Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तलाठी महिलेच्या छळप्रकरणी मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

तलाठी महिलेचा शारीरिक, मानसिक छळ करण्याचा आरोप असलेले अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि देगलूरचे तहसीलदार जीवराज डापकर जामिनावर सुटल्याने बहुजन समाज पक्षाच्या महिला आघाडीतर्फे मंगळवारी जिल्हा कचेरीवर मोठा मोर्चा काढला. पोलिस निरीक्षक उगलेंना सहआरोपी करण्याची मागणी या वेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व नगरसेविका अंजलीताई गायकवाड यांनी केले.

देगलूर येथील तलाठी महिलेचा तहसीलदार जीवराज डापकर व नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चार महिने छळ केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या महिलेने दोघांविरुद्ध देगलूरच्या पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. परंतु, पोलिस निरीक्षक शरद उगले यांनी या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. सामाजिक दबाव वाढल्याने गुन्हा दाखल केला, तरी या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. परंतु, या दोघांवर साध्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यातच अवघ्या काही मिनिटांत जामीन मिळाला. या प्रकरणाचा निषेध करून बहुजन समाज पक्षाच्या महिला आघाडीतर्फे मंगळवारी मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून निघालेला हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. या दोघांवर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, या दोघांना सहकार्य करणाऱ्या उगलेंना सहआरोपी करावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी काकानी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

परतीच्या पावसाने लातूर जिल्ह्याला दिलासा दिला असून पुरेसा नसला, तरी धरणात पाणीसाठा होऊ लागला आहे. सोमवारी दिवसभर जिल्ह्यात जळकोट वगळता सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

या पावसामुळे लातूर आणि उस्मानाबाद, बीड जिल्ह्याला पाणीपुरवठा होत असलेल्या धनेगाव इथल्या मांजरा धरणाचा पाणीसाठा आता ०.४ दशलक्षघनमीटर इतका झाल्याची माहिती जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. बी. करपे यांनी दिली. या साठ्यामुळे किमान दहा दिवसांचा तरी पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा १.२ दशलक्षघनमीटर इतका झाला असल्याचे करपे म्हणाले.

मांजरा आणि तावरजा नदीवर बांधण्यात आलेल्या नऊ बॅरेजेसपैकी लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ बॅरेजमधे दीड मीटर, निलंगा तालुक्यातील डोंगरगाव बॅरेजमध्ये अडीच मीटर इतका पाणी साठा असल्याची माहिती उपअभियंता प्रकाश फंड यांनी दिली. मंगळवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यामध्ये सरासरी २५९.९८ मिमी पाऊस झाला आहे.

जालन्यात पाऊस

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने मुक्काम वाढवला. सोमवारी सायंकाळी सहानंतर जाफराबाद तालुका वगळता जिल्ह्यात इतर सर्व ठिकाणी चांगला पाऊस झाला. सर्वाधिक ३५.४० मिमी पाऊस

परतूर तालुक्यात झाला आहे. जिल्ह्याच्या एकूण अपेक्षित सरासरीच्या ४४.३६टक्के पाऊस झाला आहे. खरिपातील कापूस, सोयाबीन आणि मका यांना उपयुक्त तर रब्बीच्या पिकांची आशा वाढवण्यास या पावसामुळे मोठी उमेद मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या १५ मिनिटांत त्याने गमावला जीव

0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

पंढरपूर येथे बसची वाट पाहत थांबलेल्या एका प्रवाशाने तवेरा गाडीत बसून जाण्याचा घेतलेला निर्णय जीवावर बेतला. अवघ्या पंधरा मिनिटात त्याचा अपघातात मृत्यू झाला. औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावरील जिकठाण फाट्याजवळ सोमवारी (७ सप्टेंबर) रात्री झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले आहेत. ‌

दौलताबाद येथील फळविक्रेते सोमवारी रात्री आपल्या तवेरा मोटारीतून (एम.एच.२०, ए.एस. ४०८९) पुण्याकडे जात होते. मोटारीत जागा मोकळी असल्याने पंढरपूर येथील तिरंगा चौकातून पुण्याकडे जाणाऱ्या भोलेश्वर दरोगाप्रसाद यादव (वय ३२, रा. बिहारए ह.मु. साउथ सिटी, सिडको) याला घेतले. तवेरा मोटार रहीमपूर फाट्याजवळ पोहोचल्यानंतर विरुद्ध दिशेने येणारी स्विप्ट कार येऊन धडकली. या अपघातात तवेर मोटारीतील शेख मोहसीन सेख मुसा (वय ३०) शेख माजीद शेख रहेमान (वय ४५, दोघेही रा. दौलताबाद) व पंढरपूर येथून बसलेला प्रवासी ठार झाले. स्विप्ट कारमधील पोलिस कॉन्सटेबल भगवान भिका दुबे (वय ३२, रा. गंगापूर) सय्यद महेबूब सय्यद इस्माईल (वय ३६, रा. गंगापूर) व अशोक पोपटराव थोरात (वय ४५, रा. टीव्ही सेंटर, औरंगाबाद) हे ठार झाले. तवेरा कारमधील चांद खॉ अहेमद खान (वय ३६, रा. दौलताबाद) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात चाँद खॉ यांच्या फिर्यादीवरून पोलिस बसलेल्या स्विप्ट कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आतील कडी काढून मोबाइल, रोख लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

दाराची आतून लावलेली कडी काढून चार मोबाइल फोन व रोख ५ हजार ८०० रुपये लंपास करण्यात आले आहेत. या चोऱ्या सोमवारी (७ सप्टेंबर) रात्री साडेअकरा ते दोन यावेळेत झाल्या. चोरीची माहिती मिळाल्यानंतर गस्तीपथकाने एकाला संशयावरून अटक केली आहे.

शहरातील कमान मोहल्ला येथील सय्यद शौकत अली सय्यद अकबर यांचा मुलगा सय्यद मुजफ्फर सय्यद शौकत अली (वय २३) याला चोराचा धक्का लागल्याने त्याला जाग आली. घरातून कोणीतरी अनोळखी व्यक्ती जातांना दिसल्याने शौकतअली याने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण ती व्यक्ती अंधारात गल्ली बोळातून गायब झाली. शौकतअली यांनी घरी जाऊन पाहिले असता चार्जिंगला लावलेले दोन मोबाइल, शर्टच्या खिशातून ९०० रुपये चोरी झाल्याचे लक्षात आले. गल्लीतील इतरांना आवाज देऊन उठवून चोरीची माहिती दिली.

जुना स्टेट बँक हैदराबाद रोडवरील मोहंमद अकील मोहंमद शफी यांच्याही घरी दरवाजाच्या फटीतून आतील कडी उघडून पँटच्या खिशातील ४ हजार ९०० रुपये रोख व दोन मोबाइलची चोरी करण्यात आली. या घटनांची माहिती मिळाल्यानंतर गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, वाहनचालक पवार, पोलिस नाईक नाडे यांच्या पथकाने एकाला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमध्ये अतिक्रमणावर हातोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

येथील पिशोर रोडवरील भीमनगरमधील ३५ घरांचे अतिक्रमण नगर पालिकेने मंगळवारी (८ सप्टेंबर) जेसीबीने काढले. ही कारवाई मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरून करण्यात आली. या कारवाईमुळे २४ मीटरचा नरसिंगपूर रस्ता मोकळा झाला आहे.

शहरात गेल्या आठवड्यापासून अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या आठवड्यात जुन्या बसस्थानकाच्या जागेवरील व महामार्गावरील १०० फुटातील अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर पालिकेने मंगळवारी भीमनगरमधील अतिक्रमण काढले आहे. भीमनगरमध्ये मार्किंग केलेल्या ठिकाणच्या रहिवाशांना सोमवारी (७ सप्टेंबर) सायंकाळीच घरे मोकळी करण्याचे बजावण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास टेलिफोन भवनासमोरील नरसिंगपूर रस्त्याच्या जागेवरील पक्क्या घरांचे अतिक्रमण काढण्यात आले. येथील रहिवाशांकडे जागेचा पुरावा नसल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. ही वस्ती सुमारे २५ वर्षापूर्वी वसली आहे. ही कारवाई मुख्यधिकारी संतोष आगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या ठिकाणी कन्नड, खुलताबाद, पिशोर व देवगाव रंगारी पोलिस ठाण्यातून कुमक मागवण्यात आली होती. दरम्यान, घरातील संसारोपयोगी साहित्य हलविण्याशिवाय आमच्याकडे काहीही पर्याय नाही. नगर पालिकेने पुनर्वसन करावे, असे मत येथील रहिवासी जितेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काडतुसांसह आणखी एक कट्टा हस्तगत

0
0

म.टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केलेल्या कर्तारसिंग लक्ष्मीनारायण लोदी याच्या ताब्यातून आणखी एक देशी कट्टा व सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान त्याला कोर्टाने गुरुवारपर्यंत (१० सप्टेंबर) पोलिस कोठडी सुनावली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात देशी कट्टा विकणाचा प्रयत्न करणाऱ्या कर्तारसिंग याला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्या झडतीत एक गावठी कट्टा सापडला. पोलिसांनी मंगळवारी कसून चौकशी केल्यानंतर सहा जिवंत काडतुसासह आणखी एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

0
0

अंबाई येथील घटना; पाच आरोपी गजाआड

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा परिसरातील सुंदरवाडी भागात युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना असाच प्रकार सिल्लोडनज‌िक घटांब्री जंगल परिसरात घडला. अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवीयन मुलीवर गुरुवारी सामूहिक बलात्कार करण्यात आला. अजिंठा पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना गजाआड केले आहे.

पीडित मुलगी अल्पवयीन आहे. तीन सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अंभई (ता. सिल्लोड) येथे ती कॉलेजात जात होती. तेव्हा मनोज पुंजाराम मघाडे (वय २१) व समाधान रामराव भोटकर (दोघे रा. हट्टी फाटा, ता. सिल्लोड) यांनी ओळखीचा फायदा घेत पीडित मुलीस कॉलेजात सोडतो अशी थाप मारत तिला दुचाकीवर बसविले. मात्र, तिला कॉलेजला न सोडता घटांब्री जंगलात नेले. तेथे मनोज मघाडे याने तिच्यावर बलात्कार केला, तर समाधान याने पाळत ठेवली.

हा प्रकार परिसरातून जाणाऱ्या शाहरुख पठाण ( वय २२), इम्रान खान (वय २३), आणि रिक्षाचालक इम्रान शेख (वय २३) यांच्या नजरेस आला. त्यांनी मोबाइलवर हा प्रकार चित्रित केल्याचे सांगत पैसे द्या, अन्यथा मुलीसोबत गैरकृत्य करू, असे धमकावले. तसेच मनोजकडील मोबाइल व पाचशे रुपये हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही गटात हाणीमारी सुरू झाली. हा प्रकार घडत असतानाच संधी पाहून पीडित मुलीने पळ काढला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका जागरुक नागरिकाच्या मदतीने घर गाठले.

बदनामीच्या भीतीपोटी पीडित मुलीने पालकांना माहिती दिली नव्हती. मात्र, नंतर हा प्रकार समजताच तिच्या पालकांनी अजिंठा पोलिसाकडे धाव घेतली. अजिंठा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा मनोजसह त्याला मदत करणाऱ्या समाधानविरुद्ध बलात्काराचा, तर शाहरुख, इम्रान खान व शेख या तिघांवर मुलीवर अत्याचार करू देण्यासाठी दबाव टाकणे, जबरीने पैसे हिसकावणे या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पाचही आरोपींना पकडण्यात आले असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तूर्त पाणी कपात नाही; बांधकामाचे पाणी बंद’

0
0

औरंगाबाद : शहराच्या पाणी कपातीचा विचार तूर्ततरी महापालिकेच्या समोर नाही, पण बांधकामांसाठी पाणी देणे महापालिकेने बंद केलेले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली.

पाऊस कमी पडल्यामुळे मुंबई, पुणे या शहरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील पाणी कपातीसंदर्भात पालिकेचे प्रशासन काही विचार करीत आहे याची विचारणा 'मटा' ने केली. ' सध्या औरंगाबाद शहरात तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे पाणीपुरवठ्यात अगोदरच कपात झालेली आहे, त्यात अधिक कपात करण्याचा विचार नाही, पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकारी याबद्दल योग्य निर्णय घेतील. सध्या तरी आहे त्या परिस्थितीत पाणीपुरवठा सुरू आहे. बांधकामासाठी पाणी देणे महापालिकेने गेल्यावर्षीपासूनच बंद केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रक‌ विक्रीत केली फसवणूक

0
0

औरंगाबादः बोरगाव बाजार (ता. सिल्लोड) येथील शेख सादेक शेख नवाब यांनी जून २०१३मध्ये श्रीराम फायनान्स कंपनीतून कर्ज काढून ट्रक खरेदी केला. यावेळी जयदीपसिंग अटवाल (रा. पडेगाव), गायकवाड व शेख जावेद खुद्दुबोद्दिन यांच्याशी त्यांचा व्यव्हार झाला होता. यांनी कराराचे पालन केले नाही, अशी तक्रार शेख नवाब यांनी केली. त्यावरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

हुंड्यासाठी छळ

सिंधी कॉलनी, नाथनगर येथील प्रीशा उर्फ मीना प्रीतेश भूकमारिया या विवाहितेचा माहेरहून सात लाख रुपये आणण्याची मागणी करीत छळ करण्यात आला. याप्रकरणी प्रीशाच्या तक्रारीवरून आरोपी प्रीतेश खंडेलवाल, कामिनी व ओमप्रकाश खंडेलवाल (सर्व रा. आग्रा रोड, धुळे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जखमी महिलेला ५० हजारांची भरपाई

0
0

औरंगाबाद : पुतण्याला घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या महिलेस जखमी करणारा आरोपी अंकुश शिंदे याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. जी. उपाध्ये यांनी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देत कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. या प्रकरणी वनीता राजेंद्र तोमर (रा. बोरजवळा, ता. खामगाव, ह. मु. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादी महिला ९ मे २०१३ रोजी रस्ता ओलांडत असताना आरोपी अंकुश शिंदे हा दुचाकीवरून (एमएच-३७, डी १९१८) भरधाव वेगाने आला व त्याने महिलेस जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी महिलेच्या पोटरीला मार लागून हाड फ्रॅक्चर झाले, डोक्यालाही मार लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बॅँकांनी अश्रू पुसले

0
0

dhananjay.kulkarni@timesgroup.com

औरंगाबादः शेतकरी, दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यात सहकारी बँका राष्ट्रीयकृत बॅँकांपेक्षा कितीतरी पट अग्रेसर आहेत. सीएसआर फंडातून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी) मराठवाड्यात सुमारे १ कोटीहून अधिकची कामे करत, त्यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर मारली आहे.

देवगिरी सहकारी बँक आणि लोकविकास सहकारी बँकेने याकामी पुढाकार घेतला आहे. देवगिरी बँकेला सन २०१४-२०१५ला सुमारे ८ कोटी ३१ लाखांचा निव्वळ फायदा झाला. त्यापैकी बँकेने सुमारे ५९ लाख ७८ हजार रुपये सीएसआर अॅक्टिव्हिटी म्हणून खर्च केले. या निधीतून औरंगाबाद जिल्ह्यातील १४ ठिकाणी जलयुक्त शिवार, शिरपूर पॅटर्न आणि गावातील शेतकरी वर्गाला मदत केली. शेतकरी व सभासदांचा विमा उतरवणे, पीडित शेतकरी वर्गाला साहित्य व आर्थिक मदत करणे या स्वरुपाची मदत ‌लोकविकास बँकेने त्यांच्या सोशल फंडातून केली. लोकविकास बँकेला २०१४-१५मध्ये सुमारे ५९ लाखांचा फायदा झाला. यातून त्यांनी या वर्षी ३ लाखापर्यंतची मदत केली. या दोन बँकांव्यतिरिक्त शहरात ८ सहकारी बँका असून त्यांनीही त्यांच्या सोशल फंडातून रक्तदान शिबिर, प्रशिक्षण वर्ग, वॉटर प्युरिफायर वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप आणि ग्रामीण भागात मदत केली. तो आकडा २ ते ३ लाखांपर्यत आहे. काही ठिकाणी सहकारी बँकांचे संचालक मंडळ मदत करत आहेत.

'डीसीसी'कडे सीएसआर नाही

ज्या बँकेवर ग्रामीण जनता अवलंबून आहे, त्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडच नाही. बँकेने अशा पद्धतीतील कुठलाच फंड समाजोपयोगी कामासाठी ठेवला नसल्याचे बँकेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. तरीही शेतकरी वर्गाला फक्त ६ टक्के व्याजदराने पीककर्ज देणारी ही एकमेव बँक आहे.

संघ परिवारातील बँकांचे सहकार्य

ठाणे जनता, डोंबिवली जनता, जनता सहकारी बँक, अकोला अर्बन बँक यांच्यासह शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या ९ सहकारी बँकांना सुमारे ४० लाखांचा वार्षिक फायदा त्यांच्या औरंगाबाद शाखेकडून झाला. त्यांनीही सोशल अॅक्टिव्हिटीजसा‌ठी वेगळा फंड तयार केला आहे. शहर व ग्रामीण भागात त्यातून जवळपास आकडा २० ते ३० लाखांची रक्कम समाजकार्यात खर्च केली आहे.

देवगिरी बँकेने सुमारे ५९ लाख ७८ हजारापर्यंतची कामे सोशल फंडातून केली. ही सर्व कामे ग्रामीण जनतेशी नाळ असलेल्या नागरिकांसाठी झाली. जलयुक्त शिवार आणि शिरपूर पॅटर्नद्वारे पाणी वाचवा पाणी जिरवा यावर भर देत जनजागृतीही केली.

- अभय मंडलिक, सल्लागार, देवगिरी बॅंक संचालक मंडळ

आमचा सोशल फंड खूप मोठा नाही, पण आम्ही थोड्या प्रमाणात मदत करतो. गेल्या वर्षी यातून सुमारे ३ लाख रुपये खर्च केले. यातून विमा काढणे, वैद्यकीय मदत देणे, अपंगांना सायकली देणे अशी कामे केली आहेत.

- अर्जुन गायके, अध्यक्ष, लोकविकास बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून विनयभंग करणारा चार्ली निलंबित

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यधुंद अवस्थेत घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चार्ली पथकातील जवानाविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चार्लीच्या निलंबनाचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. सोमवारी रात्री पावणेदहा वाजता मयूरपार्क भागात हा प्रकार घडला.

मनोज गोपीनाथ शिरसे (वय २६ रा. शिवेश्वर कॉलनी, मयूरपार्क रोड, हर्सूल) हा पोलिस कर्मचारी बेगमपुरा पोलिस ठाण्याचा असून, सिटीचौक भागात ३२ क्रमांकाच्या चार्ली पथकात कार्यरत आहे. सोमवारी रात्री मनोज साध्या वेशात रेणुकाई हिरानगर भागात मद्यधुंद अवस्थेत फिरत होता. तो एका घरात पाठीमागून शिरला आणि घरातील महिलेशी असभ्य वर्तन केले. प्रतिकार केला असता शिवीगाळ व धमकी देत तो पळून गेला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मंगळवारी शिरसे याच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चोरांची धुळे येथील टोळी गजाआड

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून ट्रक चोरी करून धुळे येथे सुटे पार्ट करून त्याची विक्री करणारी टोळी जिन्सी पोलिसांनी गजाआड केली. गुरुवारी रात्री बायजीपुरा हद्दीतून ट्रकची चोरी करण्यात आली होती.

कलीम अमीन शेख यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक गुरूवारी रात्री बायजीपुरा येथील मनपा शाळेच्या आवारात उभा केला होता. अज्ञात चोरट्यांनी हा ट्रक चोरून नेला होता. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ट्रक चोरीप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली. पोलिसांना खबऱ्यामार्फत हा ट्रक धुळे येथील एका गोदामात असल्याची माहिती मिळाली. तातडीने पोलिसांच्या पथकाने धुळे गाठून या गोदामावर छापा टाकला. यावेळी त्यांना गोडावूनमध्ये या ट्रकचे विविध पार्टस् आढळून आले.

या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपी सय्यद सादेक सय्यद आरेफ (वय २८ रा. भोकरदन), शेख अमिन शेख बाबा (वय २४ रा. धुळे) व शेख फरीद शेख युसूफ (वय २७ रा. बायजीपुरा) यांना अटक केली. आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एन. ठाकरे यांच्यासह खाजेकर, शेख सलीम, शेख गफ्फार, बावीसकर, संजयसिंह राजपूत व हकीम पटेल यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना औषध विक्री

0
0

पन्नास हजारांचा साठा जप्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुना बाजार भागातील औषधांची विनापरवाना विक्री करणाऱ्या एका दुकानादारकडून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ५० हजार रुपये किंमतीचा औषध साठा जप्त केला. या प्रकरणी कोर्टात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती एफडीएचे सह आयुक्त विराज पौनीकर यांनी दिली.

जुना बाजार परिसरातील अल हसन क्लिनिक इमारतीच्या तळमजल्यावरील शॉप नंबर दोनमधून औषधाची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती एफडीएचे सह आयुक्त ( औषध) पौनीकर यांना मिळाली. त्याआधारे छापा टाकण्यात आला. यात सत्तार शाह हमीद शाह हे औषधांची अवैधरित्या विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. कारवाईत विविध प्रकारची औषधे जप्त करण्यात आली असून, संबंधित दुकानदाराविरोधात कोर्टात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. औषध निरीक्षक माधव निमसे, मनोज अय्या, मिलिंद काळेश्वरकर यांनी ही कारवाई केली. औषध व सौदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८ ( सी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्या आला आहे. यामध्ये ५ वर्षापर्यंत कारावास, दंड अशी शिक्षा होऊ शकते, अशी माहिती पौनीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगाचे शहरात दोन प्रकार

0
0

औरंगाबाद : महिलांचा विनयभंग केल्याचे दोन प्रकार शहरात घडले. याप्रकरणी क्रांतिचौक व जवाहरनगर पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हे दोन्ही प्रकार शनिवारी घडले.

बालाजीनगर येथील एका तरुणीच्या मोबाइलवर शनिवारी अज्ञात आरोपीने अश्लील मेसेज पाठविले; तसेच वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला. याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून मोबाइलधारकाविरुद्ध (क्रमांक ९४०५१५७४६२) जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना समर्थनगर भागातील सावरकर चौकात शनिवारी रात्री साडेआठ वाजता घडली. एका २३ वर्षांच्या महिलेचा दुचाकीवरून (क्रमांक एमएच २० व्ही ६७८४) एकाने पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवून शिवीगाळ केली व विनयभंग केला. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुराव्याअभावी अटक नाही

0
0

कलमे वाढविण्यासाठी मनपाच्या अहवालाची प्रतिक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा प्रकरणातील भूमाफियांना अटक करण्यासाठी ठोस पुरावे जमा करणे सुरू आहे; तसेच महापालिकेला या गुन्ह्यात कोणती कलमे वाढवता येतील याबाबत विचारणा करण्यात आली असून अद्याप त्याचा अहवाल आला नसल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

‌रहिवाशांनी आपली फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर प्रथमदर्शनी चौकशीमध्येच हा गुन्हा असल्याचे दिसून आले. यावरून तात्काळ आरोपी राजू तनवाणी, राज आहूजा व इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र या गुन्ह्यामध्ये अजून बराच तपास करणे बाकी आहे. तहसील कार्यालयाकडून माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. आरोपीविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात महानगरपालिकेचे इमारत निरीक्षक देखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत. वादग्रस्त ‌जमिनीवर घरे उभी राहत असताना या निरीक्षकांनी दुर्लक्ष कसे केले, या घरांना जीटीएलच्या वतीने वीज पुरवठा कसा देण्यात आला आदी बाबी गंभीर असल्याचे आयुक्तांनी सांगितले; तसेच या गुन्ह्यामध्ये आणखी काही वेगळी कलमे लावता येतात का याबाबत शुक्रवारी मनपा आयुक्तांशी चर्चा करून त्यांना लेखी पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र, त्याचा अहवाल आल्यानंतरच या गुन्ह्याच्या कलमात वाढ होण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली.

दरम्यान, सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, महापौर त्रिंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यात चर्चा झाली. यावेळी शहरात अशा पद्धतीचे बनावट लेआउट दाखवून प्लॉट विक्रीचे अनेक प्रकार सुरू असल्याची तक्रार महापौर, उपमहापौरांनी केली. त्यावर अशा लेआउटची माहिती द्या, पोलिस व मनपाचे अधिकारी संयुक्त व्हिजीट देऊन कारवाई करू, असे आपण महापौरांना सांगितल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

सोनवणेंना कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना

पहाडसिंगपुरा प्रकरणातील जमिनीचे मूळ मालक माधवराव सोनवणे यांना मंगळवारी दुपारी आर्थिक गुन्हेशाखेमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी त्यांच्या जमिनीची मूळ कागदपत्रे तपासासाठी सादर करण्यास सांगण्यात आले. या कागदपत्रांची यादी त्यांना देण्यात आली असून बुधवारी कागदपत्रासहित बोलावण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हप्तेखोरीचा कामात खोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटणाऱ्या शहरातील रस्त्यांची दुर्दशा पाहून शासनाने २४ कोटी ३३ लाखांचा निधी मंजूर केला. मात्र, जाऊ तिथे खाऊ या वृत्तीने तिथेही पाय आडवा आणला. केवळ हप्तेखोरीमुळे शहरातील पाच रस्त्यांची कामे पाच महिन्यांपासून रखडल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे.

शहरातल्या कुठल्याही रस्त्यावर जा, तुमचे अंग खिळखिळे झाल्याशिवाय राहणार नाही. अभिनेते आले की तेही इथल्या रस्त्यावरून राज्यकर्त्यांची अब्रू भर सभेत टांगतात. त्यामुळेच शहरातील रस्त्यांची दुर्दशा संपविण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे येत ९ मार्च २०१५ रोजी २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. रस्त्याच्या कामासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. समितीमध्ये जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांचा समावेश केला. या समितीच्या देखरेखी खाली कामे व्हावीत, असे शासनाने म्हटले. पैसे पालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी तीन महिने लागले. निवडणूकीची आचारसंहिता आणि स्थायी समितीचे गठन यात दोन महिने निघून गेले. त्यानंतर लगेच या पाच रस्त्यांचे टेंडर प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवणे गरजेचे होते, पण १९ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्या स्थायी समिती बैठकीत प्रशासनाने टेंडर मंजुरीचा प्रस्ताव ठेवला. तो त्याच दिवशी मंजूर झाला. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यांची कामे सुरू होतील असे प्रशासनाने त्यावेळी स्पष्ट केले. मात्र, ही कामे सुरू झाली नाहीत. केवळ हप्तेखोरीमुळे ही कामे रखडल्याचे बोलले जात आहे.

हप्त्यांचा ताळमेळ जुळेना

स्थायी समितीने टेंडर मंजूर केल्यावर ठेकेदाराला वर्कऑर्डर देऊन लगेचच रस्त्यांची कामे सुरू होणे गरजेचे होते. मात्र, अद्यापही ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आलेली नाही. हप्त्यांचे वाटेकरी आणि त्यांची रक्कम याचा ताळमेळ जमत नाही. त्यामुळेच या रस्त्यांची कामे सुरू झाली नसल्याची चर्चा सुरू आहे.

महापालिकेशी संबंधित काही व्यक्तींमध्ये हिश्शावरून वाद सुरू आहे. काही जणांनी आपले रेट वाढवून घेतलेत. ठेकेदाराने या सर्वांना पैसे वाटले तर, रस्त्याचे काम कसे होणार? पालिकेनेही विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून टेंडर काढले आहे. त्यातही मिलिभगत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. कामे मंजूर करतानाही भेदभाव केला आहे.

- इम्तियाज जलिल, आमदार

रस्त्यांसाठी शासनाने पैसे दिलेत. स्थायी समितीने टेंडरही मंजूर केले आहे. प्रशासकीय पूर्तता बाकी आहे. प्रशासन त्यांच्या स्तरावर या पूर्तता करून घेत आहे. त्यामुळे हप्तेखोरीचा आरोप चुकीचा आहे. येत्या एक-दोन दिवसांत वर्कऑर्डर दिली जाईल. काम सुरू होईल.

- त्र्यंबक तुपे, महापौर

ठेकेदाराला सेक्युरिटी डिपॉझिट जमा करण्यास सांगितले आहे. त्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला आहे. त्याने डिपॉझिट भरल्यावर लगेचच रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल. दरम्यानच्या काळात रस्त्यांच्या मोजमापीचे काम महापालिकास्तरावर सुरू केले आहे.

- सिकंदर अली, कार्यकारी अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६ वर्षांत १९ हजारांवर इंजिनीअर्स

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ६ वर्षांत १९ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगची पदवी संपादन केली. आतापर्यंत इंजिनीअरिंग फ्रेशर्सनां नोकरीच्या संधी मर्यादित होत्या, मात्र दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर (डीएमआसी), स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे इंजिनीअरिंग क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, आयटी आदी शाखांना चांगले दिवस अपेक्षित आहेत, पण त्यासाठी शिक्षणाला सॉफ्टस्किल्स, कम्युनिकेशन आदींची जोड देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या काही वर्षांत इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. प्रथम वर्षासह थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरीसाठी कंपन्यांच्या दारोदार फिरावे लागते आणि नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे हे चित्र निर्माण झाले आहे. विद्यापीठातंर्गत २०१० ते २०१५ या कालावधीत इंजिनीअरिंगच्या विविध शाखांमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १९ हजार ४३३ आहे. पदवी संपादन केलेल्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत नोकरीचे प्रमाण कमी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मराठवाड्यातील इंजिनीअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडलेल्यांपैकी ७ ते ८ टक्केच विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक क्षमता असली तरी सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किलमध्ये विद्यार्थी मागे पडतात. शिक्षणाला या स्किल्सची जोड देण्याची गरज तज्ज्ञांना वाटते. इंजिनीअरिंग झाल्यानंतर विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून या कौशल्याचे प्रशिक्षण घेत आहेत. शिक्षणात पहिल्या वर्षापासूनच त्यांचा अंतर्भाव व्हावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

औरंगाबादमध्ये स्मार्ट सिटी, डीएमआयसी सारखे प्रकल्प येत आहेत. त्यामुळे पाच ते दहा वर्षात इंजिनीअर्सना मोठी मागणी असेल. विशेषतः स्मार्ट सिटी प्रकल्प इलेक्ट्रॉनिक्सशीच संबंधित आहे. या दृष्टिकोनातून शिक्षण पद्धतीतही बदल केले पाहिजेत.

- चंद्रशेखर गंपावार, मार्गदर्शक

कंपन्यांकडून मागणी आहे, परंतु त्यांना हवे तसे मनुष्यबळ मिळत नाही. येथील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता भरपूर आहे, परंतु प्रेझेंटेशन करण्यात ते कमी पडतात. अॅप्टिट्यूट टेस्ट, सॉफ्टस्किल्स, कम्युनिकेशन स्किल याबाबत विद्यार्थी अधिक जागरूक असले पाहिजेत.

- रुपेश झा, मार्गदर्शक

डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. पदवीधारकही नोकरीसाठी चौकशी करतात. नवीन उद्योजक निर्माण होण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. मराठवाड्यात हे प्रमाण चांगले आहे.

- पी. पी. देशमुख, संचालक, एमसीईडी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहीण-भावाचा वीज पडून मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण तालुक्यातील नवगाव शिवारात वीज पडून भाऊ- बहिणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (८ सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास घडली. तालुक्यातील तुळजापूर येथील मेहताब शेख (वय ५२) हे पत्नी रहेमानबी ( वय ४८), मुलगी सुलताना (वय १५) व मुलगा फारुख (वय १३) यांच्यासोबत नवगाव शिवारातील शेतात काम करत होते. दुपारी दोनच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. फारुख व सुलताना हे दोघे पावसापासून बचाव करण्यासाठी एका झाडाखाली थांबले होते. त्यावेळी बहिण-भावावर वीज पडली. या घटनेत फारुखचा जागीच मृत्यू झाला. गंभीर सुलतानावर पैठण येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करून औरंगाबादला पाठवण्यात आले, परंतु तिचा रस्त्यातच बिडकीनजवळ मृत्यू झाला. याप्रकरणाची पैठण पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठ्याचे नाव आरोपींतून वगळले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा प्रकरणात तीन भूमाफियांसह तत्कालीन तलाठ्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला होता, परंतु पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये आरोपींच्या यादीतून तलाठ्याला वगळल्याचे समोर आले आहे. भूमाफियांनी बनावट ले आउटद्वारे प्लॉट विकून फसवणूक केल्याची तक्रार रेणुकामातानगर येथील रहिवासी रामदास ढोले यांनी दिली. त्यानुसार रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला.

ढोले यांच्या तक्रारीत भूमाफिया तनवाणी, अहुजा, कोरडे यांच्या नावांसह २००४मध्ये कार्यरत असलेल्या तलाठ्याचा उल्लेख करण्यात आला होता. एफआयआरमध्ये तक्रारीतील सर्व मजकुराचा समावेश आहे, मात्र पोलिसांनी तनवाणी, अहुजा आणि कोरडे यांचीच आरोपी म्हणून नोंद केली आहे. तलाठ्याचा उल्लेख आरोपींच्या यादीत नाही.

ही तक्रार फिर्यादीच्या जवाबावरून दाखल केली आहे. तलाठ्याचे नाव त्यांना माहिती नव्हते. तपासाअंती तलाठ्याचे नाव निष्पन्न झाल्यावर ते नाव आरोपींमध्ये सामाविष्ट केले जाईल.

- मधुकर सावंत, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images