Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुकानदारांपुढे प्रशासन हतबल

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

श्री घृष्णेश्वर मंदिराच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात भारतीय पुरातत्व विभागाने लावलेले बॅरीकेड्स संतप्त दुकानदारांनी मंगळवारी रात्री काढून टाकले. यामुळे अतिक्रमणधारकांपुढे प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येते. यावरून मंदिर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंदिर परिसरात कोणतेही वाहन जाऊ नये, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्रावण महिन्यात बॅरीकेट्स लावण्यात आले होते. खासदार राजकुमार धूत यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरात सुशोभिकरण करून उद्यान तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याआधी दुकानदारांना पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. हे प्रयत्न सुरू असताना येथील दुकानदारांनी व्यवसाय होत नाही, उपासमारीची वेळ आल्याचा कांगावा करत मंगळवारी रात्री आठच्या सुमाराला बॅरीकेट्स काढून टाकले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे कर्मचाऱ्यांसह पोहोचले तेव्हा अनेक दुकानदार बॅरीकेट्स काढतांना दिसले. पोलिस आल्याचे लक्षात येताच दुकानदारांनी पळापळ केली. उज्वला चव्हाण, माया पवार, आयना पवार, संतोष भालेराव यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील प्रसंग टळला.

पुन्हा बॅरीकेट्स लावले

मंदिर परिसरात एकही वाहन येऊ नये यासाठी बुधवारी एएसआयचे हेमंतकुमार हुकरे, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्या उपस्थितीत बॅरीकेड्स पुन्हा लावण्यात आले.

काय घडले होते?

९ मे २००६ रोजी सायंकाळी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात आरडीएक्सचा साठा पकडण्यात आला होता. मुंबई एटीएसच्या पथकाने नांदगाव येथून येणारी टाटा सुमो व इंडिका कारचा पाठलाग केला. चालकाने टाटा सुमो मंदिराच्या समोरील दुकानांच्या परिसरात वळविली. या मोटारीत १६ एके ४७ रायफल, ३२०० काडतूस, ६२ मॅगझिन, ४३ किलो आरडीएक्स, ५० हँडग्रेनेड आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुसऱ्या दिवशीही संपामुळे हाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एसटी कर्मचाऱ्यांचा संप शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत सुरू असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशीही हाल झाले. या संपाचा पैठणच्या आठवडी बाजारालाही फटका बसला. दुपारी तीननंतर बससेवा सुरू झाली. काँग्रेसप्रणित एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने वेतनवाढीच्या मागणीसाठी गुरुवारपासून संप पुकारला. या संपामुळे गुरुवारी पैठण आगारातून एकही बस सुटली नाही; शुक्रवारीही संप सुरू होता. त्यामुळे सकाळी आठवडी बाजारात येणारे व्यापारी, नागरिक, आठवडी बाजारानिमित्त शासकीय कार्यालयात कामासाठी येणारे नागरिक, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा खोळंबा झाला. ग्रामीण भागातून येण्यासाठी बस नसल्याने शाळा व कॉलेजमध्ये उपस्थितीवरही परिणाम जाणवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक विभागाचे दुर्लक्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराचे वय चक्क २४३ वर्ष दाखवून निवडणूक विभागाचे दूर्लक्ष झाल्याचे उघड झाले आहे.
हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये उमेदवारी दाखल केलेल्या ठाकूर हनुमानसिंग विठ्ठल या उमेदवाराचे वय २४३ वर्ष दाखवून निवडणूक विभागात चाललेला कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथील कारभार उपविभागीय अधिकारी आविशकुमार सोनोने व तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून, कर्मचाऱ्यांनी केलेल्या असंख्य अक्षम्य चुकांमुळे सुरुवातीपासूनच मतदारांसह उमेदवारानाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या अगोदर मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ, प्रभाग निहाय मतदारांच्या संखेतील तफावत आदी प्रकाराने सर्वच जन हैराण झाले असून, काहींनी याद्यातील चुका व बालकांना मतदार दाखविल्याबद्दल काहींनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेच्या सुरक्षेसाठी चोऱ्यांनंतर उपाय

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बाजारसावंगी शाखेतील दरोडा पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखांच्या सुरक्षेची काळजी करत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जिल्हा बँकेच्या १४२ शाखा, विस्तारित कक्ष असून अपवाद वगळता इतर ठिकाणी सुरक्षेची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. याचा फायदा उचलत सहा महिन्यात चार शाखांमध्ये तिजोरी फोडून रोकड लांबविली.

काँग्रेस नेते सुरेश पाटील हे २३ व्या वेळेस बँकेचे अध्यक्षपद भूषवत असून संचालकमंडळात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. व्यवस्थापनाने चोख सुरक्षा ठेवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. वैजापूर येथील मार्केट यार्डातील मुख्य शाखेतील तिजोरी गॅस कटरने कापून ७ सप्टेंबर रोजी २० लाख रुपयांची रोकड पळवण्यात आली. लासूर स्टेशन येथील शाखेवर धाडसी दरोडा पडला तर, मांजरी शाखेतून ५७ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली. या तिन्ही ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हता, सीसीटीव्ही कॅमेरा, अलार्म व्यवस्था नाही. तीन घटना घडल्यानंतरही व्यवस्थापनाने सुरक्षेकडे लक्ष दिलेले नाही.

पोलिस अपयशी

जिल्हा बँकेच्या चार व महाराष्ट्र बँकेच्या दोन शाखांमध्ये तिजोरी फोडून रोकड पळवण्यात आली. मात्र पोलिसांनी अद्याप एकाही घटनेतील चोरांना पकडण्यात यश आलेले नाही. यापुढे छोट्या शाखेत जास्त पैसे ठेवले जाणार नाहीत. अन्य शाखेत सुरक्षारक्षक नेमणे, सीसीटीव्ही आदी व्यवस्था करण्यात येईल.

- सुरेश पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादेत पादचाऱ्यांचा जीव मुठीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद शहरातील बहुतांश पादचारी मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मुळात निम्म्या शहरात पादचारी मार्गच अस्तित्वात नाहीत. काही रस्त्यालगत फुटपाथ आहेत. मात्र, तेही फळाची दुकाने, फळगाडे, हातगाड्या, भाजीपाला विक्री करणारी मंडळी यांनी व्यापली आहेत. पादचाऱ्यांनाही फुटपाथची किंवा पादचारी मार्गाची आवश्यकता असते याचा विसर, नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागा व जिल्हा प्रशासनासह आदी विभागांना पडला असून, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेवूनच जावे लागत आहे.
रस्ते व वाहतूक व्यवस्था कशी आहे. यावर त्या शहराची प्रतिमा तयार होते. हवा, पाणी आणि तुळजाभवानीसाठी सर्वदूर परिचित असलेल्या उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणची वाटचाल प्रगतीकडे होत असताना उस्मानाबादेतील बहुतांश रस्ते मात्र सुस्थितीत नाहीत. त्यात रस्त्यावरून चालणाऱ्यांसाठी पादचारी मार्गाची आवश्यकता असते. याकडे सर्व संबंधित विभागाचे दुर्लक्षच झाल्याचे चित्र शहरातून फेरफटका मारल्यानंतर दिसून येते. कोट्यवधी रुपये खर्चून शहरातील आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा तसेच शिवाजी पुतळा ते उस्मानाबाद नगरपालिका इमारतीपर्यंत फुटपाथ तयार करण्यात आले. मात्र, ते नेमके कुणाकरिता तयार केले, असा प्रश्न उस्मानाबादेतून फेरफटका मारणाऱ्या कोणालाही पडेल. कारण शहरात बांधण्यात आलेल्या फुटपाथचा वापर पादचाऱ्यांऐवजी अन्य व्यावसायिक कारणासाठी केला जात असल्याचे चित्र आहे.
फुटपाथचा वापर हातगाड्या, फळाचे दुकाने लावण्यासाठी तसेच भाजीपाला विक्री करण्यासाठी किंवा साहित्य ठेवण्याबरोबरच पार्किंगसाठी केला जात आहे. मध्यंतरी या अतिक्रमण करून दुकान थाटलेल्याविरुद्ध व फळविक्री करणाऱ्या गाडे चालकाविरोधात सरकारी बाबूंनी कारवाई केली. एक-दोन दिवस या भागातील फुटपाथने मोकळा श्वास घेतला पण पुन्हा लागलीच परिस्थिती पूर्व पदावर आली.
उस्मानाबाद बस स्टॅण्डसमोरील तुळजाभवानी शॉपींगसेंटर, नगरपालिका इमारत परिसरातील व्यापारी संकुलासमोर असलेल्या फुटपाथवर विविध प्रकारची दुकाने बिनधास्तपणे थाटली आहेत. प्रत्येक वेळी किरकोळ कारवाई केली जाते. त्यामुळे या दुकानदारांचे फावते. शिवाय या मंडळींना गाव-पुढाऱ्यांचे पाठबळदेखील असते.
येथील बस स्टॅण्डसमोर पादचाऱ्यांसाठी फुटपाथची व्यवस्था केलेली आहे. परंतु, शिवाजीपुतळा परिसर, बस स्टॅण्ड ते जिल्हा न्यायालय पर्यंतची सर्व बाजू अॅटो रिक्षा स्टॅण्डसहीत वाहन चालकांनी व्यापली आहे. जिल्हाधिकारी निवासस्थान ते नेहरू चौक या शहरातील महत्त्वाच्या मार्गावर पायी चालणाऱ्यासाठी पादचारी मार्गच नाही. हीच अवस्था समता नगर, देशपांडे स्टॅण्ड, भोसले हायस्कूल परिसर शिवाय बार्शी नाका भागाची आहे. या सर्व भागातील रस्त्यालगतच वाहने बेशिस्तपणे उभी असतात. त्यामुळे नागरिकांना वाहनाच्या गर्दीतूनच वाट काढावी लागत आहे.
बस स्टॅण्डसमोरील तुळजाभवानी व्यापारी संकुल, संजीवन हॉस्पिटल परिसर, नगरपालिका परिसरातील व्यापारी संकुल, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, न्यायाधीश निवासस्थान, परिसर, काळा मारुती चौक येथील सर्व मोकळी जागा वाहन पार्किंगने व्यापली आहे. त्याशिवाय या सर्व भागात अनेकांनी अतिक्रमणे करीत दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आहे. याचा सर्वाधिक फटका बस स्टॅण्डसमोरील सर्वात जुन्या असलेल्या तुळजाभवानी व्यापारी संकुलातील शेकडो व्यापाऱ्यांना बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक फोडली, रोकड टाकून पळाले

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

तालुक्यातील बाजारसावंगी येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर गुरुवारी रात्री दोन वाजता दरोडा पडला. मात्र पोलिसांच्या गस्तीमुळे चोरटे दोन लाखाची रोकड, गॅस सिलिंडर, कटर सोडून पळून गेले.

बाजारसावंगी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कडीकोयंडा तोडून अज्ञात दरोडेखोरांनी गुरुवारी रात्री प्रवेश केला. त्यांनी सोबत तिजोरी फोडण्यासाठी गॅस सिलेंडर व कटर आणले होते. कटरने तिजोरी फोडून त्यातील २ लाख ४ हजार २९ रुपये काढूनही घेतले. मात्र त्याचवेळी तेथे गस्त घालणारे पोलिस पोहोचले. पोलिसांच्या जीपमधील पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांना बँकेचे चॅनलगेट उघडे दिसले. त्यांना संशय आल्यने बँकेजवळ जाऊन पाहणी केली, याची बँकेतील चोरांना चाहूल लागली. पोलिस आल्याचे लक्षात येताच त्यांनी साहित्य व रोकड टाकून अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. पोलिसांना घटनास्थळी २ लाख ४ हजार २९ रुपयांची रोकड, गॅस सिलिंडर व कटर सापडले. पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे, पोलिस कर्मचारी जे. आर. लिपने, व्ही. एन. चव्हाण, श्रीकांत चेळेकर, बी. आर. जाधव, पोलिस मित्र संतोष पुंड यांनी रात्री चोरांचा शोध घेतला. पण पोलिसांना चोर सापडले नाहीत. दरम्यान, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बाजारसावंगी येथे भेट देऊन बँकेची पाहणी केली. या बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, सुरक्षा रक्षक नाही व गेटसमोर लाईट नासल्याचे आढळले. दरम्यान, बँकेचे शाखा व्यवस्थापक शिवाजी दादाराव नलावडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गस्त घालताना बँकेचे चॅनलगेट उघडे दिसल्याने संशय आला. चोरटे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. त्यांचा रात्री शोध घेतला, पण सापडले नाहीत. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोरांना लवकरच पकडण्यात यईल.

- शिवलाल पुरभे, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत दुचाकी चोरी, घरफोडी

0
0

वाळूजमध्ये दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, वाळूज

सिडको वाळूज महानगर १मध्ये गुरुवारी मध्यरात्री कंपाउंडमध्ये लावलेली मोटारसायकल पळवण्यात आली. याच परिसरातील एका घराच्या कंपाउंड गेटचे कुलूप तोडण्यात आले, तिसऱ्या घराचा दरवाजा तोडून ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

सिडकोच्या महानगर १मधील महावीरनगर येथे एमआयडीसीचे सेवानिवृत्त कर्मचारी उत्तम वामनराव चव्हाण यांनी नेहमीप्रमाणे घराच्या कंपाउंडमध्ये लावलेली मोटारसायकल (एम एच २०, सी ई ८०५९) शुक्रवारी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान चोरून नेली.

चोरांनी कंपाउंडच्या गेटचे कुलूप तोडून ही चोरी केली. याच परिसरातील दोन घरे फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात एका कंपाउंड गेटचे कुलूप तोडले, मात्र चोरांना घरात प्रवेश करता आला नाही. तिसऱ्या एका घराच्या कंपाउंड गेटचे कुलूप तोडून घराच्या दाराची कडी तोडली, घरात प्रवेश करून ७ हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी खरेदीसाठी विवाहितेचा छळ

वाळूजः तीसगाव खवडा डोंगर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षाच्या विवाहितेचा मोटारसायकल खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याकरिता छळ करणाऱ्या पती, सासू विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी सुदाम सोनावणे, असे विवाहितेचे नाव असून पती सुदाम मन्सूब सोनवणे, सासू रुख्मणबाई मन्सूब सोनावणे मानसिक व शारीरिक छळ करत असल्याची तक्रार आहे. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल आर. डी. राजपूत तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांजणगावात कार जाळली

0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज

रांजणगाव शेणपुंजी येथील नेहरूनगरमध्ये एक कार व लोहाराचे दुकान शुक्रवारी पहाटे जाळण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी बजाजनगरमध्ये सातत्याने दुचाकी जाळण्याचे प्रकार घडले आहेत.

रांजणगाव शेणपुंजी येथील मुख्य रस्त्यावरील नेहरूनगरमध्ये रावसाहेब बोऱ्हाडे यांची महिंद्रा कॉन्टो (एम एच २०, सी एच ६०५०) राहत्या घरासमोर उभी केली होती. पहाटे चारच्या सुमाराला घरासमोर आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ बाहेर येऊन पाहिले असता त्यांची कार व रस्त्यापलिकडचे प्रल्हाद तुळशीराम लोहार यांचे दुकान जळत होते. आग लागल्याचे समजाताच शेजारच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन आग विझवली. या आगीत कारचे समोरील दोन टायर, बॉनेट, सिट, स्टेअरिंग, दरवाजे आदी जळाले आहेत. या आगीत सुमारे कारचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. लोहाराच्या दुकानातील लाकडी पलंग, तीन पोते कोळसा, लाकडी दरवाजे आदी २५ हजार रुपयांचे साहित्य जळाले. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय साठे करीत आहेत. यापूर्वी सलग तीन वर्षे बजाजनगरमध्ये दुचाकी जाळण्याचे प्रकार घडले आहेत. हे प्रकार एक वर्षापासून थांबले होते. कार जाळण्याच्या घटनेमुळे ते सत्र पुन्हा सुरू झाले का, अशी शंका नागरिकांना येत आहे.

पोलिसांसमोर आव्हान

बजाजनगरातील वाहन जाळण्याच्या प्रकारामुळे या परिसरातील अनेकांनी घरासमोर सीसीटीव्ही लावले आहेत. कार जाळण्याच्या घटनेत वाहन जाळून पळून जाणाऱ्या व्यक्तीचा फक्त कमरेखालचा भाग चित्रित झाला आहे, त्यामुळे कार जाळणाऱ्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेगळ्या विदर्भावर जनमत घ्याः अणे

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

'संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्यच आहे. हिवाळी अधिवेशनात विधानसभेत वेगळ्या विदर्भाला शिवसेनेचा विरोध तात्पुरता नसून ते त्यांचे धोरणच आहे,' असे मत महाराष्ट्राचे महाभियोक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घेऊन ५१ टक्के कौल आल्यास वेगळा विदर्भ करावा या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारची बाजू मांडण्यासाठी श्रीहरी अणे शहरात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राचे महाधिवक्ता अणे यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांचा अपमान केला आहे; त्यांना पदावरून दूर केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. या पार्श्वभूमीवर अणे यांनी शिवसेनेच्या भूमिकेविषयी भाष्य केले. 'संयुक्त महाराष्ट्रातील मराठी माणसांबद्दलची शिवसेनेची भूमिका योग्य असल्याची कबुली त्यांनी दिली. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर हिवाळी अधिवेशनात होणारा विरोध पक्षाच्या धोरणचा भाग असून ते वेगळ्या विदर्भाला कायम विरोध करत आले आहेत. त्याला अधिवेशपापुरते मर्यादित ठेवता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बापुजी अणे यांनी स्वतंत्र मराठवाडा व विदर्भाची भूमिका मांडली होती,' असे अणे म्हणाले. नव्या राज्याची निमिर्ती करतांना आर्थिक स्थिती बिघडण्याची भीती कायम दाखवली जाते, यावर त्यांनी मद्रास, छत्तीसगड, कर्नाटक आणि पंजाब राज्यातून वेगळ्या झालेल्या राज्यांची उदाहरणे दिली. तसेच नवीन राज्यांची निर्मिती झाल्यानंतर आर्थिक स्थितीबद्दल विचार केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

चळवळ उभारण्याची इच्छा नाही

स्वतंत्र विदर्भासाठी जनमत घेऊन वेगळ्या विदर्भाच्या बाजूने ५१ टक्के लोकांनी कौल दिल्यास कायदेशीर प्रक्रिया पार पाडून स्वतंत्र राज्याची निर्मिती करावी, असे मत अणे यांनी व्यक्त केले. वेगळ्या विदर्भासाठी स्वतंत्र चळवळ उभारण्याची आमची इच्छा नाही. तेलंगण राज्यासाठी उभारण्यात आलेल्या जनआंदोलनात १२०० जणांचा बळी गेला. या प्रश्नावर काही जणांना वेगळ्या विदर्भाच्या नावावर हिंसक आंदोलन अभिप्रेत आहे. त्यामुळे या प्रकारचे आंदोलन आम्ही मुळीच करणार नाही, असे अणे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको बसस्टॅण्ड सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको बसस्थानकाचा एक किलोमीटर पर्यंतचा परिसर शुक्रवारपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आला आहे. एसबीआय बँकेच्या सौजन्याने हे अठरा कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या कॅमेऱ्यांचे उद्घाटन केले. सिडको बसस्थानक हे मध्यवर्ती बसस्थानकाप्रमाणे एक महत्वाचे बसस्थानक झाले आहे. या ठिकाणी देखील हजारो प्रवाशांची गर्दी दररोज होत असते, मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती.

शुक्रवारपासून हा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ‌निगराणीखाली आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करताना अनुचित घटनांना या कॅमेऱ्यामुळे आळा बसेल अशी आशा व्यक्त केली. यावेळी उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त बाबाराव मुसळे, खुशालचंद बाहेती, सुखदेव चौगुले, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गोवर्धन कोळेकर यांची उपस्थिती होती. तसेच एसबीआयचे सहायक सरव्यवस्थापक रविंद्र पाटील, मुख्य व्यवस्थापक शिंदे, मुख्य प्रबंधक राजेंद्र अनासपुरे, दिनेश बागवे, अनिल वाळूंजकर, राजेंद्र चितळे तसेच सीसीटीही कॅमेरा बसविण्यासाठी प्रयत्न करणारे समीर आणि डी. एम. पठाण यांची उपस्थिती होती. पोलिस कर्मचारी पुंडलिक मानकापे यांनी यावेळी खुमासदार सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी पोलिस निरीक्षक ‌श्रीपाद परोपकारी, यांच्यासह उपनिरीक्षक ढोकरे, जमादार प्रमोद पवार, गोकुळ लोदवाल, राम हत्तरगे, एस. एस. आंधळे, विक्रम वाघ यांनी प्रयत्न केले.

पोलिस चौकीतील स्क्रीन गायब

तीन महिन्यांपूर्वी मुख्य बसस्टँडवर एका सामाजिक संस्थेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याच हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दृष्य दिसणारे स्क्रिन पोलिस चौकीत बसविण्यात आले होते. या चौकीतील हे स्क्रिन गायब असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी महिला वाहकांवर क्रांतिचौक पोलिसांत गुन्हा

0
0

औरंगाबाद : महिला वाहक व पोलिसांत झालेल्या मारहाणप्रकरणी महिला वाहकांसहित चौघींवर क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी हा प्रकार मध्यवर्ती बसस्थानकात घडला होता.

बसस्थानकात सुटे पैसे देण्यावरून महिला पोलिस प्रतिभा कोळी व वाहक जयश्री संदीप सदावर्ते यांच्यात वाद झाला होता. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. यावेळी पोलिस जमादार अशोक देहाडे याने मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप महिला वाहकांनी केला होता. दरम्यान, शासकीय काम करीत असताना पोलिस चौकीमध्ये जयश्री सदावर्ते, जयश्री सूर्यभान हजारे, शोभा खापर्डे व संगिता पालवे तसेच एका अनोळखी व्यक्तीने अशोक देहाडे व प्रतिभा कोळी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चौघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी यापूर्वी जयश्री सदावर्ते या महिला वाहकाच्या तक्रारीवरून जमादार अशोक देहाडे व प्रतिभा कोळी यांच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी क्रांतिचौक पोलिसात गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थाप मारून एलईडी पळविला

0
0

औरंगाबाद : एलईडी विक्रेत्याला पैसे आणून देण्याची थाप मारत एलईडी लंपास करण्यात आला. टीव्ही सेंटर ते जुना मोंढा दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण भाऊसाहेब मुठ्ठे यांचे टीव्ही सेंटर येथे प्रभा इंटरप्रायजेस नावाने एलईडी विक्रीचे दुकान आहे. ८ जुलै २०१४ रोजी त्यांच्या दुकानात अब्दुल रहेमान हा तरुण आला. त्यांने एक एलईडी विकत घेतला व जुना मोंढा परिसरातील हॉटेल स्टार लायटींग येथे हॉटेलात गेल्यावर पैसे देतो असे सांगितले. मुठ्ठे यांनी विश्वास ठेवून त्याला एलईडी देत पैसे घेण्यासाठी त्याच्यासोबत गेले. हॉटेलजवळ गेल्यानंतर एटीएममधून पैसे काढून देतो, असे म्हणत एलईडी सोबत घेऊन अब्दुल रहेमान याने रस्ता क्रॉस करीत समोरच्या एटीएममध्ये जाण्याचा बहाणा केला.तिथे उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसून अब्दुल रहेमान पसार झाला.

महिलेला मारहाण

पैशाच्या वादातून फौजिया अंजूम अफजलखान या महिलेला मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मकईगेट भागात घडला. याप्रकरणी आरोपी समीर देशमुख, जाकेर देशमुख, यासमीन व फैनिदा बेगम (सर्व रा. बिस्मीलाखान) यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांत हाणामारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळेचे प्रशासकीय अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक व पोलिस नाईक यांच्यात फ्री-स्टाईल हाणामारीचा प्रकार शुक्रवारी दुपारी टीव्ही सेंटरजवळील पोलिस पब्लिक स्कूलच्या आवारात घडला. भांडण करणाऱ्या मुलाला समजावून सांगण्याच्या वादातून हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिस नाईकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गंधपवाड हे पोलिस पब्लिक स्कूलमध्ये पोलिस व प्रशासन यामध्ये समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नेमणूक आयुक्तालयाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे. या स्कूलमध्ये पोलिस नाईक सतीश हंबर्डे (रा. पोलिस कॉलनी) यांचा मुलगा नवव्या वर्गात शिकतो. त्यांच्या मुलाचे वर्गमित्रासोबत शुक्रवारी सकाळी भांडण झाले होते. यावे‌ळी दोन्ही विद्यार्थ्यांना गंधपवाड यांनी समजावून सांगितले होते. दरम्यान, हंबर्डे यांच्या मुलाने आपल्याला शाळेत मारहाण केल्याची माहिती दिली. शाळा सुटल्यानंतर हंबर्डे हे शाळेच्या आवारात आले. माझ्या मुलाला कोणी मारले या कारणावरून त्यांनी गंधपवाड यांच्याशी वाद घालत मारहाणीला सुरुवात केली. या मारहाणीचे रुपांतर हाणामारीत झाले. शाळेच्या आवारामध्येच पीएसआय आणि पोलिस नाईक यांच्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली तेव्हा शाळा नुकतीच सुटलेली होती. यावेळी अनेक पालक आपल्या पाल्यांना घेण्यासाठी शाळेच्या गेटवर आलेले होते. या शाळेशेजारीच पोलिस कॉलनीही आहे. शाळेत आलेल्या पालकांसह कॉलनी परिसरातील नागरिकांची गर्दी यावेळी जमा झाली होती. काही पालकांनी मध्यस्थी करीत हे भांडण सोडविले.

या प्रकारानंतर पीएसआय गंधपवाड यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिस नाईक सतीश हंबर्डे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश हंबर्डे हे पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत या प्रकरणी तपास करीत आहेत.

स‌िम वापरणाऱ्यावर गुन्हा

सुनील अशोक दहिहंडे या तरुणाचे टाटा डोकोमो कंपनीचे हरवलेले सीमकार्ड बंद झाले होते. मात्र, हे सीमकार्ड कांबळे नावाची व्यक्ती वापरत असल्याची माहिती सुनील दहीहंडे याला मिळाली. या माहितीनुसार त्याने सिडको पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

तेरा वर्षाच्या मुलीचे अपहरण

लग्नाचे आमिष दाखवून तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार मुकुंदवाडी भागात शनिवारी घडला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी वकिलांची सेवा समाप्ती नोटीस रद्द

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

तडकाफडकी सेवा समाप्त केलेल्या सरकारी वकिलांनी शासनाच्या या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले होते. शासनाचा हा आदेश रद्द करण्यासाठी वकिलांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी मंजूर केली. राज्य शासनाची ही कृती म्हणजे हेतुपूर्वक केलेली कारवाई, असे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत. पण सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी कोर्टाने आपल्याच आदेशाला १ महिन्याची स्थगिती दिली.

युती शासनाने सत्तेवर येताच सरकारी वकिलांच्या सेवा संपुष्टात आणण्याचा नोटीस बजावल्या होत्या. त्याला वकिलांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. औरंगाबाद खंडपीठातील १५ सरकारी वकिलांच्या सेवा समाप्तीचे आदेश २८ अॉगस्ट रोजी विधी व न्याय विभागाने दिले. वकिलीचा सात वर्षांचा अनुभव, ५५ वर्षांपेक्षा जास्त वय नसावे, अशा यातील अटी होत्या. तसेच यामध्ये नवीन नियुक्त्या देताना सध्यास्थिती कार्यरत असलेल्या विधी अधिकाऱ्यांच्या सेवा आपोआप संपुष्टात येतील, असे नमूद केले होते.

आघाडी सरकारने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीअगोदर काही सरकारी वकीलांची नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच ही जाहिरात देण्यात आली. या निर्णयाविरोधात नंदुरबार, परभणी, जालना, उमरगा आणि औरंगाबाद खंडपीठातील १६ सरकारी वकिलांनी याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने सरकारी वकिलांच्या सेवा संपुष्टात करता येणार नाही, असा निकालही यापूर्वी दिला होता. औरंगाबाद खंडपीठातील अतिरिक्त सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील या पदावरील विधी अधिकाऱ्यांच्या सेवा शासनाने शेवटी संपुष्टात आणल्या. महाराष्ट्र विधी अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम १९८४ मधील नियम क्रमांक ३० (५) नुसार सेवा समाप्तीची अधिसूचना जाहीर करण्यात आली. विधी व न्याय विभागाने ही अधिसूचना काढली असून त्यात खंडपीठातील १५ सरकारी वकिलांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्या होत्या. यामध्ये एस. जी. नांदेडकर, सुनील दौंड, किशोर जी. पाटील, संभाजी टोपे, आर. पी. फाटके, के. एम. सूर्यवंशी, के. जे. घुटे, एस. एस. अंबाड, व्ही. डी. गोडभरले, जी. आर. इंगोले, वैशाली शिंदे-मोरे, सुनीता शेळके, प्रतिभा भराड व योगिता क्षीरसागर-थोरात यांचा समावेश होता. या प्रकरणात वकिलांची बाजू व्ही. डी. सपकाळ यांनी मांडली. विशेष सरकारी वकील विनायक दीक्षित यांनी राज्य शासनातर्फे काम पाहिले.

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जायचे की नाही यावर निर्णय होणे बाकी आहे. जानेवारीअखेरपर्यंत स्थगिती आहे. सहायक सरकारी वकिलांची मुदत ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. त्यांचा थोडा कालावधी बाकी आहे.

- श्रीहरी अणे, महाधिवक्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्या महिलने केले गरोदरपणाचे नाटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गर्भवती महिलेचे अपहरण करून तिची जुळे मुले पळवण्याचा प्रकार खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुल होत नसल्याने सासरची मंडळी टोमणे मारत असल्याने त्या महिलेने हा बनाव केला, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

पत्नीचे बुधवारी सकाळी अपहरण करून तिची प्रसृती करीत जुळी मुले पळवण्यात आल्याची तक्रार वैजापूर येथील सुनील कटारे याने सिडको पोलिस ठाण्यात गुरूवारी दिली होती. पत्नी कविता कटारे हिचे सेव्हनहिल परिसरातील एका खासगी ह़ॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी जाताना अपहरण करण्यात आले. प्रसुतीनंतर जुळ्या मुलांचे अपहरण करून महावीर चौकात सोडून देण्यात आले. पत्नी कविता सध्या वैजापूर येथील दवाखान्यात असल्याचे माहिती कटारे यांनी दिली होती. हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. सुनील कटारेने नाव घेतलेल्या हॉस्पिटलमध्ये कविता कटारे यांच्या नावाची, उपचाराची किंवा प्रसुती होणार असल्याची नोंद पोलिसांना आढळली नाही. त्यानंतर पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी गुरुवारी रात्री वैजापूर येथे जाऊन चौकशी केली असता या महिलेच्या सुतीच्या उपचाराची कोणतीही नोंद नसल्याचे आढळले. अधिक चौकशीत तिने हा बनाव केल्याचे उघ़डकीस आले.

असे रचले नाटक

सुनील व कविता यांना तीन वर्षांपूर्वी झालेली मुलगी काही दिवसानंतर वारली होती. त्यानंतर सासरी मुल होत नसल्याने टोमणे मारणे सुरू होते. याला कंटाळून कविता गर्भवती असल्याचे नाटक रचले. पतीलाही न सांगता ती पोटावर कपडे गुंडाळून वावरत होती. नात्यातील एका भावाच्या मदतीने दर महिन्याला औरंगाबादमध्ये येऊन तपासणीचे नाटक करून ती गावाकडे परत जात होती. तिने बुधवारी प्रसृती होणार असल्याचे सांगितले. पण बनाव उघडकीस येईल, असे लक्षात आल्याने रस्त्यातच पतीला थांबवून घरून दुपटे आणण्यास सांगितले. त्याने हॉस्पिटलला सोडतो म्हणून सांगितल्यानंतरही नकार दिला. सुनील दुपटे आणण्यासाठी घरी गेल्यानंतर ती बेपत्ता झाली. सेव्हनहिलपर्यंत पायी गेल्यानंतर तिने रिक्षाने महावीर चौक गाठला व येथे घाबरल्याचा बनाव केला, असे तपासात निष्पन्न झाले.

गर्भवती तरुणीने जुळी मुले पळवल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. तपासामध्ये तिने गर्भवती असल्याचे सासरच्या मंडळींना भासवले. वैजापूर जाऊन तिची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोत गाठवणाऱ्या महिलेने पळवले वृद्धेचे दागिने

0
0

कमी मजुरी दिल्याचा आरोप करून मारहाण

औरंगाबाद : पोत गाठवणाऱ्या महिलेने जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ७६ हजाराचा ऐवज हिसकावला. हा प्रकार जयभवानीनगर येथील विनायक ज्वेलर्सच्या बाहेर घडला. याप्रकरणी या महिलेविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुलकुवर पगारिया (वय ७४) यांनी मंगळवारी विनायक ज्वेलर्स येथील मालकाला तुटलेली पोत गाठवण्यासाठी दिली. त्याची मजुरी पन्नास रुपये ठरली. दुकानमालकाने दुकानाबाहेर बसलेल्या बाईला बोलावून पोत गाठवण्यासाठी देत पगारिया यांना दुसऱ्या दिवशी बोलावले. त्या बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गेल्या. त्यांनी पोत घेऊन मजुरी दिली. त्यावेळी पोत गाठवणारी महिला शोभाबाई सुधाकर सोनटक्के दुकानात आली व शंभर रुपये मजुरी मागत हुज्जत घातली. पगारिया यांना दुकानाबाहेर आल्यानंतर मारहाण करीत ढकलून दिले व सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर तेथेच पडलेले सोन्याचे ४२ मनी व दोन ग्रॅमचे डोरले सापडले. त्यांच्या गळ्यातील उर्वरित सहा हजार रुपये किंमतीचे मणी व सत्तर हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण, असा ७६ हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे आढळले. पगारिया यांनी ज्वेलर्सच्या मालकाला जाब विचारला असता दुकानदार व शोभाबाई सोनटक्के यांनी पुन्हा हुज्जत घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवाभावातून पॅचवर्क

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पाच रस्त्यांवर कंत्राटदारांच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने पॅचवर्क केले जाणार आहे, यापैकी दोन रस्त्यांवरचे पॅचवर्क पूर्ण होत आले आहे. मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेल्या दट्ट्यामुळे पालिकेचे 'बडे' कंत्राटदार आता कामाला लागले आहेत. कंत्राटदारांकडून विनामोबदला पॅचवर्क करून घेण्याची पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

ज्या कंत्राटदारांकडे शहरातील रस्त्याची जास्त कामे आहेत त्यांच्याकडून सेवाभावी वृत्तीने रस्त्यांवर पॅचवर्कचे काम करून घेण्याचे सुनील केंद्रेकर यांनी ठरवले. त्यानुसार कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्या माध्यमातून त्यांनी कंत्राटदारांची बैठक बोलावली. महापालिकेने दिलेल्या कामांमुळेच तुम्ही मोठे झाले आहात आता महापालिकेसाठी तुम्ही काही तरी करा, असे आवाहन त्यांनी केले. जे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत, त्या रस्त्याचे पॅचवर्क करून रस्ते सुस्थितीत करा, असे आवाहन त्यांनी केले. या कामासाठी महापालिकेकडून पैसे दिले जाणार नाहीत, कंत्राटदारांनी स्वखर्चाने हे काम करावे, असे त्यांनी सांगितले. कंत्राटदारांच्या एमबीमध्ये (मोजमाप पुस्तिका) त्याची नोंद पालिकेतर्फे केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रेकरांच्या आवाहनाला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला.

इथे होणार काम

टीव्ही सेंटर ते सेव्हनहिल्स हा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला विनामूल्य पॅचवर्क करण्यासाठी देण्यात आला आहे. तीन दिवसात पॅचवर्कचे काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. सिडको बसस्टँड चौक ते मुकुंदवाडी चौक या रस्त्याच्या पॅचवर्कचे काम आदिनाथ कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते, हे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. कटकटगेट ते पोलिस मेस या रस्त्याच्या पॅचवर्कचे काम एम. ए. सिद्दिकी या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. एकता चौक ते पीरबाजार या रस्त्याच्या पॅचवर्कचे काम एलोरा कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते, हे काम देखील पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. कामगार चौक ते हायकोर्ट व वीजमंडळ उपकेंद्र ते पुंडलिकनगर या रस्त्याच्या पॅचवर्कचे काम ए. एस. कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड दिवसाचे आंदोलन; ३ कोटींचा फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के वेतनवाढीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉँग्रेसने पुकारलेल्या संपामुळे दीड दिवसात मराठवाड्यात एसटीला तब्बल ३ कोटींचा फटका बसला. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी दुपारपासून हा संप मागे घेण्यात आला. या घोषणेने परगावचे अडकलेले प्रवासी, वाहक, चालकांनी सुटकेचा श्वास सोडला.

औरंगाबादमध्ये एसटीचा थांबलेला प्रवास अकोला - पुणे बस रवाना करून सुरू झाला. इंटकने गुरुवारपासून पगारवाढीसाठी राज्यव्यापी संप सुरू केला होता. त्यामुळे दिवसभर एसटी वाहतूक बंद होती. परगावच्या अनेक अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना शुक्रवारी सकाळीही संप सुरू असल्यामुळे त्रास सहन करावा लागला.

अनेकांनी अव्वाच्या सव्वा पैसे देऊन खासगी बसने प्रवास केला. तर अनेक प्रवासी संप मिटण्याची वाट पाहत बसले होते. मध्यवर्ती बसस्थान, सिडको बसस्थानकावर बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना तसेच इतर मार्गावर जाण्यासाठी आलेल्या प्रवासी ताटकळत होते. आंदोलनाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. शुक्रवारी दुपारी संप मिटल्याचे जाहीर केल्यानंतर प्रवाशांचे चेहरे आनंदाने उजळले. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून, घोषणा देत आनंद साजरा केला.

आंदोलन संपताच मध्यवर्ती बसस्थानकातून अकोला - पुणे ही गाडी अकोल्याकडे निघाली. यानंतर बाहेरगावी निघालेल्या सर्व एसटी बस आपल्या आगाराकडे गेल्या. शहरात सिटीबस, शिवनेरी, निमआराम आणि साध्या वर्गातील सर्व बस सेवा सुरू झाल्या. औरंगाबादमध्ये दीड दिवसातील संपात जवळपास ७५ बसचे टायर फोडले. यात जवळपास २० टायरचे नुकसान झाल्याचे समजते.

शिवनेरी ४ वाजता निघाली

औरंगाबाद - पुणे मार्गावर चालणारी शिवनेरी बससेवा बंद होती. या मार्गावर शिवनेरीच्या १८ फेऱ्या चालतात. मात्र, संपाच्या काळात ही सेवा बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शुक्रवारीही ‌दुपारपर्यंत त्यांना बसची वाट पहात बसावी लागली. त्यामुळे एसटीचे अडीच लाखांचे उत्पन्न बुडाले.

बसस्टॅंडमध्येच दिवस

औरंगाबाद विभागात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक वाहकांची संख्या २,८९१ इतकी आहे. इंटक संघटनेच्या आंदोलनात१,२९९ कर्मचारी सहभागी झाले. यात चालक ५९२ आणि वाहकांची ५४५ इतकी संख्या होती. आंदोलनामुळे एसटीच्या अन्य चालक आणि वाहकांना गाड्या निघण्यासाठी जागा नसल्याने बस स्थानकातच बसून राहावे लागले.

७५ टायर फोडले

मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात दीड दिवसांत जवळपास दोनशेच्यावर गाड्या थांबल्या होत्या. त्यापैकी ७५ बसचे टायर अज्ञातांनी फोडले आहेत. टायर पंक्चर करण्यासाठी टोचाचा वापर करण्यात आला. एका टायरची किंमत बारा हजार रुपये आहे. वीसच्यावर टायरचे पंक्चरमुळे नुकसान झाले. नुकसानीचा आकडा ३ कोटींचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विभागाचे चित्र

२,८९१ एसटी कर्मचारी

१,२९९ कर्मचारी संपात सहभागी

५९२ चालक संपात

५४५ वाहक सहभागी

२०० पैकी ७५ बसचे टायर फोडले

१२ हजार एका टायरची किंमत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलवाले विरोधात छावाची निदर्शने

0
0

औरंगाबादः शाहरूख खानच्या दिलवाले या चित्रपटाविरोधात छावा मराठा युवा संघटनच्या वतीने शुक्रवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. फेम तापडिया येथे संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र व मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे असताना शाहरूख इथे मदत न करता चेन्नई व पाकिस्तानला मदत करत आहे. ज्या महाराष्ट्राने भरभरून दिले त्याची जाण शाहरूख खानला राहिली म्हणून म्हणून छावा संघटनेने शाहरूखचा निषेध करत जोरदार निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमेश केरे, शहराध्यक्ष विवेक वाकोडे, शिक्षक संघटनेचे जिल्हाप्रमुख डी. के. चव्हाण, किशोर शिरवत, नामदेव चव्हाण, शुभम केरे, विशाल पवार, शिवाजी पाटील, राहुल पाटील, मयूर सोनवणे, मंगेश पाटील, उबाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ किलो कॅरिबॅग जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुकुंदवाडी परिसरात महापालिकेच्या पथकाने कारवाई करत ६० किलो कॅरिबॅग जप्त केल्या. जप्त केलेल्या सर्व कॅरिबॅग ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आहेत.

महापालिकेने दोन दिवसांपासून कॅरिबॅग विक्रेते आणि प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करणे सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी दोन क्विंटल कॅरिबॅग मोतीकारंजा व पानदरीबा भागातून जप्त करण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी मुकुंदवाडी भागात कारवाई करण्यात आली. या भागातील ओम प्रोव्हिजन्स अँड राइस सेंटर, श्री साई प्रोव्हिजन्स, न्यू माऊली प्रोव्हिजन्स, बिकानेर मिठाई या दुकानांसह मुकुंदवाडी मंडईतील फळ व भाजीपाला विक्रेते, चिकन मटन विक्रेत्यांच्या दुकानांवरही कारवाई करण्यात आली. या सर्वांकडून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. सुमारे ६० किलो कॅरिबॅग व सात किलो प्लास्टिकचे ग्लास जप्त केले.

सातारा परिसरात कारवाई

बीड बायपास रोड नजिक सातारा परिसरात पाच दुकानांवर कारवाई करून ३ किलो ४०० ग्रॅम कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. या पाचही दुकानदारांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापनकक्ष प्रमुख शिवाजी झनझन यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images