारसोबत 'फॉक्सकॉन'ने ३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला. या कंपनीने तीन महिन्यांपूर्वी औरंगाबादेत येऊन जागेची चाचपणी केली होती. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये मंगळवारी हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे 'फॉक्सकॉन'चा मुद्दा उपस्थित केला. त्यावर फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविली. फॉक्सकॉन राज्यात तीन ठिकाणी प्रकल्प उभारणार आहे. मुंबई, पुण्यातील प्लँटची घोषणा शनिवारी झाली होती. कंपनीने तिसरा प्लँट औरंगाबादला सुरू करावा यासाठी सरकारकडून आग्रह धरला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा मानसिक छळ

$
0
0

नांदेड : माहेराहून व्यापार करण्यासाठी रोख रक्कम घेऊन ये या आणि इतर कारणांवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून सहा जणांविरुद्ध भोकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहमदीया कॉलनी येथील इसाखान पठाण यांचा २०१३मध्ये विवाह झाला होता. ८ महिन्यांपासून ते त्यांच्या पत्नीचा छळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेहमीच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत फिर्याद देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंध उमेदवाराला लेखनिक नाकारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

केंद्रीय कर्मचारी भरती मंडळाच्या ९ ऑगस्ट रोजी झालेल्या परीक्षेच्या वेळी पुणे आणि औरंगाबाद परीक्षा केंद्रावर अंध उमेदवाराना लेखनिक नाकारल्यामुळे हायकोर्टात दाद मागणार असल्याचे अंध उमेदवार माधव गणपतराव गोरे यांनी सांगितले. गेले चार दिवस या प्रकारा बद्दल विविध ठिकाणी दाद मागूनही त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी हे पाऊलव उचलण्याचे ठरवले आहे.

केंद्रीय कर्मचारी भरती मंडळातर्फे पदवीधारक असलेल्यांसाठी विविध पदांसाठी परीक्षा घेतली गेली. अंध-अपंग उमेदवारांना सक्षम लेखनिक वापरण्याची तरतूद केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी शासन निर्णय अपंग कायदा १९९५नुसार घोषित केली आहे. त्या तरतुदीचा विचार न करता अंध उमेदवारांना पुणे येथील आबासाहेब शिक्षण संस्था आणि औरंगाबाद येथील मौलाना आझाद कॉलेज या दोन परीक्षा केंद्रांवर लेखनिक न देता अयोग्य लेखनिक देऊन अंधांना नोकरीपासून वंचित ठेवल्याचा आरोप अंधांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध अंध उमेदवार माधव गणपत गोरे, बंडु रामा रेनेवाड, गणेश माने, संजय माने, नारायण वानखेडे दत्ता माधव करदुरे, यांनी कर्मचारी भरती मंडळाकडे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिहेरी खून प्रकरणातील दोन आरोपींना जामीन

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

अंबाजोगाई येथील तिहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी दिगंबर व बाळासाहेब चौघुले यांचा जामीन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांनी मंजूर केला. हे आरोपी गेल्या ३ जानेवारीपासून जेलमध्ये होते.

अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी शिवार गट नं. ७३४ येथील वनक्षेत्रामध्ये १जानेवारी २०१५ रोजी एका महिला व दोन मुलांचे मृतदेह आढळून आले होते. वनरक्षक बाळासाहेब नागरगोजे यांनी तक्रारीवरून अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी केलेल्या तपासात महिला सुनीता जयराम चौघुले, मुलगी जयश्री, मुलगा अभिजीत यांचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी बाळासाहेब चौघुले व दिगंबर चौघुले यांना संशयावरून अटक झाली होती. अंबाजोगाई कोर्टाने जामीन फेटाळल्याने बाळासाहेब व दिगंबर यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. कोर्टाने १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर, तितक्याच रकमेच्या २ जामीनदारांसह जमीन मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या नेतृत्वाखाली उद्या उस्मानाबादेत मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राज्यातील सरकारला दुष्काळाची तीव्रता व दाहकता याची जाणीव करून देण्यासाठी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार करणार आहेत. पवारांच्या नेतृत्वाखाली निघणारा हा उस्मानाबादेतील पहिलाच मार्चा ठरणार आहे.

उस्मानाबादसह मराठवाड्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. दुबार पेरणीचीही आता शक्यता नाही. त्यामुळे राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक सहाय्य करून त्यांना दिलासा द्यावा. मजुरांच्या हाताला काम, पिण्यासाठी पाणी व जनावराला चारा उपलब्ध करून द्यावा. याशिवाय, रब्बी हंगामासाठी म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट प्रतिहेक्टरी ३० हजार रुपये अर्थसहाय्य करावे, या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चाचे आयोजन केले आहे.

पवारांच्या या आंदोलनामुळे शेकापचे दिवंगत नेते भाई उद्धवराव पाटील यांच्या कार्यकाळातील मोर्चाच्या आठवणींना उजाळा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे १४ ऑगस्टरच्या या मोर्चाकडे सर्वपक्षीय नेते मंडळींचे लक्ष लागले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ११ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, या मोर्चात एकही दिग्गज नेता ‌किंवा विद्यमान लोकप्रतिनिधी सहभागी झाले नव्हते.

जून २०१५ मध्ये शरद पवार उस्मानाबादला आले होते. या वेळी त्यांनी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा, अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उस्मानाबादेत आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चारा छावण्या तत्काळ सुरू करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'राज्यात जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला जाणार असून चारा छावण्या तत्काळ सुरू करण्यात येणार आहेत,' अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. लातूर जिल्ह्यातील लातूर आणि रेणापूर तालुक्यातील गावांना त्यांनी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

पालकमंत्र्यांनी लातूर तालुक्यातील महापूर शिवारातील शेतकरी बालाजी शिंदे यांच्या शेतात पाण्याअभावी न उगवलेल्या पिकांची पाहणी केली. या वेळी शिंदे यांनी पेरणीसाठी झालेला खर्च, दुबार पेरणीची मावळलेली आशा कथन केली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या किसन रणखाम यांच्या वाळत असलेल्या ऊसाची माहितीही पालकमंत्र्यांनी शेतावर जाऊन घेतली. रेणापूर तालुक्यातील खानापूर शिवारातील विश्वजित कदम यांच्या सुकत असलेल्या डाळिंबाच्या बागेस भेट दिली. या वेळी पाण्यासाठी सरकारने काही तरी मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पंकजा म्हणाल्या, 'पावसाने ओढ दिल्यामुळे परिस्थिती गंभीर झालीआहे. सरकार पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जनावारांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला असून चारा डेपो किंवा छावणी सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, चारा छावणी ही तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात जिल्हा परिषदा सहकार्य करतील, असे आज काही चित्र नाही. त्याचा स्थानिक विकासकामांवर भर असतो. त्यांना काही कायदे आहेत. परंतु, कोणी नियम, कायदे यांची सांगड घालून जर कोणत्या जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विचार केला जाईल.'

'परिस्थिती गंभीर असली, तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्येने समस्या संपत नाहीत. उलट एका कुंटुबासमोर भावनिक, सामाजिक अनेक समस्या निर्माण होतात. त्याचा विचार करून धीर सोडू नये.'

या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, उपविभागीय अधिकारी डॉ. प्रताप काळे, तहसीलदार अजित कारंडे, कृषी अधिकारी मोहन भिसे, जिल्हा बँकेचे संचालक रमेश कराड, भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद केंद्रे आदी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाची भेट

विश्रामगृहावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंग, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. ए. के. सिंग, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. केंद्रीय पथकानेही डाळिंबाच्या बागेला आणि सोयाबीनची पेरणी झालेल्या शेताची पाहणी करून अंबाजोगाईकडे प्रयाण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण तालुक्यात दमदार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शहर व परिसरात मंगळवारी रात्री जवळपास दीड तास जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे कापूस, तूर, मूग या खरीप पिकांना काही अंशी लाभ मिळणार आहे. या पावसळ्याच्या सुरुवातीला एक दोन चांगले पाऊस पडल्यावर मागच्या दीड महिन्यापासून तालुक्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग दोन तीन दिवस रिमझिम पाऊस पडला. मात्र, या पावसाचा खरीप पिकांना जास्त उपयोग झाला नाही. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास शहर व तालुक्यातील पूर्व, पश्चिम, उत्तर भागात जवळपास दीड तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर हा पाऊस रात्रभर रिमझिम स्वरुपात होता. या पावसामुळे तालुक्यात लागवड करण्यात आलेल्या खरीप हंगामातील कापूस, तूर, मूग, बाजरी, मका व सोयाबीन या पिकांना फार फायदा होणार नसला तरी जवळपास पन्नास ते साठ टक्के खरीप पिकांना जीवनदान मिळणार असल्याची माहिती कृषी सहाय्यक सचिन खराद यांनी दिली.

सर्व रस्त्यांवर चिखल

भूमिगत गटार योजनेचे काम व नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मंगळवारच्या पावसामुळे सर्वच रस्त्यांवर चिखल झाला आहे. भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराने पाइप टाकल्यानंतर रस्त्यावरील माती उचलेली नाही. नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शहरात कचरा व मातीचे ढीग लागले. पावसानंतर उद्यान रोड, नेहरूचौक रोड, जुना नगररोड या प्रमुख रस्त्यांसह सर्व रस्त्यांवर चिखल झाला आहे. त्यावरून नागरिकांना चालणे कठीण असून वाहने घसरत आहेत. नगरपालिकेने रस्त्यावरील माती उचलावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images