Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

फुटबॉल संघटक भाटिया यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा फुटबॉल संघटनेचे माजी सचिव धरमपाल उर्फ पॉल भाटिया (वय ८५) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मोहित व सुनील ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. औरंगाबाद आणि मराठवाड्यामध्ये फुटबॉलचा प्रचार, प्रसार करण्यात पॉल भाटिया यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सेनादलाचे प्रतिनिधत्व केले होते. तब्बल दोन दशके ते औरंगाबाद जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव होते. त्यांनी औरंगाबाद आणि मराठवाड्यातील अनेक फुटबॉलपटू घडविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ओव्हीट्रॅप’ने करा डासांचा नायनाट

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

औरंगाबादः अवघ्या ३५-४० रुपयांमध्ये आणि केवळ १० मिनिटांत घरच्या घरी तयार करता येणाऱ्या 'ओव्हीट्रॅप' या छोटेखानी व १०० टक्के नैसर्गिक उपकरणामुळे डासांची निर्मिती थांबून हळूहळू नायनाट होऊ शकतो. घरात व इतरत्र कुठेही अडकवून ठेवता येणाऱ्या या 'ट्रॅप'मध्ये डेंगी-चिकनगुनियाला कारणीभूत ठरणाऱ्या 'एडिस एजिप्ती' या डासांसह इतरही डासांची अंडी आपोआप जमा होऊन नवीन डासांची निर्मिती थांबते व हळूहळू डासांचा नायनाट होतो.

या ट्रॅप'चा वापर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वॉर्डांमध्ये सुरू झाला आहे. घाटीतील 'बीपीएमटी' अभ्यासक्रमाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी पूजा जगताप हिने मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'ओव्हीट्रॅप' तयार केला आणि आता त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे. लवकरच एका 'ट्रॅप'मध्ये दिवसभरात, आठवड्यात किती अंडी जमा होतात, हे लक्षात येणार असून, त्याचाही अभ्यास लवकरच केला जाणार आहे. सद्यस्थितीत 'ट्रॅप'मध्ये रोजच अंडी जमा होत असल्याचे लक्षात आले आहे.

असा तयार करा 'ओव्हीट्रॅप'

मुलांची पैसे जमा करायची प्लास्टिकची उभी 'पिगीबँक' (कॉइनबॉक्स) घ्या. 'पिगीबँक'ला खालच्या बाजूने अर्ध्यापेक्षा कमी अंतरावर पाणी निघून जावे यासाठी समोरासमोर दोन छोटे छिद्र पाडा. 'ट्रॅप' तारेला अडकवून ठेवण्यासाठी वरच्या बाजूने चार बोटे सोडून समोरासमोर दोन छिद्र पाडा. त्यानंतर 'पिगीबँक'चे वरचे झाकण कापून टाका. एक मोठ्या आकाराचा काळा सॉक्स घ्या आणि 'पिगीबँक'च्या आतमध्ये सॉक्सचे शेवटचे बंद टोक चिटकवून 'पिगीबँक'च्या बाहेरून उलटा खालपर्यंत ओढा व चिटकवून टाका. आता 'ट्रॅप' पूर्णपणे काळ्या रंगाचा होऊन जाईल. त्यानंतर 'पिगीबँक'च्या तोडाच्या आकाराची स्टीलची 'मॉस्क्युटो नेट' (बारीक आकाराची) वरतून थोडी दाबून ठेऊन द्या. 'ओव्हीट्रॅप' अडकवून ठेवण्यासाठी वरच्या दोन छिद्रांमध्ये दोन्हीकडून वायर लावा. त्यानंतर साबण नसलेल्या व शक्यतो सांडपाण्यात किंवा पावसाच्या पाण्यात 'ओव्हीट्रॅप' बुडवून पाणी भरून घ्यावे.

साचलेल्या पाण्याचा वास 'ट्रॅप'ला लागावा आणि डास आकृष्ठ व्हावे, या हेतुने 'ट्रॅप' प्रत्यक्ष बुडवून पाणी घ्यावे. अर्थातच, खालच्या छिद्राच्या पातळीपर्यंत पाणी मावेल व वरचा जाळीपर्यंतचा भाग मोकळा राहील. पाण्याच्या वासामुळे व काळ्या रंगामुळे डासांची मादी त्या जाळीवर बसते आणि नैसर्गिक प्रवृत्तीमुळे अंडी देते. ती अंडी जाळीतून 'ट्रॅप'मध्ये पडतात व कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडू शकत नाहीत. ८-१५ दिवसांतून 'ट्रॅप' स्वच्छ करता येऊ शकतो; परंतु रोज 'ट्रॅप'मध्ये थोडे पाणी टाकणे आवश्यक आहे, अशी माहिती डॉ. बोरकर व पूजा हिने दिली.

९७ टक्के डेंगीच्या केसेसमध्ये घट

'विकीपीडिया'च्या नोंदीनुसार, 'ओव्हीट्रॅप'मुळे ९२ टक्के डेंगीचे केसेस घटल्याचे क्विन्सलँड हेल्थ डिपार्टमेंटने, तर ९७ टक्के डेंगीच्या केसेस घटल्याचे 'दि फिलापाइन्स डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी'ने म्हटले आहे. अमेरिकी लष्करामध्ये १९७० पासून 'ओव्हीट्रॅप'चा यशस्वी वापर होत आहे. इतरही अनेक देशांमध्ये याचा वापर होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बक्षिसाची फाइल मंजुरीच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका शाळेतून दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याची फाइल दहा ते पंधरा दिवसांपासून लेखा विभागात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. फाइल मंजूर न झाल्यामुळे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचा शिक्षक दिनाचा मुहूर्त हुकला. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी हा कार्यक्रम व्हावा असा प्रयत्न केला जात होता. या दिवशीही हा कार्यक्रम झाला नाही.

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रोत्साहन मिळावे व दहावीच्या परीक्षेत त्यांना खासगी शाळांच्या तुलनेत चांगले गुण मिळावेत म्हणून दोन वर्षांपूर्वी महापालिकेने बक्षीस योजना जाहीर केली. सुमारे पाच ते साता लाख रुपये या योजनेसाठी महापालिकेने खर्च केले. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यावर शिक्षण विभागाने विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली, पण प्रशासनाकडून या कार्यक्रमासाठी हिरवा कंदील दाखवला गेला नाही. त्यामुळे परीक्षेचा निकाल लागल्यावर लगेचच हा कार्यक्रम होऊ शकला नाही. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांच्या सत्कारासह विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा कार्यक्रम घ्यावा अशी चर्चा झाली. मात्र, त्यावेळीही आर्थिक तरतुदीचा मुद्दा पुढे आला.

बक्षिसासाठाची फाइलच शिक्षण विभागातर्फे लेखा विभागाला देण्यात आली नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२ सप्टेंबर रोजी शिक्षण विभागाने लेखा विभागाकडे ती फाइल सादर केली. फाइलीला लगेचच मंजुरी मिळेल असे मानून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी कार्यक्रम घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले. मात्र, अद्याप लेखा विभागाने विद्यार्थ्यांच्या बक्षिसांची फाइल मंजूर केली नाही.

गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे व अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षीस योजना अंमलात आणली आहे. यंदाच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याची फाइल १२ सप्टेंबरपासून लेखा विभागात पडून आहे. ही दुर्दैवी बाब आहे. वास्तविक पाहता अशा कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाने उत्स्फूर्तपणे केले पाहिजे.

- शिवाजी दांडगे, शिक्षण सभापती, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तथ्य आढळल्यास सनातनवर बंदी’

$
0
0

औरंगाबाद : 'गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. पोलिस कायद्यानुसार कारवाई करतील. त्यात सरकार कुठेच हस्तक्षेप करणार नाही. तथ्य आढळले तर, सनातन वर बंदीबाबत सरकार योग्य निर्णय घेईल,' असे प्रतिपादन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. पानसरे हत्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी समीर गायकवाडला अटक केली आहे. खडसे म्हणाले, 'संशयित आरोपी पकडला आहे. सखोल चौकशी सुरू आहे. सरकारने ठरविले म्हणून तर, संशयित गुन्हेगारापर्यंत पोचता आले. पोलिस कायद्यानुसार कारवाई करतील. सरकार हस्तपेक्ष करणार नाही. सनातनवर बंदीचा निर्णय लगेच घेता येतो पण तो कोर्टात टिकत नाही. त्यामुळे पोलिस तपासानंतर काय निष्कर्ष निघतो हे तपासून सरकार योग्य निर्णय घेईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी जुळवल्या रेशीमगाठी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोघांचे प्रेम झाले. त्यांनी लग्न करायच्या आणाभाका घेतल्या. अन् अचानक त्याने पाठ फिरवली. आता करणार काय? तिचे त्याच्यावर प्रेम. मग तिने तडक मुकुंडवाडी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी अगोदर तिचे म्हणणे ऐकून घेतले. तक्रार दाखल करून न घेता, त्याचा शोध घेतला अन् समुपदेश केले. मग काय दोघेही लग्नासाठी तयार झाले. नातेवाईकांच्या साक्षीने उद्या हे लग्न होते आहे. मुकुंदवाडी पोलिसांच्या समंजसपणाने दोन कुटुंब जोडली गेली. याचीच चर्चा आज रंगली.

दर्शन (नाव बदलेले, वय २२) राजनगरमध्ये राहतो. त्याची गेल्या वर्षी सिटीचौकातल्या सोनिकासोबत (वय १९) ओळख झाली. दर्शनला आई-वडील नाही. सोनिका मावशीकडे राहते. या दोघांत प्रेम झाले. मात्र, अवघ्या काही महिन्यात खटके उडू लागले. दर्शनने सोनिकाला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोनिका संतापली. तिने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून दर्शनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली. पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण हाताळले. तरुणीने तक्रार केल्यास या प्रकरणामध्ये जास्त दरी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यांनी सोनिकाची समजूत घातली. तिने फक्त दर्शनने आपल्याशी लग्न करावे एवढीच मागणी असल्याचे सांगितले. इकडे दर्शन पसार झाला होता. भारतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पट्टेकर, मिलिंद घोरपडे यांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधत त्याचा शोध घेतला. त्याची समजूत काढली. सोमवारी दर्शन पोलिस ठाण्यात हजर झाला. पीएसआय करेवाड यांनी त्याचे समुपदेशन केले. त्याला देखील आपली चूक लक्षात आली. त्याच्या नातेवाईकांचे देखील पोलिसांनी समुपदेशन केले. यातून दोन्ही कुटुंब या लग्नास तयार झाले. उद्या धार्मिक पद्धतीने हा विवाह सोहळा मोठ्या धूमधडाक्यात होणार आहे.

महिला सुरक्षितता व महिलांचे सबलीकरण होणे आवश्यक आहे. या दोघांच्या प्रकरणात तक्रार दाखल झाली असती तर, प्रकरण ‌बिनसले असते. दोघांचे समुपदेशन करण्यात आम्हाला यश आले. यामध्ये वरिष्ठांचे खूप मार्गदर्शन झाले.

-स्नेहा करेवाड, पोलिस उपनिरीक्षक

दोघांच्या घरची परिस्थिती बिकट आहे. त्यांची समजूत काढली. दोघांनी विवाह करून एकत्रित राहण्याबाबत ग्वाही दिली. याकामी आम्हाला नगरसेवक कैलास गायकवाड यांनी मदत केली.

विजय पट्टेकर, सामाजिक कार्यकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन महिन्यांत सरकते जिने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनवर सरकते जिने सुरू होण्यासाठी अजून तीन महिन्यांची वाट पाहावी लागेल. मुंबईहून तीन कंटेनरमधून दोन एस्कलेटरचे सामान नुकतेच आले आहे.
देशभरातील २०० रेल्वे स्टेशनवर सरकते जिने बसवण्यात येत आहेत. औरंगाबादमधील कामाचे भूमीपूजन तीन महिन्यांपूर्वी दक्षिण मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक पी. के. श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर हे काम थांबले होते. रविवारी रात्री मुंबईहून तीन जिन्यांचे सामान तीन कंटेनरमधून आणले गेले. यातील दोन एस्कलेटर जॉन्सन कंपनीचे आहेत. त्यातील एक पायऱ्या चढण्यासाठी, दुसरा उतरण्यासाठी वापरण्यात येईल. एस्कलेटरच्या लांबी रुंदीनुसार पाया तयार केला जाईल. त्यानंतर वीज जोडणी करून एस्कलेटर बसवण्याचे काम सुरू केले जाईल. या कामासाठी तीन ते चार महिने लागतील. मार्च २०१६ मध्ये हे जिने सुरू होतील, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

साखळी चोरीला

एस्कलेटरचे सामान सध्या स्टेशनवरील जुन्या इमारतीत ठेवले आहे. या सामानाच्या सुरक्षेसाठी वापरलेली लोखंडी साखळी चोरट्यांनी पळवली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस हे सामान कुठे ठेवायचे, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना पडला आहे. यामुळे सध्या या सामानाची जबाबदारी इलेक्ट्रीकल आणि कम्युनिकेशन विभाग रेल्वे सहाय्यक अभियंत्यावर टाकत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या कामाला सतराशे विघ्ने!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने सात महिन्यांपूर्वी निधी दिला. हे पैसे महापालिकेने सहा महिने ठेवून घेतले. आता टेंडर निघाले, कंत्राटदाराला वर्कऑर्डर दिली. मात्र, केवळ उदघाटनासाठी मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळत नाही म्हणून, या कामाची सुरुवात रखडली आहे.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे लक्षात घेऊन भाजप आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून १० रस्त्यांसाठी २४ कोटी ३३ लाख रुपये मंजूर करून घेतले. शासनाने ही रक्कम ९ मार्च रोजी मंजूर केली. एप्रिल महिन्यात महापालिकेची निवडणूक असल्यामुळे महापालिकेने या रस्त्यांचे काम सुरू केले नाही. निवडणूक झाल्यावर लगेचच काम सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, महापालिकेने त्यासाठी वेळकाढूपणा केला. १९ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांच्या कामाचे टेंडर प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवले. स्थायी समितीने हे टेंडर मंजूर केले. त्यानंत लगेच कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देऊन पालिका प्रशासन रस्त्यांचे काम सुरू करेल असे मानले जात होते. मात्र, कंत्राटदाराला वर्कऑर्डर देऊनही अद्याप रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शहरात आले होते. मात्र, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना जास्त वेळ शहरात थांबता आले नाही. त्यामुळे रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होऊ शकला नाही. आता गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांनी रस्ते कामासाठी निधी दिला. रस्त्यांच्या कामाचे श्रेय त्यांचेच आहे. आता वर्कऑर्डर झाली आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम सुरू करा, मुख्यमंत्र्यांची वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचा अनौपचारिक शुभारंभ करू. कामे लवकर होणे गरजेचे आहे.

- त्र्यंबक तुपे, महापौर

रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करावा, असे नियोजन होते. मात्र, ते अन्य कार्यक्रमांमुळे वेळ देऊ शकले नाहीत. आता गणेशोत्सवानंतर काम सुरू करण्याचे ठरवले आहे. रस्त्यांच्या लोकार्पणासाठी त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू.

- अतुल सावे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना वरदान ठरणारा प्रकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मराठवाड्यात गुणवत्तायुक्त केशर आंबा उत्पादनाला चालना देणारे केशर आंबा गुणवत्ता केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. भारत-इस्त्रायल कृषी सहकार्य करारानुसार तीन वर्षांपूर्वी प्रकल्प कार्यान्वित झाला. हिमायतबाग येथील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी उद्घाटन केले.

इंडो-इस्त्रायल कृषी सहकार्य कराराअंतर्गत २०१२मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हिमायतबागेतील फळबाग संशोधन केंद्रात केशर आंबा गुणवत्ता प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पासाठी सात कोटी ४४ लाख रुपये खर्च करण्यात आला. भारत व इस्रायलच्या कृषी शास्त्रज्ञांनी परिश्रमपूर्वक संशोधन केले. केशर आंबा व इस्रायलच्या उत्तम जातीचा आंबा यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. दोन जातीच्या आंब्याचे कलम तयार केले. मराठवाड्यातील ३२ शेतकऱ्यांना प्रायोगिक पातळीवर केशरची रोपे दिली आहेत; तसेच आंबा लागवडीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी आंब्यांची लागवड जास्त अंतरावर करतात. या उपक्रमात अतिघन लागवड व फांद्यांची छाटणी केल्यास किती उत्पादन वाढेल यावर संशोधन सुरू आहे. शिवाय उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेली रोपे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. केशर आंबा निर्यातक्षम करणारा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.

दरम्यान, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केशर आंबा गुणवत्ता केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी कृषिमंत्री एकनाथ खडसे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री राम शिंदे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप शिंदे, इस्त्रायलचे काउंन्सिल जनरल डेव्हिड अकोव्ह, काउंन्सिलर डॅन अलुफ, कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, केंद्र संचालक डॉ. तुकाराम तांबे, डॉ. संजय पाटील, कृषी अधिकारी पी. डी. लोणारे उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञान

या प्रकल्पाअंतर्गत २४ लाख रुपये किमतीचे खास छाटणी यंत्र इटलीहून मागविण्यात आले. आंब्याच्या झाडाची १४ फुटांपर्यंतची छाटणी यंत्रामुळे सहजसोपी झाली आहे. शेतकऱ्यांना नाममात्र भाडेतत्त्वावर हे यंत्र देणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानात छाटणी यंत्राचे विशेष महत्त्व आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागा देणार नसाल तर, आत्महत्येची परवानगी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एमआयडीसीमध्ये भाडेतत्वावर व्यवसाय करणाऱ्या लघु उद्योजकांना तीन वर्षांपासून मागणी करूनही जागा मिळत नाही. जागा देणार नसाल तर, आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी लघु उद्योजक संघाने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अध्यक्ष अनिल अर्डक यांनी सांगितले की, चिकलठाणा एमआयडीसी येथे गेल्या १० ते १५ वर्षांपासून असंख्य लघु उद्योजक भाडेतत्वावर जागा घेऊन व्यवसाय करत आगहेत. या उद्योजकांना स्वतःची जागा असावी यासाठी २०१२मध्ये लघु उद्योजक संघ स्थापन करून अर्डक यांनी पहिला प्रस्ताव पाठविला, पण चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रामध्ये निविदा पद्धतीने भूखंड वाटप असल्यामुळे सरळ पद्धतीने भूखंड वाटप करणे शक्य नाही, असे एमआयडीसीने कळविले. त्यानंतर वारंवार राज्य सरकारकडे लघु उद्योजकांनी जागेची मागणी केली.

एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांशी वैयक्तिक संपर्क साधला असता चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एक जागा असून, तेथे गाळे बांधून ५०० चौरस फुटांचा प्रत्येक गाळा असेल. पाच मजली इमारत उभी करून प्रत्येक गाळ्याला किमान २८ लाख रुपये लागणार असल्याबद्दलची चर्चा होती. अर्थात त्यासंदर्भात अधिकृत घोषणा कधीच झाली नाही. विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून संघाने जागेची मागणी केली. देसाई यांनी एमआयडीसी औरंगाबादला पत्र पाठवून जागेची व्यवस्था करून देण्यासंदर्भात सूचना केली होती. त्यावर अद्याप हालचाल झालेली नाही, असे अर्डक यांनी सांगितले. लघु उद्योजक इमाने इतबारे भाड्याच्या जागेमध्ये व्यवसाय करत आहेत. त्यांना कायमस्वरुपी जागा मिळाली तर, निश्चितपणे लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लघु उद्योजकांना जागा दिली जाईल, असे आश्वासन दिले होते, पण काहीच हालचाल होत नसल्याने दहा सप्टेंबर रोजी लघु उद्योजक संघाने एमआयडीसीला निवेदन दिले आहे. जागा उपलब्ध करून द्या किंवा आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केल्याचे अर्डक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबससाठी भाजप पदाधिकाऱ्यांत रस्सीखेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतर्फे सिटीबस सेवा सुरू करण्याची चर्चाच सुरू झाली. स्थायी समितीच्या बैठकीत किंवा सर्वसाधारण सभेत यासंदर्भात अद्याप प्रस्ताव आलेला नाही. बससेवेचा प्रस्ताव आणण्याची तयारी मात्र केली जात आहे. प्रस्ताव सादर करून, त्याला मंजुरी मिळण्यापूर्वीच सिटीबस सेवेसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्येच रस्सीखेच सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ही सेवा नागरिकांसाठी कितपत फायदेशीर ठरेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेने तत्कालीन महापौर किशनचंद तनवाणी यांच्या पुढाकाराने २००६ यावर्षी 'एएमटी' या नावाने सिटीबस सेवा सुरू केली होती. ३ वर्षांनंतर ही सेवा बंद पडली. आता पुन्हा सिटीबस सेवा सुरू करण्याची महापालिकेत तयारी सुरू झाली आहे. ही सेवा व्यावसायिक दृष्टिने न चालविता नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले जाणार आहे, असे स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांनी स्पष्ट केले आहे. थोरात हे भाजपचे नगरसेवक असल्यामुळे, ते सभापतिपदावर असेपर्यंत आपल्या नातेवाईकाला सिटीबस सेवेचे कंत्राट मिळाले पाहिजे, यासाठी एक बडे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. या पदाधिकाऱ्याचे नातेवाईक बससेवा चालवितात.

या संस्थेच्या माध्यमातून कंपनीमधील कामगारांची ने-आण करण्यात येते. बसचे मोठे नेटवर्क या संस्थेकडे अाहे. त्यामुळे सिटीबस सेवा चालवणे सोपे जाईल, असे या पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या नातेवाईकालाच सिटीबसचे कंत्राट मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी व्यूहरचना आखणे सुरूकेले आहे.

दरम्यान, भाजपच्याच एका अन्य पदाधिकाऱ्याने सिटीबस सेवेचे कंत्राट मिळविण्यासाठी सर्व प्राथमिक तयारी केली होती. त्यांनी कर्जासाठी बँकेशीही संपर्क साधला होता, पण बडे पदाधिकारी या स्पर्धेत उतल्यामुळे त्यांनी माघार घेतली. महापालिकेत सिटीबस सेवेचा प्रस्ताव येण्यापूर्वीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दृष्टिक्षेपात सिटीबस

एसटी महामंडळाकडून शहरात सिटीबस सेवा सुरू होती

शहरबस महापालिकेने चालवावी, असा निर्णय महामंडळाने घेतला

२००४-०५मध्ये औरंगाबादमधील सिटीबस बंद करण्यात आली.

२००६मध्ये महापालिकेने 'एएमटी' ही बससेवा खासगीकरणातून सुरू केली

तोटा वाढल्याने २०१०मध्ये ही सेवा बंद करण्यात आली

पुन्हा एसटी महामंडळाने २०१०मध्ये सिटीबस सुरू केली

सध्या केवळ ३६ सिटीबस औरंगाबादेत सुरू आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

$
0
0

औरंगाबादः गोलवाडी परिसरात मित्रासोबत गेलेल्या सोळा वर्षाच्या मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली. सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की एक सोळा वर्षाची मुलगी तिच्या २० वर्षांच्या मित्रासह दुचाकीवर गोलवाडी परिसरात गेली होती. रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी हे दोघे गप्पा मारीत होते. यावेळी तीन तरुण त्यांच्या दिशेने आले. या तरुणांनी दोघांना मारहाण केली व मुलीवर बलात्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा सुरळीत; अॅप्रोच कॅनलवर मगर

$
0
0

औरंगाबादः तीन दिवसांच्या खंडानंतर सोमवारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, जायकवाडी येथील महापालिकेच्या पंपहाउससाठी तयार केलेल्या अॅप्रोच कॅनलवर मगर आढळल्याने खळबळ उडाली.

फारोळा येथील जलशुद्ध‌ीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या आठवड्यात दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शनिवारी पंपहाउसमध्ये गवताचे प्रमाण वाढल्यामुळे पाणी उपशावर परिणाम झाला. गवत काढण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे आज शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, आज जायकवाडी येथील महापालिकेच्या पंपहाऊससाठी तयार केलेल्या अॅप्रोच कॅनॉलच्या काठाला महाकाय मगरीचे दर्शन झाले. काहीवेळ ही मगर काठावर बसून होती, नंतर पाण्यात गायब झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेटिंग आठवड्यावर आणणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अडीअडचणींवर मात करीत ३ वर्षे पूर्ण करणाऱ्या राज्यातील पहिल्या शासकीय विभागीय कर्करुग्णालयात 'रेडिएशन' उपचारांसाठी असलेले दोन ते अडीच महिन्यांचे 'वेटिंग' ८ दिवसांवर आणण्याचा संकल्प विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात केला. 'वेटिंग' कमी करण्यासाठी दुसरे युनिट रुग्णालयामध्ये सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनीही स्पष्ट केले.

२१ सप्टेंबर २०१२ रोजी शासकीय विभागीय कर्करुग्णालय अर्थात कॅन्सर हॉस्पिटलचे उद्ऩघाटन झाले, मात्र उद्घाटनापूर्वीपासूनच रुग्णालय सुरू करण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला. रुग्णालयाच्या पदनिर्मितीला प्रशासकीय मान्यता मिळण्यापासून उद्घाटनापर्यंत अडचणी आल्या. पाण्याचा प्रश्न, निवासी डॉक्टरांचा प्रश्न, रिक्त पदे व तज्ज्ञांचा अभाव, असे प्रश्न कायम असतानाच रुग्णालयाने मागच्या ३ वर्षांत विविध समस्यांवर मात करीत सुमारे ७५ हजार रुग्णांना आधार दिल्याचे स्पष्ट झाले. वर्धापनदिनानिमित्त रुग्णालयामध्ये सोमवारी छोटेखानी कार्यक्रम झाला. डॉ. गायकवाड म्हणाले, तीन जुलै रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल'च्या संचालकांमध्ये झालेल्या करारानुसार 'टाटा'ने कॅन्सर हॉस्पिटलला उपकेंद्र म्हणून जाहीर केले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांना 'टाटा'मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्याचाही फायदा येथील रुग्णांना होणार आहे. रेडिएशनच्या उपचारांसाठी रुग्णांना दोन ते अडीच महिने प्रतीक्षा करावी लागते. 'लिनॅक' या उपकरणाच्या क्षमतेनुसार दिवसातून ४० ते ६० कर्करुग्णांना रेडिएशन देणे अपेक्षित असताना, रुग्णसंख्या खूप जास्त असल्यामुळे दररोज दुप्पट म्हणजेच ८० ते १२० रुग्णांना रेडिएशन दिले जाते. त्यासाठीच केंद्राकडे दुसऱ्या युनिटचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, रुग्णालयामध्ये दुसरे युनिट सुरू झाल्यानंतर 'वेटिंग' ८ दिवसांवर आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असेही डॉ. गायकवाड म्हणाले, तर प्रस्तावासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्राचार्य रवींद्र तोरवणे, डॉ. साधना कुलकर्णी, डॉ. देवदत्त धनेश्वर आदींची उपस्थिती होती. डॉ. कमलाकर माने यांनी प्रास्ताविक केले.

६३ कोटींच्या दुसऱ्या युनिटचा प्रस्ताव जानेवारी २०१४ मध्ये 'डीएमईआर' व वैद्यकीय सचिवांमार्फत केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये लिनॅक, ब्रेकेथेरपी, सिटी सिम्युलेटर अशी उपकरणे, एक कोबाल्ट युनिट व बांधकाम अपेक्षित आहे. प्रस्तावासाठी पाठपुरावा सुरू असून, केंद्राकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही.

- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, कॅन्सर हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब, ६ विहिरींसाठी खर्च २२ लाख!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विहिरीच्या खोदकामापेक्षा तिच्या साफसफाईवर जास्त खर्च करावा लागतो, हे ऐकून जरा आश्चर्य वाटेल, पण औरंगाबाद महापालिकेने ही किमया साधली आहे. गणेश विसर्जनाच्या ६ विहिरींच्या सफाईसाठी यावर्षी तब्बल २२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकारातून महापालिकेच्या तिजोरीचीच 'सफाई' जास्त होईल, असे मानले जात आहे.

गणपती विसर्जनासाठी औरंगपुरा, सिडको एन-१२, चिकलठाणा, मुकुंदवाडी, शिवाजीनगर, संघर्षनगर येथे विहिरी आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात महापालिकेकडून त्यांची स्वच्छता करण्यात येते. गाळ काढणे, आजुबाजुचा परिसर स्वच्छ करणे, तात्परत्या स्वरुपात दिवाबत्तीची सोय करणे, स्टेज उभारणी आदी कामे यावेळी केली जातात. त्यासाठी ठराविक रक्कम खर्च केली जाते. एका विहिरीसाठी ही सगळी कामे करण्यास जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे, पण महापालिकेच्या प्रशासनाने यासाठी तब्बल २० ते २२ लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको एन १२ येथील विहीर स्वच्छ करण्यात आली. त्यासाठी तीन लाख रुपये खर्च झाले. अन्य विहिरींच्या स्वच्छतेची कामे अद्याप सुरू झाले नाही. यासंदर्भात महापालिकेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी आयुक्तांना पत्र दिले असून, विहीर स्वच्छतेसाठी केल्या जाणाऱ्या अमाप खर्चाबद्दल आक्षेप घेतला आहे. गेल्यावर्षी हे काम ८० हजारांत झाले, मग यंदा तीन ते पाच लाख रुपये खर्च कशासाठी, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

विहिरींतील निव्वळ गाळ काढण्यासाठी औरंगाबाद महापालिका २२ लाख रुपये खर्च करीत असेल तर, चिंतेचा विषय आहे. हा निधी दुष्काळी भागात वापरावा.

- शिवाजी मोहिते, शेतकरी

गणेश विसर्जनासाठी विहिरीतील गाळ काढण्यावर २२ लाख रुपयांचा खर्च करणे निव्वळ अपव्यय आहे. या खर्चात विहिरी तयार करणे शक्य होईल.

- नारायण चौधरी, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात दुष्काळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पीक पैसेवारी मोजण्याची पद्धती राज्य सरकारने बदलली आहे. पूर्वी ५० टक्के पैसेवारी असल्यास दुष्काळ जाहीर केला जात असे. आता ३३ टक्के पैसेवारी असली तरी दुष्काळ जाहीर करण्यात येतो. यावर्षी मराठवाड्यातील सर्व तालुके या निकषामध्ये बसतात, असे सांगून संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याचे सूतोवाच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे सांगितले.

खडसे म्हणाले,'दुष्काळी निकष लावल्यानंतर मदत करण्यासाठी पूर्वी जी पद्धत प्रचलित होती त्यात राज्य सरकारने बदल केले आहेत. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आम्ही दुष्काळाची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी १५ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात ग्रामीण भागात दारिद्र‍्यरेषेखालील शेतकऱ्यांना दोन रुपये किलो दराने गहू तर, तीन रुपये किलो दराने तांदूळ दिले जात आहेत. मागेल त्याला काम देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दुष्काळ जाहीर केल्यानंतर कोरडवाहू जमिनीसाठी ६८०० रुपये प्रतिहेक्टर तर, ओलिताखालील जमिनीसाठी १३५०० रुपये प्रतिहेक्टर मदत दिली जाणार आहे.'

'अलिगड'साठी जागेची चाचपणी

अल्पसंख्याक विभागामार्फत अनेक नवीन योजना राबविण्यात येत आहेत. मराठवाड्यात इस्लामिक सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येईल. त्यासाठी पाच एकर जागेचा शोध सुरू आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या उभारणीसाठी २०० एकर जागेच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे. विद्यापीठासाठी औरंगाबाद जिल्ह्यात जागा मिळेल की नाही, हे सांगता येत नाही, पण राज्यात विद्यापीठाचे उपकेंद्र होईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले. 'उर्दू घर' ही नवीन संकल्पना राबविली जाणार आहे. उर्दू साहित्य जतन करण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होईल. अल्पसंख्या मुले व मुलींना १५००० रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्यास मंजुरी दिली आहे. अल्पसंख्याक समाजातील होतकरू तरुण, तरुणींसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, व्यावसायिक शिक्षणासाठी स्वतंत्र केंद्रे उभारली जातील. त्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. वक्फ बोर्डाच्या जमिनींवर जे अतिक्रमण झाले आहे, खरेदी विक्रीचे बेकायदा व्यवहार, भाडेतत्वावर झालेले व्यवहार रद्द ठरविण्यात आले आहेत. ही जमीन ताब्यात घेऊन त्याचा विनियोग केला जाईल. त्यासाठी केंद्राने कायदा केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या दांडीवर सारवासारव

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या दौऱ्यात शिवसेनेचे नेते दिसले नसल्याबद्दल विचारले असता खडसे म्हणाले की, राज्यपालांचा दौरा चार दिवसांपूर्वी ठरला. मी पालकमंत्री रामदास कदम यांना बोललो होते. ते गणेशोत्सवासाठी कोकणात गेले आहेत. मी सुद्धा पाहुणा म्हणूनच आलो आहे. पत्रिकेवर खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव आहे. त्यामुळे त्यांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवैध दारूविक्री रोखण्यासाठी ठिय्या

$
0
0

नांदेड : मौजे वाशी येथील महिलांनी मंगळवारी अवैध होत असलेल्या दारूविक्रीला लगाम घालण्याच्या मागणीसाठी हिमायतनगर पोलिसात ठिय्या मांडून पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना निवेदन सादर केले आहे. तक्रार देताच अवघ्या तासभरात संबंधित विक्रेत्यास पोलिसांनी जेरबंद करण्यात आले आहे.

शहरातील काही परवानाधारक दारू विक्रेत्यांकडून ग्रामीण भागात अवैध देशी दारूची वाहतूक करून संबंधित गावातील विक्रेत्याला पोचविली जात होती. हा प्रकार स्थानिक पोलिसांना हाताशी धरून चालविला जात असल्याने शेतकरी, मजूरदार व अल्पवयीन बालकेही दारूच्या आहारी जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे तालुक्यातील मौजे वाशी येथील काही महिला-पुरुषांनी हिमायतनगर पोलिस स्थानकात मंगळवारी ठिय्या मांडला. सकाळी ११ वाजता पोलिस स्थानकात हजार होऊन गावातील अवैध दारू विक्रेत्यांबाबत तक्रार दिली. तातडीने संबंधितावर आणि गावातील अन्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्याकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने बंधाऱ्यांची वाताहत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील बारा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची वाताहत झाली असून नद्यांच्या काठावरील हजारो हेक्टर जमिनींवरील माती वाहून गेली आहे. तसेच, पाचशेहून अधिक विहिरी ढासळल्या असून काही तर पुरामुळे वाहून आलेल्या गाळाने चक्क बुजून गेल्या आहेत. एकूण चार हजार हेक्टरहून अधिक शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज असून अब्जावधी लिटर पाणी वाहून गेले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील पूर्णा, केळणा, गिरीजा आणि धामणा या नद्यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला. अकरा सप्टेंबरपासून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील नदीला पूर आला. १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान पुन्हा एकदा सिल्लोड परिसरातील झालेल्या अतिवृष्टीमुळे या नद्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याने गेल्या दहा वर्षांतील उच्चांक प्रस्थापित केला. या पुरामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नद्यांनी पात्र बदलले आहे.

पूर्णा नदीच्या पात्रात केदारखेडा, विटा, आणि तांदुळवाडी या गावांच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. या पुरात कंत्राटदार मुकेश पांडे यांची ३० लाख रुपयांची मशिनरी वाहून गेली आहे. पांडे यांनी 'मटा'शी बोलताना ही माहिती दिली आहे. भोकरदन तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रात असलेल्या तांदुळवाडी, सिरसगाव मंडप, जैनपूर कोठारा, केदारखेडा, नळणी, तडेगाव, वाहेगाव; गिरीजा नदीच्या पात्रात असलेल्या वजीरखेडा, सिरसगाव वाघ्रुळ, बोरगाव तारू, विटा; केळणा नदीच्या पात्रात असलेल्या लिंगेवाडी; जाफराबाद तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रात असलेल्या बोरखेडी गायके हे सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या पुराच्या पाण्याने वाहून गेलेले आहेत. यापैकी अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात तांत्रिक चुका झालेल्या आहेत, तर अनेक बंधाऱ्यांना गेट बसवलेले नव्हते. काही ठिकाणी तर अर्धवट गेट बसवले होते. पूर येण्यापूर्वी बंधाऱ्यांची स्थिती नेमकी काय होती, या बाबतीत कुणीही अधिकारी बोलायला तयार नाही. जिल्हा परिषदेचे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता माकू यांना संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला यासंदर्भात काही ठोस माहिती नाही. कनिष्ठ अभियंत्यांकडून अहवाल मागितला आहे, असे सांगितले.

लघुसिंचन जलसंधारण विभागाचे अभियंता आर. के. जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून गिरीजा आणि पूर्णा नदीच्या पात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानाचा अहवाल तयार करण्यात आला असून प्राथमिक अंदाजानुसार बंधाऱ्यांचे ६.५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बंधाऱ्यांच्या दर्जाबाबत अधिकारी गप्प

बंधारे बांधण्यात तांत्रिक चुका असल्याची शक्यता आहे. अनेक बंधाऱ्यांना गेट बसवलेले नव्हते. काही ठिकाणी तर अर्धवट गेट बसवले होते. पूर येण्यापूर्वी बंधाऱ्यांची स्थिती नेमकी काय होती, या बाबतीत कुणीही अधिकारी बोलायला तयार नाही. जिल्हा परिषदेचे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता माकू यांनी यासंदर्भात कनिष्ठ अभियंत्यांकडून अहवाल मागितला आहे.

खडकपूर्णा धरण भरले

पूर्णा नदीला मिळणाऱ्या केळणा, गिरीजा आणि धामना या सर्व नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे धरण पूर्ण भरले आहे. या धरणाचे बॅकवॉटर सुमारे पंचवीस किलोमीटर मागे असलेल्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहराला वळसा घालून केळणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात साठले आहे. असे पाणी या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा बघितल्याचे सांगितले आहे.

कसे लक्षात आले?

अतिवृष्टीनंतर नद्यांना पूर आला. नद्यांचे पाणी ओसरू लागल्यानंतर झालेल्या नुकसानाची कल्पना येत आहे. नदीकाठावरील शेतजमिनींचे नुकसान झाले असून काही विहिरीदेखील गाळाने पूर्णपणे बुजल्या गेल्या आहेत.

हे बंधारे वाहून गेले

तांदुळवाडी, सिरसगाव मंडप, जैनपूर कोठारा, केदारखेडा, नळणी, तडेगाव, वाहेगाव (पूर्णा नदीपात्र, भोकरदन)

वजीरखेडा, सिरसगाव वाघ्रुळ, बोरगाव तारू, विटा (गिरीजा नदीपात्र, भोकरदन)

लिंगेवाडी (केळणा नदी, जाफराबाद)

बोरखेडी गायके (पूर्णा नदीचे पात्र, जाफराबाद) वाडी खु., सेवना, बोरगाव अर्ज, लिमखेडा (गिरीजा नदीपात्र, फुलंब्री)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिंत बांधकामात गैरव्यवहाराचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य व भाजप अल्पसंख्य आघाडी जिल्हा चिटणीस, फिरोजखाँ पठाण यांनी केला आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सोयगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. गेल्या आठवड्यात वाघूर नदीला आलेल्या संरक्षक भिंत पडली आहे.

फर्दापूर येथील ग्रामपंचायतीतर्फे बीआरजीएफ योजनेतून २०१४-१५मध्ये स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधणे, ओटा बांधून त्यावर पत्र्याचे शेड बांधण्याकरिता सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता यांनी अनधिकृतपणे वाघूर नदी पात्रातील जागेचा नमुना नंबर आठ काढून घेतला. तेथे नदीतील मातीमिश्रित वाळू वापरून पाया न खोदता संरक्षक भिंत बांधली. ओटा व पत्र्याचे शेड बांधले नाही, परंतु एम.बी. न भरताच रक्कम उचलून घेतली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आमदारांकडून पाहणी

आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित भागांचा सोमवारी (२१ सप्टेंबर) दौरा करून पाहणी केली. फर्दापूर येथील वाघूर नदीवरील वाहून गेलेला पूल, पुरामुळे पडलेली स्मशानभूमीची संरक्षक भिंत, पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. सोना नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या सोयगाव, आमखेडा, गलवाडा, सोनसवाडी या गावात पाणी करून नुकसानीचा अंदाज घेतला. आपद्ग्रस्तांना मदत मिळवून देण्याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत फर्दापूरचे उपसरपंच शेख सत्तार शेख मुन्शी, विलास वराडे, रवींद्र बावस्कर, रशीद पठाण, बबलू शेठ, सत्तार शहा, योगेश महाकाळ, गणेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगाराचा मृतदेह नदीकाठी सापडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

पंढरपूर वळदगाव येथील पुरात वाहून गेलेल्या कामगारांचा मृतदेह वाळूजपासून १५ किलोमीटर अंतरावरील पिंपरखेडा येथे खामनदीच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत सापडला.
त्यांच्या अंगावरील कपड्यावरून हा मृतदेह राजा राधेश्याम आडकणे ( वय २६, रा. इंदिरानगर, पंढरपूर, मूळ रा. रामपायली जि. बालाघाट, मध्य प्रदेश) असल्याची ओळख पटवण्यात आली. मृतदेह पाच दिवस पाण्याखाली असल्याने कुजला होता. त्याच्यावर जागेवरच पोस्टमार्टेम करून अंत्यसंस्कार करण्यात आले. हा कामगार १८ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरात वाहून गेला होता. एक कामगार पुरामध्ये वाहून गेल्याची वाळूज व परिसरात जोरदार चर्चा होती, पण नाव माहिती नसल्याने नागरिकांनी अफवा समजून त्याकडे दुर्लक्ष केले होते. स्थानिक नागरिक नसल्याने त्याबद्दल जास्त चर्चाही झाली नाही. हा कामगार बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्या अनुप भैय्यालाल मेश्राम यांनी ओळख पटवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव वीजबिलांचा वडगावकरांना झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

दरमहा सुमारे ४०० ते ५०० रुपये येणारे वीजबिल या महिन्यात थेट १८ ते २० हजार रुपये आल्याने वडगाव कोल्हाटी येथील नागरिक वैतागले आहेत. वाढीव बिलाबद्दल येथील महावितरण कार्यालयात मंगळवारी अभियंत्यासा घेराव घालून जाब विचारून दुरुस्तीची मागणी करण्यात आली.

वडगाव कोल्हाटी येथील गंगोत्री पार्क, सलामपुरा आदी परिसरातील अनेक वीज ग्राहकांना महिन्याकाठी येणार्या वीज बिलात मोठी वाढ झाली आहे. घरघुती वीज कनेक्शन असूनही कांताबाई सोमासे यांना २०,६९० रुपये बिल मिळाले आहे. निर्मला मतसागर यांना ९,८६० रुपये, वर्षा भवर यांना ६,५४०, असे अव्वाच्या सव्वा बिल आले आहे. वाढीव बिले मिळाल्याने सुमारे ५० महिलांनी मंगळवारी शाखा अभियंता ए. टी. घुले यांना घेराव घालत वीज बिल दुरुस्त करून देण्याची मागणी केली. आपली मागणी रास्त असून, याबाबत तोडगा काढू, असे सांगून घुले यांनी काढता पाय घेतला. यावेळी व्दारका खेडकर, शोभा लोमटे, लक्ष्मी राजगुरू, ज्योती ठाकरे, अर्चना डोंगे, अनिता त्रिभूवन, विश्वनाथ वाडेकर, नागोराव ठोंबरे, देवराव साळवे आदी ग्राहकांनी तक्रार केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images