Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

फटाक्यांच्या दुकानांना मुखेडमध्ये आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

मुखेड शहरात जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर थाटण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानांना सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण १६ दुकाने खाक झाली असून, यामध्ये आठ मोटारसायकली आणि एक ऑटोही खाक झाली आहे. या घटनेत ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर फटाक्यांची दुकाने लावण्यात आली असून, यातील एका दुकानाला सायंकाळी आग लागली. त्यानंतर काही वेळातच बाजूच्या दुकानांमध्येही आग पसरली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत फटाक्यांचा आवाज येत होता. घटनास्थळी दोन हजार नागरिकांचा जमाव जमला होता. पाणी टंचाईमुळे आणि एकच अग्निशामक दलाची गाडी असल्याने तत्काळ पाण्याचे बंब पोचू शकले नसल्याने मोठे नुकसान झाले.

फटके खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आगीमुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक सैरावैरा पळत सुटले. त्याचवेळी फटाक्याच्या दुकानांजवळ उभ्या असलेल्या ग्राहकांच्या दुचाकींनीही पेट घेतला. या परिसरात बाजूलाच असलेले एक घरही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पोलिस आणि अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी येईपर्यंत बहुतेक सर्वच दुकाने जळून खाक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गिर्यारोहक मनीषाची दिवाळी भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया यांच्या सीमेवरील किलिमांजारो शिखर अवघ्या सहा दिवसांत सर करून औरंगाबादची गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिने दिवाळी भेट दिली. १८ हजार ९२० फूट उंचीचे शिखर पादाक्रांत करणारी मनीषा ही मराठवाड्यातील एकमेव गिर्यारोहक ठरली.

ऑस्ट्रेलिया आणि रशियातील शिखरे पादाक्रांत केल्यानंतर मनीषाने दक्षिण आफ्रिकेतील किलिमांजोरो हे शिखर सर करण्याचे स्वप्न पाहिले होते. तीन खंडातील शिखरे सर करणारी मनीषा ही पहिलीच औरंगाबादची गिर्यारोहक आहे. 'शेतकरी वाचवा, देश वाचवा' हे घोषवाक्य घेऊन मनीषा या मोहिमेत सहभागी झाली होती.

किलीमांजारो शिखराची मोहीम बारा दिवसांची होती, परंतु मुसळधार पावसामुळे सहा दिवसांमध्येच शिखर सर करण्याचे तिने ठरवले. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतच होता. पावसाची शक्यता अधिक असल्याने मोहिमेत पुढे सरकने अथवा रद्द करणे हे दोन मार्ग तिच्यासमोर होते. मनीषाने पाऊस पडत असतानाही शिखरावर चढण्याचे आव्हान स्वीकारले. सोमवारी सलग १४ तास चालताना अनेक संकटांचा यशस्वी सामना करीत तिनेने शिखर पादाक्रांत केले. शिखर पादाक्रांत करून ती पायथ्याशी परतली तेव्हा किलिमांजोरो शहरात मुसळधार पाऊस कोसळतच होता. या मोहिमेबद्दल 'मटा'शी बोलताना मनीषा म्हणाली, 'किलिमांजोरो शहरात मोहिमेसाठी दाखल झाली तेव्हा नऊ नोव्हेंबरपासून पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. त्यामुळे ही मोहीम सहा दिवसांतच पूर्ण करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. अन्यथा ही मोहिमच रद्द करावी लागली असती. शिखरावर पोहचले तेव्हा प्रचंड वाऱ्याचा सामना करावा लागला. 'लावा टॉवर' आणि ज्वालामुखी केंद्र प्रथमच एवढ्या जवळून पाहण्याची संधी मिळाली. शिखर सर केल्याचा मोठा आनंद आहे. तिन्ही खंडातील शिखरे पादाक्रांत करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले यापेक्षा मोठा आनंद नाही.'

जुलै महिन्यात मनीषाने रशियातील 'माउंट एलब्रस' हे युरोप खंडातील सर्वाधिक उंचीचे शिखर मानले जाते. १८ हजार ७०० फूट उंचीचे हे शिखर मनीषाने सर केले होते. या मोहिमेसाठी मनीषाला विनोत नरवडे, सुरेंद्र शेळके, आनंद बनसोडे, डॉ. भीमराव खाडे, जगदीश खाडिलकर, शशिकांत सिंग यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

हवामानाचा अंदाज बांधणे अतिशय कठीण होते. एकाच दिवसांत तीन्ही ऋतुंचा अनुभव येथे घेता येतो. मुसळधार पावसाअगोदर शिखर सर केल्याचा आनंद वाटतो. अन्यथा मोहिम रद्द करावी लागली असती. - मनीषा वाघमारे, गिर्यारोहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडमध्ये तख्तस्नान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

तख्त सचखंड श्री हजूर साहिब धार्मिक स्थळावर मंगळवारी पारंपरिक तख्तस्नान साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक आणि देशभरातून आलेल्या हजारों भाविकांनी सहभाग नोंदवला. या वेळी गोदावरी नदीवरून तीन फेऱ्या करून भाविकांनी गुरुद्वारा स्वच्छ केले.

सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे तख्त स्नानाच्या सेवेस सुरुवात झाली. गुरुद्वारामध्ये असलेल्या श्री अंगीठासाहेब (गर्भगृह) येथील ऐतहासिक आणि जुन्या शस्त्रांना बाहेर काढून त्यांची सफाई सुरू केली गेली. संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या मार्गदर्शनात सर्व विधी पार पाडण्यात आले. मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी यांनी तख्तस्नान कार्यक्रमाची अरदास केली. श्री गुरू ग्रंथसाहिबाची समाप्ती आणि त्यांच्या स्थलांतरणाचे कार्य हेडग्रंथी ज्ञानी कश्मीरसिंघजी आणि मीत ग्रंथी ज्ञानी अवतारसिंघजी शितल तसेच भाई रामसिंघजी धुपीया यांनी केले. त्यांना या कार्यात भाई जगींदरसिंघजी, ज्ञानी बख्शींसिंघ कथाकार, ज्ञानी अमरजीतसिंघ कथाकार, महेन्द्रसिंघ पैदल यांनी मदत केली.

घागरची सेवा घागरिया भाई हरदयालसिंघ जी यांनी केली. या वर्षी गोदावरी नदीत पाण्याची उपलब्धता नव्हती. तसेच शासकीय पातळीवरून गोदावरी नदीत विष्णुपुरी बांधातून पाणी सोडण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आल्या मुळे पाण्याचे नियोजन नगिनाघाट येथील सरोवरातून करण्यात आले.

नगिनाघाट येथील सरोवराला स्वच्छ करून गोदावरीचे पाणी त्यात साठवण्यात आले. भाविकांनी सरोवरामधून भांड्याने व घागरीने पाणी भरून तख्त स्नान कार्यक्रमात सहभाग घेतला. नगिनाघाट येथे पहली घागर भरून झाल्यानंतर घागरची आरती ओवाळण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याची दहशत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागील ६ महिन्यांपासून वारंवार बिबट्या दिसूनही वन विभागाने कन्नड तालुक्यात सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाही. आलापूर गावात शनिवारी बिबट्याने बैलाचा फडशा पाडला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड दहशत पसरली असून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने हालचाल केली नसल्याने लोक भयभीत झाले आहेत.

कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या परिसरात मागील पाच वर्षात उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेकडो एकरवर ऊस असल्यामुळे रानडुकरे व बिबट्याचा वावर वाढला आहे. पाणी व सुरक्षित जागा असल्यामुळे वन्यप्राण्यांनी नागरी वसाहतीत शिरकाव केला आहे. आलापूर शिवारातील एका गोठ्यात शनिवारी बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात गोठ्यातील जनावरे दावे तोडून पळाले; मात्र एका बैलाचा बिबट्याने फडशा पाडला. या घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कन्नडचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची नुकतीच बदली झाली आहे.

सध्या या परिक्षेत्राचे काम खुलताबाद वनपरिक्षेत्र अधिकारी गवंडर सांभाळत आहेत. आलापूर शिवारात बिबट्या दिसल्याच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गवंडर यांच्याशी संपर्क साधला; मात्र त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. देवगाव (रंगारी), देभेगाव, अंतापूर, आलापूर, केसापूर, जैतापूर, टाकळी, टापरगाव, लव्हाळी, जळगाव परिसरात बिबट्याचा वावर आहे. मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्या दिसला आहे. हा प्रकार वन विभागाने गांभीर्याने घेतला नसल्याने गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे.

उसाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या भागात बिबट्या किमान एक वर्षे मुक्काम करतो. शिकार करण्यासाठी बिबट्या रात्री बाहेर पडतो. ऊसतोड सुरू होताच बिबट्या वास्तव्य बदलतो. सध्या ऊसतोड सुरू झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बिबट्याचा वावर असल्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये दहशत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपोविरुद्ध उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

महापालिकेच्या प्रस्तावित कचरा डेपोविरुद्ध तीसगाव महानगर बचाव व आरोग्य कृती समितीने मंगळवारपासून (१० नोव्हेंबर) साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे तीसगावकरांची ही दिवाळी उपोषणात जाणार आहे.

प्रस्तावित कचरा डेपोला तीसगावकरांनी कडाडून विरोध केला असूनही पालिकेने डेपो करण्याचा ठाम निर्धार केला आहे. त्यामुळे यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी नगर रोडवर रास्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोकोमध्ये सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

कचरा डेपोला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीतर्फे मंगळवारपासून तीसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणात माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे, तीसगावचे सरपंच अंजन साळवे, ग्रामपंचायत सदस्य मोहन चौधरी, संजय जाधव, राहुल सावंत, कैलास जाधव, अस्लम शेख, ईश्वर तरैय्यावाले, किशोर म्हस्के, सोमीनाथ महापुरे, संतोष दळे, अशोक त्रिभुवन, दशरथ महापुरे, भुषण साळवे, पवन दाभाडे, विलास पठारे, शोभा सोनवणे, सिद्धुबाई जंगले, नंदा पवार, सुशीला तोले, सुंदरबाई जाधव, सुनंदा त्रिभुवन रुख्मणबाई वाघमारे, शालू खरात, मंदा घोरपडे, वंदना जाधव, सखुबाई अंगिरे, अशोक निकम, संजय वाहुळ यांच्यासह २५ ते ३० नागरिकांनी सहभाग घेतला. या साखळी उपोषणाला काँग्रेसने पाठिंबा दिला. माजी खासदार उत्तमसिंग पवार, प्रदेश चिटणीस जितेंद्र देहाडे, शरद जाधव यांनी भेट दिली. पालिकेच्या निर्णयाया काँग्रेसने निषेध केला असून शुक्रवारी दिवसभर काँग्रेसतर्फे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र देहाडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२७ गावांत स्वच्छता संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील १२७ गावे वर्षभरात हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत विभागाने भाऊबीजसाठी आगळावेगळा संदेश तयार केला आहे. या संदेशाच्या माहितीपत्रकांचे वाटप मंगळवारी औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यांतील गावांमध्ये करण्यात आले. पंचायत विभागाने यंदा हागणदारीमुक्तीसाठी १२७ गावे निवडली आहेत. ८५६ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायती पूर्वीच हागणदारीमुक्त झाल्या आहेत.

नवीन उद्दिष्टानुसार निवड केलेल्या गावांमधून मोहीम राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी उपाययोजना संकलित केल्या. त्यात दिवाळीनिमित्त गावागावांमध्ये माहितीपत्रके वाटप करण्याचे ठरले. त्यावर संदेश कोणता द्यायचा ? याविषयी माहिती मागविण्यात आली. भाऊबीज सणाचे महत्व आपल्याकडे खूप आहे. त्याला अनुसरून घोषवाक्य निवडण्यात आले. भाऊबीजची ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्यापेक्षा एक शौचालय बांधून दे, अशी मागणी बहीण करत असल्याचे हे घोषवाक्य आहे. फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये मंगळवारी सकाळपासून घरोघरी जाऊन माहितीपत्रक देण्यात आले. यंदा भाऊबीजनिमित्त घरी येणाऱ्या भावाला हे पत्रक द्या जेणेकरून तुमच्या घरात शौचालय बांधता येईल, असे यातून सूचविण्यात आले. सीइओ चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांच्यासह पंचायत विभागातील अधिकारी, कर्मचारी चौका, गणोरी, फुलंब्री गावांमध्ये गेले आणि माहितीपत्रके वाटली. जिल्ह्यातील १२७ गावांमधून ५० हजार माहितीपत्रके वाटप करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकोला ते परळी पॅसेंजरमध्ये सोमवारी एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून घेण्यात आले. यावेळी या महिलेवर हल्ला करून गळा चिरण्यात आला. रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्याने काळात प्रवाशांवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत.

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून रोज ३४ रेल्वे धावतात. त्यापैकी १२ पॅसेंजर व २४ एक्स्प्रेस आहेत. अलिकडील काळात रेल्वेत प्रवाशांच्या सामानाची चोरी, छेडछाड आदी प्रकार वाढले आहेत. अकोला-परळी पॅसेंजरमध्ये घडलेल्या घटनेप्रमाणे परतूर येथे दगडफेकीचे प्रकार व इतर घटना घडल्या आहेत. पॅसेंजर रेल्वेत सुरक्षारक्षक नसल्याने नसल्याने प्रवाशांच्या जीवाला आणि संपत्तीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरी अनेक रेल्वेमध्ये सुरक्षा दलाचा कर्मचारी नसतो. एखादी घटना घडल्यास मदतीसाठी सुरक्षारक्षक नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. यामुळे एक्स्प्रेस असो की पॅसेंजर दोन्ही रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल रेल्वे प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे जाणवते. औरंगाबादहून सुटणाऱ्या हैदराबाद पॅसेंजर, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, हायकोर्ट एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नसतात.

मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये परभणी, पूर्णा येतील रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी लासूरपर्यंत असतात. तेथून मनमाडपर्यंत सुरक्षा नसते. मुंबईहून येणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये लासूर स्टेशनवरून सुरक्षारक्षक चढतात, ते परभणी किंवा सेलूपर्यंत प्रवास करतात. नगरसोल नरसापूर, विजयवाडा, शिर्डीला पाठविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सुरक्षारक्षक आहे. देवगिरी एक्स्प्रेसमध्ये नांदेड येथील सुरक्षा दलाचे कर्मचारी असतात. अंजठा एक्स्प्रेस आणि काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये प्रत्येकी चार सुरक्षारक्षक तैनात असतात.

१५ वर्षे जुनी पदसंख्या

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा दलाची पदसंख्या १५ वर्षांपूर्वी धावणाऱ्या रेल्वेच्या तुलनेत आहे. सध्या धावणाऱ्या रेल्वे व प्रवासी संख्येच्या तुलनेत ६० सुरक्षारक्षकांची गरज असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदयरुग्णांच्या अकाली मृत्यूमागे मधुमेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे भारतीयांमध्ये मधुमेह मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तो अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहे. हृदयरोगाने अकाली मृत्यू होण्यामागे, तसेच अकाली पक्षाघात किंवा किडनीविकार होण्यामागे सर्वाधिक कारण हे विशी-तिशीत होणारा मधुमेहच आहे. त्यावर मधुमेह नियंत्रणात ठेवणे हाच उपाय असल्याचा इशारा वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक मधुमेह दिन १४ नोव्हेंबर रोजी साजरा होतो आहे. यानिमित्ताने मधुमेहतज्ज्ञ डॉ. विशाल ढाकरे-सिल्लोडकर व डॉ. महेशकुमार बनसोडे यांनी मंगळवारी (१० नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत मधुमेहाबाबत विविध तत्थे मांडली. हृदयविकार व हृदयविकाराचा झटका, मेंदूचा अटॅक म्हणजेच पक्षाघात (स्ट्रोक), मूत्रपिंडाचे आजार यांच्या मुळाशी मधुमेह हाच मुख्य आजार आहे. दुर्दैवाने सद्यस्थितीत भारता हा मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जात आहे. आज भारतामध्ये ६३ दशलक्ष व्यक्तींना मधुमेह आहे. शहरी-ग्रामीण भागातील १० ते १३ टक्के व्यक्तींना मधुमेह आहे व त्याहून दुप्पट व्यक्तींना पूर्व मधुमेह (प्री-डायबेटिस) आहे. सध्या झपाट्याने होत असलेले शहरीकरण, बैठी तसेच तणावपूर्ण व बिघडलेली जीवनशैली, झपाट्याने वाढते यांत्रिकीकरण, व्यायाम व श्रमाचा अभाव व विशिष्ट जनुकीय रचनेमुळे मधुमेहाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळेच इतर देशांच्या तुलनेत १० ते १५ वर्षे कमी वयातील व्यक्तींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सुयोग्य वेळी निदान न झाल्यामुळे किंवा तज्ज्ञांकडून नियमित उपचार न झाल्यामुळे रक्तशर्करा अनियंत्रित राहून हृदय, मेंदू, मूत्रपिंड या महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अतिशर्करेमुळे सूज येते. तसेच वाईट कोलेस्टेरॉलचे संथगतीने थर जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो व हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा दोन्ही मूत्रपिंड निकामी होणे, यासारखे आजार अकाली वयात होतात. अशा आजारांमध्ये मृत्यू किंवा कायमचे अपंगत्वही येऊ शकते. त्यामुळे संतुलित आहार, पुरेसा व्यायाम, सुदृढ जीवनशैली, व्यसनमुक्ती, मधुमेहाचे योग्य वेळी निदान व योग्य उपचार गरजेचे असल्याचे डॉ. ढाकरे म्हणाले.

.........

इन्सुलिन फ्रीजमध्ये न ठेवता थंड जागी ठेवा.

इन्सुलिन पाण्याच्या माठाजवळ ठेवावे.

इन्सुलिन २८ दिवस 'रूम टेम्प्रेचर'मध्ये चांगले राहते.

जेवणाआधी ३०-४० मिनिटे इन्सुलिन घ्या.

उशिर झाल्यास घाम येतो-घबराट होते.

इन्सुलिन घेणाऱ्यांनी ४-५ वेळेस थोडे-थोडे खावे.

इन्सुलिन घेणाऱ्यांनी अजिबात उपवास करू नये.

..........

औषधी-गोळ्यांनी रक्तातील साखर जेवणापूर्वी ११० च्या आत व जेवणानंतरची १८० च्या आत राहात नसेल, तर मधुमेहतज्ज्ञांच्या सल्ल्याने व 'एचबी ए वन सी' या तपासणीच्या निष्कर्षानुसार इन्सुलिन इंडेक्शन सुरू करणे गरजेचे आहे. योग्य वेळी इन्सुलिन सुरू केले तर डोळ्यांच्या पटलावरील 'रेटेनोपॅथी', मूत्रपिंडावरील (किडनी) 'नेफ्रोपॅथी', मेंदू व मज्जातंतुचे 'न्युरोपॅथी' असे मधुमेहाचे दुष्परिणाम टाळता येतील. इन्सुलिनविषयीचे गैरसमज व भीती सोडून वेळेत सुरू करावे, असे आवाहन डॉ. बनसोडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुकट पास नाहीच!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातल्या एकाही माध्यमिक विद्यार्थ्याला फुकटचा पास मिळणार नाही. उच्च माध्यमिक आणि महाविदयालयीन विद्यार्थ्यांसाठी 'स्वाती मोफत पास योजना' जाहीर करण्यात आली. मात्र, या योजनेतील एसटीच्या परिपत्रकात मराठवाड्याचा शैक्षणिक असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ही योजना या विदयार्थ्यांसाठी आहे किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर अखेर पडदा पडला आहे.

कन्नड अंधारी या एसटीतून कन्नड ते कोळसवाडी, गारगोटी, पोळसवाडी, मेहगाव, वासाडी पर्यंत अनेक माध्यमिक विद्यार्थी शिक्षणासाठी रोज प्रवास करतात. याशिवाय वासाडीहून पिशोर, मोहाडी, सारोळा, नाचनवेल या मार्गावर शंभरच्यावर विद्यार्थी प्रवास करतात. यात ३० विदयार्थी महाविदयालयीन आहेत.

अशाच प्रकारे ग्रामीण भागात सोयगाव, गंगापूर, वैजापूर, पैठण, राजूर आणि फुलंब्रीसह अनेक मार्गावर विद्यार्थ्यांना दररोज प्रवास करावा लागतो. स्वाती योजनेचे परिपत्रक आल्यानंतर माध्यमिक विद्यार्थ्यांना सदर पास योजना लागू आहे किंवा नाही याबाबत एसटी विभागात संभ्रम निर्माण झाला होता. या परिपत्रकाबाबत त्यांनी थेट मुंबईला स्थानिक अधिकाऱ्यांनी विचारून आपल्या शंका त्यांना सांगितल्या. तेव्हा माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ही योजना तूर्तास नसल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

.......

औरंगाबाद जिल्हयात रोज ५ हजार विदयार्थी शिक्षणासाठी एसटीने प्रवास करतात. या विद्यार्थ्यांना 'स्वाती' योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आधीच दुष्काळाने होरपळलेल्या या विद्यार्थ्यांना आगामी काळात काटकसरीने प्रवास करावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४०० शाळा दत्तक घेणार

$
0
0


Ashish.Choudhari@timesgroup.com

औरंगाबाद - ग्रामीण भागातील कुटुंबांचे रोजगारासाठी वाढते स्थलांतर, मुलींच्या बालविवाहामुळे उच्च माध्यमिक शाळांमधील गळतीचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. पाच जिल्ह्यांत हे प्रमाण तब्बल ५५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. तेथील ४०० शाळा शिक्षण विभाग दत्तक घेणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. स्थलांतर रोखण्यासाठी गरज पडेल तेथे तात्पुरती वसतिगृहेही उभारली जाणार आहेत.

शिक्षणाचा स्तर वाढत जाताना गळतीचे प्रमाणही वाढते. उच्च माध्यमिक शिक्षणात आठवीनंतर ग्रामीण भागात शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः मुलींचे प्रमाण अधिक आहे. ही गळती रोकण्यासाठी शिक्षण विभागाने कृतीशील उपक्रम हाती घेत आहे. राज्यात गळतीचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या पाच जिल्ह्यांतील तब्बल ४०० शाळा शासन दत्तक घेणार आहे. मुलांना शाळांकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, जनजागृतीचे कार्यक्रम गावागावांत घेण्यात येतील. या गावांतील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, याची जबाबदारी शिक्षण विभाग घेणार आहे. या उपरक्रमाचा दरमहा त्याचा आढावा घेतला जाईल.

शाळांमधील गळती वाढण्यामध्ये कुटुंबांचे स्थलांतरही कारणीभूत आहे. हे लक्षात घेत दत्तक घेतलेल्या शाळांमधील ‌विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या खर्चापोटी दरमहा प्रत्येकी ५०० रुपये शासन देणार आहे. काही गावांमध्ये तात्पुरत्या स्वरुपाची वसतिगृहे उभारून विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका, गडचिरोलीतील भामरागड, नांदेडमधील हदगाव, हिंगोलीतील सेनगाव, परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील ४०० शाळांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मेच पाणी पोचले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगर-नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या ७.०७ टीएमसी पाण्यापैकी मंगळवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणात ३.७२ टीएमसी पाणी पोचले.

सध्या जायकवाडी धरणामध्ये १८८.५२२ दशलक्ष घनमीटर (८.६८ टक्के) अशी पाणीसाठ्याची स्थिती असून, धरणात पाण्याची आवक आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. जायकवाडीत उर्ध्व भागातील धरण समूहातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून ऊर्ध्व प्रकल्पातून ७.०७ टीएमसी पाणी सोडण्यात आले. यापैकी ३.७२ टीएमसी पाणी धरणात दाखल झाले आहे. पाणी सोडण्याचा कोटा पूर्ण होत असल्यामुळे मुकणे, दारणा तसेच मुळा धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत मुळा प्रकल्पातून १.८१, निळवंडे १.४२, दारणा २.४२, कडवा ०.३८, मुकणे ०.०७, आळंदी ०.५, गंगापूर धरणातून १.१९ तर ऊर्ध्व धरणातील वापरासाठी ०.२१ टीएमसी असे एकूण ७.०७ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. अद्यापही ५.१४ टीएमसी पाणी सोडणे शिल्लक असले तरी, प्रत्यक्षात एकूण आठ ते नऊ टीएमसी पाणीच येईल. त्यामुळे २५ ते ३० टक्के पाण्याचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरसाठी उजनीतून पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर शहराला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून उजनी धरणातील पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या पाइपलाइनसाठी मंजूर रकमेपैकी ४४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. या कामाच्या निविदा आठ दिवसांत निघणार असल्याची माहिती पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे. यावर कायमस्वरुपी पर्याय काढण्याच्या उद्देशाने भाजपचे आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर हे प्रयत्नशील होते. त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून उजनी येथील धरणातून लातूर शहराला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या पाइपलाइनसाठी अंदाजे अडीचशे ते दोनशे ७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असून त्यास महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच मंजूरी दिली आहे. मंजूर रकमेपैकी ४४ कोटी रुपये आयुक्त कार्यालयामार्फत लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून येत्या आठ दिवसांत पहिल्या टप्प्यातील कामांच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे आमदार निलंगेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुळातच लातूर शहराचा गेल्या वर्षांतील विकासाचा वाढता आलेख व लोकसंख्येचा विचार करता प्रतिवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रकर्षाने भासते आहे. पावसाचे प्रमाण समाधानकाकर राहिले तरी लातूरच्या नागरिकांना आठ दिवसांतून एकदा नळाद्वारे पाणी मिळते. त्यात यंदाच्या भिषण दुष्काळामुळे आठ दिवसाला पुरवठा होणारे पाणी दिवसांवर जाऊन पोहचले आहे. आमदार निलंगेकर, अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या या योजनेमुळे लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असा दावा भाजपाने पत्रकात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट औषधांचा कारखाना उद‍्ध्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडीमध्ये आयुर्वेदाच्या औषधींपासून अन्य बनावट औषधी बनविण्याचा कारखाना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या सहकार्याने उद्ध्वस्त केला. मोठ्या प्रमाणात औषधी येथून जप्त करण्यात आली. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जयप्रकाश दाभाडे याला अटक केली आहे.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी मुंकुंदवाडी भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी संकेत मोबाइल शॉपीजवळ जयप्रकाश दाभाडे हा ३५ वर्षीय (रा. विश्रांतीनगर) युवक संशयास्पद हालचाली करताना आढळला. पोलिसांना त्याच्याकडे आयुर्वेदाच्या गोळ्या आढळल्या. त्याची अधिक चौकशी केली असता त्यांने गोळ्या तयार करण्याच्या कारखान्याबाबत माहिती दिली.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश अघाव यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुकुंदवाडीतील विश्रांतीनगर भागातील एका घरावर छापा मारला. तेथील किचन रूममध्ये औषधींचा साठा पोलिसांना आढळला. याशिवाय औषधींपासून बनावट औषधी तयार करण्याचे साहित्यही यावेळी जप्त करण्यात आले आहे. या औषधींसोबत काही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनही येथे सापडल्या. या घरात आयुर्वेदिक औषधीपासून बनावट औषधी तयार करण्याचा धंदा खूप दिवसांपासून सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी जयप्रकाश दाभाडे याच्यावर मुंकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारे बनावट औषधी तयार करण्याचे कारखाने सुरू असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दर्दहर तेल - अंदाजे तीन हजार लेबल्स

दर्दनिवारक तेल - अंदाजे पाच हजार लेबल्स

आम बाम वापर वटी - तीन हजार लेबल्स

पुरुषार्थ कॅप्सूल - तीन हजार लेबल्स

सन्स पुरुषार्थ कॅप्सूल - आठ हजार लेबल्स

अॅटीक्शन निल चुर्ण - पाच हजार लेबल्स

आयुर्वेदिक औषधींच्या गोळ्यांचा साठा आणि इतर काही गोळ्यांचा साठाही जप्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत अर्धा तास आधी तिकीट कन्फर्म

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवाळी व सणासुदीच्या काळात तिकीट कन्फर्म करण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागते. औरंगाबादहून जाणाऱ्या प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाने अर्धा तास आधी तिकीट कन्फर्म करण्यासाठी योजना जाहीर केली आहे. ही योजना गुरुवारपासून लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रेल्वे विभागाने रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी नवीन योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी रेल्वे सुटण्याच्या दोन तासआधी रेल्वेचार्ट तयार केला जात होता. आता रेल्वेचार्ट चार तास आधी तयार करण्याची कारवाई मागील ८ दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. रेल्वे चार्ट तयार झाल्यानंतर एखाद्या रेल्वेतील शिल्लक जागा रेल्वे निघण्याच्या अर्धा तास आधीपर्यंत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे विभागाने चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय तत्काळ लागू केला आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या रेल्वेची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. १२ मेल आणि २२ एक्स्प्रेस धावत असून रोज १५ ते २० हजार प्रवाशी जातात. यातील अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट न मिळाल्याने साधे तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे. रेल्वे विभागाने या प्रवाशांच्या सोयीसाठी अर्धा तास आधी तिकीट कन्फर्म करण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी वेटिंगवरील प्रवाशांचे तिकीट कन्फर्म केल्यानंतर शिल्लक व ऐनवेळी प्रवास रद्द करणाऱ्या प्रवाशांच्या जागा, ऑनलाइन बुकिंगनंतरही रिक्त जागा, बर्थ इतरांना मिळ‌ण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

अशी आहे सद्यस्थिती : सध्या चार तास आधी चार्ट तयार केल्यानंतर, अनेक रेल्वेचे बर्थ रिक्त राहतात. रिक्त जागांची माहिती टीसीला असते. यामुळे रेल्वेच्या नियमानुसार फाइनसह अतिरिक्त शुल्क भरून तिकीट कन्फर्म करून घ्यावे लागत आहे. नवीन योजना लागू केल्यानंतर, टीसीच्या मनमानीला आळा बसणार आहे.

........

जालना-औरंगाबाद- दादर जनशताब्दी रोज सकाळी ६.२० वाजता औरंगाबाद येथे पोहोचते. या रेल्वेत अनेकदा बर्थ रिक्त असतात. तिकीट रद्द केल्याने, ऑनलाइन ‌बुकिंगचा कोटा कमी झाल्याने, या रेल्वेचे काही ब‌र्थ, सीट रिकाम्या असतात. यामुळे अनेकदा जनशताब्दी एक्स्प्रेस निघण्याच्या काही वेळेआधी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेल्यांना जनशताब्दीचे कन्फर्म तिकीट मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मे सिग्नल बंद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा देण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील निम्मे वाहतूक सिग्नल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असून ते सुरू करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नाही. त्यामुळे रस्त्यांवर व चौकात वाहतूक कोंडी नित्यांची झाली आहे.

शहरातील रस्ते व वाहतूक व्यवस्था कशी आहे, यावर त्या शहराची प्रतिमा तयार होते. राज्याची पर्यटन राजधानी असूनही अनेक रस्ते सुस्थितीत नाहीत. वाहतूक व्यवस्था पोलिसांची जबाबदारी असली तरी आवश्यक सुविधा देण्याची जबाबदारी मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, पण सुविधा पुरवण्याबद्दल पालिका फार गंभीर असल्याचे जाणवत नाही. रस्त्यावरील खड्डे भरणे, पुरेशी पार्किंग व्यवस्था, लेन मार्किंग, झेब्रा कॉसिंग, पदचारी मार्ग, सिग्नल उभारणी, दुभाजक आदी बाबी पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासीन आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने सिल्लेखाना, औरंगपुरा, आकाशवाणी, मोंढानाका, नगरनाका, ए. एस. क्लब आदींसह शहरातील महत्त्वाच्या ३४ ठिकाणी सिग्नल उभारले आहेत. त्यापैकी बहुतांश सिग्नल मनपाचे आहेत. शहर व परिसरातील सर्व सिग्नलपैकी १७ बंद आहेत. परिणामी, सिग्नल बंद असलेल्या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. यातून बेशिस्त वाहतुकीला नकळत प्रोत्साहन मिळत आहे. या सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मनपा किंवा संबंधित विभागाची असते. त्याकरिता पोलिसांना कोणताही निधी मिळत नाही. सिग्नलवरील एखादा लाइट बंद झाल्यानंतर पोलिसांना त्या विभागाकडे पाठपुरावा करावा लागतो.

...........

सिग्नलची देखभाल दुरुस्ती वेळेवर व सतत करण्याची गरज आहे. परंतु, मनपाने याचे यावर्षी कंत्राट दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

.........

चीनचे उपराष्ट्रपती ली युआनचो हे नुकतेच शहरात येऊन गेले. त्याचा शहरात एक रात्र मुक्काम होता. ते विमानतळापासून निघाले तेव्हा त्यांच्या मार्गावरील वाहतूक सिग्नल बंद होते. शिवाय पथदिवेही बंद होते. त्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवली असली तरी त्यावेळी सर्व सुविधा सुस्थितीत असणे गरजेचे होते.

बंद सिग्नल

मिलकॉर्नर

अण्णाभाऊ साठे चौक

ज्युबली पार्क

पंचवटी

क्रांतिचौक

स्वा. सावरकर चौक

महानुभव आश्रम

औरंगपुराचौक

बाबुराव काळे चौक

हायकोर्ट

मुकुंदवाडी

एन वन चौकी

हॉटेल अॅम्बेसेडर

टीव्ही सेंटर

बजरंग चौक

महाराणा प्रताप चौक पंढरपूर

मोरे चौक पंढरपूर

(स्त्रोतः वाहतूक शाखा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट शिधापत्रिकेत पिछाडी

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट शिधापत्रिकेला आळा बसावा तसेच सर्वसामान्य जनतेचे धान्य परस्पर लाटणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी यासाठी शासनाच्या शिधापत्रिका आधार जोडणी मोहीम मराठवाड्यात अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आधार जोडणीच्या राज्याच्या आकडेवारीच्या तुलनेत मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड जिल्हे पिछाडीवर असून विभागात केवळ २९ टक्के जोडणी झाली आहे. विभागातील आधार जोडणीत ४५ टक्के जोडणी करुन लातूर जिल्हा अव्वल स्थानावर आहे.

या मोहिमेअंतर्गत कुटूंबातील प्रत्येक सदस्याची संपूर्ण माहिती एकत्र करण्यात येत असून या मोहिमेत कुटूंबातील सदस्य संख्या, पत्ता, बँक खाते आदी संपूर्ण माहिती, गॅस सिलिंडरची संख्या आदी माहिती भरून घेण्यात येत आहे. राज्यात शुभ्र, केशरी, आणि पिवळ्या शिधापत्रिका असलेल्या सर्व कार्डधारकांना आधार कार्डशी जोडण्याचा हा उपक्रम आहे. या मोहिमेमुळे बनावट शिधापत्रिकेला आळा बसेल, लाभार्थ्यांना अन्नधान्य, रॉकेल यांचा थेट पुरवठा होऊन सर्व प्रकारची अनुदाने देताना याचा लाभ होईल आणि त्यामुळे दुकानदारांच्या फसवेगिरीला आळा बसणार आहे. मात्र मराठवाड्यातून या मोहिमेस अत्यंल्प प्रतिसाद मिळत आहे.

सुरू करण्यात आलेल्या आधार जोडणी मोहिमेला राज्यभरात थंड प्रतिसाद मिळत असून सरकारी अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे मराठवाड्यात जोडणीची टक्केवारी केवळ २९ टक्के आहे. आधार जोडणीचा उद्देश व सध्याची स्थिती पाहता धान्य वितरणातील गळतीची कीड रोखणे त्यामुळे अवघड होणार आहे.

.........

आधार जोडणीत राज्याच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक २६ वा असून लातूर जिल्ह्याचा क्रमांक ५वा आहे. १८ व्या क्रमांकावर हिंगोली, जालना २२, परभणी २३, उस्मानाबाद २८, नांदेड ३१ तर बीडचा क्रमांक ३३ वा आहे. आधार जोडणीत राज्यामध्ये अमरावती अव्वल क्रमांकावर असून पालघर जिल्हा सर्वात शेवटी ३५ व्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर ‌महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये ४८ टक्के सदस्यांच्या आधार कार्डची जोडणी करण्यात आली होती. राज्याचे लक्ष ७ कोटी १६ हजार ६८४ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगळ्या वाटेचा खेळाडू

$
0
0

Shripad.Kulkarni@timesgroup.com

साधारणपणे १९९७-९८चा काळ. दिनेश वंजारे नववीत शिकत होता. सध्या विद्यापीठातील क्रीडा शिक्षक असलेले उदय डोंगरे व तो ज्ञानप्रकाश विद्यालयाच्या खो-खो टीममध्ये खेळत होते. एका स्पर्धेत त्यांची चांगली कामगिरी केली. त्या स्पर्धेची बातमी पेपरमध्ये आली. त्यात दिनेशचे नाव होते. त्याचे त्याला अप्रुप वाटले. खेळामध्येच करिअर करण्याचा निर्णय त्यावेळी त्याने घेतला. उदय डोंगरे यांचे मोठे भाऊ श्याम डोंगरे यांनी त्यावेळी शहरात तलवारबाजी खेळाला सुरुवात केली होती. दिनेश त्यावेळी खो-खोकडून तलवारबाजीकडे वळाला. हा खेळ त्यावेळी औरंगाबाद शहरालाही नवखा होता.

१९९९मध्ये नाशिक येथे राज्य स्पर्धेत दिनेशने सहभाग घेतला. त्यावेळी पदक जिंकता आले नाही, पण मोठ्या स्पर्धेत सहभागाचा अनुभव मिळाल. त्यानंतर २०००मध्ये नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे वरिष्ठ गटाची राज्य स्पर्धा झाली. या स्पर्धेत त्याला कांस्य पदक मिळाले. त्यानंतर त्याने मागे पाहिलेच नाही. २०१४पर्यंत त्याने सलग राज्य स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर सलग १३ राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेतला. आतापर्यंत दिनेशने विविध स्पर्धांत ४० पदके मिळविली आहेत.

बारावीमध्ये असताना खेळावे की खेळू नये, असा प्रश्न समोर आला होता. अभ्यासाकडे लक्ष द्यावे. खेळणे थांबवावे, असा कुटुंबीयांचा आग्रह होता. त्यावेळी वडिलांनी प्रोत्साहन दिले. खेळात करिअर करण्यासाठी पाठबळ दिले. हा प्रसंग द्विधा मनःस्थिती निर्माण करणारा होता, असे दिनेश सांगतो. २००५मध्ये तैवान चॅम्पिअनशिपमध्ये दिनेशने भारताचे प्रतिनिधित्व केले. हा त्याला आयुष्यातील मोठा क्षण वाटतो.

तलवारबाजी हा क्रीडाप्रकार वेगळा आहे. त्यामुळेच त्याची निवड केली. खेळाच्या तलवारी, पोषाख यांच्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. रायफल शुटिंगखालोखाल हा महागडा खेळ असल्याचे मानले जाते. तलवार चार ते पाच हजार रुपयांपर्यंत मिळते. चिनी बनावटीचा गणवेश ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत तर, रशियन बनावटीचा ६० ते ७० हजार रुपये लागतात. हा खेळ इलेट्रॉनिकवर आधारित आहे. टार्गेटवर तलवार विशिष्ट दाबाने पिंच केल्यावर मॅनिटरवरील लाइट लागतो. त्यानुसार पॅइंट मिळतात, असे दिनेशने सांगितले.

गेल्या दहा वर्षांपासून तो एमजीएम संस्कार विद्यालयात क्रीडा शिक्षकम्हणून कार्यरत आहे. तलवारबाजीचे प्रशिक्षण देण्याचे कामही तो दहा वर्षांपासून करीत आहे. त्याने प्रशिक्षित केलेले तीन ते चार खेळाडू दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होतात.

आता पालक तलवारबाजीबाबत सजग झाले आहेत. या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश आहे. त्यामुळे तलवारबाजीकडे कल वाढला आहे. पालक आणि खेळाडू इंटरनेटच्या माध्यमातून खेळातील ताज्या घडामोडींची माहिती घेतात. मोठ्या स्पर्धांतील सामन्यांचे व्हिडिओ पाहतात, असा त्याचा अनुभव आहे.

नोकरी करताना स्पर्धांत सहभागी होणे अवघड असते, मात्र दिनेशचा अनुभव वेगळा आहे. त्याला एमजीएम संस्थेकडून संपूर्ण सहकार्य मिळते. स्पर्धा, कॅम्पमध्ये सहभागी होण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत. संस्थेच्या सहकार्यामुळेच आतापर्यंतची वाटचाल शक्य झाली. घरी क्रीडा क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नाही. असे असतानाही दिनेशने तलवारबाजीसारख्या वेगळ्या खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला. कठोर मेहनत आणि सातत्याच्या बळावर स्पर्धा गाजविल्या. त्याची राज्य सरकारनेही दखल घेतली आणि त्याला मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे. स्पर्धांत सहभागी होणे आणि प्रशिक्षण देणे ही तारेवरची कसरत करणे अवघड असते. त्यामुळे येत्या काळात प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा त्याचा मानस आहे. सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणाने तलवारबाजीसारख्या आडवळणाच्या खेळात केलेले करिअर तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’मुळे ‘भूमिगत’ संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारच्या 'अमृत' योजनेमुळे औरंगाबाद शहरात सुरू असलेले भूमिगत गटार योजनेचे काम संकटात सापडले आहे. केंद्र सरकारने निधीमध्ये कपात केल्यामुळे तब्बल १०९ कोटी ७० लाख रुपयांच्या कामांवर गंडांतर आले आहे. एवढ्या रक्कमेची कामे वगळण्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. 'अमृत'मुळे 'भूमिगत'चा केंद्र सरकारकडून मिळणारा

दुसरा हप्ताही संकटात सापडला आहे.

औरंगाबाद शहरासाठीची भूमिगत गटार योजना केंद्र सरकारच्या 'अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल अँड मिडिअम टाउन्स' (यूआयडीएसएसएमटी) या योजनेतून मंजूर करण्यात आली होती. ही योजना ३६५ कोटी रुपयांची आहे. योजनेच्या एकूण किंमतीच्या ८० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार, असे जाहीर करण्यात आले होते. उर्वरित २० टक्के रक्कम राज्य सरकार व महापालिकेने देणे गरजेचे होते. महापालिका व राज्य सरकारने त्यांच्या वाट्याला येणारा हिस्सा या योजनेसाठी दिला आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १४६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी महापालिकेला उपलब्ध दिला आहे. या निधीमधून महापालिकेने भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले आहे.

केंद्रात सत्तांतरानंतर 'यूआयडीएसएसएमटी' ही योजना रद्द केली व त्याच्या जागी 'अमृत' योजना सुरू केली. त्यामुळे भूमिगत गटार योजनेचे काम आता 'अमृत'मधून करावे लागणार आहे. 'अमृत' योजना लागू करताना केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या ८० टक्के निधीऐवजी ५० टक्केच निधी केंद्र सरकार महापालिकेला देईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेला १०९ कोटी ७० लाख रुपयांची तूट येणार आहे. तुटीची रक्कम महापालिकेला स्वतःच्या फंडातून उपलब्ध करून द्यावी लागणार आहे किंवा तेवढ्या किंमतीचे काम रद्द करावे लागणार आहे.

'भूमिगत' योजनेतून होणारी नियोजित कामे

६० किलोमीटरची मुख्य सिव्हरेज लाइन

कांचनवाडी, पडेगाव, झाल्टा, बनेवाडी येथे २१६ एमएलडी क्षमतेचे एसटीपी

२०० किलोमीटरची अंतर्गत मलनिःसारण वाहिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जायकवाडी’त पाणी येणारच

$
0
0

म. टा . विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणात ऊर्ध्व भागातील धरणातून १२.८४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्याचा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतलेला निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाशी सुसंगत असून, त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असा निर्वाळा प्राधिकरणाचे अध्यक्ष रवीभूषण बुद्धिराजा, सदस्य चित्कला झुत्शी व सु. वी. सोडल यांनी दिला आहे. या निर्णयामुळे गंगापूर धरणातील पाणी आदेशाप्रमाणेच सोडले जाईल.

नाशिक व नगर जिल्ह्यातील साखर कारखाने व इतर अशा सात याचिकाकर्त्यांनी महामंडळाच्या १७ नोव्हेंबरच्या आदेशाला अव्हान दिले होते. जायकवाडी धरणात पिण्याचे पाणी उपलब्ध असल्यामुळे वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, पाणी सोडल्यास उलट नगर-नाशिक मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. बागायती पिकांचेही मोठे नुकसान होईल, त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती.

मराठवाड्यातील नागरीकांतर्फे परभणीचे प्रा. अभिजीत धानोरकर जोशी यांनी निवेदन देऊन प्राधिकरणाच्या आदेशाचे समर्थन केले. मराठवाड्यासाठी जायकवाडीत किमान २२ टीएमसी पाणी ऊर्ध्व भागातून उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानुसार हे अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन जोशी यांचे वकील यशोदीप देशमुख यांनी केले. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी १३.५२ टीएमसी पाण्याच्या पाण्याची गरज असल्याची माहिती सादर केली. पाण्याचे तीस टक्के वहनव्यय गृहित धरून केवळ ८.९७ टीएमसी पाणी लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे, असा निर्वाळा प्राधिकरणाने सोमवारी दिला. या निर्णयाने नगर, नाशिकरांचे कोर्टाचे सर्व दरवाजे बंद झाले आहे. आता मुंबई हायकोर्टात १८ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सावकारांचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

लोखंड आणि बियाणे उद्योगाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जालन्याला अवैध खासगी सावकारीने विळखा घातला आहे. सरासरी तीस टक्क्यांवर पठाण व्याज भरणारे शेकडोंच्या संख्येने व्यवहार शहरात सुरू आहेत. धमक्या, मारहाण करून वसूली करणाऱ्या गुंडांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभलेला असून पोलिस ठाण्यात 'अर्थपूर्ण' संबंधाच्या जोरावर सगळे काही तडजोड करून निपटले जाते. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

मराठवाड्यात सर्वात मोठ्या प्रमाणात खासगी फायनान्स जालन्यात मिळतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जन्मजात व्यापारी समाजातील सर्व छोट्या-छोट्या जातींची जालन्यात वस्ती आहे. पारंपारीक छोटे धंदे करताना अगदीच काही दिवसासाठी नगदी रोख रक्कम लागते. या सर्व गरजा पूर्ण करणे आजही सरकारी, सहकारी बँकांना त्वरित शक्य नाही. या प्रकरणी सर्वात मोठा गंभीर प्रकार म्हणजे हे सगळे धंदे कागदावर लिहून कुणी करत नाही. त्यामुळे सरकारी करांचा ससेमिरा कुणालाही नकोच असतो. ही जालन्यातील व्यापारी समाजातील मानसिकता आहे. त्यामुळे अवैध खासगी सावकारीचा जालन्यात जाहीर बोलबाला आहे.

धंदा आणि खासगी फायनान्स असे जालन्यात पारंपारीक रूजलेल्या या समिकरणातूनच भांडणे, हाणामाऱ्या, धमक्या, राहते घर बळकावणे यामधून प्रसंगी खून आणि आत्महत्या झाल्या आहेत. हा सर्व प्रकार भाजपचे शहराध्यक्ष विरेंद्र धोका यांची खासगी सावकारीतून पिळवणूक ‌होत असल्याने पोलिसांत केलेल्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणात थेट पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्तीगत पातळीवर जाऊन धोका यांच्या बाजूने पोलिसांना फटकारल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. अन्यथा अशा प्रकारच्या अनेक तक्रारींना सदर बाजार पोलिस स्टेशनच्या गेटमधून पोलीसच आत येऊ देत नाहीत. तक्रारदाराला तुमचा खासगी व्यवहार आहे. बाहेरच्या बाहेर निपटून घ्या असे असा जाहीर सल्ला दिला जातो.

धोका यांनी उमेश खाकीवाले यांच्याकडून खासगी सावकारीतून दहा लाख रुपये घेतले होते. धोका यांच्या सांगण्यानुसार त्यांनी त्याचे २२ लाख रुपये परत केले आहेत. धोका यांच्याजवळ खाकीवाले यांना परत दिलेल्या पैशाचे पुरावे आहेत, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांच्या दृष्टीने हा धोका आणि खाकीवाले यांच्यातला खासगी व्यवहार आहे असे सांगितले जाते. अगदी थेट कॅबिनेट मंत्र्याने हस्तक्षेप केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, सदर बाजार पोलिसांना याचे काहीच सोयरसुतक नाही. सात नोव्हेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी सापडलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images