Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पोलिसांची भीती दाखवत तरुणीकडून खंडणी उकळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रियकराला अश्लिल फोटो पाठवणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. तिच्या प्रियकराला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक झाली असून पोलिस तिची चौकशी करणार असल्याची भिती तिला दाखविण्यात आली. या गुन्ह्यातून वाचण्यासाठी तिच्याकडून ४० हजार रुपयांची खंडणी तिघांनी उकळली. या तरुणीने हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूरपार्क परिसरातील २४ वर्षांच्या तरुणीसोबत हा प्रकार घडला. ती एका कंपनीत कामाला असून जालना रोडवरील एका महाविद्यालयात तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. या ‌ठिकाणी ‌अजित जाधव (रा. एन २, कामगार चौक) याच्यासोबत तिचा परिचय झाला होता. २०१४ साली अजितने फेसबुकवर तिच्याशी संपर्क साधला. यानंतर फेसबुक व वॉटसअपच्या माध्यमातून त्यांचा संपर्क वाढला. अजितने तिला आपण पुण्याला मॉलमध्ये कामाला असल्याची थाप मारली होती. आपली परिस्थिती खराब असल्याचे सांगत त्याने तिच्याकडून यापूर्वी १६ हजार रुपये उकळले आहेत. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने अजितने तिला तिचे अश्लिल फोटो वॉटसअपवर टाकण्याची गळ घातली होती. या तरुणीने ही मागणीही पूर्ण केली. १० डिसेंबर रोजी तिच्या मोबाइलवर एका अनोळखी मोबाइलधारकाचा कॉल आला होता. त्याने अजित जाधव हा खुनाच्या केसमध्ये अडकला असून ज्या ज्या लोकांनी त्याला मेसेज, फोन केले आहे. त्यांची पोलिस चौकशी करणार आहेत. यामध्ये तिचा क्रमांक प्रथम असल्याची थाप मारली. तसेच या प्रकरणातून वाचवायचे असल्यास ४० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकाराने ही तरुणी गोंधळून गेली. समोरील तरुणाने दिलेल्या गणेश उत्तरेश्वर पाठक याच्या जालना रोडवरील एसबीआय बँकेच्या शाखेमधील बँक खात्यामध्ये तिने ही रक्कम जमा केली. दरम्यान, दोन-तीन दिवस उलटल्यानंतर आपली अजित जाधव व त्याच्या मित्रांनी फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आले. मंगळवारी तिने हर्सूल पोलिस ठाण्यात दुपारी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी अजित जाधव, वकील वाघ व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेने म्हणणे सादर करावे

$
0
0

रस्ता दुरवस्था याचिकेवर हायकोर्टाचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात दाखल जनहित याचिकेत महापालिकेने आरोग्य प्रश्नाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याचे मान्य केले. पोलिस आयुक्तांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सविस्तर उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यावर राज्य शासन, महापालिका, बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाने म्हणणे सादर करावे, असे आदेश न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती ए. आय. एस. चिमा यांनी दिले आहेत.

शहरातील रस्त्यासंदर्भात वकील रुपेश जैस्वाल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत गेल्या सुनावणीत शहराच्या आरोग्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन खंडपीठाने प्रशासनाला धारेवर धरले होते. शहरात सर्वसामान्यांसह, उद्योजक, व्यापारी, अधिकारी, वकील सारेच साथीच्या रोगाने फणफणले आहेत. डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू या आजारांनी डोके वर काढले. त्यावर काय उपाययोजना करणार अशी विचारणा खंडपीठाने केली होती. दरम्यान ही याचिका मंगळवारी सुनावणीस निघाली, त्यावेळी महापालिकेतर्फे आरोग्याच्या प्रश्नाच्या उपाययोजना करण्याचे शपथपत्र दाखल केले.

महापालिकेच्या उपाययोजना

पालिकेतर्फे आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्याने उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रत्येक वॉर्डनिहाय प्रत्येक आठवड्याला किटकनाशकांची फवारणी केली जाईल. या शिवाय फॉगिंग मशिनद्वारे फवारणी केली जाणार आहे. पालिकेने किटनाशक फवारणीसाठी शंभर स्प्रेइंग पंप खरेदी केले आहेत. डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी जलसाठ्यांमध्ये, पाण्याचे हौद, पाण्याच्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे लार्वीसीऊल ऑइल पाणी साठ्यात सोडणे. किटकनाशकांची फवारणी करणे, फॉगिंग मशिनद्वारे फावारणी करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. फवारणीच्या कंत्राटांना तूर्तास मुदतवाढ दिली असून, नियमित टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. आरोग्याशी संबंधित कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकाल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी शपथपत्राद्वारे स्पष्ट केले. शहरामध्ये प्रत्येक वर्षी होणाऱ्या डेंगीच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने महापालिकेने गेल्या तीन वर्षातील आकडेवारी खंडपीठात सादर केली. गेल्या २ वर्षांत पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पालिकेने कोर्टात सांगितले.

पोलिसांची कारवाई

शहराच्या वाहतूक सुधारण्याच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी विविध २१ प्रकारच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. शहरात नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून २ कोटी ३० लाख ६० हजार रुपये वसूल केले आहेत. या शिवाय फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्याच्या विरोधात कलम २८३ नुसार ४३२ जणांवर कारवाई केली. त्याचप्रमाणे शहरात ३० ठिकाणी उच्च दर्जाचे कॅमेरे बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून, ते लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस आयुक्तांच्या उपाययोजना

चिकलठाणा ते वाळूज औद्योगिक वसाहत या २८ किमी रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक.

शहरात अनेक ठिकाणी सिग्नलची गरज. जे सिग्नल आहेत, त्यात बहुतांश नादुरुस्त.

बीड बायपास रस्त्यावर झाल्टा फाटा ते महानुभाव चौक हा रस्ता तांत्रिकदृष्ट्या बायपास असला तरीही तो शहरात, त्यामुळे या रस्त्याला सर्व्हिस रोडची आवश्यकता.

महानुभाव चौक ते पैठण रोडचे रुंदीकरण व नगरनाका ते दौलताबाद रोड, नगरनाका ते वाळूज रोड या रस्त्यात दुभाजक व स्ट्रिटलाइटची व्यवस्था केली पाहिजे.

जालना रस्त्याला सिल्लेखाना ते एमजीएम या रखडलेल्या पर्यायी रस्त्याची आवश्यकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रीची रक्कम वाटून घेतली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अल्पवयीन पीडित मुलीची ९५ हजारात विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा जणांनी ही रक्कम अग्रवाल कुटुंबाकडून घेतल्यानंतर लगेचच टोळीतील समावेशानुसार वाटप केले. यामध्ये मामाला ४० तर मुख्य दलाल मानधनेने १५ हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.

परभणी येथील साडेतेरा वर्षाच्या मुलीची विवाहाच्या नावाखाली विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मिसारवाडी येथे उघडकीस आला आहे. तिच्या मावस मामाने तिला या टोळीच्या स्वाधीन केले होते. ९५ हजारात तिची अग्रवाल कुटुंबाला विक्री करण्यात आली होती. ६ जुलै २०१५ रोजी हा व्यवहार झाला होता. या प्रकरणी तरुणीची मानलेली मावशी सुवर्णा उर्फ शकुंतला ‌शिवाजी वंजारे, सुरेश गणेश बावणे, विवाहितेचा मामा विठ्ठल लिंबाजी पवार व दलाल धुराजी सुखदेव सूर्यनारायण, छाया रवी जाधव व आशा रामेश्वर सोनवणे यांना अटक करण्यात आली आहे. हे लग्न जमविणारा उस्मानाबाद येथील रघुनाथ मानधनेला अद्याप अटक होणे बाकी आहे. या टोळीने ९५ हजार रुपये मिळाल्यानंतर त्यापैकी ४० हजार तिचा मामा विठ्ठलने घेतले. १५ हजार रघुनाथ मानधने याने तर ५ हजार धुराजी सूर्यनारायण याला देण्यात आले. या चार महिला आरोपींना प्रत्येकी साडेसात हजार रुपये देण्यात आले. तर ५ हजार रुपये या टोळीने खर्च केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरोपींना न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद : शहराच्या मिसारवाडी भागातील अल्पवयीन मुलीची विक्री झाल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील सहा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी बुधवारी (१६ डिसेंबर) दिले. या प्रकरणातील अल्पवयीन मुलीने सिडको पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीनुसार, सुवर्णा उर्फ शकुंतला भिवाजी वंजारे, विठ्ठल लिंबाजी पवार, धुराजडी सुखदेव सूर्यनारायण, सुरेखा गणेश बावणे, छाया रवी जाधव, आशा रामेश्वर सोनवणे या आरोपींवर गुन्हा दाखल होऊन कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमातून बालिकेचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकतर्फी प्रेमातून १४ वर्षांच्या बालिकेला मेसेज करून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार छावणी येथे घडला, तसेच अन्य एका घटनेत क्रांतीनगर येथे विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी छावणी व क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

छावणी पोलिस ठाणे हद्दीतील पेठेनगर येथे १४ वर्षाची बालिका आईवडिलांसोबत राहते. गेल्या सहा महिन्यांपासून या बालिकेचा आरोपी मिलिंद दोंदे याने एकतर्फी प्रेमातून पाठलाग सुरू केला होता. तसेच तिच्या मोबाइलवर अश्लिल मेसेज पाठवून तिला त्रास देणे सुरू केले. या प्रकाराला कंटाळून तिने घरी हा प्रकार सांगितला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाणे गाठून आरोपी मिलिंद दोंदे विरुद्ध तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

विनयभंगाचा दुसरा प्रकार सोमवारी रात्री क्रांतीनगर भागात घडला. येथील प्रकाश जाधव या तरुणाने २९ वर्षांच्या पीडित महिलेला पाठलाग करीत विनयभंग केला. तसेच एकतर्फी प्रेमातून तिला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बिडकीन परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणातील आरोपीला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी बुधवारी (१६ डिसेंबर) दिले.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला आरोपी इद्रिस अफसर बागवान (१८) हा दुचाकीवर बसवून एका गल्लीमध्ये घेऊन गेला व तिथे तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीवरून आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले आले असता, आरोपी व पीडितेची वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे. तसेच आरोपीने वापरलेली दुचाकी जप्त करणेही बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा परिसरातील मिलिंदनगरमध्ये राहणारे मिलिंद तानाजी जोगदंड( वय ४०) यांनी सोमवारी (१४ डिसेंबर) सांयकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू असल्याचे उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले.

जुगारअड्ड्यावर छापा

हर्सूल परिसरातील फुलेनगर येथील अनिस सिकंदर पटेल याच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी दुपारी हर्सूल पोलिसांनी छापा टाकला. यावेळी झन्नामन्ना खेळणाऱ्या जुगार खेळणाऱ्या ७ जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये राजेशकुमार खन्ना, रोहित अधाने, सुखदेव जामदार, अब्दुल मंजीत, विशाल काळे, गणेश वेताळ व अनिस पटेल यांचा समावेश आहे. आरोपीच्या ताब्यातून रोख ३८ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शेतीची अवजारे पळविली

शेंदूरवादा येथील गट क्रमांक २३१ मध्ये असलेल्या फहाद बिन मुबारक (वय २९) यांच्या शेतामध्ये असलेल्या खोलीतून चौदा हजाराची शेतीची अवजारे पळविण्यात आली. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकाला ७० हजारांचा गंडा

$
0
0

औरंगाबाद : कर्ज देण्याचे आमिष दाखवून फायनांस कंपनीच्या नावाखाली रिक्षाचालकाला ७० हजारांचा गंडा घालण्यात आला. २३ मे २०१५ मध्ये एका वर्तमानपत्रामध्ये आलेल्या कर्जाच्या जाहिरातीनुसार अंकुश लोखंडे या रिक्षाचालकाने या जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधला. समोरील मोबाइलधारकाने एक लाख रुपये कर्ज भेटेल, असे सांगत स्वराज फायनान्सच्या नावाने मेल आयडी देऊन कागदपत्रे पाठविण्यास सांगितले. अंकुशने मेल केल्यावर तरुणाने महाराष्ट्र बँक व पंजाब नॅशनल बँकेच्या दोन बँक खात्याचा क्रमांक पाठविला. वेगवेगळी कारणे सांगून ७० हजार रुपये या खात्यावर मागितले. रक्कम भरल्यावर कर्जास टाळाटाळ करण्यात आली. मे २०१५ ते जुलै २०१५ दरम्यान हा प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याने अंकूशने मंगळवारी छावणी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलधारक रडारवर

$
0
0

२५ हजारावर मोबाइलधारकांचा डमडेटा जमा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. चित्रा डकरे यांच्या खुनाला बुधवारी तब्बल १५ दिवस उलटले तरीही पोलिसांच्या हाती ठोस पुरावा येऊ शकलेला नाही. या १५ दिवसांमध्ये १४२७ जणांची पोलिसांनी चौकशी केली आहे. या परिसरातील मोबाइल टॉवरचा डमडेटा मागविण्यात आला असून २५ हजारावर मोबाइलधारकांची यादी त्यात आहे. यापैकी संशयित मोबाइलधारकांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

विमलज्योती गृहनिर्माण संस्थेतील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये एकट्या असलेल्या डॉ. चित्रा डकरे यांचा २ डिसेंबर २०१५ रोजी भरदिवसा खून करण्यात आला. मारेकऱ्याने त्यांचे हात बांधत गळा चिरून हत्या केली होती. पोलिसांची दहा पथके या प्रकरणी तपासकामी लावण्यात आली आहेत, मात्र पंधरा दिवस उलटले तरी पोलिस तपास अंधारातच चाचपडत आहे.

डॉ. डकरे यांचे नातेवाईक, हॉस्पिटलमधील कर्मचारी, मोलकरणी, त्या भागातील सेल्समन, शेजारी तसेच इतर संशयित आदी १४२७ जणांची चौकशी आतापर्यंत पोलिसांनी केली आहे. शहरात एकूण पोलिसांच्या रेकॉर्डवर १२० हिस्ट्रीशीटर आहेत. यापैकी ५८ गुन्हेगार शहराबाहेर आहेत. उर्वरित हिस्ट्रीशीटरची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी या भागातील मोबाइल टॉवरचा डमडाटा संबधित मोबाइल कंपनीकडून मागविला आहे. २ डिसेंबर व त्याला लागून असलेल्या काही दिवसांचा हा डेटा आहे. सुमारे २५ हजारांवर मोबाइल क्रमांकाची ही यादी आहे. यापैकी काही नंबर शॉर्ट लिस्ट करण्यात आले आहेत.

या संशयित मोबाइलधारकांना बुधवारी चौकशीसाठी गुन्हेशाखेत बोलाविण्यात आले होते. गुन्हेशाखेचे दोन सहायक पोलिस निरीक्षक व सायबरसेलचे अधिकाऱ्यामार्फत या संशयीतांची चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुसाइड नोट श्रुतीचीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या श्रुती कुलकर्णी मृत्यूपूर्वी लिहलेली सुसाइड नोट तिच्याच हस्ताक्षरातील असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी हस्ताक्षर तज्ज्ञांनी गुन्हेशाखेकडे हा अहवाल सोपवला. तो कोर्टातही सादर केल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

हडकोतल्या बजरंग चौकात राहणाऱ्या श्रुतीचा एकतर्फी प्रेमातून स्वप्निल मणियारने छळ सुरू केला होता. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात मणियारविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर, त्याला अटक करण्यात आली. मात्र, जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने त्रास देणे सुरू केले होते. या प्रकाराला कंटाळून श्रुतीने राहत्या घरी १७ ऑगस्ट रोजी रक्तदाब व झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यापूर्वी तिने सुसाइड नोट लिहिली होती. यात स्वप्निलच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. २० ऑगस्ट रोजी श्रुतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी स्वप्निलला गुन्हेशाखेने अटक केली होती. या प्रकरणी तपास करून दोषारोपपत्र कोर्टात सादर करण्यात आले असून स्वप्निल हा हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

घटनाक्रम

१७ ऑगस्ट २०१५ : श्रुतीने झोपेच्या गोळ्या घेतल्या.

२० ऑगस्ट : उपचारादरम्यान श्रुतीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू.

आरोपी स्वप्निल मणियार हर्सूल कारागृहात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जन्म प्रमाणपत्राच्या वादातून डॉक्टर-वकिलात हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जन्म प्रमाणपत्राच्या वादातून डॉक्टर व वकिलाता हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. उल्कानगरी येथील संत एकनाथ हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली असून, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हे दाखल झालेत.

डॉ. अनंत कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अतुल काळे यांची पत्नी शीतल डिसेंबर २०१२ मध्ये प्रसुतीसाठी दाखल होती. बाळाच्या जन्मानंतर त्यांना सुटी दिल्यानंतर बाळाचे जन्म प्रमाणपत्र सोबत दिले होते. दुय्यम पत्रावर त्यांची सही घेतली होती. सोमवारी अतुल काळे यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन जन्म प्रमाणपत्र का देत नाही, या कारणावरून शिवीगाळ करीत डॉ. कुलकर्णीना तसेच त्यांच्या वडिलांना मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात संशयित अतुल काळे विरुद्ध दंगल करणे, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याच प्रकरणात अतुल काळे यांनी दुसरी तक्रार दिली आहे. यामध्ये काळे यांच्या मुलाचे जन्मप्रमाणपत्र दिले नव्हते. मुलाला शाळेत टाकण्यासाठी प्रमाणपत्राची गरज असल्याने डॉ. संध्या कुलकर्णी यांच्याकडे प्रमाणपत्राची मागणी केली. त्यांनी फुकटात सर्व काही पाहिजे, पोच मिळणार नाही, काय करायचे कर, असे म्हणत शिवीगाळ केली. एका जेष्ठ नागरिकाने व तरुणाने पाठीमागून येऊन मारहाण केली. तसेच डॉ. अनंत कुलकर्णी यांनी डोक्यात धारदार वस्तूने मारले व गळा दाबला. माझ्या पत्नीने मला त्यांच्या तावडीतून सोडवल्याचा उल्लेख केला आहे. अतुल काळे यांच्या तक्रारीवरून डॉ. संध्या कुलकर्णी, डॉ. अनंत कुलकर्णी व इतर दोघांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीएसआय अरूण घोलप तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कंडक्टरला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अंगात वर्दी, दारू ढोसलेली अशा बेताल अवस्थेतल्या पोलिस कर्मचाऱ्याने बुधवारी पोलिस चौकीतच महिला कंडक्टवर हात टाकला. तिच्याशी हुज्जत घालत शिविगाळ करत मारहाण केली. ए. एस. देहाडे असे त्या मुजोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेने संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्टँडमध्ये सुमारे तासभर चक्का जाम आंदोलन केले. सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

धुळे ते औरंगाबाद (एमएच १४ बीटी १५९७) या बसमधून पोलिस विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी प्रतिभा कोळी प्रवास करत होत्या. त्यांच्या तिकिटाचे ३५ रुपये महिला वाहक जयश्री सदावर्ते यांच्याकडे शिल्लक होते. या पैशावरून त्यांच्यात वादावादी झाली. यावर तोडगा म्हणून जयश्री सदावर्ते यांनी प्रतिभा कोळी यांना शंभरची नोट दिली. ३५ रुपये दिल्यानंतरच ही नोट परत करा, असे सांगितले. बस औरंगाबादजवळ आल्यानंतर सदावर्ते यांनी ३५ रुपये पोलिस कर्मचारी कोळी यांना दिले. मात्र, त्यांनी पैसे न घेता वादास सुरुवात केली. सदावर्ते यांना धमक्या दिल्या. बस औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावर आल्यानंतर वाढलेला वाद पाहून अन्य महिला वाहक जमा झाल्या. महिला वाहक सदावर्ते यांनी ड्रायव्हरसह बसस्टॅँडवरील पोलिस चौकी गाठली. या चौकीतील पोलिस कर्मचारी ए. एस. देहाडेने महिला पोलिस कर्मचारीची बाजू घेत महिला वाहकांसोबत हाणामारी केली. महिला वाहक जयश्री हजारे, शोभा खापर्डे आणि संगिता मालवे यांनाही देहाडेने मारहाण केली. तो यावेळी दारू पिऊन तर्रर होता असा आरोप वाहकांनी केला आहे. मारहाणीची घटना समजताच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती बस स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर आडवी बस लावून 'चक्काजाम आंदोलन' सुरू केले. देहाडे आणि महिला पोलिस कर्मचारी प्रतिभा कोळीला क्रांतिचौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, सहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी बसस्टँडवर जाऊन महिला वाहकांशी चर्चा करत दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस कर्मचाऱ्याला क्रांतिचौक पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मेडिकल टेस्ट करा

पोलिस कर्मचारी ए. एस. दाभाडे दारू पिऊन कर्तव्यावर होता.

दाभाडेची मेडिकल टेस्ट करा; एसटी कर्मचाऱ्यांची मागणी.

चक्काजाम आंदोलन का करू दिले; पोलिसांची एसटी अधिकाऱ्यांना विचारणा.

आंदोलन सुरू झाल्यानंतर बसस्टँडवरून चोरट्यांनी चार जणांचे पाकीट मारले.

बसस्टँडवर घडलेली घटना गंभीर आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल. वेळप्रसंगी त्यांना निलंबित करू.

- खुशालचंद बाहेती, सहाय्यक पोलिस आयुक्त

महिला वाहकांसोबत अशा घटना होऊ नयेत याची काळजी घेऊ. यापूर्वी दलालाच्या हल्ल्यात पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर दलालांचा आम्हाला होणारा त्रास बंद झाला होता. आता सहकार्य करावे.

- सी. के. सोळसे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी ओपीडीत पाण्याचा ठणठणाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) इमारतीमध्ये महिन्यापासून पाण्याचा ठणठणाट असल्याने, मध्यवर्ती प्रयोगशाळेपासून स्वच्छतागृहापर्यंत सर्वत्र पाणी नसल्याचा फटका बसत आहे. त्याचवेळी ओपीडीतील एकमेव लिफ्ट मागच्या पाच ते सहा दिवसांपासून बंद पडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण, तेवढेच नातेवाईक आणि शंभरपेक्षा जास्त डॉक्टर-कर्मचारी असा रोज सहा ते सात हजार व्यक्तींचा राबता असलेल्या ओपीडीमध्ये गेल्या महिन्यापासून पाणीच येत नाही. त्यामुळे दैनंदिन कामांना व रुग्णांना फटका बसत आहे. इमारतीमध्ये सकाळी आठपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत वर्दळ सुरू असते. मात्र पाणीच नसल्याने सर्व प्रकारच्या स्वच्छतेवर परिणाम होत आहे. प्रयोगशाळेमध्ये छोट्या कॅनमधील पाणी वापरून वेळ मारून नेली जात आहे. तपासण्या करण्याच्या उद्देशाने रक्त-लघवीचे नमुने देण्यासाठी रुग्ण या प्रयोगशाळेमध्ये येतात. मात्र पाणीच नसल्याने रुग्णांसह डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी हात धुवावेत तरी कुठे, असा पेच निर्माण झाला आहे. एक महिन्यापासून पुरेशी स्वच्छता होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी संसर्गाची भीती वाढत आहे. पाण्याची थातूर-मातूर सोय करून प्रयोगशाळातील तपासण्या केल्या जात असल्या तरी स्वच्छतेवर, परिणाम होत आहे. इतर विभागांच्या वॉर्डांची स्थिती वेगळी नाही. स्वच्छतागृहांची स्थिती तर अत्यंत दयनीय बनली आहे. एरवीच स्वच्छतागृहांची पुरेशी स्वच्छता होत नसल्याचा आरोप होतो. त्यातच आता तर पाणी नसल्याचे निमित्त मिळाल्याने स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय झाली आहे.

लिफ्ट बंद असल्याचे विद्युत विभागाला, तर पाण्याच्या प्रश्नाविषयी बांधकाम विभागालाही कळविण्यात आले आहे. लवकरच दोन्ही प्रश्न मिटतील, अशी आशा आहे.

- डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा वाढवणार?

$
0
0

विधान परिषदेत शिंदे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्याच्या मुद्द्यावर विधान परिषदेत बुधवारी चर्चा झाली. सरकार याबाबत सकारात्मक विचार करत असल्याचे राज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. २००८ पासून भरती बंद असल्याने आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षाही वेळेवर होत नसल्याने हजारो तरुणांच्या संधी हुकत आहे.

निधी नसल्याचे कारण दाखवून राज्यात २००८ पासून नोकर भरतीची प्रक्रिया थंडावलेली आहे. २००८-०९ मध्ये सुरुवातीला भरती बंद केल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर परिस्थिती फारशी बदलेली नाही. शासनाच्या अशा धोरणामुळे अनेकांच्या नोकरीच्या संधी हुकत आहेत. भरती बंदचा विचार करत स्पर्धा परीक्षांच्या वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी होत आहे. हा मुद्दा आज विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला.

आमदार चव्हाण यांनी सभागृहात ९३ अन्वये सूचनेद्वारे उमेदवारांची वर्यामर्यादा वाढवावी, अशी मागणी केली. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री राम शिंदे यांनी, सरकार उमेदवारांची वर्यामर्यादा वाढविण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. यामुळे तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खुल्या प्रवर्गासाठी नोकरीचे वय ४० वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४२ वर्षे करावे, अशी मागणी आहे. सध्या राज्यात स्पर्धा परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा ३३ तर, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी २८ वर्षे आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची २०१२पासून ही मागणी आहे. राज्यात २००८पासून नोकर भरती जवळपास बंद आहे. लाखो विद्यार्थी नेट-सेट, इतर पदव्या घेऊनही बेरोजगार आहेत. त्यांनी करायचे काय, असा प्रश्न आहे. शासनाने वयोमर्यादा वाढविण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

- मनोहर इंगळे, स्पर्धा परीक्षेचे उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन क्विंटल कॅरिबॅग जप्त

$
0
0

महापालिकेची पाच विक्रेत्यांवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने कॅरिबॅग विक्रेत्यांवर बुधवारपासून कारवाई सुरू केली. आज पहिल्याच दिवशी पाच विक्रेत्यांवर कारवाई करीत २०० किलो कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. उद्यापासून ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.

कॅरिबॅग विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात येईल, असे महापालिकेतर्फे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. कॅरिबॅग विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना ३१ डिसेंबरची डेडलाइन देण्यात आली होती. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते, परंतु आज अचानक कॅरिबॅग विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली. पालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या कारवाईची जबाबदारी नगर सचिव डी. डी. सूर्यवंशी यांच्यावर टाकली. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सायंकाळी चार वाजता कारवाईस सुरुवात केली. दोन तासांमध्ये पाच विक्रेत्यांवर या पथकाने कारवाई केली. त्यात मोतीकारंजा भागातील संजय प्लास्टिक, शालिमार प्लास्टिक, गंगवाल प्लास्टिक, पानदरिबा भागातील राज प्लास्टिक सेंटर, सुराणा ब्रदर्स या विक्रेत्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली. या विक्रेत्यांकडून सुमारे २०० किलो कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. या सर्व कॅरिबॅग ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या होत्या. एक सुरक्षारक्षक व पाच कर्मचारी यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारपासून ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दंडासह गुन्ह्याची तरतूद

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचे उत्पादक, विक्रेते आणि त्यांचा उपयोग करणाऱ्यांवर घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी कायदा २०००नुसार ५०० ते १००० रुपये दंडाची कारवाई केली जाऊ शकते. त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख शिवाजी झनझन यांनी दिली. कॅरिबॅगची विक्री हा नागरिकांच्या जीवितास धोका पोचवण्याचा प्रकार आहे, असे गृहित धरून दंडाची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानमंदिरांना पानटपऱ्यांचा विळखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शाळांपासून शंभर मीटर परिसरात पानटपऱ्या थाटल्या जाऊ नयेत, असा नियम आहे. शहरातील अनेक शाळांनी त्याला केराची टोपली दाखविल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने सर्व शाळांकडून टपऱ्यांविषयी माहिती मागविली आहे. या पार्श्वभूमीवर 'मटा'ने शहरातील शाळांची परिस्थिती जाणून घेतली तेव्हा अनेक शाळांच्या आवारातच टपऱ्यांची रेलचेल दिसून आली.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने जीवाला धोका आहे, अनेकांनी त्यामुळे जीव गमावला आहे, हे माहित असूनही मोठ्या संख्येने लोक त्याचे सेवन करतात. यांची या पदार्थांची तलफ भागविण्यासाठी मग जागोजागी पानटपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांनीही नियमांची पायमल्लीच केल्याचे दिसते. शाळा, महाविद्यलायांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे, मात्र या नियमांकडे शिक्षण विभाग, अन्न व औषध प्रशासन, पोलिस व महापालिका प्रशासनाकडून सर्रास कानाडोळा केला जातोय आणि त्याचाच फायदा टपऱ्यांना होतो आहे.

शहरातील औरंगपुरा परिसरात असलेल्या सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या समोरच्या बाजूस अनधिकृतपणे पानटपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. अनेकदा या पानटपऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले, मात्र काही तासातच या पानटपऱ्या पुन्हा अवतरत असल्याचे चित्र आहे. याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी कोचिंग क्लासेसही चालतात. त्यामुळे सकाळपासून या परिसर विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा शेजारीच असलेल्या एका दुकानात सर्रास सिगारेटची विक्री करण्यात येते. केवळ औरंगपुराच नाही तर मुकुंदवाडी, चिकलठाणा, सिडको, हडको, शहागंज, विद्यापीठ परिसरामध्ये असलेल्या महाविद्यालयाच्या शेजारचीही परिस्थिती अशीच आहे. सर्वत्र शाळा, महाविद्यालयांना पानटपऱ्यांनी विळखा घातला आहे.

बुधवारी (१६ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली, शाळा महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी असल्यामुळे या बैठकीत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. आता सर्व शाळांच्या परिसरात असलेल्या पानटपऱ्यांची यादी प्रशासन मिळवणार कधी अन् कारवाई होणार कधी, असा प्रश्न आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शाळा महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असताना प्रशासन केवळ

बैठकांमध्येच गुंग आहे.

शाळेच्या प्रवेशद्वारावरच पानटपरी

औरंगपुरा परिसरातच असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारावरच पानटपरी आहे. अनधिकृतपणे थाटलेल्या या पानटपरीकडे कधीही महापालिका प्रशासनाचे लक्ष गेले नाही. थोडे पुढे गेल्यानंतर शहर बसथांब्यालगतच आणखी एक टपरी आहे. शिशुविहार शाळेच्या काही फूट अंतरावरच असलेल्या या पानटपरीवर गुटखा तसेच सिगारेटची विक्री करण्यात येते. पुढे जिल्हा परिषद कार्यालयाला लागूनही अनेक अनधिकृत हॉटेल तसेच पानटपऱ्यांमधून सिगारेट तसेच गुटख्याच्या पुड्यांची विक्री करण्यात येते.

प्रशासकीय यंत्रणा कोणतीही असो, काम पुढे ढकलणे, कानाडोळा करणे एवढेच त्यांचे काम असे नेहमीच दिसते, मात्र अशाच वृत्तीतून शाळा - महाविद्यालयांच्या शेजारीच तंबाखूजन्य पदार्थ सर्रास मिळू लागलेत. या भावी पिढीला याचे व्यसन लागले तर किती महागात पडेल, याचा विचार या यंत्रणांनी गांभीर्याने करावा अन् तातडीने कारवाईचे पाऊल उचलायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गरवारे क्रीडा संकुलाची वाताहात

$
0
0

आता मनपा आयुक्त कारवाई करणार का, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष

Sudhir.Bhalerao@timesgroup.com

औरंगाबाद :
कोर्टाच्या आदेशामुळे गरवारे क्रीडा संकुल लग्न-समारंभांच्या जाचातून सुटलेले असले तरी महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे त्याची वाताहत झाली आहे. मैदानावर खेळाडू खेळत असताना मैदानाबाहेर भरदिवसा दारूच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत. सायंकाळनंतर तळीरामांमुळे मैदानावर फिरणेदेखील अवघड होऊन बसले आहे. या परिसरात अनेक गैरप्रकार होत असल्याच्या प्रतिक्रिया 'मटा'शी संवाद साधताना क्रीडाप्रेमींनी व्यक्त केल्या.

क्रीडा संकुल शहरातील सर्वात मोठे संकुल म्हणून ओळखले जाते. या संकुलाच्या देखभालीकडे महापालिकेने प्रचंड दुर्लक्ष केल्यामुळे ते बकाल बनले आहे. सहा ऑगस्ट १९९७ रोजी लोकार्पण झालेल्या गरवारे क्रीडा संकुलाची १८ वर्षांच्या कालावधीत अधोगतीच झाली. इनडोअर हॉलमधील बॅडमिंटन, टेबल टेनिस यांसह अन्य सुविधा तर अनेक वर्षांपासूनच बंदच पडल्या आहेत. आज फक्त क्रिकेट मैदानाचाच उपयोग होताना दिसतो, पण या मैदानाचीही निगाही राखली जात नाही, हे मैदान पाहताक्षणीच सहज लक्षात येते. मनपाच्या क्रीडा विभागाचेही गरवारे क्रीडा संकुलाकडे लक्ष नाही. आयुक्त सुनील केंद्रेकर स्वत: या मैदानावर क्रिकेटचे अनेक सामने खेळले आहेत. त्यांना या मैदानाच्या सद्यस्थितीची कल्पना आहे. त्यांनी संकुलाची दूरवस्था दूर करण्यासाटी कठोर उपाय योजना आखावी, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करीत आहेत.
जलतरणिकेचे काम रखडले

या संकुलातील प्रस्तावित जलतरण तलावाचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. तलावाचे काम सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच वाद झाला आणि काम रखडले. सद्यस्थितीत अर्धवट जलतरण तलाव बघावयास मिळतो. भविष्यात या तलावाचे बांधकाम कधी पूर्ण होईल याची शाश्वती कोणालाही देता येत नाही. तलावाभोवती काटेरी झुडपे व अन्य झाडे उगवलेली आहेत. त्यामुळे अस्वच्छता दिसून येते.

जॉगिंग ट्रॅक धुळीचाच

क्रिकेट मैदानाला तारेचे कुंपण घातल्यानंतर शेजारील जागेचा वापर अनेक वर्षांपासून नागरिक 'जॉगिंग ट्रॅक' म्हणून करीत आहेत. महापालिकेचे या ट्रॅककडेही लक्ष नाही. धूळ उडवतच पायी चालण्याचा व्यायाम नागरिकांना करावा लागतो. पावसाळ्यात चिखलामुळे या ट्रॅकवरून चालणेही अवघड होते. याविषयी अनेकदा तक्रार करूनही कोणी दखल घेतली नसल्याचे नागरिक सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष प्राधिकरण समिती रखडली; प्रशासनाला मुहूर्त सापडेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील वृक्षतोड आणि वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र यंत्रणाच अस्तित्वात नसल्यामुळे अवैध वृक्षतोड वाढली आहे. नवीन बांधकामात आणि रस्त्यात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी स्वतंत्र वृक्ष प्राधिकरण समिती असते. औरंगाबाद महानगरपालिकेत वृक्ष प्राधिकरण समिती नसल्याने वृक्ष संवर्धन कायदा कागदावरच दिसत आहे.

औरंगाबाद शहराचा विस्तार आणि नवीन बांधकामांची गती पाहता पर्यावरणाच्या समस्या जटील झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र वृक्ष प्राधिकरण समितीची गरज आहे. महापालिका क्षेत्रात अशी समिती स्थापन करणे महत्त्वापूर्ण आहे; मात्र, मागील सहा महिन्यांपासून समिती नाही. जुनी समिती बरखास्त झाल्यानंतर नवीन समिती स्थापन करण्यासाठी मनपा प्रशासनाने हालचाल केली नाही. समितीत काम करण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी अर्ज केले आहेत. सेवाभावी संस्था आणि पर्यावरण अभ्यासकांनी समितीत काम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्यक्षात वृक्ष प्राधिकरण समिती कधी नेमणार याचा मनपा प्रशासनालाच थांगपत्ता नाही. प्रचंड दबाव वाढल्यानंतर काही दिवसांपूर्वी मनपाच्या सर्वसाधारण सभेत वृक्ष प्राधिकरण समिती नियुक्त करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावानंतर अजूनही महापौर किंवा आयुक्तांनी समितीबाबतचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. परिणामी, वृक्षतोड आणि वृक्ष संवर्धनासाठीचे अर्ज प्रलंबित आहेत. सर्वसामान्य नागरिकांना वृक्षतोड किंवा छाटणीची त्वरित परवानगी मिळत नसल्यामुळे अवैध वृक्षतोड वाढण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष पाहणी करून समिती झाडांची तोड किती व कोणत्या बाजून करावी याचे निर्देश देते. समितीच नसल्याने नागरिकांनी काही ठिकाणी बेछूट वृक्षतोड केली आहे. दिल्ली गेट ते सिडको रस्त्यावरील झाडे तोडण्याचे टेंडर मनपाने काढले होते. या टेंडरला विरोध झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी संस्था व उद्यान अधीक्षकांनी प्रत्यक्ष झाडांची पाहणी केली. या झाडांमधील काही झाडे तोडण्यास हरकत नसल्याचा दाखला दिला आहे. तर जवळपास ७० झाडांचे अर्ज रखडले आहेत. 'वुई फॉर एन्व्हॉरमेंट', 'सृष्टी संवर्धन संस्था' यांनी मनपाला सहकार्य करण्यासाठी पाहणीत सहभाग घेतला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ मुक्तीसाठी पंचसूत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासन पाणीटंचाई आणि चारा टंचाईवर मात, हाताला काम, अन्नसुरक्षा आणि जलयुक्त शिवार अभियान अशा पंचसूत्रीच्या माध्यमातून काम करीत आहे. या दुष्काळ मुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घोषणापत्र तयार करण्यात आले असून, त्यांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व यंत्रणेला सूचना केल्या आहेत.

दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे या आपत्तीचा सर्वांनी मिळून सामना करणे गरजेचे आहे. गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत विविध विभागांची यंत्रणा दुष्काळाशी मुकाबला करीत आहे. तसेच शेतकरी व सर्वसामान्य वर्गासाठी झटत आहे. आपण करीत असलेले हे काम त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांच्याशी थेट संवाद साधा, असे आवाहन यानिमित्ताने बोलताना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना केले.शासन जनतेच्या पाठीशी आहे. हे आपल्या कृतीतून दाखवून द्या, विविध विभागांमार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम होत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेवून प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारी अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे अनुभव या लोकांपर्यंत घेवून जा, अशी सूचनाही नारनवरे यांनी केली.

शासन यंत्रणांनी केलेले काम लोकांपर्यंत पोहोचले पाहिले, त्यासाठी सकारात्मक पद्धतीने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दुष्काळाशी सामना करताना प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्या दृष्टीने सर्वच पातळीवर काम व्हायला हवे, लोकांना दिलासा मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

चारा निर्मितीचे प्रशिक्षण द्या

चारा छावणीत ज्या शेतकऱ्यांची जनावरे आहेत. त्या प्रत्येक शेतकऱ्यांचे बँकेत खाते नसेल तर त्यांची खाती उघडून घ्या, त्यांना बँकेच्या कामकाजांची माहिती द्या, थेटपणे लोकांपर्यंत पोहोचा, असे निर्देशही डॉ. नारनवरे यांनी दिले.

चारा टंचाई लक्षात घेवून चारा छावण्यावरील शेतकऱ्यांना अॅझोला निर्मिती आणि हायड्रोफोनिक तंत्राने चारा निर्मितीचे प्रशिक्षण द्या. चारा छावण्यांना अधिकाऱ्यांनी भेटी देण्याबातही जिल्ह‌ाधिकारी यांनी सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

भारतीय सैन्य भरतीवेळी उमेदवारांची एकाचवेळी होणारी गर्दी तसेच त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इच्छूक उमेदवारांना आता भारतीय सैन्यामध्ये भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. सैन्य भरतीसाठी इच्छूक उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार असल्याची माहिती भारतीय सैन्य भरती कार्यालय पुणे येथील सहाय्यक भरती अधिकारी एस. एस. रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात विविध ठिकाणी आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या खुल्या सैन्य भरती प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने उमेदवार आले होते. परंतु, सदर भरतीवेळी होणाऱ्या गर्दीमुळे उमेदवारांना होणारा त्रास रोखण्यासाठी ऑनलाइन नोंदणीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अनेकवेळा भरतीसाठी पात्र नसलेले उमेदवार ही भरतीसाठी आल्याने गर्दी वाढते व यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. अशा गैरप्रकारांना आळा बसणार असून, ऑनलाइन नोंदणीमुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची संख्या अगोदरच कळणार असल्याने भरती प्रक्रिया शांततेत पार पडण्यास एप्रिल २०१६ मध्ये लातूर येथे लातूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यातील उमेदवरांकरीता सैन्य भरतीचे आयोजन करण्याची शक्यता आहे.

याकरीता सदर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी. ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर भरतीसाठीचे पत्र / प्रवेशपत्र संबंधीत उमेदवरांना ऑनलाइनच प्राप्त होणार असल्याचे ही सहाय्यक भरती अधिकारी रावत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या संपाचा प्रवाशांना फटका

$
0
0

मराठवाड्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम मटा, औरंगाबाद

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी बंद पुकारला होता. या बंदला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्यने कर्मचारी संपात सहभागी झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. या संपामुळे दिवसभर प्रवाशांचे हाल झाले. लांब जाणाऱ्या प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागले.

संपामुळे वाहतुकीचा खोळंबा

बीड ः जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी संप पुकारला होता. यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली. बीड जिल्ह्यातील तब्बल सातशेहून अधिककर्मचारी या संपात सहभागी झाले होते. त्यामुळे चारशेच्या जवळपास बस फेऱ्या बंद राहिल्या. कर्मचाऱ्यांनी बसच्या टायरमधील हवा सोडून बसस्थानक बाहेर पडणार नाही असा प्रयत्न यावेळी केला. जिल्ह्यातीलअंबाजोगाई येथे चार ते पाच बसवर दगडफेक झाल्याची घटना या दरम्यान घडली.

संपाचा प्रवाशांना फटका

उस्मानाबाद ः एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी गुरुवारी संप पुकारला होता. याचा मोठ्याप्रमाणात फटका प्रवाशांना बसला. उस्मानाबाद स्थानकावरून जाणाऱ्या बहुतेक बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बससेवा सुरू ठेवण्यात आली होती. बस बंदमुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचा मात्र चांगलाच फायदा झाला.

खासगी वाहतूकदारांची चांदी

लातूर : पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गुरुवारी दिवसभर प्रवाशांची तारांबळ उडाली. बहुतेक बस बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची मात्र, चांदी झाली. आगाऊ तिकिटासह दुप्पट क्षमतेने प्रवाशांना बसवून वाहतुकीच्या फेऱ्या केल्या.

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार काँग्रेस संघटनेच्यावतीने (इंटक) गुरुवार, १७ रोजी विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. सकाळी दहापर्यंत वाहतूक सुरळीत होती. त्यानंतर इंटकच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक बंद पाडली. एसटीच्या विभागीय कार्यलयात नियंत्रण कक्ष स्थापन्यात आला होता. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी चारपर्यंत एक हजार ३११ फेऱ्या होणे अपेक्षीत होते. परंतु, सकाळी दहापर्यंत वाहतूक सुरळीत होती. त्यावेळेत ११५ फेऱ्या झाल्या. त्यापैकी १ हजार १९६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. संप यशस्वी झाल्याचा दावा राम नागरगोजे यांनी केला आहे. या संपात लातूर आगारातील ८० वाहतूक, ८० चालक व आगारातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

दुपारनंतर बससेवा सुरळीत

जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या चक्का जाम आंदोलनाचा जालना आगारातील कामकाजावर दुपारच्या सत्रात फार परिणाम झाला नाही. दुपारी बारानंतर बरीच वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली होती. परतूर, मंठा, जाफराबाद, अंबड, घनसावंगी आणि भोकरदन येथे दुपारच्या सत्रात तुरळक प्रमाणात गाड्या धावल्या. दरम्यान, एसटीच्या या संपामुळे सर्व सामान्यांना त्रास सहन करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images