Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वैजापूर शहरात ‘मी पण पोलिस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमधील पोलिसांची भिती नष्ट झाली पाहिजे. त्यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत व कॉलेजमधील तरुणांच्या ज्ञानाचा परिणामकारक वापर व्हावा यासाठी वैजापूर उपविभागात 'मी पण पोलिस' ही संकल्पना राबवण्यात येणार येईल, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी हर्ष पोतदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समाजातील गुन्हे रोखणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. पण त्यासोबतच पोलिस व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मैत्रीचे संबंध असणे गरजेचे आहे. जपान व जर्मनीसारख्या देशात गुन्हे रोखण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग अर्थात सामाजिक पोलिस ही संकल्पना राबवण्यात येते. विशेष पोलिस महासंचालक विश्वास नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहरातही या संकल्पनेचा वापर करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर वैजापूर उपविभागात अभियांत्रिकी व लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामाबाबत दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मोकाट जनावरांमुळे शहराच्या स्वच्छतेत बाधा येत असून यापुढे नगर परिषदेच्या सहकार्याने या जनावरांच्या मालकांविरुद्ध मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई

करण्यात येईल. अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पोलिस निरीक्षक बापुसाहेब महाजन यांनीही यापूर्वी राबवण्यात आलेल्या पोलिस मित्र या संकल्पनेची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५८५ शिक्षकांची पदे रिक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अतंर्गत कॉलेजांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. तब्बल ५८५ शिक्षकांची तर ३७९ शिक्षकेतर कर्मचारी अशी ९६४ पदे रिक्त आहेत. प्राचार्यांच्या पाठोपाठ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने कॉलेजांमधील गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या विभागांमधील चित्रही जैसे थेच आहे.

शिक्षकांची रिक्तपदे तात्काळ भरा, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने डिसेंबर २०१४ मध्ये विद्यापीठांना दिले. पात्र शिक्षक नसल्याने गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याचे यूजीसीने पत्रात नमूद केले होते. राज्यपालांसोबत झालेल्या कुलगुरूंच्या बैठकांमध्येही हा विषय वारंवार चर्चेला गेला. यानंतरही रिक्त जागांवर विद्यापीठाची कार्यवाही संथ आहे. सहसंचालक कार्यालयाच्या अहवालानुसार विद्यापीठातंर्गत असलेल्या कॉलेजांमध्ये तब्बल ५८५ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपेक्षा शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे अहवाल सांगतो.

विद्यापीठातंर्गत अनुदानित कॉलेजांची संख्या १२० एवढी आहे. यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ३७९ जागा भरण्यात आलेल्या नाहीत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ६,१५९ एवढी मंजूर पदे आहेत. यातील ५,२९५ पदे भरलेली असून ९६४ पदे रिक्त आहेत. पदे न भरणाऱ्या कॉलेजांच्या अनुदानावरही गदा येईल असे आयोगाने सुचित केले परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही विद्यापीठ अन् प्रशासनाकडून कारवाई होत नाही.

नॅकचा 'अ' दर्जा मिळालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागांमध्येही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. बारापेक्षा विभागांमध्ये तर एक किंवा दोन शिक्षकच आहेत. भुगोल, संस्कृत, ललित कला, पाली आणि बुद्धिझमसारखे विभाग एका शिक्षकावर सुरू आहेत. विद्यापीठात प्राध्यापकाच्या १०, सहयोगी प्राध्यापकाच्या २५ तर सहाय्यक प्राध्यापकाच्या तब्बल ३४ जागा रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर योजना रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या दुसऱ्या टप्प्यातील पाइप अद्याप आलेले नाहीत. पहिल्या टप्प्यातील पाइप येऊन सव्वा महिना उटला तरी दुसऱ्या टप्प्यातील पाइप न आल्यामुळे आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. वेळेत पाइप आले नाहीत, तर काम खोळंबण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद महापालिकेने जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा करार सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड या कंपनीसोबत केला. या कंपनीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला समांतर जलवाहिनीच्या कामासाठी स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून नेमले आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकावयाच्या पाइपचे काम गुजरात मधील टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड या कंपनीला दिले आहे. सुमारे दीडशे कोटी रुपयांचे हे काम असून दोन हजार मिलीमीटर व्यासाची पाइपलाइन जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत टाटा कंपनीतर्फे टाकली जाणार आहे. या कंपनीने तयार केलेले पाइप १६ सप्टेबर रोजी औरंगाबादेत आणले गेले. बिडकीन शिवारात हे पाइप उतरवण्यात आले. पहिल्या टप्प्यात टाटा कंपनीने २५ पाइप आणले. आता सतत पाइप येत राहतील आणि जलवाहिनी टाकण्याचे काम १८ महिन्यात पूर्ण होईल, असे त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. १६ सप्टेबरनंतर टाटा कंपनीने किती पाइप आणले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यानंतर अद्याप पाइप आणले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यातील २५ पाइपवरच सध्या काम केले जात आहे. सव्वामहिन्यात दुसऱ्या टप्प्यातील पाइप न आल्यामुळे समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम १८ महिन्यात पूर्ण होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाइपचा व्यास २००० मिलीमीटर.

एका पाइपची लांबी १२ मीटर.

पाइपची उंची साडेसहा फूट.

पाइपची जाडी २० मिलीमीटर.

प्रत्येक पाइपला पॉलिइथ‌िलीनचे तीन थर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाच्या खंदकाची भिंत ढासळली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहातील वाघांच्या पिंजऱ्यासाठी बांधलेल्या खंदकाची भिंत ढासळली आहे, त्यामुळे या भागात केव्हाही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसामुळे पडलेल्या नाल्याकाठच्या भिंतीला जाळीचे संरक्षण देण्यात आले आहे.

प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचे पिंजरे जुने झालेले आहेत. या पिंजऱ्यांचे आयुष्यमान किमान २५ वर्षांचे आहे. ढासळणारे पिंजरे व सभोवतीच्या परिसराला दरवेळी देखभाल-दुरुस्तीचा तात्पुराता मुलामा दिला जातो. ही कामे दीर्घकाळ टिकत नाहीत. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात वारंवार पडझड होते. वाघांसाठी विशिष्ट प्रकारचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. मूळ पिंजऱ्याला खेटून खंदक तयार करण्यात आला आहे. पिवळ्या वाघांच्या पिंजऱ्याच्या खंदकाची एक भिंत काही महिन्यांपूर्वी ढासळली होती. काँक्रिटीकरण करून पडलेल्या भिंतीची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर आता त्याच खंदकाची दुसरी भिंत ढासळली आहे. प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात. पिंजऱ्यातील वाघ पाहण्यासाठी नागरिक ज्या रेलिंगला रेलून उभे राहतात, त्याच रेलिंगच्या खालची भिंत ढासळली आहे. त्यामुळे नागरिकांनी रेलिंगला टेकून उभे राहू नये, यासाठी प्राणिसंग्रहालय संचालकानी ढासळलेल्या भिंतीच्या परिसरात काटेरी झाडांच्या फांद्या टाकल्या आहेत. ढासळलेली भिंत बांधण्याचे काम लवकर सुरू न झाल्यास दुर्घटना घडू शकते, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

पावसामुळे प्राणिसंग्रहालयातील नाल्याच्या काठची भिंत पडली होती. या भिंतीचे बांधकाम अद्याप सुरू झाले नाही. प्रशासनाने पडलेल्या भिंतीच्या जागी मोठी जाळी लावून टाकली आहे. ढासळलेल्या खंदकाची भिंत आणि लावण्यात आलेली जाळी याची पाहणी महापालिकेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी केली. यावेळी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे उपस्थित होते. प्राणिसंग्रहालयातील सर्वच पिंजऱ्यांचे आयुष्यमान संपले आहे, त्यामुळे त्यांची देखभालदुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळ लेणीच्या कँटीनमध्ये स्फोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी क्रमांक ३२ समोरील कँटीनमधील फ्रीजचा बुधवारी रात्री स्फोट झाला. या घटनेमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना रात्री घटल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वेरूळ लेण्यात बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान अचानक स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला. त्यामुळे स्थानिक रहिवासी हादरले. शिवाय गावात आवाज पोहोचला व काहीतरी जळाल्याचा वास पसरला. या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर एएसआयचे अधिकारी हेमंत हुकरे, राजेश वाकलेकर, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे आदी ताफ्यासह लेणीमध्ये पोहोचले.

तोपर्यंत एएसआच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी आग विझव‌िण्यासाठी पाण्याचे टँकर मागवले होते व आग आटोक्यात आली होती, मात्र ही घटना घातपाताचा प्रकार असावा का या शंकेमुळे एटीएस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सीआयडीचे पोलिस उपनिरीक्षक एस. एस. महेर यांनी लेणीत धाव घेतली. या पथकांनी रात्रभर लेणीची कसून तपासणी केली. हेडलाइटस् लावून पाहणी केल्यानंतर फ्रीजमध्ये स्फोट झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान, खुलताबाद पोलिसांत याची आकस्मिक घटना म्हणून नोंद घेण्यात आली आहे. फ्रीजमध्ये शॉर्टसक्रिट होऊन स्फोट झाल्याचा दावा कँटीनचालक संतोष अजमेरा यांनी केला आहे. एएसआयच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना स्फोट झाल्याचे पत्र पाठवून कळवले आहे.

कँटीन जळून खाक

भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) बबिता संतोष अजमेरा यांना लेणी क्रमांक ३२ जवळ कँटीन भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिले आहे. स्फोटानंतर आग लागून या कँटीनमधील पाच फ्रीज, इलेक्ट्रिक शेगडी, दोन सीसीटीव्ही कॅमेरे, खुर्च्या, टेबल, खाद्यपदार्थांचा साठा, थंडपेयाच्या बाटल्या, चहा, कॉफीचे मशिन व इतर वस्तू जळाल्या आहेत.

सुरक्षा धोक्यात

ही घटना रात्री घडल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. जर ती दिवसा घडली असती तर कँटीनमधील पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. शिवाय लेणीच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कँटीनची मूळ जागा दुसरीकडेच आहे, पण अधिक व्यवसायाच्या लालसेने ते वाहनतळाजवळ थाटण्यात आले होते. यामुळे धोका होऊ शकतो, याकडे अनेकांनी यापूर्वी लक्ष वेधले होते.

या घटनेची चौकशी सुरू केली आहे. फॉरेन्सिक लॅब व महावितरणला तपासणीसाठी पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीनंतरच स्फोट कशाचा व का झाला आहे, हे स्पष्ट होईल. - शिवलाल पुरभे, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महर्षी दयानंद चौकाजवळ असलेल्या ७५० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्ह गुरुवारी जेसीबी धडकल्यामुळे फुटला आणि दिवसभरात हजारो लिटर पाणी वाया गेले. जेसीबीच्या चालकावर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहे. व्हॉल्व्ह फुटल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शहागंज, जिन्सी, दिल्लीगेट, क्रांतिचौक व गारखेडा परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. एअर व्हॉल्व्ह फुटल्यामुळे वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी कंपनीने रेल्वेस्टेशन जवळील एअर व्हॉल्व्ह बंद करून पाहिला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे महर्षी दयानंद चौकात पाण्याचा ओघ सुरूच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांजरा परिवाराचे कारखाने सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मांजरा परिवारातील मांजरा, विकास व रेणा या सहकारी साखर कारखान्यासोबत जागृती या खासगी साखर कारखान्याचे बॉयलर प्रदिपन समारंभ आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थिती पार पडले. यावेळी कारखान्याचे संचालक, भागधारक उपस्थित होते.

विकास सहकारी साखर कारखाना वैशालीनगर, निवळी कारखान्याचे गाळप हंगामचा बॉयलर अग्निप्रदीपन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी विकासचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात चेअरमन वैशाली देशमुख यांनी विजयादशमी निमीत्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आजपर्यंतच्या सर्व हंगामाप्रमाणे येणारा हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी तज्ज्ञ संचालक त्र्यबंकदास झंवर, व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, संचालक रामचंद्र सुडे, नरसिंग बुलबुले, उमेश बेद्रे, युवराज जाधव, अनंत बारबोले, रवींद्र काळे, चंद्रकांत टेकाळे, जयचंद भिसे, नितीन पाटील, संचालिका कमलादेवी राजपुत, संचालक रमेश थोरमोटे (पाटील), भारत आदमाने, तज्ज्ञ संचालक प्राचार्य हेमंत पाटील, कार्यकारी संचालक एस. बी. सलगर, कार्यलक्षी संचालक शिवाजी बारबोले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक कार्यकारी संचालक एस. बी. सलगर यांनी तर आभार व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे यांनी मानले.

रेणा सहकारी साखर कारखान्याचे बॉयरल कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील सेलूकर, व्हाईस चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन आबासाहेब पाटील म्हणाले, 'यंदाचा हंगाम अडचणीचा आहे. मागील काळात जसे शेतकरी कारखान्याच्या पाठीशी उभे राहिले तसेच या वेळी त्यांनी कारखान्याला सहकार्य करावे. कारखाना त्यांना जास्तीत जास्त भाव देऊन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहणार आहे.'

जागृती साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदिपन समारंभाला कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीप माने, सूर्यकांत करवा, गणपतराव मोरगे आदि उपस्थित होते.

'गळीत हंगाम पूर्ण करणार'

सध्या साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. परिस्थिती प्रतिकुल असली तरी नियोजनबद्ध पद्धतीने मांजरा परिवार हा हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करेल असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर बोलताना दिला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, माजी चेअरमन धनंजय देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार त्र्यंबक भिसे, मोईज शेख, बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेने महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उमरगा शहराजवळ दोन दुचाकींची धडक होवून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. ही घटना बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. तलमोड येथील शहाजी सुरेश मोरे हे मंगळवारी त्यांच्या पत्नी शांताबाई शहाजी मोरे (वय ३५)यांना घेऊन उमरगा शहराकडे येत होते.येथील श्रमजिवी शिक्षण संस्थेसमोर राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीची (क्र.एमएच २५/ झेड १७५३)ची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली.या अपघातात शांताबाई मोरे या गंभीर जखमी झाल्या.त्यांना उपचारासाठी उमरगा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उरमगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू राठोड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तेरा अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

गुरु-ता-गद्दी नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या अनागोंदी कारभारातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह आठ जणांच्या एफआयआर रद्द करण्यास हाय‌कोर्टाने नकार दिला आहे. न्या. ए. बी. चौधरी आणि न्या. इंदिरा जैन यांनी नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकरणात दिलेल्या या निर्णयाने अधीक्षक अभियंता तुंगे आणि कार्यकारी अभियंता धोंडगे यांच्यासह आठ जणांवर काही काळ दूर झालेली कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

गुर-ता-गद्दी सोहळ्यातील सर्वेक्षणाची काही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडने काही मजूर सोसायट्याना दिले. त्या कामांची किंमत ७० लाख रुपये होती. खरेतर ही कामे मजूर संस्थाना देत येत नाहीत. पण या ७० लाखांच्या कामांसाठी जिल्हा उपनिबंधकचे खोटे शिफारस पत्र लावण्यात आले. त्या खोट्या कागदाच्या आधारावर सार्वजनिक बांधकाम नांदेड विभागाने ७० लाखांची कामे मजूर सोसायट्याना दिली. हा प्रकार सन २००८-२००९ या वर्षात करण्यात आली होती.

त्यावर माहिती अधिकारात दत्ता तुळशीराम शेंबाळे यांनी प्राप्त केलेल्या कागदपत्राच्या आधारे हे चुकीचे काम करणाऱ्या अधीक्षक अभियंता चंद्रशेखर वसंतराव तुंगे, कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे इतर अधिकारी मोहन सांगवीकर, शंकर तोटावार, सुरेंद्र गवारे, सुरेंद्र वाघमारे, मौलाना मोहमंद सय्यद, दीपक देवतराज, बेलकर, वसमतकर, सुदेश देशमुख, अविनाश भायेकर, अश्फाक अली या तेरा जणांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार असल्याने काहीच त्याची दखल घेतली नाही. तेव्हा दत्ता तुळशीराम शेंबाळे यांनी या प्रकरणात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याची दखल घेतली. तेरा सार्वजनीक बांधकाम नांदेड विभागाच्या अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या आदेश पारित केला. त्या प्रकारांत जिल्हा उप निबंधक एन. व्ही. आघाव यांनी या ७० लाखाच्या कामांसाठी जोडण्यात आलेले शिफारस पत्र उपनिबंधक कार्यालयाने दिलेलेच नाही, असे लिहून दिले आहे. तरीही पोलिसांनी या प्रकरणाची काहीही दखल घेतली नाही. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम नांदेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायालयातून अटक पूर्व जामीन मिळवला.

या प्रकरणातील सार्वजनिक बांधकाम नांदेड विभाग नांदेडच्या अधिकाऱ्यानविरुद्ध दाखल झालेली एफआयआर रद्द करावी या साठी तेरा पैकी आठ जणांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली. त्या प्रकरणाची सुनावणी झाल्या नंतर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) ची सखोल सविस्तर चारच्या आपल्या ३६ आणि निकाल पत्रात केली आहे. त्यानुसार पोलिसांना तपास करण्याचा अधिकार आहे. त्यात कोणत्याच न्यायालयाला दखल देत येत नाही असा मुद्दा या प्रकरणात मांडला गेला. उपलब्ध कागदपत्रे सुद्धा गुन्हा घडल्याची ग्वाही देत आहेत असा मुद्दा न्यायालयाने लिहिला आहे. एफआयआर रद्द करण्यास स्पष्ठ नकार दिला आहे.

स्थगिती चार आठवड्यासाठी कायम

या सार्वजनकि बांधकाम विभागाच्या अधिकारी मंडळीना दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने चार आठवड्यासाठी कायम ठेवली आहे. या अधिकाऱ्यांना अपील दाखल करण्यासाठी जिल्हा न्यायालय असतांना एफआयआर रद्द करण्याची मागणी मंजूर करणे चूक ठरेल असे न्यायालयाने म्हटले आहे. या बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला पुष्ठी देत नांदेड येथील दत्ता शेंबाळे यांचे वकील अॅड. सय्यद अरीबोद्दिन यांनी सांगितले की, आता या सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा न्यायालयात येणे आवश्यक आहेत. त्यांना मिळालेली अटकपूर्व जामीन रद्द करण्याचे स्वतंत्र प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. आता त्याचा निकाल सुद्धा लवकरच येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठवाड्याच्या पाण्यासाठी आंदोलन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. परंतु, या मागणीला आजपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आजघडीला संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळतो आहे. कधी नव्हे इतकी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची मराठवाड्याला गरज आहे. त्यामुळे हे पाणी मिळविण्यासाठी जनआंदोलन उभे करू, असा इशारा आमदार अमित देशमुख यांनी दिला.

स्व. दगडोजीराव देशमुख यांनी बाभळगावच्या दसरा महोत्सवाची परंपरा घालून दिली. ती परंपरा लोकनेते विलासराव देशमुख, आमदार दिलीपराव देशमुख यांची जपली. तीच परंपरा पुढे नेत असताना विजयादशमीच्या दिवशी बाभळगावमध्ये मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत दसरा महोत्सव पार पडला. त्याप्रसंगी आमदार अमित देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक माणिकराव देशमुख होते. प्रमुख पाहूणे म्हणून विकास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैशाली देशमुख, अदिती देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, लातूर शहर जिल्हा ‌काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, उपमहापौर कैलास कांबळे, आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, लक्ष्मण मोरे, एस. आर. देशमुख, रावसाहेब भालेराव, गोविंद बोराडे, विजय देशमुख, चंद्रचुड चव्हाण, दगडूसाहेब पडिले, रेणापूर चव्हाण यांची उपस्थिती होती.

देशातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारने जनतेची घोर निराशा केली, असा आरोप करून आमदार देशमुख पुढे म्हणाले, 'केंद्र व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळेच या सरकारांना दुष्काळात होरपळणारे शेतकरी दिसत नाहीत. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे अपेक्षीत असताना केवळ वेळकाढूपणा केला जात आहे.'

वृक्षारोपण करण्याची गरज

दुष्काळाशी सामना करताना आता प्रत्येकाला स्वत:हून काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. त्यात जलपुर्नभरण, वृक्षारोपण, पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारणाची कामे करीत असतानाच वृक्षारोपण आणि संवर्धन करावे लागणार आहे. या कामात लातूरसह बाभळगावाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळीची साठेबाजी रोखण्यासाठी छापे

$
0
0

हिंगोलीः पुरवठा विभागाने हिंगोली जिल्ह्यातील ४९ ठिकाणच्या गोदामांवर छापे मारून साठ्याच्या नोंदी घेतल्या. हिंगोली जिल्ह्यात तूर, हरभरा, उडीद, मूग उपलब्ध असल्याचे मात्र आढळून आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या सूचनेवरून जिल्हाभर एकाचवेळी छापे टाकण्यात आले.

त्यामध्ये तालुकानिहाय हिंगोलीः ८, कळमनुरी ः ८, सेनगाव ः ८, वसमत ः ११ व औंढा ना. १४ असे छापे टाकण्यात आले. यात जिल्ह्याचे चित्र पाहिले तर एकूण पथकांनी टाकलेल्या धाडीत तूर १६ हजार ८९५ क्विंटल, मूग ः ६९४८ क्विंटल, हरभरा डाळ ः ९८४५ क्विंटल, उडीद ः ४५२३ क्विंटल, खाद्यतेल ः ६४२५ क्विंटल व इतर ३८५ क्विंटल असा माल आढळून आला आहे. जिल्हाभरातील हा साठा असल्याने तुलनेत फार मोठा आकडा नसला तरीही गरज भागविणारा आकडा आहे.हिंगोलीत आठ ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये तूर ७३२ क्विंटल, मूग ः ०.६० क्विं., हरभरा ः २६८२ क्विंटल, उडीद ः ७, इतर ६५० क्विंटल असा साठा आढळून आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवती महिलेस पतीची मारहाण

$
0
0

औरंगाबादः गर्भवती महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. विवाहिता ही आठ महिन्याची गर्भवती आहे. ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पीडित महिलेचा पती अशोक म्हस्के (रा. हडको) याने त्याच्या तीन साथीदारासह घरावर दगडफेक केली व घरात प्रवेश करून शिवीगाळ केली. अशोक याने गर्भवती पत्नीस गर्भातील मुल माझे नाही, असे म्हणत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. अशोक म्हस्के, संतोष तुपके, ऋषी देशमुख, संकेत जैन यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज येथील खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज औद्योगिक परिसरात एसटीपी प्लँट उभारण्यासाठी एमआयडीसीने खोदलेल्या ५० फूट खोल खड्यात पडून एका बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून या खड्ड्याला संरक्षक कवच किंवा जाळी बसवण्यात आली नाही.

वाळूज एमआयडीसीतील कंपन्या व ड्रेनेजचे पाणी शुद्ध करण्यासाठी एसटीपी प्लँट उभारण्यात येत आहेत. त्याकरिता जागोजागी पाणी साठविण्यासाठी मोठे हौद खोदण्यात येत आहेत. या पद्धतीचा एक मोठा खड्डा स्टरलाइट कंपनीसमोर खोदण्यात आला आहे. या खड्यातील पाण्यात मासे पकडण्यासाठी गुरुवारी कल्पेश राजेंद्र पाटील (वय १२) मित्रांसह गेला होता. कल्पेश पाण्यात पडल्यानंतर त्यांचा बरोबरचा अल्पवयीन मित्र घरी निघून आला. तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने शोधशोध करून मामा योगराज नामदेव देसले यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. देसले यांनी त्याच्या मित्रांकडे शुक्रवारी चौकशी केल्यानंतर तो खड्ड्यात पडल्याचे उघड झाले. ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिस व अग्निशमन अधिकार्यांनी घटनस्थळी धाव घेतली. मात्र मृतदेह बाहेर काढण्यास नकार दिल्याने काही समाजसेवकांनी मृतदेह बाहेर काढला.

परिसरात हळहळ

कल्पेश हा शिक्षणासाठी मामा योगराज नामदेव देसले (रा. आर. एच.११३/ ११, सप्तश्रृंगीमाता मंदिराजवळ, बजाजनगर) यांच्याकडे राहण्यासाठी आला होता. दसऱ्या दिवशी कल्पेश गायब झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. कल्पेश मूळ चाळीसगाव तालुक्यातील ताम्हगव्हाण येथील रहिवासी आहे. त्याचे कलेवर पाहिल्यानंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्दापूरचा पूल धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर गावाजवळील निजामकालीन पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. पुलावर मोठे खड्डे पडले असून, पुलाखालचा स्लॅब ढासळला आहे.
औरंगाबाद-जळगाव मार्गावर उत्तर भारतात जाणारी अवजड वाहने, प्रवासी वाहने व अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ असते. या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची खूप दुरवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पार चाळणी झाली आहे. वाईट रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातामुळे विभागाला जाग येत नाही. त्यातच फर्दापूरजवळील निजामकालीन पूल शेवटच्या घटका मोजत आहे. या पुलाचा संपूर्ण सांगाडा उघडा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 'सावधान, कमकुवत पूल, वाहने सावकाश चालवा' अशी पाटी लावून जबाबदारी पाळली आहे. मात्र पूल व रस्ता दुरुस्त करण्याच्या जबाबदारीचे विस्मरण झाले आहे. या पुलावरून अवजड वाहनांची अखंड वाहतूक सुरू असते. त्यामुळे तातडीने पुलाची डागडुजी करण्याची गरज आहे.

पुलाच्या दूरावस्थेकडे स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फर्दापूर येथील उपविभागीय कार्यालयात अनेक निवेदने दिली. मात्र ठिकळपट्टी करण्यापलिकडे काहीही झालेले नाही. हा पूल तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.

निवेदनाकडे दुर्लक्षाची तक्रार

निजामकाली पुलाची दुरुस्ती करण्याबद्दल भाजपतर्फे २०१३पासून उपविभागीय अभियंत्यांकडे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र कार्यालयात अभियंते येतच नसल्याने आमची निवेदने धूळखात पडून आहेत. गैरहजर अभियंत्यांवर कारवाई करावी अशी मागणी १८ जुलै २०१३ रोजी सोयगावच्या तहसीलदारांकडे केली होती, त्यावर काहीही कारवाई झाली नाही, असे भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज पठाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव शासन दरबारी

$
0
0

महापौरांचे नगरविकास खात्याच्या सचिवाला पत्र

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरोधात मंजूर करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव शासन दरबारी पोहोचला आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना या संदर्भात पत्र पाठविले असून आयुक्तांना शासनाकडे परत पाठवण्याची कार्यवाही करा, अशी विनंती करण्यात आली आहे. पत्रासोबत सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत जोडण्यात आली आहे.

महापालिकेच्या २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव ९५ विरुध्द १३ मतांनी मंजूर झाला. त्यानंतर त्याची माहिती लगेचच शासनाला कळविण्यात आली. आज महापौर त्र्यंबक तुपे यांनी अधिकृतपणे अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याच्या सचिवांच्या नावे पाठवली आहे. त्या माहितीच्या सोबत त्यांनी पत्र जोडले असून आज इमेलद्वारे ही सर्व माहिती सचिवांना पाठविण्यात आली. सोमवारी विशेष दुताच्या हस्ते सर्व कागदपत्रे मंत्रालयात पोहोचवली जाणार आहेत.

सचिवांना दिलेल्या पत्रात महापौरांनी म्हटले आहे की, २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक २१८ अन्वये महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांना शासनाकडे परत पाठवण्याचा ठराव सभागृहाच्या सदस्य संख्येच्या पाच अष्टमांश पेक्षा जास्त मतांनी लेखी मतदानाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन व शहराचा स्मार्ट सिटी अभियानात झालेला समावेश व त्या अनुषंगाने करावयाची विकास कामे याची निकड लक्षात घेऊन महापालिका अधिनियम कलम ३६ (३) च्या तरतुदीला अनुसरून आयुक्तांना शासनाकडे परत पाठवण्याची कार्यवाही करण्यात यावी. पत्राच्या सोबत सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत जोडण्यात आली आहे. महापौरांचे पत्र व इतिवृत्ताची प्रत घेऊन रविवारी रात्र महापालिकेचा एक खास दूत मुंबईला रवाना होणार आहे. सोमवारी सकाळीच नगरविकास खात्याच्या सचिवांकडे ही सर्व कागदपत्रे सुपूर्त केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदनामीची धमकी देऊन सव्वादोन लाख उकळले

$
0
0

तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइलमध्ये ब‌हिणीचे केलेले रेकॉर्डिंग जाहीर करण्याची धमकी देत एका महिलेकडून सव्वादोन लाख रुपये उकळले. मुकुंदवाडी परिसरात गेल्या महिन्यात हा प्रकार घडला. या प्रकरणी तीन आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुंदवाडी परिसरात एका भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारी महिला राहते. या महिलेला तिच्या भावाला व वहिनीला २० सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी आठ वाजता संशयित आरोपी बाबा चांद शेख, श्याम सुवानंद प्रसाद व समीर बाबा शेख (सर्व रा. मुकुंदवाडी परिसर) यांनी लहान मुलाच्या हाती निरोप पाठवून घरी बोलाविले. या ठिकाणी या तिघांना तुमच्या बहिणीचे बदनामीकारक रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. तुम्हाला गल्लीत राहू देणार नाही. राहायचे असल्यास तीन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. महिलेने व तिच्या भावाने काय रेकॉर्डिंग आहे, असे विचारले असता त्यांना सांगण्यात आले नाही. घर सोडावे लागेल या भितीने या महिलेने भावाकडून ५० हजार, बहिणीकडून ७० हजार व स्वतःचे एक लाख रुपये असे दोन लाख वीस हजार रुपये २६ सप्टेंबर रोजी आरोपी बाबा चांद शेख याच्या घरी नेऊन दिले.

यावेळी ही रेकॉर्डिग परत मागितली असता आरोपींनी अजून एक लाख रुपये देण्याची मागणी केली. आणखी एक लाख रुपये दिले नाही तर ही रेकॉर्डिंग गल्लीत जाहीर करण्याची पुन्हा धमकी दिली. या त्रासाला कंटाळून या महिलेने पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थनगरातून मंगळसूत्र पळविले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगर परिसरातून दुचाकीस्वार चोरट्याने महिलेची सोनसाखळी पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वा आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत महिलेच्या गळ्याला मार लागून ती जखमी झाली आहे. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

जयश्री प्रभाकर स्वामी (वय ५५) ही महिला सकाळी आठ वाजता घरापासून काही अंतरावर राहत असलेल्या दिराकडे गेली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सासूचे निधन झाले असून नातेवाईकांना भेटून सव्वा आठ वाजेच्या सुमारास जयश्री स्वामी व त्यांची बहीण सुनंदा स्वामी या घरी परतत होत्या. यावेळी काळ्या दुचाकीवर एक तरुण पाठीमागून आला. या तरुणाने जयश्री स्वामी यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका देऊन ओढली व पसार झाला. अचानक बसलेल्या झटक्याने जयश्री स्वामी गळ्याला खरचटल्याने जखम झाली. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटा पसार झाला. चोरट्याने सोनसाखळी ओढण्यापूर्वी रेकी केली होती. हा प्रकार त्यांच्या दिराच्या बंगल्याबाहेर लावलेल्या व तसेच आणखी एका नागरिकांच्या बंगल्याबाहेर लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. या फुटेजमध्ये चोरट्याने ट्रॅकसूटची पँट व पांढरा शर्ट घातल्याचे दिसूत असून दाढी वाढलेला हा तरुण आहे. घटनास्थळी गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गोवर्धन कोळेकर, पीएसआय सय्यद सिद्दीकी आदींनी भेट दिली. क्रांतिचौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बंदोबस्त ‌शिथील होताच सक्रीय

नवरात्रोत्सव निमित्ताने पोलिसांनी शहरात सर्वत्र नऊ दिवस कडक बंदोबस्त लावला होता. पहाटे महिला दर्शनासाठी जातात ही बाब हेरून सकाळच्या सुमारास पेट्रोलिंग वाढविण्यात आली होती, मात्र गुरुवारी नवरात्रोत्सव संपल्यामुळे बंदोबस्त शिथिल करण्यात आला. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुसऱ्याच दिवशी मंगळसूत्र लंपास केले.

काळी दुचाकी शोधण्याचे चार्लीला आदेश

घटनास्थळी चार्लीचे जवान देखील आले होते. मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याने काळ्या दुचाकीचा वापर केला असून त्याला साईडला डिकी आहे. शहरातील सर्व भागातील अशा संशयित दुचाकी जमा करण्याचे आदेश चार्लीच्या पथकांना देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासू सासऱ्यांसह पतीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पाच वर्षांपूर्वी गाजलेल्या डॉ. सुचेता पाटील हत्या प्रकरणात आरोपी पती डॉ. नितीन पाटील, सासरे बाबुराव, सासू शारदा उर्फ अनुपमा यांना हुंडाबळी व शारीरिक, मानसिक छळ केला म्हणून १० वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. बी. चौधरी व न्या. इंदिरा जैन यांनी ठोठावली. विशेष म्हणजे या आरोपींना औरंगाबाद कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. या आरोपींची रवानगी हर्सूल जेलमध्ये करण्यात आली आहे.

डॉ. सुचेता पाटील यांचे वडील बळीराम पालापुरे व राज्य शासनाने औरंगाबाद कोर्टाच्या १ जूनच्या आदेशाविरुद्ध हायकोर्टात अपील केले. १ मे २०१० रोजी सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पेट्रोल अंगावर टाकून डॉ. सुचेता पाटील यांनी आत्महत्या केली होती. भूखंड विकास व दवाखाना बांधकाम करण्यासाठी पैशांची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. अर्जदार पालापुरे यांनी डॉ. नितीन पाटील यांना ७० लाख रुपये दिले होते. मुत्यूपूर्व जबानीत डॉ. सुचेता पाटील यांनी सासरच्या मंडळींना जबाबदार धरले होते. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे यांनी तपास पूर्ण करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. पैसे विकासासाठी दिले असा निर्वाळा देऊन न्यायाधीस एस. बी. कचरे यांनी आरोपी पती डॉ. नितीन पाटील, सासरे बाबुराव, सासू शारदा उर्फ अनुपमा यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले होते. अन्य आरोपी दीर जितेंद्र, कैलास व नितीन यांचा मित्र सुनील पाटील यांनाही निर्दोष सोडले होते.

या आदेशाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. केवळ पाच महिन्यात खंडपीठाने या अपिलाचा निकाल लावला. मुत्यूपूर्व जबानी व डॉ. सुचेता यांनी त्यांच्या डायरीत केलेल्या नोंदी या प्रकरणात महत्वपूर्ण ठरल्या. 'मी काही बरेवाईट केले तर पती, सासू, सासरे, दीर यांना दोषी धरावे' असे सुचेता यांनी शेवटच्या नोंदीत लिहिलेले होते. पालापुरे यांची बाजू एम. डी. म्हसे-ठुबे यांनी तर सरकारतर्फे ए. एस. शिंदे व एस. बी. यावलकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ तासांत २ कोटी वाटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर सर्वसाधारण सभेत अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यावर लगेचच २४ तासांत लेखा विभागाने कंत्राटदारांना २ कोटी १७ लाख रुपयांच्या चेकचे वितरण केले. एका दिवसात सुमारे ४५ चेक वाटण्यात आले.

शहरातील अनेक कामे कंत्राटदारांची बिले न दिल्यामुळे बंद पडली आहेत. काही कामे संथ गतीने कामे केली जात आहेत. त्यासाठी पालिकेच्या तिजोरीत असलेल्या खडखडाटाचे कारण सांगितले जाते. वारंवार पाठपुरावा केला तरी चेक मिळत नाहीत, असे पालिकेच्या वर्तुळात जाहीरपणे बोलले जाते. त्यातच महापालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव महापालिकच्या सर्वसाधारण सभेने २० ऑक्टोबर रोजी मंजूर केला. त्यानंतर लगेचच लेखा विभागातून कंत्राटदारांच्या नावे सुमारे ४५ चेक काढण्यात आले. २० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या काळात, म्हणजे २४ तासांत हे चेक देण्यात आले. या सर्व चेकच्या माध्यमातून २ कोटी १७ लाख २३ हजार ६९ रुपयांची बिले देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती, महापौर व उपमहापौरांना मुख्य लेखाधिकाऱ्यांनी ही माहिती लेखी स्वरुपात दिली आहे. आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यावर २४ तासांत एवढे चेक काढण्यात आल्याबद्दल पालिकेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकाच दिवसात एवढे चेक काढण्याचे कारण काय, कुणाच्या सांगण्यावरून हे काम करण्यात आले, असे प्रश्न विचारले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकाश्रयामुळे मुलींची सुवर्णपदकावर मोहोर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत वैजापूरमधील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी आभाळाएवढे यश मिळविले आहे. दोन वयोगटातील संघांनी विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे या खेळाचे क्रीडा साहित्य घेण्यासाठी लोकवर्गणीतून एक लाख रुपये गोळा करण्यात आले.

नंदूरबार येथे १६ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत १७ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटातील वैजापूरच्या संघांनी विजेतेपद पटकाविले. बॉल बॅडमिंटनसाठी ग्रॅफाइटच्या बॅटची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे एका खेळाडूसाठी किमान पाच हजार रुपये खर्च करावा लागतो. जिल्हा परिषद शाळेला एवढा मोठा निधी मिळणे शक्यच नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी क्रीडा शिक्षक अंजुम पठाण यांनी वैजापुरातील दानशूर व्यक्तींना भेटून विद्यार्थिनींना मदतीचे आवाहन केले. मे व जून २०१५मध्ये ही मोहीम हाती घेतली. पाहता पाहता एक लाख रुपये जमले. चेन्नईहून बॅट मागविल्या. अन्य साहित्य औरंगाबादेतून खरेदी केले. विद्यार्थिनींनाही हुरूप आला. त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. पहिल्यांदा जिल्हास्तर, मग विभागीय स्तरावर अजिंक्यपद पटकाविले. लातूर, परभणीच्या तगड्या टीमना हरवून वैजापूरच्या कन्यांनी इतिहास रचला. राज्यस्तरीय स्पर्धेतही या दोन्ही संघांनी अनुक्रमे पुणे आणि नाशिकच्या संघांना धूळ चारली. अभूतपूर्व कामगिरीमुळे निकिता साठे, सुवर्णा साठे, हर्षदा त्रिभुवन आणि मोनिका गलांडे चार खेळाडूंची देशाच्या टीममध्ये निवड झाली. अंजुम पठाण यांनी जिद्दीने टीम तयार केली. लोकवर्गणीसाठी पुढाकार घेतला आणि एक आदर्श घालून दिला.

१७ वर्षे वयोगटातील विजेती टीम

सुवर्णा साठे (कर्णधार), निकिता साठे, अफरीन शेख, वनिता त्रिभुवन, रुपाली त्रिभुवन, अलिसा शेख, उर्मिला धवर, हर्षदा त्रिभुवन.

१९ वर्षे वयोगटातील विजेती टीम

विद्या खंडीसोड (कर्णधार), मोनिका गलांडे, ज्योती बागूल, आयेशा पठाण, ज्योती गलांडे, निशाद शेख, कोमल फाळके, वैशाली, धीवर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images