Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कन्नड, सिल्लोडवर जलसंकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

जुलै व ऑगस्टमधील पावसाच्या तुटीचा फटका पिकांसह तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना बसला आहे. दोन महिन्यात प्रमुख प्रकल्पांसह तालुक्यातील लघु प्रकल्प व तलाव कोरडे पडले आहेत. शहराला अंबाडी धरणातील मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरावर टंचाईचे संकट घोंगावत आहे.

तालुक्यातील शिवना, अंबाडी, पूर्णा, अंजना, गांधारी या नद्यांना जूनमधील अतिवृष्टीमुळे थोड्या प्रमाणात पाणी आले होते. त्यानंतर जोरदार व पुरेसा पाऊस न पडल्याने नद्या व नाले कोरडे ठाक पडले आहेत. कन्नड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या अंबाडी प्रकल्प मृतसाठ्यात असून कन्नड शहराला पाणी टंचाईच्या सामोरे जाण्याची चिन्हे आहेत. कन्नड शहराला सध्या सहा दिवसांतून एका पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील ५४ गावांसाठी पाणीटंचाई निवारण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती तांत्रिक अधिकारी एम. एम. देवकर यांनी दिली. देवगाव (र.), चांभारवाडी, माटेगाव, कानडगाव (क.), औराळी, जवळी (खुर्द), जवळी (बुद्रुक), गव्हाळीतांडा, गौरपिंप्री, माटेगाव, दिगाव, खेडी, भांबरवाडी, लंगडातांडा, आंबातांडा, नादरपूर, दहिगाव, धामणी (खुर्द), शिरोडी या गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहे.

यंदा जून महिन्यात पहिल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाची आतापर्यंत सरासरी तूट २० टक्के आहे. सध्या जेमतेम पावसावर पिके काही प्रमाणात तग धरून आहेत. यंदा मुग व उडीद या पिकांनी हात न दिल्याने सर्व भिस्त मका व कापूस पिकावर असून मका तुऱ्यात असून कापूस कैऱ्या लगडण्याच्या स्थितीत आहे. या पिकांना पाण्याची गरज असून पाणी नाही मिळाले, तर खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे.

प्रकल्पांनी गाठला तळ

कन्नड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या अंबाडी प्रकल्प मृत साठ्यात आहे. या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २.१३० द.ल.घ.मी.आहे यातून कन्नड शहरासाठी ३० लाख लिटर पाण्याच्या उपसा होतो. शिवना-टाकळी प्रकल्पाचा जलसाठा ८.५ टक्के असून यात ३.१ द.ल.घ.मी. पाणी आहे. पूर्णा-नेवपूर प्रकल्पात ३० टक्के, तर अंजना-पळशी प्रकल्पात ३३ टक्के जलसाठा आहे. अंजना-पळशी प्रकल्पातून १० गावांना टँकद्वारे पाणीपुरवठा करण्यत येत आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळे पाणी चोरी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसस्थानकातून प्रवासी बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको बसस्थानकातून शिवचलअप्पा संगप्पा कलमणी (वय ५४ रा. मैदर्गी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हे बुधवारी बेपत्ता झाले. कलमणी उपचारासाठी औरंगाबादला आले होते. त्यांचे जावई कैलास पटणे यांनी त्यांना बुधवारी सिडको बसस्टँडवर सोडले होते. गुरूवारी सकाळी त्यांनी गावाकडे फोन करून सासरे पोहचले का विचारण्यासाठी फोन केला. यावेळी कलमणी पोहोचले नसल्याची माहिती त्यांना मिळाली.

या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. कलमणी यांची उंची पाच फूट चार इंच, रंग गोरा, मजबूत बांधा, अंगात पांढरा रेषाचा शर्ट व पिवळसर भुरकट रंगाची पँट आहे. मराठी व कानडी भाषा त्यांना येत असून अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अस्थीव्यंग निवासी शाळेत नोकरीला आहेत. वरील वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळून आल्यास सिडको एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्राआधारे महिलेला प्लॉट विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मूळ मालक नसताना महिलेला परस्पर प्लॉट विक्री करून पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार मुकुंदवाडी भागात घडला. या प्रकरणी आरोपीविरूद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलीगुन्नीसा मोहम्मद समयोद्दीन (रा. बारी कॉलनी) या महिलेने आरोपी सय्यद हाशम सय्यद शाहेद याच्याकडून मुकुंदवाडी परिसरात दोन प्लॉट खरेदी केले होते. ७ ऑक्टोंबर रोजी हा व्यवहार झाला होता. बाँडवर नोटरी करून हे प्लॉट विक्री करून या महिलेकडून पाच लाख रूपये घेण्यात आले होते. यावेळी हाशम याने आपल्या मालकीचे हे प्लॉट असल्याचे त्यांना सांगितले होते. मात्र, हे प्लॉट हाशम याचे नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी बलीगुन्नीसा मोहम्मद यांना मिळाली होती. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून आरोपी हाशम विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डंपर चोरणारे दोघे गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिकवरून डंपर चोरी करून शहरात त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना गुन्हेशाखेने बीड बायपास भागात अटक केली. ७ ऑगस्ट रोजी त्यांनी डंपर चोरी केली होती.

बीड बायपास रोडवरील एका गॅरेजजवळ चोरीचे डंपर विकण्यासाठी दोघांनी आणले असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. या माहितीवरून शुक्रवारी या भागात सापळा लावण्यात आला व दोघांना अटक करण्यात आली. आरोपी इम्रान सिराज सय्यद (वय २८) व इम्रान हमीद पठाण (वय ३२ रा. वडाळा, नाशिक) या दोघांची चौकशी करण्यात आली. हे डंपर त्यांनी ७ ऑगस्ट रोजी नाशिक येथील मुंबई नाक्यावरून चोरल्याची माहिती दिली. शफीक रहेमान अजीज शेख यांच्या गॅरेजवरून हे डंपर चोरण्यात आले होते. पडकलेले दोन्ही आरोपी जेसीबीचालक आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रशांत आवारे, नंदकुमार भंडारे, अशोक नरवडे, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, धर्मराज गायकवाड, सिद्धार्थ थोरात व तुकाराम राठोड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन अधिकाऱ्यांना फुटला घाम

$
0
0

वनमंत्री मुनगंटीवार यांनी वन अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विभागातील वनक्षेत्राचा आढावा घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निष्क्रिय वन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये शनिवारी (२२ ऑगस्ट) झालेल्या बैठकीत मुनगंटीवार यांनी सर्वांना काम करण्याचा सूचना दिल्या. तसेच मुख्य वनसंरक्षक कधीच फोन घेत नसल्याची तक्रार आमदार नारायण कुचे यांनी केली.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबाद दौऱ्यात वन विभागाची स्वतंत्र बैठक घेतली. हॉटेल रामात झालेल्या बैठकीला मुख्य वनसंरक्षक ए. आर. मंडे, उपवनसरंक्षक अशोक गिऱ्हेपुजे, वन्यजीव संरक्षक सुनील ओहोळ आदी अधिकारी उपस्थित होते. सामाजिक वनीकरण विभागाने १५ ऑगस्ट रोजी केलेल्या वृक्षारोपण मोहिमेच्या सचित्र पुस्तकाचे मुनगंटीवार यांनी प्रकाशन केले. तसेच वन अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या जेमतेम अर्धा तासाच्या बैठकीत मुनगंटीवार यांनी निष्क्रिय अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तसेच मराठवाडा विभागातील वनक्षेत्राची माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार नारायण कुचे यांनी, मुख्य वनसंरक्षक मंडे कधीच फोनवर बोलत नसल्याची तक्रार मांडली. ही तक्रार ऐकताच मुनगंटीवार यांनी मंडे यांना खडसावले असे उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वन जमिनीवरील अतिक्रमण, अवैध वृक्षतोड, मुरूम उपसा, भकास वनोद्याने असा वन विभागात सावळागोंधळ सुरू असताना वनमंत्री ठोस भूमिका घेतील अशी अपेक्षा होती. पण, जेमतेम अर्ध्या तासात त्यांनी अनौपचारिक बैठक गुंडाळली.

अधिकाऱ्यांचे राजकारण

औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुडा यांची नुकतीच नागपूर येथे मूल्यांकन विभागात बदली झाली आहे. नागपूरचे मूल्यांकन अधिकारी ए. आर. मंडे औरंगाबादला मुख्य वनसंरक्षक म्हणून रूजू झाले. मात्र, दोघे बदलीवर नाराज आहेत. बदली रद्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याचा संदर्भ देत 'अजून पण इथे (औरंगाबाद) येण्याची इच्छा नाही का ?' असा प्रश्न मुनंगटीवार यांनी करताच, 'आता अॅडजस्ट केले' असे उत्तर मंडे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्निलला पोलिस कोठडी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रुतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या स्वप्निल मणियारला रविवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही कस्तुरे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शनिवारी स्वप्निल पोलिसांना शरण आला. रविवारी दुपारी त्याला कोर्टामध्ये नेण्यात आले. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्तामध्ये त्याला कोर्टापुढे हजर करण्यात आले. श्रुती व स्वप्निलमध्ये काही पत्रव्यवहार झाला होता का, आरोपीचा मोबाइल हस्तगत करणे, श्रुतीने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका कोणत्या कारणावरून घेतली, तसेच त्याच्या घरझडतीसाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. कोर्टाने त्याला गुरूवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, विशेष पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी त्याला कोर्टात हजर केले. दरम्यान, श्रुतीसोबत आपली ओळख सात वर्षांपासून आहे. पैसे मागण्यावरून आपल्यात वाद झाला होता. तसेच ही माहिती आपण तिच्या बहिणीला देखील दिली होती, अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

श्रुतीचा मृत्यू झाला त्या दिवशी स्वप्निल औरंगाबादेतच होता. रात्री दुचाकीवर मित्रांसोबत तो ट्रिपलसीट गंगापूरला गेला. तेथे त्यांनी दोन मित्रासोबत कार मागवून घेतली. कारने चौघे नगरला गेले. तेथून दोघे मित्र औरंगाबादला परतले, तर स्वप्निल एका मित्रासोबत पुण्याला गेला. तेथून श्रुतीचे सर्व विधी करण्याचे ठरवत दोघे नाशिकला गेले. तेथे कुंभमेळ्यानिमित्त मोठा पोलिस बंदोबस्त पाहून दोघांनी पलायन करीत पुन्हा पुणे गाठले. एका मंदिरात पूजा केल्यानंतर समोरच असलेल्या सलूनमध्ये त्याने मुंडण केले. दरम्यान, त्याचा औरंगाबाद पोलिसांकडून शोध सुरू झाला होता. स्वप्निल त्याच्या भाऊजीच्या संपर्कात होता. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने स्वप्निलला मोबाइलवर भावनिक मॅसेज पाठवण्यात आले. त्याला शरण येण्याबाबत सांगण्यात आले. पोलिसांचा हा फंडा लागू पडला. स्वप्निलने शरण येण्याचे मान्य केले. पडेगाव रोडवरील टोल नाक्याजवळ तो आल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

आरोपीवर कडक कारवाई करा

श्रुती कुलकर्णीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी माजी नगरसेविका चंद्रभागा दाणे, डॉ. प्रज्ञा साळवे, वैशाली वानखडे, ललिता बस्ते, मंगला गवई, सुनिता भालेराव, मंगल गायकवाड, कस्तुरा तांबोळे, ज्योती हिवाळे यांची यावेळी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राकडून ५५६ कोटींचा निधी प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळ असून इतर चार जिल्ह्यांत दुष्काळाच्या झळा बसत आहेत. राज्य शासनाने पिण्याचे पाणी व चाऱ्याचे पूर्ण नियोजन केले आहे. केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (एनडीआरएफ) ५५६ कोटी रुपये मिळाले आहेत,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

या निधीमुळे दुष्काळात पाणीपुरवठ्याची देणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस पडला किंवा नाही पडला तर किती पाणीपुरवठा करावा लागेल याबाबतचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळाच्या उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही. मराठवाडा विभागातील संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहेत, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. विभागातील परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये मोठे शहर तसेच गावांच्या पाण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याची स्थिती बिकट असून तेथे रेल्वेने पाणी पोहोचवण्याची योजना तयार आहे. जनावरांसाठी कमी वेळ व स्वस्तात हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी हायड्रोपोलिक चारा उपलब्ध करुन देण्याबाबतही नियोजन झाले असल्याचे

मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये चाऱ्याची टंचाई असून या जिल्ह्यांमध्ये शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवेळी या छावण्यांमधून मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळे यंदा या छावण्यांमधून केवळ जनावरांना कुरण मिळावे इतरांना नाही याचेही नियोजन करण्यात आले आहे, या छावण्या व्यवस्थित आणि नियोजनपूर्वक चालवल्या जाव्यात, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

रब्बीसाठी विमा

पीक विम्याचे संरक्षण देण्यासाठी काही तारखा ठरलेल्या आहेत मात्र विभागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्या कमी प्रमाणात झाल्या त्यामुळे रब्बीची पेरणी सप्टेबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकर झालेल्या रब्बीच्या पिकांनाही विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी केंद्रशासनाकडे निवेदन देण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्याकडून मदत

दुष्काळ निवारणासाठी जालना जिल्हा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धाऊन आला असून जिल्ह्यातील पालकमंत्री ६ महिन्यांचे वेतन, लोकप्रतिनिधी १ महिन्याचे वेतन तर कर्मचारी १ दिवसाचे वेतन मदत म्हणून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सप्टेबरमध्ये दुष्काळ दौरा

मराठवाड्याच्या टंचाईसंदर्भात संपूर्ण नियोजन झाले असले तरी सप्टेबर महिन्यामध्ये औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात येईल तसेच आपण मराठवाड्यातील परिसिथती जाणून घेण्यासाठी विभागाचा दुष्काळ दौरा करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जायकवाडीत पाणी प्राधिकरणाच्या आदेशानुसारच

जायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडण्यासाठी एक सूत्र असते. ठराविक कालावधीत रेशोनुसारच खाली पाणी सोडण्यात येते व हा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता काढता पाय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विकासासाठी संघ शक्ती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'संघाशी निगडित संस्थांच्या एकत्रित शक्तीचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा, आपली एकत्र‌ित संघटनात्मक विधायक शक्ती खूप मोठी आहे, त्याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केल्यास अपेक्षित परिवर्तन गतीने साध्य करता येईल,' असा विश्वास अखिल भारतीय सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत समन्वय बैठकीत रविवारी ते मार्गदर्शन करत होते. संघाच्या राज्यस्तरावरील कार्यकर्त्यांची दोन दिवसीय समन्वय बैठकीचा समारोप रविवारी (२३ ऑगस्ट) झाला.

दरवर्षी होणाऱ्या या बैठकीला संघ परिवारातील विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सामाजिक समरसता मंच, वनवासी कल्याण आश्रम, भटके विमुक्त विकास परिषद, भारतीय जनता पक्ष, क्रीडा भारती, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ यासह ३० संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद येथे प्रथमच झालेल्या या बैठकीत प्रतिनिधींनी निवेदन व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले. यात संघटनेची सद्यस्थिती, संघटनात्मक विस्तार, आगामी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. दुष्काळाचा सामना करण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याचे परिणाम व पुढील काळातील योजनांचे सादरीकरण करण्यात आले.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी दीनदयाळ बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे यवतमाळ येथे शेतकरी विकास संशोधन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्याबद्दलचे निवेदन बैठकीत करण्यात आले. दलित वस्त्यांमध्ये बचतगट निर्मिती, वनवासी व भटके विमुक्त महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न, भटके विमुक्तांमधील अंधश्रद्धा, कुप्रथा निर्मुलनासाठीचे प्रयत्न याची माहिती स्वयंसेवी संस्थांतर्फे मांडण्यात आली. देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये समाज जागृतीचे काम करणाऱ्या सोलापूर येथील श्रीमती चंद्रीकाताई चव्हाण यांनी केलेले निवेदन सर्वांनाच अंतर्मुख करून गेले. भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने विविध विद्याशाखामध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा सुरू करणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीचा समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक यांनी केला.

या बैठकीसाठी प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक चौगुले, पूर्वसैनिक सेवा परिषदेचे निवृत्त लेप्टनंट जनरल व्ही. एन. पाटील, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे, विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. अशोक कुकडे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, हंसराज अहीर, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ३७५ प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरण संवर्धनासाठी उद्योगांनी प्रयत्न करावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी उद्योगांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, पर्यावरण प्रदूषित होऊ नये, यासाठी सरकारने आदेशित केलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे', असे आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) च्या शिष्टमंडळाने शनिवारी जावडेकर यांच्याशी चर्चा केली. औरंगाबाद स्थित उद्योगांच्या विविध समस्यांची यावेळी चर्चा करण्यात आली. सीएमआयए अध्यक्ष आशिष गर्दे यांनी जावडेकर यांचे स्वागत केले. श्री. जावडेकर यांनी केंद्र सरकारने पर्यावरणासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या बैठकी दरम्यान हरित लवादाने जाहीर केलेले आदेश व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची त्या अनुषंगाने केलेली कार्यवाही याविषयी चर्चा करण्यात आली.

सीएमआयएचे सचिव प्रसाद कोकीळ यांनी सीएमआयएच्या माध्यमातून यासंदर्भात हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयी महिती दिली. सांडपाण्याचा पुनर्वापर तसेच घनकचरा व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. तसेच विभागातील सर्व औदयोगिक संघटना एकत्र येउन मराठवाडा इन्व्हारमेंटल केअर क्लस्टर (एमईसीसी) नावाची 'नॉन फॉर प्रॉफिट' संस्था स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हया संस्थांचाही सहभाग आहे व तो वाढविण्याची त्यांनी तयारी दर्शविलेली आहे. चर्चेत उपाध्यक्ष गुरप्रित बग्गा, माजी अध्यक्ष एन. के. गुप्ता, उमेश दाशरथी, मिलिंद कंक, कार्यकारी समितीचे सदस्य जी. के. संगनेरिआ, अक्षय राठी, रितेश मिश्रा, सौरभ भोगले, रमण अजगांवकर, आर. एच. मार्लापल्ले, विनोद नांदापूरकर, मैथिली तांबोळकर, उदयोजक विवेक देशपांडे, अनिल भालेराव, आबासाहेब देशपांडे, रोहित देशपांडे, मुकुंद बडवे, लक्ष्मीकांत मिनियार, व्ही. के. श्रीवास्तव, रवी वैद्य आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्मवादी राहूनच प्रगती शक्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'प्रगती करताना आपल्यासोबत इतर समाजाचाही विचार करणे ही संस्कृती आहे. व्यापारात आघाडीवर असलेल्या आर्य वैश्य समाजाने या संस्कृतीचे जतन करावे. कर्मवादी राहूनच अधिकाधिक प्रगती शक्य आहे,' असे प्रतिपादन अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्य वैश्य समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

आर्य वैश्य मंडळ, औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित गुणवंत राज्यस्तरीय कौतुक सोहळा रविवारी (२३ ऑगस्ट) रुक्मिणी सभागृहात झाला. या कार्यक्रमाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आर्य वैश्य जागतिक महासभेचे अध्यक्ष रामकृष्ण तंगुतुरी, परभणी महापालिकेचे आयुक्त राहुल रेखावार, डॉ. श्रीनिवास ओमनवार, कार्यकारी अभियंता संजय मुनगीलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, 'आर्य वैश्य समाज पूर्वीपासून व्यवसायात आघाडीवर आहे. समाजाची गृहिणीसुद्धा उत्तम आर्थिक नियोजन करते.

ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन व्यवसाय उभारून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न करा. आपल्यासोबत इतर समाजाचाही विचार करा. दैववाद व कर्मवादात कशाला प्राधान्य द्यावे असा पेच असतो. मात्र, श्रद्धा जपत कर्मवादाला प्राधान्य देऊन यश मिळवा'. तर मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रात येण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. 'डॉक्टर, इंजिनीअर किंवा एमबीए या चाकोरीतून बाहेर पडा. आव्हाने पेलण्याची क्षमता वाढवून यश मिळवले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्याने थांबलात तर संपलात ही जाणीव हवी. व्यवसायासोबत कला, साहित्य, क्रीडा या क्षेत्रात संधी शोधण्याची गरज आहे,' असे रेखावार म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात राज्यभरातील साडेतीनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन भास्करराव चौधरी व अनिल चिंतावार यांनी केले. प्रास्ताविक ब्रह्मानंद चक्कावार आणि सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार व महेश अचिंतलवार यांनी केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकोरी मोडा

आर्य वैश्य समाज पूर्वीपासून व्यापारात अग्रस्थानी आहे. मात्र, एकाच चाकोरीत अडकण्यापेक्षा विविध क्षेत्रात आगेकूच करण्याचे मान्यवरांनी आवाहन केले. 'हातात दोन रुपये असताना एका रुपयाची भाकरी व एका रुपयाचे पुस्तक घ्या असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत', याची आठवण अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी उपस्थितांना करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेट असेल तरच पक्के लायसन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पक्के ड्रायव्हिंग लायसन्सकरीता दुचाकीसाठी हेल्मेट घालून व चारचाकी चालवताना सिटबेल्ट बांधून चाचणी द्यावी लागणार आहे. हा नियम सोमवारपासून (२४ ऑगस्ट) लागू होत आहे.

आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ड्रायव्हिंग ट्रॅकवर मोटार वाहन निरीक्षकांसमोर वाहन चालवून चाचणी द्यावी लागते. दुचाकी वाहनधारक स्वतःच्या दुचाकीवर तर चारचाकी वाहनधारक स्वतःची किंवा ड्रायव्हिंग स्कूलची मोटार चालवून चाचणी देतात. वाहतूक नियमाचे ज्ञान सुरुवातीपासूनच व्हावे व नियमांची अंमलबजावणी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यापासूनच व्हावी यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैदांणे यांनी हा बदल करण्याची सूचना मोटार वाहन निरीक्षकांना केली आहे. हेल्मेट असेल तरच चाचणी घ्यावी, असे लेखी आदेश सैदाणे यांनी दिले आहेत. चारचारीच्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उमेदवाराने सिटबेल्ट बांधला नाही तर त्याला पुन्हा चाचणी द्यावी लागेल, असे सांगण्यात आले.

रोज २०० उमेदवार

आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांची संख्या कमी असल्याने अनेक उमेदवारांना अपॉईंटमेंट मिळत नाही. कागदपत्रे तपासणीसाठी रांग लागते. यापुढे दररोज प्रत्येकी २०० लर्निंग व पक्के लायसन्स तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे मोटार वाहन निरीक्षकांना सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत दोन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. याबद्दलचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आघाडी’मुळे शिक्षणात गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आघाडी सरकारने शाळा, कॉलेज देताना कोणतीही काळजी घेतली नाही. इतर धोरणे चुकली. त्यामुळे शिक्षणात गोंधळ निर्माण झाला आहे', असा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. रविवारी स्वामी रामानंदतीर्थ स्मृती केंद्रात आयोजित 'आमच्या शिक्षणाचे काय' या कार्यशाळेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तावडे म्हणाले, 'कायम शब्द काढण्यात आला असून, अशा संस्थांना अनुदान देणे क्रमप्राप्त आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील शासनाने गरज नसताना भरमसाठ शाळा, कॉलेज दिले.

यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे यापुढे शिक्षणाचा विकास आराखडा तयार करण्यात येईल. त्या परिसरातील गरजेनुसार तेथे कोणत्या अभ्यासक्रमाचे कॉलेज आवश्यक आहे, त्यानुसारच यापुढे कॉलेज दिले जाईल. आवश्यक असेल तरच शाळेला मंजुरी मिळेल. बालवाडीवर नियंत्रण आणण्याबाबत आढावा घेतला जात आहे. त्याचा निर्णय घेऊ. शाळांमधील शुल्कवाढीबाबत पालक तक्रारी करण्यात घाबरतात. त्यामुळे शाळांचे फावते.

सीबीएसई शाळांवर राज्यसरकार फक्त ना हारकत प्रमाणपत्र देऊ शकते. याउपर त्यांच्यावर कारवाईबाबत राज्य शासनाकडे अधिकार नाहीत. शाळेला ना हारकत नाकारली तर विद्यार्थी, पालक, तेथील पुढारी विरोध करतात. त्यामुळे लाखो रुपयांची शुल्कवाढ केल्यानंतरही अनेकदा अशा शाळांवर कारवाई करताना अडचणी निर्माण होतात. हे लक्षात घेत सीबीएसईसारख्या मंडळाच्या शाळांवर राज्यशासनाला कारवाईचे अधिकार द्यावेत. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पत्र दिले आहे', असे तावडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यासाठी ४००० कोटींचे विशेष पॅकेज?

$
0
0

मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळ आणि विकास प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारने ४००० कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी विभागातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पॅकेज देण्याचे सूचित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळाच्या औरंगाबादेत पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत या पॅकेजची घोषणा होऊ शकते, असे मानले जाते.

पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाड्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सरकारच्या पातळीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. दुष्काळी स्थितीला तोंड देण्यासाठी कोणत्या स्वरुपाची उपाययोजना करण्यात येत आहेत, याची माहिती घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर मराठवाड्यासाठी ४००० हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यासाठी तयारी करण्याचेही त्यांनी सांगितल्याची माहिती या सूत्रांनी दिली.

या पॅकेजमध्ये दुष्काळावरील उपाययोजना आणि विभागाच्या विकास कामांसाठीच्या खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध विभागांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. हे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

सात वर्षांनंतर बैठक

औरंगाबादेत आघाडी सरकारच्या कार्यकाळात २००८मध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर स्वाइन फ्लू, मंबईतील दहशतवादी हल्ला, आचारसंहिता, गणेशोत्सव या कारणांमुळे मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे असताना विभागासाठी एकाही वर्षी बैठक घेण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५,००० किमीचे राष्ट्रीय महामार्ग

$
0
0

उन्मेश देशपांडे, औरंगाबाद

केंद्र सरकार येत्या काळात देशभरात पंधरा हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार आहे, प्रत्येक महामार्ग चार पदरी असणार असून, हे रस्ते सिमेंट काँक्रिटचेच असतील अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 'मटा'ला विशेष मुलाखत देताना दिली. या राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यात महाराष्ट्र आणि मराठवाड्याला झुकते माप दिले जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. इंधनाच्या बाबतीत स्वदेशी आणि स्वावलंबी होण्यासाठी येत्या काळात इलेक्ट्रिक मोटारींच्या उत्पादनावर भर दिला जाणार असून त्यातील पहिल्या मोटरीचे लोकार्पण लोकसभेच्या आगामी अधिवेशनाच्यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल असेही गडकरी म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीच्या निमित्याने नितीन गडकरी आज रविवारी औरंगाबाद शहरात आले होते. गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाचे आतापर्यंतचे नियोजन ७५०० किलोमीटरचे आहे. आता १५००० किलोमीटरचे रस्ते केले जाणार आहेत. सर्व राष्ट्रीय महामार्ग किमान चार लेनचे असतील. प्रत्येक महामार्गाच्या बाजूला १२५० अॅमिनिटीज् उभ्या केल्या जाणार आहेत. प्रत्येक बायपासला गावाच्या बाहेर मेडिकल हब, एज्युकेशन हब व ट्रांसपोर्ट हब बांधण्याची योजना आहे. सध्या जमिनीचे भाव खूप वाढले आहेत. त्यामुळे भूसंपादनासाठी ८० हजार कोटी रुपयांवरून एक लाख ८० हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स उभारण्याची योजना असल्याचेही गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. देशात दोन हजार ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स उभारले जाणार आहेत.

तालुक्याच्या ठिकाणी आणि नगरपालिका क्षेत्रावर गावाबाहेर हे सेंटर्स उभारले जातील. गडकरी यांच्या व्यवस्थेसाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, उद्योगपती विवेक देशपांडे, भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडमोडे विशेष लक्ष ठेवून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे यांनी घेतली सुपारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

पुरंदरे यांचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन भाजपमधील मराठा नेत्यांबद्दल संशय निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुपारी घेतल्याचा घणाघाती आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज बदनामी विरोधी कृती समितीतर्फे जालन्यात आयोजित शिवसन्मान जागर परिषदेत ते बोलत होते. येथील भाग्यनगर परिसरातील मराठा सेवा संघ कार्यालायाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रा. श्रीमंत कोकाटे, प्रा. प्रतिभा परदेशी, प्रा. डॉ. मे‌हबूब सय्यद, रिपाइंचे अॅड. चव्हाण, कॉ. अण्णा सावंत, संतोष गाजरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. आव्हाड यांनी भाषणाची सुरुवात जालन्यातील पोलिस अधीक्षकांवर टीकास्त्र सोडून केली. प्रवीण तोगडिया, अशोक सिंघल यांच्यासारख्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांना सभेसाठी परवानगी दिली जाते. मात्र, आमच्यासारख्या विवेकवादी लोकांना सत्य आणि विचार मांडण्यास बंदी घातली जाते. चौकशीतून वाचण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी परवानगी नाकरली आहे. सरकार कायमचे नसून फक्त पाच वर्षांसाठी असते याचे त्यांनी भान ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला.

आव्हाड म्हणाले, 'महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन राज्य सरकारने पुरंदरे यांच्या खोट्या इतिहासावर शासनाचा अधिकृत शिक्का लावला आहे. राज्य सरकारने इतिहासाचे पुनर्लेखन करावे, अन्यथा शिवप्रेमींच्या मनातील द्वेष सर्वत्र पसरेल. त्यामुळे होणाऱ्या परिणमाला सरकार जबादार राहील असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, या कार्यक्रमाला पोलिसांनी आणि नगर पालिकेने परवानगी नाकरल्याने कार्यक्रमावर अनिश्चतेतेचे सावट पसरले होते. कुठला ही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. नाट्यगृह परिसराला दोरीचे कुंपण घालण्यात आले होते. आयोजकांनी ऐनवेळी भाग्यनगरातील मराठा सेवा संघ भवनात कार्यक्रम घेऊन पोलिसांना चकवा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आई रागावल्याने मुलीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

आईने रागावल्याचा राग मनात धरून १६ वर्षाच्या एका युवतीने झोक्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास भोकर येथील पवार कॉलनीत ही घटना घडली.
सौरंगी मारोती दर्शनवाड (वय १६) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पंचमी सणानिमित्त घरात झोका बांधला होता. सौरंगीचा आई समवेत काही कारणावरून वाद झाला. ती शिवाजी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होती. सोमवारी शाळा सुटल्यानंतर ती घरी परतली. परंतु, आईने पुर्वी रागवलेल्या वादाचा विषय डोक्यात असताना तिचे लहान भावासमवेत भांडण झाले. याचवेळी खोलीचे आतले दार बंद करून ओढणीच्या सहाय्याने झोक्याच्या दोरीत ओढणी बांधून तिने जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा मृतदेह आढळला

$
0
0

नांदेडः रेल्वे स्थानकाजवळील शौचालयाजवळ ५५ वर्षाचा एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. रविवारी ही घटना घडली. या प्रकरणी ऑटोचालक विजय गंगाराम वाघमारे यांनी लेखी फिर्याद दिली आहे. नांदेड शहरातील रेल्वेस्थानकाजवळ रविवारी दुपारी महिला मृतावस्थेत अाढळून आली. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांने महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. त्यानुसार वजिराबाद पोलीसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. जमादार आडे पुढील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकी दिल्याने महिलेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,जालना

शेळी चोरल्याचा आरोप करून, पोलिस केस करण्याची धमकी दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. रानीउंचेगाव शिवारात घडलेल्या या घटनेप्रकरणी चौघांविरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राहिबाई बाबुराव शिंदे (वय ६०) असे या मयत महिलेचे नाव आहे. राणीउंचेगाव येथील राहिबाई यांना त्यांच्या शेजारी राहत असलेल्या रामकुंवर तुकाराम गोडसे, मनिषा संदीप लोहकरे, संदीप लोहकरे, अंजना नामक महिलेने तुम्ही आमच्या बकरीस काही तरी चारून मारले आहे, असा आरोप केला होता. याप्रकरणी आम्ही तुमच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात केस करणार आहोत, अशी धमकी दिली होती.

या मानसिक त्रासाला वैतागलेल्या राहिबाई शिंदे यांनी रविवारी राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात वरिल सर्व आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजपूत करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेल्या आठ महिन्यांत ९६ शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षीच्या सुरुवातीच्या आठ महिन्यात ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षीय नेतेमंडळींचे दौरे व आश्वासनाची खैरात होत असतानाही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. राज्य सरकार मात्र, अद्यापही या दुष्काळीस्थितीबाबत असंवेदनशील आहे. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी उस्मानाबाद तालुक्यातील कोल्हेगाव येथील शेतकरी मधुकर निवृत्ती टेकाळे (वय ६५) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे २४ ऑगस्ट २०१५ मध्ये जिल्ह्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९६ वर पोहोचली आहे.

जिल्हातील ९६ पैकी ४१ शेतकरी आत्महत्येचे प्रस्ताव हे शासन मदतीस पात्र ठरले आहेत. तर २९ प्रस्ताव हे अपात्र ठरले असून, २६ प्रस्तावाची चौकशी सुरू आहे. नापिकी व दुष्काळीस्थिती यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. २०१५ मध्ये अवघ्या आठ महिन्यांतच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे प्रशासनवरील जबाबदारी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला लिपिकास लाच घेताना पकडले

$
0
0

नांदेडः शेत जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना किनवट तहसील कार्यालयातील महिला लिपिकास सोमवारी लाचलूपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांने रंगेहाथ पकडले.

पद्मा आनंदराव निलगीरवार असे अटक करण्यात आलेल्या महिला लिपिकाचे नाव आहे. किनवट तालुक्यातील पांगरी येथील शेत जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील कुळाचे नाव कमी करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह गेल्या एप्रिल महिन्यात तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. तक्रारदार यांचे पत्नीचे नावे असलेल्या शेतीचे कुळाचे नाव कमी करण्यासाठी लिपीक पद्मा निलगिरवार यांनी ५ हजार रुपये रक्कमेची लाच मागितली. तडजोडी अंती हा सौदा ३ हजार रोख रुपये देऊन झाला. उर्वरित रक्कम देण्याची तक्रारदाराची तयारी नव्हती. त्यामुळे त्यांनी नांदेडच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून लेखी तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचून लाचव घेत असताना पद्मा निलगीरवार यांना रंगेहाथ पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images