Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वीज जोडा, अन्यथा फौजदारी

$
0
0
महावितरणने वीज थकबाकी वसुलीसाठी नोटीस न देता शेतीपंपाची वीज तोडल्यामुळे जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी, शेतकरी व राजकीय पक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

जायकवाडीत पाणी सोडा

$
0
0
जायकवाडी धरणात नगर, नाशिक भागातील धरणातून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे शनिवारी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोर निदर्शने करण्यात आली.

२ मुलींनी रचला अपहरणाचा बनाव

$
0
0
तीन गुन्हेगारांनी शाळेसमोरुन अपहरण केले, त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन पळ काढला, अशी माहिती जालना येथील दोन शालेय विद्यार्थिनींनी शनिवारी पोलिसांना दिली.

जलवाहिनीचा ८ दिवसांत निर्णय

$
0
0
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलीटी कंपनीने पालिकेकडे वस्तूस्थिती कथन करणारी कागदपत्रे सादर केल्याचा दावा केला आहे. या दाव्यावर पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत.

पीआरपी शहराध्यक्षांचा पँथर सेनेत प्रवेश

$
0
0
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष भगवान गंगावने यांनी पँथर सेनेत प्रवेश केला आहे. पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार व महासचिव रतन खंडागळे यांच्या उपस्थितीत सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रवेश केला.

पैठणचा वीज तिढा सुटला

$
0
0
पैठण नगर पालिका व महावितरण यांनी एकमेकावर थकबाकीच्या कारणामुळे केलीली कारवाई शनिवारी मागे घेतली. महावितरणने पाणी पुरवठा विभागाची वीज जोडणी करून शहरातील वीज पुरवठा सुरळीत केला.

वीज न जोडल्यास शनिवारी मोर्चा

$
0
0
'वीज बिलासाठी तोडलेले कनेक्शन तीन दिवसात जोडले नाही तर, ७ सप्टेंबर रोजी सिल्लोड व फुलंब्री येथील महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढला जाईल,' असे खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कार्यशाळा न झाल्याने मुख्याध्यापकांचा हेलपाटा

$
0
0
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे रविवारी मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. ऐनवेळी कार्यशाळेची तारीख बदलण्यात आली पण ती माहिती मुख्याध्यापकांना न पोचविल्याने मोठा पेच निर्माण झाला.

डाळिंब उत्पादनात आघाडी

$
0
0
बीड जिल्ह्यातील उंदरी या गावातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके घेण्याचा नाद सोडून फळबाग लागवड केली आहे. सहाशे एकरच्या जवळपास क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे.

कलाप्रांतात मान शरमेने खाली

$
0
0
हल्ली औरंगाबादमध्ये कलाकारांचा राबता वाढला आहे. भरपूर बिदागीही मिळू लागली आहे. तशी बिदागी देणारे नेतेही वाढले आहेत. अशा परिस्थितीत हुल्लडबाजीच्या नावाखाली विकृतीच दाखवत एकाने अभिनेत्री अमृता खानविलकरवर चप्पल फेकली. यातून काय साधले हेच कळाले नाही. हा हेतू राजकीय होता की आकसापोटी होता हे तपासून पाहायला हवे, पण यामुळे कलाप्रांतात शरमेने मान खाली गेली आहे हे निश्चित.

बाजार समितीवर सीसीटीव्हीची नजर

$
0
0
जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ढासळलेला कारभार पुन्हा रुळावर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून समिती आवारातील प्रत्येक हालचाली आता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद होणार आहेत.

पक्ष्यांसाठी एक उद्यान तरी ठेवा

$
0
0
औरंगाबाद शहरात माणसांसाठी अनेक उद्याने आहेत. सलीम अली सरोवराचे एक उद्यान पक्ष्यांसाठी ठेवा, अशी गळ डॉ. सलीम अली सरोवर संवर्धन समितीचे सदस्य असलेल्या पक्षीमित्रांनी पालिका आयुक्तांना घातली.

‘डीटीएड’कडे विद्यार्थ्यांची पाठ

$
0
0
तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर डीटीएड प्रवेश प्रक्रियेला अखेर रविवारपासून (एक सप्टेंबर) सुरुवात झाली. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी फिरविलेली पाठ, प्रक्रियेला झालेला उशिर यामुळे पहिल्या दिवशी शुकशुकाट होता.

‘वॉर्डातील प्रश्न तंटामुक्तीने सोडावा’

$
0
0
समाजात बंधूभाव निर्माण करण्यासाठी आणि एकमेकांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी ईद मिलन सारखे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डावॉर्डातील तंटे समोपचाराने व शांततेच्या मार्गाने सोडविले जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पोलिसआयुक्त संजयकुमार यांनी व्यक्त केले.

सॅमसंग स्मार्ट ग्राहकांना चित्रपटाची पर्वणी

$
0
0
प्रोझोन मॉल येथील सॅमसंग स्मार्ट कॅफेतून स्मार्ट फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चित्रपट शोचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. यावेळी ग्राहकांनी चित्रपटाचा आनंद लुटला.

गणिताची दहीहंडी, नृत्य, नाटिका

$
0
0
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये दहीहंडी उत्साहात फोडण्यात आली. यानिमित्त काही शाळांमध्ये गणिताची दहीहंडी साकारण्यात आली. मुलांनी नृत्य, नाटिका सादर करुन या सणाचा आनंद लुटला.

सर्दी, तापामुळे अर्धे शहर आजारी

$
0
0
महिनाभरापासून पावसाने मारलेली दडी आणि त्यात उन्हाचे प्रमाण वाढल्याने मिश्र वातावरण तयार झाले आहे. याचा फटका औरंगाबादवासीयांना बसला आहे. रक्तपेशी कमी होणे, ताप, सर्दीमुळे अर्धे शहर आजारी पडले आहे.

वीजपुरवठा, बिल वसुलीत महावितरणचा दुजाभाव

$
0
0
जायकवाडी धरणावरील मराठवाड्यातील शेतकऱ्यांची वीज खंडित केली असताना नगर जिल्ह्यातीत दोन तालुक्यात दहा तास वीज दिली जात आहे. वीजपुरवठा, बिल वसुली व आकारणीत महावितरण दुजाभाव करत असल्याचा आरोप शेतकरी संघटना व जायकवाडी पाणी संघर्ष समितीने केला आहे.

कामगारांचे कामाचे तास ठरवा

$
0
0
‘महावितरणमधील तांत्रिक कामगारांना अनेक पद्धतीची कामे सोपवली आहेत; मात्र त्यासाठी कामाचे ठराविक तास ठरविलेले नाहीत. तांत्रिक कामगारांनी कामाचे तास निश्चितीसाठी आग्रह धरावा,’ अशी सूचना आमदार प्रशांत बंब यांनी केली.

थोरात, विखे, पिचड, कोल्हेंविरोधात लढाई

$
0
0
जायकवाडीच्या पाण्यातील खरा अडथळा थोरात, विखे, पिचड व कोल्हे ही चौकडी असून त्यांच्याविरोधात आक्रमक होण्याचा निर्णय जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images