Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रोबोट तंत्रज्ञाचा अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

बजाज ऑटोमधील एका टेक्न‌िशियनचा गुरुवारी (१३ ऑगस्ट) मृत्यू झाला. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. भानुदास बोरकर (वय ५१), असे या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की बजाज ऑटोमध्ये वाहनांना रंग देण्याचे काम रोबोटमार्फत केले जाते. या विभागात रात्री साडेनऊच्या सुमारास रोबोटचा धक्का लागून भानुदास बोरकर खाली पडले. या घटनेत बोरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक माहितीनुसार बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर व्यवस्थापनातर्फे वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व पोलिस हेडकॉन्स्टेबल गुंजाळ यांच्यासह इतर पोलिस बजाज ऑटोमध्ये गेले. पोलिस रात्री उशिरापर्यंत घटनेची माहिती घेत होते. 'या विभागात कोणी जात नाही. रोबोट नादुरूस्त झाल्यास कोणी तरी दुरुस्तीसाठी जातो. बोरकर तेथे कशासाठी गेले होते, याची माहिती घेत आहोत,' असे पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबद्दल बोलण्यास व्यवस्थापनाकडून कोणीही उपलब्ध झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिझेल रिक्षांना जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून डिझेल रिक्षा रद्दपार करण्याचा निर्णय गुरुवारी (१३ ऑगस्ट) रात्री उशिरा रद्द करण्यात आला, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. वाढत्या प्रदूषणामुळे शहरातून डिझेल रिक्षा हद्दपार करण्याचा निर्णय स्थानिक प्रादेशिक परिववह प्राधिकरणने घेतला होता. आरटीएच्या या निर्णयाविरोधात रिक्षा संघटनेने निवेदन देत परिवहन मंत्र्यांना साकडे घातले होते. या निर्णयाबाबत सर्व अंगाने विचार करण्यात आला. शासनाने औरंगाबादमधील डिझेल रिक्षांची संख्या (एकूण ४००) पाहिली. या वाहनांपेक्षा शहरातील खासगी वाहनांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत डिझेल रिक्षांची संख्या नगण्य आहे. शिवाय डिझेल रिक्षाचालक गरीब आहे. त्याला रिक्षा भंगारात काढून, नवी पेट्रोल किंवा एलपीजी रिक्षा कमी वेळात घेणे शक्य नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, डिझेल रिक्षाच्या हद्दपारीची १५ ऑगस्टची मुदत लक्षात घेता गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’ विश्वासाला अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यासह कर्तृत्ववान नेतेमंडळींनी राज्यातील जनतेची विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळेच राजकारणातील अव्वल स्थान असलेल्या शरद पवार यांना तब्बल ३५ वर्षांनंतर रस्त्यावर उतरावे लागत आहे, असा आरोप भाजप नेते तथा राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केला.

यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. मिल‌िंद पाटील आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी तावडे म्हणाले, 'दिल्ली‌त तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सुरू असताना शरद पवार यांना उस्मानाबादेतील धडक मोर्चासाठी पाचारण करण्यात यावे हे येथील राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या दृष्टीने योग्य बाब नाही. याचा राष्ट्रवादी काँग्रेसने विचार करण्याची गरज आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रसच्या नेतेमंडळींच्या बोलण्यावर आता जनतेचा विश्वास नाही. त्यामुळेच जनतेला पुन्हा दुष्काळासंदर्भात आवाज उठव‌िण्यासाठी म्हणून खास बोलावण्यात आले. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी आमच्या सरकारला मार्गदर्शन करावे. त्यांच्या ज्येष्ठतेचा तो अधिकार आहे. दुष्काळी जनतेच्या हिताच्या काही गोष्टी त्यांनी सुचविल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू.'

कार्यक्षेत्रातील बँका शासन मदतीने गब्बर करावयाच्या आहेत. यातून पुन्हा आपले उखळ पांढरे करून घ्यावयाचे आहे. विद्यमान सरकारने कर्जमाफीपेक्षा अधिक पैसे दुष्काळाचा नायनाट करण्यासाठी खर्च केले आहेत, त्यासोबत ते अजूनही खर्च करीत आहेत. राज्यातील दुष्काळाचा कायमचा नायनाट करून राज्य टंचाईमुक्त व टँकरमुक्त करण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील २० हजार टंचाईग्रस्त गावांपैकी पाच हजार गावांतून सध्या जलशिवार अभियानाची कामे सुरू आहेत. या कामास लोकसहभागही जागोजागी मिळत असल्याचे यावेळी तावडे यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाचे राजकारण करू नका असा सल्ला यापूर्वी शरद पवार देत होते; परंतु आता तेच दुष्काळाचे राजकारण करत आहेत. ही दुर्दैवी बाब आहे. सरकारबरोबर चर्चा करून शिवाय उपाययोजना सुचवून दुष्काळ निवारणकामी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असा सल्ला शरद पवार वारंवार देत होते. आज या सूचनावजा सल्ल्याचा त्यांना विसर पडल्याचे दिसते. मलतबी व स्वार्थी राजकारणाकरिता ते रस्त्यावर उतरले आहेत. याचेच सर्वसामान्यांना आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले.

रिक्त पदे भरण्यासोबतच राज्यातील आयुर्वेद महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालयातील अडी- अडचणी लवकरच दूर केल्या जातील. त्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत.

- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात जेलभरो

$
0
0

दुष्काळप्रश्नी शरद पवार यांचा सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १४ सप्टेंबरपासून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी उस्मानाबाद येथे दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून पवार यांनी आंदोलन केले.

'उस्मानाबादसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यंदाही दुष्काळाने ग्रासले आहे. अशा प्रसंगी राज्य सरकारने दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी, रब्बीसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रुपये, चारा छावणी या प्रामुख्याने दुष्काळग्रस्तांच्या मागण्या आहेत,' असे सांगून 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत,' असे भावनात्मक आवाहन पवार यांनी या वेळी केले.

'देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत येऊन मुखदर्शन द्यायला तयार नाहीत. चर्चा तर सोडा; परंतु साधा संदेशही त्यांच्याकडून येत नाही. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. परंतु, त्यांना याची चिंता नाही. यामुळे दुष्काळी भागांतील जनतेचे जगणे असह्य होत चालले आहे,' अशी टीका पवार यांनी केली.

प्रसंगी राजकीय संघर्ष

मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. उस्मानाबाद जिल्हा तीन वर्षांपासून सलग दुष्काळाचा सामना करीत आहे. राज्य सरकारने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राजकीय संघर्ष अटळ आहे, असा इशारा पवार यांनी दिला. 'दुष्काळप्रश्नी ‌वेळीच उपाययोजना न झाल्यास शेती उद्वस्त होईल व पशुधनावर विपरिणाम होतील. मदतीबाबतचे राज्य सरकारने धोरण अद्यापही स्पष्ट नाही. मराठवाड्यातील हवामान पर्जन्यमानास अनुकूल नाही, असा अहवाल मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्षही वेधले होते. परंतु, सरकारचे धोरण नकारात्मकच आहे. दुष्काळी भागाची पाहणी करून मुख्यमंत्री व पंतप्रधानांना स्वतंत्र अहवाल देऊन दुष्काळग्रस्तांना भरीव मदतीसाठी विनंती करणार आहे', असे पवार म्हणाले.

मोदींनी हस्तक्षेप करायला हवा होता

ललित मोदी प्रकरणी संसदेच्या २० दिवसांच्या कामकाजाचा खेळखंडोबा झाला. पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून विरोधी पक्षनेत्यांबरोबर चर्चा केली असती तर, त्यातून मार्ग निघाला असता, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. देशात तिसरी आघाडी निर्माण व्हावी, ही आपली इच्छा आहे. बिहारची निवडणूक महत्त्वाची असल्याने विरोधकांनी ती एकत्रितपणे लढवावी, असा आपला प्रयत्न आहे. त्यामुळेच १२ ऑगस्टला दिल्लीत काही नेत्यांना चहापानासाठी निमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले.

आवरते भाषण

उस्मानाबाद येथे शरद पवार यांच्या भाषणातून घणाघाती टीका होईल म्हणून या धडक मोर्चाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु, पवार यांनी त्यांचे भाषण केवळ दहा मिनिटांतच आवरते घेतले. पवार यांनी मोदींना लक्ष्य करताना, 'उद्या तुम्हाला भाईयों और बहनों... ऐकू येईल. पण आपल्या भावा-बहिणींकडे पाहायला त्यांच्याकडे वेळ नाही,' अशी टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुरुस्तीचा प्रस्ताव प्रलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर ते रोटेगाव या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे.

वैजापूर ते रोटेगाव रस्ता, शहरातून जाणाऱ्या नाशिक-निर्मल राज्य रस्त्याचा भाग आहे. वैजापूरहून औरंगाबादकडे जाणारी सर्व वाहने या रस्त्याने जातात. गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार स्टेशन रोडच्या भागात वाढल्याने या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या भागात अनेक शाळा, वीज वितरण कंपनीचे कार्यालय, चर्च, मर्चंट बँक कॉलनी, चंद्रपालनगर यासारख्या नागरी वसाहती आहेत. त्यामुळे मुले घेऊन जाणाऱ्या रिक्षा, दुचाकीसह जड वाहनाची या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रोटेगावपर्यंत हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. वाहने चालवतांना चालकाला मोठी कसरत करावी लागते. परिणामी खड्डा न चुकल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात झाले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. परंतु, मंजुरी नसल्याने हे काम रखडल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता पी. बी. पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षित वॉर्ड नसताना सरपंचपदाचे आरक्षण

$
0
0

सिल्लोड : अनुसूचित जमातीसाठी वॉर्ड राखीव न ठेवता तालुक्यातील आठ गावांचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळे या गावांचा पेच सुटल्याशिवाय कोणत्याही गावच्या सरपंचपदाची निवडणूक घेऊ नये, या मागणीसाठी महाराष्ट्र कोळी समाज संघातर्फे शुक्रवारी (१४ ऑगस्ट) तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

प्रशासनाने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार आठ ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, परंतु, निवडणूक लढविण्यासाठी त्या गावात अनुसूचित जमातीसाठी वार्ड आरक्षित ठेवण्यात आला नाही. तालुक्यातील वांगी (खुर्द) येथे असा प्रकार झाला आहे. सरपंचपद अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव आहे; पण वार्ड राखीव नसल्याने या प्रवर्गातील कोणालाही निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे सरपंचपद राखीव असून त्यानुसार अनुसूचित जमातीला सत्तेत वाटा मिळणार नाही. त्यामुळे नव्याने वार्डरचना करून वार्ड आरक्षित करून फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी झालेल्या उपोषणात महाराष्ट्र कोळी समाज संघाचे जिल्हाध्यक्ष राजू सपकाळ, जिल्हासचिव संजय शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सोनवणे, तालुकाध्यक्ष साहेबराव दांडगे, कौतिक बावस्कर, राजू साळवे, ईश्वर जाधव, बाळू गवळे या पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवाची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घृष्णेश्वरा’भोवतीचे अतिक्रमण त्वरित काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरातील अस्वच्छता पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. मंदिरासमोरील अतिक्रमणे ताबडतोब काढून मंदिर परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) घृष्णेश्वर मंदिराची पाहणी केली. श्रावण महिना व कुंभमेळ्यानिमित्त येथे होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन व सुरक्षेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या बाहेर रांगा लावण्यासाठी बॅरिकेट वाढविण्याची सूचना केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांडे व पोलिस अधीक्षक रेड्डी यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. घृष्णेश्वर मंदिर देवस्थानतर्फे घृष्णेश्वराची प्रतिमा, शाल, श्रीफळ भेट देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी राजू नंदकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतमकुमार यावलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, भारतीय पुरातत्व विभागाचे हेमंतकुमार हुकरे, देवस्थानचे अध्यक्ष संजय वैद्य, राजेंद्र कौशिके, चंद्रशेखर शेवाळे, शरद दांडगे, सुरेश ठाकरे, गटविकास अधिकारी डॉ. आर. एस. लाहोटी आदी उपस्थित होते.

चंदनाची पाने विकू नयेत

पवित्र श्रावण महिन्यानिमित्त बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बेलाऐवजी चंदनाचा पाला विकू नये. निर्माल्याची विल्हेवाट मशिनद्वारे लावावी, मंदिर परिसरात स्वच्छता ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याची माहिती दिल्याच्या संशयावरून महिलेवर हल्ला

$
0
0

औरंगाबाद : पोलिसांना दरोड्याची माहिती दिल्याच्या संशयावरून एका महिलेवर मंगळवारी रात्री अकरा वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुनंदा रावसा‌हेब काळे (वय ३५, रा. भारतनगर) या महिलेच्या घरावर जुन्या भांडणातून, तसेच दोन वर्षांपूर्वी पोलिसांना माहिती दिल्यावरून काठ्या कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी वायरलेस पवार, धीरज, सुवर्णा, तेजस, वासुदेव पवार, उडिक, चिवक, चिवा, बेबीताई ठकसेन काळे व समीर पवार यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रकमधून चोरी

पेप्सोडेंट कंपनीचे ७५६ बॉक्स घेऊन वसंत विश्वनाथ त्रिभुवन (रा. आण्णाभाऊ साठेनगर वैजापूर) हा ट्रकचालक मंगळवारी रात्री गुजरात येथील न्यू सिद्दिकी ट्रान्स्पोर्टला पोहचविण्यासाठी जात होता. वाळूजजवळील स्वराज इंटरप्रायजेस पेट्रोलपंपाजवळ थांबून तो ट्रकच्या कॅबिनमध्ये रात्री झोपला. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी हा माल लंपास केला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक ए.जी. परजणे करत आहेत.

वाळूजमध्ये गुटखा जप्त

अन्न औषध प्रशासनाने बुधवारी रात्री सचिन नागराज म्हस्के याचे वाळूजमधील घर व टपरीत टाकलेल्या छाप्यात ४० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी रा.द. मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हस्के याच्याविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरिक्षक एस. एन. बहुरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमान पाहून ढग पळाले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमान, फ्लेअर्स पाठोपाठ रडार येऊन कार्यान्व‌ित झाले. मात्र आता पाऊस पाडण्यासाठी उपयुक्त ढग गायब झाले आहेत. त्यामुळे विमान, रडार यांचा काही उपयोग होणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रडार कार्यान्वित झाल्यानंतर तज्ज्ञ मंडळी रोज ढगांचा वेध घेत असले तरी भारताच्या मध्य भागात निर्माण झालेल्या चक्रवातामुळे पाऊस पाडणारे ढग आग्नेय दिशेस गेले. आता येत्या काही दिवसांमध्ये आकाशात ढग निर्माण झाले, तरच कृत्रिम पावसाचा प्रयोग शक्य होणार आहे. कृत्रिम पावसासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार आर. व्ही. शर्मा यांनी सांगितले.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर बसवण्यात आलेल्या सी-बॅण्ड डॉप्लर रडारच्या माध्यमातून विमानाला पाऊस पाडणाऱ्या ढगांचे छायाचित्र मिळणे सुरू आहे. परंतु, उपयुक्त ढगांचा अपेक्षित फायदा आतापर्यंत झालेल्या क्लाउड सिडींगच्या प्रयोगात झालेला नाही. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे संपूर्ण यश उपयुक्त ढगांवर अवलंबून असल्यामुळे येत्या काही दिवसांत ढग निर्माण झाले तरच मराठवाडा तसेच इतर जिल्ह्यांवर पावसाची कृपादृष्टी होणार आहे.

साडेसात मिनिटास फोटो

डॉप्लर रडारच्या माध्यमातून प्रत्येक साडेसात मिनिटांला रडारच्या परिघातील छायाचित्र (सेटेलाईट इमेज) कंट्रोल रुमला मिळते. त्यावरून उपयुक्त ढगांची स्थिती, आर्द्रतेचे प्रमाण आदीं माहितीचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर विमानाला उपयुक्त ढगांची अक्षांश-रेखांशांसह माहिती दिली जाते.

उपयुक्त ढग उत्तरेकडे

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा आहे. हे वारे पश्चिम भागाकडे येण्यापूर्वीच उपयुक्त ढग नागपूर, बिहारमार्गे उत्तर भारतात जाऊन बरसत असल्याची स्थिती आहे.

राज्यातील जास्त पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वर, सातारा, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातही पाऊस नाही. लातूर, बीड, उस्मानाबाद मध्येही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी योग्य ढग मिळत नाहीत. तांत्रिक टीम तयार आहे, कृत्रिम पावसाचे संपूर्ण यश हे ढगांवर अवलंबून आहे.- सुहास दिवसे,

संचालक, आपत्ती व्यवस्थापन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणमुक्ती प्रस्ताव पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आम्ही वेरूळ लेणी वाचवू. पर्यावरणाचे संवर्धन करू. प्रदूषणमुक्त परिसराचा निर्धार. या केवळ गप्पा ठरल्यात. कारण वेरूळ लेणी परिसरात खासगी वाहनांना प्रवेश बंद आणि बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव, अजूनही एमटीडीसीकडेच धूळ खात पडून आहे.

अजिंठा लेणी परिसरात प्रदूषण वाढले. त्यामुळे लेणी संवर्धनासाठी परिसरात खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. लेणी ते फर्दापूर टी पॉइंट मार्गावर एसटी महामंडळाने बस सेवा सुरू केली. साहजिकच प्रदूषण कमी झाले. वेरूळ लेणी परिसरात सर्रास खासगी वाहने येतात. या भागात प्रदूषण वाढले आहे.

पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी बैठक घेतली. या बैठकीत वेरूळ लेणी परिसरात खासगी वाहनांना प्रवेश बंद करत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर एसटी महामंडळाने वेरूळ परिसरात किती बस लागतील, त्यांचा मार्ग कोणता असेल, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे प्रस्तावासह दिली. मात्र, त्यावर पुढे काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे लेणी परिसरात दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे.

वेरूळ लेणी परिसरात बससेवा सुरू करण्यासाठी आम्ही तयार आहोत. एमटीडीसीने खासगी वाहनांवर बंदी घातल्यास, आम्ही आमची सेवा सुरू करू. तसा प्रस्तावही आम्ही एमटीडीसीसमोर मांडला आहे.

- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरेंचा पुरस्कार परत घेण्याचा ठराव

$
0
0

औरंगाबादः महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घेतला पाहिजे, अशी मागणी करणारा ठराव कन्नड येथे नुकत्याच झालेल्या इतिहास विषयाच्या परिषदेत मंजूर करण्यात आला. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजमध्ये ही दोन दिवसाची परिषद पार पडली. ही परिषद यूजीसीच्या सहकार्याने घेण्यात आली आहे. 'मराठ्यांच्या इतिहासाची पूनर्मांडणी' या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. समारोपावेळी हा ठराव मांडण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षित शहरासाठी ५० सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाढते घातपात आणि सुरक्षा लक्षात घेऊन पहिल्या लवकरच शहरातील १३ चौकांत ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्तालय, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने 'सेफ सिटी प्रोजेक्ट' अंतर्गत पहिल्या टप्प्यात हे काम केले जाईल. याचे प्रात्यक्षिक शुक्रवारी (१४ ऑगस्ट) घेण्यात आले. त्यासाठी महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात मनपा आयुक्त व पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील सुरक्षा व गुन्हेगारी रोखण्यासाठी चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकूण १२५ ठिकाणी २३४ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्प्यामध्ये पन्नास कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांचा दर्जा तपासणी व प्रात्याक्षिक बघण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. यामध्ये दोन कंपन्यानी त्यांच्या कॅमेऱ्याचे सादरीकरण केले. तसेच या कॅमेरे बसवण्यासंदर्भातील स्थान, देखभाल, सुरक्षा या विषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बाबा पेट्रोलंपप, रेल्वेस्थानक, क्रांतिचौक येथे हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंबरप्लेटसाठी झुंबड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिसांनी फॅन्सी नंबरप्लेट, वेगवेगळ्या आकारात नंबर टाकलेल्या वाहनांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या वाहनधारकांनी नियमानुसार नंबरप्लेट तयार करून घेण्यासाठी दुकानामध्ये गर्दी केली आहे.

शहरात विनाक्रमांकाची वाहने, फॅन्सी नंबरप्लेट असलेली वाहने, वेगवेगळ्या आकारात रंगवेल्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या खूप आहे. शिवाय विविध राजकीय पक्ष, संघटना, घरातील सदस्यांची नावे वाहनांवर लिहली आहेत. हे प्रकार नियमाविरुद्ध असल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकराची नंबरप्लेट असलेली वाहने पकडून सरळ ताब्यात घेतली जात आहेत. शिवाय पार्किंग, रस्त्याकडेला थांबलेल्या याप्रकारची वाहनेही ताब्यात घेतली जात आहेत. पोलिस वाहने उचलून नेत असल्याने वाहनचालक चांगलेच धास्तावले आहेत.

पोलिस कारवाईनंतर वाहन सोडवण्यासाठी गेल्यनंतर दंड तर आकारलाच जातो, शिवाय नियमानुसार नंबरप्लेट लावण्याची ताकीद दिली जात आहे. त्यामुळे पैठण गेटसह शहरातील विविध भागातील नंबरप्लेट तयार करणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी वाढली आह. काही वाहनधारक कारवाई टाळण्यासाठी नंबरप्लेट बदलून घेत आहेत. पूर्वी दिवसातून दोन ते तीन नंबरप्लेट तयार करण्यासाठी वाहनधारक येत असत. आता ही संख्या वाढत असल्याची माहिती दुकानदारांनी दिली.

पोलिसांनी फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. यामुळे मी माझ्या वाहनाची नंबरप्लेट बदलून घेतली आहे.

- अशोक पाटील, ग्राहक

वाहनांचे नंबर टाकताना, आम्ही आयडी घेत आहोत. आयडी असल्याशिवाय नंबरप्लेट बदलून देत नाही.

- अखील अब्दुल कलीम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारखेडा येथून विद्यार्थी बेपत्ता

$
0
0

औरंगाबादः गारखेडा, हुसेन कॉलनी परिसरातून सिध्दार्थ किशोर शेंडगे वय १३ हा शालेय विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. २६ जुलै रोजी सकाळी सात वाजता शाळेत जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. अद्यापपर्यंत तो घरी परतला नाही. त्यांची उंची साडेचार फूट, रंग गोरा, सडपातळ बांधा, गोल चेहरा असून, मराठी बोलतो. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील वर्णनाचा मुलगा कोणाला आढळून आल्यास मुकुंदवाडी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील पसार आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुणे ग्र‌ामीण पोलिसांना खुनाचा प्रयत्न व दरोड्याच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीला गुन्हेशाखेने शुक्रवारी रांजणगाव येथून अटक केली आहे. त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रांजणगाव परिसरात पुणे पोलिसांना हवा असलेला पसार आरोपी येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. या माहितीवरून रांजणगाव येथे सापळा लावण्यात आला. यावेळी संशयित आरोपी मयूर उर्फ मुगास दीपक आंधळे (वय २९, रा. पाटस ता. दौंड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता यवत पोलिस ठाण्यात त्याच्यावर २०११ साली दरोडा तर २०१४ साली खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्याला यवत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिस जमादार अशोक नागरगोजे, देवीदास इंदोरे, धीरज काबलीये, सुरेश काळवणे, प्रभाकर राऊत यानी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेचे मंगळसूत्र पळविणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलाला शाळेतून घरी घेऊन येणाऱ्या महिलेला मारहाण करून तिचे मंगळसूत्र दोन जणांनी पळविले होते. हिमायतबाग परिसरात बुधवारी दुपारी हा प्रकार घडला होता. मंगळसूत्र विकण्याच्या प्रयत्नात हे दोघे असताना त्यांना गुन्हेशाखेने ताब्यात घेतले. यापैकी एक आरोपी अल्पवयीन (१५ वर्षे) आहे.

नंदा जाधव (वय ३५, रा. जलाल कॉलनी ) ही महिला बुधवारी दुपारी मुलाला शाळेतून घरी घेऊन येत होती. यावेळी हिमायतबाग परिसरातील मंदिराच्या ओट्यावर एका अल्पवयीन मुलगा आणखी एक तरुण बसलेला होता. जाधव या मंदिरासमोरून जात असताना या दोघांपैकी लहान मुलाने पाठीमागून येत जाधव यांचे हात पकडले तर दुसऱ्याने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले व दोघेही पसार झाले. या प्रकरणी महिलेने बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा

दाखल केला.

दरम्यान, मंगळसूत्र हिसकावल्यानंतर हे दोघे शहागंज परिसरात सराफाच्या दुकानात मंगळसूत्र विकण्यासाठी आले. खबऱ्याने ही माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला दिली. पोलिसांनी शोध घेत शहागंज परिसरात संशयित आरोपी शेख इस्तीयाक महमद इसाक (वय १९ रा. शहाबाजार) याच्यासह पंधरा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले.

इस्तीयाकच्या झडतीमध्ये त्याच्याजवळ जाधव यांच्या मंगळसूत्राचे सोन्याचे ३४ मणी आढळून आले. पोलिसांनी आरोपींना बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, शिवजी झिने, गोविंद पचरंडे, सुरेश काळवणे, लालखां पठाण व प्रभाकर राऊत यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांवर दबावतंत्र

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रॅडिको प्रकरणात कारवाई झाली नसल्याने तीन शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा दिला आहे. हे आत्मदहन रोखण्यासाठी पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. एका शेतकऱ्याला जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित दोन शेतकऱ्यांचा शोध सुरू आहे.

शेंद्रा परिसरातील बाबासाहेब म्हस्के, आसाराम ठुबे व योगेश वैष्णव या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रॅडिको कंपनीने विषारी रसायने सोडल्याने त्यांची जमीन नापीक झाली आहे. या प्रकरणी रॅडिको कंपनीवर कारवाई व्हावी या हेतूने या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका लेखी निवेदनाद्वारे १५ ऑगस्ट रोजी सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा दिला. या इशाऱ्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. तिघां शेतकऱ्यांचा शुक्रवारपासून पोलिसांनी शोध सुरू केला. यापैकी योगेश वैष्णव हा शेतकरी शहरातील कैलासनगर भागात राहतो. त्याला जिन्सी पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. आत्मदहन करू नये यासाठी त्यांना समजावून सांगत त्यांच्याकडून लेखी लिहून घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली. बाबासाहेब म्हस्के व आसाराम ठुबे यांचाही शोध पोलिसांच्या वतीने घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वानराने तोडला महिलेचा लचका

$
0
0

फुलंब्रीः गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यातील धामणगांव येथे वानरांचा धुमाकुळ सुरू आहे. एका वानराने शुक्रवारी (१४ ऑगस्ट) भर गावात एका महिलेचा लचका तोडला. ही महिला गंभीर जखमी झाली आहे. धामणगाव येथे ८ ऑगस्ट रोजी वानर अंगावर धावून आल्याने धास्तावलेल्या सुपडू शेख यांचा हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही घटना ताजी असतांना शुक्रवारी वानराच्या टोळीने गावात धुमाकूळ घातला. ओट्यावर बसलेल्या आयेशा तय्यब शेख (वय २५) महिलेचा लचका तोडून गंभीर जखमी केले. या महिलेला उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याता आले आहे. वानरांच्य भीतीने कोणीही शेतात जाण्यास धजावत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काम न मिळालेल्या ठेकेदाराची धमकी

$
0
0

औरंगाबाद : कामवाटपात मला काम का दिले नाही, असे विचारून धमकावण्याचा प्रकार शुक्रवारी (१४ ऑगस्ट) दुपारी जिल्हा परिषदेत घडला. एका ठेकेदाराने कैलास जाधव या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला धमकी दिली. कर्मचाऱ्यांच्या एकजुटीनंतर हे प्रकरण मिटले. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना किरकोळ कारणावरून धमकावण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहे. गेल्या तीन महिन्यांत चार विभागांमधील कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या. एका जिल्हा परिषद सदस्याने तर पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. बांधकाम विभागातील काम वाटप समितीची बैठक गुरुवारी झाली. किरकोळ दुरुस्तीची ७९ कामे वाटण्यात आली. त्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. या कामवाटपाची माहिती मिळाल्यानंतर त्यात आपले नाव नाही हे पाहून एका ठेकेदाराने दुपारी कैलास जाधव यांना धमकी दिली. या प्रकारानंतर कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता बावीस्कर आणि अतिरिक्त सीइओ बेदमुथा यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदूरच्या ठेकेदारांना आठ दिवसांची पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खाम नदीत रसायने सोडणाऱ्या टोळीतील संशयीत आरोपी मध्यप्रदेश येथील दोन ठेकेदारांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या दोघांना गुरुवारी इंदूर येथून अटक‌ करण्यात आली आहे.

बंद असलेल्या बालाजी केमिकल इंडस्ट्रीजच्या नावावर ठेकेदार अनिलसिंग परिहार व आशीष जैन यांनी स्टरलाइट कंपनीकडून केमिकलची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट घेतले होते. त्यांना अटक केल्यानंतर शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी या ठेकेदारांनी यापूर्वी असे प्रकार केले आहेत का ? पसार असलेला वापी येथील ठेकेदार प्रकाश चित्रोड याच्या संपर्कात हे होते का? कंपनीचे आणखी काही अधिकारी यामध्ये सहभागी आहेत का ? यांचे कंत्राट नेमके कशा स्वरूपाचे होते आदी मुद्यावर तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. या मागणीचा विचार करून कोर्टाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images