Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राज्यातील दलित नेते MIM च्या संपर्कात

0
0

ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील रिपब्लिकन पक्षांतील अनेक पदाधिकारी व आंबेडकरी विचारधारेतील निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकारी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीनमध्ये (एमआयएम) प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, असा दावा मुकुंद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला. सोनवणे पक्षाच्या ओबीसी व एससी सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

एमआयएमचे नेते ओवेसी यांच्या उपस्थितीत पुढील महिन्यात मुंबई येथे कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. यावेळी अनेक जण पक्षात दाखल होतील, असे ते म्हणाले. आठवले व कवाडे गट, इतर रिपाइं पक्षांचे पदाधिकारी संपर्कात असल्याचा दावा सोनवणे यांनी केला. एमआयएमने विधानसभा निवडणुकीत दलित मुस्लिम ऐक्य करण्याचा प्रयत्न केला होता. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत दलित अत्याचाराबदद्ल आवाज उठवला. यामुळे पक्षाबद्दल आकर्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या औरंगाबाद जिल्हयातील एससी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी फैसल खान, पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी शोएब खान यांची निवड घोषित करण्यात आली. यावेळी मौलाना महेफुज उर रहेमान फारुखी, एमआयएमचे नेते गफ्फार कादरी, नगरसेवक अब्दुल रहीम नाईकवाडी, जफर बिल्डर, अॅड. अन्वर कादरी, रफिक पठाण आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठात पदनिर्मितीचा सपाटा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वसतिगृह शुल्कमाफी, कमवा व शिका योजनेतील मानधनात वाढ करताना पुरेसा निधी नसल्याची ओरड करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने स्वनिधीतून पदनिर्मितीचा मात्र सपाटा सुरू केला आहे. रविवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेत माहिती अधिकारी, डायरेक्टर ऑफ मीडिया, डॉयरेक्टर ऑफ पब्लिकेशन अादी सात पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांचा विषय आला की, विद्यापीठ तिजोरीत ठणठणाट असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी संवैधानिक अधिकाऱ्यांची दालने, दौरे, बैठका आदींवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. यातच आता विद्यापीठ फंडातून पदनिर्मितीचा सपाटा सुरू केल्याचे समोर आले आहे. विद्यापीठ व उद्योजकांमधील सुसंवाद वाढावा यासाठी विशेष कार्यासन अधिकारी नेमण्यात आला. प्रारंभी झालेल्या वादानंतर विद्यापीठ फंडातून या पदाला मान्यता देण्यात आली. यानंतर रविवारी पुन्हा नव्याने सात पदांच्या निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतची घोषणा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. नवीन पदभरतीमध्ये माहिती अधिकारी, डायरेक्टर ऑफ मीडिया, डॉयरेक्टर ऑफ पब्लिकेशन यासह मुलांचे व मुलींच्या वसतिगृहात प्रत्येकी दोन अधीक्षक नेमण्यात येणार आहेत. माहिती अधिकारातील प्रकरणांची संख्या वाढली आहे. त्यासाठी माहिती अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. माध्यमांना माहिती देण्यासाठी डॉयरेक्टर ऑफ मीडिया नेमण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. वसतिगृहांमधील सुविधांबाबत वारंवार मागणी करण्यात येते. त्यावेळी निधी नसल्याचे कारण सांगण्यात येते. दुसरीकडे विद्यापीठ फंडातून पदनिर्मितीबाबत मात्र प्रयत्न करत आहे.

विद्यापीठ तिजोरीवर ताण वाढणार

नवीन पदनिर्मितीमुळे विद्यापीठाच्या तिजोरीवरील ताण वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. यापूर्वीही शिक्षकांची पदे फंडातून भरण्यात आली होती. त्यांच्या पगाराचा भार आता शासनाने स्वीकारला आहे. यातच फंडातून ओएसडीची नियुक्ती करण्यात आली यानंतर आता या पदांची निर्मिती करण्यात आली. यामुळे तिजोरीवरील ताण वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचा भाव रडवणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात कांद्याच्या भावात वाढ होत असून प्रति किलोचा भाव ४५ ते ५५ रुपयांपर्यंत पोचला आहे. हा मागील दोन आठवड्यातील सर्वाधिक भाव आहे. लासलगाव, नाशिक येथून कांद्याची आवक कमी झाल्याने भाववाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कांद्याचा भाव मॉलमध्ये ३० ते ३५ रुपये किलो आहे.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतील विक्रेते प्रभाकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रेत्यांना कांदा सुमारे साडेतीन हजार रुपये क्विंटलने मिळत आहे. शहरातील भाजीमंडईत सुमारे ४५ ते ५५ रुपये किलो या दराने कांदा विकला जात आहे. बाजार समितीत एक महिन्यापासून आवक कमी झाली आहे. अवेळी झालेल्या पावसाचा कांद्याच्या उत्पादनाला बसलेला फटका, पावसाने दिलेली ओढीची यामुळे राहुरी, सोलापूर, लासलगाव येथील कांद्याच्या बाजारपेठांत आवक निम्म्याने घटली आहे, असे सिडकोतील व्यापारी जर्नादन जाधव यांनी सांगितले. औरंगपुरा येथे सुमारे ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने कांदा विकला जात असून ही दरवाढ ७० रुपयांपर्यंत होऊ शकते, असे सांगण्यात आले. मागणीच्या प्रमाणात आवक नसल्याकडे औरंगपुरा विक्रेत्या शशिकला खोबरे यांनी लक्ष वेधले. औरंगाबादेत रविवारी तीस ट्रक आवक झाली. साठवणुकीचा कांदा संपत आल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला असून दरवाढीच्या अपेक्षने शेतकऱ्यांनी बाजारात कांदा आणण्याचे थांबवले आहे. औरंगपुरा, शिवाजीनगर, पुंडलिकनगर आदी भागात तेथील मागणीनुसार दरात फरक पडतो, असे विक्रेते जर्नादन जाधव यांनी सांगितले. औरंगपुरा, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर परिसर या भागत ४५ ते ५५ रुपये प्रतिकिलोने कांदा मिळत आहे. मॉलमध्ये मात्र कांद्याचा भाव ३० ते ३५ रुपये आहे.

लासलगावांत ४० रुपये

लासलगाव येथील घाऊक बाजारात कांद्याला सोमवारी ४३ रुपये किलो भाव मिळाला. यामुळे किरकोळ बाजारात कांद्यासाठी ४५ ते ५५ रुपये मोजावे लागत आहेत, असे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिकामे औद्योगिक प्लॉट ताब्यात

0
0

फेरवाटपासाठी नवे धोरणः देसाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकारने वापराविना पडून असलेले १७०० औद्योगिक भूखंड परत घेतले आहेत. त्याचबरोबर चार हजार भूखंडधारकांना नोटीस बजाविल्या आहेत. ताब्यात घेतलेले भूखंड वितरित करून तेथे तातडीने उद्योग उभारणीसाठी नवे धोरण निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,'राज्यात अनेक औद्योगिक भूखंड वापराविना पडून आहेत. सरकारने १७०० भूखंड ताब्यात घेतले व ४ हजार भूखंडधारकांना नोटीस बजाविल्या. त्यापैकी अनेक भूखंड एमआयडीसीच्या ताब्यात येतील. या सर्व भूखंडांचे फेरवाटप करण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येणार आहे. या भूखंडांवर तातडीने उद्योगांची उभारणी करण्यासाठी सरकार नवे धोरण तयार करणार आहे.' माहिती-तंत्रज्ञान उद्योगाच्या (आयटी) धोरणात सरकारने काही नव्या तरतुदींचा समावेश केला आहे. सॉफ्टवेअल डेव्हलपमेंट, व्हिडिओ गेमिंग आदी कंपन्यांसाठी आयटी टाउनशिप वसविण्याचा समावेश धोरण्यात करण्यात आल्याची माहिती देसाई यांनी दिली.

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने अनेक कंपन्यांवर कारवाई केली आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक आयोजित केली आहे. चर्चेतून हे प्रश्न सोडविले जातील, असेही उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.

उद्योजकांसाठी सादरीकरण

डीएमआयसी प्रकल्पात स्थानिक उद्योजकांचा किती सहभाग असेल, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक उद्योजकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ऑगस्टअखेरीस सादरीकरणाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती उद्योजकांना दिली जाणार आहे. त्याचबरोबर फॉक्सकॉन, स्टरलाइट, हुंदाई आदी कंपन्यांनी औरंगाबादेत गुंतवणूक करावी, यासाठी सरकार आग्रही आहे, असेही देसाई यांनी सांगितले. जालन्याजवळ ड्रायपोर्टच्या उभारणीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत सदस्य पतीकडून मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील शेलगाव येथील ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने एका पत्रकारास मारहाण केली. याबद्दल पिशोर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेलगाव येथील पत्रकार पोपट बाळा भुसारे हे ग्रामसेवक प्रभाकर दहीहंडे यांच्याकडून १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेची माहिती घेत होते. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य उषाबाई मनगटे यांचे पती रमेश गजाबा मनगटे तेथे आले. त्यांनी भुसारे यांना,'हा गावातील अस्वच्छतेच्या बातम्या छापतो, त्याला माहिती देऊ नका,' असे सांगितले. त्यानंतर अर्वाच्य शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत तक्रार देण्यासाठी भुसारे पिशोरला जात असताना शेलगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एकनाथ मनगटे व गावकऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतु, रमेश मनगटे यांनी वाद घातला. त्यानंतर भुसारे यांनी पिशोर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर यांच्याकडे तक्रार दिली. तालुक्यातील पत्रकार संघटनेने दोषीवर कारवाईची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकार संघाच्या कार्यालयास बातम्या छापल्याने कुलूप!

0
0

पैठण : पैठण नगर पालिकेच्या विरोधात बातम्या छापल्या म्हणून नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या आदेशावरून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पैठण तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. विशेष म्हणजे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांना सूचना न देता ही कारवाई करण्यात आली.

शिवाजी चौकातील संत एकनाथ सार्वजनिक वाचनालयात दहा वर्षांपूर्वी नगर पालिकेने पत्रकारांना कार्यालयासाठी जागा दिली आहे. या कार्यालयाला बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी पाणीपुरवठा विभागप्रमुख भगवान कुलकर्णी यांनी कुलूप ठोकले. 'काही महिन्यांपासून वर्तमानपत्रांमध्ये शहरातील चिखल, जागा भाडेवाढ, दुषित पाणीपुरवठ्याबद्दल सातत्याने बातम्या छापून येत आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष गोर्डे यांनी कुलूप लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशावरून ही कारवाई करीत आहोत,' असे कुलकर्णी यांनी सांगितले. मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्याकडे संपर्क केला असता ते म्हणाले, पत्रकार संघाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याबद्दल मला माहिती नाही. या कारवाईचे मी आदेश दिले नाहीत, असे ते म्हणाले. कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याने शहरातून निषेध व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पैठणचे रस्ते पीडब्ल्यूडीने बांधावेत’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

रस्ता बांधणीसाठी लागणारी सक्षम यंत्रणा नसतानाही नगर पालिका, पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाअंतर्गत शहरात रस्ते बांधणीसाठी आग्रह धरत आहे. जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच शहरातील रस्ते बांधावेत, अशी मागणी शालिवाहन विकास प्रतिष्ठानमार्फत करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहागड फाटा ते आपेगाव बसस्थानक व शहरातील हॉटेल पार्कवे ते व्यंकटेश मेडिकल व शिवाजीचौक ते गागा भट्ट चौक या रस्त्यांना मान्यता देण्यात आली. शहरातील दोन्ही रस्त्यांना जवळपास साडेआठ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे रस्ते नगर पालिकेमार्फत करण्यात यावे, असा आग्रह नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत धरला. नगर पालिकेकडे एवढ्या मोठ्या बजेटचे रस्ते बांधण्यासाठी इंजिनीअर, यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कंत्राटदाराने गुणवत्ता न राखणास कोणाला जबाबदार धरणार, असा प्रश्न शालिवाहन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. नगरोत्थान योजनेत करण्यात येत असलेल्या रस्ते कामात डांबरी रस्त्यावर थेट पीसीसी व फायनल लेअर टाकून सिमेंट रस्ते करण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषण ९६ तासांनी मागे

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड नगर पालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून होत असलेली मुस्काटदाबी, कथित भ्रष्टाचार व इतर मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनापासून सुरू असलेले शिवसेना, मनसे नगरसेवकांचे उपोषण मंगळवारी रात्री (१८ ऑगस्ट) उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी व नगर पालिका मुख्याधिकारी अशोक कायंदे यांच्या मध्यस्तीने सोडविण्यात आले. हे उपोषण ९६ तास चालले.

शिवसेनेचे गटनेते सुनील मिरकर, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष कमलेश कटारिया, राजेंद्र सिरसाट यांनी स्वातंत्र्यदिनापासून उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. नगर परिषदेने प्रस्तावित केलेली दरवाढ रद्द करावी, विशेष सभेत व मासिक सभेत नगरसेवकांनाच प्रवेश द्यावा, मासिक सभा-सर्वसाधारण सभेचे व्हिडिओ चित्रण करावे, अनेक वर्षे एकाच ठिकाणी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी बुधवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी, नगर पालिका मुख्याधिकारी अशोक कायदे व उपोषणार्थीना चर्चेसाठी औरंगाबादला बोलावले आहे. या चर्चेत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण थांबविण्यात आले. यावेळी दोन्ही शासकीय अधिकाऱ्यांसह माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्मचाऱ्यांनंतरच सीईओ घेणार वेतन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कर्मचारी, शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. हे वेतन मिळाल्यानंतरच झेडपीचे सर्व विभागप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी वेतन घेतील, असा निर्णय घेतल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षकांचे वेतन रखडल्याच्या प्रश्नावर चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत शिक्षकांची वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, रजेची देयके बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहेत. ती देण्यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठविणे तसेच शिक्षकांचे मासिक वेतन नियमित द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यासाठी सर्व घटक परिश्रम घेत आहेत. जोवर झेडपीच्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही तोवर सर्व विभागप्रमुखांसह सीइओ डॉ. चौधरी हे सुद्धा वेतन घेणार नाहीत, असे चव्हाण यांनी सांगितले. शिष्टमंडळात मधुकर वालतुरे, राजेश हिवाळे, कैलास गायकवाड, हारून शेख, मंगला कासोद, मीना भोगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौताळा अभयारण्यात लूटमार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

गौताळा अभयारण्यातून जाणाऱ्या कन्नड-पिशोर राज्य रस्त्यावर मंगळवारी (१८ ऑगस्ट) रात्री पावणेअकरा ते साडेअकराच्या दरम्यान झाडे आडवी टाकून सहा वाहनांना लुटण्यात आले. या घटनेत प्रवाशांना मारहाण करण्यात आली असून, सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचा अंदाज आहे. या घटनेत एका पोलिसासह चार जण जखमी झाले आहेत.

कन्नड पिशोर राज्यरस्ता क्रमांक ५१वर चंदन नाल्याच्या पुढे गौताळा अभयारण्यातील ब्राह्मणी बीट कपार्टमेंट १५४मधील चंदनबावडी परिसरातील खांडीत सुमारे सात ते आठ दरोडेखोरांनी मंगळवारी रात्री रस्त्यावर झाडे व दगड आडवे टाकले होते. यावेळी प्रथम कन्नडकडून पिशोरला जाणारी वाहने अडवून वाहनधारकांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील मोबाइलमधील सिमकार्ड काढून मारहाण करून लुटण्यात आले. यात एम. एच.२० सी. टी. ९२४४, एम. एच.२० बी. टी. ३२७९ या क्रमांकाचे ट्रक, एम. एच. १८ ए. ए. ६१९ क्रमांकाचा आयशर ट्रक, एम. एच २० सी. एच. ७२९२ क्रमांकाची टाटा सुमो, एम. एच ०४ ९२२० क्रमांकाची इंडिका व एम. एच. १४ सी. टी. १२८४ क्रमांकाची हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अडवण्यात आली.

प्रसंगावधान राखून माघारी फिरलेल्या रुग्णावाहिका चालकाकडून माहिती मिळाल्यानंतर कन्नडचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस शिपाई मयूर पाटील, धीरज चव्हाण, जी. एम. कराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा लुटमार सुरू होती. मयूर पाटील यांनी एका दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना दुसऱ्या दरोडेखोराने दगड फेकून मारला. त्यात पाटील यांचे डोके फुटले. पोलिस आल्याचे लक्षात येताच दरोडेखोर जंगलात पळून गेले. तासभर सुरू असलेल्या या घटनेत काही वाहनामधील महिलांचे दागिने लुटण्यात आले. हे दरोडेखोर हिंदीतून बोलत असल्याची माहिती मिळाली आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार किमान दीड लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. या घटनेत मयूर पाटील (पोलिस कर्मचारी), अय्युब खाँ बशीर खाँ (कुंजखेडा), विनोद विठ्ठल आघाडे (रा. हटटी) फेरोज खान (दिगाव खेडी) हे जखमी झाले आहेत.

पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग व सहकारी, दंगा काबू पथक, दरोडा प्रतिबंधक पथकांनी हा परिसर पिंजून काढला. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांनी घटनास्थळी भेट देवून आढावा घेतला.

रुग्णवाहिकेमुळे वाचा फुटली

हतनूर आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका रुग्ण आणण्यासाठी वासडी येथे जात होती. रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान राखून रुग्णवाहिका माघारी कन्नडकडे आणली. त्यामुळे घटनेला वाचा फुटली. दगडफेकीत रुग्णवाहिकेचे थोडे नुकसान झाले आहे.

तालुक्यात घबराहट

या परिसरात यापूर्वीही लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. कन्नड शहरातील दुकाने फोडण्याचे प्रकार व कालीमठ (उपळा) येथील बँक लुटण्यात आल्याने तालुक्यात घबराट निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेनचालकावर गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज औद्योगिक परिसरातील एम सेक्टरमधून जाताना एका क्रेनने चालकाचा ताबा सुटल्याने बी. जी. इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या पार्किंगमधील मोटरसायकल, बोलेरो जीप व खासगी बसला धडक दिली. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (१८ ऑगस्ट) रात्री बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्रेनचालक नितीन साईनाथ तांबे (वय २५, रांजणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोन कामगारांच्या मोटारसायकलचे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. टी. कीर्तीकर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी कट्ट्यासह दरोडेखोरांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

जोगेश्वरी येथील फोस्टर कंपनीच्या शेजारील मैदानात दरोड्याचा कट रचणाऱ्या पाच दरोडेखोरांपैकी दोघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व तीन जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.

जोगेश्वरी येतील फोस्टर कंपनी शेजारील मैदानात अंधारात काही जण लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (१८ ऑगस्ट) रात्री पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय बहीरव, पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास वैष्णव, परमेश्वर पायगव्हाणे, बाबासाहेब काकडे, मुरमुरे, आर. आर. निमोने आदींनी सापळा रचून छापा मारला. यावेळी पाचपैकी तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. गोकूळ दिलीप अराक (वय २९, रा. बकवालनगर नायगाव ता. गंगापूर) व अजयसिंग श्रीरामचंद्र राजपूत (वय २३, सालामपुरेनगर पंढरपूर, मुळगाव मु. रतनपूर पोस्ट गुरदीन ता. अजयगड, जि.पन्ना, मध्यप्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जीवंत काडतूस, लोखंडी टॉमी, मिरची पावडरची पुडी, नॉयलनची दोरी व दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणार्या दोन मोटरसायकली असा एकूण ७१,२३० रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय बहिरव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमबाह्य औषधी विक्री थांबवा, अन्यथा कारवाई

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील औषध विक्रेत्यांनी नियमबाह्य औषध विक्री टाळावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. बुधवारी पोलिस आयुक्तालयात औषध विक्रेते, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये पोलिसांच्या वतीने विविध सूचना करण्यात आल्या. शहरातील तरुणवर्ग नशेसाठी औषधांचा, तसेच गोळ्यांचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. गुन्हे शाखेने दहा दिवसापुर्वी नियमबाह्य विक्री करणाऱ्या एका दुकानदाराला अटक केली होती. या पार्श्वभूमीवर नियमबाह्य औषध विक्रीवर प्रतिबंध घालण्यासंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, एसीपी रमेश गायकवाड, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त व्ही.टी. पोहणेकर, मराठवाडा औषध विक्रेता असोसिऐशनचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांच्यासह शंभरावर औषध विक्रेते उपस्थित होते.

मेडिकल दुकानादारांच्या बैठकीत‌ नियमबाह्य औषधविक्री संदर्भात विविध सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन न झाल्यास कडक कारवाईला सबंधितांना सामोरे जावे लागणार आहे.

वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त

बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सूचना

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय शेड्युल एच ड्रग दुकानदाराने विक्री करू नये

मनोरुग्णांना प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधे देऊ नयेत

गुंगी येणारी औषधे पेन्डाईल, कोरेक्स नशेसाठी वापरत असल्याने प्रिस्क्रिप्शनशिवाय देऊ नयेत

जनरल स्टोअर्समधून व्हाईटनर, स्टिक फास्ट यांसारखी औषधे विक्री करू नये.

एफडीएने अशा दुकानांवर अधिकाराचा वापर करून कारवाई करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसासाठी रात्री उड्डाण?

0
0

औरंगाबादः उपयुक्त ढग सापडल्यानंतर कृत्रिम पावसासाठी सध्या केवळ दिवसाच उड्डाण करण्यात येते. मात्र आता रात्रीही कृत्रिम पावसाचा प्रयोग करता येईल का, या संदर्भात प्रशासन चाचपणी करणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिली.

दोन आठवड्यांपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात येत आहेत. सूर्यप्रकाशात उपयुक्त ढगांची माहिती रडारकडून मिळाल्यानंतर ‌विमानाद्वारे क्लाउड सिडिंग करण्यात येत आहे. परंतु, अनेक ठिकाणी रात्रीही पावसाचे उपयुक्त ढग दिसतात, याचा उपयोग पाऊस पाडण्यासाठी होऊ शकतो काय याबाबत प्रशासनाची चाचपणी सुरू आहे. बुधवारी (१९ ऑगस्ट) विमानाने क्लाउड सि‌डिंगसाठी उड्डाण घेतले मात्र दुपारपर्यंत एक फेरी पूर्ण झाल्यानंतरही कुठेही फ्लेअर न उडवताच विमान परत आले. अशी परिस्थिती गेल्या आठ दिवसांपासून कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन विभाग, महापालिकेची रेल्वे अधिकाऱ्याला नोटीस

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध वृक्षतोड करून शेकडो पक्ष्यांचे जीव घेतल्याबद्दल संबंधित रेल्वे अधिकाऱ्याला वन विभाग आणि महापालिकेने नोटीस बजावली आहे. रेल्वे विभागाने या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर आगामी दोन दिवसात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. रेल्वे स्टेशन परिसरात दोन दिवसांपूर्वी पार्किंगलगतच्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. या फांद्यांवरील बगळ्यांची घरटी खाली पडून कित्येक पिले मरण पावली आणि बगळ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. वन विभागाने घटनेचा पंचनामा करून पक्षी वन्यजीव सरंक्षण कायदा १९७२ नुसार गायबगळे आणि लहान बगळयांच्या मुत्यूसाठी कलम ९ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

वन विभागाकडून रेल्वे विभागाला नोटीसही बजाविण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी सहाय्यक वनसंरक्षक ए.एन. येडलेवार हे करीत आहेत. रेल्वे विभागाकडून नांदेडचे विभागीय व्यवस्थापक ए.के. सिन्हा यांनीही चौकशी समिती नेमण्यात आली. याशिवाय, महापालिकेनेही या घटनेचे गांभीर्य ओळखले असून, पालिकेच्या उद्यान अधीक्षक व वृक्ष प्राधिकरण विभागाकडून रेल्वेला नोटीस बजावण्यात आली आहे. वृक्ष जतन कायदा, क्रमांक एक्सएलआयव्ही १९७५, कलम ८(१) चे उल्लंघन केल्याबद्दल ही नोटीस देण्यात आली असून, खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.

अवैध वृक्षतोडीप्रकरणात रेल्वे विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणात दोषींवर आगामी दोन दिवसांत कारवाई केली जाणार आहे. सदर प्रकरण गंभीर आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.

-ए.के. सिन्हा, विभागीय व्यवस्थापक, नांदेड रेल्वे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोने आवळला फास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनधिकृत बांधकाम व रेखांकन करून प्लॉट विक्री करणाऱ्या एका बिल्डरसह सहा जणांना सिडकोने नोटीस बजावली आहे. बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे, कोणत्या सक्षम प्राधिकरणाकडून परवानगी घेतली आहे, याची माहिती सात दिवसात सादर करा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन राज्य शासनाने शहरालगतच्या १८ महसुली गावातील १५,१८४ हेक्टरवर झालर क्षेत्र विकासित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली. झालरक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे विकासकाम, इमारत बांधकाम, पुनर्विकास, रेखाकंन यासाठी सिडकोची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. परंतु झालरक्षेत्रात काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे, रेखाकंन करून प्लॉटविक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. बेकायदा बांधकामे, रेखाकंन करून प्लॉट विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश सिडकोचे मुख्यप्रशासक सुनील केंद्रेकर यांनी दिले. त्यानूसार सिडकोचे वरिष्ठ नियोजनकार ए. व्ही. उईके, उपनियोजनकार अभिजीत पवार व पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे.

हर्सूल सावंगी परिसरातील नर्मदानगर येथील जगदंब गृहसंकुल हा ६० रो हाउसचा प्रकल्प सिडकोची मान्यता न उभारण्यात येत असल्याने अनधिकृत असल्याचे पवार यांनी सांगितले. ग्रीन झोनमध्ये उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम तातडीने थांबवावे, भूखंडच्या मालकी हक्काची कागदपत्रे सात दिवसाच्या सादर करावीत, अशी नोटीस बजाविण्यात आली आहे. याची पूर्तता न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा देण्यात आला आहे.

कृष्णापूरवाडी येथे अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या प्रगती प्रॉपर्टी, साई मिरॅकल, सावंगी गट नंबर २१७ येथे अनधिकृत प्लॉटिंग करणारे माऊलीनगराचे संचालक, नमर्दा बिल्डर्स, बालाजीनगर येथे प्लॉटिंग करून विक्री करणारे वैभव जगदाळे व त्यांचे साथीदार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जागेचा अद्ययावत सातबारा, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा नकाशा, बांधकाम परवानगी, सक्षम प्राधिकरणाने मान्य केलेले रेखांकन, नकाशा आदी कागदपत्रे सात दिवसात सादर करावीत, असे निर्देश सिडकोने दिले आहेत.

फसवणूक टाळण्याचे आवाहन

सिडकोची पूर्व परवानगी न घेता होणारी विकासकामे अनधिकृत आहेत. अनधिकृत कामांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. सिडको अधिसूचित क्षेत्रातील सदानिका, भूखंड खरेदी करण्याआधी ते बांधकाम, रेखांकन अधिकृत आहे की नाही, याची खात्री करून फसगत टाळावी, असे आवाहन सिडकोचे वरिष्ठ नियोजनकार ए. व्ही. उईके यांनी केले आहे.

नोटीस मिळाली नाही

सिडकोकडून कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही, असे प्लॉट व्यवसायिक वैभव जगदाळे यांनी सांगितले. कृष्णापूरवाडीची प्लॉटिंग कायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेअर ट्रान्सफर करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेअर ट्रान्सफर करण्याच्या बहाण्याने कोऱ्या कागदपत्रावर सह्या करून दांपत्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगला अंबादासराव देशपांडे (वय ५१, रा. ज्योतीनगर) यांनी व त्यांच्या पतीने १९९३ मध्ये एका कंपनीचे १०३ शेअर्स खरेदी केले होते. १ जानेवारी १९९३ ते ३१ डिसेंबर १९९४ या कालावधीत नागेश्वरवाडी येथे संतोष एकनाथ बनसोड, संकेत श्रॉफ व बाबासाहेब काशीनाथ देवकाते यांनी संगनमत करून देशपांडे दांपत्याचा विश्वास संपादन केला. त्यांच्या नावावर असलेले शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी त्यांनी कोऱ्या कागदपत्रावर देशपांडे यांच्या सह्या घेतल्या. मात्र, त्यांच्या खात्यावर शेअर्स ट्रान्सफर न करता दुसऱ्याच खात्यावर वळते केले. नुकताच हा प्रकार देशपांडे यांच्या लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध सावकार पप्पी महाराजला अटक

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध सावकारीचा गुन्हा दाखल असलेल्या पप्पी महाराजला आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे. सोमवारी कोर्टात शरण आलेल्या या आरोपीची कोर्टाने हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

नरेंद्रसिंग प्रीतमसिंग छतवाल उर्फ पप्पी महाराज (वय ५६, रा. मित्रनगर, सिंधी कॉलनी) याच्यावर १ जुलै रोजी अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उस्मानपुरा येथील सुखवीरसिंग चंडोक यांना एक लाख रूपये व्याजाने देत त्यांची चितेगाव येथील दोन एकर जमीन पप्पी महाराजाने नावावर करून घेतली होती. कर्जाची रक्कम परतकेल्यानंतरही त्याने चंडोक यांची जमीन त्यांना परत नावावर करून देण्यास नकार दिला होता. या प्रकरणी अखेर चंडोक यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट दाद मागितली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला होता. सोमवारी कोर्टापुढे तो शरण आला. कोर्टाने त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली होती. आर्थिक गुन्हेशाखेने कोर्टाकडे आरोपीला अधिक तपासासाठी ताब्यात देण्याची मागणी केली होती. या मागणीवरून बुधवारी कोर्टाच्या आदेशाने त्याला आर्थिक गुन्हेशाखेच्या ताब्यात देण्यात आले असून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय श्यामसुंदर कोठाळे, सुभाष खंडागळे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अपघातांत दोन जण ठार

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन विविध अपघातात जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. चौका घाट व ए.एस. क्लबजवळ या घटना अनुक्रमे मंगळवारी व शनिवारी घडल्या होत्या. रवींद्र देविदास पगडे (वय २५, मूळ रा. बिल्डा ता. फुलंब्री, सध्या रा. गादिया विहार) हा तरुण सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता गावाकडून औरंगाबादकडे दुचाकीवर येत होता. यावेळी चौका घाटात त्याच्या समोरून येणाऱ्या ट्रकसोबत धडक झाली. या अपघातात रवींद्र गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. मात्र,

त्याचा पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघाताची दुसरी घटना शनिवारी वाळूज रोडवरील ए.एस.क्बलजवळ घडली. रशिदाबी शेख सत्तार (वय ६० रा. साईनगर, पंढरपूर) ही महिला नातेवाईकासोबत दुचाकीवर जात होती. दुचाकीवरून खाली पडल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी मागवली ‘त्या’ चार शाळांची माहिती

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शालेय मान्यता आणि अभ्यासक्रमाविषयी क्रांतिचौक पोलिसांनी चार शाळांची माहिती त्या-त्या व्यवस्थापनाकडून मागवली असून या अनुषंगाने या शाळांना पोलिसांनी पत्र पाठवले आहे. आर. जे. इंटरनॅशनल, दिल्ली पब्लिक स्कूल, ग्लोबल डिस्कव्हरी, युनिव्हर्सल इंटरनॅशनल या शाळांविरोधात गेल्या दोन आठवड्यांपासून तक्रारी वाढल्या आहेत. या अनुषंगाने काही नागरिकांनी न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर व दाखल झालेल्या एफआयआरसंबंधी पुढील तपास पोलिसांना करायचा आहे म्हणून ही शाळांसंबंधी माहिती गोळा करण्यात येत आहे. शाळेला सीबीएसई मान्यता आहे का, मुलांची पटावरील संख्या किती, किती शिक्षक आहेत, शाळांचा परिसर किती, कोणता अभ्यासक्रम तेथे शिकवला जातो यासह इतर माहिती शाळांकडून मागविण्यात येत आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी चार शिक्षणविस्तार अधिकारीही नेमले असून त्यांनी शाळांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images