Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘मागासवर्गीय मंडळाला निधी द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

भाजप सरकारच्या काळात गेल्या वर्षांत काही कामे चांगली झाली आहेत. या सरकारने मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी, त्यांना ताठमानेने जगता यावे यासाठी सर्व प्रकारच्या मागासवर्गीय आर्थिक विकास मंडळाला निधी देण्याची मागणी वैशाली बौद्ध विहाराचे विश्वस्त केशव कांबळे यांनी केली.

राज्यातील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव कांबळे होते. यावेळी राज्याचे परिवहन, बांधकाम राज्यमंत्री विजय देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शैलेश लाहोटी, गुरुनाथ मगे, सुधीर धुत्तेकर, मोहन माने, प्रविण कस्तुरे यांची उपस्थिती होती.

लोकसंवाद कार्यक्रमात सहभागी होताना अभियंता अतुले चिमने म्हणाले, '२०१३ साली जर्मनीवरुन सौर ऊर्जा विषयातील शिक्षण पूर्ण करुन भारतात आलो. त्यावेळी सौर ऊर्जा क्षेत्रात काही तरी करावे अशी इच्छा होती. मात्र, त्यावेळच्या सरकारच्या धोरणाने ते शक्य झाले नाही. आता मोदी सरकारने सौर ऊर्जा क्षेत्रात काम करण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.'

या वेळी बोलताना राज्यमंत्री विजय देशमुख यांनी राज्य सरकारने केलेल्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, 'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी १५ वर्षात घाण केली आहे. ती स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे.'

यावेळी शैलेश गोजमगुंडे यांनी प्रस्ताविक केले. शैलेश लोहोटी, नागनाथ निडवदे, यांनी मनोगते व्यक्त केली. याच कार्यक्रमात शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपीसोबतच पोलिसांची चौकशी करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

शाहू महाविद्यालयाच्या मैदानावर माहिती अधिकाराचे कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना झालेल्या मारहाणीची चौकशी करताना पोलिसांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल असे मत राज्याचे बांधकाम राज्यमंत्री विजय देशमुख यांनी लातूरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

छत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनाधिकृत इमारतीचे प्रकरण धसास लावणारे कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना शुक्रवारी झालेल्या अमानुष मारहाणीची माहिती घेण्यासाठी राज्यमंत्री देशमुख यांनी रविवारी पोतदार हॉस्पीटलमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अशोक पोतदार यांच्याशी चर्चा केली. यावेळी शैलेश लाहोटी, गुरनाथ मगे, प्रदिप मोरे यांनी त्यांना माहिती दिली. देशमुख यांनी सर्व छायाचित्राची पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री विजय देशमुख म्हणाले, 'भाईकट्टी हे सोलापूरचे आहेत. त्यांना कॉलेजमध्ये नेऊन झालेली मारहाण हा प्रकार निंदनीय आहे. आरोपींना पकडण्यासंदर्भात एसपीशी चर्चा करून तपासाची माहिती घेतनी आहे. परंतु, या घटनेला जर कोणी पोलिस, कर्मचारी जबाबदार असतील तर चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्र्याना भेटून मी सर्व माहिती देणार असल्याचे ही विजय देशमुख यांनी सांगितले. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानावर सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत शाहू महाविद्यालयाच्या एकूणच वर्तणुकीवर जोरदार टीका करण्यात आली. भाईकट्टी यांना झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करावी, मारहाणी मागचा सुत्रधार शोधून काढावा हे मुद्दे प्रत्येकांने मांडले. भाईकट्टी यांनी सरंक्षणाची मागणी केलेली असतानाही चार महिने त्यांच्या अर्जावर जिल्हा पोलिस प्रमुखांनी निर्णय घेतला नाही, त्यांना सरंक्षण दिल असते तर हा प्रसंग टळला असता, मारहाण झाल्यानंतर मारेकरी गावभर माध्यमांना प्रतिक्रिया देत फिरत होते. त्यांना अटक का झाली नाही, त्यामुळे या प्रकरणी पोलीस अधिक्षकांची बदली करावी आदि विषयावर चर्चा करण्यात आली.

या वेळी शेकापचे उदय गवारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर, शैलेश स्वामी, काँग्रेसचे मोईज शेख, उपमहापौर कैलाश कांबळे, सभागृह नेते नरेंद्र अग्रवाल, आरपीआयचे चंद्रकांत चिकटे, आम आदमी पार्टीचे बाळ होळीकर, भाजपचे प्रदीप मोरे, बसपाचे रघुनाथ बनसोडे, सपाचे एम. बी. पठाण, विद्रोही संघटनेचे अॅड. अतिश चिकटे, सामाजिक कार्यकर्ते अफजल कुरेशी, बरकत काझी, साबेर काझी, अंकित बजाज, किशोर जैन, प्रशांत चव्हाण यांची उपस्थिती होती.

बुधवारी सर्वपक्षीय निषेध मोर्चा

लातूर शहराच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या या घटनेविरुद्ध जनआंदोलन करावे, मारहाणीची ही प्रवृत्ती वेळीच ठेचून काढण्यासाठी जनआंदोलन करावे लागेल.आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून या मागण्यांसाठी बुधवारी शहरातून एक मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्प संचालक नाईकविरोधात गुन्हा

$
0
0

आर्थिक विकास महामंडळातील बोगस कर्ज ‌प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

पुणे येथे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेल्या शरद नाईक यांच्याविरोधात महामंडळात केलेल्या बोगस कर्ज प्रकरणातील अपहारप्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शरद नाईक हे पुणे येथे रुजू होण्याअगोदर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळातील उस्मानाबाद येथील कार्यालयात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकालात उस्मानाबाद येथे बनावट कर्ज प्रकरण केल्याचे उघडकीस आले असून, यातून १९ लाखांचा अपहार करण्यात आला आहे.

२०११-१२ या आर्थिक वर्षात शरद नाईक यांनी बनावट कागदपत्राद्वारे कर्जाची प्रकरणे मंजूर केली व या रकमा हडप केल्या. याप्रकरणी हिवर्डा येथील मुंडे नावाच्या तरुणाने तक्रार नोंदविल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. मुंडे यांच्या तक्रारीनंतर येथील विद्यमान व्यवस्थापिका शैलजा काळे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत २०११-१२ मध्ये आठ जणांच्या नावे बनावट कागदपत्राआधारे १९ लाख ५० हजारांचे कर्जप्रकरण मंजूर करून ही रक्कम लाटल्याचे समोर आले. शैलजा काळे यांनी या आठ प्रकारणाची गावनिहाय जाऊन जातीने चौकशी केली असता त्या गावात या नावाच्या व्यक्ती राहात नसल्याने समोर आले. ग्रामसेवकांनी तसे लेखीही महामंडळाला दिले आहे.

१९ लाख ५० हजारांचा मामला हा एका वर्षातील आहे. शरद नाईक यांच्या कार्यकालातील आणखीत तीन वर्षांच्या कार्यकालातील कारभाराची चौकशी झाल्यास अपहाराचा आकडा १ कोटींच्या पुढे जाणाच्या अंदाज वर्तविण्यात येत आहे. बहुचर्चित अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कोट्यवधीच्या घोटाळ्याची चर्चा ताजी असतानाच हा मामला समोर आल्याने शासनाच्या या योजना खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नसल्याचेच यातून समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगर पंचायतींसाठी चुरशीने मतदान

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

बीड जिल्ह्यातील चार जालना जिल्ह्यातील चार व लातूर जिल्ह्यातील चार नगर पंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. मतदानावेळी कुठलाच अनुचीत प्रकार घडली नाही. सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी मतमोजणी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मतदानासाठी रांगा

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार आणि वडवणी याठिकाणी रविवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुपारपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत शिरूरमध्ये ८७ टक्केमतदान झाले. तर वडवणीत ८२ टक्के मतदान झाले. पाटोदा येथे ७४,तर आष्टीला ७७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या चारही नगरपंचायतीसाठीचा कौल मतदान यंत्रात बंद झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये खरी लढत असून अनेक स्थानिक आघाड्या आणि अपक्षही काही ठिकाणी नशीब आतमावित आहेत.

भाजपकडून स्थानिक आमदार आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रचाराचीआघाडी सांभाळली. तर राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते धनंजयमुंडे यांनी प्रचार केला. मतदानानंतर दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा केला जात आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी या चारही ठिकाणी नगर पंचायतीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता कुणाला विजयाचा गुलाल लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जालन्यात ७६ टक्के मतदान

जालना : जालना जिल्ह्यातील चार नगर पंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या वेळी सरसरी ७६.६९ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. यावेळी कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. बदनापूर येथे ८० टक्के, घनसावंगी ८० टक्के, जाफ्राबाद ८२ टक्के, मंठा ६९ टक्के मतदान झाले. त्यासोबतच जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ८२ टक्के मतदान झाले. भोकरदन तालुक्यातील नळनी येथील एका मतदान केंद्रावर मतदान स्थगित करण्यात आले. या ‌ठिकाणच्या एका प्रभागासाठी दुबार मतदान घेण्यात येणार आहे.

लातूरमध्ये शांततेत मतदान

लातूर : लातूर जिल्ह्यातील चार नगरपंचयात निवडणुकीसाठी व औसा नगरपालिकेच्या दोन वार्डातील पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. यावेळी कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. चाकूर नगरपंचायतीसाठी ७८ टक्के, शिरुर अनंतपाठ पालिकेसाठी ८१ टक्के, देवणीसाठी ७४ टक्के तर जळकोट तालुक्यासाठी ८३ टक्के मतदान झाले. त्यासोबतच औसा पालिकेतील दोन वार्डाच्या पोटनिवडणुकीत ५३ टक्के मतदान झाले. यावेळी सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी मतमोजणी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुक‌ीत भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची कस लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची जमीन हडपल्याचा गुन्हा

$
0
0

वैजापूर ः बनावट कागदपत्रांच्या आधारे तालुक्यातील बाजाठाण येथील एका महिलेची फसवणूक करून ३३ गुंठे जमीन हडपल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने तत्कालिन दुय्यम निबंधकासह सात जणांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील राहिवासी चंद्रभागाबाई अर्जुन पाटील यांचे बाजाठाण हे माहेर असून तेथे त्यांच्या वडिलांची शेती आहे. या शेतीचे बनावट कागदपत्रे तयार करुन कैलास गायकवाड याने अधिकाऱ्यांच्या मदतीने ३३ गुंठे जमीन स्वतःच्या नावावर केली, अशी तक्रार न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार दुय्यम निबंधक पी. के. सपकाळ, कैलास विठ्ठल गायकवाड, गणेश सुदाम निर्मळ, ज्ञानदेव विश्वनाथ शिंदे, वामन ज्ञानदेव भराडे, भाऊसाहेब मुरलीधर निर्मळ व सुनील भरत लांडे यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक

पोलिस निरीक्षक प्रकाशकुमार पाटील करीत आहेत.

ऊस जळून खाक

नगिना पिंपळगाव शिवारातील गट क्रमांक ८४ व गट क्रमांक ८५ मधील उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने दोन शेतकऱ्यांचा दोन एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत उसासह पीव्हीसी पाइप, ठिबक सिंचनच्या नळ्या, असे एकूण तीन लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी पुंडलिक संभाजी मते यांनी केली आहे. त्यांचे दोन लाख १० हजार व लताई विजय गोरसे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी शेख फेरोज व सहायक अशोक शितोळे यांनी पंचनामा केला आहे.

कर्मचाऱ्यास मारहाण

गॅस सिलिंडर का दिले नाही, अशी विचारणा करीत तालुक्यातील चिंचडगाव येथील तिघांनी खांबेकर गॅस एजन्सीचा कर्मचारी ऋषिनाथ रामभाऊ पवार यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नाना सुभाष खोतकर , कृष्णा सुभाष खोतकर व अमोल सुभाष खोतकर यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीला पळवून नेले

शहरातील मोंढा मार्केट भागातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लासलगाव येथील रहिवासी अंबादास रवींद्र बागुल व नांदगाव येथील सचिन संजय त्रिभुवन या दोघांनी मुलीला घरातून पळवून नेल्याची तक्रार आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा बिरारे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकी तुंबल्याने लोडशेडिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

शहरात महावितरणकडून वीजबिलांची अत्यंत संथगतीने वसुली सुरू असल्याने एक कोटी ३५ लाख रुपये थकले आहेत. परिणामी शहरातील तिन्ही फिडर 'एफ' गटात खाली आले आहेत. यामुळे शहरात साडेआठ तासांचे लोडशेडिंग सुरू आहे.

महावितरणतर्फे गेल्या महिन्यात ६२ लाख रुपयांची वसुली वसुली करण्यात आली. शहरातील पावर हाउस व नाथमंदिर हे दोन फिडर मागच्या महिन्यात 'जी' गटातून 'एफ' गटात आले आहे. नवीन कावसान फिडर अजूनही 'जी' गटात असल्याची माहिती शाखा अभियंता अभय लांडगे यांनी दिली. एखाद्या फिडरवर ४२ टक्क्यांपेक्षा कमी वीजगळती व वीज बिल थकित असल्यास तो फिडर 'डी' गटात येतो व फिडर लोडशेडिंगमूक्त करण्यात येते. सध्या पैठण शहरातील तिन्ही फिडर 'डी' गटाच्या खाली असल्याने साडेआठ तासांचे लोडशेडिंग करण्यात येत असल्याचे शाखा अभियंता लांडगे यांनी सांगितले. मागच्या महिन्यात आम्ही वीजबिल वसुली मोहीम राबविल्यामुळे पावर हाऊस व नाथ मंदिर फिडर 'जी' गटातून एफ गटात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात साडेआठ तासाऐवजी साडेसहा तासाचे व तीन ऐवजी दोन वेळा लोडशेडिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महावितरण अत्यंत संथगतीने वीज वसुली मोहीम राबवीत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वीजबिल थकले आहे. महावितरणने सक्तीची वीजबिल वसुली मोहीम राबवून थकबाकीदारांवर कार्यवाही करावी व शहर लोडशेडिंगमूक्त करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. 'जे विद्युत ग्राहक नियमित वीजबिल भरत नाहीत त्यांच्यावर महावितरणने कार्यवाही करावी. लोडशेडिंग करून नियमित वीज बिल भरणाऱ्यांना त्रास देवू नये,' अशी भावना एक वीजग्राहक मुकेश परदेशी यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध कारवायांतील सहा जणांना अटक

$
0
0

औरंगाबादः गुन्हेशाखेच्या पथकाने केलेल्या विविध कारवायामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली. यामध्ये एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकीचा वापर करणाऱ्या दोघांसह संशयित घरफोड्याचा, मोबाइलचोराचा समावेश आहे.

ज्युबलीपार्क भागात दोन तरूण एकच क्रमांकाच्या दोन वेगवेगळ्या दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती शुक्रवारी गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यावरून शोध घेऊन आकाश सुभाष सोळंके (वय २२) व संदीप विष्णू शिंदे (वय २४ रा. बेगमपुरा) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून एमएच २० एडी २७९१ या एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. संदीप शिंदे याने दहा महिन्यांपूर्वी बुलडाणा येथून शेषनारायण नावाच्या व्यक्तीकडून दुचाकी खरेदी केली होती. मात्र ही दुचाकी मध्यप्रदेश पासिंगची असल्याने त्यावर बनावट क्रमांक टाकला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरद गणेश मंदिराजवळ शेख नय्यर शेख नईम (वय १९ रा. एसटी कॉलनी, समर्थनगर) या संशयिताला पाठलाग करून पकडण्यात आले. छावणी येथील गॅस गोडावूनशेजारी लपून बसलेले शेख कादर शेख खैरोद्दीन (वय २६ रा. पडेगाव) व शेख ताहेर शेख नबी (वय २७ रा. कोहिनूर कॉलनी) यांना ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुष्यात माणसं वाचायला शिका

$
0
0

आयसीएआयच्या परिषदेत डॉ. निशीगंधा वाड यांचे मत

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद

शिक्षण ही काळाची गरज आहे, पण माणूसपणच विसराला तर, शिक्षणाचा उपयोग तरी काय? आपण किती पदव्या घेतल्या याहीपेक्षा आयुष्याच्या विद्यापीठात आपण माणस किती वाचायला शिकलो, हे महत्त्वाचे, असे मत अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांनी येथे व्यक्त ‌केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्‌स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) औरंगाबाद शाखेतर्फे आयसीए भवन येथे रविवारी आयोजित महिला उपविभागीय परिषदेच्या डॉ. निशीगंधा वाड प्रमुख पाहुण्या होत्या. करपद्धतीत बदल व त्याबाबतची काळजी हा विषय घेत आयसीएआयच्या महिला सक्षमीकरण समिती व पश्चिम विभागीय मंडळातर्फे एक दिवसाची परिषद घेण्यात आली. यावेळी औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष पंकज कलंत्री, उपाध्यक्ष रेणुका देशपांडे, सचिव रोहन आचलिया,कोषाध्यक्ष अल्केश रावका व महिला सक्षमीकरण समिती प्रमुख रुपाली बोथरा उपस्थित होत्या.

डॉ. वाड म्हणाल्या,'शिक्षणामुळे आजची स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असली तरी, आजही मोजक्याच स्त्रियांना निणर्यस्वातंत्र्य आहे. वास्तविक स्त्री सक्षम होतीच. आता कुठे गाडीच्या या चाकाचे महत्त्व पुरूषप्रधान संस्कृतीला पटत आहे. म्हणूनच वर्तमानात स्त्री सक्षमीकरणाला 'क्रायस चेजिंग रोल वुमेन एम्पॉवरमेंट' असेच संबोधावे लागेल. केवळ आर्थिक स्वायत्तता म्हणजेच सक्षमीकरण नव्हे तर, सहज तुटणाऱ्या नात्यांची वीण घट्ट करणे हे सुद्धा सक्षमीकरणच आहे.'

हे अधिवेशन तांत्रिक आणि विशेष अशा दोन सत्रांत झाले. तांत्रिक सत्रामध्ये सीए सुजाता रांगणेकर (मुंबई), सीए रुपल हरिया यांनी व्हॅट आणि आयटी सेक्युरिटी इन सीए ऑफिस या विषयावर मार्गदर्शन केले. नॉन टेक्नीकल सत्रामध्ये आजच्या काळात स्त्रियांपुढील आव्हाने या विषयावर डॉ. अर्पणा कोतापल्ले, डॉ. मोनाली देशपांडे व डिंपल बिंद्रा यांनी कायदेशीर पैलूंवर प्रकाश टाकला. श्वेता भारतीया व मीनल नाईक यांनी सूत्रसंचालन केले. रोहन आचलिया यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये सीए स्मिता भारतीया यांचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकार कॉर्पोरेटसाठी झटतेय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बीएसएनलएलचे मोबाइल कनेक्शन वाढत असून त्याप्रमाणत ग्राहकांना समाधानकारक सेवा देता येत नाही, हे व्यवस्थापनाचे अपयश आहे. जनतेने निवडून दिलेले सरकार कार्पोरेटसाठी काम करत आहे,' असा आरोप नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्लॉईजचे महासचिव कॉ. चदेश्वरसिंग यांनी केला.

नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्लॉइजच्या (बीएसएनएल) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत बोलत होते. उदघाटनाआधी मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले.

'बीएसएनएलमध्ये गुंतवणूक केली जात नसल्यामुळे ग्राहक खाजगी कंपन्यांची सेवा घेत आहेत. आम्हाला नवीन तंत्रज्ञान, आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी संघटना आंदोलन उभारेल,' असा इशारा कॉ. चंदेश्वरसिंग यांनी दिला. यावेळी स्वागताध्यक्ष कॉ. भालचंद्र कानगो, समाजवादी नेते अॅड. विष्णू ढोबळे यांनी असंघटीत कामगारांचे ऐक्य मजबूत करून जातीयवादी व फुटीरतावादी शक्तींना पराभूत करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. इस्लाम अहमद यांनी सरकारने बीएसएनएलचे बीडब्ल्यूए स्पेक्ट्रमचे पैसे व इन्कम टॅक्सचा परतावा न दिल्याने बीएसएनएलची प्र्रगती खुंटली असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार आणि व्यवस्थापन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.

टॉवर कंपन्यांची स्थापना व एमटीएनएल-बीएसएनएलच्या प्रस्तावित एकत्रिकरणामुळे बीएसएनएलची आर्थिक स्थिती आणखी कमकुवत होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कॉ. रंजन दाणी यांनी केले. कॉ. के. एस. कुलकर्णी यांनी आभार मानले. या बैठकीसाठी संपूर्ण देशातून तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. स्थानिक कार्यकारिणीने बैठकीचे संयोजन केले आहे.

आज खुले अधिवेशन

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने कॉ. इस्लाम अहमद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (२ नोव्हेंबर) भानुदास चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता खुल्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीएसएनएल नवीन दिल्लीच्या एचआर व अॅडमिन संचालक सुजाता रे, बीएसएनएल महाराष्ट्र परिमंडळ मुंबईचे जी. के. उपाध्याय, प्रवीण मल्होत्रा, नितीन महाजन यांची उपस्थिती राहणार आहे. एनएफटीईचे कॉ. चंदेश्वर सिंग, स्वागताध्यक्ष कॉ. भालचंद्र कानगो हे प्रमुख वक्ते राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९०० रुग्णांना ‘सीएम’ची ३० कोटींवर मदत

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

मुख्यमंत्री कार्यालयात स्थापन झालेल्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून अवघ्या पाच-सहा महिन्यांत सुमारे ९०० गोरगरीब रुग्णांना तब्बल ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक सहाय करण्यात आले. त्यातील सुमारे ५०० रुग्ण मराठवाडा व विदर्भातील आहे. देण्यात आलेली ही मदत १ ते ४२ लाखांपर्यंत आहे. विशेष म्हणजे या कक्षामार्फत गोरगरीब रुग्णांवर मुंबईचे लिलावती हॉस्पिटल, पुण्याचे रुबी हॉस्पिटल, बॉँबे हॉस्पिटल यांसारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार केलेजात आहेत.

मुख्यमंत्री फंडातून यापूर्वीही आर्थिक सहाय केले जात होते; परंतु ती रक्कम कधीही ५० हजारांच्या पुढे जात नव्हती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयात मार्च महिन्यात स्थापन केलेल्या कक्षामार्फत तब्बल ४२ लाख रुपयांपर्यंत मदत केली आहे. अर्थात, हा कक्ष मार्च महिन्यामध्ये स्थापन झाला. राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये समावेश नसलेल्या किंवा योजनेमध्ये समावेश असूनही जास्त खर्च लागणाऱ्या आणि एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून मदत दिली जात आहे. 'राजीव गांधी'मध्ये संपूर्ण कुटुंबाला एका वर्षासाठी दीड लाखांपर्यंतचे उपचार होऊ शकतात. या प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांपर्यंत खर्च मंजूर आहे, मात्र योजनेमध्ये विविध रक्ताचे कर्करोग, बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट, कॉक्लिअर ट्रीटमेंट आदींसह कित्येक आजार व उपचारांचा योजनेमध्ये समावेश होत नाही. त्यामुळेच अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री कक्षातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी सर्व कागदपत्रांसह मंत्रालयातील सातव्या मजल्यावर (जुनी इमारत), कक्ष क्रमांक ७१३, येथे प्रत्यक्ष यावे; शहानिशा करून थेट रुग्णालयात निधी जमा होतो, असे कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी 'मटा'ला सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाकडून केवळ चार-पाच महिन्यांमध्ये सुमारे ९०० रुग्णांवरील विविध उपचारांसाठी ३० कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला असून, यामध्ये मराठवाडा-विदर्भातील ५०० लाभार्थी रुग्ण आहेत.

१९९६ ते २०१५पर्यंतच्या अनुभवानुसार २५ ते ५० हजारांपेक्षा जास्त मुख्यमंत्री निधी कधीही मिळाला नाही, मात्र आता दोन ते तीन लाखापर्यंत निधी सहज मिळत असून, त्याअंतर्गत आमच्या रुग्णालयात आतापर्यंत किमान १० ते १५ रुग्णांवर उपचार झाले आहेत.- डॉ. उन्मेश टाकळकर,

मुख्य संचालक, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल.

- ओमप्रकाश शेटे, प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष

आवश्यक बाबी

रेशन कार्ड, आधार कार्ड

उत्पनाचा दाखला

उपचार होणाऱ्या हॉस्पिटलचे एस्टिमेट

एस्टिमेटवर जिल्हा शल्यचिकित्सकांची सही-शिक्का

उपचार होणाऱ्या हॉस्पिटलचे बँक स्टेटस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमाडचा पीएसआय अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुसरे लग्न झाल्यानंतर पहिल्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी करमाड स्टेशनचे पीएसआय अविनाश तांगड यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. तांगड यांनी स्थानिक नागरिकाच्या मदतीने जंगलात पुरलेल्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. त्याला कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अविनाश तांगड (रा. अहमदनगर) हा मार्च २०१५पासून करमाड पोलिस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयात असताना त्यांचे अॅसेन्था पिल्लईसोबत प्रेमविवाह केला. २०१२मध्ये एमपीएससी परीक्षा उतीर्ण होऊन तांगड पीएसआय झाले. नियुक्ती भामरागड येथे नक्षल सेलमध्ये झाल्याने त्यांनी अॅसेन्थाला बोलावून घेतले होते. नंतर कुटुंबीयांच्या आग्रहास्तव त्यांनी दुसरा विवाह केला होता. दोन्ही पत्नींना सांभाळणे अवघड झाल्याने; तसेच नातेवाईकात बदनामी होईल म्हणून त्याने अॅसेन्थाचा गळा आवळून खून केला. एका स्थानिक नागरिकाच्या मदतीने त्याने तिचा मृतदेह अहेरीच्या जंगलात पुरला होता.

असा झाला प्रकार उघड

अॅसेन्था बेपत्ता झाल्याने तिच्या बहिणीने तिचा शोध सुरू केला. तांगड यांना विचारल्यानंतर त्यांनी टाळाटाळ केली. करमाड पोलिस स्टेशनमध्ये तिने अॅसेन्था बेपत्ता असल्याची नोंद केली. यावेळी पोलिसांनी तिचे शेवटचे मोबाइल लोकेशन अहेरी येथे असल्याचे सांगितले. याप्रकरणी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना संशय आला. त्यांनी अहेरीचे उपाधीक्षक राहुल धुमाळ यांच्याकडे चौकशी सोपवली. काही कर्मचाऱ्यांनी, तांगड याने काही महिन्यांपूर्वी रुग्णवाहिकेची मागणी केल्याचे सांगितले. त्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तांगड यांच्यासोबत अॅसेन्थाचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर गडचिरोली पोलिसांनी त्यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओल नसल्याने पेरणी थांबली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

परतीच्या पावसाने मारलेली दडी रब्बी पिकांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. सर्वात मोठे क्षेत्र असलेल्या रब्बी ज्वारीची विभागात केवळ ५० टक्के पेरणी झाली आहे. जमिनीत ओल नसल्यामुळे पेरण्या ठप्प झाल्या आहेत. या परिस्थितीत रब्बी पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची भीती आहे; तसेच चारा व पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे उत्पादनात ७० टक्के घट झाली. कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे उत्पादन लक्षणीय घटले. पावसाची शक्यता नसताना १७ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस झाला. सतत चार दिवस पाऊस झाल्याने रब्बीच्या पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले होते. या पावसाचा खरीप पिकांना काहीच फायदा झाला नाही; मात्र संरक्षित सिंचनासाठी असलेले सिमेंट बंधारे व विहिरींची पाणी पातळी वाढली. रब्बीची पेरणी करण्यासाठी योग्य वातावरण असल्याचे गृहित धरून शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा या प्रमुख पिकांची पेरणी केली. ही पिके चांगली तरारून आली. सद्यस्थितीत जमिनीत ओलावा नसल्याने पिके सुकली आहेत; तसेच निम्मी पेरणी झाली नाही. परतीचा पाऊस झाल्यास रब्बीची पेरणी पूर्ण होणार आहे, पण पाऊस नसल्याने रब्बी हंगामाचे लक्षणीय नुकसान होणार आहे. एकूण मराठवाड्यात १६ लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती. सध्या केवळ ८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढल्यास मुबलक चारा उपलब्ध होतो. ज्वारीची फक्त ५० टक्के पेरणी झाल्यामुळे चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे; तसेच पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.

बागायती क्षेत्रात घट

जिल्ह्याचे एकूण बागायती क्षेत्र दोन लाख सहा हजार हेक्टर आहे. पुरेसा पाऊस नसल्याने शेततळी, बंधारे व विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी टंचाईमुळे बागायती क्षेत्रात घट होणार आहे. एकूण अर्थकारणावर परिणाम जाणवणार आहे.

राज्याच्या इतर जिल्ह्यांत परतीचा पाऊस सुरू असताना मराठवाड्यात पाऊस नाही. किमान एक जोरदार पाऊस झाल्यास रब्बीच्या पिकांना आधार मिळाला असता. गहू व हरभरा या पिकांचे मोठे नुकसान होईल.

- पी. डी. लोणारे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा

$
0
0

धार्मिक स्थळे हटविताना अडथळा आणल्याचे प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज महानगरातील बजाजनगर भागात महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या भूखंडावर उभारलेली धार्मिक स्थळे हटविताना तहसीलदार रमेश मुनलोड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ यांच्यासह ४० जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी तहसीलदार मुनलोड यांनी दोन दिवसांपूर्वी तक्रार दिली होती.

यावेळी तहसीलदार मुनलोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. त्यासाठी एक जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकीत वाळूज एमआयडीसी क्षेत्रातील ६ धार्मिक स्थळांची माहिती समोर आली. ही स्थळे हटविण्यासाठी २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१५ अशी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास बजाजनगर वसाहतीमधील धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. ४ धार्मिक स्थळे हटविल्यानंतर संत नरहरी महादेव मंदिर हटविताना दुपारी तीनच्या सुमारास खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ आदींसह ३० ते ४० जणांनी कारवाईला विरोध केला. शिवराळ भाषेचा वापर केला. तोंडावर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत वरिष्ठ कार्यालयास माहिती पाठविल्यानंतर दोन दिवसांनंतर तहसीलदार मुनोलड यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीची चौकशी केल्यानंतर खासदार खैरे, आमदार शिरसार यांच्यासह इतर ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’ कार्यालयात मराठीची पाटी कोरीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

राज्याचे परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते हे मायबोलीचे (मराठी भाषेचे) कट्टर पुरस्कर्ते असले तरीही त्यांच्या अखत्यारीतील आरटीओ (परिवहन कार्यालय) कार्यालयात मराठीची पाटी कोरीच आहे. या कार्यालयातील बहुतांश कारभार हा इंग्रजी भाषेतूनच चालतो. या कार्यालयात विदेशी इंग्रजी भाषेचेच अस्तित्व आहे.

राज्यातील आरटीओ कार्यालयात वाहनचालक व वाहनधारकांसाठी आवश्यक असणारी आवेदन पत्रे (फॉर्मस) केवळ इंग्रजी भाषेतूनच आहेत.

मराठी मायबोलीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन खात्याची जबाबदारी आल्यानंतर परिवहन खात्यातील (आरटीओ कार्यालयातील) परदेशी इंग्रजी भाषेचे अतिक्रमण दूर होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती.

यापूर्वी मंत्रालयातील मंत्री व सचिवांच्या नावाचे फलक मराठीतून लावण्यासाठी रावते यांनी वेळोवेळी आग्रह धरला होता. त्यामुळेच त्यांच्याकडे परिवहन खात्याचा कारभार आल्यानंतर आरटीओ कार्यालयातील सर्व फॉर्मस् मराठीतून उपलब्ध होतील, अशी वाहनचालक व वाहनधारक यांची समजूत होती.

सध्या आरटीओ कार्यालयातील बहुतांश फॉर्मस् केवळ इंग्रजीतूनच आहेत. त्यामुळे हे फॉर्मस् भरण्यासाठी गरजूंना आरटीओ कार्यालयातील दलालांचा (एजंट) आश्रय घ्यावा लागतो व यासाठी मेहनताना म्हणून त्यांना भली मोठी रक्कम मोजावी लागते.

त्यामुळे एकतर आरटीओ कार्यालयातून मराठी भाषा सक्तीची करण्यात यावी अन्यथा बँकांतील स्लीपप्रमाणे आरटीओ कार्यालयातील सर्व फॉर्क्सस् मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून उपलब्ध करून द्यावीत, अशी वाहनचालकासह वाहनधारकांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीवरून दोन गटांत हाणामारी

$
0
0

नांदेडः गोपाळचावडी येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन पॅनल प्रमुखाच्या गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाचे जवळपास १८ जण जखमी झाले. याप्रकरणी ५२ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गावात तणावपूर्ण स्थिती असून आतापर्यंत १३ जणांना अटक केली.

गोपाळचावडी येथे ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूकीसाठी पाच मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास विद्यमान सरपंच साहेबराव सेलुकर व संजय शिंदे, या दोन पॅनलप्रमुखांच्या समर्थकात प्रचंड काठ्यालाठ्या, तलवारी, कत्ती व दगडफेक करण्यात आली. याप्रकरणामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या घटनेने नागरीकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. साहेबराव सेलुकर यांनी फिर्याद दिली आहे. तर त्यांच्याविरूद्ध संजय बालाजी शिंदे यांनी सतरा जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. गावात तणावपूर्ण परिस्थीती असून गावात पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक बनकर, ग्रामीणचे गजानन सैदाने यांनी भेट देऊन प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘साखर कारखान्यांनी पूरक जोड धंदे सुरू करावेत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

साखर कारखान्यांनी कारखान्याच्या भरभराटीबरोबरच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी साखर कारखान्याला पूरक असे उपपदार्थ निर्मितीचे जोडधंदे सुरू करावेत. त्याशिवाय शेतकऱ्यांनाही जोडधंद्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रांजणी (ता. कळंब) येथे एन साई (नॅचरल शुगर्स) साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सुरुवातीप्रसंगी बोलताना केले.

कारखान्याचे चेअरमन बी. बी. ठोंबरे, आमदार संगीता ठोंबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

रांजणीकरांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी एन साईच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरओ प्लॅन्टचे यावेळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बागडे म्हणाले, 'साखर उद्योगातील खासगी साखर कारखान्याच्या शिरकावामुळे सहकारी साखर कारखाने अधिक जोमाने चालविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. जे साखर कारखाने व्यावसायिक पद्धतीने चालविले जात नाहीत, त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, बाजारपेठेची गरज आणि शेतकऱ्यांची निकड ओळखून त्याप्रमाणे कारखानदारीत बदल करणाऱ्या आणि केवळ साखरेवर अवलंबून न राहता उपपदार्थ निर्मितीवर भर देणाऱ्या कारखान्यांनी आर्थिक अडचणींवर मात केली आहे. नॅचरल शुगर्स (एनसाई) हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.' शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासारखा पूरक व्यवासय उपलब्ध करून देण्यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याच वेळी एन साई साखर कारखान्याच्या चालू वर्षाच्या गळीत हंगामाची सुरुवात बागडे यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपंचायतींमध्ये धोंडेंना धक्क‌ा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर या तीन नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. वडवणीममध्ये भाजपला विजय मिळविता आला. आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन नगरपालिका जिंकत माजी मंत्री सुरेश धस यांनी विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना मात दिली आहे.

सोमवारी सकाळी या चारही नगरपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी झाली. आष्टी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ उमेदवार निवडून आले तर भाजपचे २ उमेदवार निवडून आले एका अपक्षने बाजी मारली.

शिरुर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, भाजपचे ५ तर अपक्ष २ जण विजयी झाले. पाटोदा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १० उमेदवार विजयी झाले तर भाजपचे ३ तर तीन अपक्ष ही निवडून आले आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे.

वडवणी नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होती. यात भाजपने बाजी मारली असून ही एकमेव नगरपालिका भाजपकडे आली आहे. भाजपने नऊ जागांवर विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष आणि शिवसेना यांना प्रत्येकी एक जागा मिळाली.

'अभिमान बाळगू नये'

माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. विजय राष्ट्रवादीचा आहे. मात्र, पराभव पंकजा मुंडे यांचा असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. त्याबद्दल त्यांनी हा माझाच पराभव आहे कारण मी जिल्ह्याचे नेतृत्व करते. मात्र, त्यांनी अभिमान बाळगू नये कारण या विजयात त्यांचा वाटा नसून स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा वाटा असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडमधील पथदिवे बंद

$
0
0

कन्नड : दिवाळीच्या तोंडावर कन्नड शहरात मात्र काळोख पसरला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने शहरवासीयांना रात्रीचा त्रास सहन करावा लागतो आहे. चोरटीच्या घटना वाढल्या आहेत.

शहरातील बंद असलेले पथदिवे व जागोजागी साचलेला ओला व सुका कचरा हटविण्याची मागणी शिवसेनेचा वतीने नगर परिषदेकडे करण्यात आली आहे. शहरातील हिवरखेडा रोड, खांडसरी परिसर, जागृत हनुमान मंदिर, कॉलेज रोड, माळीवाडा, आठवडी बाजार परिसर, भिळ पलटण टिळक नगर, शनी मंदिर परिसर, वडार वाडा या भागातील बहुतांश पथदिवे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. कन्नड शहराला पिण्यासाठी अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून, फिल्टर प्लॅटमधील ब्लिचिंग पावडरचा उपयोग केला जात नाही. शहरात जागोजागी कोपऱ्यामध्ये कचरा पडलेला असतो. सध्या मलेरियाची साथ सुरू असताना गटाराच्या साफसफाईकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी शिवसेनच्या वतीने शहराध्यक्ष राम पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यधिकारी संतोष आगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा सुमारे दीड कोटी रुपयांचा मोबदला न दिल्याने जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय व भूसंपादन अधिकारी उबाळे यांची खुर्ची सोमवारी कोर्टाच्या आदेशाने जप्त करण्यात आली.

वैजापूरच्या बोरदहेगाव प्रकल्पासाठी १९९० मध्ये गोळेगावच्या दिडशे ग्रामस्थांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले. १९९७ मध्ये अॅवॉर्ड करून गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाने जमीन संपादन केली आहे. त्याच्या वाढीव मोबदल्याबद्दल न्यायालयाच्या आदेशानुसार नांदूर मधमेश्वर कालवा कार्यकारी अभियंत्यांची गाडी, खुर्ची, तसेच कम्प्युटर न्यायालयाच्या आदेशाने यापूर्वीच जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर १९ मे रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांच्या मोटारीला न्यायालयाच्या आदेशानंतर सील लावले होते. त्यावेळी उर्वर‌ित रक्कम तीन महिन्यात देऊ असे प्रशासनाने लेखी दिले होते. मात्र या घटनेला सहा महिने उलटूनही पैसे मिळाले नाहीत. वैजापूर न्यायालयाचे बेलिफ जे. एस. वाघ हे जप्तीचे वॉरंट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय कार्यालयात हजर नसल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. ‌बेलिफने जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांचे संगणक, जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणाविरुद्ध संचालकांचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात टाकण्यात आलेले विनापरवानी शेड काढण्याच्या मागणीसाठी बाजार समिती संचालकांनी सोमवारी उपोषण केले. परिसरात तीन ठिकाणी शेड बांधून दुकाने थाटण्यात आली आहेत.

बाजार समितीचे संचालक गणेश शिंदे, सुमनबाई बनकर, आबासाहेब तायडे, कृष्णा बोरसे यांनी उपोषण सुरू केले आहे. या संचालकांनी ८ ऑगस्ट व ३१ ऑगस्ट रोजी सहायक निबंधकांना या अतिक्रमणाबद्दल पत्र दिले होते. याशिवाय २७ ऑगस्टच्या सभेत अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा घडवली होती. संचालक गणेश शिंदे यांनी तीन ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचा विषय उपस्थित करून ठराव संमत करून घेतला. परंतु सभापती व सचिवांनी याकडे दुर्लक्ष केले व कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे चार संचालकांनी बाजार समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केला आहे. याबाबत सभापती राजकुमार गंगवाल यांनी अतिक्रमणे काढण्यात येती असे सांगितले. या प्रकरणी सोमवारी सायंकाळपर्यंत तोडगा निघाला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images