Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाच रस्त्यांना निधीचे ग्रहण

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात असूनही सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांचे ग्रहण दोन वर्षे उलटून गेले तरी सुटण्यास तयार नाही. मंजूर केलेल्या निधीतून अर्धेच पैसे मिळाल्याने या रस्त्यांचे हाल कायम आहेत. दरम्यान, रखडलेल्या तीन रस्त्यांच्या डागडुजीसाठी सरकारकडे एक कोटींची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या हद्दीत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शहरातील पाच रस्ते आहेत. जालना रोड, जळगाव रोड, जळगाव टी पॉइंट ते दिल्ली गेट, हर्सूल ते सावंगी या रस्त्यांच्या डागडुजीचे राजकारण गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी २१ कोटी रुपये आणल्याचा दावा करण्यात आला होता. त्यापूर्वी सात वर्षांपासून औरंगाबाद शहरातील रस्त्यासाठी एक रुपयाही दिला गेला नव्हता. २१ कोटींची घोषणा करण्यात आली, पण प्रत्यक्षात निधी मिळालाच नाही. कारण काँग्रेसच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थ खाते त्यांच्याकडे असल्याने निधी अडवून ठेवला. त्या दरम्यान लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या आणि हा विषय मागे पडला. तत्कालीन आघाडी सरकारने दोन कोटी मात्र प्राथमिक डागडुजीसाठी दिले. त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले आणि त्यांनी वर्षभरात दहा कोटी रुपये दिले. मात्र, हा पैसा पूर्णपणे शहरातील पाच रस्त्यांवर खर्च झाला नाही. प्राधान्यानुसार जिल्ह्यातील अन्य रस्त्यांच्या कामांसाठी हा पैसा वापरला गेला. परिणामी, जालना रोड व जळगाव रोड वगळता अन्य रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव टी पॉइंट ते दिल्ली गेट रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. तशीच परिस्थिती हर्सूल ते सावंगी रस्त्याची आहे. या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक कार्यालयाने मुंबई कार्यालयास एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी लवकरात लवकर मंजूर झाला तरच रस्त्याची डागडुजी शक्य होणार आहे.

मकबरा ते लेणीसाठी एक कोटी

मकबरा ते औरंगाबाद लेणी या पावणेतीन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नाबार्डअंतर्गत एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता लवकरच गुळगुळीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मद्यपी दुचाकीस्वारावर गुन्हा

$
0
0

औरंगाबादः छावणी पोलिसांचे पथक शनिवारी नंदनवन कॉलनीत गस्त घालत असताना कादरी नुरूल फारूक (वय ३८ रा. चांदमारी) हा मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविताना आढळून आला. मद्यपी कादरी नुरूलला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैशांसाठी विवाहितेचा छळ

कार घेण्यासाठी माहेरुन दहा लाख रुपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार परतवाडा (जि. अमरावती) येथे घडला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आरोपी संदीप चंदेल, घनशाम चंदेल, दीपक चंदेल व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलचोरीचे सत्र सुरूच

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले मोबाइलचोरीचे सत्र कायम आहे. गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी कोर्ट, कॉलेज; तसेच आठवडी बाजारातून मोबाइल लंपास केले आहेत. याप्रकरणी संबधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वकील शेख इम्तीयाज समी (वय ३० रा. इंदीरानगर, गारखेडा) सोमवारी दुपारी जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये शेख टायपिंग करीत होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या टेबलावर ठेवलेला साडेसतरा हजाराचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तसेच वसंतराव नाईक कॉलेजमधून श्रीकांत डांगे या विद्यार्थ्याचा तर एमजीएम कॉलेजच्या पॅथॉलॉजी लॅबमधून जतीन बिंद्रा यांचा मोबाइल चोरट्याने लांबविला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जाधववाडी येथील आठवडी बाजारातून रविवारी चोरट्यांनी अभय अग्रवाल जरेश्वर शेट्टी यांचे मोबाइल लंपास केले. रविवारच्या आठवडी बाजारात देखील मोबाइल चोरी करण्यात आली असून, या ठिकाणी रामन्ना हलीमनी रा. पहाडसिंगपुरा यांचा मोबाइल रविवारी लंपास करण्यात आला. याप्रकरणी ‌क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी पिरबाजार येथील आठवडी बाजारातून मुकुंद पत्तरकिरणे यांचा मोबाइल चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ हजारांचा मोबाइल चोरणाऱ्याला कोठडी

२१ हजारांचा मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला गुरुवारपर्यंत (२९ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखलेपूरकर यांनी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दिले. या प्रकरणी ऋतिक विनोद टाक (रा. नाशिक) यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा २५ जून २०१५ रोजी नगरसोल-नांदेड रेल्वेने जात होता व रेल्वेच्या दरवाज्यात बसून चॅटिंग करत होता. दरम्यान, गाडी हळुहळु जात असताना आरोपी भरतसिंग दारासिंग बावरी (२२, रा. छोटा मुरलीधरनगर) याने फिर्यादीच्या हातावर फटका मारला. त्यामुळे खाली पडलेला मोबाइल आरोपीने लंपास केला. आरोपीला सोमवारी (२६ ऑक्टोबर) अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरलेला मोबाइल जप्त करण्यात आला. मंगळवारी त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आले असता, आरोपीकडून मेमरी कार्ड व सिम कार्ड जप्त करणे आहे, अन्य साथीदारांचा तसेच चोरीचे मोबाइल कुठे विकले जातात याचा शोध घेणे आहे, म्हणून आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर फोडून सव्वा लाखावर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. हर्सूल परिसरातील हितोपदेश सोसायटी येथे मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुखदेव नारायण अहीर (वय ३८ रा. हितोपदेश सोसायटी) हे कुटुंबासह मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या घराला कुलूप लावलेले आहे. मंगळवारी पहाटे चोरट्यांनी ही बाब हेरून कुलूप तोडून त्यांचे घर फोडले. कपाटातील रोख ५६ हजार व सोन्याचांदीचे दागिने असा एकूण एक लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सकाळी शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. अहीर व जवळच राहत असलेल्या त्यांच्या बहिणीला कळविण्यात आले.

हर्सूल पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर एसीपी बाबाराव मुसळे व पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. ठशांचे नमुने पोलिसांनी घेतले असून श्वान पथकाला मात्र चोरट्यांचा माग काढण्यामध्ये अपयश आले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज्’वरील कारवाई योग्य : जिल्हा कोर्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील ज्योतीनगरातील 'शलाका इंजिनिअर्स'च्या 'राकाज लाइफस्टाइल क्लब'वर महापालिकेने केलेली कारवाई जिल्हा कोर्टाने वैध ठरवली. या संदर्भातील 'राकाज'चे अपील मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायधीश एस. एल. पठाण यांनी फेटाळले.

'शलाका'चे सुनील राका यांनी ज्योतीनगरात बीओटी तत्वावर जागा घेऊन त्या ठिकाणी जिमखाना, जलतरण तलाव बांधून विकसित केला. मात्र, महापालिकेसोबत झालेल्या करारापेक्षा अतिरिक्त बांधकाम करून त्या ठिकाणी रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, मसाज सेंटर, संगीत वर्ग सर्रासपणे सुरू केले होते. पोलिस आयुक्तांनी हुक्का पार्लरवर छापा मारून कारवाई केल्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह मनपाच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि राकाज क्लबला सील ठोकण्याचे आदेश दिले. पालिकेने सील ठोकताना नोटीस बजावली नाही, असा आरोप करीत राका यांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने पालिकेस रितसर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, मनपाने सर्व साधरण सभेत सील ठोकण्याचे आदेश पारित केले. या मनाई हुकुमाला आणि 'राकाज क्लब'चे सील काढण्यासाठी राका यांनी अतिरिक्त सत्र न्यायधीश एस. एल. पठाण यांच्या कोर्टात धाव घेतली होती. पालिकेच्या वतीने अॅड. अशोक अदंवत यांनी, तर राकाच्या वतीने अॅड. नेहरी यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींच्या भावात २० रुपयांची घसरण

$
0
0

औरंगाबाद : साठेबाजांवर छापेमारी सुरू असूनही अजून डाळ महागच आहे. डाळीचे दर केवळ २० रुपयांनी घसरलेत. नागपूर, मुंबईहून डाळींची आवक होणार असल्याने सणासुदीत डाळीची टंचाई भासणार नाही, असे व्यापारी सांगत आहेत. सध्या तूरडाळ १७० ते १८० या दराने विकली जात आहे. मूग, उडीद, हरभरा, मटकी, चवळी डाळीचे भावही चढेच आहेत. त्यामुळे डाळींची विक्री ४० टक्क्यांनी घटली आहे. 'होलसेलमध्ये तूरडाळीचा भाव ५०, इतर डाळीच्या भावात १० ते २० रुपयांनी घसरण झाली आहे. डाळींचे भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे,' असे व्यापारी हरीश पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९०० मालमत्तांना महापालिकेचा डबलकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या अजब कारभाराचा गजब नमुना समोर आला आहे. शहरातील सुमारे एक लाख मालमत्तांना अद्याप कर लागलेला नाही. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. तर, दुसरीकडे १९०० मालमत्तांना डबल कर लागल्याचे उघड झाले आहे.

मालमत्ता कर वसुलीवर विशेष लक्ष देत महापालिका प्रशासनाकडून कामाची आखणी केली जात आहे. पालिका हद्दीतील किती मालमत्तांना कर लागला, किती मालमत्तांना कर लागलेला नाही याची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक लाख ७५ हजार मालमत्तांनाच आतापर्यंत कर आकारण्यात आला आहे. तर, किमान एक लाख मालमत्ता कर आकारणीच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित करूनही या मालमत्तांना कर आकारलेला नाही.

दरम्यान करमूल्य निर्धारक व संकलक विभागाने एकाच मालमत्तेला डबल कर लागल्याची प्रकरणे शोधून काढली. महापौर त्र्यंबक तुपे यांनी कर वसुलीसंदर्भात बैठक घेऊन या संदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या पथकाने सर्वेक्षण करून डबल कर लागलेल्या १९०० मालमत्ता शोधल्या. या मालमत्ता अ आणि क वॉर्ड कार्यालयाच्या अंतर्गत आहेत. आता या संदर्भात सुनावणी घेऊन त्यातून मार्ग काढला जाणार आहे. अन्य वॉर्ड कार्यालयाच्या अंतर्गत डबल कर लागलेल्या मालमत्तांचे, पालिका हद्दीतील होर्डिंगचेही सर्वेक्षण करण्यात आले. महापालिकेच्या मालकीचे ३१३ होर्डिंग असताना सर्वेक्षणात मात्र ५१८ होर्डिंग आढळले. जास्तीच्या होर्डिंगवर आता कारवाई केली जाणार आहे.

महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या आदेशाने मालमत्ता कर वसुलीसंदर्भात काम सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डबल कर लागलेल्या मालमत्ता शोधण्याचे काम हाती घेतले आहे. मालमत्ताकर वसुली बरोबरच पालिकेच्या मालमत्तांपासून मिळणाऱ्या करात वाढ करण्याकडेही लक्ष दिले जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- अय्युब खान, उपायुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात चिकनगुनियाचे थैमान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरभर चिकनगुनियाने थैमान घातले आहे. खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड संख्या आहे. तरीही महापालिकेच्या लेखी मात्र संपूर्ण शहरात फक्त तीन रुग्ण आहेत. आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही आकडेवारी मंगळवारच्या आढावा बैठकीत सांगितली. तेव्हा महापौर त्र्यंबक तुपे संतापले. त्यांनी या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत व्यवस्थित काम करण्याची तंबी दिली.

चिकनगुनिया, डेंगीच्या आजाराने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. खासगी, सरकारी हॉस्पिटल रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने काय प्रयत्न केले, याचा आढावा घेण्यासाठी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी डॉ. सुहास जगताप, डॉ. संध्या टाकळीकर यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, घाटी रुग्णालयातील साथरोग तज्ज्ञ डॉ. अंकुशे, आरोग्य सभापती विजय औताडे उपस्थित होते. बैठकीत महापौरांना माहिती देण्यात आली. 'शहरात डेंगीचे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ६७ रुग्ण होते. आता ऑक्टोबर महिन्यात ४८ रुग्ण आहेत. चिकनगुनियाचे फक्त तीन रुग्ण आढळून आले आहेत. मलेरियाचे १९ रुग्ण आहेत,' असे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही आकडेवारी ऐकून महापौर संतापले. 'संपूर्ण शहर चिकनगुनियाने त्रस्त असताना तुमच्याकडे फक्त तीनच रुग्णांची नोंद कशी काय,' असा प्रश्न त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना विचारला. फवारणीच्या कामाचे वर्षभराचे नियोजन करा,' असे आदेश त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात १३३५ ठिकाणी छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डाळीच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे गेल्या आठवड्यात मराठवाड्यात पुरवठा विभागाने १३३५ व्यापाऱ्यांवर छापे टाकले. लातूर जिल्ह्यात ४९ गोदामांना टाळे ठोकले आहे. त्याशिवाय ३०० क्विंटल डाळ जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई १९७ पथकांनी केली.

डाळी आणि खाद्यतेलांच्या भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने साठवणुकीवर निर्बंध लागू केले. त्यानंतर सुरू देशभर छापासत्र सुरू झाले. मराठवाड्यात पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईमध्ये शेकडो क्विंटल डाळी, सोयाबीन यांचे साठे सील करण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या धान्यसाठ्याची कागदपत्रे दाखविता आली नाहीत. काही जणांकडे परवाने नसल्यामुळे त्यांचे दुकान आणि गोदामामध्ये असलेले धान्य सील करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यांमध्ये १५.९२ क्विंटल तूर, ३६.६४ मूग, २१०.९७ हरभरा डाळ, ११.४ क्विंटल उडीद डाळीचा साठा सील करण्यात आला. जालना जिल्ह्यात सील केलेल्या धान्यांत ४८.५ हरभरा डाळ, साखर ११८.५ मूगडाळ १३.७, तूरडाळ ३.५, उडीद दाळ १.१० जेमिनी तेल ५१.१५, पामतेल ७५ किलो, गहू १५० क्विंटल यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातही ८ हजार २३६ क्विंटल सोयाबीन तर, २८ क्विंटल तूर असा २ कोटी ९१ लाख रुपयांचा माल सील करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये ३३ क्विंटल हरभरा डाळ व इतर ७ हजार ४५५ क्विंटल माल सील करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहित मुलगीही नेमणुकीला पात्र

$
0
0

म. टा . विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

केवळ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक व्यक्तीने नामनिर्देशित केलेल्या मुलीचे लग्न झाल्यामुळे ती प्रकल्पग्रस्त संगर्वातून शासन सेवेतील नेमणुकीस पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. ए. एम. बदर यांनी दिला.

जळकोटजवळील (जि. लातूर) धामणगावच्या मनीषा नामदेवराव चोले यांनी जिल्हा परिषदेकडे आरोग्य सेवक या पदासाठी प्रकल्पग्रस्त या संवर्गातून नियुक्तीसाठी अर्ज केला होता. त्यांची निवड होऊनही, केवळ विवाहित असल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यांचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाले होते. या आदेशाला मनीषा चोले यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. कोर्टाने त्या पात्र असल्याचे आदेश दिले. या प्रकरणात चोले यांच्या वतीने आनंद पाटील -इंद्राळे यांनी तर शासनातर्फे विठ्ठल दिघे यांनी बाजू मांडली.

समान दर्जा

विवाहित मुलगा व विवाहित मुलगी यांच्यामध्ये कायद्यानुसार भेदभाव करता येणार नाही. असा भेदभाव हा असंवैधानिक व पूर्णपणे बेकायदा असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला. या निकालामुळे शासन व इतर शासकीय सेवेत विशिष्ट संवर्गातून विवाहित मुलगा व विवाहित मुलगी यांना कायद्यानुसार समान दर्जा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसपीआय प्रवेशाचा पॅटर्न बदलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत (एसपीआय) प्रवेशासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. आता विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेत दोन पेपर द्यावे लागतील. त्याचबरोबर मुलाखतीचे तंत्रही बदलण्यात आले अाहे. आता एकच पॅनल मुलाखत घेण्यात येणार आहे. 'कट ऑफ लिस्ट' जाहीर करण्यात येणार आहे. सध्या संस्थेत ५० जागांवर प्रवेश देण्यात येतो. त्यात १० जागांची वाढ करण्यात आली आहे. हे बदल येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहेत.

सैन्य दलातील अधिकारी पदांवर मराठी विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून औरंगाबादमध्ये 'एसपीआय' संस्थेची उभारणी करण्यात आली. या संस्थेत ५० जागांवरील प्रवेशासाठी हजारो विद्यार्थी रांगेत असतात. दरवर्षी ही संख्या वाढत असल्याने संस्थेने प्रवेश परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केले आहेत. आता विद्यार्थ्यांना मॅथ्स व जनरल अॅबिलिटीचा पेपर स्वतंत्रपणे द्यावा लागणार आहे. पूर्वी शंभर गुणांसाठी एकच पेपर होता. यात मॅथ्स, इंग्रजी, फिजिक्स, बायोलॉजी, केमेस्ट्री, हिस्ट्री आदी विषयांचा समावेश होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेशासाठी 'यूपीएससी'तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मॅथ्सला जास्त वेटेज असते. त्यामुळे या विषयासाठी स्वतंत्र पेपर घेण्यात येणार आहे.

राज्यातील चार शहरांत प्रवेशासाठी वेगवेगळ्या तारखांना परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेनंतर त्याच दिवशी निकाल जाहीर केला जातो. यापुढे सर्व शहरांतील परीक्षांचा निकाल एकाच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा पॅटर्न लागू होणार आहे.

विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन त्यांचे सुप्तगुण अधिकाधिक समोर यावेत आणि त्यांना प्रवेशासाठी जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून परीक्षा पद्धतीत बदल केले जात आहेत.

- ले. जनरल विनायक पाटणकर, अध्यक्ष, एसपीआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘स्वाती अभय योजना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळग्रस्त भागात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना एसटीचा मोफत पास देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने लातूर जिल्ह्यातील स्वाती पिटले हिने आत्महत्या केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. 'स्वाती अभय योजना' असे मोफत पास योजनेला नाव देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ ४ लाख ६० हजार विद्यार्थिनींना होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

लातूर जिल्ह्यातील स्वाती पिटले हिने पाससाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर मराठवाड्यातील विद्यार्थिनींना एसटीचा मोफत पास देण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च शिक्षणासाठी एसटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना ३३ टक्के पैसे आकारून पास देण्यात येतो. आता त्यांना मोफत पास देण्यात येणार आहे. त्याचा लाभ मराठवाड्यातील ४ लाख ६० हजार विद्यार्थिनींना याचा थेट फायदा होणार आहे.

नोव्हेंबर २०१५पासून मार्च २०१६पर्यंत स्वाती अभय योजना राबविण्यात येणार आहे. यामुळे एसटीवर ९ कोटी १८ लाख २८ हजार रुपयांचा भार पडणार आहे. तो उचलण्याचा निर्णय एसटी विभागाने घेतला आहे. ही योजना एक नोव्हेंबर २०१५पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

केवळ २६० रुपयांसाठी...

स्वाती पिटले हिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. तिचा एसटीच्या एसटीच्या पासची मुदत संपली होती. पासच्या नूतनीकरणासाठी तिला २६० रुपयांची गरज होती. त्यामुळे स्वाती आठ दिवस कॉलेजला जाऊ शकली नव्हती. कुटुंबाच्या बिकट आर्थिक स्थितीचा तिच्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे तिने जीवनयात्रा संपविली. तिच्या मृत्युमुळे दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात-बारा दाखवा, ‘जीवनदायी’ मिळवा!

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

औरंगाबादः एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना लागू असणारी 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' आता महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांना नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही गावातील शेतकऱ्याला व त्याच्या कुटुंबीयांना राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. केवळ सात-बारा दाखवून शेतकऱ्यांना योजनेतील ९७१ प्रकारचे उपचार घेता येतील.

नोव्हेंबर २०१२मध्ये 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' राज्यामध्ये लागू करण्यात आली. पिवळे व केशरी रेशन कार्डधारक, अंत्योदय व अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थींना योजना लागू होती. दुष्काळ व शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या समावेशाचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घोषणा केली व त्या दृष्टिकोनातून राज्यातील शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. 'मटा'ला अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार; नोव्हेंबरमध्ये योजनेत सुधारणा होणे अपेक्षित असून, शेतकऱ्यांचा योजनेत समावेशाची अंमलबजावणी होणार अाहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला अद्याप शासनाचा आदेश प्राप्त झाला नसला तरी, तो लवकरच प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

राज्यात कुठेही उपचार शक्य

योजनेसाठी शेतकऱ्यांना केवळ सात-बारा दाखवावा लागणार आहे. संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनाही रेशनकार्डवरील त्यांची नावे दाखवून उपचार घेता येणार आहे. ही योजना लागू असलेल्या कुठल्याही खासगी रुग्णालयामध्ये कुठल्याही गावातील शेतकऱ्याला उपचार घेता येईल.

'राजीव गांधी जीवनदायी'मध्ये शेतकऱ्यांचा विचार केला जाणार असून, लवकरच निर्णय होणार आहे. यासंदर्भात पुढील महिन्यात सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहेत.

- डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळीमुळे व्यापारी, ग्राहकांच्या कात्रीत सरकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

व्यापाऱ्यांच्या गोदामावर छापे टाकण्याच्या मोहिमेचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळेच राज्य सरकार बाजार सुरळीत व मुक्त वातावरणात कसा सुरू राहील आणि सर्वसामान्यांना माफक दरात वस्तु कशा मिळतील याचा समतोल साधण्याच्या कात्रीत सापडले असल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात सरकारकडून व्यापाऱ्यांची गोदामे सील करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचा परिणाम सध्या व्यापारपेठेवर झाला असून त्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने कोणतीही आवक सध्या होत नाही. ज्याप्रमाणात धाडसत्र सुरू आहे. त्याप्रमाणात सामान्य ग्राहकांना डाळ स्वस्त मिळत नाही. या वातावरणातही डाळीच्या किमंती घसरल्या असून तूरडाळीचा भाव सध्या १७० रुपयांवर आला आहे. लातूर येथील व्यापाऱ्यांने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की, सरकारने जे छापे मारले आहेत. या कारवाईत तूरडाळ आणि तूर किती सापडली हे स्पष्ट करावे. त्याचे कारण म्हणजे सापडलेल्या छाप्यात आयात केलेली व चढयाभावाने घेतलेली तूरडाळ किंवा तूर मोठ्या प्रमाणावर आहे. लहान-मोठ्या शहरात टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये अत्यल्प प्रमाणात तूर सापडली आहे. गेल्या वर्षी उत्पादनच कमी झालेले आहे. सध्या जे गोदामे सील केले आहेत. त्याबद्दल तातडीने सरकारने निर्णय करून जी काही कारवाई करायची आहे. तरच ग्राहकांना सणासुदीला डाळ मिळू शकते. त्यासाठी धोरण नक्की करावे लागणार आहे. त्यासोबतच साठा मर्यादा आणि वास्तव याचा सोक्षमोक्ष लावून जी काही अतिरीक्त डाळ मिळेल ती जर स्वस्त धान्य दुकानातून विकायची असेल तर त्याला सुद्धा पॅकिंग केले तरच फायदा होणार आहे. ती पॅकिंग करण्यासाठी वेळ लागणार आहे. आता पुढील आठवड्यात नोकरदार माणसांच्या हाती पैसा येणार आहे.

त्याला स्वस्त दरात दाळ मिळाली पाहिजे, यासाठी सरकाराला आजच पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा भाव कमी झाले. परंतु, दाळच बाजारात नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती ही एका अनुभवी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सील केलेली गोदामे लवकर पारदर्शक पद्धतीने मोकळे करण्याची कारवाई सध्या सुरू असून त्यामधून तूरडाळीचा साठा मोठ्याप्रमाणात लातूर जिल्ह्यात तरी सापडेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सील केलेल्या गोदामाची तपासणी, कागदपत्रे आणि वास्तवात असलेला धान्यसाठा याची जुळवणी झाल्याशिवाय नेमका आकडा समजणार नसल्याचे सांगण्यात आले. तरीही किमान ३० ते ३५ हजार किं. तुरीचा साठा असेल असे सांगण्यात येत आहे.

निर्बंध घालून परिस्थिती सुधारणार नाही

सध्याचे सरकार हे बाजार सुरळीत मुक्त वातावरणात कसा सुरू राहील आणि सामान्याना माफक दरात वस्तु कशा मिळतील याचा समतोल साधण्याच्या कात्रीत सापडले असल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांवर अविश्वास आणि निर्बंध घालून परिस्थिती सुधारणार नाही तर, तात्काळ निर्णय आणि कडक अमंलबजावणीची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन विवाहितेवर सामूहिक बलात्कार

$
0
0

उस्मानाबादः बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथे एका अल्पवयीन विवहितेला चौघांनी बेदम मारहाण करीत तिच्यावर दुष्कर्म केल्याची घटना घडली. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन विवाहितेचे पतीशी फारसे जमत नसल्यामुळे ती बेंबळी येथे आपल्या आजोबाकडे राहते. बेंबळी येथील विष्णू डाके, धनंजय रसाळ, बालाजी कांबळे व दादासाहेब जानराव हे तिची सतत छेड काढत होते. परंतु, विविहिती त्यांच्याकडे दूर्लक्ष करीत होती. सोमवारी रात्री सदरील महिला घराबाहेर आल्याचे पाहून चौघांनी मिला पळवून नेले. अंधारात तिला बेबळी जवळच्या पांडूरंग तिगाडे यांच्या शेतात नेवून तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. बलत्कारानंतर चौघांनी त्या ठिकाणहून पळ काढला. यानंतर सदरील महिलेने स्वताला सावरत घर गाठले. हा प्रकार घरच्या मंडळीना तिने सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी चोरीविरुद्ध कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी मध्यम प्रकल्पातील पाण्याची राजरोसपणे चोरी करणाऱ्याविरूद्ध ‌कडक कारवाई करण्यात आली. पाणी चोरीविरुद्ध बुधवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या पथकाने पाइप, विजेच्या मोटारी, पाणीपंप जप्त केले. ज्या शेतकऱ्याचे हे पंप आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर शासन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले.

लातूर शहरातील पाणीटंचाईमुळे शेकडो बांधकाम मजुरांना कामपासून वंचित ठेवले जात असताना रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी मध्यम प्रकल्पातील पाण्याची राजरोसपणे चोरी केली जात होती. भंडारवाडीचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात आले आहे. याबाबत काही तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल प्रशासनाने घेतली.

बुधवारी जिल्हाधिकारी पोले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भंडारवाडी धरणाच्या परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना अनेक ठिकाणी मोटारी सुरू असल्याचे दिसले. त्या सात ते आठ वीज मोटारी, पंप जप्त केले. किमान दोन हजार फुट पाइप जप्त केले आहेत. सदरील साहित्य कोणाचे आहेत याचा शोध पोलिस घेणार असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असून पाण्याची चोरी करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी पोले म्हणाले, 'जप्त केलेले साहित्य माझे आहे. हे सांगण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे आम्ही आता ही पाइपलाइन कोणाच्या शेतात गेली होती. ती खाणून काढून त्या शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत. धरणासाठी संपादित केलेली परंतु, वापरात नसलेल्या जमिनीवर संपादित जमिनीवर शेतकरी गाळपेरा करतात, परंतु, काही शेतकऱ्यांनी गाळपेरा करत असताना शासनाने संपादित केलेल्या जमिनीवर माती टाकून तिची उंची वाढविली आहे. तेथून त्यांनी पाइपलाइन केली आहे. हे बेकायदेशीर आहे. जमिन उंच करण्यामुळे धरणाच्या पाणी साठ्याच्या आकारमानात घट होते. पाणी कमी साठले जात, अशा उंची वाढविलेल्या शेतकऱ्यांविरुद्ध, तसेच पाइपलाइन करून पाणी नेत असलेल्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत.'

यावेळी जिल्हाधिकारी पोले सोबत रेणापूरच्या प्रभारी तहसीलदार मंजुश्री लटपटे, लातूरचे तहसीलदार संजय वारकड, महावितरणचे अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. कारवाई सुरू होताना अनेक शेतकरी उपस्थित होते.

पाइपलाइन खोदून कारवाई करणार

ज्या शेतकऱ्यांनी बेकायदेशीरपणे पाइपलाइन केली आहे. त्यांनी एक महिन्याच्या आत काढून घेतली नाही, तर अंडरग्रांउड केलेली पाइपलाइन खोदून ती ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली आहे. त्या सर्वांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पोले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरांचे अतिक्रमण काढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करून बांधलेली पाच मंदिरे मंगळवारी अतिक्रमण हटाव पथकाने हटवली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यामुळे बजानगर परिसरात तणावाचे वातावरण होते.

बजाजनगर एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर नागरिकांनी अनेक ठिकाणी मंदिरे उभारली आहेत. जवळपास ४२ मंदिरे उभारल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. त्यापैकी ६ मंदिरे हाटविण्याचा निणर्य एमआयडीसी प्रशासनाने घेतला होता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त घेत सकाळी ८ वाजता कारवाई सुरू झाली. यावेळी हनुमानमंदिर, चर्च, बालाजी मंदिर, संत नरहरी महाराज मंदिर व साईबाबा मंदिर हटविण्यात आले. शिव सिद्धेेश्वर पावन महादेव मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी न्यालयातून एक दिवसाची स्थगिती मिळवली. त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्यात आले नाही. सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत, पोलिस उपनिरिक्षक महेश टाक, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे, तहसीलदार मुनलोड आदींची यावेळी उपस्थिती होती.

खैरे-तहसीलदारांची बाचाबाची

दरम्यान, अतिक्रमण हटविताना खासदार चंद्रकांत खैरे यांचे आगमन झाले. त्यांच्यात आणि तहसलीदार रमेश मुनलोड यांच्यात यावेळी जोरदार वादावादी झाली. खैरे यांनी तहसीलदार, पोलिस, महसूल कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे समजते. या प्रकरणी तहसीलदार मुनलोड म्हणाले, 'न्यायालयाच्या निर्णयानुसार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिस, एमआयडीसी तसेच महसूल प्रशासनाच्या बैठकीनंतर बुधवारी अतिक्रमण हटवण्याचे ठरले. त्यानुसार बजाजनगर येथे कारवाई सुरू होती. सहा पैकी काही धार्मिक स्थळांचे अतिक्रमण नागरिकांनी स्वतहून काढून घेतले. पाचव्या धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढणे सुरू असताना खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह काही लोक आले. तुम्हाला केवळ मंदिरच दिसते काय असे म्हणत एमआयडीसी, महसूल तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली,' अशी माहिती तहसीलदार रमेश मुनलोड यांनी दिली.

बजाजनगर येथील मंदिरे पाडून नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांचा निषेध करून पाडण्यात आलेल्या मंदिराच्या जागेवर शिवसेनेच्या वतीने पुन्हा मंदिर उभारू. या वसाहतींमध्ये एमआयडीसीने सोयी-सुविधा उपल्ब्ध करून दिल्या पाहिजेत, मात्र नागरिकांनी स्वखर्चातून उभारलेले धार्मिक स्थळे पाडण्याचे काम काही अधिकारी करत आहेत. त्यांना शिवसेना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. खरेच हिंमत असेल तर, क्रांतिचौकातील अतिक्रमण काढावे. याबाबत कोणताच निर्णय घेतला जात नाही.

- चंद्रकांत खैरे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्मदात्यांच्या शोधासाठी आटापिटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नकोशी म्हणून ज्या जन्मदात्यांनी १७ वर्षांपूर्वी अवघ्या १० दिवसाच्या बाळाला रस्त्यावर बेवारसपणे फेकून दिले होते. त्याच मुलीने आता जन्मदात्या आईला शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी ती तमिळनाडूतून थेट बीडला आली. मात्र, जन्मदात्यांच्या भेटीची तिची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. लहानपणी आधार बालगृहापर्यंत नेणाऱ्या एका जेष्ठाचे आशीर्वाद घेत ती माघारी फिरली.

कीर्ती (नाव बदलेले आहे. वय १७) तामिळनाडूतील एका बड्या शहरात ती आई यशोदासोबत (नाव बदलेले आहे) राहते. आई उच्चशिक्षित असून एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करते. यशोदा यांनी १७ वर्षांपूर्वी औरंगाबादेतील एका बालगृहातून तिला अवघ्या तीन महिन्यांची असताना कायदेशीररित्या दत्तक घेतले होते.

मायेची सावली व हक्काचे घर देत यशोदामाईने तिचा सांभाळ केला. लेक कळती-सवरती झाल्यावर त्यांनी तिला दत्तक घेतले असल्याचे सांगितले. यशोदाचा मोठेपणा किर्तीला समजला, पण आपली खरी आई कोण या प्रश्नाने तिला अस्वस्थ केले. अकरावीत गेल्यापासून तिने आपल्या आईचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ही बाब आई यशोदाच्याही लक्षात आली. त्यांनी दोघींनी मिळून पुढे हा शोध सुरू केला.

तामिळनाडू ते बीड

कीर्तीला दत्तक घेतेवेळी सामाजिक कार्यकर्त्या सुनीता तगारे यांच्याशी यशोदा यांची ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी तगारे यांच्याशी संपर्क साधत सद्यस्थिती सांगितली. कीर्ती बीड शहरात सापडली होती. त्यामुळे कीर्ती, तिची आई यशोदासह तगारे यांनी बीड गाठले. पोलिस अधिक्षक अनिल बारसकर यांच्यासह महिला तक्रार निवारण केंद्राच्या सहायक पोलिस निरीक्षक विशाखा धुळे, जमादार ए.जे. पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी केलेल्या प्रयत्नानंतर १७ वर्षे जुनी किर्तीशी संबंधित कागदपत्रे सापडली, पण, त्यातही किर्तीच्या पालकांचा शोध लागण्याइतपत माहिती मिळू शकली नाही.

चिंचेचे ते झाड आणि आजोबांचे आशीर्वाद

पोलिसांकडील कागपत्रावरून कीर्तीला ती ज्या ठिकाणी सापडली व ज्या व्यक्तीने तिला प्रथम पहिले होते त्या आश्रुबा वडमारे यांची माहिती मिळाली. त्याआधारे सर्वांनी घटनास्थळ असलेल्या लक्ष्मणनगरला भेट दिली. एका चिंचेच्या झाडाखाली बेवारस टाकण्यात आले होते, ही बाब समजातच कीर्ती हेलावली. आई अशी ओरड करत तिने टाहो फोडला. सर्वांचे डोळे पाणवले होते. भावना मोकळ्या करत किर्तीसह सर्वांनी वडमारे यांची भेट घेतली. बांधकाम खात्यातून निवृत्त झालेल्या आश्रुबा यांनाही किर्तीविषयी समजातच अश्रू लपविता आले नाहीत. कार्यालयासाठी सकाळी जात असतानाच झुडपातून बाळाचा रडण्याचा आवाज आला. ही माहिती आपण पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. जीवनदान देणाऱ्या आजोबा आश्रुबा यांचे आशीर्वाद घेत कीर्ती तामिळनाडूला परतली मायेची सावली देणाऱ्या यशोदा आईसोबत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमाफिया हिवाळेला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंढरपूर येथील २५ गुंठे भूखंड बळकविणाऱ्या टोळीचा म्होरक्या ज्ञानदेव लक्ष्मण हिवाळे व निवृत्त तलाठी बबन निकम यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी गजाआड केले. त्यांना बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. हिंगणे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले असता दोघांना शुक्रवारपर्यंत (३० ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जिल्हा उद्योग केंद्रातील निवृत्त व्यवस्थापक शिवाजी हल्लाळे यांनी सेवेत असताना पंढरपूर परिसरातील गट क्रमांक १५ मधील २५ गुंठे भूखंड खरेदी केला होता. या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून माफियांनी भूखंड गिळकृत केला.

तो भूखंड सोडण्यासाठी हल्लाळे यांना ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या राजू रामचंद्र अमराव, विनोद भिकाजी बनकर, रवींद्र विठ्ठल म्हस्के, ग्यानोबा उर्फ राजू कापसे, राध्येश्याम जाजू, अरुण दप्तरे, रुपचंद डोगरे, वॉचमन सर्जेराव घोडे या आठ जणांना अटक केली होती. या टोळीचा म्होरक्या ज्ञानदेव लक्ष्मण हिवाळेला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. हिवाळेने चौकशी दरम्यान तत्कालीन तलाठी बबन शेकुजी निकम याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांच्या पथकाने निवृत्त तलाठी बबन निकम यास अटक केली. निकम आणि हिवाळे या दोघांना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. व्ही. हिंगणे यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, तपास अधिकाऱ्यांनी कागदपत्र, मुखत्यारनामा, सह्यांचे नुमने हस्तगत करावयाची असल्यामुळे पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने दोघांना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतरच्या अधिकाऱ्याला पाण्यावरून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनियमित पाणीपुरवठा व वॉर्डांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामात केल्या जाणाऱ्या दिरंगाईचा भडका बुधवारी पुन्हा उडाला. शिवसेनेचे नगरसेवक मनोज बल्लाळ यांनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे वितरण व देखभाल दुरुस्ती विभागाचे व्यवस्थापक विरसंग स्वामी यांना मारहाण केली, अशी तक्रार स्वामी यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

स्वामी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 'सकाळी अकरा वाजता कार्यालयात काम करीत असताना महाव्यवस्थापक सोनकांबळे यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. यावेळी वॉर्ड क्रमांक ५५ चे नगरसेवक मनोज बल्लाळ एका कार्यकर्त्यासह बसले होते. त्यांनी त्यांच्या वॉर्डातील पाइप लाइनच्या कामाची चौकशी करीत मारहाण केली. बल्लाळ त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेखही तक्रारीत केला आहे. पोलिसांनी बल्लाळ यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून घेतला आहे.

मी किंवा माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्याने कुणालाही मारहाण केली नाही. शाब्दिक चकमक मात्र झाली. त्यांनी या चकमकीला वेगळे वळण दिले आहे.

- मनोज बल्लाळ, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images