Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ग्रामविकास अधिकारी; जमीनप्रकरणी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

चितेगाव ग्रामपंचयतीची अकृषक जमीन नियमबाह्य पद्धतीने विक्री करणे, ग्रामपंचयतीचा कारभार नियुक्त महिला ग्रामसेवकास हस्तांतरित न करणे, सदस्यांना चुकीची माहीती देऊन प्रशासनाविरुद्ध भडकावणे, आदी आरोप ठेऊन तालुक्यातील चितेगाव येथी ग्रामविकास अधिकारी एस. एन. पल्हाड यांना गटविकास आधिकारी उल्हास सोमवंशी यांनी निलंबित केले आहे. पल्हाड यांनी ग्रामपंचायतीची गट नंबर ६६ मधील जमीन नियमबाह्य पद्धतीने विकल्याच आरोप आहे. तसेच नगररचना विभागाकडून ६८ प्लाॅटची मान्यता घेऊन नियमानुसार प्लाॅट पाडलेले आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ५,६०,१४० चौरस मीटर आहे.ज्यात १२०० चौरस मीटर प्रस्तुत प्लाॅटची जिल्हाधिकारी यांच्याकडून १२ जुन १४ ला अकृषक मान्यता दिली. यापूर्वी ग्रामपंचायतीने २० मार्च १४ च्या ठराव क्रमांक ५७ प्रमाणे १०४ प्लाॅटला मान्यता दिली व ओपन स्पेस ८५५४ या दोन्ही मान्यतामध्ये मोठी तफावत आढळून आली.

सचिव या नात्याने पल्हाड यांनी पदाचा गैरवापर, अनियमितता केल्याचे आढळून आल्याने ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाच्या विरोधात भडकावून दिले. महिला ग्रामविकास आधिकाऱ्याला पदभार घेण्यास मज्जाव केला, असा ठपका गटविकास अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. या आरोपावरून गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी ग्रामविकास अधिकारी पल्हाड यांचे निलंबन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वच्छ भारत’ अर्धेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत तालुक्यात वैयक्तिक स्वच्छतागृहांची बांधणी संथगतीने सुरू आहे. गेल्यावर्षी पंचायत समितीने वार्षिक कृती आराखड्यात समावेश केलेल्या १४ गावात आतापर्यंत केवळ ५० टक्केच काम झाले आहे. त्यातही पूर्ण झालेल्या स्वच्छतागृहांपैकी ३५५ प्रस्ताव ग्रामपंचायतस्तरावर पडून आहेत.

केंद्रात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता अभियानातून गावोगावच्या कार्यकर्त्यांना प्रेरित केले. या योनजेत २ ऑक्टोबर २०१४ पासून ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतागृहासाठी प्रति लाभार्थीं १२ हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यापैकी केंद्र शासन ९ हजार व राज्य शासन ३ हजार रुपये देणार आहे.

या योजनेचा अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखालील, अल्पभूधारक, भूमीहीन, महिला कुटुंबप्रमुख व अपंगांना प्राधान्याने लाभ द्यावा, असे निर्देश आहेत. त्यानुसार पंचायत समितीने वार्षिक कृती आराखडा तयार केला असून त्यात अव्व्लगाव, बाजाठाण, भटाणा, बिलोणी, बोरसर, चांडगाव, चिकटगाव, चिंचडगाव, डवाळा, डोणगाव, फाकीराबादवाडी, घायगाव, करंजगाव व लाडगाव या १४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये ३,५२८ वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून २०१५ च्या आर्थिक वर्षात अभियानासाठी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. २०१४ मध्ये सुरु करण्यात आलेल्या स्वच्छतागृहांसाठी १२ हजार रुपये व २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये मंजूर झालेल्या स्वच्छतागृहांसाठी ४, ६०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार होते.

पंचायत समिती प्रशासनाने एक वर्षात या अभियानात निम्मेच उद्दिष्ट गाठले आहे. निवडण्यात आलेल्या गावांतील राजकारण, ग्रामसेवकांचा कामचुकारपणा, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन व कंत्राटदारांची घुसखोरीमुळे हे अभियान रखडले आहे.

व्यावसायिकांची घुसखोरी

अभियानातील कमाई पाहून काही रेडिमेड स्वच्छतागृह उत्पादक व विक्रेत्यांनी संधी साधून दुकान थाटले आहे. गावोगावच्या लाभार्थ्यांना संपर्क साधून त्यांच्या घराच्या परिसरात हे रेडिमेड स्वच्छतागृह उभारण्यापासून ते ग्रामपंचायतीकडून अनुदान काढून देण्यात ही यंत्रणा कार्यरत आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी काही गावात रेडिमेड स्वच्छतागृहांची पाहणी केली तेव्हा ते कमी गुणवत्तेचे असल्याचे आढळले. बांधकामाची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी लाभार्थ्यांना विटाचे बांधकाम करण्यास प्रवृत्त करावे, असे त्यांनी ग्रामसेवकांना कळविले होते. रेडिमेड स्वच्छतागृहांच्या गुणवत्तेबद्दल तक्रार आल्यास ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्चित केली. परंतु, हे निर्देश धाब्यावर बसवून गावोगाव रेडिमेड स्वच्छतागृह उभारण्यात येत आहेत.

निलंबनाचा प्रस्ताव

बिलोणीचे ग्रामसेवक बी. जी. गाढे यांची स्वच्छ भारत मिशन अभियानात कामगारी समाधानकारक नसल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला. या गावात १७४ स्वच्छतागृहाचे उद्दिष्ट होते, त्यापैकी ९१ स्वच्छतागृहांचे बांधकाम झाले. सूचना देऊनही गाढे यांनी पदभार घेतल्यापासून अभियानात काहीच काम केलेले नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी २९ ऑक्टोबर २०१५ रोजी ग्रामपंचायतीला भेट दिली तेव्हा ते गैरहजर होते. त्यांची कामातील उदासिनता पाहता गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी निलंबनाचा प्रस्ताव पाठवला आहे.

अनुदानापासून वंचित

अव्व्लगाव १०२, बाजाठाण ९८, भटाणा १३ , बिलोणी ९१, बोरसर १०६, चांडगाव २६५, चिकटगाव १०३, चिंचडगाव २२४, डवाळा १०७, डोणगाव ९२, फाकीराबादवाडी ९६, घायगाव ११८, करंजगाव १९३ व लाडगाव १४७ असे एकूण १८७५ स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापैकी ३५५ प्रस्ताव विविध कारणास्तव ग्रामपंचायतस्तरावर पडून असून त्यांना अनुदान मिळाले नाही, असे स्वच्छ भारत मिशन कक्षातील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ४ तालुक्यांत १०३ टँकरने पुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सप्टेबर महिन्यात झालेल्या पावसामुळे झपाट्याने कमी झालेल्या टँकरची संख्या औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ९ पैकी ४ तालुक्यातील ७९ गावांची तहान १०३ टँकरने भागवली जात आहे.

जानेवारीपूर्वीच टँकरची संख्या शंभरावर गेल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात मेपर्यंत टँकरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. टँकर हा पाणीटंचाई तात्पुरत्या स्वरुपात दूर करण्याचा मार्ग असला तरी निम्म्या तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्याने टँकरसाठी पाणी आणायचे कोठून असा प्रश्न आहे. ऐन पावसाळ्यात मराठवाड्यावर रुसलेल्या वरूण राजाने परतीची वाटही वाकडी केली. मात्र सप्टेबर महिन्यातील तीन दिवस बसरलेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव व कन्नड तालुक्यातील पाण्याची अडचण सोडवली. जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात मात्र कमी पर्जन्यमानामुळे आतापर्यंत सर्वाधिक ५३ टँकर सुरू करावे लागले.

टँकर सुरू असलेली गावे

पैठण : कृष्णापूर, ढाकेफळ, पैठणखेडा, कारकीन, कदमवस्ती-वैतागवाडी, नायगव्हाण, खंडेवाडी, केकत जळगाव, नानेगांव, खेर्डातांडा - यासीनपूर, पाचलगाव, वरुडी बुद्रुक, देगाव जहां-दादेगाव जुने, आखडवाडा, करंजखेडा, रहाटगाव, विहामांडवा, चित्तेगाव, सोलनापूर, हर्षी, पांगरा, दादेगाव बुद्रुक, दादेगाव खूर्द, कुतूबखेडा, बन्नीतांडा-नरसिंहतांडा, दिन्नापूर, बालानगर.

वैजापूर : बाबतारा, वैजापूर ग्रामीण, घायगाव, माळीसागज, बल्लाळी सागज, चोरवाघलगाव, भगूर, हिंगोणी, चांडगाव, एकोडीसागज, गाडेपिंपळगाव, हडसपिंपळगाव, टाकळी सागज, खिर्डी, माळी घोगरगाव, बाजारठाण, पारळा, जळगाव, अमानतपूरवाडी.

गंगापूर : मांजरी, नेवरगांव, माहूली सिद्धपूर, आसेगाव - तळेसमान, वाळूज, कोळघर, नांदेडा, हैबतपूर, नरसापूर, नागापूर, बोरगांव, तांदूळवाडी, बोलठाण, कनकोरी, वाहेगांव, मुद्देशवाडगांव, येसगाव, कासोडा, दिघी-काळेगाव, गोपाळवाडी, गवळीधानोरा.

५२ विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यात टँकरसाठी ४२ व टँकर व्यतिरिक्त १० अशा ५२ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. गंगापूर २५, वैजापूर २३ व कन्नड तालुक्यातील ३ विहीरींचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिका प्रकरणी राज्यपालांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बारकोड उत्तरपत्रिका खरेदीतील अनियमितता प्रकरणाबाबत विरोधी पक्षनेत्यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेत निवेदन सादर केले.

विद्यापीठातील बारकोड उत्तरपत्रिका खरेदीतील गैरव्यवहाराचे प्रकरण सोमवारी विधान परिषदेतही गाजले होते. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. यावर गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, नसिम खान, सतीश चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेतली. बारकोड उत्तरपत्रिका खरेदी प्रकरणात राज्यपालांनी तत्काळ लक्ष देत चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह इतर आमदारांनी केली आहे. विद्यापीठाने मागील वर्षी ७३ लाख ५० हजारांच्या बारकोड उत्तरपत्रिकांची खरेदी केली. त्यात अनियमितता आढळल्याचा ठपका विद्यापीठानेच नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी भडकलगेट येथे घडला. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्युब्ली पार्क, भडकलगेट येथील प्रकाश मुरलीधर शिंदे याचे बिल थकित अाहे. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी नंदकिशोर जनार्धन म्हस्के (रा. लक्ष्मी कॉलनी) त्यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. यावेळी प्रकाश याने त्यांच्या गणवेशाची कॉलर धरीत शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. पुन्हा घरी आल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा‌ निर्माण केल्याप्रकरणी प्रकाश शिंदेच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला विविध ठिकाणी नेत शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडला. या नंतर तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ वर्षांची एक तरुणी २०११ ते २०१३ या कालावधीत घाटी हॉस्पिटलमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेत होती. या काळात तिचा परिचय स्वांतत्र्य सेनानी उत्तमरावजी पाटील नर्सिंग कॉलेज शिवाजीनगर येथील सुनील भगवान पांचाळ (रा. लिमगाव, रेल्वे स्टेशन, नांदेड) याच्यासोबत झाला. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सुनीलने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. लग्नाचे आमिष दाखवून सुनीलने तिच्या घरी, त्याच्या हॉस्टेलवर तसेच शिर्डी येथे दर्शनासाठी नेण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये शारीरिक शोषण केले. यानंतर त्याने या तरुणीस जातीचे कारण दाखवित लग्नास नकार दिला व दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरविले. ही गोष्ट समजल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे तिने आरोपी सुनील पांचाळविरुद्ध बलात्कार तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सिडको विभागाचे सहायक पोलिस आयुक्त या प्रकरणी तपास करीत आहेत.

विवाहितेचा छळ

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा प्रकार वानखेडेनगर एन १३ येथे घडला. या प्रकरणी विवाहितेने‌ दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती मुरलीधर जाधव, सासरा दिनकर, सासू उषा, दीर शरद (सर्व रा. वरठाण ता. सोयगाव) व नणंद सुलोचना रणधीर (रा. पारोळा) यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्र व जमावबंदीचे आदेश

येत्या पंधरा दिवसात शहरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच वर्षाअखेरीस थर्टीफर्स्टचा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. तसेच विविध संघटनांची निदर्शने या काळात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २० डिसेंबर २०१५ ते ३ जानेवारी २०१६ या कालावधीत शस्त्र व जमावबंदीचे आदेश प्रभारी पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार या पंधरा दिवसांच्या काळात कोणत्याही प्रकारची शस्त्रे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच प्रक्षोभक भाषणे करता येणार नाही. पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येऊन निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट पावत्या सादर करून अपंग भावाचे घर बळकावले

$
0
0

औरंगाबाद : बनावट पावत्या सादर करून अपंग भावाचे घर हडपून कोर्टाची फसवणूक करणाऱ्या भावाविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको एन-८ परिसरातील यशोधरा हाऊसिंग सोसायटी येथे राहणारे प्रल्हाद श्रीपतराव मुगदल ( वय ६०) हे सेवानिवृत्त अधिकारी असून त्यांचे जिन्सी भागात एक घर आहे. त्यांचा भाऊ अशोक श्रीपतराव मुगदल (रा. भगतसिंगनगर, हर्सूल) याने फिर्यादी प्रल्हाद यांच्या अपंगतावाचा फायदा उचलत व कोर्टात बनावट पावत्या सादर करत त्याचे घर स्वतःच्या नावावर करून घेतले. ही बाब प्रल्हाद मुगदल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी जिन्सी पोलिसांकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रहेमानिया कॉलनी घर फोडले

$
0
0

औरंगाबाद : रहेमानिया कॉलनी येथे अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकाचे घर फोडून ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. गुरुवार ते शनिवारच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राशेद अहेमद फजल अहेमद (वय ५८) हे व्यवसायाने टॅक्सीचालक आहेत. गुरुवारी नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी ते बाहेरगावी गेले होते. शनिवारी ते घरी परतले. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३२,५००रुपयांचा ऐवज घेऊन चोरटा पसार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धनादेश वटला नाही; शिक्षकास दंड, कारावास

$
0
0

औरंगाबादः पैठण येथील शिक्षकाने दिलेला धनादेश न वटल्याने शिक्षकास १० लाख रुपये दंड व एक वर्ष कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डब्ल्यू. उगले यांनी ठोठावली.

पैठण येथील नाथ सेकंडरी कॉलेजचे शिक्षक मिलिंद बोडखे याने औरंगाबाद येथील बापूसाहेब नामदेवराव लालीकर यांच्याकडून ८ लाख रुपये उसने घेतले. रक्कम परत करण्यासाठी बोडखे याने लालीकर यांना धनादेश दिला. हा धनादेश लालीकर यांनी बोडखेच्या सूचनेप्रमाणे वटण्यास टाकला; परंतु संबंधित धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने न वटता परत आला म्हणून लालीकर यांनी अॅड. योगेश सोमाणी यांच्यामार्फत औरंगाबाद येथील प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी यांच्या कोर्टात फिर्याद दाखल केली. कोर्टाने आरोपीस १० लाख रुपये दंड व एक वर्ष साधी कैद व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मोबाइल चोर जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइल चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. त्यापैकी एकजण हा अल्पवयीन असून त्यांच्याकडून ४४ हजार ५०० रुपये किंमतीचे नऊ मोबाइल जप्त करण्यात आले आहे. इम्रान खान असद खान (वय २०, रा. गल्ली नं. १०, मिसारवाडी) व एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा (रा. मिसारवाडी) असे पकडण्यात आलेले आरोपी आहेत.

प्रकाश देशमाने ( रा. बीड) हे काही कामानिमित्त काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत आले होते. सेव्हन हिल ते हॉटेल लेमन ट्री यामार्गाने ते रिक्षाने प्रवास करत असतानाच सहप्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी त्याचा मोबाइल लंपास केला होता. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात इमरान व त्याचा साथीदाराचाच हात दोन असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, दोन मुले शनिवारी विविध कंपन्याचे मोबाइल विक्रीसाठी आंबेडकर चौकात येणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी कारवाई करत इमरान खा व त्याच्या साथीदाराला पकडले. त्याच्याकडून ४४ हजार ५०० रुपये किंमतीचे विविध कंपन्याचे ९ मोबाइल जप्त करण्यात आले. सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गजानन कल्याणकर, सहाय्यक फौजदार शेख आरेफ, कर्मचारी मनोज चव्हाण, भीमराव आरके, तुकाराम राठोड, विश्वास शिंदे, राऊत आदींनी ही कारवाई केली.

रक्कम, मोबाइल लांबविला

घराचे दार उघडे असल्याची संधी साधत चोरट्याने रोख रकमेसह मोबाइल असा २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना न्यू हनुमाननगरात शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणी संतोष मल्लीकार्जून पाटील ( वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितांच्या छळात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहितांचा छळ केल्याप्रकरणी विविध सात घटनांत शहरातील पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सातारा परिसरात एका विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

जटवाडा, होनाजीनगर येथील विवाहितेचा माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करीत छळ करण्यात आला. याप्रकरणी विवाहितेने‌ दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती धीरज मरमट, लताबाई, नरसिंह, शैलेंद्र मरमट व स्वाती व जयप्रकाश ठाकूर (सर्व रा. आभूषण पार्क, देवळाई परिसर) यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत वाळूज येथील विवाहितेला माहेरून एक लाख रुपये आणण्याची मागणी करीत घरातून हाकलून देण्यात आले. याप्रकरणी आरोपी लक्ष्मी आरणे, जयश्री, विजया, शारदा, कल्याणी व प्राजक्ता आरणे (सर्व रा. अंबड) यांच्याविरुद्ध वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेमध्ये मुकुंदवाडी प्रकाशनगर भागातील २० वर्षांच्या विवाहितेचा दुचाकी घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करीत छळ करण्यात आला. याप्रकरणी आरोपी श्रीनिवास हरणे, रामकिसन, अलकाबाई, विलास, शिवकन्या, विजय, शिवानी हरणे तसेच प्रकाश गाढेकर (सर्व रा. जालना) यांच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत ज्युबलीपार्क, भडकलगेट येथील विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करून छळ करण्यात आला. या प्रकरणी आरोपी कुणाल म्हस्के, लताबाई, सागर म्हस्के व नीता भिंगारे (रा. भडकलगेट) यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिसारवाडी येथील विवाहितेचा मुली होत असल्याच्या कारणावरून छळ करण्यात आला. या प्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख उस्मान शेख यासीन, शेख चांद, मासुमबी, रब्बानीबी, सय्यद करीम व रशिदाबी शेख चांद (सर्व रा. मिसारवाडी) यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य एका घटनेत विवाहितेला घटस्फोट देण्यासाठी चार लाखांची मागणी करीत छळ करण्यात आला. या प्रकरणी तिच्या तक्रारीवरून आरोपी चंद्रमणी रोहिदास शंगारे (वय रा. शांतीनिकेतन कॉलनी) याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न

सातारा परिसरात ३० वर्षांच्या विवाहितेला आई-वडिलांशी का भांडते, या कारणावरून पतीने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. गुरुवारी दुपारी चार वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पती अशोक रंगनाथ खंडागळे, सासरा रंगनाथ व सासू उषाबाई विरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी ओपीडीची लिफ्ट सुरू

$
0
0

पाण्याचा प्रश्नही लागला मार्गी; पाइपलाइचे काम पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागच्या आठ दिवसांपासून बंद असलेली घाटी ओपीडीतील लिफ्ट अखेर शनिवारपासून सुरू झाली. त्याचवेळी महिन्यापासून असलेला पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. 'मटा'ने या विषयी १७ डिसेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अधिष्ठातांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश काढले आणि एकदाची लिफ्ट सुरू झाली. तसेच पाइपलाइनची दुरुस्तीदेखील करण्यात आली असून, सोमवारी पाण्याची तपासणी होणार आहे.

आठ दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) इमारतीमधील एकमेव लिफ्ट बंद पडली. त्यामुळे असंख्य रुग्णांचे हाल होत होते. त्यातच स्ट्रेचर किंवा व्हिलचेअर वरच्या मजल्यावर नेण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने गंभीर-अत्यवस्थ रुग्णांना वरच्या मजल्यावर नेण्यासाठी नातेवाईकांनाच कसरत करावी लागत होती. याविषयी विद्युत विभागाला वारंवार कळवूनही फारसा उपयोग होत नव्हता. तसेच ओपीडी बिल्डिंगमध्ये एक महिन्यापासून पाण्याचा ठणठणाट होता. मध्यवर्ती प्रयोगशाळेसह बहुतेक सर्व वॉर्ड, स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे रुग्णांना हात धुण्यासाठीदेखील पाणी नसल्याने जंतुसंसर्गाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. प्रयोगशाळेला लागणारे आवश्यक पाणीदेखील मिळत नव्हते. स्वच्छतेवरही गंभीर परिणाम झाला होता. या संदर्भातही घाटी प्रशासनाकडून बांधकाम विभागाला लेखी कळविण्यात आले होते. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नव्हते. या पार्श्वभूमीवर 'मटा'ने १७ डिसेंबर रोजी 'घाटी ओपीडीत पाण्याचा ठणठणाट' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध

केले होते. याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दुसऱ्याच दिवशी तातडीने काम करण्याचे लेखी आदेश काढले आणि कामाला सुरुवात झाली. त्याचा परिणाम म्हणून शनिवारपासून लिफ्ट सुरू झाली. तसेच पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने तातडीने काम हाती घेण्यात आले.

लिफ्ट सुरू झाली आहे. तसेच आवश्यक तिथे पाइप बदलण्यात आले आणि ब्लॉकही काढण्यात आले. काम पूर्ण झाले असून, सोमवारी पाणी आल्यावर टेस्टिंग होणार आहे. काम होईपर्यंत टँकरने ओपीडी बिल्डिंगला पाणी पुरवण्यात आले.

- डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी धरणातील साठा घटण्यास सुरुवात

$
0
0

औरंगाबाद : केवळ जायवाडी धरणावर अवलंबून असलेल्या असलेल्या शहर तसेच शहरातील उद्योगांवरही येणाऱ्या काळामध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. वरच्या धरणातून जायकवाडीला पाणी आले, मात्र रोजचा वापर व बाष्पीभवनामुळे पाण्यात घट होत असून सध्या जायकवाडी धरणामध्ये १८९.३५९ दशलक्ष घनमीटर (८.७२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

विभागात सर्वाधिक पाऊस‌ औरंगाबाद जिल्ह्यात झाला असला तरी पिकांसाठी हा पाऊस पुरेसा नाही. त्यामुळे जिल्ह्यात खरिपानंतर रब्बीलाही कमी पावसाचा फटका बसला आहे. पैठण येथील नाथसागरामधून औरंगाबाद, जालना, अंबड शहर तसेच काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असून उद्योगांसाठीही पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद व जालना शहराला दररोज १७० एमएलडी (०.१७ दलघमी), उद्योगांसाठी ५२ एमएलडी (०.५ दलघमी) पाणीपुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपूर्वीच धरणातील पाणी जोत्याखाली गेले होते मात्र, नाशिक तसेच धरणाच्या वरच्या भागात झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली व पाणी जिवंत साठ्यावर आले होते, त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरण समुहातून जायकवाडीमध्ये पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले. पण ११.५८ टीएमसीपैकी जायकवाडीत केवळ ६.६३ टीएमसी पाणी पोचले. यानंतर मात्र प्रकरण पुन्हा न्यायालयात गेल्यामुळे पाणी सोडणे बंद करण्यात आले. सध्या जायकवाडी धरणातून औरंगाबाद, जालना जिल्ह्याला पिण्यासाठी तसेच उद्योगासाठी पाणी देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच जायकवाडीतून माजलगाव धरणासाठी दोन टीएमसी पाणी सोडण्याची सुरूवात झाली होती. एकूणच जायकवाडीच्या पाण्यात दररोज झपाट्याने घट होत आहे. धरण उशाला असलेल्या पैठण तालुक्यालाच सध्या टंचाईच्या झळा बसत असून पैठण तालुक्यात ५३ तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या १०३ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणावर जीडीपीच्या १० टक्के खर्च करा

$
0
0

भाई वैद्य यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाच्या धोरणांमुळे शिक्षण दिवसेंदिवस महाग होत असून सर्वसमान्यांच्या आवक्याबाहेर गेले आहे. केंद्र शासनाने शिक्षणावरील खर्च १० टक्क्यांपर्यंत वाढवावा, शासनाने सर्वांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था उभारायला हवी, अशी मागणी ज्येष्ठ समाजवादी नेते, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे संस्थापक अध्यक्ष भाई वैद्य यांनी पत्रकार परिषदेत केली.

शासानाने समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा, असे वैद्य म्हणाले. शिक्षणाबाबत राज्यकर्ते उदासिन आहेत. 'जीडीपी'च्या (सकल राष्ट्रीय उत्पन्न) तुलनेत आपला शिक्षणावर होणारा खर्च कमी आहे. शासन केवळ शिक्षणावर ३ टक्के खर्च करते. विकसित देशांमध्ये हा खर्च १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच ती देश प्रगतीत पुढे आहेत. भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले जाते.

आपण शिक्षणाकडे लक्ष देणार नाही, तोपर्यंत स्थिती बदलणार नाही. त्यामुळे शिक्षणावरील खर्च हा 'जीडीपी'च्या १० टक्के व्हावा. सध्याची शिक्षण धोरणे शिक्षणाच्या विरोधात असून, सर्वांना मोफत शिक्षण दिले गेले पाहिजे.

आरटीई कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कायदा केल्यामुळे परिस्थिती बदलेली नाही. शिक्षण विकास निर्देशांकात राज्याची झालेली घसरण ही चिंतेची बाब असल्याचेही भाई वैद्य म्हणाले. यावेळी सभेचे उपाध्यक्ष अजमल खान, संदीप भदाने यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुप्पट टीडीआर दिलाच कसा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेकडे १२ मीटर रस्त्याचा टीडीआर (विकास हक्क हस्तांतर) मागितला असताना नगररचना विभागाने २४ मीटर रस्त्याचा टीडीआर दिलाच कसा, असा सवाल नारेगाव येथील गट क्रमांक २६मधील भूखंड मालक तुषार अरविंद चौधरी यांनी पालिका आयुक्तांना केला आहे. नगररचना विभागाने दिलेले २४ मीटर टीडीआरचे प्रमाणपत्र अनाकलनीय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

नारेगाव येथील गट क्रमांक २६ मध्ये तुषार अरविंद चौधरी यांना महापालिकेने टीडीआर देऊ केला आहे. रस्त्याच्या कामासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात त्यांना हा टीडीआर देण्यात आला आहे. चौधरी यांनी १२ मीटर रस्त्याचा टीडीआर मागितला असताना महापालिकेच्या नगररचना विभागाने त्यांना २४ मीटर रस्त्याचा टीडीआर दिला. हे प्रकरण 'मटा'ने ९ डिसेंबरच्या अंकात उघड केले होते. त्यानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या टीडीआर घोटाळ्याबद्दल वादळी चर्चा झाली.

महापौर त्र्यंबक तुपे यांनी टीडीआर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर चौधरी यांनी आयुक्तांच्या नावे निवेदन देऊन १२ मीटर रस्त्याचा टीडीआर मागितला असताना २४ मीटरचा टीडीआर कसा दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. टीडीआर प्रमाणपत्रात दुरुस्ती करून १२ मीटरच्या रस्त्याचे टीडीआर प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

'मटा'ने या टीडीआरचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती, काही नगरसेवकांशीही त्यांनी याबद्दल चर्चा केली, पण अद्याप दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नगरसेवकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तर अधिकाऱ्यांची गय नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात हलगर्जीपणा केल्यास गय गेली जाणार नाही. गोपनीय अहवालात त्याची नोंद केली जाईल, असा सज्जड दम शिक्षण प्रधानसचिव नंदकुमार यांनी‌ दिला आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षण नियोजनाबाबत आयोजित बैठकीसाठी ते औरंगाबादला आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी विविध विषयावर त्यांनी संवाद साधला. शासनाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम' आखला आहे. त्यात शिक्षण विभागाचे आयुक्त, विविध संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी पदावरील अधिकारी शाळा दत्तक घेणार आहेत. या शाळा गळतीचे प्रमाण अधिक असलेल्या भागातील असतील. गुणवत्तावाढीसाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत. याबाबत नंदकुमार म्हणाले,'राज्य सरकार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाबाबत आग्रही आहे. त्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्या गोपनीय अहवाल नोंद केली जाईल.'

शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, गडचिरोलीतील भामरागड, नांदेडमधील हादगाव, हिंगोलीतील सेनगाव तर, परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यांतील सुमारे २०० शाळा घेतल्या आहेत. दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये ‌गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जानेवारीअखेर एअर कार्गो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एजन्सीच्या माध्यमातून देशांतर्गत एअर कार्गो सेवा जानेवरी २०१६ अखेरीस सुरू होणार आहे. तिसऱ्यांदा काढलेल्या निविदेत दिल्ली येथील कार्गो सर्व्हिसेस सेंटर या एजन्सीने निविदा भरली आहे. या एजन्सीला कंत्राट देण्यात येणार असून ही प्रक्रिया सोमवारी पूर्ण होणार आहे.

विमानतळावरून देशांतर्गत कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा निविदा काढण्यात आली. परंतु, तिला कमी प्रतिसाद मिळाल्याने विमानतळ प्राधिकरणाने तिसरी निविदा काढली. ही प्रक्रिया १८ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली. त्यात दिल्ली येथील कार्गो सर्व्हिसेस सेंटर या एकच एजन्सीने निविदा भरून स्वारस्य दाखवले आहे. तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवूनही एकाच एजन्सीकडून प्रतिसाद मिळाल्याने या एजन्सीला कंत्राट देण्याची प्रक्रिया सोमवारी पूर्ण करण्यात येणार आहे. या एजन्सीचे मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नई येथे केंद्र आहे. कार्गो सुविधा सुरू करण्यासाठी एजन्सीला विमानतळावर कोल्ड रूम, स्ट्राँग रूम, स्कॅनर मशिन, कार्गो लोडर, रॅम्प आदी सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. त्यासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सुविधा उपलब्ध झाल्यानंतर औरंगाबाद विमानतळाहून देशांतर्गत कार्गो सुविधा सुरू होईल.

दरम्यान, औरंगाबादहून पाठविण्यात येणारा माल थेट विदेशातही पाठवता येणार आहे. यासाठी विमानतळावर कस्टम क्लिअरन्स देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. औरंगाबादमधील कंपन्या सध्या युएई, अमेरिका, जपान, सौदी अरेबिया, बांगला देश, रुमानिया, श्रीलंका, कतार, टांझानिया, मलेशिया, आस्ट्रेलिया, तैवान, नेपाळ या देशात माल पाठवतात.

मुंबई विमातळावर पाहणी

विमानतळावर फार्मा टर्मिनल तयार करण्यात येणार असल्याने मुंबई विमानतळावरील फार्मा टर्मिनलची एका पथकाने नुकतीच पाहणी केली. औरंगाबाद विमानतळावरून आलेला माल इतरत्र कसा पाठवला जाईल, याची माहितीही विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी घेतली. त्यानुसार येथील विमानतळावर आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्गो सर्व्हिसेस सेंटरला कंत्राट देण्याची कारवाई पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कंपनीला कार्गो वाहतुकीसाठी सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. त्यामुळे जानेवारीअखेर कार्गो सेवा सुरू होईल, असा विश्वास आहे.

- अलोक वार्ष्णेय, विमानतळ व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलांना श‌िक्षणाची हमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे वेळापत्रक शासनाकडून मंजूर झाल्यानंतर त्याची सुरुवात होणार आहे. जानेवारीत होणाऱ्या या सर्वेक्षणात आढळणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत टिकविणे आव्हान आहे. त्यासाठीही राष्ट्रीय सेवा योजना आणि संस्थांची मदत घेतली जाणार आहे. पालकांच्या रोजगारामुळे स्थलांतरित झालेले विद्यार्थी शिक्षणाबाहेर राहू नयेत, त्यासाठी 'एज्युकेशन गॅरंटी कार्ड' दिले जाणार आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शासकीय सर्वेक्षणावर सामाजिक संघटनांनी प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर राज्यात नव्याने हा सर्वेक्षण केले जाणार आहे. राज्यातील विविध कॉलेजांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. ३ हजार कॉलेजांमधील ३ लाख विद्यार्थी सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. याबाबत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, जिल्ह्यांचे एनएसएस समन्वयक यांची प्रधान सचिवांच्या उपस्थितीत रविवारी बैठक झाली. जानेवारीत सर्वेक्षण करण्याचे एनएसएसने स्पष्ट केले आहे. त्याचा आढावा ही घेण्यात आला. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होण्यापुरते हे काम मर्यादित नसल्याचे नंदकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे सर्वेक्षण आदिवासी, ग्रामीण आणि शहरी या गटांत करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात हा सर्वेक्षण केले जाईल. एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही, असा प्रयत्न असल्याचे नंदकुमार म्हणाले.

शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत टिकावेत, हे आमचे आव्हान आहे. त्यासाठीच्या हंगामी वसतिगृह, एज्युकेशन गॅरंटी कार्ड अशा उपक्रमावरही काम सुरू आहे. या विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती रहावी, यासाठी एनएसएस, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल. गळतीचे प्रमाण असलेल्या जिल्ह्यावरही विशेष लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रकल्प संचालक सुवर्णा खरात यांची उपस्थिती होती.

शाळाबाह्य मुलांबाबत शासनाचे आदेश आल्यानंतर सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू होईल. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणातून एकही गाव सुटणार नाही. हे काम संस्था, एनएसएसच्या मदतीने काम पूर्ण केले जाईल.

- नंदकुमार, प्रधानसचिव, शिक्षण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी सोडण्यावरून अभियंत्यास शिवीगाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याचे पाणी सोडण्यावरून पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण वसंतराव सुराशे यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी तालुक्यातील लाडगाव शिवारात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सध्या नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी वैजापूर व गंगापूर तालुक्यांकरिता पाण्याचे आवर्तन सोडले आहे. पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण सुराशे हे शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चारी क्रमांक ९ येथे लाभार्थी शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी वांजरगाव व सावखेडगंगा येथे अर्जून अशोक तेलगे व राजू संपत तिपाली या दोघांनी तुम्ही आम्हाला पाणी का देत नाही, असे विचारून सुराशे यांना धक्काबुक्की करून शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली, सरकारी कामात अडथळा आणला अशी फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार अर्जून तेलगे व राजू तिपाली यांच्याविरुद्ध विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नसून पुढील तपास हवालदार अशोक नेव्हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिकेचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले.
लातूर शहरातील बेशिस्त वाहतुकीच्या समस्येवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पोलिस उपधीक्षक मंगेश चव्हाण, वाहतूक शाखेचे निरीक्षक राजकुमार सोनवणे यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस उपाधिक्षक मंगेश चव्हाण यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने कराव्याच्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली. समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनीही वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासंदर्भात काही सूचना केल्या.
या बैठकीत सर्वपक्षाच्या नगरसेवकांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीविषयी नाराजी व्यक्त करुन चिंता व्यक्त केली.त्यानंतर शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी महापालिकेकडून करावयाच्या उपाययोजना म्हणून शहरात नव्याने १३ सिग्नल बसविणे, मुख्य रस्त्यावर पे अॅँड पार्क पद्धत राबविणे, नो पार्किंग झोनमध्ये फलक लावणे, मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळे निर्माण करणारे अतिक्रमणे काढणे, अॅटोरिक्षा थांबे नश्चित करणे आदि निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला महापालिकेतील सभागृह नेते नरेंद्र अग्रवाल, विरोधी पक्षनेते मकरंद सावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ सदस्य राजा मणियार, रेहना बासले, शिवसेना गटनेते सुनील बसपुरे, आरपीआयचे चंद्रकांत चिकटे, माजी महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, प्रभाग समितीच्या सभापती सपना किसवे, अतिक्रमण विभाग प्रमुख सहदेव बोराडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images