Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबाद गारठले; तापमान ८.६ वर

$
0
0

औरंगाबाद: निरभ्र आकाश आणि उत्तरेकडील थंडीच्या लाटेने मराठवाड्यात गारठा वाढला आहे. औरंगाबाद शहरात शनिवारी तापमानात लक्षणीय घसरण झाली. किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. या गारव्याचा नागरिकांचा कमालीचा फटका बसला. सकाळी हवेत सर्वाधिक गारवा होता. दुपारी काही प्रमाणात तापमान वाढले; मात्र सायंकाळी थंडीचा जोर कायम होता. चिकलठाणा वेधशाळेत कमाल २६ व किमान ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. पुढील आठवड्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही कडाक्याची थंडी पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅरिबॅगविरुद्ध थेट फौजदारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका कार्यक्षेत्रात यापुढे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची कॅरिबॅग बाळगणाऱ्यांविरोधात जप्ती नव्हे, तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. यासंदर्भात जनजागृतीसाठी रविवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅगचा वापर सर्रास केला जातो. प्रदूषणास खतपाणी आणि पर्यावरणास धोका असलेल्या या कॅरिबॅगच्या बंदीचा निर्णय महापालिकेने घेतला. गेल्या काही दिवसांपासून पालिकेचे अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील विविध प्रतिष्ठानांमध्ये जाऊन छापे मारले. त्यात लाखो रुपयांच्या कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. त्यापुढे जात पालिका प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे ठरविले आहे.

यापुढे कॅरिबॅग बाळगणाऱ्यांविरुद्ध जप्तीऐवजी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मात्र, त्याची पूर्वकल्पना द्यावी आणि जनजागृती करावी या उद्देशाने रविवारी पालिका अधिकाऱ्यांनी फळविक्रेते, हातगाडीचालक, दुकानदार यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे.

एक क्विंटल कॅरिबॅग जप्त

पालिकेने दहा दिवसांपूर्वी कॅरिबॅग जप्तीची मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी ७० किलो कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर व्यापाऱ्यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग विकणे बंद केले आहे. पालिकेच्या मोहिमेस सहकार्य करण्याची अनेकांची भूमिका आहे. मात्र, कॅरिबॅग बनविणारी मंडळी थेट हातगाड्या, फळांच्या गाड्यावर जाऊन विक्री करतात. या सगळ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रविवारी सकाळ अकरा वाजता बैठक बोलाविली आहे. शनिवारी वाळूज परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली, पण तिथे कॅरिबॅग आढळून आल्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवना येथील आरोग्य केंद्राचे बांधकाम करावे’

$
0
0

सिल्लोड शिवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सभापती रेखाताई जगताप यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्याकडे केली आहे. शिवना येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मंजूर असून टेंडर झालेले आहे. पंरतु, इमारत बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरवठा करून जमीन हस्तांतर करून घेतली. आरोग्य संचनालय मुंबई येथून इमारत बांधकामासाठी वाढीव निधी करिता तत्कालिन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने तरतूद करून घेण्यात आली, त्याबद्दलचे पत्र स्वतः जिल्हा परिषदेला आणून दिले आहे. त्यामुळे अध्यक्षांनी या प्रकरणी लक्ष घालून इमारतीचे काम तातडीने करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज उपकेंद्राचे काम शिवन्यात रखडले

$
0
0

सिल्लोड ः सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे मंजूर करण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राऊत यांनी केली आहे.
शिवना ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून, व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीजटंचाई भासत आहे. त्याचबरोबर कृषी वीजपुरवठाही कमी दाबाने होत असल्याने शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी सुरळीत चालत नाहीत. या केंद्राला मंजुरी मिळून दोन वर्ष झाली आहेत. उपकेंद्रासाठी ग्रामपंचायती जागा उपलब्ध करून देऊनही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी महावितरणला दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्निचर क्लस्टर मंजूर

$
0
0


Makarand.Kulkarni@timesgroup.com

औरंगाबाद ः उद्योग खात्यातर्फे लघु उद्योजकांना गेल्या वर्षभरात विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक व्यावसायिकांचे क्लस्टर कार्यान्वित होत आहेत. खवा, ट्रक बॉडी बिल्डिंग, लेदर क्लस्टरची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. त्यापुढे जात औरंगाबादेत ८० उद्योजकांना एकत्र करून फर्निचर क्लस्टर तयार करण्यात आले आहे. त्याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली.

उद्योग खात्याकडे यासंदर्भात प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. क्लस्टर म्हणजे एखाद्या समान उत्पादन करणाऱ्या लघु व्यावसायिक, उद्योजकांना एकत्र करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे होय. उद्योग विभागाच्या नियमानुसार क्लस्टर स्थापनेचा प्रकल्प सादर करताना त्याचा सविस्तर अभ्यास अहवाल सादर करावा लागतो. औरंगाबादेत उभारावयाच्या फर्निचर क्लस्टरचा हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये फर्निचर बनविणारे ८० उद्योजक एकत्र आले आहेत. टेबल, खुर्ची, हॉस्पिटल यांना लागणारे साहित्य, स्टील व लाकडी फर्निचर बनविणाऱ्यांचा यात समावेश आहे. या लघु व्यावसायिकांना आधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या तर अधिक दर्जेदार उत्पादन आणि व्यवसायाला फायदा होऊ शकतो. औरंगाबादेत वर्षाकाठी सुमारे ५० कोटींची उलाढाल फर्निचर व्यवसायातून होते, मात्र छोट्या व्यावसायिकांना प्रोडक्ट तयार करताना काही गोष्टींची अडचण येते. कर्व्हिंग, पॉलिशिंग, कटिंग, बेंडिंग, पावडर कोटिंग आदी कामांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध होत नाहीत.

क्लस्टरच्या स्थापनेनंतर या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. पाच कोटी रुपयांचा हा एकूण प्रकल्प असणार आहे. सविस्तर अभ्यास अहवालानंतर आता पुढच्या टप्प्यात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल. त्याच्या मंजुरीस दोन ते तीन महिने लागणार आहेत. त्यानंतर औरंगाबाद स्टील क्लस्टर खऱ्या अर्थाने कार्यान्वित होणार आहे. क्लस्टर उभारणीसाठी दोन एकर जागा लागणार आहे. त्यासाठीचा प्रस्तावही प्रकल्प अहवालात समाविष्ट करण्यात येणार आहे. एकूणच औरंगाबाद फर्निचर क्लस्टरच्या स्थापनेनंतर उद्योगवाढीला वाव मिळणार आहे.


क्लस्टरमुळे काय होणार?

कर्विंग, पावडर कोटिंग, पॉलिशिंग, कटिंन, बेंडिंग आदी कामांसाठी उद्योजकांना मोठा खर्च करावा लागतो. या कामांसाठी लागणारी यंत्रसामग्रीही महागडी आहे. ही सामग्री क्लस्टरच्या निमित्ताने एका छताखाली उपलब्ध होणार आहे. क्लस्टरमधील यंत्रसामग्रीच्या मदतीने दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करणे शक्य होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसानंतर थंडी ओसरणार!

$
0
0

औरंगाबाद ः गेल्या चार दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली असून, तज्ज्ञांच्यामते दोन दिवसांनंतर थंडीचा जोर ओसरणार अाहे. त्यानंतर आठवडाभरानंतर मराठवाड्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी सुरू होणार आहे.

डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून उत्तर भारतात थंडीची लाट असून, काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून औरंगाबाद शहरात तापमान १३ अंश सेल्सियसवरून थेट ८ अंश सेल्सियसपर्यंत घट झाली होती, मात्र आता हवामान अभ्यासकांच्या मते सोमवारपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. दुपारी उन्हाचा चटका कमी झाला असला तरी, थंड वारे वाहत असल्यामुळे थंडी कायम आहे. मार्च महिन्यापर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये गेल्या आठवड्यापासून तापमानामध्ये मोठी घट झाल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये तापमान वाढल्यानंतर थंडी कमी होणार असली तरी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा थंडीचा कडाका सुरू होणार आहे. असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांचा डॉक्टरांना डोस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका मुख्यालयाजवळ असलेल्या नूर कॉलनीत पाच दिवसांत दोन युवकांचा डेंगीसदृश विकाराने मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रविवारी सकाळी या भागास भेट दिली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची मात्र या अचानक दौऱ्याने धावपळ उडाली. दिवसभर या भागात कँप लावला गेला. दिवसभरात २५६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. तापाचे नऊ रुग्ण आढळून आले. तीन ड्रममध्ये डास अळ्या निदर्शनास आल्या. यावरून औरंगाबादेत डेंगी तापाची साथ सुरूच असल्यास पुष्टी मिळाली आहे.
टाउन हॉलमधील नूर कॉलनीमधील एका युवकाला शुक्रवारी घाटी हॉस्पिटलमध्ये तापाच्या आजारावरून उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी याच भागातील समीर नावाच्या १४ वर्षांय युवकाचाही डेंगीसदृश तापाने मृत्यू झाला. पालिकेच्या स्वच्छता विभागास वेळोवेळी तक्रारी करूनही स्वच्छता केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. शिवाय आरोग्य विभागानेही दुर्लक्ष केले होते. त्याची दखल घेत आयुक्त केंद्रेकर रविवारी सकाळी नूर कॉलनीत पोचले. या परिसराची त्यांनी पाहणी केली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आयुक्तांच्या दौऱ्यामुळे धावपळ उडाली. आरोग्य विभागाला या भागात कँप लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. २५६ घरांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यात अनेक अव्यवस्था आढळून आल्या. ५९८ पाण्याचे ड्रम, कंटेनर पालिका यंत्रणेने तपासले. त्यातील तीन ड्रममध्ये डास अळ्या आढळून आल्या. ५११ ड्रम कंटेनर, त्याचबरोबर पाणीसाठा असलेल्या भांड्यांमध्ये अॅबेट टाकण्यात आले.
तपासणी शिबिरात ६९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात तापाचे नऊ रुग्ण आढळून आले. ३० जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. आयुक्तांच्या आदेशानंतर या परिसरात फॉगिंग, स्प्रेइंग करण्यात आले. तपासणी शिबिरामध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणे, डॉ. उनवणे, डॉ. संध्या टाकळीकर, डॉ. मनिषा भोंडवे, डॉ. राठोडकर आदी सहभागी झाले होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंजारी वधु-वर मेळाव्यास गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वंजारी मंगल कार्यालय येथे रविवारी आयोजित केलेल्या वंजारी उपवर वधु-वर परिचय मेळाव्यामध्ये हुंडाबंदी, लग्नातील अनावश्यक खर्च तसेच विवाह जमवताना येणाऱ्या अडचणी आदी गोष्टींवर चर्चा करण्यात आली. अॅड. बी. आर. जायभाय यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये मराठवाडासह इतर विभागातील सुमारे २०० वधु-वर तसेच त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ (मामा) अंबारवाडीकर होते. कार्यक्रमामध्ये वधु-वरांनी जोडीदार कसा असावा याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. योग्य वेळी योग्य जोडीदार निवडणे भावी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, असे पालकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुंदर बडे, ज्ञानेश्वर वाघ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चांगदेव गिते तर, सुग्रीव मुंडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीएडला ‘एनओसी’चा अडसर

$
0
0

बीएडला 'एनओसी'चा अडसर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील अध्यापक पदवी अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा करण्यात आला, परंतु या अभ्यासक्रमांच्या कॉलेजांना राज्य शासनाचे ना-हरकत प्रमापत्रच नसल्याचे समोर आले आहे. अभ्यासक्रम चालविण्यास कॉलेज सक्षम आहेत का, याची तपासणी करून विद्यापीठांनी शासनाला अहवला सादर केल्यानंतर शासन प्रमाणपत्र देणार होते, परंतु प्रक्रियाच झालेली नाही. त्यामुळे कॉलेजांनी दिलेले प्रवेश पात्र ठरतात की अपात्र, याबाबत संभ्रम आहे.

अध्यापक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविलेली आहे. दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम केल्यानंतरही स्थिती बदलेली नाही. त्यात कॉलेजांना शासनाने अद्यापही ना-हारकत प्रमाणपत्रच दिलेले नाहीत. कॉलेजांनी मात्र प्रवेशाची प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रियेपासून अडचणीत सापडलेल्या बीएड कॉलेजांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. नॅशनल काउंसिल फॉर टिचर्स एज्युकेशने (एनसीटीई) अध्यापनात कौशल्य, गुणवत्ता यावी यासाठी अभ्यासक्रमात बदल केले. अभ्यासक्रमाच्या रचनेत बदल करत त्यात तात्विक आणि प्रात्यक्षिक कार्याचा समन्वय साधण्यात आला आहे. त्यानुसार यंदापासून अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे कॉलेजांतर्फे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार होते. विद्यापीठांनी आपल्यातंर्गत कॉलेजांची तपासणीनंतर हे अहवाल शासनाकडे सादर करणे अपेक्षित होते. कॉलेजांमधील पायाभूत सुविधांची तपासणी करून सक्षम असतील तर ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाणार होते, परंतु अद्यापही कॉलेजांना अशा प्रकारचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कॉलेजांमधील प्रवेशाचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकारामुळे कॉलेजांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हुकमशाहीचा देशाला धोका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मोदी सरकारमागे अर्थसत्ता, धर्मसत्ता उभ्या आहेत, त्यामुळे देशाला हुकुमशाहीचा धोका असल्याचे मत कॉ. भगवानराव देशपांडे यांनी व्यक्त केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ९० वा वर्धापन दिन नुकताच जिल्हाभरात साजरा करण्यात आला. या निमित्त खोकडपुरा येथील जिल्हा कार्यालयाच्या प्रांगणात कॉ. भगवानराव देशपांडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यानंतर त्यांचे व्याख्यान झाले. इटलीच्या हुकुमशहा सत्ताधीशांच्या मागे तेथील अर्थसत्ता ठामपणे उभी होती तर, जर्मनीच्या हुकुमशहा सत्ताधीशांच्या मागे तेथील धर्मसत्ता ठामपणे होती. भारतातील मोदी सरकारची वाटचाल हुकुमशाहीकडेच सुरू असून या सरकारमागे धर्मसत्ता व अर्थसत्ता ठामपणे उभ्या आहेत व हे देशासामोरचे मोठे आव्हान आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव प्रा. कॉ. राम बाहेतील, अॅड. मनोहर टाकसाळ, अशफाक सलामी, अॅड. अभय टाकसाळ, कॉ. भास्कर लहाने आदींची यावेळी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

औरंगाबाद ः 'औरंगाबाद ब्लॅक बक्स' ही मॅरेथॉन संघटना तसेच 'मुंबई रोड रनर्स'च्या वतीने रविवारी (२७ डिसेंबर) शहरामध्ये दहा किलोमिटर दौड घेण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध धावपटू तसेच 'मुंबई रोड रनर्स'चे बिजय नायर व सतीश गुजारन यांच्यासह ४२ धावक सहभागी झाले होते. बीड बायपासवरील एमआयटी महाविद्यालयापासून ही दौड सुरू झाली. या दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामध्ये सहा वर्षांपासून सातत्याने ९० किलोमिटर अंतराची 'कॉम्रेड मेरेथॉन' धावणारे ५३ वर्षीय सतीश गुजारन यांनी मॅरेथॉन धावण्याची खास वैशिष्ट्ये नमूद केली. प्रसिद्ध धावपटू बिजय नायर यांनी धावण्याच्या व्यायामाचे महत्व समजून सांगितले. तसेच कर्करोगावर मात करून धावणारे, ७० व्या वर्षी ४२ किलोमिटर धावणाऱ्या धावकांची स्फूर्तीदायक उदाहरणे कथन केली. या उपक्रमासाठी एमआयटी महाविद्यालयाचे प्रा. गोडिहाल यांनी तसेच एबीबी ग्रुपच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समरसता साहित्य संमेलन कल्याण येथे जानेवारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समरसता साहित्य परिषद व कल्याण येथील श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय यांच्या वतीने १७वे समरसता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कल्याण येथे ३० व ३१ जानेवारीला संमेलन होणार असून, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान' या विषयावर संमेलन आधारित आहे, अशी माहिती कार्यवाह रवींद्र गोळे यांनी दिली. संमेलनानिमित्त रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कल्याण येथे १७वे समरसता साहित्य संमेलन होणार आहे. विशिष्ट विचारसूत्र घेऊन दरवर्षी समरसता संमेलन घेतले जात आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान या विषयावर संमेलन होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष रमेश पतंगे आहेत. संमेलनाचे उद्घाटन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार गणपत गायकवाड व माजी अध्यक्ष शेषराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संमेलनात वैविध्यपूर्ण परिसंवाद होणार आहेत. 'डॉ. आंबेडकरांचे भारतकेंद्री अर्थचिंतन', 'डॉ. आंबेडकरांचा प्रखर राष्ट्रवाद', 'डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आणि परिणाम' या विषयांवरील परिसंवादात मान्यवर सहभागी होणार आहेत. विजय सुरवाडे व मारुती माने या सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला रमेश महाजन, रवींद्र गोळे, प्रा. विजय राठोड, रमेश पांडव, संजय कांबळे व संतोष साळुंखे उपस्थित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण विभागीकरणास तीव्र विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरण कंपनीचे पाच विभागात विभाजन करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे वरिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीत अडचण निर्माण करणारे आहे. महावितरणच्या या नियमबाह्य कार्यवाहीच्या विरोधात वरिष्ठ अभियंत्यांसह सर्वच स्तरातील वीज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. याप्रकरणी २९ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय घोडके, कार्याध्यक्ष प्रेमानंद मोर्य, सरचिटणीस एन. बी. जारोडे, मुख्य संघटक एस. के. हनवते यांनी ही माहिती दिली. विद्युत मंडळाचे तीन कंपन्यांमध्ये विभाजन केल्यानंतर या त्यांचे खासगीकरण करणार नाही, कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्थीमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असा करार कामगार संघटनांसोबत करण्यात आला. तरीही नागपूर, औरंगाबाद व जळगाव येथे फ्रँजायजीच्या माध्यमातून खासगीकरण करण्यात आले. औरंगाबाद व जळगाव येथील फ्रँजायजी रद्द करण्यात आल्यानंतर नागपूर येथील एसएनडीएलच्या अनागोंदी व ग्राहकाविरोधी कारभारास जनता कंटाळली आहे. सत्यशोधन समितीच्या अहवालानंतरही एसएनडीएलची फ्रँजायजी रद्द करण्यास सरकार कचरत असल्याचा आरोप संघटनेने केला.
वीज कंपन्यांचे विभागीकरण रोखण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने २९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच दिवशी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादेतील संघटना सदस्यांनी मंगळवारी दुपारी बारा वाजता परिमंडळ कार्यालयासमोर जमावे, असे आवाहन संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष नवनाथ पोटभरे, रोहिदास अल्हाट, रुपाली पहूरकर, गौतम पगारे, जी. टी. सोनवणे, आशुतोष शिरोळे, रवींद्र धनवे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलचे भिजत घोंगडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या औरंगाबाद तहसीलच्या विभाजनाच्या घोषणेनंतर तहसीलसाठी नवीन इमारत सज्ज झाली आहे मात्र अद्याप उदघाटनाला मुहूर्त लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन तहसीलचे उद््घाटन २२ जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे.
शासनाचा आदेश प्राप्त न झाल्यामुळे प्रादेशिक मत्स्य कार्यालयाच्या जागेत सुरू करण्यात येणाऱ्या नवीन तहसीलच्या उद््घाटनाचा १२ डिसेंबर रोजीचा मुहूर्त हुकला. दरम्यानच्या काळात इमारतीची संपूर्ण डागडूजी, रंगरंगोटी करण्यात आली असून कार्यालयासाठीचे साहित्य खरेदीच्या निविदा मागवण्याचीही तयारी पूर्ण करण्यात आली आहे.अत्यंत कमी वेळेत तहसीलची ही इमारत कार्यालयासाठी तयार करण्यात आली असून केवळ कार्यालय सुरू करण्यासाठी शासन आदेशाची प्रतिक्षा आहे. उद््घाटनाचा कार्यक्रम १२ डिसेंबर रोजी जवळपास ठरला होता, निमंत्रणपत्रिका छापण्यात आल्या व पाहुण्यांची यादीही तयार करण्यात आली. मात्र प्रशासनाला अध्यादेश नसल्यामुळे उद््घाटन बारगळले.
नवीन तहसीलसाठी कोणत्याही विभागावर ताण न पडू देता १ अप्पर तहसीलदार, १ नायब तहसीलदार, ८ लिपिक, २ कारकून व १ वाहनचालक अशा एकूण १३ नियुक्त्यांबाबत कच्चा आराखडाही तयार करण्यात आला. नवीन तहसील कार्यालय हे शहरासाठी राहणार असून सध्याच्या तहसील कार्यालयाकडे ग्रामीणचा भाग राहणार आहे. सध्याच्या तहसील कार्यालयाकडे ८० गावांचा कारभार ठेवण्यात येणार असून नवीन कार्यालयाकडे औरंगाबाद, कांचनवाडी, उस्मानपूरा हे चार सर्कल, पूर्व, मध्य व पश्चिम मतदारसंघातील गावांचा समावेश राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन तहसीलसाठी सुरू असलेले कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांनी अभिलेख कक्ष; तसेच औरंगाबाद तहसील कार्यालयाचीही पाहणी केली होती. यावेळी त्यांनी नवीन तहसील कार्यालयात नागरिकांसाठी स्वच्छतागृह तयार करण्याचे, कार्यालयाच्या परिसरात जलफेरभरण करण्याचे निर्देश दिले होते.हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर काही दिवसातच नवीन तहसील कार्यालयाचे उदघाटन होण्याची चर्चा होती. आता नवीन कार्यालयाचे उद््घाटन २२ जानेवारीला होण्याची शक्यता आहे, २६ जानेवारी या तारखेबद्दलही दबक्या आजावात चर्चा आहे. मात्र इतर कार्यक्रमांमुळे २२ रोजीच उद््घाटन होण्याची शक्यता विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी वर्तवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालक-वाहक झोपले; रकमेसह चावी लांबवली

$
0
0

औरंगाबाद ः चालक - वाहक बसमध्ये झोपल्याची संधी साधत चोरट्यांनी १२ हजार रुपयांसह बसची चावी लंपास केली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. सुनील वर्मा (रा. बडवाह, मध्यप्रदेश) असे फिर्यादीचे नाव आहे. मध्य प्रदेश राज्यातील इंदूर डेपोमध्ये ते बसवाहक म्हणून कार्यरत आहे. ड्युटी निमित्त ते औरंगाबादेत आले होते. इंदौरला बस नेण्याची वेळ पहाटेची असल्याने रात्री ते व चालक बसमध्येच झोपले होते. ही संधी चोरट्यांनी साधली आणि खिडकीतून बसमध्ये प्रवेश करत फिर्यादीच्या पॅँटमधील १२ हजार रुपयांसह बसची चावी लंपास केली. वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आंतर भारती’ची शहरात स्थापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साने गुरूजी यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी सुरू केलेल्या आंतर भारतीची येथे नुकतीच स्थापना करण्यात आली. गारखेडा परिसरातील यशवंत कला महाविद्यालयात जळगाव येथील प्रा. डॉ. संजय पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. साने गुरूजींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शाखा स्थापनेचा कार्यक्रम पार पडला.

उद्योजक व लोकविकास सहकारी बँकेचे अध्यक्ष अर्जून गायके यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. यावेळी अॅड. डॉ. डी. एस. कोरे, प्रा. व्ही. व्ही. जोशी, प्रतिभा शर्मा, अॅड. सी. ए. शिराळकर, यशवंत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तांबटकर, शिवाजी पाटील, ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. कोरे यांनी प्रास्ताविक केले.

संजय पाटील म्हणाले, देशातील वातावरण तणावपूर्ण, संशयास्पद असताना साने गुरूजींनी सांगितलेल्या प्रेमाच्या मार्गानेच राष्ट्रीय एकात्मता वाढीस चालना मिळेल.

भारतीय ऐक्याचे थोर ध्येय घेऊन चालणारी आंतर भारतीची चळवळ ही नव्या जोमाने सुरू होण्याची गरज आहे. देशाच्या १२ राज्यांत आंतर भारतीच्या शाखा असून मराठवाड्यातही चौथी शाखा सुरू झाली आहे. ही औरंगाबादकरांसाठी आनंदाची

बाब आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन आणखी १२ टक्के वाढीसाठी होते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एसटी कर्मचाऱ्यांना २०१२ - १६च्या वेतन करारात २५ टक्के वेतन वाढ करण्याची मागणी होती. या करारात फक्त १३ टक्के वेतनवाढ पूर्वीच करण्यात आली आहे. आता आणखी १२ टक्के वाढीसाठी आंदोलन कररण्यात आले होते, असे स्पष्टिकरण इंटक कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष मुकेश तिगोटे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

राज्यात वेतनवाढीसाठी इंटक संघटनेनं १६ आणि १७ डिसेंबर रोजी एसटी बेमुदत संप पुकारला होता. इंटकचे कार्याध्यक्ष मुकेश ति‌गोटे यांनी, संप यशस्वी झाला असून, कामगारांना ड्यूटी कम्प्युटरच्या मदतीने दिली जाईल.

या आंदोलनात राज्यातील ८५ हजार एसटी कामगार सहभागी झाले होते. या कामगारांवर कारवाई करण्यासाठी मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधिकारी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अशी कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे सूचित केले. काम नाही तर दाम नाही, या धर्तीवर वेतनात कपात केली जाणार असल्याची माहितीही तिगोटे यांनी दिली.

एक जानेवारीपासून २५ टक्के पगार वाढ मिळणार का, या प्रश्नाच्या उत्तरात तिगोटे म्हणाले, 'इंटकच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. २०१२ - १६साठी कामगार वेतन करारात २५ टक्के वेतन वाढ करण्याची आम्ही मागणी केली होती. वेतन करारात १३ टक्के वेतनवाढ यापूर्वीच मंजूर केले आहेत. उर्वरित १२ टक्के वेतनवाढ मिळावी, यासाठी आंदोलन करण्यात आले होते. मंत्र्यांनी ही वाढ मान्य केली असून, आगामी करारात १२ टक्के वेतनवाढ मान्य करण्यात येणार आहे.'

ती जबाबदारी आमची नाही
या आंदोलनात दोनशेपेक्षा अधिक एसटी बसचे टायर पंक्चर करण्यात आले होते. याप्रकरणात संघटनेची भूमिका विचारले असता, 'टायर पंक्चर करण्याचे काम आम्ही केले नाही. हे आंदोलन अयशस्वी करण्यासाठी विरोधी संघटनेने केलेले कृत्य आहे. ही आमची जबाबदारी नाही.' यावेली परिषदेत इंटकचे राज्य सरचिटणिस लिपने पाटील, संघटक सचिव सुरेश जाधव, चिकलठाणा कार्यशाळेचे सचिव साहेबराव निकम, विभागीय सचिव जे. एस. ढाकणे यांच्यासह काँग्रेसचे शेख अथर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेट परीक्षेत विद्यार्थी वेळ संपेपर्यंत वर्गातच!

$
0
0

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे रविवारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) घेण्यात आली. औरंगाबाद परीक्षा केंद्राहून ८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दोन टप्पात झालेल्य परीक्षेत घेण्यात आली. पेपरसाठी देण्यात आलेला वेळ संपल्यानंतरच वर्गाच्या बाहेर परीक्षार्थींनी जायचे हा आदेश विद्यार्थ्यांनी अनुभवला.

प्राध्यापकपदासाठीची नेट परीक्षा आज घेण्यात आली. ८३ विषयांसाठी होणारी ही परीक्षा देशातील ८८ शहरातील परीक्षा केंद्रावरून घेण्यात आली. सीबीएसई घेण्यात आलेली परीक्षा दोन टप्पयात झाली. पहिल्या सत्रात दोन पेपर होणार आहे. सकाळी साडेनऊ ते पावणेदहा व सव्वाअकरा ते दुपारी साडेबारा या वेळेत परीक्षा घेण्यात आली. दुपारच्या सत्रातील पेपर दोन ते साडेचार यादरम्यान झाला. वेळेच्या आधी प्रश्नपत्रिका सोडल्यानंतरही परीक्षार्थींना बाहेर जाता आले नाही. वेळ पूर्ण झाल्यानंतरच परीक्षार्थींनी बाहेर जावे, असे आदेश देण्यात आले. त्यामुळे अर्धातास आधी पेपर सोडविलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा हॉल सोडता आला नाही.

या आदेशामुळे अनेकांना ताटकळत बसावे लागले. नेट परीक्षेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत कॉलेजांमधील सुमारे ८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाचे शहरात तीन महासंगम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संघशाखेच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व नि:स्वार्थ सेवेचा संस्कार नियमितपणे घडत असतो, हाच वैभवशाली व बलशाली राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे, असे मत राष्ट्रय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे संचालक अनिल भालेराव यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भगतसिंगनगर, मयूरपार्क, हर्सूल परिसरातील स्वयंसेवकांसाठी ऑडिटर सोसायटी येथील उद्यानात 'भगतसिंगनगर महासंगम' या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून संस्कार प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष जगदीश देसले, भगतस‌िंगनगरचे संघचालक डॉ. विशाल ढाकरे हे उपस्थित होते.
भालेराव म्हणाले, 'दुसऱ्याचे दु:ख ते आपले दु:ख व दुसऱ्याचे सुखात आपले सुख पाहण्याचा संस्कार, कडवी शिस्त , खिलाडूवृत्ती, कुटुंबसमाज व राष्ट्रासाठी कष्ट सोसण्याची प्रवृत्ती या सद्गुणांची जोपासना संघाच्या दैनंदिन कार्यक्रमातून नकळत घडत जाते. संघाने देशभरातील दीड लाखांवरील सेवाकार्याच्या माध्यमातून सेवावृत्तीचा आदर्श घालून दिला आहे.' सुरुवातीला स्वयंसेवकांनी दैनंदिन शाखा, धृतयोग, सूर्यनमस्कार व समता याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविले. देसले यांनी या वेळी संघाच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीबद्दल गौरवोद्गार काढले. सुनील देशमुख यांनी प्रास्ताविक केले. हरीश वाघ यांनी आभार मानले.

श्रीरामनगरात महासंगम
समाजाच्या पुरुषार्थाला आवाहन करून सामाजिक एकात्मता प्रस्थापित होईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. संघाच्या श्रीरामगनगराचा महासंगम कार्यक्रम ज्ञानेश विद्या मंदिरच्या मैदानावर पार पडला. यावेळी ते बोलत होते. या महासंगमला प्रमुख पाहुणे म्हणून संतोष चौधरी उपस्थित होते. व्यासपीठावर नगर संघचालक अजय तल्हार यांची उपस्थिती होती. श्रीरामनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा या भागातील स्वयंसेवक व नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. संघ कार्याचा विस्तार संपूर्ण जगभर झाला आहे. जगातील ६५देशात शाखा असून, देशातील सर्व जिल्ह्यात संघाचे काम पोहचले आहे. देशभरात दीड लाखावर सेवा कार्य संघाच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली. स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिके करून दाखविली.

विश्वकर्मानगरमध्ये महासंगम
'संघाचे वाढते काम आणि एकंदरीतंच त्यात होत असलेले संस्कार युवापिढीला प्रेरणादायी आहेत, संघाला सध्या नागरिकांकडून वेळ हवा आहे राष्ट्रनिर्मितीच्या काळात संघाला तुमच्याकडून वेळ हवा आहे. तो वेळ द्या,' असे आवाहन गोसेवा समितीचे प्रांतकार्यवाह सुधीर विध्वंस यांनी केले. सेव्हन हिल्स, सिडको बस स्टँड, आंबेडकरनगर, सिडको जकात नाका आणि पुन्हा सेव्हन हिल्स या विश्वकर्मानगराचा महासंगम रविवारी झाला. वेणूताई चव्हाण शाळेसमोरील संघशाखा परिसरात झालेल्या या महासंगमाच्या व्यासपीठावर यावेळी मोहन कुलकर्णी, डॉ. विनोदकुमार भाला यांची उपस्थिती होती.्र यावेळी विध्वंस म्हणाले, 'मुले, तरुण, सेवानिवृत्त यांच्यासाठी शाखेत वेगवेगळे कार्यक्रम चालत असतात. सध्या संघ विस्तारत आहे. यासाठी विविध जबाबदारी स्वत:हून उचलणारे स्वयंसेवक हवे आहेत. संघाचा भाग व्हा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडोबा दर्शनासाठी भाविकांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
साताऱ्यातील प्रसिद्ध अशी खंडोबाची मुख्य यात्रा संपली असली तरी, दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. रविवारी (२७ डिसेंबर) प्रचंड गर्दी झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले होते.

रविवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. पहाटे ३ पासूनच अभिषेकाला सुरुवात झाली. त्यानंतर महिला व पुरुषांच्या मिळून चार रांगा या मंदिराच्या मागच्या बाजूच्या पश्चिमेकडच्या

दरवाजापर्यंत लागल्या होत्या. भाविकांना दर्शनासाठी एक ते दीड तास लागत होता. गर्दी झाल्यामुळे विश्वस्तांना पोलिसांना पाचारण करावे लागले. पौंष महिना संपेपर्यंत छोटी यात्रा सुरू असते. त्यामुळे रविवारी गर्दी जास्तच असते.

पूर्वेकडील बाजूने येणाऱ्या रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे. त्याच्या बाजूचे चेंबर दिवसपूर्वीच फुटले आहे, परंतु त्याचे काम न झाल्यामुळे रस्त्यावर सांडपाणी पसरून दुर्गंधी पसरली आहे. भाविकांना याचा त्रास सहन करावा लागला. चेंबरच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images