Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सोयगावमध्ये युतीचा झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

नव्याने स्थापन झालेल्या सोयगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. भाजपचे ८, शिवसेनेचे ६ व काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पानीपत झाले असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ काळे यांना स्वतःच्या गावात एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही.

सोयगाव ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर रविवारी पहिली निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मतदारांनी भरघोस मतदान केले. सोयगाव येथील बचत भवनमध्ये सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार नरसिंग सोनवणे यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. सकाळी साडेअकरापर्यंत निवडणुकीचा कौल स्पष्ट झाला. सोयगाव नगरपंचायत ताब्यात ठेवण्याकरिता शिवसेना-भाजप युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. तालुका व जिल्ह्याच्या नेत्यांनी येथे आठ दिवसांपासून ठाण मांडले होते.

विजयी व पराभूत उमेदवार

वॉर्ड क्रमांक १ भागवत गायकवाड (शिवसेना, विजयी) रमेश गव्हांडे (पराभूत, काँग्रेस), वार्ड क्रमांक २ लतीफ शहा (काँगेस विजयी) प्रमोद पाटील (पराभूत राष्ट्रवादी काँग्रेस), वार्ड क्रमांक ३ वर्षा मोरे (भाजप विजयी) अशरफबी तडवी (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक ४ वंदनाबाई बनकर (भाजप विजयी) शोभाबाई पगारे (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक ५ योगेश मानकर (भाजप विजयी), नारायण घनघाव (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक ६ कैलास काळे (भाजप विजयी) अक्षय काळे (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक ७ मनीषा चौधरी (शिवसेना विजयी), उज्ज्वला चौधरी (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक ८ युवराज आगे (भाजप विजयी) राजू दुतोंडे (पराभूत राष्ट्रवादी काँग्रेस), वार्ड क्रमांक ९ मंगला राऊत (काँग्रेस विजयी) वैशाली मिसाळ (पराभूत राष्ट्रवादी काँग्रेस) वार्ड क्रमांक १० अनिता तडवी (भाजप विजयी), लताबाई सपकाळ (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक ११ प्रतिभा बोडखे (शिवसेना विजयी), अनिता वाघ (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक १२ छाया काटोले (शिवसेना विजयी), बबलू सोहनी (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक १३ राजू तिडके (काँग्रेस टॉसने विजयी), वार्ड क्रमांक १४ योगेश पाटील (शिवसेना विजयी), वसंत काळे (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक १५ सुलताना देशमुख (भाजप विजयी), बीबी देशमुख (पराभूत काँग्रेस) वार्ड क्रमांक १६ भगवान इंगळे (शिवसेना विजयी), प्रकाश सोनवणे (पराभूत काँग्रेस), वार्ड क्रमांक १७ शोभाबाई मोरे (भाजप विजयी) सुरेखाबाई काळे (पराभूत काँग्रेस)

काँग्रेसचे नशीब

वार्ड क्रमांक १३ मध्ये भाजप उमेदवार मंगेश सोहनी व काँग्रेसचे उमेदवार राजू तिडके यांना समान ५३ मते मिळाली. त्यामुळे टॉस करण्यात आला. त्यात नशिबाचा कौल मिळून काँग्रेसचे तिडके विजयी ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चीनच्या उपराष्ट्रपतींच्या सुरक्षिततेसाठी तगडा बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चीनचे उपराष्ट्रपती ली युवानचो मंगळवारी दोन दिवसाच्या दौऱ्यावर शहरात येत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. गुप्तचर यंत्रणा, बाराशे पोलिस अधिकारी कर्मचारी तसेच खासगी यंत्रणेचा या बंदोबस्तात समावेश करण्यात आला आहे.

उपराष्ट्रपती ली युवानचो यांचे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता विमानाने चिकलठाणा विमानतळावर आगमन होणार आहे. रात्री हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे त्यांचा मुक्काम आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता अजिंठा लेणी पाहण्यासाठी ते जाणार आहेत. दुपारी तीन वाजता त्यांचे आगमन झाल्यानंतर महापौर त्रिंबक तुपे व मनपा आयुक्त त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यानं‌तर ते विमानाने कोलकत्ताकडे रवाना होतील. त्यांच्या या दौऱ्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विमानतळ ते रामा इंटरनॅशनल दरम्यान तसेच अजिंठा लेणी परिसरात हा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये २४ पोलिस निरीक्षक, ५६ सहायक पोलिस निरीक्षक - उपनिरीक्षक तसेच ११०० कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, गुप्तचर यंत्रणेसोबत उपराष्ट्रपतीच्या खासगी सुरक्षा यंत्रणेचा देखील बंदोबस्तामध्ये समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींच्या वसतिगृह प्रमुखाविरूद्ध गुन्हा

$
0
0

औरंगाबाद : पाण्याच्या टँकरची संख्या जास्त दाखवत मुलींच्या वसतिगृहाच्या प्रमुखपदावरील महिलेने २८ हजार २०० रुपयाचा अपहार केला आहे. ज्युबिली पार्क येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात हा प्रकार उघड झाला असून, सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलींच्या वसतिगृहात पाण्याची कमतरता भासते म्हणून टँकर मागवण्यात आले होते. वसतिगृहाच्या प्रमुख व गृहपाल एल. डी. निकाळजे यांनी या टँकरचा हिशेब ठेवताना मुलींच्या सह्यांसह याची रजिस्टरमध्ये बनावट नोंद केली. प्रकल्प अधिकारी सुनील बोरसे यांनी रजिस्टरची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. बोरसे यांच्या तक्रारीवरून निकाळजे यांच्याविरुद्ध अपहार, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील एकाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रतापनगर परिसरात रविवारी (एक नोव्हेंबर) रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकाला रविवारी अटक करण्यात आली. त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, बुधवारपर्यंत (४ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखलेपूरकर यांनी दिले.

प्रतापनगर परिसरात काहीजण दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिस ठाण्याला मिळाली. त्यावरून पोलिस निरीक्षक गौतम फसले यांनी घटनास्थळी धाव घेतली असता चार-पाचजण दरोड्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. त्यापैकी आरोपी संतोष तारासिंग कल्याणी (रा. छोटा मुरलीधरनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दांडा, चाकू, टॉमी, कोयता असे साहित्य जप्त करण्यात आले. इतर आरोपी पसार झाले. अटक केलेल्या आरोपीला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

जुन्या वादातून विनयभंग

जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी दुपारी संसारनगर भागात घडला. या प्रकरणी आरोपी अश्फाक व दोन अनोळखी तरुणाविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीस्वार जखमी

अॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बादशाहखान हिमायूखान हा तरुण जखमी झाला. ८ सप्टेंबर रोजी चेलीपुरा भागात हा अपघात घडला होता. या प्रकरणी शनिवारी रिक्षाचालक दीपक रोकडे (रा. लेबर कॉलनी) याच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी पळविली

किरण गणेशराव देशमुख (वय २९ रा. एन १२) या तरुणाची दुचाकी चोरट्यांनी गॅरेजसमोरून लंपास केली. शुक्रवारी हा सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा

औरंगाबाद : विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा आकाश कांबळे या विवाहितेने २० मे २०१५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पती आकाश कांबळे, मनोज कांबळे व अन्य एका महिलेने (सर्व रा. नाईकवाडा, मोतीकारंजा) केलेल्या छळामुळेच वर्षाने आत्महत्या केली, अशी तक्रार वर्षा यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत केली. त्यावरुन गुन्हा दाखल झाल्याचे क्रांतिचौक पोलिसांनी सांगितले.

कुख्यात गुंडाची तरुणाला मारहाण

औरंगाबाद : मोबाइल न दिल्याच्या कारणावरून कुख्यात गुंडाने तरुणाला मारहाण केली. शनिवारी सायंकाळी जयभवानीनगरात हा प्रकार घडला असून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रामप्रसाद कांबळे (वय १९ रा. जयभवानीनगर) हा तरुण दुचाकीवर गल्ली क्रमांक ११ येथून घराकडे जात होता. यावेळी त्याला गुंड शुभम जाट व एका साथीदाराने अडविले. योगेशला मोबाइलची मागणी करीत शुभमने त्याचे खिसे तपासणे सुरू केले. योगेशने विरोध केला असता शुभमने त्याला दगडाने मारहाण केली. यामध्ये डोक्यात व पाठीला दगडाचा वार लागल्याने योगेश जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरून शुभमविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेजस्विनीच्या पालकांची आयुक्ताकडे धाव

$
0
0

औरंगाबादः नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या तेजस्विनी डोभाळ मृत्युप्रकरणात तिच्या आईने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची सोमवारी भेट घेतली. या प्रकरणी शहर पोलिसांनी चौकशी करून न्याय देण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली.

इटखेडा परिसरातील रहिवासी असलेल्या तेजस्विनी डोभाळ (वय १७) या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मंगळवारी सकाळी नेवासा येथील वसतिगृहात आत्महत्या केली होती. तिची आई प्रिती डोभाळ यांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी कॉलेजचे प्राचार्य अशोक गाढे व रेक्टर कुंदा शिंदे यांच्यावर नेवासा पोलिस ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी प्रिती डोभाळ यांनी पोलिस आयुक्तांना एक निवेदन सादर केले. यामध्ये नेवासा पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिच्या मृत्युप्रकरणी शहर पोलिसांनीही तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धारदार शस्त्राने युवकावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेगमपुरा परिसरातील मकाईगेट घाटी येथे राहणाऱ्या एका १५ वर्षीय युवकाचे अपहरणाचा प्रयत्न झाला तसेच त्यावर हल्लेखोरांनी दोनवेळा धारदार शस्त्राने हल्ला केला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नसून हल्ल्यामागील कारणही स्पष्ट होऊ शकले नाही.

शोएब लियाखत मिर्झा ( वय १५, मकाई गेट) असे त्या तरुणाचे नाव असून तो विद्यापीठ गेट जवळील एका शाळेत १० वीच्या वर्गात शिकतो. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तो दुचाकीने शाळेकडे जात असतानाच बेगमपुरा येथील मेराज टी हाऊस समोर तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन तरुणांनी त्यास अडविले व विद्यापीठ गेटजवळ सोडण्यास सांगितले. आरोपींनी शोएबलामध्ये बसवित दुचाकी विद्यापीठच्या दिशेने नेली. शाळा आल्याने शोएबने दुचाकी थांबविण्यास सांगितले, मात्र आरोपींनी त्यास धमकावित भावसिंगपुऱ्यातील निर्जनस्थळी नेले. आरोपीपैकी एकाने मद्य प्राशन केले व शोएबला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी दुसऱ्या आरोपीने फोन करुन अन्य एकास बोलवून घेतले. तिघे गप्पा मारत असतानाच संधी साधत शोएबने आपली दुचाकी घेत पळ काढण्यात यशस्वी झाला. आरोपींनी काही अंतरापर्यंत पाठलाग केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घरी आल्यावर शोएबने हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी पोलिस ठाणे गाठत घटनास्थळाची पाहणी केली, मात्र कुणीही आढळून आले नव्हते.

दरम्यान, दुसऱ्याच दिवशी (२८ ऑक्टोबर) बिस्किट पुडा आणण्यासाठी गेलेल्या शोएबवर दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींनी चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात तो बचावला आणि हल्ल्यात शर्ट फाटला. तर तिसऱ्या दिवशी (२९ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजेच्या सुमारास शोएब हा आपल्या घरासमोर दात घासत उभा होता. त्याचवेळी रुमालाने तोंड झाकलेल्या एक अनोळखी व्यक्तीने त्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत पसार झाला. त्यात शोएब यांच्या हातावर गंभीर दुखापत झाली.

शोएबच्या पालकांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नसून हल्ल्यामागील कारणही स्पष्ट होऊ शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेस पुण्यातून अटक

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अंबिकानगर येथील माजी सैनिकाचा खून करून पसार झालेल्या महिलेला दोन महिन्यांनंतर पुण्यातून पकडण्यात मुकुंदवाडी पोलिसांना यश आले. नऊ वर्षांपासून ही महिला माजी सैनिकासोबत विवाह न करता राहत होती. पेन्शन नावावर करून देत नसल्याने ३ सप्टेंबर रोजी संपत खंडागळे याचा तिने खून केला होता, असा आरोप आहे.

अंबिकानगर, गल्ली क्रमांक ४ येथील माजी स‌ैनिक संपत खंडागळे याचा खून झाल्याचे ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आले होते. घरातून दुर्गंधी सुटल्यामुळे हा प्रकार लक्षात आला होता. संपत खंडागळे याच्यासोबत राहत असलेली शकुंतला आनंदराव मुधोळकर उर्फ कमल राजपूत (वय ४५) ही महिला तेव्हापासून पसार झाली होती. पोलिस गेल्या दोन महिन्यांपासून तिचा शोध घेत होते. दरम्यान, पुणे शहरातील फुगेवाडी, दापोडी येथे शकुंतला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीवरून पीएसआय ताहेर पटेल, वामन गावंडे, महिला शिपाई आर.आर. गोहाडे व अवचर यांनी पुणे गाठून शकुंतलाला ताब्यात घेतले. खंडागळे यांना मिळणारी पेन्शन नावावर करून देण्याची मागणी सातत्याने शकुंतला करीत होती. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. ३ सप्टेंबर रोजी रात्री झोपेत असलेल्या खंडागळे यांचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून शकुंतलाने त्यांच्या डोक्यावर तसेच गुप्तांगावर वार करीत बेदम

मारहाण केली होती. यात त्यांचा मृत्यू झाला. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी शकुंतलाला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडी बाजारातून मोबाइलचोरी सुरूच

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाफरगेटच्या आठवडी बाजारातून मोबाइल पळविण्याचे सत्र या रविवारी देखील कायम राहिले. चोरट्यांनी पाच मोबाइल या रविवारी लंपास केले. दर रविवारी या घटना घडत असताना देखील पोलिसांचा निष्काळजीपणा कायम असल्याने चोरट्यांचे फावत आहे.

जाफरगेट येथे एकनाथ नंदलाल मानधने (वय ५३ रा. तिलकनगर) हे खरेदीसाठी रविवारी सकाळी अकरा वाजता गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांचा ४० हजारांचा मोबाइल लंपास केला. याशिवाय चोरट्यांनी अभय गुजर (रा. टिळकनगर), सय्यद रबानी सय्यद जिलानी, कैलास राठोड (रा. संजयनगर) व श्रीकांत उपाध्याय (रा. न्यू बालाजीनगर) यांचे देखील मोबाइल लंपास केले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गर्दीमध्ये भाजी खरेदी करताना हे मोबाइल संशयित बुरखाधारी महिलांनी लंपास केल्याचा संशय आहे.

जाधववाडीतल्या चोऱ्या थांबल्या

मोबाइल चोरांनी जाधववाडी भाजीमंडईला देखील लक्ष्य केले होते. या ठिकाणी देखील मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या, मात्र सिडको पोलिसांनी बंदोबस्त वाढविल्याने मोबाइल चोरांनी जाफरगेटच्या आठवडी बाजाराकडे मोर्चा वळवला आहे.

तीन आठवड्यांत चौदा मोबाइल लंपास

गेल्या तीन आठवड्यांत जाफरगेट येथील बाजारातून चोरट्यांनी चौदा मोबाइल लंपास केले आहेत. आठवडी बाजारातून मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना क्रांतिचौक पोलिस ठाणे तसेच गुन्हेशाखा याकडे काणाडोळा करताना दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुद्रेची तिजोरी खुली; ५० कोटींचे कर्जवाटप

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com

शहरवासीयांसाठी मुद्रा बॅँकेने आपल्या गंगाजळीची तिजोरी खुली केली आहे. विविध बँकांतर्फे तब्बल ११ हजार प्रस्ताव आले आहेत. आतापर्यंत ५० कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात. १६ बँकांच्या सुमारे ४०१ शाखांमधून हे कर्जवाटप होणार होणार आहे.

मुद्रा बँकेच्या माध्यमातून शिशू, कुमार तरुण या तीन गटांसाठी कर्ज देण्यात येते. या योजनेची घोषणा पंतप्रधानांनी एप्रिल महिन्यात केली होती. शासनाच्या विविध योजनेंतर्गत बेरोजगारांना रोजगारासाठी जिल्हा उद्योग केंद्र, विविध महामंडळे, बँकांमधून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, हे कर्ज मिळवण्यासाठी खूप अडचणी येतात. कर्ज मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे मुद्रा बँक अशा तरुणांना आधार ठरत आहे. आगामी काळात मुद्रा बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होवू शकते.

मुद्रा बँक योजनेत तीन प्रकारचे कर्ज मिळते. त्यानुसार शिशू गटासाठी ५० हजार, किशोर योजनेंतर्गत ५० हजार ते लाखांपर्यंत तर, तरुण योजनेंतर्गत पाच ते दहा लाखांपर्यंत कर्ज मिळते.

- विजयकुमार कांबळे, झोनल ऑफिसर, महाराष्ट्र बॅँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत

$
0
0

वाहतूक शाखेने नऊ महिन्यांत केला दोन कोटी दंड वसूल

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या तब्बल १ लाख ३२ हजार जणांविरोधात गेल्या नऊ महिन्यांत कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला, मात्र त्यातील एकही पैसा वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मिळत नाही. गोळा केलेली दंडाची सर्व रक्कम त्यांना शासनाच्या तिजोरीत जमा करावी लागते.

वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत म्हणून वाहतूक शाळा जनजागृतीचे उपक्रम राबविते. तरीही सर्व वाहनधारक शिस्तीत वाहने चालवतीलच असे नाही. रॉँग साइड जाणे, वाहतूक परवाना नसणे, नो पार्किंग, फ्रँट सीट प्रवासी बसविणे, नंबर प्लेट नसणे किंवा फॅन्सी पद्धतीची नंबर प्लेट लावणे यांसह वाहतुकीचे अन्य नियम तोडणाऱ्या १ लाख ३२ हजार वाहनचालकांविरुद्ध सप्टेंबर २०१५अखेरपर्यंत कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ कोटी ९८ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला, परंतु ही रक्कम पोलिसांना वाहतूक व्यवस्थेसाठी खर्च करता येत नाही. नियमाप्रमाणे ही रक्कम शासकीय तिजोरीत जमा करावी लागते.

जबाबदारी पालिकेची

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी वाहतूक शाखेकडे आहे. वाहन, वॉकीटॉकी, बॅरिकेट्स, जॅमर आदी साधने गृह विभागाकडून पोलिसांना पुरविण्यात येतात, पण वाहतूक व्यवस्थेसाठी सर्व पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पार्किंग व्यवस्था, लेन मार्किंग, झेब्रा कॉसिंग, दिशादर्शक फलक लावणे, पदचारी मार्ग, सिग्नल उभारणी यांसह वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरविणे, ही महापालिकेची जबाबदारी आहे. शहरात ३७ सिग्नल आहेत, पण त्यापैकी केवळ १७ सिग्नल योग्य प्रकारे सुरू आहेत. बजरंग चौक, ज्युबिली पार्क, मिल कॉर्नरसह अन्य सिग्नल बंद अवस्थेते आहे. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संग्रामनगर उड्डाणपुलजवळ (बीडबायपास), एमआयटी कॉलेज, देवळाई चौक, सेव्हन हिल्स, क्रांतिचौक, हर्सूल रोडवर दोन ठिकाणी अादी गजबजलेल्या चौकांत सिग्नल उभारण्याची चर्चा गेल्या एका वर्षापासून सुरू असली तरी, त्यासंबंधी ठोस कारवाई अद्याप नाही.

पोलिस आयुक्तांनी त्यांच्या विशेष अधिकारात डिझेल रिक्षा हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. या रिक्षा चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात येत होते. रिक्षा चालकांनी वाहतूक नियम पाळले तर, अशी कारवाई होणार नाही. दोन महिन्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. प्रवाशांच्या तक्रारी आणि इतर सूचना आल्यास निश्चितच याबाबत बदल करण्याचा अधिकारी पोलिस आयुक्तांना आहे. - सर्जेराव शेळके, प्रादेशिक

परिवहन अधिकारी, औरंगाबाद

डिझेल रिक्षांना बंदी घातल्याचा निश्चित फायदा होईल. अशी बंदी अन्य कोणत्या शहरात लावण्यात आली आहे, याबाबत मला माहिती नाही, मात्र शहर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे.- अमितेश कुमार,

पोलिस आयुक्त, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केंद्राकडून शिक्षणाचे संघीकरण’

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबादः विशिष्ट अजेंडा घेऊन केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपले रंग दाखविणे सुरू केले आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात केंद्र सरकारकडून शिक्षणाचे संघीकरण केले जात आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना केला.

केंद्राची अर्थ समिती मराठवाडा दौऱ्यावर होती. या समितीचे सदस्य असलेल्या दिग्विजयसिंह यांनी 'मटा'शी संवाद साधला. ते म्हणाले,'देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केला आहे. नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न होत आहे. विज्ञानाला नवीन आयाम देण्याचे प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहेत. विमानाचा शोध कधी लागला? यावरून होणारी चर्चा विज्ञानाला आव्हान देणारी आहे. इतिहास आणि विज्ञान बदलण्याची ही प्रवृत्ती शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत घातक आहे. शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याची टीका केंद्रावर होत आहे, पण माझे म्हणणे आहे, की हे भगवेकरण नसून संघीकरण आहे. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचा अजेंडा केंद्र सरकार राबवित आहे.'वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करत दिग्गीराजा म्हणाले,'देशात गेल्या वर्षभरात असहिष्णुता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे देशाचे वातावरण बिघडत चालले आहे. साहित्यिक, कलाकार, वैज्ञानिक यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. अनेकांनी त्यांनी मिळालेले पुरस्कार परत केले आहेत. 'विविधेतून एकता' अशी ओळख असलेल्या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर बिघडत चालली आहे. देशवासीय चिंतीत आहेत. मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, गोमांस खाणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, अशी वक्तव्ये भाजपचे नेते मंडळी करतात आणि त्याविरुद्ध मोदी काहीच बोलत नाहीत. देशाच्या बिघडत्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्याची नितांत आवश्यकता आहे.'

दादरीत अखलाकची झालेली हत्या सुनियोजित होती. बिहार विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न होता. केंद्र सरकारचे अपयश लपविण्यासाठी दादरी प्रकरण घडविले गेले,' असा आरोप त्यांनी केला.

पवार, काँग्रेसमध्ये या

जातीयवादी शक्तींविरोधात लढा देण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या विचारधारा एकत्र आल्या पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये परत यावे. त्यामुळे काँग्रेस आणखी बळकट होईल आणि केंद्र सरकारविरुद्ध अधिक तीव्रतेने लढा देता येईल, असे आवाहन दिग्विजयसिंह यांनी केले. गांधीभवनात काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’मधून सिटी बस!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी योजनेत सिटी बस सुरू करता येणार नसली तरी 'अमृत योजने'तून सिटी बस महापालिकेला सुरू करता येतील. त्यासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळू शकतो. सिटी बससाठी 'अमृत'मधून निधी मिळावा, यासाठी महापालिकेला स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. 'स्मार्ट सिटी'संदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.

'स्मार्ट सिटी'साठी सविस्तर प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनास ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करायचा आहे. त्याचे काम 'पीएमसी'च्या माध्यमातून सुरू आहे. 'स्मार्ट सिटी'मध्ये 'पॅन सिटी'च्या टाळता न येणाऱ्या मुद्यावर काम करावे लागणार आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन आणि सिटी बस या दोन पर्यायांची चर्चा सध्या सुरू आहे. त्यात सिटी बसला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

या योजनेत सिटी बस खरेदीसाठी शासनाकडून निधी दिला जाणार नाही. सिटी बससाठी स्मार्ट ट्रॅफिक, स्मार्ट सिग्नलिंग, जीपीएस सिस्टिम आदींसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. सिटी बससाठी सरकार 'अमृत योजने'तून पैसे देऊ शकेल, असे 'पीएमसी'च्या प्रतिनिधींनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यासाठी महापालिकेला राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. निधी देण्याचे राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्यावरच केंद्र सरकार औरंगाबादच्या स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाचा प्राधान्याने विचार केरेल, असे पीएमसीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

'अमृत'मधून सिटी बससाठी निधी मिळाला तरी ही सेवा चालविणे महापालिकेला शक्य होणार नाही. या सेवसाठी सर्व पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. त्यामुळे शासनाच्या निधीतून मिळणाऱ्या सिटी बस महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरू शकतील. खासगीकरणातून सिटी बस चालवणेच महापालिकेला फायदेशीर ठरेल.

- दिलीप थोरात, सभापती, स्थायी समिती, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज रात्री येणार धरणात पाणी

$
0
0

पैठण : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीत १२.८३ टीएमसी पाणी सोडायला सुरुवात झाली आहे. हे पाणी मंगळवारी रात्री जायकवाडीत पोहोचणार असून सरासरी दहा दिवस आवक सुरू राहणार असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. सध्या मुळा धरणातून ६००० क्युसेक्स, निळवंडेतून २००० तर दारणा प्रकल्पातून ४००० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, यापैकी केवळ आठ टीएमसी पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात जवळपास २२८ दशलक्ष घनमीटर पाण्याची भर पडणार आहे. जायकवाडीची पाणीपातळी साडेचार फुटाने वाढणार आहे. सध्या धरणात साडेचार टक्के पाणीसाठा असून त्यात आठ टीएमसीची भर पडल्यावर धरणात जवळपास पंधरा टक्के साठा जमा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवे, पंकजा, लोणीकर यांना जबर धक्का

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील नगरपंचायती निवडणुकीत भाजप नेत्यांना जबर फटका बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार अमित देशमुख, भाजपचे पंचायत राज समितीचे अध्यक्ष व आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार भीमराव धोंडे यांना मतदारांनी जोरदार धक्का दिला. लातूर जिल्ह्यात एमआयएमने खाते उघडले आहे.

बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. बीडमध्ये ४ पैकी शिरुर, पाटोदा, आष्टी या तीन नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निकालामुळे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंची सरशी झाली आहे. भाजपला वडवणीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राष्ट्रवादीने आष्टीचे आमदार यांच्या मतदारसंघातील शिरुर, आष्टी व पाटोदा येथे यश मिळविले आहे. जालना जिल्ह्यात नगर पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना जोरदार धक्का दिलाय. जिल्ह्यातील ४ पैकी २ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून उर्वरित दोन नगरपंचायतीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली आहे. रावसाहेब दानवे व संतोष दानवे या पिता-पुत्राच्या मतदारसंघातील जाफराबादमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. एमआयएम पक्षाने लातूर जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत जळकोट आणि देवणीत एक अशा दोन ठिकाणी विजय मिळविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८९ बिल्डरांवर कारवाईची शक्यता

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

ले-आउटमध्ये १५ऐवजी १० टक्के मोकळी जागा ठेऊन उर्वरित ५ टक्के जागा रेडिरेकनर दराच्या ५० टक्के रकमेत बिल्डरला विकण्याचा महापालिकेने १९९९ला मंजूर केलेला ठराव मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल केल्यानंतर शहरातील काही बिल्डर्सनी त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने बिल्डरांच्या या याचिका फेटाळून लावल्याने शहरातील १८९ बिल्डरवर कारवाई होणार आहे.

औरंगाबाद महापालिका १९८२मध्ये अस्तिवात आली. त्यावेळी प्रचलित असलेल्या कायद्याप्रमाणे मोकळी जागा १५ टक्के ठेऊन ले-आउटला मंजुरी होती. त्यामध्ये १५ टक्के मोकळी जागा सोडली. तीच जागा प्लॉटधारकाच्या उपयोगासाठी होती. १९८३ ते १९९२ यादरम्यान २८३ ले-आउट मंजूर करण्यात आले. त्यापैकी १८९ बिल्डरांनी ५ टक्के जागा विकण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली. त्यांना परवानगी देण्यात आली.

बिल्डरांनी नगरसेवक, अधिकारी यांच्याशी संगनमत करून ५ टक्के जागा विकली, पण हे करताना राज्य शासनाची परवानगी घेतली नाही. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे शहरातील १८९ ले-आउटमधील ५ टक्के जागेच्या बेकायदा व्यवहाराला प्रतिबंध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’चे पाइप निकृष्ट

$
0
0

Tushar.Bodkhe@timesgroup.com

समांतर जलवाहिनीतील पाइप किमान ५० वर्षे टिकतील हा 'औरंगाबाद वॉटर युटीलिटी कंपनी'चा दावा फोल ठरला आहे. कामापूर्वीच पाइपचे गंजरोधक रासायनिक लेप व काँक्रिट अस्तरीकरण निखळले आहे. स्थायी समितीत २२०० मिलिमीटर व्यास पाइपलाइनचा प्रस्ताव मंजूर असताना प्रत्यक्षात दोन हजार मिलीमीटर व्यासाचे निकृष्ट पाइप वापरत आहेत.

जायकवाडी ते औरंगाबाद अशी ४३ किलोमीटरची नवीन समांतर जलवाहिनी सुरू होण्यापूर्वी वादग्रस्त ठरली आहे. आतापर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना फक्त ३०० मीटर अंतराचे पाइप आणले आहे. मागील महिनाभरापासून फक्त चर खोदून पाइप मांडले आहेत. प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार याची माहिती औरंगाबाद वॉटर युटीलिटी कंपनी देत नाही. समांतर जलवाहिनीचे काम दर्जेदार असून किमान ५० वर्षे टिकतील, अशा दर्जाचे पाइप वापरत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा दावा औरंगाबाद समांतर योजना पाणीपुरवठा विरोधी नागरी कृती समितीने फोल ठरवला. समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पाइप निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड केले. पाइपमधील गंजरोधक रासायनिक लेप निखळले आहे. सिमेंटचे अस्तरीकरण फुटल्याने ठिकठिकाणी पाइप गंजले आहेत.

मागील महिनाभरापासून कंपनी लोकांना फक्त पाइप दाखवत आहे. प्रत्यक्ष कामाचा तपशील देत नसल्याचे कृती समितीचे प्रा. विजय दिवाण यांनी सांगितले. मनपाच्या स्थायी समितीत बावीसशे व्यासाच्या पाइपलाइनचा प्रस्ताव मंजूर झाला होता.

प्रत्यक्षात कंपनीने दोन हजार मिलिमीटर व्यासाचे पाइप वापरले आहे. या निकृष्ट पाइपमुळे भविष्यात जलवाहिनीची वारंवार गळती होण्याचा धोका आहे. कंपनी नागरिकांची फसवणूक करीत असल्याची टीका समितीने केली आहे.

खोटी माहिती

तब्बल ४३ किलोमीटर अंतरापैकी जेमतेम एक किलोमीटरचे काम कंपनीने हाती घेतले. मात्र, काही दिवसांतच कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचा दावा केला. केवळ चर खोदणे व पाइप मांडणे हा पहिला टप्पा आहे का, असा सवाल प्रा. विजय दिवाण यांनी केला. पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती निखालस खोटी आहे. सध्या सुरू असलेल्या कामही थातूर-मातूर असल्याचे प्रा. दिवाण म्हणाले.

समांतर जलवाहिनीत वापरले जाणारे पाइप निकृष्ट आहेत. कमी व्यासाचे व रासायनिक लेप निखळलेले पाइप वापरत आहेत. काँक्रिटचा थर निघालेले पाइप किती वर्षे टिकतील हे कंपनीने सांगावे.

- प्रा. विजय दिवाण, सदस्य, नागरी कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा बंदीमुळे सर्वसामान्यांना भुर्दंड!

$
0
0

Abdulwajed.Shaikh@timesgroup.com

औरंगाबादः पोलिसांनी बंदी घातल्यामुळे दोन हजार रिक्षा शहरातील रस्त्यांवरून हद्दपार करण्यात आल्या आहेत. हा आदेश देताना, रिक्षांचा वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे. केवळ दोन हजार रिक्षांना बंदी घालून शहरातील वाहतूक सुरळीत होईल का, वाहतुकीला शिस्त लागेल काय, असे प्रश्न या निमित्ताने पुढे आले आहेत. या बंदीमुळे सर्वसामान्यांचे स्वस्त प्रवासाचे साधन बंद झाले आहे.

औरंगाबादची लोकसंख्या १२ लाखांवर पोहोचली आहे. शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा नसल्याने; तसेच गरजेपोटी मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चार चाकी वाहने वापरली जातात. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहरात सुमारे ७ लाखांच्या आसपास वाहने आहेत. आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्यात मोटार सायकल, स्कूटर, मोपेडची संख्या ७ लाख ७६ हजार होती. याशिवाय कार, जीप, अन्य चारचाकी वाहनांची संख्या ७५ हजारांवर पोहोचली आहे. दोन वर्षांपूर्वी मोटारसायकल‌ींची संख्या ५ लाख ४२ हजार तर, कारची संख्या ४० हजारांपर्यंत होती.

वाढलेल्या वाहन संख्येमुळे शहराच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. जालना रोडवरील विविध चौकांत कायम कोंडी होते. याशिवाय गजानन महाराज मंदिर, गारखेडा चौक आणि शिवाजीनगर चौकात नागरिकांना वाहतूक कोंडीचा दररोज सामना करावा लागत आहे.

औरंगाबादकर वाहतूक कोंडीमुळे वैतागले आहेत. कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पोलिस, महापालिका यांच्याकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. आधी पोलिसांनी काळीपिवळी तसेच ट्रॅव्हल्स वाहने हद्दपार केली, आता वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी डिझेल रिक्षांना शहरात प्रवेशाला मनाई केली आहे. या बंदीमुळे शहरातील वाहतुकीस शिस्त लागेल का, असाच प्रश्न यानिमित्ताने उ‌पस्थित होत आहे.

बंदीचेच प्रयोग

मागील वर्षभरात ट्रॅव्हल्स बसला शहरात प्रवेशाला बंदी करण्यात आली. ट्रॅव्हल्स बसला विशेष स्टँड देण्याची मागणीही पोलिस आयुक्तांनी मान्य केली. त्यानंतर काळी-पिवळी जीपवर शहरातून हद्दपार करण्यात आले. त्यापाठोपाठ आता डिझेल रिक्षांवर बंदी घातली आहे. त्याशिवाय जेसीबी, पोकलेन यांनाही शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पार्किंगवरही बंदी?

शहरातील निराला बाजार, औरंगपुरा, टिळकपथ, गोमटेश मार्केट या भागात चारचाकी वाहने रस्त्यांवर लावलेली असतात. रिक्षा चालकांवर 'नो पार्किंग'ची कारवाई मोठ्या प्रमाणात केली जाते. शहरात पार्किंगची सुविधा नसल्याने चारचाकी वाहनधारकांना रस्त्यालगत वाहने उभी करावी लागतात. या वाहनांवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

बंदीची सक्तीच का?

औरंगाबाद शहराच्या रस्त्यांवरून ट्रॅव्हल्स बस, जड वाहनांना प्रवेशबंदी यानंतर काळी पिवळीलाही हद्दपार करण्यात आले आहे. यानंतर आता डिझेल रिक्षा हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक नियमाप्रमाणे चालावी, यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक नियम राबविण्याची किंवा वाहतूक वाढत असल्यामुळे, चौकांचे नियोजन करणे, प्रवाशांच्या मागणीनुसार नियोजन राबविण्याचे काम महापालिका आणि पोलिस वाहतूक विभागातर्फे करणे अपेक्षीत आहे. मात्र अशा वाहनांवर बंदी घालणे योग्य आहे का? असं मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

शिस्तीची कमतरता

शहरातील डिझेल रिक्षांवर नियम मोडल्यास कारवाई करण्यात येते. कारवाईनंतरही रिक्षाचालकांत फारशी सुधारणा होत नसल्याचा अनुभव आहे. रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी मात्र कोणीही प्रयत्न करीत नाही. थेट डिझेल रिक्षा हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वस्तातील प्रवासाला ब्रेक

शहरात सुमारे ७५ हजार नागरिक रिक्षांतून प्रवास करतात. रोजंदारीवर जाणारे कामगार, कारखान्यांतील कामगार नियमितपणे रिक्षातून प्रवास करतात. त्याशिवाय रेल्वे व एसटी स्टँडवर येणारे प्रवासीही रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. स्वस्तात प्रवासाचे साधन म्हणून रिक्षांकडे पाहिले जाते. डिझेल रिक्षा बंद झाल्यामुळे सर्वासामान्य नागरिक, कष्टकऱ्यांचा स्वस्तातील प्रवासाचे साधन बंद झाले आहे.

१०% रिक्षा वापरतात मीटर

शहरात १७ हजार परवानाधारक रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. तो लागू केल्यानंतर रिक्षा परवाना नियमित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले. परवानाधारक रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविले, मात्र शहरात इलेक्ट्रॉनिक मीटरचा वापर फारच कमी आहे. शहरात केवळ दहा टक्के रिक्षांमध्ये या मीटरचा वापर केला जातो.

बोगस रिक्षांवर कारवाई

शहरात दोन ते अडीच हजारांवर स्क्रॅप आणि बोगस परवाना असलेल्या रिक्षा धावत आहेत, असा आरोप रिक्षाचालक मालक संघटनेचा आहे. गेल्या वर्षभरापासून वाहतूक पोलिसांकडून अशा रिक्षांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७००च्या आसपास रिक्षांवर कारवाई करण्यात आली. सुमारे ३०० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

डिझेल वाहनांची संख्या वाढली

शहरात डिझेल कारची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एक जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्यात ७५ हजार ५५० कार होत्या. त्यापैकी शहरात सुमरे ७० टक्के कार शहरात आहेत. याशिवाय टॅक्सी कारची संख्याही २२७१ इतकी आहे. या उलट रिक्षांची संख्याही एक जानेवारी २०१५ रोजी २४ हजार ७८० होती. त्यापैकी शहरात धावणाऱ्या रिक्षांचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती आरटीओ कार्यालयातून देण्यात आली.

रिक्षावर ४० हजार रोजगार

रिक्षा व्यवसायावर सुमारे ४० हजार जणांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यात सुमारे २५ हजार चालक आहेत. याशिवाय रिक्षा मालक, दुरुस्तीचे काम करणारे मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मीटर व्यवसायिक, यांच्यासह स्पेअर पार्ट आणि टायरांची विक्री आदींचा रोजगार रिक्षांवर अवलंबून आहे. सुमारे ४० हजार जणांचा रिक्षा व्यवसायाची थेट संबंध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीत पाणी येणे सुरुच राहणार

$
0
0

प्रमोद माने । औरंगाबाद

नाशिकमधील गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती द्यावी, ही मागणी हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आता नाशिककरांनी न्यायासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. खासदार हेमंत गोडसे आणि जलचिंतन संस्थेच्यावतीने सुप्रीम कोर्टामध्ये सोमवारी पाच विशेष याचिका (स्पेशल लिव्ह पिटीशन) दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. कोर्टाने या पाचही याचिका फेटाळून लावल्या.

नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. गंगापूर आणि दारणा धरणात पुरेसे पाणी नसल्याने मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र, हायकोर्टाने स्थगिती नाकारून मराठवाड्याला पिण्यासाठी पुरेल एवढे पाणी जायकवाडीत सोडावे असे आदेश दिले. मराठवाड्याची पिण्याच्या पाण्याची गरज ४.८५ टीएमसी एवढी आहे. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतर रिव्हाईज ऑर्डर न निघाल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा पूर्वीचाच आदेश अंतिम मानून नाशिक आणि नगरच्या धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडले जात आहे. या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. पण ती फेटाळण्यात आल्याचे गोदावरी महामंडळाचे वकील सतीश तळेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाणी व्यवस्थित जात आहे का? यावर देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत. हे पाणी पिण्यासाठीच वापरले जावे असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी लवकर घेण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद जिल्ह्यात फटाकेविरोधी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी तयारी करण्यात येत असली, तरीही दुष्परिणामांचा विचार करत प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे. फटाक्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण होते, तसेच पैशांचाही अपव्यय होतो. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भारतीय जैन संघटन यांचे वतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भारतीय जैन संघटन या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करीत आहेत. तसेच, जनजागृतीसाठी जयंत नारळीकर, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. प्रकाश आमटे, नाना पाटेकर, सचिन तेंडुलकर, डॉ. जब्बार पटेल, एन. डी. पाडील यांच्या सहीचे पत्रकही शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. फटाके व शोभेची दारू उडविणे हे शंभर टक्के अनुत्पादक आहे. पैशाचा धूर काढणे असेच त्याचे वर्णन करावे लागेल, असाही संदेश या पत्रकामधून देण्यात आला आहे.

याच हॅण्डबिल (पत्रक) बरोबर विद्यार्थ्यांनी सही करून घ्यावयाचे एक विद्यार्थ्यांचे संकल्प पत्र ही त्यांना देण्यात येत असून, त्यांच्याकडून ते भरून घेतले जात आहे. या खर्चातून विद्यार्थ्यांनी अन्य छंद जोपासावेत, यासाठी प्रोत्साहनही देण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याला लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा फटाक्यांपेक्षा दराचा आवाज मोठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दसऱ्यानंतर दिवाळीचे वेध लागले असून, दिवाळीचे प्रमुख आकर्षण असणारे फटाके यंदा सामान्यांच्या खिशाला ताण देणार आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीजदरवाढ, वाहतुकीचा वाढलेला खर्च यांमुळे फटाक्याच्या किंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते बारा टक्क्यांनी वाढले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा फटाक्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या गावाला मराठवाड्यातील शिवकाशी अशी ओळख आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे यंदा दरात वाढ झाल्याचे येथील फटाका उत्पादक इरफान दारूवाला व तयुब दारूवाला यांनी याबाबतची माहिती दिली. तेरखेडा येथे तयार करण्यात येणाऱ्या फटाक्यांना महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातूनही मोठी मागणी असते.

फटाके निर्मितीसाठी बोरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, अॅल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्च्या मालाचा वापर केला जातो. यंदा यापैकी अनेक मालाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. याबरोबर वाहतुकीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या सर्व बाबींमुळे फटाके उत्पादकांना फटाक्यांच्या किंमती वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी माहिती दादा फायर वर्क्सचे तयब हुसेन दारूवाला यांनी दिली.

तेरखेडा तोटा हद्दपार

तेरखेडा येथे वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांचे उत्पादन करण्यात येते. यामध्ये तेरखेडा तोटा हा प्रकार लोकप्रिय असून, विशेषत: मराठवाड्यामध्ये या तोट्याला मागणी असते. मात्र, या तोट्यासाठी कुशल कामगारांची गरज असते आणि कामगार टंचाईमुळे या तोट्याचे उत्पादन बंद झाले आहे. कामगार टंचाईमुळे ऐन मोसमात मजुरांनाही जादा पैसे मोजावे लागतात, याकडेही उत्पादक लक्ष वेधत आहेत.

एमआयडीसीकडे दुर्लक्ष

मराठवाड्यातील तेरखेडा या गावात मोठ्या प्रमाणात हॅण्डमेड फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथील फटाक्यांना महाराष्ट्रासह परप्रांतातूनही मोठी मागणी असते. येथील फटाके उद्योगाचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारने २००८ मध्ये तेरखेडा येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र आश्वासनानंतर गेल्या सात वर्षांत येथे एमआयडीसीच्या सोयीसुविधा संदर्भाने कसलीही हालचाल करण्यात आली नाही. येथील औद्योगिक वसाहतीला चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही कसलीही हालचाल होताना दिसत नाही. शिवाय याप्रकरणी लोकप्रतिनिधी देखील उदासिन आहेत. तेरखेडा येथे हॅन्डमेड फटाक्याचे उत्पादन करणारे वीसहून अधिक उद्योजक आहेत. याशिवाय अनाधिकृतरीत्या येथील अनेकांच्या घरातूनही हा उद्योग चालतो येथील या उद्योगामुळे या परिसरातील सुमारे ४०० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याशिवाय तेरखेडापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या कसबे तडवळे येथेही फटाक्यांची निर्मिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images