Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

इनामी जमीन पुजाऱ्यास देण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथील देवी संस्थानची इनामी जमीन मंदिराच्या पुजाऱ्याच्या ताब्यात देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले.

सोलेगाव देवीसंस्थानचे दीडशे वर्षांपूर्वीच्या मंदिराची पूजाअर्चा व वार्षिक उत्सव नियमित ठेवण्याच्या व मंदिराचे बांधकाम करण्याच्या उद्देशाने हनुमंतगाव, (गट नं. ८८) व मौजे सोलेगांव (गट नं. ४०) मधील आठ एकर इनामी जमीन शासनाने हैदराबाद एतियात अॅक्ट १९५२नुसार ताब्यात घेतली होती. जमीन ताब्यात घेताना वैजापूर उपजिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल २०११ रोजी या जमीनीचा ताबा दोन वर्षानंतर परत देण्याचे स्पष्ट केले.

मुदतीनंतर विरासतदार (पुजारी) श्रीकांत भानुदास जोशी यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे निवेदन देऊन जमीन परत देण्याची विनंती केली. मात्र निवेदनाची दखल न घेतल्याने जोशी यांनी खंडपीठात याचिका केली. या जमिनीचा दोन वर्षाचा कालावधी २०१३ मध्ये पूर्ण झाला आहे. याचिकाकर्त्यांनी देवस्थानची सेवा केलेली आहे, त्यामुळे तेच जमिनीची वहिती करू शकतात, असा युक्तिवाद अर्जदाराचे वकिल रवींद्र गोरे यांनी केला. जमिनीचा ताबा याचिकाकर्त्यांना चार आठवड्यात देण्यात यावा, याचिकाकर्त्यांनी मंदिराची देखभाल व्यवस्थितपणे केली नाही, तर राज्य शासन हैदराबाद अतियात ऍक्टच्या कलम ५नुसार कारवाई करू शकेल, असे आदेश खंडपीठाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उसाच्या पेमेंटसाठी सिल्लोडला धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊसाचे पेमेंट पाच महिन्यांपासून पाच कोटी रुपये थकले आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी येथे अन्नदाता शेतकरी मंडळाच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पेमेंट मिळेपर्यंत धरणे आंदोलन मागे घेणार नाही, असे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

माणिकनगर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला पैठण, औरंगाबाद, गंगापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस दिला आहे. पण कारखान्याने अद्याप एक रुपयाही दिलेला नाही. सहकार कायद्यानुसार ऊस कारखान्याला गेल्यानंतर १४ दिवसांनी पैसे देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी औरंगाबाद येथे सहायक साखर आयुक्तांकडे वेळोवेळी तक्रार दिली, त्यानंतर आयुक्तांनी पत्र दिल्यानंतरही कारखान्याने पैसे देण्यास टोलवाटोलवी केल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनात पांडुरंग शिंदे, संजय जाधव, संजय उगले, कृष्णा मिसाळ, रामेश्वर शिंदे, शिवाजी उघडे, हरिभाऊ उघडे, सय्यद शामद, दादासाहेब जाधव, शेषराव डांगे, अप्पा भवर आदी शेतकरी उपस्थित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख गणवेश दोन दिवसांत द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शाळेतील एक लाख ६३ हजार विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी किमान एकतरी गणवेश द्यावा, असे असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठी दीड महिन्यापूर्वीच साडेसहा कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.

सर्वशिक्षा अभियानातून जिल्हा परिषद शाळेतील एससी, एसटी विद्यार्थी, विद्यार्थिनी, दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थिनी या प्रवर्गासाठी गणवेश दिले जातात. यंदा २१३० शाळांमधील एक लाख ६३ हजार ६४५ विद्यार्थ्यांसाठी सहा कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये प्राप्त झाले होते. नियमानुसार हा निधी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे वर्ग करण्यात आला होता. दीड महिन्यापूर्वी हे पैसे देण्यात आले जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळतील. शिक्षण समितीच्या बैठकीत याचा आढावा घेतला असता असे लक्षात आले की बहुतांश शाळेत गणवेश वाटप झालेले नाही. कारण विचारल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले, की ग्रामपंचायत निवडणूक होती. त्यासाठी लागू झालेल्या आचारसंहितेमुळे काही मुख्याध्यापकांनी ही प्रक्रियाच राबविली नाही. काही ठिकाणी मुख्याध्यापक, शिक्षकांना निवडणूक कामाला जावे लागले होते. त्यामुळे गणवेश शिवण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. प्रती विद्यार्थी २०० रुपये अनुदान अपेक्षित आहे. त्यातून दोन गणवेश द्यावेत, असे आदेशित केलेले आहे. वास्तविक निवडणूक आचारसंहिता आणि गणवेश याचा कुठेही संबंध नाही पण मुख्याध्यापकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन न मागविल्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसला आहे.

यावर तोडगा काढत समितीने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले की १५ ऑगस्ट पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले पाहिजे. सभापती विनोद तांबे, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

पाण्यासाठी शाळांना प्राधान्य

संभाव्य पाणीटंचाईचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पाण्याचा जपून वापर करताना ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्या टँकरचे पाणी आधी शाळेतील टाकीत टाकावे, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असे आदेश सभापती विनोद तांबे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैजू पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना सेव्हस बँकेकडून दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार 'अंडर वॉटर फोटोग्राफी'साठी मिळाला आहे. नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राणा कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

वन्यजीव छायाचित्रण केल्यानंतर बैजू पाटील यांनी अंडर वॉटर फोटोग्राफीमध्ये नवनवीन प्रयोग केले. अंडर वॉटर फोटोग्राफीसाठी त्यांना हा पहिलाच पुरस्कार मिळाला. अंदमान येथील हॅवलॉक बेटावर त्यांनी वॉटरप्रूफ कॅमेऱ्याने पुरस्कार प्राप्त फोटो घेतला. अर्धा कॅमेरा पाण्याखाली आणि अर्धा वर ठेवल्यानंतर सुंदर दृश्य टिपता आले. फोटोत दिसणारा मासा हा स्विड असून त्याच्यावर प्रकाश पडल्यावर तो चमकतो. पाण्याखाली अनेक फोटो घेतल्यानंतर पाण्यावर मासे येत असताना दिसले. तसेच समोरून येणारी बोट पाहिल्यावर फोटोचा हा अँगल डोक्यात आला आणि क्षणाचाही विलंब न लावता ही छबी टिपल्याचे बैजू यांनी सांगितले.

अंदमान बेटावर प्रशिक्षण

जगात केवळ तीन टक्के लोकच अंडर वॉटर फोटोग्राफी करतात. देशात हे प्रमाण नगण्य आहे. खोल समुद्रात जाऊन फोटोग्राफी करताना लाटांनी जास्त काळ तग धरून राहता येत नाही. बैजू यांना अंदमान बेटावर प्रशिक्षण घ्यावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाय सुजलेल्या मुलासह आईची पालिकेत धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या आरोग्य केंद्रात देण्यात आलेल्या इंजक्शेनचे रिअॅक्शन झाल्यामुळे पाच वर्षाच्या मुलाचा पाय सुजला. या मुलाच्या पायाची गुरुवारी (१३ ऑगस्ट) घाटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे. पाय सुजलेल्या मुलाला घेऊन त्याची आई बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी महापालिकेत आली होती.

सय्यद इम्रान सय्यद फय्याज या मुलास ६ ऑगस्ट रोजी डीपीटी बुस्टर डोस देण्यात आला होता. डोसची रिअॅक्शन झाल्याने त्याचा उजवा पाय सुजला. आई-वडिलांनी त्याला दवाखान्यात नेले, पण औषधोपचारानंतरही सूज कमी झाली नाही. त्यामुळे इम्रानच्या आईने बुधवारी सकाळी थेट महापालिकेत मुलास घेऊन धाव घेतली. त्यांनी आधी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांची भेट घेऊन मदत करण्याची मागणी केली. आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर मदत करता येईल, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितल्यानंतर इम्रानच्या आईने उपमहापौर प्रमोद राठोड यांची भेट घेतली. राठोड यांनी ही व्यथा ऐकून घेतल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. उपमहापौरांच्या आदेशानंतर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, देवळाई वॉर्डांची अधिसूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सातारा, देवळाई वॉर्ड पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने वॉर्ड रचनेची अंतिम अधिसूचना बुधवारी (१२ ऑगस्ट) जारी केली. या अधिसूचनेनुसार सातारा-देवळाई भागात दोनच वॉर्ड असतील. त्यापैकी सातारा वॉर्ड सर्वसाधारण व देवळाई एसटी महिलेसाठी राखील राहणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. महापालिका प्रशासनाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून कर्मचारी नियुक्तीची लगबग सुरू झाली आहे.

सातारा, देवळाई भागाचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर आता या भागाची निवडणूक स्वतंत्रपणे होणार आहे. कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसोबत सातारा व देवळाई वॉर्डाची निवडणूक होणार हे आता स्पष्ट झाले आहे. वॉर्ड रचनेची अंतिम अधिसूचना बुधवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार सातारा परिसर ११४ क्रमांकाचा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी असून ११५ क्रमांकाचा देवळाई परिसराचा वॉर्ड एसटी महिलांसाठी (अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी) राखीव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

११४ क्रमांकाच्या वॉर्डात २७७७४ लोकसंख्या असणार असून, त्यात ३३१२ नागरिक अनुसूचित जाती, तर ४८६ नागरिक अनुसूचित जमाती आहेत. ११५ क्रमांकाच्या वॉर्डची लोकसंख्या २५११५ निर्धारीत करण्यात आली आहे. त्यात ५५७० नागरिक अनुसूचित जाती, तर ५९४ नागरिक अनुसूचित जमातीचे आहेत. वॉर्ड रचनेची अधिसूचना जाहीर झाल्यामुळे प्रशासनाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

या संपूर्ण परिसरात २८ ते ३० मतदान केंद्र असणार आहेत. एका मतदान केंद्रावर १२०० ते १४०० मतदार असतील. मतदान आणि मतमोजण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागात लगबग सुरू झाली आहे. विविध शासकीय कार्यालयांना पत्र देऊन निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची मागणी केली जाणार असल्याचे उपायुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांना सांगितले.

२८ ते ३० मतदान केंद्र

सातारा परिसर वॉर्ड ११४ क्रमांकाचा (खुला प्रवर्ग) असून ११५ क्रमांकाचा देवळाई परिसराचा वॉर्ड एसटी महिलांसाठी (अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी) राखीव आहे. या संपूर्ण परिसरात २८ ते ३० मतदान केंद्र असणार आहेत. एका मतदान केंद्रावर १२०० ते १४०० मतदार असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेरोजगाराला गंडविले; एसटी सुरक्षा निरीक्षक गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नोकरीचे आमीष दाखवून बेरोजगाराला गंडवणारा चंद्रपुरातील एसटी सुरक्षा निरीक्षक रमेश जोगदंड याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. तसेच जोगंदडला एसटी विभागाने निलंबित केले आहे.

पैठण पोलिस ठाण्यात संतोष कोंडरे यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे '२०११ मध्ये एसटी विभागात भरती झाली. त्यात क्लार्क पदावर नोकरी मिळावी यासाठी संबंधितांनी नोकरीसाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी जोगदंड औरंगाबाद विभागात सुरक्षा निरीक्षक पदावर कार्यरत होता. जोगदंडने वीस दिवसांत एसटीत नोकरी लावून देतो म्हणून कोंडरेकडून दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर कोंडरे यांनी फोन करून नोकरीबाबत विचारले. तेव्हा जोगदंडने पुन्हा वीस हजारांची मागणी केली. एकूण एक लाख ६७ हजार ५०० रुपये दिल्यानंतरही त्याने नोकरी लावली नाही. पैसे देण्यासही टाळाटाळ केली. या प्रकरणी पैठण पोलिसांत २५ एप्रिल २०१५ रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक पाटोळे यांनी वारंवार संपर्क करूनही जोगदंडने पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. ८ जुलै रोजी पैठण पोलिसांनी औरंगाबाद येथे आलेल्या जोगदंडला अटक केली.

२००८ मध्येही निलंबित

जोगदंड २००८ मध्ये सिंधुदूर्ग येथे कार्यरत होता. तिथेही त्याच्या विरोधात फसवणूक तसेच नोकरीचे आमीष दाखविल्याप्रकरणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. चौकशीनंतर त्याला आठ महिने निलंबित करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर फोडून चाळीस हजाराचा ऐवज लंपास

$
0
0

औरंगाबादः उस्मानपुरा परिसरात दिवंगत स्वातंत्र्य सैनिकाचे घर चोरट्यांनी फोडून चाळीस हजाराचे भांडे पळविले. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला असून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संत एकनाथ रंग मंदिराच्या मागे सिटी केअर हॉस्पिटलजवळ सिंधूताई भालेराव यांचे निवासस्थान आहे. दीड महिन्यापूर्वी भालेराव यांचे निधन झाले. सध्या त्यांच्या बंगल्यामध्ये एक भाडेकरू आहे. आठ ते अकरा ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश केला. आतमधील तांब्या पितळाचे भांडे व पाणी तापवायचा बंब चोरट्यांनी नेला. मंगळवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या बेपत्ता बहिणी रेल्वे स्टेशनवरून ताब्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिकमधून बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या बहिणींना मंगळवारी सायंकाळी जनशताब्दी एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

प्रियंका विनोद घोगरे (वय ८) व निकीता घोगरे (४) रा. भगवतीनगर, कोळीवाडा, जुने नाशिक या दोन दोघी सोमवारी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या पालकांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघी औरंगाबादला गेल्याची माहिती मंगळवारी नाशिक पोलिसांना मिळाली. त्यांनी वॉटसअपद्वारे फोटो व मुलींची माहिती औरंगाबाद पोलिसांना कळविली. त्यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे, क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी, दामिनी पथक व आयुक्तालयातील स्ट्रायकींग फोर्स असा फौजफाटा मुलींच्या शोधासाठी लावण्यात आला. दरम्यान, सायंकाळी मुंबईवरून नाशिकमार्गे येणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसची तपासणी रेल्वे स्टेशवरवर पोलिसांनी केली. यामध्ये एका बोगीमध्ये या बहिणी आढळल्या. त्यांना ताब्यात घेत उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. नाशिक पोलिसांना ही माहिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता मुलाची माहिती माध्यमांना देण्यासाठी मातेलाच पिटाळले

$
0
0

औरंगाबाद : पोटचा मुलगा गेल्या दोन ‌महिन्यांपासून बेपत्ता झालेला. अल्पवयीन असल्याने आईने हर्सूल पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याच्याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना फोटोसह देण्याचे काम तसे सबंधित तपास अधिकाऱ्याचे आहे. मात्र, या गरीब मातेलाच ही माहिती देण्यासाठी पिटाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

योगेश सोमीना‌थ ससे (वय १७, वर्ष रा. सुरेवाडी) हा दोन महिन्यापासून बेपत्ता आहे. त्याची आई आशाबाई यांनी या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात ३१ जुलै रोजी अपहरणचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता योगेशची उंची पाच फूट, रंग सावळा, अंगात जांभळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पँट आहे. बेपत्ता झालेल्या फोटो व त्याची माहिती तपास अधिकाऱ्यांमार्फत प्रसार माध्यमांना प्रसिद्धीसाठी देण्याची पद्धत आहे. मात्र हर्सूल पोलिसांनी योगेशच्या आईकडेच सर्व वर्तमात्रपत्रांना देण्यासाठीची प्रेसनोट दिली. ‌कुठे रिक्षाने तर कुठे पायपीट करत पदरमोड करून त्यांनी वर्तमानपत्राचे कार्यालय गाठून आपल्या मुलाची माहिती दिली. हर्सूल पोलिसांनी आपली जबाबदारी सोयीस्करपणे टाळल्यामुळे एका आईला मुलाच्या शोधासाठी वणवण फिरावे लागले.

दोन लाखांच्या खंडणीची मागणी

औरंगाबाद : भाड्याचे घर सोडण्यासाठी भाडेकरूनेच घरमालकाला दोन लाखाच्या खंडणीची मागणी केली आहे. मकसूद कॉलनी भागात हा प्रकार घडला असून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नसरूल्लाखान लाल खान (वय ५७ रा. मिसारवाडी) यांचे मकसूद कॉलनी भागात घर आहे. हे घर काही महिन्यापूर्वी त्यांनी मोहमद इम्रान आरेफखान यांना घर भाड्याने दिले होते. र‌विवारी सकाळी साडेनऊ वाजता नसरूल्लाखान भाडेकरूंना घर रिकामे करण्यासाठी सांगण्यास गेले होते. यावेळी त्यांना मोहमद इम्रान व आमेरखान आरेफखान यांनी घर सोडायचे असल्यास दोन लाख रुपये द्या, अशी मागणी केली. तसेच शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून हाकलून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉटची पोलिसांनीच विक्री केल्याचा आरोप

$
0
0

औरंगाबाद : मंगळवारी नारेगाव येथील आपल्या प्लॉटवर दोघांनी मारहाण करीत अतिक्रमणाचा प्रयत्न केला असून, पोलिसांच्या मदतीने हा प्रकार घडल्याची तक्रार पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविल्यावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीने केला

पोलिसांनी अटकेत असताना परस्पर प्लॉटची कागदपत्रे हस्तगत करून या प्लॉटची विक्री केली, असा आरोप नारेगाव येथील साहेबखान यासीनखान पठाण या आरोपीने केला आहे. पैशाचा पाऊस पाडण्याची थाप मारून फसवणूक केल्याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. मंगळवारी नारेगाव येथील आपल्या बंद असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी इसाक कुरेशी व लईक शेख यांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केला, वस्तूंची नासधूस केली अशी तक्रार साहेबखान पोलिस आयुक्तालयात दिली आहे. आपण चार महिने अटकेत असताना आपल्या पत्नीच्या व मेव्हणीच्या नावे असलेल्या प्लॉटची कागदपत्रे गुन्हेशाखेने जप्त केली. पदाचा गैरवापर करीत ‌परस्पर या प्लॉटची विक्री केली असा आरोप त्याने तक्रारीत केला आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याने केली आहे.

जामीन फेटाळला

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी संदीप विठ्ठलराव भसांडे याचा नियमित जामीन विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी फेटाळला. भसांडेच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला व २७ जून रोजी त्याला अटक झाली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने नियमित जामीनासाठी अर्ज सादर केला होता. या प्रकरणी सुनावणीवेळी, आरोपी हा फिर्यादीवर दबाव आणू शकतो म्हणून त्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील एस. एम. नवले यांनी केला.

पादचारी मृत्युप्रकरणी, चालकास सहा महिने शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव वेगात येणाऱ्या बसने पादचाऱ्यास चिरडल्यामुळे बस चालकास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. डोईफोडे यांनी दोषी ठरवून सहा महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठवली. नवीनचंद्र मंत्री हे ११ नोव्हेंबर २००९ रोजी दुपारी गजानन मंदिरासमोरून शिवाजीनगरकडे पायी जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या बसने (क्र. एम, एच. २० डब्ल्यू. ९३४८) मंत्री यांना जोराची धडक दिली. या अपघातात मंत्री हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रेमसुख मंत्री यांच्या तक्रारीवरुन बसचालक गणेश कोठाळेविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या फौजदारी खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. डोईफोडे यांच्यासमोर झाली असता, सरकारी वकिलांनी सहा साक्षीदार तपासले. यामध्ये चालक गणेश कोठाळे हा दोषी आढळून आल्याने कोर्टाने त्याला सहा महिने साधी कैद व २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनासूचना वीज तोडली; महावितरणला १० हजार दंड

$
0
0

औरंगाबाद : कायदा बासनात गुंडाळून ग्राहकांना कसलिही नोटीस न देता पाच वेळेस वीज कनेक्शन तोडणे महावितरणला चांगलेच महागात पडले. या प्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचाने महावितरणला दहा हजारांचा दंड ठोठावला.

सिडकोत राहणाऱ्या अबरार अहमद सिद्दीकी यांना वाढीव बिल यायचे. याबाबत त्यांनी २०१४ मध्ये वीज मीटर फॉल्टी आहे, वाढीव बिल येते अशी तक्रार करत महावितरणकडे मीटर तपासणीची मागणी केली. मात्र, या तक्रारीकडे महावितरणने लक्ष दिले नाही. वीज कायदा २०१३ प्रमाणे ग्राहकाला वीज तोडणीआधी नोटीस देणे आवश्यक आहे. याकडेही दुर्लक्ष केले. आणि फक्त वसुलीएके वसुली डोळ्यांसमोर ठेवून सिडको कार्यालयाने जानेवारी २०१५ ते मे २०१५ या काळात अबरार सिद्दीकी यांच्या घरातील वीजपुरवठा ५ वेळेस खंडित केला. महावितरणच्या या कारभाराविरुद्ध त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. ग्राहक प्रतिनिधी अख्तर अली खान यांनी त्यांची बाजू मंचासमोर मांडली. ग्राहक तक्रार मंचाचे अध्यक्ष डॉ. भास्कर पालवे, एन. आर. गंधळे आणि विलासचंद्र काबरा यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर महावितरणला मानसिक छळापोटी दहा हजारांचा दंड ठोठावला.

अतिरिक्त ४ हजार भरा

ग्राहकाचे २००८ ते २०१५ पर्यंतचे बिल दुरुस्त करून द्यावे, बिल ५० केडब्ल्यू ऐवजी ५ केडब्ल्यू प्रमाणे आकारावे, ग्राहकाला जूनमध्ये २,८५८ युनिट ऐवजी ५५६ युनिटचे बिल आकारावे असे आदेश दिले. वीज बिल तक्रारीची वेळेत दखल न घेतल्याबद्दल महावितरणाला ४००० रुपयांचा वेगळा दंड ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साफसफाई कामात खासगीकरणाचे वारे

$
0
0

औरंगाबाद : साफसफाईच्या कामाबाबत महापालिकेत पुन्हा एकदा खासगीकरणाचे वारे वाहू लागलेत. खर्च कमी करण्याच्या नावाखाली सभापती दिलीप थोरात यांनी हे संकेत दिले. आगामी काही महिन्यांत हा निर्णय होऊ शकतो.

महापालिकेने 'रॅमकी' कंपनीच्या माध्यमातून शहरातील साफसफाईच्या कामाचे खासगीकरण केले. मात्र, पालिका आणि 'रॅमकी'त वाद निर्माण झाल्यामुळे २०१२ पासून 'रॅमकी'ने साफसफाईचे काम बंद केले. कचऱ्याची वाहतूक करण्याचे कामही 'रॅमकी'कडे होते. ते काम आता पालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. सध्या या कामावर महिन्याला सुमारे १३ कोटी रुपये खर्च केले जातात. 'रॅमकी'च्या काळात हा खर्च आठ ते दहा कोटींच्या घरात होता. कंपनीपेक्षा महापालिकेचा खर्च जास्त होऊ लागल्यामुळे खासगीकरणाचाच मार्ग चांगला, अशी मानसिकता पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.

खासगीकरणामुळे पालिकेचा खर्च वाचणार असेल, तर खासगीकरण करावे लागेल. यासाठी पुन्हा 'रॅमकी'ने पुढाकार घेतला, तर त्या कंपनीला काम देण्याबद्दल विचार करता येईल. येत्या काही महिन्यात या संबंधीचा सविस्तर प्रस्ताव स्थायी समितीसमोर येईल.

- दिलीप थोरात, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३७ जोडप्यांचे हम साथ-साथ है!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'वेगळे राहणे नकोच. काही चुकले असेल ते दोघांचेही. आपण दोघेही समजून घेऊ', असे म्हणत ३७ जोडप्यांनी आपले विसकटलेले संसार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी महिला सहाय्य कक्ष आणि पोलिस आयुक्त कार्यालयाने घेतलेल्या विशेष समुपदेशन मेळाव्याचे हे फलित.

प्रत्येक पोलिस स्टेशनच्या महिला सहाय्यक कक्षात महिन्याकाठी किमान एक तरी जोडपे कौटुंबिक कलाहामुळे वेगळे राहण्यासाठी अर्ज करते. ही संख्या वाढतेच आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने समुपदेशन करून या जोडप्यांचा संसार टिकावा म्हणून प्रयत्न केले जातात, पण ही प्रकिया वेळखाऊ. त्यामुळे सर्व पोलिस स्टेशनची अशी प्रकरणे एकाच दिवशी सोडवण्यासाठी या मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. एकूण २८५ अर्जदारांपैकी १०० जणांशी संपर्क झाला. प्रत्यक्षात ६१ हजर जोडप्यांपैकी ३७ जोडप्यांचे संसार पुन्हा जोडण्यात पोलिसांना यश आले. ज्यांचे पटतच नाही, अशा ४ जोडप्यांना न्यायालायात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला. ज्या पीडित महिलांना पती व सासरच्या मंडळीकडून मानसिक, शारीरिक त्रास होत आहे, अशा पती-पत्नींचे समुपदेशन करून सखोल विचार करण्यासाठी १६ जोडप्यांना पुढील तारखा देण्यात आला. तर ३ प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी पोलिस स्टेशनला दिली. यातले १ प्रकरण निकाली काढले. ज्या जोडप्यांपैकी एकाच बाजूचे लोक हजर झाले, त्यांना पुढील तारखा देते समुपदेशनाकरता वेळ देण्यात आला.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस उपायुक्त संदीप आटोळे, वसंत परदेशी, सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश गायकवाड व महिला सहाय्य कक्षाच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा झाला. महिला सामाजिक सुरक्षा समितीच्या सफिया लक्ष्मीनारायण, सुरैय्या बेगम, डॉ. शुभांगी गव्हाणे, ज्योती दासरी, नसीमा खालेद, स्नेहलता मानकर, विमल मापारी, मंगल खिंवसरा, सुरैय्या बेगम, नसीमा खालेद, मनोरमा शर्मा, सईदा शाहजहां, सुनिता चव्हाण, सुलभा खंदारे आदींनी

समुपदेशन केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. आर. चव्हाण, विनोद आघाव, कल्पना नाईक, प्रणिता दुभळकर, फहिमुन्नीसा शेख, रुक्मिणी गाडेकर, इत्तेजा शेख, नंदा तिडके, समिंद्रा गायकवाड, उषा राठोड आदींनी परीश्रम घेतले. यशस्वी जोडप्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पाच महिन्यांपासून तीन वर्षापर्यंत प्रकरणे

समुपदेश मेळाव्यात आलेल्या जोडप्यांमध्ये पाच महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंतची प्रकरणे होती. गेल्या तीन वर्षांपासून कुरबुरी सुरू झालेली जोडपे अनेक आहेत. बहुतेक प्रकरणांत नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे घरात कलह निर्माण झाल्याचे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदविले.

आत समुपदेशन, बाहेर हाणामारी

माझा नवऱ्याला माझ्यासाठी वेळच नसतो, तो दारू पितो, माझी बायको सारखा संशय घेते, मला काही नको, फक्त नवऱ्याचा वेळ हवा, असे संवाद यावेळी ऐकू आले. तरी वेगळ्या वाटेने आलेली जोडपी जाताना मात्र मोठ्या आनंदाने सोबत गेली. काही प्रकरणांमध्ये वाद इतक्या शिगेला पोचला होता की, समोरासमोर आल्यापासून ते जाईपर्यंत ही जोडपी एकमेकांशी भांडत होती. इतकेच नव्हे तर काही जोडप्यांच्या नातेवाईकांनी आयुक्तालयाच्या आवारातच जोरदार हाणामारी केली.

न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. फलित मिळायला बराच वेळ जातो. मेळाव्यात दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्र आणत शांतपणे विचार करण्याची संधी दिली. महिन्यातून ‌एकदा असा मेळावा घेण्याचा प्रयत्न करू.

- निर्मला परदेशी, पोलिस निरीक्षक, महिला सहाय्य कक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्राँक्र‌िट मिक्सर चोरांना बेड्या

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालकासोबत वाद झाल्याने त्याला धडा शिकविण्याच्या हेतूने कामावरून काढलेल्या नोकराने दोन साथीदारांच्या मदतीने दीड लाखाचे क्राँक्र‌िट मिक्सर चोरले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक झाली असून, सूत्रधार असलेल्या कुख्यात बापू बनसोडेचा गेल्या महिन्यात पिंपरी‌ चिंचवड येथे खून झाला आहे.

मुकुंदवाडी, राजीव गांधीनगर येथील बाळू रामकिसन सोनवणे (वय ४४) यांच्याकडे चालक म्हणून सुरेश रमेश मोरे (वय ३० रा. पुंडलिकनगर) नोकरी करीत होता. सोनवणे यांचा सिमेंट क्राँक्र‌िट मिक्सर भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. सोनवणे यांनी कामाच्या तक्रारीवरून मोरेला कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग मोरेच्या मनात होता. त्याची ओळख बांधकाम ठेकेदार शेख पाशा शेख शब्बीर (वय ३२ रा. नारेगाव) याच्यासोबत झाली होती. पाशाच्या ओळखीचा रांजणगाव येथील कुख्यात गुन्हेगार बापू बनसोडे हा होता. मोरे याने पाशा व बापूला सोनवणेसोबत झालेला प्रकार सांगितला. या तिघांनी सोनवणे यांचे मिक्सर तीन वर्षांपूर्वी चोरले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात त्यांनी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गुन्हेशाखेच्या पथकाला या चोरीमागे मोरे व पाशाचा हात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी हे मिक्सर चोरल्याची कबुली देत परभणी येथे नातेवाईकांकडे ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी हे मिक्सर जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अ‌विनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अयुब पठाण, शिवाजी भोसले, संजय जाधव, बबन इप्पर, आनंद वाहूळ, रितेश जाधव, प्रभाकर राऊत व एजाज खान यांनी केली.

बापूचा पिंपरी चिंचवडला खून

आरोपी पाशा याने बापू बनसोडेसोबत आणखी एक मिक्सर चोरल्याची कबुली दिली. मात्र, बापू पोलिसांच्या लेखी मृत गुन्हेगार आहे. बापू बनसोडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. पिंपरी चिंचवड येथील काही गुन्हेगारांना त्याने स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातला होता. हे पैसे वसूल करण्यासाठी १५ जुलै रोजी त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. २४ जुलै रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार आरोपींना याप्रकरणी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्मार्ट’ औरंगाबाद ‘अमृत’मध्येही

$
0
0

उन्मेष देशपांडे, औरंगाबाद

औरंगाबाद शहराला आता 'अच्छे दिन' येऊ लागले आहेत. स्मार्ट सिटी पाठोपाठ आता शहराचा समावेश केंद्र सरकारच्या 'अमृत' (अटल मिशन फॉर रिज्युवनेशन अँड अर्बन ट्रांसफॉर्मेशन) योजनेतही समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही योजनांचा आराखडा ठरविण्यासाठी येत्या १९ ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. त्याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.

शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अभियान आणि अमृत योजना जाहीर केली आहे. शहराचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. त्यानंतर औरंगाबादकरांसाठी आणखी एक गुड न्यूज आहे. शहराचा समावेश 'अमृत' योजनेतही झाल्याचा संदेश मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयातून देण्यात आला. स्मार्ट सिटी अभियान व अमृत योजना यांचा आराखडा ठरविण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी नगर विकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यासाठी उपस्थित राहण्याचा निरोप मंत्रालयातून देण्यात आला आहे. नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी केंद्राने 'अमृत'ची आखणी केली आहे. त्यात सक्षम पाणीपुरवठा योजना, अद्ययावत मलनिःसारण योजना, शहर वाहतूक व्यवस्था यांसह रस्ते, दिवाबत्ती, घनकचरा व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. केंद्राने खर्चाची विभागणी तीन भागांत केली आहे. ८० टक्के रक्कम केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. प्रशासकीय सुधारणांसाठी इन्सेंटिव्ह म्हणून १० टक्के रक्कम दिली जाणार आहे. राज्य सरकार ८ टक्के रक्कमेची तरतूद करणार असून, नगर विकास मंत्रालय बजेटच्या २ टक्के रक्कम देणार आहे.

'अमृत' योजनेत काय होणार...

अद्ययावत पाणीपुरवठा योजना

कार्यक्षम मलनिःसारण व्यवस्था

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या (स्टॉर्म वॉटर ड्रेन)

सार्वजनिक वाहतूक आणि पार्किंगच्या जागांचा विकास

हरित पट्ट्यांचा विकास, उद्यानांचा विकास

सांस्कृतिक सभागृहे व लहान मुलांसाठी सुविधा

स्मार्ट सिटी अभियानाबरोबरच 'अमृत' योजनेतही औरंगाबादचा समावेश करण्यात आल्याची माहिती मंगळवारी मंत्रालयातून देण्यात आली. या दोन्ही योजनांचा आराखडा ठरवण्यासाठी नगर विकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. एकाच वेळी दोन्ही योजनांचा लाभ औरंगाबाद महापालिकेला घेता येईल. त्यात काही अडचण नाही.

- सखाराम पानझडे, शहर अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम मजुरांना ईएसआय

$
0
0

रवींद्र टाकसाळ, औरंगाबाद

बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत असंघटित कामगारांना भारतीय राज्य कामगार विमा योजनेचा (ईएसआय) लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ होईल.

वाढत्या शहरीकरणामुळे सर्वत्र इमारती उभारल्या जात आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर राबत असलेल्या बांधकाम कामगारांची अवस्था मात्र वाईट आहे. कृषी क्षेत्रानंतर सर्वात जास्त कामगार बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. या कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांनाही ईएसआयमार्फत आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत.

कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण वैद्यकीय देखभालीबरोबरच आजारपण, तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व, इत्यादींमुळे उत्पन्नाच्या क्षमतेत झालेली घट या वर्गात मोडणारे रोख लाभ मिळणार आहेत. औद्योगिक अपघात किंवा सेवेतील इजेमुळे किंवा व्यावसायिक जोखमीमुळे मृत्यू झाल्यास विमाधारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना अवलंबित्व लाभ दिला जाणार आहे.

कामगारांचे हित जपण्यासाठी सामाजिक सुरक्षा देणारी सर्वसमावेशक योजना आखण्यात आली असली तरी तिचा लाभ असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मिळत नव्हता. या कामगारांना ईएसआय लागू करावी, यासाठी विविध कामगार संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला.

संघटित कामगारांना ज्याप्रमाणे ईएसआयचा लाभ मिळतो, त्याप्रमाणेच बांधकाम कामगारांना दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांची माहिती गोळा करण्याचे काम ईएसआयमार्फत गेल्या आठवड्यापासून सुरू झाले आहे. बिल्डर, बांधकाम कंत्राटदार यांच्याकडूनही माहिती मागविण्यात आली आहे. देशातील 393 जिल्ह्यांत टप्प्या-टप्प्याने ही योजना लागू केली जाणार आहे.

बांधकाम कामगारांना ईएसआय लागू करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कामगार संघटना प्रयत्नशील होत्या. हा एक चांगला निर्णय असून, राज्यभरातील लाखों कामगारांना याचा लाभ होईल.

विनोद फरकाडे, राज्य सचिव, ईएसआयसी

जिल्ह्यात किती नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगार आहेत, याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे.संबंधित बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार यांच्याकडूनही माहिती मागविण्यात आली आहे.

- अशोक जोशी, सामाजिक सुरक्षा अधिकारी, राज्य कामगार विमा महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध उत्पादकांचा विमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद सहकारी दूध उत्पादक संघातर्फे नियमित दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १०२५ शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला असून आणखी ३४ हजार शेतकऱ्यांचा विमा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. बी. पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील ५५० दूध उत्पादक संस्था जिल्हा संघाच्या सभासद आहेत. या संस्थांच्या माध्यमातून सुमारे ३५ हजारांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी दररोज सरासरी ८० हजार लिटरहून अधिक दूध पुरवतात.

संघाला राज्य शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजनाअंतर्गत विमा काढण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानूसार सर्व सभासद संस्थांकडून दूध उत्पादकांची नावे, बँक खाते क्रमांकांची माहिती घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात पडेगाव येथील लक्ष्मीमाता सहकारी दूध उत्पादक संस्था, देवपूळ येथील गजानन संस्था, जैतापूर येथील सावित्री फुले महिला संस्था, गोळेगाव येथील रेणुका देवी संस्था आदीसह एकूण ६२ संस्थांच्या १०२५ शेतकऱ्यांचा विमा काढण्यात आला आहे. टप्प्या टप्प्याने सर्व शेतकऱ्यांचा विमा काढण्यात येणार आहे. शासकीय दरापेक्षा जास्त दराने दूध खरेदी केली जात असून दोन वर्षांपूर्वी दुष्काळी मदत म्हणून २५ लाख रुपयांची मदत संघाने केली होती.

विम्यासाठी वार्षिक सुमारे आठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही सर्व रक्कम जिल्हा संघ देणार आहे. काही शेतकऱ्यांनी विमा काढला असेल, तर त्यांना दूध बिलात परतावा देण्यात येणार आहे.

- डॉ. पी. बी. पाटील, व्यवस्थापकीय संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलावंतांना शक्य ते सरकारला का नाही?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठी कलावंतांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी तत्परता दाखवली. मग शेतकऱ्यांपर्यंत सरकारी मदत पोहचण्यात काय अडचण आहे तेच कळत नाही. कलावंतांना जमले ते सरकारलाही जमेल' असे मत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. 'स्लॅमबुक' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रभावळकर बुधवारी (१२ ऑगस्ट) शहरात आले होते. यावेळी दुष्काळी परिस्थितीवर त्यांनी परखड मते मांडली.

बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी आर्थिक मदत केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत सरकारी यंत्रणा पोहचत नसताना कलावंतांनी मदत केल्याची राज्यभर मोठी चर्चा झाली. मराठी नाट्य-चित्रपट कलावंतांच्या संवेदनशीलतेने शेतकरी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.

या मदतीसाठी नाना आणि मकरंद यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनीही पुढाकार घेतला आहे. 'दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत असल्याचे मकरंदने सांगितले होते. निधी जमा करण्यासाठी सहभागी होण्याची विनंती केली. आतापर्यंत शेतकऱ्यांवर बेतलेल्या संकटांची माहिती होती. त्यामुळे तत्काळ होकार कळवला. मराठी कलावंतांनी निधी उभा करून मराठवाडा व विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिला' असे प्रभावळकर यांनी सांगितले. दुष्काळात शेतकरी भोगत असलेल्या दुःखाने प्रभावळकर व्यथित झाले आहेत. शहरी वातावरणात कदाचित दुष्काळाची झळ बसत नाही आणि कळतही नाही. पण, दुष्काळी भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवते, असे ते म्हणाले. समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. मराठी कलावंत शेतकरी कुटुंबियांना नक्की सावरतील, असा विश्वास प्रभावळकर यांना व्यक्त केला.

दिलीप प्रभावळकर यांची खंत

दुष्काळात शेतकरी कुटुंबाला काय भोगावे लागते याची प्रातिनिधिक उदाहरणे ऐकल्यानंतर प्रचंड अस्वस्थ झालो. कर्त्या पुरूषाच्या आत्महत्येनंतर कुटुंबाची झालेली वाताहत ऐकून हादरलो. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला विचार करायला लावणारी सद्यस्थिती आहे, असे प्रभावळकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे

$
0
0

औरंगाबादः नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नांदेडहून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. नांदेड-नाशिक रेल्वेच्या बारा फेऱ्या होणार आहेत. ही रेल्वे १८ ऑगस्ट ते २५ या कालावधीत चालविण्यात येणार आहे. रेल्वे क्रमांक ०७९२६ नांदेड ते नाशिकरोड कुंभमेळा जनसाधारण विशेष रेल्वे नांदेड येथून दिनांक १८,२५,२८ ऑगस्ट आणि १२, १७,२४ सप्टेंबर, २०१५ला रात्री दहा वाजता सुटून नाशिकरोड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०:५० वाजता पोहोचेल. नाशिक ते नांदेड रेल्वे १९, २६, २९ ऑगस्ट आणि १३, १८, २५ सप्टेंबर रोजी सुटणार आहे. ही रेल्वे पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, लासलगाव आणि ओढा स्थानकांवर दोन्ही बाजूच्या प्रवास दरम्यान थांबणार आहे. या रेल्वेला १० साधारण जनरल, आणि दोन एस. एल. आर. जोडण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images