Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘बांधकामांची चौकशी करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यानातील पालिकेच्या प्राणिसंग्रहालयात गेल्या तीन वर्षात झालेल्या सर्व बांधकामाची चौकशी झाली करावी. भिंत बांधण्याचे अंदाजपत्रक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून तपासून घ्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी केली आहे. अवास्तव अंदाजपत्रकांमुळे कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंतापर्यंतची कार्यप्रणाली संशयाच्या फेऱ्यात असल्याचे ते म्हणाले.

१५ फुटाच्या भिंतीसाठी पावणे नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रक केल्याचे प्रकरण 'मटा' ने लावून धरले आहे. या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालणार असून वास्तववादी अंदाजपत्रक तयार करा, असे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिल्याची माहिती मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी दिली आहे. त्यासंदर्भात बोलताना समीर राजूरकर म्हणाले, अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रकरणाची निश्चित कालावधीत चौकशी झाली पाहिजे. अवास्तव अंदाजपत्रक तयार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याचे ठरवले आहे, त्यांनी एकतर स्वतः चौकशी करावी किंवा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून चौकशी करून घ्यावी. त्यातून खरे काय ते उघड होईल, असे राजूरकर म्हणाले. अंदाजपत्रक तयार करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता पर्यंतची कार्यप्रणाली महत्वाची असते. अंदाजपत्रक वादात सापडले तर या कार्यप्रणालीवरही संशय येतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन घरफोड्यांत अडीच लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरफोडीच्या दोन घटनांत चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. खडकेश्वर व एन - १ भागात शुक्रवार ते सोमवारच्या दरम्यान या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी सिटीचौक व सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खडकेश्वर भागातील आकृती इनक्लेव्ह हॉटेलच्या बाजूला संजय जग्गनाथ गव्हाणे यांचे घर आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता गव्हाणे पत्नी व मुलासोबत बाहेर गेले होते. यावेळी चोरट्याने त्यांच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. लोखंडी कपाट व लाकडी कपाटाच्या लॉकरमधून चोरट्यांनी आतमध्ये असलेले चार तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख ८० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. गव्हाणे कुटुंब दुपारी साडेबारा वाजता घरी आले असता हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक

शाहेद सिद्दीकी या प्रकरणी तपास करीत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना सिडको एन - १ अे सेक्टर येथे घडली. अतुल श्रीपाल शहा (वय ६८) हे शुक्रवारी रात्री कुटुंबासह बारामतीला गेले होते. सोमवारी रात्री शहा घरी परतले. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील रोख १२ हजार व मंगळसूत्र तसेच चांदीचा डबा असा २३ हजारांचा ऐवज त्यांनी चोरून नेला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन घटनांमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग करण्यात आल्याच्या घटना रोशनगेट व मुकुंदवाडी परिसरात घडल्या. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दहावीत शिकत असलेली पंधरा वर्षांची विद्यार्थिनी रोषणगेट परिसरात ट्यूशनला जाते. बुधवारी ती ट्यूशनसाठी गेली असता आरोपी मोहसीन युसूफखान मिस्तरी (रा. रोशण मशीदजवळ) व त्याच्या बहिणीने तिला आडोशाला नेले. मोहसीन याने एकतर्फी प्रेमातून तिला लग्नाची मागणी घातली. या विद्यार्थिनीने नकार दिल्यामुळे तिचा हात धरून विनयभंग केला. तसेच त्याच्या बहिणीने भावासोबत लग्न कर असे म्हणत शिवीगाळ केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी घटना मुकुंदवाडी परिसरात घडली. या विद्यार्थिनीला १७ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्याने पाठलाग करून अडविण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या पालकांनी विद्यार्थ्याच्या घरी जाऊन हा प्रकार सांगितला असता मुलाच्या पालकांनी त्यांनाच दमदाटी करीत घर जाळण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी गजाआड

सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक रविवारी मध्यरात्री नारेगाव भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांना मनपा शाळेजवळ मोहम्मद इलीयास जहूर (वय ३५ रा. नारेगाव) हा अंधारात लपून बसलेला आढळला. त्याला संशयावरून अटक करण्यात आली असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हाडा कॉलनीतून दुचाकी लंपास

बाबा पेट्रोल पंप परिसरातील म्हाडा कॉलनी येथील लेवी अनिल घोरपडे (वय २६) या तरुणाची दुचाकी (क्रमांक एमएच १२ केआय ६०१७) चोरट्यांनी पळवून नेली. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकृष्ट अन्नप्रकरणी चौकशीचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किलेअर्क येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण देण्याच्या प्रकरणाचे सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मेसमध्ये अत्यंत निकृष्ट अन्न दिले जाते, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यात आंदोलन केले होते. त्याची दखल घेत समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलामुलींची शिक्षणाची व राहण्याची सोय व्हावी, यासाठी समाज कल्याण विभागातंर्गत जिल्ह्यात १७ वसतिगृह चालविण्यात येतात. त्यापैकी चार युनिट किलेअर्क परिसरात असून एक हजार विद्यार्थी क्षमतेचे हे वसतिगृह आहे. याच वसतिगृहात शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावरून वाद पेटला होता. आहारात देण्यात आलेली अंडी तसेच फळे निकृष्ट असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. जेवण करण्यास नकार देत वसतिगृह आवारात त्यांनी आंदोलन सुरू केले होते. सकस अन्न मिळालेच पाहिजे, दोषींवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. तेथील अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले होते.

हे प्रकरण प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त जे. एम. एस. शेख यांनी म्हटले आहे. या चौकशीतून अन्न निकृष्ट असल्याची आमची तक्रार खरी असल्याचे स्पष्ट होईल आणि यापुढे आमच्या वसतिगृहात सकस आहार विद्यार्थ्यांना मिळू शकेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकांना मारहाण करून लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चहा पिण्यासाठी जाणाऱ्या युवकांना भर रस्त्यात मारहाण करून लुटणाऱ्या छावणीतील दोन्ही आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एच. सैय्यद यांनी गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली.

विजेंद्र राजेंद्र बनसोडे (२१, रा. शाक्यनगर, भोईवाडा) याने या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी विजेंद्र बनसोडे हा एक ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मित्र अक्षय बनसोडे, अजय बनसोडे, अक्षय दाणे, धम्मा नररवडे यांच्यासह मध्यवर्ती बसस्थानक ते भोईवाडा रस्त्यावरील हॉटेल मिलन टी हाऊस येथे जात होता. त्याचवेळी हॉटेलमध्ये नेहमी येणारा आरोपी वसीम ख्वाजा कुरेशी (३२), त्याचा भाऊ व आरोपी वाजीद उस्मान कुरेशी (२४) (दोन्ही रा. छावणी) आणि हॉटेल मालकाचा मुलगा शेख रहीम शेख हबीब (रा. गरमपाणी) यांनी जातीयवाचक शिविगाळ करून फिर्यादीसह त्याच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली. समजावण्याचा प्रयत्न केला असता, शेख रहीम सेख हबीब याने फिर्यादीचा चुलत भाऊ अक्षय बनसोडे यास पकडून इतर दोघांनी मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेत आरोपींनी पळ काढला. यातील आरोपी वसीम ख्वाजा कुरेशी व आरोपी वाजीद उस्मान कुरेशी यांना सोमवारी अटक करण्यात आली. दोघांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते, ते कुठे होते याचा तपास करणे, साक्षीदारांचे जबाब नोंदविणे, मुद्देमाल व मोबाईल हस्तगत करणे, आरोपींनी इतर गुन्हे केले आहेत काय, याचा शोध घ्यायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती कोर्टात करण्यात आली असता, कोर्टाने दोन्ही आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रिपलसीट चालकांची पोलिसाला मारहाण

$
0
0

औरंगाबाद : पोलिसाने ट्रिपलसीट पकडल्याने राग येऊन पोलिसालाच तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार मिलकॉर्नर ते बाबा पेट्रोलपंप रोडवर घडला. पोलिस नाईक राजेंद्र भोसले यांना एका दुचाकीवर तीन तरुण जाताना दिसले. त्यांना भोसले यांनी अडविले व दुचाकीच्या कागदपत्राची मागणी केली. यावेळी दुचाकीचालक मोहम्मद जावेद महेबूब शेख (वय २९ रा. आरेफ कॉलनी) व त्याच्यासोबतच्या दोन जणांनी भोसले यांच्याशी हुज्जत घातली. तसेच त्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मोहम्मद जावेदला ताब्यात घेण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅट्रॉसिटीप्रकरणी जामीन फेटाळला

$
0
0

औरंगाबाद : खुलताबाद येथील पोलिस ठाण्यामध्ये कृष्णा भीमराव मोटे (रा. लामणगाव, ता. खुलताबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुंडलिक पांडुरंग मालोदे, शिवाजी कुंडलिक मालोदे, अंकुश रामचंद्र मालोदे, परसराम सूर्यभान मालोदे, दत्तू दशरथ मालोदे, नवनाथ विश्वनाथ बारगळ व विपीन विश्वनाथ बारगळ (सर्व रा. लामणगाव) यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. सर्व आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांच्या कोर्टामध्ये सुनावणी झाली. सुनावणीअंती आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला. तक्रारदारातर्फे अॅड. सुरेश कांबळे व अॅड. शंकर वानखेडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या अमिषाने फसवणूक

$
0
0

औरंगाबादः सैन्यदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत सात जणांची ३५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रक‌ार उघड झाला. याप्रकरणी अंतरवाली (ता. पैठण) येथील योगेश्वर श्रीमंत हांडे यांच्या तक्रारीवरून आजी-माजी सैनिक व एका महिलेविरुद्ध मंगळवारी सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

हांडे यांच्या परिचयाचे घुगे-पाटील नावाचे परिचित सिडको एमआयडीसीत नोकरीला आहेत. तेथे त्यांची ओळख शेख अय्यूब शेख महेबूब (रा. डोंबरी, जि. बीड) याच्यासोबत झाली. अय्यूब हा सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. त्यापूर्वी तो १०१ मिल्ट्री बटालयीन येथून निवृत्त झाला आहे. अय्यूबने सैन्यदलात आपली ओळख असल्याची माहिती घुगे यांना दिली. नोकरीच्या आमिषाने योगेश्वर हांडे, सोपान हांडे, योगेश ताठे, राजू दवंगे, नकुल निवारे, महेश भोगे व योगेश शिरसाठ (सर्व रा. अंतरवाली) यांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी अय्युबची भेट घेतली. अय्यूबने नोकरी लावण्याचे आमिष दाखवत प्रत्येकाकडून पाच-पाच लाख असे एकूण ३५ लाख रुपये घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेलिब्रिटींच्या तालावर रंगणार दांडिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरूण-तरूणींचे विशेष आकर्षण असलेल्या रास दांडियाला शहरात सुरूवात झाली आहे. दुष्काळाचे सावट कमी असल्याचा दावा करीत संयोजकांनी नेहमीप्रमाणे भव्य स्वरूपात दांडिया आयोजित केला आहे. सेलिब्रिटी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दररोज रात्री दांडियाचा ठेका रंगणार आहे. या माध्यमातून जवळपास दोन कोटी रूपयांची उलाढाल अपेक्षित आहे.

काही वर्षांत शहरातील दांडियाचे व्यावसायिकीकरण झाल्यानंतर आर्थिक उलाढाल वाढली आहे. दरवर्षी दांडियाचे स्वरूप व्यापक होत असून, यावर्षी दुष्काळाचे सावट असूनही दांडिया आयोजनात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणार आहे. अदालत रोड परिसरात नगरसेवक ऋषिकेश खैरे यांचा दांडिया उत्सव, उल्कानगरीत नगरसेवक दिलीप थोरात आयोजित वंदे मातरम् दांडिया, औरंगपुरा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आयोजित नवरंग दांडिया, सिडकोत उपमहापौर प्रमोद राठोड यांचा स्वाभिमान दांडिया उत्सव व एसएफएस मैदानावर विनोद पाटील व संजय सरकटे प्रस्तुत क्रिस्टल रास दांडिया रंगणार आहेत. मोठ्या मैदानावरील दांडियाला तरुणांची अधिक गर्दी असते. या दांडियांना सशुल्क प्रवेश असून 'डेली' व 'सिझन पास' आहेत. या पासचे दर वेगवेगळे आहेत. नवरंग दांडियात मोफत प्रवेश आहे. शेवटच्या पाच दिवसात दांडियाला सर्वाधिक प्रतिसाद असतो. त्यामुळे काही संयोजक शेवटच्या सत्रात दर वाढवतात. महिलांची सुरक्षितता व चोख बंदोबस्तावर संयोजकांनी भर दिला आहे. सर्व दांडिया परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी दररोज किमान ५० हजार लोक दांडियात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. गुजराती समाजाचा पारंपरिक दांडिया उत्सव पाटीदार भवन व कुंवारफल्लीत रंगणार आहे. हा उत्सव केवळ निमंत्रितांसाठी आहे.

सेलिब्रिटींची गर्दी

शहरातील बहुतेक दांडिया उत्सवात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार हजेरी लावणार आहेत. हा उत्सव दिमाखदार करणे व तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटींना निमंत्रित करतात. कलाकारांचे मानधन एक ते पाच लाख रुपयांपर्यंत आहे. यंदा प्रिती झिंटा, मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कलाकारांची नावे बुधवारी जाहीर करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेदोन लाखांचे दहा मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात मोबाइल लंपास करण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. सोमवारी विविध भागातून एक-दोन नव्हे तर दहा मोबाइल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या. एकूण पावणेदोन लाख रुपयांचा हा ऐवज आहे. जाधववाडी, टीव्ही सेंटर, जाफरगेट आठवडी बाजाराला मोबाइल चोरांनी लक्ष्य केल्याचे या घटनांवरून दिसत आहे.

सिडको पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. सातारा परिसरातील पराग नारायणराव पाथरे हे सोमवारी जाधववाडी भाजीमंडईमध्ये गेले होते. यावेळी त्यांचा दहा हजार रुपयांचा तसेच एन - ७ येथील सुभाष तायडे यांचा सहा हजाराचा मोबाइल येथून पळविण्यात आला. टीव्ही सेंटर येथील भाजीमंडईतून चंद्रकिशोर राऊत (रा. एन ७) यांचा दहा हजाराचा, किशोर मगरे (रा. मयुरपार्क) यांचा साडेआठ हजारांचा आणि रमेश भोंबे (रा. एन ९) यांचा ५१ हजार रुपयांचा मोबाइल पळविण्यात आला.

क्रांतिचौक पोलिस ठाणे हद्दीतून दोन मोबाइल लंपास करण्यात आले. यामध्ये आनंद मालोजी पवार (रा. मुकुंदवाडी) हे जेष्ठ नागरिक जाफरगेट येथील आठवडी बाजारात खरेदीसाठी आले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांचा २१ हजारांचा मोबाइल पळविला. तसेच रवींद्र घोडके हा तरुण अजबनगर येथे मित्राच्या खोलीवर झोपण्यासाठी आला होता. सोमवारी त्याचा साडेसतरा हजारांचा मोबाइल रूममधून चोरी करण्यात आला.

उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी तीन मोबाइल चोरी झाले. कुरेशी मुजाहिद हमीद कुरेशी (रा. शहा कॉलनी) यांच्या उघड्या घरातून ४६ हजार पाचशे रुपयांचे दोन मोबाइल पळवण्यात आले. त्यांचे भाऊ झोपले असल्याची संधी साधून चोरट्यांनी हा प्रकार केला.

अन्य एका घटनेत दशमेशनगर येथील अनिता अविनाश जोशी या शिक्षिकेचा तीन हजारांचा मोबाइल न्यू लुक टेलर येथून लंपास करण्यात आला. सातारा प‌रिसरातील प्रशांतकुमार पाटील या विद्यार्थ्याचा मोबाइल त्याच्या खोलीमधून चोरट्यांनी पळविला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाटा गमावल्याचे नुकसान

चोरट्यांनी मोबाइल चोरी केल्यानंतर महागड्या मोबाइलसोबतच त्यामध्ये असलेले संपर्क क्रमांक व इतर साठविलेल्या माहितीला नागरिकांना मुकावे लागत आहे. मोबाइल सापडला तरी त्यामधील डाटा सुरक्षित राहण्याची खात्री नाही. त्यामुळे नागरिकांचे दुहेरी नुकसान होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत कलगीतुरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरुध्द अविश्वास ठराव आणण्यावरून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्येच कलगीतुरा रंगला आहे. 'अविश्वास ठरावामागच्या सूत्रधाराची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिली,' असे म्हणत खैरेंनी मंगळवारी स्वकीयांना इशारा दिला.

गजानन महाराज मंदिर चौक ते जयभवानीनगर चौक रस्त्याच्या व्हाइट टॉपिंग कामाचा शुभारंभ खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, गटनेते गजानन बारवाल आदी उपस्थित होते. खैरे म्हणाले, 'आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव घेऊन त्यांच्या आतापर्यंतच्या सेवेचा आपण अपमान करत आहोत. ते तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होतीलच. त्यामुळे त्यांच्यानंतर महापालिकेसाठी सक्षम आयुक्त द्या, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करावी. आयुक्तांवरील अविश्वास ठराव मोहिमेमागे कोण आहे, याची माहिती मी पक्षप्रमुखांना दिली आहे. अतुल सावे यांनी पाच रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडून २४ कोटींचा निधी मिळवला. मी त्यापेक्षा जास्त पैसा केंद्र आणि राज्य सरकारकडून रस्त्यांच्या कामासाठी आणेन. केंद्रात माझे वजन किती आहे, हे दोन दिवसांपूर्वी सर्वांच्या लक्षात आलेच आहे. (जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचे अध्यक्षपद खेचल्याचा संदर्भ) मुख्यमंत्र्यांशीही माझे चांगले संबंध आहेत. तेव्हा ते शहरासाठी जास्तीचा निधी देतील.'

आमदार सावे म्हणाले, 'खासदार खैरे यांनी रस्ते विकासासाठी दिल्लीतून निधी आणावा. काल अमावस्येमुळे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला नाही. अमावस्येदिवशी काम सुरू केले तर, भूत मागे लागते असे खैरे यांनीच आम्हाला सांगितले आहे,' असा उल्लेख करून त्यांनी मीना गायके यांनी केलेल्या कामाच्या उदघाटनावर टीका केली.

नगरसेवकांना ताकद द्या!

'खासदार चंद्रकांत खैरे यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यापेक्षा नगरसेवकांना ताकद द्यावी,' अशा शब्दांत महापालिका सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी खैरेंना घरचा आहेर दिला. 'आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणू नका, असे आदेश अद्याप आम्हाला पक्षप्रमुखांकडून किंवा अन्य वरिष्ठ नेत्यांकडून आले नाहीत,' असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणणाऱ्या सूत्रधाराची माहिती आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली आहे,' असा इशारा खैरे यांनी दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना जंजाळ म्हणाले, 'आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव तयार केला असून त्यावर भाजप, शिवसेना, शहर विकास आघाडीतील नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. एमआयएम नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या लवकरच होतील. बहुमताने आयुक्तांवरचा अविश्वास ठराव मंजूर होईल. आम्ही महापालिकेचे विश्वस्त आहोत. आम्हाला जनतेत जावे लागते. त्यामुळे खैरे यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यापेक्षा आपल्या नगरसेवकांना बळ दिले पाहिजे. निवडणुकीचा विचार केला तर, आता खैरे यांचीच निवडणूक प्रथम होईल. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त खासदार निधी शहराच्या विकासासाठी आणून विकास कामे करावी. आयुक्तांच्या अविश्वास प्रस्तावाचा विषय प्रतिष्ठेचा करू नये. पालिकेत घेण्यात आलेल्या रॉडिंग मशीनच्या चौकशीची मागणी आपण केली आहे. आयुक्तांनी यावर चौकशी समितीही नियुक्त केली, पण सखाराम पानझडे जोपर्यंत शहर अभियंता पदावर आहेत, तो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होणार नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करावे किंवा चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवावे,' असे जंजाळ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत प्लॉटिंग उद‍्ध्वस्त

$
0
0

तीन विकसकांवर सिडकोची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेकायदा प्लॉटिंग व रेखाकंन (ले-आउट) करणाऱ्या तीन विकसकांविरोधात सिडकोने मंगळवारी कारवाई केली. यात प्रगती प्रॉपर्टी, साई प्रॉपर्टी आणि साई प्लॉटिंग सेंटरने तयार केलेले रेखांकन, प्लॉटिंग नगररचना व अतिक्रमणविरोधी पथकाने काढून टाकले.

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन राज्य शासनाने शहरालगतच्या २८ महसुली गावातील १५ हजार १८४ हेक्टरवर झालर क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली. झालर क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे विकासकाम, इमारत बांधकाम, पुनर्विकास, रेखाकंन यासाठी सिडकोची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. असे असतानाही कृष्णपूरवाडी येथील गट क्रमांक ७०मध्ये साई प्रॉपर्टी, गट क्रमांक ६६/२मध्ये प्रगती पॉप्रर्टी; तसेच अशरफपूर परिसरातील गट क्रमांक ८मध्ये साई प्लॉटिंग सेंटर या विकसकांनी सिडकोची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रेखांकन, प्लॉटिंग सुरू केली. नगररचना विभागाचे वरिष्ठ नियोजनकार ए. व्ही. उईके, उपनियोजनकार अभिजीत पवार व पथकास हे आढळून आले. विकसकांना निर्धारित वेळेत आवश्यक ती कागदपत्रे, म्हणणे सादर करा, अशी नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर संबंधित बांधकान काढून टाका, असेही निर्देशही देण्यात आले होते, पण त्यास विकसकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार नगररचना विभाग, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख गजानन सटोटे यांनी बेकायदा प्लॉटिंगवर कारवाई केली. तेथील तारेचे कुंपण आदी काढून घेण्यात आले. संबंधित विकसकांनी तातडीने म्हणणे सादर न केल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा सिडकोने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारेंना धमकीच्या निषेधार्थ उपोषण

$
0
0

पैठण : समाजसेवक अण्णा हजारे यांना राजस्थान राज्यातून धमकी मिळाल्याच्या निषेधार्थ शहरातील ज्येष्ठ समाजसेवक बंडेराव जोशी यांनी बुधवारी (१४ ऑक्टोबर) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

अण्णा हजारे गेल्या आठवड्यात राजस्थानच्या दौऱ्यावर गेले असता, मोटारसायकलवर आलेल्या दोन युवकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शहरातील शिवाजी चौकात जोशी यांच्यासोबत गणी बागवान, मधुकर मगरे यांनी उपोषण केले. 'राज्यातील व देशातील अलीकडच्या घटनांमुळे देशभरातील समाज प्रबोधन करणारे व पुरोगामी विचाराच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे वातावरण निवळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे,' असे मत जोशी यांनी व्यक्त केले. शहरातील अनेक नागरिकांनी दिवसभर भेट देऊन बंडेराव जोशी यांना पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्या डीपींचा पडेगावात धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव, मिटमिटा भागातील वस्त्यांमध्ये महावितरणची डीपी अनेक ठिकाणी उघडी आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व मुलांच्या जिविताला धोका संभवतो. पडेगाव, मिटमिटा परिसर छावणी सबस्टेशनच्या अंतर्गत येतो. परिसरातील देवगिरी व्हॅली येथील डीपी उघडी असून त्याशेजारी शाळा आह. या डीपीला कंपाउंडही नाही. डीपीला कंपाउंड करण्याबद्दल स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. परंतु, दखल घेतली जात नसल्याचे सुनील तुपे, सतीश बादाडे, शरद भोसले यांनी सांगितले. या शिवाय तारांगण, मिस्बाह कॉलनी, पडेगाव, आर्च अंगण येथील डीपीही उघड्या आहेत. या डीपींना संरक्षक कवच बसविण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आह.

शिक्षकाचे श्रमदान

मिटमिटा येथील देवगिरी व्हॅली येथील शिक्षक सतीश पंडितराव पाटील यांनी नाशिकरोडच्या रस्त्याकडेचे खड्डे श्रमदान करून बुजवले. पालकासोबत जाणारी एक मुलगी शनिवारी खड्ड्यामुळे पडल्याचे या शिक्षकाने पाहिले होते. त्यांनी रविवारी सुटीच्या दिवशी सकाळी साडेआठ ते साडेअकरापर्यंत कोणालाही न सांगता स्वतः खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. हे पाहून तेथे गॉगल विक्री करणाऱ्या सिद्धार्थ मनोहर याने त्यांना मदत केली. या रस्त्याकडेचा मुरूम व माती पावसात वाहून गेल्याने खड्डे झाले आहेत.

बांधाचे भूमिपूजन

देवगिरी व्हॅली परिसरातील नाल्यावर नालीबांध टाकण्याच्या कामाचे नगरसेवक रावसाहेब आमले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. हा बांध बांधकाम व्यावसायिक योगेश तुपे स्वखर्चाने बांधणार आहेत. देवगिरी व्हॅली परिसरातील पाणीपातळी घटली असून नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वीचा येथील बंधारा पावसात वाहून गेला आहेयावेळी शरद भोसले, राहुल यल्दी, गणेश राऊत, प्रकाश दुबिले, हिरालाल वाणी, मनोज मते यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत सोडा २२ टीएमसी पाणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणात १५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान किमान २२ टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाकडे केली आहे.

जायकवाडीच्या वरच्या धरणातील सध्याची पाण्याची स्थिती लक्षात घेता किमान ५० टीएमसी पाणी उपलब्ध आहे. शिवाय नाशिक, नगर जिल्ह्यातील लघु प्रकल्पातील पाणीसाठा आणि खर‌िपासाठी वापरण्यात आलेला पाणीसाठा याचा विचार केल्यास किमान ९० टीएमसी पाणी उपलब्ध होते, म्हणून त्याचे वाटप समन्यायी प्रमाणात करणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्याच्या कलम १२ (६) (ग) नुसार आवश्यक आहे. ही कायदेशीर जबाबदारी पार पाडण्यात गेली चार वर्ष हेतुपुरस्पर दिरंगाई करण्यात आली आहे. परिषदेने सहा महिन्यांपासून १५ सप्टेंबरपूर्वीच पाणी सोडण्यास सुरुवात करावी, अशी मागणी केली आहे. मात्र सरकार आणि प्राधिकरणाने त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले. जलतज्ज्ञ सदस्य शामराव नाईक यांनी प्राधिकरणाकडे याचिका दाखल करून जुलै महिन्यापासूनच खरीपासाठी पाणी सोडावी, अशी विनंती केली होती. या याचिकेवर तीन वेळा सुनावणी झाली व प्राधिकरणाने निर्णय राखून ठेवला. ७ सप्टेंबरपासून आजपर्यंत हा निर्णय अद्याप आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगर रस्त्यावर भुयारी मार्ग

$
0
0

सिडकोचा निर्णय, रस्ता ओलांडण्यासाठीची प्रतीक्षा टळणार

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

औरंगाबाद-अहमदनगर रस्ता ओलांडण्यासाठी सिडकोतर्फे वाळूजमध्ये दोन ठिकाणी भुयारी मार्ग बांधणार आहे. सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

औरंगाबाद- अहमदनगर रस्त्यामुळे सिडकोच्या वाळूज महानगरचे दोन भाग पडले आहेत. ए.एस. क्लबच्या बाजूने नगर एक असून गोलवाडीच्या बाजुला नगर दोन आहे. या दोन्ही नगरमध्ये साधारणतः प्रत्येकी दहा हजार नागरिक राहतात. शिवाय नगर दोनला बजाजनगरचा भाग जोडला गेला असल्याने या भागात सुमारे ४० हजार नागरिक राहतात. या नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी कित्येक वेळा प्रतीक्षा करावी लागते.

नगर रस्त्यावरून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ आहे. शिवाय धुळे, नाशिककडून येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक सिडकोच्या नगरांसमोरून होते. त्यामुळेही रस्ता ओलांडणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे सिडकोने दोन नगरांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिकडच्या काळात सिडकोने वाळूज महानगरवर लक्ष केंद्रित करून विकासकामांना चालना दिली आहे. वर्षानुवर्षे रेंगाळत पडलेली कामे हातावेगळी केली जात आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सिडकोच्या क्षेत्रात ५० हजार झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे जगविण्याची सोय करण्यात आली आहे.

नगर १ व २ मधील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही नगरातील कचराकुंड्या हद्दपार झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर नागरिकांचा वाळूज महानगरकडे ओढा वाढला आहे.

कार जाऊ शकेल

सिडको नगर १ व सिडको नगर २च्या प्रवेशद्वारासमोरून सुरू होऊन भुयारी मार्ग दुसऱ्या बाजुला निघतील. यामुळे दोन्ही नगरमधील नागरिकांना रस्ता ओलांडण्याकरिता प्रतीक्षा करावी लागणार नाही. या भुयारी मार्गाचा वापर कार करू शकेल, अशी रचना करण्यात येणार आहे.

वाळूज महानगरातील दोन्ही नगराला जोडणारे भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यामार्गाने छोटी वाहने सहजरित्या जाऊ शकतील.

- एन. व्ही. गोलखंडे, मुख्य नियोजनकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्यांवर पोकळ गप्पा

$
0
0

उत्तरे देतांना किशोर तिवारी यांची भंबेरी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा ८०० पेक्षा अधिक झाला असतांना त्या कशा रोखता येतील याबद्दलच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी झालेल्या बैठकीत ठोस निर्णय न होता फक्त पोकळ गप्पा झाल्या.

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत शेतकरी आत्महत्या व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना तिवारी यांची मराठवाड्यातील आत्महत्या, त्यांची कारणे, आत्महत्या रोखण्याबातच्या ठोस उपाययोजना काय या प्रश्नांची उत्तर देतांना चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी त्यांनी सरकारच्या उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या असत्या तर अशी वेळ आली नसती, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेवटच्या माणसांपर्यंत जावे लागेल, असे उत्तर देत सारवासारव केली. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीसाठी मराठवाड्यातील अधिकारी उपस्थित होते. राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत शेतकऱ्यांना लागणाऱ्या मुलभूत गरजांची उणीव भरून काढण्यासाठी कृषी समृद्धी योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामध्ये आत्महत्या रोखण्याच्या उपाययोजना समाविष्ट आहेत. गावपातळीवरी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन कृषी कर्ज देण्याविषयी मार्गदर्शन करावे तसेच शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेची अम्मलबजावणी होते की नाही याची तपासणी करावी, असे तिवारी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. शेतीमालाला योग्य भाव देण्याबाबत त्यांनी बोलणे टाळले. मराठवाड्यात कापसाचे उत्पादन मोठे असून प्रतिक्विंटल पाचशे रुपये अधिक भाव द्यावा अशी आपली भूमिका असल्याचे सांगत ते काही प्रश्नांची उत्तरे न देता सभागृहाबाहेर निघून गेले. दरम्यान, बैठकीमध्ये विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मानव विकास निर्देशांक फार कमी असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनयूएचएम’च्या १०५ कर्मचाऱ्यांचे पगार थकले

$
0
0

औरंगाबाद : नॅशनल अर्बन हेल्थ मिशन (एनयूएचएम) अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत १०५ कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकित आहे. सणासुदीच्या काळात आर्थिक टंचाईचा सामना करणाऱ्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांना घेराओ घातला. प्रशासनाने तातडीने सरकारकडे संपर्क साधून वेतनासाठी तरतूद म्हणून दोन कोटींची मागणी केली.

एनयूएचएम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी महापालिकेच्या सेवेत आहेत. केंद्राच्या योजनेसाठी केंद्रामार्फत राज्य सरकारकडे निधी पाठविला जातो. तीन महिन्यांपूर्वी या खात्यावर असलेले पैसे संपल्याने अधिकारी, कर्मचारी वेतनापासून वंचित राहिले आहेत. सद्यस्थितीला या खात्यावर केवळ ३३ हजार रुपये शिल्लक आहेत. एका वर्षात पगारापोटी एक कोटी पाच लाख रुपये लागतात. तीन महिन्यांपासून पगाराविना असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी महापालिकेत येऊन आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराओ घातला. या प्रश्नी प्रशासनाने मुंबईत संपर्क साधून या योजनेसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे आरोग्य सभापती विजय औताडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाखांचा शेतकऱ्यांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या बहाण्याने दोन लाख ४० हजार रुपयाला गंडा घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपत सटवाजी गायकवाड (वय ५०, रा. नांदेड) या शेतकऱ्याची १० ऑक्टोबर २०१४ रोजी विलास सदाशिव मेश्राम (रा. भडकलगेट) याच्याशी ओळख झाली. यावेळी मेश्राम याने शेती उत्पन्नासाठी कर्ज देतो असे अामीष दाखवले, एक लाखाच्या कर्ज मंजुरीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये कमीशन घेत असल्याचे सांगितले. गायकवाड व त्यांच्या मित्रांनी मेश्राम याला दोन लाख ४० हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर कर्ज मंजूर करून दिले नाही व पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्किंग नसल्याने माघार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्किंग व भूसंपादनाची कोणतीही कारवाई न करता गेलेल्या पालिकेच्या पथकाला जाहिरातीचे फलक व ओटे काढून परतावे लागले. यावेळी व्यापाऱ्यांनी अतिक्रमण विरोधी पथकावर प्रश्नांची सरबत्ती केली.

पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी जालना रोडवरील सेव्हनहिल उड्डाणपुला शेजारील मोकळ्या भूखंडाला लावलेली पत्रे काढण्यास सुरुवात केली. तेव्हा भूखंडमालक बाकलीवाल व शेजारच्या भूखंडधारकांनी ही कारवाई कशासाठी असा सवाल केला. त्यामुळे पथकाने हे काम अर्धवट टाकून अपना बाजार व्यापारी संकुलाच्या पायऱ्या तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी पायऱ्या का तोडल्या जात आहेत, अशी विचारणा करून पथकातील अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. काही व्यापाऱ्यांनी जागा मोजून आम्हाला टीडीएस द्या, आम्ही स्वतः मालमत्ता काढून घेतो, असे सांगितले. त्यानंतर दुकानांसमोरील जाहिरातीचे बोर्ड व इतर किरकोळ अतिक्रमण काढण्यात आले. याशिवाय कुशल मंगल कार्यालयासमोरील ओटे, कोठारी यांची संरक्षक भिंत काढण्यात आली. पथकाने जालना रोडवरील २५ साइन बोर्ड आणि ४२ ओटे काढले. ही कारवाई उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख महावीर पाटणी, बी. एन. कागनाडे आदींनी केली.

व्यापाऱ्यांकडून विचारणा

सेव्हन हिल ते महर्षि चौक या दरम्यान अतिक्रमण हटाव पथकाच्या माध्यमातून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे. अपना बाजार व्यापारी संकुल नियमानुसार बांधण्यात आले असून येथे अतिक्रमणाचा मुद्दा कसा काय उपस्थित होऊ शकतो, अशी विचारणा व्यापाऱ्यांनी केली आहे. व्यापारी शैलेश कासलीवाल, हरमित तमैनी, संजय अग्रवाल यांनी पालिकेने मार्किंग करून दिल्यास आम्ही पायऱ्या तोडून घेता, असे पालिका अधिकाऱ्यांना भेटून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images