Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पावसाच्या मोठ्या विश्रांतीने चिंता

$
0
0
मराठवाड्यात यंदा पावसाळ्याला वेळेवर सुरुवात झाली खरी, मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी विश्रांती घेतल्यामुळे दुष्काळातून बाहेर पडताना पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटले आहेत.

मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास

$
0
0
जय भवानीनगर (वॉर्ड क्रमांक ८१) येथे गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. वाहनचालकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे गंभीर अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

मॉर्निंग कोर्टाला पैठणमध्ये सुरुवात

$
0
0
इव्हेनिंग कोर्टासोबतच पैठण न्यायालयात १२ ऑगस्टपासून मॉर्निंग कोर्टाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत पैठण न्यायालयात कामकाज चालणार आहे.

आदर्श पुरस्कारासाठी दहा प्रस्ताव

$
0
0
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी यावेळी दहा शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले आहेत. गेल्या तीन - चार वर्षात एकही प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल न झाल्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण पालिकेत झाले नव्हते.

मतदान गोपनीयता : कारवाईची शिफारस

$
0
0
विधान परिषद निवडणुकीत कन्नड नगर पालिकेतील मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग झाल्याच्या प्रकारामुळे संबंधित केंद्रावर नियुक्त केलेले मायक्रो ऑब्झर्व्हर आणि केंद्राध्यक्षांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काँग्रेसचा टक्का वाढला

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांनी विजय मिळविल्यामुळे आघाडीचे वजन वाढले आहे.

रानडुकरांनी पाडला उसाचा फडशा

$
0
0
गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा येथील उसाच्या शेतीचे रानडुकरांनी अतोनात नुकसान केले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वन विभाग, तहसिलदार आणि जिल्हाधिका-यांना निवेदन देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही.

शिवसेनेने जागा गमावली

$
0
0
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष झांबड यांनी विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांचा ७२ मतांनी पराभव केला.

फसव्या जाहिरातीतील कलावंतावर नजर

$
0
0
दिशाभूल करणाऱ्या व फसव्या जाहिरातीव्दारे मार्केटिंग करण्यात येत असलेल्या वस्तूंची खरेदी करु नका, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांनी केले आहे.

दाभोलकरांच्या हत्येचा निषेध

$
0
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध पक्ष व संघटनांनी केली.

वनरक्षकासाठी हजारो धावले

$
0
0
वन विभागात वन रक्षकाचे पद मिळविण्यासाठी दीड हजार तरुण आज पाच किलोमीटर धावले. दीडशेवर उमेदवारांनी मात्र पाच किलोमीटर धावण्याच्या परीक्षेला दांडी मारली.

पदांचे वाटप मटक्याच्या आकड्यांसारखे?

$
0
0
महापालिकेत सध्या अधिकाऱ्यांना मटक्याच्या आकड्यासारखी पदे वाटली जात आहेत. नागरिकांच्या प्रश्नांची चाड राहिलेली नाही, असा आरोप माजी उपमहापौर व भाजपचे नगरसेवक प्रशांत देसरडा यांनी आज गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केला.

झेडपी कर्मचारी पतसंस्थेची रविवारी सभा

$
0
0
औरंगाबाद जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २५ ऑगस्टला रविवारी दुपारी बारा वाजता साखरे मंगल कार्यालय सिडको एन आठ औरंगाबाद येथे होणार आहे.

बीड जिल्ह्यातील निम्या फिडरवर भारनियमन

$
0
0
महावितरण कंपनीने गतवर्षीपासून फिडरनिहाय भारनियमन करण्याचा निर्णय घेतला. ज्या फिडरची वितरण आणि वाणिज्यिक हानी कमी त्यांचे भारनियमन बंद झाले. वितरण आणि वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या फिडरवर भारनियमन करण्यात आले.

‘येडेश्वरी’च्या यात्रेची दहीहंडीने सांगता

$
0
0
आई राजा, उदो.. उदो… च्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थि‌तीत उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या श्रावणी पौर्णिमा यात्रेचा महोत्सव उत्साहात पार पडला. बुधवारी दहीहंडीच्या कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता झाली.

अॅडव्हांटेज औरंगाबाद पोलिस

$
0
0
बदल्यात काळानुसार ५२ दरवाजांचे शहर आता या दरवाजांबाहेरही प्रचंड विस्तारले आहे. औद्योगिक वसाहतीसोबत अनेक नवीन उपनगरांचा उदय झाला. हे बदलते स्वरुप पाहून पोलिस दलातही बदल अपेक्षित आहेत.

परप्रांतीय व्यापाऱ्यांचा विक्रीकर विभागाला गंडा

$
0
0
विक्रीकर विभागात वॅटच्या वजावटीची खोटी बिले सादर करुन चार व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजस्थान व मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्यांविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यापीठ देणार कौशल्यांचेही धडे

$
0
0
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असतानाच आता विद्यार्थ्यांना आता कौशल्य विकासाचे धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्यावर बेरोजगार म्हणून शिक्का बसणार नाही.

कॅम्पसमधून ३० विद्यार्थ्यांची निवड

$
0
0
सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित असलेल्या पर्सिस्टंट कंपनीतर्फे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले. यातून विविध कॉलेजांच्या तीस विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांना प्रत्येकी साडेतीन लाखांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

जि.प. अध्यक्षांची ३० ऑगस्टला निवड

$
0
0
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या ३० ऑगस्ट रोजी (शुक्रवार) जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे हे या सभेसाठी पीठासन अधिकारी असतील.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images