Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पुरी, राठोडांचा अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे संस्थेस सहा कोटी साठ लाख रूपयांत जमीन विक्री केल्याप्रकरणी प्रा. सुरेश पुरी व प्रा. मोतीराम राठोड यांच्याविरूद्ध कोर्टाच्या आदेशाने दाखल केलेल्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एन. डब्ल्यू सांबरे यांनी फेटाळला आहे. यापूर्वी हायकोर्टाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

सातारा परिसरातील या नोंदणीकृत संस्थेच्या मालकीची गट नंबर २४३ मधील ११ हेक्टर जमीन स्वत:ची मिळकत म्हणून दोघांनी विक्री केल्याची फिर्याद प्रा. अविनाश किशन राठोड यांनी दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशावरून दोघांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही जमीन १९८१ मध्ये या संस्थेच्या नावे केवळ ३० हजार रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली असून संस्थेची अद्यापपर्यंत नोंदणी करण्यात आलेली नाही. या प्रकरणात पियुष जाधव यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून दोघांच्या जामिनाला विरोध केला. हस्तक्षेपकातर्फे गिरीश नाईक थिगळे, बी. ए. ढेंगळे व सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मनीषा देशपांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डाळ व्यापाऱ्यांवर १७ ठिकाणी छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील १७ डाळ व्यापाऱ्यांवर तहसीलदारांच्या पथकांनी मंगळवारी छापे मारले. मात्र, एकाही ठिकाणी नियमबाह्य डाळसाठा आढळला नाही. डाळीचे गगनाला भिडलेले दर पाहता शासनाने नियमबाह्य साठेबाजांवर कारवाई करणे सुरू केले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली ४ पथके तयार केली आहेत. एका पथकात तीन अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पथकांनी दिवसभरात १७ ठिकाणी छापे टाकले. यात औरंगाबाद शहर परिसरातील पंढरपूर, वाळूज, सातारा परिसर, लासूर स्टेशन, वैजापूर आदी ठिकाणी छापे टाकून दुकाने, गोदाम तसेच शहराबाहेरील खासगी जागांची तपासणी केली. मात्र, कुठेही डाळीचा नियमबाह्य साठा आढळला नाही.

'शहर परिसरातील व्यापाऱ्यांची शहराबाहेर गोदामे असून या गोदामांचीही तपासणी करण्यात आली. मात्र, या कारवाईत कुठेही नियमबाह्य साठा आढळला नाही,' अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटरनॅशनल कार्गो सुविधा डिसेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एअर इंडिया येत्या डिसेंबरपासून औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय ‌कार्गो सुविधा सुरू करणार आहे. या सेवेमुळे मराठवाड्यातील उद्योजकांना आखाती देश, आस्ट्रेलिया, चीन आदी देशांत उत्पादने थेट पाठविता येणार आहेत.

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला कस्टमचा दर्जा देण्यात आला आहे. यानंतर विमानतळावर कार्गो हब उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासोबतच एअर इंडियानेही आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने येत्या डिसेंबरपासून औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या सुविधेमुळे औरंगाबादेतून विविध उत्पादने सिंगापूर, सिडनी, मेलबर्न, शांघाय आणि दुबईला पाठविता येणार आहेत. या सेवेमुळे शहरालगतच्या शेतमाल, अॅटो कंपोनंट, औषधी, यंत्रांचे सुटे भाग निर्यात करण्याची सोय होणार आहे. या सुविधेमुळे रोज तीनशे ते साडेतीनशे टन मालाची आंतरराष्ट्रीय बाजारापेठेपर्यंत पोचविता येणार आहे.

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे. ही सुविधा शहरातील उद्योजक, व्यापारी यांच्यासह शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.

- वसंत बरडे, व्यवस्थापक, एअर इंडिया, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता टुरिझम पोलिस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐ‌तिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादेत देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी टुरिझम पोलिस संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. टुरिझम पोलिसांचे पथक लवकरच कार्यान्वित होणार आहे. या पथकाला स्वतंत्र वाहने देण्यात येणार आहेत. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश केला जाणार आहे.

औरंगाबाद शहर व जिल्हा पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. अजिंठा, वेरूळ येथील लेण्या, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, पाणचक्की, वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर आदी ठिकाणांना भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची शहरात वर्षभर गर्दी असते. अनेक ठिकाणी पर्यटकांसोबत गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हेरला. त्यातून ही टुरिझम पोलिस पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकाला दोन नवी वाहने देण्यात येणार आहेत. फौजदार किंवा सहायक फौजदार दर्जाचा अधिकारी या पथकाचा प्रमुख असेल. इंग्रजीचे उत्तम ज्ञान आणि चांगले संवादकौशल्य असलेल्या उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांची पथकासाठी निवड करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांतच टुरिझम पोलिस शहरातील पर्यटनस्थळी दिसतील.

हॉटेल, टुरिस्ट होमचीही पाहणी

टुरिझम पोलिस शहरातील विविध पर्यटना स्थळांच्या व पर्यटकाच्या सुरक्षेसाठी काम करतील. ते पर्यटकांच्या अडचणी ते जाणून घेतील. पर्यटकांना असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी हे पोलिस मदत करतील. पर्यटक राहत असलेले हॉटेल, टुरिस्ट होम यांची पाहणी करून त्यांच्या सुरक्षेची खात्रीही या पथकातील पोलिस करून घेतील.

पर्यटकांच्या छेडीने लागले गालबोट

शहरात विदेशी पर्यटकांची छेडछाड करण्याचे तीन प्रकार घडलेले आहेत. यापैकी विदेशातील एक तरुणी शिक्षणासाठी २००६मध्ये शहरात आली होती. हेडगेवार हॉस्पिटलसमोर तीन मद्यपींनी तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. सोमनाथ बोंबले व सचिन जव्हेरी यांच्यामुळे तो प्रयत्न फसला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपींना पाच वर्षांची शिक्षा झाली होती. २०१२मध्ये विदेशातील एका तरुणीची दौलताबाद किल्ल्यामध्ये अंधारात छेड काढण्यात आली होती. मुंबईला गेल्यानंतर तिने ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त संजयकुमार यांनी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने एक समिती तयार केली होती. त्यानंतर २०१३मध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकराने पर्यटक तरुणीचा रूममध्ये विनयभंग केला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी सोडण्याबाबत शुक्रवारी निर्णय

$
0
0

शिर्डी: येत्या २५ ऑक्टोंबरपर्यंत नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी जायकवाडी धरणात सोडले जाणार नाही असा खुलासा राज्य सरकारने केल्यानंतर याप्रकरणी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर येत्या शुक्रवारी ( २३ ऑक्टोंबर ) निर्णय घेतला जाईल असे मुंबई हायकोर्टाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय आणखी पाच दिवस लांबणीवर पडला आहे.

नगर नाशिक जिल्ह्यातील धरणातून १३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्याला चार सहकारी साखर कारखान्यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असतांना पिण्याच्या पाण्याची गरज त्यातून भागणार आहे. नगर नाशिक धरणातून पाणी सोडल्याने त्याची नासाडी होईल तसेच नगर व नाशिकची शेती उद‍्ध्वस्त होईल, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड रमेश धोरडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी मंत्रीपुत्रासह सोनवणेवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुऱ्यातील जमिनीची बेकायदा प्लॉटिंग करून विक्री केल्याप्रकरणी माधव सोनवणे, अब्दुल सलीम व दोघांविरुद्ध शेख सलीम शेख सांडू यांच्या तक्रारीवरून मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

सलीम यांनी १५ मार्च २०१० रोजी गट क्रमांक ९९-१ मधील दोन प्लॉट खरेदी केले होते. ही जमीन अब्दुल रऊफ अब्दुल यांच्या मालकीची दाखवण्यात आली असून, अमजदखान मोहम्मदखान यांच्या नावावर या जमिनीचे मुखत्यारपत्र करून दिले होते. अमजदखानकडून सलीम यांनी प्लॉटची खरेदी केली. खरेदीखतामध्ये या प्लॉटची किंमत आठ हजार रुपये दाखवली. मात्र, प्रत्यक्षात ८० हजारांत हा व्यवहार ठरला. ही रक्कम शेख सलीम यांनी माजी मंत्री अब्दुल अजीम यांचा मुलगा अब्दुल सलीम अब्दुल अजीम यांच्या नेहरू भवन येथील घरी नेऊन दिली.

ही जमीन वादग्रस्त असल्याचे माहिती असूनही प्लॉटिंग करून विक्री करण्यात आली. ३१ ऑगस्ट २०१५ रोजी महसूल विभागाने कोर्टाच्या आदेशाने या जमिनीचा ताबा घेत मूळमालक माधव सोनवणे यांच्या ताब्यात‌ दिल्यानंतर, आपली फसवणूक झाल्याचे शेख सलीम यांच्या लक्षात आले. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखा गाठून शेख सलीम यांनी तक्रार देत सबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.

यांचा समावेश

शेख सलीम यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात आरोपी अब्दुल सलीम अब्दुल अजीम, अब्दुल रऊफ अब्दुल रहीम, अमजदखान मोहमदखान पठाण, मा‌धव माणिक सोनवणे, तत्कालीन मनपा इमारत निरीक्षक, अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी, तत्कालीन तलाठी व मंडळ निरीक्षक यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेकडो लोक बेघर

पहाडसिंगपुऱ्यातील वादग्रस्त जमिनीचा ताबा कोर्टाने मूळमालक माधव सोनवणेकडे दिला आहे. त्यामुळे या परिसरातील शेकडो रहिवासी बेघर झाले आहेत. काहींनी तिथेच आपला संसार सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ डिसेंबरला तहसील विभाजन?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद तहसील कार्यालयाच्या विभाजनाचा गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला प्रश्न येत्या १२ डिसेंबर रोजी मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. अप्पल तहसीलदार हे पद निर्माण करून तहसीलचे विभाजन केले जाणार आहे. माजी केंद्रीयमंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन १२ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यावेळी तहसील विभाजनाचीही घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तहसील विभाजन; तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाविषयी मंगळवारी मुंबई येथे बैठक घेण्यात आली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीकीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्यायमंत्री बडोले; तसेच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची उपस्थिती होती.

शहर आणि ग्रामीण भागासाठी एकच तहसील कार्यालय असल्याने कामाचा ताण वाढला अाहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी तहसीलच्या विभाजनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रस्तावावर चर्चा करून ३ महिन्यांत नवीन तहसीलसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसह प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश विभागीय आयुक्तांना दिले होते.

मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये तसहील विभाजनावर चर्चा करण्यात आली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अप्पर तहसीलदार हे पद निर्माण करण्यासाइी धोरणात्मक निर्णय घेऊन १२ डिसेंबर रोजी तहसील विभाजनाची घोषणा करण्यात येईल, असे बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्मारकाचे भूमीपूजन

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद येथील शासकीय डेअरीच्या जागेवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ डिसेंबर रोजी मुंडे यांची जन्मदिन असल्यामुळे स्मारकाचे भूमीपूजनही याच दिवशी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निष्क्रियतेचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावासाठी 'एमआयएम'च्या नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे भारतीय जनता पक्षानेही ऐनवेळी अविश्वासाच्या बाजुने मतदान केले. त्यामुळे ९५विरुद्ध १३ मतांनी प्रस्ताव मंजूर झाला. पाच नगरसेवक गैरहजर राहिले. अविश्वास प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले. नवीन आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत अतिरिक्त आयुक्तांनी आयुक्त म्हणून काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांविरुद्ध नगरसेवकांनी एकजूट दाखवून अविश्वास प्रस्ताव आणला.

आयुक्तांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, गटनेते भगवान घडमोडे, गजानन बारवाल यांनी महाजन यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. महाजन यांना शासनाच्या सेवेत परत पाठवावे, असे त्यात नमूद करण्यात आले. २० मुद‍्द्यांच्या आधारे आयुक्तांवर आरोपही या प्रस्तावात करण्यात आले. प्रस्तावाला सभापती दिलीप थोरात, गटनेते राजू वैद्य यांनी अनुमोदन दिले होते. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सकाळी ११ वाजता महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सभेवर अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला. नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली. आयुक्तांवरील अविश्वास प्रस्तावाचा विषय महापौरांनी चर्चेला घ्यावा, अशी सूचना सभागृहनेते जंजाळ यांनी केली. त्यानंतर प्रस्तावावर चर्चा सुरू झाली.

अफसर खान म्हणाले, 'अविश्वास प्रस्ताव आताच का आणला. सात महिने तुम्ही काय करीत होता. युतीचे पदाधिकारी आयुक्तांची बदली करू शकले असते.' कैलास गायकवाड म्हणाले, 'उशिरा का होईना योग्य प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे प्रस्ताव ठेवणाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे.'

काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी या प्रस्तावावर मतदानाची मागणी केली. गजानन बारवाल म्हणाले, 'हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठबळ देणारा आहे. त्यामुळे तो मंजूर झाला पाहिजे.' संगीता वाघुले म्हणाल्या, 'आयुक्तांनी योग्य पद्धतीने काम केले असते तर, ही वेळ आली नसती. ' अजीज खान, सीमा खरात, अब्दुल नाईकवाडे यांनीही मत मांडले. भगवान घडमोडे व राजू वैद्य यांनी अविश्वास प्रस्तावामागची भूमिका मांडली. स्वाक्षरीच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. प्रस्तावाच्या बाजूने ९५ तर, विरोधात १३ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या केल्या. पाच नगरसेवक गैरहजर राहिले. एमआयएमच्या सर्व २५ नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. काल सायंकाळपर्यंत शिवसेना-भाजपच्या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याची भाषा करणारे एमआयएमचे नगरसेवक आज ओळीने प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी महापालिकेच्या सभागृहात उभे होते. प्रस्ताव मंजूर झाल्यावर पालिकेच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

१३ महिन्यांची कारकिर्द

प्रकाश महाजन यांची आयुक्तपदाची कारकिर्द जेमतेम १३ महिन्यांची ठरली. हर्षदीप कांबळे यांच्या बदलीनंतर ३ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांनी आयुक्तपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाली. येत्या ३१ डिसेंबर रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. अविश्वास प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला. मतदानाची मागणी करणारे नगरसेवक

भाऊसाहेब जगताप, अफसर खान, शेख सोहेल, अय्युब खान, वैशाली जाधव, रेश्मा कुरैशी, अब्दुल नवीद, मलिका बेदम हबीब कुरैशी, शबनम बेगम, बेगम खाजोद्दिन, अंकिता विधाते, ज्योती मोरे.

आशा निकाळजे, शोभा बुरांडे, ज्ञानोबा जाधव, कीर्ती शिंदे, सुनीता चव्हाण.

शिवसेना ः २८

भाजप ः २२

एमआयएम ः २५

शहर विकास आघाडी ः १०

इतर ः १०

एकूण : ९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

देशात व महाराष्ट्रात धर्मांध शक्तीचा उदय होत आहे. सत्ताधारी पक्षामधील मंडळी एकमेकांच्या तोंडाला काळे फासून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. या पाकीटमार सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे उरले नसून, निवडणुकीत भरघोस आश्वासन देऊन शेतकऱ्यांची व सर्व सामन्यांची दिशाभूल केली आहे. १२ हजार गावात शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, सवलतीत कमालीची विसंगती दिसून येत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त कोरडी सहानुभूती दाखवीत आहे. शेतकऱ्यांना कोरड्या सहानुभूतीची नाही तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी मिळवून देण्याची गरज आहे असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

श्री परमेश्वर मंदिर मैदानावरील जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला शहरातील ५० लाखांच्या निधीतून विविध विकास कामाचे भूमिपूजन खासदार अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील-जवळगावकर, आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी चव्हाण म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात माजी आमदार माधवराव पाटील यांनी विधानसभा क्षेत्रात अतिशय चांगले काम केले. जो माणूस रात्रीचा दिवस करून अहोरात्र मेहनत घेतो. त्याच्या पाठीमागे आपण उभे राहायला पाहिजे. येणाऱ्या काळात माजी आमदार जवळगावकरांना उभे करण्यासाठी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसला साथ द्या. भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला जात आहे. त्यामुळे मध्यवधी निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवनावश्यक वस्तूसह विविध कराचा बोजा आदीमुळे वाढत असलेली महागाई, आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यामुळे सरकारचे तोंडाला काळे फासले जात आहे. अश्या पद्धतीने पाकीटमारी करून शेतकरी, कष्टकर्याना अडचणीत आणणाऱ्या सरकारला निर्शक्त करण्यासाठी आगामी निवडणुकात कॉंग्रेसचा झेंडा फडकावा.'

यावेळी राजीव सातव म्हणाले, 'गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता दाडीवाल्या बुवाच्या भूलथापणा बळी पडली. परंतु, अच्छे दिन म्हणून उद्घोष करणाऱ्या पंतप्रधानांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास केले आहे.'

श्रेय लाटण्याचा प्रयत्न

नगर पंचायतीचा दर्जा तत्कालीन काँग्रेस सत्ता काळात पाठपुराव्यामुळे प्राप्त झाला. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी ही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे मांडून हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिला. तसेच तालुक्यातील पळसपूर, वडगाव ज., पोटा बू, येथे ३३ केव्ही उपकेंद्राची मंजुरी सुद्धा माझ्याच काळात करण्यात आली.परंतु विद्यमान आमदारांनी जनतेची दिशाभूल करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे, असे मत माजी आमदार जवळगावकर यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच प्रकरणी तीन वर्षांचा कारावास

$
0
0

नांदेड : आठ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या मुखेड येथील तत्कालीन कृषी अधिकारी बाळासाहेब ढाकणे यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांनी तीन वर्षाच्या कारावासासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

रासायन‌िक खताच्या दुकानाचा निलंबीत झालेला परवाना तो पुन्हा देण्यासाठी मुखेड पंचायत समितीचे तत्कालीन कृषी अधिकारी बाळासाहेब ढाकणे यांना ८ हजार रुपयांची लाच घेतांना १६ सप्टेंबर २०१० रोजी रंगेहात पकडण्यात आले होते. तत्कालीन उपअधिक्षक संग्राम सांगळे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्याकडे दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीअंती अतिरिक्त सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांनी आरोपी बाळासाहेब ढाकणे यास एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून बी. एन. शिंदे यांनी काम पाहिले. तर उपअधिक्षक संजय कुलकर्णी, पोलिस निरीक्षक पौळ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठेबाजांविरूद्ध धडक मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना जिल्ह्यातील तूरडाळीच्या साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने बुधवारी धडक मोहीम राबविली. यावेळी ५५ ठिकाणी मारलेल्या छाप्यात २० हजार क्विंटलहून अधिक तूर, हरभरा, मूग आणि खाद्य तेलाचे साठे जप्त केले. जालना तालुक्यात पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची दोन पथकांनी शहरातील विविध भागातील व्यापारी प्रतिष्ठानांची तपासणी केली. यामध्ये ठिकाणी टाकलेल्या धाडीत पाच हजार ५२५ क्विंटल तूरडाळ, ९६०३ क्विंटल मुगडाळ आणि ३४०० क्विंटल हरभरा आणि उडीद डाळ जप्त केली.

जालना जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या पथकाने बुधवारी साठेबाजांविरूद्ध कारवाई केली. यावेळीभोकरदन तालुक्यात आठ ठिकाणी टाकलेल्या धाडीत ३.१ क्विंटल तूर डाळ, १.९ क्विंटल मूग डाळ १८.३० क्विंटल हरबरा आणि १०.६० क्विंटल खाद्य तेल जप्त करण्यात आले. जाफराबाद तालुक्यात पाच ठिकाणी टाकलेल्या धाडीत २.८५ क्विंटल तूर डाळ, २.४५ क्विंटल मूग डाळ, ५.६५ क्विंटल हरबरा आणि ९.९० क्विंटल खाद्य तेल जप्त करण्यात आले. परतूर तालुक्यात चार ठिकाणी धाडी टाकून दोन क्विंटल मूग आणि तीन क्विंटल हरभरा डाळ जप्त करण्यात आली. मंठा तालुक्यात सात ठिकाणी धाडी टाकून १०.१५ क्विंटल तूर डाळ, १.३ क्विंटल मूग,१८ क्विंटल हरभरा आणि २.७ क्विंटल उडीद डाळ जप्त करण्यात आली. अंबड तालुक्यात दहा व्यापारी प्रतिष्ठानांची तपासणीत तीन व्यापाऱ्यांकडे तूर, साखर, तेल यांचा एकत्रित ४७३ क्विंटल साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ३१ लाख रुपये आहे. या तपासणी मोहिमेचा अनेकांनी धसकाच घेतला.

राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेचे स्वागतच आहे. जे दुकानदार हा व्यवसाय कायदेशीर मान्यता घेऊन करतात, त्यांनी साठा बाळगणे हा गुन्हा नाही. त्यामुळे अधिकृत व्यापाऱ्यांनी या कारवाईला घाबरण्याची गरज नाही. सध्या जालन्यात तूरडाळीचा भाव ११० ते १८० रुपये किलो इतका आहे.

- अमित मगरे, जेष्ठ डाळ व्यापारी, बजरंग डाळ मिल, जालना

जिल्ह्यातील या विविध ठिकाणांहून जप्त करण्यात आलेला माल ज्या व्यापाऱ्यांचा आहे. त्यांनी आपल्या मालाची अधिकृतता कागदपत्रे सादर केली तर तातडीने त्यांचा माल सोडून दिला जाईल.

- अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरदिवसा चोरी; एकाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड शहरातील काळे कॉलनीत भरदिवसा झालेल्या घरफोडीचा तपास लावण्यात सिल्लोड शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला टक करण्यात आली आहे.

काळे कॉलनी येथील रहिवासी अविनाश पाटील बाहेर गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या बाजुच्या गॅलरीच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून १४ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडलाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी सूत्रे हलवून शहरातील जामा मशीद परिसरातील शेख सईद शेख खलील यांस चोरी करण्याच्या पद्धतीवरून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीचे ३९ ग्रँम सोने हस्तगत केले आहे. त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत २१ टीएमसी पाणी सोडावे

$
0
0

नागरी कृती समितीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पैठण

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार सध्या जायकवाडी धरणात चाळीस टीएमसी पाण्याचा अनुशेष असून हा अनुशेष भरून काढण्यासाठी जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील धरणातून १३ ऐवजी २१ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी पैठण तालुका नागरी कृती समितीने केली आहे.

सध्या जायकवाडी धरणात जेमतेम सहा टक्के पाणी असून त्यावर औरंगाबाद, नांदेड, परभणी, जालना, बीड आदी जिल्ह्यांचे पिण्याचे पाणी, सिंचन व उद्योग अवलंबून आहे. जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्व जिल्ह्यातील पाणी परिस्थिती गंभीर असून आजही या जिल्ह्यात अडीच हजार गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार सध्या जायकवाडी धरणात ४० टीएमसी पाण्याचा अनुशेष आहे. हा असुशेष भरून काढण्यासाठी जायकवाडी धरणात २१ टीएमसी पाणी सोडणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने केवळ १३ टीएमसी पाणी सोडायचे जाहीर केले आहे. शासनाने हक्काचे २१ टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी करणारे निवदेन पैठण तालुका कृती समितीने तहसीलदार संजय पवार यांना दिले. निवेदनावर संतोष तांबे, शहादेव लोहारे, भिकाजी आठवले, हरिपंडित गोसावी, श्रीमंतराव दसपुते, गणेश पवार, सखाराम शिंदे, महेश पवार आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नापिकी, पीककर्ज व नातेवाइकांकडून घेतलेले उसने पैसे कसे द्यायचे यामुळे निराश झालेल्या एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (२१ ऑक्टोबर) पहाटे तालुक्यातील भगूर येथे घडली. मच्छिंद्र फकीरचंद बुट्टे (वय ५५), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बुट्टे हे आपल्या परिवारासह भगूर शिवारातील आदमाने वस्तीवर राहतात. त्यांनी आपल्या कोरडवाहू शेतीसाठी स्टेट बँक ऑफ हैदराबादकडून पीककर्ज घेतले होते. घरखर्चासाठी गावातील काही नातेवाईकांकडूनही हातउसने पैसे घेतले होते. पावसाने यावर्षीही जेमतेम हजेरी लावल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढणार या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. त्यातच उपवर झालेल्या मुलीचा विवाहाचा खर्च कसा भागणार हा प्रश्नही त्यांना सतावत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या मच्छिद्र यांनी वस्तीवरील घरालगत असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ग्रामस्थांनी त्यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तलाठी रवींद्र जोशी यांनी घटनास्थळी जाऊन परिवाराची भेट घेतली व पंचनामा तहसील कार्यालयात दाखल केला. मच्छिंद्र बुट्टे यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी वीरगाव पोलिसांनी अाकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षांच्या मुलीवर हिवरखेड्यात अतिप्रसंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील हिवरखेडा गौताळा येथे एका झोपलेल्या तीन वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. ही घटना बुधवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान घडली. संशयित तरूण पीडित मुलीचा शेजारी असून तो पसार झाला आहे.

या पीडित मुलीच्या आईने सकाळी स्वयंपाक आटोपून तिला राहत्या घरालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपवले व कपडे धुण्यासाठी गेली. ही संधी साधून शेजारी राहणारा संशयित आरोपी संजय कचरू सोनवणे (वय २०) याने मुलगी झोपेत असताना अतिप्रसंग केला. पीडित मुलीच्या आठ वर्षांच्या भावाला तिच्या रडण्याचा आवाज आला, त्याने चौकशी केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. आसपासच्या लोकांनाही संशयित आरोपीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे आढळले. त्यांनी जाब विचारल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देवून तो पळून गेला. या घटनेने हिवरखेडा गाव सुन्न झाले आहे. मुलीची ग्रामीण पोलिस ठाण्यात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्ना शहापूर, पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. संशयित आरोपीविरुद्ध कन्नड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाऊण किलो गांजा सुलीभंजनमध्ये जप्त

$
0
0

खुलताबादः सुलीभंजन परिसरात गांजा विक्री करताना पोलिसांनी छापा टाकून ७२० ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी पती-पत्नीविरुद्ध एनडीपीएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. समशेर खान पठाण व इरफान बानो पठाण (रा. सुलीभंजन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून पठाण यांच्या घरावर छापा टाकून घरात लपवून ठेवलेला गांजा जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे, पोलिस नाईक नदीम शेख, शरद सोनवणे, श्रीकांत चेळेकर, हनुमंत सातपुते, योगेश नाडे, भावसिंग जारवाल, अनिता बनसोड यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींचे अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील वडोदबाजार येथील श्री सरस्वती भुवन हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना खोटे बोलून निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाणारा तरूण नागरिकांच्या दक्षतेमुळे पकडला गेला. मुलींनी त्याच्याविरुद्ध बळजबरीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

वडोदबाजार येथील श्री सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये आठवी व नववीमध्ये शिकणाऱ्या दोन मुलींना त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या जमीर नजीर पठाण (वय २१) याने मंगळवारी (२० ऑक्टोबर) मधल्या सुटीत गाठले. साहेब आले असून तुमची सही पाहिजे अशी थाप मारून दोघींना एम. एच २०, सी. जी. ७४१३ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून फरशी फाट्याच्या दिशेने घेऊन गेला. हा प्रकार मुलींच्या नातेवाईकांनी पाहिले, त्यांनी आवाज दिल्यानंतरही तो थांबला नाही. मुलींचा विरोध असताना मित्राला चारचाकी वाहन आणण्यास सांगितले. दुसरा तरूण रईस सलीम शहा (वय २५) याने एम. एच. २०, ड. जे. ४२९४ क्रमांकाची क्रुझर आणली, त्यात मुलींना बळजबरीने बसवून घेऊन गेले. ही घटना मुलीच्या नातेवाईकांनी पालकांना कळवली. चौकशीनंतर शिक्षकांनी मुली वर्गात नसल्याचे पालकांना कळविले. दरम्यान, निर्मनुष्य ठिकाणी अंगलटी करण्याच्या प्रयत्नामुळे घाबरलेल्या मुलींनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेऊन पळ काढला. दोन तासानंतर घरी परतल्यानंतर मुलींनी ही हकीकत पालकांना सांगितली. पालकांच्या माहितीनंतर वडोदबाजार पोलिसांना पीडित मुलींचा जबाब इनकॅमेरा नोंदवला. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांनी तत्काळ भेट देऊन जमीर नजीर पठाण व रईस सलीम शहा यांच्याविरुद्ध अपहरण व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली. गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप सागर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापुरात घेतला दोघांनी गळफास

$
0
0

वैजापूरः शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी गळफास लावून आत्महत्या केल्या. नवनाथ रामेश्वर आंबेकर (वय ३५) व चेतन विजय चव्हाण (वय ३०), असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. लाडगाव रोडवरील स्वामी समर्थनगर परिसरातील नवनाथ आंबेकर याने स्वतःच्या निलेश किराणा स्टोअर्समध्ये बुधवारी सकाळी सातच्या सुमाराला छताला गळफास लावून आत्महत्या केली. नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीने त्याला खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दुसऱ्या एका घटनेत खंडोबानगर परिसरातील १३२ केव्ही केंद्राच्या कर्मचारी निवासस्थानात चेतन विजय चव्हाण (वय २०) या विद्यार्थ्याने नैराश्यातून दुपारी अडीचच्या सुमाराला छताला गळफास घेवून आत्महत्या केली. चेतन हा अभियांत्रिकीच्या शाखेचा विद्यार्थी होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून चेतन याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार अल्पवयीन मुले ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव येथे सोमवारी पहाटे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणात चार अल्पवयीन बालकांना गुन्हेशाखेने ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन बालकांकडून महत्त्वाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पडेगाव परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथील शिवदास पवार यांच्या घरी रविवारी पहाटे जबरी चोरी झाली होती. चार चोरट्यांनी घरात शिरून दोन महिलांना मारहाण करीत दीड लाखांचा ऐवज पळवला होता. या चौघांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते. साधारण पंधरा ते तीस वयोगटातील हे आरोपी असल्याची माहिती या महिलांनी पोलिसांना दिली होती. या माहितीवरून पोलिसांनी पडेगाव येथील काही संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये चार बालकांचा समावेश आहे. दोन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. या बालकांनी या गुन्ह्यासंदर्भात महत्वाची माहिती पोलिसांना दिली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. या संदर्भात गुन्हेशाखेचे एक पथक बुधवारी सायंकाळी बाहेरगावी रवाना झाले होते.

दशमेशनगर प्रकरणात थंड तपास

दशमेशनगर येथे गेल्या आठवड्यात जबरी चोरीचे दोन गुन्हे घडले. या संदर्भात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र उस्मानपुरा पोलिसांकडून या गुन्ह्याच्या तपासात प्रगती दिसून येत नाही. दरम्यान गुन्हेशाखेच्या वतीने देखील या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेंडूच्या दरात ३० ते ४० रुपयांची वाढ

$
0
0

शेवंती, गुलाब, निशिगंध यांचे मार्केटही वधारले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दसऱ्यामुळे झेंडूच्या फुलांच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला, बुधवारी झेंडूच्या फुलांचा दर ८० रुपयांपासून १२० रुपये किलोपर्यंत होता.

झेंडूच्या फुलांचा दर आकारानुसार ठरविला जातो, असे फुलविक्रते राहुल देशमुख यांनी सांगितले. यंदा नगर, कोपरगाव, शिर्डी या भागातून झेंडूच्या फुलांची आवक झाली. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती ५२७ क्विंटल झेंडूंची आवक झाली. बाजार समितीतत झेंडू फुलांना क्विंटलमागे किमान ३ हजार ते ५ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. केशरी, पिवळे, मोतिया आणि गेंदी झेंडूना अधिक मागणी असते.

केशरी मोठ्या गेंदाची फुले १२० रुपये किलो, शिवाजी नगर, गजानन महाराज मंदिर परिसर, पुंडलिक नगर परिसर, टीव्ही सेंटर रोड, उल्कानगरी परिसर, ‌त्र‌िमूर्ती चौक, जालना रोड येथे शेतकऱ्यांनी फुलविक्रीची दुकाने थाटली. यंदा दसऱ्याच्या सनानिमित्त औरंगाबादसह नगर जिल्ह्यातील फुले शहरात विक्रीसाठी आल्याचे राहुल देशमुख आणि कमळबाई घोरपडे या विक्रेत्यांनी सांगितले.

नाशिक, हैदराबादहून अन्य फुलांची आवक

झेंडू वगळता अन्य फुलांची आवक हैदराबाद आणि नाशिकहून होत असते. चाफा, सोनचाफा, शेवंती, घेवडा, निशिगंधा या फुलांना नवरात्र आणि विजयादशमीला मागणी वाढत असते. औरंगाबादेत बुधवारी गलांडा १२० ते १५० रुपये किलो, शेवंती १५० ते १८० रुपये, चाफा १५० ते १८० रुपये, गुलछडी ३०० ते ४०० रुपये किलो या दरात विकले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images