Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाळूज महानगरात दिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

औरंगाबाद शहरातील दिवसा घरफोडीचे लोण वाळूजमध्येही आले आहे. सिडको वाळूज महानगरातील एक घर चोरट्यांनी फोडून सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. सिडको वाळूज महानगरातील रहिवासी नारायण दामोधर मगरे हे मंगळवारी (१९ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता सहकुटुंब घराबाहेर पडले होते. दुपारी दोन वाजता घरी परतल्यानंतर दरवाजाची कडी तुटून पडलेली दिसली. त्यांनी तत्काळ एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केल्यानंतर चोरांनी ७ ग्रॅमची अंगठी, साडेतीन तोळ्यांचा राणी हार व १५ हजार रुपये रोख, असा एक लाख १७ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत. गेल्या काही दिवसात घरफोडीच्या सलग तीन-चार घटना घडल्याने नाग‌रिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलात्कारातील आरोपीची जन्मठेप हायकोर्टात रद्द

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

अपहरण, बलात्कार, खून व अनैसर्गिक कृत्य अशा चार कलमांमध्ये सेशन कोर्टाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. बी. चौधरी व न्या. इंदिरा जैन यांनी रद्द केली. संशयाचा फायदा देऊन आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे.

नारेगाव येथील एक नऊ वर्षीय मुलगी १२ फेब्रुवारी २०१०रोजी बेपत्ता झाली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही ती न सापडल्याने ती हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. १४ फेब्रुवारी रोजी मुलीचा मृतदेह काटेरी झुडपांमध्ये आढळून आला होता. या मुलीला शेवटी संशयित मोहम्मद जावेद मोहम्मद खुद्दूस याच्या बरोबर जाताना पाहिले होते, असा जबाब हारुण नावाच्या व्यक्तीने दिला. त्यावरून पोलिसांनी जावेदला त्याच दिवशी अटक केली. तपासामध्ये मुलीवर बलात्कार करून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणी भादवि ३७६ (बलात्कार करणे), ३०२ (खून करणे), ३६३ (पळवून नेणे), ३७७ (अनैसर्गिक कृत करणे) अशा कलमान्वये सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासादरम्यान मुलीचे जळालेल्या अवस्थेतील कपडे जावेदच्या घरासमोरून जप्त केले होते. या प्रकरणात सेशन कोर्टाने २०१२मध्ये कलम ३७७ अन्वये दहा वर्षे व अन्य कलमामध्ये जन्मठेप अशी शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला जावेदने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. साक्षीदाराने मुलीला शेवटी आरोपीच्या बरोबर पाहिलेले आहे. त्याचप्रमाणे मुलीचे कपडे आरोपी घरासमोर सापडलेले आहेत, असा युक्तीवाद सरकारच्या वतीने करण्यात आला. पोलिसांनी मागितलेला वैद्यकीय अहवाल शेवटपर्यंत मिळालेला नाही, असा युक्तीवाद आरोपीचे वकील अभयसिंह भोसले यांनी केला. परिस्थितीजन्य पुरावा दखल घेण्यासारखा नाही, असे मत व्यक्त करून संशयाचा फायदा देऊन आरोपीची मुक्तता करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिवांना प्रतिवादी करण्याचे आदेश

$
0
0

हर्सूल जेलमधील असुविधा याचिका

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

ऐतिहासिक हर्सूल कारागृहाविषयी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या अहवालावर राज्यशासनाने उत्तर दाखल करावे व वित्त विभागाच्या सचिवांनाही प्रतिवादी करावे, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. न्या. आर. एम. बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली.

पार्टी इन पर्सन अॅड. रुपेश जयस्वाल यांनी हर्सूल कारागृहातील असुविधेबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत हायकोटाने कारागृहाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. कारागृहाची क्षमता ६०० कैद्यांची असताना याठिकाणी १६७७ कैदी ठेवण्यात आले होते. ही संख्या जवळपास तिप्पट असून मुलभूत अधिकारात घटनेच्या कलम २१ नुसार व्यक्तिस्वातंत्र्य आणि जगण्याचा हक्क अधिकारान्वये हा अन्याय असल्याचे याचिकेत म्हटले होते. हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुमंत कोल्हे यांनी ३१ डिसेंबर २०१४ रोजी पाहणी केली होती. त्याचा अहवाल त्यांनी हायकोर्टासमोर मांडला. या शिफारशींवर हायकोर्टाने यावर्षी पाच मे रोजी राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानुसार नव्या बरॅक बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याची माहिती सादर करण्यात आली होती. पण पुढे यासंबंधी कार्यवाही न झाल्याने १६ बरॅक उभारण्यासंबंधी शासनाला शपथपत्र सादर करण्याचा आदेश दिले होते. त्यानंतर वेळोवेळी सुनावणी झाली.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत वित्त विभागाच्या सचिवांना प्रतिवादी करण्याचे व अहवालावर उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. शासनाच्यावतीने सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलीमच्या घराची घरझडती

$
0
0

औरंगाबाद : आर्थिक गुन्हेशाखेने गजाआड केलेला माजी मंत्र्याचा पूत्र अब्दुल सलीम याच्या नेहरू भवन जवळील घराची बुधवारी सायंकाळी घरझडती घेण्यात आली. ग्रीन झोनमध्ये बेकायदा प्लॉटिंग करत विक्री केल्याप्रकरणी अब्दुल सलीम, अब्दुल रऊफ व अमजदखान व मूळ मालक माधव सोनवणेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख सलीम या रहिवाशाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. ३१ ऑगस्ट रोजी महसूल विभागाने कोर्टाच्या आदेशाने या १८ एकर ‌जमिनीचा ताबा घेतला होता. बेघर झालेल्या रहिवाशांना यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले होते. मंगळवारी अब्दुल सलीमला अटक करण्यात आली.

बुधवारी सायंकाळी त्याच्या नेहरू भवन जवळील सोनिया महल या घराची झडती पोलिसांनी घेतली. अर्धा तास घेतलेल्या या झडतीमध्ये हस्ताक्षरांचे व सह्यांचे नमूने असलेले दस्तावेज पोलिसांनी जप्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपी अब्दुल सलीमला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुऱ्यातील ताजमहाल कॉलनीत 'ग्रीन झोन'मधील जमिनीच्या बनावट ले-आउटद्वारे प्लॉटिंग करून दोन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजीमंत्री अब्दुल अजीम यांचा मुलगा व आरोपी अब्दुल सलीम अब्दुल अजीम याला शनिवारपर्यंत (२४ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. हिंगणे यांनी बुधवारी दिले.

या प्रकरणी शेख सलीम सेख सांडू (४५, रा. शताब्दीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ताजमहाल कॉलनी येथील गट क्रमांक ९९/१, ९९/२ येथील वादग्रस्त जमीन 'ग्रीन झोन'मधील असून वसाहतीसाठी आरक्षित नाही. या जमिनीचा मूळ मालक माधवराव सोनवणे याच्या बाजूने खंडपीठ; तसेच सुप्रिम कोर्टाने निकाल दिला आहे. हे माहीत असूनही ही बाब लपवून ठेवत बनावट ले-आउट तयार करून

प्लॉटिंग केली व दोन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी अब्दुल सलीम अब्दुल अझीम (५४, रा. बुढीलेन), अब्दुल रऊफ अब्दुल रहीम (रा. बुढीलेन), अमजद खान मोहम्मद पठाण (रा. बायजीपुरा), माधवराव सोनवणे, महापालिकेचे इमारत निरीक्षक, अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी, तत्कालिन तलाठी, मंडळ निरीक्षक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ४६२, ४६३, ४३८, ४७१, ४७४, १०९, ११४, १२० (१३), ५०४, ५०६, ३४सह ५२, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अब्दुल सलीम अब्दुल अझीम याला मंगळवारी (२० ऑक्टोबर) अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले.

या खटल्यावेळी, माधवराव सोनवणेकडून नोटरीआधारे केलेले समजूतपत्र (करारनामा) जप्त करणे आहे, अब्दुल रऊफ याचे सात-बारावर नाव असून मूळ उतारा जप्त करणे, सात एकर जमिनीच्या बाबतीत अजमल पठाण यास सर्व अधिकारपत्र दिले असून, ते जप्त करणे, रऊफ याने राहण्याचा पत्ता अब्दुल सलीम याच्या घराचा दिला असल्यामुळे त्याचे घनिष्ठ संबंध आहेत. सोनवणे याच्या वारसांनी रझिया बेगम अब्दुल अजीम यांना १२ एकर जमिनीचे ५० रुपयांच्या बाँडवर खरेदीखत करून दिले असून, ते जप्त करणे आहे.

त्यामुळे आरोपीला १० दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षाकडून कोर्टात करण्यात आली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम जळाल्याची पहिलीच घटना : एसबीआय

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

सूतगिरणी चौकात बुधवारी (दि. २१) सकाळी ६. ते ७ च्या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला आग लागली. आग लागल्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. याआधी बदनापूर, फुलंबी, दोन वर्षांपूर्वी आग व चोरी झाली होती.

एसबीआयचे एटीएमचे रिज‌नल चॅनल मॅनेजर कैलाश जायभाये, झोनलचे चॅनल मॅनेज प्रताप हंडराळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या एटीएममध्ये एसबीआय फक्त कॅश भरते, बाकी सुरक्षा, एसी, सीसीटीव्ही आणि इतर सोयी देण्याचे काम एफएसएच नावाच्या कंपनीला दिले आहे. थर्ड पार्टीला कंत्राट दिले गेले आहे. यावर स्टेट बँकेचा कंट्रोल नव्हता. ऑफलाईन सेवा प्रणालीत ही एटीएम सेवा होती. एसी, सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्राँग रूम, बोनेट आणि मशिन पूर्ण जळाले आहे. एसीच्या गॅस सिलेंडरला आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. साहित्य जळाले असले तर सुमारे ११ लाख ८९ हजार ४०० रूपयांची कॅश जळाली नसल्याचे एसबीआयचे चॅनल मॅनेजर कैलाश जायभाय यांनी सांगितले. संध्याकाळी एफएसएच कंपनीच्या अधिकारी वर्गाने या जळीत एटीएम मशिनची व दुकानाची पाहणी केली असून इन्शुरन्स असल्याने याचा परतावा मिळणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी व एसबीआयच्या अधिकारीऱ्यांनी सांगितले. ही चोरी किंवा घातपाताचा प्रकार नसल्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचे जात प्रमाणपत्र रद्द

$
0
0

एक प्रमाणपत्र निश्च‌ित करण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लातूरचे महापौर शेख अख्तर यांचे बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेले जात पडताळणी प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी रद्द केले. दोन जात प्रमाणपत्रांची चौकशी करून सहा आठवड्यात एक प्रमाणपत्र निश्चीत करावे असे आदेशात नमूद केले आहे.

लातूर महापलिकेच्या सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ अ हा वार्ड ओबीसी राखीव होता. शेख अख्तर जलाल यांनी मिस्त्री जातीचे पडताळणी प्रमाणपत्र सादर केले. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत ते निवडून आले होते. त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राला पराभूत उमेदवार अॅड. गोपाल सत्यजित बुरबुरे यांनी खंडपीठात आव्हान दिले. शेख अख्तर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सन २००१ मध्ये छप्परबंद मुस्लिम (एनटी प्रवर्ग) व सन २०१२ मध्ये मिस्त्री (ओबीसी प्रवर्ग) अशी दोन प्रमाणपत्र काढलेले आहेत. त्यांना जात पडताळणी समितीने अवघ्या तीन दिवसात पडताळणी प्रमाणपत्र दिल्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली. सुनावणीनंतर खंडपीठाने शेख अख्तर यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द केले.

सहा आठवड्यात त्यांच्या दोन जात प्रमाणपत्राची शहनिशा करुन कोणते प्रमाणपत्र खरे आहे, याचा शोध घ्यावा असे आदेश खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. नितीन गवारे, गजेंद्र सोनटक्के, प्रियंद्रा सोनटक्के यांनी तर शेख अख्तर यांच्यातर्फे हनुमंत पाटील यांनी काम पाहिले. महापौर शेख यांचे जात प्रमाणपत्र औरंगाबाद खंडपीठाने अवैध ठरविले आहे. त्यामुळे त्यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते अॅड. गोपाळ बुरबुरे यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

महापौरपदाला सहा महिन्यांसाठी संरक्षण आहे. न्यायालयाने जात पडताळणी कार्यालयास पडताळणी करण्यासाठी सहा आठवड्याची मुदत दिली आहे. त्यांना आवश्य ते कागदपत्र आम्ही सादर करणार आहोत. त्यानंतर कोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत महापौर अख्तर शेख यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दांडियाच्या वादातून प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दांडिया मैदानावर झालेल्या वादानंतर तरुणावर प्राणघातक हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजता सिंहगड कॉलनीमध्ये ही घटना घडली.

राहुल दिगंबर बारोले (वय २५, रा. सिंहगड कॉलनी, एन ६, सिडको) हा तरुण रविवारी रात्री दांडिया खेळण्यासाठी एन ३ येथील स्वाभीमान रास दांडियामध्ये गेला होता. यावेळी त्या ठिकाणी अक्षय जाधव (रा. जयभवानीनगर) हा तरुण महिला होमगार्डसोबत वाद घालून शिवीगाळ करीत होता. राहुलने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता अक्षयने त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. यानंतर लोकांनी हा वाद सोडवला. रात्री साडेदहा वाजता दांडिया संपल्यानंतर राहुल घरी परतला. घरासमोर तो मित्रांसोबत गप्पा मारीत उभा होता. त्यावेळी अक्षय जाधव, अमोल तांबे व दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी राहुलला मारहाण केली. यावेळी त्याच्यावर चाकू व गुप्तीने वार करण्यात आले. यामध्ये कमरेवर, छातीवर व उजव्या पायाच्या मांडीवर वार करण्यात आल्याने राहुल गंभीर जखमी झाला. त्याच्यावर चाकू, गुप्तीने गंभीर वार करीत चारही आरोपी पसार झाले. याप्रकरणी मंगळवारी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय जाधव, अमोल तांबे व दोन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फक्त छापे, डाळीची जप्ती नाही!

$
0
0

औरंगाबाद : गगनाला भिडलेल्या डाळीच्या किमतीमुळे उशिराने जाग आलेल्या सरकारने डाळी आणि खाद्यतेलांच्या भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी साठवणुकीवर निर्बंध लागू केले. त्यानंतर सुरू झालेल्या छापासत्रात औरंगाबाद पुरवठा विभागाला काहीही हाती लागले नाही. बुधवारी (२१ ऑक्टोबर) जिल्ह्यात १० पथकांनी ४२ ठिकाणी छापे टाकले, मात्र सलग दुसऱ्या दिवशीही पथकाच्या हाती काहीच लागले नाही.

बुधवारी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात १, पैठण ८, गंगापूर २३, खुलताबाद ३ तर, औरंगाबाद शहरात ४ ठिकाणी छापे टाकले, मात्र तपासाअंती पथकाला एकाही ठिकाणी नियमबाह्य डाळसाठा आढळला नाही. बुधवारी वैजापूर, पैठण, गंगापूर तालुक्यांत प्रत्येकी एक, गंगापूर तालुक्यात दोन व औरंगाबाद शहरात पाच पथकांनी छापे टाकले. शासानाने घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसाठी आखुन दिलेली मर्यादा अधिक असल्यामुळे पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना या व्यापाऱ्यांकडे नियमबाह्य साठा आढळला नाही. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या छापासत्रामुळे बड्या व्यापाऱ्यांनी डाळीचा साठा इतरत्र हलवला असल्यामुळे पुरवठा विभागाच्या हाती काहीही लागले नसल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम मशीन जळून खाक

$
0
0

सूतगिरणी चौकातील प्रकार; बारा लाख बचावले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा सूतगिरणी चौकात एसबीआय बँकेच्या एटीएमला बुधवारी सकाळी आग लागली. या आगीमध्ये मशीनचे मोठे नुकसान झाले असून, मशीममधील बारा लाख रुपये सुस्थितीत आहेत. या आगीमुळे आजुबाजुच्या तीन दुकानांचेही नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

सूतगिरणी चौकातील आनंद प्लाझा इमारतीच्या कोपऱ्यावर गेल्या पाच वर्षांपासून एसबीआय बँकेचे एटीएम आहे. सकाळी सहाच्या सुमारास या एटीएम मशीनला आग लागली. हा प्रकार समोरील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आला. अग्निशमन दलाला ही घटना कळविण्यात आली. दरम्यान, एटीएम सेंटरमधील एसीच्या गॅस सिलेंडरचा स्फोट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. एटीएम सेंटरच्या बाजूला असलेल्या शेषराव राठोड यांच्या यश मल्टी सर्व्हिसेसला देखील आगीने विळखा घातला. या दुकानातील संगणक, फर्निचर व दरवाजाचे यामध्ये नुकसान झाले. त्याचबरोबर शिवशक्ती कलेक्शन या दुकानाचे शटरही आगीत जळाले. एटीएम सेंटरच्या वरील मजल्यावर अॅडोरा फार्मास्युटिकल्सचे कार्यालय आहे. त्याचेही आगीत नुकसान झाले.

यूपीएसमधून विज पुरवठा सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी बँकेचे चॅनल मॅनेजर कैलास जायभाये, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील तेलुरे यांनी भेट दिली. अग्निशमन दलाने दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली.

रक्कम बचावली

आग लागली त्यावेळी एटीएममध्ये ११ लाख ८९ हजार ४०० रुपये होते. मशीनच्या देखभालीचे व सुरक्षेचे कंत्राट एफएसएस या कंपनीला देण्यात आले आहे. एटीएम मशीनमध्ये चार कप्प्यामध्ये रक्कम ठेवली जाते. तीन कप्प्यामध्ये हजार, पाचशे व शंभर रुपयाच्या नोटा ठेवल्या जातात तर, एका कप्प्यामध्ये फाटक्या नोटा जमा होतात. आगीची धग या कप्प्यांपर्यंत पोहचली नसल्याने नोटा बचावल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गशिक्ष‌िकेने घातला विद्यार्थ्यांना चपलांचा हार

$
0
0

जिल्हा परिषद शाळेतील घृणास्पद प्रकार

म. टा. प्रतिन‌िधी, उस्मानाबाद

वर्गात चप्पल घालून बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच चपलांचा हार बनवून त्यांच्या गळ्यात घालून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. हा घृणास्पद प्रकार कळंब तालुक्यातील अंदोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सोमवारी घडला होता. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी या शाळेच्या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

अंदोरा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील काही विद्यार्थी सोमवारी वर्गात चप्पल घालून बसले होते. वर्गात चप्पल घालून बसलेले विद्यार्थी दिसताच वर्गशिक्ष‌िकेचा पारा चढला. त्यांनी या सात विद्यार्थ्यांला चप्पल काढून एकत्र त्यांनी या सात विद्यार्थ्यांना गोळा केलेल्या चपलांचे हार बनविण्याचे फर्मान सोडले. या चपलांचे हार त्यांनी या विद्यार्थ्यांना गळ्यात घालण्याचे आदेश दिले. शिवाय या विद्यार्थ्यांचे चपलांचा हार घातलेले फोटो स्वतःच्या मोबाइलमध्ये काढले. यापुढे अशी चूक केल्यास या फोटोचे डिजिटल फ्लेक्स गावात लावण्याची धमकी दिली. त्याशिवाय हा सर्व प्रकार घरच्यांना सांगू नका, अशा सक्त सूचना दिल्या. या प्रकाराने अपमानित झालेल्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्ष‌िकेच्या फतव्याची तमा न बाळगता हा प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे संतप्त पालकांनी मंगळवारी शिक्षकांना धारेवर धरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

माहूर तालुक्यातील रूई येथील जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या शेतीमध्ये काम करीत असलेल्या एका शेतकऱ्यांवर अस्वल व त्याच्या दोन पिल्लांनी हल्ला चढविला. या घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला असून, पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

रुई येथील शेतकरी लोभाजी घनशाम हगवणे शेतात कामसाठी गेले होते. दुपारपर्यंत शेतातील काम आटोपून विश्रांतीसाठी झाडाखाली बसले असता बाजूला धबा धरून बसलेल्या अस्वल व दोन पिल्लांनी अचानक हल्ला केला. यामध्ये लोभाजी हे गंभीर जखमी झाले. त्यांनी बचावासाठी आरडा-ओरडा केले असता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने अस्वलाने धूम ठोकली. तातडीने त्यांनी उपचारासाठी माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

या परिसरात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावरत असल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

पावसाच्या कमतरतेमुळे व दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधत जंगलातील वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वनविभागाच्या हलगर्जीपणा व पाणवठे निर्माण करण्यास दिरंगाई केली जात असल्याने प्राणी मानवी वस्तीत येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाच्याकडून बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

लग्नाचे आमिष दाखवून सख्या भाच्यानेच २५ वर्षीय विवाहिते आत्यावर बलात्कार करून माणूसकीच्या नात्याला काळीमा फासला. ही घटना १६ मार्च २०१५ पासून ते ऑक्टोबर दरम्यान घडली. या प्रकरणी पीडित आत्याच्या तक्रारीवरून भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहीत आत्यासोबतच भाच्च्याने प्रेम संबंध जुळविले होते. आत्याला विश्वासात घेवून तुझ्या सोबत लग्न करतो व तुझ्या मुलांना सांभाळतो असे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून लातूर येथे नेवून तिच्यावर आत्याचार केला. नात्याचा गैरफायदा घेवून तो तिला वेळप्रसंगी मारहाण ही करत होता. या त्रासाला कंटाळून या पीडितेने नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून सिडको भागात राहणाऱ्या आरोपीविरुद्ध आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालय नसल्याने अर्ज बाद

$
0
0

नांदेड : हदगाव तालुक्यातील चोरंबा(खु) येथील निवडणुकीत उमेदावारी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज शौचालय प्रमाणपत्र अभावी छाननी दरम्यान बाद झाले. विरोधी गटाचा एकतर्फी विजय झाल्याचे मानले जात असले तरी याबाबत बाद झालेल्या गटाने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.

याठिकाणी आठ उमेदवाराची ग्रांपचायत आहे. या मध्ये पंडीत बोरकर व धर्माजी अंकमवार या दोघांनी परस्पर विरोधी गटाचे नेतृत्व केले. दोघांनीही आपआपल्या गटाकडून आठ-आठ जणांचे उमेदवारी अर्ज वेळापत्रका प्रमाणे दाखल केले. पंडीत बोरकर गटाच्या आठही उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाने अवैध ठरवले. आठही उमेदवाराकडे शौचालय घरी असल्याचे प्रमाण पत्र नव्हते. त्यामुळे बोरकर गट हा निवडणुकीतून बाद झाला. अंकमवार गट विजयी झाल्याने बोरकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत हाय कोर्टात धाव घेतली आहे.​

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड: ५ गोदाम सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नांदेड

जीवनावश्यक वस्तुंच्या साठ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कृत्रिम भाव वाढ आणि काळा बाजारास आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात धडक मोहिमेअंतर्गतसुमारे १७६ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात पाच ठिकाणचे साठे संबंधितांनी समाधानकारक पुरावे न दिल्याने सिलबंद करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील या कारवाईसाठी ६५ पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून डाळी, खाद्यतेल आणि खाद्य तेलबिया यांच्या साठवणुकीची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात साठेबाजांवर अशा पद्धतीने एकाचवेळी कारवाई करण्याची ही पहिलीच मोहिम आहे. या छाप्यात डाळीचा साठा मात्र आढळला नाही.

या मोहिमेत उपविभागीय अधिकारी, जिल्ह्यातील तहसिलदार, मंडळ अधिकारी तसेच तलाठी आदी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या ६५ पथकांसाठी साठेबाजांवरील कारवाईसाठी सुनियोजित आराखडाही तयार करण्यात आला. त्यानुसार या पथकांनी जिल्ह्यातील विविध भागात सुमारे १७६ ठिकाणी तपासणी केली. यामध्ये जिल्ह्यातील मोठी गोदामे, भुसार दुकाने, खासगी-निमशासकीय गोदाम, आडत दुकाने, किराणा दुकाने यांच्यावरही छापे टाकण्यात आले. त्याठिकाणी संबंधितांकडून खाद्यान्नांचे उपलब्ध साठे त्यासंदर्भातील अनुषंगिक कागदपत्रे याचीही कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये पाच ठिकाणच्या साठेधारकांकडे परवाना नसल्यामुळे त्यांची गोदामे सिलबंद करण्यात आली. वेदीका वेअर हाऊस (निवघा ता. हदगाव), प्रदीप ट्रेडींग कंपनी निवघा, बाबु कुंभारगावे कंधार, प्रल्हाद बोरलेपवार कंधार, विश्वनाथ गौरखअप्पा स्वामी कंधार या गोदामाना सील ठोकण्यात आले.

राज्यातील डाळी आणि खाद्यतेलांच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डाळी, खाद्यतेल आणि खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत निर्बंध लागू करण्यात आला आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तुंसाठी साठा निर्बंध लागू केले आहेत. त्याला अनुसरुन राज्य सरकारनेही राज्यात डाळी, खाद्यतेल आणि खाद्य तेलबिया यांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयानुसार डाळी, खाद्यतेलबिया आणि खाद्यतेल यांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू राहतील. यातून शेतकऱ्यांकडे असलेला अशा प्रकारचा शेतमाल वगळण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेव्ह फार्मर, सेव्ह नेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे युवक धावून आले आहेत. निलंगा तालुक्यातील १५० शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा किराणा माल त्यांनी घरपोच आणून दिला. त्यामुळे त्यांचा दसरा, दिवाळीचा सण आनंदात साजरा होणार आहे.

निलंगा येथील उपजिल्हाधिकारी डॉ. भवानजी आगे यांनी पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांपर्यंत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणयचा विचार पोहचवला होता. त्याचा चांगला परिणाम झाला. विद्यार्थ्यांनी आपण या भागात मदत केली पाहिजे असे ठरवले. त्यांनी 'सेव्ह फार्मर, सेव्ह नेशन' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. सर्व विद्यार्थ्यांनी खर्चातील काही रक्कम बचत करून, इतरांकडून देणगी मिळवून निधी संकलन केले. त्यांना या कामात हिरकणी महिला व बालकल्याण प्रतिष्ठान यांचे ही सहकार्य लाभले. पुण्यातील शिवगर्जना मित्रमंडळ मुंढवा यांनी गणेश विर्सजन मिरवणुकीचा खर्च टाळून ३० हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना दिला.

निधी संकलनात सक्रिय असलेले निलेश निबांळकर, सदानंद नाईक, योगेश सोनवणे, निखिल चिंचनसुरे, धनंजय गाडे, अर्जुन रसाळ, प्रवीण भोसले, विशाल भापकर, स्नेहल अडसुळ, अश्विनी डफळ आदिनी निलंगा तालुक्यातील यलमवाडी,शाबीतवाडी, हसोरी खुर्द, हासोरी बुद्रुक, या चार गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यातून त्यांनी १५० कुटुंबाची निवड केली. प्रत्येक कुटुंबाला साखर, शेंगदाणे, साबुदाना, गोडेतेल, मटकी, हरभरा दाळ, तुरदाळ, मुगदाळ, कपड्याचे, स्नानाचे साबण, खोबरेल तेल, बिस्कीट, मीठ, हळद, जिरे, मोहरी, पोहे, रवा, टुथपेस्ट, चहापावडर आदी किराणा वस्तुची एकत्रीत पिशवी दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. भवानजी आगे, तलाठी गुजर, पुरी, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे निलंगा तालुक्यातील कासारशिरसीचे निखिल चिंचनसुरे यांनी विद्यार्थ्यांना या 'सेव्ह फार्मर, सेव्ह नेशन' या उपक्रमासाठी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खात्याचा क्रमांक सादर करा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

खरीप हंगाम २०१४ मधील बाधित गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अनुदान विभागीय आयुक्त, आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या आदेशान्वये अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या वैयक्तीक खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहे. खरीप हंगाम २०१४ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक संबंधित तलाठी यांच्याकडे जमा केलेले नाही. त्यांनी तात्काळ त्यांचे बँक खाते क्रमांक जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुदान वितरणासाठी कार्यवाही तहसीलस्तरावरुन चालू आहे. परंतु, अद्यापही काही शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा न केल्याने अनुदान वितरणास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँक खाते द्यावीत, त्यामुळे अनुदान वितरण करणे सुलभ होईल, असे जिल्हाधिकारी जालना यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लाबोल मिरवणुकीने सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नांदेड

सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारात दसऱ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व धार्मिक कार्यक्रमाची सांगता नगर कीर्तनाने व हल्लाबोलच्या मिरवणुकीने झाली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शीख बांधव सहभागी झाले होते.

दसऱ्याच्यानिमित्ताने गुरुवारी पहाटे दोन वाजल्यापासून गुरुद्वारात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली. त्यामध्ये पंजाब व देशाच्या अन्य भागातून आलेले शीख यात्रेकरू व भाविक सामील झाले होते. दसरामेला या नावाने गुरुवारी अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कीर्तन पहाटेपासून गुरुबनीचे पाठ तसेच गेल्या द‌हा दिवसांपासून सुरू झालेल्या चंडी पाठची संपती कार्यक्रमाने करण्यात आली.

गुरुवारी सायंकाळी चार वाजता नगर कीर्तन सुरू झाले. या मिरवणुकीत पंचप्यारे, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष तारासिंघ व सदस्य सहभागी झाले होते. या धार्मिक मिरवणुकीचे नेतृत्व बाबा कुलवंत सिंघजी यांनी केले. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. यावेळी शस्त्र चालविण्याची प्रत्याक्षिके बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

शहरातील महावीर चौकापाशी नगर कीर्तन मिरवणूक आल्यावर तिचे रुपांतर हल्ला बोलमध्ये झाले व घोडे व शस्त्र घेतलेले सरदार व शिपाई यांनी श्री गुरुगोविंदसिंघजी यांनी सुरू केलेया परंपरेनुसार हल्ला बोलमध्ये भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानी मंदिरात धार्मिक विधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात विजयादशमीचा सण अर्थातच दसरा गुरुवारी (२२ ऑक्टोबर) विविध धार्मिक विधीने साजरा करण्यात आला. दुष्काळी वातावरणामुळे धार्मिक विधी पार पाडण्यापलीकडे फारसा उत्साह नव्हता. बाजार पेठेतही ग्राहकी जेमतेमच होती. दसरा सणानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दसरा सण गुरुवारी महानवमीच्या दिवशी साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी प्रथेप्रमाणे अजबलीचा कार्यक्रम पार पडला. त्याशिवाय गुरुवारी दुपारी घटोत््थापन सोहळा पार पडला. दरम्यान, गुरुवारी दसरा सणानिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

गुरुवारी रात्री नगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात आली. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन हे शुक्रवारी दशमीच्या दिवशी पहाटे होणार आहे.

येरमाळ्यातही येडेश्वरीच्या दर्शनासाठी गर्दी

येरमाळा (ता. कळंब) येथील येडेश्वरीच्या दर्शनासाइी गुरुवारी दसरा सणाच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण असा येडेश्वरी देवीचा उल्लेख केला जातो.

उस्मानाबादेतही भाविकांची गर्दी

दसरा सणानिमित्त उस्मानाबादेतही ग्रामदैवत असलेल्या धारासूर मर्दिनी देवीसह हातलादेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विजयादशमी निमित्त आर्य समाज मंदिरातून एक शोभा यात्रा काढण्यात आली. यामध्ये धर्मप्रेमी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीचा शेवट घारासुर मर्दिनी मंदिराच्या पटांगणात करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोजागरीला शिवाजी द्वारातून प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

नवरात्रोत्सवात शिखर दर्शनाबाबत बेफिकीर वृत्तीने वागणारे जिल्हा प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. कोजागरी पौर्णिमेला भाविकांना किमान शिखराचे दर्शन सहजरित्या व्हावे यासाठी सोलापूरहून येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेबरोबरच शिवाजी दरवाज्यातून थेट प्रवेश देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उशिरा सुचलेले शहाणपण असाच काहीसा प्रकार तुळजाभवानी देवस्थान समिती व प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत भक्तांना सध्या अनुभवयास मिळत आहे.

शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांना सहजरित्या शिखर दर्शन व्हावे, त्याचबरोबर तीर्थकल्लोळ, गोमुख व गणेश मंदिराचे दर्शन घेत मातेच्या गाभाऱ्यात जाता यावे, यासाठी भाविकांनी मंदिराच्या दोन्ही मुख दरवाज्यातून सोडण्यात यावे, अशी मागणी भाविकांसहीत पुजाऱ्यांनी प्रशासनाकडे लावून धरली होती. मात्र, प्रशासनाचा हट्ट व लोकप्रतिनिधींचे व पुजाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे भाविकांच्या या मागणीची प्रशासनाबरोबरच देवस्थान समितीने दुर्लक्ष केले. भाविकांना बीडकर तलावामार्ग दर्शन रांगेतूनच दर्शनाचा मार्ग पत्कारावा लागला.

शारदीय नवरात्र महोत्सवात प्रशासनाने भाविकांना शिखर दर्शनापासून वंचित ठेवले. कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी मात्र, देवस्थान समितीसह जिल्हा प्रशासनाला शिखर दर्शनाची आठवण व्हावी, याचे सर्वसामान्यांना आश्चर्य वाटते. प्रशासनाला उशीरा सुचलेले हे शहाणपण राजकीय दबावापोटी आहे, की काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोजागिरी पौर्णिमेदिवशी सोलापूर तसेच अन्य भागातून पायी चालत येणाऱ्या भाविकांना शिखर दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी आराधवाडी मार्गे शिवाजी दरवाजातून थेट प्रवेश देण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. कोजागिरी पौर्णिमेला सोलापूर येथून शिवलाड समाजाच्या मानाच्या काठ्या तुळजापुरात येतात. यावेळी सोलापूर शहरातील भाविक बहुसंख्येने तुळजापूरला चालत येतात. त्यांना शिखराचे दर्शन व्हावे यासाठी शिवाजी दरवाज्यातून प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख अभिषेक त्रिमुखेसह अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख दीपाली घाडगे यांच्याशी चर्चा केली आहे.

त्यामुळेच निर्णय बदलावा लागला

प्रशासनाने व देवस्थान समितीने शिवाजी दरवाज्यातून भाविकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत असताना वास्तविक पाहता पुजारी व व्यापाऱ्यांची मते जाणून घ्यायला हवी होती. त्यासोबतच देवस्थान समितीचे सदस्य असलेल्या नगराध्यक्ष तसेच तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्याकडे विचारणा करायला हवी होती. मात्र, ‌हा निर्णय घेत असताना प्रशासनाने व देवस्थान समितीने सर्वांना अंधारात ठेवले. त्यामुळेच त्यांच्यावर हा निर्णय बदलण्याची वेळ आल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images