Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रेल्वे प्रवासी पुन्हा ताटकळले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मनमाड काचीगुडा पॅसेंजर रेल्वेचा इंजिन परसोडा रेल्वे स्टेशनवर बिघडले. या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी तब्बल दोन तास वाट पाहावी लागली आहे. औरंगाबादहून मालगाडीचे रेल्वे इंजिन पाठवून ही पॅसेंजर रेल्वे आणण्यात आली. या रेल्वे मार्गावर इंजिन बिघडण्याची दोन वर्षांतील ही ११८ वी घटना असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

मनमाड ते काचीगुडा पॅसेजर पहिली पॅसेंजर म्हणून ओळखली जाते. औरंगाबादला ती सकाळी ७.२० वाजता पोहोचते. या गाडीने औरंगाबाद, जालनाहून परभणी, नांदेड तसेच अन्य ठिकाणी जाणारे अनेक प्रवासी अप-डाऊन करतात. या रेल्वेने नगरसोल, रोटेगाव, परसोडा, परसोडा, दौलताबाद येथून अनेक प्रवासी औरंगाबादला येतात. मंगळवारी सकाळी मनमाडहून ही पॅसेंजर नियोजित वेळेवर निघाली. ती परसोडा येथे दोन मिनिटांच्या हॉल्टसाठी थांबली होती. त्याच वेळी या रेल्वेच्या 'पॉवर सप्लाय'मध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते बंद पडले. दोन तास गाडी खोळंबून राहिली. दरम्यान, प्रवाशांनी थेट नांदेड कंट्रोल रूमशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानंतर औरंगाबादहून मालगाडीचे इंजिन परसोडा रेल्वे स्टेशनकडे पाठविण्यात आले. ही रेल्वे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर दोन तास उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

रेल्वे वाहतूक सुरळीत

हा सिंगल ट्रॅक असल्यामुळे, एखाद्या रेल्वेचे इंजिन बिघडताच वाहतूक खोळंबते. मंगळवारी पॅसेंजर रेल्वेचं इंजिन परसोडा रेल्वे स्टेशनवरच फेल झाल्यामुळे, अन्य गाड्यांची वाहतूक रेल्वे स्टेशनवरील दुसऱ्या ट्रॅकवरून करण्यात आली. मात्र, अन्य रेल्वेच्या क्राॅसिंगमुळे जालनानंतर या रेल्वेतील प्रवाशांना तीन ते चार तास उशिर लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेवाभावी कंत्राटदारांना सात कोटींची खैरात

0
0

औरंगाबाद : सेवाभावी वृत्तीने रस्त्यांचे पॅचवर्क करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेने मंगळवारी सात कोटी रुपयांची खैरात वाटली. यामुळे आता रस्त्याची बंद पडलेली कामे सुरू होतील, असे मानले जात आहे.

पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रस्त्यांचे काम करणाऱ्या काही प्रमुख कंत्राटदारांना रस्त्यांच्या पॅचवर्कचे काम सेवाभावी वृत्तीने करण्यास सांगितले होते. त्यामुळे काही कंत्राटदारांनी पॅचवर्कचे काम पूर्ण केले, तर काहींनी नुकतेच काम सुरू केले आहे. याच कंत्राटदारांकडे शहरातील विविध रस्त्यांची कामे देखील आहेत. पण पेमेंट थकल्यामुळे त्यांनी या कामांकडे पाठ फिरवली आहे. बंद पडलेली रस्त्यांची कामे नागरिकांसाठी त्रासदायक ठरू लागली आहेत. ही बाब लक्षात घेऊन केंद्रेकर यांनी मंगळवारी सकाळी कंत्राटदारांची बैठक घेतली. थकीत पेमेंटपैकी ३० ते ४० टक्के पेमेंट आम्ही करू, तुम्ही तत्काळ काम सुरू करा, असे त्यांनी कंत्राटदारांना सांगितले. केंद्रेकरांच्या या आवाहनाला कंत्राटदारांनी देखील प्रतिसाद दिला. त्यामुळे रस्त्यांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना दुपारी सुमारे सात कोटी रुपयांचे पेमेंट करण्याची तयारी लेखा विभागाने केली, हे पेमेंट केल्यावर रस्त्यांची रखडलेली कामे सुरू होण्याचा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फक्त तीन कामे सांगा!

0
0

मनपा आयुक्तांचे नगरसेवकांना 'ऑप्शन'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे वास्तववादी बजेट मिळेपर्यंत काहीच कामे करता येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मला सर्वप्रथम वास्तववादी बजेट द्या, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्थायी समितीच्या सदस्यांना केले. तुम्ही तुमच्या वॉर्डातील दोन-तीन महत्त्वाची कामे सांगा, ती लगेच करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी विकास कामे होत नसल्याबद्दल असंतोष व्यक्त केला; भाजप नगरसेविका कमल नरोटे यांनी सभात्यागच केला होता. त्यामुळे आयुक्त केंद्रेकर यांनी मंगळवारी अचानक स्थायी समितीच्या सदस्यांची बैठक घेतली. ही बैठक सुमारे दोन तास चालली. यावेळी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांच्यासह सर्व १६ सदस्य, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, सिकंदर अली, हेमंत कोल्हे आदी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रकर यांनी नगरसेवकांसोबत बोलताना बजेटचा विषय काढला. तुम्ही वास्तववादी बजेट द्या, जोपर्यंत वास्तववादी बजेट मिळत नाही तोपर्यंत कोणतेही काम करणे शक्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यावर नगरसेवकांनी बजेटची कोंडी फोडण्याची मागणी केली. बजेटची कोंडी फोडा, आता किती दिवस विकास कामांसाठी थांबायचे, निवडून येऊन आठ महिने झाले पण वॉर्डांमध्ये विकासाची ठोस कामे झालेली नाहीत, अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केली.

नगरसेवकांच्या भावना, त्यांची स्थिती आम्ही समजू शकतो पण, जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केंद्रेकर यांनी केले. शेवटी नगरसेवकांच्या मागणीचा विचार करून वॉर्डातील महत्त्वाची दोन-तीन कामे सांगा, ती करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. भूमिगत गटारांना त्रासदायक ठरणारे नाल्यांवरचे अतिक्रमण काढून टाका, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पहिल्यांदाच बैठक

आयुक्तांनी स्थायी समिती सदस्यांची बैठक बोलावण्याची पालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयुक्तांच्या कार्यालयातून स्थायी समिती सदस्यांना सकाळीच फोन गेले. 'दुपारी केंद्रेकर साहेब तुमची बैठक घेणार आहेत, तेव्हा वेळेवर बैठकीला,' असे सांगण्यात आले. या निरोपानुसार सभापतींसह सर्व सदस्य पालिकेत वेळेपूर्वीच दाखल झाले. पालिका आयुक्तांच्या सांगण्यावरून सभापतींसह स्थायी समितीचे सर्व सदस्य पालिकेत तत्काळ हजर झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातंग समाजाकडून पोलिसांना सुवर्णपदके !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मातंग समाजाच्या मोर्चावर नागपुरात अमानुष लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी विभागीय आयुक्तालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेने हे आंदोलन केले. पोलिस अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून आंदोलकांनी त्यांना प्रतिकात्मक सुर्वणपदक बहाल करत आपला संतप्त व्यक्त केला.

न्यायहक्कासाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलन शांततेत सुरू असतानाच पोलिसांनी आंदोलकांवर निर्दयपणे लाठीहल्ला केला, असा आरोप विकास परिषदेचे नेते उत्तम कांबळे यांनी केला. मानवी हक्काचे उल्लंघन करणारी व राज्यातील पोलिसांच्या गौरवशाली इतिहासाला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे त्यांनी नमूद करत त्यांनी या घटनेचा निषेध केला.

याप्रसंगी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांना प्रतिकात्मक सुवर्णपदक बहाल करत त्यांचा निषेध केला. या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करावी, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दोषींवर गुन्हे दाखल करावेत, कार्यकर्त्यांवरील गंभीर स्वरुपाचे गुन्हे तत्काळ रद्द करा, गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत करावी, लाठीहल्ला करणाऱ्या दोषी अधिकारी - कर्मचाऱ्यांना निलंबित करावे किंवा शौर्य गाजविल्याबद्दल सुवर्णपदक बहाल करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रमोद कांबळे, प्रा. संजय गायकवाड, रतन शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

नागपुरातील लाठी हल्ल्याचा केला निषेध

नागपूर येथे मातंग समाजावर झालेल्या लाठीहल्ल्याचा वीर लहुजी मित्र मंडळाने निषेध केला. घटनेची कोर्टामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष कुणाल कांबळे, आनंद तुपे, विष्णू पाचवणे, मनीष ससाणे, रोहित साठे आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोबाइलवर सभ्य रिंगटोन लावा’

0
0

औरंगाबाद : शांताबाई ... शांताबाई... यासह चित्रपटातील विविध गाणे, पक्षाचे आवाज, कर्कश रिंगटोन लावण्यास पोलिस कर्मचाऱ्यांना मज्जाव करण्यात आला आहे. चित्रपट गीत, कर्कश आवाज, विविध पक्षांचे आवाज आदी रिंगटोनमुळे लोकांमध्ये पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते, असे सांगत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाइलची रिंगटोन पोलिस दलाची प्रतिष्ठा जोपसणारी ठेवावी, असे आदेश दिले आहेत.

एखादं गाणं हिट झालं की ते अनेकांच्या फोनमध्ये रिंगटोन होते. नव्या जुन्या हिंदी, मराठी चित्रपटातील गाजलेल्या गाण्यासह पोलिस गाड्यांचे सायरन, पक्षांचे आवाज आदी विविध प्रकारच्या लक्षवेधी रिंगटोन लावण्याची क्रेझ मोबाइल युजरमध्ये दिसून येते. पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्येही वेगवेगळ्या प्रकारची रिंगटोन ठेवण्याची आवड काही कमी नाही. मात्र, नको त्या ठिकाणी अशा रिंगटोन वाजल्यावर पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीने बदलतो. हीच बाब लक्षात घेत विशेष पोलिस माहनिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी परिक्षेत्रातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपली मोबाइलमधील रिंगटोन ही योग्य व चांगली असेल याची दक्षता घ्या, असे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी वाहनांना वेरूळ लेणीत बंदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अजिंठा लेणीप्रमाणे येत्या एक जानेवारीपासून वेरूळ लेणी परिसरात खासगी वाहनांना प्रवेश करण्यात येणार आहे. यापुढे लेणीत जाण्यासाठी वेरूळ अभ्यागत केंद्रातून एसटी महामंडळाच्या बसमधून जावे लागणार आहे.

अजिंठा लेणीतील चित्रांचे प्रदूषणापासून रक्षण करण्यासाठी लेणी परिसरात खासगी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तेथे प्रदूषणमुक्त बसमधून पर्यटकांना प्रवास करावा लागतो. याप्रमाणे आता वेरूळ लेणी जतन करण्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एसटी बसमधून वेरूळ अभ्यागत केंद्रापासून लेणीपर्यंत प्रवासी वाहतूक करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजवणी १ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. वेरूळ लेणीला २०१४-१५ मध्ये १३ लाख २० हजार पर्यटकांनी भेट दिली. त्यानुसार दररोज सरासरी ४,३२६ पर्यटक भेट देतात. खासगी वाहनांना प्रवेश बंदी केल्यानंतर रोज सरासरी २००० प्रवाशी एसटीमधून लेणीपर्यंत प्रवास करतील, असा अंदाज आहे. अभ्यागत केंद्र ते लेणी या मार्गावर पाच मिडी आणि दोन हिरकणी बस चालवण्यात येणार आहेत.

असे राहतील दर

वेरूळ अभ्यागत केंद्र ते लेणी व परत अभ्यागत केंद्र हे अंतर ५.६ किलोमीटर आहे. मिडी बसच्या प्रवासासाठी २० रुपये, हिरकणी विना वातानुकूलित बस २० रुपये व वातानुकूलित बस करिता ४० रुपये दर आकारण्यात येणार आहे.

खासगी वाहतूक बंद करून अभ्यागत केंद्र ते लेणी या मार्गावर एसटी महामंडळाची बस सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या सेवेसाठी २८ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त, महामंडळाचे अधिकारी यांची बैठक होणार आहे. माझ्याकडे सध्या एवढीच माहिती आहे.

- आर.एन. पाटील, विभागीय नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा थंडीचा कडाका मार्चपर्यंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सकाळी व रात्री प्रचंड गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण आहे. सोमवारचे किमान तापमान १७वरून घसरून मंगळवारी थेट १३ अंशांवर आले. जानेवारीत थंडी वाढणार असून मार्चपर्यंत कडाक्याची थंडी मुक्काम करणार आहे.

डिसेंबरच्या मध्यापर्यंत अपेक्षित थंडी नाही. उलट दिवसा तापमान वाढत आहे. औरंगाबादेत सकाळी १० पर्यंत आणि सायंकाळी सातनंतर थंडी, तर दुपारी उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. 'पश्चिम घाट, उत्तर महाराष्ट्रासह मुंबईत थंडी वाढली आहे. मराठवाड्यातही पुढील चार दिवसात तापमानाची घसरण होईल' असे हवामान तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. मागील आठवड्यापासून आकाशात ढग तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या बदलामुळे थंडी घटली आहे. तापमानात आणखी घसरण अपेक्षित असून राज्याच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विपरित हवामानामुळे पडसे व तापाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

हवामानातील या बदलाचा रबी हंगामावरही परिणाम झाला आहे. हरभरा, ज्वारी व गहू या पिकांना थंडीची आवश्यकता असते. थंडीचे कमी प्रमाण व वाढत्या उन्हामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

काश्मीरला बर्फवृष्टी सुरू असून उत्तर भारतातून थंड वारे वाहत आहेत. सध्याची कमी थंडी हा 'एल निनो'चा परिणाम आहे. येत्या दोन दिवसात तापमानात घसरण होणार आहे. मात्र, जानेवारी ते मार्च महिन्यात प्रचंड थंडी राहील.

- डॉ. श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्या मुकुंदवाडी शाळेला आयएसओ!

0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com

औरंगाबादः महापालिकेच्या मराठी शाळा मागास. तिथले शिक्षण कमी दर्जाचे. असा गैरसमज बाळगणाऱ्यांना मुकुंदवाडी शाळेने आपल्या कर्तृत्वाने सणसणीत चपारक दिली आहे. शाळेच्या शिरपेचात आयएसओ ९००१ - २००८ या मानांकनाचा तुरा खोवला गेला आहे. असे मानांकन मिळवणारी ही महापालिकेची पहिलीच शाळा आहे.

मुकुंदवाडी शाळेत १०८० विद्यार्थी असून २४ शिक्षक काम करतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आलेख उंचावला पाहिजे, दहावी परीक्षेत आपल्या शाळेचे जास्तीत जास्त विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण व्हावेत याकडे शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र सोळुंके व शिक्षक विशेष लक्ष देतात. तासिकातत्वावरील शिक्षकांचेही यात मोठे योगदान आहे. गुणवत्तेची एक एक पायरी सर करताना आपली शाळा आयएसओ मानांकन प्राप्त असली पाहिजे, असा ध्यास मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतला. त्यानुसार परिसर स्वच्छता, इमारतीची रंगरंगोटी, इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, शिक्षकांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक पध्दती असे उपक्रम राबविले. यासाठी पालिकेच्या फंडातून पैसा खर्च केला नाही. लायन्स क्लबचे राहुल औसेकर, डेंटल असोसिएशनचे डॉ. शहा, महेंद्र बोरगे, संजू जीनवाल, आमदार नारायण कुचे, नगरसेवक कमलाकर जगताप, भाऊसाहेब जगताप, कमल नरोटे, अनिता साळवे यांच्यासह बाबासाहेब डांगे यांचेही यासाठी योगदान लाभल्याचे देवेंद्र सोळुंके सांगतात.

'आयएसओ' मिळाल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. यापुढे जास्त जोमाने काम करू. ज्ञानरचनावादावर विशेष लक्ष देणार आहोत. शाळेला आयएसओ मिळाले. आता चिकलठाणा व विश्रांतीनगरच्या शाळेसाठी प्रयत्न करण्याची इच्छा आहे.

- देवेंद्र सोळुंके, मुख्याध्यापक

शाळेला आयएसओ मानांकन मिळाल्याचा आनंद आहे. त्यामुळे आमची जबाबदारी देखील वाढली आहे. शाळेला गुणवत्तेच्या बाबतीत यशाच्या शिखरावर नेण्याचे आव्हान आमच्या समोर आहे.

- अलका गोसावी, शिक्षिका

आयएसओ मानांकनामुळे या शाळेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल. गुणवत्तेच्या दृष्टिने शाळेत विविध उपक्रम सुरू आहेत. त्याचा लाभ निश्चितपणे विद्यार्थ्यांना होईल.

- सुनीता पाटील, शिक्षिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवड्यात १५० टँकर वाढले

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातचा घसा दिवसेंदिवस कोरडा पडतो आहे. आठवड्यात तब्बल १५०हून अधिक टँकर नव्याने सुरू करावे लागलेत. सद्यःस्थितीत विभागात एकूण ७६७ टँकर सुरू असून सर्वाधिक टँकर बीड जिल्ह्यात आहेत.
सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे जनता हवालदिल झाली आहे. हिवाळा सुरू होण्याआधीपासूनच बीडसह मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. सार्वजनिक विहीर, विहिरी प्रकल्पांसह खासगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणी टँकरद्वारे गावोगावात पोहचवले जात आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या या टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
मात्र, परिस्थिती भयावह असतानाच टँकरच्या नेमक्या खऱ्या किती फेऱ्या होतात, याविषयी आता ओरड होत आहे. मुळात टँकरमध्ये कमी पाणी भरले जाते. कमी फेऱ्या करून, जास्त फेऱ्या केल्याचे दाखवले जाते. त्यातून जादा बिल उचलल जातात. ग्रामपंचायतमध्ये टँकरच्या फेऱ्याची रोज नोंद केली जात नाही, असा आरोप अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तपासणीचे आदेश
दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. टँकरची मागणी वाढत आहे. टॅँकरवरील जीपीएस यंत्रणेची तपासणी करण्यासाठी एक पथक नेमले आहे. या पथकाने बीड जिल्ह्यातील आष्टी, गेवराई आणि बीड या तीन तालुक्यात टँकरची अचानक तपासणी केली. तेव्हा जीपीएस यंत्रणा नसणे, फेऱ्यांची नोंद रजिस्टरमध्ये न ठेवणे, गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या न घेणे, आदी त्रुटी दिसून आल्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत टॅँकरची तपासणी होत नसल्याचेही स्पष्ट झाले. तपासणीचा हा अहवाल लवकरच विभागीय आयुक्तांना सादर होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अलिगढ विद्यापीठासाठी जमीन हस्तांतर करा’

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला पाच नवीन केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यापैकी एक औरंगाबाद येथे एक केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठ इच्छुक आहे. केंद्रासाठी जमीन हस्तांतर करण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे.

अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, संयोजक कैसरोद्दीन, शारेक नक्षबंदी यांच्यासह शिष्टमंडळाने बुधवारी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की जमिनीची पाहणी करून सर्व्हेे क्रमांक पाच, शुलीभंजन (ता. खुलताबाद) येथील जागा अंतिम करण्यात आली होती. मागच्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात अशी घोषणा केली होती. विद्यापीठ केंद्र लवकरच सुरू करण्यात येईल, पण आजवर सरकारने जमिनीचे हस्तांतरण विद्यापीठाकडे केलेले नाही. ही कारवाई लवकर व्हावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळ सय्यद अफजल हुसेन, राजेश मुंडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ चले जाव !

0
0

'समांतर' चले जाव !

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या विरोधात स्वराज अभियान संघटनेने बुधवारी महापालिका कार्यालयासमोर निदर्शने केली. हायकोर्टात दिलेला शब्द न पाळणारे 'समांतर' चले जाव, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
प्रा. विजय दिवाण यांनी समांतर जलवाहिनीसंबंधी महापालिकेने कंपनीशी केलेल्या कराराबद्दल हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी कंपनीचे कर्मचारी दमदाटी करतात, १८ टक्के व्याज आकारले जाते, नळ कनेक्शन तोडण्याच्या धमक्या दिल्या जातात हे त्यांनी याचिकेच्या माध्यमातून कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा कोर्टाने कंपनीवर निर्बंध घालीत हे सर्व प्रकार थांबवण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानंतरही सक्तीने पाणीपट्टी वसुली, व्याज आकारणी, नळ कनेक्शन तोडणे अशी कामे कंपनीतर्फे केली जात आहेत. त्यामुळे कंपनीच्या विरोधात स्वराज अभियानच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी देविदास कीर्तीशाही, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, डॉ. मोहम्मद सर्फराज, प्रवीण सरकटे, अरविंद बोरकर, राधाकिसन पंडित आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिपुत्राकडून ई-कॉमर्सची मुहूर्तमेढ

0
0

Nikhil.Nirkhee
@timesgroup.com

देशपांडे कुटुंबीय हे मूळचे जालना जिल्ह्यातील परतूरचे. अभय देशपांडे यांचे वडील आर. एम. देशपांडे हे मंत्रालयातील विधी व न्याय विभागातून सचिव म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे घरामध्ये शिक्षणाचे आणि विशेषतः कायद्याच्या शिक्षणाचे वातावरण. वडील शासकीय सेवेत असल्यामुळे दर दोन-तीन वर्षांनी बदली होत होती व अशी बदलीच्या ठिकाणी अभय यांचे शिक्षण होत गेले. अर्थात, अभय यांचे बहुतांश शिक्षण हे मराठवाड्यातच झाले. अभय यांची पहिल्यापासूनच शैक्षणिक प्रगती दिसून येत होती. त्यांना कधीही ८० टक्क्यांपेक्षा कमी मार्क्स मिळाले नाहीत. गणित-विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असल्याने त्यांनी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला आणि नांदेड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये बी. ई. पूर्ण केले. अर्थात, पहिल्या वर्षी गटांगळ्या खाल्या; पण शेवटच्या वर्षी म्हणजे १९९५ मध्ये डिस्टिक्शन मिळविले. बी. ई. झाल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याची त्यांना कधीच इच्छा नव्हती. त्याऐवजी उद्योग-व्यवसायाकडे वळावे, अशी मनोमन इच्छा होती. मात्र, वडिलांनी नोकरी शोधा, असे ठणकावून सांगितल्यानंतर नोकरीचा शोध सुरू केला. सुरुवातीला एका मित्राच्या कंपनीमध्ये दीड वर्ष काम केल्यानंतर त्या कंपनीचे काम हैदराबादमध्ये सुरू झाल्यामुळे अभय यांना तिथे जावे लागले. उद्योग-व्यवसायाकडे मन खेचले जात होते आणि नोकरीत मन रमत नव्हते. त्याचवेळी वेगवेगळ्या शहरातील स्पेशालिटीज म्हणजेच पुण्यातील चितळ्यांची बाकरवडी दुसरीकडे का नाही मिळत, हा डोक्यात भुंगा सुरू झाला आणि त्यावर ई-कॉमर्स हेच उत्तर असल्याचे अभय यांना पुरते कळून चुकले. त्यातूनच त्यांनी 'मालामाल डॉट कॉम' हे ई-कॉमर्सचे पोर्टल सुरू केले. पोर्टलवर ऑर्डर करा आणि हवे ते मिळवा, अशी आज सर्वांना परिचित होत असलेली ई-कॉमर्सची संकल्पना त्यावेळी म्हणजेच १९९८ मध्ये भारतीयांना फारशी पचनी पडली नाही. लोकांचा प्रतिसाद मिळत होता; परंतु तो अपेक्षेपेक्षा खूप कमी होता. त्यामुळेच अभय यांनी अमेरिकेत मार्केट प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला. बघता-बघता अमेरिकेतून प्रतिसाद मिळत गेला आणि विशेषतः एनआरआयकडून खूप जास्त आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. हळूहळू अनेक गुंतवणुकदारांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली. मात्र, कदाचित नियतीला ते मान्य नव्हते. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला आणि अमेरिकेच्या अर्थकारणाला काही काळ का होईना ग्रहण लागले. त्याच सुमारास जागतिक मंदीने डोके वर काढले आणि कंपनीला गंभीर आर्थिक फटका बसला. दिवाळखोरी जाहीर करण्याचा विचार मनाला शिऊन गेला खरा; पण काही झाले तरी जबाबदारी पार पाडायची आणि पै ना पैची कर्जफेड करायचीच, हे त्यांनी ठरवून टाकले. त्यामुळे २००० ते २००६ या अत्यंत कठीण काळावर मात करीत आणि झुंज देत संपूर्ण चार कोटींचे कर्ज फेडले. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पूर्ण पैसे वापस केले. या काळात कंपनीची कर्मचारीसंख्या १०० वरून १२ वर आली. कंपनीची अवस्था पाहून अनेक कर्मचारी सोडून गेले. मात्र, मार्केटमधून पळून न जाता मोठ्या धिटाईने पाय रोवून उभे राहण्यात आणि कंपनीची प्रतिमा उंचावण्यात अभय देशपांडे हे पूर्णपणे यशस्वी झाले. 'मालामाल डॉट कॉम'ने त्यांना आर्थिकदृष्ट्या 'मालामाल' केले नाही; परंतु समृद्ध अनुभवाच्या दृष्टिकोनातून त्यांना नक्कीच 'मालामाल' केले. अत्यंत वाईट आर्थिक स्थितीत कंपनी कशी चालवावी आणि अशाही स्थितीत अचूक धोरणे कशी आखायची व राबवयाची, याचे असंख्य धडे त्यांना मिळाले आणि त्याचा १०० टक्के फायदा त्यांना त्यांच्या पुढच्या टप्प्यावर झाला, हे ते आवर्जुन म्हणतात.

'मार्टजॅक'ची देशभर व्याप्ती
अनुभवातून पुरेपूर शिकल्यानंतर अभय यांनी २००७ मध्ये 'मार्टजॅक डॉट कॉम' ही कंपनी सुरू केली. व्यापारी-व्यावसायिक प्रतिष्ठानांना स्वतःची वेबसाइट तयार करण्याची टेक्नॉलॉजी मासिक भाडेतत्वावर पुरविण्याची 'मार्टजॅक'ची कल्पना-संकल्पना तशी देशात नवीच होती. हळूहळू 'मार्टजॅक'ची व्याप्ती व लोकप्रियता वाढत गेली. वॉलमार्ट, युनिविव्हर, पिझ्झा हट, लुलू यासारख्या मोठमोठ्या ब्रँडकडून कंपनीच्या टेक्नॉलॉजीचा वापर झाला आणि आज मोठमोठे ब्रँड कंपनीचे क्लाएंट आहेत. अनेक गुंतवणुकदारांनी दहा लाखांपासून दहा कोटींपर्यंत 'मार्टजॅक'मध्ये गुंतवणूक केली असून, कंपनीचे शेअर घेतले आहेत. आज कंपनीमध्ये आयआयटी, आयआयएमचे पदवीधर आहेत. अनेकजण मोठमोठ्या कंपन्या सोडून आले आहेत, हे विशेष. ई-कॉमर्स क्षेत्रातील देशातील एक यशस्वी कंपनी म्हणून 'मार्टजॅक'ने नावलौकिक मिळविला आहे.

सर्वांत मोठी डील वाट्याला
'मार्टजॅक'च्या यशामुळेच सिंगापूरच्या 'कॅपिलरी टेक्नॉलॉजी'ने 'मार्टजॅक' कंपनी दोन महिन्यांपूर्वी टेकओव्हर केली आहे. त्यासाठी तब्बल ३०० कोटींची डील झाली, जी देशातील मागच्या वर्षभरातील सर्वांत मोठी डील ठरली आहे, हे विशेष. यामुळे 'मार्टजॅक' आता अजून मोठ्या प्रमाणात संपन्न झाली आहे. टेकओव्हरनंतरही अभय हेच 'मार्टजॅक'चे संस्थापक व सीईओ म्हणून काम करणार असून, ते सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे शेअर होल्डर असणार आहेत. अर्थात, यापुढेही कंपनीतील सर्व २०० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम राहणार आहेत आणि कंपनीची घौडदौड अधिक वेगाने होणार आहे. 'बिलियन डॉलर कंपनी'चे अभय यांचे स्वप्न व ध्येय असून, त्यासाठी अभय यांना पुन्हा एकदा झपाटले आहे, हे विशेष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालमत्ता कराच्या वसुलीला लकवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला चक्क लकवा मारल्यागत धिम्यागतीने काम सुरू आहे. कर वसुलीचे उद्दिष्ट १६५ कोटी रुपयांचे असताना आतापर्यंत फक्त ४७ कोटी २८ लाख ६० हजार ८३९ रुपयांची गंगाजळी जमा झाली. सध्याचे वसुली प्रमाण ३० टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत ९ कोटी २२ लाख रुपयांनी वसुली वाढल्याचा दावा करत पालिकेचे अधिकारी स्वतःची टिमकी वाजवण्यात गर्क आहेत.
पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मालमत्ता कर वसुलीकडे विशेष लक्ष दिले आहे. वसुली प्रमाण वाढवण्यासाठी त्यांनी उपायुक्त अय्युब खान यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. हे काम प्रभावीपणे व्हावे यासाठी खान यांच्याकडे फक्त कर आकारणी व कर वसुलीचेच काम ठेवण्यात आले आहे. सहा वॉर्ड कार्यालयांतर्गत वसुलीचे काम केले जाते. प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला वसुलीचे वार्षिक उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. सहा वॉर्ड कार्यालयाचे मिळून एकूण उद्दीष्ट १५६ कोटी रुपये आहे. १ एप्रिल ते २२ डिसेंबर या दरम्यान ४७ कोटी २८ लाख ६० हजार ८३९ रुपयांची वसुली झाली आहे. गतवर्षी याच दरम्यान ३८ कोटी ६ लाख ३६ हजार ५४३ कोटी रुपयांची वसुली झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली ९ कोटी २२ लाख २४ हजार २९६ रुपयांनी जास्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या बदलीची भीती निराधार

0
0



म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराच्या समांतर जलवाहिनीच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी शपथपत्र सादर केले नाही. आयुक्तांना बदलण्याची भीती निराधार असल्याचे राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात आले. जर तसे खरोखरच घडले, तर फिर्यादी पक्षास या कोर्टाकडे दाद मागण्याची मुभा न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी दिले आहेत.
समांतर जलवाहिनी पाणीपुरवठ्याच्या विरोधात तीन याचिका केल्या आहेत. शुक्रवारी या याचिकांवर सुनावणी झाली. खासगीकरणाविरुद्ध स्थापन झालेल्या नागरी कृती समिती तर्फे प्रा. विजय दिवाण, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील, जलाधिकार कृती समितीचे विजय शिरसाट व सचिन भोजने यांनी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करून योजनेचे स्वरुप, समांतरचा करार आणि त्याची अंमलबजावणी यांच्या वैधतेविषयी आक्षेप घेतला आहे.
महापालिकेच्या आयुक्तांच्यावतीने शपथपत्र आजही दाखल केले गेले नाही. आयुक्तांच्यावतीने अनिल बजाज हे नवे वकील उभे राहिले. त्यांनी शपथपत्र देण्यासाठी ८ आठवड्यांची मुदत मागितली. त्यावर दिवाण यांचे वकील उदय बोपशेट्टी यांनी कोर्टासमोर निवेदन केले की 'सध्याच्या आयुक्तांनी समांतर प्रकरणी समग्र तपासणी करून वॉटर युटिलिटी कंपनीस 'कंत्राट रद्द का करू नये' अशी कारणे दाखवा नोटीस दिली आहे. आयुक्त हे स्वत: अभियांत्रिकी व विधी पदवीधर असल्याने या योजनेतील तांत्रिक व आर्थिक चुकांच्या अन्वेषणाचे त्यांचे निष्कर्ष त्यांच्या शपथपत्रात मांडले जाणे शक्य आहे. त्यामुळे त्यांचे शपथपत्र महत्त्वाचे आहे.
मात्र, आयुक्तांकडे पालिकेचा अतिरिक्त कारभार असल्याने त्यांचा कार्यभार संपुष्टात आणून त्यांच्या जागी नवा आयुक्त केंव्हाही नेमला जाऊ शकतो. तसे झाल्यास या आयुक्तांनी केलेल्या तपासाचे निष्कर्ष पटलावर न येण्याची भीती अॅड. बोपशेट्टी यांनी व्यक्त केली. यावर न्यायमूर्तींनी सरकारी वकीलांकडे विचारणा केली की शासन सध्याच्या आयुक्तांना पदावरून हलविण्याचा विचार करीत आहे काय ? त्यावर सरकारी वकिलांनी चौकशी करून सांगण्याचे मान्य केले. यावर न्यायमूर्तींनी सांगितले की 'आयुक्तांना पदावरून हलवले जाईल. ही भीती तूर्त निराधार असून जर तसे खरोखरच घडले तर फिर्यादी पक्षास या कोर्टाकडे दाद मागण्याची मुभा आहे.' या प्रकरणी पुढील सुनावणी २८जानेवारीला होणार आहे. दिवाण यांच्यातर्फे उदय बोपशेट्टी , राजेंद्र दाते पाटील यांच्यातर्फे अनिल गोळेगावकर, विजय शिरसाट यांचे वकील प्रदीप देशमुख, पालिकेतर्फे अनिल बजाज,कंत्राटदाराच्या वतीने राहुल कर्पे आणि राज्य शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अविनाश बोरुळकर हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलाबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम

0
0




म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलाची चर्चा दोन महिन्यांपासून होती. मात्र, कॉँग्रेसमधील अंतर्गत गटतटांची मर्जी राखण्यासाठी श्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दोन्ही अध्यक्ष करण्यासाठी सध्या पक्षात संभ्रमावस्था आहे.
विद्यमान जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे आणि शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांचा कार्यकाल संपला आहे. केंद्र, राज्य आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, पुढे त्याची पुनरावृत्ती होऊ नये, कार्यकर्त्यांना संधी द्यावी या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलाचे संकेत दिले होते. दोन महिन्यांपूर्वी चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी यासंदर्भात वक्तव्य केले होते. तेव्हापासून दोन्ही पदांसाठी इच्छुक असलेल्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशोक चव्हाण गटाकडे दोन्हीपैकी एक अध्यक्षपद निश्चित आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विनोद तांबे, माजी महापौर सुदाम सोनवणे, माजी आमदार नितीन पाटील यांची नावे चर्चेत होती. सत्तार चव्हाण गटाचे आहेत.
आगामी काळात पक्षबांधणी तसेच पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्तार यांना जिल्हाध्यक्ष करण्यासंदर्भात चव्हाण पॉझिटिव्ह आहेत. खुद्द सत्तार यांनी पत्रकारांना याची माहिती दिली. चव्हाणांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले आहेत. मी त्यासाठी तयार असल्याचे सांगून एक नियुक्ती झाल्याचे संकेत दिले. सत्तारांसोबत शहरात कुणाला जबाबदारी द्यायची, असा प्रश्न श्रेष्ठींना आता पडला आहे. शहराध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, आमदार सुभाष झांबड यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी जाऊ शकते, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या महापालिकेतील बळही घटले आहे. दुसरीकडे शहरात एकही आमदार नाही. त्यामुळे शहराध्यक्षपदाची जबाबदारी ज्याच्यावर द्यावयाची तो सक्षम असला पाहिजे, असा प्रथम निकष लावण्यात आला आहे. दोन्ही पदे जर चव्हाण गटाकडे गेली तर अन्य गट नाराज होतील आणि त्याचा फटका पक्षविस्ताराला बसण्याची शक्यता आहे. हे जाणून त्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. सध्या तरी काँग्रेस श्रेष्ठी संभ्रमावस्थेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’चे वीज कनेक्शन धोक्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला थकित वीज बिलचे एक कोटी रुपये भरण्यासाठी महावितरणने नोटीस बजावली आहे. सोमवारपर्यंत ही थकबाकी न भरल्यास पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

शहराची पाणीपुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. पाणी योजनेत पैठण, फारोळा, ढोरकीन येथे पंप बसविण्यात आले आहेत. त्यासाठी महावितरणकडून हाय टेन्शन कनेक्शन घेण्यात आले आहे. या विजेचे एका महिन्याचे सुमारे एक कोटी रुपये बील थकित आहे. त्यामुळे महावितरणने कंपनीला नुकतीच नोटीस बजाविल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंपनीने सोमवारपर्यंत बील न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो, असेही महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

महापालिकेकडून वीज बिल भरण्यासाठी पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे बिल भरण्यात आले नाही, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.

आयुक्तांना करावी लागली मध्यस्थी

महावितरणने नोटीस पाठविल्यानंतर महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची शक्यता आहे. या प्रकरणात महापालिकेचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे महावितरणने कंपनीला वीज बिल भरण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली.

१५ कोटींची थकबाकी

गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेने शहरातील वीज खांबांवरील दिव्यांचे वीज बिल भरलेले नाही. शहरातील पथदिव्यांचे सुमारे १५ कोटी रुपये थकित असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. केंद्र आणि राज्य आणि महापालिकेतही भाजप सत्तेत असल्याने या पदाला अधिक भाव आहे.
भाजपमध्ये सध्या अंतर्गत निवडणुकामुळे लगीनघाई सुरू आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे निवडणूक कार्यक्रमास महिन्याचा विलंब झाला असून वॉर्ड अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात शहराध्यक्षपदाची निवड होईल. लोकसभा, विधानसभा पाठोपाठ मनपा निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून भगवान घडमोडे यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली. तळागाळातील कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणाऱ्या घडमोडे उर्फ बापू यांनी पक्ष संघटन वाढविण्यावर भर दिला. शहराध्यक्ष म्हणून यांचा कार्यकाल पूर्ण होत आल्याने आता नवीन शहराध्यक्ष कोण, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. प्रामुख्याने आमदार अतुल सावे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश सदस्य माजी नगरसेवक अनिल मकरिये यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. यासह भाजपचे शहर सरचिटणीस विजयराव साळवे, संजय जोशी, हेंमत खेडकर यांचीही नावे चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेश प्रवक्ते असलेले शिरीष बोराळकर यांनी शहराध्यक्षपद स्वीकारावे, यासाठी पक्षातील काही मंडळी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अाविष्कार’मधील ३० प्रकल्प राज्यपातळीवर

0
0


अाविष्कार'मधील ३० प्रकल्प राज्यपातळीवर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधनावर आधारित ९० पैकी ३० प्रकल्प राज्यपातळीसाठी पात्र ठरले आहेत. अाविष्कार स्पर्धेत भाषा व ललित कला, विधी, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अशा सहा विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत संशोधन मांडले होते. यातील ३० प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १५ व १६ जानेवारीदरम्यान राज्यपातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. प्रत्येक गटातून पाच स्पर्धक राज्यपातळीवर पाठविले जाणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. चोपडे यांनी 'अविष्कार सेल' स्थापन करण्याची घोषणा केली. हा सेल स्थापन करून पूर्णवेळ संचालक नेमण्यात येईल. संशोधनासाठी येत्या अर्थसंकल्पात वेगळ्या निधीची तरतूद केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय वाऱ्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मेक इन इंडिया' आणि आयआयटी नव्हे तर आता 'आयटीआय'कडे लक्ष असेल, असे पतंप्रधान सांगत असले तरी, आयटीआय, तंत्रशाळांचे चित्र बदलण्यास तयार नाही. एकट्या औरंगाबाद विभागातील आयटीआय, तंत्रशाळांमधील शिक्षकांच्या तब्बल ३५० जागा रिक्त आहेत. पूर्णवेळ शिक्षक, प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्याही निम्म्या जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर भांडारपाला, लिपीकासह 'अ' संवर्गातीलही २२ जागा रिकाम्या आहेत.

पारंपरिक शिक्षणापेक्षा रोजगाराभिमुख, कौशल्याभिमुख शिक्षणाला महत्त्व देण्याच्या घोषणा शासनाकडून होत असल्या तरी प्रत्यक्षात या अभ्यासक्रमांच्या संस्थांची दुरवस्था कायम आहे. मराठवाड्यातील आयटीआय, शासकीय तंत्रशाळा, शासकीय एमसीव्हीसी अशा संस्थांमध्ये अनेक विषयांना शिक्षकच नाहीत. त्याचा अनेक संस्थांमध्ये अध्यापनाच्या कामावर त्याचा परिणाम झाला आहे. मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त पदांची संख्या मोठी असून, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. अशा शासकीय संस्थांमध्ये अपुऱ्या शिक्षकांमुळे, इतर शिक्षकांवर कामाचा ताण वाढतो आहे. अनेक संस्थांमध्ये दोन विषय एकाच शिक्षकाला शिकविण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात ८१ शासकीय आयटीआय, ३० खाजगी अनुदानित आयटीआय आहेत. यासह ४१ तंत्रशाळा आहेत.

आयटीआयमध्ये विविध विषयांना शिकविण्यासाठी निदेशक महत्त्वाचे असतात. यात शिल्प निदेशक, निदेशक, पूर्णवेळ निदेशक असे तब्बल ३११ पदे रिक्त आहेत. शिकविणारे शिक्षकांचीच संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम अध्यापनावर होतो आहे. यासह 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' अशा वेगवेगळ्या संवर्गातील तब्बल ७०० पदे रिक्त आहेत.


प्राचार्यही नाहीत
आयटीआयमध्ये प्राचार्यांची पदे ही मोठ्या प्रमाणात रिक्त् आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; विभागातील आयटीआयमध्ये २२ प्राचार्यांची पदे रिक्त आहेत. प्राचार्यच नसल्याने अशा संस्थांचा गाडा हाकणे प्रशासनाला अडचणीचे ठरते आहे. त्यात ग्रामीण भागातील आयटीआयची संख्या अधिक आहे.

शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे प्रशिक्षणावर परिणाम होतो. प्राचार्यांच्या रिक्त जागांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होतो. योजना राबविणे अवघड होते. अनेक ठिकाणी प्रभारी प्राचार्य नेमण्यात आले आहेत.
- डॉ. रवींद्र बाळपुरे, विभागीय सहसंचालक, व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, औरंगाबाद.


प्रमुख रिक्त जागा...
पूर्णवेळ शिक्षक २२

शिल्प निदेशक २६७

निदेशक ३१

पूर्णवेळ निदेशक १३

मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक ११

भांडारपाल ४८

लिपिक ८९


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कामे करा; अन्यथा निलंबन’

0
0



औरंगाबाद : 'पंधरा दिवसात प्रलंबित कामांचा निपटारा झालाच पाहिजे. अन्यथा कारवाईला तयार रहा,' अशा स्पष्ट शब्दांत विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. प्रशासनावर शासनाचे अंकुश नसल्याचा आरोप वारंवार होत आहे. अधिकारशाहीबाबत मुख्यमंत्र्यांनीही अनेकदा हे बोलून दाखविले. यानंतर आता प्रशासकीय पातळीवर अशा बैठका घेत कामकाजाचा निपटारा करा, जनतेचे प्रश्न तातडीने निकाली काढावेत अशा सूचना वरिष्ठांकडून केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विभागीय आयुक्तांनी आज कामकाजाचा आढावा घेतला. ज्यात जिल्ह्यातील पुरवठा, ई-फेरफार, आआरसीची वसुली, लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे, जिल्हा नियोजन विकास समिती, गौणखनिज, निराधार लाभार्थींच्या योजना, भूसंपादन, तहसील आणि उपविभागीय कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना प्रलं‌बित प्रकरणांचा जाब विचारत तातडीने प्रकरणे निकाली काढा, गतीने काम करा, दुष्काळी परिस्थिती असल्याचे भान ठेवून जनतेला दिलासा देता येईल, अशा कामांचा तत्काळ निर्णय घ्या, अशा सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images