Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वेरूळमध्ये सिद्धचक्र विधान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेरूळ येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्या जैन गुरुकुलमध्ये सिद्धचक्र महामंडल विधानाचे उद्घाटन १०८ नियमसागरजी महाराज, सुपार्श्वसागरजी महाराज, अभिनंदनजी महाराज, ऋषभसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत मंगळवारी (१७ नोव्हेंबर) करण्यात आले. यानिमित्त ८१ कळसधारी श्राविकांच्या उपस्थितीत वेरूळमधून मिरवणूक काढण्यात आली. श्रावक-श्राविकांनी 'अहिंसा परमो धर्म की जय,जय कारा गुरुदेव का' अशा घोषणा देत परिसर भक्तिमय करून टाकला.

मिवणुकीचा समारोप गुरुकुलात झाला. भगवान पार्श्वनाथच्या अभिषेकाचा मान मंडप उद्घाटक व ध्वजारोहक म्हणून प्रकाशचंद कासलीवाल व कुंजीलाल पांडे यांना मिळाला होता. या कार्यक्रमासाठी सौधर्म इंद्रपदाचा मान दिनेशकुमार गंगवाल, कुबेर इंद्राचा मान रमणलाल सुरेशकुमार, डॉ. प्रेमचंद पाटणी यांना मिळाला. ब्रह्मइंद्राचा मान सिद्धार्थ टोग्या (इंदूर) ब्रह्मपदाचा मान सुरेखा प्रशांत सदावर्ते, कचरू खुले, राजेंद्रकुमार अंबेकर यांना मिळाला. २२ नोव्हेंबर रोजी पिचिका परिवर्तन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचा श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन पन्नालाल गंगवाल, वर्धमान पांडे, डॉ. प्रेमचंद पाटणी, दिनेश गंगवाल, हर्षवर्धन जैन, निर्मलकुमार ठोळे, जयचंद पाटणी, गौतमचंद ठोळे, महावीर कासलीवाल, महेंद्र दगडफोडे यांनी केले. २६ नोव्हेंबरपर्यंत सिद्धचक्र महामंडल विधान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान दररोज दुपारी १२ ते ३दरम्यान १०८ नियमसागरजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रक्त घटकांची देवाणघेवाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशातील रक्तपेढ्यांअंतर्गत रक्त व रक्तघटकांची देवाण-घेवाण करण्याची मुभा नुकतीच देण्यात आली असून, अतिरिक्त तसेच वाया जाणारे रक्त व रक्तघटक दुसऱ्या रक्तपेढ्यांना देऊन असंख्य रुग्णांना लाभ होणार आहे. त्यामुळेच डेंगीसारखे आजार, नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालिन परिस्थितीत देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रक्तघटक देता येतील. त्याचबरोबर रक्तपेढ्यांतील अतिरिक्त प्लाझ्मा हा घटक रक्तपेढ्यांना लागणारे घटक व 'प्लाझ्मा प्रॉडक्टस'च्या बदल्यात प्लाझ्मा प्रक्रिया उद्योगांना १६०० रुपये प्रति लिटर या किंमतीसमक्ष देता येणार आहे. त्यामुळे 'प्लाझ्मा'पासून तयार होणाऱ्या 'ह्युमन अल्बोबिन' या अतिशय महत्त्वाच्या औषधाची देशातील टंचाई दूर होऊन आयातीवरील अवलंबित्वही दूर होणार आहे. यासंदर्भात देशातील रक्तपेढ्यांवर नियंत्रण असणाऱ्या राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेच्या (एनबीटीसी) शिफारसीला आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. अर्थातच, 'एनबीटीसी'ने घालून दिलेल्या वेगवेगळ्या अटी-शर्तींवर ही देवाण-घेवाण करता येणार आहे.

अलीकडे 'राज्य रक्तसंक्रमण परिषदे'कडे (एसबीटीसी) राज्यातील सर्वच रक्तपेढ्यांमधील सर्व प्रकारचा रक्तघटकांच्या साठ्याची नोंद अद्ययावत असते. त्यामुळे ज्या रक्तपेढीमध्ये विशिष्ट रक्तघटकांची कमतरता असेल किंवा संबंधित शहरामध्ये ज्या रक्तघटकांची नितांत आवश्यकता असेल, ते रक्तघटक राज्यातील अन्य शहरातील रक्तपेढीतून मागवणे शक्य होणार आहे. याबाबत 'सीबीटीसी' अशा प्रकारचे निर्देश देऊ शकते किंवा गरजू रक्तपेढी संबंधित रक्तपेढीशी संपर्क साधून संबंधित घटकांची मागणी करू शकते. अशा वेळी रक्तघटक देणाऱ्या रक्तपेढीवरच संबंधित रक्त व घटक सुस्थितीत आणि नियमांचे पालन करून मागणी करणाऱ्या रक्तपेढीला द्यावे लागणार आहे. त्यासाठी योग्य प्रक्रिया शुल्क घेण्याचे अधिकार रक्त व घटक देण्याऱ्या रक्तपेढीला असतील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये अशा प्रकारचे देवाण-घेवाण होऊ शकेल. रक्त व घटक दिल्यानंतर काही गुंतागुंत झाल्यास त्याची जबाबदारी देणाऱ्या रक्तपेढीवर राहणार आहे. याच निर्णयानुसार, देशातील रक्तपेढ्यांमधील अतिरिक्त 'प्लाझ्मा' हा घटक प्लाझ्मा प्रक्रिया उद्योगांना कायद्याच्या चौकटीत देता येणार आहे. यापूर्वी याबाबत कुठलेच नियम नव्हते आणि त्यामुळे त्याची सर्रास विक्री होत होती किंवा हा घटक वाया जात होता. आता 'प्लाझ्मा' हा घटक १६०० रुपये प्रतिलिटर या किंमतीसमक्ष रक्तपेढ्यांना 'प्लाझ्मा'चे प्रोडक्टस किंवा इतर उपयुक्त घटक घेऊन 'प्लाझ्मा' हा प्रक्रिया उद्योगांना देता येणार आहे. त्यामुळे किडनी-लिव्हरच्या तसेच इतर गंभीर रुग्णांना उपयुक्त ठरणारे व 'प्लाझ्मा'पासून तयार होणारे 'ह्युमन अल्बोमिन' ची देशातील निर्मिती वाढेल व देशाला या औषधाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे संकेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् जुळ्या बहिणींना मिळाले आई-बाबा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पूजा आणि प्रीतिका या जुळ्या बहिणी. मात्र, अनाथ. त्यांना आई-वडील मिळवून देण्याचे मोलाचे काम केले भारतीय समाज सेवा केंद्राने. केंद्राच्या वतीने दत्तक जाणीव जागृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

१४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर हा आठवडा दत्तक जाणीव जागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने भारतीय समाजसेवा केंद्रातील पूजा आणि प्रीतिका या जुळ्या मुलींचा दत्तक विधान सोहळा पार पडला. भारतीय समाज सेवा केंद्र हे अनाथ व निराधार मुलांच्या संगोपनाबरोबरच दत्तकाद्वारे त्यांचे पुनर्वसन करणारी संस्था म्हणून १९९६ पासून कार्यरत आहे. शनिवारी चेन्नई येथील पोनराज व पुष्पा यांना माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. भाग्यश्री गोडबोले यांच्या हस्ते पूजा व प्रीतिका यांना दत्तक देण्यात आले. यावेळी संस्थेचे समिती सदस्य संजय मेहरा, शाखा संचालिका वसुधा जातेगावकर, पर्यवेक्षिका छाया पवार, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा घुले, मीनाक्षी पाटील, पूजा धनेधर, बालविकास कार्यकर्ता आरती देशमुख यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी पाण्यावरील पिके घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

मराठवाड्यातील दुष्कळाच्या भीषणतेची पाहणी करीत लातूर जिल्ह्यात पोहचलेल्या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांनी आता कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाची लागवड करावी, असा सल्ला दिला. पथकाने शनिवारी औसा तालुक्यातील बुधडा, चलबुर्गा, उत्का, शिरसल या गावाना भेटी दिल्या.

या पथकात केंद्रिय कृषी मंत्रालयाचे आयुक्त एस. के. मल्होत्रा, केंद्रिय पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त एच. आर. खन्ना, केंद्रिय कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी शेतावर जाऊन पाहणी केली. या पाहणीत सोयाबीन, वाढ थांबलेल्या हरभऱ्याची, तुरीची, रब्बी ज्वारीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या.

पथकाने तावराजा नदीवर आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. औसा तालुक्यातील बुधडा शिवारातील महादेव कठारे यांच्या शेतातील सोयाबीन आणि रमेश पंडगे यांच्या शेतातील ज्वारीची पाहणीही केली. त्यावेळी त्यांनी सोयाबीनला आलेल्या कमी उताऱ्याबाबत आणि ज्वारीची वाढ कशी खुंटली आहे याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली.

चलबुर्गा शिवारातील पवार यांनी तलावातील गाळ त्यांच्या जमिनीवर टाकून तयार केलेल्या सुपिक जमिनीवर हरभऱ्याची पेरणी केली आहे. त्याची पाहणी करून पथकाने शेतकऱ्याचे आणि जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी शेतीला सुपीक बनविण्याच्या कामासाठी शेतकऱ्यांनाही मदत करण्याची अपेक्षा केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. उत्का गावातील विलास ससाणे यांच्या शेतातील हरभरा, करडई, जवस पिकाची तर संगिता ससाणे यांच्या शेतातील तुरीची पाहणी केली.

उत्का गावातील पाण्याची समस्या यावेळी शेतकऱ्यांनी मांडली. उत्का गावाला माकणी धरणातून पाणी देण्याची विनंती करून दररोज एक ते तिन किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत असल्याचे गऱ्हाणे काही शेतकऱ्यांनी मांडले. लामजना शिवारातील लक्ष्मण काटे यांचा पाण्याअभावी वाळत चाललेला ऊस पाहुन शेतकऱ्यांना आता कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाची लागवड करण्याचा आग्रह धरला पाहिजे, असे मत त्यांनी केंद्रिय पथकाकडे व्यक्त केले.

पथकाला विश्रामगृहावर खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी तातडीने मदत करण्याची मागणी केली. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी प्रतापसिंह कदम, जिल्हा कृषी विकास अधिकारी मोहन भिसे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

पळसवाडी येथील गट नंबर ७० मधील वडिलांच्या नावावरील जमीन कर्जबाजारीपणामुळे विक्री करण्यास काढली होती. कुळाची नोंद असल्यामुळे जमीन विक्री करता येत नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्याने गुरुवारी तहसीलच्या कार्यालयाच्या आवारात विष घेतले होते. औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

काकासाहेब भाऊसाहेब औटे (वय २५ रा. पळसवाडी ता. खुलताबाद) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. खुलताबाद पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह पोलिस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु, ग्रामस्थांनी समजूत काढत पळसवाडी येथे अंत्यविधी करण्यात आला. कुळाच्या प्रकरणात सुनावणी घेऊन निकाल देण्यास विलंब लावल्याने तहसीलदारांवर कारवाईची मागणी औटे कुटुंबियांनी केली आहे.

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे गट नंबर ७० मध्ये भाऊसाहेब जयवंत औटे यांची दोन एकर १० आर जमीन आहे. पत्नी ताईबाई, दोन मुले भाऊसाहेब व सतीश यांच्यासह ते शेती करतात. या शेतीमध्ये कुळाची नोंद आहे. औटे यांच्यावर महाराष्ट्र बँक, विविध कार्यकारी सोसायटी, खासगी सावकार , फायनान्स कंपनी तसेच विविध देणी असल्यामुळे त्यांनी शेती विक्री काढली होती. मात्र शेतीमध्ये कुळाची नोंद असल्याने शेती खरेदी करण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. शेती कुळाच्या प्रकरणात दाद मागण्यासाठी खुलताबाद तहसीलदारांच्या न्यायालयात प्रकरण प्रलंबीत होते. कुळाच्या अडचणीमुळे शेती विक्री करण्यास अडचण येत असल्यामुळे काकासाहेब औटे चिंताग्रस्त होता. गुरुवारी काकासाहेब औटे यांनी तहसीलदार बालाजी शेवाळे यांची भेट घेऊन कुळ प्रकरण निकाली काढून कुळ कमी करण्याचे आदेश देण्याचा आग्रह धरला होता; अन्यथा आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती.

'तहसीलदारांनी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगून बोळवण केल्याने काकासाहेब औटे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात गुरुवारी रात्री विषारी औषध प्राशन केले. शुक्रवारी सकाळी भूमिअभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेशुद्ध अवस्थेतील काकासाहेब औटे यांच्यावर औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतांना शनिवारी त्याचा मृत्यू झाला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयातील सीडीआर यंत्रणा काढून नेल्याने सीसीटीव्ही बुजगावणे होऊन बसले आहे. काकासाहेब औटे हा गुरुवारी दिवसभर तहसील कार्यालयाच्या आवारात होता. त्यांनी केव्हा विषप्राशन केले ते सीसीटीव्हीवरून दिसले असते. मात्र, सीसीटीव्हीचे सीडीआर यंत्रणा बंद असल्याने घटना नेमकी केव्हा घडली ते समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथील पंपहाऊसच्या विद्युत पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. त्याचा परिणाम म्हणून शनिवारी शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला. सुमारे ६ तास उशिराने पाणीपुरवठा होत आहे.

जायकवाडी येथे २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १ वाजता विद्युत पॅनलमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आणि पंपहाऊस मधील पंप बंद पडले. सकाळी ७ वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. रात्री एक ते सकाळी सात वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. त्यानंतर पाणीपुरवठा सुरू झाला, पण नियमित पाणीपुरवठ्यात सहा ते सात तासांचा खंड निर्माण झाला. वेळापत्रकाप्रमाणे शनिवारी ज्या भागांना पाणीपुरवठा होणार होता, तो पुरवठा ६- ७ तास उशिराने होत असल्याचे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतर्फे कळवण्यात आले आहे. दरम्यान जिन्सी जलकुंभावरून होणारा संजय नगर आणि बायजीपुरा तसेच रमानगर, काल्डा कॉलनी, श्रेयनगर या परिसराचा पाणीपुरवठा उद्या रविवारी होणार आहे, असे कंपनीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ चौकशीच्या अडकित्त्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतर जलवाहिनी योजनेची वाढलेली किंमत, टेंडर काढताना धाब्यावर बसवले गेलेले निकष या सर्वांची चौकशी करू,' असा इशारा महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी दिला. समांतर जलवाहिनी संदर्भात केंद्रेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हा मनोदय जाहीर केला.

संयुक्त बैठकीला महापालिकेचे अधिकारी, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी व समांतर जलवाहिनीच्या संदर्भात स्थापन झालेल्या नागरिकांच्या कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने प्रा. विजय दिवाण, सुभाष लोमटे, मनोहर टाकसाळ, राजेंद्र दाते पाटील, ठोलिया, कलीम अख्तर या समिती सदस्यांचा समावेश होता.

बैठकीत केंद्रेकरांनी सर्वांचे म्हणणे शांततेत ऐकले. त्यानंतर त्यांनी समांतर संदर्भात आपले मत व्यक्त केले. प्रा. विजय दिवाण यांनी समांतरच्या वाढलेल्या किमतीचा उल्लेख केला. या योजनेची मूळ किंमत ३६० कोटी रुपये होती, आता ही किंमत ७९२ कोटी रुपये झाली. या योजनेची निविदा काढताना शासनाने नेमून दिलेले निकष पाळले नाहीत, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्याचाच संदर्भ घेत केंद्रेकर म्हणाले, समांतर जलवाहिनी प्रकल्पाची किंमत डीएसआरमुळे वाढली असण्याची शक्यता आहे. त्यासाठी कंपनीचे फायनान्शियल मॉडेल तपासावे लागेल. हे मॉडेल सादर केले आहे का, असा प्रश्न त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला. हे मॉडेल सादर करण्यात आले नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रेकरांना सांगितले. त्यावर केंद्रेकारांनी नाराजी व्यक्त केली. कामात पारदर्शकता ठेवा असे ते म्हणाले.

केंद्रेकरांचे खडे बोल

समांतर प्रकल्पाची किंमत कशी वाढली याची चौकशी करावी लागेल. निविदा काढताना शासनाचे निकष पाळले नाहीत. कोणतीही निविदा मंजूर करताना त्या प्रकल्पासाठी किमान तीन निविदा आलेल्या असल्या पाहिजेत. समांतर प्रकल्पासंदर्भात असे झालेले दिसत नाही. तीन निविदांची अट का पाळली नाही, ही अट कुणी शिथिल केली, अट शिथिल करण्याचा त्याला अधिकार आहे का याचीही चौकशी करावी लागेल. 'समांतर'ची सुरुवातीपासून चौकशी करावी लागेल. त्यासाठी या योजनेचा अभ्यास करू, असे केंद्रेकरांनी बैठकीत स्पष्ट केले.

पाणीपट्टी व 'समांतर' हे दोन्ही वेगळे विषय

पाणीपट्टी व समांतर जलवाहिनी प्रकल्प हे दोन विषय वेगळे आहेत. त्याची सरमिसळ करू नका, असे सुनील केंद्रेकर यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. जायकवाडीतून उचललेले पाणी ग्राहकाच्या घरापर्यंत आणण्यासाठी जो खर्च येतो त्यावर पाणीपट्टी ठरवली जाते. दररोज पाणी पुरवठा करणार असाल तरच नळ कनेक्शनला मीटर लावा, असे त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बजावले. कंपनीला फायदा होईल, अशा कोणत्याही गोष्टी होऊ देणार नाही. महापालिकेकडे येणारा पैसा सर्वसामान्य नागरिकांचा आहे, तो योग्य प्रकारेच वापरला गेला पाहिजे. त्यामुळे कमी खर्चात जास्त काम करण्यावर आपला भर राहणार आहे. अधिकाऱ्यांनीही 'लॅव्हिशपणा' सोडून दिला पाहिजे, असे केंद्रेकरांनी ठणकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकृष्ट भोजनामुळे विद्यार्थी रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शनिवारी, निकृष्ट जेवण आणि मेसचालकाच्या अरेरावीच्या निषेधार्थ विद्यापीठात रास्तारोको केला. मुख्य रस्त्यावर खाणावळीतील भोजनाचे साहित्य रस्त्यावर मांडत प्रशासन आणि मेसचालकाचा निषेध करीत विद्यार्थ्यांनी सुमारे तासभर ठिय्या मांडला.

वसतिगृह क्रमांक १ मधील विद्यार्थी सकाळी खाणावळीत जेवण करायला गेले असता निकृष्ट प्रतीचे जेवण आणि इतर बाबींचा मेसचालकाला जाब विचारला. यानंतर मेसचालकाच्या कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली. नंतर संतप्त विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. संबंधित मेसचालकावर कारवाई करावी, विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य रस्त्यावर खाणावळीतील वरण, भात, पोळीचे सर्व टिफिन व खानावळीतील इतर साहित्य रस्त्यावर मांडले आणि घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक, प्रशासनातील इतर अधिकारी वसतिगृहात आले. विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मेसचालकाने विद्यार्थ्यांशी माफी मागितली यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

प्रशासनाचा कारभार सुस्तच

भोजन पुरविण्याचे कंत्राट हॉटेल बगीचा यांच्याकडे आहे. तसेच कँटीनचालकही नुकतेच बदलण्यात आले आहेत. भोजन तसेच नाश्त्याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडे कोणतीच यंत्रणा नाही. त्यामुळे अनेकदा हा प्रश्न पुढे आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळाची पाहणी संतापाच्या फेऱ्यात

$
0
0

दौऱ्यावरील केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांचा घेराव

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्याच्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला सलग दुसऱ्या दिवशी संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. औसा-उस्मानाबादजवळ संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी पथकाची गाडी अडविली. 'मदतीचे बोला व दावणीलाच चारा द्या', अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी रौद्रावतार धारण केल्याने दंगल नियंत्रण पथकातील जवानांनी शेतकऱ्यांना सावरले. दरम्यान, सरकारने वारंवार पाहणी दौरे करूनही मराठवाडा व राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नसून हा केवळ पाहणी दौऱ्यांचा फार्स आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी केला. तर 'दुष्काळाचा योग्य अहवाल सरकारला द्या,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात सांगितले.

लातूर येथून उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करताच पाहणी पथकाला संतप्त शेतकऱ्यांनी अ‌डविले. तर उस्मानाबाद येथेही संतप्त शेतकऱ्यांमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकारांनंतर पाहणी पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागून नये म्हणून, जिल्हा प्रशासनाने जागोजागी दंगल नियंत्रण पथक तैनात केले होते. शिवाय पथकासमवेत चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

नाशिकमध्ये पाणी पेटले

नाशिक : नाशिकमधून जायकवाडीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना घेराव घातला. त्यानंतर शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पाणी आरक्षण बैठकीस जात असताना पालकमंत्र्यांना शिवसेना मंत्र्यांची ढाल करावी लागली. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांनी विरोध तीव्र करीत पालकमंत्री 'गो बॅक'चा नारा दिला. शेतकऱ्यांचा सामना करण्यास नकार देणाऱ्या पालकमंत्र्यांच्या बैठकीवरही शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला. तर नाशकात असूनही, छगन भुजबळ यांनी आंदोलनाकडे व पाणी आरक्षण बैठकीकडे पाठ फिरवली.

...तर मंत्र्यांना फिरणे कठिण

मुंबई : सरकारने वारंवार पाहणी दौरे करूनही मराठवाडा व राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही, सध्या सुरू असलेल्या केंद्रीय पथकाच्या तिसऱ्या दुष्काळी दौऱ्यातूनही राज्याला मदत मिळण्याची सूतराम शक्यता नाही. मदतीबद्दल दिरंगाई आणि चालढकल अशीच सुरू राहिल्यास राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मंत्र्यांना फिरणे कठीण होईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघूर नदीपात्रात हातभट्टीवर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील वाघूर नदीपात्रातील हातभट्टीवर छापे मारले. या छाप्यात १६०० लिटर रसायनासह ३६,८७५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सिमेवरील वाघूर नदीपात्रात हातभट्टीची दारू गाळण्यात येते. ही दारू जळगाव जिल्हा व फर्दापूर तालुक्यात विकली जाते. याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे औरंगाबाद येथील अधीक्षक यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर झालेल्या कारवाईत नदीपात्रातील कातड्या व खडक्या येथे दोन पथकांनी छापा मारला.

या छाप्यात हातभट्टी नष्ट करून झाडीत लपवलेले रसायन व दारू पाडण्याचे साहित्य नष्ट केले. ही कारवाई पथकातील प्रभारी निरीक्षक जी. एस. पवार, दुय्यम निरीक्षक ए. जी. शिंदे, आर. एस. भारती, शेख निसार, विनायक चव्हाण यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

$
0
0

औरंगाबाद : माझ्या पतीला फोन का करतेस, अशी विचारणा करून आठवडीबाजारात धक्काबुक्की दोन महिलांनी केल्यामुळे झालेला अपमान सहन न झाल्याने एका महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोयगाव तालुक्यातील रवळा येथील रहिवासी विद्याबाई सदानंद पवार या २ नोव्हेंबर रोजी जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील आठवडी बाजारात गेल्या होत्या. तेथे त्यांना मंदाबाई अनिल लोखंडे व सोनाली श्याम लोखंडे (रा. जवळा, ता. सोयगाव) यांनी धक्काबुक्की केली. 'माझ्या पतीसोबत फोनवर का बोलतेस, त्यांच्यासोबत अनैतिक संबंध आहेत,' असा आरोप केला. बाजारात झालेला अपमान सहन न झाल्याने विद्याबाई पवार यांनी स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी विद्याबाईचा पती सदानंद भरतसिंग पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ५ नोव्हेंबर रोजी मंदाबाई लोखंडे व सोनाली लोखंडे यांच्याविरुद्ध भादंवि ३०६,५०४,३२३,३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सदानंद पवार यांनी पत्नीच्या मृत्यूला मंदाबाईचा पती अनिल रंगनाथ लोखंडे हा सुद्धा कारणीभूत असल्याची दुसरी तक्रार दिली आहे. घटनेच्यादिवशी अनिल लोखंडे त्यांच्या घराभोवती संशयास्पदरित्या फिरत असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्रीत जनावरांचा बाजार ओस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने एक पाऊल पुढे टाकत शेतीमालासोबतच जनावरांचा बाजार सुरू केला होता. मात्र हा बाजार कांही महिन्यातच ओस पडला आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी यापूर्वी फुलंब्री येथील नागरिकांनी जनावरांचा बाजार भरविण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केला. काही वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांना हाताशी धरून दर सोमवारी वानेगाव फाटा येथे जनावरांचा बाजार भरवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु ग्रामपंचायत वडोदबाजार व व्यापाऱ्यांचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांचे हित जोपासत दुकान गाळ्यानंतर बाजार समितीच्या आवारात जनावरांचा आठवडी बाजार दर गुरुवारी भरविण्याचा प्रयत्न केला. राज्य रस्त्यालगत असलेल्या बाजार समितीच्या मालकीच्या आवारात भरणाऱ्या या बाजाराची प्रसिद्धीही करण्यात आली होती. जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी हौद, जनावरे चढ-उतार करण्यासाठी ओटे, आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या. एक-दोन आठवड्यानंतर या जनावराच्या बाजाराकडे शेतकरी व व्यापारी दोघांनीही पाठ फिरवली आहे.

तालुक्यातील वडोदबाजार येथील जनावरांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. या बाजारात राज्याबाहेरून जनावरे व व्यापारी येतात. शिवाय औरंगाबाद येथील छावणीमध्ये दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो. त्यामुळे येथील बाजार समितीचा जनावरांचा बाजार भरविण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक कोटी ३७ लाखांची वैजापूरमध्ये फसवणूक

$
0
0

वैजापूर : भाई हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या वैजापूर शाखेत एक कोटी ३७ लाख रुपयांचा अपहार करून खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी १३ संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या शाखेत सहा वर्षांपूर्वी शहर व तालुक्यातील एकूण ९२ खातेदारांनी रक्कम गुंतवली आहे.

पतसंस्थेत पैशाची अफरातफर झाली असून, ही पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्याचा अहवाल लेखापरिक्षकांनी दिल्यानंतर पतसंस्थेची टिळक रोडवरील शाखा बंद झाली. त्यामुळे भेदरलेल्या ९२ ठेवीदारांनी आपली गुंतवणूक परत मिळणार नसल्याची खात्री पटल्याने शहरातील भाटिया गल्लीतील एक ठेवीदार प्रदीप वेद यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद रायसोनी, संचालक मोतीलाल जिरी, सुरजमल जैन, दिलीप चोरडिया, दादा पाटील, भागवत माळी, राजाराम कोळी, भगवान वाघ, हितेंद्र महाजन, इंद्रकुमार लालवाणी, प्रतिभा जिरी, शेख रमजान, ललिता सोनवणे (सर्व रा. जामनेर, जिल्हा जळगाव) यांच्यावर वैजापूर पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळ रस्त्यावर माती टाकून खड्डेभरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

नाशिक-मुंबई रस्त्याला जोडणाऱ्या कसाबखेडा फाटा ते वेरूळ या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. मात्र सुयोग्य पद्धतीने रस्ता दुरुस्त करण्याऐवजी खड्ड्यांमध्ये रस्त्याकडेची माती, खडी टाकून बुजवले जात आहेत.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी व श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची या रस्त्यावर वर्दळ आहे. या रस्त्यावरून जड वाहने, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड या राज्यात जाण्यारी वाहने धावतात. या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी झटकून सार्वजनिक बांधकाम विभाग थातूरमातूर माती टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे आधीच खड्ड्यांमुळे त्रासलेले वाहनचालक पूर्वीपेक्षाही अधिक वैतागले आहेत. या रस्त्यावर धावणारी वाहने खुळखुळा बनली आहेत.त्याबद्दल वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. माती टाकून खड्डे बुजविणे बंद न केल्यास वेरूळ ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. वेरूळ येथील नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा आवाज उठविला आहे. मणका व पाठीचे दुखणे वाढत असल्याची वाहनचालकांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण रस्त्यावर मातीमुळे धुळीचा त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील खड्डे चक्क मातीमिश्रीत मुरुमाने बुजवले जात आहेत. यामुळे वाहनधारकांना आता खड्ड्यांसह धुळीचाही त्रास सहन करावा लागत आहे.
पैठण-औरंगाबाद रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे. सध्या या रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. हे सर्व खड्डे डांबरमिश्रित खडीने बुजवणे अपेक्षित असताना, सार्वजनिक विभागातर्फे मातीमिश्रीत मुरुमाने बुजवले जात आहेत. वाहनांची रहदारी सुरू होताच खड्ड्यातील माती खड्ड्याबाहेर येवून रस्त्यावर पसरत आहे. परिणामी, रोडवर धुळीचे लोट उडत आहे. यामुळे पैठण-औरंगाबाद रस्त्यावर आता वाहनधारकांना खड्ड्यासह धुळीचाही त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी पैठण सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता भिवाजी जायभाये यांच्याकडे विचारणा केली असता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव यांचा अचानक पैठण दौरा ठरल्याने रस्त्यावरील खड्डे मुरुमाच्या साह्याने बुजवण्यात आले. लवकरच या खड्ड्यातील मुरूम काढून या रस्त्यावरील सर्व खड्डे डांबरमिश्रित खडीच्या साह्याने बुजवले आहेत, अशी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणास गंडविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध कंपनीत नोकरी लावून देतो म्हणत आमिष दाखविणाऱ्या चेन्नईच्या महिलेसह तीन भामट्यांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीत मेहरा, गौरव, आशिष नायर व एक महिला यांनी तरुणाची फसवणूक केली.

नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या मनिष अरुणराव डायतकर (२६) या तरुणास १७ ऑक्टोबर रोजी चेन्नईतून एक फोन आला. त्या फोनवरुन प्रथम एका महिलेने, तुम्हला आमच्या कंपनीत नोकरी लावून देतो म्हणत मनिषला २५०० रुपये चेन्नई येथील कोटक महिंद्र बँकमध्ये जमा करण्यास सांगितले. काही दिवसांनी पुन्हा चेन्नईतून दुसऱ्या नंबरवरून फोन आला.

अमीत मेहरा बोलत असल्याचे सांगत, आमच्या कंपनीत जागा असून त्यासाठी तुमची मुलाखत घ्यायची सांगितले. अर्धा ते एक तास मेहराने मनिषची मुलाखत घेतली. त्यानंतर त्याच बँकेत पैसे भरण्यास सांगितले. पुन्हा काही दिवसांनी तिसऱ्या नंबरवरून फोन आला त्यावेळी गौरव, आशिष नायर या दोघांनी तुमचे बँक खाते, व्हिसा व पासबुक बनवायचे असल्याची थाप मारून त्याच बँकेत पैसे भरण्यास सांगितले. मनिषने सुमारे ८५ हजार ५४२ रुपये बँकेत भरले. आपल्याला नोकरीसाठी बोलवित नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनिषने छावणी पोलिस ठाणे गाठून चौघांविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरमालकाच्या दागिन्यांवर डल्ला

$
0
0

औरंगाबाद : नातेवाईकांच्या अत्यंविधीसाठी गेलेल्या घरमालकाने घराची चावी विश्वासाने भाडेकरूच्या हातात दिली. मात्र, त्यांनीच घरमालकाचा विश्वासघात करून ९० हजारांचा ऐवज लंपास केला. शिवाजीनगरात घडलेल्या या घटनेप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे. शिवाजी नगरातील ११ व्या योजनेत राहणारे सुरेश कडुबा चव्हाण (३५) यांचे एक नोव्हेबर रोजी नातेवाईक वारल्याने ते अंत्यविधीसाठी गावाला गेले होते. जाताना घराला कुलूप लावुन त्यांनी चावी भाडेकरू विलास दहिभाते, परमेश्वर उगले व त्यांच्या पत्नी यांच्याकडे सोपविली होती. त्याच भाडेकरुंनी चव्हाण यांच्या घरातील ९० हजार ७०० रुपये किमतीचे सोन्या-चांदिचे दागिने लांबविले. दोन दिवसांनंतर चव्हाण कुटूंब घरी परतले असता त्यांना दागिने गहाळ झाल्याचे दिसले. मात्र, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले नाही. त्यामुळे संशयावरून त्यांनी भाडेकरूवर गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममधून ७९ हजार लांबविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गहाळ झालेल्या एटीएम कार्डचा वापर करून अज्ञात भामट्याने ७९ हजार रुपये लांबविल्याची घटना सिडको भागात घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकर नगरातील गल्ली नं.३ मध्ये राहणाऱ्या शुभम राहुल गवळी (२०) या तरुणाचे एटीएम कार्ड काही दिवसांपूर्वी हरविले होते. शुक्रवारी एका अज्ञात भामट्याने त्या एटीएम कार्डचा वापर करून एसबीआयच्या एका एटीएम मशीनमधून गवळी यांचे ७९ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली.

दुकानात चोरी, दोघे अटकेत

भरदिवसा दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या दोन विधी संघर्ष बालकांना पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने पकडले. या झटापटीत एक चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला. ही घटना गादीयाविहार येथील शंभूनगरमध्ये घडली असून या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गादीया विहार परिसरात राहणारे गौतम रामचंद्र गंगावणे (२९) यांचे शंभूनगर भागात डिव्हिडीचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानाला कुलूप लावून घरी गेले होते. तीन विधी संघर्ष बालकांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून फिलिप्स कंपनीच्या सुमारे २४ हजार ५०० रुपये किमतीच्या डिव्हिडी, रोख रक्कम चोरली. मात्र, भर दुपारची वेळ असल्याने काही सूज्ञ नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी दोन बालकांना पकडले. मात्र, एक जण पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी दोन्ही विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. गौतम गंगावणे यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पादचाऱ्यास रिक्षाची धडक

रस्ता ओलांडणाऱ्या एकास भरधाव येणाऱ्या रिक्षाने धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला, ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास फायर ब्रिगेड कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पदमपुऱ्यात राहणारे राजु रामसिंग डेडवाल (३९) यांचे वडील रामसिंग डेडवाल हे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अग्निशामन दलाच्या कार्यालयासमोरून रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या रिक्षाने त्यांना धडक दिली. त्यानंतर रिक्षाचालक रिक्षासह पसार झाला. या अपघातात रामसिंग डेडवाल हे गंभीर जखमी झाले. राजु डेडवाल यांच्या तक्रारीवरून रिक्षाचालकाविरुद्ध क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढाईस तयार राहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयडीबीआयच्या कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आता येऊन ठेपली आहे. बँकेच्या खासगीकरणाचा घाट केंद्र शासनाने घातला आहे. हा घाट हाणून पाडायचा आहे. या लढाईसाठी तयार राहा, असे आवाहन शिवसनेचे उपनेते आणि आयडीबीआय बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी केले.

रविवारी (२२ नोव्हेंबर) उस्मानपुरा येथील कलश मंगल कार्यालयात आयडीबीआय बँकेचा 'खासगीकरणाला विरोध' मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना महाडिक यांनी आक्रमक भाषण केले. ऑल इंडिया बँक एम्प्लाइज असोसिएशन, युनाटेड फोरम आणि आयडीबीआय बँक कर्मचारी यांच्यातर्फे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर अधिकारी संघटनेचे महासचिव राजीव आठल्ये, रत्नाकर वानखेडे, भाई परब यांची उपस्थिती होती. कॉम्रेड आणि शिवसैनिक युनाटेड फोरमच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले. महाडिक म्हणाले, 'आयडीबीआय बँकेवर तिसरा अॅटॅक आहे. आधी बँकेला सरकारी केले. नंतर विविध बँकांना त्यात विलीन केले आणि आता बँकेचेच खासगीकरण केले जात आहे. परिस्थिती गंभीर आहे. लढा द्यायला हवा.'

यावेळी राजीव आठल्ये म्हणाले, 'एआयबीईए संघटना आणि सर्व युनाटेड फोरमसह बँक खासगीकरण विरोधातला लढा द्यावाच लागेल. यासाठी कंत्राटी, तृतीय, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीवर्ग व त्यांच्या संघटनांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.' कर्मचाऱ्यांवर खासगीकरणाचे सुलतानी संकट कोसळू देणार नाही. आंदोलनाला पाठिंबा असून शासनदरबारी याचा पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार खैरे यांनी दिले.

रत्नाकर वानखेडे यांनी, कर्मचारी संघटनांची युनियन काय सांगेल, फोरम काय सांगेल आणि त्यानुसार काम करण्याची गरज आहे. भाई परब यांनी आधीच्या लढ्याची आठवण केली आ‌धीच्या लढ्यात ३ हजार ५०० जणांनी लढा दिला होता. आता आपण सगळे मिळून ३४ हजारांवर आहोत, असे सांगून हा लढा मोठा करायला हवा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना मांडलेला बँकेच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडयला हवा, असे मत मांडले.

यावेळी आयडीबीआयच्या विविध शाखांमधील कर्मचारी उपस्थित होते. आयडीबीआय कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव लक्ष्मीकांत शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर मते पाटील, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात खासगीकरणा विरोधातील विविध मागण्या केंद्र सरकारकडे पोचवण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपही पुकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांवर लागणार ‘ग्रीन स्टिकर’

$
0
0

नांदेड : उत्तम आरोग्यासाठी घर तेथे शौचालय ही संकल्पना राबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने देशभरात मोठे प्रयत्न केले जात आहेत. नांदेड जिल्हयाने स्वच्छ भारत अभियानात राज्यात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे ज्या कुटूंबांनी शौचालय बांधून त्याचा वापर कायम सुरु ठेवला आहे, अशा घरांवर आता ग्रीन स्टिकर लावण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी दिली.

नांदेड जिल्हयात शौचालय बांधकामाच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शौचालयासह स्नानगृही अनेक कुटूंबांनी बांधले आहेत. चालू वर्षात नांदेड जिल्हयातील ४६५ ग्राम पंचायती हागणदारीमुक्त करण्यात येणार असून, सुमारे ८५ हजार शौचालय बांधकामाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. ४६५ गावात गट विकास अधिकारी, मिनी बिडीओ, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी शौचालय बांधकामाचे नियोजन तयार केले आहे. या मोहिमेत कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळेच शौचालय बांधकामात नांदेड जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images