Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जिल्हा परिषद थंडावली

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com

राज्य सरकार जसे दुष्काळामुळे थंडावले आहे. त्रस्त असलेल्या जनतेचा भाजपवर रोष वाढत आहे. अगदी तशीच परिस्थिती जिल्हा परिषदेची झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील निवडक मंडळी एकत्र असल्याने सगळ्या विकासकामांचा खेळखंडोबा झाला आहे. त्यात कोणत्याही योजनांचे प्रभावीपणे नियोजन होत नसल्याने जिल्हा परिषद थंडावली आहे.

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हाताशी धरून दहा वर्षांनंतर जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली. आज साडेतीन वर्षे उलटून गेली तरी झेडपीची राजकीय घडी बसलेली नाही. सुरुवातीला झालेल्या अध्यक्ष नाहिदा बानो पठाण यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यांच्यानंतर शारदा जारवाल यांना औटघटकेचे अध्यक्षपद मिळाले, पण त्यांच्या काळात काँग्रेसचेच सदस्य सर्वाधिक नाराज झाले.

दरम्यानच्या काळात मनसे आणि काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे वादाचे प्रसंग घडतच होते. विषय समित्यांच्या सभापतींकडून स्वपक्षाला दिले जाणारे झुकते माप फोडणीत तेल ओतल्यासारखे ठरले. अडीच वर्षांची पहिली टर्म संपल्यानंतर अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले होते. दहा वर्षांनंतर सर्वसाधारण गटाला संधी मिळत असल्याने काँग्रेसमधून जोरदार फिल्डिंग लावली गेली. अशोक चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आल्यामुळे साहजिकच त्यांच्या गटाचा बोलबाला होता. आमदार अब्दुल सत्तार गटाचे श्रीराम महाजन अध्यक्ष झाले. विद्यमान सभापती विनोद तांबे यांनीही जोरदार सेटिंग केली होती. पण सत्तार यांचे वजन अधिक पडल्याने महाजन अध्यक्ष झाले. तेव्हापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत दोन गट पडले आणि जिल्हा परिषदेच्या कामाचा ऱ्हास सुरू झाला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचीही परिस्थिती वेगळी नव्हती. आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर गटाचे दिनकर पवार उपाध्यक्ष झाले. मनसेच्या कोट्यातील दोन्ही सभापतिपदे अनुक्रमे संतोष जाधव आणि शीला चव्हाण यांच्याकडे तर महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरला मनगटे यांना मिळाले. अडीच वर्षे मिळून मिसळून, एकत्र राहून झेडपीचा कारभार सांभाळण्याऐवजी कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. अध्यक्ष श्रीराम महाजन यांना विरोध करण्यासाठी काँग्रेसचाच एक गट कायम सक्रिय आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे सहकार्य आहे. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर जिल्हा परिषदेत 'अविश्वासा'चे वातावरण निर्माण केले जाते. केंद्र आणि राज्यातील सत्ता गमाविल्यामुळे अवसान गळालेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी झेडपीकडे पुरते दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षभरात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली नाही. झेडपी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर खासगीत टीका करणाऱ्या त्यांच्याच पक्षातील सदस्यांना पक्षातूनच पाठबळ मिळते आणि झेडपीची घडी विस्कटते. सिंचन विभागात काही सदस्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लाखो रुपयांचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. ही परंपरा जुनीच आहे. पण त्यावर काही कारवाई झालेली नव्हती. जुन्या कामांची तक्रार झाल्याने सिंचन आणि बांधकाम विभागातील प्रकरणांवर पोलिसांत गुन्हे दाखल झाले. सिंचन विभागातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अध्यक्ष महाजन यांनी गेल्या वर्षभरात एकही काम मंजूर केले नाही आणि तिथून धुसफूस सुरू झाली. विकासकामे अडविल्याच्या वल्गना करत काहींनी त्यांच्याविरुद्ध मोट बांधली, पण ती अजूनतरी तडीस गेलेली नाही. त्यामुळे सत्ताबदलाची स्थिती सध्या तरी 'बोलाचाच भात बोलाचीच कढी' अशी आहे. या राजकीय विचक्यामुळे विकासकामांची मात्र वाट लागली आहे. समाजकल्याण, महिला व बालकल्याण, बांधकाम, सिंचन, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण या विभागांची कामे जवळपास ठप्प आहेत.

नियोजन केल्याचा दावा पदाधिकारी करतात पण प्रत्यक्षात कृती शून्य आहे. ज्या कामांचे नियोजन झाले त्या ठराविक सदस्यांचीच कामे समाविष्ट केली गेली. ६० पैकी ३२ महिला सदस्य आहेत. त्यांच्यापैकी बहुतांश जणांना कोणत्या विभागात किती निधी आला याची माहितीच मिळत नाही. सगळे नियोजन झाल्यानंतरच माहिती कळते. तोवर पदाधिकारी, सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील निवडक सदस्य आपापल्या पदरात माप पाडून घेतात. साडेतीन वर्षांपासून हेच सुरू आहे. हेच पुढे सुरू राहील, याची माहिती असल्याने काही सदस्यांनी अविश्वासाचे वातावरण निर्माण करून आपल्या पदरात अधिकचे माप पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला यश मिळेल की नाही हे पुढचा काळ दाखवून देईल, पण यामुळे जिल्हा परिषद मात्र थंडावली आहे, हे नक्की.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीच्या आत्महत्याप्रकरणी कोर्टाने जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोयगाव येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचाही नियमित जामीन विशेष न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी मंगळवारी (आठ डिसेंबर) फेटाळला. या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावजयीचा अटकपूर्व जामीनही कोर्टाने शुक्रवारी (चार डिसेंबर) फेटाळला होता.

मृत मुलीचा भाऊ अतुल उत्तम गलिदे (२०, रा. लोहारगल्ली, सोयगाव) याने फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादीची मृत बहीण दुर्गा उत्तम गलिदे (१७) ही २२ नोव्हेंबर २०१५ रोजी घरी एकटीच होती. फिर्यादी व त्यांची आई बाजारात गेली होती. त्यावेळी मुख्य आरोपी राजेंद्र उर्फ बबलू कृष्णा परेराव (२५) व आरोपी राजेंद्रची भावजय वैशाली संतोष परेराव हे दोघे फिर्यादीच्या घरी आले व दोन्ही आरोपी निघून गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये दुर्गा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही आरोपींनी दुर्गाला अशी कोणती धमकी दिली, कशा प्रकारचा दबाव आणला, हे कळाले नाही. आरोपी राजेंद्रचे दुर्गावर एकतर्फी प्रेम होते. तो तिचा नेहमी पाठलाग करीत होता, पळून जाऊन लग्न करण्यासाठी धमकावत होता, जिवे मारण्याची तसेच बदनामीची धमकी दिली होती, असेही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दुर्गा हिने २२ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केल्यानंतर फिर्यादीने सोयगाव पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. त्यावरून २३ नोव्हेंबर रोजी आरोपी राजेंद्र याला अटक करण्यात येऊन २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी, तपासामध्ये मृत दुर्गाला आरोपीने लिहिलेले पत्र हस्तगत करण्यात आले असून, त्या पत्रावरून आरोपीचा गुन्ह्यामध्ये सहभाग आहे, असे दिसून येते. तसेच मृत दुर्गा ही अल्पवयीन असल्याने कलम ३०५ अन्वये गुन्हा होतो व या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपीला जामीन देऊ नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील शरद बांगर यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णांच्या नातलगांकडून हॉस्पिटलची तोडफोड

$
0
0

औरंगाबाद : उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करीत हॉस्पिटलची तोडफोड केली. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता कुशलनगर येथील संजिवनी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी डॉक्टरांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजिवनी बाल रुग्णालयात जालना येथील एका बालकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी डॉक्टर प्रशांत भाऊराव जाधव (रा. टिळकनगर) यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामध्ये एका कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. तसेच हॉस्पिटलमधील सामानाची देखील तोडफोड यावेळी करण्यात आली व मृत बालकाचे पोस्टमार्टम न करण्याची धमकी यावेळी नातलगांनी दिली. या प्रकरणी आरोपी राकेश म्हात्रे, रुपेश गडमकर, संतोष मेटेकर, कपिल कोमरे, संदीप तिरुपती, नीतेश टेकूर व नितीन (सर्व रा. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकसानभरपाईच्या वादातून घरात घुसून चाकूहल्ला

दुचाकीच्या नुकसान भरपाईच्या वादातून घरात घुसून चाकूहल्ला केल्याने दोन महिला जखमी झाल्या आहेत. मिलकॉर्नर परिसरातील एमएसईबी क्वाटर्समध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

एमएसईबी क्वाटर्समधील एका विवाहितेच्या पतीचा योगेश जाधव या तरुणासोबत दुचाकीच्या नुकसान भरपाईवरून वाद सुरू आहे. योगेशने नुकसानभरपाई पोटी सहा हजाराची मागणी केली होती. मात्र, या महिलेचा पती एक हजार रुपये देण्यासाठी तयार होता. या कारणावरून सोमवारी सकाळी योगेश चाकू घेऊन महिलेच्या घरात शिरला. तिच्या पतीला योगेश मारहाण करीत असताना ही महिला व तिची सासू मध्ये पडली. यावेळी महिलेच्या व सासूच्या उजव्या हाताच्या बोटांना चाकूचा वार बसून जखम झाली. या प्रकरणी आरोपी योगेशविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय आढाव तपास करीत आहेत.

तरुणींचा विनयभंग

दोन विविध घटनात तरुणींचा विनयभंग केल्याच्या घटना चिकलठाणा व अंगुरीबाग येथे घडल्या. यापैकी चिकलठाणा येथील घटनेत हॉटेलमध्ये मद्यपी तरुणांकडून तरुणीला मारहाण करण्यात आली. दोन मद्यपीना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सिडको एमआयडीसी व सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षाची तरुणी मैत्रिणींसोबत सोमवारी सायंकाळी चिकलठाणा येथील मॅकडोनाल्स हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. यावेळी एका बुलेटवर आलेले दोन मद्यपी तरुणीजवळ आले. या तरूणांनी अश्लिल भाषा वापरून गैरकृत्य केले. या तरुणीची मैत्रीणमध्ये पडली असता तिला तरुणांनी मारहाण केली. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अंकुश रावल (वय २२) व आदवेत धर (वय २४ रा. सिडको एमजीएमजवळ) यांना अटक केली. तसेच दुसरी घटना अंगुरीबाग येथे घडली. येथील एका महिलेच्या नातेवाईकाच्या मोबाइलवर अनोळखी मोबाइलधारकाने अश्लिल मॅसेज केले. या महिलेच्या भावाने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळेत गोंधळ घालणाऱ्याविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : मुलाला मारण्याच्या कारणावरून शाळेत गोंधळ घालणाऱ्या जमावाविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा परिसरातील डॉ. हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कुलमध्ये मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. येथील शिक्षिका शिल्पा बबनराव ढोणे (रा. उत्तमनगर, जवाहर कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. यामध्ये मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या शाळेत त्यांच्या परिचयाचे संजय भुजबळ, प्रदीप जाधव, स्वप्निल शिरसाठ, प्रशांत सातपुते, निलेश भाग्यवंत, ढगे शंतनू यांच्यासह २० ते २५ जणांना जमाव आला. या जमावाने शिक्षिका ढोणे यांना, 'तुम्ही सोमवारी ज्या मुलाला मारले तो विद्यार्थी कोठे आहे, त्याचा नाव व वर्ग सांगा' अशी मागणी केली. यावेळी ढोणे यांनी सदरील विद्यार्थी गावाकडे गेला असल्याची माहिती दिली. यामुळे संतापलेल्या जमावाने शिक्षिका ढोणे, शिक्षक दत्तात्रय तळेकर यांच्यासह नागपूरला गेलेले संस्थाचालक शामसुंदर कनके यांच्या नावाने अश्लिल शिवीगाळ करीत गोंधळ घातला. ढोणे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. चित्रा डकरेंच्या खुनाचा फायदा कोणाला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. चित्रा डकरे यांच्या खुनाचे गुढ दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कोणाला फायदा आहे का याची चाचपणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच एक पथक चोरीच्या प्रयत्नात डॉ. डकरे यांचा खून झाल्याची शक्यता गृहित धरून तपास करीत आहेत.

डॉ. चित्रा डकरे यांच्या खुनाला बुधवारी आठ दिवस पूर्ण झाले. आतापर्यंत कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. डॉ. चित्रा डकरे यांच्या खुनाचे कारण शोधण्याचे काम युद्धपातळीवर पोलिसांच्या विविध पथकांकडून सुरू आहे. डॉ. डकरे यांच्या मृत्यूमुळे कोणाला आर्थिक किंवा अन्य काही फायदा होणार आहे का, याची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. त्यांच्या मूळ गावी हिवरखेड तसेच यावल या ठिकाणी पथके जाऊन नातेवाईकांची चौकशी करून आली आहेत. शहरातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांची शोध मोहीम राबवित त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. डॉ. आस्वार यांच्याशी सबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांची, मोलकरणींची चौकशी करण्यात आली आहे. दिनेश डकरे यांची गावाकडे आठ एकर शेती व दोन हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे. त्यामुळे आर्थिक फायद्यासाठी हा खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांना कमी वाटत आहे. या बाजुने तपास सुरू असताना दुसरे पथक चोरी करताना प्रतिकार केल्यामुळे डॉ. डकरे यांचा चोरट्यांनी खून केल्याची शक्यता लक्षात घेऊनही तपास करीत आहेत.

चित्राबाई घरी एकट्या असल्याची संधी साधून चोरट्याने प्रवेश केला. त्यांना चाकूचा धाक दाखवत हात बांधले. व चोरीचा प्रयत्न केला. मात्र, चित्राबाईनी प्रतिकार केल्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचा गळा चिरला असावा. यानंतर दिनेश डकरे घरी परतले असावे त्यामुळे घाबरून काही ऐवज न नेता गॅलरीतून त्याने पलायन केले असल्याची शक्यता एका पोलिस अधिकाऱ्याने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या वादातून गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोगस सभासदांची नोंदणी करून निवडणूक लढवित कार्यकारिणी निवडल्याप्रकरणी वसंत शिक्षण संस्थेच्या सभासदांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या सचिवांनी याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती.

हडको मयुरनगर भागात वसंत शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेची निवडणूक २६ ऑगस्ट २०१५ ते १० सप्टेंबर २०१५ या कालावधित झाली होती. मात्र, ही निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेचे सचिव शेख हक्कानी मोहम्मद हुसेन (वय ६५ रा. शहानगर, बीड बायपास) यांनी कोर्टात धाव घेऊन केला होता. यामध्ये संस्थेच्या संचालकांनी निवडणुकीमध्ये बहूमत प्राप्त करण्यासाठी ३४ वैध सभासदांच्या यादीतून ११ सभासदांची नावे कमी केली होती. तसेच १७ बोगस सभासदांची नावे त्यामध्ये समाविष्ट केली. निवडणूक अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत सत्य परिस्थिती लपवून ठेवत बोगस यादीद्वारे ही निवडणूक जिंकण्यात आल्याचा आरोप शेख हक्कानी यांनी केला आहे. कोर्टाने या प्रकरणी सिडको पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार संस्थेचे वसंत नाना रासने, तुळसाबाई केशव तुपे हरीराम लक्ष्मण घोगरे व मुरलीधर लक्ष्मण घोगरे यांच्यासह १४ जणांविरुद्ध कट रचणे, बनावट दस्तावेज तयार करणे, फसवणूक करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध कत्तलखान्यांवर छापे

$
0
0

बारा जनावरे जप्त, पाच जणांना अटक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिल्लेखाना येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर लागोपाठ दोन दिवस कत्तल विरोधी पथकाने कारवाई केली. मंगळवारी व बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पाच जणांना अटक करण्यात आली असून १२ जनावरे जप्त करण्यात आली आहे.

‌सिल्लेखान्यातून वाहणाऱ्या ड्रेनेजलाईनमध्ये रक्तमिश्रीत पाणी वाहत असल्याची माहिती जागरूक नागरिकाने मनपाच्या पथकाला कळविले होते. या माहितीआधारे मनपातील कत्तल विरोधी पथक प्रमुख डॉ. बी. एस नाईकवाडे यांनी पोलिसांना या भागात अवैध कत्तलखाने सुरू असल्याची माहिती देत मदतीसाठी पोलिस पथकाची मागणी केली होती. या मागणीवरून या पथकासोबत स्ट्रायकींग फोर्स, क्रांतिचौक पोलिसांचे पथक व वाहतूक शाखेचा बंदोबस्त देण्यात आला. पहाटे साडेचार वाजता सिल्लेखान्यात या पथकाने छापा मारला. पाच ठिकाणी मारलेल्या छाप्यामध्ये ११ बैल व एक वासरू कत्तलीसाठी बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. ही जनावरे जप्त करण्यात आली. या प्रकरणी मुत्तालीब वहाब कुरेशी, इमरान अजीज कुरेशी, परवेज कुरेशी व फय्याज खलील कुरेशी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी पहाटे झालेल्या कारवाईमध्ये शेख बाबा शेख रहेमान कुरेशी याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्या ताब्यातून कत्तलीसाठी बांधलेली चार जनावरे जप्त करण्यात आली.

भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक

औरंगाबाद : गुप्तचर यंत्रणेच्या सुचनेनुसार जिल्ह्यात दहशतवादी शांतता भंग करून देश‌विघातक कृत्य करण्याची शक्यता वर्तविण्यात आली. या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण जिल्हा अंतर्गत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदिर, गुरूद्वारा, चर्च, मशीद, धर्मशाळा, हॉटेल, लॉजेस, घरमालक, वस्तीगृह आदींच्या मालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या भाडेकरूंची, प्रवाशांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुंदरवाडीप्रकरणी चार्जशीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुंदरवाडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींविरोधात चिकलठाणा पोलिसांनी कोर्टात चार्जशीट दाखल केले आहे. जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात यावा, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. सुंदरवाडी शिवारात २७ ऑगस्ट रोजी (गुरुवारी) रात्री सव्वाआठच्या सुमारास सामूहिक बलात्काराची घटना घडली होती.

सिडको प‌रिसरातील एक तरुणी तिच्या मित्रासोबत दुचाकीवर सुंदरवाडी शिवारात गेली होती. केंब्रिज स्कूलच्या मागे निर्जन ठिकाणी दोघे गप्पा मारत असताना दुचाकीवर चार अनोळखी तरुण तिथे आले. दोघांनी तिच्या मित्राला मारहाण केली. अन्य दोघांनी तरुणीला चाकुचा धाक दाखवत जवळच असलेल्या बाजरीच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तिच्या मित्राने कशीबशी सुटका करून घेत जालना रोडकडे धाव घेतली. तेथून जात असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अडवून त्याने हा प्रकार सांगितला.

पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपअधीक्षक एस. के. लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी कारवाई करत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यात शेख तय्यब शेख शेख नईम (रा. सुंदरवाडी) तालीबअली सय्यद अली शाह (रा. हिनानगर), शेख जमील शेख हुसेन बागवान व शेख अश्पाक शेख हुसेन (रा, हिनानगर) या चौघांना पकडण्यात आलेले असून ते सध्या हर्सूल कारागृहात आहेत. याप्रकरणी कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. जदलगती न्यायालयात खटला चालविण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती चिकलठाणा पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदनामीप्रकरणी जामीन फेटाळला

$
0
0

औरंगाबाद : शहरातील २० वर्षीय तरुणीचे व स्वत:चे छायचित्र मिक्सिंग करून फेसबुकवर अपलोड करून लग्न झाल्याचे भासविणाऱ्या व बदनामी करणाऱ्या आरोपी प्रकाश दादाराव सूर्यंवशी याचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी फेटाळला.

शहरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारी २० वर्षीय तरुणी पदमपुरा येथील संत तुकाराम वसतिगृहात राहते. सुट्टीमध्ये ती मुंबईतील मालाड येथे बहिणीला भेटण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी असलेल्या बहिणीचा मावसभाऊ व आरोपी प्रकाश दादाराव सूर्यवंशी याच्यासोबत जुलै २०१२ मध्ये ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने संत तुकारम वसतिगृहात कुरियर पाठविले. त्या कुरियर बॉक्समध्ये आरोपी प्रकाश व तरुणीचे मिक्सिंग केलेले छायाचित्र, सिमकार्ड आणि ग्रिर्टीग कार्ड, एसबीआय बँकेचा कोरा धनादेश होते. वॉर्डन अनिता राठोड यांनी ते कुरियर स्वीकारले. याबाबत वॉर्डनने तरुणीच्या आई-वडिलांना कळवली. त्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपी प्रकाशची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. उलट त्या तरुणाने स्वत:सह तरुणीचे मिक्सिंग केलेले छायाचित्र फेसबुकच्या पेजवर अपलोड करून लग्न झाल्याचे भासवून वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून तरुणीने २४ नोव्हेंबर २०१४ रोजी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली व फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कोर्टात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीने पुन्हा १० मे २०१५ रोजी बदनामी करणारा मजकूर फेसबुकवर अपलोड केल्याचे समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आत्महत्या प्रकरणातला आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहाडसिंगपुरा भूमाफियांच्या गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या शिवाजी कोरडे आत्महत्या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी बुधवारी एकाला अटक केली. संजय फतेलष्कर असे आरोपीचे नाव असून, त्याला कोर्टाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

रेणुकामातानगर, ताजमहल कॉलनी परिसरात रहिवाशांची झालेल्या फसवणूक प्रकरणी भूमाफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी नगरसेवक राजू तनवाणी यांच्याविरुद्ध असलेल्या गुन्ह्यामध्ये शिवाजी कोरडे हा प्रमुख साक्षीदार होता. त्याने विद्यापीठ परिसरात औरंगाबाद लेणीजवळच्या जंगलात ६ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्याचा भाऊ अमरच्या तक्रारीवरून राजू तनवाणी, राज आहुजा, ख्वाजा आमीन, माधव सोनवणे व त्याला धमकी देणाऱ्या मोबाइलधारकाविरुद्ध आत्महत्येसप्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात मोबाइलवर धमकी देणारा बेगमपुरा येथील संजय फतेलष्कर असल्याचे निष्पन्न झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभाजनामुळे तहसीलचा भार हलका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तहसील कार्यालयाचा वाढलेला कारभार, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त ताण, लोकांची कामे होण्यास लागणारा विलंब या सर्व बाबींचा विचार करून येत्या शनिवारी तहसीलचे विभाजन करण्याची शक्यता आहे. विभाजनानंतर शहर व ग्रामीण अशी दोन कार्यालये करण्यात येणार असल्याने तहसीलचा भार हलका होणार आहे.

औरंगाबाद तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराची लोकसंख्या सुमारे साडेबारा लाख तर ग्रामीण भागाची लोकसंख्या साडेचार लाख आहे. गेल्या काही वर्षांपासून सातारा, देवळाई, पंढरपूर, कुंभेफळ, करमाड, लाडगाव, सटाणा, शेकटा, मंगरूळ, शेंद्रा जहांगीर, चौका, लाडसावंगी आदी गावांमध्ये शहरीकरण वाढत असल्याने महसुली गकामकाजावरही ताण पडला आहे.तालुक्या एकूण ११५ ग्रामपंचायती, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे ९ गट असून महापालिका हद्दीतील वार्डांची संख्या ११३ आहे. तहसील कार्यालयात रोज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे औरंगाबाद तालुक्याचे विभाजन करावे, ही मागणी अनेक वर्षांपासून होती. तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या, शहराचा होत असलेला विस्तार लक्षात घेता सध्या असलेल्या ५४ तलाठी सज्जांच्या माध्यमातून

कामावर नियंत्रण ठेवणे अवघड जात असून, नवीन तहसीलमुळे कामाचा हा भार हलका होणार आहे.तहसीलदारांना दंडाधिकाऱ्यांच्या कामासह नैसर्गिक आपत्ती, पुरवठाविषयक कामे, पंचनामे, ओळख परेड, न्यायालयात शासनाची बाजू मांडणे, प्रमाणपत्रे देणे, शहरात येणाऱ्या मंत्री व महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याची तयारी करणे आदी कामे करावी लागतात.

तहसील कार्यालयातून वर्षभरात साडेपाच लाख प्रमाणपत्रे दिली जातात, यात ग्रामीणच्या नागरिकांचे पावणेचार लाख अर्ज असतात. तहसीलचे विभाजनानंतर कामाचा ताण कमी होईल.

शहराचा स्वतंत्र कारभार

शहरी भागासाठी स्वतंत्र कारभार राहणार आहे. सध्या असलेल्या तहसीलमधून ग्रामीण भागाचा कारभार होणार असून, सध्याच्या तहसील अंतर्गत ८० गावांचा कारभार सुरू राहणार आहे.

प्रादेशिक मत्स्य कार्यालयात नवीन तहसीलची उभारणी साठी रंगरंगोटी व डागडुजीचे काम सुरू आहे. नवीन तहसीलसाठी संपूर्ण तयारी केली असली तरी, शासनाकडून अद्यापही आदेश प्राप्त झालेला नाही. आदेश प्राप्त होताच विभाजनाबाबत सांगता येईल.

- रमेश मुंडलोड, तहसीलदार, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांचे पाच ट्रक कागजीपुऱ्यात पकडले

$
0
0

खुलताबादः कागजीपुरा येथे जनावरे घेऊन जाणारे पाच ट्रक नागरिकांनी पाठलाग करून पकडल्यामुळे खुलताबाद व कागजीपुरा येथे वातावरण तंग झाले होते. शीघ्र कृती दल व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

खुलताबाद येथील शिवसैनिकांना पाच ट्रकमधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पाठलाग करून हे ट्रक कागजीपुरा येथे बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास पकडले. त्यावरून कागजीपुरा येथे दोन जमाव समोरासमोर आले होते. पोलिसांनी ही माहिती मिळल्यानंतर हे ट्रक बंदोबस्तात खुलताबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आहे. येथेही दोन्ही बाजुने मोठा जमाव जमा झाला. त्यामुळे शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. दोन्ही बाजुने घोषणा देणाऱ्या जमावाला पोलिसांनी हस्तक्षेप करून हुसकवून लावले. पोलिस निरीक्षक डॉ. कांचनकुमारे चाटे, खुलताबादचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे यांनी हस्तक्षेप करून जमावाची समजूत घातली परंतु, दोन्ही बाजुंचा जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. वातावरण तंग झाल्यामुळे पोलिसांनी ही जनावरे वेरूळ येथील गोशाळेत पाठवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरांसाठी उद्या ‘सेल्फी’चा प्रयोग

$
0
0

'मटा' कार्निव्हलची आजची धूम

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्याचा ट्रेंड असलेल्या 'सेल्फी'त आपल्या सख्यांना सामावून घेतले तर, बनणाऱ्या 'ग्रुफी'ची धमाल काही औरच. म्हणूनच आपल्या सेल्फीतून मैत्रीची प्रतिमा उमटवण्यास मराठी नाट्यसृष्टीतील पाच अभिनेत्री सज्ज आहेत. निमित्त आहे महाराष्ट्र टाइम्सच्या औरंगाबाद आवृत्तीच्या चौथ्या वर्धापन दिनाचे.

'सेल्फी'च्या माध्यमातून स्वतःचा शोध या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित 'सेल्फी' नाटकाचा प्रयोग 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (११ डिसेंबर) संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता औरंगाबादकर रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

अभिनेत्री शिल्पा नवलकर यांच्या लेखणीतून या नाटकाची संहिता आकारास आली आहे. या नाटकाचे दिग्दर्शन व निर्मिती अजित भुरे यांची असून, मराठी रंगभूमीवरील दिग्गज अभिनेत्री पहिल्यांदाच या अनोख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या नाटकात एकत्र आल्या आहेत.

चाळीशीतल्या सख्यांचे विश्व या नाटकातून सादर करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असलेल्या समवयस्क महिलांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या नाटकात दाखविण्यात आला आहे. संसार, आयुष्य याबद्दलच्या विचारांचे अनेक पैलूंची मजा हे नाटक देईल व नक्कीच गांभीर्याने विचार करायला भाग पाडेल यात शंका नाही.

या कलावंताचा असेल सहभाग

'सेल्फी' नाटकात अभिनेत्री सुकन्या मोने-कुलकर्णी, ऋजुता देशमुख, शिल्पा नवलकर, पूर्वा गोखले आणि सोनाली पंडित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांना नाटकाचा मोफत आनंद घेता येणार आहे. या नाटकाच्या जाहिरातीचे कूपन 'म.टा.' कार्यालयात जमा करून प्रवेशिका दिल्या जात आहेत. प्रवेशिकांसाठी 'मटा'च्या कार्यालय संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांची जिल्ह्यात आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गळफास घेऊन करमाड पोलिस स्टेशन हद्दीतील दोन शेतकऱ्यांने आत्महत्या केली. एकाने कर्जबाजारीपणामुळे जीवन संपविल्याचे समोर येत आहे तर, दुसऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे करमाड पोलिसांनी सांगितले.

करमाड पोलिस ठाणा हद्दीतील टाकळीमाळी येथे राहणारे बंडू साहेबराव बुरकुल (वय ३५) या शेतकऱ्याची टाकळीमाळ शिवारात ५७ गुंठे शेती आहे. त्यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून ५० हजार रुपये व फायनान्स कंपनीकडून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले आहेत. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पडत असलेल्या दुष्काळामुळे ते कर्जफेड करू शकले नाहीत. नेहमी मुलासोबत जाणारे बुरकुल बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास शेतात दूध काढण्यासाठी एकटेच गेले. त्यांची दोन्ही लहान मुले त्यांच्या पाठोपाठ शेतात गेली, मात्र तोपर्यंत बुरकुल यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला होता. हे पाहताच मुलांनी नातेवाईकांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. बंडू बुरकुल यांना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी अमोल दाणी करत आहेत.

सोमिनाथ अण्णाजी पठाडे (वय ३०, रा. टीव्ही सेंटर हडको) यांनी मंगळवारी (८ डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास वरझडी शिवारातील आपल्या शेतात गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांनी पठाडे यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली, हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस कर्मचारी के.बी. चाबुकस्वार करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर प्रकरणाची स्वतंत्र चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नारेगावातील गट क्रमांक २६मधील टीडीआर प्रकरणाची महापालिकेचे प्रशासन स्वतंत्रपणे चौकशी करणार आहे. जमीन मालकाने १२ मीटर जागेचा टीडीआर (विकास हक्क हस्तांतर) मागितला असताना नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी २४ मीटर रस्त्याचा टीडीआर दिला. हे प्रकरण 'मटा'ने उघड केल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागात खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी मागवली आहे.

'मटा'ने बुधवारी नारेगाव येथील टीडीआर प्रकरण उघड केले. जमीन मालकाने १२ मीटर रस्त्याचा टीडीआर मागितला असताना नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास २४ मीटर रस्त्याचा टीडीआर दिला. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर नगररचना विभागात खळबळ उडाली. काही प्रमुख अधिकारी 'नॉट रिचेबल' झाले.

याप्रकरणी 'मटा'ने अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना विचारले असता, आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशाने चौकशीचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या तीन प्रकरणांबरोबर याचीही चौकशी करणार का, असे विचारले असता ते म्हणाले, 'हे प्रकरण अधिक गंभीर आहे, असे वाटते. त्यामुळे याची स्वतंत्र चौकशी करावी लागेल. आयुक्तांनी तसे आदेश दिले तर, स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल.'

दरम्यान, याप्रकरणी नगरसेवक नितीन चित्ते यांनी आयुक्त केंद्रेकर यांना निवेदन दिले असून, नारेगाव प्रकरणाची फाइल तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी करावी. मिळकतधारक, दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी दाखल करावी. टीडीआर लोड करण्याची कारवाई थांबवून टीडीआर प्रमाणपत्र रद्द करावी, अशी मागणी केली आहे. १४ डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेपूर्वी ही कारवाई न झाल्यास सभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ला टर्मिनेशनची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने करारातील अटी-शर्तींप्रमाणे समांतर जलवाहिनीचे काम केले नाही. त्यामुळे या कंपनीला टर्मिनेशनची नोटीस द्या, असे आदेश महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना बुधवारी (९ डिसेंबर) दिले.

महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केंद्रेकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे अधिकारी यांच्या बैठका घेतल्या. समांतर जलवाहिनीची योजना नेमकी कशी आहे, योजनेंतर्गत कोणकोणती कामे आहेत, ती कशी करणे गरजेचे होते, याची माहिती करून घेतली. आज त्यांच्या उपस्थितीत यासंदर्भात पाचवी बैठक झाली. त्यावेळी बैठकीत केंद्रेकरांनी कंपनीने आजपर्यंत केलेल्या कामाची चिरफाडच केली. बैठकीला स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, गटनेते भगवान घडमोडे, राजू वैद्य, महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक, कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील चर्चा व केंद्रेकरांनी दिलेले आदेश यांची माहिती उपमहापौर प्रमोद राठोड यांनी पत्रकारांना दिली. आयुक्तांनी बैठकीत कंपनीचे अधिकारी व 'पीएमसी'चे प्रतिनिधी यांना विविध प्रश्न विचारले. केंद्रेकरांच्या प्रश्नांपुढे कंपनीचे अधिकारी व पीएमसीचे प्रतिनिधी निरुत्तर झाले. करारानुसार आजपर्यंत जी कामे करणे अपेक्षित होते, ती आर्थिक नियोजनाअभावी कंपनीला करता आली नाहीत, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. अपेक्षित कामे झाली नाहीत ही आमची चूक झाली, असेही ते म्हणाले. चूक एखाद्या व्यक्तीबद्दल असती तर ते ठिक होते, पण तुम्ही या शहरातील १५ लाख लोकांसाठी काम करता,पुन्हा चूक झाली, असे सांगता, हे योग्य नाही, अशा भाषेत केंद्रेकरांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बजावले.

कंपनीने आतापर्यंत समांतर जलवाहिनीचे काम करारानुसार केले नाही. पीएमसीनेही कंपनीकडून काम करून घेतले नाही. त्यामुळे कंपनीला व पीएमसीला टर्मिनेशनची नोटीस द्या, असे आदेश केंद्रेकरांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना दिले. नोटीससोबत आज बुधवारी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त देखील जोडा आणि कंपनीला खुलासा करण्यास सांगा, असे केंद्रेकरांनी पानझडे यांना सांगितले.

समांतर जलवाहिनीचे प्रकरण भ्रष्टाचारयुक्त आहे. अशी योजना नागरिकांच्या माथी मारण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची केंद्रेकर योग्य प्रकारे चौकशी करतील, अशी अपेक्षा होती. टर्मिनेशनची नोटीस ही कारणे दाखवा नोटीस असली तरी, चूक दुरुस्त करून पुन्हा काम त्या कंपनीमार्फत चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. असे न करता महापालिकेने कंपनीबरोबर केलेला करारच रद्द केला पाहिजे. समांतर जलवाहिनीच्या योजनेत झालेल्या गैरप्रकारांची जबाबदारी निश्चित करून त्या-त्या व्यक्तींची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

- प्रा. विजय दिवाण, समांतर पाणीपुरवठा योजना विरोधी कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीडितेची ९५ हजारांत विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मिसारवाडीतील पीडित विवाहितेची ९५ हजारांत अग्रवाल कुटुंबाला विक्री करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. पीडितेच्या मानलेल्या मावशीने व मावस मामाने हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. या प्रकरणी चौघांना बुधवारी मानवी तस्करी कायद्याच्या कलमानुसार अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

१९ वर्षांच्या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून अमानुष छळ सुरू होता. ३० नोव्हेंबर रोजी अग्रवाल कुटुंबीयांच्या तावडीतून तिची नागरिकांनी सुटका केली. या प्रकरणी पती संजय, सासू आशा, दीर शरद व सागर तसेच नणंद दीपाला अटक करण्यात आली. ४ महिन्यांपूर्वी या विवाहितेचा घरामध्येच संजय याच्यासोबत विवाह लावण्यात आला होता. तिची म्हाडा कॉलनी येथे राहणारी मानलेली मावशी सुवर्णा वंजारे, मावस मामा विठ्ठल पवार यांनी या कामी पुढाकार घेतला. सूर्यनारायण (रा. आंबेडकरनगर) याच्या ओळखीने हा विवाह जमवण्यात आला होता. या विवाहितेची सुटका करताना अग्रवाल कुटुंबीयांनी तिला विकत घेतल्याचा कांगावा केला होता. पोलिस चौकशीत देखील त्यांनी १ लाख २० हजारात तिला खरेदी केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. दोन दिवसांपूर्वी संजय अग्रवालचा लॅपटॉप तसेच काही बाँडपेपर व करारनामा अशी कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी विशेष पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी बुधवारी सुवर्णा वंजारे, विठ्ठल पवार आदींची ६ तास सखोल चौकशी केली. यामध्ये मुलीच्या आईला अंधारात ठेवून ९५ हजारांत तिची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुवर्णा वंजारे, विठ्ठल पवार, दलाल सूर्यनारायण यांच्यासहीत एका महिलेला अटक केली आहे.

आरोपींची 'हर्सूल'मध्ये रवानगी

मिसारवाडी प्रकरणातील पीडितेल्या छळणाऱ्या पाचजणांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी दिले. या आदेशामुळे सर्व पाच आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पती संजय वीरेंद्रकुमार अग्रवाल, सासू आशा वीरेंद्रकुमार अग्रवाल, दीर सागर वीरेंद्रकुमार अग्रवाल व अतुल उर्फ शरद वीरेंद्रकुमार अग्रवाल, नणंद दीपा वीरेंद्रकुमार अग्रवाल यांचा आरोपीत समावेश आहे. आरोपींना कोर्टाने तीनदा पोलिस कोठडी ठोठावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

मामाला मिळाले चाळीस हजार

दलाल सूर्यनारायणने हा विवाह जमवला होता. ९५ हजारांची रक्कम दिल्यानंतर यापैकी ४० हजार रुपये मामा विठ्ठल पवार याला देण्यात आले होते. नेमका हा व्यवहार कसा ठरला, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सदरील पीडित महिलेची अग्रवाल कुटुंबाला ९५ हजारांत विक्री करण्यात आल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. या प्रकरणी तिच्या मानलेल्या मावशीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी शाळेतून दप्तर गायब

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

चिमुकल्यांना शाळेत पाठविल्यानंतर पालकांना चिंता असते ती पाठीवरच्या ओझ्याची. दप्तराच्या ओझ्यात चिमुकले त्रस्त झालेले असतात. दप्तर नसतानाही चांगले शिक्षण घेता येऊ शकते. रचनावादी शिक्षणपद्धतीचा पहिला प्रयोग औरंगाबाद जिल्ह्यातील लासूरगावच्या जिल्हा परिषद शाळेत यशस्वी झाला आहे. आज त्या शाळेतील पहिलीचे ३७ विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याविना आनंददायी शिक्षण घेत आहेत.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने कराड आणि सातारा जिल्ह्यात रचनावादी शिक्षण पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबविला. सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटमध्ये तर हा प्रयोग कमालाची यशस्वी झाला. त्यानंतर राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यात औरंगाबादचा समावेश आहे. या अनुषंगाने लासूरगाव (ता. वैजापूर) जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाजीराव काळोखे आणि त्यांच्या पाच शिक्षकांनी तीन नोव्हेंबर रोजी कुमठे बीटमधील सोनगाव जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेथील शिक्षणपद्धती पाहिल्यानंतर आपल्या शाळेत याच पद्धतीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू झाली. पहिल्या टप्प्यात लासूरगावमधील शाळेत पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. पहिलीच्या वर्गात ३७ विद्यार्थी आहेत. शिक्षक सुरेश राऊत आणि अन्य सहकाऱ्यांच्या पुढाकारने वर्गात शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात आली. ज्ञान रचना अभ्यासक्रमावर भर दिला गेला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे करताना मुख्याध्यापक काळोखे यांनी पालकमेळावा घेऊन ही नवीन पद्धत समजावून सांगितली. विद्यार्थ्यांचे दप्तर घरी न नेता शाळेतच ठेवण्याचा कन्सेप्ट पालकांना रूजला. दप्तराची ने - आण बंद झाली. काही दिवसांतच वर्गात वेगळे वातावरण दिसून आले. सगळे विद्यार्थी आनंदी झाले. रचनावादी शिक्षणपद्धतीचा फायदा जिल्हा परिषद शाळांमधून दिसू लागला आहे.

उपक्रमशील मुख्याध्यापक

मुख्याध्यापक बाजीराव काळोखे तीन वर्षांपूर्वी या शाळेत बदलून आले. २०१२ पासून त्यांनी शाळेत बायोमेट्रिक पद्धती सुरू केली. स्वतः उपक्रमशील असलेले काळोखे नेहमी नवनवीन उपक्रम राबवित असतात. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

शाळांच्या भेटी सुरू

लासूरगावमधील शाळेत पहिलीचा वर्ग दप्तरफ्री झाल्याची माहिती कळताच तालुक्यातून जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक भेटी देऊ लागले आहेत. आतापर्यंत दहा शाळांनी भेट देऊन आपापल्या शाळेत अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड शहराजवळ एमआयडीसी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

शहराजवळील रेल नावडी शिवारात एमआयडीसीसाठी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून १६८.९८ हेक्टर खासगी जमिनीच्या भूसंपादनाची कार्यवाही करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

रेल नावडी शिवारातील १२३.९३ हेक्टर सरकारी गायरान व खाजगी १६८.९८ हेक्टर जमिनीचा (एकूण ७३२ एकर) एमआयडीसीकडून पाहणी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला उच्चधिकार समितीकडून मान्यता देण्यात आली. याबाबत २ डिसेंबर रोजी या प्रस्तावास मंजुरी दिल्याची सूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी कन्नड यांना भूसंपादनासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. रेल नावडी शिवारातील गट क्रमांक ४९ ते ७० सह ११६, ११७ व १४४ यासह शासकीय जमीन (गायरान जमीन) गट क्रमांक ५१ व १४५ यांचाही समावेश आहे. या अधिसूचनेमुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. नियोजित औद्योगिक वसाहत कन्नड शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असून राष्ट्रीय महामार्ग वसाहतीजवळून जातो. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख राम पवार, डॉ. सदाशिव पाटील. डॉ. विनोद पाटे यांनी स्वागत केले आहे.

मार्चअखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने करून ही जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

- राजीव नंदकर, उपविभागीय अधिकारी

या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होईल. यामुळे कन्नड तालुक्याच्या विकास पर्वाला एक प्रकारे सुरवातच होणार आहे.

- हर्षवर्धन जाधव, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिहास परिषदेचे कन्नड येथे अधिवेशन

$
0
0

कन्नड

येथील विनायकराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठवाडा इतिहास परिषदेचे दोन दिवसांचे ३५ वे अधिवेशन शुक्रवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर पाटील हे राहणार आहेत.

परिषदेचे बीजभाषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख डॉ. उमेश बागडे करणार आहे. जवाहर नेहरू विद्यापीठाचे डॉ. उमेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास संशोधन पद्धतीवर परिसंवादात मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. किशोर गायकवाड, डॉ. नीरज साळुंखे सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक काळातील संशोधनावरील शोधनिबंध वाचले जाणार आहेत. परिषदेचा समारोप शनिवारी अमरावती येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. गं. का. माने यांच्या उपस्थितीत होणार आहे. परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य मेजर हिम्मतराव नरके, संयोजक डॉ. शरद गावंडे, उपप्राचार्य डॉ. रामचन्द्र काळुंखे, प्रसिद्धीप्रमुख प्रा. सुधीर पवार, प्रा. मकरंद जोशी, प्रा.केशव मोरे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकट्यात दरोडा; दोन गंभीर जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

दरोडेखोरांनी शेकटा येथील शेतवस्तीवर हल्ला करत दोघांना गंभीर जखमी करून रोख २१ हजार रुपये पळवून नेले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या भागात तेरा दिवसांत दरोड्याची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील शेकटा रोडवरील शिंदे वस्तीवर भाऊसाहेब शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. ते बुधवारी रात्री आपल्या कुटुंबासोबत झोपले असता पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत घरात प्रवेश केला. भाऊसाहेब शिंदे व त्यांचा मुलगा संजय शिंदे याने दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी कुऱ्हाडीने हल्ला करत दोघांना जखमी केले. घरातील लोखंडी पेटी घेवून चोरटे पसार झाले. घरापासून काही अंतरावर गेल्यावर चोरट्यांनी लोखंडी पेटीतील २१ हजार रुपये काढून घेऊन पेटी तेथेच टाकून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना बोलावून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप धागेदोरे मिळाले नाहीत. चोरट्यांनी २७ नोव्हेंबर रोजी ढाकेफळ येथील संजय शिसोदे यांच्या घरात शस्राचा धाक दाखवून ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा अद्याप तपास लागला नसताना १३ दिवसांत दरोड्याची दुसरी घटना घडली आहे. यामुळे ढाकेफळ, लोहगाव, ७४ जळगाव, शेकटा व बिडकीन परिसरातील गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images