Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दहा टक्के मद्यपींमध्ये ‘अल्कोहोल डिपेन्डन्स’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार (अल्कोहोल डिपेन्डन्स) आहे आणि या आजाराचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या आजारावरील उपचारांचा खर्च दारूच्या तुलनेत एक चतुर्थांश असूनही एक-दोन टक्क्यांपेक्षा कमीजण या आजारावर उपचार घेतात.

विविध उपचारांनी ६० टक्के मद्यपी व्यसनाच्या आजारापासून मुक्त होऊ शकतात, तर अनेकजण सुसह्य जीवन जगू शकतात. व्यसनांचे प्रमाण वाढत असताना व व्यसन करणाऱ्यांचे वय कमी होत असताना उपचार घेण्याबाबत कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. महात्मा गांधी जयंतीनिमित्त तसेच मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त गुरुवारी (एक ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत शांती नर्सिंग होमचे प्रमुख डॉ. विनय बाऱ्हाळे, डॉ. विनय पाटील, प्रशासकीय अधिकारी सई चपळगावकर यांनी विविध निरीक्षणे नोंदविली. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) परीक्षणानुसार, भारतातील ८० ते ९० टक्के व्यक्तींनी आयुष्यात कधी ना कधी दारू घेतलेलीच असते व त्यातील १० ते १५ टक्के लोकांना 'अल्कोहोल डिपेन्डन्स' हा आजार होतो. महाविद्यालयीन जीवनात युवकांमध्ये मद्यपान सुरू होते व तिशी-पस्तीशीत तरूण व्यसनी होऊन जातो. अलीकडे तर १५-१६ वर्षातील मुलांमध्ये व महिलांमध्येही मद्यपान वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांनी फार पूर्वीच 'दारूचे व्यसन हा समाजाचा कॅन्सर' असे म्हटले होते. 'डब्ल्यूएचओ'ने आरोग्याची व्याख्या 'मेंटल, फिझिकल, सोशल, स्पिरिच्युएल वेलबिंग' अशी केली आहे; परंतु मद्यपानाच्या व्यसनामुळे मानसिक, शारीरिक, सामाजिक, अध्यात्मिक असे सर्वांगीण आरोग्य बिघडते; किंबहुना आयुष्य उद्ध्वस्त होते म्हणून मद्यपानाच्या व्यसनाला मानसिक आजार म्हटले जाते. दुर्दैवाने शासकीय यंत्रणेमध्ये व्यसनमुक्तीसाठी फारसे काही होताना दिसत नाही व जनतेमध्येही उपचार घेण्याबाबत जागृती नसल्याची टीका डॉ. बाऱ्हाळे यांनी केली.

युवकांसाठी आज स्पर्धा

युवकांमध्ये जागृती वाढावी म्हणून शांती नर्सिंग होमच्या 'मित्र ग्रुप'तर्फे आंतर-महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा होत आहे. 'दारूबंदी कायदाः व्यसनमुक्तीचा एकमेव उपाय' या विषयावर नुकतीच प्राथमिक फेरी झाली व शुक्रवारी (दोन ऑक्टोबर) महसूल प्रबोधिनीत सायंकाळी पाचला 'दारूच्या व्यसनासाठी समाज व संस्कृती जबाबदार आहे' विषयी पाच महाविद्यालयांमध्ये अंतिम स्पर्धा होईल. माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल, असेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुस्तकातून समजलेले बापू...!

$
0
0

९८ कैद्यांनी दिली गांधी विचार परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गांधीजींनी स्थापन केलेला पहिला आश्रम कोणता, गांधीजींचे जन्मस्थान कोणते, गांधीजींना कोणत्या रेल्वेस्थानकावरून धक्के मारून उतरविण्यात आले, अशा प्रश्नांमधून पुस्तकातून समजेलेले गांधी विचार कैद्यांनी गुरुवारी उत्तरपत्रिकेत उतरविले. औचित्य होते महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधी विचार परीक्षेचे.

हर्सूल कारागृहातील ९८ कैद्यांनी ही परीक्षा दिली. यात २३ महिलांचा समावेश होता. शिक्षा संपल्यानंतर समाजात वावरताना त्यांच्यात परिवर्तन व्हावे, अहिंसेचा मार्ग अवलंबवावा या हेतूने ही परीक्षा घेण्यात आली. देवगिरी कॉलेज गांधीयन अध्यासन केंद्र आणि सर्वोदय मंडळ, मुंबई यांच्यातर्फे परीक्षेचे तीन स्तरावर आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता ५ ते ७ पर्यंत शिक्षण झालेल्या कैद्यांनी 'गांधी बापू', ८ ते १० शिक्षण झालेल्यांनी 'माझी जीवनकथा' तर ११ ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेतलेल्यांनी 'संक्षिप्त आत्मकथा' पुस्तकावर आधारित परीक्षा घेण्यात आली. ८० प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका ८० गुणांची होती. प्रश्नपत्रिका हाती पडताच कैदी प्रश्नपत्रिका सोडण्यात मग्न झाले. त्यांना एक तासाचा कालावधी देण्यात आला.

सकारात्मक विचार ठेवा - लक्ष्मण गोळे

गुन्हेगारीतून गांधी विचाराकडे प्रवृत्त होऊन जीवन जगणाऱ्या लक्ष्मण गोळे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 'हिंसेने कोणते प्रश्न सुटत नाहीत. अहिंसेचा मार्गच योग्य आहे. कारागृह अधीक्षक विनोद शेकदार, अॅड. मोहन सावंत, डॉ. उत्तम पांचाळ, कारागृह उपअधीक्षक राणी भोसले यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० कोटींचे व्यवहार तुंबले!

$
0
0

चक्काजाम आंदोलनामुळे परराज्यात जाणाऱ्या ट्रक प्रवासाला ब्रेक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे गुरुवारी जिल्ह्यातील ३० कोटींचे व्यवहार तुंबले. टोल आणि टीडीएस रद्द करा, या मागणीसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे.

औरंगाबादमधून गुजरात, हरियाणा, राजस्थान, दिल्ली तसेच अन्य भागात जाणाऱ्या ट्रकची वाहतूक थांबली होती. यामुळे शहरातील किमान ७०० ट्रक औरंगाबाद, वाळूज, पंढरपूर अशा विविध ठिकाणी थांबले होते.

वाळूजमधील ट्रक ‌टर्मिनलवर राजस्थान, गुजरात आणि अन्य भागातून आलेल्या वाहतूकदारांना थांबावे लागले. या ट्रक टर्मिनलला औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे एम. जी. इरफान, एजाज खान, युसूफ खान, वेदप्रकाश, आर के सिंग, जयकुमार थानवी, राजू घोडे यांनी भेट देऊन ट्रक चालकांना चक्का जाम आंदोलनाचे महत्त्व समजावून सांगितले. मात्र, औरंगाबाद-पैठण,

औरंगाबाद-नगर, औरंगाबाद-चाळीसगाव या रस्त्यावरून राज्यांतर्गत चालणारी ट्रक वाहतूक सुरू होती. तर, जालन्यातील वाहतूकदारांनी दुपारपासून या संपात भाग घेतला.

मालाची सुरक्षितता

परराज्यातून येणारा माल, परराज्यात माल भरून निघालेले ट्रक वाहतूकदार सुरक्षित जागा पार्क करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी दिवसभर ट्रक वाहतूक सुरू होती, अशी माहिती औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्टचे एजाज खान आणि युसूफ खान यांनी दिली. शुक्रवारपासून ही वाहतूक बंद होईल आणि आंदोलन तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला.

आम्ही तीन दिवसांपासून भाडे मिळेल म्हणून थांबलो होतो. आज भाडे मिळाले, पण चक्का जाम आंदोलन सुरू झाले. आता आंदोलन थांबण्याची वाट पहात आहोत.

- बालाभाई मकवाना,

ट्रक चालक, गांधीधाम-गुजरात

ट्रक संपाचा पहिला दिवस आहे. ट्रक चालकांनी स्वतःची व्यवस्था केली आहे. संप वाढल्यास थांबलेल्या ट्रक चालक आणि त्यांच्या सोबत सहाय्यकाला जेवणाचीही व्यवस्था करावी लागेल.

-एस.पी. मिश्रा, पे अॅण्ड पार्क प्रतिनिधी

टोलमुळे वाहतूकदारांचे नुकसान होत आहे. पैसा शासनाच्या तिजोरीत जमा होत नाही. जनतेसाठी हे आंदोलन आहे. सत्तर टक्के बंद होता. तीस कोटींचा व्यवहार ठप्प झाला.

- फैय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तस्करी अंमली पदार्थाची

$
0
0

Ravindra.Taksal@timesgroup.com

गांजा, मॅफेड्रॉन (एम.डी), कोकेन या अंमलीपदार्थांच्या तस्करीसह नशा आणणाऱ्या औषधांची शहरात बेकायदा विक्री होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. एका परदेशी नागरिकांसह अन्य काही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात, पण, हा प्रश्न पूर्णतः निकाली निघू शकलेला नाही. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांना अधिक दक्ष व्हावे लागणार आहे. अन्यथा असे अंमली पदार्थ सहजरित्या उपलब्ध झाल्यास तरुणवर्ग व्यसनाच्या विळख्यात सापडेल. परिणामी गुन्हेगारीवृत्तीलाही खतपाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही.

हर्सूल परिसरातील जहांगीर कॉलनी येथे काही दिवसापूर्वीच दोन गटात हाणामाऱ्या झाल्या होत्या. यातील काहीजण गांजाच्या नशेमध्ये होते, अशी माहिती तपासात उघड झाली. गांजावर बंदी असतानाही तो शहरात कसा उपलब्ध होतो, असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. नाकाबंदी, पोलिसांची पेट्रोलिंग यासह सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात असतानाही शहरात रेव्ह पार्टीसाठी वापरले जाणारे मॅफेड्रॉन (एम.डी) तसेच कोकेन यासह अन्य अंमली पदार्थांची तस्करी होत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने निश्चितच ही बाब अत्यंत गंभीर आहे.

१३ सप्टेंबर रोजी चिकलठाणा येथील बलबीर हॉटेलसमोर छापा मारून ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ८० हजार रुपयांचे कोकेन जप्त केले. गोपाळ उर्फ गौरव हरी शर्मा, त्याचा भाऊ आणि राजाबाजार येथील सुमीत जैस्वाल या तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सिडको येथील एन-१ भागातील उच्चभ्रू वसाहतीतून शर्मा हे रॅकेट चालवित असे. रेव्ह पार्टीत वापरल्या जाणाऱ्या मॅफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाचा सुमारे २२ हजार रुपये किंमतीचा साठी त्याने अवैधरित्या घरात दडवून

ठेवला होता. या अंमली पदार्थांचा पुरवठा मुंबई येथे राहणाऱ्या चुकावू अलॅय इमॅन्यूएल नामक नायजेरियन करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यालाही मोठ्या शिताफीने अटक केली. पोलिस कारवाईमुळे निश्चितच काही प्रमाणात या नशेखोरीला ब्रेक लागला असला तरी अन्य अंमली पदार्थाची होणारी तस्करी व बेकयाद विक्री पूर्णतः थांबविणे पोलिसांसमोरील एक मोठे आव्हान आहे.

नायट्रोसन-१० या नशा आणणाऱ्या गोळ्यांचीही शहरात मोठ्या प्रमाणात छुपी विक्री होत असल्याची ओरड आहे. गारखेडा परिसरात या गोळ्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सज्जावर खान ऊर्फ सज्जू नवाजखान व सय्यद मुख्तार सय्यद सत्तार या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी काही दिवसापूर्वीच जेरबंद केले.

या आरोपींकडे तब्बल १४० गोळ्या आढळून आल्या. असाच साठा शहरातील अन्य भागातही गेल्या काही महिन्यात सापडला. औषध विक्रीचा कोणताही परवाना नसतानाही या आरोपींकडे एवढ्या प्रमाणात औषधांचा साठा कुठून आला ? याचा खोलवर तपास पोलिसांनी करणे आवश्यक आहे. केवळ एक-दोन आरोपी पकडून चालणार नाही, तर ही साखळी तोडणे, त्यांच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे.

अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यात प्रामुख्याने तरुणच पुढे असल्याचे दिसते. त्यातही उच्चभ्रू वर्गातील तरुण अशा अंमली पदार्थांच्या सेवनाकडे ओढले जातात. देशाचे भविष्य असलेली ही तरुणाई अशी नशेच्या विळख्यात सापडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसून या अवैध धंद्याची पाळेमुळे उखडून फेकलीच पाहिजेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसच खंडणीबहाद्दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको वाहतूक शाखेच्या जमादारासह इतर तिघांवर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंटणखान्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्यांनी ७५ हजार रुपये खंडणी मागितली होती. यापैकी ४० हजार रुपये व मोबाइल ‌त्यांच्याकडून घेण्यात आला होता. तीन तरुणांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून जमादाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

तीन महिन्यांपूर्वी सातारा परिसरात कुंटणखाना उद््ध्वस्त करण्यात आला होता. तुषार राजपूत या कुंटणखाना चालकाला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील तक्रारदार आ‌काश तिडके हा दोन महिने राजपूतकडे नोकर म्हणून कामाला होता. दरम्यान, राजपूतला अटक झाल्यानंतर जमादार दीपक ससाणे पप्पू उर्फ विजय नथ्थू सोळुंके, गणेश सोमीनाथ बनकर व मंगेश निमकर (सर्व रा. अजबनगर) यांनी आकाशशी संपर्क साधला. त्याला सोबत नेत मारहाण करण्यात आली. तसेच त्याला या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ७५ हजाराच्या खंडणीची मागणी करण्यात आली. यापैकी त्याच्याकडून ४० हजार खंडणी आरोपींनी उकळली होती. त्याचा मोबाइल आरोपींनी स्वतःकडे ठेवून घेत त्याला पुन्हा पैशांची मागणी केली होती. या प्रकारामुळे आकाश घाबरून बाहेरगावी गेला होता. त्याला फोनवरून ससाणे व साथीदारांनी धमक्या देत शिवीगाळ केली होती. तसेच मोबाइल परत करण्यासाठी पंधरा हजाराची मागणी केली होती. वारंवार होत असलेल्या मारहाणीमुळे आकाशने बुधवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत हा प्रकार सांगितला. आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

क्रांतिचौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपी पप्पू सोळुंके, गणेश बनकर व मंगेश निमकरला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक जहारवाल या प्रकरणी तपास करीत आहेत.

ससाणेची चौकशी

पोलिस जमादार दीपक ससाणे याने क्राईम ब्रँच तसेच क्रांतिचौक पोलिस ठाण्यात काम केले आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी ससाणेची चौकशी केली. या प्रकरणी त्याची अधिक चौकशी करण्याचे काम सुरू असून त्यानंतर त्याला अटक करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षात पोलिसांवर दहा हल्ले

$
0
0

रस्त्यांवरील घटनांपासून पोलिस ठाण्यातील गोंधळाचाही समावेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी रिक्षाचालकाच्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांवर हल्ला होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या नऊ महिन्यांत आतापर्यंत पोलिसांना दहा वेळा हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. किरकोळ कारणावरून असे प्रकार घडल्याचे काही अलीकडच्या काळातील काही घटनातून दिसून येते. यामध्ये रस्त्यावरील मारामारीपासून ते पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याच्या घटनांचा समावेश आहे.

या सर्व घटना पाहता यामध्ये पोलिसांची जास्त चूक दिसून येत नाही. आपले कर्तव्य बजावणे त्यांना महागात पडले आहे. या घटनांमध्ये शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊन आरोपींना अटक करण्यात आली. कर्मचाऱ्यांशी केलेल्या चर्चेनुसार नागरिकांना कायद्याचे पालन करणे चुकीचे वाटते. वाहतूक पोलिसांना हा अनुभव हमखास येतो. कोणाची दुचाकी पकडल्यास एखाद्या राजकीय नेत्याला क‌िंवा तथाकथित भाऊ, दादाला फोन लावण्यात येतो. अशावेळी दुचाकी सोडल्यास त्या वाहनधारकाची शिरजोरी वाढते व यातूनच पुढे पोलिसांसोबत वादावादीचे प्रकार घडतात.

जनजागृती प्रभावहीन

पोलिसांच्या वतीने व वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीचे नियम पालनाबाबत वारंवार जनजागृती करण्यात येते. रिक्षाचालक मालक संघटनांच्या बैठक घेण्यात येतात. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येते, मात्र या जनजागृतीचा परिणाम होत नसल्याचे या घटनांवरून दिसून येते.

१० जुलै २०१५

मोंढा नाका चौकात वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी शेख रज्जाक कर्तव्य बजावत होते. यावेळी हाजी अली इद्रीस आली हा दुचाकीस्वार राँगसाईड जात होता. शेख रज्जाक यांनी त्याला प्रतिबंध केला असता त्याने पोलिसांवर हात उचलला. क्रांतिचौक पोलिस ठाण्याच्या पीएसआय मयुरी पवार पैठणगेट परिसरात रात्रीच्या सुमारास गोंधळ घालणाऱ्या जमावाला आवरण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांच्यासोबत धक्काबुक्की करीत जमावाने शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

१० ऑगस्ट - ७ सप्टेंबर

वाहतूकशाखेचे कर्मचारी श्रीराम बदने क्रांतिचौक उड्डाणपुलाखाली कर्तव्य बजावत होते. यावेळी भाजपाचे स्विकृत सदस्य कचरू घोडके राँग साईडने जात होते. त्यांना मज्जाव केला असता बदने यांना धक्काबुक्की करीत त्यांचा मोबाइल घोडके घेऊन गेले. क्रांतिचौक पोलिस ठाण्यात जमादार गोपाळ सोनवणे ठाणे अंमलदार म्हणून काम करीत होते. सोमेश बनसोडे या आरोपीने मद्यधुंद अवस्थेत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या कारणावरून गोंधळ घालत सोनवणेला शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

वाहतूक पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रकार जास्त आहेत. मुळात वाहनधारकांनी नियमांचे पालन केल्यास वादाचे प्रकार घडणार नाही.

- वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त

रेल्वे स्टेशन येथे घडलेली घटना पूर्वनियोजित दिसून येते. शहराला शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या कारवायांमुळे रोष निर्माण होऊन असा प्रकार घडू शकतो.

- दीपकसिंह गौर, माजी सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सरसावले हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाची धग बसलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहरात शिकणे कठीण झाले आहे. शुल्क आणि मेसचे पैसे भरणे शक्य नसल्याने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, श्रेयनगर येथील सुसंदेश गणेश मंडळ मदतीला धावले अन् दोघांचा शिकण्याचा मार्ग सुकर झाला. या विद्यार्थ्यांना गुरुवारी (१ ऑक्टोबर) आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

दुष्काळाची वाढती तीव्रता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडसर ठरत आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधील संदीप जाधव व विशाल शिंदे या दोन विद्यार्थ्यांनाही परिस्थितीचे चटके बसले. भिरडा (जि. हिंगोली) येथील संदीपली वडील नाहीत. आई शेतमजूर आहे. रेणापूर (जि. लातूर) येथील विशाल शिंदे याचे वडील अंध असून, मोठा भाऊ शेती करतो. घरून पैसे मिळणे बंद झाल्याने शिक्षण अर्धवट सोडून दोघे गावी परतण्याच्या विचारात होते. या संकटात असतानाच झांबड इस्टेट येथील सुसंदेश गणेश मंडळ त्यांच्या मदतीला धावले. गणेशोत्सवात खर्च टाळून विधायक काम करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. याअंतर्गत संदीप जाधव व विशाल शिंदे यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. रेणुकामाता मंदिर परिसरात झालेल्या कार्यक्रमाला नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, सागर वाडकर, राधेश्याम तिवारी, मनोज सकलेचा, डॉ. राधा बंग, सीमा यादव, शोभा तिवारी, स्मिता डोंगरे, मीना सोनी यांच्यासह 'पॉलिटेक्निक कॉलेज'चे प्रा. रवी कोरडे, रमेश राऊत उपस्थित होते.

आर्थिक मदत स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांना गहिवरून आले. 'कठीण काळात मदत मिळाल्यामुळे आत्मविश्वास दुणावला आहे. नेटाने अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभे राहू,' असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षांत १६०० कोटींची गुंतवणूक

$
0
0

स्मार्ट, सोलार, सेफ, अमृत योजनांचा औरंगाबादला लाभ

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराला येत्या ५ वर्षांत विविध प्रकारच्या ४ योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यातून सुमारे १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. एकाच वेळी चार योजनांचा लाभ मिळणारे औरंगाबाद हे राज्यातील पहिलेच शहर ठरण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबादची निवड झाली. या योजनेत ५ वर्षांत १ हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यात ५०० कोटी रुपये केंद्र सरकारतर्फे दिले जाणार असून, २५० कोटी रुपये अनुक्रमे राज्य सरकार व महापालिकेला द्यावे लागणार आहेत.

केंद्र सरकारच्या 'अमृत' (अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रांसफॉर्मेशन) योजनेतही औरंगाबादचा समावेश झाला आहे. त्याची अधिकृत घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेतील समावेशामुळे शहराला किमान पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ५ वर्षांत ५०० कोटी रुपये मिळणार आहेत.

केंद्र सरकारच्या अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या 'सोलार सिटी' प्रकल्पासाठी औरंगाबादची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी ६६ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. त्यातील सुमारे ४ ते ५ कोटी रुपये शहराला मिळतील, असे मानले जात आहे. शहरातील काही प्रमुख इमारती, उद्याने व हॉस्पिटलमध्ये सोलार सिस्टिम कार्यान्वित केली जाणार आहे.

औरंगाबादचा समावेश 'सेफ सिटी'मध्येही करण्यात आला आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी व छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारने 'सेफ सिटी'ची संकल्पना पुढे आणली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. औरंगाबादसाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी पहिल्या टप्प्यात २ कोटी रुपये मंजूर केले. त्यातून शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. स्मार्ट सिटी, अमृत, सोलार सिटी व सेफ सिटी या योजना सक्षमपणे राबवल्यास ५ वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलेल, असे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंधनावरील एलबीटीचा जाच कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाने पेट्रोल आणि डिझेलवरील स्थानिक संस्थाकर (एलबीटी) रद्द करून, त्याजागी २ रुपये २ पैसे सरचार्ज आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर औरंगाबाद शहरातील पेट्रोल पंपांवर इंधनाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली. त्याबरोबर एलबीटीही वसूल करणे सुरूच आहे. एलबीटी वसूल करणे थांबविण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात इंधन २ रुपयांनी स्वस्त असे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यातील 'ड' वर्ग महापालिकांच्या क्षेत्रात जकात कराऐवजी स्थानिक संस्था कर वसूल केला जात होता. शासनाने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला, मात्र ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना या निर्णयातून वगळले होते. सर्व पेट्रोल पंप ५० कोटी रुपयांच्या मर्यादेबाहेर होते. पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याची मागणी पेट्रोल विक्रेता संघटनेने केली होती. त्यासाठी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबर रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर सरकारसमोरील आर्थिक संकटामुळे इंधनविक्रीवर २ रुपये २ पैसे प्रतिलिटर सरचार्ज आकारण्याचेही त्यांनी जाहीर केले. सरकारच्या निर्णयानंतर औरंगाबाद शहरात पेट्रोल, डिझेल विक्रीवर सरचार्ज आकारणी सुरू झाली, मात्र एलबीटी अा‌णि शहर विकास कराबाबत कंपनीकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवर प्रत्येकी १ टक्का प्रतिलिटर एलबीटी, पेट्रोलवर २ टक्के आणि डिझेलवर ३ टक्के शहर विकास कर वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत पेट्रोलचे दर २ रुपये २ पैसे आणि डिझेलचे दर २ रुपये ५५ पैशांनी जास्त आहेत.

एलबीटी आणि इतर कर याबाबत शासनाकडून निर्देश मिळाले, पण कंपनीकडून त्याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. यामुळे सध्या शहरात सर्व कर लावूनच इंधनाची विक्री केली जात आहे.

- अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोल‌िअम डिलर्स असो‌सिएशन.



असे आहेत दर

सध्याचे दर पूर्वीचे दर

पेट्रोल ६८.३० ६६.२८

डिझेल ५३.२५ ५०.६०

वाळूजमधील इंधनाचे दर

पेट्रोल ६६.९३ ६४.९१

डिझेल ५१.२८ ४९.२६

एलबीटी, शहर विकास कर रद्द केल्यास शहरात पेट्रोल ६४ रुपये ९७ पैसे आणि डिझेल ५१ रुपये २५ पैसे प्रतिलिटर दराने नागरिकांना मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात परतीच्या पावसात नऊ जणांचा मृत्यू

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

मरावाड्यातील अनेक जिल्ह्यांत गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वीज पडल्याने नऊ जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील चौघांचा, उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघांचा तर, बीड, लातूर व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात पुणे, कराड, सांगलीसह अनेक ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान औरंगाबाद शहर व परिसरात गुरुवारी रात्री पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

नांदेड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी झाले. लादगा (ता. मुखेड) येथे वीज पडून साहू नागरगोजे (वय १७) मरण पावला. धानोरा (ता. कंधार) येथील लक्ष्मीबाई राऊलवाड (वय ३५) ही महिला मृत्युमुखी पडली. कुंडलवाडी येथे वीज अंगावर पडल्याने बाळू तरारेवार व रवी डुप्परवार या दोघांना जीव गमवावा लागला. जळकोट (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) येथे पावसावेळी वीज अंगावर पडल्याने गुराबाई रामा लोखंडे (वय ४०) यांचा मृत्यू झाला. अन्य चार महिला गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वाशी तालुक्यातील विजोरा येथे गुरुवारी सायंकाळी वीज पडल्याने अंबिका कनिफनाथ यादव (वय ५५) या महिलेचा मृत्यू झाला. तळणी (ता. औसा) येथील सालगडी राजेंद्र कांबळे (वय ४८) यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. उपळी (ता. वडवणी, जि. बीड) येथील शेख हबीब शेख सय्यद (वय ६५) यांच्या अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातील मृताचे नाव समजू शकले नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, वाशी तालुक्यात गुरुवार दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे ओढ्याला पूर आला. लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यासोबतच बीड जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशीरा पावसाच्या सरी कोसळल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन बिल्डरांविरुद्ध तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झालर क्षेत्रात विनापरवाना बांधकाम आणि प्लॉटिंग करणाऱ्या तीन बिल्डरांविरुद्ध सिडकोने फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यात श्रीग्रुप डेव्हलपर्स, साई प्लॉटिंग सेंटर आणि रेनबो स्कूलचा समावेश आहे.

सिडकोचे मुख्यप्रशासक सुनील केंद्रेकर यांच्या आदेशानुसार सिडकोचे वरिष्ठ नियोजनकार ए. व्ही. उईके, उपनियोजनकार अभिजित पवार यांच्या पथकातर्फे बेकायदा बांधकामे, रेखाकंनाचा शोध सुरू आहे. या तपासणीत अश्रफपूर शिवारातील गट क्रमांक आठ येथे पथकाने स्थळ पाहणी केली. यात साई प्लॉटिंग सेंटर फर्मने कोणत्याही प्रकाराची परवानगी न घेता अनधिकृतपणे रेखांकन करून प्लॉटिंग केल्याचे आढळले. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम (एमआरटीपी) १९६६ च्या कलम ५४ अन्वये अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत संबधितांस १ सप्टेंबर २०१५ ला नोटीस बजावली होती. मात्र, निर्धारित वेळेत कोणताही खुलासा, उत्तर दिले नाही. सांवगी शिवारातील गट क्रमांक १७६ मध्ये श्री ग्रुप डेव्हलपर्सतर्फे तर, गट क्रमांक १९४ मध्ये रेनबो स्कूलने विनापरवानगी बांधकाम सुरू केल्याचा दावा पथकाने केला आहे. पिसादेवी शिवारातील गट क्रमांक ८४मध्ये श्री. जी. बिल्डर्सतर्फे उभारण्यात येत असलेल्या रो-हाऊस प्रकल्पाचे बांधकामही विनापरवाना आहे. त्यामुळे सिडकोने पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.

अजून कारवाई नाही

फुलंब्री पोलिस ठाण्यात यापूर्वीच जगदंब गृहसंकुल तसेच प्रगती प्रॉपर्टी या विकसकांविरुद्ध सिडकोने तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने हे प्रकरण तर पोलिस गांभीर्याने घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील इतर चार विकसकांना दोन दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आली आहे.

...ही कामे अनधिकृत

औरंगाबादलगत असलेल्या बाळापूर, गांधेली, झाल्टा, सुंदरवाडी, हिरापूर, फत्तेपूर, रामपूर, सुलतानपूर, कच्चीघाटी, मल्हारपूर, मांडकी, पिसादेवी, गोपाळपूर, कृष्णापूर, तुळजापूर यासह २८ महसुली गावातील झालर क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाने २००६ सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. या झालर क्षेत्रात सिडकोची परवानगी न घेता होणारी विकास कामे अनधिकृत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लढ’ म्हणण्यास ‘सर’ सरसावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबू नये म्हणून शहरातील काही शिक्षक एकत्र आले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या २५ विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा संकल्प केला आहे.

दुष्काळामुळे घरून येणारे पैसे बंद झाल्याने विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी रुपेश मोरे आणि राजेंद्र वाळके हे दोन शिक्षक मदतीसाठी सरसावले.

त्यांनी आपल्या मित्र परिवारातील २५ जणांना एकत्र केले. त्यांच्या मदतीने शहरातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा संकल्प केला. २५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत या शिक्षकांचे 'पसायदान प्रतिष्ठान' करणार आहे. २५ विद्यार्थ्यांमध्ये अकरावीपासून ते संशोधक, मेडिकल, इंजिनीअरिंग आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समोवश आहे. येत्या रविवारी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या मदतीचे वितरण करण्यात येणार आहे.

सिनेअभिनेते सचिन खेडेकर, विजयअण्णा बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून वि‌िवध सामाजिक संघटना पुढाकार घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांची एकजूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचे फक्त राजकारण केले आणि युती सरकार आरक्षणासाठी न्यायालयात पाठपुरावा करीत नाही. मराठा समाजाची कुचंबणा थांबवून आरक्षणाचा तिढा लवकर सोडवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीने केली. या मागणीसाठी समितीने गुरुवारी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला.

गुजरातमध्ये पटेल आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवून सरकारने आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी विद्यार्थी कृती समितीने केली. या मागणीसाठी मराठवाड्यातून आलेल्या जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी क्रांतिचौक ते विभागीय आयुक्तालय मोर्चा काढला. बैलगाडीवर बसून अविनाश खापे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. दुपारी तीननंतर मोर्चा आयुक्तालय परिसरात पोहचला. यावेळी छोटेखानी सभा घेण्यात आली. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन विद्यार्थी कृती समितीच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना दिले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर शासकीय वसतिगृह बांधावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची तरतूद वार्षिक दहा हजार कोटी रुपये करावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी सुशील काळे, शुभम राखुंडे, सूरज लहाने, गजानन पाटील, दत्ता हूड, अजित काळे, गोविंद सावंत, भैय्यासाहेब खरात, सचिन कचरे, अभिषेक हंबर्डे, सतीश झिरपे, कार्तिक निर्मळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारकासाठी स्वातंत्रसैनिक कोर्टात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मारकासाठी पुतळा उभारणी करण्याकरिता योग्य जागेची पाहणी करून अंतिम सुनावणीच्या वेळेस कोर्टात माहिती द्यावी, असे अंतरिम आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. बी. चौधरी व न्या. इंदिरा जैन यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांना दिले आहेत.

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्य-कर्तृत्वास साजेसे मराठवाडयातील विभागीय ठिकाणी म्हणजेच औरंगाबादमधील मध्यवर्ती जागेवर स्मारक म्हणून त्यांचा पुतळा उभारावा, एस.एस.सी, सी.बी.एस.सी, आय.सी.एस.ई. या बोर्डातील अभ्यासक्रमात इतिहास विषयातील पाठयक्रमाच्या पुस्तकात हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीचा इतिहास समाविष्ट करावा अशी विनंती करणारी जनहित याचिका रेणापूरचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मुर्गाआप्पा काशीनाथआप्पा खुमसे यांनी केली आहे. ते हैदराबाद मुक्तीसंग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढयात सहभागी झाले होते. कोर्टाने केंद्र शासनाचे मानव संसाधन विभागाचे सचिव, संसदीय कामकाज विभागाचे सचिव, महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागचे सचिव, प्रोटोकॉल विभागचे सचिव, शालेय शिक्षण विभागचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, राष्ट्रीय शिक्षण व संशोधन व प्रशिक्षण परिषद (दिल्ली), महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे), महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे), महाराष्ट्र पाठयपुस्तक निर्मिती अभ्यास संशोधन मंडळ, विभागीय आयुक्त, औरंगाबाद जिल्हाधिकारी व पालिका आयुक्त या प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. केंद्र सरकारतर्फे राहुल बागूल आणि राज्य शासनातर्फे ए. व्ही. देशमुख यांनी ही नोटीस स्वीकारली.

भारताची गौरवशाली परंपरा व देशाचा स्वातंत्र्य लढा नागरिकांना सदा सर्वकाळ प्रेरणादायक राहावा म्हणून स्वामी रामानंद तीर्थाचे स्मारक व त्यांच्या कार्याचा गौरव तसेच हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीचा इतिहास व त्याची उजळणी लोकांना करून देण्यासाठी ही जनहित याचिका करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे सतीश तळेकर हे बाजू मांडत आहेत. त्यांना उमाकांत आवटे, प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे हे सहकार्य करत आहेत. या याचिकेवर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणी होणार आहे.

हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास लोकांपर्यंत न्यावा!

महापुरुषांच्या यादीत स्वामी रामानंद र्तीर्थांच्या नावाचा समावेश करा, राज्यातील व देशातील महापुरुषाच्या यादीमध्ये स्वामीजींच्या नावाचा समावेश करावा, केंद्र व राज्य शासनाने स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे अंशदान पेन्शन स्वामीजींच्या नावाने जाहीर व्हावे अशी विनंती याचिकेत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवन्यात हाणामारी; दोघांविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,सिल्लोड

शिवना येथील आठवडी बाजारात दुकान लावण्याच्या कारणावरून बसस्थानकावर हाणामारी करणाऱ्या दोघांनाविरूद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख माजीद शेख बशीर व पप्पु सखाराम नेमाडे (रा. दोघेही शिवना) यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद होता. हा वाद बुधवारी सायंकाळी विकोपाला जाऊन हाणामारी झाली. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या कारणावरून दोघांना बसस्थानकावरून ताब्यात घेतले. पोलिस कर्मचारी अजय मोतिंगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अध्यक्षपदासाठी गांधी जयंतीदिवशीच तंटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी एकमत न झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे हतनूरमध्ये ग्रामसभा स्थगित करावी लागली. गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये गांधी जयंतीदिवशीच वाद झाला.

कन्नड तालुक्यात नवीन अस्तित्वात आलेल्या ८१ ग्राम पंचायत मध्ये बहुतांश ठिकाणी सत्तांतर झाल्याने तंटामूक्त समितीच्या पदासाठी वाद पेटले आहेत. त्याचा परिपाक हतनूर येथे शुक्रवारी (२ ऑक्टोबर) गांधी जयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभेत आला. कोरम पूर्ण असतानाही ग्रामसभा केवळ गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने स्थग‌ित करण्यात आली. हतनूरच्या सरपंच मंगला काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले यांनी स्वच्छता अभियान २ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यावर चर्चा केली. याबरोबरच अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यावर चर्चा झाली. यांनतर पोलीस पाटील व तंटामुक्त समितीचे सचिव तथा निमंत्रक प्रकाश पवार यांनी निवडीबाबत घोषणा केली व अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली. यामध्ये यापदासाठी दोन उमेदवार इच्छुक असल्यांची घोषणाबाजी सुरू झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यातच राजकीय पदाधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका सोडून महिला पदाधिकाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सरपंच मंगला काळे यांनी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी एकमत होत नसल्याचे लक्षात आल्याने ग्रामसभा स्थग‌ित केल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

चापानेर येथील बाळू किसन थोरात (वय ५७) यांनी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) पहाटे चार वाजता राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. चापानेर शिवारात बाळू किसन थोरात यांची गट नंबर ५२ मध्ये ३७ आर कोरडवाहू जमीन आहे. त्यांच्या नावावर सोसायटी व खाजगी बँकेचे सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज आहे.

गतवर्षी व यंदाही पिकाने हवी तशी साथ न दिल्याने हताश होवून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबात एकूण नऊ सदस्य आहेत. यापूर्वीही चापानेर येथील एका शेतकऱ्याने काही महिन्यापूर्वी आत्महत्या केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना फसवणाऱ्या एकाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

महिला व मुलींना जाळ्यात ओढून वाममार्गाला लावणारे आंतरराज्य रॅकेट उघड झाले आहे. खुलताबाद पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अरविंद पुत्तुलाल राजपूत (वय २१) याला अटक केली आहे. त्याला न्यायाधीश अभय घुगे यांनी ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पार्टटाईम जॉब देण्याचे आमीष दाखवून एका महाविद्यालयीन तरुणीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडण्याचे प्रकरण २४ सप्टेंबर रोजी उघडकीस आले आहे. खुलताबाद पोलिसांनी नारायण निवृत्ती काशीदे (वय ३६, रा. सारोळा ता. वसमत, जि. हिंगोली, हल्लीमुक्काम रांजणगाव ता. गंगापूर) याला अटक केली आहे. त्याच्याकडून मिळेल्या माहितीवरून पोलिसांनी उत्तरप्रदेशात राजपूत याला अटक केली आहे. काशीदे याला पोलिसांनी सापळा रचून खुलताबाद येथे पकडले होते. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे यांच्या पथकाने केला. त्यांनी मोबाइल लोकेशनवरून काशीदेचा साथीदार अरविंद पुत्तुलाल राजपूत याला सजेती जिल्हा आग्रा येथून बुधवारी अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. महिला मुलींना पळवून त्यांना बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणारे हे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही टोळी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राज्यस्थान, महाराष्ट्रात सक्रिय आहे. या टोळीच्या सूत्रधाराचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने नाकारले; गावकऱ्यांनी दिले

$
0
0

लोकवर्गणीतून ७१ हजारांची मदत

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटु्ंबीयांना शासनातर्फे मदत केली जाते. मात्र मदतीसाठीचे निकष पूर्ण होत नसलेल्यांना मदत मिळत नाही. शासनाकडून असेच डावलल्या गेलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना नाटवी येथील गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून ७१ हजार ६०० रुपयांची मदत दिली.

तालुक्यातील नाटवी येथील शंकर महादू दौड (वय ६७) यांचे अजिंठा वनविभागाच्या हद्दीलगत शेत आहे. सततची नापिकी व यंदाचा दुष्काळ यामुळे उरसे सुरले पीक राखण करण्यासाठी ते शेतात जात होते. शेताची राखण करण्यासाठी ते नेहमी प्रमाणे ४ जुलै रोजी रात्री गेले होते. तेव्हा डुलकी लागली, तेवढ्यात निलगाईनी त्यांच्या पाच एकरावरील सोयाबीन व मकाचे पीक खाऊन फस्त केले. उगवलेले पीक नीलगाईंनी खाल्ल्याने आता कसे जगावे, काय खावे याचा धसका दौड यांनी घेतला. त्यांनी गोठ्यात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्याच्या नावावर जमीन नसल्याने ती मदतीकरिता शासकीय निकषात बसली नाही. परिणामी या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे रामदास कालभिले, संजय कालभिले, एकनाथ कालभिले, बाळासाहेब दौड, पंढरीनाथ गव्हांडे, नाना कालभिले आदीसह ग्रामस्थांनी पुढाकर घेऊन गावात लोकवर्गणी जमा केली. लोकवर्गणीतून जमा झालेले ७१ हजार ६०० रुपये नुकतेच या कुटुंबाला देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनधनच्या खात्यांना उदासीनतेचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जनधन योजनेतील बँक खाते सक्रिय न ठेवल्याचा फटका खातेदारांना बसणार आहे. सहा महिने खाते सक्रिय न ठेवल्याने त्यांना रूपे डेबिट कार्ड व पाच हजार रुपयाच्या ओव्हरड्रापला मुकावे लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी 'प्रधानमंत्री जन धन योजने'ची घोषणा केली. या महात्वाकांक्षी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडण्या आली आहेत. या योनजेतील खातेदारांना महिन्यातून एकदा रूपे डेबिट कार्डचा वापर करणे व सहा महिने खाते सक्रिय ठेवणे बंधनकारक आहे. सक्रीय खाते वापरणारे ग्राहक १० टक्केच असल्याचे माहिती येथील बँक अधिकाऱ्यांनी दिली. या ग्राहकांना पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ दिला जाणार आहे. मात्र इतरांना या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे. समाधानकारक खात्याचे व्यवहार असलेल्या खातेदारांना लघु कर्जाची पाच हजार रुपयांची मर्यादाही बँकेकडून वाढवून घेता येऊ शकते. दरम्यान, बँकिग सुविधेपासून वंचित घटकांना सहा पायाभूत निकषांवर १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत समाविष्ट करून घेण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. सध्या तरी खातेदारांच्या उदासीनतेमुळे चांगल्या योजनेचा बोजवारा उडताना दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images