Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१८९ क्विंटल डाळ जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात शुक्रवारी मोंढ्यातील एका दुकानातून १२६ क्विंटल तूर डाळ जप्त करण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यात ६३ क्विंटल डाळ जप्त करण्यात आली.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले की, जुना मोंढा येथील संजयकुमार ग्यानचंद पाटणी यांच्या दुकानावर टाकलेल्या छाप्यात सुमारे १२६.८० क्विंटल डाळीचा साठा जप्त केला. त्यांनी या साठवणुकीसाठी कुठलाही परवाना सादर केला नव्हता. याशिवाय साठवणुकीमागे कुठलेही कारण ते देऊ शकले नाहीत. यामुळे त्यांचे दुकान सील करण्यात आले आहे. गेल्या ३ दिवसांत १०६ ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. या पुढील कारवाईसाठी महापालिका आणि पोलिस यंत्रणेचे सहकार्य घेण्यात येत आहे.

औरंगाबाद शहरात ५ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. फुलंब्रीत २, कन्नड २, पैठण २, वैजापूर २, गंगापूर २ अशा एकूण १२ पथकांनी जिल्ह्यात छापे टाकले. जिल्ह्यात २६ ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. यात तूर १५.९२ क्विंटल, मूग २६.६४, हरभरा १०.९७, उडीद ११.४० क्विंटल डाळ जप्त करण्यात आली. एकट्या शहरातून १२६ क्विंटल साठा जप्त करण्यात आला आहे. दुकानदार संजयकुमार पाटणी यांच्या दुकानास सील करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा दुकानदारांना परवाना देण्याचे काम सुरू असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाससाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॉलेजला जाण्यासाठी एसटीच्या पासचे २६० रुपये पैसे नाहीत, वडिलांना आपल्या लग्नाची चिंता आहे, या कारणावरून लातूर जिल्ह्यातील एका अकरावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

लातूर जिल्ह्यातील जढाळा गावातील स्वाती विठ्ठल पिटले या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने वडिलांच्या नावे पत्र लिहून ठेवले. 'माझ्या मरणाचं कारण एवढंच आहे की, माझ्या बसचा पास संपला होता म्हणून आठ दिवस कॉलेजला गेले नाही. आईने कोणाकडून उसने पैसे घेऊन मला पास काढण्यासाठी दिले. त्यानंतर मी कॉलेजला गेले. रोजरोजचे हे टेन्शन असह्य होत आहे,' असे तिने या पत्रात म्हटले आहे.

'आई-वडील इतके काबाडकष्ट करतात आणि देव त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ देत नाही. पप्पा मी तुमची परेशानी समजू शकते. आजकाल तुमच्या चेहऱ्यावर खुशी दिसत नाही. मला माहिती आहे, तुम्ही जास्त टेन्शन कोणत्या गोष्टीचं घेता. हेच ना, की तुमच्या दोन मुली लग्नाला आल्यात,' असेही स्वातीने या पत्रात लिहिले आहे.

स्वातीच्या वडिलांनी २५ हजार रुपये खर्चून टोमॅटोचे पीक लावले होते. ते जळून गेले. त्यातच मळणी यंत्राचे हप्ते थकले. बँकेचा तगादा सुरू होता. त्यात मुलांना शिकवायचे कसे आणि घर चालवायचे कसे, असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. ही सारी परिस्थिती पाहून स्वाती खचून गेली आणि तिने जीवनयात्रा संपविली.

दुष्काळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात सापडले आहे. औरंगाबादमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरून दैनंदिन खर्चासाठी पैसे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडण्याच्या बेतात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात डाळीच्या साठेबाजांवर छापे

$
0
0

औरंगाबाद : तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यात छापे मारले. १३४ ठिकाणी झालेल्या छापेमारीत मोहरी, हरभरा, सोयाबीन, तूर डाळ, उडीद डाळ जप्त करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय जाधवर यांनी सांगितले, की बाबरा (ता.औरंगाबाद) येथे मारलेल्या छाप्यात २५० क्विंटल मोहरी, २०० क्विंटल हरभरा, १५ क्विंटल सोयाबीन जप्त करण्यात आले. हे साठे खासगी गोडावूनमध्ये करण्यात आले होते. बाबरा येथील सुनील अँड ब्रदर्स आणि पियुष ट्रेडर्सवर कारवाई करण्यात आली. फुलंब्री तहसील कार्यालयाच्या पथकाने फुलंब्रीमध्ये छापे मारले. बुलडाणा अर्बन बँकेच्या गोडावूनमधील ३२५ क्विंटल मोहरी जप्त करण्यात आली. १२९ ठिकाणी प्रशासनाने छापे मारले. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवारी जप्त करण्यात आलेला साठा

तूर डाळ - ५. ९२ क्विंटल

मूग डाळ - ३६.६४

हरभरा डाळ - २१०.९७

उडीद डाळ - ११.०४

इतर - ७५२.२३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ दहा वर्षे रखडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतर जलवाहिनी योजना लुटारूंच्या टोळीने तयार केली आहे. तीन वर्षात समांतरकडून ४३ किलोमीटर जलवाहिनीचे काम अपेक्षित होते. मात्र, फक्त एक किलोमीटर अंतराचे पाइप आणले आहेत. पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी कंत्राटदारांनी वाटाघाटी केल्यामुळे पुढील दहा वर्षेसुद्धा 'समांतर'चे काम होणार नाही' अशी परखड टीका प्रा. विजय दिवाण यांनी केली. परिमल सोसायटीत नागरिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचे खासगीकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सामान्य नागरिकांकडून वाढीव पाणीपट्टी वसुली सुरू असल्याने औरंगाबाद समांतर योजना पाणीपुरवठा विरोधी नागरी कृती समितीने शहरात जनजागृती हाती घेतली आहे. गारखेडा परिसरातील परिमल सोसायटीत शनिवारी झालेल्या मेळाव्याला नागरिकांची लक्षणीय गर्दी झाली. यावेळी प्रा. विजय दिवाण म्हणाले, 'नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महापालिकांची स्थापना झाली. मनपाने पाणी पुरवठा 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर करणे आवश्यक आहे. मात्र, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक नफ्यामुळे मनपाची व्यवस्था ढासळली आहे. मागील वीस वर्षांत शहर अधिक बकाल झाले. पाणी पुरवठ्याचे कंत्राट दिल्यानंतर २०१२ मध्ये असलेली १८०० रुपये पाणीपट्टी २०१५ मध्ये तीन हजार ३५० रुपये झाली. महिन्यात फक्त दहा दिवस पाणी देणारी समांतर योजना नागरिकांची लूट करीत आहे. या प्रकारचा जुलूम निजामाच्या काळातसुद्धा नव्हता. सहा महिन्यांत काम न केल्यास कंत्राट रद्द होते. मात्र, तीन वर्षांत काम नसतानाही समांतरचे कंत्राट कायम आहे. कारण मनपा आणि कंपनीच्या वाटाघाटी आहेत. सध्या चर खोदून एक पाइप टाकला आहे. आतापर्यंत ४३ किलोमीटर जलवाहिनीचे काम अपेक्षित होते. शहरातील १२८७ किलोमीटरची जलवाहिनी बदलणे अवघड आहे. समांतर योजना पुढील दहा वर्षेसुद्धा पूर्ण होणार नाही'. यावेळी परिमल सोसायटीने ठराव मंजूर करून कृती समितीला पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधा न देणारा बिल्डर अटकेत

$
0
0

अनाधिकृत बांधकाम प्रकरणी पोलिस कोठडी

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बोहरी कठाडा येथे गणेश निवास या इमारतीचे बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) माधव पाठक यांनी फसवणूक केल्यामुळे त्याला सिटीचौक पोलिसांनी शुक्रवार रात्री अटक केली. सदनिकेत आवश्यक त्या सुविधा न पुरविणे तसेच अनधिकृत बांधकामे केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.व्ही. पेखला - पुरकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. एक दिवसाच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. बोहरी कठडा येथे बिल्डर माधव प्रभाकर पाठकने गणेश निवास दोन मजली इमारत बांधली. पालिकेकडून दोन मजली बांधकामाची परवानगी घेतली असतांना त्याने तिसऱ्या मजल्यावर अनाधिकृतपणे बांधकाम करण्यात आले. त्याच बरोबर वाहनतळाची जागा बळकावली, त्याच बरोबर फ्लॅटधारकांना बोअरवेल करुन देतो असे आश्वासन दिले होते. मात्र, बिल्डर पाठकने ते काम केले नाही, बिल्डरने विश्वासघात केला असल्याची तक्रार संदीप अशोक माने आणि विजयलक्ष्मी भाले यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली.

या तक्ररीवरुन बिल्डर माधव पाठकला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखला-पुरकर यांच्या समोर हजर करण्यात आले बिल्डरच्या ताब्यातून मुळ कागदपत्र जप्त करावयाची आहेत, अन्य किती जणाला गंडविले याचा तपास करावयाचा असल्यामुळे पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. कोर्टाने ही विनंती ग्राह्य धरून एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीचे पाणी ठरतेय मृगजळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबादमध्ये सुरळीत व मुबलक पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत चार वेळा नगरपालिकेच्या निवडणुका लढल्यानंतरही शहराला नियोजित पाणीपुरवठा करण्याला नगरपालिकेला अपयश आलेले आहे. नियमित पाणी पुरवठ्यासाठी सुमारे १९० कोटी रूपये खर्च करूनही उजनीचे पाणी शहरवासीयांना अद्यापही पुरेसे व वेळेवर मिळत नाही. शहरातील नळपट्टीत भरमसाठ वाढ केली तरी पण पाण्याचा ठणठणाट कायम आहे.

यंदा दसऱ्याचा महत्वाचा सण सुद्धा पाण्याअभावी साजरा करण्याची पाळी शहरवासियांवर आली. आठवड्यातून दोनवेळा मिळणारे पाणी आता दहा दिवसानंतरही मिळेनासे झाले आहे. कोट्यावधीची उधळण करूनही उस्मानाबादकर अद्याप तहानलेलेच आहेत. मात्र, याची कसलीही चिंता नगरपालिकेसह जिल्हा प्रशासनाला नाही. आठवड्यातून एकवेळेस मिळणारे पाणी आता उस्मानाबादकरांना दहा दिवसानंतरही मिळेनासे झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शहरासाठी दररोज पाणी देण्यात येईल असे आश्वासन देऊन २०११ मध्ये बाजी मारली. मात्र, नियमित पाणी पुरवठ्यासाठी नागरिकांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे. २०११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीररित्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता २०१६ मध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीपुर्वी होईल किंवा नाही याबद्दलही साशंकता आहे.

१९ एप्रिल २०१३ रोजी भौगोलिक, तांत्रिक व प्रशासकीय अडचणी पार करीत उजनीचे पाणी उस्मानाबादेत पोहचले. मात्र, शहरातील वितरण व्यवस्थेच्या नियोजना अभावी उजनीचे पाणी गेल्या अडीच वर्षांपासून शहरवासीयांच्या दारापर्यंत पोहोचलेले नाही. हे पाणी अद्यापही उस्मानाबादकरांना मिळणे दुरापस्त झाले आहे.

उजनी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी पुरवठ्याचे आश्वासन हवेतच विरले असताना उस्मानाबाद नगरपालिकेने नळपट्टीत दुप्पटीहून अधिकची करवाढ केली आहे. याशिवाय नव्यानेच उपभोक्ता करही लादला आहे. नगरपालिकेला येणारे वीज बील व नळपट्टीचा ताळमेळ लावण्यासाठी नळप्पटीत वाढ करणे अपरिहार्य असल्यामुळे ही करवाढ करण्यात आल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.

उस्मानाबाद शहरासाठीच्या उजनी पाणी पुरवठा योजनेचे पाणी १९ एप्रिल २०१३ रोजी उस्मानाबादमध्ये आले. परंतु, विविध कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे हे पाणी अद्यापही उस्मानाबादकरांच्या दारापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे उस्मानाबादकर अद्यापही तहानलेलेच आहेत. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

यापूर्वी उस्मानाबादकरांना नळपट्टी ८१६ रुपये प्रतिवर्ष इतकी भरावी लागत होती. ती आता वाढवून दोन हजार रूपये करण्यात आली आहे. तर दोन हजारांची चार हजार रूपये करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील प्रत्येक कुटुंबावर १८० रूपये उपभोक्ता कर लावण्यात आला आहे. कचरा घंटागाडीसाठीचा हा कर आहे. उस्मानाबाद जिल्हा हा गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

दुष्काळी स्थितीत जिल्ह्यातील नागरिकांना विविध सवलती जाहीर करून शासन दिलासा देण्याचा प्रयत्न करते. परंतु, उस्मानाबादेत मात्र, दुष्काळी स्थितीत, पाण्याचा ठणठणाट असताना नळपट्टीत भरमसाठ वाढ करून अधिकचा उपभोक्ता कर आकारला जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटनेरच्या धडकेत एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव कंटनेरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीररित्या जखमी झाला. निजामपुरा फाटा येथे ही घटना घडली असून याप्रकरणी शुक्रवारी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

संजय जाधव (वय ३१, रा. आपेगाव ता. गंगापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. संजय व त्यांचा मित्र अंकुश बापुराव बनसोडे हे दोघे १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुचाकी (क्र.एमएच.२०,सीडी.४२०७) विटावा येथून गवळी शिवरा येथे देवदर्शनासाठी मुंबई हायवे मार्गे जात होते. तोच भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटनेरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दरम्यान उपचारादरम्यान अंकुश बनसोडे यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी संजय जाधव यांच्या तक्रारीवरुन अज्ञात कंटनेरचालका चालकाविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिरात चोरीचा प्रयत्न

मंदिराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीस सुरक्षारक्षकाने पकडले. पद्मपुरा भागातील दर्गामाता मंदिर येथे शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस अधिक तपास करत आहेत.

विकास देविदास परदेशी (वय २२, रा. पद्मपुरा) असे फिर्यादीचे नाव असून ते पद्मपुरा भागातील दुर्गामाता मंदिर समोरील घरात वॉचमनची ड्युटी करतात. शुक्रवारी पहाटे ते ड्युटीवर असतानात ज्ञानेश्वर औचितराव साळुंके (रा. कोलारा ता. चिखली, जि. बुलढाणा) हा आरोपी दुर्गामाता मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न करताना फिर्यादीच्या निदर्शनास आले. त्यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने आरोपी विकास यास पकडून क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मदत देण्यातही आनंद असतो याचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा यासाठी लातूरच्या पोतदार इंटरनॅशनल स्कुलने गेला आठवडाभर शाळेत 'जॉय ऑफ गिव्हिंग' हा उपक्रम राबिवला. या उपक्रमातंर्गत शाळेतील विद्यार्थ्यानी शुक्रवारी लातूर तालुक्यातील भातांगळी येथील गरजु १५ शेतकऱ्यांना प्रत्येकी साडेचार हजार रुपयांची मदत केली.

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील-कव्हेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य दगडू पडिले, पंचायत समिती सभापती रावसाहेब भालेराव, सरपंच सुरेखा कारवाडे, जनरल मॅनेजर चरणदिपसिग बिंद्रा, प्राचार्य अरविंद सिंग उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक करताना प्राचार्य अरविंद सिंग म्हणाले, 'पोतदार स्कुलमध्ये जुनी संस्कृती नविन विचार हे आमलात आणण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केले जात आहेत. यासाठी एसओएस बालग्राम, मातोश्री वृद्धाश्रम याठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना सामाजिक संवेदना जागविण्याचा अनुभव दिला जात आहे. त्या ठिकाणी ही विद्यार्थ्यानी जमवलेली मदत दिलेली आहे.'

भातांगळी येथे सातवी आणि आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दहा रुपयापासून रक्कम मदत म्हणून जमा केली होती. या मदतीतून गरजु असलेल्या अल्पभुधारक १५ शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी उपयोग व्हावा म्हणून प्रत्येकी साडेचार हजार रुपये रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील म्हणाल्या, 'आम्ही सत्तेत असूनही शेतकऱ्यांना मदत करता येत नाही, सरकारने जर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला तर शेतकऱ्यांना कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही. आज विद्यार्थ्यांनी मदतीसाठी संकटात असलेला शेतकरी निवडला. त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे.

मदती विषयी माहिती देताना शाळेची विद्यार्थींनी आदिती महाजन म्हणाली, 'शाळेचे संस्कार व संस्कृती जुनी व विचार नवे असल्यामुळे आम्ही आठवडाभर 'जॉय ऑफ गिव्हिंग'चा उपक्रम राबविला. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी आणि इतरांकडून जमा केलेली रक्कम शेतकर्यांना देऊन खऱ्या अर्थाने आनंद अनुभवत आहोत.'

ग्रामस्थांच्यावतीने बोलताना संजय जाधव म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाला मदत देण्यापेक्षा तो आर्थिक अडचणीत असताना योग्य वेळी मदत दिली. तर, त्याला ही आपल्या पाठीशी कोणीतरी आहे ही भावना निर्माण होते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुढाऱ्यांकडून मराठवाड्याचे शोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यानींच मराठवाड्यातील सर्वच क्षेत्राचे मोठे शोषण केले आहे. गोदावरीच्या पाण्यावरच त्यांची शेती बहरत चालली असल्याने याची त्यांना थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे, आपण जोपर्यंत जागे होणार नाही तोपर्यंत हे चालूच राहणार असे मत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले. शहागड येथे गोदावरी नदीच्या पुलावर शिवसेनेच्यावतीने गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्याच्या प्रश्नावर नगर, नाशिक परीसरातील राजकीय नेत्यांच्या आक्रस्ताळी भूमिकेच्या विरोधात शनिवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मराठवाड्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात जाहीरपणे सांगितले पाहिजे, मराठवाड्याच्या हक्काच्या जायकवाडीच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आडवलेल्या पाण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने अत्यंत कठोरपणे कायदेशीर कारवाई केली पाहिजे असे यावेळी खोतकर यांनी सांगितले. मराठवाड्याच्या गोदावरीत पाणी चोरी करत दुधाचा धंदा करणारे नगर, नाशिक परिसरातील राजकीय नेत्यांच्या दुधावर मराठवाड्यातील जनतेनेही बहिष्कार घातला पाहिजे. ऊसाला, द्राक्षाला, अन् दुधात मिसळायला यांना गोदावरीत पाणी लागते, पण आता मात्र, मराठवाड्यातील जनता जागी झाली आहे, असेही सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले. यावेळी माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचे भाषण झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे यांच्या सोबत शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनास शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. रास्ता रोको आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरीच्या तीन घटना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर परिसरातून दुचाकी चोरीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. शिवपुरी कॉलनी येथील रहिवासी किरण कैलास पसफुले हे मंगळवारी रात्री दांडिया पाहण्यासाठी एसएफएस मैदान येथे गेले होते. त्यांनी दुचाकी (क्रमांक एमएच २० सीएम ६३६१) मैदान परिसरात पार्क केली होती. चोरट्याने गाडी लंपास केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद असून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सिडकोतील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर घडली. रमण गंगाधर तेरकर यांनी बँकेसमोर दुचाकी पार्क केली होती. तिसरी घटनेत एमजीएम हॉस्पिटलच्या वाहनतळातून दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी काकासाहेब कचरू दानवे (रा. हनुमाननगर) यांनी तक्रार दिली आहे. या दोन्ही घटनेचा तपास सिडको पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ करणार शंभर कोटींची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विकासासाठी प्रशासन उद्योजकांकडे शंभर कोटी रूपयांची मागणी करणार आहे. 'युनिव्हर्सिटी इंडस्ट्री इंटरअॅक्शन समीट'मधील सहभागी उद्योजकांना निधीसह, सहभागातून नॉलेज सेंटर उभारण्याची साद ही घातली जाणार आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठ प्रशासनाने तयार केला आहे.

विद्यापीठ व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरतर्फे (सीएमआयए) २९ व ३० ऑक्टोबर असे दोन दिवस विद्यापीठात ही समिट होणार आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील ८०० पेक्षा अ‌धिक उद्योजक येतील असा दावा विद्यापीठाने केला आहे. विकासासाठी सीएसआरमधून निधी मिळावा या हेतूने हा प्रयत्न आहे. विद्यापीठ व इंडस्ट्री इंटरअॅक्शनसाठीही समीट उपयुक्त ठरणार आहे. निधीबाबत शासनाकडून विद्यापीठाला मिळणारा दुजाभाव, त्यामुळे रखडणारे प्रकल्प पाहता विद्यापीठ उद्योगांसमोर शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यासाठीचा प्रस्ताव ठेवणार आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळा, इमारती अन् विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीसाठी उद्योगांनी हा निधी द्यावा असे काही प्रस्ताव बैठकीत ठेवणार आहे. उद्योगांना अनुसरून हा प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर वेगाने सुरू आहे. डीएमआयसीसारखे प्रकल्प पाहता नॉलेज सेंटर, रिसर्च सेंटर उभारावे यासाठी विद्यापीठ आग्रही आहे.

अर्थमंत्र्यांना आमंत्रण

बैठकीच्या उद‍्घाटन कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्याकडून नकार आल्याने आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले. त्यांनी बैठकीच्या उद‍्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यात पाच हजार उद्योजक आहेत. विद्यापीठाच्या विकासात त्यांना सहभागी करून घेणे. त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? या दृष्टीकोनातून ही बैठक महत्वपूर्ण ठरेल. त्यांच्याकडून निधीची अपेक्षा आहेच, त्याबाबतीतही आमची तयारी सुरु आहे.

- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनकचऱ्यासाठी पालिकेचा डीपीआर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेने प्राथमिक स्तरावर प्रकल्प अहवाल तयार केला असून, खासगी संस्थेच्या मदतीने त्याला अंतिम रुप दिले जाणार आहे. हा प्रकल्प अहवाल सादर केल्यावर केंद्र सरकारकडून महापालिकेला ४६ कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.

घनकचरा व्यवस्थापन व वैयक्तिक शौचालयासाठी महापालिकेने स्वतःच्या पातळीवर नियोजन करून प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, 'शासनाच्या स्वच्छ भारत योजनेतून या योजनेसाठी किमान ४६ कोटी रुपये मिळतील. त्याशिवाय राज्य शासनाचाही निधी मिळेल. या निधीतून कचरा वाहतुकीसाठी नवीन वाहने खरेदी करण्याचे नियोजन केले जात आहे. प्रत्येक वाहनाला जीपीएस सिस्टीम बसवली जाईल. प्रत्येक वॉर्डाला एक मोठे व एक छोटे वाहन दिले जाईल. त्यामुळे वॉर्ड कचरामुक्त राहील. विघटित केलेला कचरा त्या-त्या वॉर्डातून गोळा केला जाईल. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून ऑइल तयार करण्याचा प्रकल्प विकसित करता येण्यासारखा आहे. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प किंवा खतनिर्मितीचा प्रकल्प उभारला जाऊ शकतो. सुक्या कचऱ्याचा उपयोग पाथ वे सह अन्य कामांसाठी करता येऊ शकतो.

हायड्रॉलिक वाहनांसह कचरा उचलण्याची अद्ययावत यंत्रणा तयार करण्याचे नियोजन केले जाईल. त्यासाठी नव्याने सहाशे कर्मचारी महापालिकेला घ्यावे लागतील. हे कर्मचारी कसे नियुक्त करायचे, याचा निर्णय देखील येत्या काळात आयुक्त व महापौर यांच्या सल्ल्याने केला जाणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन अपघातांत तीन जण ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खासगी कारने उडवले, वाहनाने हूल दिली आणि दुचाकी स्लिप होऊन झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत शनिवारी तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका कारच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास दौलताबाद रस्त्यावर घडली. पुंजाराम नाना नवगिरे (रा. पडेगाव) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मोलमजुरीसाठी पडेगाव भागातून जात होते. तेव्हा भरधाव कारने (एमएच २० डीई ०२१०) त्यांना धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. याप्रकरणी छावणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

अपघाताची दुसरी घटना बीडबायपाय रोडवर दुपारी दोनच्या सुमारास घडली. यात अजय नंदू खंडागळे (रा. निपाणी) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अजय चित्तेगावाहून दुचाकीने निपाणीकडे जात होते. तोच मालवाहतूक करणाऱ्या एका वाहनाने त्यांना हूल दिली. त्यामुळे अजयचे दुचाकीवरील नियत्रंण सुटले व दुचाकी शेजारी असलेल्या ट्रक खाली आली. या अपघातात ते जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस अधिक तपास करत आहेत.

दुचाकी स्लिप झाली

तिसऱ्या घटनेत दुचाकी स्लिप झाल्याने एक ठार तर, एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शेकट्याजवळ दुपारी तीनच्या सुमारास घडली. राजेंद्र मोरसकर (रा. चिकलठाणा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर, शेख रफिक (रा. किराडपुरा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी हास्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती करमाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोंकणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकांना दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वतःचे घर भाड्याने दिल्याची माहिती हद्दीतील पोलिस ठाण्याला न देणाऱ्या शहरातील तीन वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या घरमालकांना प्रत्येकी २०० रुपये दंड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. हिंगणे यांनी ठोठावला.

या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यातील कर्मचारी योगेश सावंत व ज्ञानेश्वर तुकाराम पगारे आणि छावणी पोलिस ठाण्यातील कर्मचारी गौतम गंगावणे यांनी फिर्याद दिली आहे. तिघांच्या फिर्यादीनुसार, घरमालक व आरोपी शेख तस्लीम शेख करीम (रा. मोगलपुरा, कोहीनूर कॉलनी), घरमालक व आरोपी शेख अस्लम शेख शेरू (रा. मोगलपुरा, कोहीनूर कॉलनी) तसेच घरमालक व आरोपी आमेर खान हुसेन खान (रा. पडेगाव) यांनी त्यांच्या हद्दीतील पोलिस ठाण्याला भाडेकरू ठेवल्याची माहिती कळविली नाही. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच तपास करून कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अंतिम सुनावणीवेळी कोर्टाने आरोपींना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमातून जीवे मारण्याची धमकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'तुमच्या मुलीसोबत लग्न लावून द्या. अन्यथा कुटुंबास ठार मारू,' अशी धमकी देणाऱ्या आरोपीविरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून प्रेम प्रकाश गुरव (रा. भुसावळ) हा सतत फोनवरून त्रास द्यायचा. शिवीगाळ करायचा. प्रेम हा फिर्यादी महिलेच्या पतीच्या मोबाइलवर सातत्याने फोन करायचा. तुमच्या मुलीसोबत लग्न लावून द्या, अशी गळ घालायचा. कुटुंबाने त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने शिवीगाळ करत मुलगा व पूर्ण कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून भेदरलेल्या फिर्यादीने तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन शाळांना समान गुण

$
0
0

निवडीसाठी हायकोर्टात याचिका

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील समान गुण प्राप्त झालेल्या नवीन माध्यमिक शाळांपैकी एका शाळेची निवड करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. ए. एम. बदर यांनी राज्य शासनाला नोटीस बजावली. या याचिकेची अंतिम सुनावणी २९ ऑक्टोबरला होणार आहे.

राज्यात १५० पेक्षा जास्त ठिकणी अनुदानित व विनाअनुदानित नवीन माध्यमिक शाळांना परवानगी द्यावी यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. २०११-१२ पासून ते आतापर्यंत प्रस्ताव दाखल झालेल्या माध्यमिक शाळांची पाच सदस्यीय जिल्हास्तरीय समितीकडून छाननी झाली. ५ डिसेंबर २०१२ व २५ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार संबंधित संस्थेची आर्थिक क्षमता, शालेय इमारतीचे बांधकाम तसेच स्वत:च्या मालकीची जमीन व इतर निकषावर गुणदान करण्यात आले. यासंबंधीच्या हरकती मागविण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन राज्यस्तरीय समितीचा अंतिम निर्णय येणार आहे. साधारणत: ३० ऑक्टोबरपर्यंत हा निकाल अपेक्षित आहे. जिल्हास्तरीय पडताळणी समित्यांच्या निकषानंतर गुणदान दिले. नवीन शाळा सुरू करण्यासाठीच्या परवानगीसाठी प्रत्येक ठिकाणासाठी प्रत्येकी तीन संस्थांची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी शिफारस केलेल्या तीन संस्थाना एक समान गुण मिळालेले आहे. जालना येथील राजकुंवर बहुउद्देशीय सेवाभाव संस्थेने निवड प्रक्रियेत समान गुण प्राप्त शाळांचा प्रश्न निकाली काढावा यासाठी शासनाला व शिक्षण विभागाला निवेदन दिले होते. याप्रकरणी राज्य शासनाने निश्चित धोरण आखावे यासाठी संस्थेने याचिका दाखल केली आहे. संस्थेतर्फे बी.एल.सगर-किल्लारीकर हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात लूटमार; ३ दुकाने फोडली

$
0
0

पुंडलिकनगरातून हजारोंचा ऐवज लंपास

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुंडलिकनगरातील एकाच लाइनमधील तीन दुकाने शुक्रवारी रात्री फोडून चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लंपास केला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघड झाला. हनुमान चौक परिसरातील नागापूरकर हॉस्पिटल समोर असलेली दुकाने चोरट्यांनी लक्ष्य केली. सहारा मोबाइल शॉपीतील रिचार्ज व्हाऊचर, मोबाइल हॅण्डसेटसह गल्ल्यातील ९०० रुपये चोरीला गेल्याचे दुकान मालक खालेद पठाण यांनी सांगितले. शिवराज ट्रेडर्स अॅण्ड इलेक्ट्रिकल्स या दुकानातून २ फॅन, २ पाण्याच्या मोटारी, इस्त्री आणि मिक्सर असे साहित्य चोरीला गेल्याचे दुकान चालक अशोक पगार यांनी सांगितले. शेजारीच असलेल्या चॉइस फूटवेअरमधून बूट तसेच चपलांचे काही जोड व ८०० रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. याच लाइनमधील चौथे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुखदेव चौघुले, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश गायकवाड, पोलिस निरीक्षक अविनाश अघाव, मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाथा जाधव आदींनी धाव घेतली. दरम्यान, सायंकाळपर्यंत कुणीही तक्रार दिली नाही. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले.

बेगमपुऱ्यात ४६ हजार लंपास

बेगमपुऱ्यात एका २१ वर्षीय तरुणाला मारहाण करत चोरट्यांनी ४६ हजार रुपये लंपास केले. जटवाड रस्त्यावर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. अमोल साळवे (रा. एकतानगर) असे फिर्यादीचे नाव आहे. दुपारी जटवाड रोड भाग फिरताना विनोद सदावर्ते, श्रीकांत जाधव व गणेश मिसाळ (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांनी मारहाण करत खिशातील ४६ हजार ५०० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले, अशी तक्रार अमोल याने केली आहे. यावरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तीन हजारांची घरफोडी

शिवाजीनगर भागात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन हजार रुपये लंपास केले. गणेश चंदवाडे असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. चंदवाडे दुपारी एक वाजता कॉलेजला गेला होतो. सायंकाळी घरी आल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.

लॅपटॉप, मोबाइलचोरी

दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेत तीन बुरखाधारी महिलांनी दुकानातील लॅपटॉप, मोबाइल असा पन्नास हजारांचा ऐवज पळविला. सिडको भागातील अरुण इलेक्ट्रॉनिकमध्ये गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी सिडको पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादला हिरवळीचा कोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्मार्ट सिटी'चा सरकारला सादर होणारा प्रस्ताव महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रथम मांडला जाईल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यासाठीची सभा होणार आहे. आराखड्यात शहराच्या चार दिशांना 'ग्रीनफिल्ड' (हरित क्षेत्र) करण्याचे नियोजन आहे.

स्मार्ट सिटी अभियानात औरंगाबादचा समावेश झाल्यानंतर या अभियानासाठीच्या प्रकल्प अहवालासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी 'नाइट फ्रँक' व 'फोट्रेस' या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती (पीएमसी) म्हणून नियुक्ती झाली आहे. 'पीएमसी', विविध घटकांतील नागरिकांशी संवाद साधून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करीत आहे. पालिकेने राज्य सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंत व केंद्र सरकारला १५ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करावा लागेल. वेळ कमी असल्यामुळे पालिकेचे अधिकारी व 'पीएमसी' मिळून प्रकल्प अहवाल तयार करीत आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पालिकेच्या विशेष सभेने अहवालात काही दुरुस्ती किंवा सूचना केल्या तर, त्याचा समावेश अहवालात केल्या जातील. अंतिम अहवाल नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तयार करावा लागणार आहे. सरकारकडे तो ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवला जाईल. महापालिकेच्या स्मार्ट सिटी अभियानाचे नोडल ऑफिसर सिकंदर अली म्हणाले, की स्मार्ट सिटी अभियानासाठीच्या प्रकल्प अहवालाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आठवड्यात हे काम पूर्ण होईल. विशेष सर्वसाधारण सभेसमोर प्रकल्प अहवाल ठेवला जाईल.

'स्मार्ट सिटी'त औरंगाबादचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न नागरिक बघत आहेत. त्यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच व्यक्तिगत पातळीवरही सूचना दिल्या जात आहेत. महापालिका प्रशासन आणि 'पीसीसी'ने आलेल्या सूचनांची माहिती घेऊन आराखड्यात त्यांचा समावेश करावा, अशी अपेक्षा औरंगाबादकर व्यक्त करीत आहेत.

कुठे होणार हरित क्षेत्र?

'ग्रीनफिल्ड'साठी औरंगाबादच्या चार दिशांना चार ठिकाणांचे नियोजन आहे. त्यात जवाहर कॉलनीचा परिसर, डॉ. आंबेडकरनगर, चिकलठाणा गावठाण व सिद्धार्थ उद्यानाशेजारील मिलच्या ठिकाणांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांनो, आत्महत्यांऐवजी कष्ट करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

मराठवाडयात आत्महत्या कराव्यात एव्हडीही अवकृपा निसर्गाने केलेली नाही. शेतकऱ्यांनो आपला देह कोट्यावधीचा असून, शासन मदत करतेय, फक्त कष्ट करून, कर्ज फेडण्याची नीती ठेवा, असा मौलीक सल्ला राष्ट्रीय कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात दिला.

जालना जिल्हा कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यावतीने स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना इंदुरीकर महाराज यांनी धर्माला आलेली ग्लानी, संस्काराअभावी वाढत चाललेला दुराचार, सुख असूनही प्राप्तीसाठी चालू असलेली धडपड, खोटया प्रतिष्ठेपायी बळीराजाचे होत असलेले हाल, या सर्व समाज वास्तवावर विनोदी, व्यंगात्मक आणि तेवढेच गांभीर्यपूर्वक भाष्य करून उपस्थितांना मंत्रमुग्ध तर केलेच शिवाय विचारही करण्यास भाग पाडले.

गीतेची सुरूवात धर्मक्षेत्रापासून होत असल्याने पहिला शब्द आयुष्यभर लक्षात ठेवावा, आजकाल 'चेंज' च्या नावाखाली महिलांचा पदर लुप्त होत चालला. रक्ताच्या नात्यांमध्ये कटूता येत चालली असून, भीक मागा, पण स्वाभिमानाने जगा, परिस्थितीने अपमान झाला तरी चालेल पण, मुलींनी त्यांच्या वागण्यातून कुटूंबांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे सांगितले.

यावेळी आमदार अर्जुन खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, रामेश्वर भांदरगे, पंडीत भुतेकर, विलास नाईक, बाबुराव सतकर, बाबू पवार, विजय जाधव, अॅड. सुरेश कुलकर्णी, शरद टोपे, विजय पवार, राहूल पवार यांच्यासह महिला-युवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

जमीन, मुलीची जपणूक करा

उच्च कोटींच्या संस्कृतीत जन्माला आलोय, माता-पित्यांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देऊन, धर्माचे संस्कार रूजवावेत, तरच संस्कृती टिकेल. दुष्काळ असला तरी लग्नात साधेपणा ठेवा, पुढील पाच वर्षात जमीन आणि मुलगी या दोन गोष्टी दुर्मिळ होणार आहेत. दोन्हींचीही जपणूक करा, असा सल्ला शेवटी त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजपचे सरकार सामान्यांच्या विरोधात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

युपीए सरकारच्या भ्रष्ट व मुजोर कारभाराला कंटाळून आणि मोदींच्या विकासाच्या जाहिरातबाजीला भुलून नागरिकांनी मोठ्या आशेने भाजपला सत्तेत आणले, पण भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचाराबरोबरच विद्वेषाच्या राजकारणाचे जातीयवादी भुतही जनतेच्या मानगुटीवर बसले आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते सुभाष वारे यांनी नांदेडमध्ये केला.

महापालिकेच्या विरोधात धिक्कार मोर्चानिमित्त नांदेड येथे वारे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते. वारे म्हणाले, 'भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त वाढल्या आहेत. शेतमजूर-कष्टकर्त्यांच्या हाताला काम नाही. महागाई बेलगाम वाढत चालली आहे. गाजावाजा करत सेवा हमी कायदा आणला तरी सरकारी कचेरीतील हेलपाटे, मनस्ताप आणि लाचखोरीपासून आम आदमीची काही सुटका झालेली नाही. जनतेने मोठ्या आशेने दिलेल्या बहुमताशी भाजपने विश्वासघात केला आहे.'

आर्थिक आघाडीवरील अपयश लपविण्यासाठी सत्ताधारी नेते समाजात फुट पडेल, विद्वेष निर्माण होईल असे निर्णय व अशी वक्तव्ये जाणीवपूर्वक करत असून त्यांची ही खेळी लक्षात घेऊन सामान्य जनतेने एकजूट टिकविण्याची गरज आहे. भाजपा सरकारला त्यांच्या विकासाच्या आश्वासनाच्या हिशोब सतत विचारला पाहिजे. कार्यकर्त्यांनी जनतेला सोबत घेऊन सर्वसमावेशी विकासाचे राजकारण पुढे नेण्यासाठी सक्रिय रहावे असे आवाहनही वारे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images