Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दोन मेहुण्यांचा जामीन फेटाळला

$
0
0

छळामुळे केली होती पतीने आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीसह सासू-सासऱ्याच्या छळाला कंटाळून पतीच्या आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मेहुण्यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी शुक्रवारी (सहा नोव्हेंबर) फेटाळला.

या प्रकरणी पतीचे वडील मधुकर सिताराम पवार (६०, रा. देवगाव तांडा, बदनापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मुलगा नीतेश मधुकर पवार (मृत) याचे लग्न मे २०१३ रोजी पूजा हिच्याशी झाले होते. दोघे पुंडलिकनगरमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहात होते. पूजा ही पैशासाठी नीतेशला त्रास देत होती. ठेकेदारीचे काम करणाऱ्या नीतेशने कामगारांसाठी आणलेले पैसे पूजा काढून घेत होती. त्यामुळे घरामध्ये सतत ताणतणाव राहायचा आणि छोट्या-मोठ्या भांडणावरून पूजा तिच्या माहेरी जात होती. नीतेशसह फिर्यादी मधुकर पवार व फिर्यादीच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी बदनापूरला अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.

या सर्व त्रासाला कंटाळून नीतेशने २८ ऑगस्ट २०१५ रोजी आत्महत्या केली. त्यावरून कलम ३०६, ५०४, ३४ अन्वये सासरा शिवाजी दगडू राठोड, सासू सुमनबाई शिवाजी राठोड, पत्नी पूजा नीतेश पवार, मेहुणे अविनाश व आकाश यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी सासरा शिवाजी राठोड हा न्यायालयीन कोठडीत असून, दोन्ही मेहुणे अविनाश व आकाश यांनी अटकपूर्ण जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी, आरोपी हे पतीच्या मृत्यूस कारणीभूत असून, साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, मृत नीतेशचे पाकिट-मोबाइल जप्त करणे बाकी असून, आरोपींकडे असण्याची शक्यता असल्याने तपास करणे आहे, त्यामुळे आरोपींना जामीन देऊ नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोरडेचा मृत्यू अपघात की घातपात?

$
0
0

पोलिसांनी देखील टॉर्चर केल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजी कोरडे याच्या संशयास्पद मृत्यूमुळे पोलिस तसेच भूमाफियात खळबळ उडाली आहे. त्याचा मृतदेह दहा ते बारा फूट उंचीवर असलेल्या फांदीला लटकलेला असल्याने त्याने गळफास कसा घेतला हा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन पोलिसांनी देखील त्याला या प्रकरणात टॉर्चर केले असल्याचा भावाचा आरोप आहे. ३० ऑक्टोबरला दिलेला जबाब त्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याचे दिसत आहे.

शिवाजी हा संतराम कोरडे याचा मोठा मुलगा आहे. संतराम यांनी २००४ साली राजू तनवाणी यांना पहाडसिंगपुरा येथील पाच एक २९ गुंठे जमिनीचा आम मुख्यातरनामा करून दिला होता. ३१ ऑगस्ट रोजी महसूल विभागने या जमिनीचा ताबा सोनवणे याला दिला होता. या प्रकरणी रहिवाशांनी राजू तनवाणी, राज आहूजा व शिवाजीचे वडील संतराम यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यात शिवाजी महत्वाचा साक्षीदार होता.

पोलिस, भूमाफिया हादरले

शिवाजी कोरडे याने आत्महत्या केल्याचे कळताच पहाडसिंगपुऱ्यात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला बेगमपुरा पोलिसांना या घटनेचे गांर्भीय वाटले नाही, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घाटी हॉस्पिटलमध्ये गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस‌ निरीक्षक मधुकर सावंत यांनी भेट देत पाहणी केली.

गळफास घेतला कसा

औरंगाबाद लेणीपासून उजवीकडच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात झाडाला दोरीने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. जमिनीपासून ही फांदी दहा ते बारा फूट उंच आहे. तसेच ही फांदी देखील जास्त जाड नाही. इतक्या उंचीवर त्याने गळफास कसा घेतला? त्याच्या पायावर व खाली पडलेले रक्ताचे डाग कशाचे आहेत? आदी संशयास्पद बाबी या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत.

शिवाजीच्या त्या जबाबात होते काय?

३० ऑक्टोबर रोजी शिवाजी कोरडेचा कोर्टात न्यायधीशासमोर जबाब घेण्यात आला. २७ ऑक्टोबर रोजी त्यांना या या संदर्भात पत्र देण्यात आले होते. त्यांचा जबाब पुढीलप्रमाणे होता. 'माझ्या वडिलांची ५ एकर ३९ गुंठे जमीन होती. ही जमीन माझ्या वडिलांनी तनवाणी यांना आम मुख्यातरपत्राद्वारे दिली होती. या जमिनीचा माधवराव सोनवणे व माझे वडील संतराम रोकडे यांच्यात न्यायालयीन वाद सुरू होता. त्याबाबतचा निकाल आमच्या विरोधात गेला. हा वाद न्यायालयात प्रलंबित असताना तनवाणी माझ्या वडिलांना म्हणाले, हे मी सांभाळून घेतो. त्यांनी जमिनीची प्लॉटींग करून प्लॉट विक्री केले. त्यांनी माझ्या वडिलांना पैसे ‌सुद्धा दिले नाही. या व्यतिरिक्त मला काही सांगायचे नाही.

कायम करत नसल्याने देखील ‌होता निराश

शिवाजी हा बारा वर्षापासून बिबी का मकबरा, औरंगाबाद लेणी परिसरात वॉचमन म्हणून कामाला आहे. त्याला मद्याचे व्यसन होते, मात्र बारा वर्षे झाली तरी त्याला कायमस्वरूपी कामावर घेण्यात आले नव्हते. या कारणामुळे देखील त्याला नैराश्य आले होते. त्याच्या सहकाऱ्यांनी ही माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओत चालकांची शाळा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीओ कार्यालयामध्ये आज वाहन परवान्यांच्या नूतनीकरणासाठी आलेल्या वाहन चालकांची शाळाच भरल्याचे चित्र दिसत होते. मोटार वाहन निरीक्षकांनी दीड तास या वाहनचालकांचा प्रशिक्षण वर्ग घेतला अन् त्यांना नियमांची माहिती करून देत वाहन चालविताना काळजी घेण्याची सूचना दिल्या.

आरटीओने ट्रान्सपोर्ट लायसन्स धारकांचे लायसन्स नूतनीकरण करण्यापूर्वी वाहतूक नियमांसदर्भात त्यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येथे तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारपासून प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली. या प्रशिक्षण वर्गात मोटार वाहन निरिक्षकांनी वाहतूक नियमांची माहिती दिली. वाहन चालविताना सीट बेल्ट लावा, मोबाइलवर बोलणे टाळा, आदी विविध बाबी त्यांना सांगण्यात आल्या. या प्रशिक्षण वर्गात शुक्रवारी चाळीस ड्रायव्हर उपस्थित होते. लायसन्स नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा प्रशिक्षण वर्ग पूर्ण करण्यासाठी मोटार वाहन निरिक्षकांना खासगी कर्मचाऱ्यांची मदतही घ्यावी लागली.

चाळीस वर्षांच्या अनुभवाचे काय?

या प्रशिक्षण वर्गात चाळीशीच्यावर असलेल्या अनेक वाहनचालकांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षण वर्गानंतर काही वाहनचालकांनी, 'गेली अनेक वर्षे आम्ही वाहन चालवित आहोत. आतापर्यंत एकही अपघात झालेला नाही. रस्त्यावरचा आमचा अनुभव मोठा आहे. असे असतानाही या प्रबोधन वर्गाची गरज होती का?' असा सवाल उपस्थित केला.

शुल्क भरण्यासाठी लागली रांग

प्रशिक्षण वर्गानंतरच लायसन्स नूतनीकरणाची प्रक्रिया केली जाणार होती. यामुळे परवाना शुल्क भरण्यासाठी, मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या होत्या. वाहन परवाना नूतनीकरणासाठी शुल्क भरण्यासाठी एकच खिडकी असल्यामुळे ही रांग वाढत गेली.

दर आठवड्यात शुक्रवारी प्रशिक्षण वर्ग घेण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र वाहनचालकांची संख्या वाढल्याने शुल्क भरण्यासाठी लोकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे यापुढे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस प्रशिक्षण घेतले जाणार आहे.

- किरण मोरे, सहाय्यक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धनगर समाजाला आरक्षण द्या!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सत्तेत येण्यापूर्वी भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. मात्र, वर्षभरानंतरही या मागणीबाबत कोणताही विचार केला नाही. सरकारच्या या धोरणाविरोधात नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर १० डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय महाराष्ट्र धनगर मेळाव्यात शुक्रवारी घेण्यात आला.

औरंगाबाद जिल्हा धनगर समाज आणि मल्हार सेनेच्या वतीने राधाकृष्ण मंगल कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार हरिदास भदे, मल्हार सेना प्रमुख लहुजी शेवाळे, डॉ. सुभाष माने, प्रभू कोकणे, विठ्ठल कोरडे, ‌संदीपान नरवटे यांची उपस्थिती होती.

धनगर समाजाला आतापर्यंत अनुसूचित जमातीअंतर्गत कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. कॉँग्रेस सरकारने या समाजाची दिशाभूल केली. तेव्हाही धनगर समाजाने तीव्र आंदोलन केले. कॉँग्रेस सरकारला या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच सत्तेबाहेर बसावे लागले. भाजपाने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कोणतीही कारवाई केली नाही.

आमदार वडकुते यांनी विधानसभेत धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आवाज बुलंद केला, पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला. मल्हार सेनेचे लहुजी साळवे म्हणाले, 'सत्तेत असलेल्यांना त्यांचे आश्वासन आठवून देण्याचे काम मल्हार सेनेचे कार्यकर्ते करणार आहेत. यासाठी मोठे आंदोलन उभारण्याची तयारी पूर्ण केली आहे.' मेळाव्याला मल्हार सेनेचे शहर प्रमुख दत्ता मेहेत्रे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

काँग्रेस सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे त्यांना सत्ता गमवावी लागली. भाजपने आश्वासन दिले. ते प्रामाणिकपणे पाळावे. त्यांना आश्वासन आठवत नसेल तर, ते आठवून देण्याचे काम मल्हार सेनेचे कार्यकर्ते करणार आहेत. अन्यथा आगामी काळात आंदोलन तीव्र करू.

- लहुजी साळवे, मल्हार सेना प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहिरात एजन्सीला गंडा

$
0
0

बनावट पावती पाठवत प्रसिद्ध केल्या जाहिराती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सूरत येथील कन्सलटंसी सर्व्हिसेस चालविणाऱ्या भामट्याने शहरातील मीडिया हब या जाहिरात एजन्सीचालकाची साडेपाच लाखांची फसवणूक केली आहे. बँकेत चेक जमा केल्याच्या बनावट पावत्या इमेलवर पाठवत त्याने जाहिराती प्रसिद्ध करून घेत हा गंडा घातला. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहमद राफे हाश्मी मोहमद कादर (वय ३१ रा. बुक्कलगुडा, शहागंज) या तरुणाची मीडिया हब नावाने जाहिरात एजन्सी आहे. २९ सप्टेंबर रोजी राफे हाश्मी यांच्याशी यश कपूर (रा.सुरत, गुजरात) या व्यक्तीने संपर्क साधला. आपल्या वेस्टगेट, व्हिडी; तसेच अॅसेंट कन्सलटंसी सर्व्हिसेस असल्याची माहिती त्याने हाश्मी यांना दिली. भारतातील सर्व वर्तमानपत्रामध्ये आपल्या जाहिराती प्रसिद्ध करावयाच्या असल्याचेही त्याने सांगितले. हाश्मी यांनी जाहिरातीच्या बिलाच्या रकमेबाबत विचारणा केली असता बंगळूरू येथील स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या संजयनगर येथील शाखेमध्ये चेक जमा करण्याचे आश्वासन त्याने दिले. या बँकेमध्ये त्याने पाच लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा चेक जमा केल्याच्या सही शिक्के असलेल्या बँकेच्या पावत्यांचे फोटो देखील हाश्मी यांना मेलद्वारे पाठविले. या गोष्टीवर विश्वास ठेवून हाश्मी यांनी त्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. मात्र, दोन ते तीन दिवस उलटल्यानंतरही चेकची रक्कम जमा न झाल्याने हाश्मी यांनी शहागंज येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शाखेत जाऊन चौकशी केली. यावेळी बंगळूरच्या शाखेमध्ये कोणताही चेक जमा करण्यात आला नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

यश कपूर याच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याने ३० ऑक्टोबरपर्यंत रक्कम पाठविण्याचे आश्वासन दिले, मात्र, ही मुदत उलटून गेल्यानंतर त्याने मोबाइल बंद करून ठेवले. त्याच्याशी मेलद्वारे संपर्क साधण्यात आला असता त्याने आपण विदेशात असल्याची माहिती हाश्मी यांना दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हाश्मी यांनी पोलिस ठाणे गाठून आरोपी यश कपूर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बंगळूरची एसबीएचची शाखा संशयाच्या भोवऱ्यात

यश कपूर याने हाश्मी यांना चेक जमा केल्याच्या दोन बनावट पावत्या पाठविल्या. यापैकी एका पावतीवर दोन ऑक्टोबर तारीख आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्याने बँकांना शासकीय सुट्टी होती. त्यामुळे या दिवशी त्याने बँकेचे शिक्के कसे मिळवले, हे गौडबंगाल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत कारखानदार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गॅस सिल‌िंडरने भरलेल्या ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर, त्याचा मित्र जखमी झाला. जालना रोडवरील महर्षी चौकात गुरुवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. या चौकात १५ दिवसांतील हा दुसरा भीषण अपघात आहे. मुकुल नीरजकुमार मित्तल (वय ३२, रा. मोहनलालनगर, फरिदाबाद, उत्तर प्रदेश), असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

फरिदाबाद येथे मुकुल यांचा बांगड्यांचा कारखाना असून, ते दर महिन्याला औरंगाबादेमध्ये व्यवसायानिमित्त येतात. ते गुरुवारी सकाळी शहरात आले. दिवसभर व्यवसायानिमित्त भेटीगाठीनंतर रात्री ओम बॅँगल्सचे आशिष अग्रवाल (रा. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ) या मित्राच्या घरी जेवणासाठी गेले. त्यानंतर उस्मानपुरा येथे पान खाण्यासाठी दुचाकीवरून अग्रवाल यांच्यासोबत निघाले.

महर्षी चौकातून वळण घेताना गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे अग्रवाल तोल जावून दुभाजकाच्या बाजुने पडले, तर मुकुल मित्तल रस्त्यावर कोसळून ट्रकखाली चिरडले गेले. या घटनेत त्यांचा जागेवर मृत्यू झाला. अग्रवाल यांना किरकोळ मार लागला आहे. ही घटना समजल्यानंतर उस्मानपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत ट्रकचालक पसार झाला होता. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून याप्रकरणी उस्मानपूरा पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मणियारचा जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

औरंगाबादः श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणातील आरोपी स्वप्निल मणियार याचा नियमित जामीन विशेष न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी शुक्रवारी (सहा नोव्हेंबर) फेटाळला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वप्निलने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी स्वप्निल मणियार याच्या छळास कंटाळून सिडकोतील श्रुती कुलकर्णी या तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली होती. त्यावरून स्वप्निल मणियारला सिडको पोलिसांनी अटक केली होती. अटकेपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, स्वप्निल मणियारने नियमीत जामीन मिळविण्यासाठी अॅड. सोमनाथ लढ्ढा यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. तर, सरकारच्या वतीने या खटल्यासाठी विशेष सहायक लोकभियोक्ता म्हणून अॅड. के. जी. भोसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे प्रकरण निकालासाठी शुक्रवारी आले असता, कोर्टाने स्वप्निल मणियारचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काचे पाणी द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी आक्रोश शुक्रवारी पुन्हा एकदा प्रकटला. मराठवाड्याला दरवर्षी हक्काचे पाणी द्यावे, पाणीपुरवठा योजनेचे खासगीकरण रद्द करावे, या प्रमुख मागण्यांसाठी मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मूकमोर्चा नेला.

जल वेदना शासनदरबारी मांडण्यासाठी काढलेल्या या मोर्चास पैठणगेट येथून सुरुवात झाली. समितीचे नेते डॉ. भालचंद्र कानगो, मनोहर टाकसाळ, सुभाष लोमटे, राम बाहेती, प्रदीप पुरंदरे, शरद अदवंत, अॅड. रमेश खंडागळे, मंगल खिंवसरा, उद्धव भवलकर, अभय टाकसाळ आदी उपस्थित होते.

नाशिक-अहमदनगर जिल्ह्यात मूळ नियोजनापेक्षा जास्त क्षमतेची धरणे बांधली गेली. वरच्या भागात दरवर्षी द्राक्षे व ऊस मोठ्या प्रमाणावर होत असताना, जायकवाडी लाभक्षेत्रात मात्र चार-चार वर्ष प्रवाही सिंचन होत नाही. मराठवाड्याला हक्काचे पाणी दरवर्षी मिळालेच पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

घटनात्मक तरतुदींना छेद

समांतर पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमिमता आहे. पीपीपीच्या माध्यमातून खासगीकरण करणे घटनात्मक तरतुदींना छेद देणारे व नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक आहे. समांतरचे खासगीकरण रद्द करून हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कायदा लांबणीवर पडण्याचे संकेत

$
0
0

वेळ पडली तर अध्यादेश : तावडे

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रस्तावित 'महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१५'वर राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर शिक्कामोर्तब करण्यात घाटत असले तरी, आक्षेप व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच राहण्यार आहे, असे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. त्यामुळे हा कायदा लांबणीवर पडण्याची अंदाज आहे. प्रस्तावित कायद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित चर्चासत्रानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रस्तावित कायद्याचा मसुदा अंतिम करण्यासाठी विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतर्फे शिक्षणतज्ज्ञांच्या सूचना जाणून घेण्यासाठी विद्यापीठांमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठात शुक्रवारी झालेल्या चर्चासत्रानंतर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उर्वरित चर्चासत्रे, तज्ज्ञांच्या सूचना आणि अधिवेशनाचा कमी कालावधी पाहता अंतिम मसूदा वेळेत पूर्ण होईल का? असे विचारले असता. ते म्हणाले, 'प्रस्ताविक कायदा सर्वसमावेश असेल. मसुदा अंतिम करण्यासाठी समिती वेगाने काम करते आहे. प्रत्येकाच्या सूचनांचा निश्चित विचार केला जाईल. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात प्रस्तावित कायदा आणला जाईल, त्यासाठी मी आग्रही आहे, परंतु त्यासाठी हट्ट करणार नाही. तसे नाही झाले तरी विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होऊ दिला जाणार नाही. कायद्याला उशीर झाला तर अद्यादेश काढला जाईल.'

विद्यापीठाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होण‍ार हाेऊ दिला जाणार नाही याची खबरदारी सरकार घेईल. प्रस्तावित कायद्यात सर्व सूचना आणि आक्षेपांची दखल घेवून सुयोग्य बदल केले जातील, असे त्यांनी सांगितले. 'पुरस्कार वापसी' च्या प्रश्नावर लेखकांनी पुरस्कार परत करण्यापेक्षा लिहते झाले पाहिजे. आपली ताकद लेखणीत आहे, हे ओळखले पाहिजे, असे मत व्यक्त केले. लिंगडोह समितीच्या अहवालानुसार महाविद्यालयीन निवडणुका होतील, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोठ्या भावाची भूमिका कळालीच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'युतीमधील कडवटपणा मिटवण्यासाठी शिवसेनेने आतापर्यंत नेहमीच हात पुढे केला. आता भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेण्याची गरज आहे. भाजप आता मोठा भाऊ असला तरी, त्यांना अद्याप मोठ्या भावाची भूमिका कळालीच नाही,' असा टोला राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मारला.

ग्रामविकास विभागाच्या राज्यस्तरीय विकास परिषदेसाठी शुक्रवारी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. कल्याण - डोंबिवली आणि कोल्हापूर या महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला होता. आरोप-प्रत्यारोपांमुळे युती ट‌िकून राहील की नाही अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपला टोला मारला. ते म्हणाले, 'दोन्ही पक्षांमध्ये असलेली ओढताण, कटुता हा प्रकार श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी आहे. प्रत्यक्षात शिवसेनेने नेहमीच हात पुढे केला. आता भाजपनेही दोन पावले पुढे येण्याची गरज आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे दुसऱ्या लोकांना लाभ होतो. मोठ्या पक्षांनी आपल्या मित्रपक्षांना मोठे करावयाचे असते, मात्र जेव्हा लाट संपेल तेव्हा त्यांनाही समजेल.'

गारपीट, अवकाळी पाऊस आणि सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य शासनाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असले तरी, याचा परिणाम विकासकामांवर होणार नाही. यासाठी उत्पादन शुल्क, नगरविकास, इतर विभागांचे महसुली उत्पन्न वाढविण्याचा शासन विचार करत आहे. याचा उपयोग राज्याचा दुष्काळग्रस्त भागासाठी करता येईल. पेट्रोलचे दर कमी झाल्याने व्हॅटच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले. लोकांसाठी काम करण्याचा हा काळ असून, यासाठी शिवसेनेचे सर्वच मंत्री शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

देवगिरीचे तीन डबे वाढविणार?

'सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचे प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. आरक्षणाची स्थिती आणि होणारी गर्दी लक्षात घेता, या गाडीला तीन डबे वाढवून देण्याच्या मागणीचा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांकडे देणार आहे,' असेही केसरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे फुल्ल; प्रवासी वेटिंगवर

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सणासुदीच्या काळात रेल्वेचे आरक्षण मिळविण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आरक्षण केंद्रावर होणारी गर्दी तसेच ऑनलाईन तिकिट विक्री वाढल्याने, प्रवाशांना कन्फर्म तिकिट मिळत नाही. त्यामुळे एजंटाकडून अव्वाचे सव्वा भाव आकारून तिकिट घ्यावे लागत आहे.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून प्रकाश (नाव बदलेले आहे) व त्यांचा मित्र या अहमदाबादचे आरक्षण करण्यासाठी आले होते. प्रकाश यांनी आरक्षण कार्यालयात औरंगाबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेसच्या तिकिटाबाबत चौकशी केली असता, वेटींग असल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील एका एजंटाला गाठले असता, त्यांना औरंगाबाद ते मुंबईचे तिकिट कन्फर्म करून देण्यासाठी जास्तीच्या पाचशे रुपयांची मा‌गणी केली. प्रकश यांनी जादा पैसे देऊन कन्फर्म तिकिट मिळाल्याची माहिती मटाला दिली.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. येथून २२ मेल (एक्सप्रेस) आणि १२ पॅसेंजर रेल्वे धावतात. या स्टेशनवर तिकिट विक्रीतून दररोज १७ लाख रुपयांचे उत्पन्न होते. गर्दीच्या या मोसमात प्रवाशांना तिकिट कन्फर्म मिळत नसल्यामुळे स्टेशन ‌परिसरात फिरणाऱ्या दलालांकडून तिकिटे कन्फर्म करून दिली जात आहेत. साध्या तिकिटावर दोनशे ते एक हजार रुपयांपर्यंत जास्त रक्कम आकारून तिकिट कन्फर्म करून दिले जात आहे. काही तिकिटे एजंटाच्या कोट्यातून, तर काही रेलवे अधिकाऱ्यांच्या मदतीने कन्फर्म करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिकिट काळाबाजाराचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.

१३ एजंटांवर कारवाई : काही महिन्यांपूर्वी तत्काळ तिकिट घेण्यासाठी दलालांची रांग लागत असल्यामुळे, दलालांच्या बंदोबस्त करण्याची मागणी रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी केली होती. या नंतर औरंगाबाद ते नांदेड मार्गावरील १३ एजंटांवर कारवाई करण्यात आली होती. यात औरंगाबादमधील चार एजंटांचा समावेश आहे. कारवाई झालेल्यांमध्ये बी. बालकृष्णा आर. भास्करन, शेख शकीब, सुशील राधाकिसन, अरविंद कुलकर्णी, अब्दुल हमीद यांचा समावेश आहे. याशिवाय परभणीच्या अब्दुल सलीम, मोहम्मद इसाक, नांदेडचे सोनू मिलिंद लोने, एजाज खान, नारायण भुमण्णा, शिवचरण सिंह माला, मानवत रोडचे सुदर्शन जगदाळे, जालनामधील संतोष पारसमल, बिपीन ओमप्रकाश यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील तिकिट काऊंटरवर एजंटांची नजर : रेल्वे आरक्षण कार्यालयात ‌तत्काळ तिकिट विक्री केंद्रावर आरपीएफचे जवान पहारा देतात. त्यामुळे औरंगाबादमध्ये तत्काळ तिकिट विक्रीचा गोंधळ कमी झाला आहे. तत्काळ तिकिट घेण्यासाठी आता रोटेगाव, लासूर, करमाड तसेच अन्य छोट्या रेल्वे स्टेशनवरून तत्काळ तिकिटे घेऊन विकली जात आहेत.

रेल्वे फुल्ल

दिवाळीच्या सुट्टया लागण्याआधीच रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. हैदराबादकडे जाणाऱ्या काकीनाडा, विजयवाडा या रेल्वे फुल्ल आहेत. याशिवाय देवगिरी रेल्वेला १४५ च्या वर वेटींग सुरू आहे. नंदीग्राम एक्सप्रेसही वेटींगवर आहे. सचखंड एक्सप्रेसला तुलनेने वेटींग जास्त आहे.

असा आहे एजंटाच्या तिकिट कन्फर्मचा फंडा

काही दिवस आधी बुकिंग करून कन्फर्म तिकिट मिळविण्यासाठी एजंटांनी वेगवेगळे युक्त्या केल्या आहेत. यात काही गाड्यांना ‌विविध स्टेशनसाठी कोटा देण्यात आलेला आहे. उदा. नगरसोल ते नरसापूर गाडीतून हैदराबादला जायचे असेल तर औरंगाबादहून या रेल्वेचे तिकिट वेटींगवर असते. नगरसोलहून घेतले तर तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय विविध प्रवर्गांसाठी रेल्वे विभागाने आरक्षण ठेवले आहे. ट्रॅव्हल्स किंवा रेलवे विभागाकडून मान्यता प्राप्त असलेल्या काही एजंटांना तिकिट बुकींग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे या एजंटांना तिकिट कन्फर्म करण्यात काही अडचणी येत नाही.

सिसीटीव्ही नावालाच

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील आरक्षण केंद्रावरील तिकिट खिडकीच्या बाहेर कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तत्काळ तिकिट घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा दिसावा अशा पद्धतीने कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे असूनही एजंटांनी नेमलेले अनेक सदस्य वारंवार तत्काळ तिकिट घेण्यासाठी येत आहेत. याबाबत कोणतीही कारवाई होत नाही.

तिकिटाच्या काळाबाजाराबाबत मी रेल्वे मंत्र्यांपर्यंत तक्रार केली होती. आजही अनेक ‌एजंट फिरत आहेत. रेल्वे विभागाने पाच जणांवर कारवाई केली होती. ही कारवाई दिखाऊ स्वरूपात झाली आहे. दोन दिवसापूर्वी मी पुन्हा हा विषय दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मांडला. आगामी काळात याबाबत कारवाई होईल असा विश्वास आहे.

- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

दिवाळीला गावी जायचे आहे. तिकिट घेण्यासाठी आलो होतो. सध्या वेटींगवर तिकिट घेतले आहे. मला विश्वास आहे की, तिकिट कन्फर्म होईल.

- गणेश हंगरगे, प्रवासी

आम्ही तत्काळ टिकीट घेण्यासाठी आलो होतो. मात्र, वेटींगचेच तिकिट मिळत असल्यामुळे आम्ही तिकिट खरेदी केले नाही. आता मुंबईला ट्रॅव्हल्स, अन्य वाहनाने जावे लागणार आहे.

- श्याम ढगे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या कुटुंबीयांना ६० लाखांची भरपाई

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

अपघातात मृत तरुणाच्या कुटुंबीयांना ६० लाख रुपये ९ टक्के व्याजासह नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश मोटार अपघात प्राधिकरणाच्या सदस्य एस. एस. नायर यांनी श्रीराम जनरल व युनायटेड इंडिया या दोन कंपन्यांना दिले आहेत.

अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव महेशचंद्र आत्माराम मोहिते (वय २६) आहे. बीडहून औरंगाबादला कारने येताना निपाणी शिवारात अपघात झाला. ट्रकने धडक दिल्याने कारमधील चालक सचिन चोरडिया व महेश हे दोघे जागीच ठार झाले. महेश हे टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये वरिष्ठ अभियंता होते. हा अपघात १२ ऑगस्ट २०१० रोजी झाला होता.

महेश यांची आई चंद्रकला, वडील आत्माराम, बहिण पल्लवी, भाऊ ऋषिकेश यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. अपघात झाला त्यावेळी महेश यांचे वेतन ४० हजार ७५३ रुपये होते. मोहिते यांच्या कुटुंबाचा चरितार्थ महेश यांच्या वेतनावरच अवलंबून होता. ९० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी म्हणून आई चंद्रकला यांनी मोटार अपघात प्राधिकरणात दावा दाखल केला. महेश यांचे वय, वेतन विचारात घेऊन कोर्टाने महेश यांच्या वारसांना ६० लाख ७८ हजार ५३० रुपये ९ टक्के व्याजासह नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दोन विमा कंपन्यांना दिले. अर्जदाराची बाजू रामदास चव्हाण व मंगल चव्हाण यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसुदा बदलू, घाबरू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुचर्चित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात शिक्षणातील सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या कायद्याचा अंतिम मसुदा अद्याप तयार झालेला नसल्यामुळे बदलांना वाव आहे. त्यामुळे कायद्याचा बाऊ करू नये, असा शब्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रस्तावित कायद्यावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कायद्यासह स्टॅट्यूट्स (परिनियम) तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परिनियमही कायद्यासोबतच येतील, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या चर्चासत्राला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, समितीसदस्य कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, संचालक डॉ. धनराज माने, आमदार सतीश चव्हाण, अतुल सावे, विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षणमंत्री म्हणाले,'प्रस्तावित कायदा विद्यार्थी केंद्रबिंदू मानून तयार करण्यात येईल. विद्यापीठांची स्वायतत्ता कायम ठेवतानाच कुलगुरू, अधिकार मंडळे यांच्या कामकाजात समानता राखली जाईल. कायद्यात अधिकार मंडळांचे अस्तित्त्व अबाधित ठेवण्यात येईल. आरक्षणाचे निकषही पाळण्यात येतील. शैक्षणिक आणि व्यवसायिक पात्रता यात तफावत आहे. ती दूर करण्यासाठी उद्योगांचा सहभाग वाढविण्यात येईल. कायद्याबाबत भिती बाळगण्याचे कारण नाही.' संचालक डॉ. डी. आर. माने यांनी प्रास्ताविक केले.

परीक्षांवर बहिष्कार नको

परीक्षा येताच प्राध्यापक विविध मागण्यांसाठी आंदोलने करतात. त्याचा शिक्षण व्यवस्थेवर विपर‌ित परिणाम होतो. विद्यार्थ्यांचे नुकसान होते. हे लक्षात घेऊन प्राध्यापकांनी परीक्षांवर बहिष्कार घालू नये, असे आवाहन तावडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा येथील वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आणि पुरातत्त्व खात्यातील कंत्राटी सुरक्षारक्षक शिवाजी संतराम कोरडे (वय ३५, रा. बेगमपुरा) याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी औरंगाबाद लेणीजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शिवाजी कोरडे राजू तनवाणीच्या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या मृत संतराम कोरडेचा मुलगा आहे. याप्रकरणी भूमाफिया राजू तनवाणी, माधव सोनवणे व ख्वाजा आमीनसह चौघांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवाब देण्याच्या कारणावरून दोन्ही गटांकडून त्याला धमक्या येत असल्याने त्याने आत्महत्या केली, असा आरोप त्याच्या भावाने केला आहे.

यासंदर्भात शिवाजी कोरडेचा भाऊ अमर कोरडे याने तक्रार दाखल केली आहे. २९ ऑक्टोबर रोजी शिवाजीला मकबरा रोडवर दोन अनोळखी व्यक्तींनी अडविले होते. आम्ही माधवराव सोनवणे व ख्वाजा आमीनची माणसे असून, ३० ऑक्टोबर रोजी कोर्टात राजू तनवाणीविरुद्ध जबाब दे अन्यथा ठार मारू, अशी धमकी दिली होती. त्याचबरोबर २ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीचदरम्यान त्याला एका अनोळखी व्यक्तीने मोबाइलवरून फोन केला. राजू तनवाणीविरुद्ध जबाब का दिला, असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. ही माहिती शिवाजीने अमरला दिली होती, असे या तक्रारीत म्हटले आहे.

बुधवारी शिवाजी नाइट शिफ्टला गेला होता. गुरुवारी सकाळी त्याने कामावर येणाऱ्या वॉचमनला मोबाइल करून चावी दगडाखाली ठेवल्याची माहिती दिली. यानंतर तो घरी आला नाही, असेही तक्रारीत नमूद केले आहे. नातेवाईक, कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. सायंकाळी बेगमपुरा पोलिस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. शुक्रवारी सकाळी त्याचे नातेवाईक शिवाजी शिंदे हे कोरडे याचा शोध घेत होते. त्यांना औरंगाबाद लेणीजवळील दाट झाडीत शिवाजी कोरडेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत झाडाला दिसून आला. त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. फसवणुकीच्या गुन्ह्यात महत्त्वाचा साक्षीदार असल्याने त्याला धमक्या येत होत्या. या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून राजू तनवाणी, माधव सोनवणे, ख्वाजा आमीनसह चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ते दोन पोलिस कोण ?

दोन पोलिसांनीही शिवाजी कोरडेवर जबाब देण्यासाठी दबाव आणला होता, पण शिवाजीने पोलिसांची नावे सांगितली नव्हती, असे अमर कोरडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे दबाव आणणारे पोलिस कर्मचारी कोण, याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

तनवाणी, आहुजाची दिवाळी तुरुंगात

पहाडसिंगपुरा प्रकरणी नगरसेवक राजू लेखराज तनवाणी व राज दिलीपकुमार आहुजा यांचा नियमित जामीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. वाय. डोईफोडे यांनी शुक्रवारी फेटाळला. त्यामुळे तनवाणी व आहुजा यांची दिवाळी हर्सूल कारागृहात निश्चित झाली आहे. तनवाणी, आहुजाच्या वतीने अॅड. अशोक ठाकरे व अॅड. दिनेश गंगापूरवाला यांनी, तपास पूर्ण झाला आहे, दोषारोपपत्र सादर करण्यात आल्यामुळे नियमित जामीन द्यावा, अशी विनंती केली. तर, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असला तरी, तनवाणी राजकीय बळाचा वापर करून साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, पोलिसांच्या तपासावेळी हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती सरकारी वकील एन. एन. पवार यांनी कोर्टात केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोटावर पाय नाही; नियम पाळा’

$
0
0

शहरात डिझेल रिक्षांवर बंदी का घातली?

बेशिस्त वाहतूक हे बंदीचे एक कारण आहे. एलपीजी, पेट्रोल रिक्षांच्या आकारापेक्षा डिझेल रिक्षांचा आकार मोठा आहे. वेग कमी आहे. वारंवार या रिक्षा प्रवासी घेण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी थांबतात. याबाबत रिक्षाचालकांना वारंवार सूचना दिल्या. दंड आकारला. मात्र, त्यांच्या वर्तनात कोणताही फरक पडला नाही. शहरात पुलांचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी अगोदरच वाढली आहे. हे टाळण्यासाठी आम्ही दोन महिन्यांसाठी ही बंदी घातली.

बंदीमुळे डिझेल रिक्षाचालक बेरोजगार झालेत. त्याचे काय?

हे बघा या डिझेल रिक्षांवर संपूर्ण बंदी नाही. फक्त मध्यवर्ती किंवा गजबजलेल्या शहरात प्रवेशास बंदी आहे. शहराबाहेर हर्सूल टी पॉइंट, चिकलठाणा, कांचनवाडी, वाळूज, बीडबायपास या भागात ते रिक्षा चालवू शकतात. पोटावर पाय देण्याचा उद्देश नाही. फक्त शिस्त लागावी हा प्रयत्न आहे.

वाहतूक शिस्त पाळण्यासाठी रिक्षा थांबे नसल्याचा आरोप होतो. त्याचे काय?

शहरात रिक्षा थांबे किंवा स्टॅँड नाहीत. याचा अर्थ असा नाही की रिक्षा चालविताना तुम्ही अचानक थांबवायची. प्रवाशांना चलता का, असे विचारायचे. जुन्या थांब्यावरून चालक रिक्षा नीट चालवत नाहीत. प्रवाशी घेण्यासाठी कुठेही थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. रिक्षा चालकांनी शिस्त पाळण्यासाठी पुढाकार घेतल्यास त्याचा योग्य परिणाम रस्त्यावर दिसून येईल.

पुढील नियोजन काय असेल?

दोन महिन्यांसाठी ही बंदी घातली आहे. आगामी काळातही या रिक्षांना वाहतुकीची शिस्त लागली नाही तर, निश्चित या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात येईल. नागरिकांनी याबाबत वाहतूक विभागाकडे सूचना मांडव्यात. त्यानुसार पुढील निर्णय घेऊ.

- खुशालचंद बाहेती,

सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक डिझेल रिक्षांवर शहरात प्रवासास बंदी घातली आहे. हा निर्णय फक्त बेशिस्तीपणामुळे घ्यावा लागला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर, कसलिही पूर्वसूचना न देता बंदी घातल्याने रिक्षाचालक संघटनेने विरोध केला आहे. या बंदीबाबत या दोन्ही पक्षांना काय वाटते, त्याचे सवाल-जवाब.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद टॉप २०मध्ये येईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्मार्ट सिटीच्या टॉप २०मध्ये येण्याची क्षमता औरंगाबादमध्ये आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आपल्या शहराचा टॉप २०मध्ये नक्की समावेश होईल,' असा विश्वास महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी 'मटा' शी बोलताना व्यक्त केला.

महाजन म्हणाले, 'स्मार्ट सिटी अभियानासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. औरंगाबादच्या अनेक सकारात्मक बाबी आहेत. या शहराची ऐतिहासिक, धार्मिक म्हणून ओळख आहे, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या दळवळणाच्या सुविधा या आहेत. पाण्याची कमतरता नाही. पर्यटनाला अधिक चालना मिळाली तर, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. या बळावर स्मार्ट सिटी अभियानात पहिल्या विसात आपला समावेश होईल असे वाटते. शहरात केंद्र सरकारच्या निधीतून समांतर जलवाहनी व भूमिगत गटार योजनेची कामे सुरू आहेत. या योजनांसाठी दिलेला पैसा महापालिकेतर्फे योग्य प्रकारे खर्च केला जातो, असा विश्वास केंद्रात निर्माण झाला आहे. या विश्वासाचा फायदा होईल,' असे महाजन म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवासेनेत ऋषिकेश जैस्वाल यांचे लॉचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेमध्ये खासदारपुत्रापाठोपाठ आता माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजिव ऋषिकेश जैस्वाल यांचेही शनिवारी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत लॉचिंग झाले. त्यामुळे औरंगाबादच्या युवासेनेमधील खदखदीला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.

शहरातील युवासेनेची धुरा कुणाच्या खांद्यावर, यावरून गेल्या काही महिन्यांपासून खल सुरू आहे. सध्या युवासेनेची कार्यकारिणी अस्तित्वात नाही. कार्यकारिणी निवडीसाठी आतापर्यंत दोन वेळा मुंबईस्थित नेत्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या, पण त्यातून काहीच मार्ग निघाला नाही. दिवाळीच्या निमित्याने शेतकरी कुटुंबातील महिलांना फराळ साहित्याचे वाटप करण्यासाठी आदित्य ठाकरे शहरात आले होते. शहानूरवाडी येथील श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पालकमंत्री रामदास कदम यांनी मनोगत व्यक्त केले. 'फराळाचे साहित्य जमा करून त्याचे व्यवस्थित पॅकिंग करण्याचे काम प्रदीप जैस्वाल, त्यांच्या मुलाने व जिल्हाप्रमुखाने केले आहे,' असा उल्लेख कदम यांनी केला. 'आदित्य यांच्या हस्ते प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश यांचा सत्कार केला जाणार आहे,' असे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ऋषिकेश खैरे यांचा सत्कार केला. यावेळी महापालिकेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळही उपस्थित होते.

आदित्य यांनी आपल्या भाषणात या सत्काराचा उल्लेख केला. ते जैस्वाल यांना उद्देशून म्हणाले, 'प्रदीपजी तुमचा सत्कार बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाला, उध्दवजींनीही तुमचा सत्कार केला आहे. आज माझ्या हातून तुमच्या मुलाचा सत्कार होत आहे.' औरंगाबादमधील युवासेनेचा कर्ताधर्ता कोण यावरून खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र नगरसेवक ऋषिकेश खैरे व प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनीच ऋषिकेश जैस्वाल यांचे लॉचिंग केल्यामुळे खैरेंचे नाव मागे पडल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण क्षेत्राचे ‘बुरे दिन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कला, क्रीडा शिक्षकांची पदे रद्द करणे, पात्र शाळांना वेतन अनुदान न देणे अशा अनेक निर्णयांमुळे शिक्षण क्षेत्राचे बुरे दिन सुरू आहेत; असा आरोप करत शिक्षक, संस्थाचालकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.

घोषित करण्यात आलेल्या अनुदान पात्र शाळांना अनुदान देण्यात यावे, २८ ऑगस्टचा शासन आदेश हा राज्यातील शिक्षण व्यवस्थेला अस्थिर करणारा आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आले असून, कला व क्रीडा शिक्षकांची पदे रद्द करणे यासारखे अनेक निर्णयही शिक्षण व्यवस्थेला घातक आहेत, असे आरोप करत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये असेच आंदोलन करत शासनाच्या चुकीच्या ध्येयधोरणाचा निषेध करण्यात आला.

आंदोलनात 'शिक्षण वाचवा' अशा आशयासह विविध मागण्यांचे फलक हाती घेत आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष मिलिंद पाटील, वाल्मिक सुरासे, मनोज पाटील, एम. पी. सुरगडे, एस. पी. जवळकर, पी. एम. पवार, अजमल खान, उद्धव भवलकर, युनूस पटेल, मंगला हुमे, महेश पाटील, थॉमस खरात, प्रकाश वाघमारे, नामदेव सोनवणे, असलेम शेख, रेखा शिंदे, आनंद खरात, सुरेखा शिंदे, सलीम मिर्झा बेग, सुभाष महेर, विजय काथार, ए. जी. पाटील यांची उपस्थिती होती.

पुढचा टप्पा 'झोपमोड आंदोलन'

विविध मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकांच्या संघटनांनी एकत्र येत 'महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती' स्थापन केली आहे. समितीने शनिवारपासून आंदोलनाला सुरुवात केली. घंटानाद आंदोलनानंतरचा पुढचा टप्पा १४ ऑक्टोबर रोजी 'झोपमोड आंदोलन' करण्यात येणार आहे. आमदार, खासदारांच्या घरासमोर रात्री उशिरा जाऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट कलावंतांचा आज सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, प्रेम चोप्रा, शहरातील गीतकार एम. प्रकाश यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अन्य कलावंतांना रविवारी सन्मानित करण्यात येणार आहे. संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता हा सत्कार सोहळा होईल.

एनआरआय मीडिया पॉवर व तहेलका डान्स अॅकेडमीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. संगीतकार दिलीप सेन, सुनंदा चित्ते, संच कुमार, प्रभात मोरे, जगन्नाथ मंचेकर, विजय कांबळे यांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरे समजून शेतकऱ्यांची घरे वाचवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंदिरे वाचवणे महत्त्वाचे आहेच. ती वाचवाच. सोबतच शेतकऱ्यांची घरेही मंदिरासारखी समजा आणि त्यांनाही वाचवा,' असे आवाहन करत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच शनिवारी घरचा आहेर दिला.

दिवाळीच्या निमित्ताने शिवसेनेतर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील महिलांना फराळ साहित्याचे वाटप आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, महापौर त्र्यंबक तुपे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, शहरप्रमुख राजू वैद्य यांच्यासह विशाखा राऊत, मीना कांबळे यांची विशेष

उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे म्हणाले, 'दुसऱ्या कोणत्याही पक्षाने अशी मदत केली नाही. पालकमंत्री तुमच्या घरी येऊन मदत करीत आहेत. सर्वांना मदत मिळेल याचा मला विश्वास आहे. शिवसेनेची मदत घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. आता मलाही तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही मदत घेऊन जेव्हा आपापल्या घरी जाल तेव्हा आपल्या ओळखीच्यांना, शेजारच्यांना आत्महत्या करू नका असे सांगा. कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय नाही. शिवसेना तुमच्या मदतीसाठी धावून येईल, लढण्यासाठी तुमच्या सोबत उभी राहील.'

रामदास कदम, चंद्रकांत खैरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सातारा तांडा येथील द्रोपदाबाई बदर व अनसूया पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले, राजू वैद्य यांनी आदित्य ठाकरे यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने दिवा भेट दिला. अंबादास दानवे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images