Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अजिंठा लेणी विकास योजनेतून बांधण्यात आलेल्या औरंगाबाद-अजिंठा लेणी-बऱ्हाणपूर महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक खड्डे पडलेल्या रस्त्यांमुळे धोकादायक झालेला रस्ता महामार्गाऐवजी मृत्युमार्ग बनला आहे.

अजिंठा लेणी विकास योजनेतून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला आहे. त्यानंतर रस्ता दुरुस्तीवर मोठा खर्च झाला; प्रत्यक्षात महामार्गाची दुरुस्ती झाल्याचे कोठे दिसत नाही. अजिंठा घाट ते फर्दापूर येथील वाघूर नदी पूल या सात किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. रस्त्याची अक्षरक्षः चाळण झाली आहे. असंख्या खड्ड्यामुळे हा रस्ता महामार्गाऐवजी मृत्युचा मार्ग झाला आहे. या सात किलोमीटरच्या अंतरात आतापर्यंत अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले. रस्त्याचे कठडे जागोजागी तुटले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल वेळोवेळी आवाज उठवण्यात आला, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. खड्डे दुरुस्तीच्या नावे कंत्राटदार खड्ड्यात माती टाकतो; ही माती पाऊस पडल्यानंतर धोकादायक असते. मातीवर साचणाऱ्या पाण्यामुळे दुचाकीस्वारांना अंदाज येत नाही; परिणामी वाहन घसरून अपघात होतात. अनेक अवजड वाहनांचे पाटे तुटले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

नावापुरते कार्यालय

फर्दापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय केवळ नावापुरतेच उरले आहे. या कार्यालयात एका शिपायाखेरीज कोणीच हजर राहत नाही. कार्यालयाला अनेक वेळा कुलूप असल्याचे दिसते. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता शाखा अभियंता औरंगाबादहून, तर उपविभागीय अभियंता पुण्याहून कार्यालयाचा कारभार पाहत असल्याची माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रांजणगाव खूनप्रकरणी पसार जखमीला अटक

$
0
0

म .टा. प्रतिनिधी वाळूज

रांजणगाव शेणपुंजी येथील देशी दारू दुकानासमोर झालेल्या खूनप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने संशयावरून एकाला अटक केली आहे. त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तम गंगाधर पवार, असे त्याचे नाव आहे.

रांजणाव शेणपुंजी येथे गुरुवारी (३ सप्टेंबर) रोजी सकाळी सहा वाजता खंडू भिकाजी पहेरकर याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी दोघे जण बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली होती; पण एक जण पळून गेला होता. पोलिसांनी दुसऱ्या जखमीचा शोध सुरू केल्यानंतर रांजणगाव येथे बहिणीकडे आलेल्या उत्तम गंगाधर पवार (वय ३२, रा. वझूर ता. पूर्णा जि. परभणी) याचे नाव समोर आले. पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला मूळ गावाहून ताब्यात घेतले. त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केले असता १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक थिटे यांच्या पथकाने केली.

अद्याप तपास नाही

रांजणगाव येथील खुनाच्या घटनेत पोलिसांनी २४ तासात संशयावरून एकाला अटक केली आहे. परंतु, याच परिसरात साजापूर येथील तृतीयपंथीयाचा खून होऊन चार महिने उलटले. त्या प्रकरणाची उकल अद्याप झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणी कॅम्पद्वारे उद्योजकांची मोजणी

$
0
0

म.टा.प्रतिनिधी वाळूज़

राज्यातील लघु व सुक्ष्म उद्योजकांची अधिकृत आकडेवारी स्पष्ट व्हावी याकरिता जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सर्व एमआयडीसी क्षेत्रात मोफत नोंदणी कॅम्प सुरू करण्यात आले आहेत. येथील मासिआ कार्यालयात शुक्रवारपासून दोन दिवसांचा कॅम्प सुरू झाला. या कॅम्पमध्ये उद्योजकांना लागणारे 'पार्ट टू'चे प्रमाणपत्र तत्काळ देण्याची सोय करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील लघु, सुक्ष्म उद्योजकांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे, परंतु त्यांची नोंद जिल्हा उद्योग केंद्रात नाही. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांची नोंदणी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार राज्यभर सर्वत्र नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. या नोंदणी कॅम्पमध्ये लघु व सुक्ष्म उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यापुर्वी जिल्हा उद्योग केंद्रात पहिल्या (पार्ट १) प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावी लागते. त्यानंतर कायमस्वरूपी (पार्ट-२) प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधीत नोंदणीकृत व्यवसायधारकाला जागेचा पुरावा, वीज बिल, भाडेतत्त्ववरील भाडेकरार आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या पार्ट-२ प्रमाणपत्राच्या नोंदीवरून जिल्ह्यातील सर्व उद्योजकांची आकडे समोर येणार आहे. कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरिक्षक एम. आर. गायकवाड, ए. बी. राऊत, जी. डब्ल्यु. भांगे आदी काम पाहात आहे. यावेळी लघु उद्योजक तसेच मासिआचे सचीव सुनील किर्दक, अर्जून साळुंके, डी. एल. राजाळे, ए. एस. शेख, अनिल पटेल आदींची उपस्थिती होती.

नोंदणीचे आवाहन

लघु व सूक्ष्म उद्योगात अनेक व्यवसाय येतात. त्यात सायकल दुरुस्ती, टेलरिंग, केश कर्तनालय, फेब्रिकेशन, टूल्स मेकिंग आदींचा समावेश होतो. त्यामुळे यासर्व उद्योजकांनी नोंदणी करून जिल्हा उद्योग केंद्राच्या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक व्ही. बी. सोने यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ बुडवणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यासह शहरातील विविध कारखाने, उद्योजक आणि व्याव‌स‌ायिकांनी जर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम पीए कार्यालयात भरली नाही तर कारवाई सुरूच राहील, असा इशारा भविष्य कर्मचारी निर्वाह निधी व संगठनचे आयुक्त सुधीर गणवीर यांनी 'मटा'शी बोलताना दिला.

शुक्रवारी 'महाराष्ट्र टाइम्स'ने १० लाखांच्या वर असलेल्या विविध थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केल्यावर १७ कारखाने, ६ साखर कारखाने, ४ शैक्षणिक संस्था आणि २ हॉटेलवर पीएफ विभागाने केलेल्या कारवाईचा पुन्हा फॉलोअप घेतला. यावेळी गणवीर म्हणाले, 'आता १० लाखांच्या खाली पीएफ बुडवणाऱ्या विविध कारखान्यांवर यापुढे कारवाई सुरू राहणार आहे. अशा बुडव्यांची संख्या ५० असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईत बँक खाती गोठवणे, मालमत्ता जप्तीची कारवाई आणि वसुली करणे आदी बाबींचा समावेश असतो. यापुढे पीएफ न भरलेल्या कंपन्यांना व व्यावसायिकांना आधी नोटीस आणि नंतर कारवाई करण्यात येईल. कोट्यवधींचा पैसा हा गोरगरिबांच्या हक्काचा व कष्टाचा पैसा आहे. यामुळे आम्ही तो बुडवू देणार नाही,' असे गणवीर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीचे आमिष; सहा लाखाचा गंडा

$
0
0

औरंगाबाद : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणाला सहा लाखाचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार मुकुंदवाडी भागात घडला. याप्रकरणी दोघांवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाशनगर भागातील प्रल्हाद रतन लांडगे व सचिन भोळे हे दोघे श्याम पांडुरंग बागडे (रा. प्रकाशनगर) याच्या वडिलांच्या ओळखीचे होते. नोव्हेंबर २०१४ रोजी या दोघांनी पांडूरंग बागडे यांना श्यामला सरकारी नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. या कामासाठी त्यांच्याकडून सहा लाख रुपये या दोघांनी उकळले. नोकरी लागली नाही तर पैसे परत करू असेही दोघांनी सांगितले होते. तसेच बागडे यांना देवगिरी बँकेचा सहा लाखाचा चेक दिला होता. यानंतर आरोपी सचिन भोळे याने हा चेक परत नेत बागडे यांना चेकची झेरॉक्स दिली होती. वारंवार पाठपुरावा करूनही श्यामला नोकरी लागली नाही तसेच पैसे परत करण्याऐवजी या दोघांनी ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोघांविरूद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमआराम बस आणखी आरामदायी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटीच्या निमआराम बसमध्ये प्रवाशांना अधिक आराम मिळावा यासाठी पुश बॅक सीट असलेल्या आणखी ८०० बस तयार करण्याचे काम औरंगाबादसह ‌दापोली आणि नागपूर येथील कार्यशाळेत वेगाने सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील बस प्रवाशांचा निमआराममधील प्रवास आणखी आरामदायी होणार आहे.

एसटीने खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांशी स्पर्धा करावी व प्रवाशांनी अधिकाधिक चांगली, आरामदायी सेवा द्यावी म्हणून महामंडळाच्या वतीने ८३७ हिरकणी (निमआराम बस) विविध आगारातून सुरू करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या या सेवेला राज्यभरातील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि महामंडळाच्या बसस्टँडवर गर्दी वाढू लागली. आता ही सेवा अधिक चांगली करण्यासाठी याच श्रेणीतील ८०० नवीन बस तयार करण्याचा महामंडळाचा विचार होता. या बसेसना पुश बॅक (सीट मागे पुढे करण्याची सोय) सीटची व्यवस्था करण्यात करण्याचाही विचार होता. त्यासाठी हा प्रस्ताव दापोली येथील रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो नुकताच मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबादच्या चिकलठाणा कार्यशाळेत सध्या ११ ‌चेसीसवर निमआराम गाड्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. औरंगाबादसह ‌दापोली आणि नागपूर येथून नवीन निमआराम बसची बांधणी करण्यात येणार आहे. राज्यभरासाठी एकूण ८०० बस तयार केल्या जाणार असून या बस आगामी आठ ते दहा महिन्यात रस्त्यावर धावू लागतील.

चिकलठाणा कार्यशाळेत निमआराम पुश बॅक सीटच्या बस गाड्यांची निर्मिती सुरू आहे. यात तांत्रिक बदल केले जाणार आहेत. या कार्यशाळेतून ११ नवीन बस सप्टेंबर अखेर तयार होण्याची शक्यता आहे. त्या नियोजनानुसार कामाने वेग घेतला आहे.

- जे. पी. चव्ह‌ाण, कार्यशाळा व्यवस्थापक, चिकलठाणा विभागीय कार्यशाळा औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर तलाठ्यास एक वर्ष सक्तमजुरी

$
0
0

म.टा.विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

साताबारावर २७ हजाराच्या पीक कर्जाच्या बोजाची नोंद घेण्यासाठी १५० रूपयाची लाच घेणारा तलाठी मोहन कुलकर्णी याला लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी एक वर्ष सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश दिले.

पैठण तालुक्यातील हिरापूर येथील कान्होजी मुरलीधर लेंडे यांनी आपल्या शेताच्या सातबारावर २७ हजार रुपयांच्या पीक कर्जाच्या बोजाची नोंद घेण्याची विनंती तलाठी मोहन कुलकर्णी यांच्याकडे केली असता त्यांनी त्यासाठी १५० रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे लेंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचून तलाठी मोहन कुलकर्णी यास १५० रुपयांची लाच घेताना अटक केली. त्याच्याविरुध्द पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ किलो चांदी चोरट्याकडून जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सराफा दुकान फोडणाऱ्या चोरट्याकडून पाच किलो चांदी हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. किशोर टाक (वय २२, रा. जालना) असे अटेकत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

सिल्लोड शहरातील सराफा मार्केट भागातील चिंतामणी ज्वेलर्स या दुकानात चोरी केल्याचा प्रकार ३ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आला होता. चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला व दुकानातील दोन किलो वजनाचे चांदीचे जोडवे ६० नग, १० किलो वजनाचे चांदीचे फॅन्सी चैन पट्टे २५० नग, दोन किलो वजनाचे चांदीचे फॅन्सी जोडवे ३० नग, चांदीचे ७ ब्रेसलेट, २५ कडेवाळे, अडीच किलो वजनाचे चांदीचे १० जोड दंडकडे, १० ग्रॅम वजनाची सोन्याची एक बाळी, असा तीन लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे व त्यांच्या पथकाने किशोर टाक या संशयावरुन २८ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने चोरी केल्याचे कबूल केले. सुरुवातीला त्याकडून दहा किलो चांदी हस्तगत करण्यात आली. त्यानंतर तपासात आणखी पाच किलो चांदी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी.पी. सरोदे, पोलिस कर्मचारी रोहिदास तांदळे, गणेश जाधव, निलेश गायकवाड, प्रेम म्हस्के, विकास चौधरी, पुष्पाजंली इंगळे यांनी कामगिरी केली. याप्रकरणातील अन्य दोन पसार आरोपींचा शोध पोलिस घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झनझन यांना बैठकीतून बाहेर काढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालमत्ता कर वसुलीच्या आढावा बैठकीतून महापौर त्र्यंबक तुपे यांनी शुक्रवारी मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना बाहेर काढले. झनझन यांच्याकडे कर वसुलीचा पदभारच नाही. त्यामुळे त्यांनी बैठकीत पूर्णवेळ थांबू नये आणि मालमत्ता कर वसुलीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठकही घेऊ नये, अशी सूचना केली.

महापौरांनी सकाळी अकराच्या सुमारास मालमत्ताकर वसुलीसाठी घेतलेल्या बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, गजानन बारवाल, भगवान घडमोडे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम, सर्व वॉर्ड अधिकारी यांच्यासह शिवाजी झनझन उपस्थित होते.

झनझन यांच्याकडे असलेला करमूल्य निर्धारक व संकलक पदाचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश महापौरांनी २० ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले होते. त्यानुसार प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी झनझन यांच्याकडचा कार्यभार तत्काळ काढला. याला आयुक्त प्रकाश महाजन यांचा विरोध होता. झनझन यांच्याकडचा कार्यभार उपायुक्त अय्युब खान यांच्याकडे देण्यात आला. महाजन यांनी अय्युब खान यांच्याकडचा करमूल्य निर्धारक व संकलकपदाचा कार्यभार काढून घेतला व हा विभाग स्वतःकडेच ठेवला. गुरुवारी आयुक्त बाहेरगावी गेले होते.

तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत झनझन यांनी कर वसुलीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीचे पडसाद आज महापौरांनी आयोजित केलेल्या बैठकीत उमटले. त्यातच करमूल्य निर्धारक व संकलक पदाची सूत्रे नसताना झनझन बैठकीला येऊन बसले. त्यामुळे महापौरांसह सर्वच पदाधिकारी संतापले.

महापौर झनझन यांना उद्देशून म्हणाले, 'कर वसुलीचा कार्यभार तुमच्याकडे दोन दिवसांपूर्वी होता. तो पर्यंतच्या काळात किती कर वसुली झाली याची माहिती द्या आणि बैठकीतून निघून जा.' राजेंद्र जंजाळ आणि राजू वैद्य यांनी 'मालमत्ता करासंबंधी किती तक्रारींवर सुनावणी बाकी आहे,' असा प्रश्न विचारला. तेव्हा 'सर्व तक्रारी निकाली काढल्या,' असे झनझन यांनी सांगितले. वॉर्ड अधिकाऱ्यांनी मात्र 'तक्रारी निकाली काढणे बाकी आहे,' असा खुलासा केला. त्यानंतर महापालिकेकडे नोंद असलेल्या शहरातील मालमत्ता व नोंद नसलेल्या मालमत्ता यावर चर्चा सुरू झाली. ही चर्चा मध्येच थांबवत महापौरांनी झनझन यांना बैठक सोडून जाण्यास भाग पाडले.

झनझन यांना उद्देशून ते म्हणाले, 'झनझन तुम्ही आता बाहेर जा. आम्ही वॉर्ड अधिकाऱ्यांशी बोलतो. आम्ही बोलल्यावर तुम्ही त्यांच्याशी स्वतंत्र बोलू नका, त्यांची बैठक घेऊ नका.' महापौरांच्या या निवेदनानंतर झनझन बैठकीतून उठून बाहेर गेले.

निर्णयाची अंमलबजावणी करा

मालमत्ता करावर २४ ट्क्के व्याज आकारण्याचा निर्णय प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक नागरिकांना मालमत्ताकराच्या नोटीस मिळालेल्या नाहीत. त्यामुळे व्याज आकारणीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्या, असा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला होता. तसे आदेश प्रशासनाला दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करा, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावर विधीसल्लागार ओ. सी. शिरसाट यांनी कायद्यानुसार व्याज आाकरणी केली जात आहे असा खुलासा केला. 'व्याज आकारणीचा कायदा केव्हा झाला,' असा प्रश्न राजू वैद्य यांनी विचारला. तेव्हा २०१२ यावर्षीपासून हा कायदा झाल्याचे शिरसाट यांनी सांगितले. २०१२ पासून कायदा झालेला असताना प्रशासनाने आतापर्यंत व्याज आकारणी का केली नाही, असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला.

सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. ही अंमलबजावणी करणे शक्य नसेल तर शासनाला कळवा. शासनाला कळवताना २०१२ पासून व्याज आकारणी केली नाही आणि अद्याप मालमत्ताकराच्या नोटीसांचे वाटप झालेले नाही असेही शासनाला कळवा.

- त्र्यंबक तुपे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट साहित्य; व्यापारी अटकेत

$
0
0

औरंगाबाद : इन्टेक्स मोबाइल कंपनीचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना क्रांत‌िचौक पोलिसांनी अटक केली. त्यात श्रेयनगरच्या विनायक मोहन चौधरी, कुंभारवाड्यातील दिनेश कुमार भवरलाल आणि बायजीपुराचा निशीबखान शब्बीर खान यांचा समावेश आहे. त्यांंच्या ताब्यातून १० लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.

व्यापाऱ्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एच. सय्यद यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी ७ सप्टेंबर सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. इन्टेक्स मोबाइल कंपनीचे दिल्ली येथील मुकेशकुमार पांडे यांनी पैठण गेट, निराला बाजार परिसरातील दुकानात जाऊन साहित्य खरेदी केले. त्या साहित्याची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी क्रांत‌िचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणीसाठी अपहरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाच लाखांच्या खंडणीसाठी प्लॉटिंग व्यावसायिक तौस‌िफ देशमुख यांचे पिस्टलचा धाक दाखवून बुधवारी अपहरण करण्यात आले. बाबा पेट्रोलपंपाजवळील म्हाडा कॉलनी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी शुक्रवारी एका आरोपीला अटक करण्यात आली.

सिल्लोड येथील तौसीफ मुनीर देशमुख यांनी नोव्हेंबर महिन्यात सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिराच्या कमानीजवळ 'देशमुख बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' नावाने कार्यालय सुरू केले. त्यांनी शेख सुलतान शेख सांडू, फजलभाई व शेख सलीम शेख लाल यांच्यासोबत दोन हजार स्क्वेअर फुटाचे सहा प्लॉट भागीदारीत खरेदी केले. खासगी व्यक्तीकडून ‌कर्ज घेऊन घरांचे बांधकाम केले. मात्र, मध्यंतरी सातारा परिसरात शासनाने अतिक्रमण हटावची मोहीम राबविल्याने त्यांच्या घराची विक्री झाली नाही. देशमुख यांच्या नावावर कर्ज होते. त्यांच्या भागिदारांनी देखील त्यांच्या योजनेतून अंग काढून घेतले. देणेदारांनी कर्जाच्या पैशासाठी देशमुखकडे तगादा लावला. काही मालमत्ता विकून देशमुख यांनी कर्ज फेडले. मात्र, काही जणांचे कर्ज बाकी होते. देशमुख यांनी पत्नी व मुलांना सासरी म्हाडा कॉलनीत सोडून देणेदारांच्या भीतीने ते बाहेरगावी गेले होते.

दरम्यान, देशमुख बुधवारी पत्नी व मुलांना भेटण्यासाठी आले. यावेळी रऊफ वहाब पटेल (रा. बीड बायपास), नफीज रिक्षावाला व रफीक टपरीवाला यांनी त्यांचे अपहरण केले. टाटा सफारीमध्ये त्यांना पडेगाव येथील कत्तलखान्याच्या मागे असलेल्या फार्महाउसवर नेण्यात आले. झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. तसेच पिस्टलचा धाक दाखवून दोन दिवसांत पाच लाखांच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली. गयावया केल्यानंतर देशमुख यांना पुन्हा बाबा पेट्रोलपंप येथे सोडण्यात आले.

एक गजाआड; पसार आरोपींचा शोध सुरू

देशमुख यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत हा प्रकार सांगितला. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हेशाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी रऊफ पटेलला सापळा रचून म्हाडा कॉलनीतून अटक करण्यात आली. त्याच्या दोन पसार साथीदारांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...मग आमच्याकडे पाठ का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रेल्वेस्टेशनला बगळयांची घरटी उद्धवस्त झाली. सगळे शहर मदतीसाठी धावले. इकडे आमचीही घरे पाडली. गेल्या पाच दिवसांपासून आम्ही रस्त्यावर आलो. मात्र, आमच्याकडे पाठ का,' अशी आर्त हाक पहाडसिंगपुऱ्यातल्या रहिवाशांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत घातली. सोमवारपर्यंत भूमाफियावर गुन्हे दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

सोमवारी महसूल विभागाच्या कारवाईने रेणुकामातानगर व ताजमहल कॉलनी परिसरातील १०४ कुटुंब उघड्यावर आली. शुक्रवारी या रहिवाशांनी पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली. घराची रजिष्ट्री, मनपाचा कर तसेच विद्युत मीटर असे सगळे अधिकृत असताना आम्हाला घराबाहेर का काढले, त्यावेळी सबंधित जमीन मालक व शासकीय यंत्रणा झोपली होती का, असा प्रश्न शारदाबाई शिंदे, पंचशीला खोब्रागडे यांनी केला. पाच दिवसांपासून एका कपड्यावर आहे. मुले रडत आहेत. भीक मागून खावे लागते.

मुलांची दप्तरे घरामध्ये अडकल्याने मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. जमीनमालकाने ही जागा वादग्रस्त आहे, अशी पाटी पूर्वीच लावली असती तर आम्ही जागा घेतली नसती. जीव गेला तरी चालेल मात्र, घरासमोरून हलणार नाही असा इशारा सुनिता वैष्णव यांनी दिला. या भागातील रहिवासी रामदास ढोले, सचिन शिंदे आदींनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

भाकपचा आज मोर्चा

पहाडसिंगपुऱ्यातल्या बेघर रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पैठणगेटपासून निघणाऱ्या या मोर्चात बेघर रहिवासी सहभागी होणार आहेत. कोर्टाच्या आदेशात तहसीलदारांनी या प्रकरणी ताबा घेण्यापूर्वी सबंधित रहिवाशांची बाजू ऐकूण घ्यावी असा उल्लेख आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात मागणी करणार असल्याची माहिती अॅड. अभय टाकसाळ यांनी दिली.

रहिवाशांचे जबाब

आर्थिक गुन्हेशाखेकडे पहाडसिंगपुरा प्रकरणी अनेक रहिवाशांनी तक्रार अर्ज दाखल केले आहेत. या तक्रारदारांपैकी सात जणांचे जबाब शुक्रवारी नोंदवण्यात आले. यामध्ये त्यांनी जमीन कोणाकडून विकत घेतली, खरेदीखत कसे केले, नोटरी आहे का, रजिस्ट्री, सातबाऱ्यावर उल्लेख आहे का, आदी माहिती घेण्यात आली. दोन दिवसांत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बसते पंगत

पहाडसिंगपुऱ्यातील नागरिकांना अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर काढले. अन्न, पाण्याची वनवन गेल्या पाच दिवसांपासून सुरू होती. मात्र, नागरिकांनी मदतीचा हात पुढे केल्याने ही वणवण थांबली. पुरीभाजी, खिचडीची मदत नागरिकांनी केली. पाण्याचे टँकर सुरू झाले. भाकपने कपड्यांची मदत केली. जयसिंगपुरा येथील एका दानशुराने दोन वेळेस पोळीभाजीची व्यवस्था केली आहे. वडाच्या झाडाखाली सार्वजनिक पंगत बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या बदलीची मागणी

$
0
0

पदाधिकाऱ्यांचे सीएमना साकडे

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांची बदली करण्याची मागणी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या या पत्रामुळे आयुक्त आणि पदाधिकारी असा वाद येत्या काळात रंगण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, गटनेते रेणुकादास वैद्य, भगवान घडमोडे, गजानन बारवाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन कार्यालयात नियमित उपस्थित नसतात. त्यामुळे कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. महापालिकेतील सर्वोच्च सभागृह असलेल्या सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आयुक्तांनी करणे अपेक्षित आहे, पण सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आयुक्तांकडून केली जात नाही. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. आयुक्तांचे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही.

औरंगाबाद शहराचा समावेश स्मार्ट सिटी अभियानात झाला असून, महापालिकेस या योजनेत आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी कार्यक्षम अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. विकासात खंड पडू नये व स्मार्ट सिटी योजनेत अंतिम यादीत निवड होण्यासाठी महापालिकेचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे महाजन यांची बदली करून त्यांच्या जागी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.

वाद कशामुळे...

सर्वसाधारण सभेने घेतलेले निर्णय आमलात आणले जात नाहीत. मालमत्ता करावर २४ टक्के व्याज आकारणीला तूर्त स्थगिती देण्याच्या आदेशाचीही अंमलबजावणीही आयुक्तांनी केली नाही. महापौरांनी आयोजित केलेल्या बैठकांना आयुक्त गैरहजर राहतात. पूर्वकल्पना न देता बाहेरगावी जातात, असे आक्षेप पदाधिकाऱ्यांनी घेतले आहेत. त्यातच उपमहापौर प्रमोद राठोड यांच्याबरोबर आयुक्तांची झालेली शाब्दिक चकमक हा देखील वादाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा हिंगोलीलाही दगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरवर्षी हमखास पाऊस पडतो, अशी ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्याकडेही यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. उर्वरित पावसाळाही कोरडा केल्यास जिल्ह्यातील १०२ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासनाने सरकारकडे निधीची मागणी केली आहे.

औंढा नागनाथ, वसमत तालुक्यांत दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. मराठवाड्यात परतीचा हमखास पाऊस होतो, मात्र यंदा पावसाचे एकुणच चित्र पाहता पाऊस झाला नाही तर जिल्ह्यामध्ये तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, विंधनविहिरी, टँकरसाठी हा निधी खर्च करावा

लागणार आहे. हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी दमदार पाऊस होतो. खात्रीशीर पावसाचा जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा ३ लाख ६८ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या. यातील बहुतांश क्षेत्र हे सोयाबीनचे आहे, मात्र पावसाच्या मोठ्या खंडामुळे या पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निकषाप्रमाणे संभाव्य आराखडा तयार केला आहे. पेरणी क्षेत्रापैकी ३३ टक्के नुककसान झालेल्या कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ६८००, बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये भरापाई दिली जाते. यानुसार ६९ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार ९० हजार ७९८ हेक्टर ११ आरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वसमत तालुक्यातील ६ मंडळे व कळमनुरी तालुक्यातील २ मंडळांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तेथे येत्या काही दिवसात परिस्थ‌िती बिकट होण्याची शक्यता आहे.

पावसाची अशीच स्थिती राहिली तर जिल्ह्यातील १०२ गावांत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यावर मात करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी शासनाकडून ९ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

- प्रवीण फुलारी, निवासी, उपजिल्हाधिकारी, हिंगोली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत शिक्षक ‘दीन’

$
0
0

गेल्या वर्षीचे पुरस्कार रखडले; यंदा प्रस्ताव नाही

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका शाळेतील शिक्षक अक्षरशः 'दीन' झालेत. उद्या ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन. सगळीकडे तो उत्साहाने साजरा होईल. पालिकेने मात्र त्याबाबत कसलिही तयारी केली नाही. या वर्षीचे सोडाच गेल्या वर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण अद्याप रखडले आहे. त्यामुळे यंदा एकाही शिक्षकाने या पुरस्कारासाठी प्रस्तावही पाठवला नाही. त्यामुळे या स्मार्ट पालिकेचा शिक्षक दिन उद्या जाहीरपणे साजरा होण्याची शक्यता तशी कमीच.

महापालिकेच्या ७७ शाळा. या शाळांमधून सुमारे ५५० शिक्षक अध्यापन करतात. शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांचा यथोचित सन्मान करण्याची प्रथा महापालिकेत आहे, पण गेल्या वर्षीपासून त्यात खंड निर्माण झाला. पुरस्कारासाठी पाच शिक्षकांची निवड करण्यात आली, पण अद्याप त्यांना हा पुरस्कार दिला नाही. पुरस्कार देण्याबद्दल प्रशासनाची अनास्था लक्षात आल्यामुळे शिक्षकांनी यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्तावच पाठवले नाहीत. त्यामुळे यंदाही पुरस्कार वितरण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रशासनाने शिक्षक दिन साजरा करण्याचे नियोजन केले नाही. शाळांमधून विद्यार्थ्यांनीच शिक्षक दिन साजरा केला तर, शिक्षकांचा सन्मान होऊ शकतो. अन्यथा त्यापासूनही शिक्षकांना वंचित राहावे लागेल.

शिक्षक दिन साजरा करण्याबाबत शिक्षण सभापती शिवाजी दांडगे यांनी शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा होऊ शकत नाही, असे कर्मचाऱ्यांनी दांडगे यांना सांगितले.

१७ सप्टेंबर रोजी वेगळा कार्यक्रम शिक्षक दिनाच्या निमित्याने साजरा करता येईल, असे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार होत नसल्याबद्दल दांडगे यांनी नाराजी व्यक्त केली. पाच सप्टेबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो, हे माहिती असताना शिक्षण विभागाने कार्यक्रमाचे नियोजन करायला हवे होते, असे मत दांडगे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एका उचकीने मोडला संसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अहो मला लागली कुणाची उचकी', या गाण्याने एकेकाळी धमाल उडवून दिली. अशीच धमाल आणखी एका उचकीने उडवलीय. हो खरेच, पत्नीला पाहिले की त्याला उचकी लागते. नाना उपचार केले मात्र, उचकी थांबली नाही. शेवटी त्याने कंटाळून पत्नीलाच सोडले. गेल्या तीन वर्षांपासून माहेरी असणाऱ्या महिलेने न्याय मिळावा म्हणत शुक्रवारी ग्रामीण पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. आणि अचंबित करणारा प्रकार समोर आला.

अनेकांचे संसार दारू, संशय, कुरबुरीमुळे विस्कटतात. हे धागे जुळवण्याचे काम महिला तक्रार निवारण केंद्र करते. आज त्यांच्यासमोर उचकीमुळे संसार मोडल्याची तक्रार एका पत्नीने केली, तेव्हा केंद्रातले अधिकारीही हैराण झाले. कलावतीचे (नाव बदलले आहे) तीन वर्षांपूर्वी कैलासशी (नाव बदलले आहे) लग्न झाले. दोघेही शिक्षित. लग्नानंतर काही दिवस सुखाचा संसार झाला. अन् कैलासच्या उचकीमुळे या सुखात मिठाचा खडा पडला. पत्नीला पाहाताच उचकी लागते, अशी तक्रार कैलास करू लागला. त्यामुळे कलावतीही भांबावून गेली. नंतर तक्रारीचा पाढा वाढलाच. शेवटी कैलासने पत्नीला माहेरी सोडले. या प्रकारामुळे माहेरकडील मंडळीही हैराण झाली. मुलींचा संसार सुखाने व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, तुमच्या मुलीला पाहताच उचकी लागते. थांबत नाही, अशी तक्रार कैलासकडून वारंवार होऊ लागली. पत्नी समोर नसल्यास तो नियमित काम करतो, असा दावाही त्याच्या वडिलांनी केला. यावर उपचार म्हणून दोन्हीकडील मंडळींनी कैलासला नाना डॉक्टरांकडे नेले. देवधर्म झाले. मात्र, तीन वर्षानंतरही काही केल्या फरक पडला नाही. शेवटी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कलावतीने कंटाळून थेट पोलिस तक्रार निवारण केंद्राकडे मदतीसाठी धाव घेत आपली कैफियत मांडली. आता दोघांना समोरासमोर बसवून मार्ग काढण्याचे प्रयत्न केंद्राच्या प्रमुख राजश्री आडे, रेखा माळी, उज्ज्वला क्षीरसागर आदींनी सुरू केलेत.

सर्व रिपोर्ट नॉर्मल

कैलासला कान, नाक, घसा तज्ज्ञांकडे दाखविण्यात आले. मात्र, सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी योग्य चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

केंद्रातही 'ती' आली

या जोडप्याला शुक्रवारी केंद्रात बोलविण्यात आले. त्यावेळी कलावतीने चेहरा कपड्याने बांधून ठेवला. कैलासला ती केंद्रात असल्याचे माहत नव्हते. तोपर्यंत तो शांत होता. मात्र, काही वेळाने त्याने पत्नीला ओळखताच, अचानक त्याची उचकी सुरू झाली.

मला पाहताच त्यांना उचकी लागते कशी? यावर विश्वास कसा ठेवू? उपचाराने सर्व काही बरे होऊ शकते. मी पतीसोबत वेगळ्या ठिकाणी राहण्यास तयार आहे.

- कलावती, पीडित महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ लाख न भरल्याने ३७ कोटी गेले परत!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचा ३५ लाखांचा हिस्सा वेळेवर भरला नसल्याने ३७ कोटी १४ लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत गेल्याची माहिती उघड झाली आहे. हा निधी परत गेल्यामुळे अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबांना खासगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देणे आता महापालिकेला शक्य होणार नाही.

महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेंतर्गत राज्यातील नागरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबाना खासगी नळजोडणी व वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १४ फेब्रुवारी २०१४ रोजी निवडलेल्या २३ शहरांत औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आला. ९७२ खासगी नळजोड, १११६ वैयक्तिक शौचालय, १५१०९ नळ जोडणी व वैयक्तिक शौचालय यासाठी शासनाने औरंगाबाद महापालिकेला ३७ कोटी १४ लाख रुपये मंजूर केले. ही रक्कम मिळण्यासाठी महापालिकेला शासनाकडे ३५ लाख रुपये भरायचे होते. ही रक्कम महापालिकेने वेळेत भरली असती तर, ३७ कोटी १४ लाख रुपये महापालिकेला मिळाले असते, पण महापालिकेने ३५ लाख रुपये न भरल्यामुळे मोठी रक्कम शासनाकडे परत गेली, असे नगरसेवक नितीन चित्ते यांनी पत्रकारांना सांगितले.

ही रक्कम महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे भरणे गरजे होते. यासंदर्भात १४ जुलै २०१५ रोजी मुख्यसचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापालिकेला कल्पनाही दिली होती. त्यावेळी चार दिवसांत पैसे भरण्याची तयारी महापालिकेने दाखविली होती, पण प्रत्यक्षात २९ जुलै रोजी शासनाकडे चेक पाठविला. तो २९ ऑगस्टपर्यंत वटलाच नाही. त्यामुळे शासनाला महापालिकेचा हिस्सा मिळू शकला नाही. परिणामी शासनाने ३७ कोटी १४ लाख रुपये महापालिकेला न देता ते परस्पर परत घेतले, असे चित्रे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोहळ्याचा डामडौल टाळून शेतकरी कुटुंबाला मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षकाचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम झाले. मराठवाड्यात यंदा गंभीर दुष्काळ आहे. हजारो शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. दुष्काळाचे सामाजिक भान ठेवत सोनामाता बालक मंदिरच्या शिक्षकांनी एका आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांस २५ हजारांची आर्थिक मदत देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.

सिडको एन -नऊ येथील सोनामाता बालक मंदिरच्या शिक्षकांची ३१ ऑगस्ट रोजी बैठक झाली. शिक्षक दिनानिमित्त राबवायच्या उपक्रमांची चर्चा झाली. ज्येष्ठ शिक्षक रावसाहेब चव्हाण यांनी सर्वांसमोर प्रस्ताव मांडला. मराठवाड्यात यंदा पाऊस न झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. सततच्या नापिकीमुळे हजारो शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण यंदाचा शिक्षक दिन उत्साहात साजरा न करता काही रक्कम जमा करून ती एखाद्या गरजू कुटुंबाला द्यावी, हा तो विचार. संस्थाध्यक्ष विमल तळेगावकर यांना ही कल्पना खूप आवडली. सर्व शिक्षकांनीही मनापासून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

पुढचा टप्पा होता तो कुटुंब निवडण्याचा. चव्हाण सरांनी कृषी अधिकारी ठोंबरे यांना संपर्क साधून माहिती मिळविली. औराळी (ता. कन्नड) येथील निवृत्ती गायकवाड यांनी महिनाभरापूर्वी आत्महत्या केली. दोन एकर कोरडवाहू शेती, गावात पत्र्याचे छोटे घर, दोन लहान मुले अशी गायकवाड कुटुंबीयांची अवस्था आहे. या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना थोडीफार आर्थिक मदत केली तर थोडा आधार देता येईल, अशी सोनामाता शाळेच्या शिक्षकांची भावना होती. कार्यक्रमासाठी लागणारी रक्कम जमा झाल्यावर त्यात २५ शिक्षकांनी आपापले योगदान दिले आणि २५ हजारांची रक्कम जमा झाली.

शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रम आटोपून मुख्याध्यापक उर्मिला श्रॉफ यांच्यासह सर्व शिक्षक मंडळी औराळीला गेले. गावकऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. सरपंच आणि सर्व मंडळी गायकवाड यांच्या घराजवळ जमली. शिक्षकांनी गावकऱ्यांच्या साक्षीने आर्थिक मदत गायकवाड कुटुंबीयांना सुपूर्द केली. शिक्षकदिनाच्या निमित्ताने दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवणाऱ्या या शिक्षक मंडळींनी नवा आदर्श निर्माण करून दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबिकानगरात माजी सैनिकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा विमानतळ येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका माजी सैनिकाचा अंबिकानगर येथे राहत्या घरी खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेपासून त्यांची दुसरी पत्नी बेपत्ता असून या हत्येमागे तिचाच हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

संपत शंकर खंडागळे (५८, रा. गल्ली नं. चार, अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे त्या दुर्देवी व्यक्तीचे नाव आहे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर खंडागळे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. मुला-मुलींचा विरोध पत्करुन खंडागळे त्यांनी २००७ मध्ये दुसरा विवाह केला. या विवाहानंतर खंडागळे यांनी रामनगरातील स्वताचे घर मुलांना दिले.

लष्करातील नोकरीतून निवृत्त झाल्यापासून ते चिकलठाणा विमानतळावर सुरक्षारक्षक म्हणून काम करू लागले आणि दुसरी पत्नी कमल हिच्यासोबत अंबिकानगरात किरायाने खोली घेऊन ते राहत होते. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी त्यांनी विमानतळावरील सुरक्षारक्षकाची नोकरी देखील सोडली होती.

दरम्यान, कुलुप बंद असलेल्या त्यांच्या घरातून मोठी दुर्गंधी येत होती. ही बाब समजताच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाथा जाधव, पोलिस उप निरीक्षक कल्याण शेळके, शेख हारुण यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ आणि प्रशांत आवारे व पथकाने घटनास्थळी घाव घेतली. पोलिसांनी कुलुप तोडून घरात प्रवेश केला असता संपत खंडागळे यांचा खून झाल्याचा समोर आले.

खंडागळे यांचा वायरने गळा आवळण्यात आला, चेहरा रॉडने वार करुन विद्रूप करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा खून दोन ते तीन दिवसापूर्वी करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या तीन दिवसापासून खंडागळे यांची दुसरी पत्नी कमल राजपूत ही पसार असून तिचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास मुकुंदवाडी पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या बॅटरी खरेदी करणाऱ्यास कोठडी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

मोबाइल टॉवरमधील चोरीच्या २० बॅटरी खरेदी करणाऱ्या दोन भंगारवाल्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनिषा कुलकर्णी यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यांनी १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

चिकलठाणा परिसरातील हिरापूरी शिवारा मोबाइल कंपनीचे टॉवर आहे. त्या टॉवरखाली असलेल्या इन्व्हेटरमधील बॅटऱ्या खराब झाल्याने त्या ठिकाणी २५ ऑगस्ट २०१५ रोजी २० नवीन बॅटऱ्या लावण्यात आले. त्या बॅटऱ्या लावून गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी चोरट्याने त्या सर्व बॅटऱ्या चोरुन नेल्या असल्याची तक्रार विनोद प्रभाकर चव्हाण यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांच्या पथकाने मंजूर रसुल पिंजारी व रोशन शहा या दोघांना अटक केली. त्या दोघांनी बॅटरी चोरी केली असल्याची कबुली दिली. त्या बॅटऱ्या नाशिक येथील भंगारवाला योगेश आनंद जाधव, गजानन रामदास दांगट या दोघांना विकल्या असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री त्या दोघांना नाशिक येथून पकडून आणले. त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनिषा कुलकर्णी यांच्या समोर हजर करण्यात आले. तपास करावायचा असल्यामुळे पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती सरकारी वकील रूपाली मेतकेवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images