Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खुनाच्या गुन्ह्यातील पसार आरोपी गजाआड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हेशाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री केंब्रीज स्कूलजवळ अटक केली. सोमवारी पहाटे तीन वाजता पत्नीच्या डोक्यात लोखंडी सळईचे वार करून आरोपीने चारित्र्याच्या संशयावरून तिचा खून केला होता. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

काशीनाथ गोपीनाथ तिडके (वय २७ रा. स्वराजनगर, मुकुंदवाडी) याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी कमलबाईला बेदम मारहाण केली होती. सतत मोबाइलवर बोलत असल्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. या मारहाणीत कमलबाईचा मृत्यू झाला होता. त्याचा मेहुणा अनिल पवार याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी काशीनाथ हा पसार झाला होता. मंगळवारी रात्री शेकटा गावावरून तो शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी केंब्रीज चौकात सापळा रचून काशीनाथला अटक केली. गुन्हेशाखेचे पीएसआय अनिल वाघ, शेख आरेफ, मनोज चव्हाण, शेख जावेद, प्रकाश भालेराव आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


८ हजारांची लाच घेताना लेखाधिकारी जाळ्यात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून आठ हजारांची लाच घेणारा वेतन पडताळणी पथकाचा लेखाधिकारी अनिल वनगुजरेला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी दुपारी अटक केली.
पाटबंधारे विभागातून उप विभागीय अधिकारी असलेले देशपांडे सहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले. १९८१ पासून सर्व वेतन आयोगाच्या निश्चित केलेल्या वेतनाची सुधारित वेतन निश्चिती करावी, असे शासनाचे आदेश होते. त्यामुळे देशपांडे यांच्या वेतनाची पुनर्निश्चिती करून सेवापट वेतन पडताळणी पथकाकडे पाठविले होते. लेखाधिकारी अनिल त्र्यंबक वनगुजरे (रा. विनायक हौसिंग सोसायटी, एन ८, सिडको) यांच्याकडे हे पडताळणीचे काम होते. या कामासाठी त्यांनी दहा हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीत आठ हजार रुपये लाच देण्याचे ठरले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार आली. वनगुजरे यांनी बुधवारी देशपांडे यांना लाचेची रक्कम घेऊन ट्रेझरी कार्यालयाशेजारी असलेल्या त्यांच्या कार्यालयात बोलावले. लाचेची रक्कम स्वीकारताच वनगुजरे यांना सापळा रचलेल्या पथकाने अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, कैलास कामठे, अजय आवले, अश्वलिंग होनराव, संदीप चिंचोले आदींनी केली.

प्रत्येक तालुक्यात रॅकेट

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासाठी सेवापुस्तक पडताळणी करून देण्याचे काम वेतन पडताळणी प‌थकाकडे आहे. यांच्या शिफारशीनंतर त्यांना निवृत्ती वेतन मंजूर होते. मात्र, या कामासाठी रॅकेट कार्यरत आहे. प्रत्येक तालुक्यातील कार्यालयात कारकुनाला किंवा दलालाला यांनी हाताशी धरले आहे. एक फाइल पडताळणीसाठी दहा हजार रुपये वसूल केले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नागरिकांना कोणत्याही कामासाठी शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असल्यास त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे. कोणत्याही कारणासाठी लाच देणे टाळावे. भ्रष्टाचारसबंधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

- डॉ. डी. एस. स्वामी, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही पेट्रोल पंप कोरडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचा बोर्ड झळकला. पेट्रोलपंप चालक आणि कंपनीच्या वादामुळे शहरवासीयांची फरफट सुरू आहे.

जालना रोडवर, शहागंज, दिल्ली गेट, गजानन महाराज मंदिराजवळीत पेट्रोल पंप ड्राय झाले होते. शहरातील अन्य भागातील पेट्रोल पंपावरही 'नो स्टॉक'चे बोर्ड होते. पेट्रोलचे दर कमी झाल्यानंतर अचानक शहरात पेट्रोलचा तुटवडा सुरू आहे. अनेक पेट्रोल पंप चालकांनी, पेट्रोलसाठी आपल्या ऑर्डर कंपनीकडे दिल्यात. या ऑर्डरनंतरही आतापर्यंत अनेक डिलर्संना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा झालेला नाही.

मंगळवारी रात्री काही पेट्रोल पंपावर आलेले पेट्रोल बुधवारी दुपारपर्यंत संपून गेले. त्यामुळे जिथे पेट्रोल आहे त्या पंपावर मोठ्या रांगा लागल्या. यामुळे अनेकांचे वेळापत्रक कोलमडले.

डिलर्सकडून बुकिंग नाही

पेट्रोल तुटवड्याबाबत कंपनीचा एक अधिकारी 'मटा'शी बोलताना म्हणाला, '३१ ऑगस्ट रोजी पेट्रोलचे दर कमी होतील असा अंदाज घेऊन पेट्रोल पंप चालकांनी शेवटच्या काही दिवसांत ऑर्डर दिल्या नाहीत. सोमवारी पेट्रोल किंमती फक्त पन्नास पैशांनी कमी झाल्या. नवीन दर जाहीर झाल्यानंतर पंप चालकांनी मंगळवारी ऑर्डर दिल्या. बुधवारी काही पेट्रोल पंपावर पेट्रोलचा पुरवठा करण्यात आला. गुरुवारी ही परिस्थिती आणखी सुधारेल.'

आयओसी कंपनीने ३१ ऑगस्टला माल न उचलणाऱ्या डिलर्सबाबत नवीन धोरण अवलंबले आहे. डिलर्सना पन्नास ते शंभर लिटर ऑइल खरेदी करण्याचा ‌नवीन नियम लावला आहे. जोपर्यंत ऑईल खरेदी होत नाही, तोपर्यंत माल मिळणार नाही असा निर्णय कंपनीने लागू केला. त्यामुळे आयओसीचे पेट्रोल डिलर्स अडचणीत आले आहेत.

- संदीप घंटे, डिलर, आयओसी

अनेक डिलर्सना ३१ ऑगस्टपासून पेट्रोलचा पुरवठा झालेला नाही. बुधवारी ऑर्डर बुक केल्यानंतर दुपारपर्यंत पेट्रोल पाठविणे आवश्यक होते. मात्र, पैसे भरूनही कंपनी ऑर्डर पाठवत नाही. दुसऱ्या ऑर्डसाठी नवीन ऑर्डर बुक करण्याची अट घातली जात आहे. कंपन्यांच्या जिझियागिरीमुळे पेट्रोल पंप चालक आणि सर्वसामान्यांना अडचण येत आहे.

- अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिऐशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूने शहरात आणखी एकाचा मृत्यू

$
0
0

औरंगाबादः काही काळासाठी गायब झालेल्या स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा रविवारी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

शोना बाजार (जि. जालना) येथील हबीब सांडू शेख हे घाटी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. ताप, कफ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची त्यांची तक्रार होती. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या विषाणू तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. रविवारी त्यांचा मृत्यू झाला. स्वॅबचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यात स्वाइन फ्लूचे झाल्याचे निदान झाले. दरम्यान, एमआयटी हॉस्पिटलमध्ये एक स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याचे एमआयटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद निकाळजे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’साठी ‘नाइट फ्रँक’ पीएमसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेने बुधवारी अखेर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारम्हणून (पीएमसी) नाइट फ्रँक (इंडिया) प्रा.लि. या संस्थेची नियुक्ती केली. ही संस्था लवकरच डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम सुरू करेल, अशी माहिती आयुक्त प्रकाश महाजन यांनी दिली.

स्मार्ट सिटी अभियानासाठी पीएमसी नियुक्त करण्याची प्रक्रिया महापालिकेने २८ ऑगस्टपासून सुरू केली होती. पीएमसीच्या नियुक्तीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती. त्यात शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, मुख्यलेखाधिकारी अशोक थोरात, मुख्यलेखापरिक्षक एम. आर. थत्ते यांचा समावेश होता. समितीच्या सदस्यांसमोर २८ ऑगस्ट रोजी इच्छुक पीएमसींचे सादरीकरण झाले. त्यानंतर नियुक्तीच्या प्रक्रियेतून थोरात व थत्ते यांना डावलण्यात आले. चार दिवस प्रदीर्घ चर्चा झाल्यावर आज अखेर पीएमसीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नाइट फ्रँक (इंडिया) प्रा. लि. इन असोसिएशन विथ फोट्रेस इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस अँड पीएसपी फायनांशियल कन्सलटंट प्रा. लि. या संस्थेची निवड पीएमसी म्हणून करण्यात आली असून, शासनालाही त्याची माहिती कळविण्यात आली आहे, असे आयुक्त महाजन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील महिला असुरक्षित

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील महिला व तरुणींची छेडछाड सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात तीन घटनांमध्ये तरुणी व महिलांचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सिटीचौक व मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरण आणि सुंदरवाडी बलात्कार प्रकरणानंतरही महिलांच्या छेडछाडीच्या घटना थांबत नसल्याने महिलावर्गात घबराट पसरली आहे.

घटना १ - संजयनगर येथील एक २० वर्षाची तरुणी दिल्लीगेट परिसरातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. मंगळवारी आरोपी साजीद अझहरखान (वय २१ रा. शहाबाजार) या तरुणाने तिला रस्त्यात अडविले. बुरखा ओढून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना २ - औरंगपुरा भागातील एक २४ वर्षांची तरुणी सिटीचौक परिसरातील एका साडी सेंटरमध्ये कामाला आहे. रविवारी या तरुणीला तुझे दुकान मालकाशी संबध आहेत, असे म्हणून संशयित आरोपी विकास जाधव (रा. रमानगर) याने तिची छेड काढली. याप्रकरणी संतप्त झालेल्या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जाधवविरूद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना ३ - सिडको ४ भागातील एका २४ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास एमआयटी हॉस्पिटलजवळ हा प्रकार घडला. या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दीपक जयसिंग दीक्षित (वय ३२ रा. हनुमाननगर) याच्याविरूद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरण आणि त्यानंतर सुंदरवाडीतील सामूहिक आत्महत्या प्रकरणाने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. महिला संघटना व सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतरही पोलिस प्रशासन जागे झालेले दिसत नाही हे गेल्या दोन दिवसातील विनयभंगाच्या तीन घटनांमधून दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांत इलेक्शन नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॉलेजांमध्ये या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संसद निवडणुकीची धामधूम दिसणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बुधवारी हा निर्णय घेतला. नवीन विद्यापीठ कायदा येणार असल्याने शासनाने अधिकार मंडळांबरोबर कॉलेजांतील निवडणुकांची प्रक्रिया थांबविण्याच्या निर्देश दिले आहेत. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयीन निवडणुका खुल्या होणार की गुणवत्तेनुसार हा प्रश्नही अधांतरीच आहे.

विद्यापीठ, कॉलेजांमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका म्हणजे राजकारणातील पहिली पायरी समजली जाते. यंदा महाविद्यालयांच्या निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे कॉलेजांसह विद्यापीठातही संसद अध्यक्ष, सचिवांसह इतर मंडळ सदस्यही नसतील. निवडणुका होणार नसल्याचे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाने बुधवारी स्पष्ट केले. नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात येणार असल्याने विद्यापीठ अधिकार मंडळांच्या निवडणुकांची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडळांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. नवीन कायद्यानुसारच विद्यार्थी संसदेच्या निवडणुका होणार आहेत. ३१ ऑगस्ट रोजी विद्यापीठांमधील अधिकार मंडळांची मुदत संपली. त्यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी निवडणूक प्रक्रियेबाबत शासनाने विद्यापीठांना परिपत्रक पाठविले होते.

निवडणूक वेळापत्रकाला स्थगिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने निवडणूक वेळापत्रक जाहीर केले होते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. अधिकार मंडळांबाबत शासनाकडून आलेल्या परिपत्रकानुसार इतर विद्यापिठे व कायदेशीर विचारपूस केल्यानंतर या वेळापत्रकाला स्थगिती देण्यात आली.

विद्यापीठ विभाग, कॉलेजांमधील विद्यार्थी संसदेच्या निवडणूकांना यंदा स्थगिती देण्यात आली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार तशा प्रकारचे पत्र काढण्यात आले. याबाबत महाविद्यालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

- डॉ. सुहास मोराळे, संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळामुळे शिक्षण सोडण्याची वेळ

$
0
0

ramchandra.vaybhat @timesgroup.com

दुष्काळामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. कष्ट करून, पोटाला चिमटा काढत शेतकऱ्यांनी मुलांना उच्च शिक्षणासाठी शहरात पाठविले, मात्र दुष्काळामुळे त्यांच्यावर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. काही विद्यार्थी हॉटेल, हॉस्पिटल, नेट कॅफेमध्ये काम करून खर्च भागवित आहेत.

परभणी शहरात परिसरातील गावांतील बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी रोज ये-जा करतात. यंदा प्रवासाचाही खर्च मिळू शकत नसल्यामुळे त्यांना परभणीत भाड्याच्या खोलीतत राहून शिकावे लागत आहे. विद्यार्थ्यांना खर्च भागवण्यासाठी हॉटेल, हॉस्पिटल, इंटरनेट कॅफे, तसेच इतर ठिकाणी नोकरी करावी लागत आहे. अनेक मुलींनी खर्च परवडत नसल्याने यंदा केवळ परीक्षेसाठीच कॉलेजला जायचे ठरवून परभणी सोडले. काही मुली शिकवण्या घेऊन शिक्षणाचा खर्च भागवित आहेत.

शहरापासून २० किलोमीटरवरील गावातून मी परभणीला येते. पूर्वी खुरपणी करून शिक्षणासाठी पैसे जमा करीत होते, मात्र आता पाणी नसल्यामुळे शेतीमध्ये काम नाही. त्यामुळे मोठी अडचण होत असल्याचे निशा मुळे या विद्यार्थिनीने सांगितले.

दुष्काळामुळे खर्च परवडत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेत आहे. परवडत नसलेल्या खर्चामुळे रूम पार्टनर पुढच्या महिन्यात रूम सोडणार आहे, अशी माहिती ज्योती झाडे हिने दिली. कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी दररोज ये- जा करतात. यंदा दुष्काळामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाविद्यालय त्यांना शक्य तेवढी मदत करते, पण त्याला मर्यादा आहेत, असे प्रा. रवीशंकर झिंगरे यांनी सांगितले.

हजेरीवर परिणाम

फी भरण्यासाठीही पैसे नसल्याने अनेक विद्यार्थ्यानी शिक्षण सोडले. स्वतःचा खर्च भागवावा म्हणून अनेक विद्यार्थी लहान-मोठी कामे करीत आहेत. महाविद्यालयामध्ये ६० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. दुष्काळामुळे उपस्थितीवर ४० टक्के परिणाम झाला आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून सवलती देण्यात येतात मात्र त्यालाही मर्यादा आहेत, असे शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास पेशट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात टीएमसी पाणी देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद, बीड

कृष्णा खोऱ्याचे पहिल्या लवादाने मराठवाड्यासाठी मान्य केलेले, सात टीएमसी पाणी देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि गतिमान पद्धतीने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. दरम्यान, सौताडा (ता. पाटोदा) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मराठवाड्यात स्थिती गंभीर असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.

डोमगाव (जि. उस्मानाबाद) येथील सीना कोळेगाव प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीय क्षत्रीय, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाड्यातील परिस्थिती भीषण आहे. सलग तीन वर्षे सातत्याने हा भाग दुष्काळाचा सामना करीत आहे. शेतकऱ्यांना नापिकीमुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या संकटात शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आपण हा दौरा करीत आहोत.

निसर्गाचा कोप मराठवाड्यावर झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ नाही. यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. आगामी काळात काम, चारा व पाणी या तीन गोष्टीला महत्त्व देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील कार्यक्रमप्रसंगी सांगितले.

दीड लाख शेततळ्यांची निर्मिती

येत्या काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने, 'शेत तेथे शेततळे' तयार करण्यात येणार आहेत. पावसाचे पाणी थांबण्यासाठी दीड लाख शेततळी तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिला सक्षमीकरणाशिवाय प्रगती नाही’

$
0
0

औरंगाबाद टाइम्स टीम

शहरात मुलींवर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देव‌गिरी कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहाच्या वतीने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी मुक्तसंवाद आज (गुरुवार) घेण्यात आला.

'महिला सुरक्षिततेबाबत पोलिस प्रशासनाने घ्यावयाची भूमिका' यावर सहाशेहून अधिक मुलींचे म्हणणे वसतीगृहाने पोलिस आयुक्तांना सुपूर्द केले होते. त्याचबरोबर देवगिरी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींनी इतर महाविद्यालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थीनींशीही संवाद साधला. त्यामुळे या कार्यक्रमाला ‌खाजगी व सरकारी वसतीगृहातही राहणाऱ्या मुलींनी हजेरी लावली होती. देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला तेव्हा सभागृहात पाय ठेवायलाही जागा नव्हती. बाहेर प्रोजेक्टर लावण्यात आले होते. सुरुवातीला युवतींचे संघटन या संकल्पेनवर आधारित दुर्गानृत्य स्वाती गोर्डे व तिच्या मैत्रिणींनी सादर केले. पंडितराव हर्षे अण्णा कार्येक्रमाचे अध्यक्ष होते. व्यासपीठावर डॉ. अविनाश येळीकर, प्राचार्य डॉ. माणिकराव जाधव, वसतीगृह अधीक्षिका लता जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी कराटेंचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पोलिस आयुक्तालयातर्फे महाविद्यालयीन तरुणींमध्ये जनजागृती मोहिमेची अनौपचारिक सुरुवातही या कार्यक्रमानेच झाली असल्याने काही मुलींनी पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारले. यामध्ये दामिनी पथक, गुन्हेगाराचे वय, गुन्हा नोंदवताना येणाऱ्या अडचणी, पोलिसांच्या वर्तनापासून ते थेट पोलिसांच्या ड्युटीच्या तासांपर्यंत प्रश्न विचारले. आयुक्तांनीही सायबर क्राईम, तरुणी व महिलांची छेडछाड, त्या संदर्भात दाखल करता येणारे गुन्हे, सोशल मीडियाबाबात घ्यावयाची दक्षता आदींबाबात मार्गदर्शन केले. 'शहरात झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुलींनीही सर्तक होण्याची गरज असून पोलिस, महिला सहाय्य कक्ष यांचे नंबर स्वतःजवळ बाळगा. रात्रीच्या वेळी रिक्षातून परतत असाल तर, ऑटोचा नंबर घरच्या सदस्यांना पाठवा', असा दक्षतेचा इशाराही केला.

‌प्राचार्य जाधव यांनी प्रास्ताविक केले तर हर्षे अण्णा यांनी अध्यक्षीय समारोप केला. वसतीगृह अधीक्षिका लता जाधव यांनी आभार मानले. सुजाता मुंडे हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता पूजा भानुशाली, अश्विनी इंगळे, मनिषा गणपुरे, गीता बोबडे, लक्ष्मी शेळके आदी विद्यार्थीनींनी काम पाहिले.

महिलांनी दक्ष होणे गरजेचे

शहर सुरक्षित होण्याकरता पोलिस खाते सज्ज आहे, पण मुली व महिलांनी दक्ष व सतर्क होणे गरजेचे आहे. आताच्या गुन्ह्यांचे स्वरुप बदलले आहे. सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तक्रार देणे टाळू नका. शहरात प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही बसविणार असून, अतिसंवेदनशील भागातही सीसीटीव्हींची बसवता येतील का याबाबतही विचार सुरू आहे. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आल्यावर पुरुष अधिकारी असल्यामुळे महिला संकोच करतात व बरेचदा पोलिस खातेही टीकेचे धनी होते. म्हणूनच महिला-मुलींची तक्रार महिला पोलिसांनी नोंदवून घ्यावी याबाबत प्रयत्नशील आहोत, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

स्वतःला घडवा

मी सुद्धा तुमच्यासारखा सामान्य विद्यार्थी होतो. अभ्यास करणारे, प्रश्न विचारणारे, चर्चेत सहभागी होणारे विद्यार्थी पाहून मला नवल वाटायचे व आम्हीही त्यांना चिडवायचो, पण आता समजले की ते विद्यार्थीच योग्य होते. आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात शिस्त, सुव्यवस्था याबाबत विद्यार्थ्यांनीच आत्मपरीक्षण करावे. मोबाइलवर वेळ खर्च करण्यापेक्षा अभ्यास, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, वाचन सारख्या सवयी लावा. सोशल मीडियाचा वापर जपून करा यात वाहत जाऊ नका. स्वतःला घडवा, असा मोलाचा सल्ला त्यांनी कॉलेजियन्सना दिला. मुलांशीही साधला संवाद

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे वलय व तरुणाईमध्ये असणारी लोक‌प्रियता याचा प्रत्यय या कार्यक्रमातही आला. मुळात हा कार्यक्रम मुलींनी मुलींकरता घेतला होता, पण त्यापूर्वी अमितेशकुमार यांना मुलांशी संवाद साधावा लागला. महाविद्यालयाच्या आवारातच झालेल्या या संवादात आयुक्तांनी मुलांना मार्गदर्शन केले. शहराची शिस्त, सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी असून प्रत्येक वाईट घटनांची नोंद घ्या व पोलिसांना कळवा. वाहतूक असो की, कॉलेजचा परिसर स्वतःही नियमांचे पालन करा व इतरांनाही सांगा असेही आवाहन त्यांनी केले. हा संवाद शेकडो विद्यार्थ्यांचे मोबाइल रेकॉर्ड करत होते. तरुणांमध्ये त्यांची किती क्रेझ आहे, हे यावेळी दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न घाबरता पुढे या, पोलिस मदतीला सज्ज

$
0
0

औरंगाबाद टाइम्स टीम

'तुमच्या रक्षणासाठी पोलिस खाते तत्पर आहे, पण याकरता तुम्ही निर्भयपणे तक्रार करा. सुरुवातीपासूनच विरोध करा. महिला सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे', हे शब्द कानावर पडताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. महाविद्यालयीन युवतींशी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचा मुक्तसंवाद हा सामान्य नागरिक व पोलिस यांच्यातले अंतर कमी करून शहरात सुरक्षित वातावरण निर्मितीकरता सकारात्मक दिशा देणारा ठरला.

देवगिरी कॉलेजमध्ये पोलिस आयुक्तांनी मुक्तसंवाद साधला. तडफदार आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अशी प्रतिमा असलेले पोलिस आयुक्त कॉलेजमध्ये येताच त्यांची युवकांमध्येही किती क्रेझ आहे याचीही प्रचिती आली. कॉलेजच्या हजारावर विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घातला अन् त्यांच्याशी हस्तांदोलन केले. पोलिस आयुक्तांनी त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींशी साधलेल्या संवादादरम्यान अनेक मुलींनी मनकोकळे केले अन् विविध प्रश्न केले. त्याची तेवढीच समर्पक उत्तरे पोलिस आयुक्तांनी दिली. पोलिस सदैव तुमच्या सोबत असल्याची खात्री त्यांनी युवतींना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतक-यांच्या पाठिशी उभे राहू!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, परभणी

मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असून यंदाही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत. टंचाईस्थितीत शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खचून न जाता मनोबल भक्कम ठेऊन या परिस्थितीचा धिराने मुकाबला करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मानवत तालुक्यातील ताडबोरगाव व पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दिवाकर रावते, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, मोहन फड, बाबाजानी दुर्राणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. टी. कदम, माजी आमदार मीराताई रेंगे व अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'मराठवाडयातील टंचाईस्थितीची प्रत्यक्ष शिवारात पाहणी करून शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शासन आणि प्रशासन आपल्या दारी आले आहे. यंदा ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पावसाअभावी वाया गेली आणि ज्यांनी पावसाच्या प्रतिक्षेत तयारी केली पण पेरणी करू शकले नाहीत, अशा शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम जरी वाया गेला तरी रब्बी हंगामासाठी शासनाने बियाणे आणि खते यांच्या उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी वीज बिलात सुट देण्याचेही विचाराधीन आहे.'

पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि मजूरांच्या हाताला काम देण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे जनावरांवर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते, जनावरांना जगविण्यासाठी ऑगस्ट महिन्यातच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अल्पकाळात तयार होणारा हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. दहा टक्के रक्कम जनावरांच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच चारा उपलब्ध नसल्यास परराज्यातूनही चारा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. के. दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, तहसील, कृषी व संबंधीत विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

टंचाईस्थितीमध्ये मजुरांना माफकदरामध्ये १५ ऑगस्टपासून धान्य पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ ६० लाख गरजु कुटुंबाना होणार असून अशा प्रकारची योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

..........

ढालेगाव, ताडबोरगाव व पानेरा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे गोदावरी नदी तसेच बंधाऱ्याची पाहणी.

मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे टंचाई निवारणार्थ करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची तसेच शिवारातील पिकांच्या स्थितीची पाहणी.

परभणी तालुक्यातील पानेरा येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गतच्या सिमेंट नाला बांधाची पाहणी.

ढालेगाव, ताडबोरगाव व पानेरा गावांतील शेतकरी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतक-यांनी थांबवले आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर तालुक्यातील ढोकनांदूर, सावखेडगंगा, बाभूळगावगंगा व लाडगाव या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रनसिंगनाला पाझर तलावात नांदूर मधमेश्वर कालव्यातून ९ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांनी गुरुवारी (३ सप्टेंबर) दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला.

या भागातील ६० शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी या मागणीकरिता आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर वैजापूरचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब महाजन, सहायक पोलिस निरीक्षक आर. एम जाधव यांनी कार्यालय परिसरात बंदोबस्त ठेवला होता. 'नांमका'चे कार्यकारी अभियंता फुलंब्रीकर यांनी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. कालव्यातून ५ सप्टेंबरपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन होते, परंतु पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने हा कार्यक्रम १० सप्टेंबरपर्यंत वाढवून ९ सप्टेंबर रोजी पाझर तलावात पाणी सोडण्याचा प्रस्ताव नाशिक पाटबंधारे विभागाकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांनी या पत्रावर आक्षेप घेतला. माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. प्रमोद जगताप, पंचायत समितीचे माजी उपसभापती अॅड. प्रताप निंबाळकर यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. पाणी सोडण्यापूर्वी वितरिकेवरील पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांची बैठक घ्यावी, असे 'नांमका'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी नायब तहसिलदार चैताली दराडे, धनंजय धोर्डे, शिवाजी थेटे, बाबासाहेब थेटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतक-यांचे समुपदेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यातील अतित्रस्त दीडशे शेतकऱ्यांना समुपदेशन करून आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय गुरुवारी (३ सप्टेंबर) तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शासनाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील ७५० शेतकरी नापिकी, कर्ज, मुलींचे लग्न, आजारपण आदी कारणांमुळे तणावात असल्याचे लक्षात आले आहे. त्याबद्दलचे वृत्त 'म.टा.'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्र्यांचे विशेष कार्यासन अधिकारी व तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेऊन आत्महत्या रोखण्याबद्दल विचार करण्यात आला. सर्वेक्षणात लक्षात आलेल्या ७५० शेतकऱ्यांपैकी दीडशे शेतकऱ्यांना ताबडतोब समुपदेशन व इतर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत व्यक्त झाले. शासनातर्फे त्याबद्दल उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे सांगण्यात आले. यावर्षी खुलताबाद तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोची विकासकांविरोधात तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झालरक्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखांकन करून प्लॉट विक्री करणाऱ्या दोन विकसकांविरुद्ध सिडकोने फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जगदंब गृहसंकुल व प्रगती प्रॉपर्टी, अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय इतर चौघांना नोटीस बजावण्यात आली आहे. निर्धारीत वेळेत म्हणणे सादर न केल्यास कडक कारवाई करू, असा इशारा सिडकोने दिला.

झालरक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे विकासकाम, इमारत बांधकाम, पुनर्विकास, रेखाकंन करण्याकरिता सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, परवानगी न घेता बांधकामे, रेखाकंन करून प्लॉटविक्री होत आहे. सिडकोचे मुख्यप्रशासक सुनील केंद्रेकर यांच्या आदेशानुसार सिडकोचे वरिष्ठ नियोजनकार ए. व्ही. उईके, उपनियोजनकार अभिजीत पवार यांच्या पथकाने शोध घेतला आहे. या तपासणीत हर्सूल सावंगी परिसरातील नर्मदानगर येथील जगदंब गृहसंकुल हा ६० रो हाउसचा प्रकल्प व कृष्णापूरवाडी येथील प्रगती प्रॉपर्टीच्या प्लॉटिंगला सिडकोची मान्यता नसल्याचे उघड झाले. सिडकोने या दोन्ही विकसकांना नोटीस दिली; त्यांनी निर्धारीत वेळेत म्हणणे सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी नियोजन विभागाला दिले. या आदेशानुसार फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.

......

सिडकोची परवानगी न घेता होणारी विकासकामे अनधिकृत आहेत. अनधिकृत कामांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. सिडको अधिसूचित क्षेत्रातील सदानिका, भूखंड खरेदी करण्याआधी ते बांधकाम, रेखांकन अधिकृत आहे की नाही, याची खात्री करून फसगत टाळावी, असे आवाहन सिडकोने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यामुळे होत आहेत हाल

$
0
0


ठाकरेनगर - ठाकरेनगर एसटी कॉलनी हा नव्याने तयार झालेला वॉर्ड नंबर ८१. जालन्याहून येताना लागणाऱ्या प्रमुख काही वॉर्डांपैकी हा वॉर्ड एक आहे. वॉर्डात सर्वसामान्य नागरिक व कामगारांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. वॉर्डात सुमारे ७ हजार मतदार असून लोकसंख्या १५ हजार आहे. पाण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने पाणीपुरवठा, उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीचा त्रास येथील नागरिकांना होत आहे. सध्या वॉर्डात सिमेंट रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु कामांचे नियोजन अद्याप झालेले नाही.

नगरसेविका सत्यभामा शिंदे या काही महिन्यांपासून विकासकामांसाठी निधीची प्रतीक्षा करीत आहेत. कामगार चौक ते महालक्ष्मी चौक आणि कासलीवाल कॉर्नर ते तुकोबानगर या परिसरातील रस्त्यांचे काम निधीअभावी पूर्ण झालेले नाही. वॉर्डातील 'बी' आणि 'डी' सेक्टरमधील कामांना डीपीसीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर होऊनही काम झालेले नाही. कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगितले जाते. परंतु, कामाला होत असलेल्या उशिरामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे. सी सेक्टरमधील रस्त्यांसाठीही सुमारे २५ लाख रुपये मंजूर झाले, असून मोठ्या दोन रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत, अशी माहिती विद्यमान नगरसेविकेचे पती व माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे यांनी दिली.

वॉर्डातील ठाकरेनगर, एसटी कॉलनी, तुकोबानगर, कासलीवाल कॉर्नर, महालक्ष्मी चौक, कामगार चौक, न्यू एसटी कॉलनी या परिसरात विकासकामांना सुरुवात झाली आहे. विकासकामांना निधीची पूर्तताही हळुहळु होत आहे. शहर 'स्मार्ट सिटी' होत असताना वॉर्ड 'स्मार्ट' झाला तर तो शहराच्यादृष्टीने हितकारक राहील. त्यादृष्टीने वॉर्डातील कचरा व्यवस्थापन, व्हाइट टॉपिंग आणि रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याचा मानस नगरसेविका सत्यभामा ‌शिंदे यांनी बोलून दाखविला. वॉर्डातील नागरिक विजेच्या समस्येने त्रस्त आहेत. डीपी उभारणी आणि रस्ते बांधणी या प्रमुख समस्या सुटत नसल्याने नागरिक नाराज आहेत. परंतु, निधी उपलब्ध होत असल्याने या समस्या सुटण्याच्या अपेक्षा आहे.

.........

नगरसेविका सत्यभामा शिंदे या सुशिक्षित आहेत. त्यांचे पती दामूअण्णा शिंदे पूर्वी नगरसेवक होते. वार्ड आरक्ष‌ित झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना पतीच्या जनसंपर्काचा लाभ होत आहे.

..........

पाणी येण्याचा दिवस असतो तेव्हा वॉर्डात व जलकुंभावर जाऊन परिस्थितीची पाहणी करते. पाणी येण्याची वेळ अनियमित असल्याने त्रास होतो. ही समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विकासकामे करायची आहेत. परंतु, निधी वेळेवर मिळत नाही. मनपा आणि आमदारांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. - सत्यभामा शिंदे, नगरसेविका

वॉर्डत पाणी सोडण्याच्या नि‌यमित कराव्यात. ठरलेल्या वेळेनुसार पाणी येत नसल्याने इतर कामांचा खोळंबा होतो. रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरू व्हावीत.- रामदास उशिरे

वॉर्डात व्हाइप टॉपिंग रस्त्यांकरिता निधी मंजूर होऊनही काम सुरू झाले नाही. पाण्याची वेळ अनियमीत असल्याने कामांचा खोळंबा होतो. शिवाय कमी दाबाने पाणी येते. - जयंत निकुले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगाराची हत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

रांजणगाव शेणपुंजी येथे दोन कामगारांच्या भांडणात एकाचा डोक्यात वीट मारून खून करण्यात आला. जयभवानी चौकातील देशी दारू दुकानासमोर गुरुवारी (३ सप्टेंबर) सकाळी सहा वाजता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीचे नाव खंडू भिकाजी पहेरकर, असे असून, या घटनेतील जखमी अनोळखी कामगार पळून गेला आहे.

रांजणगाव फाट्याजवळील जयभवानी चौकात देशी दारू दुकानासमोर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. तेथे एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्या तत्काळ औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांमध्ये दारू पिण्यावरून किंवा इतर कारणावरून भांडण व मारामारी झाली असावी, दुसरा जखमी पळून गेला आहे,' अशी माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी दिली. या मृत कामगाराचे नाव खंडू भिकाजी पहेरकर (वय ४७, मूळ रा. यसगाव दिघी, हल्ली मुक्काम शिवनेरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) असे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दुसऱ्या जखमीचा शोध सुरू केला आहे. दुसऱ्या जखमीचा या खुनाशी संबंध असावा, असा पोलिसांना संशय आहे. या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त रमेश गायकवाड, क्राइम ब्रांचचे अधिकारी, फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

.........

शिवनेरी कॉलनीतील हे देशी दारूचे दुकान परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. भरवस्तीतील दुकान हटवण्याची मागणी अनेकदा करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याची नागरिकांची तक्रार आहे. हाणामारी,भांडण नित्याच्या आहेत. आता एक खून झाल्याने दुकान गावाबाहेर हलवावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी जिल्हाउपसंघटक साखराताई तोगे यांनी केली आहे.

.........

दारू दुकानासमोर दोन व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी कळवल्यानंतर पोलिस आले. परंतु, पोलिसांचे गस्ती पथक व चार्लीच्या नजरेतून ही बाब कशी सुटली, अशी शंका नागरिक घेत आहेत. मात्र ही घटना मध्यरात्रीची असण्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याअभावी जनजीवन विस्कळीत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील सर्वाधिक तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला तरी, बिलोली, मुखेड, नायगाव, धर्माबाद या तालुक्यांमध्ये कमी पावसामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. मराठवाड्यात सर्वाधिक १५७५ गावे असलेल्या नांदेड जिल्ह्यात दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ९५५.५५ मिलिमीटर, मात्र आतापर्यंत केवळ ३४८.९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पेरणी केलेले खरीप पूर्णपणे जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे, सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा जगाचये कसे, जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्याच्या काही भागात ५० टक्के पाऊस झाल्याची नोंद असली तरी ३ सप्टेबरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झाला नाही. पावसाच्या कमतरतेमुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. बोअर, विहिरी आटू लागल्याने येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर दुष्काळामुळे नांदेड जिल्ह्याचे भीषण चित्र निर्माण होण्याची भीती आहे. महिना-पंधरा दिवस कसेबसे काढल्यानंतर पिण्याच्या पाण्यासह जनावरासाठी पाणी व चाऱ्यासाठी काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. भोकर, उमरी, हिमायतनगर, हदगाव, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद, नांदेड, मुदखेड व अर्धापूर या सर्वच तालुक्यांना दुष्काळाच्या झळा तीव्रतेने जाणवत आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे हतबल झालेल्या जिल्ह्यातील तब्बल १०३ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यामध्ये समितीने ७१ आत्महत्यांना पात्र व ७ आत्महत्यांना अपात्र ठरविले. २६ प्रकरणे चौकशीसाठी सरकारी दप्तरी प्रलंबित आहेत. पात्र ठरवण्यात आलेल्या सर्व ७१ प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी मदत दिली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक लहान मोठ्या जनावरांची संख्या नांदेड जिल्ह्यात आहे, मात्र निम्म्या जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पोटच्या लेकरागत सांभाळलेल्या जनावरांची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या जनावरांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग असलेल्या कंधार, लोहा, मुखेड, माहूर, किनवट या भागांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पाण्याचे जवळपास सर्वच स्त्रोत तळाला गेल्यामुळे लहान वाड्या-वस्त्यांवरील लोक शहराकडे स्थलांतरित होत आहेत.

तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये १२६ योजना प्रस्तावित. केवळ ३६ योजना मंजूर. प्रत्यक्षात केवळ १८ योजनाच पूर्ण.

नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी जिल्ह्यामध्ये तब्बल २१७ योजनांपैकी ९२ योजना जून २०१५ पर्यंत मंजूर. यापैकी ७१ योजना पूर्ण.

जिल्ह्यामध्ये नवीन बोअरवेल घेण्याचे ७२४ प्रस्ताव प्रशासनाकडे. यापैकी २८३ प्रस्तावांना मंजूरी. यातील १७० बोअरवेल घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाणीदार’ यशोगाथा

$
0
0

औरंगाबाद - जायकवाडी प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक असल्याने औरंगाबाद शहरात तीन-चार दिवसांआड पाणी पुरवठा सुरू आहे. कित्येक वसाहतीत पाणी टंचाईने नागरीक हवालदिल झाले आहेत. या परिस्थितीला महाजन कॉलनी मात्र अपवाद आहे. जुन्या विहिरीचे फेरभरण केल्याने महापालिकेच्या पाण्यावर अवलंबून न राहता ही कॉलनी पाण्याबाबत स्वावलंबी ठरली आहे.

सिडको वसाहतीपूर्वी महाजन कॉलनीची स्थापना झाली आहे. सध्या कॉलनीत १२६ घरे आहेत. शहरभर पाण्यासाठी ओरड असताना महाजन कॉलनी मात्र पाण्याबाबत स्वावलंबी आहे. कारण काळाची पावले ओळखून सोसायटीने एकत्रित प्रयत्नातून पाणी टंचाईवर मात केली. कॉलनीच्या मैदानावरील जुन्या विहिरीचा १९५०पासून वापर केला जात होता, मात्र नंतर हा वापर थांबला. कॉलनीचे सर्वात जुने रहिवासी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. त्र्यंबक महाजन यांनी विहिरीचे पाणी वापरण्याचा निर्णय घेतला. १९९०पासून पुन्हा विहिरीचे पाणी वापरात आले. या कामासाठी सिडकोचे तत्कालिन प्रशासक वसंतराव सोळुंके यांनी मार्गदर्शन केले होते. सध्या सोसायटीचे अध्यक्ष रामदास फड पाणी नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

'जलफेरभरणामुळे विहिरीची पाणी पातळी वाढली. काही वर्षांपूर्वी विहिरीत आडवे बोअर घेऊनही पाणी वाढले नव्हते. त्यामुळे फेरभरणाचा उपक्रम राबवला,' असे फड यांनी सांगितले. सध्या दररोज सकाळी अर्धा तास सोसायटीतील सव्वाशे घरांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेचे पाणी असते त्या दिवशी पाणी सोडले जात नाही. फक्त अर्धा तास पाणी सोडल्याने रहिवासी पाणी काटकसरीने वापरतात. विहिरीच्या सभोवती झाडे लावली आहेत; तसेच कॉलनीत भरपूर झाडे असल्यामुळे ही वसाहत निसर्गरम्य झाली आहे. शहरात जवळपास २५० जुन्या विहिरी आहेत. या विहिरींचे पावसाच्या पाण्याने दरवर्षी फेरभरण केल्यास स्थानिक पातळीवर पाणी टंचाई संपू शकते. शहरातील इतर सोसायट्यांनी महाजन कॉलनीची 'पाणीदार' यशोगाथा अंमलात आणण्यास हरकत नाही.

प्रयोग

कॉलनीत मोकळ्या मैदानावर विहीर असून, मैदानाच्या दोन्ही बाजूने वाहत आलेले पावसाचे पाणी विहिरीकडे वळविले आहे. रस्त्यापासून विहिरीपर्यंत चर खोदला आहे; तसेच स्वतंत्र पाइपलाइन आहे. वाहत आलेले पाणी मुरविण्यासाठी विहिरीलगत १० फूट खोल व १५ फूट रुंद दोन खड्डे खोदले आहेत. खड्ड्यात पाणी मुरल्यानंतर विहिरीचे पाणी पातळी वाढते. सध्या विहीर नितळ पाण्याने डबडबली आहे.

पालिकेच्या पाण्यावर सोसायटी फार अवलंबून नाही. प्रत्येक नागरी वसाहतीत बोअरवेल व विहीर फेरभरणाचा प्रयोग केल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे. - रामदास फड, अध्यक्ष, महाजन कॉलनी सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वक्फ बोर्डात महिलांची भरती

$
0
0

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड कार्यालयात ७०० कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून यात ३० टक्के महिलांची भरती करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसीम बानो नासेर पटेल यांनी ही माहिती दिली.

नसीम बानो यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला भेट देऊन विविध विभागातील माहिती घेतली. रेकॉर्ड रूमचीही त्यांनी पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'रेकॉर्ड रूमची अवस्था अत्यंत वाईट आहे. अभिलेखाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. शासनाला प्रस्ताव पाठवून यासंदर्भात नियोजन केले जाणार आहे. वक्फ बोर्डात कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकरणे औरंगाबादला येत असल्याने येथे कर्मचारी वाढविण्याची गरज आहे. ७०० कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या वक्फ कार्यालयात एकही महिला कर्मचारी नाही. त्यामुळे या भरतीत ३० टक्के महिला कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल.

पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी

२००२ ते २०१५ पर्यंत आठ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वकफ बोर्डाचा कारभार पाहिला. आता प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नसीम बानो या महिला अधिकारी वक्फ बोर्डावर आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images