Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विषप्राशनानंतर सुरू झाले टँकर

$
0
0

औरंगाबाद : दहेगाव-मुरमी ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच विक्रम राऊत यांनी विषप्राशन केल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून मागणीप्रमाणे या गावांना शुक्रवारपासून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले. दरम्यान, सरपंच राऊत यांच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दहेगाव बंगला, मुरुमी व सांरगपूर या तीन गावांची ग्रुपग्रामपंचायत असून तेथे टेंभापुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने या तिन्ही गावातील ग्रामस्थांना गेल्या काही महिन्यापासून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे या गावांना टॅकरद्वारे पाणीपुरवठा करावा,यासाठी सरपंच राऊत गेल्या तीन महिने प्रयत्नशील होते. पाठपुरावा करूनही पाणी मिळत नसल्याने त्यांनी गुरुवारी गंगापूर येथील गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर विष प्राशन केले. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने माहिती मागवून घेऊन टँकर सुरू करण्याचे आदेश दिले, अशी माहिती सरपंच राऊत यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दहेगाव येथे टँकर सुरू झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारचा नियोजित मोर्चा रद्द केला आहे. लोडशेंडिग बंद करा, टंचाईग्रस्त भागात टँकर सुरू आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, गंगापूर तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ, सूर्यकांत गरड आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शपथपत्र दाखल करा; आयुक्तांना आदेश

$
0
0

म. टा .विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

शहराच्या समांतर जलवाहिनीच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी २३ डिसेंबरला शपथपत्र सादर करावे, असे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या.ए.आय.एस.चिमा यांनी शुक्रवारी दिले.

समांतर योजना राबविणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर बंधने घालण्यात आली आहेत. वसुलीबाबत ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, अथवा जबरदस्तीची कृती करू नये. नळ कापले जाऊ नयेत, जादा व्याजदर आकारू नये अशी बंधने समांतर कंपनीवर लादली आहेत. समांतर जलवाहिनी पाणीपुरवठ्याच्या विरोधात तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या याचिकांवर सुनावणी झाली.

खासगीकरणाविरुद्ध स्थापन झालेल्या नागरी कृती समिती तर्फे प्रा. विजय दिवाण, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील, जलाधिकार कृती समितीचे विजय शिरसाट व सचिन भोजने यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल करून योजनेचे स्वरूप, समांतरचा करार आणि त्याची अंमलबजावणी यांच्या वैधतेविषयी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी होणार आहे. दिवाण यांच्यातर्फे उदय बोपशेट्टी, राजेंद्र दाते पाटील यांच्यातर्फे अनिल गोळेगावकर, विजय शिरसाट यांचे वकील प्रदीप देशमुख, पालिकेतर्फे नंदकुमार खंदारे आणि राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरसिंग गिरासे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक कोटीचे बोगस पीककर्ज वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

बनावट कागदपत्रे तयार करून आणि अस्तित्वात नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने एक कोटी १४ लाख रुपयांचे बोगस पीककर्ज वाटप करण्यात आले. याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे कुंभारपिंपळगाव (ता.घनसावंगी) येथील शाखा व्यवस्थापक पद्माकर ज्योतीपूरकर आणि दीपक गोडसे यांच्यासह एकशे दोन शेतकऱ्यांविरूद्ध बँकेची फसवणूक आणि अपहार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुंभारपिंपळगाव येथील शाखेत बनावट कागदपत्रे तयार करून सन २००७ ते २००९ या कालावधीत बोगस पीककर्जाचे वाटप करण्यात आले. यासर्व प्रक्रियेत तत्कालीन शाखा व्यवस्थापक ज्योतीपूरकर आणि गोडसे यांचा महत्वाचा सहभाग होता. त्यांच्यासोबतच पीककर्ज वाटप करणाऱ्या मध्यस्थ दलालांची तेवढीच भूमिका होती. या प्रकरणी बँकेच्या अंतर्गत ऑडिटमध्ये अनेक वेळा त्रुटी निदर्शनास आल्या. या प्रकरणी एक जागृत नागरीक दिगंबर रामभाऊ जाधवर (रा.पिपंरखेड, ता.घनसावंगी) यांनी तक्रार केली. त्यानंतर बँकेच्या वरिष्ठ यंत्रणा जाग्या झाल्या. त्यांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या चौकशीत शेकडो जणांचे जवाब नोंदवण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रचे औरंगाबाद येथील वरीष्ठ व्यवस्थापक विजय कांबळे यांनी चौकशी केली. पीककर्ज वाटपात पाडुरंग विठोबा भांगे (रा. पिपंरखेड) यांनी विजय गुळ युनिट या कंपनीच्यावतीने अनेक व्यक्तींना जमीन नसताना आहेत असे दाखवून ऊसासाठी पीककर्ज घेतले.

अशास्वरुपाची अनेक प्रकरणे बँकेत दाखल करून रक्कम उचलून घेतली. यामध्ये किसन श्रीराम भांगे आणि वेणूबाई किसन मुंडे या नावाच्या दोन व्यक्ती अस्तित्वात नसताना सुद्धा त्यांच्या नावावर पीककर्ज उचलून घेतले आहे. यासर्व प्रकरणाची सखोल चौकशी बँकेच्यावतीने करण्यात आल्यानंतर या संदर्भात महाराष्ट्र बँकेचे कुंभारपिंपळगाव शाखेचे विद्यमान व्यवस्थापक रमेश भानाकर यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.



जमीन नसतानाही ‌दिले कर्ज

महाराष्ट्र बँकेकडे जी जमिनी तारण ठेवून काही जणांनी कर्ज घेतले होते. त्यांनी तीच जमीन अन्य एका नागरी सहकारी बँकेकडे तारण ठेवून तेथून देखील कर्ज उचलले आहे. अनेक जणांनी तारण म्हणून ठेवलेली जमीन चक्क विकून टाकली. तर सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक व्यक्तींना जमीन नसताना बोगस सातबारावर पीककर्ज देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यात सर्वत्र नॅशनल हेरल्ड प्रकरणी निर्दशने करण्यात आली. या आंदोलनाच्या निमित्ताने सर्वत्र काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहवयास मिळाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

औरंगाबादमध्ये निदर्शने

औरंगाबाद: बहुचर्चित हेरॉल्डप्रकरणी काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याच्या आरोपावरून शहर काँग्रेसच्यावतीने शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. गांधीपुतळा येथे शनिवारी दुपारी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, विलास औताडे, भाऊसाहेब जगताप, विनोद तांबे, मनोज पाटील, हमद चाऊस, राजेंद्र दाते, अनिल सोनवणे, जगन्नाथ काळे, लियाकत पठाण, सुदाम सोनवणे, खालेद पठाण, सरोज मसलगे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निदर्शनापूर्वी गांधीभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार सत्तार म्हणाले, 'देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा डाव आता जास्त दिवस चालणार नाही. भाजपला देशातील जनता योग्य जागा दाखवून देईल.' कल्याण काळे म्हणाले, 'स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचा सहभाग सक्रिय होता, हे विसरून चालणार नाही.'

कन्नडमध्ये आंदोलन

कन्नड : शहरातील बाळासाहेब पवार चौकात कन्नड तालुका काँग्रेसच्यावतीने नॅशनल हेरल्ड प्रकरणी माजी आमदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी तालुकाधध्यक्ष बाबासाहेब मोहिते, नगराध्यक्ष संतोष कोल्हे, भाऊसाहेब थोरात, अब्दुल जावेद, राजकुमार गंगवाल, चंद्रकांत देशमुख, नासेर शेख, उपस्थित होते.

उस्मानाबादमध्ये घोषणाबाजी

उस्मानाबाद : भाजप सरकारकडून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्यावर नॅशनल हेरल्ड प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. या विरोधात उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वैजापूरमध्ये निषेध

वैजापूर : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचा निषेध करण्यासाठी तालुका काँग्रेसतर्फे शनिवारी आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश नाईकवाडी यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती,कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष तांबे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, शेख सलिम, सारंगधर डिके, प्रमोद नांगरे, ईद्रिस खान, बाळा सुतवणे, ज्ञानेश्वर घोडके, प्रविण तांबे आंदोलनात सहभागी झाले होते.

जालन्यात आंदोलन

जालना : नॅशनल हेरल्ड प्रकरणी जालना शहरात निर्दशने करण्यात आली. या आंदोलनाच्या निमित्ताने जालन्यातील काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

काँग्रेसची निदर्शने

लातूर : काँग्रेस कार्यकर्त्यांनी लातूरात दोन ठिकाणी निदर्शने केली. माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, तालुका अध्यक्ष दगडुसाहेब पडीले यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. रघुनाथ मदने, सुरज वाजे, जावेद मणियार, विजय पारीख, रहेमान शेख, पप्पु देशमुख, अॅड. समद पटेल आदी सहभागी झाले होते.

नांदेडमध्ये जत्रेचे स्वरूप

नांदेड : संपत्तीच्या विवादाची बंद पडलेली फाइल पुन्हा उघडून काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना बदनाम करण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या सूड सत्राच्या विरोधात शनिवारी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जत्रेचे स्वरुप आले होते. तब्बल चार तास संपूर्ण वाहतूक बंद पडली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धरणे आंदोलनाचे नेतृत्व आमदार अमिता चव्हाण, वसंतराव चव्हाण, अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी केले. यावेळी अब्दुल सत्तार, शफी अहेमद कुरेशी, मंगला निमकर यांची भाषणे झाली. या धरणे आंदोलनास महापौर शैलजा स्वामी, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगला गुंडले, माधवराव पाटील-जवळगावकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅन्सी नंबरप्लेट; काळ्या फिल्मवर बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकी, चारचाकी वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट तसेच काळ्या फिल्म लावण्यास पोलिस आयुक्त अतिमेश कुमार यांनी एका आदेशान्वये बंदी घातली आहे. फॅन्सी नंबरप्लेट व काळ्या फिल्म बसवून देणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला असून, नियमाप्रमाणे नंबरप्लेट वाहनावर लावावी, असे आवाहन केले आहे.

वाहनांवरील फॅन्सी नंबरप्लेटमुळे वाहनांचे नंबर जनतेस किंवा सुरक्षा यंत्रणेस दिसत नाहीत. विचित्र अक्षरांमुळे मुळे खरा नंबर कळत नाही. अशा फॅन्सी नंबरप्लेटचा उपयोग अनेकदा गुन्हेगारी वृत्तीचे लोक करतात व पसार होतात. त्यांचा सुगाव लागत नाही. अशा गुन्ह्यांमुळे जनतेच्या मालमत्तेस, जीवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फॅन्सी नंबरप्लेट कुणीही तयार करून देऊ नये, तसेच वाहनचालकांनीही लावू नये, नियमाप्रमाणे असलेली नंबरप्लेट लावावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दुकानदारांनी नंबरप्लेट तयार करताना वाहनाचे आर. सी. बुक किंवा मोटार परिवहन विभागाने दिलेले संदेश, वाहन मालकाचे फोटो, ओळखपत्र आदी दस्तऐवज पाहून नंबरप्लेट तयार केल्याबाबतच्या नोंदी स्वंतत्र रजिस्टरमध्ये कराव्यात. चारचाकी वाहनाला काळ्या फिल्म लावून देऊ नये, आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याचे वासे फिरलेलेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकप्रतिनिधींमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि प्राप्त झालेल्या हरकती सूचनांकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सातारावासीयांची अवस्था त्रिशंकू झाली आहे. ना नगरपालिकेत, ना महापालिकेत अशी स्थिती निर्माण झाल्याने या भागातील विकासाचे चाक रुतून बसले आहे.

सातारा - देवळाईचा महापालिकेत समावेश करावा यासाठी जानेवारी २०१५ पासून प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याचा परिणाम म्हणून शासनाने सातारा - देवळाईचा महापालिकेत समावेश केल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार परिसरात वॉर्ड रचनेचे कामही सुरू झाले. मात्र, दरम्यानच्या काळात काही नागरिकांनी कोर्टात धाव घेतली. महापालिका समावेशाची अधिसूचना काढताना नगरपालिका बरखास्तीचे आदेश शासनाने काढले नाहीत, त्यामुळे वेगळीच स्थिती या परिसरात निर्माण झाली. जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेने या परिसरात विकास कामे करता येत नाहीत, असे म्हणून हात वर केले. साताऱ्यातील प्रसिध्द खंडोबा यात्रेच्या वेळीही पथदिवे लावणे, रस्ता दुरुस्त करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे ही कामे झाली नाहीत.

सूचनांचा विचार नाही

राज्य सरकारने नगरपालिका बरखास्तीची अधिसूचना ६ ऑक्टोबर रोजी काढली. त्यावर ७ नोव्हेंबरपर्यंत सूचना - हरकती मागवल्या. ४,३८५ हरकती प्राप्त झाल्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने या हरकती - सूचनांवर अद्याप निर्णय घेतला नाही. जिल्हा प्रशासनाचा निर्णय झाल्यास सरकार सातारा देवळाई बद्दल अंतिम निर्णय घेऊ शकेल.

मी विधान परिषदेच्या निवडणुकीत व्यस्त आहे. त्यामुळे सध्यातरी सातारा - देवळाईबद्दल मला काही बोलता येणार नाही. - रामदास कदम, पालकमंत्री

सातारा - देवळाई प्रकरणात भाजपने खोडा घातला, हे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सिध्द करून दाखवावे. कुणी कोर्टात गेले, तर त्याला भाजप जबाबदार कसे असू शकते. खासदारांचे विधान दिशाभूल करणारे आहे. सातारा - देवळाईचा परिसर शहराला लागून आहे. त्यामुळे त्याचा समावेश महापालिकेत व्हावा, अशी आमची भूमिका आहे. प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा. - अतुल सावे, आमदार

सातारा-देवळाईचा परिसर महापालिकेत घेण्याचे ठरले होते, पण त्यात भाजपवाल्यांनी खोडा घातला आहे. त्यांना तेथे नगरपालिकाच हवी आहे. त्यात त्या गावांचे नुकसान होत आहे. भाजपवाले मनाला वाटेल तसे वागू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. हा संपूर्ण परिसर महापालिकेत आला, तर त्या परिसराचा योग्य प्रकारे विकास होईल. नगरपालिका स्थापन झाली तर उत्पन्नाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे लोकांना फसवणे बंद करून सातारा - देवळाईचा परिसर महापालिकेत यावा यासाठी प्रयत्न व्हावे. सूचना-हरकती निकाली काढण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. - चंद्रकांत खैरे, खासदार

सातारा - देवळाई भागात एकही काम करता येत नाही, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या हरकती - सूचनांवर निर्णय घ्यायला हवा होता. आता त्यांचीच भूमिका महत्त्वाची आहे. सातारा - देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट करून घेण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, यासाठी पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे. - त्र्यंबक तुपे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूलमधील कैद्यांची फौजदारास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गाडीत बसण्याच्या कारणावरून तीन कच्च्या कैद्यांनी सहाय्यक फौजदारास मारहाण केली. जिल्हा कोर्टासमोर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

हर्सूल कारागृहातील कैदी श्वेता युवराज ढगे (रा. तिसगाव), योगेश नंदू सांगळे व रवी पंडित गाडेकर यांना न्यायालयीन कामकाजानिमित्त शुक्रवारी कोर्टात आणले होते. त्यांना आणण्याची व हर्सूल कारागृहात नेण्याची जबाबदारी जवाहर पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक फौजदार भिकचंद सांडूज घिरटे व त्यांचे सहकारी नरवडे यांच्याकडे होती. कोर्टातील काम झाल्यानंतर कैद्यांना घेऊन सहाय्यक फौजदार घिटरेसह सर्वजण वाहनाने हर्सूलकडे निघाले. त्यावेळी गाडीत कोणी कुठे बसणार, यावरून कैद्यांनी घिरटे यांच्याशी वाद घातला. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी कैद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी घिरटे यांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेताना ‘आरेखक’ गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रमाई घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्याची रक्कम देण्यासाठी १ हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी पंचायत समितीचे आरेखक पुंजाजी लहाने यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारास २०१४-१५ मध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. त्याने नियमानुसार घरकुलाचे पहिल्या टप्प्यातील बेसमेंटपर्यंतचे काम स्वखर्चाने पूर्ण केले. या बांधकामाची पाहणी केल्यानंतर खर्चाचा पहिला हप्ता मिळणार होता. सदर कामाची जबाबदारी पंचायत समितीतील कनिष्ठ आरेखक पुंजाजी लहाने (रा. खिवंसरा पार्क) याच्याकडे होती. पुंजाजीने हे काम करून देण्यासाठी तक्रारादाराकडे एक हजाराची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर अधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, प्रमोद पाटील यांनी शुक्रवारी शहानुरमियॉँ दर्गा परिसरात सायंकाळी साडेपाच वाजता सापळा लावून लहाने यास एक हजार रुपये घेताना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्य संमेलन नवीन पायंडा पाडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पिंपरी चिंचवड येथील नियोजित ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवीन वाड्मयीन पायंडा पाडणार आहे. चाळीस एकरवर चार मंडप उभारले जाणार असून ज्येष्ठ गीतकार गुलजार, ज्येष्ठ नेते शरद पवार व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रकट मुलाखत संमेलनाचे वैशिष्ट्य ठरेल,' अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली. साहित्य संमेलनानिमित्त शनिवारी शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड येथे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आहेत. भव्य स्वरूपातील आयोजनामुळे संमेलन चर्चेत आहे. मराठवाड्यातील साहित्य रसिक व साहित्यिकांना निमंत्रण देण्यासाठी डॉ. पाटील शनिवारी शहरात होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संमेलन आयोजनाची भूमिका मांडली.

'राज्यातील वेगवेगळ्या भागात संमेलनाला पाठिंबा मिळत आहे. पिंपरी चिंचवडला चाळीस एकर जागेवर मंडप उभारणार आहे. पुस्तक विक्रीचे ५०० स्टॉल्स असतील. पहिल्या दिवशी ज्येष्ठ गीतकार गुलजार यांची मुलाखत होईल. संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच १७ जानेवारीला शरद पवार व डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रकट मुलाखत होईल. २२ परिसंवाद, बहुभाषिक कविसंमेलन, 'लेखक आपल्या भेटीला' आणि तरुण रसिक जोडणारे कार्यक्रम आहेत' असे पाटील यांनी सांगितले. या संमेलनात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची संगीत रजनी होणार आहे. तर समारोपाला प्रसिद्ध लेखक चेतन भगत, गीतकार जावेद अख्तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, संमेलन गुणात्मकदृष्ट्या यशस्वी करण्यासाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू केली आहे. तसेच 'साहित्यमित्र' नावाचा अॅप बनवला आहे. या पत्रकार परिषदेला संयोजक सचिन इटकर, कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे उपस्थित होते.

दुष्काळग्रस्तांना मदत

साहित्य संमेलन आयोजनात सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ७० लाख रुपये दिले जाणार आहेत. ग्रंथ प्रदर्शनातील निधीही याच कामासाठी खर्च केला जाईल, असे सचिन इटकर यांनी जाहीर केले. संमेलन झाल्यानंतर मराठी भाषेचे अध्यासन केंद्र सुरू केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलांचे जानेवारीत सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण नवीन वर्षात केले जाणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात राज्यभर हे सर्वेक्षण होणार असून, ३ हजार कॉलेजांमधील ३ लाख विद्यार्थी त्याचे काम करणार आहेत. यापूर्वी ४ जुलै रोजी शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणावरून राज्यभर गदारोळ झाला होता.

शाळाबाह्य मुलांची स्थिती चिंताजनक आहे. शाळाबाह्य मुलांची संख्या लाखात असताना शिक्षण विभागाच्या ४ जुलैच्या सर्वेक्षणात राज्यात केवळ ५३ हजार शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद झाली. यावर अनेक संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर शासनाने हे सर्वेक्षण नव्याने करण्यात येईल असे जाहीर केले. शिक्षण विभागाकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने हे काम राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक करणार आहेत. राज्यातील ३ हजार कॉलेजचे ३ लाख स्वयंसेवक सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. जानेवारी २०१६ च्या दुसऱ्या पंधरावाड्यात राज्यभर हा सर्वे होणार आहे. याबाबच्या नियोजनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकांची बैठक होत आहे.

ठराविक विभाग निश्चित

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी काही ठराविक विभाग निश्चित करण्यात आले आहेत. तशा वस्त्यांचाही समावेश आहे. जेथे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, तेथे प्रत्येक कॉलेजमधील एनएसएस युनिटमधील १० विद्यार्थ्यांचा एक संघ असेल. तो संघ जवळील परिसरातच हा सर्वे करेल. घरोघरी जाऊन, हॉटेल, छोटी-मोठ्या व्यवसायाच्या ठिकाणी नोंदी घेतल्या जातील. एका कॉलेजचे किमान एक ते दोन संघ या कामात सहभागी होतील.

आधारकार्डची जोड

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी हा प्रश्न मांडला आहे. संस्थांच्या आकडेवारीनुसार राज्यात शाळाबाह्य मुलांची संख्या ४ लाख एवढी आहे. सर्वेक्षणात नोंदी करण्यात आलेला विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी आधारकार्डशी जोडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी कॉलेजचा परिसरच दिला जाईल, जेणे करून त्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत. सगळ्याच विद्यार्थ्यांचा यात समावेश नसेल. कॉलेजामधील किमान १० ते २० विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्याच्या नियोजनाबाबत आमची बैठक सुरू आहे.

- डॉ. अतुल साळुंके, राज्य संपर्क अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुझे विश्वास है, नई धरती जरूर बनेगी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पर्यावरणाचा ऱ्हास ही जागतिक समस्या बनली आहे. उजाड झालेल्या धरणी मातेला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. झाडे लावण्याचा ध्यास बालपणापासूनच घेतला गेला तर युवक क्रांती घडवून आणतील. हिरवीगार धरणीमाता हे स्वप्न राहणार नाही. 'नई धरती जरूर बनेगी,' असा आशावाद पद्मश्री जादव मोलाई पायेंग यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

महात्मा गांधी मिशन (एमजीएम) संस्थेच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त पायेंग प्रमुख पाहुणे आहेत. रुख्मिणी सभागृहात मिलिंद भागवत यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. आसाम येथील फोटो जर्नालिस्ट जितू कालिया यांची यावेळी उपस्थिती होती. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या रेताड बेटावर गेल्या ४० वर्षांपासून केवळ झाडे लावणे हे उद्दिष्ट उराशी बाळगून पायेंग यांनी एक एक झाड लावून १२०० एकरचे जंगल उभे केले आहे. सकाळी साडेतीन वाजता उठून झाडे लावण्यासाठी जाणाऱ्या पायेंग यांनी एकट्यानेच क्रांती घडवून आणली. आज या जंगलाच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी भोगदोई नदीच्या काठावर १९६५ मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला आणि सगळी वनसंपदा वाहून गेली. पायेंग यांचे गाव या नदीच्या काठावर होते. उजाड झालेली झाडी पाहून ते दुःखी झाले. शेती, दुधविक्री, जनावर पालन हा प्रमुख व्यवसाय. झाडी, जंगल नष्ट झाल्याने ती पूर्ववत कशी उपलब्ध होईल या विवंचनेत त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. एका ज्येष्ठाने सल्ला दिला की 'झाडे लाव'. सल्ला देणे सोपे होते पण काम अतिशय अवघड पण पायेंग यांनी चॅलेंज स्वीकारले आणि एकट्यानेच झाडे लावण्यास सुरवात केली. हे अनुभव शेअर करताच सभागृहातून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.

पायेंग म्हणाले, ''लहानपणी पाहिलेले जंगल नाहीसे झाल्याचे पाहून झाडे लावण्याचे ठरविले. सकाळी साडेतीन वाजता उठून झाडे लावण्यासाठी निघायचो आजही तो दिनक्रम कायम आहे. घरापासून पाच किलोमीटर सायकलवर जाणे, तिथून छोट्याशा होडीतून नदी पार करणे, पुन्हा काही किलोमीटर चालून झाडे लावणे सुरू करायचो. ११०पेक्षा अधिक प्रकारची झाडे लावली. १२०० एकरच्या परिसरात टप्प्याटप्प्याने दरवर्षी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे हे एकमेव काम असे. पावसाळ्यातील तीन महिन्यांत झाडांची निगा राखण्याची गरज नाही, पण उर्वरित कालावधीत खूप काळजी घेतली. विरोध खूप झाला. मागे हटलो नाही. आज हे जंगल पाहून जग जिंकल्याचे समाधान आहे. आजची युवा पिढी पर्यावरणसक्षम करणे गरजेचे आहे. शालेय जीवनापासून झाडे लावण्याचे महत्व पटवून देऊन झाडे लावली पाहिजेत. मोबाईल आणि टीव्हीचा वापर म्हणजे ज्ञान नव्हे. हा निव्वळ टाइमपास आहे. युवा पिढीच भविष्यात पर्यावरणाचे महत्व जाणून आपली ओसाड झालेली धरती पुन्हा वसवतील. झाडे तोडू देणार नाहीत.''

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून करणाऱ्या साधूला जमावाने मारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर / औरंगाबाद

लॅपटॉपचे मेमरी कार्ड न दिल्याच्या कारणावरून साधूने दहावर्षीय मुलाचा खून केला. नंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूला ठार केले. हा थरार शनिवारी दहेगावमध्ये (ता. वैजापूर) घडला. महेश बाळकृष्ण उगले असे मुलाचे तर, विश्वास शरद सरस्वती उर्फ विद्यानंद सरस्वती असे साधूचे नाव आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशच्या आजोबांनीच विद्यानंद सरस्वतीला उत्तरप्रदेशातून दहेगावमध्ये आणले होते. विद्यानंद उगले यांच्या शेतात राहायचा. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याच्या लॅपटॉपमधून गावकऱ्यांना काही अश्लील साहित्य मिळाले होते. तेव्हापासून विद्यानंद आणि गावकऱ्यांत वाद होता. विद्यानंदचे मेमरी कार्ड उगले कुटुंबातील महेशकडे होते. त्यातही काही आक्षेपार्ह असल्याचे समजते. ते कार्ड परत घेण्यासाठी विद्यानंदने महेशला शनिवारी सायंकाळी आपल्या घरी बोलावले होते. महेश आपल्या वडिलांसोबत विद्यानंदकडे गेला होता. सुरुवातीला विद्यानंदने महेशला एकट्याला खोलीत बोलावून घेतले. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील खोलीत गेले. तेव्हा विद्यानंद महेशला मारहाण करत होता. त्या मारहाणीत महेशचा मृत्यू झाला. तेथून कुऱ्हाड, तलवार असे साहित्य मिळाले. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी केलेल्या मारहाणीत विद्यानंदचाही मृत्यू झाला.

पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय पोलिस अधिकारी हर्ष पोतदार, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

अंमली पदार्थांची तस्करी

विद्यानंद काही दिवसांपूर्वी गोलवाडी, भालगाव या भागातही राहायचा. या पूर्वी त्याने अंमली पदार्थांची तस्करी केल्याची माहितीही मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशिक्षणार्थी १३० पोलिसांना विषबाधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे १३० प्रशिक्षणार्थी पोलिसांना जेवणातून विषबाधा झाली. त्या सर्वांवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

केंद्रात सध्या राज्यातील ९९४ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास सर्वांनी जेवण केले. अभ्यास वर्ग सुरू असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान काही प्रशिक्षणार्थींना उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सर्व पीडितांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे २०० प्रशिक्षणार्थींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काहींना प्रथमोपचारानंतर सोडण्यात आले तर, सुमारे ६१ प्रशिक्षणार्थीवर उपचार सुरु आहेत.

प्राथमिकदृष्ट्या हा अन्नविषबाधेचा (फूड पॉयझनिंग) प्रकार दिसत असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या प्रशिक्षणार्थींना दक्षता म्हणून २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे.

-डॉ. सरिता पाटील,

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना

काही प्रशिक्षणार्थींना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास जेवण केल्यानंतर अभ्यासवर्ग सुरू असताना पाचच्या दरम्यान उलट्या व पोटदुखीचा त्रास झाला.

-दिलीप माळी, पीडित प्रशिक्षणार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नापिकीस कंटाळून पिशोर येथे आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

पिशोर येथील शफेपूर शिवारात नापिकीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. बापू तुकाराम मोकासे (वय ४५), असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतात विषारी औषधप्राशन केले; त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथून घाटी हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यातच ते मरण पावले. पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

मृत मोकासे यांच्या मागे आई, पत्नी व तीन मुले असून ते अल्पभूधारक होते. कापसाचे पीक हातचे गेल्यामुळे ते चिंतित होते, असे नातेवाइकांनी सांगितले. तालुक्यात ९ डिसेंबर रोजी गणेश दवंगे या तरूण शेतकऱ्याने नापिकीमुळे आत्महत्या केली; त्यानंतर बारा दिवसांतच ही दुसरी आत्महत्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिला ई-तालुका सध्या ऑफलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

खुलताबाद तालुक्यात मराठवाड्यात सर्वात आधी ई-फेरफार व ऑनलाइन सातबारा योजना सुरू करण्यात आली. त्यावेळी याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र तालुक्यात याचा बोजवारा उडाला आहे.
जमिनीचा खरेदी दस्त झाल्यानंतर तत्काळ फेरफार उतारा आणि त्यानंतर १५ दिवसांत सातबारा उतारे देण्यासाठी ई-फेरफार ही महत्वाकांक्षी योजना खुलताबाद तालुक्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली. प्रशासकीय कामाची गती वाढवण्यासाठी हस्तलिखित सातबारा बंद करून राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद महसूल विभागात २ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या हस्ते ई-फेरफार व ऑनलाइन सातबारा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या प्रणालीची गती अत्यंत संथ असल्यामुळे ई-फेरफार जलदगतीने होत नाहीत. त्यामुळे अनेक जमिनींचे खरेदीविक्री व्यवहार ठप्प झाले आहेत. तालुक्यात या ऑनलाइन सेवेचा बोजवारा उडाला आहे. खुलताबाद तालुक्यात सुरुवातील ई-फेरफार योजनेसाठी पावले उचलली गेली. शेतीसाठी अतिशय महत्त्वाचे दस्ताऐवज असलेला फेरफार आणि सातबारा ऑनलाइन झाल्यापासून शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ऑनलाइन सातबारा व ई-फेरफार कामास होत असलेल्या दिरंगाईमुळे मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासोबत शेतकऱ्यांचे रोज खटके उडत आहेत. ऑनलाइन सातबारा व ई-फेरफार मिळत नसल्याने बँकेकडून कर्ज घेण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. या प्रक्रियेतील अडचणी सोडविण्याची मागणी एस. एम. कमर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. प्लॉटचे क्षेत्र आर चौरस मीटर येत नसल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून एकही फेर होत नाही. ई-फेरफार किंवा ऑनलाइन कामकाजात सुधारणा करण्यात यावी, ऑनलाइन कामांतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महिला कैद्यासाठी लातूरच्या कारागृहात व्यवस्था करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूरचे जिल्हा कारागृह वर्ग एक दर्जाचे असून पूर्ण क्षमतेने ते भरलेले नाही. महिला कैद्यांसाठी आवश्यक सुविधा या कारागृहात उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला कैद्याची ही व्यवस्था येथेच करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती कारागृह विभागाचे अतिरीक्त पोलिस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने डॉ भुषणकुमार उपाध्याय यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. राज्यातील कारागृह व्यवस्थेची माहिती देताना डॉ. उपाध्याय म्हणाले, 'कारागृहात असलेल्या कैद्याचे पुनर्वसन करण्यासाठी, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी प्रत्येक ठिकाणी योगा आणि धार्मिक प्रवचने, संगीत याचा उपयोग केला जात असतो. नागपूरच्या कारगृहात एका कैद्याने धार्मिक आधारावर योगाला नकार दिला. परंतु, त्यांने शारिरीक व्याधी दूर करण्यासाठी म्हणून योग करणे सुरू केले. त्याच्या व्याधी बऱ्या झाल्या आहेत. शिक्षेची मुदत संपल्यानंतर त्याने जम्मू काश्मीर मध्ये त्याच्या गावी स्वता: योगासनाचे वर्ग सुरू केले आहेत.'
कारागृहाच्या सुरक्षतेतेचा मुद्दा अनेकवेळा चर्चिला जातो त्याच मुख्य कारण हे अपुर मनुष्यबळ असते, त्यावर तंत्रज्ञानाच्या साह्याने मात करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अग्रहावरुन सर्वत्र सि सी टि व्ही कॅमेर्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ही व्यवस्था कार्यान्वयीत झाली आहे. त्या ठिकाणी त्याचा चांगला उपयोग होत आहे. संजय दत्तला मिळालेली रजा आणि पॅरोल हे पूर्णपणे नियमानुसार झाले असल्याचे त्यानी सांगितले
लातूरच्या कारागृहाची क्षमता ही पाचशे कैद्यांची आहे. त्या ठिकाणी फक्त ३०० कैदी आहेत. अत्याधुनिक अशा अंडासेलची व्यवस्था या कारागृहात आहे. मोकळी जमीन आहे. तेथे कमी पाण्यावर येणारे झाडे लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.

पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य जीवनधर शहरकर यांनी डॉ. उपाध्याय यांचे स्वागत केले. संघाचे पदाधिकारी अशोक चिंचोले, विजय स्वामी, अरविंद रेड्डी यांनी स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी बाळ होळीकर यांनी आभार मानले. पंकज जैयस्वाल यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी चोरल्याबद्दल शेतकऱ्यावर गुन्हा

$
0
0

वैजापूर : नांदूर मधमेश्वर कालवा वितरिकेचे गेट तोडून अनधिकृतरित्या कालव्याचे पाणी शेतीसाठी घेतल्याच्या आरोपावरून तालुक्यातील भग्गाव येथील शेतकरी आप्पासाहेब नानासाहेब पवार याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंदवण्यात आला. पवार याने शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भग्गाव शिवारातील चारी क्रमांक पाचचे गेट तोडले व कालव्याचे पाणी बेकायदा शेतीसाठी वळवले तसेच कालव्याचे नुकसान करून शासनाच्या आदेशांचा उल्लंघन केले, अशी फिर्याद पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता शाम केदारे यांनी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरडपुरी, आपेगाव बंधाऱ्यात पाणी सोडा

$
0
0

अन्नदाता शेतकरी संघटनेची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पैठण

आपेगाव बंधारा गेल्या एक महिन्यापासून कोरडा पडला आहे तर, हिरडपुरी बंधाऱ्यात अत्यल्प व दूषित पाणीसाठा आहे. परिणामी ४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही बंधाऱ्यात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. गोदावरी नदीवर बांधलेल्या हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्याच्या पाण्यावर पैठण, शेवगाव व गेवराई तालुक्यातील जवळपास ४० गावे अवलंबून आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने या दोन्ही बंधाऱ्यात अत्यल्प पाणीसाठा जमा झाला होता. सध्या आपेगाव बंधारा पूर्ण कोरडा पडला असून हिरडपुरी बंधाऱ्यात कमी पाणीसाठा आहे. या पाण्यात जंतू झाल्याने ते पिण्यालायक नाही. यामुळे या दोन्ही बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून असलेल्या ४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. जायकवाडी धरणातून या दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष जयजीराव सूर्यवंशी यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित केल्यावरही शेवगाव व नेवासा तालुक्यातील शेतकरी सिंचनासाठी बेकायदा पाणीउपसा करत आहे. आम्ही पिण्यासाठी पाण्याची मागणी करत असून एका आठवड्यात दोन्ही बंधाऱ्यात पाणी न सोडल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाचखोर पोलिस गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिणी, नांदेड

मोबाइल परत देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेतांना एका पोलिस कर्मचाऱ्यासह पोलिस खात्यातील अन्य एका कर्मचाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. हा प्रकार भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी घडला.
१६ डिसेंबर रोजी तक्रारकर्त्याचा भाऊ आणि इतर काहीजण पावडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे बसले होते. यावेळी पोलिस हवालदार केंद्रे तेथे आले. त्यांनी त्यांच्या भावाचा मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर मोबाइल परत
देण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर पोलिस हवालदार केंद्रे याला पंचांसमक्ष सातशे रुपये लाचेची मागणी करून ठाण्याबाहेर निघून गेले. त्यानंतर ठरलेली पाचशे रुपये लाच पोलिस नाईक गणेश तिडके यांनी स्वीकारली.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास पकडले. याप्रकरणी पोलिस हवालदार नागोराव मारोती केंद्रे (ब.न.३४५) आणि पोलिस नाईक गणेश पंढरीनाथ तिडके (ब. न. २८०४) या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी उस्मानाबादकरांची भटकंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
सलग चौथ्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमीच पाऊस झाला. अपुऱ्या पावसामुळे यंदाही पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठीच्या चाऱ्याची तीव्र टंचाई सर्वत्र निर्माण झाली आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. यंदा तर ही परिस्थिती पावसाळा सुरू झाल्यापासून आहे. मात्र, राजकीय व प्रशासकीय यंत्रणा अद्यापही नियोजनाच्या पातळीवरच चाचपडत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याला तसा दुष्काळ नवा नाही. पण तहान लागल्यावरर विहिर खोदण्याच्या सवयीमुळे फक्त पैशाची वारेमाप उधळपट्टी होताना दिसत आहे. अधुनमधून डोकेवर काढणाऱ्या दुष्काळावर कायमस्वरूपी दीर्घकालीन धोरण आखले जात नाही. गेल्या काही वर्षातील दुष्काळाच्या तुलनेत यंदा पाण्याची अभूतपूर्व टंचाई असल्याने राज्यकर्ते आणि यांच्यासाठी आगामी सहा ते आठ महिने कसोटीचे आहेत. या परिस्थितीत जलसाठे फक्त पिण्यासाठी राखून ठेवणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे जलसाठे पिण्यासाठी म्हणून राखून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असले तरी त्यांच्या या उपक्रमांना पाटबंधारे विभागाकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व टंचाई असताना जिल्ह्यात बांधकामे जोरात सुरू आहेत. दुष्काळस्थितीत बांधकाम परवाने देऊ नयेत याचे भान नगरपालिका प्रशासनाला नाही किंवा चालू असलेले बांधकाम रोखण्याचे कसलेही प्रयत्न नगरपालिकाकडून होताना दिसत नाही.
जिल्ह्यात सध्या ४१२ गावांना १५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवाय पाणीपुरवठ्यासाठी म्हणून विहिरी व कुपनलिकेची ७७६अधिग्रहणे करण्यात आली आहेत.
पाणी उपसणाऱ्यांच्या मोटारी जप्त करण्याचे आदेश, कारवाई मात्र सुस्तच
पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जलसाठ्यातून अवैध मार्गाने कोणी पाण्याचा उपसा करीत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करून त्यांचे विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील कामे गाव येथे अवैध मार्गाने पाणी उपसा करणाऱ्या १४ शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करून त्यांचे विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मात्र, यानंतर ही मोहीम थंडावलीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images