Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘घडो तुझी सेवा राघवेंद्रा...’

$
0
0
मनाचा ठाव घेणारी भक्तीरचना, संगीत सूर आणि उत्तम गायकी यांच्या संगमातून श्री राघवेंद्र स्वामी यांच्यावरील भक्तिसंगीताचा कार्यक्रम विशेष श्रवणीय ठरला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गुरुवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात उत्तमोत्तम रचना सादर करण्यात आल्या.

दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू

$
0
0
दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजता जटवाडा, एकतानगर भागात घडली. याप्रकरणी बेगमपुरा नोंद करण्यात आली आहे.

अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ‘इको गणपती’

$
0
0
दीपशिखा फाउंडेशनतर्फे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शाडू मातीपासून गणेशाची मूर्ती तयार करण्यात अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

अहवालानंतर अभ्यासगटाला मुदतवाढ!

$
0
0
दुष्काळामुळे जायकवाडी प्रकल्प संकटात सापडला. वरील बाजुच्या धरणांतून पाणी सोडण्यासाठी याचिकाही दाखल झाली. सरकारने एका अभ्यासगटाची स्थापनाही केली.

मुलीशी अतिप्रसंग करणाऱ्याचा खून

$
0
0
पोटच्या विवाहित मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याचा पत्नीने डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही घटना केज तालुक्यातील टाकळी येथे बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा

$
0
0
राज्यातील २५ सहकारी साखर कारखाने राज्य बँकेने कवडीमोल किमंतीत विक्री केले आहेत. आताही १९ साखर कारखान्याच्या विक्रीची तयारी सुरू आहे. बंद कारखाने विक्री करण्यापेक्षा सरकारने ते ताब्यात घेऊन त्याचे राज्य सहकारी बँकेप्रमाणे पुनर्वसन करावे.

पालिकेत कडेकोट बंदोबस्त!

$
0
0
मोकाट कुत्र्यांच्या धास्तीने गुरुवारी पालिकेत कडेकोट बंदोबस्त होता. अखेर मोकाट कुत्रे पालिकेत आलीच नाहीत आणि सुरक्षा रक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पालिकेत संशयकल्लोळ

$
0
0
औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पालिकेत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांकडे संशयाने पहात होते.

मालमत्ताकर वसुलीत वाढ

$
0
0
महापालिकेच्या मालमत्ताकराच्या वसुलीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा तेरा कोटींची वाढ झाली आहे, असा दावा मालमत्ताकर वसुलीचे विशेष अधिकारी शिवाजी झनझन यांनी केला.

आॅगस्ट महिन्यात पाऊस रुसलेलाच

$
0
0
जून व जुलैमध्ये भरभरून बरसणारा पाऊस ऑगस्टमध्ये मात्र रूसला आहे. तीन दिवसांपासून आभाळ भरून येत असताना पावसाचा थेबही पडत नाही.

यंदा लाखमोलाचे आठ थर

$
0
0
दहीहंडी उत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला असून शहरातील प्रमुख मंडळांनी महोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. यावर्षी आठ थरांसाठी चुरस असून गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत.

महिला वृत्तछायाचित्रकारावरील बलात्काराचा निषेध

$
0
0
मुंबईत महिला वृत्तछायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा लातूर येथील वृत्तछायाचित्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला. लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात झालेल्या बैठकीत आरोपीना शासनाने कडक शिक्षा करण्याची मागणी ही करण्यात आली.

‘दाभोलकरांच्या खुनाचा तपास करा’

$
0
0
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा तपास केंद्र सरकारच्या विशेष पथकाकडून करण्यात यावा अशी प्रमुख मागणी शुक्रवारी लातूर येथील विविध सामाजिक संघटनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

पदाधिका-यांना डावलून महापौर CM च्या भेटीला

$
0
0
पालिकेतील पदाधिका-यांना डावलून महापौर कला ओझा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विमानतळावर गेल्या. वेळ न घेता अनाहुतपणे आलेल्या महापौरांना पाहून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या मला तुम्हाला भेटण्यासाठी वेळ नाही.

सभागृह, हज हाउस एकाच वेळी

$
0
0
वंदे मातरम् सभागृह आणि हज हाउस यांच्या उभारणीचे काम एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे सिडकोकडून करण्यात येतील.

पाण्याच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची बगल

$
0
0
मराठवाड्यासाठी महत्त्वाचा असलेल्या पाणीप्रश्नावर पत्रकारांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बगल दिली.

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार द्या अन्यथा आंदोलन

$
0
0
गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद जिल्हा परिषदेने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे वितरण केलेले नाही. यंदा शिक्षकदिनी म्हणजे पाच सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे.

बीअरचा साठा जप्त

$
0
0
एक्सपायरी डेट संपलेल्या बीअरचा साठा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)जप्त केला आहे. सिडको भागात असलेल्या एका वाईन शॉपमध्ये एक्सपायरी डेट संपलेली बीअरची विक्री केली जात असल्याची तक्रार ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष वाजेद अस्लम यांना मिळाली.

आणखी दोन रुग्ण डेंगी पॉझिटिव्ह

$
0
0
शहर व जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना डेंगी झाल्याचे निदान शुक्रवारी झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ४० पर्यंत पोचली आहे.

परभणीत अतिक्रमण हटाव मोहीम

$
0
0
शहराच्या मुख्य रस्त्यासह बाजारपेठेत ठिकठिकाणी वर्षानुवर्ष असलेले अति‌क्रमण हटाव मोहीम महापलिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images