Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘राकाज्’ संदर्भात मागितली कागदपत्रे

$
0
0

औरंगाबाद : 'राकाज्'संदर्भात चौकशी करण्यासाठी उस्मानपुरा पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी बुधवारी सायंकाळी महापालिकेत दाखल झाले. त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली व राकाज् संबंधीच्या कागदपत्रांची मागणी केली. येत्या दोन दिवसांत आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले. राकाज् लाइफ स्टाइल क्लबच्या विरोधात महापालिकेने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज प्रथमच पोलिस अधिकारी महापालिकेत आले होते. 'राकाज्'बरोबर महापालिकेने केलेल्या कराराची प्रत, पंचनाम्याची प्रत, स्थानिक नागरिकांच्या तक्रार अर्जाची प्रत, जागेच्या मालकीहक्काबद्दलची कागदपत्रे आदी कागदपत्रांची मागणी पोलिसांनी केली. ही कागदपत्रे लवकर उपलब्ध करून दिली तर तपास गतीने करता येईल, असे पोलिसांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील दोन जणांना गुन्हे शाखेच्या प‌थकाने सोमवारी रात्री वाळूज एमआयडीसी भागात अटक केली. टोळीतील पाचजण पसार झाले आहेत. या टोळीने राज्यात अनेक ठिकाणी फक्त गोदाम किंवा कंटेनर लुटले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

रांजणगाव फाट्याजवळील मेटे यांच्या गोदामाजवळ एका स्कॉर्पियोमध्ये काही जण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून छापा टाकून राहुल दिनकर वाहूळ (वय २७ यशोधरा कॉलनी, औरंगाबाद) व चांद पाशा शेख बनु (वय ३२ रा. निजामगंज, औरंगाबाद) यांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून धारदार चाकू, लोखंडी गज, टॉमी, मिरची पूड जप्त करण्यात आले. पसार आरोपींमध्ये धीरज गुगळे रा. अहमदनगर, कबीर पठाण, गोपाळ मुराडे, शंकर वाघ व उद्धव राजदेव (रा. वाळूज) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरूद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याचा तयारीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत आवारे, अनिल वाघ, नंदकुमार भंडारे, शेख आरेफ, अशोक नरवडे, सिद्धार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, मनोज चव्हाण व धर्मराज गायकवाड यांनी केली.

या टोळीने दोन महिन्यांपूर्वी दौलताबाद परिसरात चालकावर चाकुहल्ला करीत कंटेनर पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र कंटेनरचालकाने जखमी अवस्थेतही कंटेनर गावाच्या दिशेने चालवल्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीमुळे दरोडेखोरांनी टेंपोमधून पलायन केले होते.

एलसीडी जप्त

या टोळीने पाच महिन्यांपूर्वी नगर एमआयडीसीतील बंद गोडाऊन फोडून टीव्ही, एलसीडी तसेच होम थियेटर्स असा माल चोरला होता. खडकेश्वर भागात मल्टीपर्पज स्कूलजवळ एका टेंपोमध्ये लपवून ठेवलेला हा साडेसात लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला.

गुगळे मास्टरमाइंड

या टोळीने अहमदननगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात गोडाऊन फोडल्याचे गुन्हे दाखल आहेत. धीरज गुगळे या टोळीचा मास्टरमाइंड आहे. या टोळीचा तो फायनान्सर देखील आहे. दुसरा आरोपी राहुल वाहूळ हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. गोंदी पोलिस ठाण्यात १६ जून २०१२ रोजी वाहनचालकाचा खून केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाडीमुळे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या छळाला कंटाळून तरूणीने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी छेडछाड करणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आहे. तरुणीच्या तक्रारीवरून त्याला पंधरा दिवसांपूर्वीही अटक केली होती.

सिडको परिसरातील एका तरूणीची दोन वर्षांपूर्वी आयटीआयचा विद्यार्थी स्वप्नील संतोष मनीयार (वय २३, रा. तुर्काबाद खराडी, ता. गंगापूर) याच्यासोबत ओळख झाली होती. आयटीआयनंतर तरुणीने कॉलेज बदलले होते. जुन्या ओळखीमुळे स्वप्नील लग्नासाठी आग्रह करून धमक्या देत होता. तरूणीच्या कुटुंबीयानी ३ ऑगस्ट रोजी तक्रार दिल्यानंतर सिडको पोलिसांनी त्याला अटक केली. जामिनावर सुटल्यानंतर त्याने तरुणीला मोबाइलवर मॅसेज, फोन करून धमकावणे सुरू ठेवले. याला कंटाळून तरुणीने तीन दिवसांपूर्वी विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरूणीला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पोलिसांनी स्वप्नीलला अटक केली असून सध्या हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस जमादार हिवाळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमसीसाठी ११ दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी अभियानासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रकल्प सल्लागार समितीची (पीएमसी) नियुक्ती करा, असे आदेश राज्य शासनाने महापालिकेला बुधवारी दिले. औरंगाबाद शहराचा 'अमृत' योजनेत समावेश झालेला असल्याने योजनेत करावयाच्या कामासंदर्भात गुरूवार व शुक्रवारी, दोन दिवस मुंबईत बैठक होणार आहे.

स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत बैठक झाली. पहिल्या दिवशी स्मार्ट सिटी अभियानाच्या संदर्भात चर्चा झाली, असे महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पीएमसीची नियुक्ती करा, असे आदेश मनीषा म्हैसकर यांनी दिले.

पीएमसीची नियुक्ती करून त्याची माहिती शासनाला कळवा, असे त्यांनी यावेळी सांगितले. औरंगाबाद महापालिकेने पीएमसी नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्र सरकारने अकरा पीएमसींची यादी दिली आहे. त्यातीलच एक पीएमसी नियुक्त करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. त्या सर्व पीएमसींना पत्र पाठवले जात आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार पीएमसीची नियुक्ती केली जाईल, अशी ग्वाही महापालिकेतर्फे देण्यात आल्याची माहिती पानझडे यांनी दिली. स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेसंदर्भात मुंबईत होत असलेल्या बैठकीसाठी पानझडे यांच्याबरोबर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार देखील गेलेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, सेंट्रल मेस सुरू करावी आदी मागण्यांबाबत वारंवार निवेदन दिल्यानंतरही विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बुधवारी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध केला. एसएफआयतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसएफआयतर्फे आठ दिवसांपासून धरणे आंदोलन, मोर्चा काढण्यात आला. यानंतर गुरुवारी काळ्या फिती लावून आंदोलन करत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात एक हजार क्षमतेचे नवीन वसतिगृह बांधावे, सेंट्रल मेस लवकर सुरू करावी, इतर विद्यापीठांप्रमाणे एम.फिल., पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात यावे, कमवा व शिका योजने मानधन १८०० रुपये करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

बुधवारी विविध विभागांमधील विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावत वर्गात प्रवेश केला. प्रशासकीय इमारती समोरही प्रशानसाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रमेश जोशी, नितीन वाव्हळे, रखमाजी कांबळे, अभिमान भोसले, सत्यजित मस्के, गणेश चव्हाण, मुकुंद शिंदे यांची उपस्थिती होती.

दौरा, दालनाचे नूतनीकरण आदींवर वारेमाप खर्च करणारे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आम्हाला अशा प्रकारे प्रशासनाचा निषेध करावा लागत आहे.

- सुनील राठोड, राज्य सचिव, एसएफआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार्लीच देऊ लागले शिक्षा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरिकांना तत्परतेने मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चार्ली पथकाने कायदा हाती घेत शिक्षाही स्वतःच देणे सुरू केले आहे. मंगळवारीच भोईवाड्यात दोन महिला चार्लींनी रिक्षाचालकाला मारहाण केल्याचे प्रकरण घडले होते. आता दुचाकीवरून जाणाऱ्या मुलांना महिला चार्लींनी भर रस्त्यावर उठाबशा मारण्याची शिक्षा सुनावल्याचा प्रकार उघड झाला. 'मटा'च्या एका वाचकाने हे छायाचित्र उपलब्ध करून दिले.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार अंदाजे २० ते २२ दिवसांपूर्वी दिल्लीगेट व्हीआयपी रोडवरून साधारण १२ ते १५ वर्षांची दोन मुले दुचाकीवरून जात होती. चार्ली पथकाने त्याना थांबण्याचा इशारा केला. पोलिसांना पाहताच या मुलांनी दुचाकी पळविण्याचा प्रयत्न केला. विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ या दोघांना चार्लींनी पकडले. त्यांना इतर वाहनधारकांसमोर चार्लींनी भर रस्त्यात उठबशा मारायची शिक्षा सुनावली. ही मुले उठाबशा मारत असताना एका जागरूक नागरिकाने मोबाइमध्ये हा प्रकार टिपला. वाहनधारकांना उठबशा मारायला लावण्याचा प्रकार यापूर्वी देखील बीड बायपास रोडवर दीड महिन्यापूर्वी घडला आहे. एका लग्नासाठी दुचाकीवर ट्रिपलसीट काही तरूण जात होते. त्यांना चार्ली पथकाने पकडले. त्यांना देखील रस्त्यावर उठबशा मारायवयास सांगण्यात आले. या तरूणांनी नकार देत दंड भरायची तयारी दर्शवली. मात्र, महिला चार्ली पथकाने उठबशा मारायचा हेका कायम ठेवला. या तरूणांचा एक नातेवाईक पोलिस दलात कार्यरत आहे. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत तो नेमका या परिसरातून जात होता. यावेळी त्यांच्या हा प्रकार निदर्शनास पडला. या अधिकाऱ्याने देखील चार्ली पथकाची या प्रकाराबद्दल चांगलीच कानउघडणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट

चार्ली पथकांची निर्मिती पोलिस आयुक्तांकडून करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हेशाखेचे नियंत्रण आहे. पोलिस अधिकारी त्यांच्या कामामध्ये थेट हस्तक्षेप करण्यास धजावत नाहीत. हस्तक्षेप केल्यास पोलिस आयुक्तांकडे तक्रार जाऊ शकते, या भितीने वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील तोंडावर बोट ठेवून याप्रकरणी गप्प आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहाच्या पानांत औषधी गुण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोहाचे झाड म्हटले की अनेकांना त्याच्या फुलांपासून तयार होणारी दारू आठवते. याच मोहाच्या पानांमध्ये 'अल्कोलाइड्स' आणि 'फिनॉल्स' हे औषधी गुणधर्म असतात, हे शासकीय विज्ञान संस्थेतील पठाण याहिया खान अमीर खान या संशोधकाने शोधले आहे. या संशोधनासाठी त्यांना 'नेचर मेडिसिन व्युईथ अलेक्झांडर ग्राहम बेल रिसर्च अवॉर्ड' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मोहांच्या फुलांबाबत सर्वसामान्यांना माहिती असते. परंतु, त्या झाडाच्या पानांमध्येही औषधी गुणधर्म असतात यावरील संशोधन दोन वर्षांपासून पठाण याहियाखान अमीरखान हे संशोधक करत आहेत. मोहाच्या पानातील दोन औषधी घटकांचा शोध लावून ते चार जीवांणूवर प्रतिबंधात्मक उपायासाठी उपयुक्त ठरतात, असे सिद्ध केले.

निमोनिया, डायरिया, ताप या आजारातील औषध निर्मितीसाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे नैसर्गिक घटक असल्याने शरीरावर उपायकार ठरत नाहीत. हे संशोधन 'अँटी बॅक्टेरियल अॅक्टेव्ह‌िटी ऑफ मिथेनॉलिक लिव्हज एक्सट्रॅक्ट ऑफ मधुका इंडिका' या नावाने प्रसिद्ध केले. त्यांच्या या संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. उपयुक्त अशा या संशोधनासाठी त्यांना इंटरनॅशनल एजन्सी स्टँडर्ड व रेटिंग्ज अँड फोटॉन फाउंडेशन अमेरिका यांच्यातर्फे दिला जाणारा 'नेचर मेडिसिन व्युईथ अलेक्झांडर ग्राहम बेल रिसर्च - २०१५ अवॉर्ड'पुरस्कार देऊन जागतिक पातळीवर गौरविण्यात आले. या पुरस्कारासाठी ते राज्यातून एकमेव विद्यार्थी ठरले. विज्ञान संस्थेतील डॉ. साहेरा नसरीन यांच्या मार्गदर्शनाखाली ते संशोधन करत आहेत. पठाण हे आपल्या संशोधनाचे पेंटट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून कॉलेजनेही त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

या बॅक्टेरियावर रामबाण उपाय

पठाण यांच्या संशोधनातील 'अल्कोलाइड्स' आणि 'फिनॉल्स' हे औषधी गुणधर्म 'ई कोलाय', 'एस.औरिअस', 'बी. सिरीअस', 'पी. ऑरोजीनोसा' अशा बॅक्टेरियावरील प्रतिबंधात्मक उपायांसाठी हे घटक उपयुक्त आहेत. जे निमोनिया, डायरिया, ताप, ज्वरसारख्या आजारांवरील उपचारांसाठी महत्वपूर्ण आहेत. हे सर्व घटक नैसर्गिक असून केमिकलयुक्त औषधांमध्येही त्याचा समावेश करता येतो. ज्यामुळे शरिरावर याचा साईड इफेक्टही होणार नाही.

आपल्याकडे अनेक वनस्पती अशा आहेत, ज्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जात आहे. माझे संशोधन सुरूच असून, हा संशोधनाचा पहिला टप्पा आहे.

- पठाण याहियाखान अमीरखान, संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसीच्या प्रवेशाचे ‘तंत्र’ बिघडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या (डी.फार्मसी) समुपदेशन फेरीचा पहिल्याच दिवशी बुधवारी फज्जा उडाला. रात्रभर प्रवास करून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. चार टप्प्यांत २०६९४ मेरिटपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते, प्रत्यक्षात तांत्रिक अडचणीमुळे ७ हजार मेरिटपर्यंतच्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देत प्रक्रिया बंद करण्याची वेळ तंत्रशिक्षणवर आली. आजचा प्रवेश उद्यावर गेल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी तासभर ठिय्या मांडला. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. प्रवेशाचे नियोजन न करता आल्याने राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची, पालकांची प्रचंड गैरसोय झाली.

तंत्रशिक्षण विभागातर्फे डी.फार्मसी प्रवेशासाठी बुधवार व गुरुवार असे दोन दिवस समुपदेशन फेरी घेण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ही फेरी सुरू आहे. पहिल्याच दिवशी वारंवार बंद पडणारे नेट, खराब प्रिंटर, वीज गुलमुळे जनरेटरसाठी उडालेली धावपळ अशा तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाच्या कारभाराचा फज्जा उडाला. यासह राज्यभर प्रक्रियेतील संथ गतीमुळे केवळ दिवसभरात सायंकाळपर्यंत केवळ ३३७ प्रवेश होऊ शकले. पहिल्या दिवशी चार टप्प्यांत मेरिटनुसार प्रवेश होतील, असे सांगत त्याचे वेळापत्रक तंत्रशिक्षणने जाहीर केले होते. त्यामुळे मेरिटनुसार विद्यार्थी प्रवेशासाठी कॉलेजमध्ये दाखल झाले होते. प्रवेशाला गती मिळाली नसल्याने पहिल्या टप्प्यातीलच प्रवेश सायंकाळी सातपर्यंत सुरू होते. वेळापत्रकानुसार हा टप्पा दुपारी १२ वाजता पूर्ण होणार होता. पुढचे टप्पे होणार नसल्याचे लक्षात आल्याने तंत्रशिक्षण विभागाने राज्यभरातील सहा केंद्रांवर सुरू असलेले प्रवेश थांबवून इतर टप्प्यातील प्रवेश गुरुवारी होतील, असे जाहीर करावे लागले. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.

आम्ही पहाटे सहा वाजता जळगावहून आले आहोत. आमच्या प्रवेशाचा टप्पा दुपारी बारानंतर होता, परंतु पहिलाच टप्पा सायंकाळी सातपर्यंत सुरू होता. आता गुरुवारी प्रवेश होतील, असे सांगण्यात आले.

- कुणाल पाटील

सकाळी सातपासून प्रवेशासाठी ताटकळत बसावे लागले. प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती. वारंवार तांत्रिक बिघाड यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला. तंत्रशिक्षणने एवढे विद्यार्थी बोलावणे नको होते.

- किरण घोगरे

बाहेरुन मुले, मुली प्रवेशासाठी येणार याची माहिती प्रशासनाला आहे. अशावेळी प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते. परंतु येथे कोणतीही व्यवस्था नाही.

- महेश जटाळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तूर @ १४०

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाअभावी त्रस्त झालेल्या नागरिकांना आता डाळींच्या भाववाढीला सामोरे जावे लागत आहे. ऐन सणासुदींच्या काळात तुरीसह सर्वच डाळींचा भाव किरकोळ बाजारातील दर १४० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षी आतापर्यंत केवळ ३५ क्विंटल तूर व मूग यांची आवक झाली.

देशामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये तुरीच्या डाळीचे उत्पादन होते. पावसाअभावी तेथेही उत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम डाळीच्या दरावर झाला. पुढील काळामध्ये दरवाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे व्यापारी संजय कांकरिया यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल दर १० हजार १०७ रुपयांपर्यंत गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दुष्काळ आणि गारपिटीमुळे सध्या तूर, मूग आणि इतर डाळींची आवक घटली आहे. या डाळींच्या दरात क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांची तर भाजलेल्या डाळीच्या दरात ४० किलोमागे ८० ते १०० रुपये दर वाढ झाली आहे.

सार्वजनिक कंपन्यांच्या माध्यमातून आयात

यंदा देशात कमी पावसाचा अंदाज आहे. त्यात कॅनडा, ऑस्ट्रेलिया येथील डाळींचे उत्पादन घटले आहे. परिणामी जागतिक पातळीवरच डाळींचे भाव वाढत चालले आहेत. भारतात दरवर्षी १.८ ते १.९ कोटी टन डाळ उत्पादन होते. तरीही स्थानिक गरज भागविण्यासाठी ३० ते ४० लाख टन डाळ आयात करावी लागते. आजपर्यंत ही आयात खासगी व्यापाऱ्यांमार्फत केली जात असे. यंदा मात्र 'एमएमटीसी'सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमार्फत ही आयात केली जाणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...मायेचा जरतारी धागा!

$
0
0

औरंगाबाद टाइम्स टीम

श्रावण सण सोबत घेऊन येतो. नागपंचमीनंतर राखीपौर्णिमेचे वेध लागतात. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. यंदा राख्यांच्या किंमती १५ ते २० टक्के वाढ झाली असून, २९ ऑगस्टपर्यंत २ कोटींपर्यंत उलाढाल होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली.

औरंगपुरा, गुलमंडी, कुंभारवाडा, रंगारगल्ली, उस्मानपुरा आणि गजानन महाराज मंदिर परिसरात राख्यांची दुकाने सजली आहेत. सकाळी व संध्याकाळी राखी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. कार्टूनच्या राख्यांवर हनुमान, छोटा भीम, कृष्णा आणि डोरेमन, ‌मिकी अँड डोनाल्ड, छोटू-मोटू स्वार झालेत.

छोटू-मोटू राख्या १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत. साध्या रेशमी धाग्याच्या राख्या ५ ते १५ रुपये, स्टोन व मोत्यांच्या राख्या सुमारे २० ते ६० रुपये आणि कार्टूनच्या राख्या २० ते ८० रुपये प्रति नग विकल्या जात आहेत.

बच्चेकंपनी कार्टूनच्या राख्यांना पसंती देत आहे. तर युवती स्टोन, मोत्यांच्या राख्यांची मागणी करत आहेत. कार्टून व स्टोनमध्ये लुंबा, जरदोसी, रेशमी राख्यांनाही चांगली मागणी आहे.

औरंगाबादमध्ये राख्यांच्या अनेक प्रकारची निर्मिती होते. तसेच हैदराबाद, दिल्ली, मुंबई येथून राख्यांची आयात होते.

गिफ्ट, कार्डचे आकर्षण

भाऊ बहिणीला भेट देतो. आता बहिणही भाऊरायाला गिफ्ट देत आहे. तशी पद्धत अलीकडे रूढ झाली आहे. त्यासाठी फ्रेम, स्क्रोलसह विविध ग्र‌िटींग कार्ड बाजारात आले असून, यांची किंमत सुमारे २० ते २०० रुपयांपर्यंत आहे, असे औरंगपुरा येथील व्यापारी सुहास देशपांडे यांनी सांगितले.

पूजा थाळी

राखीपौर्णिमेनिमित्त हळद-कुंकू, गिफ्टसह सजलेल्या आकर्षक थाळी बाजारात आल्या आहेत. या थाळीची किंमत सुमारे १५० ते ३५० रुपयांच्या दरम्यान आहे. मोती, अक्षदा आणि सजलेली थाळी मुलींना अधिक आकर्षित करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो बोलका हवा!

$
0
0

मोबाइल फोटोग्राफी वर्कशॉपमध्ये मिळाल्या स्मार्ट टिप्स्

औरंगाबाद टाइम्स टीम

'आयुष्यातल्या अविस्मरणीय क्षणांना टिपण्याचे उत्तम माध्यम म्हणजे कॅमेरा. त्या क्षणांच्या आठवणी कायम आपल्या जवळ राहाव्यात म्हणून टिपलेला फोटो बोलका असावा', अशा टिप्स् अनेक टिप्स छायाचित्रकार महेंद्र डेंगळे यांनी दिल्या. महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित फोटोग्राफी कार्यशाळेत ते बोलत होते. 'गरवारे कम्युनिटी सेंटर' या कार्यक्रमाचे व्हेन्यू पार्टनर होते.

जागतिक छाय‌ाचित्र दिनाचे (१९ ऑगस्ट) औचित्य साधत 'मटा'ने सिडकोच्या गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये ही कार्यशाळा झाली. कार्यशाळेत सर्व वयोगटातील हौशी फोटोग्राफर, ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले. आज प्रत्येकाजवळ 'हाय लेन्स' कॅमेरा नसला तरी मल्टीमीडिया हॅँडसेट असतोच. मित्राचा वाढदिवस, ट्रीप, घरातली पूजा ते सेल्फी असे अनेक फोटो आपण रोज क्लिक करतो. रस्त्यांवरचे अपघात, खड्डे आदींचे फोटो काढत फेसबुकवर पोस्ट करतो. या माध्यमातून सामाजिक समस्या चव्हाट्यावर आणतो. मात्र, प्रत्येकाचा फोटो बोलका, शास्त्रशुद्ध असेलच असे नाही. त्यामुळे फोटो काढूनही हवा तो अर्थ मिळत नाही, परिणाम साधत नाही. मग फोटो टिपताना काय काळजी घ्यायची, कोणते तंत्र-पद्धत वापरायची या टिप्स यावेळी छायाचित्रकार डेंगळे यांनी दिल्या.

* फोटो काढण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स्

>> फोटोसाठी प्रकाश व्यवस्था उत्तम हवी. सूर्यप्रकाशात येणारे फोटो सर्वोत्तम फोटो असतात.

>> फोटो घेण्यापूर्वी फोटोमध्ये काय आवश्यक आहे याचा विचार करा व मगच फोटो फ्रेम बनवा.

>> फ्रेमनुसार फोटोचे पोट्रेट व लॅँडस्केप असे प्रकार पडतात. फ्रेम लक्षात घ्या मोबाइल उभा किंवा आडवा करा.

>> फोटोची पार्श्वभूमी महत्त्वाची. एखादी वास्तू व तुम्ही असा फोटो काढायचा असेल तर त्या वास्तूपासून दूर उभे रहा. तेव्हाच ती जागा व तुम्ही असा योग्य फोटो येईल.

>> वेगवेगळी देखावे, निसर्ग, फुलांच्या बागा यांना मोबाइलमध्ये क्लिक करा. आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात ताण दूर करणारा हा उत्तम व्यायाम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपातविरोधी मोहिमेबाबत निरुत्साह

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

गर्भलिंग तपासणी व गर्भपातविरोधी मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आरोग्य विभागाचे काही अधिकारी फारसे उत्सुक नसल्याचे गुरुवारी पार पडलेल्या आढावा बैठकीप्रसंगी निदर्शनास आले.

अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत बाबरे, अॅड. यु के. गंगणे, डॉ. स्मिता शहापुरकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवून कर्तव्याचे पालन केले. तर अन्न व औषध प्रशासनाला ही आढावा बैठक तितकीशी महत्त्वाची वाटली नाही.

वारंवार सूचना देऊनही संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित राहत नसतील तर त्यांचेविरुद्ध कारवाई करावी लागेल. शिवाय या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचावरील कार्यालयलासुद्धा याची प्रत देण्याचे निर्देश या वेळी अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले.

जिल्ह्यात गर्भपातबाबत विकल्या जाणाऱ्या विविध औषधांचा सविस्तर माहिती या आढावा बैठकीत सादर करण्याबाबत सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांना कळवून सुद्धा ते या बैठकीला हजर राहिले नाहीत किंवा त्यांनी माहितीही सादर केलेली नाही.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यबादल ही अडचण दाखवून या बैठकीला दांडी मारत असल्याचे या वेळी दिसले. परिपूर्ण माहिती नसलेला एक प्रतिनिधी पाठवून ते कामचुकारपणा करीत असल्याचे यातून स्पष्ट जाणवते.

गर्भलिंग तपासणी विरोधी मोहिम व गर्भपातविरोधी मोहिम विशेष करून जिल्ह्याच्या उमरगा, मुरुम या सीमावर्ती भागात राबविणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात तसे प्रयत्न होताना दिसत नाही.

गर्भतपासणी सेंटर (सोनोग्राफी चिकित्सा सेंटर) व गर्भपात सेंटरची माहिती हस्तगत करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावरही या वेळी चर्चा झाली. खबऱ्यांची संख्या वाढवून माहिती हस्तगत करण्याचे या वेळी ठरले. यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या (ऑटोरिक्षा, सहा आसनी रिक्षा, जीप) ड्रायव्हर बरोबर सलगी वाढवून किंवा त्यांना विश्वासात घेऊन बेटी बचाओ मोहीम अधिक सक्रीय करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

जिल्ह्यात सोनोग्राफीचे अधिकृत नोंदणीकृत ६६ सेंटर आहेत. यापैकी ५० सेंटर कार्यरत आहेत. २०१५ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात एकाही सेंटरवर गैरप्रकार आढळून आलेला नाही. एका सेंटरवर काही तांत्रीक त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांचे दप्तर जमा करण्यात आले.



अन्य वकिलांच्या नियुक्तीचा प्रस्ताव

एप्रिल २०१४ ते २०१५ दरम्यान पीसीपीएनडीटी कायद्यान्वये २६ केसेस उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. सात प्रकरणात शासनविरोधी तर १३ प्रकरणात शासनाच्या बाजून निकाल लागला आहे.पीसीपीएनडीटी संदर्भातील केसेस चालविण्यात सरकारी वकील फारते उत्सूक नसतात. त्यामुळे अशी प्रकरणे चालविण्यासाठी अन्य वकीलांची नियुक्ती करण्याबाबतच्या प्रस्तावावर या वेळी विचार करण्यात आला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानाचे स्थलांतर हायकोर्टाकडून रद्द

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

देशी दारूचे दुकान पुण्याच्या नवाब खडकीहून नांदेड जिल्ह्यातील हनेगाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या.पी. आर. बोरा यांनी राज्य शासनाला दिले आहेत.

देगलूर तालुक्यातील हनेगाव येथील ग्रामस्थ माणिक टोके व छबुबाई पाकळे यांनी जनहित याचिका केली. ६ हजार १२२ लोकसंख्या असलेल्या गावात सध्या ४ दारूचे दुकान कार्यरत आहेत. ग्रामपंचायतने दारूबंदीचा ठराव १५ ऑगस्ट २०११ रोजी संमत केला होता. गावातील दारूचे दुकाने हटविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रतिवादी रमेश पाटील व मनोज गौड यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे खडकी बाजारचे देशी दारूचे दुकान हनेगाव येथे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव दाखल केला. घरमालकाने भाडे करार करून दिला नाही असे कारण त्यांनी अर्जात दिले. जिल्ह्याधिकाऱ्यांनी अर्ज मंजूर केला. दरम्यान, पाटील व गौड यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. पण त्यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका करण्यात आली ही बाब लपविली. औरंगाबाद खंडपीठाने मुंबई हायकोर्टात दाखल केलेली सर्व कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश दिले होते पण त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही. कोर्टाने देशी दारूचे दुकान स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द केला. लोकसंखेच्या प्रमाणात किती दारूचे दुकान असावेत यासाठी मार्गदर्शक धोरण राज्य शासनाकडे नाही. जनहितासाठी राज्य शासनाने असे धोरण तयार करावे अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली. याचिकाकर्त्यांची बाजू अनिल कासलीवाल यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालय योजनेत नांदेड अव्वल

$
0
0

जिल्हा परिषदेला २१ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी घर तेथे शौचालय ही योजना राबविली जात आहे. या योजनेत गेल्यावर्षी नांदेड जिल्ह्याने ६० हजार शौचालय बांधून राज्यात पहिला क्रमांक पटकाविला होता. चालू वर्षातही एप्रिल ते जुलै या चार महिन्यात नांदेड जिल्ह्यात १६ हजार शौचालये बांधली असून नांदेड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगल गुंडले यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक स्वरुपात स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. यात नांदेड जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षात सुमारे ६० हजार शौचालयाची जिल्ह्यात निर्मिती करण्यात आली. यामध्ये ३५ ते ४० हजार शौचालये स्नानगृहासह बांधण्यात आली आहेत. एवढया मोठया प्रमाणात शौचालये बांधली गेली. परंतु, पुरेशा प्रमाणात अनुदानाचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हयास प्राप्त झाला नव्हता. परंतु, जिल्हा परिषदेच्या वतीने वारंवार निधीसाठी मागणी करण्यात आली आहे. यामुळे आता शौचालय बांधकामाचे २१ कोटी रुपयांचे अनुदान बिडीएसवर प्राप्त झाले आहे. हा निधी लवकरच लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे गुंडले यांनी सांगितले.

शौचालय बांधकामात राज्यात पहिल्या पाचमध्ये नांदेड, उस्मानाबाद, बुलढाणा, यवतमाळ व सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत नांदेड जिल्ह्यात १६ हजार ७८८ शौचालये बांधण्यात आली आहेत. उस्मानाबाद दहा हजार ८११, बुलढाणा ९ हजार २३१, यवतमाळ पाच हजार ४९२, तर सांगली जिल्ह्यात पाच हजार ८१३ शौचालये बांधण्यात आली आहेत. मराठवाडयात नांदेड व उस्मानाबाद वगळता इतर जिल्ह्याने बांधलेली शौचालये याप्रमाणे औरंगाबाद दोन हजार ९८९, बीड दोन हजार ५१७, लातूर दोन हजार ५०१, परभणी तीन हजार १३४, हिंगोली दोन हजार ११२ तर जालना जिल्ह्यात एक हजार ४५ शौचालय बांधकाम केल्याची नोंद शासनाच्या संकेतस्थळावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरमध्ये अंनिसच्यावतीने धरणे आंदोलन

$
0
0



लातूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली.



म. टा. प्रतिनिधी, लातूर

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटनाच्यावतीने गुरुवारी नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यावा आणि जी विचारसरणी आणि संघटना डॉ. दाभोलकरांच्या विचाराला व कार्याला विरोध करीत होती. त्यांची कसून चौकशी करावी, शासनाने या बाबत मत जाहीर करावे या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण झाली. परंतु, त्यांचे मारेकरी सापडत नाहीत. याबाबत सर्वच वक्त्यांनी संताप ही व्यक्त केला. अंनिस आणि समविचारी संघटनाच्या सदस्यांनी सकाळी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदनावर निर्भय वॉक असे अभिनव आंदोलन केले. त्यासोबतच दुपारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

या वेळी अनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, जिल्हा सचिव प्रकाश घादगीने, रामकुमार रायवाडीकर, शहराध्यक्ष वैजनाथ कोरे, रामकुमार रायवाडीकर आदि प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेकजण उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंधारे, नदीच्या पाणीसाठ्यात वाढ

$
0
0

लातूर जिल्ह्यातील तीन दिवसांपासून दिलासादायक पाऊस; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

नारायण पावले

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. या पावसाचा खरीपाच्या पिकाला अत्यल्प फायदा होणार असला तरी सुद्धा काही शेतकरी पुन्हा पेरणीचा प्रयोग करीत आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील लातूर आणि निलंगा तालुक्यातील बंधाऱ्यामध्ये पाणी साठले आहे. त्यासोबतच औसा तालुक्यातील उजनी येथील तेरणा नदीत पाणी साठले आहे.

गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा, रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळला आहे. बुधवारी रात्री उशीरापर्यंत जिल्ह्याच्या दहा तालुक्यात पाऊस सुरू होता. गुरुवारी सकाळीपर्यंत जिल्ह्यात सरासरी २०४.८२ मिलिमीटर इतका पाऊस झाला. या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या साखळीमधील लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ, निलंगा तालुक्यातल डोंगरगाव आणि धनेगावच्या नदीच्या ४० किलो मिटर पात्रात दीड मिटर इतके पाणी साठले असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे उपअभियंता प्रकाश फंड यांनी दिली. या पाण्यामुळे या परिसरातील जनावऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

औसा तालुक्यात गेल्या उन्हाळ्यात भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या खासदार निधीतून तेरणा आणि तावरजा नदीच्या खोलीकरण, रुंदीकरणाची मोठी कामे झाली आहेत. औसा तालुक्यातील तेरणा नदीच्या खोलीकरणाचे काम याच निधीतून केले असल्याची माहिती माजी आमदार पाशा पटेल यांनी दिली.

यावेळी पाशा पटेल म्हणाले, 'खासदार काकडे यांच्या निधीतून उजनी येथील तावरजा नदीचे साडेतीन किलोमिटर लांबीचे पात्र १२ फुट खोल, १०० फुट रुंद, करण्यात आले आहे. या कामांसाठी उजनी ग्रामस्थांनी सुद्धा साडे चौदा लाख रुपये लोकवर्गणी जमा केली होती. सरकारने या कामासाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या चार दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस पडला. त्याचा फायदा तेरणा नदीचे पात्रातील पाणीसाठयात वाढ होण्यासाठी झाला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखिल भारतीय बगळे समाजाचे माणूस लोकांना जाहीर निवेदन

$
0
0

प्रा. जयदेव डोळे

आमचे चुकलेच! रेल्वे स्थानकातील पार्किंगमध्ये शिस्तीत उभ्या असलेल्या मोटारसायकलींवर आमच्याकडून विष्ठा पडत होती म्हणून माणूस लोकांनी आमचे रेसिडेन्स कम् पार्किंग पाडून टाकले; आम्हाला चांगला धडा शिकविला याबद्दल जाहीर आभार. आमचे जास्ती चुकले ते शहरात वेड्यावाकड्या उभ्या असलेल्या मोटारसायकलींवर आम्ही विष्ठा टाकली नाही, हे. आम्ही आमच्या चिल्ल्यापिल्ल्यांना शहराची वाहतूक सुधारणा करायला अशा पद्धतीने विष्ठा प्रदान करायला शिकवायला हवे होते. पण कोणी चांगला प्रशिक्षक मिळेना. तुम्ही खालून बघत असाल की आम्ही उलट्या व्ही आकारात उडतो. कोणी रांग मोडत नाही की पुढे घुसायच्या प्रयत्नात असत नाही. खाली जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला इंग्रजी बाराखडी शिकायला मिळते इतकी अक्षरे तुम्ही माणसे रस्त्यावर तुमच्या वाहनातून काढत असता. तुमच्यातील काही कवी आमच्यावर कविता रचता. 'बगळ्यांची माळफुले अजुनि अंबरात' असे काहीसे गाणे कोणीतरी गात असते. ते गाणे वा. रा. कांत या मराठवाडी कवीने रचल्याचेही ऐकून होतो. त्यामुळे औरंगाबादच्या रेल्वेस्थानकाविषयी आम्हाला जरा आपुलकीच वाटे. कसचे काय!

आम्हाला बदनाम करणारे ही माणूस लोकात कमी नाहीत. बकध्यान, बकमुद्रा असे आम्हाला हिणवले जाते. का तर म्हणजे पाण्यात आम्ही शांत, निश्चल उभे असतो अन् पटकन मासा पकडतो. आमचा एक पाय वर उचललेला असल्याने आमची तुलना एका पायावर योगसाधना करणाऱ्या साधूशी करतात. म्हणून बकध्यान किंवा बकसाधना.

बाकी मनुष्यहो, तुम्ही चिमण्यांना हाकलून लावले. कावळे देखील शहरात प्रचंड उकिरडा असताना दिसेनासे झाले. धन्य आहे तुमची. हार पळवणाऱ्या कावळ्याची जागा आता मंगळसूत्र चोर घेऊ लागले, आनंद आहे! आम्हा पक्ष्यांची बदनामी वाचली. तुम्ही तो चातक घालवला. पाऊसही घालवला. झाडे तोडून इतक्या इमारती बांधल्या की, पारवे, कबुतरे हे राष्ट्रीय पक्षी बनू लागले. बिनकामाचे हे पक्षी तुमच्या काचा, कठडे, गच्ची अन् खोल्या घाण करून सोडतात. पण तुम्ही आपले घर कसे पाडाल? तुमचे कार्यालय पाडाल का? सिमेंट कॉक्रिटचे जंगल वाढले की हे पारवे घाण करायला जन्मतात, पण तुम्ही त्यांचे लाड करता. आम्ही तर फक्त तुमच्या स्वयंचलित दुचाक्यांवर विष्ठा टाकायचो. बरे ते दुचाकीस्वार पार्किंगकडे येताना, जाताना पचापचा थुंकून रस्ते, कोपरे, जिने, खिडक्या, बेसिन, संडास घाणेरडे करतात. हे काय आम्हाला माहीत नाही? पण तुमची जीभ कोण हासडणार? तुमचे थोबाड कोण दाबणार?

आणि ते रेल्वेमधील संडास बघता ना? तुम्हाला माहितच आहे, हे पार्किंगवालेच या संडासाच्या दुर्दशेला जबाबदार असतात. त्या संडासाच्या कडेला बसून शौच करणाऱ्यांबद्दल काय बोलणार? कोण बोलणार? उघड्यावर विष्ठाप्रदान करणाऱ्यांची घरे पाडाल तुम्ही? कसे पाडाल म्हणा. त्यांची मते हवी असतात ना तुम्हाला. आम्हाला मतदान काही करता येत. नाही तर आमच्यातही बगुलाभगत, बकवृत्ती, बकचर पैदा झाले असते, नाही का? पांढरा पोशाख दुसरे काय होऊ देणार ? तुमच्या एका फोटोग्राफरने आम्ही गर्दी करून बसलेल्या एका झाडाचा फोटो काढून बक्षीस ('बक'शीस ?) मिळवल्याचे आम्ही ऐकून होतो. आनंद झाला होता. अभिनंदनाचा ठरावही आम्ही केला होता. पण त्या फोटोग्राफरचा पत्ताच सापडला नाही. ना कोणी चिऊताई त्याची शेजारीण, ना कोणी कावळेदादा. घुबडेकाका रात्र रात्र जागून लक्ष ठेवायचे. आता कोठेतरी दूर गेले म्हणे.... विचारू कोणाला? शेवटी अभिनंदन राहून गेले करायचे. आता काढ म्हणावे आमच्या फुटलेल्या अंड्याचे अन् मरून पडलेल्या पिलांचे फोटो. १७ ऑगस्ट हा दिवस तुम्ही पक्षी हत्यादिन म्हणून पाळावा असा ठराव उरलेल्या काही बगळे बांधवांकडून मंजूर करवून घेतला आहे. विचार करावा ही विनंती.

(कृपया पक्ष्यांसाठी शौचालये बांधण्याची सूचना महापालिकेकडे करून नये. त्यातही भ्रष्टाचार होऊन आमची फुकट बदनामी होईल याची जाणीव करून देत आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांसाठी प्रथमच एकजूट

$
0
0

रेल्वे स्टेशन पार्किंगमधील झाड तोडल्याने पक्ष्यांचा बळी गेला. त्याच्या न‌िषेधार्थ पक्षीप्रेमींनी काळ्या फिती बांधून मोर्चा काढला.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे प्रशासनाने मनमानी पद्धतीने झाडांवर कुऱ्हाड चालविली. त्यात असंख्य निष्पाप पक्षी बेघर झाले. त्यांच्या पिलांचा अकाली मृत्यू झाला. या प्रकारामुळे गहिरवलेल्या औरंगाबादकरांनी रेल्वे विभागाविरुद्धचा संताप मूकमोर्चाच्या माध्यमातून व्यक्त केला. यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तराळले.

रेल्वे स्टेशनच्या पार्किंग परिसरातील दोन झाडांची संपूर्ण छाटणी केली. त्यामुळे झाडांवरील असंख्य निष्पाप पक्षांचे संसार मोडले. ६० ते ७० पिलांचा मृत्यू झाला. या निर्दयी प्रकाराचा निषेध करण्याबरोबर शहरातील झाडांची कत्तल थांबविण्यासाठी विविध संस्था, संघटना आणि पर्यावरणप्रेमी नागरिक गुरुवारी रस्त्यावर उतरले. गेल्या काही वर्षांत नागरिकांनी अशा स्वरुपाचा पुढाकार प्रथमच घेतला.

सकाळी आठच्या सुमारास पर्यावरणप्रेमी स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी एकत्र आले. त्यानंतर त्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून दुचाकी पार्किंगपर्यंत मूकमोर्चा काढला. त्यांच्या हातात झाडे तोडल्याचा निषेध करणारे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक होते. तोडलेल्या झाडापर्यंत मूकमोर्चा पोचला. तेथे काहींनी मेणबत्त्या लावून पक्ष्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर श्रद्धांजली सभा घेण्यात आली. त्यावेळी काहींचे डोळे पाणावले. प्रयास ग्रुप, निसर्ग मित्र मंडळ, व्हिजन आशा ग्रुप, जैन इंजिनीअरिंग सोसायटीचा वी फॉर इन्व्हायरमेंट ग्रुप, क्षत्रीय राठोड समाज सेवाभावी संस्था, एज्युकेश रिसर्च फाउंडेशन अॅकॅडमी, पाेलिस सै‌निक प्र‌शिक्ष्ाण्ा केंद्र, सृष्टी संवर्धन सेवाभावी संस्था, मराठवाडा गुणवंत कामगार संघटना यांसह अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक, तरूण, तरुणी, प्रवासी आदींनी या मोर्चात सहभाग घेतला. यावेळी निसर्ग मित्र मंडळाचे मानद वनसंरक्षक दिलीप यार्दी, आश्विनी यार्दी, निर्मल दादा, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, प्रयासचे प्रकाश कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, प्रीतम चव्हाण, सागर शिंदे, यासह अतुल यावलकर, मनोज शहा, कमल पठाडे, प्रिती शहा, राजेश बंग, मोनिका चहाला, अक्षय शिंदे, आकाश पडळकर, शिवानी चहाला, पूजा गिरे, राजेश गव्हाणकर, निरज बडजाते, मेघना बडजाते, संजय जोहापूरकर, अॅड. ए. के. आगळे, पक्ष्ाीमित्र किशोर पाठक यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात परतण्याची सक्ती नको

$
0
0

डॉक्टरांची खंडपीठात याचिका

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मायदेशीच आले पाहिजे, अशी अट घालणाऱ्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेत केंद्र शासन व मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांनी दिले आहेत.

केंद्राच्या ४ ऑगस्टच्या अधिसूचनेला सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स (मार्ड) यांच्यासाठी डॉ. सागर मुंदडा व डॉ. अय्युब मगदूम यांनी आव्हान दिले. ही अधिसूचना घटनेच्या कलम १४,१९ व २१ अन्वये हा निर्णय मूलभूत हक्कांवर गदा आणणारी आहे. केंद्र सरकार आयआयटी, आयआयएम, वकील अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर खर्च करते. त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांसाठी नियम सारखे असावेत, असे याचिकेत म्हटले आहे.

खंडपीठाने मेडिकल काउन्सिलला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिल्यानंतर काउन्सिलतर्फे एस. के. कदम उपस्थित झाले. खंडपीठाने केंद्र शासन व मेडिकल काउन्सिलला नोटीस बजावून शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे रामेश्वर तोतला, राहुल तोतला, स्नेहल तोतला. मेडिकल काउन्सिलतर्फे एस. के. कदम व केंद्र शासनातर्फे संजीव देशपांडे हे काम पहात आहेत.



अधिसूचनेत 'नोरी' प्रमाणपत्राला नकार

भारतातील अनेक विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. शिक्षणानंतर त्यांना भारतीय दुतावासातर्फे 'नोरी' (नो ऑब्जेक्शन टू रिटर्न इंडिया) प्रमाणपत्र घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अथवा अनुभव घेण्यासाठी तेथेच थांबण्याची मुभा दिली जात होती. अर्जावर अंतिम परवानगी देण्यासाठी दोन साक्षीदारांचे शपथपत्र व पाच लाख रुपयांच्या बाँडची पूर्तता करावी लागे. या प्रमाणपत्रामुळे अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या व्यक्तीस वैद्यकीय व्यवसाय करता येतो. असे असताना ४ ऑगस्ट २०१५ रोजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार देणारी अधिसूचना काढली. वयाच्या ६५ वर्षांनंतर परदेशात राहता येईल. त्यापूर्वी मात्र राहता येणार नाही, असे अधिसूचनेत म्हटले आहे.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्धापन दिनानिमित्त ‘ओपन डे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'ओपन डे'मुळे विभागांमधील संशोधन, प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्य पाहण्याची संधी २२ व २३ ऑगस्ट रोजी सर्वसामान्यांना नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक आपला विभाग सजविण्यासाठी धावपळ करत आहेत.

विद्यापीठाचा ५७वा वर्धापन दिन २३ ऑगस्ट रोजी आहे. त्यानिमित्त विद्यापीठात 'ओपन डे' संकल्पना राबविली जाते. विद्यापीठांमधून होणारे संशोधन, प्रयोगशाळा, तेथील कामकाज, शैक्षणिक साहित्य, ग्रंथसंपदा आदी माहिती सर्वसमान्य नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून हा उपक्रम राबविला जातो. २२ व २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे सर्व विभाग सर्वांसाठी खुले असतात. विद्यापीठात ४२ विभाग असून, सर्व विभागांनी 'ओपन डे'ची तयारी सुरू केली आहे. विभाग सजविणे, आपल्या विभागातील ग्रंथसंपदा, प्रयोगशाळांची माहिती देणारे फलक, शोधप्रबंध यांची अधिकाधिक आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात येत आहे. प्रदर्शनातून ही माहिती सर्वांपर्यंत पोचविली जाते.



विनोद तावडे, प्रा. राम शिंदेंची उपस्थिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापनदिन शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. यावेळी सहा जणांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रांरभी सकाळी पावणेनऊ वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर विद्यापीठाच्या नाट्यगृहात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images