Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दूषित पाणी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दूषित पाण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटली नाही. दूषित पाणी धार्मिक स्थळापर्यंत पोचल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ते पाणी घेऊन महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे कार्यालय गाठले व तक्रारींची पाढा वाचला. केंद्रेकर यांनी तात्कळ दखल घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून दोन दिवसांत प्रश्न सोडवा असे आदेश दिले.

नवाबपुरा वॉर्डात गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पिण्याचे पाणी व ड्रेनेजचे पाणी याची सरमिसळ होत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या होत्या. नगरसेवक फिरोज खान यांच्याकडेही तशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. फिरोज खान यांनी नागरिकांच्यावतीने अधिकाऱ्यांकडे तक्रारी मांडल्या, पण त्याची दखल घेण्यात आली नव्हती. शनिवारी केंद्रेकर यांनी नवाबपुरा भागाची पाहणी केली. त्यावेळीही नागरिकांनी दूषित पाण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे मांडला. हा प्रश्न सोडवा व नागरिकांना दिलासा द्या, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मात्र, दोन दिवसांत त्यावर काहीच कारवाई झाली नाही. अखेर आज नागरिकांनी नगरसेवकाच्या नेतृत्वाखाली महापालिकेत येऊन केंद्रेकर यांची भेट घेतली. केंद्रेकर यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना बोलावून घेतले. नवाबपुरा भागातील दूषित पाण्याची समस्या येत्या दोन दिवसांत सोडवा, तातडीने नवाबपुरा भागाला भेट देऊन त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश दिले.

कारवाई नाही

महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच सुनील केंद्रेकरांनी सगळ्या विभागांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यांनी शनिवारी नवाबपुरा भागाची पाहणी केली होती. या वेळीही नागरिकांनी दूषित पाण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे मांडला. हा प्रश्न तत्काळ सोडवा अशी मागणी केली. तेव्हा केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही.

नवाबपुऱ्यात दूषित पाणीपुरवठा.

नागरिक आयुक्तांकडे.

दोन दिवसांत पाणीप्रश्न सोडवा.

पाहणी करून अहवाल द्या.

केंद्रेकरांचे अधिकाऱ्यांना आदेश.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्तिक स्वामी महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने तेरमध्ये बुधवारी कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

तेर येथील स्कंद कार्तिकाची मूर्ती असून, ही मूर्ती राष्ट्रकुटकालीन शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. या मूर्तीचा कालखंड हा इसवी सन आठव्या शतकातील आहे. ही मूर्ती चतुर्भज असून उजव्या हातात स्कंद कार्तिकेयचे शस्त्र खङ्ग असून, मूर्ती मोरावर विराजमान आहे. या मूर्तीसाठीचा खडक हा गारगुटी स्वरूपाचा चमकदार असा आहे. त्यामुळे या मूर्तीला विशेष झळाळीप्राप्त झालेली आहे. कार्तिकेयची ही मूर्ती पूर्वी तेर येथील त्रिविक्रम मंदिराच्या गाभाऱ्यात होती. मात्र, सध्या या मूर्तीचे मूल्य व महत्त्व लक्षात घेता तेर येथील पुरातत्त्व वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे. या मूर्तीप्रमाणे स्कंद कार्तिकेयची मूर्ती आंध्र प्रदेशात आणि श्रीलंकेत आढळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण महासंमेलनाच्या वेबसाइटचे उद‍्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

पुढील वर्षी सहा आणि सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लातुरातील ब्राह्मण संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटचा आणि फेसबुक पेजचे उद‍्घाटन करण्यात आले.

शहरात सहा आणि सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ब्राह्मण संमेलनाच्या निमित्ताने राज्यात आणि देशात संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक संपर्क साधनांचा उपयोग करण्यासाठी वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटच्या उद‍्घाटनाच्या निमित्ताने मराठवाडा विभागातील विविध ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री उत्तरादी मठाचे मराठवाडा प्रचार प्रमुख पंडित वामनाचार्य, सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक सदाशिवराव दाते, पतसंस्था चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक गोविंदपूरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष पप्पू कुलकर्णी, पेशवा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक रणनवरे, संमेलनाचे सुबोध बेळंबे, संमेलनाचे अध्यक्ष सुधाकर जोशी, कार्याध्यक्ष योगेश जानतीकर, उपस्थित होते.

लातूरच्या पॅटर्नप्रमाणे ऐतिहासिक संमेलन होईल आणि ते समाजाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास पंडित वामनाचार्य यांनी व्यक्त केला. स्वागताध्यक्ष पप्पू कुलकर्णी म्हणाले, 'महाराष्ट्रात जी समाजाची अधिवेशने झाली, त्या अधिवेशनांपेक्षा हे संमेलन चांगल्या प्रकारे होईल. यासाठी समाजाने पुढे येऊन काम करावे.' सुबोध बेळंबे यांनी महासंमेलनाच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी डॉ. रविराज पोरे, उदय देशपांडे, संजय राजहंस, वैभव पाटील, किशोर पानसे, जगदीश कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरे नांदेडमध्ये

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांबरोबरच अल्पभूधारक आणि नैसर्गिक आपत्तीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २९ नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये येत आहेत. या कार्यक्रमात एक हजार शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे.

नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी या कार्यक्रमाची कल्पना मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्राच्या लिलावातून उभा राहणारा निधीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. याआधी औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने मदत करण्यात आल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंगळवारी शासकीय विश्रामगृहात शिवसेना आमदार हेमंत पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार सुभाष साबणे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, लातूरचे सहसंपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, भुजंग पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांना या मदतीचा फायदा व्हावा, यासाठी त्यांची नावे व कुटुंबाची परिस्थिती तसेच अन्य माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात कोणतेही होर्डिंग लावण्यात येऊ नयेत, हारतुरे व भव्यदिव्य स्वागत टाळण्यात यावे, अशा सूचनाही या वेळी आमदार व जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

तालुकाप्रमुखांनी अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने व योग्य ती यादी तात्काळ जिल्हाप्रमुखाकडे देवून याबाबत सतर्कता बाळगावी. गरजूंना या मदतीचा लाभ व्हावा, यासाठी काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही आमदार हेमंत पाटील, आमदार प्रताप पाटील, आमदार सुभाष साबणे यांनी केल्या. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाला मान्यतेची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

खासदार आदर्शग्राम योजनेत समावेश असलेल्या वेरूळ येथील विकासकामांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. खासदार राजकुमार धूत यांनी दत्तक घेतलेल्या या गावासाठी सुमारे सव्वादोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ई-टेंडर करून लवकरच कामे सुरू केली जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्याकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांनी 'म.टा.'ला दिली. वेरूळ गाव, वेरूळ तांडा, तळ्याची वाडी या भागांत वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यावर या प्रस्तावात भर देण्यात आला आहे. कचरा व्यवस्थापनासाठी आमदार प्रशांत बंब यांनी दिलेल्या घंटागाडीचा वापर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार धूत यांनी गाव दत्तक घेतल्यानंतर मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्त्यांची सुमारे १० लाख रुपयांची कामे करण्यात आली आहेत. यापुढील टप्प्यात ग्रामपंचायत इमारत, ग्रंथालय, व्यायामशाळा, स्मशानभूमी, दशक्रिया विधी घाटाचे सुशोभीकरण, गावांतर्गत सिमेंट रस्ते, मुख्य चौकात हायमास्ट पथदिवे, गावातील शाळेला संगणक, अंगणवाडीसाठी खेळाचे स्थायी साहित्य, कब्रस्थानात संरक्षक भिंत, आयटीआयला यंत्रसामुग्री, लक्षविनायक गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुटपाथ बांधणे, पथदिवे बसविणे ही कामे विकास आराखड्यात समाविष्ट आहेत. सध्या ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम व वृक्षलागवड हे दोन उपक्रम हाती घेतले आहेत. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके यांनी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वेरूळ गाव आणि वेरूळ तांडा येथील शौचालयांच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्याच्यासोब सरपंच साहेबराव पांडव, उपसरपंच कोमलबाई दगडफोडे, किरण काळे, श्याम शेवाळे, विजय भालेराव, संगीता राठोड, रेखा ठाकरे, संगीता जाधव, रूख्मणबाई बकाल, देविका मेहर, अनिता गुमलाडू, संतोष फुलारे, साहेबसिंग गुमलाडू, रफिक शेख, सुवर्णा मिसाळ, गटविकास अधिकारी डॉ. आर. एस. लाहोटी, ग्रामविकास अधिकारी बी. आर. म्हस्के आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणार्थी कामगारांना मध्यरात्री मारहाण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, वाळूज

वाळूज एमआयडीसीतील एफडीसी लिमिटेड कंपनीने दोन कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात कंपनीसमोर आमरण उपोषण करणाऱ्या कामगारांवर सोमवारी मध्यरात्री दोन वाजता अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्लेखोरांनी आंदोलनक कामगारांना बेदम मारहाण केली.

एफडीसी कंपनी व्यवस्थापकांनी संजय श्रीपत भिंगारे व विश्वनाथ एकनाथ इंगळे या दोन कामगारांना कामावरून निलंबित केले होते. व्यवस्थापकांच्या या निणर्याच्या विरोधात महाराष्ट्र कामगार विकास संघटनेतर्फे कंपनीच्या प्रवेशद्वारावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलकांवर रात्री दोन वाजता हल्ला करण्यात आला. उपोषणार्थीसोबत असलेले पंढीरनाथ खरात, महेश शेळके, तुकाराम गवळी हे मारहाणीत जखमी झाले आहेत. या हल्ल्याची माहिती आंदोलकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसाना दिली आहे. मात्र याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरसिद्धी देवी यात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल येथील हरसिद्धी देवी यात्रोत्सवानिमित्त व्यायाम शाळेतर्फे खुल्या कुस्त्यांची दंगल व केसरी गट, कबड्डी तसेच देखणे पशु प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन बुधवारी (२५ नोव्हेंबर) करण्यात आले आहे.

या यात्रोत्सवात बुधवारी सायंकाळी सहा वाजता बारामती आर्केस्टा संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्त्यांची दंगल गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास ३१००० रुपये व चांदीची गदा तसेच व्दितीय विजेत्यास २१००० रुपये, अशी पारितोषिके जाहीर करण्यात आलेली आहेत. शुक्रवारी सकाळी ११ ते ३ यावेळेत घोडा, कोंबडा, बकरी, कुत्रा आदी पशुंचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत चालीची स्पर्धा व नाचकाम स्पर्धा अशी विभागणी करण्यात आली आहे. शुक्रवारी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संघांची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम ११,१११ रुपये, व्दितीय ५,५५५ रुपये, तृतीय ३,३३३ हजार रुपये अशी रोख पारितोषिके विजेत्या संघांना दिले जातील. या सर्व स्पर्धा हरसिद्धी देवी आखाडा (हर्सूल) येथे होणार आहेत. या स्पर्धांचे आयोजन मनपाचे आरोग्य सभापती विजय औताडे व नगरसेवक पूनमचंद बमणे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर दुरुस्ती रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

पुरातत्व खात्याच्या ताब्यात असलेल्या खंडोबा मंदिराची दुरवस्था होत असून, अद्याप त्याची डागडुजी व दुरुस्तीचे काम झालेले नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे दीपमाळेचे काही दिवे ढासळले. खंडोबा यात्रेला पुढील महिन्यात सुरुवात होत आहे, यात्रेला लाखो भाविक भेट देतात. त्यापूर्वी मंदिराची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

साताऱ्यातील खंडोबाचे हेमाडपंथी मंदिर सुमारे २९५ वर्षे जुने आहे, हा परिसरातील अमुल्य ठेवा आहे. परंतु काळाच्या ओघात मंदिराची झीज झाली आहे. मंदिराच्या कळसाचा काही भाग, तसेच पायथ्याच्या काही भागाला क्षती पोहोचली आहे. त्यावर असलेले नक्षीकामही तुटले आहे. दीपमाळेचे बरेचसे दिवे एक एक पडले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पावसात दिवे पडले होते. त्यानंतर पुरातत्व विभागाने मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्याचे सांगितले. त्यानंतर अधिकारी येऊन पाहणी करून गेले. परंतु प्रत्यक्षात कामाला मात्र सुरूवात झाली नाही. श्रावण महिन्यात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विश्वस्तांनी प्रवेशद्वार खुले केले. खंडोबाच्या यात्रेला १२ डिसेंबर सुरुवात होत आहे. यात्रेत औरंगाबाद शहर, मराठवाड्यातील इतर सात जिल्हे, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रेची पूर्वतयारी म्हणून मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिरावरील झाडे काढण्याचे तसेच रंगरंगोटीचे काम सुरू केले आहे. तसेच भाविकांसाठी धर्मशाळाही बांधण्यात आली आहे. मनपा प्रशासनही यात्रेच्या तयारीसाठी कामाला लागले आहे. पुरातत्व खात्याचे अधिकारी महेंद्र साखरे यांनी संपूर्ण मंदिराच्या डागडुजीचा व नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्याला मंजुरी मिळाल्यावरच कामाला सुरूवात होईल, असे सांगितले. यात्रेपूर्वी काम करण्याची मागणी मंदिराचे अध्यक्ष गोविद चोपडे, सचिव मोहन पवार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्मचारी-ठेकेदारात फ्रीस्टाइल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यास टेबलवर जाऊन शिवीगाळ केल्यावरून ठेकेदार आणि कर्मचाऱ्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. हा प्रकार मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा मात्र नोंदविला गेला नाही.

याविषयी प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी, की सिल्लोड येथील ठेकेदार दादाराव वानखेडे हे मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेत आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या दालनात जाऊन त्यांनी विचारपूस केली. सीइओ नसल्याने तिथे आरडाओरड केली. तिथून समोरच असलेल्या बांधकाम विभागात वानखेडे गेले आणि कार्यकारी अभियंता बाविस्कर यांची चौकशी केली. हे अधिकारीही नसल्याने चिडलेल्या वानखेडे यांनी बांधकाम विभागात जाऊन इंगळे या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला आणि वानखेडे यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे चिडलेले इंगळे आणि वानखेडे यांची जोरदार झटापट झाली. त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. सीइओ दालनासमोर काहीतरी गोंधळ सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेत आधीच पसरली होती. त्यात हाणामारी सुरू झाल्याचे कळताच गर्दी जमली. काही जणांनी हाणामारी सोडविली. तोवर पोलिसांना माहिती कळाली होती. क्रांतिचौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वानखेडे व इंगळे दोघांनाही जीपमध्ये बसवून पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. वानखेडे यांच्या पत्नी सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती आहेत. या हाणामारीची जिल्हा परिषदेत चर्चा होती.

सीसीटीव्हीत घटना कैद

कर्मचारी आणि ठेकेदारातील ही फ्रीस्टाइल हाणामारी कार्यालयात घडली. सीइओ दालन, बांधकाम विभाग तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुढे पुराव्यादाखल सीसीटीव्हीचे फुटेजही वापरले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून स्वच्छता मोहीम केली बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुटीच्या दिवशी कार्यालयात येऊ नका असे पत्रच महापालिकेच्या लेखा विभागाने काढले असून, सर्व विभागप्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांना या पत्राच्या प्रती देण्यात आल्या आहेत. रविवारी नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संपूर्ण नगररचना विभाग स्वच्छ केला. त्या पार्श्वभूमीवर हे पत्र काढल्याची माहिती मिळाली.

महापालिकेच्या नगररचना विभागातील अनागोंदी कारभारावर आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. नगररचना विभागातून झालेल्या टीडीआरच्या व्यवहाराबद्दल नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे केंद्रेकर यांनी या प्रकरणांचा अहवाल मागवला होता. या अहवालाची धास्ती घेऊन नगररचना विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी रविवारी सुटीच्या दिवशी कार्यालयात दाखल झाले व त्यांनी हा विभाग साफ केला. काही जुनी कागदपत्रे आणि फाइल जाळून टाकल्या. या पार्श्वभूमीवर अस्थापना विभागाने सोमवारी सायंकाळी सर्व विभागप्रमुख व अन्य अधिकारी यांच्या नावे पत्र दिले. या पत्राच्या प्रती कनिष्ठ अभियंता, शाखा 'अभियंता यांनाही दिल्या. 'सुटीच्या दिवशी कार्यालयात येऊ नका व काम करू नका. कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्तही कार्यालयात काम करणे योग्य नाही. कार्यालयीन वेळेतच पूर्ण क्षमतेने काम करण्याची अपेक्षा आहे,'असे या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवंश हत्या, अकबर कुरैशीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोवंश हत्या प्रकरणी सिल्लेखान्यातून पोलिसांनी मंगळवारी अकबर कादर कुरैशी या व्यक्तीला अटक केली. त्याच्यावर गोवंश हत्त्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लेखाना भागात गोवंशाची हत्त्या केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या पथकाने मंगळवारी पहाडे पाचच्या सुमारास धाड टाकून गोवंशाची हत्त्या करणाऱ्यांवर कारवाई केली. पशूसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सिल्लेखाना येथे गोवंश हत्त्या करण्यात येत आहे असे कळाल्यावर पालिकेचे पथक त्या भागात पोचले. ज्या भागात गोवंशाची हत्त्या केली जात होती तो भाग या पथकाने शोधून काढला आणि हत्त्या करण्यात आलेले गोवंश जप्त करण्यात आले. या दरम्यान अकबर कादर कुरैशी यांच्या काही साथीदारांनी महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही महिला पथकावर चालून आल्या. क्रांतिचौक पोलिसांनी वेळीच कुमक पाठवून महापालिकेच्या पथकाला साथ दिली आणि अकबर कुरैशीला ताब्यात घेतले.

महापालिकेच्या पथकाने हत्या केलेल्या जनावराचे मांस जप्त केले. त्याच ठिकाणी बांधून ठेवलेली पाच जनावरेही ताब्यात घेतली. महापालिकेचे अैवध कत्तल विरोधी पथकाचे प्रमुख प्रेमसिंग चव्हाण यांनी अकबर कुरैशी यांच्या विरुध्द गोवंश हत्त्या केल्या प्रकरणी व पाच जनावरे डांबून ठेवल्याप्रकरणी क्रांतिचौक पोलिसात तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोळा मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइल चोरीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून दोन दिवसांत १६ मोबाइल हँडसेट चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यात एका दुकानातून १२ हँडसेट गेले तर अन्य चार जणांचे मोबाइल विविध घटनात चोरले गेले. मोबाइल चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे पोलिस मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे.

दुकानाचे शटर लॉक बनावट चावीने उघडून चोरट्यांनी विविध कंपनीचे बारा मोबाइल हॅण्डसेट लंपास केले. दर्गारोड परिसरात ही घटना घडली. फिर्यादी रुपेश प्रदीप गप्पे (वय २६, रा. जाधववाडी, वसंतनगर) यांचे मोबाइल शॉपीचे दुकान दर्गा रोड परिसरात आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता ते दुकानास कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. सोमवारी सायकांळी पाच वाजेच्या सुमारास ते दुकानात परत आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप बनावट चावीने उघडत आता प्रवेश केला व वेगवेगळ्या कंपनीचे बारा मोबाइल हॅण्डसेट लंपास केले, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास जवाहरनगर पोलिस करत आहेत.

चार नागरिकांनाही हिसका

शहरातील विविध भागातून चोरट्यांनी आणखी चार मोबाइल लंपास करीत नागरिकांना हिसका दिला. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फिर्यादी ऑलविन जय डॅनियल (वय २२, रा, मयूरबन कॉलनी) हे सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दर्गा रोडवरील आरे दूध केंद्र येथे दूध खरेदीसाठी गेले होते. दूध बॅग घेत असतानाच अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल लंपास केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास जवाहरनगर पोलिस करत आहेत.

अन्य तीन घटना क्रांतिचौक पोलिस स्टेशन हद्दीत घडल्या. गजानंद एकनाथ वाकडे ( रा, उदय कॉलनी) हे रविवारी दुपारी खोलीत झोपलेले होते तर त्यांचे मित्र घरकामात मग्न असताना दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने साडे पाच हजार रुपये किंमतीचा मोबाइल लंपास केला. तर सुरेश मुरलीधर आहेर ( वय ३०, रा. अयोध्या नगर सिडको) यांचा पाच हजार रुपये किंमतीचा मोबाइल सोमवारी दुपारी सव्वाच्या सुमारास बाबा पेट्रोल पंप परिसरातून चोरीला गेला. रिक्षात बसत असतानाच शर्टच्या खिशातून चोरट्यांनी मोबाइल लांबविला, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले.

याशिवाय फिर्यादी राहुल श्रीवास्तव ( रा. गारखेडा) यांचा मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी क्रांतिचौक पोलिसांकडे केली आहे.

....

गेल्या काही महिन्यांत शहरात मोबाइल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आतापर्यंत सुमारे पाचशेहून अधिक मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी केवळ दीडशे प्रकरणातील मोबाइल चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ३५० प्रकरणांतील मोबाइल चोरीचा मात्र छडा लागू शकलेला नाही. सातत्याने होत असलेल्या अशा घटनांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकने महिलेस चिरडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

सामाजिक कार्यकर्त्या, महिला व्यावसायिक मंदा वालतुरे यांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बीड बायपासवरील रेणुकामाता मंदिर कमानीसमोर घडली. चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गाडी चालवणारी २४ वर्षीय तरुणी जखमी असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतरही ट्रकचालकास या घटनेची माहिती नव्हती. शेजारी जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने त्याला याबाबतची कल्पना दिली. पंजाबच्या या ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली आहे.

सातारा परिसरातील पृथ्वीनगर येथे राहणाऱ्या मंदा संजय वालतुरे (वय ४१) यांचे रचना बुटिक आहे. त्या आणखी नवीन डिझाइन शिकण्यासाठी शेजारीच राहणाऱ्या केतकी हेमंत अदवंत (वय २४) यांच्या सोबत शिवाजीनगर येथील शिवण क्लासमध्ये गेल्या होत्या. मंगळवारी या क्लासमध्ये प्रवेश घेऊन परतत असताना रेणुकामाता मंदिर कमानीजवळ त्यांच्या टीव्हीएस प्लेझरला (एमएच २०-४०३५)जमशेदपूरहून-नाशिकला अॅल्युमिनिअमचे सामान घेऊन जाणाऱ्या १२ चाकी ट्रकने (पीबी ०२ बीएल ९७८६) जोराची धडक दिली. या धडकेत गाडी चालवणारी केतकी डाव्या बाजूला तर, मंदा वालतुरे या उजव्या बाजूला पडल्या. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने मंदा यांचा जागीच मृत्यू झाला. तर केतकी जखमी झाली. ट्रकचालक केवलसिंग इंदरसिंग (रा. कर्तारपूर, पंजाब) याला मोटारसायकल स्वाराने सांगितल्यावर अपघात झाल्याचे कळले. अपघात घडला त्यावेळी पृथ्वीनगर येथे मंदा वालतुरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कांता कदम तेथून जात होत्या. त्यांनी अपघात झाल्याची माहिती मंदा यांच्या पतींना कळवली. पोलिसांनी मंदा यांना घाटी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे हे करीत आहेत.

बघ्यांचे मोबाइलवर शूटिंग

अपघात झाला त्यावेळी मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला. जमावातील अनेकांनी जखमींना मदत करण्याचे सोडून देऊन मोबाइलवर अपघात स्थळाचे शूटिंग करण्यात धन्यता मानली. यामुळे उपस्थितांतील अनेकांनी संताप व्यक्त केला. शूटिंग करण्यापासून अनेकांना रोखले.

पृथ्वीनगरवर शोककळा

मंदा वालतुरे यांच्या निधनाची वार्ता समजताच अपघात स्थळापासून काही अंतरावरच त्या राहत असलेल्या पृथ्वीनगरमध्ये शोककळा पसरली. त्यांचे पती संजय वालतुरे हे मूळचे सोनईजवळील नेवरगावचे रहिवासी. ते संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व जनता सहकारी बँकेत नोकरीस आहेत. १४ वर्षांपूर्वी ते पृथ्वीनगरला राहायला आले. मंदा वालतुरे यांनी तेव्हाच रचना बुटिक सुरू केले. त्यांचा विविध सामाजिक कार्यातही सहभाग असायचा. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा सीए झाला, तर दुसरा इंजिनीअरिंगला आहे. पृथ्वीनगरमध्ये जनता सहकारी बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने असल्याने त्यांच्या निधनाची बातमी कळताच संघाचे कार्यकर्ते, बँक कर्मचारी व कॉलनीतील रहिवाशांनी त्यांची घरी धाव घेतली.

...

. बीड बायपासच्या दोन्ही बाजूंनी नागरी वसाहती मोठया प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यातच जालना रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे शहरातील वाहतूकही या रस्त्याने वळवली आहे. मात्र, बीड बायपासला सर्व्हिस रोड नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नुकत्याच झालेल्या ट्रक अपघातात मराठवाडा हार्डवेअरसमोर एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हायवेच्या नियमानुसार २ किलोमीटर अंतरावर रस्ता उघडला होता. नागरिकांच्या मागणीनुसार कासलीवाल मार्व्हल व आणखी एका ठिकाणी रस्ता उघडा ठेवण्यात आला. मात्र, अयप्पा मंदिर व देवळाईतील नाईकनगर या दोन ठिकाणी डिव्हाइडर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राँग साइड वाहन चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच चौकात वाहतूक सिग्नल, स्पीडब्रेकरचा अभाव आहे. काही दिवसांपूर्वी देवळाई चौकातही दोन वृद्ध नागरिक अपघातात बळी पडले होते. आणखी किती बळी गेल्यावर सर्व्हिस रोड होणार, असा संतप्त सवाल राजू बिंद्रा, महेश चौधरी, सुधीर फुलवाडकर, अरूण कदम, प्रदीप जाधव, कैलास पाटील यांनी केला आहे.

. बीड बायपास येथील अपघातात ठार झालेल्या मंदा संजय वालतुरे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे काम करत. विविध सामाजिक कार्याबरोबरच त्या बचत गटही चालवत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या साविता कुलकर्णी यांनी दिली. संग्रामनगर उड्डाण पुलाचे काम जानेवारी २०१४ला पूर्ण झाले होते. फक्त उद्घाटनाअभावी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत मंदा वालतुरे यांच्यासह अन्य महिलांनी २६ जानेवारी २०१४ रोजी पुढाकार घेत उड्डाणपुलावरून फेरी काढत या पुलाचा वापर सुरू केला होता.

. बीड बायपासवरील रेणुकामाता मंदिर कमानीसमोरील रस्ता वर्दळीचा आहे. या चौकात यापूर्वी एका भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत महिला जखमी झाली होती. त्यानंतर सातारा पोलिस ठाण्याचा कर्मचारी ट्रकच्या धडकेत जखमी झाला होता. त्यावेळी संतप्त नागरिकांनी याठिकाणी गतिरोधक बसण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला होता. या ठिकाणी किरकोळ अपघात नेहमी होतात.

..

मंदा वालतुरे यांनी शिवाजीनगर येथील शिवण क्लासमध्ये आजच प्रवेश घेतला होता. त्यांचा क्लासचा पहिलाच दिवस संपवून त्या घरी परतत होत्या. त्याचवेळी हा अपघात घडला.

दुचाकी अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्लेझर चालवणाऱ्या केतकीने हेल्मेट घातले नव्हते. तसेच मागे बसलेल्या मंदा वालतुरे यांच्या डोक्यावरही हेल्मेट नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडीवर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा.विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या एलईडी पथदिव्यांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. हा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द करून पालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. पालिकेने 'इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टिम' या कंपनीची निविदा मंजूर केली होती. या निर्णयामुळे शहरात पथदिव्यांचा झगमगाट होणार आहे.

इलेक्ट्रॉनला निविदा दिल्याविरुद्ध 'पॉलिकॅब वायर्स' व 'शाह इन्व्हेस्टमेंट' या कंपन्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. या आदेशाला इलेक्ट्रॉनने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.

एलईडी (४० हजार नग) लावणे व आठ वर्षांच्या देखभालीसाठीच्या निविदा प्रक्रियेत तीन कंपन्या सहभागी होत्या. तांत्रिक कारणांवरून व अपेक्षित कागदपत्रे न दिल्याचे सांगत पालिकेने 'पॉलिकॅब' व 'शाह इन्व्हस्टमेंट'च्या निविदा नामंजूर केल्या होत्या. दोन सप्टेंबर २०१४च्या 'इलेक्ट्रॉन लायटिंग'चा ठराव मंजूर झाला. दुसऱ्या दिवशी (तीन सप्टेंबर) 'वर्क ऑर्डर'ही देण्यात आली. या निर्णयाला 'पॉलिकॅब' व 'शाह इन्व्हेस्टमेंट'नी स्वतंत्रपणे आव्हान दिले होते.

२५ कोटींच्या वार्षिक उलाढालीचा निकष असताना 'इलेक्ट्रॉन'ने 'व्हॅट रिटर्न'एेवजी 'सीए'चे प्रमाणपत्र दाखल केले. 'पॉलिकॅब'ची चार हजार कोटींची उलाढाल आहे; तसेच 'टेक्निकल बीड' पूर्ण केल्यानंतर 'फिल्ड टेस्ट' घेतली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले होते. २८ ऑगस्ट रोजी 'फिल्ड टेस्ट' घेण्यात आली होती. ३० ऑगस्ट रोजी 'टेक्निकल बीड'ची प्रक्रिया पूर्ण केल्याचे याचिकेत म्हटले होते. महापालिकेची एलईडी निविदा हायकोर्टाने रद्द ठरविली होती.

हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध इलेक्टॉन कंपनीने सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले. कार्यादेश देताना घाई झाली नाही. त्यामुळे पुरेसा वेळ देण्यात आला, असा दावा कंपनीने केला. सामंजस्य करारासंबंधी तांत्रिक समितीच्या अहवालात चर्चा झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तांत्रिक निविदेसोबत चालू वर्षाचे व्हॅट रिटर्न दाखल केले. याासंबंधीचा उल्लेख मूल्यमापन समितीच्या अहवालात असल्याचे कोर्टाने नमूद केले. एलईडी प्रक्रियेसंबंधीची ३ सप्टेंबर २०१४ रोजी महापालिकेने दिलेले आदेश कोर्टाने वैध ठरविले. कंपनीच्या वतीने मनुकुमार सिंघवी तर मनपातर्फे शाम दिवाण व सुधांशु चौधरी यांनी काम पाहिले.

२०११ ते २०१४ या तीन वर्षांत पालिकेला अडीच कोटी रुपये जाहिरातीतून महसूल मिळाला, पण त्यात पथदिव्यांवरील खांबांच्या जाहिरातीचे उत्त्पन्न शून्य होते. जाहिरातीचे अधिकार हा सर्वस्वी वेगळे आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनला जाहिरातीचे अधिकार देण्याचा पालिकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविला. हे अधिकार देताना पालिका निरपेक्षपणे वागली नाही असे मत व्यक्त करून पालिकेने यासठी पुन्हा नव्याने निविदा मागविण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीला लसीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाच गंभीर आजारांपासून बालकांचे संरक्षण करणारी पेंटाव्हॅलंट ही महत्त्वाची लस राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात; तसेच महापालिकेच्या शहरातील आरोग्य केंद्रांमध्ये व रुग्णालयांमध्येही उपलब्ध झाली आहे, मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) या लसीची अजूनही प्रतीक्षा कायम आहे.

महाराष्ट्रामध्ये सोमवारी (२३ नोव्हेंबर) सर्वत्र ही लस उपलब्ध झाली आणि त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला. औरंगाबाद जिल्ह्यामध्येही पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. महापालिकेच्या शहरातील सर्व आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये ही लस मंगळवारपासून उपलब्ध झाली आहे. मात्र घाटीमध्ये ही लस अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घाटीला ही लस उपलब्ध होणार आहे; परंतु अद्यापपर्यंत ही लस उपलब्ध झालेली नाही. घाटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लस देण्यासाठी बालकांना मोठ्या संख्येने आणले जाते. त्यामुळेच ही लस लवकरात लवकर उपलब्ध करण्याची अपेक्षा केली जात आहे. यासंदर्भात घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी, अद्याप ही लस उपलब्ध झाली नसली तरी लवकरच ही लस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आरोग्य उपसंचालकांशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, येत्या काही दिवसांत घाटीला ही लस उपलब्ध केली जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. आर. टी. चव्हाण यांनी 'मटा'ला सांगितले.

पेंटाव्हॅलंट लस प्रत्येक बालकाला उपलब्ध झाली असून, आता पोलिओ व्हॅक्सिनची प्रतीक्षा आहे. पोलिओ ड्रॉप्स वर्षानुवर्षे आणि सर्वत्र दिले जातात. त्या जोडीला 'पोलिओ'चे व्हॅक्सिनही लवकरच दिले जाणार आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, सूत्रांनी सांगितल्यानुसार येत्या काही महिन्यांत ही लसदेखील सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. तज्ज्ञांनुसार, 'पोलिओ'च्या व्हॅक्सिनमुळे कायमची पोलिओ मुक्ती साधता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षा शुल्काचा फज्जा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दहावीचे परीक्षा शुल्क माफ केले. कोणत्याही विद्यार्थ्याकडून शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट केले. मराठवाड्यातील सर्व गावे दुष्काळग्रस्त भागात असतानाही विभागात दहावीच्या परीक्षा शुल्कापोटी तब्बल ६६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

मराठवाड्यात दुष्काळाजन्य परिस्थितीचा परिणाम शिक्षणावरही झाला आहे. दुष्काळा परिस्थिती विचारात घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०१६मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आकारणी करू नये, असा निर्णय सरकारने जाहीर केला. मंडळाने परिपत्रक काढून त्याबाबत मुख्याध्यापकांना सूचना केल्या. त्यानंतरही मंडळाने शुल्कवसुली सुरुच ठेवली आहे. आजपर्यंत विभागीय मंडळाने ६६ लाख रुपये शुल्क जमा केले आहेत. त्यामुळे शुल्कमाफीच्या घोषणेचा फज्जा उडाला आहे.

मराठवाड्यातील सर्व ८५५५ गावे दुष्काळग्रस्त जाहीर झालेली आहे. हे शुल्क शहरातील शाळांचे असल्याचा दावा मंडळाचे अधिकारी करत आहेत. मंडळाने काढलेल्या परिपत्रकाबाबत मंडळाच्याच अधिकाऱ्यांना संभ्रम असल्याने हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. काही ग्रामीण भागातील शाळांनीही शुल्क भरल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यमंडळाने २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा परिपत्रक काढत दुष्काळग्रस्त भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून अतिविलंब, विशेष अतिविलंब, अतिविशेष अतिविलंबन शुल्क आकरण्यात येऊ नये, असे स्पष्ट केले. अतिविलंबाने १० फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसमध्ये गटबाजी

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबाद - केंद्र व राज्यातील सत्ता गेली तरीही काँग्रेसमधील गटबाजी संपण्याची चिन्हे नाहीत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये अजूनही मतभेद आहेत. हे रविवारी सिद्ध झाले. नगरच्या कार्यक्रमातून परतताना पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण वेगवेगळ्या ठिकाणी थांबले. त्यामुळे स्वागतासाठीही वेगवेगळ्या गटाचे स्थानिक नेते त्या ठिकाणी हजर होते.

नगर येथे रविवारी पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी राज्य प्रभारी मोहन प्रकाश, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव शौराज वाल्मिकी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील बडे नेते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी हे नेतेमंडळी मुंबईहून हेलिकॉप्टरने नगरला आली होती. कार्यक्रम संपताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे हेलिकॉप्टरसाठी पूरक वातावरण नव्हते. त्यामुळे नेत्यांनी मुंबईला परतण्यासाठी औरंगाबादमार्गे विमानाने जाण्याचा पर्याय निवडला. त्यानंतर सूत्रे हालली आणि औरंगाबादहून विमानाची तिकिटे काढली गेली. दरम्यान, या घडामोडीत दोन तास निघून गेले. नगरहून निघताना पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि आमदार आनंदराव पाटील एका ताफ्यात तर मोहन प्रकाश आणि अशोक चव्हाण स्वतंत्र ताफ्यात निघाले. तिथूनच गटबाजीचे दर्शन घडले. इकडे औरंगाबादच्या नेतेमंडळींना निरोप आल्यानंतर गटानुसार स्थानिक नेते स्वागतासाठी उपस्थित राहिले. सुभेदारी विश्रामगृहावर पृथ्वीराज चव्हाण होते. तिथे प्रदेश सरचिटणीस अरूण मुगदिया, जितेंद्र देहाडे, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, किरण पाटील डोणगावकर, संजय औताडे तर हॉटेल अतिथी येथे अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश यांच्या स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, माजी आमदार नितीन पाटील, अनिल सोनवणे आदी मंडळी जमली होती. दोन्हीकडे काही वेळासाठी थांबलेल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि एकाच विमानाने मुंबईला निघून गेले. नगरहूनच जर ही मंडळी एकत्र निघून एकाच ठिकाणी थांबली असती तर गटबाजीच्या चर्चेला उधाण आले नसते. नेत्यांनीच गटबाजी संपविली पाहिजे. कार्यकर्ते बिचारे काय करणार ? अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना व्यक्त केली.

...

नेतेमंडळी औरंगाबाद मार्गे जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांमार्फत औरंगाबादला कळविण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी सहाच्या सुमारास सोयीनुसार निवडक पदाधिकाऱ्यांना हा निरोप कळविण्यात आला. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आपोआप विभागले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला शिस्त लावण्याचे आव्हान

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com

महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य शासनाने सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती केली आहे. केंद्रेकर यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे, परंतु त्यांनी ज्या तडफेने महापालिकेत काम सुरू केले आहे त्यावरून ते अतिरिक्त कार्यभार असलेले अधिकारी आहेत, असे वाटत नाही. अवघ्या चार दिवसांत त्यांनी महापालिका सुतासारखी सरळ करून दाखलवी आहे, पण पालिकेच्या कारभाराला कायमस्वरुपी शिस्त लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे हे मात्र तेवढेच खरे.

महापालिकेचा कारभार आतापर्यंत मनमौजी पद्धतीने सुरू होता. प्रत्येक अधिकाऱ्याचा वेगळा कायदा आणि वेगळ्या पद्धतीचे काम अशी महापालिकेची ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे कामेही अधिकाऱ्यांच्या मर्जीनेच होत होती. आता त्याला लगाम बसू लागला आहे. भ्रष्टाचार मला चालणार नाही, तो मी खपवून घेणार नाही, असे केंद्रेकर यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्टपणे बजावले. त्यांचे हे बजावणे फक्त अधिकाऱ्यांनाच होते असे नाही, तर काही नगरसेवकांनाही त्यांनी फटकारले. महापालिकेच्या बाबतीत भ्रष्टाचार हा महत्वाचा मुद्दा आहेच. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे यात दुमत असण्याचे कारण नाही, पण त्याचबरोबर काही महत्वाच्या मुद्यांकडे केंद्रेकर यांना लक्ष द्यावे लागणार आहे. त्यातला पहिला मुद्दा मालमत्ता कराच्या वसुलीचा आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. २५ ते २८ टक्केच मालमत्ता कराची वसुली होते. औरंगाबाद शहराचा समावेश स्मार्ट सिटी अभियानात झालेला असल्यामुळे करांच्या वसुलीचे प्रमाण महापालिकेला किमान ८० टक्के करावे लागणार आहे. करवसुली झाली तरच शहराचा विकास शक्य आहे. शासनाचे अनुदानही कर वसुलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काळात कर वसुलीची टक्केवारी वाढविण्यावर केंद्रेकर यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

महापालिकेचा लेखा विभाग आणि नगररचना विभाग नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय बनले आहेत. सामान्य माणसांची कामे या दोन्हीही विभागात सहजासहजी होतच नाहीत. बड्यांना मात्र दोन्ही विभागात 'रेड कार्पेट' चा अनुभव येतो. या दोन्ही विभागात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत, त्यामुळे या दोन्ही एकप्रकारची साखळी निर्माण झाली आहे. ही साखळी तोडण्याचा प्रयत्न आतापर्यंत कुणीही केला नाही. या दोन्ही विभागातील एखाद्या व्यक्तीची बदली अन्य विभागात झाली तर काही दिवसातच ती व्यक्ती त्याच्या मूळ पदावर येऊन बसते. 'सबकुछ मॅनेज होता है' असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो. हा भाव मोडून काढण्याचे आव्हानही केंद्रेकरांना स्वीकारावे लागणार आहे. या दोन्हीही विभागात मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या तरच लेखा विभाग, नगररचना विभाग सुतासारखा सरळ होईल. सर्वसामान्यांनाही त्यातून दिलासा मिळेल.

विद्युत विभागाचे अस्तित्व केंद्रशासित प्रदेशासारखे स्वतंत्र आहे. या विभागात कोण काय करते हे कुणालाच कळत नाही. त्यामुळेच शहर अंधारात ओढले गेले आहे. या विभागावर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न वेळोवेळी निर्माण होतो आणि अनुत्तरित राहतो. नागरिकांनीच काय पण नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण देखील हा विभाग तत्परतेने करत नाही. या विभागाच्या शुद्धीकरणाची देखील गरज आहे. शुद्धीकरण झाले तरच शहरात दिवे लागतील अशी स्थिती आहे. महापालिकेच्या निमित्ताने केंद्रेकरांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. रस्ते दुरूस्ती, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा हे विषय तर ऐरणीवरचे आहेतच. त्यावरही रामबाण उपाय शोधले गेले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने नागरिकांना दिलासा मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरसाठी ‘निम्न तेरणा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

पाणीपुरवठ्याचे मोठे आव्हान असणाऱ्या लातूर शहरासाठी आता उजनीऐवजी निम्न तेरणा धरणाचा विचार करण्यात येत आहे. लातूरसाठी माकणी येथील या धरणातून पाणीपुरवठ्याचे नियोजन तपासण्यात येत असून, या योजनेचा सर्वेक्षण अहवाल एक-दोन दिवसांत मंत्रालयात सादर करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या पर्यायांचा विचार करता, हाच पर्याय सर्वांत व्यवहार्य असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे.

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने घडी पुस्तिकेच प्रकाशन करण्यात आले. या वेळी पोले यांनी ही माहिती दिली. लातूर शहराच्या पाणीपुरवठ्याविषयी बोलताना पोले म्हणाले, 'सध्या शहराला मांजरा धरणातून आणि साई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होत आहे. मांजरा धरणात तीन महिने पुरेल एवढे पाणी आहे. त्यानंतरच्या पाणी पुरवठ्यासाठी माकणीच्या निम्न तेरणा धरणातून पाणीपुरवठा केला जावा, यासाठी सर्वे करण्यात आला आहे. त्याचा अहवालही येत्या दोन दिवसांत राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.'

निम्न तेरणा धरणातून सध्या निलंगा, औसा शहरासह काही गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. त्यातील दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वीज बिलाअभावी बंद आहेत. त्या गावांची पर्यायी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे निम्न तेरणा धरणातील आरक्षित सात दशलक्ष घनमीटर पाणी साठ्यापैकी सर्व आरक्षणे वगळून चार दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक राहते. त्या पाण्याचा लातूर शहरासाठी करणे सोयीचे जाणार आहे. निम्न तेरणा धरणापासून औसा तालुक्यातील बोरफळपर्यंत पाइपलाइन आलेली आहे. त्याठिकाणाहुन लातूरपर्यंत पाइपलाइन टाकावी लागणार असल्याचे पोले यांनी सांगितले.

या वेळी घडीपुस्तिकेत जलसंधारण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना, स्वच्छ महाराष्ट्र, जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात गेल्या वर्षात करण्यात आलेल्या कामाची माहिती देण्यात आली आहे. या वेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी केले.

'बुडक्यां'चा आधार

लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे डोंगरगाव बंधाऱ्यातील पाणी मसलगा धरणात आणून ते बाभळगावमार्गे लातूर शहरात आणण्याचा विचार सुरू आहे. मसलगा ते पानचिंचोली, बाभळगावपर्यंत सध्या पाइपलाइन तयार आहे. फक्त बाभळगाव ते लातूर या अंतराचा प्रश्न आहे. नागझरी आणि मांजरा धरणातही बुडक्या मारून (खड्डे खोदून) पाणीसाठा निर्माण करण्याचा पर्याय ही असल्याचे त्यांना सांगितले. पाणी पुरवठ्याची सर्व कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार असल्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जीर्ण पाइपलाइनचा अडसर

लातूर शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा अत्यंत जुनी असल्यामुळे गळतीचे प्रमाण खूपच आहे, असे सांगून महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, 'केंद्राच्या अमृत योजनेतून सर्व पाइपलाइन बदलण्याचा ६१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिलेला आहे. तो मंजुर होताच, त्यातून नव्याने मुख्य पाइपलाइन आणि त्याला लगतची एक छोटी पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यामुळे तो प्रश्न मिटेल.' बेकायदेशीर बांधकामाबाबत तेलंग म्हणाले, '५० जणांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे त्यावर निर्बंध घालणे अडचणीचे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यातील नगरपंचायतींमध्ये भाजपला धक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपला धक्का बसला असून, भाजपचा प्रभाव असणाऱ्या नगरपंचायतींमध्ये पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविला आहे. तर, मंठ्यामध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला आहे. घनसावंगीबरोबरच बदनापूर आणि जाफराबादमध्येही राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष झाल्यामुळे, जालना जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलत आहे का, अशी चर्चा रंगली आहे.

नगर पंचायत निवडणूकीची तयारी स्थानिक पातळीवर सोडून देत, भाजपच्या नेत्यांनी या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात आपले अंग झटकून टाकण्याचे काम केले होते. मात्र याच पार्श्वभूमीवर घनसावंगी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी तळ ठोकून निवडणूक लढविली. जाफराबादमध्ये माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सर्व राजकीय खेळी मनापासून खेळत निवडणूक जिंकली. बदनापूरमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती होऊन देखील उपयोग झाला नाही. तर मंठ्यात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाऊन ही निवडणूक जिंकली आहे.

बदनापुरात युती अपयशी

बदनापूर नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीच्या चित्रलेखा पांडुरंग जर्हाड या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजप-शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगला बारगजे यांचा अकरा विरुद्ध सहा मतांनी पराभव केला. उपनगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे शेख युनूस शेख लालमिया हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे गोरखनाथ खैरे यांना अकरा विरुद्ध सहा मतांनी पराभूत केले. बदनापूर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत झाली होती.

घनसावंगी बिनविरोध

घनसावंगी नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम स्थापन केला आहे. नगराध्यक्ष पदावर योजना नंदकुमार देशमुख उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचे राधेश्याम प्रभाकर घाईत हे विजयी झाले आहेत. घनसावंगी नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा नगरसेवक विजयी झाले आहेत. विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रतिकात्मक विरोधही नोंदविला नाही, हे विशेष.

मंठ्यात शिवसेनेची बाजी

मंठा नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदावर शिवसेनेच्या पार्वतीबाई कैलास बोराडे विजयी झाल्या त्यांनी भाजपच्या मीरा राजेश मोरे यांचा नऊ विरूद्ध आठ मतांनी पराभव केला. उपाध्यक्ष पदावर बाळासाहेब जिजाभाऊ बोराडे विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या दिलकश मोईन कुरेशी यांना नऊ विरूद्ध आठ मतांनी मात दिली. मंठा येथे या निवडणुकीत भाजप-काँग्रेसची युती झाली होती.

जाफराबादमध्येही राष्ट्रवादी

जाफराबाद येथे नसरीन शेख साऊद या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष उमेदवार सईदा बेगम सर्फराज यांचा अकरा विरुद्ध सहा मतांनी पराभव केला. उपनगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचे दीपक वाकडे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या सय्यद मेहमूद यांचा अकरा विरुद्ध सहा मतांनी पराभव केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images