Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निरंतर संशोधनाच्या वाटेवर

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

औरंगाबाद सोडून पुण्यामध्ये नामांकित महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले तर, अगदी नियोजनपूर्वक मुंबईतील मोठ्या संस्थेमध्ये 'इलेक्ट्रॉनिक्स'मध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. याच विषयात ऑस्ट्रेलियामध्ये 'एमएस' करण्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या धाडसाने एकटीने परदेशात राहून नामांकित विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि संशोधन हाच आपला पिंड असल्याचे ओळखून संशोधनात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 'इलेक्ट्रॉनिक्स'मध्ये 'रिसर्च असिस्टंट' म्हणून काम करीत असतानाच पीएचडीच्या आणि उभे आयुष्य संशोधनाच्या वाटेवर आहे औरंगाबादची श्रुती निरंतर.

निरंतर कुटुंबीय हे मूळचे मालेगावचे. श्रुतीचे वडील अनिल निरंतर हे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सेवेमध्ये होते आणि त्यांची बदली १९८२च्या सुमारास औरंगाबादला झाली. तेव्हापासून जवळजवळ दोन दशके निरंतर कुटुंबीय औरंगाबाद शहरात होते. याच शहरामध्ये तद्दन कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील श्रुती घडत गेली. रवींद्र शाळेत; तसेच शारदा मंदिर कन्या प्रशालेत तिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पहिल्यापासूनच श्रुती सर्व क्षेत्रांमध्ये चुणचुणीत होती. अभ्यासात हुशार होती आणि मुख्य म्हणजे अभ्यासाची तिला आवडही होती. गणित-विज्ञानाबरोबरच नाटक-नृत्य-खेळामध्येही चांगलीच गती होती. सर्वच क्षेत्रात तिची मुक्त मुशाफिरी सुरू असली, तरी तिने कधीही ८० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविले नाहीत. पहिल्यापासून तिने 'सायन्स'मध्ये करिअर करण्याचे जवळजवळ निश्चित केले होते आणि आपले शहर सोडून बाहेर शिकण्याची आणि सर्वांगीण अनुभव घेण्याची तिची जबरदस्त इच्छा होती. त्यामुळेच दहावीमध्ये ९१ टक्के पटकावून पुण्याच्या मॉडेल कॉलेमध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. कुटुंब औरंगाबादला; पण तिने एकटीने वसतिगृहात राहून बारावीमध्येही ८५ टक्के मिळविले. पुन्हा अगदी नियोजनपूर्वक आणि अजून मोठ्या शहरात आणि मोठ्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि योगायोगाने बांद्राच्या थॉडेमल शहानी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. तिच्या आवडीच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची तिची इच्छा पूर्ण झाली. केवळ अभियांत्रिकी शिक्षणापर्यंतच मर्यादित न राहता पुढे शिकण्याची इच्छा निर्माण झाली आणि अर्थातच त्यासाठीचे नियोजनही सुरू केले. सर्व विचाराअंती तिने ऑस्ट्रेलिसामध्ये 'इलेक्ट्रॉनिक्स' विषयामध्ये 'एमएस' करण्याचा निर्णय घेतला आणि शैक्षणिक कर्ज घेऊन मेलबर्नच्या आरएमआयटी विद्यापीठात प्रवेश मिळविला. कुटुंबापैकी कोणालाही सोबत न नेता तिने स्वतः ऑस्ट्रेलिया गाठले आणि मोठ्या हिमतीने एकटी राहून यशस्वीपणे व चांगल्या ग्रेडसह 'एमएस' पूर्ण केले. 'एमएस' करतानाच या विषयामध्ये संशोधन करण्याची तीव्र इच्छाशक्ती तिच्यामध्ये निर्माण झाली आणि संशोधन हाच आपला पिंड आणि करिअर असल्याचे तिचे मनोमन ओळखले. याच ध्यासातून तिने 'रिसर्च असिस्टंट' म्हणून काम करण्याची अनेक विद्यार्थ्यांमधून संधी मिळविली. आता तिने पीएचडीचा ध्यास घेतला असून, संधोधनामध्येच करीअर करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत दोन भारतीय तज्ज्ञ तिचे ऑस्ट्रेलियातील गाइड आहेत. लवकरच तिला विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळण्याची चिन्हे आहे. आयुष्यभर संशोधन करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. औरंगाबादमधून संशोधनासाठी ऑस्ट्रेलियात गेलेली ती कदाचित एकमेव विद्यार्थिनी असावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुस्तकपेढी योजनेला घरघर

$
0
0

निम्मे वर्ष उलटल्यानंतर मिळालेली पुस्तके अद्याप धुळखात पडून

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या पुस्तकपेढी योजनेची पुस्तके धुळखात पडल्याचे चित्र आहे. शैक्षणिक वर्ष संपत असताना जिल्ह्याला पुस्तकांचे संच मिळाले आहेत. यातही हे संच शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे धुळखात पडून आहेत. शिक्षण विभागाचा हा उलटा कारभार विद्यार्थ्यांची परवड करणारा ठरला आहे.

शासनाने नववी, दहावीतील शिक्षण घेणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने पुस्तकपेढी योजना सुरू केली. शासनाच्या आणि शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे योजनेचा तीनतेरा वाजले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होताना, जूनमध्ये ही पुस्तके मिळणे अपेक्षित अाहे. यंदा सहामाही परीक्षा संपल्यानंतर, नोव्हेंबरअखेर पुस्तकांचे संच आले आहेत. त्यात शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे ही पुस्तके अद्यापही धुळखात पडून आहेत. आधीच पुस्तकांना झालेला उशीर त्यात वाटपासाठीची प्रक्रिया संथ गतीने असल्याने विद्यार्थ्यांची परवड होत आहे. शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी तीन-चार महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा कितपत फायदा होणार असाही प्रश्न आहे. औरंगाबाद जिल्ह्याला मिळेलेली पुस्तके ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यायालयाकडे जागा नसल्याने त्यांनी शिवाजी हायस्कूलची मदत घेतली. हायस्कूलच्या एका खोलीमध्ये पुस्तके ठेवण्यात आली. तेथे त्यांच्यावर धूळ चढत आहे. मागणी करूनही शाळांना पुस्तके न मिळाल्याने शाळा प्रशासनामध्ये नाराजी आहे.



पुस्तकपेढी योजनेतील पुस्तके आली असून, आम्ही शाळांनाही याबाबत कळविले आहे. यंदा पुस्तकांचे मर्यादित संच आले आहेत. त्यांच्या वितरणाचे काम सुरू आहे. दहावीची पुस्तके आलेली नाहीत.

- रमेश तांगडे, उपशिक्षणाधिकारी, औरंगाबाद

योजनेतील पुस्तकांच्या संचांचे वितरण जिल्हा परिषदांकडे आहे. ही पुस्तके शाळेतच वाचण्यासाठी असतात. त्यानंतर ती पुढल्या विद्यार्थ्यांना फायद्याची ठरतात. आम्ही संच वितरित केले. त्यापुढे ते शाळांना पोहोचविण्याचे काम माध्यमिक शिक्षण विभागाचे आहे.

- व्ही. एल. पडघान, बालभारती

बालभारतीने दिलेले संच

मराठी ५६००

उर्दू ९०

इंग्रजी ५०

हिंदी १२

नववीची विद्यार्थी संख्या

औरंगाबाद शहर २३७८३

औरंगाबाद ७१८५

गंगापूर ८०५०

कन्नड ६५७५

खुलताबाद २६७५

पैठण ६४४३

फुलंब्री ३०२१

सिल्लोड ७४२२

सोयगाव १९००

वैजापूर ५२११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकलठाण्याला ‘ग्रीनफिल्ड’साठी पसंती

$
0
0

आज निर्णय; जमीन देण्यास शेतकरी राजी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गतचा ग्रीनफिल्ड प्रकल्प चिकलठाणा भागातच उभारला जावा म्हणून शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन जमीन देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची उभारणी चिकलठाण्यातच होणार हे स्पष्ट झाले आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय महापालिका गुरुवारी घेणार असून, शनिवारपर्यंत हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांत महापालिकेने ग्रीनफिल्ड विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पीएमसी व महापालिकेने नक्षत्रवाडी, चिकलठाणा या दोन साइट निवडल्या. चिकलठाण्याच्या तुलनेत नक्षत्रवाडी येथे ग्रीनफिल्डसाठी जागा मिळणे सोपे आहे, असे सादरीकरण पीएमसीने केले. दरम्यानच्या काळात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ग्रीनफिल्डच्या जागा निश्चितीच्या प्रकरणात लक्ष घातले. चिकलठाणा येथे ग्रीनफिल्ड व्हावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. महापालिकेचे अधिकारी, पीएमसीचे अधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी चिकलठाणा परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांना स्मार्ट सिटी आणि ग्रीनफिल्डचा प्रकल्प समजवून सांगितला. महापालिका आणि पीएमसीचे अधिकारी शेतकऱ्यांपर्यंत पोचले नव्हते, हे लक्षात आले. शेतकऱ्यांनी ग्रीनफिल्डसाठी जमिनी दिल्यातर एक चांगले शहर चिकलठाणा परिसरात उभे राहू शकते. त्यातून शेतकऱ्यांनाही लाभ होऊ शकतो, याची जाणीव बागडे यांनी करून दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांत या भागातील शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या. सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी ग्रीनफिल्डसाठी अनुकूलता दाखवली. त्यामुळे ५१० एकर जागा उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांच्या अनुकूलतेमुळे व बागडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे चिकलठाण्यातच ग्रीनफिल्ड होणार हे आता स्पष्ट झाले आहे. ग्रीनफिल्डच्या जागा निश्चितीचा प्रस्ताव महापालिका गुरुवारी अंतिम करणार असून, शनिवारपर्यंत तो राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे.

महापालिका आणि पीएमसी चिकलठाण्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचलेच नव्हते. दोन दिवसांपूर्वी मी या प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतली. स्मार्ट सिटी व ग्रीनफिल्डमध्ये वारंवार मगरपट्ट्याचे उदाहरण दिले जाते. मगरपट्ट्यात तेथील शेतकरी एकत्र आले आहेत. येथेही ते एकत्र येऊ शकतील, असे वाटेल आणि मी त्यांना जागे केले. शेतकरी देखील आता या प्रकल्पासाठी तयार झाले आहेत. त्यांच्या जागेत नवीन शहर विकस‌ित झाले तर त्यांनाच लाभ होणार आहे हे मी त्यांच्या लक्षात आणून दिले.

- हरिभाऊ बागडे, अध्यक्ष, विधानसभा

शेतकऱ्यांना होणारा लाभ

शेतकऱ्यांना दुप्पट एफएसआय मिळेल.

नवीन शहराच्या विकासात त्यांना स्वतः सहभागी होता येईल.

त्यांच्या जमिनीचा एनए विनासायास होईल.

ग्रीन बेल्टचा यलो ब्लेट देखील विनासायास होणार आहे.

सरकार दरबारी खेट्या मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर महिलेचा भरदिवसा खून

$
0
0

हातपाय बांधून गळा‌ चिरला; हडको एन ९ भागातील थरारक घटना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साठ वर्षांच्या डॉक्टर महिलेचे हातपाय बांधून गळा चिरल्याच्या घटनेने बुधवारी हडको परिसर हादरला. विमलज्योती सोसायटीत सकाळी साडेदहा ते साडेअकरा दरम्यान ही घटना घडली. चित्राबाई दिनेश डकरे असे मृत महिलेचे नाव आहे.

विमलज्योती सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये डॉ. नीलेश आस्वार त्यांची पत्नी स्नेहल व सात वर्षांचा मुलगा उत्कर्ष सोबत राहतात. त्यांचे टीव्ही सेंटर चौकात कल्पतरु मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे. २३ नोव्हेंबर रोजी डॉ. स्नेहल यांचे वडील दिनेश सूर्यभान डकरे व आई डॉ. चित्रा डकरे (रा. हिवरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती) मुलीकडे‌ दिवाळीनिमित्त आल्या होत्या. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता डॉ. नीलेश सासरे दिनेश डकरे यांच्या सोबत प्लॉट बघण्यासाठी एन ७ परिसरात गेले. त्यानंतर सव्वादहाच्या सुमारास डॉ. स्नेहल हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यांचा मुलगा उत्कर्ष सकाळी साडेसात वाजता शाळेमध्ये गेला होता. घरात चित्राबाई एकट्याच होत्या. साधारण दीड तासाने दिनेश डकरे घरी परतले. त्यांनी घराची कडी वाजवली. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार बेल व कडी वाजवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी मोबाइलवर फोन लावला. चित्राबाईंनी फोनही उचलला आला नाही. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, त्यांच्या फ्लॅटच्या बाजूला असलेल्या तीनही फ्लॅटधारकांच्या फ्लॅटला बाहेरून कड्या लावल्या होत्या. डकरे यांनी या कड्या उघडल्या. शेजारी मदतीसाठी धावत आले. हा प्रकार कळताच मुलगी स्नेहल व नीलेश देखील घरी आले. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हॉलमध्येच रक्ताच्या थारोळ्यात चित्राबाई पालथ्या पडलेल्या होत्या. त्यांचे हात नायलॉनच्या दोरीने पाठीमागे बांधले होते. धारदार शस्त्राने गळा चिरला होता. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, उपायुक्त राहुल श्रीरामे आदींनी धाव घेतली. आरोपींनी दोन्ही बेडरूममधील कपाटे फोडून त्यामधील सामान बाहेर फेकल्याचे दिसले. तसेच आतमध्ये मिरचीची फोडलेली पुडी व भुकटी देखील गॅलरीत पडलेली आढळली. बेडरूमच्या गॅलरीमधून खाली उतरत चोरट्याने पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उश‌िरापर्यंत सुरू होती.

कौटुंबिक पार्श्वभूमी

दिनेश डकरे हे एमएसईबीचे अभियंता म्हणून चांदूरबाजार येथून निवृत्त झाले आहेत. चित्राबाई यांचे बीएएमएसपर्यंत वैद्यकीय ‌शिक्षण झाले होते. मात्र, त्यांनी कधी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केली नव्हती. त्यांना दोन मुली असून औरंगाबादला असलेल्या स्नेहल यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला आहे.

श्वानाचा बसस्टॉपपर्यंत माग

घटनास्थळी फिंगर प्रिंटस तज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते. यावेळी लुसी श्वानाने ज्या गॅलरीतून मारेकऱ्याने खाली उडी घेतली, तेथून बाहेर आठशे मीटर अंतरापर्यंत असलेल्या एम २ रोडवरील बसस्टॉपर्यंत मार्ग काढून घुटमळले. या ठिकाणी रिक्षास्टँड आहे. या ठिकाणावरून वाहनाने मारेकरी पसार झाल्याचा अंदाज आहे.

दागिने अंगावरच

मारेकऱ्यांनी घरातील कपाटे फोडून आतमधील सामान बाहेर फेकले. मात्र, त्यांनी काही ऐवज नेला आहे अथवा नाही, याची माहिती डॉ. स्नेहल यांना देता आली नाही. चित्राबाई यांच्या अंगावर सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, अंगठ्या आदी दागिने होते. हे दागिनेही अंगावर तसेच होते.



श्रुती भागवतच्या घटनेची पुनरावृत्ती

उल्कानगरी येथील श्रीनाथ अपार्टमेंट येथे श्रुती भागवत या शिक्षिकेचा १७ एप्रिल २०१२ रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी याच पध्दतीने हल्ला करून निर्घृण खून केला होता. मात्र, त्या घटनेत भागवत यांना नंतर पेटवून देण्यात आले होते. त्यांच्या घरातून देखील मारेकऱ्यांनी काही ऐवज पळवला नव्हता. तेच साम्य या घटनेत आहे.

अनुत्तरित प्रश्न

मारेकऱ्याला नेमक्या चित्राबाई एकट्या आहेत, हे कसे माहित होते?

आजूबाजूच्या फ्लॅटला बाहेरून कड्या लावून त्याने नेमके डॉ. आस्वार यांचा फ्लॅट कसा ओळखला?

हातपाय बांधलेले असताना गळा चिरण्याचे कारण काय?

खून केल्यानंतर कडी उघडून जाणे सोपे असताना गॅलरीतून पळ का काढला?

एन ९ प‌रिसरात असलेल्या विमलज्योती सोसायटीत १२ फ्लॅट आहेत. प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट आहेत. सोसायटीच्या आजूबाजूला उच्चभ्रू परिसर व नर्सिंग कॉलेज आहे. मारेकऱ्यांनी डॉ. आस्वार यांच्या बाजूला राहत असलेल्या डॉ. सूर्यवंशी, संकेत गोरे व एका फ्लॅटधारकाच्या फ्लॅटला बाहेरून कडी लावली होती. यानंतर त्याने आस्वारच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. हा प्रकार उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा पडला; बटाटा गडगडला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोह्यातला कांदा आणि वड्यातला आलू वाढवला तर हरकत नाही. कारण जिल्ह्यातून आवक वाढताच कांदा, बटाट्याचे भाव गडगडलेत. कांदा किलोमागे १५ रुपयांपासून तर बटाटे किलोमागे ८ रुपयांपासून विकले जात आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज कांदे, टोमॅटोची करमाड, फुलंब्री आदी ठिकाणाहून दररोज सुमारे १० टन आवक होत आहे. यापूर्वी ही आवक २ ते ३ टनापर्यंत होती. त्यामुळे आजवर ४० रुपये किलो विकणारे उत्तम प्रतीचे टोमॅटो आजघडीला १५ रुपये किलोने विकले जात आहेत. ३ डिसेंबरला ९२ क्विंटल टोमॅटोची आवक झाल्याचे, मराठवाडा फ्रुटस् अॅंड व्हेजिटेबल संघटनेचे बाबूभाई बागवान यांनी सांगितले. बाजारात अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड, फुलंब्री येथून सध्या कांद्याची दररोज १० ते २० टन आवक होत आहे. त्यामुळे ठोक बाजारात उत्तम प्रतीच्या कांद्याचे दर आता ३० रुपयांहून २० रुपये किलोवर आले आहेत. बाजारात सध्या दररोज ५० क्विंटल बटाट्याची आवक होत आहे. त्यामुळे पूर्वी ठोक बाजारात १२ रुपये किलो दराने विकणारे बटाटे आजघडीला ८ ते १० रुपये किलोने विकले जात आहेत, अशी माहिती बाबूभाई यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहीर प्रकरणी ‘ब्लेमगेम’

$
0
0

विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांचे पैठणमध्ये उपोषण

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विहीर घोटाळ्यात आता 'ब्लेमगेम' सुरू झाला आहे. पंचायत समिती सदस्या पैश्याची मागणी करत असल्याचा आरोप करत योजनेतील काही लाभार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे तर, मी दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केल्याने अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हाताशी धरून उपोषणाला बसवले आहे, असा आरोप पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुलकर्णी यांनी केला आहे.

विहीर घोटाळा प्रकरणाची जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डी. ई. चाटे यांनी चौकशी केली असता, गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली विहिरी बेकायदा मंजूर केल्याचा जवाब दिला होता. गटविकास अधिकारी सोमवंशी यांनी बेकायदा विहिरी मंजूर केल्याने तालुक्यातील पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाहीची मागणी पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुलकर्णी यांनी केली आहे. कारवाही न झाल्यास कुलकर्णी यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. या प्रकरणाला बुधवारी वेगळेच वळण लागले. योजनेअंतर्गत विहिरी मंजूर झालेल्या विहामांडवा येथील शेतकऱ्यांनी आम्हाला विहिरीचे खोदकाम करण्याची परवानगी द्या व पंचायत समिती सदस्या या अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने विहीर प्रकरणात आरोप करत असल्याचा आरोप केला. त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. याप्रकरणी पंचायत समिती सदस्या प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, दोषी अधिकार्यावर कार्यवाही व्हावी यासाठी मी एकटीच लढत आहे. या प्रकरणात मी माघार घ्यावी यासाठी अधिकारी साम-दाम-दंड भेदचा वापर करत आहेत. मी कोणत्याही अधिकाऱ्याकडे पैश्याची मागणी केली नाही. पंचायत समितीतील काही अधिकारी व कर्मचारी या शेतकऱ्यांना उपोषणाच्या पाठीमागे असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला.

मंजूर विहिरीचे खोदकाम करण्याची परवानगी मिळावी यासाठीच शेतकऱ्यांनी उपोषण केले असते तर ते समजण्यासारखे होते. मात्र, मी अधिकाऱ्यांकडून पैश्याची मागणी करत असल्याचा शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपामुळे यामागे दोषी अधिकाऱ्यांच्या हात असल्याचे सिद्ध होते. - प्रज्ञा कुलकर्णी, पंचायत समिती सदस्या

मी नियमात बसणाऱ्या विहिरीच मंजूर केल्या होत्या. आता खोट्या तक्रारी करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याने शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाठीमागे कोणत्याही अधिकाऱ्याचा हात नाही. - उल्हास सोमवंशी, गटविकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिन्यासह बाजरी, डाळींचीही चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

भावजयीच्या अंत्यविधीला गेलेल्या वयोवृद्ध महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वालाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख ६० हजार रुपये, असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना सोमवारी रात्री घडली. चोरांनी या घरातून दीड क्विंटल बाजरी, पापड, डाळी, खारुड्या, कुरड्या तसेच साड्या चोरून नेल्या आहेत.

तालुक्यातील भगूर येथील गंगुबाई विनायक चव्हाण या सोमवारी भावजयीचे अपघाती निधन झाल्याने अंत्यविधीसाठी शिवारातील वस्तीवर गेल्या होत्या. ही संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून रोख ६० हजार रुपये, १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, दीड क्विंटल बाजरी, साड्या, पापड, डाळी, कुरड्या, खारुड्यांची चोरी झाली. गंगुबाई विधवा असून त्यांना मुलबाळ नाही. त्यांनी मंगळवारी घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी रोख रकमेसह धान्यावर डल्ला मारल्याने पोलिसही चक्रावले आहेत.

या घरफोडीची माहिती मिळल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शरद बर्डे, विरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, सहायक फौजदार माधव जरारे, सोमनाथ तांगडे, शिवशंकर राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांनी घरात काही वस्तू हाताळल्याने श्वानपथकाला पाचारण करण्यात आले नाही. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहे.

शेतमालावर डोळा

दुष्काळी परिस्थितीमुळे चोरीच्या घटनांत वाढ होत असून चोरांनी वस्त्यांवरील शेत मालावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही महिन्यात गंगथडी परिसरातील विविध भागात कांदे, मका हा शेतमाल पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबाद नगरपालिकेत नवीन १४ पदे मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

राज्यस्तरीय गट क संवर्ग मंजूर पदांचा आढावा प्रस्तावित सुधारित आकृतीबंध शासनाने तयार केला आहे. त्यात खुलताबाद नगरपालिकेला १४ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे लवकरच नगरपालिकेच्या कारभारात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील नगरपालिकांमधील दैनंदिन काम, विकासकामांचे सुसूत्रीकरण व्हावे, त्यांच्या सेवाशर्ती व वेतनश्रेणी यांच्यात समानता असावी व विहित शैक्षणिक अर्हता पात्र जबाबदार अधिकारी नगरपालिका प्रशासनात उपलब्ध व्हावेत म्हणून सहा पदांचे सेवाशर्ती नियम केलेले आहे. वित्त विभागाच्या २ जून २०१५ च्या शासननिर्णयानुसार नगरपालिका आकृतिबंधातील राज्यस्तरीय संवर्गाच्या मंजूर पदांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरे अधिनियम १९६५ चे कलम ७६ नुसार या संचालनालयाने यापूर्वीचा नगरपरिषद आकृतिबंध मंजूर केला आहे. यामध्ये आता नव्याने नगर अभियंता (स्थापत्य), नगर अभियंता (विद्युत), नगर अभियंता (संगणक), पाणीपुरवठा जल निस्सारण व स्वच्छता अभियंता, सहायक मिळकत पर्यवेक्षक, सहायक समाजकल्याण माहिती व जनसंपर्क पर्यवेक्षक, सहायक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक, नगररचनाकार, सहायक खरेदी भांडार, सहायक विधी व कामगार, कर निरीक्षक, कार्यालय अधीक्षक, लेखापाल, लेखापरीक्षक अशी १४ पदे मंजूर करण्यात आलेली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहावीचा अभ्यासक्रम बदलणार

$
0
0



अकरावी मराठीला नवे पुस्तक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्याचबरोबर अकरावी अभ्यासक्रमातील 'मराठी युवकभारती' हे पुस्तकही नव्याने प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी सलंग्नित शाळांसाठी हे बदल असणार आहेत. बालभारतीने याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे.

अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यानुसार पहिलीपासून आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदलांची प्रक्रिया सुरू झाली. पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०१६-१७) इयत्ता सहावीचे पाठपुस्तके बदलणार आहेत. फेररचनेनुसार अभ्यासक्रम बदलाची प्रक्रिया सुरू आहे. 'प्राथमिक ‌शिक्षण अभ्यासक्रम-२०१२'नुसार ही सुधारित बदलाची प्रक्रिया करण्यात येत आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात पाचवीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला तर, इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम २०१७पासून बदलण्याचे प्रस्तावित असल्याचे राज्य पाठपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने स्पष्ट केले आहे. मंडळाने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, पुस्तक विक्रेत्यांना पत्रकाद्वारे कळविले आहे. आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांमधील कौशल्यगुण विकसित करणे या दृष्टिकोनातून नवीन अभ्यासक्रमात बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अकरावीचे मराठी बदलणार

२०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून अकरावी अभ्यासक्रमातील मराठी युवकभारती हे पुस्तक नव्याने प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामुळे जूनपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांना नवीन मराठीचे पुस्तके उपलब्ध होणार आहेत. त्याच्या निर्मितीचे कामही सुरू असल्याचे मंडळाच्या अधिकारी सूत्रांनी सांगितले.

पुढील शैक्षणिक वर्षात बदलण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे परिपत्रक पुस्तक विक्रेते, संस्थांना पाठविले आहे. सहावीचा अभ्यासक्रमातील पाठपुस्तके आणि अकरावी मराठी युवकभारतीचा समावेश आहे. - व्ही. एल. पडघान, विभागीय भांडारप्रमुख, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी अनुकंपा घोटाळा गाजणार

$
0
0

जयंत पाटील यांच्यासह अन्य आमदारांचा हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युती सरकारच्या काळात (१९९८ ते २००५) औरंगाबाद एसटी कार्यालयात झालेल्या अनुकंपा भरती घोटाळ्याचे भूत पुन्हा नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार आहे. या घोटाळ्याबाबत आमदार जयंती पाटील यांच्यासह इतर आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या जागी अन्य ८ जणांना सेवेत भरती केल्यामुळे हा घोटाळा गाजला होता.

औरंगाबाद एसटी विभागात झालेल्या अनुकंपा भरती घोटाळ्याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने कोलारकर समितीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. एसटीतल्या अनुकंपा भरतीतली बोगस कर्मचारी नियुक्ती उघड झाल्यानंतर अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी या समितीची नियुक्त करण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानुसार, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी त्यांच्या पाल्यांना नोकरीवर न घेता, इतर ८ जणांची बोगस कागदपत्रांच्या आधारे भरती झाली होती. या घोटाळ्याप्रकरणी विविध आगारात कार्यरत असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. कोलारकर समितीने या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करा, अशी शिफारस केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी आमदार जयंत पाटील, जितेंद्र अव्हाड यांच्यासह आमदार आनंद ठाकूर, हेमंत टकले, राहुल नार्वेकर, सुनील तटकरे, सुनील पावसकर, ख्वाजा बेग, दीपक सांळुखे, नरेंद्र पाटील, प्रकाश बिनसाळे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न मांडला आहे. या प्रकरणी कुणावरही ठोस कारवाई न झाल्याने आगामी काळात हा घोटाळा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.

गुन्हा दाखल करण्यासाठी महामंडळाची मंजुरी आवश्यक

अनुकंपा भरती घोटाळा करणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करा, असे आदेश एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. यासाठीचा ड्राफ्ट मंजुरीसाठी महामंडळाकडे पाठविण्यात आला आहे. त्या नंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्रोपणासाठी एका झाडाचा खर्च १० हजार

$
0
0

धुळे - सोलापूर महामार्गावरील झाडे वाचवण्याचा प्रशासनाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धुळे - सोलापूर महामार्गावरील मोठ्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. झाडांच्या पुनर्रोपणासाठी अनुभवी संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत. एका झाडाच्या पुनर्रोपणासाठी किमान पाच ते वीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. महामार्गाच्या पुढील टप्प्यात सर्वाधिक वृक्षतोड होणार असल्याने पुनर्रोपणाचा निर्णय लवकर घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

सोलापूर-धुळे महामार्ग रुंदीकरणात आतापर्यंत १२ हजार झाडांचा बळी गेला. रस्ता रुदीकरणात जुनी झाडे तुटल्याने पर्यावरण संस्थांनी विरोध केला आहे. मात्र, वृक्ष पुनर्रोपणातून हा प्रश्न निकाली काढण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आणि शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यावेळी वन विभागाचे उपवनसंरक्षक अशोक गिऱ्हेपुजे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, 'वुई फॉर इन्व्हॉरमेंट'च्या मेघना बडजाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. महामार्गाच्या रुंदीकरणात शेकडो झाडे तुटत असल्यामुळे पुनर्रोपण आवश्यक आहे. या कामासाठी पुनर्रोपण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या निविदा मागवण्यात येतील, पुनर्रोपणासाठीची नियमावली, कंपनीची अर्हता या विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, पुनर्रोपण क्षेत्रात कार्यरत पुणे आणि दिल्ली येथील संस्थांनी कामाचे 'प्रेझेंटेशन' केले. महामार्गात किमान पाचशेपेक्षा अधिक झाडे असतील तरच काम करू अशी भूमिका दिल्लीच्या संस्थेने घेतली आहे. तर पुण्याच्या संस्थेने मागील कामाचा दाखला दिला आहे. एका झाडाच्या पुनर्रोपणासाठी किमान ५ ते कमाल २० हजार खर्च अपेक्षित आहे. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व जिल्हा प्रशासनाने या खर्चाची जबाबदारी घेण्यावर बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, वृक्ष पुनर्रोपणानंतर झाड जगण्याचे प्रमाण ६० ते ८० टक्के आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास महामार्गावरील हजारो झाडांना जीवदान मिळेल. झाड लावल्यानंतर पाच वर्षांनी पाहणी करून जिवंत झाडांच्या संख्येनुसार संस्थेला पैसे दिले जाणार आहेत. निविदेसासाठी किमान दहा वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे.

कायद्याचे प्रश्नचिन्ह

जिल्ह्यातील वृक्षतोड परवानगी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, हा आदेश सरसकट लागू होऊ शकत नसल्याचे अभ्यासकांनी सांगितले. शहरी हद्दीसाठी महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती, वनक्षेत्र हद्दीत वन विभाग आणि ग्रामीण भागात वृक्षसंवर्धनासाठी वेगळा कायदा आहे. परवानगी रद्द करण्याचा निर्णय योग्य असला तरी कायद्याच्या तरतुदी वेगळ्या आहेत.

आजपासून सर्व्हे

वृक्ष पुनर्रोपणासाठी पहिल्या टप्प्यात चित्तेपिंपळगाव ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते वेरूळ रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांचे सर्व्हेक्षण होणार आहे. या कामाला शुक्रवारी (४ डिसेंबर) सुरुवात होईल.

सोलापूर-धुळे महामार्गाचा पुढील टप्पा चिंताजनक आहे. वृक्ष पुनर्रोपणाचा निर्णय तातडीने घेतल्यास हजारो वृक्ष वाचवणे सहजशक्य आहे. - मेघना बडजाते, वुई फॉर इन्व्हॉरमेंट

वृक्ष पुनर्रोपणाबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. या कामासाठी वेगवेगळ्या संस्थांच्या निविदा मागवल्या आहेत. त्यानंतरच कामाला सुरुवात होईल. - अशोक गिऱ्हेपुजे, उपवनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात छावणी चालकांना नोटीस

$
0
0



फौजदारी कारवाईचा जिल्हाधिकारी नारनवरेंचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

चारा छावणीच्या प्रस्तावास मंजुरी देवूनही छावणी सुरू न करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सात संस्थांना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी फौजदारी कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसीमुळे चारा छावणी सुरू करून पशुसेवा केलेल्या संस्‍थाचालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंजुरी मिळाल्यानंतरही चारा छावणी न सुरू केल्यामुळे छावणीमालकांना जबाबदार धरीत ही नोटीस बजावण्यात आली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली चाराटंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चारा छावणीचे तीन महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. चारा छावणी सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील ११० संस्थांनी आपले प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले होते. त्यातील १४ संस्थांच्या प्रस्तावांना छावणी सुरू करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला होता. प्रत्यक्षात मात्र, केवळ सात संस्थांनीच मंजुरीनंतर चारा छावणी सुरू केली. मंजुरी देवूनही उर्वरित सात संस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

चारा टंचाईमुळे जनावरे मेल्यास किंवा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याला मंजुरीनंतरही छावणी सुरू न करणारे संस्थाचालक जबाबदार असतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीशीत नमूद केले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कलम ५७ नुसार सात संस्थांवर कायदेशीर फौजदारी करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

ऑगस्टमध्ये चारा छावणी सुरू करण्याबाबत या संस्थांना प्रशासनाने अनुमती दिली होती. तीन महिन्यांचा कालावधीत उलटूनही चारा छावणी संबंधितांनी सुरू केलेली नाही. त्यावरून चारा छावणी सुरू करण्यास या संस्था इच्छूक दिसत नसल्याचे या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

उस्मानबाद येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, परंडा तालुक्यातील भोत्रा येथील वसंतराव पाटील मजूर सहकारी संस्था, भूम तालुक्यातील आंतरगाव मजूर सहकारी संस्था आणि सहयोग बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नळदुर्ग येथील समर्थ बहुउद्देशिय संस्था, भूम तालुक्यातील भगवानबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व अन्य एक अशा सात संस्थांना मंजुरी देण्यात आली होती. या सर्व संस्थांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

चारा छावणी न सुरू केल्यामुळे उपासमार होऊन जनावरे दगावली अथवा जनावरांस चारा उपलब्ध न झाल्यामुळे विपरीत घटना घडली किंवा नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात आपल्या अकार्यक्षमतेमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याबाबत आपणास संस्थेचे अध्यक्ष व सचिव म्हणून व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल व आपल्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविला जाईल, असे संस्थाचालकांना जारी करण्यात आलेल्या नोटीशीत म्हटले आहे.



पशुसेवा म्हणजे गुन्हा आहे का ?

नोटीस देण्यात आलेल्यापैकी काही संस्‍थानी चारा छावणी सुरू केल्या होत्या. त्यांनी काही काळ छावणी सुरू केली होती. मात्र, संप्टेबरमध्ये पाऊस पडल्याने काही शेतकऱ्यांनी जनावरे परत घरी घेऊन जाणे पसंत केले. त्यामुळे चारा छावण्या बंद पडल्या. यामधील काही जणांनी पशुची सेवाही केली. याबाबतचे एक रुपयाचे सरकारी अनुदान न मागता संस्थेच्या खर्चांने छावणी चालवली. अशाप्रकारे पशुसेवा करणे हा गुन्हा ठरू श‌‌कतो का असा सवाल संतप्त छावणी चाल‌कांतून व्यक्त केला जात आहे.

नळदुर्ग परिसरात सुमारे दीड महिना चारा छावणी चालवली. छावणीत ११० जनावरे होती. संप्टेबरमध्ये पाऊस पडल्यानंतर सर्वत्र हिरवळ झाली. त्यामुळे सर्वांनी जनावरे घरी घेऊन जाणे पसंत केले. यासाठी संस्थेने सुमारे साडेतीन लाख रुपये पदरचा खर्च केला, एक रुपयाचेही शासनाचे अनुदान मागितलेले नाही. काही दिवसांपासून चारा टंचाई जाणवत असल्याने चारा छावणी पुन्हा सुरू करून गैरसोय दूर करू. सुशांत भुमकर, अध्यक्ष, समर्थ बहुउद्देशिय संस्था, नळदुर्ग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्रा योजनेची माहिती देण्यास टाळाटाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

सुशिक्षित बेकार युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रत्येक लहान - मोठ्या उद्योगाना समान संधी मिळावी या उद्दात हेतूने प्रधानमंत्री मुद्रा योजना सरकारने जाहीर करून अमलात आणली. परंतु, हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बँक शाखेतील शाखाधिकारी यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या योजनेचा लाभ गरजूंना मिळत नाही. याबाबत विचारपूस करण्यासाठी गेलेल्या युवकांना माहिती दिली जात नसल्याने केंद्र शासनाच्या योजनेला हरताळ फासला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक लहान व मोठ्या व्यावसायकासाठी समान संधी म्हणून प्रधानमंत्री मुद्रा योजना अमलात आणली आहे. या योजनेमुळे लहानात-लहान व मोठ्या उद्योगचालकांना कोणत्याही परतफेडीची चिंता न करता सुसह्य कालावधीत आजवर मिळाली नाही अशा गतीने जलद प्रगती करून उन्नती व्हावी हा उद्देश ठेवला आहे. यातून शिशी लोनमधून ५० हजारचे कर्ज, किशोर लोनमधून ५० हजार टे ५ लाखापर्यंत कर्ज, तरुण लोनमध्ये ५ लाखांपासून ते १० लाखापर्यंतचे मुद्रा कार्डद्वारे कर्ज देऊन खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. एवढेच नव्हे हे कर्ज मिळविण्यासाठी कोणतेही तारण नाही, प्रक्रिया शुल्कात सवलत, योग्य असा परतफेडीचा कालावधी देण्यात आला आहे. सदर योजनेची सुरुवात करून मुद्रा लोन हे सर्व बँकाच्या शाखांमध्ये उपलब्ध करून थेट बँकेमार्फत किंवा बॅँकेकडून एमएफआयच्या सहयोगाने वितरण करण्याचे सर्व बँकाना सुचित केले आहे.

याबाबत हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी केंद्र शासनाच्या या योजनेची विचारपूस करणाऱ्या युवकांना मा‌हिती देण्यास सुद्धा टाळाटाळ करीत आहेत. यासह शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच योजनेची माहिती गुलदस्त्यात ठेवून शाखाधिकारी काय सध्या करीत आहेत असा सवाल लाभार्थ्यामधून विचारला जात आहे.

महाप्रबंधकांनी चौकशी करावी

हिमायतनगर बँकेतील शाखेत चालविल्या जाणाऱ्या शाखाधिकाऱ्याच्या या कारभाराची महाप्रबंधक यांनी चौकशी करून तातडीने येथून उचलबांगडी करावी. तालुक्यातील छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या व बेरोजगार युवकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही तर शाखेसमोर हजारो युवक व वंचित व्यावसायीक लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीसाठी मापात पाप

$
0
0

३.७७ टीएमसी पाणी 'मुरले'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगर-नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या ११.५८ अब्ज घनफूच (टीएमसी) पाण्यापैकी गुरुवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणात केवळ ६.६३ टीएमसी पाणी पोचले. ऊर्ध्व भागातील कालव्यांना १.१८ टीएमसी पाणी सोडल्यामुळे जायकवाडीसाठी सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी झाला आहे. यामुळे जायकवाडीला शिल्लक पाणी मिळण्यासाठी आणखी दहा ते पंधरा दिवस ‌लागण्याची शक्यता आहे. प्रवाह मार्गातील खड्ड्यांमुळे तब्बल ३६ टक्के पाणी वाटतच मुरले. जायकवाडीला ६४ टक्केच पाणी मिळाले असल्याने 'मापात पाप' झाल्याची ‌भावना निर्माण झाली आहे.

सध्या जायकवाडी धरणामध्ये ११ टक्के पाणीसाठा आहे. धरणात पाण्याची आवक आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. जायकवाडीत ऊर्ध्व भागातील धरण समूहांतून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून ऊर्ध्व प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पाणी बंदही करण्यात आले होते. आतापर्यंत ११.५८ टीएमसी पाणी सोडण्यात आले असून, यापैकी नांदूर मधमेश्वर कालव्यातील ०.२१ टीएमसी, प्रवरा कालव्यातील ०.७५ तर प्रवरा नदीमधील कोल्हापूरी बंधाऱ्यातून ०.२२ टीएमसी पाणी सोडण्यात आले. हे पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग कमी झाला आहे. जायकवाडीसाठी आतापर्यंत १०.४० टीएमसी पाणी सोडण्यात आले असून, यापैकी ६.६३ टीएमसी पाणी धरणात दाखल झाले आहे.

पाणी सोडण्याचा कोटा पूर्ण होत असल्यामुळे बहुतांश प्रकल्पातून पाणी सोडणे बंद केले असून, सध्या केवळ निळवंडे धरणातून १५०० क्युसेक्सने पाणी जायवाकवाडीसाठी सोडण्यात येत आहे.

आदेशाला केराची टोपली

ऊर्ध्व धरण समूहातून पाणी सोडण्याच्या निर्णय झाल्यानंतर पाण्याचा कमीत कमी तोटा (वहनव्यय) व्हावा म्हणून जास्तीत जास्त विसर्ग सोडावा, असे आदेश गोदावरी खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी दिले होते, मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचा परिणाम जायकवाडी प्रकल्पात येणाऱ्या पाण्यावर झाला आहे.

असा झाला विसर्ग

धरण.................सोडलेले पामी

मुळा...................१.४९

दारणा................२.२५

कडवा..................०.३८

मुकणे...................०.६७

गंगापूर...................१.३६

आळंदी.................०.०५

निळवंडे...............५.३८

.................................

एकूण......................११.५८ (पाणी टीएमसी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या वादातून तणाव

$
0
0

बुढीलेन भागात दोन गटांत वाद; परिस्थिती नियंत्रणात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बुढीलेन भागातील चिमणाराजा महल या जमिनीच्या जागेतून दोन गटात गुरुवारी दुपारी तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. आमदार अब्दुल सत्तार यांच्या गुंडानी दगडफेक करीत दहशत निर्माण केल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला तर, ही जागा आपली असून, दगडफेकीचा आरोप आमदार सत्तार यांनी फेटाळून लावला. या घटनेनंतर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बुढीलेन परिसरातील सिटी सर्व्हे क्रमांक ३१९४ मधील शीट क्रमांक २५ मध्ये ७ हजार १८६ चौरस फूट ही जमीन आहे. चिमणाराजा महल नावाने ही जागा ओळखली जाते. या ठिकाणी काही कच्ची बांधकामे केलेली घरे तसेच पत्र्याचे गॅरेज, टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शंभर ते दीडशे महिला पुरूषांचा जमाव वाहनांमध्ये या ठिकाणी आला. त्यांनी जागा ए. एस. अजंता कंस्ट्रक्शनच्या मालकीची असल्याचा दावा केला. काही वेळातच स्थानिक नागरिकांचा जमाव या ठिकाणी जमला. दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये हमरीतुमरी झाल्याने तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. सौम्य बळाचा वापर करीत जमाव पांगवण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार यांचे हे गुंड असून त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जागेचा दावा सांगणाऱ्या दोन्ही गटाच्या व्यक्तींना कागदपत्रे पोलिसांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर येथील परिस्थिती पूर्ववत झाली. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

मूळ हैदराबादच्या व्यक्तीची जागा

ही जागा मूळ हैदराबाद येथील विक्रमराव प्रभाकरराव यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. येथील हसनोद्दीन शेख कमालोद्दीन यांनी ही जागा आपण त्यांच्याकडून २००२ मध्ये विकत घेतल्याचा दावा केला आहे. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील या जागेवर हक्क सांगत विक्रम प्रभाकरराव यांच्याकडून जागा विकत घेतल्याचा दावा केला आहे.

सकाळी शंभर ते दीडशेचा जमाव हत्यारांसह या जागेवर चालून आला. आमदार अब्दुल सत्तार व त्याच्या मुलाचे हे गुंड होते. त्यांनी दगडफेक करीत दहशत निर्माण केली. या जागेवर आमचा ५० वर्षांपासून निर्विवाद ताबा आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.- शेख हसनोद्दीन, ताबेदार

कायदेशीररित्या ही जागा आमच्या मालकीची आहे. कोर्टात आमचा दावा सिद्ध झालेला आहे. सदर घडलेल्या प्रकरणात केलेल आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत.- अब्दुल सत्तार, आमदार

सकाळी या जागेच्या साफसफाईसाठी सात ते आठजण आले होते. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आले. जमावाची समजूत घालण्यात आली आहे, तसेच जागेवर दावा सांगणाऱ्या मंडळीना कागदपत्रे सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. या जागेवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त, शहर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छेडछाडीला कंटाळून आत्महत्या

$
0
0

माय-लेकाचा जामीन फेटाळला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छेडछाडीला कंटाळून शहरातील अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याप्रकरणी छेडछाड काढणाऱ्या आरोपीचा नियमित जामीन, तर आरोपीच्या आईचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी फेटाळला.

या प्रकरणी आत्महत्या केलेल्या ऋतुजा ज्ञानेश्वर गायके (१५) हिची आई मिनाश्री ज्ञानेश्वर गायके (४५, रा. पडेगाव) यांनी फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी ईश्वर एकनाथ साळवे हा मृत ऋतुजा हिचा पाठलाग करून सातत्याने छेडछाड काढत होता. या बाबात त्याला फिर्यादीच्या कुटुंबीयांनी वारंवार समजावून सांगितले; परंतु आरोपी ईश्वर हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यातच १५ नोव्हेंबर २०१५ रोजी आरोपी ईश्वर व त्याची आई आरोपी द्वारकाबाई एकनाथ साळवे यांनी फिर्यादीच्या घरी येऊन भांडण केली. तसेच शिविगाळ करून धमक्याही दिल्या. या प्रकाराला कंटाळून ऋतुजा हिने १६ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी फिर्यादीने छावणी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला. दरम्यान, आरोपी ईश्वर हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता, तर आरोपीची आई द्वारकाबाई हिनेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हे प्रकरण सुनावणीसाठी कोर्टात आले असता, जामीन देऊ नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील अजित यु अंकुश यांनी कोर्टात केली होती. ही विनंती ग्राह्य धरून दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले. या प्रकरणामध्ये अॅड. राजेश बिहानी यांनी सरकारी वकिलांना सहाय्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० टक्के जागा शेतकऱ्यांना मिळणार

$
0
0

८७० कोटी खर्चून होणार पायाभूत सुविधांचा विकास

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत चिकलठाणा भागात ग्रीनफिल्डची योजना अंमलात आणली तर, त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात मोठा लाभ होईल. त्यांच्या संपादित जागेपैकी ३० टक्के जागा परत केली जाणार असून, त्या जागेचा विकास ते स्वतःच्या कल्पनेने करू शकतील.

ग्रीनफिल्ड परिसरात केंद्र सरकारच्या माध्यमातून ८७० कोटी खर्चून पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पासाठी पीएमसी म्हणून काम करणाऱ्या फोट्रेस कंपनीचे प्रतिनिधी अजय भोरे यांनी शेतकऱ्यांना दिली. महापौरांकडे आलेल्या शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देताना भोरे म्हणाले 'संपादित केलेल्या एकूण जमिनीचा लेआऊट तयार केला जाणार आहे. त्यात रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज लाइन, घनकचरा व्यवस्थापनाचा अद्ययावत प्रकल्प अशा विविध पायाभूत सुविधा शासनाच्या निधीतून पूर्ण केल्या जातील. शेतकऱ्यांना त्यांची ३० टक्के जमीन परत मिळवण्यासाठी किमान एक ते दीड वर्ष वाट पाहावी लागेल. चिकलठाण्यातील शेतकऱ्यांची जमीन सध्या नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे. ग्रीनफिल्डसाठी ही जमीन मिळाली तर, या जमिनीचे आरक्षण आपोआप येलो बेल्टमध्ये होईल. शेतकऱ्यांना ताब्यात मिळालेल्या ३० टक्के जमिनीवर त्यांना डबल एफएसआय मिळेल, म्हणजे एखाद्याने १० हजार चौरस फूट जागा या प्रकल्पासाठी दिली असेल तर, त्याला त्याच्या ताब्यात मिळालेल्या जागेवर ६ हजार चौरस फुटाचे बांधकाम करता येईल. बांधकाम कसे करायचे याचे स्वातंत्र्य त्या शेतकऱ्याला असेल. या सर्व व्यवहारात शेतकऱ्यांचाच फायदा होईल,' असा दावा त्यांनी केला.

स्मार्टसिटी बद्दल आम्हाला कल्पना देणे गरजेचे होते. मात्र, दिली गेली नाही. त्यामुळे किती ज‌मीन जाणार, त्याचा मोबदला काय याबाबत काहीच माहिती नाही. प्रशासनाने याबाबी स्पष्ट करायला हव्यात. - भागिनाथ नवपुते

नागरिकांमध्ये प्रकल्पाबद्दल संभ्रम आहे. प्रशासनाने संवाद साधून ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे स्वरुप कसे असेल, शेतकऱ्यांची जमीन किती घेणार याबाबत माहिती द्यायला हवी होती. - रुपचंद नवपुते

स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रीनफिल्ड प्रकल्प चिकलठाण्यात विकसित करण्याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात येते आहे. मात्र, याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी आलो होतो. - रवी कावडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरीविरोध काही तासांत मावळला

$
0
0

संभाव्य फायद्यामुळे ग्रीन फिल्ड चिकलठाण्यात करायला सहमती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलण्यात होणाऱ्या ग्रीनफिल्डला झालेला शेतकऱ्यांचा विरोध प्रकल्पाचे फायदे ऐकताच अवघ्या काही तासांत मावळला. आम्हाला स्मार्ट सिटी, ग्रीन फिल्डबद्दल कुणी माहितीच दिली नव्हती. शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर, प्रकल्प चिकलठाण्यातच राबवा, अशी मागणी त्यांनी गुरुवारी महापौरांकडे केली.

केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात शहराचा समावेश झाल्यानंतर महापालिका, पीएमसी अधिकाऱ्यांनी ग्रीनफिल्ड प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नक्षत्रवाडीच्या जागेला पसंती दाखवली. हा प्रस्ताव अंतिम होत असताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या प्रकलपातील शेतकऱ्यांचा फायदा लक्षात घेता चिकलठाणा भागात मंगळवारी सुमारे १५० शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यात ग्रीनफिल्ड प्रकल्प म्हणजे काय, त्यातून लाभ कसा मिळेल हे समजावून सांगितले. बहुतेक शेतकरी ग्रीनफिल्डच्या बाजूने तयार झाले. या संदर्भातले वृत्त 'मटा' ने गुरुवारच्या अंकात प्रसिध्द केले. त्यानंतर चिकलठाण्याच्या चौधरी कॉलनीतून निवडून आलेल्या काँग्रेस नगरसेविका वैशाली जाधव यांनी या प्रकल्पास विरोध करणारे एक निवेदन घेऊन पन्नास शेतकऱ्यांसह गुरुवारी दुपारी महापालिकेचे कार्यालय गाठले. महापौर त्र्यंबक तुपे यांची भेट घेतली. तुपे यांनी या शेतकऱ्यांबरोबर साधक-बाधक चर्चा केली. 'तुमचा विरोध असेल तर चिकलठाण्यात ग्रीनफिल्डचा प्रकल्प करणार नाही. कुणावर बळजबरी करणार नाही,' असे स्पष्ट केले. यावेळी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात उपस्थित होते. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे नोडल ऑफिसर सिकंदर अली, पीएमसीचे प्रतिनिधी अजय भोरे यांनी ग्रीनफिल्डमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे हे समजवून सांगितले. त्यानंतर या शेतकऱ्यांचा विरोध मावळला. उद्या शुक्रवारी पुन्हा एकदा महापालिकेचे अधिकारी व पीएमसीचे प्रतिनिधी चिकलठाणा येथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

२५० एकराची बेरीज झाली

ग्रीनफिल्डसाठी किमान २५० एकराचा निकष आहे.

चिकलठाण्यातील ज्या ठिकाणी जागा निश्चित केली जाणार आहे, त्या ठिकाणी १०० एकर जागा शासनाची आहे. त्याशिवाय ५ ते ७ शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन १५० एकर जागा देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे २५० एकर जागेची बेरीज पूर्ण झाल्याचे महापालिकेचे अधिकारी सिकंदर अली यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले. ५०० एकरापर्यंत ग्रीनफिल्ड विकसित केले जाऊ शकते. आणखी शेतकरी पुढे आले हे काम करता येईल असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव ऑनलाईन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पासाठीचा प्रस्ताव शनिवारी ऑनलाइन राज्य शासनाकडे पाठविणार आहे. राज्य सरकारकडे प्रस्तावाची छाननी होऊन तोच प्रस्ताव १५ डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारला पाठविण्यात येईल.

स्मार्ट सिटी प्रस्ताव पाठवण्यासाठी राज्य सरकारने महापालिकांना ५ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे याच दिवशी प्रस्ताव पाठविण्याचे महापालिकेने ठरवले आहे. या संदर्भात महापौर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थितीत पत्रकारांना माहिती देताना स्मार्ट सिटी प्रकल्पाचे नोडल ऑफिसर सिकंदर अली म्हणाले, 'प्रस्ताव तयार करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी आहे. उद्या शुक्रवारी सायंकाळ पर्यंत ही पूर्तता केली जाईल. त्यानंतर शनिवारी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल. चिकलठाणा येथे ग्रीनफिल्ड प्रकल्प विकसित करावा या दृष्टीने प्रस्ताव तयार केला जात आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टीडीआर’मुळे गाजणार आजची स्थायीची बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टीडीआर घोटाळ्यामुळे उद्या होणारी स्थायी समितीची बैठक गाजण्याची शक्यता आहे. ज्या जागांचे टीडीआर पालिकेने दिले, त्या जागांचा ताबा न घेता व मालकी हक्काची कागदपत्रे तयार न करता टीडीआर दिल्याचे प्रकरण सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उपस्थित केले होते. त्यावर आयुक्तांनी तत्काळ चौकशीचे आश्वासन दिले, पण अद्याप चौकशी अहवाल आला नाही.

महापालिकेच्या १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राज वानखेडे यांनी सिटीसर्व्हे क्रमांक ११४३६, ११४३२ वरील टीडीआरचे प्रकरण मांडले होते. जागा ताब्यात न घेता हे टीडीआर दिले आहेत. टीडीआर देताना मोजणी नकाशाचा आधार घेतला नाही. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे टीडीआर दिल्याचे वानखेडे यांनी नमूद केले होते. त्यांच्या या तक्रारीच्या संदर्भात तत्काळ चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले होते. त्यांनी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक ए. बी. देशमुख यांना टीडीआर प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मिळेलेल्या माहितीनुसार देशमुख यांनी अहवाल सादर केला, पण त्यात अनेक बाबी लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात याच टीडीआर प्रकरणाबद्दर नावखेडे व नितीन चित्ते यांनी केंद्रेकर यांना स्वतंत्रपणे निवेदन सादर करून चुकीच्या पध्दतीने टीडीआर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या संदर्भातही अद्याप काहीच कारवाई न झाल्यामुळे उद्याच्या बैठकीत काही नगरसेवक हा विषय उपस्थित करण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images