Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विजेअभावी पिके सुकू लागली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने पळसपूर भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पाण्यावर अवलंबून पिके सुकू लागली आहेत. या परिसरातील कपाशीचे पीक पाणी असूनही वीज नसल्याने अडचणीत आले आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर असलेल्या पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, घारापुर, खडकी बा. शेलोडा या भागातील शेतकऱ्यांचे जीवन शेती पिकांवर अवलंबून आहे. या भागात गेल्या काही वर्षांपासून वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकरी व वीज ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता नुकतेच आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या प्रयत्नाने पळसपूर येथे ३३ के.व्ही. उपकेंद्रास मंजूर मिळाली आहे. या कामास लवकरच सुरुवात होणार असली तरी सध्या या भागातील नागरिकांना हिमायतनगर ३३ के.व्ही केंद्रांतर्गत वीज पुरवठा केला जात आहे. यावर्षी पावसाने खरीप हंगामात दगा दिल्याने ऊस, तुरी, कापसाची पिकांची पूर्णतः वाढ झाली नाही. परिणामी ऑगस्ट महिन्यातच पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. आजघडीला शेतीत असलेल्या पाण्यावर पिके जगवायची असताना महावितरण कंपनीकडून होणारा वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने पिके वळण्याच्या मार्गावर आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यासाठी १२.८४ टीएमसी पाणी सोडणार

0
0

औरंगाबाद: दुष्काळग्रस्त मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी अहमदनगर आणि नाशिकमधील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडा, असा आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिला आहे. पाटबंधारे विभाग आणि औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यानंतर हा महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आला.

नाशिक आणि नगरमधील मुळा धरणातून १.७४ टीएमसी, प्रवरामधून ६.५० टीएमसी, गंगापूर १.३६ टीएमसी, दारणा धरणातून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे. ३१ ऑक्टोबरपूर्वी हे पाणी सोडण्याचे निर्देशही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले आहेत.

भाजप आमदार प्रशांत बंब यांनी कालच अहमदनगर-नाशिकमधली अनधिकृत धरणं कॅप्सूल बॉम्बने उडवून देण्याची मागणी केली होती. यानंतर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनीही बंब यांच्या सुरात सूर मिसळत, जनआंदोलन उभं करण्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यात बुडून बालकाचा अंत

0
0

वैजापूरः अंगणवाडीच्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्डयात पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना शहरातील आनंदनगर परिसरात शुक्रवारी दुपारी घडली.

समर्थ सोपान वाघमारे (रा. कादरीनगर) असे मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. नगर पालिकेने शहरातील आनंदनगरमधील खुल्या जागेत अंगणवाडी इमारतीचे बांधकाम मागील सुरू केले आहे. या कामाचा ठेका के. के. कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. यासाठी ठेकेदाराने या ठिकाणी कॉलम उभारण्यासाठी खड्डे खोदलेले होते. मुसळधार पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरले होते. या कामाच्या लगतच्याच कादरीनगरमधील सोपान वाघमारे यांचा मुलगा समर्थ हा शुक्रवारी घराबाहेर खेळत होता. खेळता खेळता तो या खड्ड्यात पडला. तो पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगरसेवक साबेरखान यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंडळाधिकारी घागरे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दगडांनी ठेचून एकाचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

मुदखेड तालुक्यातील टाकळी गावात ग्रामपंचायत निवडणुकामध्ये दुसऱ्या गटात का गेलास म्हणून पाच जणांनी मिळून एकाचा दगडांनी ठेचून खून केला. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडला आहे. माधव बालाजी शिंदे (वय २१ रा. टाकळी ता.मुदखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टाकळी गावातील केशव गणपती शिंदे, शिवाजी शंकर शिंदे, लक्ष्मण पुरभाजी शिंदे, माधव पंढरी शिंदे आणि लालजी कोंडीबा शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. या पाच जणांनी पुंडलिक गणपती शिंदे (वय ४५ ) यांचा निवडणुकीमध्ये आमच्या गटाकडून काम करण्याची बोलणी झाली असताना तु दुसऱ्या गटाकडून काम का करतोस असे सांगून पुंडलिकला दगडांनी ठेचून खून केला. मुदखेड पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक श्रीधर पवार हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणप्रकरणी वक‌िलांचा बहिष्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

एका अल्पवयीन बालिकेच्यावतीने न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलाला एका महिलेने कोर्टाच्या गेटसमोर मारहाण केल्याचा प्रकार घडला. या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यद्वारासमोर काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पेशकाराला सुद्धा मारहाण केली होती. वकिलाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शनिवारी (१७ ऑक्टो‌बर) जिल्हाभर वकील संघाने कोर्टाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता.

१५ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास कोर्टाच्या गेटसमोर चहा-पाणी घेत थांबलेल्या अॅड. प्रदीप राठोड यांना महादेवी मठपती या महिलेने मारहाण केली. त्यावेळी अॅड. राठोड यांच्यासोबत त्यांचे अनेक मित्र होते. या झालेल्या मारहाणीचा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विजयकुमार भोपी, सचिव अॅड. नरेश कल्याणकर यांनी कार्यकारिणीची बैठक बोलावून निषेध ठराव मांडला. तो मंजूर करून सर्व वकिलांना शनिवारच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातुरात डेंगीने बालिकेचा मृत्यू

0
0

लातूरः लातूर आणि परिसरात डेंगींच्या साथीने थैमान घातले असून शहराच्या विविध भागातील हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने पेशंट उपचार घेत आहेत. शुक्रवारी सांयकाळी एका खासगी रुग्णालयात अकरा महिन्यांच्या बालिकेचा डेंगीने बळी घेतला.

लातूर शहरात डेंगीचा फैलाव वेगाने वाढत आहे. पेशंटची वाढती संख्या ही चिंताजनक असल्याची कबुली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी 'मटा'शी बोलताना दिली. शुक्रवारी एका बालिकेचा मृत्यू झाल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, 'जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत शहरात २५० पेशंटना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहर परिसरात १५० पेक्षा अधिक जणांना लागण झाल्याची शक्यता आहे. डेंगीबाबात आयुक्त सुधाकर तेलंग यांनी आजच आढावा बैठक घेतली असून उपाय योजना, प्रबोधनासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आदेश दिले.बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे म्हणाले, 'डेंगीने अनेक पेशंट प्रभावीत झालेले आहेत. त्यातील दोन पेशंट व्हेंटिलेटरवर आहेत. दादोजी कोंडदेव नगर, जुना औसा रोड, ड्रायव्हर कॉलनी भागातील लहान मुलांची, युवकांची संख्या अधिक आहे. औषधोपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीत मोठा भ्रष्टाचार

0
0

औरंगाबादमध्ये पीआरसी चेअरमन निलंगेकर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील अन्य जिल्हा परिषदांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वात मोठा भ्रष्टाचार दिसून येत आहे. सिंचन, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण विभागांतील अनेक गैरप्रकारांची नोंद घेतली असून कारवाई संदर्भात थेट सचिवांकडे साक्ष लावण्यात आल्या आहेत. सविस्तर अहवाल विधीमंडळाच्या पटलावर सादर केला जाईल, अशी माहिती पंचायत राज समितीचे चेअरमन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

गुरूवारपासून तीन दिवस समितीचा औरंगाबाद दौरा होता. त्याची माहिती देताना निलंगेकर म्हणाले, 'पहिल्या दिवशी आम्ही लेखापरीक्षण अहवालातील त्रुटींची पाहणी केली. शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी दिल्या. यापूर्वी आम्ही पाच जिल्हा परिषदांचा दौरा केला. जिथे राज्य सरकारची सत्ता असते तिथे पीआरसी जात नाही, असे संकेत होते. पण आमच्या सरकारने सरसकट न्याय देण्याची भूमिका घेतली. हिंगोली, पुणे, नागपूरमध्ये १२ वर्षांपासून समिती गेली नव्हती. हे जिल्हे आम्ही केले. औरंगाबाद जिल्ह्यातही तशीच परिस्थिती होती. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना आमच्या पथकाने भेट दिली.'

तीन पथके करून आम्ही तीन - तीन तालुके पाहिले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिला गेलेला पैसा तिथपर्यंत पोचला पाहिजे, पण दुर्देवाने असे चित्र येथे दिसून आले नाही. लघु पाटबंधारे, सिंचन विभागात मोठा भ्रष्टाचार आहे. राज्यात सिंचन विभागाच्या भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू औरंगाबाद जिल्हा परिषद आहे. सिल्लोड तालुक्यातील गिरजा नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. नदीतून पाणी वाहत आहे, पण बंधाऱ्यात थेंबभर पाणी नाही. कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले बंधारे अर्धवट कसे काय राहिले ? गेल्या काही वर्षांत पडलेला हा गॅप भरून काढण्यासाठी पीआरसी काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बांधकाम विभागातही अव्यवस्था आहे. ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब आहे. पथकाला शुक्रवारी एका तालुक्याचा आढावा घेण्यासाठी बारा तास लागले. समाजकल्याण विभागाचे साहित्य वाटप तीन वर्षांपासून रखडले आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या गेल्या नाहीत, असे अनेक गैरप्रकार आढळून आले. याची गंभीर दखल घेऊन आम्ही कारवाई प्रस्तावित केली आहे. अनेक विभागांची सचिवांसमोर साक्ष ठेवली आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर पुढच्या महिनाभरात कारवाई होईल, असेही निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्ष उलटले तरीही आर्थिक मदत मिळेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा वेचताना अचानक भीषण स्फोट होऊन तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेला एक वर्ष उलटले. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने या महिलेच्या कुटुंबीयाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केले नसल्याचे समोर आले आहे.

१६ ऑक्टोबर २०१४ रोजी चिकलठाणा एमआयडीसीमधील रस्त्याच्या कडेला आणून टाकलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या वेचताना अचानक मोठा स्फोट झाला. त्यात नंदाबाई कडूबा भालेराव (रा. मिसारवाडी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने उद्योनगरी हळहळली. मात्र, कोणत्याही प्रशासकीय विभागाने, राजकीय नेत्यांनी या महिलेच्या कुटुंबीयाला आधार देण्याचे सौहार्द दाखविले नाही. भालेराव कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी मयताची आई शशिकला आव्हाड, पती कडूबा भालेराव, मुलगा केशव तसेच सामाजिक कार्यकर्ते नागेश भालेराव उपस्थित होते.

मयत नंदाबाई या कचऱ्यातील भंगार गोळा करून दिवसाकाठी शंभर-सव्वाशे रुपये मिळवून उदरनिर्वाह करत असत. तिच्या कुटुंबात पती, मुलगा, मुलगी आणि जावई यांचा समावेश आहे. वेदनादायक बाब म्हणजे तिच्या पतीला गुडघेदुखीचा त्रास असल्याने ते काहीच काम करू शकत नाहीत. मुलगा दहावीचे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाच्या जबाबदारीसाठी मातीकाम करत आहे.

नंदाबाईच्या मृत्यूने उद्ध्वस्त झालेल्या भालेराव कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून का होईना मदत मिळावी यासाठी आठ महिन्यापूर्वी या कुटुंबीयाने विभागीय आयुक्तालयाच्या माध्यमातून पत्रव्यवहार देखील केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्त-सभागृहनेत्यांमध्ये अविश्वासावरून जुंपली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन आणि सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांच्यात अविश्वास ठरावावरून चांगलीच जुंपली आहे. आयुक्तांनी जंजाळ यांना नगरसेवकपदावरून अपात्र का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली आहे. तर, जंजाळ यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी विमान प्रवासावर केलेल्या खर्चाचा तपशील शनिवारी उघड केला.

आयुक्तांची नोटीस जंजाळ यांना शनिवारी मिळाली. त्या म्हटले आहे की, जंजाळ यांनी सिटीप्राइड या महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलात २०१३मध्ये ३९५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा गाळा भाड्याने घेतला होता. काही महिने या गाळ्याचे भाडे त्यांनी भरले. त्यानंतर त्यांनी हा गाळा सोडला. गाळा सोडताना त्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली. मोडतोडीमुळे महापालिकेचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. दीड लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि थकित भाडे तत्काळ भरा अन्यथा महाराष्ट्र महापालिका अधिनियम १० (फ) नुसार तुम्हाला अपात्र ठरवले जाईल असे, या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

पानझडेंचा विमानखर्च जंजाळांनी केला उघड

महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी एप्रिल २०१३ ते सप्टेंबर २०१५ या काळात विमान प्रवासावर चार लाख ८५ हजार ९९१ रुपयांचा खर्च केल्याचा तपशील जंजाळ यांनी आज उघड केला. जंजाळ यांनी लेखा विभागाकडून हा तपशील मागवला होता. लेखा विभागाने जंजाळ यांना कळवलेल्या तपशिलात म्हटले आहे की, शहर अभियंता यांनी जानेवारी २०१४ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत बाहेरगावी कामासाठी जाण्यासाठी प्रवासभत्ते घेतले आहेत. त्या भत्त्यांची एकूण रक्कम दोन लाख ११ हजार ८९१ रुपये इतकी आहे. पानझडे यांनी या काळात मुंबई, दिल्ली, नागपूर या गावांसाठी प्रवास केला. त्यात कोर्ट केसेस आणि कार्यालयीन कामकाजाचा समावेश होता. एप्रिल २०१३ ते मार्च २०१५ या कालावधीत पानझडे यांनी विमान प्रवासासाठी २ लाख ७४ हजार १०२ रुपये प्रवास भत्ता म्हणून घेतले, असा उल्लेखही लेखा विभागाच्या तपशीलात असल्याचे जंजाळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवी परीक्षेत एका बाकावर तीन विद्यार्थी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर परीक्षेचे सगळे निकष धाब्यावर बसवले आहेत. अनेक परीक्षा केंद्रावर एका बाकावर तीन-तीन परीक्षार्थी परीक्षा देत आहेत.

विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना ६ तर पदव्युत्तरच्या परीक्षेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. अनेक परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्तीचे परीक्षार्थी देण्यात आले आहेत. शहरातील विद्याधन कॉलेजमधील केंद्रात एकाच बाकावर तीन परीक्षार्थी बसवण्यात येत आहेत. काही कॉलेजांमध्ये तर स्टूलवर बसून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते आहे. विद्यापीठाने हॉलतिकीटवर केवळ कॉलेजचे नाव दिले. पत्ता दिला नाही. यामुळे काहीशा अडचणी आल्याचे संबंधित कॉलेजचे डॉ. एस. ए. घुमरे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

परीक्षार्थींना पुरेशी सुविधा पुरविणे ही परीक्षा केंद्राची जबाबदारी आहे. कॉलेजांची क्षमता पाहूनच विद्यार्थी दिले आहेत. एका बाकावर तीन विद्यार्थी बसविणे योग्य नाही. त्याबाबत मला पहावे लागेल.

- डॉ. प्रल्हाद लुलेकर, परीक्षा नियंत्रक, विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त तलाठ्यास अखेर अटक

0
0

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन तलाठी अशोक गायकवाडला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. कोर्टाने त्यास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पहाडसिंगपुऱ्यातील न्यायप्रविष्ट जमीन गोरगरीबांना विक्री करुन फसवणूक केल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने राजू लेखराज तनवाणी व राज दिलीपकुमार आहुजा यांना यापुर्वी अटक केलेली आहे. राजू तनवाणी व इतरांनी गट क्रमांक ९९/२च्या सातबारा उताऱ्यावर मौजे औरंगाबाद तलाठी सज्जाचे तत्कालीन तलाठी अशोक गायकवाड यांच्या २००४ मध्ये सह्या घेतल्या. गायकवाड यांना ही जमीन वादग्रस्त असल्याची माहिती होती. त्याच बरोबर जमिनीचा वाद कोर्टात सुरु असूनही त्यांनी तशी नोंद सातबाऱ्यावर घेतली नाही, असा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ टीएमसी पाणी सोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरण समुहातून जायकवाडीमध्ये १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश शनिवारी देण्यात आला. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी हा आदेश दिला. त्याची अंमलबजावणी ३१ ऑक्टोबरपर्यंत करणे बंधनकारक आहे.

दरम्यान, नवरात्र, दसरा आणि मोहरम या सणांच्या दरम्यान उपलब्ध होणाऱ्या पोलिस बंदोबस्तानुसार जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे काम केले जाईल, असे नगर व नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीने या बैठकीत सांगितले. दोन्हीही जिल्हाधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. समन्यायी पाणी वाटपासाठी, प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात बिराजदार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात झालेल्या निर्णयाची माहिती बिराजदार यांनी पत्रकारांना दिली.

ते म्हणाले की, हा निर्णय पैठण धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर आधारित आहे. खरिपासाठी या धरणातून झालेल्या पाणी वाटपाचा विचारही त्यात करण्यात आला आहे. खरिपासाठी जायकवाडीच्या वरच्या धरणातून नगर - नाशिक या जिल्ह्यांनी आतापर्यंत १५.६ टीएमसी पाणी वापरले. सध्या या धरणांमध्ये ४९.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. या दोन्हींची बेरीज ६४.९१ टीएमसी होते. एवढे पाणी वितरणासाठी गृहित धरून त्यातून १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाणी वाया जाऊ नये म्हणून धरण सोडताना ते जास्तीतजास्त विसर्गाने सोडण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले असले तरी, जायकवाडीमध्ये प्रत्यक्ष आठ ते नऊ टीएमसी पाणीच येईल, २५ ते ३० टक्के पाण्याचा तोटा सहन करावा लागेल असे बिराजदार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याला पाणी

0
0

'जायकवाडी'त पाणी सोडण्याचे नगर, नाशिक जिल्ह्यांना आदेश

बंदोबस्त मिळाला तरच पाणी सोडू

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरण समूहातून जायकवाडीमध्ये १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश शनिवारी दिला. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी हा आदेश दिला. त्याची अंमलबजावणी ३१ ऑक्टोबरपर्यंत करणे बंधनकारक आहे.

समन्यायी पाणी वाटपासाठी, प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात बिराजदार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 'हा निर्णय पैठण धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर आधारित आहे. खरिपासाठी या धरणातून झालेल्या पाणी वाटपाचा विचारही त्यात करण्यात आला आहे. खरिपासाठी जायकवाडीच्या वरच्या धरणातून नगर-नाशिक या जिल्ह्यांनी आतापर्यंत १५.६ टीएमसी पाणी वापरले. सध्या या धरणांमध्ये ४९.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. या दोन्हींची बेरीज ६४.९१ टीएमसी होते. एवढे पाणी वितरणासाठी गृहित धरून त्यातून पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत', असे ते म्हणाले.


नगर-नाशिकमध्ये संताप

नगर-नाशिक जिल्ह्यातील पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने औरंगाबादेत घोषित करताच हजारो शेतकरी संतप्त झाले. पाटबंधारे खात्याच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी शेतकरी सोमवारी आंदोलने करुन सरकारचा निषेध करणार आहेत. जायकवाडीला पाणी जाऊ द्यायचे नाही, यावर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे पाण्याचा संघर्ष पेटणार असल्याने पोलिस बळाचा मोठा वापर करून जायकवाडीला पाणी सोडण्यावर ठाम आहे.

'सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्याला जोडूनच दसऱ्याचा सण आहे, त्यानंतर मोहरम आहे. यांत पोलिस बंदोबस्त मिळाला तरच, पाणी सोडले जाईल,' असे नगर व नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. पाण्याला 'जायकवाडी'पर्यंत संरक्षण देण्याची जबाबदारी त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांची आहे, असे बिराजदार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळलेल्या झाडांचा धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाशिक रोडवरील मिटमिटा येथील वडाचे झाड पूर्ण वाळले असून ते केव्हाही पडू शकते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
नाशिक रोडवरील पडेगाव, मिटमिटा येथे वडाची मोठी झाडे आहेत. परंतु ही झाडे गेल्या दोन वर्षांपासून आपोआप उन्मळून पडत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान १२ ऑक्टोबर रोजी एका झाडाची वाळलेली फांदी पडून एक मोटारसायकलस्वार जखमी झाला. या रस्त्यावर धोकादायक परिस्थितीतील वाळलेली झाडे असून ते हटवून तेथे वृक्षारोपण करावे, अशी मागणी जागृती कृती समितीचे शरद भोसले, काकासाहेब जाधव, जी. एस. शिंदे, अशोक वाघ, शेख आमेर,

मनोज जाधव, डिगंबर मुळे आदींनी केली आहे.

नाशिक रोडवरील वाळलेली झाडे हटवून तेथे नवीन झाडे लावली तर पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल व अपघात टाळता येतील. या झाडांच्या फांद्या जीर्ण व बुंधे पोकळ झाले आहेत. सततच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे जमिनीतील मुळे सुटी होत असल्याचे काही नागरिकांचे मत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळातील कामगिरीने टळले बालविवाह

0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com

औरंगाबादः एखाद्या क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरी आयुष्याची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरते, असा अनुभव जालना जिल्ह्यातील शेतमजूर, ऊसतोड कामगारांच्या मुलींना आला आहे. पालकांनी त्यांच्या विवाहाचा घाटही घातला होता, पण खेळाचे मैदान गाजविल्यामुळे पालकांना हा निर्णय बदलावा लागला.

रोहिणी पाष्टे (पिठोरी सिरसगाव), पूजा शिंदे (पाल ठोकून राहते), सोनी काळे (सिद्धेश्वर पिंपळगाव), मनिषा राठोड (पिठोरी पिसरगाव तांडा), दीपाली बर्वे (दह्याळा), दीपाली घाडगे (चुर्मापुरी), अनिता राठोड (गोंदीतांडा), राधा शिंदे, तृप्ती राठोड (गुंडेवाडी), अंजनी गायकवाड (बारसवाडा), सुलभा खरात (पाथरवाला), राधा खरपडे (एकलहेरा), वर्षा शिंदे (नालेवाडी) या ऊसतोड, मोलमजुरी, मातीकाम करणाऱ्या कुटुंबातील मुलींनी क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला आहे.

त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन माजी खासदार अंकुशराव टोपे यांनी या मुलींना शाळेत प्रवेश घ्यायला लावला. रोहिणी पाष्टेने चिलीमध्ये झालेल्या 'स्लम सॉकर' आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मराठवाड्याचे प्रतिनिधित्व केले. तिच्या कामगिरीमुळे कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या संघाची चर्चा होऊ लागली.

क्रीडा शिक्षक शेख रफिक अफसर यांनी त्यांना मैदानावर आणले. त्यांच्या क्रीडा प्रशिक्षणाला खो-खोपासून सुरुवात केली. खो-खोतील प्रगती पाहून त्यांनी नंतर कुस्ती, अॅथलेटिक्स, फुटबॉल हे खेळही खेळण्यास सुरुवात केली. प्रारंभी प्रतिस्पर्धी संघांतील मुलींकडील आधुनिक साहित्य, कीट पाहून त्या घाबरत असत. २०१३मध्ये या मुलींना सर्वप्रथम खेळाचे संपूर्ण कीट देण्यात आले. त्यावेळी मुलींनी पहिल्यांदा बूट घालून मैदानावर अफलातून कामगिरी बजावली. मत्स्योदरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर डॉ. भागवत कटारे यांनी या मुलींसाठी निवास व भोजन व्यवस्था मोफत केली. त्यांना आधुनिक कीटही उपलब्ध करून दिले. प्रशांत तौर यांच्या मदतीमुळे या मुलींच्या कामगिरीचा आलेख उंचावत आहे.

राष्ट्रीय पातळीवर ठसा

राधा शिंदे, तृप्ती राठोड यांनी राष्ट्रीय पातळीवर दोन वेळा सुवर्णपदक जिंकले. अंजनी गायकवाड, वर्षा शिंदे, रोहिणी पाष्टे, शीतल प्रभारे यांनीही राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला. कुस्तीत अनिता राठोड, तृप्ती राठोडने ब्राँझपदक जिंकले आहे. खो-खोमध्ये या संघाने वर्चस्व कायम ठेवले आहे. प्रत्येक वर्षी त्यांचा संघ राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरत आहे.

वि‌वाह टळले...

दहावीचे शिक्षण घेत असतानाच पालकांनी या मुलींची लग्ने ठरवली होती. ऊसतोड कामगारांमध्ये मुलींची लग्ने कमी वयातच होतात. त्यामुळे मुलींची लग्ने पालकांनी ठरवली होती. खेळातील प्रगतीमुळे क्रीडा शिक्षकांनी त्यांच्या पालकांना समजावून सांगितले आणि त्यांनीही मुलींच्या करिअरला मिळालेली दिशा पाहून आपला निर्णय बदलला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टँकरखाली चिरडून विद्यार्थी मृत्युमुखी

0
0

औरंगाबादः पाण्याच्या टँकरने दुचा‌कीस्वार विद्यार्थ्यांना पाठीमागून धडक देऊन चिरडल्याची घटना अमरप्रीत हॉटेल चौकात रविवारी सकाळी घडली. अपघातात विशाल रामदास जंगले (वय २१, रा. पळसगाव, ता. खुलताबाद) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अपघातात अन्य एक जण जखमी झाला. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मृत विशाल हा जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेजमध्ये इंजिनीयरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील शेतकरी अाहेत. विशाल व त्याचा मित्र नीलेश भरत भोसले (वय १९, रा. पळसगाव) दुचाकीच्या दुरुस्तीसाठी गावाकडून शहरात आले होते. अमरप्रीत चौकात सिग्नल लागल्यामुळे ‌ते थांबले होते. सिग्नल सुटल्यानंतर मोंढा नाक्याकडे जाण्यास ते निघाले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या पाण्याच्या टँकरने त्यांना धडक दिली. त्यामुळे दुचाकी घसरून दोघे खाली पडले. टँकरच्या चाकाखाली नीलेशचा डावा हात तर, विशालचे डोके चिरडले गेले. विशाल काही अंतरापर्यंत टँकरसोबत फरफटत गेला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. न‌ीलेश गंभीर जखमी झाला. अपघातानंतर टँकरचालकाने पलायन केले.

अपघातानंतर विशालचा मृतदेह रस्त्यावर पडून होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव या वेळी तेथून जात होते. त्यांनी मृतदेह रस्त्यावरून हलवला. रुग्णवाहिका येण्यास विलंब लागल्याने रिक्षामधून मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आला. नीलेशला घाटीमध्ये पाठविले. अपघाताची क्रांतिचौक ठाण्यात नोंद करण्यात आली.

हेल्मेट असते तर...

घटनास्थळी अपघातानंतर काही मिनिटातच पोलिस निरीक्षक अविनाश आघाव दाखल झाले. त्यांनी त्याचा मृतदेह हलवला. हेल्मेट असले असते तर कदाचित विशालचा मृत्यू टळला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. चार दिवसांपूर्वी देखील हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला मार लागून समीर पेडगावकर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हेल्मेट वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

जीवलग मित्राचा डोळ्यासमोर मृत्यू

विशाल व नीलेश दोघेही जीवलग मित्र आहेत. नीलेश खुलताबाद येथे बारावीत शिकतो. काही दिवसांपूर्वी नीलेशने नवी दुचाकी घेतली होती. विशालच्या हातून या दुचाकीचा अपघात झाल्याने किरकोळ नुकसान झाले होते. दुचाकी दुरुस्तीसाठी दोघे रविवारी जालना रोड येथील शोरूममध्ये जात होते. अपघात घडल्यानंतर दोघे खाली पडले. यावेळी नीलेशने विशालला टँकर येत असल्याचे पाहून ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. जीवलग मित्राचा दुर्दैवी मृत्यू त्याच्या डोळ्यादेखत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुरस्कार परत करण्याचे राजकारण’

0
0

नांदेड:

सरकारने दिलेले साहित्य पुरस्कार परत करणारे साहित्यिक पुरस्कारांचे राजकारण करीत आहेत. स्वत: अर्ज करून आणि खटपटी-लटपटी करून ज्यांनी हे पुरस्कार मिळविले होते. ते पुरस्कार परत करीत आहेत, याचे आश्चर्य वाटते. साहित्यिक राजकारणी बनल्याने हा कार्यक्रम राबविला जात आहे, असे परखड मत विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळीचा बाजार गडगडला

0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

डाळीच्या किमंतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने साठेबाजांच्या विरोधात घेतलेले कडक भूमिकेचे चांगले परिणाम आज बाजारपेठेवर झाले. तुरीच्या भावात लक्षणीय घट झाली असून त्यामुळे आता सट्टा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

केंद्र सरकारने सध्या मध्यप्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या ठिकाणी डाळीच्या साठ्यावर मर्यादा आणल्या आहेत. महाराष्ट्र सरकार मात्र, अजून त्यात मागेच आहे. महाराष्ट्रात अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. साठ्यावर मर्यादा आणलेल्या तीन राज्यातील व्यापाऱ्यांचे गोदामे तपासणीचा धडकाही तेथील व्यापाऱ्यांनी सुरू केला असल्यामुळे तेथील व्यापाऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. मर्यादा घोषीत करून त्यानंतर तपासणी करावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

आज बाजारपेठेत तुरीचा भाव हा चार हजार रुपयांनी कमी होऊन आकरा हजार ५०० रुपयांवर स्थिरावला आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्याचा परिणाम तुरडाळीच्या ठोक किमंतीवर झाला आहे. ज्या तुरीच्या डाळीने व्दिशतक गाठले होते ती तूरडाळ ही ३० रुपयांनी कमी झाली आहे. तूर डाळीचा ठोक दर हा २१० रुपये होता किरकोळ बाजारात ती २२५ रुपयापर्यंत विकली जात होती. आता तुरीच्या डाळीचा ठोक भाव हा १८० रुपये झाला आहे. अशाच पद्धतीने इतर डाळीचे ठोक भाव ही काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामध्ये हरभरा डाळ ७० रुपयांवरुन ६५ ते ५५, उडीद डाळ १३० वरुन ११० रुपयांवर, मुगडाळ ११५ वरुन ११० रुपयांवर आली आहे.

सरकारने घेतलेल्या साठेबाजाच्या विरोधातील भूमिकेमुळे हा परिणाम झाला असल्याचे मान्य करून डाळ उत्पादक हुकुमचंद कलंत्री म्हणाले, 'उतरलेले भाव ग्राहकांना मिळण्यासाठी इतर देशातून डाळ आयात करावीच लागणार आहे. त्यासाठी दोन्ही सरकारने आक्रमकपणे, गतीमान पद्धतीने निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा बाजारपेठेच्या गणिताप्रमाणे आठ दिवसानंतर हेच दर पुन्हा वाढण्याची भीती आहे. तातडीने तुरडाळ आयात करून ती स्वस्त धान्य दुकानातून वाटप सुरू केली तरच थेट फायदा होईल.'

दोन महिन्यात नवी तूर बाजारात येणार आहे. तोपर्यंत आयात डाळीचा उपयोग होईल. अन्यथा भारतीय शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याची वेळ आली असतानाच आयात डाळ जर बाजारात असेल तर त्याचा फटका शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावास बसू शकतो. त्याचे नियोजन युद्धपातळीवर करण्याची गरज आहे.

- हुकुमचंद कलंत्री, डाळ उत्पादक, लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणाऱ्या जब्याला बेड्या

0
0

३० हजारांचा मुद्देमाल जप्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरफोडी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास जेरंबद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या ८ मोबाइलसह ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जब्या उर्फ उमेश मारक्या भोसले असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.

पैठण येथील बसस्थानक परिसरात जब्या उर्फ उमेश मारक्या भोसले हा आरोपी चोरीचे मोबाइल विक्री करण्यासाठी येत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांना मिळाली. त्याआधारे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे व पथकाने कारवाई करत बसस्थानक परिसरातून संशयितास ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे आठ मोबाइल सापडले.

दरम्यान, पैठण तालुक्यातील चनकवाडी येथील महादेव म्हस्के यांच्या घराचे कुलुप तोडून सूमारे ६५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती.

ही घरफोडी जब्या याने त्यांच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे तपासात उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आंधळे यांच्यासह दिलीप मगरे, अनिल गायकवाड, राजेश चव्हाण, भुषण देसाई यांनी ही कामगिरी केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने मृत्यू

0
0

औरंगाबादः लेखाकोष भवनातील वाहनचालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज महादेव पवार (वय ४५ रा. पुंडलीकनगर) हे मूळचे धुळे येथे असून औरंगाबादला एकटे राहतात. रविवारी गावाकडून ते शहरात आले होते. सकाळी शासकीय वाहन धुण्यासाठी कार्यालयातील हौदाजवळ गेले असता त्यांना विजेच्या मोटारीचा शॉक बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images