Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औषधविक्रेत्यांचा बंद यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ई-फार्मसी आणि ऑनलाइन औषध खरेदी-विक्रीच्या निषेधार्थ बुधवारी (दि. १४) शहरातील सुमारे २ हजार औषधविक्रेत्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवली. यानिमित्ताने वाहन फेरी काढण्यात आली. या रॅलनीनंतर गोमटेश मार्केटजवळील दलालवाडीतील औषधीभवन येथे सभा घेऊन शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. बंद १०० टक्के यशस्वी झाला.

दरम्यान, बंद आणि रॅलीमुळे नागरिकांची, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषधीभवन येथे औषध नियंत्रण कक्ष आणि शहरातील २२ वेगवेगळ्या ठिकाणची मेडिकल्स सुरू ठेवण्यात आली होती. बेकायदा चालू असलेला ऑनलाईन औषध विक्रीचा व्यवसाय बंद करावा, या औषधांमुळे होत असलेल्या दुष्परिणामांपासून सामान्य नागरिकांना वाचवावे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटिबायोटिक्स, वेदनाशमक अथवा अन्य औषधांच्या वापरास चालना मिळू शकते यासारखे ९ धोके निर्माण होत असल्याने ऑनलाइन औषध खरेदीसंबंधी शासनाने तातडीने पावले उचलावीत आणि कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन औषधविक्रेत्या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्तांना निवेदन देण्यात आले. उप‌जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे आणि सहआयुक्त विराज पौनिकर यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी अध्यक्ष रावसाहेब खेडकर, रामेश्वर राठी, शैलेंद्र रावत, दिलीप ठोले, विनोदकुमार लोहाडे, दिनेश सेठी, कपिल टिबडीवाला, बाबूराव सोनुने यांच्यासह औरंगाबाद जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व शहरातील २ हजार औषध विक्रेते उपस्थित होते.

पैठणगेटहून रॅली

सुमारे २ हजार औषधविक्रेत्यांनी पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाहन रॅली काढली. यावेळी विविध घोषणा फलक घेऊन औषधविक्रेते सामील झाले होते. लोकमान्य टिळक आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फेरी पैठणगेट, औरंगपुरा, चेलीपुरा, सिटी चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आणि नंतर जिल्हाधिकारी कार्यालय ते औरंगपुरा येथील नाथ मार्केट मध्ये असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयात गेली. यानंतर औषधीभवन येथे सभा घेऊन राज्यशासनाचा निषेध करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफोडीच्या दोन घटनांत ६५ हजारांचा ऐवज लंपास

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरफोडीच्या दोन घटनांत चोरट्यांनी ६५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. सातारा व जिन्सी पोलिस ठाणे हद्दीत या घटना घडल्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनिल अमरपालसिंह भदोरिया (रा. दिशा संस्कृती, नाथ सिडस कंपनीच्या मागे) हे एका कंपनीत व्यवस्थापक आहेत. ते कंपनीच्या कामानिमित्त चीनला गेलेले आहेत. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील एलसीडी व इतर साहित्य असा ३० हजार रुपयांचा ऐवज त्यांनी चोरून नेला. शनिवार ते मंगळवारच्या दरम्यान हा प्रकार घडला. त्यांचे कर्मचारी अशोक गावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्य एक घटना संजयनगर, बायजीपुरा भागात घडली. ५ ऑक्टोबर रोजी येथील आरती यादव ही महिला बाहेरगावी जाण्याच्या गडबडीत दरवाजा उघडा ठेवून गेली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत आतमधील ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. जिन्सी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राहकांनी खरेदीच्या बहाण्याने लेगीन्स पळविल्या

दशमेशनगर परिसरात दिगंबर वाकणकर यांचे कपड्यांचे दुकान आहे. सोमवारी त्यांच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी बाराशे रुपये किमतीच्या तीन लेगीन्स लंपास केल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाकणकर यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून दहा हजार लुबाडले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मारहाण करीत दोन तरुणांना लुबाडण्याच्या घटना नारेगाव व खोकडपुरा भागात घडल्या. यामध्ये दोन मोबाइलसह दोन हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी व क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश गायकवाड (वय २६, रा. विद्यापिठ वस्तीगृह) हा तरुण वोडाफोन कॉलसेंटरमध्ये कामाला आहे. शनिवारी रात्री अकरा वाजता तो कॉलसेंटरमधून काम संपल्यानंतर घरी जात होता. यावेळी कलाग्रामजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याला अडवत पैसे व मोबाइलची मागणी केली. उमेशने नकार दिल्यानंतर या आरोपींनी त्याला मारहाण केली. त्याच्याकडील दोन हजार रुपये व सहा हजाराचा मोबाइल हिसकावून ते पसार झाले. सोमवारी या प्रकरणी सिडका एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या एका घटनेत खोकडपुरा येथे मध्यरात्री पाऊण वाजता वकिलाचा मोबाइल लंपास करण्यात आला. अॅड. शिवप्रसाद देवीदास पुरी (वय २७, रा. बंजारा कॉलनी) हा हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना भेटून घरी जात होता. यावेळी त्याला शिवाजी हायस्कूलसमोर दोघांनी अडविले. त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत त्याला ढकलून देत आरोपी पसार झाले. क्रांतिचौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिंद्रा हॉलिडेज विरुद्धचा गुन्हा रद्द

$
0
0

औरंगाबाद : महिंद्रा हॉलिडेज अॅड रिसॉर्टस कंपनीने मेंबरची फसवणूक केल्याच्या प्रकरणात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. बी. चौधरी व न्या. इंदिरा जैन यांनी दिले.

निरंजन जाधव यांनी कंपनीकडून २००७ मध्ये मेंबरशिप घेतली होती. ऑगस्ट २०१४ मध्ये कंपनीने जाधव यांना इमेल केला व कंपनीकडे जमा असलेले व्हॅकेशन हॉलिडेज सात दिवसात घेतले नाही तर सात दिवसाचे व्हॅकेशन रद्द होतील, असे सांगितले होते. त्यामुळे जाधव यांनी दुबाईच्या रिसॉर्टची बुकिंग मागितली, मात्र कंपनीने रिसॉर्टमध्ये रुम नसल्याचे सांगून बुकिंग दिली नाही. कंपनीने दुबई येथील रिसॉर्टमधील रुमची अवैध पद्धतीने विक्री केल्याची तक्रार न्यायालयात केली होती. कोर्टाच्या आदेशानुसार महिंद्र कंपनीचे संचालक अरुणकुमार नंदा व राजीव सहानी यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही तक्रार दिवाणी स्वरुपाची असून, फौजदारी कायद्याचा गैरवापर करण्याचा हा प्रकार असल्याचे मत व्यक्त करून खंडपीठाने गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मिठाई दुकानांवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फूड इन्स्पेक्टर नाही, कामाला माणसं नाही, काय आणि कुठे कारवाई करणार अशा कायम तक्रारी करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन ‌विभागाने वर्षभर कुठेही हॉटेल किंवा मिठाईच्या दुकानांची चौकशी केली नाही. आता ऐन सणासुदींच्या काळात नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला बुधवारी शहरातील नामांकित पाच मिठाई विक्रेते व निर्मिती करणाऱ्या दुकानांवर अचानक एकाचवेळी छापे टाकून दुकानांची तपासणी करण्यात आली.

या कारवाईत काजू कतली तयार करण्यासाठी वापरले जाणारे ३६८ किलो काजू जप्त करण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेत उस्मानपुरा येथील मे. मधुर मिलन मिठाई, उल्कानगरी येथील जैन स्विट्स, उस्मानपुरा येथील बिकानेर भुजियावाला, मछलीखडक येथील परिहार मिलन मिठाई, चिकलठाणा एमआयडीसीतील नम्रता स्विट्स यांच्या मिठाई उत्पादनाच्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले.

या सर्व ठिकाणी अस्वच्छता, दुर्गंधी आढळून आली. या दुकानांमधून मिठाई, फरसाण, खवा, बर्फी व उत्पादनासाठी लागणारे बेसन, मैदा, काजू, विलायची, वनस्पती तूप आदी अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. एकट्या मधूर मिलन मिठाई, उस्मानपुरा येथे काजू कतलीतयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ३६८ किलो काजू जप्त करण्यात आले. याची किंमत २ लाख २० हजार ८०० रूपये एवढी आहे. या तपासणी व धाडसत्रात सहआयुक्त सी.बी.पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर, राम मुंडे, वर्षा रोडे, गोपाल कासार, सुनिल जिंतुरकर, राजकुमार कोकडवार, राम भरकड, गजानन गोरे यांनी सहभाग घेतला.

परवाना निलंबन होणार

या तपासणीनंतर येणाऱ्या अहवालाच्या अनुषंगाने या दुकानांचे परवाने रद्द होणार असून ही कारवाई पुढील काही दिवस अशीच सुरू राहील. ग्राहकांना दर्जेदार मिठाई मिळेल यासाठी दक्षता घेणार असल्याचे सहआयुक्त सी. बी. पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी केली ‘लाख’मोलाची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्जाच्या डोंगराखाली दबलेला बळीराजा आयुष्य संपवून टाकतो. मग त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. पुढे काय? या उत्तर नसलेल्या प्रश्नाचे ओझे अवघ्या कुटुंबावर असते. अशाच संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी पुढे सरसावले. त्यांनी फ्रेशर्स पार्टी रद्द करून तब्बल एक लाख रुपये गोळा केले आणि आत्महत्या केलेल्या दहा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना त्यातून मदत करण्यात आली.

एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमधील द्वितीय व तृतीय वर्षांचे विद्यर्थी एकत्र येत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वेलकम पार्टी देतात. त्यानिमित्त डीजे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्याकडून प्रत्येकी ३५० रुपये जमा केले. ही जमा झालेली रक्कम धांगडधिंगा, मौजमजेत खर्च न करता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देण्याचा विचार पुढे आला. सर्वांनी त्याला होकार दिला. सुरुवातीला २० हजार रुपये गोळा झाले. यात आणखी भर घालण्याचे ठरले. जमेल तशी मदत करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले अन् पाहतापाहता १ लाख रुपये जमा झाले. आत्महत्या केलेल्या १० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत करण्याचेही निश्चित करण्यात आले. बुधवारी विद्यार्थ्यांनी संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, प्राचार्य संजय हरके यांच्या उपस्थितीत ही मदत संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांकडे सुर्पूत केली. या उपक्रमासाठी किरण बोराटे, शरद सानप, राहुल ढेरे, धनंजय राजगुरू, शरद शिंदे, गजानन आव्हाड, अभिमन्यू काटकर, संध्या शिंदे, शरयू वाकोडे, सोनाली कोठावळे, पूजा पवार, प्रियंका कंदी, प्रगती चौधरी या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

दुष्काळाची परिस्थिती अन् त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. अशाच काही कुटुंबांना आपण मदत करत सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.

- किरण बोराटे, विद्यार्थी

वायफळ खर्च करण्यापेक्षा अशा प्रकारे मदत करण्याचा विचार आला. सर्व विद्यार्थी, प्राध्यापकांसह संस्थेनही मदत केली. इतरांनीही अशा मदतीला पुढे यायला हवे, अशी आमची भावना आहे.

- सोनाली कोठावळे, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन विभागातील पावती पुस्तके गायब

$
0
0

Makarand.Kulkarni @timesgroup.com

औरंगाबादः जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातून टेंडर फी जमा करण्यासाठी नोंद केलेले तब्बल ४६ पावती पुस्तके गायब झाली आहेत. दोन वर्षांपासून हे प्रकरण नुसतेच चर्चिले जात आहे. त्यामुळे तब्बल २३ लाखांचा हिशेब लागत नसल्याने सिंचन विभागातील अधिकारी; तसेच प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. गुरुवारपासून पंचायत राज समितीचा दौरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन मात्र हतबल झाले आहे.

सिंचन विभागातून मंजूर होणाऱ्या कामांसाठी टेंडर प्रक्रिया राबविली जाते. टेंडर भरण्यासाठी विशिष्ट रकमेचे शुल्क आकारले जाते. हे शुल्क घेतल्यानंतर संबंधिताला रितसर पावती देणे बंधनकारक असते. सिंचन विभागातील कामकाजावर अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून पावतीपुस्तके गायब झाली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला पाच पुस्तके गायब झाल्याचे उघडकीस आले होते, पण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची वाच्यता होऊ दिली नाही. त्यामुळे ही संख्या वाढत ४६ झाली आहे. एका पावतीबुकात १०० पावत्या असतात. साधारणपणे एका टेंडरचे शुल्क ५०० रुपये गृहित धरले तर, एका बुकाचे ५० हजार त्यानुसार ४६ बुकांचे २३ लाख रुपये होतात. पावतीपुस्तके गायब झाल्याने जमा झालेले पैसे कुठे आहेत, याचा हिशेब लागत नसल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

पावती पुस्तके गायब झाल्याची माहिती अर्थ विभागाला कळाल्यानंतर त्यांच्याकडून सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे विचारणा करत बुक व हिशेबाची मागणी केली होती. तो देण्यास सिंचन विभाग असमर्थ ठरला. परिणामी, अर्थ खात्याने मार्च २०१३पासून नवीन पावती पुस्तके देणे बंद केले आहे.

डीडीद्वारे स्वीकार

सिंचन खात्याला नवीन पावतीपुस्तके देणे बंद केल्यापासून विभागाने टेंडर फीस व अन्य शुल्क आकारण्यासाठी डिमांड ड्राफ्ट घेणे सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरदिवसा साडेतीन लाखांची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दशमेशनगर परिसरातील शांतगंगा कॉम्प्लेक्समध्ये भरदिवसा घरात घुसून चाकूचा धाक दाखवत साडेतीन लाखांचा ऐवज पळविण्यात आला. सेल्समन असल्याचे सांगून आलेल्या दोन आरोपींनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या आर्किटेक्टला मारहाण करून बांधून ठेवून चोरी केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शांतगंगा कॉम्प्लेक्सच्या बी विंगमधील फ्लॅट क्रमांक आठमध्ये आर्किटेक्ट दीपेंदू मुखर्जी (वय ४५) पत्नी व लहान मुलीसोबत राहतात. मुखर्जी यांचे कॅनॉट गार्डन येथे ऑफिस अाहे. त्यांच्या पत्नी मौलाना आझाद कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. बुधवारी दुपारी मुखर्जी जेवणासाठी घरी आले होते. यावेळी त्यांची पत्नी कॉलेजमध्ये तर, मुलगी शाळेत गेली होती. पावणेतीनच्या सुमारास दोन तरुण त्यांच्या घरी आले. 'आम्ही सेल्समन आहोत,' असे सांगत त्यांनी घरात प्रवेश केला. मुखर्जी यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ढकलून ते घरात घुसले. त्यांनी मुखर्जी यांना मारहाण सुरू केली. यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून हात, पाय व तोंड बांधून फ्लॅटच्या शेवटच्या रुममध्ये कोंडले. त्यापूर्वी चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या तीन अंगठ्या, एक हिऱ्याची अंगठी, ब्रेसलेट, सोनसाखळी आदी साडेतीन लाखांचा ऐवज काढून घेतला. त्यांचे दोन मोबाइल देखील आरोपींनी घेऊन त्यातील सीमकार्ड काढून फेकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौदा रस्त्यांच्या कामांसाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

काँग्रेस आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात ७० कोटी रुपयांची कामे मंजूर केली, मात्र फक्त उद््घाटनाच्या पाट्या लावल्या, प्रत्यक्षात रस्ते केलेच नाहीत. ही रखडलेली १४ रस्त्यांची कामे त्वरित करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी तालुक्यातील रस्त्यांची ७० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. नियमानुसार प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाल्यानंतर निविदा काढण्याचे निर्देश असतांना निधी नसतांना निविदा काढून निवडणूक काळात उद््घाटनाच्या पाट्या लावल्या, परंतु अद्यापही रस्त्याची कामे करण्यात आली नाही. यामुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. तळणी- घाटनांद्रा, सिल्लोड-कायगाव, सिल्लोड-भोकरदन, उंडणगाव-हळदा, आळंद-अंधारी या रस्त्यांची कामे रखडली आहेत, असे भाजप तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या रस्त्यांच्या कामासाठी खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटणार आहेत. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, हरीकिसन सुलताने आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारच्या बैठकीत पाणी सोडण्याचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणामध्ये वरच्या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय शनिवारी, १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत होणार आहे. गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये समन्याची पाणीवाटपाबाबत या बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी दिली.

महामंडळाच्या कार्यालयात सी. ए. बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी नगर तसेच नाशिक व औरंगाबादचे जिल्हाधिकारी किंवा त्याचे प्रतिनिधी तसेच मुख्य अभियंता यांना बोलावले आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा तसेच खरिपासाठी वापरलेले पाणी यांची बेरीज करून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या बैठकीला येताना नगर व नाशिक जिल्ह्यातील मुख्य अभियंत्यांना त्यांच्या जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा आणि खरीप हंगामासाठी वापरण्यात आलेला पाणीसाठा याची संपूर्ण माहिती घेऊन येण्याच्या सूचना दिल्या आहेत.

६ टक्के पाणीसाठा

सध्या जायकवाडी धरणात ६ टक्के पाणीसाठा आहे. तर मराठवाड्यातील सर्व प्रकल्पात एकूण १५ टक्के पाणीसाठा आहे. प्राधिकरणाच्या धोरणानुसार जायकवाडीत ३७ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असेल तर, वरच्या धरणातील पाणी सोडण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांसाठी विशेष बस सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी पर्यटन बससारखी सेवा आवश्यक होती. ही सेवा आजपासून सुरू होत आहे. देशी विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आगामी काळात शहरात टुरिस्ट पोलिस सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

मध्यवर्ती बस स्थानकाहून अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना जाण्यासाठी दोन वातानुकूलित पर्यटन बस आज सुरू करण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त अमितेशकुमार बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, प्रादेशिक व्यवस्थापक अनंत मुंडीवाले, विभागीय नियंत्रक आर. एन. पाटील, यंत्रचालक नंदकुमार कोलारकर, एमटीडीसीचे प्रादेशिक संचालक अण्णासाहेब शिंदे, आगार व्यवस्थापक सी. के. सोळसे कामगार अधिकारी लक्ष्मीकांत व्यवहारे, विभागीय अभियंता एम. डी. मोरे, हॉटेल असोसिऐशनचे अध्यक्ष ह‌रप्रितसिंग निऱ्ह, विरजी सफाया, विवेक सिंग गुप्ता, अविनाश पाटील, रमण कुमार आणि अशोक लहरिया, गाईड विजयकुमार जैस्वाल यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

ही फुलांनी सजविण्यात आली होती. आज आलेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ‌पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस अधिक्षक नवीन चंद्र रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बस सेवेचा प्रारंभ केला. पर्यटन बसचे चालक गजानन पवार आणि शाकेर पठाण यांचेही स्वागत करण्यात आले. पहिल्या बसने अजिंठा लेणी पाहण्यासाठी तीन पर्यटक आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी नऊ प्रवाशी निघाले होते. यात काही देशी आणि काही विदेशी पर्यटकांचा समावेश होता.

एमटीडीसी देणार माहिती

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या हॉलीडे कॅम्प; तसेच केंद्रात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना पर्यटन बसची मा‌हिती दिली जाईल. याशिवाय विमानतळ आणि रेल्वे स्टेशन येथील पर्यटन माहिती केंद्रावरही या सेवेची माहिती पत्रके प्रत्येक पर्यटकांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले.

पर्यटन बसचा प्रवास

> औरंगाबाद - अजिंठा (बसभाडे - ५९५ रुपये - आरक्षणासह)

> सकाळी ७.३० वाजता औरंगाबादहून अजिंठाकडे निघेल. सकाळी ९.५५ ला ती अजिंठा लेणी स्थळावर पोहोचेल. दुपारी ३ वाजता अजिंठ्याहून निघून सायंकाळी ५.०० वाजता ही बस औरंगबादला हॉलीडे कॅम्प येथे पोहोचेल. ५.२० ला ही बस बसस्टँडला पोहोचेल.

> औरंगाबाद - वेरूळ (बसभाडे - २१५ रुपये - आरक्षणासह)

> सकाळी ८.३० वाजता बसस्टँडहून एमटीडीसीला जाईल. ८.४० ला एमटीडीसीहून रवाना होऊन वेरूळला ९.३० वाजता पोहोचेल. वेरूळहून ही बस दुपारी १.३० वाजता निघेल, दौलताबादला १.५० वाजता पोहोचेल. दुपारी ३.५० वाजता बीबी का मकबराला पोहोचेल. पानचक्कीला दुपारी ४.२५ ला जाणार आहे. तर बसस्टँडाला ५.३० वाजता पोहोचेल.

(ही बस शहरातील हॉटेल मॅनोर, हॉटेल अमरप्रीत, आणि हॉटेल रामा इंटरनॅशनल या ठिकाणी पर्यटक घेण्यासाठी थांबणार आहे)

> पर्यटन बससाठी www.msrtc.com व public.msrtcors.com या संकेत स्थळावर आरक्षण करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवर परस्पर उचलले कर्ज!

$
0
0

औरंगाबादः तरुणाच्या कारची विक्री करीत तिच्या बनावट कागदपत्राआधारे साडेआठ लाखाचे कर्ज उचलण्यात आले. या प्रकरणी दोघांविरूद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई येथील करनजितसिंग सुकीदरसिंग बचरे या तरुणाची कार त्याने प्लॅटीनम मोटार्सच्या प्रफुल्ल निसार यांच्याकडे ठेवली होती. ही कार निसार याने परस्पर विक्री केली. कारवर फुजेल हमीदखान (रा. सिल्कमिल्क कॉलनी) याने बनावट कागदपत्राआधारे साडेआठ लाखाचे कर्ज उचलून मदत केली. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला. नुकताच हा प्रकार बचरे यांच्या लक्षात आला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात त्यांनी दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा तपास गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुष्याची कमाई गेली

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दशमेशनगरात लागोपाठ घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या ५० फुटांवर हे प्रकार घडले. लागोपाठ दोन घटना घडल्यामुळे पोलिस हादरले असून या ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आला आहे. या घटनेनंतर उस्मानपुरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, वयोवृद्ध बरेडिया यांना हताशपणे आयुष्यभराची कमाई व पत्नीचे आठवणीचे दागिने चोरीस जाताना पाहावे लागले.

वय वर्षे ८१ असले तरी मिश्रीलाल बरेडिया अंगाने काटक आहेत. चोरट्यांनी त्यांना धाक दाखवत झोपावयास भाग पाडले. बरेडिया निमूटपणे पाऊणतास बेडवर पडून होते. त्यांच्या समोर चोरट्यांनी त्यांच्या घरातील सर्व ऐवज शोधून काढत चोरून नेला. पावणेपाचच्या

सुमारास चोरट्यांची हालचाल जाणवत नसल्याने ते बेडरूमधून धीर धरून बाहेर आले. योगायोगाने त्यांनी त्यांचा मोबाइल रात्री समोरच्या हॉलमध्ये खिडकीजवळ ठेवला होता. खिडकीच्या पडद्यामागे असलेला हा मोबाइल चोरट्यांच्या नजरेस पडला नाही. मोबाइल घेतल्यानंतर देखील त्यांनी काही वेळ फोन लावला नाही. चोरटे गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी मुलाला फोन करून घटनेची माहिती दिली, मात्र या पाऊण तासामध्ये आयुष्याची जमा केलेली कमाई डोळ्यादेखत चोरीस जात असल्याचे पाहावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

५० फुटावर दुसरी घटना

बुधवारी दुपारी साडेतीन वाजता या बंगल्याच्या कंपाउंडवॉलला लागून असलेल्या शांतगंगा कॉम्पलेक्समध्ये घटना घडली होती. येथील आर्किटेक्ट दीपेंदू मुखर्जी यांच्या फ्लॅटमध्ये सेल्समन म्हणून शिरकाव करीत मारहाण करून साडेतीन लाखाचा ऐवज पळवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाचा गुन्हेगारांनी बरेडिया यांच्या घरावर दरोडा टाकून पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनेनंतर दशमेशनगरात फिक्स पॉइंट गुरुवारी सायंकाळी तैनात करण्यात आला.

आयुक्तांनी घेतले फैलावर

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी भेट घेतली. अवघ्या पन्नास फुटावर चोवीस तासात दुसरी घटना घडल्याने आयुक्त संतापले होते. त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. गुन्हे रोखण्यासाठी चार्ली व कंट्रोल रूम मोबाइल व्हॅनचा बंदोबस्त वाढवला आहे. रात्रीच्या सुमारास नाइट राउंडला पोलिस निरीक्षक; तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची गस्त असते. तरी देखील गुन्हे घडत असल्याने चार्ली, सीआर मोबाइल कुठे गस्त घालतात हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओड‌िसीच्या मुहूर्तावर वेरूळ महोत्सव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दोन वर्षांपासून अडखळलेली वेरुळ महोत्सवाची गाडी यंदा डेक्कन ओड‌िसीच्या मुहूर्तावर रुळावर आली आहे. विशेष म्हणजे यंदाचा महोत्सव जानेवारी महिन्यात वेरूळ लेणी पायथ्याशी होईल.

मुंबईला महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांच्या उपस्थित औरंगाबादच्या पर्यटनासंबंधी बैठक झाली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय तसेच एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती. विद्यापीठ परिसरातील सोनेरी महलमध्ये होत असलेला हा महोत्सव पुन्हा वेरुळमध्ये व्हावा, अशी गेल्या अनेक दिवसांची मागणी होती. औरंगाबाद येथे वर्षातून चार ते पाच वेळेस येणारी डेक्कन ओडीसी या राजेशाही थाट असलेल्या रेल्वेच्या मुहूर्तावर हा महोत्सव व्हावा, अशा सूचना यावेळी संचालक जैन यांनी दिल्या. वेरूळ महोत्सव एक दिवस औरंगाबादमध्येही आयोजित करता येईल. मात्र, याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांना घ्यावा लागेल. डेक्कन ओड‌िसीमध्ये पर्यटकांना राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची सफर घडवण्यात येते. ही गाडी औरंगाबादमध्ये येण्याच्या तारखेच्या आसपास वेरूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हिवाळ्यात लेणी पायथ्याशी होणारा हा महोत्सव पर्यटक, रसिकांसाठी गैरसोयीचा ठरू लागला होता. त्यामुळे त्याचे विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात आयोजन करण्यात येत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा महोत्सव विविध कारणांमुळे आयोजित केला जात नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका घेणार टँकर भाड्याने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा पाणीपुरवठा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे हस्तांतरित केल्यामुळे त्यासाठीचा सर्व खर्च कंपनीने करणे अपेक्षित आहे. मात्र कंपनीतर्फे फक्त पाणीपट्टीची वसुली केली जात असून पाणीपुरवठ्याचा खर्च पालिका करत आहे. सातारा-देवळाईचे नाव पुढे करून टँकर भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला आहे. या प्रस्तावात तीन कोटी ३२ लाख ३१,९६० रुपयांच्या खर्चाला मंजूरी मागण्यात आली आहे.

पालिकेने सध्या मे. अमुल लॉरी सर्व्हिसेस यांच्याकडून पाच हजार लिटरचे वीस व दहा हजार लिटरचे दोन टँकर भाड्याने घेतले आहेत. या २२ टँकरद्वारे शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा केला जातो.

सातारा-देवळाईमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर भाड्याने घेण्याचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली तर सातारा- देवळाईकरांच्या नावाखाली मोठा खर्च करण्याची मुभा पालिका प्रशासनाला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी मोजावा लागेल आता दाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर आता सातारा-देवळाईतील नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागणार आहे. एक दिवसआड एका ड्रम पाण्यासाठी एक वर्षाचे तीन हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या तीन हजार रुपयांवर दरवर्षी १० टक्के वाढ केली जाणार आहे.

सातारा-देवळाई परिसराचा समावेश १४ मे २०१५ पासून औरंगाबाद महापालिकेत झाला आहे. या परिसरासाठी नगर पालिका असताना जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात होता. २२ मे २०१५ पासून जिल्हा प्रशासनाने या परिसराचा पाणीपुरवठा बंद केल्यान पालिकेवर पाणी देण्याची जबाबदारी आली. त्यामुळे पालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावात असे म्हटले आहे की, सातारा-देवळाई येथील नागरिकांना प्रतिवर्ष प्रतिड्रम (२१० लिटर) एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यासाठी तीन हजार रुपये शुल्क (पाणीपट्टी) आकारण्यात यावे. त्यानंतर प्रत्येक वर्षी त्यात दहा टक्के वाढ करण्यात येईल. म्हणजे पुढीलवर्षी तीन हजारावर दहा टक्के वाढीव शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय नागरिकांना प्रसंगानुसार (लग्नसमारंभ किंवा अन्य कामांसाठी) टँकर हवे असेल तर त्यांना वेगळे शुल्क भरून टँकर घेता येणार आहे.

शुल्क भरले तरच पाणी

प्रसंगानुरूप घेतल्या जाणाऱ्या पाच हजार लिटरच्या टँकरसाठी सहाशे रुपये, तर दहा हजार लिटरच्या टँकरसाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शुल्क भरले तरच नागरिकांना यापुढे पाणीपुरवठा केला जाईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’बाबत उद्या बैठक

$
0
0

औरंगाबाद : 'स्मार्ट सिटी'संदर्भात औरंगाबादकरांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब अंतिम प्रस्तावात असावे या प्रमुख हेतूने मराठवाडा जनता परिषदेच्या शहर शाखेतर्फे शनिवारी (१७ ऑक्टोबर) नागरिकांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक नागेश्वरवाडीतील स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेत सायंकाळी ४ वाजता होणार आहे. शहर विकासाविषयी आस्था व त्यासाठी संकल्पना मांडू शकणाऱ्या नागरिकांनी लेखी सूचनांसोबतच सहभागी व्हावे. स्मार्ट सिटी योजनेची वस्तुस्थिती समजून घेतानाच नागरिकांच्या संकल्पनांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे, असे आवाहन जनता विकास परिषेदच्या शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. शरद अदवंत, सचिव सारंग टाकळकर, प्राचार्य जीवन देसाई, डॉ. रश्मी बोरीकर, प्रा. मोहन फुले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ हा पाण्याचा चोरबाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महापालिका पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक सेवा नफा तत्त्वावर खासगी कंत्राटदाराला देणार असेल तर, नगरसेवक निवडून देण्याची गरज नाही. समांतर योजना सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या दराने पाणी देणार आहे. ही योजना पाण्याचा चोरबाजार आहे,' अशी टीका सामाजिक कार्यकर्ते प्रा. विजय दिवाण यांनी केली. ज्योतीनगर येथे गुरुवारी झालेल्या समातंरविरोधी मेळाव्यात ते बोलत होते.

महापालिकेची समांतर पाणीपुरवठा योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सर्वसामान्य नागरिकांना चढ्या दराने पाणीपुरवठा करणारी योजना टीकेचे लक्ष्य ठरली आहे. सामान्य नागरिकांमध्ये समांतरविरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा. विजय दिवाण वेगवेगळ्या परिसरात मेळावे घेत आहेत. ज्योतीनगर येथील कवितेच्या बागेत मेळावा घेण्यात आला. 'कचरा व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सुविधा महापालिकेने देणे आवश्यक आहे. या कामासाठी नागरिक नगरसेवक निवडून देतात. मात्र, नफा तत्त्वावर या सुविधा खासगी कंत्राटदाराकडे जाणार असतील तर, नगरसेवकाची गरज नाही. उलट मनपाने प्रशासक नेमून शहराचा कारभार करावा. गरिबाला महागड्या दरात पाणी देणे बेकायदेशीर आहे. पाण्याचा चोरबाजार लक्षात घेऊन सामान्यांनी आवाज उठवण्याची गरज आहे. आता माघार घेतल्यास पुढील २० वर्षे समांतरची गुलामगिरी सहन करावी लागेल. लबाड नफेखोर कंत्राटदार आणि भ्रष्ट महापालिकेला कडाडून विरोध करा. सरळमार्गी नागरिकांचे योजना शोषण करीत आहे,' असे प्रा. दिवाण म्हणाले. 'समांतरच्या जलदरवाढीत बेकायदेशीपणा आहे. दरवर्षी १० टक्के दरवाढ करू, कधी दर तीन वर्षांनी २५ टक्के दर वाढवू अशी वेगवेगळी माहिती समांतर देत आहे. ही विसंगती लक्षात घेऊन विरोध करा,' असे आवाहन प्रा. दिवाण यांनी केले.

असा करा विरोध

'नागरिकांनी फक्त १८०० रूपये पाणीपट्टी भरावी. जास्तीची पाणीपट्टी भरण्यास विरोध करावा. तसेच आपल्या घरी बाजारातून मीटर आणून बसवावा. हा मीटर फक्त १२०० रुपयांना मिळतो. समांतरवाले एका मीटरसाठी आठ ते दहा हजार रुपये वसूल करीत आहेत. ही सामान्यांची लूट आहे,' असे दिवाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांत‌िचौकातील अपघातात युवकाचा मृत्यू

$
0
0

औरंगाबादः दुचाकीवरून पडल्यामुळे समीर सुधीर पेडगावकर (वय १६) या तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री क्रांतिचौक उड्डाणपुलावर हा अपघात घडला. समीर दुचाकीवर बसून मित्रासोबत क्रांतिचौक उड्डाणपुलावरून जात होता. पुलावरील गतिरोधकावर दुचाकीचालक मित्राने ब्रेक लावला. त्यांची दुचाकी स्लीप झाली. या अपघातात समीरच्या डोक्याला गंभीर इजा झाली व तो बेशुद्ध पडला. त्याचा मित्रही जखमी झाला. सोबत दुसऱ्या दुचाकीवर असलेले मित्र या घटनेमुळे घाबरून गेले. यावेळी तेथून जाणारे उद्योजक चैतन्य राजूरकर यांनी हे दृश्य पाहिले आणि ते मदतीला धावून आले. त्यांनी तातडीने गंभीर जखमी असलेल्या समीरला कारमधून उल्कानगरी येथील मॅक्स सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कारमध्ये समीर याचा एक मित्रही सोबत होता. समीरचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, यात त्यांना यश आले नाही. रात्री पावणे एकच्या सुमारास समीरने अखेरचा श्वास घेतला. समीरच्या जखमी मित्रावर घाटीत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

दु:खाचा डोंगर कोसळला : वरिष्ठ पत्रकार सुधीर पेडगावकर व संस्कार प्रबोधिनी शाळेतील शिक्षिका स्वाती पेडगावकर यांचा समीर हा एकुलता एक मुलगा. पोदार शाळेत तो शिक्षण घेत होता. आपला शैक्षणिक आलेख उंचावत ठेवत स्केटिंग व हॉकी या दोन्ही क्रीडा प्रकारात तो राज्यपातळीवर तो चमकला होता. गुरुवारी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या अपघातांमुळे शहर धास्तावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील रस्ते अपघातांचे प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत असल्याचे अधिकृत आकडेवारीनुसार स्पष्ट होत असून, जानेवारी ते जून २०१५ या केवळ सहा महिन्यांमध्ये ८७ व्यक्तींचा मृत्यू झाला. २०१३ मध्ये १५७, तर २०१४ मध्ये १८३ व्यक्तींचा मृत्यू झाला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे दुचाकी अपघातातील मृतांमध्ये ६० ते ७० टक्के व्यक्ती या ३५ वर्षांखालील तरुण आहेत.

समीर सुधीर पेडगावकर या १६ वर्षीय युवकाचा बुधवारी (१५ ऑक्टोबर) क्रांतिचौक उड्डाणपुलावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या तरुणांच्या मृत्यूकडे लक्ष वेधले आहे. यानिमित्त 'मटा'ने तज्ज्ञांची संवाद साधला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सद्यस्थितीत घाटीमध्ये दररोज अपघातामध्ये जखमी झालेल्या १० ते १२ रुग्णांना दाखल केले जात आहेत. यातील निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच ५ ते ६ रुग्ण हे हेड इन्जुरीचे असतात. या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आनंद बीडकर म्हणाले, 'दुचाकी अपघातग्रस्तांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. मद्यपान करून दुचाकी चालवणे, 'राँग साइड' व 'ट्रिपल सिट' चालवणे, ही दुचाकी अपघातातील मृत्यूची सर्वांत महत्वाची व गंभीर कारणे आहेत.'

मेंदूला लागला मार

समीरच्या मेंदूला जोराचा व गंभीर मार लागला होता व गंभीर अवस्थेतच त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळेच सर्व प्रकारचे शर्थीचे प्रयत्न करुनही त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images