Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

चित्रपटगृहांत राष्ट्रगीताची गरज नाही: MIM आमदार

$
0
0



मटा ऑनलाइन वृत्त। औरंगाबाद

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणण्याची गरज नसल्याचे मत 'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. चित्रपटगृहांमध्ये लोक मनोरंजनासाठी जातात, तिथे राष्ट्रगीताची गरज काय असा प्रश्न उपस्थित करत चित्रपटगृहांमधील राष्ट्रगीत कोणाला राष्ट्रभक्त बनवू शकत नाही असेही ते पुढे म्हणाले.

मी माझ्या देशावर प्रेम करतो, राष्ट्रध्वज आणि आणि राष्ट्रगीताचा मी मोठा सन्मान करतो, परंतु चित्रपटगहांमध्ये राष्ट्रगीत गाऊन माझ्या महान देशाच्याप्रती मी माझी देशभक्ती प्रदर्शित करू इच्छित नाही असेही जलील यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे जलील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली. दोन दिवसांपूर्वी ( सोमवारी ) मुंबईतील एका चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर उठून उभे न राहणा-या एका कुटुंबाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर या मुद्द्यावर सतत चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शैक्षणिक कर्जवाटप वाढले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पदव्यूत्तर शिक्षणासाठी जेव्हा जेव्हा अमेरिका, लंडन, कॅनडा, सौदी अरेबिया, युएई किंवा तत्सम ठिकाणी जायची वेळ येते तेव्हा पदरमोड करत कर्जही घ्यावे लागते. या कर्जाचे प्रमाण २० ते २४ टक्क्यांनी वाढले आहे. औरंगाबादमधून परदेशात शिक्षण घेण्याचा ट्रेंड वाढत चालला असून पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी शहराशिवाय देशांतर्गत आणि देशाबाहेर जाण्याचा विद्यार्थ्यांचा कलही वाढला आहे. शहरातील सुमारे १४ राष्ट्रीय कृत बँकांच्या १५० हून अधिक शाखांत सध्या एक एप्र‌िल २०१५ पासून १० कोटींहून अधिक कर्जवाटप शैक्षणिक कारणासाठी झाले आहे. जून २०१४ मध्ये ही टक्केवारी १४ टक्के होती. जून २०१४ पेक्षा या कर्जाची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली आहे.

देशांतर्गत शिक्षणाच्या कर्जासाठी ४ लाख, देशाबाहेर किमान ७ लाख ते २० लाखापर्यंत बँका कर्ज देऊ लागल्या आहेत. चार लाखांपर्यंत तारणाची गरज नसते, परंतु त्यापुढील रकमेवर तारण म्हणून घर किंवा इतर मालमत्ता तारण ठेऊन हे कर्ज दिले जात आहे. विविध बँकांनी मार्केटिंगच्या माध्यमातून शैक्षणिक कर्जासाठी कॉलेजपर्यंत पायघड्या पसरल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना कर्ज घेण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. कर्जदारांची संख्याही वाढली आहे. १५ ते २० लाखांपर्यंतच कर्ज आजकाल सहज मिळते. सध्या ८० लाख ते सव्वा कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज, १० ते १३ टक्के व्याजदराने घेऊन शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसतो आहे.

स्टडी अॅब्रॉडचा व विशेषत: अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स‌िंगापूर येथे शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी ५० ते ८० ने वाढत आहे. महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक विजय कांबळे म्हणाले, 'आमच्या बँकने एप्र‌िल ते डिसेंबर-२०१५ पर्यंत ४ कोटी कर्ज फक्त शैक्षणिक कारणासाठी दिले आहे.' याशिवाय शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि इतर बँकांनी सुमारे ८ ते १२ कोटी रूपये शैक्षणिक कर्जासाठी दिले आहेत.

कर्ज घेताना मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज देताना आम्ही त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड तपासतो. तो ज्या देशात, ज्या कॉलेजमध्ये, ज्या कोर्सला जाणार आहे त्यावरही कर्जाची रक्कम ठरते. कॉलेजचे प्लेसमेंट रेकॉर्ड, कोर्सला असलेली मागणी आदी बाबीही आम्ही विचारात घेतो, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. देशांतर्गत जयपूर, कोटा यासाठी कर्ज घेतले जात आहे. ‌याशिवाय सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग आणि इतर शाखांसाठी पुणे, मुंबई, बंगळुरू, चेन्नईला प्राधान्य देतानाही विद्यार्थी किमान १० लाख ते २० लाखापर्यंत कर्ज घेत आहेत.

परताव्याची चिंता

कर्जाची सहज उपलब्धता, सोयीसुविधा आणि इतर बाबी पाहता परताव्याची चिंता बँकांना सतावते आहे. साधारण १० टक्के थकित कर्ज असल्याचे बँकांचे अधिकारी सांगतात. वसुलीसाठी फार चकरा माराव्या लागत आहेत, पण शैक्षणिक कर्ज वसुल होत असल्याने ते सहसा बुडित खात्यात जात नाही, असेही अधिकारीवर्गाचे म्हणणे आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवन फूड फेस्टिवल ९ डिसेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सालाबादानुसार एमजीएम (महात्मा गांधी मिशन)च्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे यंदाही फूड फेस्टिवल आयोजित केला आहे. यंदाच्या फूड फेस्टिवलची संकल्पना 'गोवन फूड' आहे. हा महोत्सव दि. ९ ते १२ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी माहिती संचालिका हर्षा पोलकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवात गोव्याची संस्कृती आणि वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ सादर केले जातील. हा संपूर्ण महोत्सव विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. औरंगाबादकरांना एमजीएम परिसरातील सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर गोव्याची अनुभूती नक्कीच घेता येईल. या परिसरातील जलतरण तलाव आणि येथील तरुणाईच्या उत्साहाने सळसळणारे वातावरण या महोत्सवाचे वैशिष्ट्य अधिक खुलणार आहे. ९ ते १३ डिसेंबर संध्याकाळी ७ ते रात्री १०.३०पर्यंत हा महोत्सव असेल. या महोत्सवादरम्यान गोव्याच्या नृत्याचा देखील आस्वाद घेता येणार आहे, गोव्यात न जाता गोव्याची अनुभूती व आनंद औरंगाबादकरांना अनुभवता येईल. हा खाद्य महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. त्यात गोव्यातील विशिष्ट शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे, असे हर्षा पोलकम यांनी सांगितले. या महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन एमजीएमतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटविले; रस्ते मात्र रिक्षाचालकांचेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणाऱ्या इमारती पाडून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनपर्यंतचा रस्ता मोकळा करण्यात आला, पण रिक्षाचालकांच्या विळख्यातून मात्र हा परिसर मुक्त झाला नाही. उलट या मोकळ्या रस्त्याला आपला मालकी हक्क समजून रिक्षाचालक दिवसेंदिवस या रस्त्याला बेशिस्त व धोकादायक बनवित आहेत. ही समस्या माहित असूनही वाहतूक पोलिस मात्र कोणतीच ठोस कारवाई करत नाहीत.

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन, जयभवानीनगर, विश्रांतीनगर भागातील अतिक्रमणे कोर्टाच्या आदेशानंतर पाडण्यात आली, पण त्यानंतरही या रस्त्याचे ग्रहण काही सुटले नाही. कारण रिक्षाचालकांनी जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत अतिक्रमण केले आहे. डीपी प्लॅननुसार महापालिकेने पाडापाडी करून बहुमजली इमारतीही पाडल्या, पण अद्यापही जयभवानीनगर, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटली नाही. त्यातच जयभवानीनगर ते पुंडलिकनगर रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शिवाजी पुतळ्यापासूनच वा‌हतूक कोंडी होते. अतिक्रमणे काढताना पोलिस आयुक्तांनी ज्याप्रकारे अतिक्रमणाविरोधी भूमिका घेतली तशीच पोलिसांनी आता या परिसरातील वाहतूक कोंडीही सोडवावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.



रिक्षाचालकांवर वरदहस्त कोणाचा?

जयभवानीनगरची वा‌हतूक कोंडी वाहतूक पोलिसांना चांगल्याप्रकारे माहिती आहे. नागरिक, परिसरातील दुकानदारही वेळोवेळी पोलिस गस्तीची मागणी करतात, पण कुणी महत्त्वाची व्यक्ती येणार असेल तरच किंवा महिन्यातून काही मिनिटांचे पॅट्रोलिंग करून पोलिस निघून जातात. पोलिसांची गस्त होणार असते त्यापूर्वीच रिक्षाचालक बाजूला होतात. पोलिस निघून गेल्यावर पुन्हा सर्व रिक्षा रस्त्यावर येतात. भररस्त्यात रिक्षा आडव्या करून बसलेल्या रिक्षाचालकांना कुणी अडविले तर ते अजिबात माघार घेत नाही. दुसरे म्हणजे केवळ शिवाजी पुतळा नव्हेच तर या रिक्षा ‌सिडकोकडे जाणाऱ्या रस्त्यावरही उभ्या असतात. रस्त्याचे काम चालू असतानाही रस्ता अडवला जातो. हा चौक किंवा रस्त्यावरची वाहतूक पोलिसांना दिसत नाही का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळेच या रिक्षाचालकांवर वरदहस्त कोणाचा, असाही प्रश्न पडतो.

मोकळ्या जागांचा वापर पार्किंगसाठी

महापालिकेने अतिक्रमण तर काढली, पण या मोकळ्या जागांवर वाट्टेल तशा गाड्या लावल्या जातात. परिणामी वाहतूक कोंडी होते आहे. फुकट पार्किंग करायला मिळत असल्याने कुणीही येतो व पार्किंग करतो. रस्ता मोकळा करूनही वाहतूक कोंडीतून सुटका मात्र होत नाही, असे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावगीत स्पर्धेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठी मनाला भावणाऱ्या, जवळच्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यात भावगीतांना प्रामुख्याने खूप वरचे स्थान आहे. शब्दप्रधान गायकीतून येणाऱ्या भावगीताचे हेच महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र टाइम्सने यावर्षीही वर्धापन दिनाच्या निमित्ताने भावगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवारी (५ डिसेंबर) रोजी ही स्पर्धा मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.

दोन गटांमध्ये ही भावगीत स्पर्धा घेतली जाणार आहे. पहिला गट हा शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा, तर दुसरा खुला गट असणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ९८२२६३०५५५ या क्रमांकावर स्पर्धकांनी संपर्क साधावा.भावगीत ही शब्दप्रधान गायकी असते. शब्दांना न्याय देणारी त्याची चाल बांधलेली असते. गाण्यातील शब्दांना अर्थवाही करून गाणे ही त्या गायकाची जबाबदारी असते. शहरातील अनेक गायकांकडे शब्दप्रधान गायकीसाठी शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. अशा सर्व गायकांनी या या भावगीत स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन 'मटा'तर्फे करण्यात आले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांना दुप्पट वेटिंगची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीतील अपंगांच्या प्रमाणपत्रांसाठी कमी झालेले वेटिंग पुन्हा एकदा चक्क दुपटीने वाढले आहे. पूर्वीचे वर्ष-दीड वर्षाचे वेटिंग अलीकडच्या काही महिन्यांत दीड महिन्यावर आले होते. मात्र, आता पुन्हा हे वेटिंग तीन महिन्यांवर गेले आहे. अर्थात, तीन महिन्यानंतरच्या तारखेला प्रमाणपत्र मिळेलच, याचीदेखील शाश्वती नाही. अधून-मधून होणारा 'सर्व्हर डाऊन'चा झटकाही अपंगांनाच बसतो आहे. या सगळ्या प्रकारांमुळे अपंगांना नाहक त्रास सोसावा लागतो आहे.

अपंगांना प्रमाणपत्र मिळण्याची सोय आजतरी केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्येच (घाटी) आहे. इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ही सोय आहे. मात्र, शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय अजून तरी कार्यरत झालेले नसल्याने आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ही जबाबदारी उचलली जात नसल्यामुळे प्रमाणपत्र वाटपाचे महत्वाचे काम केवळ घाटीलाच करावे लागते. केवळ अपंगांचेच नव्हे तर, अंध, बहिरेपणा व मतिमंदत्वाच्या प्रमाणपत्रांचे वाटपही केवळ घाटीतून होते. साहजिकच सगळा ताण घाटीवर येत असल्यामुळे प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यातही अपंग प्रमाणपत्रांना सर्वाधिक गर्दी असते. त्यातच मागच्या दोन-अडीच वर्षांपासून ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येत असून, यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत. एकतर ऑनलाईन फॉर्म पूर्वीच्या तुलनेत मोठा असून, त्याला अधिक वेळ लागतो. तसेच हा सगळा फॉर्म भरल्याशिवाय सिस्टीम पुढे जात नाही व प्रमाणपत्र देणे शक्य होत नाही. यामध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो आणि तपासण्यांमध्येही वेगळा वेळ जातो. मात्र, सर्व्हर बंद पडल्यास सगळेच काम ठप्प होते. ही सिस्टीम सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळात सर्व्हर वारंवार बंद पडत होते व प्रमाणपत्र वाटपाचे काम करणारे डॉक्टर-कर्मचारी मर्यादित असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात अपंगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी चक्क वर्ष-दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळेच घाटीमध्ये वेळोवेळी आंदोलनही झाले. यामध्ये अलीकडे सुधारणा झाल्या आणि मागच्या काही महिन्यांत तर हे वेटिंग कमी होऊन अगदी दीड महिन्यावर आले. मात्र, आता हे वेटिंग पुन्हा दुप्पट म्हणजेच तीन महिन्यांवर गेले आहे. आता अनेक रुग्णांना तीन महिन्यानंतरची तारीख देण्यात आल्याची तक्रार प्रहार अपंग संघटनेने 'मटा'कडे केली आहे. त्याचवेळी जी तारीख देण्यात येत आहे, त्या तारखेलाही प्रमाणपत्र मिळत नसल्याचे समोर आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

'सर्व्हर डाउन'ने दीड तास काम

मागच्या आठवड्यात गुरुवारी अपंग प्रमाणपत्र वाटपाचा दिवस असताना, त्या दिवशी सकाळपासूनच साडेअकरा ते बारापर्यंत 'सर्व्हर डाउन' होते आणि सर्व्हर सुरू झाल्यानंतर केवळ दीड तास काम झाले. त्यामुळे त्या दिवशीची तारीख देण्यात आलेल्या अनेक अपंगांना रिकाम्या हाताने परतावे लागले. हे प्रकार अनेकदा होतात आणि तारीख देण्यात आलेल्या दिवशी कितीतरी अपंगांना प्रमाणपत्र मिळत नाही व अपंगांना प्रमापत्रासाठी खेट्या माराव्या लागतात, अशीही तक्रार प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी केली.

आता अपंगांना प्रमाणपत्रासाठी तीन महिन्यानंतरची तारीख देण्यात येत आहे. तीन महिन्यानंतर म्हणजेच तारीख दिल्याच्या दिवशीही प्रमाणपत्र मिळत नाही, अशी एकंदर स्थिती आहे. त्यातच 'सर्व्हर डाऊन'मुळे अचानक काम थांबून जाते. त्यासाठी दुसरी पर्यायी इंटरनेटची सुविधा असणे आणि प्रमाणपत्र वाटपाचे काम करणारे मनुष्यबळ वाढवणे आवश्यक आहे. मात्र, याकडे घाटीकडून दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडूनही प्रमाणपत्र वाटपाचे काम होत नसल्याने अपंगांचा त्रास वाढतोच आहे.

- शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष, प्रहार अपंग संघटना

चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर रुग्णालयातून प्रमाणपत्र वाटप सुरू केले जाईल. त्यासाठी शहरातील अपंगांना घाटीतून, तर ग्रामीण भागातील अपंगांना जिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. त्यासाठी प्रयत्न असणार आहे.

- डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हाशल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांसाठी अडथळ्यांची शर्यत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध शासकीय कार्यालयात जाणे म्हणजे अपंग बांधवांसाठी अडथळ्याची शर्यत ठरू लागली आहे. शासकीय कार्यालयांच्या इमारतींमध्ये अपंगासाठी रॅम्प तयार करण्यात यावेत, असा नियम आहे, पण या नियमाची अनेक ठिकाणी पायमल्ली केली जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अधिकाऱ्यांचे दालन दुसऱ्या मजल्यावर असल्यास अपंगत्व असलेली व्यक्ती तेथे कशी जाणार, याचा साधा विचारही करण्यात आलेला दिसत नाही. केवळ शासकीय नव्हे तर एटीएम सेंटरसह अनेक खासगी कार्यालययांच्या ठिकाणीही फारशी वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे अपंगांना अनेक अडचणींना सामना कराला लागतो.

अंध, अस्थिव्यंग, अधू, कर्णबधीर, गतीमंद आदी प्रवर्गातील सुमारे ५० हजारांहून अधिक अपंग बांधव जिल्ह्यात आहेत. या अपंग बांधवांना इतरांप्रमाणे सर्व ठिकाणी अडथळा विरहित मुक्तसंचार करता आला पाहिजे, पण काही उपवाद वगळता शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह अन्य सार्वजनिक ठिकाणी तशी पुरेशी सुविधा उपलब्ध नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात नाही म्हणयला रॅम्प तयार करण्यात आला. त्यामुळे अपंगांची थोडी सोयी झाली, पण दुसऱ्या मजल्यावर जिल्हाधिकारी यांच्या दालनात अपंगांना जाण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. विभागीय आयुक्त कार्यालयात लिफ्टची सुविधा असल्याने येथे अपंगांना दिलासा मिळतो आहे. घाटी हॉस्पिटल बाह्यरुग्ण विभागातील लिफ्टही केवळ शोभेपुरतीच आहे. त्यामुळे रुग्णांसह येणाऱ्या अपंगांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. तर धर्मादाय उपायुक्त कार्यालयात लिफ्टची सोय आहे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढल्याशिवाय अपंगांना पर्याय नाही. पोलिस आयुक्त कार्यालयत आयुक्तांचे दालन तळमजल्यावर आहे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी चार ते पाच पायऱ्या चढव्याच लागतात. पोलिस अधिक्षक कार्यालयातही अंपगांसाठी रॅम्प तयार करण्यात आलेला नाही. शहरातील पोलिस ठाण्यामध्येही यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही. सामाजिक न्याय भवनात महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळासह विविध कार्यालये आहेत. या ठिकाणी रॅम्पसह लिफ्टची सोय आहे, पण ती केवळ नावापुरतीच. अद्यापही ती लिफ्ट सुरुच करण्यात आली नाही. निवडणूक काळात सर्व मतदान केंद्रांवर अपंगांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात रॅम्प उभारले जातात. त्याचा गाजावाजा केला जातो, पण विविध कार्यालयात अपंगासाठी कायमस्वरुपी व्यवस्था किंवा नियोजन होताना दिसत नाही. अपंगांना समानतेचा हक्क मिळताना दिसत नाही.

अंधाना बसस्थानकाची माहिती कळण्यासाठीची उद्धोषणा यंत्रणा नाही. रेल्वे प्लॅटफॉर्मची उंचीही विकलांगांसाठी अडचणीचे ठरते. काही ठिकाणी रॅम्प आहेत, पण तिथे चढ, उतार योग्य नसणे, गुळगुळती टाइल्स असणे, अशा अनेक अडचणींचा सामना अपंगांना करावा लागतो. अपवाद वगळता, सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठ, एटीएम सेंटर आदी ठिकाणीही अपंगांच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली जात नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.



सर्वत्र अनास्था

अपंगांना कोणत्याही इमारतीत जाण्यासाठी लिफ्ट, रॅम्प ही सुविधा मोठी मदतगार ठरते, पण सर्व ठिकाणी अपंगांना या सुविधा दिल्या जात नाहीत. अशा विशेष सेवा देण्यात न आल्याने इमारतींचे मजले चढताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. आवश्यकता असतानाही अनेकदा व्हीलचेअर ठेवण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही, असा आरोप या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

राज्यात विविध प्रवर्गातील अंपगांची संख्या २८ लाख

शहरी भागातील अपंगाचे प्रमाण सुमारे ३५ ते ४० टक्के

ग्रामीण भागातील अपंगांची संख्या सुमारे ६५ टक्के

अपंग धोरणाचा मसुदा अद्याप जाहीर नाही.

अडथळा विरहित संचार करणे हा इतराप्रमाणे अपंगांचाही हक्क आहे, पण त्यासाठी आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाही. एटीएम सेंटर सारख्या ठिकाणीही जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढव्या लागतात. हा क्लेशदायक प्रकार आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन आदी ठिकाणीही उचित सुविधा नसल्याने मोठा त्रास होतो. यासह अन्य प्रवर्गातील अपंगाना आवश्यक त्या सुविधा तातडीने पुरविणे आवश्यक आहे. दयेची, मायेची अपंगांना गरज नाही तर मैत्रीचा हात हवा आहे. समानतेचा हक्क, अधिकार हवा आहे. अपंगाचे धोरण शासनाने त्वरित जाहीर केले पाहिजे.- सुहास तेंडुलकर, सामाजिक कार्यकर्ते

शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेले रॅम्पपैकी किती प्रामाणित व योग्य पद्धतीने बांधण्यात आले आहे, हा प्रश्नच आहे. योग्य पद्धतीने बांधलेले नसल्यास असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती होते.

- विजय कान्हेकर, सामाजिक कार्यकर्ते

अस्थिव्यंग, मूकबधीर, अंध यासह सर्वच प्रवर्गातील अपंगांना अडथळा विरहित मुक्त संचार करता आला पाहिजे. दुर्देवाने, तशी आवश्यक सुविधा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध करून दिली जाते. अंपग बांधवांचे काय म्हणणे आहे, हे समजून घेत ते सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजेत.

- ममता मोरे, सामाजिक कार्यकर्त्या

काही शासकीय कार्यालयात अपंगासाठी रॅम्पची सुविधा असली तरी ती पुरेशा प्रमाणात नाही. कार्यालयात प्रवेश करता येतो, पण अधिकाऱ्यांचे दालन दुसऱ्या मजल्यावर असेल तर तीव्र अपंगत्व असलेल्या व्यक्तीने काय करावे? याचा साधा विचारही केला जात नाही. ही दुर्देवी बाब आहे.

- सोपानराव वाडकर, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायब तहसीलदारांचा समान वेतनासाठी लढा

$
0
0

दहा डिसेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

'समान दर्जा...समान वेतन' देण्यात यावे, या प्रलंबित मागणीकडे राज्यशासनाने लक्ष वेधण्यासाठी नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. १० डिसेंबर रोजी मराठवाड्यातील सर्व नायब तहसीलदार विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद समोर धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती उस्मानाबादचे नायब तहसीलदार राजेश जाधव यांनी दिली.

नायब तहसीलदार यांना राजपत्रित अधिकारी (वर्ग २) चा दर्जा १९९८ मध्ये देण्यात आला. मात्र, त्यांचे वेतन निश्चित करताना शासन कुंजुषीपणा दाखवित असल्याचा नायब तहसीलदारांचा आरोप आहे. महसूल विभागातील अन्य राजपत्रित अधिकारी वर्ग-२ आणि नायब तहसीलदार (राजपत्रित अधिकारी वर्ग-२) यांना समान दर्जा देण्यात आला. मात्र, यांची वेतनश्रेणी निश्चित करताना शासनाने त्यांना भेदभाव केला आहे. समान दर्जा ....समान वेतन देऊन हा भेदभाव दूर करण्यात यावा एवढीच नायब तहसीलदारांची मागणी आहे.

राज्यातील सर्व राजपत्रित अधिकारी (वर्ग २) यांना ४६०० रुपये, अधिक ग्रेड वेतन देय आहे. परंतु, राजपत्रित अधिकारी (वर्ग-२) म्हणून कार्यरत असलेल्या नायब तहसीलदाराना ४३०० रुपये, अधिक ग्रेड वेतन दिले जात आहे.

राज‌पत्रित अधिकारी (वर्ग-२) यांच्या कामाच्या तुलनेत नायब तहसीलदार यांच्यावर कामाचा बोजाही अधिक असतो. शिवाय त्यांना पदोपदी जनतेचा रोष देखील पत्करावा लागतो. लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पाडणे बरोबरच कार्यकारी दंडाधिकारी यांची कामे, नैसर्गिक आपत्ती बाबतच्या जबाबदारीची सर्व कामे व दैनंदिन काम पार पाडत असताना करावी लागतात. याशिवाय तालुक्यातील जबाबदारीची कामही त्यांनाच हाताळावी लागतात. राजपत्रित अधिकारी (वर्ग २) चा दर्जा मिळूनही त्यांना याचा श्रेणीतील अन्य अधिकाऱ्याप्रमाणे वेतनमिळत नाही, ही त्यांची खंत आहे. त्यामुळे ही मंडळी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसला गटबाजीचा फटका

$
0
0

नागपूर अधिवेशनावरील मोर्चापूर्वीच जालन्यात गटा-तटाचे प्रदर्शन

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना जिल्हा काँग्रेस समितीची सत्तेतील सहभागाची समिकरणे कायम हुकलेली आहेत. त्यातच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची चाललेली आगेकूच पाहून नेमकी काँग्रेस नेत्यांची घुसमट होत आहे. त्यातही काही जणांनी 'एकला चलोरे'चे धोरण अवलंबले आहे. यासर्वांचा परिणामामुळे व फोफावत चाललेल्या गटबाजीने जालना जिल्हा काँग्रेस दिवसेंदिवस विकलांग होत चालली आहे.

भाजप महाआघाडीच्या सरकार विरोधात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरील मोर्चाला जाण्यापूर्वीच जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी गटबाजीचा मोठा महामोर्चा उघडला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच्या विश्लेषणात जालन्यातील काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात जालना जिल्हा काँग्रेस कशी मजेदार आहे याचे अत्यंत गमतीदार वर्णन केले होते. लोकसभा निवडणु‌कीतील पराभव हा काँग्रेसनेच केल्याचा अंतिम निष्कर्ष यामध्ये होता.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकमेव जालन्यातील आमदारकी गमावली. जिल्हा परिषदेत एक अंकी सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसला जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत कुठेही यश मिळाले नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावरच घनसावंगी, बदनापूर व जाफराबाद काबीज केले.

गेल्या दीड वर्षाच्या काळात काँग्रेसला अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. त्यामुळेच निवडणुकीत एकमेकांचे पाय ओढण्याचे काम केले जात असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागत आहे.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटून आंदोलन करण्याची गरज आसताना सर्व गट एकत्र येऊन आंदोलन करीत नसल्याने त्याचा परिणाम जाणवत नाही. हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यासाठी मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीचे निमंत्रण अनेक काँग्रेसच्या नेत्यांना नव्हते. त्यामुळे असंतोषाचा भडका उडाला आहे. अनेकांनी ही बाब वरिष्ठ काँग्रेस नेत्याच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे आता वरिष्ठांकडून याबाबत काय कारवाई ‌होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाच वर्षे विनाअट काँग्रेसला विधानसभेत पाठिंबा दिला. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्याच स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि काही प्रमाणात कार्यकर्त्यांनीच घात केला. त्याचा सिलसिला अजूनही चालूच आहे याचेच मोठे दुख होत आहे.

मंठा नगर पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांनी राजकीय तडजोडी कराव्यात याची त्यांना प्रेरणा देणाऱ्या तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्ध शेतकऱ्याने ठिबकवर फुलवली शेती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, बचत होऊन सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी; परिणामी उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी अंजनडोह येथील एका ७५ वर्षांच्या शेतकऱ्याने पारंपरिक सिंचन पद्धतीला फाटा देत ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. गेल्या तीन ते चार वर्षात करण्यात आलेल्या या प्रयोगामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. यातून या वयोवृद्ध शेतकऱ्याने इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

रावसाहेब गोविंदराव पाटील, असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. रावसाहेब पाटील यांनी लष्करात सेवा बजावल्यानंतर शेतीबरोबरच ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केला. सुरुवातील व्यवसायात फटका बसल्याने काही काळ ते त्यापासून दूर राहिले आणि पुन्हा नव्या जोमाने व्यवसाय सुरू केला. मुले मोठी झाल्यावर त्यांच्यावर व्यवसायाचा भार टाकत रावसाहेब यांनी पूर्णतः शेतीकडे लक्ष दिले. सुरुवातीला नेहमीप्रमाणे त्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. साडेबारा एकर शेत जमिनीपैकी निम्मी माळरानच होती. शेतात एक विहीर व दोन बोअर असूनही उन्हाळ्यात पाणी पुरेसे मिळत नसे. त्यात सातत्याने पडणारा दुष्काळ, बदलते हवामान याचा फटका इतर शेतकऱ्यांप्रमाणे रावसाहेब पाटील यांनाही बसला. त्यामुळे नाउमेद ने होता त्यांनी प्रयोगशील शेतीची कास धरली. या स्थितीत उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी आठ वर्षांपूर्वी ठिबक सिंचन पद्धतीचा स्वीकार केला. छोटेखानी एक शेततळेही बांधले. पूर्वी, उन्हाळ्यात पाण्याअभावी चांगली कसदार जमीन असूनही फारसा उपयोग करून घेता येत नव्हता, ती परिस्थिती आज राहिली नाही. सरकी, मका यांचेही उत्पादन त्यांनी घेतले. पण अपेक्षित माल दुष्काळामुळे आला नाही. अर्थात, योग्य व्यवस्थापनामुळे तोटा झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. ते सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेतात रमतात. पाणीटंचाईचा प्रश्न सर्वत्र भेडसावत असतानाच योग्य नियोजन, मेहनत करणाऱ्या रावसाहेब पाटील यांनी पाणी बचतीचा मार्ग स्वीकारत तरूण शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

उत्पादनात वाढ

पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचनावर बाजरीची लागवड यशस्वी केली. तीन नेटशेडही त्यांनी उभारले असून या २० गुंठ्यात त्यांनी केवळ या तीन महिन्यात सव्वालाख रुपयांचे उत्पादन काढले. काकडी, शिमला मिरचीची त्यांनी लागवड केली आहे. यासह एक एकरात अॅपल बोराची लागवड केली असून सध्या ४० ते ५० रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मका लागवडीत दहा पट वाढ

$
0
0

कन्नड तालुक्यात रब्बीच्या ७० टक्के पेरण्या

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यात रब्बीसाठी अपेक्षित २०,५०० हेक्टरपैकी १४,३९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने गुरांच्या चाऱ्यांची समस्या सतावत आहे. यामुळे रब्बी पेरणीत शेतकऱ्यांनी यंदा गहू व डाळवर्गीय पिकांकडे पाठ फिरवून ठिबक सिंचनावर मका पिकाला प्राधान्य दिले आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार यंदा पाण्याअभावी गव्हाच्या पेरणीत २२ ते २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. गव्हासाठी सरासरी ५,९०० हेक्टर क्षेत्र अपेक्षित होते. त्यापैकी ३० नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के क्षेत्रावर (४,१२६ हेक्टर) पेरणी झाली आहे. शाळू ज्वारीचे क्षेत्र घटलेले असून फक्त ४० टक्के क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. यात वाढ होण्याची तीळमात्र शक्यता नाही. अपेक्षित ५,६०० हेक्टरपैकी केवळ २,२५० हेक्टरवर ज्वारी पेरण्यात आली. यंदा तालुक्यातील जळगाव घाट, जवळी, रुईखेडा, शेवता, लामणगाव या गावांचा पट्टा अवर्षणात सापडला आहे.

डाळवर्गीय पिकात गतवर्षी मोठी वाढ झाली होती. परंतु यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. हरभरा पिकासाठी ७ हजार हेक्टरपैकी ३,९८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलवर्गीय पिकामध्ये करडई पिकाची ३५ टक्के लागवड झाली असून २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

ऊसाकडे पाण्याअभावी कमी कल आहे. यंदा रब्बी मका लागवडीत दहापट वाढ झाली आहे. अपेक्षित ३०० हेक्टरवर पेरणीऐवजी सुमारे ३,७८७ हेक्टरवर पेरणीला पसंती दिली आहे. यासाठी मुख्यत्वे करून नगदी पीक व गुरांना चारा हा उद्देश शेतकऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवला आहे. ठिबक सिंचन करून अत्यंत कमी पाण्यावर मका पिकाचे भरघोस उत्पादन घेता येऊ शकत असल्याने शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे ओढा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवन ऊर्जा प्रकल्प रखडला

$
0
0

कन्नड तालुक्यातील माळेगाव भागातील प्रकल्प

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

कन्नड तालुक्यातील माळेगाव ढोकळ परिसरात उभारण्यात येत असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे काम काही महिन्यांपासून रखडले आहे. हा प्रकल्प मुंबई येथील सुयोग ऊर्जा कंपनीतर्फे उभारला जात आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर वीजखरेदी दरात बदल झाल्याने हा प्रकल्प रखडल्याची माहिती मिळाली आहे.

कन्नड तालुक्यातील माळेगाव शिवारात सुयोग ऊर्जा कंपनीतर्फे १०० एकर क्षेत्रावर पवन ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. माळेगावच्या डोंगरावर पवन ऊर्जा निर्मितीसाठी संच उभे करण्यासाठी पायाभरणी करण्याचे काम करण्यात आले. खुलताबाद तालुक्यातून माळेगावकडे जाणारे रस्ते अत्यंत वाईट असल्याने प्रकल्पाचे साहित्य नेण्यात अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी निधीअभावी जिल्हा परिषदेने रस्ता दुरुस्ती करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यावर कंपनीने रस्ता दुरुस्तीसाठी निधी देण्याची तयारी दाखवली. जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत १७ ऑक्टोबर रोजी त्याला मान्यता देण्यात आली. कंपनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे पैसे जमा करणार आहेत. त्यातून बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणार आहे. हा रस्ता खुलताबाद व कन्नड या दोन तालुक्याच्या सीमेवर आहे. कंपनीचे अवजड साहित्य नेण्यासाठी एक कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे.

या घडामोडीनंतरही प्रकल्पाचे काम जवळपास रखडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पवन ऊर्जा खरेदीचा दर बदलून कमी झाला आहे. त्यामुळे कंपनीने पुन्हा एकदा प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी कामाची गती कमी केली आहे. प्रकल्पाच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात संपर्क केला असता संबंधितांनी बोलण्यास नकार दिला.

शेतकऱ्यांमध्ये भीती

या प्रकल्पासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या जात आहेत. जमीन खरेदीसाठी जादा रक्कम मोजली जात आहे. मात्र पवन ऊर्जा निर्माण करणाऱ्या पंख्यामुळ ढग दूर जाऊन पावसावर परिणाम होतो, या चर्चाचा येथील शेतकऱ्यांवर प्रभाव आहे. या भागातील शेतकरी त्याबद्दल चर्चा करत आहेत. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, व्यसनाधीनता हे संकट उभे राहण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. कंपनीला या पातळीवरही शेतकऱ्यांसोबत बोलणी करावी लागत आहे. त्यामुळेही प्रकल्पाची गती कमी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजाजनगरचे सांडपाणी ग्रीनबेल्टमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

सिडको वाळूज महानगरातील साईनगरपरिसरातील दोन्ही रस्त्याच्या सिडकोने ग्रीनबेल्ट ठेवला आहे. या ग्रीन बेल्टकडे सिडकोने दुलर्क्ष केल्यामुळे बजाजनगरातील काही सोसायट्यांमधील ड्रेनेजचे पाणी साचत अाहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

सिडको वाळूज महानगर व औद्योगिक क्षेत्रातील निवासी वसाहत बजाजनगर एकमेकांना जोडले गेले आहेत. बजाजनगर हा भाग एमआयडीसीच्या आख्यारित येत असला तरी गेल्या काही दिवसांपासून साफसफाईचे काम मात्र वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात ठिकठिकाणी घनकचऱ्याचे ढीग साचले आहेत. एमआयडीसीने ड्रेनेजकडे दुलर्क्ष केल्यामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइन तुंबल्या आहेत. हे पाणी सिडकोच्या ग्रीनबेल्टमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सिडकोच्या साईनगर, देवगिरीनगर आदी भागासाठी बनविण्यात आलेल्या गार्डन समोरील ग्रीनबेल्ट सांडपाणी व ड्रेनेजच्या पाण्याने भरला आहे. परिणामी परिसरात डासांचे प्रमाण देखील वाढले आहे.

तर वाहतूक कोंडी फुटणार

सिडकोचा उड्डाणपुलाची लांबी वाढवली तर सिग्नलवर नेहमी होणारी वाहतुकीची कोंडी फुटणार आहे. सिडको कॅनॉटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या या चौकातील सिग्नलवर नेहमीच वाहतुकीची कोंडी असल्यामुळे पुलाची लांबी वाढवण्याची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'साहेबां'च्या स्वागतासाठी रेल्वेचा ५० लाख खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलण्यात येत आहे. दौऱ्यापूर्वी होत असलेल्या या कामांवर सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याच्या निमित्ताने स्टेशनवरील फलाट क्रमांक एक, दोन व तीनच्या शेडला रंग लावण्यात येत आहे. नवीन इमारतीमधील प्रवासी सुविधा व इतर सुविधांचा आढावा घेऊन दुरुस्ती कामे सुरू झाली आहेत. स्टेशनमध्ये इन गेटशेजारील स्वच्छतागृह पाडण्यात आल. रेल्वे कर्मचारी निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. स्टेशनच्या दर्शनी भागात ठेवलेल्या रेल्वे इंजिनजवळ सौंदर्यबेट तयार करण्यात येत आहे. आरक्षण कार्यालयातील सुविधाही उत्तम दर्जाच्या केल्या जात आहेत.

रेल्वे स्टेशनची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे, त्यामुळे येथे कोणतीच कामे केली जात नव्हती. परंतु, महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामुळे जुन्या इमारतीमध्ये सिलिंगचे काम केले जात असून कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधा वाढवण्यात येत आहेत. या सर्व कामांवर सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय महाव्यवस्थापकांच्या दौऱ्या आधी रेल्वेचे अनेक अधिकारी भेट देत आहेत, ते येथे राहणार आहेत. त्यांच्यावर होणारा खर्च वेगळाच आहे.

जिन्याचे काम वेगात

औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेत वाढ करण्यात आल्याचे महाव्यवस्थापकांना दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या सरकत्या जिन्याच्या कामाला वेग आला आहे. फलाट क्रमांक २ वरील जिन्याचे काम काही दिवसांपूर्वी तर फलाट क्रमांक १ वरील जिन्याचे काम बुधवारी सुरू करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. चंद्रकांत धांडे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठ नाट्य समीक्षक, दलित मित्र पुरस्कार प्राप्त प्रख्यात लेखक तसेच पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत अंबादास धांडे (८०) यांचे बुधवारी (दोन डिसेंबर) दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी रात्री प्रतापनगर स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

विद्यार्थी दशेत त्यांना वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळाला असताना, त्यांनी मिलिंद महाविद्यालयामध्ये कला शाखेमध्ये प्रवेश घेतला होता व मराठीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. तसेच आचार्य अत्रे यांचे सहाय्यक, पत्रकार, समाज कल्याण अधिकारी म्हणूनही विविध ठिकाणी काम केले होते. त्यानंतर अचलपूर, नागपूर, पैठण आदी ठिकाणी मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणूनही कार्य केले.

पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयातून मराठी विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. लेखक, नाट्य समीक्षक म्हणूनही त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. त्यांच्या मागे निशिकांत, श्रीकांत ही मुले मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नांदेड - पुणे रेल्वेच्या फेऱ्या औरंगाबादहून

$
0
0

चारपैकी दोन होणार लातूरहून

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड - पुणे दरम्यान विशेष रेल्वेच्या ४ फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातल्या २ औरंगाबादमार्गे तर २ फेऱ्या लातूरमार्गे सोडण्यात येणार आहेत.

नांदेड - पुणे गाडी (क्रमांक ०७६२२) गुरुवारी (१० डिसेंबर) रात्री ९.२० मिनिटांनी निघेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता पुण्याला पोहचेल. लातूर-नांदेड रेल्वे (क्रमांक ०७६२१) शुक्रवारी (११ डिसेंबर) पुणे येथून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी निघेल. ती नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९ वाजून २५ मिनिटांनी पोहचेल. ही रेल्वे पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डूवाडी आणि दौंड स्थानकावर थांबेल.

नांदेड-पुणे मनमाड मार्गे जाणारी रेल्वे (०२७३०) नांदेड येथून शनिवारी (१२ डिसेंबर) रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०९ वाजून २० मिनिटांनी पुण्यात पोहचेल. पुणे-मनमाड-नांदेड ही रेल्वे पूण्याहून रविवारी (१३ डिसेंबर) रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी निघेल. ती १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता नांदेडला पोहोचेल. ही रेल्वे पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड स्थानकावर थांबेल. दोन्ही विशेष रेल्वे प्रत्येकी बारा डब्यांच्या आहेत. त्यात एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित, एक तृतीय श्रेणी वातानूकुलित, तीन स्लीपर क्लास, चार जनरल, दोन सामानाचे डबे राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हायवे’च्या कामात खोडा

$
0
0

तीन वर्षांत केवळ २५% भूसंपादन; जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार

Ramchandra.vaybhat@timesgroup.com

औरंगाबाद ः प्रस्तावित सोलापूर-औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सोलापूर ते औरंगाबाद या पहिल्या टप्प्याच्या कामाला वेगाने सुरुवात झाली. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या थंड कारभारामुळे अनेक ठिकाणी भूसंपादनाचे काम रखडले आहे. सध्या चौपदरी रस्त्यासाठी तीन वर्षांत केवळ २५ टक्के जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संपादित केली आहे. त्यामुळे कामात स्पिडब्रेकर निर्माण झाले आहे.

सोलापूर ते येडशी १०० व येडशी ते औरंगाबाद या १९० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यामध्ये उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ६४९ हेक्टर जमिनीचे चौपदरी रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे.

मात्र, गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आतापर्यंत केवळ १६० हेक्टर जमिनीचेच भूसंपादन झाले. पहिल्या टप्प्यासाठी प्राधिकरणाने कंत्राट काढल्याने रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री कामाला लागली. मात्र, या महामार्गासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात १२३ पैकी केवळ १० हेक्टर, बीड ३०३ पैकी ४०, जालना ८९ पैकी २५ तर औरंगाबाद जिल्ह्यात आवश्यक असलेल्या १३५ हेक्टरपैकी ८५ हेक्टर जमिनीचा ताबा मिळाला आहे.

भूसंपादन करण्यासाठी अनेक अडचणी असून भूमी‌अभिलेख कार्यालयानेही अनेक ठिकाणी जमिनीच्या चुकीच्या नोंदी घेतल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.



जिल्ह्यांकडे १५३ कोटी पडून

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांकडे भूसंपादनाच्या मोबदला म्हणून शेतकऱ्यांना देण्यासाठी दिलेले तब्बल १५३ कोटी ७६ लाख रुपये पडून आहेत. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात ६३.४२ कोटीपैकी केवळ ५.४७ कोटी वाटप करण्यात आले. बीड जिल्ह्यात ४४.४९ कोटीपैकी १५.४, जालना ५७.४३ पैकी १०.३७ कोटी तर औरंगाबाद जिल्ह्यासाठी दिलेल्या ७७.८२ कोटी रुपयांपैकी ५८.५६ कोटी रुपयांचे असे एकूण २४३.२ कोटी रुपयांपैकी केवळ ८९.४४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. उर्वरित १५३.७६ कोटी रुपये पडून आहे.

विभागीय आयुक्तांच्या आदेशाकडेही दुर्लक्ष

चारही जिल्ह्यांमधील भूसंपादनाच्या स्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी अनेकदा बैठका घेतल्या. तत्काळ भूसंपादन प्रक्रियेस वेग देण्याचे आदेश दिले. मात्र, आठ दिवस दहा दिवस असे कारणे सांगत जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांच्या आदेशाकडेही दुर्लक्ष केले. महामार्गासाठी राज्य शासनासोबत महामार्ग प्राधिकरणाने 'स्टेट सपोर्ट अॅग्रीमेंट' केले आहे. यानुसार प्रशासनाने भूसंपादनासाठी प्राधिकरणाला सहकार्य करायचे आहे. प्रत्यक्षात मात्र सहकार्य दिसून येत नसल्याने या अॅग्रीमेंटरवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय थंडी

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

जिल्हा परिषद गेल्या वर्षभरापासून राजकीयदृष्ट्या थंड आहे. सत्ताधाऱ्यांचे जोर दिसत नाही, विरोधकांचा आक्रमकपणा गायब झालेला आहे. अशा परिस्थितीत कुठे प्रभावी कामेही दिसत नाही. त्याचा फटका जिल्ह्यातील गरीब जनतेला बसत आहे.

दहा वर्षांची युतीची सत्ता उलथवून टाकत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हाताशी धरून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेतली. तत्कालीन अध्यक्ष नाहिदाबानो पठाण यांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित झाला आणि सहा महिन्यांत झेडपीची घडी विस्कटली. त्यांचे पद गेल्यानंतर शारदाबाई जारवाल अध्यक्ष झाल्या. काँग्रेस - राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वादावादीमुळे अडीच वर्षे नुसती एकमेकांवर आरोप करण्यात फायल अडविण्यात गेली. त्यात पहिले वर्ष दुष्काळाचे होते त्याचे नियोजन करण्यात जिल्हा परिषद प्रशासन कमी पडले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या मधे झेडपीचे कारभारी बदलले गेले. काँग्रेसचे श्रीराम महाजन अध्यक्ष झाले. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर पवार, मनसेला दोन तर काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एकेक विषय समिती सभापतीपद दिले गेले. सुरुवातीचे चार महिने बरे गेले, पण त्यानंतर प्रशासकीय दृष्ट्या मिनी मंत्रालयाची घडी विस्कटलेली आहे. यंदा गंभीर दुष्काळ आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गावांत भर पावसाळ्यात टँकर सुरू होते. आता डिसेंबरमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. टंचाई निवारण आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांचा कुठलाही वाटा नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधीपक्षाचीही कुठलीच भूमिका दुष्काळ निवारणासाठी नाही. स्थायी समिती, विषय समिती आणि क्वचित प्रसंगी सर्वसाधारण सभेत काही सदस्य बोलतात पण ठोस भूमिका घेण्याची कुणाचीच तयारी नसते. अशीच परिस्थिती योजनांच्या अंमलबजावणीत आहे. महिला व बालकल्याण विभागातील वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत महिला व युवतींना दिले जाणारे लाभ गेल्या दीड वर्षांपासून दिले गेलेले नाहीत. पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी काही विभागात करून ठेवलेल्या त्रुटी अजूनही दूर करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेवर विश्वासच उरलेला नाही. सायकल, संगणक प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण सारख्या योजनाच राबविल्या गेल्या नाहीत. समाजकल्याण विभागाचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. पीठगिरणी, टीनपत्रे, विशेष घटक योजनेंतर्गत विहिर वाटप या योजनांच्या बाबतीतही प्रचंड त्रुटी आहेत. तत्कालीन अधिकाऱ्यांनी यासंदर्भात मुद्दे उपस्थित केले होते. सध्याच्या अधिकाऱ्यांनीही योजनांसाठी बनविलेल्या याद्यांमध्ये लाभार्थी म्हणून बोगस नावे घुसविल्याचा धक्कादायक प्रकार तत्कालीन समाजकल्याण अधिकारी डॉ. मडावी यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिला होता. शिक्षण विभागात शाळाखोल्या दुरुस्त्यांचेही प्रस्ताव रखडलेले आहेत. बोगस कामांमुळे राज्यभर बदनाम झालेल्या सिंचन व बांधकाम विभागाची अवस्थाही वाईट आहे. सिंचन विभागात गेल्या वर्षभरापासून कुठलीच कामे झाली नव्हती. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सिंचन विभागाची प्रतिमा सुधारविण्यासाठी कडक पावले उचलली त्यामुळे अवास्तव सिंचन प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवले. कृषी व पशुसंवर्धन विभागाचीही दयनीय अवस्था आहे. एवढी अव्यवस्था असूनही विरोधक शांत आहेत. सत्ताधाऱ्यांमधील काही मंडळी कुरबूर करतात पण त्यांचा प्रभाव पडत नाही. केंद्र व राज्यातील सत्ता गमावून बसलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. त्यांची जिल्हापातळीवरील नेतेमंडळी काहीच हालचाली करत नाहीत. परिणामी जिल्हा परिषद कामकाजाविना थंड पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा छळ; चौघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिसारवाडीतील साईनगरात राहणाऱ्या १९ वर्षीय विवाहितेचा अमानुषपणे शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पती, सासू व दोन दिरांना मंगळवारी (एक डिसेंबर) रात्री अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, चौघांना शनिवारपर्यंत (पाच डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी दिले.

मिसारवाडीतील साईनगरात राहणाऱ्या १९ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. या छळातून परिसरातील महिलांनी पीडित विवाहितेची सुटका केली. तिची प्रकृती खूपच खराब झाल्याने तिला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा जबाब घेण्यात आला. त्या जबाबावरून आरोपी पती संजय वीरेंद्र अग्रवाल, सासू आशा वीरेंद्रकुमार अग्रवाल, दीर सागर वीरेंद्रकुमार अग्रवाल व अतुल वीरेंद्रकुमार अग्रवाल या सर्वांना सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निर्मल परदेशी यांच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

त्या चौघांना बुधवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले असता, सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. डी. आर. काठुळे यांनी, विवाहितेचा छळ करण्याचा उद्देश काय होता, याची चौकशी करून कारण शोधायचे आहे, विवाहितेस मारहाण करण्यासाठी वापरलेला लोंखडी गज, उलथने, डंबेल्स जप्त करावयाचे आहेत, पीडित विवाहितेच्या अंगावर कुत्री सोडून घृणास्पद कृत्य करण्याचे काय कारण होते, याचा तपास करावयाचा असल्यामुळे सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती कोर्टात करण्यात आली असता, ही विनंती ग्राह्य धरून शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉँग्रेस जिल्हाध्यक्षपदी सत्तार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. खुद्द सत्तार यांनी तसे संकेत दिले. 'पक्षातील 'व्हीआयपी' संस्कृती मोडित काढून पक्ष संघटना पुन्हा मजबूत करू,' असे सत्तार यांनी

स्पष्ट केले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी २०१९ डोळ्यासमोर ठेवून पक्षाची बांधणी करणे सुरू केल आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस मजबूत करण्यासाठी आपल्या गटातील नेतेमंडळींना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे सत्तार यांच्याकडे सोपविली जाणार आहेत.

यासंदर्भात सत्तार यांना विचारले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'मी वरिष्ठांना जबाबदारी सोपविताना फ्री हँड मागितला आहे. कारण आमदार म्हणून माझ्याकडे मतदारसंघाची जबाबदारी आहे. शिवाय राज्य कार्यकारिणी अशा परिस्थितीत जिल्हा सोपविला तर मी माझ्या पद्धतीने पक्ष मजबूत करणार आहे. पदाच्या नावावर वर्षानुवर्षे जागा अडवून ठेवलेल्यांना बाजूला काढले जाईल.

गांधीभवनचे लूक बदलण्यात येईल. तिथे सर्वसामान्यांना सहजपणे येता - जाता येईल, अशी सोय करण्यात येईल. माझ्या नियुक्तीनंतर मी जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वस्ती, वाड्या, तांड्यांना भेट देऊन पक्ष वाढविणार आहे.'

राज्यात गेल्या वर्षभरात ३,१०७ शेतकरी आत्महत्या झाल्या. मराठवाड्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. - अब्दुल सत्तार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images