Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

$
0
0

वाळूजः औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पंढरपूर येथील चॉईस हॉटेल समोर घडली.

संतोष रामभाऊ नागरे ( वय २१ रा. बण, ता. शेणगाव, जि. हिंगोली) असे मरण पावलेल्याचे नाव आहे. संतोष हा जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला होता. याबाबत काही जणांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन संतोष यास पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री संतोषचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसात नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहन चोरीच्या शहरात सात घटना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहन चोरानी शहरात धुमाकूळ घातला असून गेल्या तीन दिवसांत विविध भागातून वाहनचोरीचे सात घटना घडल्या आहेत. त्यापैकी गुरुवारी शहरात वाहन चोरीच्या तीन घटना घडल्या. छावणी भागातील आठवडी बाजारातून संतोष बसैये यांची दुचाकी सायंकाळी सातच्या सुमारास चोरीस गेली. छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एन अकरा सिडको येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोरुन फिर्यादी गोपाळ हुलसुरकर यांची दुचाकी ( एम. एच. २० ए.एम ४२६) चोरीला गेली. रामप्रसाद वाकळे यांने दुचाकी ( एम. एच. २० सीबी ३८४२) कॅनॉट गार्डन परिसरात पार्क केली असता ती चोरट्याने लंपास केली.

महिलेस मारहाण

आमच्या विरोधात तक्रार का केली, असे म्हणत एका महिलेस घरात घूसून मारहाण करण्यात आली. छावणी परिसरातील सुभाषपेठ येथे ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून छावणी पोलिस अधिक तपास करत आहेत. नातेवाईक असलेल्या नंदकिशोर संतोष साकल, लक्ष्मीकांत साकल यांच्यासह सातजणांनी घरात प्रवेश करत फिर्यादी व तिच्या पतीला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद केले आहे.

युवकावर चाकूने हल्ला

दारूसाठी पैसे देण्यासाठी नकार देणाऱ्या युवकावर चाकूने हल्ला करत जखमी करण्यात आले. सिल्लेखाना चौकात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. क्रांती चौक पोलिस अधिक तपास करत आहेत. रियाज कुरेशी (वय २२, रा. सिल्लेखाना) असे फिर्यादीचे नाव आहे. वाजेद उर्फ भुऱ्या कदिर कुरेशी ( रा. सिल्लेखाना) याने दारूसाठी पैशांची मागणी केली. नकार देताच त्याने चाकूने हल्ला करत जखमी केले. त्यासोबतच धाक दाखवत खिशातून १ हजार ४०० रुपये काढून घेतले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले.

महिलेचा विनयभंग

पोलिसांत तक्रार का दिली, असे म्हणत घरात घूसून एका ३८ वर्षीय महिलेस मारहाण करून विनयभंग करण्यात आला. हडको एन बारा येथे ३० सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. अमर बालकिसन (वय ३५, रा. मुकुंदवाडी गल्ली नंबर १३) व त्याच्या एक साथीदाराने घरात प्रवेश करत मारहाण व शिवीगाळ केली.

आर्थिक फसवणूक

बहिणीची आर्थिक फसवणूक व छळ केल्याप्रकरणी भावासह तिघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उर्मिला पाटील (वय ६०, रा.शंभुनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. तब्येत ठिक नसल्याने गेल्या काही महिन्यापुर्वी भाऊ विठ्ठल पालवदे यांने घरी राहण्यास नेले. त्यानंतर पाच हजार रुपये व सोन्याची एकदाणी विठ्ठलने काढून घेतली. अपत्य नसल्याने मालकीचे घर भावाचे नावे केले आहे. त्याचे घरभाडेही भाऊ विठ्ठल देत नाही. घरात कोंडून मारहाण करतात, असे उर्मिला यांनी तक्रारीत म्हटले आहे.

विवाहितेचा छळ

दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील सातजणां विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती कोमल सरसे यांच्यासह सासरकडील सातजणांनी दहा लाख रुपये माहेरुन आणावेत, यासाठी शारिरीक व मानसिक छळ केला. पैसे आणल्याशिवाय नांदण्यास नेणार नाही, सोडून देऊ, अशी धमकी दिल्याचे विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून करवाढीचा समाचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

राज्य सरकारने वाढवलेल्या कराच्या रक्कमेतून शेतकऱ्याच्या हितासाठी किती रक्कम प्रत्यक्षात खर्च करण्यात येणार आहे याचा हिशोब सरकारने दिला पाहिजे. राज्यात सध्या मागणी करूनही रोजगार हमी योजनेचे काम मिळत नाही या शब्दात शिवसेनेच्या नेत्या आमदार निलम गोरे यांनी जालन्यात सरकारच्या करवाढीचा समाचार घेतला.

शनिवारी शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली त्यावेळी गोरे बोलत होत्या. मनरेगाची कामे बंद आहेत तर शेतकऱ्यांना कसे काय काम मिळतील ? असा प्रश्न उपस्थित करून मजुरीची मागणी करूनही त्यांना काम मिळत नाही. सरकारने वाढवलेल्या कराची रक्कम तिजोरीत जमा करून ठेऊ नये, त्याचा हिशोब दिला पाहिजे असे त्या म्हणाल्या. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या व्हिसेराची रासायनिक तपासणी अहवाल येईपर्यंत सरकारच्यावतीने मदतीचा हात देण्यासाठी वाट पाहणे हा शेतकरी कुटूंबावर अन्याय आहे, असे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकार सोबत संघर्ष करण्यासाठी सज्ज आहोत असे ते म्हणाले. सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांचे भाषण झाले. प्रस्ताविक जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले.

परभणीचे खासदार संजय जाधव म्हणाले, 'शिवसेनाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात सर्वात प्रथम पुढे आली आहे. औरंगाबादला झालेल्या नाम संघटनेच्या नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या अगोदर आम्हीच घोसाळकर यांची तारीख मागितली होती पण ती मिळायला उशीर झाला. नाहीतरी आम्हीच या विषयात सर्वात पुढे आहोत.'

जालना जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या २८ कुटूंबाला प्रत्येकी पंधरा हजार रुपयांची रक्कम यावेळी देण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार शिवाजीराव चोथे, संतोष सांबरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

औरंगाबादः शहरातील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या छतावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याला मुकामार लागला असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होते आहे. याबाबत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

हा विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नियमित तासिका सुरू असताना, तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. तेथून त्याने खाली उडी मारली. इमारतीच्या परिसरात झाडे असल्याने तो झाडांवर आदळला.विभागातील शिक्षकाच्या त्रासामुळे विद्यार्थ्याने हे पाऊल उचलल्याचे विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, असे काही घडले नसल्याचे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेमके सर्वेक्षण करून आढावा सादर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात १७ व १८ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेती, बंधारे, रस्ते वाहून गेले. त्याचे सर्वेक्षण करून १०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज सादर करण्यात आला आहे. सरकारकडून आपत्ती निवारणातून निधी मागण्यात येणार आहे. प्रत्यक्ष नुकसान किती झाले, हे आताच्या अहवालावरून स्पष्ट होत नाही. परिणामी १०० कोटी रुपयांचे नुकसान नाही. नेमके सर्वेक्षण करून आढावा सादर करावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी दिले.

औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी बागडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलाविली होती. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, उपायुक्त जितेंद्र पापळकर, वर्षा ठाकूर, झेडपी सीईओ सुखदेव बनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर बागडे म्हणाले, 'दोन दिवस झालेल्या पावसानंतर मी काही भागात जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर सरकारच्या विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आणि प्राथमिक अंदाज सादर केला आहे. प्रत्यक्षात एवढे नुकसान झालेले नाही. आपल्याला सरकारकडे मागणी अहवाल सादर करताना नेमकी आकडेवारी सादर करावी लागेल. हा निधी आपत्ती निवारणातून दिला जातो. एखाद्या रस्त्यावरील पूल किंवा काही भाग वाहून गेला असेल, तर सर्वेक्षणातून संपूर्ण रस्त्याची मागणी केली गेली आहे. अशा मागण्यांमुळे मूळ कामासाठी मिळणाऱ्या निधीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महसूल प्रशासनाला पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.'

'कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे याच्या परिसरातील माती वाहून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. काही धरणांमध्ये पाच ते दहा वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे सांडव्याला गळती लागली आहे. यामुळे पाणी वाहून गेले. पुढे अशी अडचण येऊ नये, म्हणून प्रशासनाने प्राधान्याने कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे तसेच धरणांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत,' असे बागडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरुणराजाची हॅट‍्ट्रिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडत असल्यामुळे उत्साहाचे वातावरण असून, या पावसामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी मिटावा, अशी आशा लागली आहे. दरम्यान, विजांच्या कडकटांसह पाऊस होत असून, वीज कोसळल्यामुळे मराठवाड्यात शनिवारी नऊ जणांचा मृत्यू झाला.

गणेश चतुर्थीनंतर पावसाने मराठवाड्यात दडी मारली होती. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पावसाने पुनरागमन केले. औरंगाबादमध्ये शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शहरात पाऊण तास पावसाचा जोर होता. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीचच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा सुटला. तीनच्या सुमारास औरंगाबाद, फुलंब्री, पैठण तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दहाच मिनिटांमध्ये सखल भागात पाणी साचले. दरम्यान, शुक्रवारी रात्री पावसाची रिपरिप कायम होती. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत २७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

विजेचे नऊ बळी

मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये वीज कोसळल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. पैठण तालुक्यामध्ये तीन जणांचा बळी गेला. तालुक्यातील खंडाळा येथील राधा गुंजाळ (वय २७) व खेर्डा तांडा येथील सविता जाधव (वय ३७) यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. चोंडाळा येथे वीज अंगावर पडून विलास हरिभाऊ गायकवाड (वय २२) या युवकाचा मृत्यू झाला. नंदू राम बरडे (वय १८) हा जखमी झाला. वैजापूर तालुक्यातील आघूर शिवारात वीज पडल्याने नितीन कारभिरी सोळसे (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात वीज पडल्याच्या चार घटनांमध्ये चार महिलांचा मृत्यू झाला. पाथरी तालुक्यातील दिवेगाव येथील रंजना साबळे (वय १८) व उज्ज्वला साबळे (वय १८) या दोन मुलींचा मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या. मानवत तालुक्यातील हमदापूर येथे सारिका राऊत (वय ३०) आणि पूर्णा तालुक्यातील खरबडा येथील लक्ष्मी फुगले या महिला वीज पडून मरण पावल्या. अंबड तालुक्यातील खेडगांव शिवारात कृष्णा भाऊसाहेब चव्हाण (वय २०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळ लेण्यांवर दरड कोसळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जागतिक पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या वेरूळच्या १६ क्रमांकाच्या लेणीवर शनिवारी दरड कोसळली. त्यामुळे या लेणीतील हत्तीच्या शिल्पाचे नुकसान झाले असून, यामध्ये तीन पर्यटकही जखमी झाले आहेत. यातील एका पर्यटकाच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नेणाऱ्या लेणींच्या संवर्धनाविषयीच्या अनास्थाच, या वारशाच्या मुळावर उठल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटनाचा जिल्हा अशी ओळख देण्यात वेरूळ लेणींचे महत्त्वाचे स्थान आहे. सुमारे १६०० वर्षे पुरातन असणाऱ्या या वारशाचे संवर्धन करण्याची गरज आहे. मात्र, पुरातत्व खात्याकडून या लेणींकडे पुरेसे लक्ष देण्यात येत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. यातच, शनिवारी दुपारी चार वाजता लेणींवरील डोंगरावरून मोठी दरड कोसळली. ही दरड एका हत्तीच्या शिल्पावर कोसळली आणि त्यात हत्तीच्या शिल्पाचा दर्शनी भागच तुटला. शनिवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होती. ही शिळा अंगावर पडल्यामुळे राजस्थानातून आलेल्या गिरीषदास गुप्ता या पर्यटकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर, अन्य दोन पर्यटक जखमी झाले. दरड कोसळत असताना, या परिसरात ५० पर्यटक होते. सुदैवाने मोठी हानी झाली नाही.

वेरूळची लेणी शिल्पकलेचा अजोड नमुना असून, जागतिक वारशामध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. या डोंगरांमधील झाडांची मुळे शिल्पातील खडकांमध्ये शिरली आहेत. त्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष होत असल्यामुळे ही दरड कोसळल्याचे सांगण्यात येते.

अपघातांनंतरही निष्काळजीपणा

वेरूळ लेणीच्या वरच्या भागामध्ये संरक्षित कठडे नसल्यामुळे वारंवार अपघात होत असतात.

गेल्या आठवड्यात लेणीवरील गवत काढताना पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे.

१६ क्रमांकाची कैलास लेणीवरून पडून हरीण मृत्युमुखी पडले आहे.

लेणीच्या वरच्या भागात बॅरीकेड लावून तात्पुरती संरक्षणाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

लेणीतील पाषाणाची पडझड होत असून, त्याकडेही दुर्लक्ष होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव रेणुकाईत झेंडे काढल्यावरून तणाव

$
0
0

जालना : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील बसस्थानकाच्या परिसरात लावलेले झेंडे काढून फेकण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी समयसूचकता दाखवत परिस्थिती हाताळली, त्यामुळे तणाव नियंत्रणात आला.

पिंपळगाव रेणुकाई येथील बस स्थानक व परिसरात रविवारी झेंडे लावण्यात आले होते. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी झेंडे काढून फेकून दिले. ग्रामस्थांना सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला आणि काही वेळातच गावात सर्वत्रच ही गोष्ट कळाल्यामुळे पाचशे ते सहाशे जणांचा जमाव जमला. या गटनेची माहिती मिळताच, पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बिडवे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलिस निरीक्षक रेंगे पाटील, सहाय्यक फौजदार निंभोरे यांनीही घटनास्थळी भेट दिली. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

पिंपळगाव रेणुकाई गावातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून, खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने जमावाची समजूत काढण्यात यश आले आहे. ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी.

- किरण बिडवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पारध पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाधिका-यांच्या निषेधाचा ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचे टँकर बंद करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे पडसाद लातूर जिल्हा परिषदेमध्ये उमटले. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या निषेधाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्याविरोधातच निषेधाचा ठराव मंजूर करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते.

लातूर जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील सर्व ९८३ गावाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेली आहे. लातूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही पाणीटंचाई आहे. जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसानंतर टँकर बंद करण्याचा निर्णय पोले यांनी घेतला. टंचाई कायम असतानाही, थोड्या पावसानंतर योग्य नसल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच, टँकर बंद करण्याचा निर्णय अयोग्य असल्याची भूमिका लोकप्रतिनिधींकडून घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेनेही जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे गटविकास अधिकाऱ्यांना टँकर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी भारत गोरे यांनी ठराव मांडला. कृषी सभापती कल्याण पाटील यांनी त्याला अनुमोदन दिले. भाजपचे गटनेते रामचंद्र तिरुके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठराव मांडता येत नसल्याचे मत चर्चेच्या वेळी व्यक्त केले.

जिल्हा परिषद ही अंमलबजावणी करणारी संस्था असताना जिल्हाधिकारी निधी वितरीत करीत नाहीत, असा आरोप या वेळी करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निधी न देण्याच्या भूमिकेवर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. पाणी टंचाई निवारण कक्षही हस्तांतरीत करण्याचा उल्लेखही ठराव करण्याची सदस्यांनी मागणी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा पाटील कव्हेकर होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात ‘महानाकाबंदी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना पोलिसांतर्फे शहरात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी महानाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दोनशेहून अधिक वाहनांवर कारवाई करत २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जालना उपविभागातील सदर बाजार, कदीम जालना, तालुका जालना आणि चंदनजीरा या चारही पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन विशेष पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि दहा कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याबरोबरच पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीला दंगा नियंत्रण पथकाचे दोन प्लाटूनही देण्यात आले आहे. शहरातील विविध भागात ही महानाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वाहनांची तपासणी करण्यात आली. चालक परवाना, गाडीचे कागदपत्रे, नंबर प्लेट यासारख्या विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २०५ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन २० हजार ५०० रुपयांचे दंड वसुल करण्यात आले.

सर्वाधिक कारवाई करीत सदर बाजार पोलिसांनी ९६ वाहनांवर कारवाई करून ९६०० रुपये दंड वसूल केला. कदीम जालना पोलिसांनी ३४ वाहनचालकांना ३४०० रुपये दंड ठोठावला. तालुका जालना पोलिसांनी ३९०० रुपये दंड वसूल करीत ३९ वाहनांवर कारवाई केली. तर चंदनझिरा पोलिसांकडून ३६ वाहनांवर कारवाई करीत ३६०० रुपये दंड वसुलण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशीही नाकाबंदी मोहीम राबविण्यात आल्याने वाहनचालकांची भंबेरी उडाली.

अन्यथा परवाना रद्द करणार

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नाकाबंदी मोहिमेमध्ये कारवाई केली जात आहे. वारंवार दंड आकारुनही वाहतूक नियम न पाळणाऱ्या वहंचालकांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालायत पाठविण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा संकुलाच्या इमारतीला उद‍्घाटनापूर्वीच पडले तडे

$
0
0

नांदेड : येथील सिडको भागातील नव्याने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या नवीन इमारतीला उद‍्घाटनापुर्वीच तडे गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी सर्वच अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

हेमंत पाटील यांनी मंगळवारी सकाळी सिडकोच्या क्रीडा संकुलाची पाहणी केली. सुमारे दोन कोटी २१ लाख रुपये खर्चून हे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. मात्र, उद‍्घाटनापूर्वीच या क्रीडा संकुलाला दुरवस्थेने घेरले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यावर, मैदानावरील गवत आठवड्यात न कापल्यास, खासगी कर्मचाऱ्यांकडून गवत काढण्यात येईल आणि अधिकाऱ्यांच्या वेतनातून हा खर्च करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी दिली. क्रीडा संकुलाच्या इमारतीला जागोजागी तडे गेले असल्यामुळेही त्यांनी संताप व्यक्त केला. क्रीडा संकुलासाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र, अधिकाऱ्यांनीही संकुलाच्या कामात लक्ष दिले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकचालकाचा खून; क्लीनरला अटक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील विठ्ठलपूर शिवारात काही महिन्यांपूर्वा झालेल्या एका ट्रकचालकाच्या खूनाच्या आरोपावरून पोलिसांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा येथील सय्यद खलील सय्यद वली (वय २१) याला अटक केली आहे. तो याच ट्रकवर क्लीनर होता. त्याला १४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

विठ्ठलपूर शिवारात आंध्रप्रदेशातील ट्रकचालक जॉन्सन जोसेफ याचा खून झाला होता. संशयित आरोपीच्या शोधात यापूर्वी पोलिस आंध्रप्रदेशात गेले होते, त्यावेळी तो निसटला होता. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर व पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप काळे, सलीम शाह, सूर्यकांत भामटे, विजय जारवाल यांनी सय्यद खलील याला सासूरवाडीतून अट केली. याकामी आंध्रप्रदेश पोलिसांची मदत मिळाल्याचे सांगण्यात आले.

आंध्रप्रदेशात परत जाताना चालक जोसेफ व क्लीनर खलील यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावरून जोसेफचा खून केल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपी’साठी भाजपचे उपोषण

$
0
0

वैजापूरः तालुक्यातील म्हस्की येथे दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या डीपीचे काम करावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे वाहतूक शाखेतर्फे सोमवारी (१२ आक्टोबर) येथील महावितरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी म्हस्की येथे इन्फ्रा योजनेअंतर्गत रामभाऊ डीपी मंजूर करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर महावितरणने डीपीचे काम न केल्याने म्हस्की व परिसरातील गावांना वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. वैजापूर उपविभागात या योजनेअंतर्गत आठ डीपींना मंजुरी मिळाली असून पुढील टप्प्यात म्हस्की गावातील तीन डीपींचे काम करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी म्हस्कीचे सरपंच राजेंद्र सोमवंशी, उपसरपंच युसूफ शेख, शेख गणी बटाटेवाले, संतोष तागड, केतन आव्हाळे, संदीप वाळुंज आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधाऱ्यातून वाहणारे पाणी अखेर थांबले

$
0
0

आठ दिवसांच्या प्रयत्नांना यश

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील बोरगांव अर्ज येथील फुटलेला बंधारा आठ दिवसाच्या परिश्रमानंतर रविवार बुजवण्यात आला. या बंधाऱ्यात पाणी साठवण सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बोरगाव अर्ज येथील बंधारा सप्टेंबरमधील मुसळधार पावसाने फुटला व पाणी वाहून जात होते. या बंधाऱ्याअंतर्गत शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येते व लगतच्या नरला, भावडी, जळगांव मेटे, पिंप्री शेलगांव व बोरगांव अर्ज या गावच्या पाणीपुरवठा विहिरी अवलंबून आहेत. बंधारा बुजवला नसता तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असता.

हा बंधारा ३०० फूट लांब व २०० फूट रूंद असा फुटला होता. येथे शासनातर्फे आठ दिवसापासून दोन पोकलँड, एक बुलडोझर, सात टिप्पर याद्वारे दिवसभर काम करून बंधारा बुजवण्यात आला. काही वेळा तांत्रिक अडचण आल्याने शेतकऱ्यांच्या विनंतीवरून पंचायत समिती सदस्य किशोर बलांडे यांनी दोन पोकलँड व चार हायवा ट्रक उपलब्ध करून दिले. सरपंच रमेश बलांडे, उपसरपंच राजेंद्र ठोंबरे, कृषी उत्पन बाजार समिती संचालक मंगेश मेटे, जळगाव मेटेचे सरपंच पंडित पवार यांच्यासह ग्रामस्थांनी याकामात सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांजणगावातून दुसरा मुलगा बेपत्ता

$
0
0

वाळूज : रांजणगाव शेणपुंजी येथील आणखी एक शाळकरी मुलगा बेपत्ता झाला आहे. यापूर्वी बेपत्ता झालेल्या दहा वर्षाच्या मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही. दरम्यान अमावस्या व पौर्णिमेच्या आसपास मुले बेपत्ता होत असल्याने अनेकांच्या मनात वेगळीच शंका येत आहे.

रांजणगाव शेणपुंजी येथील पवननगरमधील महेश भीमराव बांगर (वय १६) हा शाळकरी मुलगा १० ऑक्टोबरच्या दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर रोजी शुभम बालाजी पटणे (वय १०) हा मुलगा बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. या मुलाची माहिती देणाऱ्यास पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

रांजणगाव शेणपुंजीमध्ये बहुसंख्य वस्ती कामगारांची आहे. कामासाठी आलेले नागरिक मिळेल, तेथे भाड्याने राहतात. रोजंदारी करून पोट भरणाऱ्यांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. या परिस्थितीत मुले बेपत्ता होत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पहिल्या मुलाचे अपहरण झाले तो दिवस पौर्णिमेचा होता, तर दुसर्याचे अपहरण झाले त्यानंतर एक दिवसानंतर अमावास्या होती. त्यामुळे हा प्रकार आघोरी कृत्यासाठी होत आहे का अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गिटारच्या कव्हरमध्ये लपवली तलवार

$
0
0

औरंगाबाद : गिटारच्या कव्हरमध्ये तलवार बाळगून फिरणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्टेशन परिसरातील मंजुळा कॉलनी येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजता ही कारवाई करण्यात आली. मंजुळा कॉलनी परिसरात एक तरूण गिटारच्या कव्हरमध्ये तलवार बाळगून फिरत असल्याची माहिती खबऱ्याने सातारा पोलिसांना दिली होती.

संशयित सोमीनाथ शिवाजी जगदाळे (वय २२ रा. इटखेडा) याने पोलिसांनी हटकल्यानंतर पळ काढला. पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. गिटारच्या कव्हरची तपासणी केल्यानंतर त्यात पावणेतीन फूट लांबीची तलवार आढळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीतही करणार चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फक्त रेल्वे प्रवाशांसाठीच्या पाणी बॉटल विक्रीप्रकरणी नाशिक येथील कोकाकोला कंपनीत चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस खात्यातील सूत्रांनी दिली. जप्त केलेल्या बॅचनंबरचा माल कोणत्या शहरात पाठवला होता, याची माहिती घेतली जाणार आहे. याशिवाय नांदेड आणि मनमाड येथील ड्रिस्ट्रिब्युटर्सचीही चौकशी केली जाणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठीच्या कमी दरातील पाण्याच्या बाटल्यांची शहरात विक्री करून गैरप्रकार केला जात असल्याचे 'म.टा'ने उघडकीस आणले आहे. त्यानंतर एका एका जागरूक नागरिकांने ही बाब पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या समोर मांडली. आयुक्तांच्या आदेशावरून गुन्हे शाखेने ‌लक्ष्मण चावडी येथील हॉटेल स्वीकारचा मालक व व्यवस्थापकाला ताब्यात घेतले होते. त्यांच्या जबाबानंतर क्रांतिचौक पोलिसांनी शनिवारी (१० ऑक्टोंबर) मोंढा नाका येथील किनले कंपनीचा ड्रिस्ट्रिब्युटर रणजितसिंह छाबडा याच्या दुकानावर छापा मारून बाटल्याचे ३५० बॉक्स जप्त केले. तपासासाठी एजन्सीचालक हजर होत नसल्याने क्रांतिचौक पोलिसांनी जप्त केलेल्या मालाचा बॅच नंबर नाशिक येथील कोकाकोला कंपनीला पाठवला असून तो कोणत्या विक्रेत्याकडे पाठवला होता, हा माल रेल्वेसाठी पाठविण्यात आला होता तर तो शहरात विक्री करिता कसा आला, हे प्रश्न विचारण्यात आले आहेत. नाशिक येथे कंपनीत व नांदेड येथील रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.

छाबडा पसारच

रेल्वेच्या पाण्याचा काळाबाजार प्रकरणातील एजन्सीचालक रणजितसिंह छाबडा अद्याप गावाहून परतलेला नाही. त्यामुळे पोलिस त्याचा मोबाइल लोकेशनवरून शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणिताची पायाभूत चाचणी कागदावरच

$
0
0

पहिल्या टप्प्यांतील परीक्षांचा गोंधळ कायम

म. टा. प्रतिनिधी, औरंबाबाद

पायाभूत चाचणी परीक्षेत गणिताच्या प्रश्नपत्रिकांचा गोंधळ अद्यापही कायम आहे. गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकाच न आल्याने शहरातील शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षाच होऊ शकलेली नाही. त्यामुळे पायाभूत चाचणी परीक्षा कागदावर राहिली आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणीसाठी राज्यातील शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. औरंगाबादमध्ये प्रश्नपत्रिकाच उपलब्ध न झाल्याने गणित विषयाचा पेपरच झाला नाही. ३० सप्टेंबरपर्यंत शाळांना परीक्षा घ्यायची होती, त्यावेळीही प्रश्नपत्रिकांचा तुटवडा निर्माण झाल्याने ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परीक्षेची मुदत संपल्यानंतर अद्यापही गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा घोळ संपलेला नाही. प्रश्नपत्रिकाच न मिळाल्याने शहरातील ७५० शाळांमध्ये या विषयाची चाचणी घेण्यात आली नाही. प्रश्नपत्रिका केव्हा येणार, परीक्षा केव्हा घ्यायच्या अन् त्या घेतलेल्या परीक्षा ग्राह्य धरल्या जातील का? असा प्रश्न शाळांना सतावतो आहे. शिक्षण विभागाच्या कारभारामुळे यंदा घेण्यात असलेल्या पायाभूत चाचणी परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

प्रथम संकलित चाचणी दिवाळीनंतर पायाभूत चाचणी परीक्षेत भाषा आणि गणित विषयाच्या परीक्षेचा गोंधळ ऑक्टोबरचा पंधरवाडा आला तरी सुरुच आहे. यानंतर आता प्रथम संकलित चाचणी आणि द्वितीय संकलित चाचणीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार दिवाळीनंतर हा टप्पा होणार आहे. पहिल्याच टप्प्यातील परीक्षेचा गोंधळ अद्याप कायम आहे. याचा गुंता सोडला जावा, अशी मागणी होत आहे.

गणिताच्या प्रश्नपत्रिका अद्याप मिळालेल्या नाहीत, त्या केव्हा मिळणार याचेही काही सांगीतले जात नाही. यामुळे संभ्रमता कायम आहे. याबाबत स्पष्टता असायला हवी.

- सुरेश परदेशी, मुख्याध्यापक, मुकुल मंदिर हायस्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद

$
0
0

औरंगाबादः ऑनलाइन औषधी खरेदी-विक्रीच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने पैठण गेट येथे सकाळी १० वाजता निदर्शने होणार आहेत, असे सचिव दिलीप ठोळे-जैन यांनी कळवले आहे. दरम्यान, अन्न-औषध प्रशासनातर्फे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांतील २२ मेडिकल दुकाने खुली राहणार आहेत. औषधी मिळण्यास अडचण आल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या ९८९२८२७७७३८, ९९८७३३५७१०, ९४२३७३८९२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाण्यात प्लॉटिंग उद‍्ध्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील गट क्रमांक २७७ येथील पटेलनगरात पाडण्यात आलेले अनधिकृत प्लॉटिंग महापालिकेच्या पथकाने मंगळवारी उद‍्ध्वस्त केले. या भागात २० बाय ४० फूट आकाराचे चाळीस प्लॉटस् पाडून दगड रोवण्यात आले होते. अंतर्गत रस्त्यासाठी जागा सोडून त्यावर पथदिवे देखील लावण्यात आले होते.

या अनधिकृत प्लॉटिंगची माहिती मिळाल्यावर पालिकेचे पथक तेथे गेले व संपूर्ण प्लॉटिंग उद‍्ध्वस्त केली. ग्रीनबेल्टवर दीड एकरात हे प्लॉटस् पाडण्यात आले होते, अशी माहिती उपायुक्त रवींद्र निकम यांनी दिली. शेख छोटू शेख मुराद यांनी ही प्लॉटिंग पाडली होती, असे त्यांनी सांगितले. प्लॉटिंग उद‍्ध्वस्त करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी महावीर पाटणी, इमारत निरिक्षक संगेवार, पोलिस निरीक्षक रियाज देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images