Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धान्य खरेदीसाठी नऊ केंद्रे

0
0
शेतीमाल एकदाच बाजारपेठेत आल्यानंतर भाव कोसळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य नफा मिळवून देणे आणि शेतीत अधिक उत्पादन वाढवण्यासाठी ‘आत्मा’ प्रयत्नशील आहे. या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे’ अशी माहिती ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक सतीश शिरडकर यांनी दिली.

‘समांतर’बद्दल ‘तेरी भी चूप-मेरी भी चूप’

0
0
समांतर जलवाहिनीबद्दल महापालिका प्रशासन व पदाधिकारी यांनी ‘तेरी भी चूप-मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता या योजनेबद्दलचा संशय बळावू लागला आहे.

‘पीपीपी’ च्या मंजुरीची फाइल शासन दरबारी

0
0
समांतर जलवाहिनीचे काम ‘पीपीपी’ तत्वावर करण्याला मंजुरी मागणारी पालिकेची फाइल शासन दरबारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वॉटर बायलॉजची फाइल मात्र अद्याप पालिकेतच घुटमळत आहे. या दोन्हीही फायलींना शासनाकडून मंजुरी मिळाल्याशिवाय समांतर जलवाहिनीचे काम सुरू होणे शक्य नसल्याची माहितीही मिळाली आहे.

काँग्रेसचे वर्चस्व कायम

0
0
मुंबईतून आदेश मिळूनही मनसेच्या काही सदस्यांनी मतदानाच्या वेळेपर्यंत भूमिका ठरविली नव्हती. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज पटेल यांनी ऐनवेळी महत्त्वाची भूमिका बजावल्याने मनसे सदस्य मतदानाला पोहोचले. काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले.

झेडपी अध्यक्षपदी जारवाल

0
0
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निवडणुकीत सोमवारी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या शारदा जारवाल निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेच्या नंदा ठोंबरे यांचा पराभव केला. जारवाल यांना ३६, तर ठोंबरे यांना २२ मते पडली.

रुपया सावरण्यासाठी तरुणाईचा पुढाकार

0
0
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची वेगाने घसरण होऊ लागली आहे. रुपया सावरण्यासाठी सरकारकडून, रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

राजस्थानी मूर्तींना मराठमोळा साज

0
0
सेव्हन हिल परिसरातील गणपतींच्या मूर्ती साकारणारे राजस्थानी लोक आता औरंगाबादवासीयांना परिचयाचे आहेतच. यंदा मात्र या कलाकारांना एका मराठमोळ्या हौशी कलाकाराने साथ दिली व या गणपतींच्या रूपात अधिक वैविध्यता आली. भाषा वेगळ्या असल्या, तरी दोन कलाकारांचे एकत्र काम करताना केवळ ‘कलानिर्मिती’ हेच ध्येय असते, मग भाषा तिथे गौण ठरते.

तोतया पोलिसांचा ज्येष्ठ महिलेला गंडा

0
0
तोतया पोलिसांनी ज्येष्ठ महिलेला पावणेदोन लाखांना लुबाडले. महिलेचे पावणेदोन लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी पळवले. चेतनानगर भागात सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.

आसारामबापू समर्थक ताब्यात व सुटका

0
0
आसारामबापूंच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या हजारो शिष्यांनी सोमवारी दुपारी क्रांती चौकात निदर्शने केली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या समर्थकांना ताब्यात घेऊन नंतर सुटका करण्यात आली.

पत्रांना वेळेत उत्तरे द्या

0
0
खासदार, आमदार यांच्या पत्रांना, निवेदनांना पोच दिली जात नाही. त्यावर वेळेत उत्तरे दिली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खासदार, आमदारांच्या पत्रांना उत्तरे देण्यात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.

प्राध्यापकाला काळे फासले

0
0
कॉलेजच्या ‌विद्यार्थिनीला छेडछाड केल्याचे सांगून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी छत्रपती शाहू पॉलिटेक्निक कॉलेजच्या एका प्राध्यापकाला काळे फासले.

पर्यटनस्थळांचा विकास आराखडा

0
0
औरंगाबादमधील पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी पर्यटन विकास प्राधिकरणाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत आगामी दहा दिवसांत वेरूळ, म्हैसमाळ, खुल्ताबाद आणि सुलीभंजन या ‌पर्यटन स्थळांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्वाइन फ्लू रुग्णाचा मृत्यू

0
0
गेल्या दोन दिवसांत घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या दोन संशयित स्वाइन फ्लू रुग्णांचा मृत्यू झाला. या पेशंटचे स्वॅब पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.

डॉ. काळदाते यांचे पुण्यात निधन

0
0
समाजशास्त्रज्ञ डॉ. सुधाताई बापुसाहेब काळदाते यांचे सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता पुण्यातील संजीवन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या ७८ वर्षाच्या होत्या.

दुष्काळानंतर पुन्हा टंचाईयात्रा

0
0
गेल्या वर्षीच्या मोठा दुष्काळ अनुभवल्यानंतर यंदा भर पावसाळ्यात एकदा पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.

शिशुविकास केंद्र शाळेतर्फे चित्रकला स्पर्धा

0
0
नवभारत शिक्षण संस्था संचलित सिडको एन-८, हडको एन-९ व सुपारी हनुमान रोड येथील शिशुविकास केंद्र प्राथमिक शाळेतर्फे शहर पातळीवर प्राथमिक शिक्षकांकरिता चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ४० शाळांमधील ९० शिक्षकांनी सहभाग घेतला. तीन गटात ही स्पर्धा झाली.

‘डीआरडीए’चे कर्मचारी पगाराविना

0
0
केंद्र सरकारच्या योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) कार्यालयातील ३८ कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. वेतनासाठीचे बजेट उपलब्ध न झाल्याची शिक्षा या कर्मचाऱ्यांना भोगावी लागत आहे.

आदर्श पुरस्कारासाठी नऊ जणांचेच प्रस्ताव

0
0
महापालिकेच्या शाळेत कार्यरत असलेल्या ५३० शिक्षकांपैकी फक्त नऊ जणांनीच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. यापैकी दोन जणांचीच पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.

पर्यटन विकासासाठी सूचनांचा पाऊस

0
0
औरंगाबादकरांनाच शहरातील पर्यटनस्थळांची माहिती करून दिली पाहिजे. औरंगाबाद-वेरूळ महोत्सवाचे वर्षभरापूर्वी नियोजन करावे यासह पर्यटनवाढीसाठी असंख्य सूचना सोमवारी आयोजित चर्चासत्रात मांडण्यात आल्या.

पाणचक्कीतील ग्रंथालय पर्यटकांपासून दूर

0
0
शहरातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या पाणचक्कीमधील सोळाव्या शतकातील ग्रंथालय पर्यटकांपासून दूरच आहे. तीन हजारांहून अधिक असलेली प्राचीन काळातील आर्युवेद, युनानी आणि प्रामुख्याने इस्लामी धर्मग्रथांचा मोठा खजिना पर्यटकांपासून सध्याही दूर आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images