Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जाचक अटींमुळे चारा छावणीचालक त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या शिस्त व पारदर्शक कारभारामुळे जिल्ह्यातील इच्छूक असलेल्या चारा छावणी चालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दुष्काळात चारा छावण्या उघडून जनावरांच्या सेवेच्या नावाखाली बिले लाटणाऱ्या राजकीय पशुसेवकांमध्ये अस्वस्थेतेचे वातावरण आहे.

चारा छावणीच्या कारभारात यंदा भ्रष्टाचाराला व गैरकारभाराला वाव नाही. याची खात्री इच्छूक चारा छावणी चालकासह राजकीय नेतेमंडळी व साखर सम्राटांना झाल्यामुळेच यंदा चारा छावण्या सुरू करण्यायाबाबत निरुत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वीच्या दुष्काळात राजकीय नेते मंडळींच्या शिफारशींवरून अनेक कार्यकर्त्यांना छावण्या मिळाल्या. छावणीसाठी कागदपत्रे गोळा करणारे छावणी मालक अल्पावधीतच मालामाल झाले. जनावरांना उपाशी, अर्धपोटी ठेवणारा, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणारा दुष्काळ अशा छावणी चालकांच्या पथ्थ्यावर असल्याचे यापूर्वी अनुभवयास मिळाले आहे.

यापूर्वीच्या दुष्काळी स्थितीत अनेक छावणी चालकांनी कागदोपत्री जनावरांचा आकडा फुगवून प्रशासनाच्या मर्जीत राहून दुष्काळाच्या संधीचे सोने केले आहे. चारा छावणीसाठीची ही मोहिम सर्वांसाठी खुले असल्याने कोणत्याही राजकीय पक्षांनी छावण्यांबाबत तक्रारी केल्या नाहीत. चारा छावणी उघडण्यासाठीच्या अटीमुळे अनेकांनी या चारा छावण्या सुरू करण्याकडे कानडोळा केला आहे. चारा छावणी संदर्भातील नियमावली सकृतदर्शनी जाचक वाटत असली तरी ती व्यावहारिकदृष्ट्या योग्य आहे. शासन नियमानुसार अदा रक्कम मिळण्यास आठ-दहा दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंतचा छावणीतील खर्च चालकांने करणे गरजेचे आहे.

चारा छावणीतील जनावरांसाठी शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य तोकडे आहे, असा आरोप केला जात आहे. छावणीतील शेण व मूत्राव्दारे मिळणारे उत्पन्न मोठे आहे. अनेक छावणीला दानशूर व्यक्ती चारा देणगी स्वरूपात देतात. पाण्यासाठी टँकर पुरवितात. मात्र, या बाबी छावणीचालक हिशेबात दर्शवित नाहीत.

- डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद

दुष्काळामुळे शेतकऱ्याजवळील चारा संपुष्टात आला आसून, आता चारा छावण्यावर शेतकऱ्यांची व पशुपालकांची मदार आहे. जिल्ह्यातील धनदांड्यामंडळिबरोबरच साखर सम्राट व सामाजिक संस्थांनी छावण्या उघडण्याबाबत निरुत्साह दर्शविला आहे.

- महेश पाठक, पालक सचिव, उस्मानबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने अॅझोला आणि हायड्रोफोनिक्स तंत्राव्दारे चारा निर्मितीस चालना देण्यात येत आहे.

- शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधिकारी, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जबाजारीपणामुळे दोघांची आत्महत्या

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण थांबण्यास तयार नाही. जालना, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने सोमवारी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

बँकेचे होते कर्ज

जालना-कर्जबाजारी शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे घडली. कल्याण राधाकृष्ण तारख असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. कल्याण तारख यांची अंतरवाली शिवारात ४२ गुंठे जमीन आहे. त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एक लाख रूपये कर्ज तसेच विविध सोसायटीचे ६७ हजाराचे कर्ज आहे. गत तीन वर्षांपासून दुष्काळ परिस्थितीमुळे शेतीत उत्पादन येत नव्हते. बँकेचा त्यांच्या पाठीमागे सारखा तगादा होता. या आर्थिक विवंचनेत कल्याण तारख यांनी शेतात विषारी औषध घेऊन जीवन यात्रा संपवली.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

नापिकीमुळे त्रस्त

नांदेडः नापिकी व कर्जाला कंटाळून धर्माबाद तालुक्यातील चोळखा येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली. दत्ताहरी बापूराव कदम (वय ४५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी रात्री जेवण करून आखाड्यावर झोपण्यासाठी गेला. त्याठिकाणी सर्विस वायर ओढून हाताला धरली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दोन वर्षांपासूनच्या नापिकी मुळे व बँकेचे कर्ज असल्याने कंटाळून आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टील उद्योगाला मंदीच्या झळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जागतिक पातळीवरील मंदीच्या झळा जालन्यातील स्थानिक भूमीपुत्रांच्या स्टील उद्योगाला बसण्यास सुरुवात झाली आहे. वीज दरवाढीचा बोजा, रुपयांचे अवमूल्यन आणि चिनी स्टीलचा भारतीय बाजारपेठेतील धुमाकूळ या सर्वाचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे निम्म्यावर स्टील कारखाने बंद पडले आहेत, तर उर्वरित कारखान्यांनी उत्पादन निम्म्यावर आणले आहे.

स्टील उद्योगाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे जालना सध्या औद्योगिक मंदीच्या संकटात सापडले आहे. जागतिक पातळीवर बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. दुष्काळी वातावरणामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे बांधकामे रखडलेल्या अवस्थेत असल्याने लोखंडी सळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात खालावली आहे. मालाला उठाव नाही. त्याच सोबत बांधकाम सळ्यांचे भाव सरासरी तीस टक्क्यापेक्षा अधिक घसरले आहेत.

स्टील उद्योगात वीज ही कच्चा माल म्हणून समजली जाते. जालन्यातील स्टील कारखान्यांना सर्वात मोठा तोटा वीज बिलाचा होतो आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्याच्या तुलनेत दीड पटीने महागडी वीज घेऊन कारखाने चालवणे म्हणजे निव्वळ हारकारी आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात साधारणपणे साडेचार रूपये युनिट वीज आहे. ही वीज महाराष्ट्र राज्यात किमान सहा रुपये युनिट खरेदी करावी लागते ही वस्तुस्थिती आहे.

जागतिक पातळीवर डॉलरच्या तुलनेत रूपयांच्या अवमूल्यनाचा परिणाम विदेशी स्कॅप (भंगार) येण्यावर झाला आहे. अतिशय महागडा विदेशी स्कॅप मागवण्यात अजिबातच न परवडणारे झाला आहे. मात्र, याच जोडीला देशातील लोखंडी स्कॅपचे संकलन अगदीच मंदावले आहे. सध्याच्या परिस्थितीत लोखंडाच्या अनेक वस्तूना प्लास्टिकचा स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने लोखंडाच्या वस्तू वापरण्याची पद्धत बदलत चालली आहे.

चीनने लोखंडाच्या उद्योगाला त्यांच्या देशात दिलेल्या प्रचंड सवलतीमुळे बांधकामाच्या लोखंडी सळ्या कमी भावात विकत आहेत. याचा परिणाम या कारखान्यांवर झाला आहे. चीनमध्ये अकरा हजार मिलियन टन लोखंडाच्या बांधकाम सळ्यांचे उत्पादन होते. या तुलनेत भारतात केवळ सातशे मिलीयन टन उत्पादन झाले आहे.

- नितीन काबरा, संचालक, भाग्यलक्ष्मी पोलाद स्टील, जालना

जालन्यातील लोखंडाच्या उद्योगात आलेल्या या मंदीचे सावट सर्वस्तरातील व्यापारी व उद्योगावर पसरले आहे. यावर उपाय शोधण्याची मोठी तातडीची आवश्यकता आहे. राज्य सरकार वीजेची क्रॉस सबसिडी भरणार आहे. त्यामुळे या व्यवसायास किंचित हातभार लागेल.

- डी. बी. सोनी, संचालक, राजुरी स्टील, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईच्या पाण्यामध्ये कपात होणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा नदीच्या खोऱ्यातील पाण्यावर मुंबईचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. यातील समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा विचार आहे. त्यामुळे या बदलांचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता नाही.

पिंजाळ आणि दमणगंगा नदीच्या खोऱ्यातील १४.५० टीएमसी पाणी मराठवाड्याच्या दिशेने वळविल्यास त्याचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी ३२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला मिळाल्यास त्याचा दुष्काळ निवारणाच्या योजनेसाठी त्याचा कायमस्वरूपी फायदा होऊ शकतो. या योजनेसाठी उर्ध्व वैतरणा खोऱ्यात दमणगंगा नदीचे २५ चौरस किलोमीटर क्षेत्राचे पाणी वळवून आणता येईल. यासाठी तीन जागी साठवण तलाव व ६.५ किलोमीटर लांबीचा बोगदा करावा लागणार आहे. अशाप्रकारे सुनियोजितपणे योजना राबविल्यास मराठवाड्यातील दुष्काळ हटविणे शक्य होणार आहे.

येत्या काळात दुसऱ्या सिंचन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार, उर्ध्व वैतरणेचे पाणी सॅडल प्रकारच्या धरणाच्या जागी रेडियल गेट बसवून, गोदावरी नदीच्या खोऱ्यात प्रवाही पद्धतीने वळविण्याची गरज आहे. यामुळे मुंबईस पाणी कमी पडू शकते. मात्र, त्याची भरपाई पिंजाळ खोऱ्यातील कोशीमशेट, देवबंध, जोगलवाडी या जागी साठवण तलाव करून, त्यातील पाणी मध्य वैतरणामध्ये धरणाकडे वळवून करता येईल. या तीन साठवण तलावाचे पाणलोट क्षेत्र १८० चौरस किलोमीटर आहे. खोदाडे गावाजवळून पिंजाळ नदीचे उर्वरित ८० चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र अडीच किलोमीटरच्या प्रवाही कालव्याने मोडकसागरकडे वळवावे. त्यासोबत पिंजाळ नदीचे १६० चौरस किलोमीटर क्षेत्राचे पाणी वैतरणा खोऱ्यात वळविल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मक्याची शेती दुष्काळात ‘स्वीट‘

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

अद्रक उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील हतनूर येथील शेतकऱ्यांनी यावर्षी पाऊस नसल्याने कमी कालावधीत येणारे मधूर मकाचे (स्वीट कॉर्न) भरघोस उत्पन्न घेतले आहे. हे पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबस सिंचनाचा उपयोग केला.

या वर्षी पाऊस कमी असून अद्रक पिकाला भरपूर पाणी लागते. त्यामुळे हतनूरच्या शेतकऱ्यांची 'दुष्काळ' म्हणून फक्त ओरड करण्यापेक्षा उपलब्ध पाण्यात पण अद्रक एवढेच आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्वीट कॉर्नची शेती करण्यास प्राधान्य दिले. स्वीट कॉर्न हुरड्यात असताना खाण्यासाठी जास्त उपयोग होते. त्याला सुरत, मुंबई व औरंगाबाद येथील बाजारपेठेतून मागणी आहे. हतनूर येथील ३० शेतकऱ्यांनी ७५ ते ९० दिवसात एकरी ३८ ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. स्वीट कॉर्नचे उत्पन्न घेण्याचा दुहेरी फायदा आहे. आर्थिक उत्पन्न मिळतेच; त्यासोबत मुबलक चाराही उपलब्ध झाला आहे. चाऱ्यालाही मागणी आहे. कमी कालावधीच्या या पिकाने शेतकऱ्याना चांगलाच हातभार लावला आहे.

मशागत : २,५०० रुपये

बियाणे : ४००० रुपये

लागवड खर्च : ४५० रुपये

तणनाशके : ५०० रुपये

खते : ३००० हजार

एकूण : १०,४५० रुपये

स्वीट कॉर्नपासून एकरी ६० हजार पर्यंत उत्पन्न मिळाले आहे. हा भाव बाहेरगावच्या व्यापाऱ्यांनी जागेवरच दिला. कमी कालावधीत व दुष्काळी परिस्थितीत चांगला हातभार लागला.

- रमेश शहरवाले, शेतकरी

स्वीट कॉर्न हे कमी कालावधीत निघणारे उत्तम पीक आहे. पिकांची फेरपालट करण्यासाठी याचा चांगला उपयोग होवू शकतो. एकंदरीत कमी कालवधीत, कमी पावसात जास्त उत्पन्न देणारे पीक असल्याने लागवड केली.

- कैलास मोहिते, शेतकरी

हतनूर गावापासून औरंगाबाद हे जवळचे मार्केट आहे. सुरत व मुंबईचे व्यापारी येऊन मका घेऊन जात आहेत. व्यापारी या मकासाठी वाहतुकीच्या दृष्टीने रोडवरील शेतीला पसंती देत आहेत.

- संजय लोखंडे, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षण दूरच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुलै महिन्यात केलेल्या शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या २ हजार १०४ विद्यार्थ्यांपैकी फक्त ५३९ जणांना पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. दरम्यान, कामगारांचे स्थलांतर विचारा घेऊन फेरसर्वेक्षणाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचबरोबर येत्या ५ सप्टेंबरपर्यंत सर्व मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

राज्यातील शाळाबाह्य मुलांचे ४ जुलै रोजी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात कधीच शाळेत न गेलेली आणि अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलांची आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. एका दिवसाच्या या सर्वेक्षणात जिल्ह्यात २ हजार १०४ शालाबाह्य मुले आढळले. त्यानंतरही अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यामुळे आशा मुलांची पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल दर आठवड्याला शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये परगावी गेलेले, स्थालांतरित झालेले किंवा सर्वेक्षणात आढळून न आलेल्या अशा सर्व बालकांना शाळेत प्रवेश द्यावा लागणार आहे. या मुलांना शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गावातील बचतगट स्वंयसेवी संस्था, शाळा व्यवस्थापन समिती यांनी दत्तक घेण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात केलेल्या सर्वेक्षणात सुमारे १ हजार १९ मुले शालाबाह्य असल्याचे आढळले.

जिल्ह्यात ९९४ मुले शालाबाह्य आढळली आहेत. शहरात सुमारे १ हजार १९ शालाबाह्य मुले आहेत. ५३९ मुलांना शाळांमध्ये प्रवेश दिला असून, ५ सप्टेंबरपर्यंत या सर्व मुलांना शाळेत सामावून घेण्याचे शिक्षकांना आदेश दिले आहेत.

- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

औरंगाबाद तालुकाः ५२

सिल्लोडः ६८

वैजापूरः ५६

गंगापूरः २३८

पैठणः १९७

खुलताबादः २८

फुलंबीः ६५

सोयगावः ३२

कन्नडः १४७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठगन पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील दाम्पत्याला त्रास देणे, विवाहितेचा छळ करणाऱ्या व तिच्या लहान मुलीला जिवे मारण्याच्या उद्देशाने पहिल्या मजल्यावरून फेकणारा संशयित आरोपी ठगन पाटील याचा अटकपूर्व जामीन पहिले जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. पठाण यांनी फेटाळला. फिर्यादी महिलेने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

ठगन पाटीलने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यामध्ये खोटी तक्रार करण्यात आल्याचे आरोपीने म्हटले होते. दरम्यान, वैद्यकीय कागपत्रांची तपासणी केली असता, संबंधित मुलगी ९ नोव्हेंबर २०१२ रोजी श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल होती व त्यानंतर कपाडिया हॉस्पिटलमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे कोर्टासमोर सादर करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीवेळी, संशयित आरोपी फिर्यादीवर दबाव आणू शकतो. त्याच्यावर यापूर्वीचे चार गुन्हे दाखल आहेत. प्रकरणाचा पूर्ण तपास व्हायचा असून, पुरावा नष्ट करू शकतो. त्यामुळे जामीन देऊ नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी केली. फिर्यादीच्या वतीने अॅड. एस. एम. बियाणी यांनी काम पाहिले.

घटनेची पार्श्वभूमी

ठगन पाटील याने फिर्यादीला बांधकाम क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचे सांगून रक्कम दुप्पट करून देण्याचे आमीष दाखविले होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याची ओळख करून दिली व आग्रह केल्याने फिर्यादीने रक्कम गुंतवली होती. त्यानंतर ठगन पाटीलने या दाम्पत्याला त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, ९ नोव्हेंबर २०१२ रोजी रात्री नऊ वाजता दारू पिऊन फिर्यादीच्या घरात गेला. त्यावेळी फिर्यादीचा पती घरी नव्हता. लहान मुलीचा गळा दाबण्याच्या प्रयत्नात असताना, फिर्यादीने मुलीला सोडवून घेतले व दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर धाव घेतली. त्याचवेळी मुलीला जिवे मारण्याच्या उद्देशाने पाटीलने मुलीला खाली फेकून दिले. यात मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशानुसार ४७८ (१५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दशक्रियाविधीसाठी जाताना तरूण ठार

$
0
0

पैठण तालुक्यातील ढाकेफळ फाट्यावर अपघात

म. टा. प्रतिनिधी, पैठण

औरंगाबाद-पैठण रस्त्यावरी ढाकेफळ फाट्याजवळ मोटारसायकल व म्हशी घेवून जाणारा टेम्पो व मोटारसायकलची धडक बसली. या अपघातात मोटारसायकलवरील पती जागेवर ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली. हे दोघे नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी जात होते.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील रहिवासी गोविंद घराबे (वय २४) हे पत्नीसोबत औरंगाबादहून पैठणकडे एका नातेवाईकाच्या दशक्रियाविधीकरिता जात होते. तेव्हा सकाळी साडेदहाच्या सुमारास ढोरकीन जवळील ढाकेफळ फाट्याजवळ त्यांच्या मोटारसायकलचा (एमएच २०, एल ७०५०) विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोसोबत (एम एच २०, बीटी २२१) अपघात झाला.

अपघातात गोविंद घराबे यांचा जागीच मृत्यू झाला. ज्योती घराबे यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा हजारांची लाच घेताना लिपिकास पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तहसील कार्यालयातील जमाबंदी लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (३१ ऑगस्ट) दुपारी दहा हजार रुपयांची लाच घेतांना पकडले. अनिल वाहूळ असे त्याचे नाव आहे.

गदाना येथील सुदाम रामचंद्र अधाने यांचे गट नंबर १०८, २६६ मधील फेरफार प्रकरणात फेरफार ऑर्डर करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून दोन हजार रुपये एक महिन्यापूर्वी घेतले होते. उर्वरित दहा हजार रुपये घेताना पकडण्यात आले. एसीबीचे पोलीस अधीक्षक डी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक भरत राठोड, अनिता वऱ्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुतारीत घेतले पैसे

लिपिक अनिल वाहूळ यांनी जेवण सोडून मुतारीत लाच घेतली. तहसील कार्यालयात दुपारी जेवणाचे डब्बे घेऊन सर्व कर्मचारी जेवण करण्यासाठी बसले होते. वाहूळ यांनाही डब्बा घेऊन जेवायला चला म्हणून सर्वांनी आग्रह केला. मात्र वाहूळने जेवण सोडून पैसे घेण्यासाठी थेट मुतारी गाठली व जाळ्यात अडकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ जाहीर करून रोजगार पुरवावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. तांत्रिक मुद्दे उपस्थित करून सरकार दुष्काळग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवत आहे. टंचाईग्रस्त मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा आणि लोकांना रोजगार द्या' अशी मागणी शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष डॉ. विष्णू ढोबळे यांनी केली. स्वामी रामानंद तीर्थ स्मृती केंद्रात सोमवारी (३१ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारपासून मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात फडणवीस यांनी रोजगार, चारा आणि पाणी टंचाई या प्रमुख समस्यांवर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष अॅड. ढोबळे म्हणाले, 'विदर्भ, मराठवाडा आणि कच्छ या तीन अवर्षणप्रवण प्रदेशांतील प्रश्नांना अग्रक्रम मिळावा अशी घटनात्मक तरतूद आहे. मात्र, मराठवाड्यातील प्रश्न वर्षानुवर्षे दुर्लक्षित आहेत. मागील आठ महिन्यात ५७९ आत्महत्या झाल्या आहेत. राज्य व केंद्र सरकार चर्चेच्या पलीकडे जात नसल्याने दुष्काळावर ठोस तोडगा निघत नाही. परिस्थिती टोकाला गेल्यामुळे शेतकरी महिलांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले. शेती देशातील मूलभूत क्षेत्र असून सर्वात मोठा रोजगार शेतीतच आहे. रोजगार, राष्ट्रीय उत्पन्नात मोठा वाटा आणि देशाचे भरणपोषण करूनही शेतीकडे दुर्लक्ष आहे. दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी थकवण्याचे काम सरकारी यंत्रणा करीत आहे. या प्रकाराला आवर घालून मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आदेश द्यावे'. दुष्काळ व शेतकरी आत्महत्येच्या मुद्यांवर सत्ताधारी व विरोधक राजकारण करतात. हा राजकीय प्रश्न नसल्यामुळे राजकारणविहिन चर्चेतून उपाय शोधावा अशी गरज ढोबळे यांनी व्यक्त केली. सतत तीन महिने मराठवाड्याचा दौरा करून ढोबळे यांनी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. सप्टेंबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात चिंतन शिबिर घेऊन जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी प्रा. सुरेश कुलकर्णी उपस्थित होते.

सरकार बदलले, धोरण तेच

काँग्रेसच्या मनमानीला लोक कंटाळले होते. या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या म्हणून भाजपला संधी मिळाली. पण, नवीन सरकारही जुन्या सरकारच्या वळणावर आहे. सध्या १८ ते ३७ वयोगटातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असूनही सरकार गंभीर नाही अशी टीका ढोबळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

येत्या बुधवारी (२ सप्टेंबर) रोजी होणाऱ्या देशव्यापी कामगार संपात अंगणवाडी व आशा कर्मचारी सामील होणार आहेत. अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी व असंघटित क्षेत्रातील कामगारांना दरमहा १५ हजार रुपये वेतनाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, आयटकच्या तालुकाध्यक्षा संगीता अंभोरे यांनी दिली.

आयटकचे कॉ. राम बाहेती, अंगणवाडी संघटनेच्या सचिव तारा बनसोडे, आशा संघटनेच्या सचिव कल्पना संकपाळ, संघटक अनिल जावळे व विलास शेंगुळे, अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा औरंगाबादमधील संघटनेच्या कार्यालयापासून सकाळी अकरा वाजता निघणार आहे.

असंघटीत कामगारांना निवृत्ती वेतन लागू करा, महागाईनुसार वेतनवाढ द्या, कामगार कर्मचारी विरोधी कायदे हाणून पाडा, भूसंपादन कायदा रद्द करा या मागण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे उशिराचे शहाणपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

'शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेने भूसंपादन विधेयकाला आधीपासूनच विरोध केला होता. आता मोदी सरकारने शिवसेनेने सूचवलेल्या सर्व दुरुस्त्या मान्य करत या कायद्याचा वटहुकूम न काढण्याचा पवित्रा घेतला आहे. भूसंपादनाची जबाबदारी राज्यांवर टाकली आहे. हे मोदी सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे,' अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी टिका केली.

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी स्पर्धाक्षम प्रकल्पांतर्गत नागपूर मुंबई महामार्गावरील कांदा मार्केटमध्ये केलेल्या दोन कोटी १० लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण सोमवारी (३१ ऑगस्ट) देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे संपर्कनेते आमदार विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार आर. एम. वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूरचा आमदार रमेश कदम पोलिसांच्या ताब्यात आहे. दुसरीकडे माजी आमदार आर. एम. वाणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने वैजापुरच्या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध केली आहे. हा शिवसेना व इतर पक्षातील फरक आहे. उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे. शिवजलक्रांतीच्या माध्यमातून जलसंधारणांच्या कामवर भर देऊन संपूर्ण मराठवाड्याचा कायापालट करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले. बाजार समितीचे सभापती अॅड. आसाराम रोठे, उपसभापती सुनील कदम व सचिव विजय सिनगर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संचालक गोकुळ आहेर यांनी केले. आनंदीबाई अन्नदाते, सुलभा भोपळे, संचालक कल्याण जगताप, महावीर बाफना, अनिल आल्हाट, नंदकुमार शिंदे, खुशालसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

'तर वाणी सभापती'

खासदार खैरे यांनी पक्षात दाखल झालेले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील निकम व सहकाऱ्यांचे स्वागत करत कानपिचक्या दिल्या. निकम यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काम केल्याने वैजापूरमधुन मोठी लीड मिळाली. पण त्यांनी विधानसभा निवडणुकीत वाणींचे काम न केल्याने त्यांचा पराभव झाला; नाही तर आज हरीभाऊ बागडेंच्या जागी वाणी असते, असे खैरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाजींच्या नातेवाइकांना विमानतळ पास नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विमानतळावरील गर्दी टाळण्यासाठी हज यात्रेकरूंच्या नातेवाइकांना व्हिजिटर्स पास देऊ नयेत, अशी विनंती हुज्जाज कमिटीच्या सदस्यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना केली आहे. याबद्दल विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले आहे.

औरंगाबाद विमानतळावरून हज यात्रेकरूंना घेऊन जाणारे पहिले विमान २ सप्टेंबर रोजी पहिले विमान जाणार आहे. हज यात्रेकरूंच्या तयारीचा विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडेय, महापालिका आयुक्त प्रकाश महाजन, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हुज्जाज कमिटीकडून आढावा घेतला. यावेळी हुज्जाज ‌कमिटीने हज कॅम्प ते विमानतळापर्यंत ट्रॅव्हल्स बस नेण्यात अडचण येत असल्याचे सांगितल्यानंतर पोलिस आयुक्तांनी बसला विशेष पास देण्यात येईल, विशेष अधिकारीही नियुक्त करण्यात येईल, असे संकेत दिले.दरम्यान, हुज्जाज कमिटीतर्फे यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी विमानतळावर न येता कॅम्पमध्ये भेटावे अशी विनंती करण्यात येत आहे. विमानतळापर्यंत निरोप देण्यासाठी येणाऱ्यांना रोखण्यासाठी पासे देऊ नयेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही लावा

पोलिस आयुक्तांनी हज कॅम्पमध्ये सीसीटीव्ही लावावा व योग्य चित्रीकरणासाठी उपयुक्त प्रकाश योजना करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी केल्या आहेत. सीसीटीव्ही लावण्यात येत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोऱ्या वाढल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या वेगवेगळ्या भागात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी चार घटनांमध्ये ६८ हजार ५०० रुपयांचे मोबाइल चोरीला गेले. तुकाराम माधव बोले (वय ४९, रा. देशमुख नगर) हे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जळगाव येथून मध्यवर्ती बसस्थानकावर आले. बसमधून उतरताना बॅगमध्ये ठेवलेला ४० हजार रुपये किमतीचा टॅब चोरट्याने लांबविला. बोले यांच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमद शहा पापा शहा (वय ६५) हे रविवारी चार वाजता निराला बाजार परिसरातील तापडिया नाट्यगृहात आले होते. त्यांच्या खिशातून १७ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाइल चोरट्याने पळवून नेला.

आनंद बंब (वय २७) हे २३ ऑगस्ट रोज दुपारी अडीच वाजता औरंगपुरा येथील महावीर भवनात दर्शनासाठी गेले होते. गर्दीत कुणीतरी त्यांच्या खिशातील ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरला. चौथ्या घटनेत अनिल वाठोरे (वय ४३) हे रविवारी सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान कटिंग करण्यासाठी सलूनमध्ये गेले होते. कटिंग करताना त्यांचा टेबलवर ठेवलेला मोबाइल लांबविण्य़ात आला. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर फोडून ३९ हजार लंपास

घरातील सर्व सदस्य बाहेर गेल्याचे पाहून चोरट्याने बंद घर फोडून ३९ हजार रुपये पळविले. ही घटना लालमत कॉलनी येथे घडली. विनोद गंगवाल (वय ५५) हे त्यांच्या मुलांसह रविवारी दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधत चोरट्याने कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि ३९ हजार रुपये चोरून नेले. गंगवाल यांच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वच्छता मोहिमेत अडथळा

महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत अडथळा आणणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र मोटर्सचे मालक मुनोत व त्यांच्या नोकराविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. सात ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता सुराणानगर येथील राजेंद्र मोटर्स स्पेअर पार्टच्या दुकानामागे छबुलाल म्हातारजी अभंग हे महापालिकेच्या कर्मचारी वर्गासह स्वच्छता मोहिम राबवित होते. मुनोत यांनी घरातील सर्व कचरा रस्त्यावर टाकला. अभंग यांनी त्यांना समजावून सांगताना मुनोत अभंग यांच्या अंगावर धावून आले. त्यांच्या नोकराने मारहाण केली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक तायडे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांना वाटा देण्यास विरोध

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परीक्षा शुल्कातील १५ टक्के रक्कम कॉलेजांना देण्याचा विद्यापीठाच्या निर्णयाबाबत प्राध्यापकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संस्थाचालकांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी प्राध्यापकांमधून होत आहे.

विद्यापीठ अधिकार मंडळांची मुदत सोमवार (३१ ऑगस्ट) रोजी संपली. यापूर्वीच अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला, कॉलेजांना परीक्षा शुल्कातून वाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. दरवर्षी सुमारे ३५ कोटी रुपये शुल्कापोटी रुपये जमा होतात. त्यातील पंधरा टक्के वाटा कॉलेजांना थेट देण्यात येणार आहे. यामुळे साडेचार, पाच कोटी रुपये कॉलेजांच्या खात्यावर जमा होणार आहेत. असा वाटा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. याबाबत प्रशासन आणि अधिकार मंडळावर टीका होत आहे. मावळत्या व्यवस्थापन परिषदेने संस्थाचालकांचा कायमस्वरुपी फायदा व्हावा यासाठी त्याबाबतचे परिपत्रक काढण्यास प्रशासनावर दबाव टाकल्याचीही चर्चा आहे. या निर्णयास शिक्षकांसह, शिक्षक संघटना, विद्यार्थी संघटनांनी जोरदार विरोध केला असून, संस्थाचालकांच्या हिताचा हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. संस्थाचालकांच्या हातात हा निधी जाणार असल्याने परीक्षांसाठीच हा निधी वापरला जाईल काय, तसेच उत्तपरत्रिका तपासणी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक यांना मिळणाऱ्या मानधनावरही गदा येईल अशी शंका शिक्षक व्यक्त करत आहेत. युरोप दौरे, पदभरतीतील हस्तक्षेप यामुळेही अधिकार मंडळांची कारर्कीद गाजली. यात हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला.

समितीवर प्राचार्यांचीच वर्णी

विद्यापीठाने प्रथम वर्ष परीक्षेसाठी होम सेंटर संकल्पना राबविली होती. यामुळे अशा प्रकारचा वाटा द्यावा यासाठी प्राचार्य आग्रही होते. परंतु ही संकल्पना हळुहळू रद्द करण्यात येत आहे. अशावेळी हा निर्णय कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो आहे. विद्यापीठाने याबाबत तीन प्राचर्यांचीच समिती नेमली. ज्यांची मागणी त्यातील सदस्यांची समितीवर वर्णी असल्याने अहवाल तशाच प्रकारचा आल्याची चर्चा आहे. अशा प्रकारच्या पायंड्याला तत्कालीन सर्वच परीक्षा नियंत्रकांनी याला विरोध केल्याचेही बोलले जात आहे.

हा निर्णय चुकीचाच आहे. तो तात्काळ रद्द करावा अशी आमची भूमिका आहे. प्रशासनाने कॉलेजांना पोसण्याचे उद्योग बंद करावेत. विद्यापीठ तिजोरीतून थेट लाखो रुपयांचा निधी संस्थाचालकांच्या घशात जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या विद्यापीठाला हे परवडणारे नाही. यामुळे याचा फेरविचार करत हा निर्णय तातडीने रद्द करावा.

- डॉ. वाल्मिक सरवदे, अध्यक्ष, बामुटा

अशा प्रकारचा निर्णय हा सरळसरळ संस्थाचालकांच्या हिताचा आहे. नियमात बसवून अशा प्रकारचा खटाटोप करण्यात आला. विद्यापीठ प्रशासनाने या निर्णयाबाबत फेरविचार करायला हवा.

डॉ. उमाकांत राठोड, जिल्हाध्यक्ष, बामुक्टो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वप्नील मणियारला न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रुती कुलकर्णीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या स्वप्नील मणियारची पोलिस कोठडी संपल्यामुळे सोमवारी (३१ ऑगस्ट) त्याला पुन्हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांच्या समोर हजर करण्यात आले असता, १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले. श्रुतीला आत्महत्येस प्रवृत केले म्हणून २२ ऑगस्ट रोजी स्वप्नील मणियार यास पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो पोलिस कोठडीत होता. पोलिसांनी स्वप्निलकडून महत्वाचे पुरावे हस्तगत केले असून, आज त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही. कस्तुरे यांच्या समोर त्याला हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती केली. मात्र, कोर्टाने विनंती फेटाळत त्याची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसात पेटली नाही चूल, कच्चीबच्ची उपाशी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शारदाबाई शिंदे यांचा दोन मुले सुना, नातवंडासह अकरा जणांचा संसार, अवघ्या काही तासांत रस्त्यावर आला. चिंतेपोटी राखीपौर्णिमेचा सणदेखील साजरा करता आला नसून, दोन दिवसात घरात चुल पेटली नसल्याचे सांगताना त्यांच्या डोळयातील पाणी थांबत नव्हते.

घाटी हॉस्पीटलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या शारदाबाईंनी चार वर्षांपूर्वी घर घेतले. नातेवाईकांकडून उधार पैसे मागून, सोसायटीचे कर्ज मिळवून त्यांनी चार लाखांत प्लॉट खरेदी केला. त्यांना दोन मुले, सुना व सहा नातवंडे आहेत. घर बांधण्यासाठी मजूर लावण्याची ऐपत नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी स्वतः घर बांधले. आपल्या हातांनी बांधलेल्या घरात अकरा जणांचा संसार सुखाने नांदत होता. मात्र, हे सुख काही काळच टिकले. शुक्रवारी त्यांना घराची जमीन मूळ मालकाच्या ताब्यात देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. दोन दिवस चिंतेमध्ये गेली. त्यांची मुलगी सासरवरून राखी पौर्णिमेच्या सणासाठी माहेरी आली होती. तिलादेखील दोन्ही भाऊ चिंतामग्न अवस्थेत दिसून आले. धीर देण्यासाठी तीदेखील थांबली. सोमवारी शिंदे कुंटुबियांनी प्रतिरोध करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, हा विरोध टिकला नाही.

घराला सील लावताना पाहून शिंदे कुटुंबियांचा बांध अनावर झाला. घरासमोरच त्यांनी बस्तान मांडले. अकरा जणांचा संसार घेऊन कुठे जावे हा प्रश्न कुटुंबप्रमुख शारदाबाईंना सतावत होता. हा प्रकार सुरू असताना कुलूपबंद घराच्या खिडकीच्या पटातून चिमुकली कदाचित आपल्याला पुन्हा या घरात बागडायला मिळेल, या आशेने डोकावत होती.

पतीने कोंडून घेतले

मनिषा महेश दांडगे या महिलेच्या घरामधली परिस्थितीदेखील गंभीर होती. तीन वर्षांपूर्वी तिने प्लॉट विकत घेतला. दांडगे कुटुंब मूळचे वेरूळचे. गेल्या काही दिवसांपासून ते बेगमपुरा परिसरात वास्तव्यास आहे. नुकतेच त्यांनी घर बांधले. त्यांचे पती एका खाजगी पार्किंगवर कामाला असून, त्यांच्यावर मनोविकारतज्ज्ञाकडे उपचार सुरू आहेत. त्यांना शिवम व अथर्व ही दोन मुले आहेत. गेल्या वर्षी हीच जागा रिकामी करण्यावरून गोंधळ झाला, तेव्हापासून त्यांच्या सासू घराचे कसे होईल या चिंतेत होत्या. या चिंतेपोटी गेल्या महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी नोटीस मिळाल्यापासून त्यांचे पती तणावाखाली आहेत. दोन दिवस त्यांनी घरामध्ये कोंडून घेतले होते.

गोठे झाले रिकामे

रेणुकामातानगरात पंधरा ते वीस जण दूधविक्रीचा व्यवसाय करतात. यापैकी नितीन मेघावले व उमेश मेघावले हे आहेत. या ठिकाणी प्लॉट खरेदी करून त्यांनी शेड उभारले आहेत. उमेश यांनी घरदेखील बांधले होते. म्हशी, गायी, बकऱ्या, कोंबड्या अनेक पशुपक्षी या नागरिकांनी पाळले आहेत. दोन दिवसांत जागा सोडण्याचे आदेश आल्यानंतर जनावराची चिंता या मंडळींना पडली होती.

निवृत्तीच्या दिवशी सोडावे लागले घर

शंकरलाल पंडुरे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करीत होते. सोमवारीच ते निवृत्त झाले. सहा वर्षांपूर्वी त्यांनी या ठिकाणी प्लॉट घेतला होता. सहा महिन्यांपुर्वी घराचे बांधकाम करून ते राहावयास आले होते. त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच सर्व सामान बाहेर काढून घराला सील ठोकण्यात आले. पत्नी, दोन मुले, सुनेसह त्यांना घर सोडून रस्त्यावर यावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुष्य देशोधडीला लागले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्वतःचे टुमदार घर असावे, असे माझे स्वप्न होते. आयुष्याची पुंजी लावली. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या तेरा लाखांतून जागा घेतली. त्यावर घर बांधले. वास्तुशांतीचा मुहूर्त पाहणे सुरू होते. पाडापाडीची चर्चा सुरू झाली. हक्काच्या नव्या घरात राहायला जायचे स्वप्न डोळ्यादेखत विरले,' ही व्यथा सांगताना पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या बी. टी. सलामपुरेंच्या डोळ्यांच्या कडा कित्येकदा पाणावल्या.

मकबरा परिसरातील पाडापाडीत सलामपुरेंचेही घर. आपले हक्काचे घर हिरावल्याचे पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकलीय. सलामपुरे म्हणाले, 'पोलिस दलात तब्बल ४० वर्षे सेवा केली. २ फेब्रुवारी २०१४ रोजी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर हाती आलेले १३ लाख नव्या घराच्या बांधकामासाठी लावले. जितेंद्र रामलाल रोगा यांच्याकडून सहाशे स्केअरफूट आकाराचा प्लॉट विकत घेतला. प्लॉटसाठी साडेतीन लाख रुपये मोजले होते. नऊ लाख रुपये बांधकामासाठी लागले. मला हवे तसे, स्वप्नातले घर बांधले. वास्तुशांती करायचे ठरवले. त्यातच पाडापाडीची चर्चा सुरू झाली. घरभरणी वातावरण शांत झाल्यानंतर करायचे ठरवले. माझ्यासह पोलिस दलातील अनेकांनी या भागात घरे, प्लॉट घेतले. सहाशे स्केअरफुटाचा प्लॉट असल्याने नोटरीवर खरेदी खत आहे. सातबारा उताऱ्यावर माझे नाव नोंदवले. तरीही महसूल यंत्रणा घर पाडण्याची कारवाई करत आहे. या भागात घर बांधकाम, प्लॉटिंगची माहिती महसूल यंत्रणेला नव्हती का? असा सवाल सलामपुरे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विष कालवलेले पाणी पिऊन मरायचे का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पोटाला चिमटा घेऊन प्लॉट घेतला. त्यावर तुटकेमुटके घर बांधले. आता तेही गेले. रस्त्यावर आलो. विष कालवलेले पाणी पिऊन आता मरायचे का,' डबडबलेले डोळे आणि बेघरांचा छळणारा प्रश्न. उत्तर देणार कोण...?

मकबरा परिसरात सोमवारी हा आकांत होता. ज्यांची घरे शाबूत त्यांच्याही डोळ्यात खिन्नता होती. सुतकी वातावरणाने काळवंडलेला मकबराही भेसूर दिसत होता.

भारती बन्सीलाल कुंभार यांनी दोन वर्षापूर्वी या ठिकाणी तीन लाखांत प्लॉट घेतला. यात चूक काय केली, असे म्हणत त्यांनी आपली व्यथा 'मटा'कडे मांडली. म्हणाल्या, 'ज्यांनी प्लॉट विकले त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगायला हवे होते. वादाची जागा आहे असा फलक लावायला हवा होता. त्यांनी असे काहीच केले नाही. आम्ही फसवले गेलो.'

ज्योत्स्ना किशोर रहाटे यांनी २०१०मध्ये एक लाख ६५ हजार रुपये खर्च या भागात प्लॉट खरेदी केला. त्यावर तीन खोल्यांचे घर बांधले. पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून बोअरवेल खोदला. आता त्यांना या प्लॉटचा ताबा द्या, असे अधिकारी सांगतात. नवऱ्याला मानसिक आजार असल्याने मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत. त्यांना घर गेले असे सांगितले तर ते वेडेच होतील, हे सांगताना जोत्सानाबाईंचा हुंदका पुन्हा-पुन्हा बाहेर पडत होता. त्यांचे पती किशोर रहाटे. वर्धा जिल्ह्यातल्या खंबीत गावचे. कामाच्या निमित्याने २००६मध्ये औरंगाबाद गाठले. गावाकडची जमीन विकून हा प्लॉट घेतला होता.

बाळांतीण रस्त्यावर

श्यामराव आरक हे सेवानिवृत्त पोस्टमन. त्यांनी या ठिकाणी प्लॉट घेऊन घर बांधले. त्यांची मुलगी आशाचे राजेश मोहाडे यांच्याशी लग्न झाले. आशा बाळांतपणासाठी वडिलांकडे आली. २९ ऑगस्ट रोजी घाटी रुग्णालयात तिची प्रसुती झाली. कालच (रविवारी) ती घरी आली. आणि आज कोर्टाच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालयाने प्लॉट ताब्यात घेतला. आरक यांच्या घरातले साहित्य बाहेर काढून घराला कुलूप लावले. ही सर्व कारवाई सुरू असताना आशा आपल्या दोन दिवसांच्या तान्ह्याला घेऊन घराबाहेर रस्त्यावर बसली. गोंधळ, गोंगाटाने बाळ घाबरलेला आणि आईची वेगळीच तगमग सुरू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असह्य संतापाचा कडेलोट

$
0
0

vijay.deulgaonkar@timesgroup.com

औरंगाबादः डोळ्यादेखत घरावर नांगर फिरला तेव्हा बंडखोर तरुणाईने रॉकेल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला बुलडोझरसमोर आडव्या झाल्या. संतापाचा लाव्हा दगडफेकीतून बाहेर आला. शेवटी पोलिसांचा तीव्र लाठीमार. आता आपण काहीच करू शकत नाही. मार्ग खुंटला, आपले घर गेले म्हणत शकडो असह्य शरण आले. हेलावून टाकणारी ही तडफड, तगमग मकबरा परिसरात सोमवारी दिवसभर पाहायला मिळाली.

रेणुकामातानगरातील रहिवाशांना शुक्रवारीच (२८ ऑगस्ट) सोमवारपर्यंत घर रिकामे करा, अशी नोटीस प्रशासनाने बजावली. बंद घराच्या दरवाजांवर, सार्वजनिक ठिकाणी, झाडावर या नोटीस डकवल्या. उद्या काय होणार या चिंतेपोटी रात्रभर रहिवाशांना झोप आली नाही. सोमवारी सकाळी सहालाच पोलिसांचा फौजफाटा रेणुकामातानगरात दाखल झाला. काही वेळात तहसीलदार, महसूल विभागाचे पथक आले. सोबत रुग्णवाहिका, तीन रिक्षा, अग्निशमन दलाचा बंब, वीज वितरण मंडळाचे कर्मचारी अशी तयारी. या रहिवाशांना लाउडस्पिकरवर पुन्हा एकदा घरे रिकामी करण्यासाठी दोन तासांचा वेळ दिला. काही नागरिकांनी तहसीलदारापुढे म्हणणे मागत काही दिवस सूट देण्याची कसनुशा चेहऱ्याने विनंती केली. मात्र, कोर्टाचा आदेश म्हणत त्यांना घर स्वतःहून खाली करण्याचे सांगण्यात आले.

तब्बल अकरा जेसीबी मागवलेल्या. मात्र, त्या रेणुकामातानगरापासून दूर डोंगरपायथ्याशी उभ्या केलेल्या. दोन तासांनी पुन्हा एकदा तहसीलदार रमेश मुनलोड यांनी ज्यांची घरे ताब्यात घेण्यात येणार आहे, अशा रहिवाशांची नावे वाचून दाखवली. रहिवाशांनी सहकार्य केले नाही, तर विद्युतपुरवठा खंडित करण्याची धमकी दिली. पोलिसांनी कारवाईसाठी अॅक्शन घेतली. तेव्हा महिला आक्रमक झाल्या. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांची समजूत काढण्याचे काम पोलिस करत होते. नेमके यावेळी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जेसीबी रेणुकामातानगराकडे बोलावल्या.

बघता-बघता वातावरण तापले. घरे पाडण्यास सुरुवात झाली, अशी आव उठली. रहिवाशांनी तुफान जेसीबीच्या दिशेने धाव घेतली. मशीन रेणुकामातानगराकडे येऊ नये म्हणून रस्त्यामध्ये लाकडे टाकून मोर्चेबांधणी केली. काही महिला जेसीबीसमोर झोपल्या. नेमके यावेळी महेंद्र महावीर कुरील, शिंदे यांनी स्वतःजवळील रॉकेलच्या दोन बाटल्या काढल्या. स्वतःसह त्याने इतरांच्या अंगावर रॉकेल टाकले. काडेपेटी काढून आत्महदहनाची धमकी दिली. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले.

शारदाबाई शिंदे या बेशुद्ध झाल्या. त्यांना पाणी पाजून तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे हॉस्पिटलमध्ये पाठवले. हा प्रकार सुरू असताना जेसीबीचालकाने जेसीबी पुढे आणले. तरुणांनी जोरदार दगडफेक सुरू केली. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. जमाव पांगवला. मात्र, जमावाचा जेसीबीला विरोध कायम होता. जेसीबी पुढे आल्यानंतर पुन्हा दगडफेक सुरू झाली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत दगडफेक करणाऱ्यांचा पाठलाग केला.

या पोलिसांवर घरांच्या पाठीमागून, छतावरून दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी लाठीमार करत काही तरुणांना ताब्यात घेतले. यानंतर प्रशासनाच्या आदेशाने कच्ची बांधकाम असलेली रिकामी घरे, शेड पाडण्यात आले. पाडापाडी विरोधात स्टे आणण्यासाठी हायकोर्टाच्या याचिकेचा निकाल दुपारपर्यंत येणार होता. रहिवासी निकालाची वाट पहात होते. मात्र, घरे ताब्यात घेऊन कुलूप लावण्याचे काम हाती घेण्यात आले. विरोधाचा फायदा होणार नसल्याचे समजून अनेकांनी डोळ्यांत पाणी आणत घरातील सामान बाहेर काढले. टेम्पो मागवून काहींनी सामान हलवले.

दुपारी चारपर्यंत घरे सील

अॅड. अभय टाकसाळ यांनी नागरिकांची भेट घेत एक निवेदन तयार केले. तहसीलदार मुनलोड यांना हे निवेदन दिले. घरे पाडण्यात येणार नसून ताब्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सायंकाळी चारपर्यंत प्रशासनाने आपली कारवाई पूर्ण केली. साडेचारच्या सुमारास घरांना अधिकृत सील लावण्याचे काम केले.

वकिलांचा सल्ला

प्लॉट, फ्लॅट खरेदी करताना अधिकृत कागदपत्रांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वस्त दरात जागा विकत मिळत असली तरी लोकांनी एनए-४४ शिवाय इतर प्लॉट विकत घेऊच नयेत. किमान ३० वर्षांचे रेकॉर्ड घेण्याचा प्रयत्न करावा. वकिलांच्या माध्यमातून सर्च रिपोर्ट उपयुक्त ठरू शकतो, असे बँक प्रकरणातील तज्ज्ञ अॅड. अनुप धानुका यांनी सांगितले. धानुका म्हणाले, 'कोणताही प्लॉट अथवा फ्लॅट विकत घेताना नागरिकांनी सर्च रिपोर्ट काढण्यास प्राधान्य द्यावे. तसेच टाऊन ऑफिस, महापालिका, तलाठी, सिटी सर्वे या कार्यालयात संबंधित जमिनीबाबतची उपलब्ध माहिती तपासून घ्यावी. मंजूर ले-आऊट परिसरात जागा अथवा फ्लॅट खरेदी करावा, असे त्यांनी सांगितले.

नव्या मालकाची घोषणा

जमिनीवर दावा सांगणारे माधव सोनवणे दुपारी चारनंतर रेणुकामातानगरात दाखल झाले. पोलिस बंदोबस्तात त्यांना जीपमध्ये बसवण्यात आले. रेणुकामाता नगरातील रहिवाशांच्या घराचा ताबा प्रशासनाने घेतला असून जमिनीचे नवे मालक माधव सोनवणे असल्याचे लाउडस्पिकरवर जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images