Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बँक, कारखाना बुडवणाऱ्यांची चौकशी करा : पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

'उस्मानाबाद जिल्हा बँक आणि तेरणा कारखाना कोणी बुडवला, याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ज्या काळात बँक आणि कारखाना बंद पडला तेव्हा राज्यात युतीचे सरकार होते,' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लातुरात शनिवारी दुष्काळ परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचाही समाचार त्यांनी घेतला. पवार म्हणाले, 'लातूरसारख्या शहराला महिन्यातून दोन वेळा आत्ताच पाणी येत आहे. वर्षभर तुम्ही पाणी कसे देणार आहात? संकटाच्या वेळी राजकारण बाजूला ठेऊन मदत करण्याची भूमिका घ्या. राज्यात, देशात तुमची सत्ता आहे, त्यामुळे पाणी कुणी पळवले, उस्मानाबादचे वाटोळे कुणी केले याची चौकशी करा, माहिती घ्या. आता सहन करायचे नाही. मनगटात जोपर्यंत रग आहे, तोपर्यंत कायद्याच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारला धडा शिकविण्यासाठी तयार रहा. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्या सोबत असतील.' मागील दोन वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ पडला होता त्यावेळी केंद्रातून भरघोस मदत राज्याला केली होती. असे सांगून पवार म्हणाले, 'जनावरे जगवण्यासाठी त्यावेळी तात्काळ छावण्या सुरू केल्या होत्या. आज अद्यापही छावण्या सुरू झालेल्या नाहीत.'

दुष्काळ परिषदेच प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले. या वेळी बस्वराज पाटील नागराळकर, आमदार जयदत्त क्षीरसागर आदींची भाषणे झाली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उडवली. ते म्हणाले, 'राज्यातील व्यापाऱ्यांना देण्यासाठी वर्षाला सात हजार कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. मात्र, शेतकऱ्यांना देण्यासाठी तुमचा विरोध का?'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ही तर बोलाची कढी अन् बोलाचाच भात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे एवढे आकडे आयुष्यामध्ये कधीही पाहिले नाहीत. भाजपने जनतेला मोठ्या भूलथापा दिल्या आहेत. त्यांनी केवळ बोलाची कढी आणि बोलाचाच भात दिला आहे,' या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर परभणी येथे टीका केली. उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्याची सांगता रविवारी झाली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जिंतूरचे आमदार विजय भांबळे, गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, आ. राजेश टोपे, विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे, बाबाजानी दुर्राणी, माजी राज्यमंत्री सुरेश धस, फौजिया खान आणि जयप्रकाश दांडेगावकर आदी नेते या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, 'ज्या परभणी जिल्ह्याने शेती कशी करायची, कापसाचे पिक कसे घ्यायचे, याचा आदर्श घालून दिला, त्या जिल्ह्याला दुष्काळामुळे अवकळा आली. दुष्काळावर मात करण्याची सरकारची कोणतीच मानसिकता दिसत नाही. मराठवाड्यात एका पावसानंतर जिथे पेरण्या झाल्या होत्या, तिथली पिके आता माना टाकायला लागली आहेत. जनावरे आणि माणसांना पिण्याचे पाणी नसताना सरकार हालचाल करत नाही. आम्ही या सरकारला जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही.' कर्जाचे पुर्नगठन करण्यासाठी लवकरच केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान जर देशात असतील तर त्यांचीही भेट घेणार असल्याचा टोमणा पवार यांनी अप्रत्यक्षरित्या मारला.

विरोधी पक्षनेत्यांनीही आपल्या भाषणात सरकारवर हल्ला चढवत शेतकरीविरोधी भाजप-सेनेचा बुरखा फाडला. आपल्या प्रास्ताविकाच्या भाषणात विजय भांबळे यांनी परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत ५६ आत्महत्या झाल्याचे सांगितले. तसेच, शेतकऱ्यांसाठी बारामतीमध्ये कपडे काढून आंदोलन करणारे स्वाभिमानी राजू शेट्टी आता कुठे लपून बसले आहेत. आता ते मुख्यमंत्र्यांच्या किंवा पंतप्रधानांच्या घरासमोर कपडे काढून आंदोलन का करत नाहीत, असा आरोप सुरेश धस यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी पथक आले आणि गेले

$
0
0

शेतकऱ्यांमध्ये पाहणीबद्दल नाराजी; पॅकेज नसल्याने खंत

मोतिचंद बेदमुथा, उस्मानाबाद

पावसाअभावी उस्मानाबाद जिल्ह्यात यंदाही निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी येथे आलेल्या केंद्रीय पथकाने आपला पाहणी दौरा घाईने गुंडाळून लातूरकडे प्रयाण केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

गेल्या तीन वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जिल्हा अशी ओळख. यंदाही जिल्ह्यावरील दुष्काळाची छाया गडद होत आहे. या स्थितीत उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहावर (सर्किट हाऊस) जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे दुष्काळासंदर्भात करत असलेल्या सादरीकरणाकडेही पथकाचे लक्ष नव्हते. पथकातील ही मंडळी आपसात सुसंवाद साधत होती. शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींशी बसून बोलणेही ते टाळत होते. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही बाब संबंधितांना नजरेत आणून दिल्यानंतर संबंधितांनी बसण्याची तसदी घेतली. दुष्काळाचा कायमचा नायनाट करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेली ‌जलशिवार अभियानाची कामे पाहण्यासाठी प्रामुख्याने हे केंद्रीय पथक आले आहे. त्याचबरोबर आम्ही दुष्काळी स्थिती ही जाणून घेत आहोत. शेतकऱ्यांसाठी आम्ही कोणतेही पॅकेज आणलेले नाही, असा खुलासा या केंद्रीय पथकाचे प्रमुख असलेले केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंह यांनी केल्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षाभंग झाला. या दौऱ्याचे नेमके प्रयोजन काय, असा प्रश्नही शेतकऱ्यांमध्ये चर्चिला जाऊ लागला आहे.

केंद्रीय पथक उस्मानाबाद जिल्ह्यात दोन तास उशिराने दाखल झाले. हे पथक पाहणीसाठी येणार म्हणून जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाने जोरदार तयारी केली होती. कन्हेरवाडी, इंदापूर, येडशी या महामार्गावरील ठिकाणी तसेच सारोळा, चिकली, पाडोळी या ठिकाणी गावकरी व अधिकारी या पथकाची वाट पाहात होते. तुळजापूरचे आमदार मधुकर चव्हाण दुपारी दोन वाजल्यापासून उस्मानाबाद येथील विश्रामगृहात तर उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील येडशी शिवारात पथकाच्या भेटीसाठी आले होते. बीडहून उस्मानाबाद भेटीसाठी आलेले हे पथक स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या गराड्यातच वावरत होते. शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुरांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पथक फारसे उत्सुक नसल्याचे जाणवत होते. पथकाचा दौरा हा केवळ महामार्गावरचा होता. ग्रामीण भागातून या पथकाने कुठेही फेरफटका मारला नाही. कोरडे तलाव, पाण्याच्या टॅँकरवरील गर्दी पथकाला दाखविण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदापुरतीच धोरणे नको...

$
0
0

>> आशिष चौधरी

उच्च शिक्षणाचे धोरण बदलाची चर्चा सध्या जोरावर आहे. येत्या वर्षात उच्च शिक्षणात मोठे फेरबदल करण्याचा विचार शासनपातळीवरुन केले जात आहे. देशपातळीवरच्या निवडक कुलगुरूंची प्राथमिक बैठक पार पडली. उच्च शिक्षणातील प्रमाण वाढत असले तरी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता, गुणवत्ता, नाविन्यता असे प्रश्न कायम आहेत. उच्च शिक्षणातील प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या यंत्रणा फोल ठरल्या हेही मात्र तेवढेच सत्य आहे. आजच्या विद्यार्थ्याला जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. याचवेळी उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी रोजगारक्षम कसा होईल याचा विचार प्रथम होणे गरजेचा आहे.

केंद्रातील नव्या सरकारने उच्च शिक्षणातील धोरणांचा आढावा घेत, नव्या बदलांबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. देशपातळीवर होणारे हे फेरबदल उच्च शिक्षणाला तारतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शिक्षण क्षेत्राचा विस्तार झाला असला तरी, उच्च शिक्षणासमोरील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, नवे प्रश्न निर्माण होत आहेत. आजही देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण समाधानकारक आहे असे नाही. यासह गुणवत्ता, पात्र शिक्षकांची वाणवा, भौतिक सोयीसुविधांचा अभाव, संशोधनाचा दर्जा, पायाभूत सुविधांचा अभाव अशा समस्यांनी उच्च शिक्षणाला वेढलेले आहे. विद्यार्थी, कॉलेज, विद्यापीठे, शासकीय संस्था प्रत्येकाच्या आपआपल्या पातळीवर असलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यात यंत्रणाही अपूरी पडली आहे. देशपातळीसह राज्यपातळीवर उच्च शिक्षणाचे निर्माण होणारे वेगवेगळे प्रश्न उच्च शिक्षणाच्या वाटचालीवर परिणामकारक ठरत आहेत. उच्च शिक्षणावर वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रण ठेवणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या यूजीसी, एआयसीटीईसारख्या चौदा संस्था आहेत. या संस्थांमध्ये समन्वय नसल्यानेही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. 'एकला चलो रे'च्या भूमिकेतून या संस्थांचा कारभार हाकला जातो. अशा यंत्रणेत सुसूत्रता नसल्याने राज्यपातळीपासून ते देशपातळीवर उच्च शिक्षणाचा पुरता गोंधळ पहायला मिळतो.

अशावेळी येणारे नवीन धोरण उपायकारक ठरेल की अपायकारक हे येणारा काळच सांगेल. आपल्याकडे कायम स्किलबेस एज्युकेशनवर चर्चा होते आहे. आजच अशा प्रकारची चर्चा होते आहे असे नाही. अनेक धोरणे आखली गेली. उच्च माध्यमिक स्तरावर कौशल्यावर आधारित शिक्षण असेल, कम्युनिटी कॉलेज, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची रचना, कॉलेजांना स्वायत्तता देणे असेल. असे अनेक प्रयत्न झाले. नवनव्या घोषणाही झाल्या. प्रत्यक्षात काही वर्षानंतर योजनांचे फलित काय झाले याचा हिशोब करताना तो हिशोबच जुळत नाही. आता काळानुरूप उच्च शिक्षण बदलते आहे. अशावेळी धोरणांची आखणी करताना तंत्रज्ञानावर अधारित शिक्षणावर भर आवश्यक आहेच, यासह आजच्या विद्यार्थ्याला वाढत्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. त्यावेळी त्याला काय हवे आहे? याचा विचार करत धोरणे आखली गेली तरच सकारात्मक बदल दिसतील. विशेष म्हणजे धोरणांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थांमधील सुसूत्रता आणणे यासह राज्यांचे कायदे, त्यांचा हस्तक्षेप, विद्यापीठांमधील अधिकार मंडळे अशा प्रश्नांचाही विचार व्हायला हवा. विद्यापीठांसारख्या नियंत्रणासाठी संस्था आहेत, परंतु त्या तेवढ्या सक्षम आहेत की नाही, याचा विचार नव्या धोरणांमध्ये करणे आवश्यक आहे. केंद्रीय स्तरावर ठरत असलेल्या नव्या धोरणांची आखणी करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या ६० कुलगुरूंमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरूंचा समावेश आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर उच्च शिक्षणाची स्थिती चांगली आहे, असे नाही. पारंपारिक शिक्षणातील कॉलेजांमधील भौतिक सुविधा, पात्र शिक्षकांचा अभाव, प्राचार्यांनाविना चालणारी कॉलेज, कायम विनाअनुदानित धोरण, विद्यार्थ्यांची रोडावलेली उपस्थिती, विद्यापीठांवर वाढता ताण, निकालांमधील अनियमितता अशा पारंपारिकसह तंत्रशिक्षणामधील इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमांची झालेली वाताहत, विद्यापीठांमध्ये नसलेला समन्वय अशा अनेक अडथळ्यांमधून उच्च शिक्षण मार्गक्रमण करते आहे. अशा अडथळ्यांमधून मार्ग काढणे किती अडचणीचे ठरते आहे, याची जाण या कुलगुरूंना निश्चित आहे. त्यामुळे देशभरातील तज्ज्ञांनी सुचविलेले बदल हे निश्चित उच्च शिक्षणाला नवी दिशा देणारे ठरतील. गुणवत्तेसह उच्च शिक्षणात नाविन्यता आणली गेली नाही, तर अशी अनेक धोरणे केवळ बैठकी आणि कागदापुरतीच ठरतील हेही तेवढेच निश्चित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माकडाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

$
0
0

फुलंब्रीः तालुक्यात आठ दिवसांनी माकडांनी धुमाकूळ घातला आहे. शनिवारी सायंकाळी शेताकडे पायी सायकल घेऊन जाणारे रंगनाथ नाना खटे यांच्यावर माकडाने हल्ला करून दंडाचा लचका तोडला आहे. माकडाने आधी सायकलवर उडी मारली, घाबरलेल्या खटे यांना मारहाण केली. म्हसला गावच्या रस्त्यावर दिवसभर माकडाची टोळी बसून राहत असल्याचे सांगितले. दरम्यान वन खात्याचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याबद्दल तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डर्ट बाइक रेसिंगचा थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑन युअर मार्क, गेट सेट गो म्हणताच, बाइकच्या एक्सेलेटरवर जोर देऊन पुढे जाण्यासाठी चाललेली बायकर्सची चढाओढ, ट्रॅकच्या बाजूला झाल्यास पेनल्टीचे भय आणि वेग व नियंत्रणाचा समतोल राखून विजयासाठी सुरू असलेले प्रयत्न अशा वातावरणात दौलताबादमध्ये रविवारी डर्ट बाइक रेसिंगचा थरार रंगला. दौलताबाद घाटात झालेल्या या स्पर्धेत औरंगाबादच्या रिझवान शेखने बेस्ट रायडरचा किताब पटकावून बाजी मारली.

डर्ट बायकिंगचा थरार अनुभवण्यासाठी दौलताबादमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली होती. दौलताबाद घाटात एचटूओच्या बाजूच्या प्रागणांत 'रोडीज औरंगाबाद'तर्फे डर्ट बाइक आणि कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतच्या पहिल्या दिवशी कारच्या स्पर्धा घेण्यात आल्या, या स्पर्धेत १३०० सीसी कार स्पर्धेत अभिजीत कुरेकर यांनी सर्वांत कमी वेळेत एक किलोमीटरच्या डर्ट ट्रॅकचे दोन लॅप्स पूर्ण केले. याशिवाय कारच्या स्पर्धेत एस कन्हैय्या यांनी पहिला क्रमांक मिळविला.

रविवारी डर्ट बाइक रेसिंग स्पर्धा रंगली. टू स्ट्रोक क्लास बाइक स्पर्धेत पहिला क्रमांक रिझवान शेख विजेता ठरला. याच प्रकारात सय्यद वाजीद दुसऱ्या, तर इस्माईल शेख तिसऱ्या स्थानी राहिला. टू अॅण्ड फोर स्ट्रोक बिगिनर्स बाइक रेसिंग स्पर्धेत बंगळुरूचा एस. आ‌तीफने विजेतेपद पटकावले. या प्रकारात शेख सलमान दुसऱ्या स्थानी राहिला. टू अॅण्ड फोर स्ट्रोक नो वेस स्पर्धेत भोपालच्या नाजीम खानने पहिला क्रमांक मिळवला, तर औरंगाबादचा स्वप्नील गायकवाड हा दुसऱ्या स्थानावर राहिला. टू अॅण्ड फोर स्ट्रोक ओपन क्लासमध्येही भोपालच्या नाझीम खानने बाजी मारली. या प्रकारात रिझवान शेखला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

टू अॅण्ड फोर स्ट्रोक औरंगाबाद क्लासमध्ये रिझवान शेख पहिल्या, तर आतीश घोडके दुसऱ्या क्रमांकावर राहिला. फोर स्ट्रोक बिगिनर्स क्लासमध्ये स्वप्नील गायकवाड व मोहम्मद शकील हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर राहिले. डर्ट बाइक रेसमध्ये विजेत्यांना गौरव भारूका, गोपाल भारूका, बबलु त्रिवेदी, सचिन चोरडीया, मधुर देसले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी मुंबईचे जुबीन पटेल यांचीही उपस्थिती होती. या स्पर्धेच्या नियोजन रघू राजू पावडे यांनी केले. या स्पर्धेत भोपाल, बंगलोर, हैदराबाद आणि औरंगाबादच्या साठपेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला असून कार स्पर्धेत एकूण वीसपेक्षा अधिक स्पर्धेक सहभागी झाले असल्याची माहिती संयोजक अली नवाज यांनी दिली.

सुरक्षा साधने नसल्यास बाद

डर्ट बाइक स्पर्धेत भाग घेणाऱ्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक रायडर्सनी सेफ्टी गॉगल घालण्याचे टाळले होते. संयोजकांच्या लक्षात येताच, त्यांनी गॉगल, तसेच रायडिंगसाठी आवश्यक अन्य सुरक्षेची साधने नसल्यास स्पर्धकाला बाद करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सुरक्षा साधनांकडे रायडर्सनी विशेष लक्ष दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज’वर अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्योतीनगरात बिनबोभाट अवैध धंदे सुरू करणाऱ्या 'राकाज लाइफस्टाइल'चे मालक सुनील मूलचंद राका यांच्याविरूद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका उपायुक्त अयुब खान नूर खान पठाण यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.

नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२, ५४ चे उल्लंघन 'राकाज'ने केले आहे. क्लबमधील सीसीटीव्हीचा पुरावा नष्ट केला असून, जलतरणासाठी आलेल्या महिलांना पारदर्शक खिडकीतून छुप्या पद्धतीने पाहणे हा विनयभंगाचा गुन्हा आहे. त्याला 'राका'ज कारणीभूत असल्याचे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे. तर पालिकेचा अहवाल कोर्टाकडे पाठविण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक गौतम फसले पुढील तपास करित आहेत.

राजकीय पाठबळ सुरूच

'राकाज'वर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील महिला नेत्याने दबाबतंत्राचा वापर केला. तर पालिकेच्या प्रकल्पाला मदत केल्याचे भांडवल करत 'राका' यांनी शिवसेनेच्या मुंबईतील बड्या नेत्याकडे मदत मागितली. स्वातंत्र्यदिनी मदतीसाठी हालचाली झाल्या. ते पाहून भाजप नेते त्रस्त झाले. या प्रकरणी आरोपीच्या पाठिशी उभे राहिलो, तर वेगळा मेसेज जाईल, हे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी भाजपच्या अन्य एका बड्या नेत्याला पटवून दिले. त्यावर भाजपने 'राकाज' विरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायट्रोसनच्या गोळ्या विकणारा गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नायट्रोसन नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमली गोळ्या विकणाऱ्या इसमाला सिटीचौक पोलिसांनी शनिवारी (ता. १६) पावणे आठ वाजेच्या सुमारास चेलीपुरा भागात अटक केली. अटक झालेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी १०० नायट्रोसन ड्रग्जच्या गोळ्या जप्त केल्या आहेत.

सिटीचौक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चेलीपुरा भागात नायट्रोसनच्या गोळ्या विकल्या जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सिद्दिकी, जमादार बने, केवारे, राऊत यांना मिळाली होती. त्यांनी सापळा लावून कटकट गेटचा रहिवासी फेरोज रसूल खान याला गोळ्या विकताना अटक केली. फिरोज खानची तपासणी केली असता, त्याच्याकडून नायट्रोसनच्या शंभर गोळ्या सापडल्या. त्याच्यावर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. फेरोज यास कोर्टात दाखल केले असता, कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अनेक तक्रारी

शहरातील अनेक तरुण नायट्रोसनसह अन्य गोळ्यांच्या आहारी गेले आहेत. विविध भागांत अनेक युवक अशा गोळ्यांच्या किंवा अन्य औषधींच्या आहारी गेल्याची तक्रार काही नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडेही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजिंठा लेणीत पर्यटकांना बसची दीर्घ प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शनिवार व रविवारची सुटी जोडून आल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी गर्दी होत आहे. पर्यटक संख्येच्या तुलनेत प्रदूषणमुक्त बसची तासनतास वाट पाहावी लागत आहे. दरम्यान या गर्दीवर सुरक्षारक्षकांचे नियंत्रण नसल्याने पर्यटक प्रवेश निषिद्ध क्षेत्रात घुसत आहेत.

स्वातंत्र्यदिनाची शनिवारी, रविवार, सोमवारचा एक दिवस सोडला तर मंगळवारी पुन्हा पारसी नववर्ष दिनानिमित्त सार्वजनिक सुटी आहे. सलग सुट्या येत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. लेणी पाहण्यासाठी आलेले पर्यटक वाघूर नदी, सप्तकुंड धबधब्याजवळ भटकंती करीत आहेत. नदीचे पात्र पावसाळ्यात साचलेल्या शेवाळामुळे निसरडे होऊन अत्यंत धोकादायक असते. यापूर्वी धबधब्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे धबधब्याजवळ जाण्यास बंदी आहे. तेथील सूचनाफलकाकडे पर्यटक दुर्लक्ष करत आहेत.

दरम्यान, प्रदूषममुक्त बससाठी पर्यटकांच्या रविवारी रांगाला लागल्या. सोयगाव आगाराकडे दहा प्रदूषणमुक्त बस उपलब्ध आहेत. पण शनिवार व रविवारी आठच बस चालवण्यात आल्या. त्यामुळे बसची वाट पाहण्यात पर्यटकांना वेळ गेला. शिवाय रांगेत थांबून वृद्ध, मुले व महिलांचे हाल झाले.

नदीपात्र धोकादायक

लेणीच्या डोंगरमाथ्यावरील हळदा, डखला, सावरखेडा, लेणापूर परिसरात पाऊस झाल्यास वाघूर नदीस अचानक पूर येतो. यावेळी वाघूर नदी पात्र व सप्तकुंड धबधब्याजवळच्या पर्यटकांचया जिवावर बेतू शकते.

सुरक्षारक्षकांचे दुर्लक्ष

लेणी परिसरात खासगी सुरक्षारक्षक, स्थानिक पोलिस, क्युआरटी जवान तैनात करण्यात आले आहेत. एवढा ताफा असताना पर्यटक निषिद्ध क्षेत्रात घुसत असल्याने जवान काय करीत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात बादशाही थाट

$
0
0

उमरग्यात महसूलदिनाचा सोहळा रंगला

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

महसूल दिनाचा लक्षवेधी व बादशाही थाटातील सोहळा नुकताच उमरगा येथे पार पडला. महसूल विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारीपासून ते सर्व अधिकारी तसेच कर्मचारी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. उस्मानाबादमधील दुष्काळी स्थितीचे सावट या सोहळ्यावर अजिबात जाणवून येत नव्हते.

हा सोहळा सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी अविस्मरणीय ठरावा, यासाठी उमरगा येथील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्नशील होते. येथे पिण्यासाठी पॅकबंद पाण्याची चंगळ होती. त्यामुळे येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवले नाही. राज्यातील दुष्काळी परिस्थ‌िती पाहता प्रशासनातील सर्व विभागांनी खर्चात काटकसर करावी, अशी सूचना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. या सोहळ्यामुळे जनतेच्या कामाचा खेळखंडोबा झाला. अनेकांना शासकीय कार्यालयांतून हेलपाटे खावे लागले. महसूलदिनी कामकाजासाठी जनतेने खेटे मारू नयेत, अशी प्रसिद्धीवजा सूचना देण्याची तसदीसुद्धा अधिकाऱ्यांनी घेतली नाही.

उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलदिनी केवळ निवासी उपजिल्हाधिकारी तांबे उपस्थ‌ित होते. केंद्रीय पथक उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याच्या पार्श्वभूमीवर ते कामात व्यस्त होते. परंतु, कर्मचारी व सहकारी अधिकारी यांच्याअभावी काम करताना त्यांची तारांबळ उडाली. महसूलदिन हा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी उत्सवदिन आहे, असे मानण्यात येते. महसूलदिन प्रबोधनाद्वारेही साजरा करता आला असता. परंतु, दुष्काळी स्थितीत असा दिमाखदार सोहळा सरकारची दुष्काळाकडे बघण्याची दृष्टी दाखवून गेला, असेच म्हणावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तहलका’वर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर छापल्याबद्दल तहलका नियतकालिकाविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार 'तहलका डॉट काम' तसेच तहलकाचे सॅम्युअल मॅथ्यूज यांच्यावर ४५९ तसेच ३४ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 'तहलका'च्या मुखपृष्ठावर बाळासाहेबांबाबत

आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे म्हणत शिवेसनेने रविवारी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस जमादार जी. एन. कडू ‌करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाव बदलला घालूनी घाव!

$
0
0

निपाणीची स्मार्ट वाटचाल; फिल्टरचे पाणी, सीसीटीव्हीमुळे कायापालट

सुधीर भालेराव, औरंगाबाद

औरंगाबादपासून वीस किलोमीटरवरील निपाणी. साधारणः दोन हजार सातशे लोकसंख्या आणि तीनशेच्या आसपास घरे. सुखना नदीतील दूषित पाण्यामुळे हे गाव अनेक वर्षे चर्चेत होते. काविळ, किडनी स्टोन, पोटदुखी, हिवतापने गावाला विळखा घातला. मात्र, अवघ्या वर्षभरात गावकऱ्यांच्या जिद्दीमुळे गावाचा थक्क करणारा कायापालट झाला. निपाणीची ही 'स्मार्ट' वाटचाल.

बीड रोडवर डावीकडे वसलेले निपाणी. गावात प्रवेश केल्यापासून कुठेही जायचे असल्यास ठिकठिकाणी रेखीव पाट्या लावलेल्या. प्रत्येक घरावर नावाची पाटी. विशेष म्हणजे त्यावर पुरुषांबरोबरच महिलांची नावे लिहिलेली. सर्व पाट्या एकाच पद्धतीच्या. त्यामुळे त्या लक्ष वेधून घेतात. कोणत्याही चांगल्या कामांची सुरुवात ही वैयक्तिक अनुभवातून होते. पाणलोट समितीचे सचिव आनंद भालेकर यांना दूषित पाण्यामुळे किडनी स्टोन झाला. त्यामुळे त्यांनी घरात फिल्टर बसवून घेतला. त्याचा चांगला परिणाम जाणवल्याने ही सुविधा संपूर्ण गावालाच उपलब्ध करून देण्याच्या विचार त्यांच्या मनात आला. पाणलोट एकात्मिक व्यवस्थापन योजनेतून त्यांनी गावालाच फिल्टरने पाणी सुविधा देण्याची योजना मंजूर करून घेतली.

दूषित पाणी, आजारांमुळे त्रस्त असलेल्या गावकऱ्यांची शुद्ध पाण्याची मागणी होतीच. पाणलोट एकात्मिक व्यवस्थापन योजनेतून अवघ्या अडीच लाख रुपयांच्या अनुदानातून ग्रामपंचायत कार्यालयात फिल्टर पाण्याची यंत्रणा बसवण्यात आली. दोन रुपयांत आठ लिटर फिल्टरचे पाणी गावकरी दररोज घेऊन जातात. तासाला पाचशे लिटर पाणी फिल्टर केले जाते. ही सुविधा २४ तास उपलब्ध असल्याने पाण्याची टंचाई गावकऱ्यांना जाणवत नाही. साधारणतः दररोज दोन हजार लिटर पाणी गावकरी घेऊन जातात. क्वाइन बॉक्समध्ये दोन रुपयाचे खास नाणेच चालते. २४ तास कितीही पाणी घेऊन जाण्याची मुभा आहे. लवकरच गावकऱ्यांना कार्ड देण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळे दररोज दोन रुपये टाकण्याऐवजी कार्ड स्वाइप केले की पाणी मिळेल, अशी यंत्रणा बसविण्यात येईल. फिल्टर पाण्यामुळे गावकऱ्यांची विविध आजारातून जवळपास मुक्तता झाली. पाण्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे.

'सीसीटीव्ही'ची करडी नजर

निपाणीत चोरी, दरोड्यांचे प्रमाण लक्षणीय होते. त्यावर उपाययोजना आखण्याच्यादृष्टीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून गावात २४ सीसीटीव्ही कॅमेरे अवघ्या महिन्याभरापूर्वी बसविण्यात आले. या यंत्रणेचा चांगला परिणाम जाणवू लागला. चोऱ्यांचे प्रमाण घटले आहे. गावातील रस्त्यांवर होणारे हाणामारीचे प्रसंग जवळपास संपुष्टात आलेत. रस्त्यावर कचरा टाकणे गावकरी टाळतात. प्रत्येक घरात शौचालय बांधल्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यांवर शौचास बसणे बंद झाले. दारुड्यांचा धिंगाणाही नियंत्रणात आला. 'सीसीटीव्ही'च्या निगराणीखाली आपण असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये असल्याने प्रत्येकजण आपल्या हातून चुकीची गोष्ट होऊ नये याची काळजी घेतो. गावातील प्रत्येक परिसर, गल्ली सीसीटीव्हीच्या नजरेत येत आहे. घरातून बाहेर पडले तरी ग्रामपंचायतमध्ये बसून सहजपणे बघता येते. याची जाणीव गावकऱ्यांना असल्याने त्यांची देहबोलीच बदलून गेली आहे. गावात येणारा प्रत्येक माणूस, गाडी दिसत असल्याने मोठे सरंक्षण कवच गावाला लाभले आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेवरही 'सीसीटीव्ही'ची नजर असल्याने विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांमध्येही उत्साह दिसून येतो.

नव्वद टक्के करवसुली

फिल्टरचे पाणी, सीसीटीव्हीची नजर, सिमेंटचे रस्ते, ड्रेनेजलाइन असे विविध उपक्रम ग्रामपंचायतीने हाती घेतले. गावाच्या विकासात एक नागरिक म्हणून आपलाही वाटा असावा म्हणून नागरिक पुढाकाराने कर भरतात. त्यामुळे करवसुलीचे प्रमाण जवळपास ९० टक्के आहे. आपले गाव 'स्मार्ट' म्हणून ओळखले जावे, यासाठी गावकरी झटत आहेत. निपाणीच्या सरपंच द्वारकाबाई खडके, उपसरपंच कमलबाई भालेकर, ग्रामसेवक शीतल उमप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांची टीम गावांमध्ये वेगवेगळ्या योजना आणून गावाला स्मार्ट करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत. गावकरी त्यांना समर्थ साथ देत आहेत.

शुद्ध पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न संपला आहे. सीसीटीव्हीमुळे चोऱ्या, दरोडे, हाणामाऱ्यासारख्या गोष्टींचा आळा बसला आहे. सिमेंटचे अंतर्गत रस्ते, दुतर्फा झाडे लावण्यात येत आहेत. गावकऱ्यांना विकासाचे महत्त्व समजल्यानेच कायापालट होत आहे. - आनंद भालेकर, सचिव, पाणलोट समिती

दूषित पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरिता ग्रामपंचायतने फिल्टर पाणी देण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला. त्यामुळे गावातील आजारपण दूर झाले. 'सीसीटीव्ही'मुळे चोरांची भीती वाटत नाही. रस्त्यांवर लोक कचरा टाकण्यास धजत नाहीत. आता गावांतील लेकी-सुनांना शहरातून पाणी आणावे लागत नाही. - उषा गरंडवाल, ग्रामपंचायत सदस्य

दूषित पाण्यामुळे उलट्या, पोटदुखीचा खूप त्रास होत होता. फिल्टर पाण्यामुळे हे आजार दूर पळाले आहेत. 'सीसीटीव्ही'मुळे गावकऱ्यांमध्ये मोठा बदल झाला आहे. अंगणवाडीतील मुलांची संख्याही वाढली आहे. - चंदा गोसावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुळल्या भारत-जपानच्या रेशीमगाठी!

$
0
0

चैतन्य-असुका यांचा 'आंतरदेशीय' विवाह ठरला उत्सुकतेचा विषय

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'...क्योटो येथील असुका योनमोरी हिचा धर्मपत्नी म्हणून स्वीकार करतो व पाच कर्तव्यांचे पालन करील असे वचन देतो' ही शपथ वर चैतन्य भंडारे यांनी घेताच फुलांचा वर्षाव झाला. या भावूक वातावरणात जपान व भारत देशातीतल दोन कुटुंबात घट्ट रेशीमगाठी बांधल्या गेल्या. पैठण रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमात रविवारी (१७ ऑगस्ट) सव्वाशे 'ज्येष्ठ' वऱ्हाडींच्या उपस्थितीत हा 'आंतरदेशीय' विवाह झाला.

औरंगाबादचा नवरदेव आणि जपानची नवरी. ऐकताना आश्चर्य वाटत असले तरी खरे आहे. जपानच्या क्योटो शहरात प्राध्यापक असलेले औरंगाबादचे चैतन्य भंडारे व क्योटोतीलच असुका योनेमोरी यांचे लग्न झाले. यावेळी दोन्ही पक्षांची मोजकीच वऱ्हाडी मंडळी आली. तर वृद्धाश्रमातील ११२ ज्येष्ठ नागरिकांनी नवविवाहित दाम्पत्याला भरभरून आशीर्वाद दिले. लग्नानिमित्त चैतन्य यांनी निराधार ज्येष्ठांना नवे कपडे घेतले. तसेच सुग्रास जेवणाची व्यवस्थाही केली. आयुष्याच्या उत्तरार्धात परवड झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची चैतन्य यांना नेहमीच काळजी वाटते. या ओढीतूनच त्यांनी सहा वर्षांपूर्वी वयोवृद्धांच्या मदतीसाठी औरंगाबादेत संस्था स्थापन केली होती. मात्र, जपानमधील वास्तव्यामुळे संस्थेचे कामकाज चालवणे कठीण गेले. ही रूखरूख कायम असल्याने किमान आपला विवाह ज्येष्ठांच्या सहवासात करावा, असा त्यांनी निर्णय घेतला. यातूनच असुका व चैतन्य मातोश्री वृद्धाश्रमात विवाहबद्ध झाले. वाजंत्री नाही की नाचगाण्याचा सोस नाही. अत्यंत समंजस व साधेपणाने मंगल परिणय झाले. गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून वधू-वराने शपथ घेतली. वृद्धाश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावरील अपूर्व आनंद हीच आमच्यासाठी सर्वोत्तम भेट असल्याचे दोघांनी सांगितले. दरम्यान, चैतन्य यांनी काही महिन्यांपू्र्वी औरंगाबाद शहरात महास्वच्छता अभियान राबविले होते. बुद्धाची भूमी म्हणून भारताबद्दल जपानमध्ये कमालीची आपुलकी आहे. या विवाहामुळे दोन्ही देशातील कुटुंबे जवळ आली असे चैतन्य म्हणाले. भारत देशाबद्दल असुका हिला प्रचंड आत्मियता आहे. यावेळी चैतन्य यांचे वडील किसनराव भंडारे यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

जपानी परंपरेनुसारही विवाह

असुका ही चैतन्य यांच्या मैत्रिणीची मैत्रीण आहे. शैक्षणिक कामानिमित्त दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सामाजिक बांधिलकी जपत विवाह करण्यावर एकमत झाले. अखेर औरंगाबादला मातोश्री वृद्धाश्रमाची निवड केली. भारतीय पद्धतीने लग्न झाल्यानंतर पुन्हा एकदा २७ मार्च रोजी हे दाम्पत्य जपानी परंपरेनुसार विवाहबद्ध होणार आहे.

मराठी-जपानी शपथ

विवाहात वधू-वराला शपथ देण्यासाठी भंते पुढे सरसावले. मात्र, वधुला मराठी कळत नसल्याने पेच निर्माण झाला. अखेर चैतन्य यांनीच दुभाषाचे काम केले. भंते यांनी सांगितलेली शपथ चैतन्य जपानीत सांगत अन् नवरी असुका ती शपथ जपानीत म्हणत असे. या भाषिक गोंधळामुळे मांडवात काहीवेळ हशा उसळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांकडून राज्य सरकार लक्ष्य

$
0
0

ही तर बोलाची कढी अन् बोलाचाच भात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे एवढे आकडे आयुष्यामध्ये कधीही पाहिले नाहीत. भाजपने जनतेला मोठ्या भूलथापा दिल्या आहेत. त्यांनी केवळ बोलाची कढी आणि बोलाचाच भात दिला आहे,' या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर परभणी येथे टीका केली. उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्याची सांगता रविवारी झाली.

'ज्या परभणी जिल्ह्याने शेती कशी करायची, कापसाचे पीक कसे घ्यायचे, याचा आदर्श घालून दिला, त्या जिल्ह्याला दुष्काळामुळे अवकळा आली आहे. दुष्काळावर मात करण्याची सरकारची कोणतीच मानसिकता दिसत नाही. मराठवाड्यात एका पावसानंतर जिथे पेरण्या झाल्या होत्या, तिथली पिके आता माना टाकायला लागली आहेत. जनावरे आणि माणसांना पिण्याचे पाणी नसताना सरकार हालचाल करत नाही. आम्ही या सरकारला जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही', असे पवार म्हणाले. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुर्नगठन करण्यासाठी लवकरच केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान जर देशात असतील तर त्यांचीही भेट घेणार असल्याचा टोमणा पवार यांनी अप्रत्यक्षपणे मारला.

विरोधी पक्षनेत्यांनीही आपल्या भाषणात सरकारवर हल्ला चढवला. आपल्या प्रास्ताविकाच्या भाषणात विजय भांबळे यांनी परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत ५६ आत्महत्या झाल्याचे सांगितले. तसेच, शेतकऱ्यांसाठी बारामतीमध्ये कपडे काढून आंदोलन करणारे स्वाभिमानी राजू शेट्टी आता कुठे लपून बसले आहेत. आता ते मुख्यमंत्र्यांच्या किंवा पंतप्रधानांच्या घरासमोर कपडे काढून आंदोलन का करत नाहीत, असा आरोप सुरेश धस यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांना वाचविण्यास नागरिकांचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील झाडे तोडल्यामुळे खाली पडून पक्ष्यांचा मृत्यू झाला. या पक्ष्यांना वाचविण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशी, निसर्गप्रेमी, राजकीय कार्यकर्ते यांनी धाव घेतली. झाडे तोडल्यामुळे बगळ्यांची घरटी मोडली. बगळ्याच्या पिलांचा जीव धोक्यात आला. त्यांना वाचविण्यासाठी रेल्वे प्रवासी, निसर्ग प्रेमींनी स्टेशनकडे धाव घेतली. त्यांनी या पक्ष्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर शिवसेनेचे राजू दानवे कार्यकर्त्यांसह धावले. बगळ्यांच्या पिलांचा मृत्यू होऊ नये म्हणून या प्रकाराची माहिती त्यांनी सिद्धार्थ उद्यानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळविली व त्यांना रेल्वे स्टेशनवर बोलावून घेतले. सकाळी सातपासून ते दुपारी दीडपर्यंत बगळ्याच्या पिलांना अन्न आणि पाणी मिळले नही. मिडअर्थ वाइल्ड लाइफच्या सदस्यांनी स्वखर्चाने पिलांसाठी मासे आणले.

शेड बांधले असते तर वाचले असते प्राण

वन विभाग, पालिका अधिकारी पार्किंगमध्ये आले. त्यांच्यापाठोपाठ पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक आल्यानंतर विनापरवानगी झाडे तोडली जात असल्याचे स्पष्ट झाले. वृक्ष तोडण्याऐवजी शेड बांधले असते किंवा नेट लावली असती तर, कॅटल ग्रेड आणि बगळ्यांचे प्राण वाचले असते, असे मत डॉ. पाठक यांनी व्यक्त केले.

वाहनधारकांना झाडाच्या फांद्या लागत होत्या. पक्ष्यांच्या विष्ठेमुळे वाहने खराब होत असल्याच्या तक्रारी होत्या. वाणिज्यिक विभागाचे अधिकारी के. बाबुराव यांनी दिलेल्या अहवालानुसार झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली.

- विवेक कुशवाह, सहाय्यक अभियंता, रेल्वे विभाग

घटना घडल्यानंतर आम्ही मित्र बगळ्याच्या मदतीसाठी थांबलो आहे. काही पक्ष्यांचे जीव वाचतील, असे वाटते.

- नितीन पाटील, इकॉलॉजीकल फाऊंडेशन

पक्ष्याचे असो की अन्य कोणत्या जीवाचे प्राण्याचे जीव जाणे हे कष्टदायक आहे. रेल्वे विभागाचे कृत्य संतापजनक आहे.

- विकास खांडेकर, इकॉलॉजीकल फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांच्या धास्तीने रात्रभर साफसफाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सुरू केलेल्या साफसफाईच्या अभियानाची धास्ती प्रशासनाने घेतल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. आयुक्त येणार असल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्रभर जागून कार्यालयाची साफसफाई केली. यापूर्वी डॉ. भापकर यांनी २६ जून रोजी अचानक भेट देऊन अस्वच्छतेबद्दल अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. त्यानंतर दीड महिना सफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

शिक्षण विभागाच्या विविध विभागीय कार्यालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अस्ताव्यत पडलेली कागदपत्रे, अस्वच्छता, कोपऱ्यावरील पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती, भिंतीवर चिकटविलेली पोस्टर, केरकचरा यामुळे कार्यालयांमध्ये अस्वच्छता असते. शिक्षण आयुक्ताचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी कार्यालयांचे स्वच्छता अभियान हाती घेतल्याचे चित्र आहे. २६ जून रोजी औरंगाबादला आले असता त्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यालय, विद्यानिकेतन संस्था, व्यवसाय मार्गदर्शन संस्था, डीटीएड कॉलेजांना भेट देत पाहणी केली. कार्यालयांमधील अस्ताव्यस्तपणा पाहता त्यांनी अधिकारी, कर्मचारी यांची कानउघडणी केली. यानंतर सोमवार (१७ ऑगस्ट) रोजी बैठकीसाठी ते शहरात आले. आयुक्त येणार असल्याचे लक्षात येताच जागे झालेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना साफसफाईचे फर्मान सोडले. आयुक्त सोमवारी येणार असल्याने रविवारी स्वच्छता मोहिम राबवित, कर्मचाऱ्यांनी अस्ताव्यस्त पडलेल्या फाईल, धूळखात पडलेली कागदपत्रे एकत्र करत ते व्यवस्थित ठेवले. खिडक्यांची साफसफाई केली. रात्री एक वाजेपर्यंत ही साफसफाई चालल्याचे शिपायांनी सांगितले. आयुक्तांची बैठक एसएससी बोर्डात झाली. येथे अस्वच्छता आढळल्याने त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.

सरल प्रणाली, शिष्यवृत्तीबद्दल नाराजी

ड. भापकर यांनी शाळा, शिक्षक विद्यार्थ्यांची माहिती 'सरल' या संगणकप्रणालीद्वारे भरून घेण्याची प्रक्रिया, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेचे काम संथ सुरू असल्याबद्दल अधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. सरल, शिष्यवृत्ती योजना, केआरए, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अशा योजनांचा विभागीय स्तरावर सोमवारी आढावा घेतला. ही बैठक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात बैठक झाली. यावेळी मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे, आंग्ल भाषेचे संचालक कैलास दातखिळ, मिपाचे संचालक शिशिर होनमडे, शिक्षणाधिकारी नितीन उपासणी, भगवान सोनवणे, एम. के. देशमुख यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्याला सक्तमजुरी

$
0
0

औरंगाबाद : सिडको एन -४ परिसरात घरफोडी करणारा अट्टल घरफोड्या दिलीप गायकवाड यास दोषी ठरवून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. डोईफोडे यांनी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

सिडकोतील रहिवासी अनुराधा इराळे या १३ जून २०१४ रोजी बाहेर गेल्या होत्या. घरी परतल्यावर त्यांना बंगल्याच्या पाठीमागील दरवाजा अर्धवट तुटलेला दिसला. बेडरुमधील लोखंडी कपाटातील सोन्याची अंगठी, झुमके, मणीमंगळसूत्र, चांदीचे पैजण, समई व निरजंन असे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तपास करीत अट्टल घरफोड्या दिलीप कचरु गायकवाड याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून सोन्या - चांदीचा ऐवज जप्त करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाला लुबाडणारा तोतया पोलिस गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस असल्याचे सांगत तरुणाचे दोन हजार रूपये पळविणारा भामटा वाहतूकशाखेच्या सतर्कतेमुळे जाळ्यात अडकला. सोमवारी सायंकाळी सिद्धार्थ उद्यानासमोर हा प्रकार घडला होता. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल देविदास बोराडे (वय २३, रा. निरालाबाजार) हा तरुण सोमवारी सायंकाळी सिल्लोडवरून औरंगाबादला आला होता. मध्यवर्ती बसस्थानकात उतरल्यानंतर तो पायी निराला बाजारकडे येण्यासाठी निघाला होता. यावेळी त्याला सिद्धार्थ उद्यानासमोर एका भामट्याने अडविले. आपण पोलिस असल्याचे सांगत अमोलकडे गांजाच्या पुड्या असून तुझी झडती घेणार असल्याचे सांगत त्याने धाक दाखविला. त्याच्या खिशातील दोन हजार रूपये घेऊन भामट्याने पलायन केले. या प्रकाराबाबत संशय आल्याने अमोलने बसस्थानकाबाहेर असलेल्या वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांना हा प्रकार सांगितला. निरीक्षक मुदीराज यांच्यासह पथकाने तातडीने अमोलला सोबत घेत भामट्याचा शोध सुरू केला.

समर्थनगर भागात संशयित आरोपी आजमखान अफजलखान पठाण (वय ४७ रा. मलकापूर ता. बुलढाणा) पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याला ताब्यात घेऊन क्रांतिचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई अशोक मुदीराज यांच्यासोबत एस.बी. जोशी, आर.एस. गोलवाल, के.डी. कुलकर्णी, पी.एम. बोंगाणे व सुरेश वाघचौरे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रिणीवर ‘इंप्रेशन’ पाडण्यासाठी दुचाकी चोरी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी वेगवेगळ्या दुचाकी चोरून त्या वापरत असलेल्या सोळा वर्षांच्या मुलाला सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. दोन महिन्यापूर्वीच त्याच्याकडून दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या.

सिटीचौक गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी सोमवारी शहागंज भागात गस्त घालीत होते. यावेळी एका अॅक्टिवा दुचाकीच्या हँडलला एक मुलगा झटका देताना आढळला. पोलिसांना पाहताच त्याने पलायन केले. पाठलाग करून त्याला पकडून त्याची झडती घेण्यात आली असता दुचाकीची बनावट चावी आढळून आली. त्याची चौकशी केली असता त्याने शहरातील विविध भागातून सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शाहेद सिद्दीकी, दिनेश बन, सुनील राऊत, संतोष केवारे, बाखरे, शेख गणी व शाहेद पटेल यांनी पार पाडली.

दुचाकींची विक्री नाही

रोशनगेट भागात हा मुलगा आईसोबत राहतो. त्याची एक मैत्रिण असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. एकाच महिन्यात त्याने सिटीचौक व क्रांतिचौक हद्दीतून तब्बल सहा दुचाकी चोरल्या. यापैकी एकही दुचाकी विकली नसून केवळ इंप्रेशन मारण्यासाठी आपण चोरी करीत असून त्या दुचाकीवरील मन भरल्यानंतर ती दुचाकी कोठेतरी पार्किंगमध्ये लावून दुसरी दुचाकी चोरत असल्याची माहिती दिली. दोन महिन्यांपूर्वी साथीदारासहित त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ टोळीकडून दोन सिमेंट मिक्सर हस्तगत

$
0
0

औरंगाबाद : सिमेंट मिक्सर चोरणाऱ्या आरोपीकडून आणखी दोन मिक्सर गुन्हेशाखेने हस्तगत केले आहेत. पाच दिवसांपूर्वी दोन आरोपींना पोलिसांनी अटक करत एक मिक्सर जप्त केले होते. गुन्हेशाखेच्या पथकाने ७ ऑगस्ट रोजी आरोपी शेख पाशा शेख शब्बीर (रा. नारेगाव) व सुरेश रमेश मोरे (रा. पुंडलीकनगर) यांना अटक केली होती. या दोघांनी मुकुंदवाडी येथील बाळू सोनवणे यांचे सिमेंट मिक्सर चोरल्याची कबुली दिली होती. दरम्यान, पोलिस चौकशीमध्ये शेख पाशा याने आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली. मुकुंदवाडी व सिडको हद्दीतून त्याने चोरलेले दोन सिमेंट मिक्सर पोलिसांच्या स्वाधीन केले. शेख पाशा हा किरकोळ स्वरूपाचा बांधकाम ठेकेदार आहे. त्याला सिमेंट मिक्सरबाबत माहिती असल्यामुळे या मिक्सरची चोरी करून बांधकाम व्यवसायातील ठेकेदारांना याची विक्री करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आरोपींकडून आतापर्यंत साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक फौजदार अयुब पठाण, शिवाजी भोसले, संजय जाधव, बबन इप्पर, आनंद वाहूळ, रितेश जाधव, प्रभाकर राऊत, एजाजखान आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>