Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वसतिगृहांत प्रवेश नाकारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रियेत निवड झालेल्या ३० विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवेश न मिळाल्याने या गरजू विद्यार्थ्यांना भाड्याच्या रुममध्ये राहण्याची वेळ आली आहे. वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाकडे धाव घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही केली जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, असे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह अनेक नामांकित शैक्षणिक संस्था शहरात असल्याने ग्रामीण भागातून; तसेच अन्य शहरांतून अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. सर्वच विद्यार्थ्यांना खासगी वसतिगृहात राहणे शक्य नसते. त्यामुळे मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला-मुलींची शिक्षणाची व राहण्याची सोय व्हावी म्हणून समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यात १७ वसतिगृहे चालविण्यात येतात. वसतिगृहांत प्रवेश मिळावा म्हणून शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच गरजू विद्यार्थी प्रयत्नशील असतात. जात, प्रवर्गनिहाय आणि विविध अभ्यासक्रमांनुसार ठरलेल्या कोट्यात विद्यार्थ्यांना मेरिटनुसार प्रवेश दिला जातो. गेल्या काही वर्षांपासून प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यावर्षी आतापर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश देण्यात आला, परंतु ऑनलाइन प्रक्रियेत निवड झाल्यानंतरही तब्बल ३० विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांना आता राहायचे कुठे? भाड्याने खोली कशी घेणार, पैसे कोठून आणणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. बहुतांशी विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट अाहे. हे विद्यार्थी इंजिनीअरिंग, व्यावसायिक शिक्षणासाठी शहरात आले आहेत.

शासकीय वसतिगृहांत प्रवेश मिळाला असता तर, निवास, भोजनाची व्यवस्था झाली असती. उपलब्ध असलेल्या अन्य सुविधांमुळे मोठा आर्थिक हातभार शिक्षणासाठी लागला असता, पण प्रवेश न मिळाल्याने पुढे काय करावे, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाकडे धाव घेतली आहे.

प्रवेश यादीत नाव असूनही प्रवेश मिळाला नाही, अशी तक्रार काही जणांनी केली आहे. यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने व मेरिटनुसार केली जात आहे. कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

- जे. एस. एम. शेख, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जूनपासून भूखंड वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत शेंद्रा येथे अवघ्या १० महिन्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यात येणार असून, उद्योजकांना जून महिन्यापासून भूखंड वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर वर्षभरात औद्योगिक उत्पादनांना सुरुवात होईल, अशी माहिती राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली.

त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये शुक्रवारी (२१ ऑगस्ट) 'डीएमआयसी'च्या कामांचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, डीएमआयसीचे संचालक भास्कर मुंढे उपस्थित होते. अपूर्व चंद्रा म्हणाले की, 'डीएमआयसी'च्या कामांना सुरुवात झाली असून, त्यांचा आढावा घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात शेंद्रा येथील ८४० हेक्टरवर पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी ८०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून, त्यांना सप्टेबर २०१५पर्यंत मुदत आहे. पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांना डिसेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. या निविदांमध्ये रेल्वे ओव्हर ब्रीज (७७ कोटी), अंतर्गत रस्ते (७३२ कोटी रुपये) यांसह वीज, पाणी आणि इतर पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. उद्योगांना आवश्यक असलेल्या विजेसाठी २२० किलो वॉट क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात येणार अाहे. त्याच्या बांधकामाला लवकरच सुरू करण्यात येणार आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये उद्योजकांना जागा देण्याचे नियोजन आहे. त्यानंतरच्या वर्षभरात उद्योग उभारून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होणार असल्याचे चंद्रा यांनी सांगीतले. बिडकीनमध्ये इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी १०० हेक्टर जागा देण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी बिडकीन येथील ३२०० हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील वर्षी निविदा काढण्यात येणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

'सीबीडी'साठी सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट

सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट जगभरातील सर्वोत्कृष्ट चार आर्किटेक्टकडून आराखडे मागविण्यात आले आहेत. उद्योजकांच्या भेटीसाठी 'डीएमआयसी'चे एक कार्यालयही औरंगाबादेत लवकरच उभारण्यात येणार असल्याचेही चंद्रा यांनी सांगितले.

औरंगाबाद - बिडकीन रस्त्यासाठी ६०० कोटी

औरंगाबादः दिल्ली - मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉरमध्ये (डीएमआयसी) येणाऱ्या उद्योगांना दळणवळणात सुलभता व्हावी म्हणून औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाउनशीप लिमिटेडने (एआयटीएल) औरंगाबाद - बिडकीन रस्त्यासाठी ६०० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला जाणार आहे. या मुख्य रस्त्यासह डीएमआयसीच्या प्रस्तावित टाउनशिपमधील अंतर्गत रस्त्यांचाही त्यात समावेश आहे.

डीएमआयसीअंतर्गत शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रिअल टाउनशिप उभारणार आहे. औरंगाबाद-पैठण हा गेल्या आठ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने बीओटीवर रस्ता करण्यासाठी चार वेळा निविदा काढल्या, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. ३०० कोटी रुपये देण्यास राज्य सरकार

तयार नव्हते. डीएमआयसीच्या उभारणीत कुठेही पायाभूत सुविधा कमी पडू नयेत, याची दक्षता घेतली जात आहे. भविष्यातील गरज ओळखून औरंगाबाद - बिडकीन रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ६०० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे लवकरच पाठविला जाणार आहे. त्यात या रस्त्यासह परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या मजबुतीकरणाचाही प्रस्ताव आहे, अशी माहिती एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर पाणीपुरवठा योजना कशासाठी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा पाणीपुरवठा समांतर जलवाहिनी योजनेच्या कंत्राटदाराकडे गेल्यापासून अत्यंत अनियमितपणे, अकार्यक्षम आणि असमाधानकारक पद्धतीने होत असून, त्याविरुद्ध नागरिक असंतोष व्यक्त करीत आहेत. ही योजना कशासाठी राबवली जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची कार्यकक्षा वाढवून द्यावी, जेणे करून सर्वंकश चौकशी करता येईल, अशी मागणी मुख्यमत्र्यांनी नेमलेल्या नागरी कृती समितीने केली आहे.

माजी मनपा आयुक्त कृष्णा भोगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीने शनिवारी एक निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे की, 'दररोज दरडोई १८० लिटर पाणी शहराला मिळावे, यासाठी समांतर योजना हाती घेण्यात आली. ही योजना ३५९.६७ कोटी रुपये खर्चाची होती. केंद्राने ९० टक्के अनुदान व राज्याने १० टक्के देण्याचे २००९ मध्ये मान्य केले होते. तेव्हाच काम सुरू झाले असते तर २०१२ पर्यंत पूर्ण झाली असती. परंतु महापालिकेने दुप्पट खर्चाची व पीपीपी तत्त्वावरील नवी योजना तयार केली. त्यात मूळ योजनेत नसलेल्या कामांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे तिची किंमत वाढली. योजनेचा खर्च दुप्पट वाढविणे व ती खासगी कंत्राटदाराच्या ताब्यात २५ वर्षासाठी देणे हा नागरिकांशी विश्वासघात आहे. पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून, नफेखोरांच्या ताब्यात योजना देऊन नागरिकांकडून जादा पैसे उकळणे हा अयोग्य व अवैध आहे. २००९ मध्ये तयर झालेला सुधारित समांतर योजनेचा प्रस्ताव अनुचित व जनहितविरोधी आहे' असे समितीने म्हटले आहे. या समितीत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, तसेच पर्यावरणतज्ज्ञ विजय दिवाण, मनपाचे अभियंता कलीम अख्तर व एच.आर. ठोलिया यांचा समावेश आहे.

कंत्राट आणि कंपनीही बेकायदा

कंत्राटदाराच्या निवडीची प्रक्रिया बेकायदा आहे आणि टेंडरिंगची प्रक्रियाही अत्यंत सदोष व अवैध आहे. निवडलेला कंत्राटदार पात्र नाही. कंत्राटदाराने सुरु केलली कन्सो‌िर्शयम कंपनीही बेकायदा आहे. पाणीपट्टीत दर तीन वर्षांनी २५ टक्के वाढ ठरविण्यात आल्यानतर २०१२ सालापासूनच ही वाढ केली गेली. २०१२ ते २०१४ दरम्यान करण्यात आलेली वाढ ६९.४ टक्के होती. येत्या ३१ ऑगस्टला पाणीपुरवठा कंत्राटदाराच्या ताब्यात देण्यास एक वर्ष पूर्ण होईल, पण अजूनही जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान इंचभरही पाईप टाकण्यात आलेला नाही. हे एकच कारण योजना रद्द करण्यास पुरेसे आहे, पण इतरही अनेक गैरव्यवहार आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी समितीची कार्यकक्षा वाढवून द्यावी,' अशी मागणी समितीने मुख्यमत्र्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुला विरोधात विनयभंगाची तक्रार

$
0
0

औरंगाबादः अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित मुलावर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पीडित मुलीला एक मुलगा नेहमी त्रास देत असल्याचा तक्रार अर्ज तिच्या पालकांनी ११ ऑगस्ट रोजी जवाहरनगर पोलिसांकडे दिला होता. याप्रकरणी योग्य तपास होत नाही, अशी तक्रार घेत पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले.

दरम्यान, याप्रकरणी संबंधित मुलाची चौकशी करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील तेलुरे यांनी दिली. ही माहिती वरिष्ठांना सादर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा खून करण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैशांसाठी एका विवाहितेला मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिसारवाडी भागात गुरुवारी ही घटना घडली असून, आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, कविता सुनील कांबळे (वय २८, रा. गल्ली क्रमांक ८, मिसारवाडी) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. पती सुनील कांबळे हा मोहरून पैसे आण, असे म्हणत नेहमी त्रास देत होता. त्याने गळा दाबून अंगावर रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

भावावर कुऱ्हाडीने हल्ला

पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या भावावरच कुहाऱ्डीने हल्ला करण्यात आला. तुर्काबाद खराडी येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. संदीप प्रभाकर आगळे (वय १९, रा. तुर्काबाद खराडी) असे फिर्यादीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी संदीपचा मोठा भाऊ पुंजाराम प्रभाकर आगळे याचे पत्नीसोबत भांडण सुरू होते. त्यामुळे संदीप व त्याच्या आई-वडिलांनी भांडण सोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुंजाराम याने संदीपला कुऱ्हाडीने मारून जखमी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या कामांचे नऊ कोटी थकित

$
0
0

पीडब्ल्यूडीच्या झालेल्या कामांचे तीन कोटी कधी मिळणार?

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पाच महत्त्वाच्या रस्त्यांसाठी दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेले २१ कोटी रुपये सरकार बदलल्यानंतरही पूर्णपणे मिळालेले नाहीत. आजपर्यंत काही टप्प्यांत १२ कोटी रुपये देण्यात आले आहेत, पण त्यातून केवळ तीन रस्त्यांची डागडुजी केली. या व्यतिरिक्त काही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती केली गेली, पण त्याचे तीन कोटी रुपये दिलेले नाहीत. हा निधी कधी मिळणार, असा प्रश्न कायम आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या शहरातील पाच रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न गेल्या १० वर्षांपासून गाजत आहे. ८ वर्षांपासून या रस्त्यांसाठी सरकारने निधीच दिला नव्हता. आघाडी सरकारने २१ कोटी रुपये मंजूर केले, पण पैसेच दिले नाहीत. दरम्यान, गेल्या वर्षी सरकार बदलले. युतीचे सरकार आल्यानंतर तरी हे पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती, पण पहिले तीन महिने काहीच मिळाले नाही. त्यानंतर टप्प्याटप्प्याने १२ कोटी रुपये दिले गेले, पण हे पैसे फक्त शहरातील पाच रस्त्यांसाठी नव्हे तर, जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी होते. आलेल्या निधीतून जालना रोड, जळगाव रोडच्या पॅचवर्क व डांबरीकरणाचे काम झाले. उर्वरित निधी जिल्ह्यातील रस्त्यांना प्राधान्यानुसार दिला गेला.

जालना रोडचे अजूनही बरेचसे काम शिल्लक आहे. डांबरीकरणावर पट्टीचा थर, दुभाजकांना रंगरंगोटी ही कामे प्रलंबित राहिली. उर्वरित नऊ कोटी रुपये कधी मिळणार, याबाबत स्थानिक कार्यालयाकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही.

दरम्यान, औरंगाबाद - पैठण रस्त्यावर महानुभाव चौक आश्रम ते ए. एस. क्लब हे काम केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी पावसाळ्यात प्राधान्य देऊन केले गेले. त्याचे दीड कोटी रुपये मिळालेले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय अन्य ठिकाणी काँक्रिटीकरण व रस्त्यांची किरकोळ दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपये खर्च केले गेले. सरकारी काम असल्याने आज ना उद्या पैसे मिळतील यासाठी कामे केली गेली, पण हे पैसे अद्याप मिळालेले नाही. सरकार बदलूनही 'पीडब्ल्यूडी'च्या रस्त्यांचे रडगाणे सुरूच आहे. यासंदर्भात अधीक्षक अभियंता यू. के. अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृष्णा मराठवाडा’ला मान्यता

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय पर्यावरण विभागाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. या प्रकल्पामुळे दुष्काळी भागाला मोठा फायदा होणार आहे.

मराठवाड्याच्या हक्काचे २१ अब्ज घन फूट पाणी २००० मध्ये मंजूर करण्यात आले आहे. पुरेशा निधीअभावी या प्रकल्पाचे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे हे हक्काचे पाणी अद्यापही मराठवाडयाला मिळालेले नाही. गेल्या दीड दशकापासून या प्रकल्पाची चर्चा आहे. हा प्रकल्प व्यवहार्य नाही, असा अहवाल अनेक तज्ज्ञ व अभ्यासक यांनी दिला आहे.

या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयांची मान्यता मिळविण्यासाठी २४ एप्रिल रोजी पर्यावरण तज्ज्ञ समितीच्या ८३व्या बैठकीमध्ये सादरीकरण करण्यात आले होते. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत उजनी जलाशयात येणाऱ्या पाण्यापैकी १९ अब्ज घन फूट पाणी उस्मानाबाद जिल्ह्यास देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत तीन स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे २३.६६ अब्ज घन फूट पाणी देण्याचे नियोजन आहे. एकूण ४ हजार ८४५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांतील गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. उपसा सिंचन योजना क्रमांक१ मधून १०.४१ अब्ज घन फूट व उपसा सिंचन योजना क्रमांक२ मधून ७.५७ अब्ज घन फूट पाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण ८७ हजार १८८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. उजनी जलाशयातून आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ५.६८अब्ज घन फूट पाणी देण्याचा समावेश आहे.

लाभक्षेत्रातील तालुके : भूम, परंडा, वाशी, कळंब, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि आष्टी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑक्टोबरपर्यंत रस्ते चकाचक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर रोजी सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. राज्यातील रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याची खराब झालेली प्रतिमा गेल्या दहा महिन्यांत बदलण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षपूर्तीचा संकल्प करत राज्य ३१ ऑक्टोबर रोजी खड्डे मुक्त करण्यात येईल. तसेच वर्षपूर्तीचे औचित्य साधत राज्यभरात १००० कामांचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मराठवाड्यातील अधिकाऱ्यांशी थेट संवाद आयोजित केला होता. या कार्यशाळेत पाटील दिवसभर बसून होते. मध्यंतरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''वर्षपूर्तीनिमित्त राज्यभरात एक हजार रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येईल. त्यात मराठवाड्यातील १८८ कामे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. १५ वर्षांपासून न झालेल्या ८०० पदोन्नत्या केल्या. विविध कारणांनी अडकलेल्या १०० पदोन्नती प्रस्तावांचाही निपटारा केला. या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवली.''

कामात हलगर्जीपणा केलेल्या १०० जणांचे निलंबनही केले. डीफर पेमेंटअंतर्गत चार हजार कोटींची कामे केली जाणार असून लवकरच ही कामेही सुरू होतील. प्रत्येक जिल्ह्यांना १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले जातील. राज्य आणि जिल्ह्यांतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे काम करण्यात आले असून त्याची एक हजार कोटींची बिले रखडली आहे. निकृष्ट कामे करण्यात आल्यामुळे ती बिले अदा करण्यात आली नाही. दर्जा तपासल्यानंतरच बिले दिली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दर्जा तपासण्यासाठी यंत्र

रस्त्यांचा दर्जा तपासण्यासाठी अत्याधुनिक यंत्र घेतले जाणार आहे. त्यातून डांबर, खडी व इतर सामग्रीचा किती वापर केला हे संगणकावर पाहायला मिळेल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

आमदारांचा हस्तक्षेप नको!

पीडब्ल्यूडीचा इमेज पूर्णपणे बदलण्याचे प्लॅनिंग केले आहे. सेवानिवृत्त सचिवांना दर्जा सुधार आणि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेसाठी आम्ही तज्ज्ञ म्हणून नेमले आहे. यासाठी सहकार्य करताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारात सत्ताधारी आमदारांनी हस्तक्षेप करू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

तीन रस्ते बीओटीवर

औरंगाबाद - जळगाव, औरंगाबाद - पैठण आणि जालना - मलकापूर हे रस्ते कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. हे रस्ते बीओटीवर करण्यात येतील. केंद्र सरकार २० टक्के राज्य सरकार २० टक्के रक्कम दिल्यानंतर जर, रक्कम शिल्लक राहिली तर सरकार तो बोजा उचलेल. या रस्त्यांवरून धावणाऱ्या जड वाहनांकडून टोल वसूल केला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, आमदार, कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करण्यासाठी मराठवाड्यात गणेशोत्सव काळात जिल्हानिहाय बैठका घेतल्या जातील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपी स्वप्नील मणियार गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रुती कुलकर्णी प्रकरणात दोन पोलिसांपाठोपाठ उपनिरीक्षक हरिष खटावकर यांना निलंबित करण्यात आले आहे. निरीक्षक राजकुमार डोंगरे यांची नियंत्रण कक्षात, सहायक फौजदार प्रकाश जेकब यास मुख्यालयात हलविण्यात आले आहे. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी दिली. दरम्यान, फरार आरोपी स्वप्नील मणियारला पोलिसांनी शनिवारी नेवासा परिसरातून अटक केली.

तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर श्रुतीला, खटावकर यांच्याकडून सहकार्य मिळाले नाही. त्याचे वर्तन अशोभनीय होते, असा निष्कर्ष समोर आल्याचे आयुक्तांनी सांगितले. पोलिसांचे पाठबळ असल्याने मणियारने पुन्हा श्रुतीला त्रास देण्यास सुरवात केली होती, पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही त्रास कमी होण्याऐवजी वाढला आणि पोलिसही आपल्यालाच त्रास देतात अशी भावना झालेल्या झाल्यानेच श्रुतीने १६ ऑगस्टला मध्यरात्री आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.

स्वप्नीलवर तीन गुन्हे

मणियारवर सुरुवातीला आयपीएल सट्ट्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर त्याच्यावर विनयभंगाचे दोन गुन्हे सिडको पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आयपीएल सट्टा प्रकरणात त्याने श्रुतीच्या नावे असलेल्या सिमकार्डचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृष्णा मराठवाडा’ला मान्यता

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय पर्यावरण विभागाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. या प्रकल्पामुळे दुष्काळी भागाला मोठा फायदा होणार आहे.

मराठवाड्याच्या हक्काचे २१ अब्ज घन फूट पाणी २००० मध्ये मंजूर करण्यात आले आहे. पुरेशा निधीअभावी या प्रकल्पाचे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे हे हक्काचे पाणी अद्यापही मराठवाडयाला मिळालेले नाही. गेल्या दीड दशकापासून या प्रकल्पाची चर्चा आहे. हा प्रकल्प व्यवहार्य नाही, असा अहवाल अनेक तज्ज्ञ व अभ्यासक यांनी दिला आहे.

या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयांची मान्यता मिळविण्यासाठी २४ एप्रिल रोजी पर्यावरण तज्ज्ञ समितीच्या ८३व्या बैठकीमध्ये सादरीकरण करण्यात आले होते. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत उजनी जलाशयात येणाऱ्या पाण्यापैकी १९ अब्ज घन फूट पाणी उस्मानाबाद जिल्ह्यास देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत तीन स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे २३.६६ अब्ज घन फूट पाणी देण्याचे नियोजन आहे. एकूण ४ हजार ८४५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांतील गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. उपसा सिंचन योजना क्रमांक१ मधून १०.४१ अब्ज घन फूट व उपसा सिंचन योजना क्रमांक२ मधून ७.५७ अब्ज घन फूट पाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण ८७ हजार १८८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. उजनी जलाशयातून आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ५.६८अब्ज घन फूट पाणी देण्याचा समावेश आहे.

लाभक्षेत्रातील तालुके : भूम, परंडा, वाशी, कळंब, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि आष्टी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात दहा टक्के पाणीसाठा शिल्लक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जिल्ह्यातील अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी वातावरणात पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावत चालली आहे. सात मध्यम प्रकल्पात केवळ दहा टक्केच उपयुक्त पाणी साठा शिल्लक असून ५७ लघु प्रकल्पात अवघा तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळ्याचे तीन महिने संपत चालले आहेत. अपेक्षित सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झाला आहे. पावसाचा शेवटचा महिना सप्टेंबर असाच कोरडा गेल्यास तीव्रतेच्या पाणीटंचाईचे संकट उभे राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जालना तालुक्यातील कल्याण गिरिजा प्रकल्पात जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाच्या तुलनेत समाधानकारक ४६ टक्के (३.९२ द.ल.घ.मी.) पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, कल्याण मध्यम प्रकल्पात जोत्याखाली पाण्याची पातळी आहे. बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना सोमठाणा मध्यम प्रकल्पात जोत्याखाली पाण्याची पातळी आहे. भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात अ‌करा टक्के (०.६८ दशलक्ष घन मीटर) धामना प्रकल्पात पाच टक्के (०.३४ दशलक्ष घन मीटर) पाणी पातळी आहे. जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा प्रकल्पात २५ टक्के (६.१३ दशलक्ष घन मीटर) पाणी आहे. अंबड तालुक्यातील गलाटी प्रकल्पात जोत्याखाली पाण्याची पातळी आहे. या सर्व सात मध्यम प्रकल्पात एकूण ६७.२९ दशलक्ष घन मीटर पाणी साठवण क्षमता आहे. त्यापैकी सध्या ६.५ दशलक्ष घन मीटर म्हणजे अवघा दहा टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे.जालना तालुक्यातील लघु प्रकल्पापैकी वाकी, दरेगाव, जामवाडी, निरखेडतांडा, पिंपळवाडी आणि कुंभेफळ हे सर्व जोत्याखाली असून नेर लघुपट तलाव कोरडा पडला आहे. तालुक्यातील एकमेव वानडगांव तलावात सहा टक्के (०.१७ दशलक्ष घन मीटर) पाणी पातळी आहे. बदनापूर तालुक्यातील आन्वी, राजेवाडी आणि सोमठाणा लघु तलावाची जोत्याखाली पाण्याची पातळी आहे. भोकरदन तालुक्यातील बरंजळा, प्रल्हादपूर, पिंपळगाव कोलते, चांदाईएक्को, पळसखेडा आणि बानेगांव यांची पाणी पातळी ज्योत्याखाली असून तालुक्यातील एकमेव रेलगाववाडी तलावात चार टक्के (०.०४ दशलक्ष घन मीटर) पाणी पातळी आहे. जाफराबाद तालुक्यातील कोनड २६ टक्के (०.९८ दशलक्ष घन मीटर), आणि भारज २८ टक्के (०.५९ दशलक्ष घन मीटर) पाणी पातळी आहे. तालुक्यातील उर्वरित चिंचखेड, ढोलखेडा, हे ज्योत्याखाली आहेत. तर शिंदी तलाव कोरडा पडला आहे. अंबड तालुक्यातील डावरगांव, मार्डी, रोहीलागड, कानडगांव, भातखेडा, टाका, लासूरा हे सगळे कोरडेठाक पडलेल्या अवस्थेत आहेत. पानेगांव, सुखापूरी, धनगर पिंप्री आणि खडकेश्वर तलाव जोत्याखाली आहेत. घनसावंगी तालुक्यातील तळेगाव, मुसाभद्रायणी, मंडाळा हे कोरडेठाक पडले असून चिंचोली, दहेगांव, जांबसमर्थ, मानेपूरी आणि बोररांजनी हे तलाव ज्योत्याखाली आहेत. मंठा तालुक्यात ढोकसाळ १२ टक्के , पांगरी एक टक्का, पोखरी दोन टक्के आणि वाई तीन टक्के पाणी पातळी आहे. उर्वरित तळतोंडी, पिंपरखेडा, शिरपूर, सावरवाडी, दहा यांची पाणी पातळी ज्योत्याखाली आहे. परतूर तालुक्यातील कसूरा ३१ टक्के, नागथस तीन टक्के, हातडी अकरा टक्के इतकी पाणी पातळी आहे. उर्वरित तळतोंडी,परतवाडी, बामनी, हस्तुरतांडा हे तलाव ज्योत्याखाली आहेत. जालना जिल्ह्यातील एकूण ५७ तलावक्षेत्रात १२ तलाव कोरडेठाक पडलेल्या अवस्थेत आहेत. तर ३४ तलावातील पाण्याची पातळी जोत्याखाली आहे. केवळ ११ तलावात तीन टक्के पाणी शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेवणातून कांदा, वरण गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य नागरिकांना महागाईने जेरीस आणले आहे. डाळीसोबतच कांदा, लसूण महाग झाल्याने जेवणाच्या ताटातून वरणाबरोबरच कांदा ही गायब होत आहे. आता किराणा व भुसार मालाचे दरही तेजीकडे वाटचाल करू लागले आहेत. दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही वाढ चालू आहे. गहू, ज्वारी, शेंगदाणे, शाबुदाणा, तेल-तुपासह बेसनच्या किमतीतही मोठी वाढ होऊ लागली आहे. महागाई वाढत असल्याने गृहिणी चिंतातूर झाल्या असून, त्यांचे महिन्याचे बजेट कोलमडायला सुरुवात झाली आहे.

कांद्याच्या दरात प्रति किलो ७० ते ८० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा गायब झाला आहे. परिणामी हॉटेल, भोजनालय व खाणावळीतून कांदा सर्व्हिस बंद झाली आहे. दुधाची तहान ताकावर म्हटल्याप्रमाणे कांद्याऐवजी ग्राहकांना तोंडी लावण्यासाठी काकडी दिली जात आहे. सफरचंदापेक्षाही कांद्याने उच्चांकी दर गाठले असून, लवकरच कांदा प्रतिकिलो शंभरी गाठेल, असा अंदाज मंडईतील जाणकार व्यक्त करीत आहेत. कांद्यासोबतच लसूणचे दरही प्रतिकिलो शंभरीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. तूर डाळीनेही शंभरी पार करत १४० रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठल्यामुळे आता जेवणातून वरण गायब होऊ लागले आहे. भोजनालय व खाणावळीतून वरण नाममात्र स्वरूपात दिले जाऊ लागले आहे.

सर्वसामान्यांसाठी रुचकर व स्वादिष्ट भोजन म्हणजे भाकरी, पिठलं (बेसन) व चटणी. परंतु, भाकरीसाठीच्या ज्वारीच्या दरात तसेच बेसण व शेंगदाणा यांच्या दरातही १५ ते २० टक्के इतकी दरवाढ झाल्याने आता सर्व सामान्य जनता जेवणाला महाग झाली आहे. वाढत्या महागाईचा फारसा परिणाम नोकरदार वर्गावर होत नसला, तरी रोजंदारीवर संसार चालविणाऱ्या मजूर वर्गासह सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. किराणा, भुसार मालाबरोबरच तेल, तूप, कांदा, लसूण व भाजीपाला यांच्या दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाळूचा उपसा सुरूच

$
0
0

नांदेडः गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील नदीकाठावरील गावातून अवैधरित्या वाळूचा बेसुमार उपसा करून साठेबाजी करण्यात येत आहे. याकडे महसूल प्रशासनाकडून डोळे झाक होत आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे फावत असल्याचा आरोप केला जात आहे. हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर, डोल्हारी, एकम्बा, कोठातांडा, रेणापूर, घारापुर, धानोरा, वारंगटाकळी आदीसह अन्य वाळूघाटावरून सर्रास वाळूचा उपसा केला जात आहे. हा प्रकार महसूल प्रशासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना माहित असताना देखील वाळू चोरावर कार्यवाही करण्यासाठी पुढाकार न घेता स्वहित जोपासत असल्याचे आरोप केला जात आहे. एकही वाळू घाटाचा लिलाव झाला नसतानाही काही जणांनी तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या घाटावरून रेती, दगड व मुरुमाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून शासनाला चुना लावत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेसाठी शासकीय जमीन हडपली

$
0
0

गुन्हे दाखल करण्याची आम आदमी पक्षाची मागणी

म. टा. प्रतिनिधी, जालना

मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या पार्थ सैनिकी शाळेसाठी जालना शहरापासून जवळच असलेल्या खरपुडी शिवारातील शासकीय जमीन अधिग्रहीत करण्यात आली. यासाठी अनेक नियम डावलून शासनाची फसवूणक करण्यात आली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषी पुढारी आणि शासकीय अधिकाऱ्यांविरोधात ४२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष देठे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

२६ सप्टेंबर १९९५ मध्ये नवोदय शाळेच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिकी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, जालना जिल्ह्यात सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी माजी खासदार अंकुशराव टोपे अध्यक्ष व आमदार राजेश टोपे सचिव असलेल्या मत्सयोदरी शिक्षण संस्थेने नियमांचे उल्लंघन करत जमीन हडपल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट होत असल्याचा आरोप प्रा.देठे यांनी केला.

या सैनिकी शाळेसाठी ३१ ऑक्टोबर १९९५ पर्यंत प्रस्ताव पाठविणे गरजेचे होते. परंतु, मत्स्योदरी शिक्षण संस्थेने पार्थ सैनिकी शाळेसाठी २००२ मध्ये परवानगी मागितली. त्यानंतर २००३ मध्ये शासनाने त्यास मंजूरी दिली. हे करीत असताना मत्स्योदरी शिक्षण संस्थेने पार्थ सैनिकी शाळेसाठी कुठलाही शासन निर्णय नसताना १९९५ मध्येच खरपुडी शिवारातील गट क्र. १९७ मधील अगोदर १६ हेक्टर व त्यानंतर १२ हेक्टर अशी एकूण २८ हेक्टर शासकीय जमीन अनुक्रमे २५३ व ४६८ या बनावट फेराद्वारे हडप केली. सैनिकी शाळा उघडण्यासाठी शासन नियमाप्रमाणे फक्त ३० एकर जागेची आवश्यकता असताना तब्बल ७० एकर जागेवर अवैध कब्जा केला. जमिन वाटपापूर्वी प्रशासनाकडून कुठलाच आढावा घेण्यात आला नाही. यासंदर्भात केलेल्या तक्रारींची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी सदर जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. परंतु, पार्थ सैनिकी शाळेच्या दबावाला बळी पडून तत्कालीन तहसीलदार जे. डी. वळवी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. टोपे यांनी पार्थ सैनिकी शाळेची मालकियत असल्याचे दाखवून शासनाचीच जमिन शासनालालाच क्रीडा संकुल बांधण्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे फेरोज बागवान, संजोग हिवाळे, तनुज बाहेती आणि जगन्ननाथ ठाकूर यांची उपस्थिती होती.

आम आदमी पार्टीकडून लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. बिनबुडाचे आरोप लावले जात आहेत. शासनाच्या नियमानुसारच शाळेला जमिन मिळालेली आहे. आरोपांमध्ये एक टक्काही तथ्य आढळल्यास मी राजकारणातून संन्यास घेऊन हिमालयावर जाईल.

- आमदार राजेश टोपे, सचिव, मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅसिड स्फोटात दोन जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

गुंडेवाडी (ता.जालना) येथील एका फर्टिलायझर कंपनीत झालेल्या अॅसिड स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभिररीत्या जखमी झाला आहे. ही घटना र‌विवारी दुपारी घडली.

पन्नालाल सहदेव शाह (वय ४०), राजकुमार प्रभु शाह ( २२) असे मरण पावलेल्यांची नावे आहेत. तर पंकज शाह असे जखमींचे नाव आहे. राजूर रोडवरील गुंडेवाडी शिवारात राजलक्ष्मी फर्टिलायझर इंडस्ट्री ही कंपनी असून तेथे सल्फ्युरिक अॅसिडचा एक टँक बनविण्यात येत आहे. याठिकाणी ३० बाय ४० फुट आकाराच्या या टॅँकवर रविवारी वेल्डिंग करण्याचे काम सुरू होते. प्राथमिक तपासणीसाठी या टँकमध्ये चार इंचापर्यंत सल्फारीक अॅसिड भरण्यात आला होते. दरम्यान, अॅसिडच्या गॅसमध्ये रूपांतर होऊन अचानक स्फोट झाला. या स्फोटात टँकवर वेल्डिंग काम करत असलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला. एक कर्मचारी गंभिररित्या जखमी झाला. याप्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेस जबाबदार असणाऱ्यावर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जलसंपत्ती’चे आदेश धाब्यावर

$
0
0

समान पाणी वाटपाच्या कम्प्युटरराइज्ड यंत्रणेस सरकारकडून दिरंगाई

सचिन वाघमारे, औरंगाबाद

गोदावरी खोऱ्यातील पाणी वाटपातील मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्य सरकारने इस्त्रायलच्या तंत्रज्ञानवार आधारित १५० कोटी रुपयांची कम्प्युटरराइज्ड यंत्रणा उभारावी असे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने संप्टेबर २०१४ रोजी दिले होते. एक वर्ष उलटून गेले तरी या आदेशाची दखल राज्य सरकारने घेतलेली ना‌ही. त्यामुळे यावर्षी तर १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान, मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळणार की नाही याबाबत अनिश्चीतता आहे.

राज्यात पायथा ते माथा हे समान पाणीवाटपाचे सूत्र राज्य सरकारने स्वीकारले आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले पाहिजे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मात्र, या समन्यायी पाणी वाटपात मराठवाड्यावर अन्यायच केला जात आहे. नगर व नाशिक जिल्ह्यातील राजकीय मंडळीच्या हस्तक्षेपामुळे मराठवाड्यातील नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून वंचीत राहावे लागत आहे.

मराठवाडा जनता विकास परिषदेकडून समान पाणी वाटप करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणांवर रिर्झव ऑपरेशन सिस्टीमचा (धरणातील पाणी सोडण्याची यंत्रणा) वापर करावी अशी शिफारस केली होती. यामुळे धरणांची दारे नियंत्रण करीत असताना होणारा मानवी हस्तक्षेप टाळता येणार आहे. त्याशिवाय इस्त्रायलच्या तंत्रज्ञानवार आधारित १५० कोटी रुपयांच्या या कम्प्युटरराइज्ड यंत्रणेमुळे कुठल्या धरणातून किती पाणी सोडायचे, किती क्युसेकने पाणी सोडायचे याचे संचलन सहजपणे करता येणार आहे. त्याशिवाय पाण्याचे सर्वच धरणातून समान पद्धतीने वाटप करता येणे शक्य होणार असल्याने ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. पाणी वाटपाच्या धोरणात्मक कामात मानवी हस्तक्षेप टाळता येणे शक्य होणार आहे. वीज वितरण कंपनीचे लोडशेडिंग ज्या कम्प्युटराइज्ड पद्धतीने केले जाते. त्याप्रमाणेच या इस्त्रायलच्या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या यंत्रणेमुळे समान पद्धतीने पाणी वाटप करणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने संप्टेबर २०१४ रोजी १५० कोटी रुपये खचर्चाची ही यंत्रणा बसवून त्या पद्धतीने समान पाणी वाटप करण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन आघाडी सरकारने याकडे दूर्लक्ष करून समन्यायी पद्धतीने पाणी वाटप न केल्याने मराठवाड्याला हक्काच्या पाण्यापासून गेल्यावर्षी वंचीत राहावे लागले होते. मराठवाड्यावर अन्याय झाल्याने यावर्षी उन्हाळ्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले.

या वर्षीही सुरुवातीच्या अडीच म‌हिन्यात मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाल्याने मराठवाडा तहानलेलाच आहे. जायकवाडी धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षी तर गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणात हक्काचे पाणी मिळेल का याबाबत संदिग्धता आहे. प्र‌धिकरणाने आदेश देऊन एक वर्ष उलटून गेले तरी या आदेशाची दखल राज्य सरकारने घेतलेली ना‌ही. त्यामुळे यावर्षी तर ही यंत्रणा कार्यन्वित करून १५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान, मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावरील मांसविक्रीने पैठणमध्ये नागरिक त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

नगरपालिकेने अद्यावत मटन मार्केट बांधल्यानंतरही शहरात उघड्यावर मांसविक्री सुरू आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला आहे.

शहरातील उघड्यावरील मांसविक्री बंद करावी, या मागणीसाठी वारकरी संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सातत्याने प्रयत्न करीत आहेत. नगरपालिकेने स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी सुमारे ३० लाख रुपये खर्च करून अद्यावत मटन मार्केट बांधले आहे. या मार्केटमध्ये मांसविक्रेते अद्याप स्थलांतरीत झाले नाहीत. अजूनही भाजी मार्केट परिसर व गेस्ट हाऊस रोडवर उघड्यावर मांसविक्री केली जाते.

विक्रेते मांसाचे तुकडे गटारांत टाकत असल्याने परिसरातील नागरिकांचा आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी तहसीलदार संजय पवार यांना निवेदन दिले आहे. शहरातील उघड्यावरील मांसविक्री बंद व्हावी यासाठी १० ऑगस्ट रोजी निवेदन दिले; त्यावर कार्यवाही न झाल्याने पुन्हा निवेदन देत आहोत. २५ ऑगस्टपर्यंत उघड्यावरील मांसविक्री बंद न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर कृष्णा खुतेकर, रितेश पहिलवान, मंगेश गायकवाड, सुदर्शन चाबुकस्वार, अशोक वाव्हळ, प्रीतेश घोडके आदीच्या सह्या आहे.

घोषणा हवेत

यावर्षी मार्चमध्ये नाथषष्ठीच्या पूर्वतयारी बैठकीत, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी नाथषष्टी काळातच नव्हे तर नेहमीसाठी उघड्यावरील मांसविक्री बंद करण्याची घोषणा केली होती. नगराध्यक्षांच्या घोषणेची सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अंमलबजावणी झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरचीने केले दुष्काळातही मालामाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

दुष्काळी परिस्थिती असतानाही पाणीव्यवस्थापन करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिरचीसारखे नाजूक पीक जगवले आहे. पंधरा दिवसांपासून मिरची तोडणीला सुरुवात झाली असून दररोज साधारणतः ९० टन मिरचीचे उत्पादन हाती येत आहे.

तालुक्यात पाच वर्षांपूर्वी प्रायोगित तत्वावर मोजक्याच शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली होती. त्यांना उत्तम उत्पादन मिळाले व आर्थिक फायदा झाल्याने मिरचीकडे इतर शेतकरी वळले आहेत. पहिल्या टप्प्यात मिरची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार नव्या शेतकऱ्यांनी कुवतीनुसार मिरची लागवड केली. गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी मिरची लागवड सातत्याने वाढत आहे. यंदा तालुक्यात सुमारे २५०० हेक्टरवर मिरची लागवड झाली आहे.

मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिरींना पाणी कमी असल्याने पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. इतर पिके न घेता एप्रिल, मे महिन्यात पाणी राखीव ठेवले. या पाण्याच्या बळावर ठिबक सिंचन करून मान्सूनपूर्व मिरची लागवड केली. या मिरचीची काढणी सुरू झाली आहे.

काही शेतकऱ्यांनी प्लॉस्टिक मल्चिंग पेपर आच्छादन करून बेड पद्धतीने लागवड केली. नांगरणी, रोटाव्हेटरने ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करणे, मिरची रोपासाठी बियाणे टाकणे, लागवडीयोग्य रोपांची लावणी, वातावरण बदलानुसार औषध फवारणी ही कामे अत्यंत काळजीपूर्वक केली. या सर्वकाळात उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे तालुक्यात मिरचीचे पीक बहरले आहे.

तालुक्यातील पानवडोद, गोळेगाव, उंडणगाव, आमठाणा, भराडी, डोंगरगाव, आन्वी, रहिमाबाद परिसरातून दररोज सुमारे १८०० पोते (९० टन) मिरची निघत आहे. उशिरा लागवड झालेली मिरची अद्याप तोडणी योग्य झालेली नाही. पुढील आठवड्यापासून मिरचीचे उत्पादन अधिक निघेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मुंबई, दिल्ली, नागपूर, नाशिक व स्थानिक बाजारपेठेत प्रति क्विंटल २३०० ते २८०० रुपये भाव मिळत आहे.

यंदा तालुक्यात २५०० हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली. पारंपरिक पिकांऐवजी मिरची लागवड करून शेतकरी अधिक उत्पन्न कमावत आहेत.

- सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी

यंदा कर्नाटकातून मिरचीची आवक वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत आहे.

- समाधान बोडखे, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोर घुसल्याचा संशय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

जनावर व शेती साहित्य चोरणारी टोळी मध्यप्रदेशातून आली आहे. या टोळीपासून सावध राहावे, अशी दवंडी पोलिसांकडून गावागावात दिली जात आहे. नागरिकांच्या बैठका आयोजित करून दुष्काळात चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अजिंठा, सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भराडी, अंधारी, आमठाणा, कोटनांद्रा, घाटनांद्रा, अजिंठा, उंडणगाव, शिवना, गोळेगाव, अंभई, जळकीबाजार, सारोळा आदी गावातील नागरिकांनी गाव-शिवारात सावध राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. अनोळखी व्यक्ती, संशयीत हालचाल असणाऱ्या व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात दरोडेखोरांनी कन्नड तालुक्यात लूटमार केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. पोलीसांनी नागरीकांना सतर्कचे आवाहन केले पोलिसांनी दरोडेखोरांची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली आहे. या वर्णनाची संशयीत व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

बँकेतील चोऱ्या, दरोडे रोखण्यासाठी अजिंठा पोलिसांनी जळगाव रोडवरील पेट्रोलपंप, अंजिठ्यातील स्टेट बँक, उंडणगाव येथील बडोदा बँक, बुलढाणा अर्बन बँक, परिसरातील पतसंस्था-बँकाचे अधिकारी, पेट्रोल पंपांचे व्यवस्थापक, मालक यांची बैठक घेऊन उपयायोजना करण्याच्या सूचना दिल्या. अजिंठा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, फौजदार राहुल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित दरोडेखोरांना पकडण्यासाठी दोन पथके तैनात केली आहेत. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तैनात केली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळणा प्रकल्पात एक महिन्याचा साठा

$
0
0

सिल्लोडः सिल्लोड शहरासह मोठ्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या खेळणा प्रकल्पात फक्त एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य निर्माण होत आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. तालुक्यातील पाच गावात आठ टँकरद्वारे २२ खेपा करून नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. तीन गावात चार विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जेमतेम संरक्षित पाण्यावर शेतकऱ्यांनी पिके जगवली आहेत. मात्र पावसाअभावी पिके ऐन बहरात असतांना सुकत आहेत. तालुक्यात सरासरीच्या निम्मा पाऊसही पडलेला नाही. रिमझिम पावसाच्या भरवशावरच पिके तगली आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जलस्त्रोत्रांना काही प्रमाणात पाणी येऊन पाणीपातळी वाढली होती. यावर्षी पावसाळ्यात जलस्त्रोतांना पाणी आले नाही. त्यामुळे तालुक्यातील जलस्त्रोत आटण्याच्या स्थितीत आहेत.

तालुक्यात सध्या अनाड येथे २ टँकरच्या ६ खेपा, मुकपाट १ टँकर २ खेपा, पिंपळदरी ३ टँकर ८ खेपा, पिरोळा-डोईफोडा- १ टँकर ३ खेपा, वसई-जळकी १ टँकर तीन खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे. शेखपूर येथे दोन, देऊळगावबाजार व धानोरा येथे प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित करून पाणीपुरवठा सुरू आहे. खेळणा प्रकल्पावर भिस्त असलेल्या नागरिकांना एक महिन्यानंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

खेळण्यात अपुरा साठा

सिल्लोड शहरासह तालुक्याच्या अर्ध्या भागाची तहान भागविणाऱ्या खेळणा मध्यम प्रकल्पात ६.७३ टक्के म्हणजे ०.७३ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. या प्रकल्पातून सिल्लोड शहरासह तालुक्यातील उंडणगाव, भराडी, वांगी व प्रकल्पाच्या परिसरातील गावांना पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पातच महिनाभर पुरेल इतका साठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images