Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शाळेतच मिळणार जात प्रमाणपत्र

$
0
0
बीड उपविभागातील बीड आणि गेवराई या दोन तालुक्यातील १८० शाळेतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळेतच जात प्रमाणपत्र मिळणार आहे.

औरंगाबादेतच होणार DNA चाचणी

$
0
0
सहज उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानामुळे, गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचे आव्हान राज्यातील पोलिसांसमोर आहे. अशा हायटेक गुन्ह्यांना चाप लावतानाच, क्लिष्ट गुन्ह्यांमध्ये डीएनए चाचणीसारखे भरभक्कम पुरावे उभे करणारे तंत्रज्ञान औरंगाबादसह मराठवाड्याच्या पोलिसांना मिळणार आहे.

गृहमंत्र्यांचे काम अवघड

$
0
0
गृहमंत्र्यांचे काम अवघड असते. पोलिसांसमोर अडचणी आहेत. सरकारने आता पोलिस यंत्रणा बळकट करण्यासाठी पावले उचलली आहेत, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.

सिल्लोड झाले ‘मिरची हब’

$
0
0
पारंपरिक पिके घेणा-या सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिरचीने चांगला हातभार दिला आहे. यंदा तालुक्यात ७०० हेक्टरवर मिरचीची लागवड झाली असून शेतक-यांना प्रति हेक्टरी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

‘जिप पतसंस्थेच्या व्यवहाराची चौकशी करावी’

$
0
0
औरंगाबाद जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या कारभाराची तसेच व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी काही सदस्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

कर्मचा-यांनीच टाकला दरोडा

$
0
0
सेलू येथील श्री रेणूकामाता मल्टीस्टेट को. ऑप अर्बन क्रेडीट सोसायटीवर शुक्रवारी रात्री दरोडा पडला होता. त्यामध्ये सोळा लाख किंमीचे सोने चोरीला गेले होते.

प्रशिक्षणासाठी गेलेले पालिका आयुक्त परत

$
0
0
महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे शनिवारी शहरात दाखल झाले. प्रशिक्षणासाठी ते २५ जून पासून मसूरीला गेले होते.

शाश्वत शेतीसाठी ‘कोरडवाहू मिशन’

$
0
0
‘पुढील पाच वर्षात कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून शाश्वत शेतीत शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचे काम केले जाणार आहे. दहा हजार कोटी रुपये निधी असलेला हा उपक्रम आदर्श उपक्रम ठरणार आहे’ असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केले.

मुंबईतील सामूहिक बलात्काराचा निषेध

$
0
0
मुंबई येथील एका महिला छायाचित्रकारांवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीसह सजग महिला संघर्ष कृती समितीने शनिवारी पैठण गेट येथे निदर्शने केली.

‘पत्रकारांच्या स्वनियंत्रणासाठी स्वतंत्र संस्था निर्माण करा’

$
0
0
पत्रकारांच्या स्वनियंत्रणासाठी राज्य पातळीवर स्वतंत्र संस्था निर्माण करा. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने पुढाकार घ्यावा. ही परिषद महत्त्वाची कामगिरी करू शकेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या नियोजन मंडळाचे सदस्य नरेंद्र जाधव यांनी केले.

स्त्रीरोग तज्ज्ञांचा छळ थांबवा

$
0
0
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्याकडून शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञांचा छळ सुरू आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स त्रस्त झाले आहेत.

कायद्याचे संरक्षण हवेच!

$
0
0
समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन पत्रकार लढतात. त्यावेळी अनेक वेळा त्यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ले होतात. अशावेळी त्यांना कायद्याच्या संरक्षणाचा आधार हवाच.

धावण्याची चाचणी पडली महाग

$
0
0
वन विभागांतर्गत वनरक्षक पदाकरिता तीन किलोमिटर महिलांची धावण्याची चाचणी परीक्षा घेण्यात आली. या चाचणी परीक्षेत दोन महिलांना अस्वस्थ वाटल्याने, त्यांना वन विभागाने तात्काळ शासकिय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प‌रीक्षा केंद्रात अचानक बदल

$
0
0
ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलाचा प्रताप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा केला आहे. दोन दिवस आधी ऑनलाइन काढलेल्या हॉ‌लतिकीटवर एक परीक्षा केंद्र, आणि प्रत्यक्षात परीक्षेच्या एक दिवस आधी मोबाइल एसएमएसवरद्वारे कळविण्यात आलेले परीक्षा केंद्र वेगळेच आहे.

अनंत भावे, कोरडे यांचा सन्मान

$
0
0
यंदाचे साहित्य अकादमीचे मराठीतील बालसाहित्य आणि युवा पुरस्कार अनुक्रमे अनंत भावे (मुंबई) आणि रवी कोरडे (औरंगाबाद) यांना जाहीर झाले आहेत. भावे यांच्या आजवरच्या केलेल्या बालसाहित्यातील कामगिरीची, तर कोरडे यांच्या लक्षवेधी लेखनाची दखल या निमित्ताने अकादमीने घेतली आहे.

पाण्यावरून विखे पाटलांचे घूमजाव

$
0
0
‘कमी पावसामुळे नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणे कोरडी आहेत. काहीजण पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा न काढता नगर -मराठवाड्यात वाद वाढवत आहेत.

कंपनीचा ३४ लाखांचा माल परस्पर लांबवला

$
0
0
एका १५ वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने पळवून नेल्याची घटना मंगळवारी शरणापूर भागात घडली. ही मुलगी बकऱ्यांना चारा देण्यासाठी गेली असता आरोपी अमोल निंबादास सोनवणे (रा. शरणापूर) याने तिला पळवून नेले.

प्रसारमाध्यमांचा जबाबदारपणा कायम

$
0
0
पत्रकारितेत वर्तमानाची नोंद घेऊन भविष्याचा वेध घेण्याची गरज आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या या क्षेत्रात अजूनही विश्वास आणि जबाबदारपणा टिकून आहे.

४ पदरी रस्त्यांवरील वाहतूक लेनच्या नियमांनीच

$
0
0
शहरातील चारपदरी रस्त्यांवरही लेनची शिस्त पाळली जात नाही, त्यामुळेच अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त यावी आणि अपघातांची संख्या कमी व्हावी, यासाठी यासाठी शहरातून जाणाऱ्या चारपदरी रस्त्यांवर लेन सिस्टिमसाठी आवश्यक उपाय योजना करण्यात येणार आहेत.

तासाभरात ३५० टन कचरा साफ

$
0
0
जपानमधील क्योटो महापालिका व औरंगाबाद महापालिकेतर्फे शहरात रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व महिला मंडळांनी सहभाग घेतला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images